Wednesday, 17 August 2016

नमस्कार लाईव्ह १७-०८-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
1- तुर्कस्तानमध्ये होणार 38 हजार कैद्यांची सुटका 
2- अमेरिका, युरोपने पाठिंबा द्यावा - बलुचिस्तानातील नेत्यांची मागणी 
3- भारत-बांगलादेशतर्फे 1971 च्या युद्धावर माहितीपट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
4- काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा - भारत 
5- शिवसेनेच्या मंत्र्यावर ५०० कोटीच्या घोटाळयाचा आरोप 
6- किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी 
7- केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या पत्नीला धमकी 
8- दिल्लीत यंदा नवे दारूचे दुकान नाही- केजरीवाल 
9- भ्रष्ट सरकारला जनता मतदान कशी करते- ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
10- बालगोविंदा आणि हंडीच्या २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बंदी कायम 
11- दहीहंडी कार्यक्रमात 18 वर्षांखालील गोविंदांवर बंदीच 
12- ड्रायव्हिंग परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करा - राज ठाकरे 
13- भ्रष्ट सरकारला जनता मतदान कशी करते- ठाकरे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
14- कोईमबतोर; पतीला संपवण्यासाठी खोलीत सोडला साप 
15- नागपूर; मागवला मोबाईल, मिळाला दगड! 
16- 'क्लोन' क्रेडीट कार्डने नर्गिस फाखरीची ६ लाखांना फसवणूक 
17- वसई; वसई : वादग्रस्त आशिर्वाद प्रार्थना केंद्राचे संचालक सेबेस्टीन मार्टिन यांचे निधन 
18- बलात्कार, खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना फाशी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
19- दीपा, जीतू राय यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस  
20- आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये टीम इंडिया नंबर १ 
21- दीपा, जीतू राय यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस ? 
22- क्रिकेटर रवींद्र जाडेजाला 6 लाखांना लावला चुना ! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
शुद्ध शाकाहारी, होम मेड, संपूर्ण महाराष्ट्रात होम-डिलिव्हरी उपलब्ध 
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा 
=====================================

काश्मीरवर नको, दहशतवादावर चर्चा करा - भारत

  • First Published :17-August-2016 : 17:00:00Last Updated at: 17-August-2016 : 17:25:36

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १७ -  काश्मीर मुद्यावर परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेचा पाकिस्तानने दिलेला प्रस्ताव बुधवारी भारताने फेटाळून लावला. काश्मीरवर नाही पण सीमेपलीकडून होणा-या दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करा ही काश्मीरमधली सद्यस्थितीमधील मुख्य समस्या आहे असे भारताने स्पष्ट केले. 
    पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ अहमद चौधरी यांच्या निमंत्रणावर भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी इस्लामाबादला जाण्याची इच्छा व्यक्त केली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बामबावले यांनी भारताचे उत्तर पाकिस्तानला कळवले आहे. 
    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात बलुचिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानने लगेच भारताला काश्मीर मुद्यावर चर्चेचे निमंत्रण दिले होते. काश्मीर मुद्यावर तोडगा काढणे दोन्ही देशांचे कर्तव्य आहे असे पाकिस्तानने निमंत्रण देताना म्हटले होते. 
=====================================

शिवसेनेच्या मंत्र्यावर ५०० कोटीच्या घोटाळयाचा आरोप

  • First Published :17-August-2016 : 16:00:00Last Updated at: 17-August-2016 : 16:36:35

  • ऑनलाइन लोकमत 
    मुंबई, दि. १७ - भाजपा नंतर आम आदमी पक्षाने आता शिवसेनेच्या मंत्र्यांवर आपला मोर्चा वळवला आहे. जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार नेते आणि राज्य सरकारमध्ये मंत्री असणा-या अर्जुन खोतकरांवर आप नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 
    जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खोतकरांनी ५०० कोटींचा घोटाळा केला असा मेनन यांनी आरोप केला. अर्जुन खोतकर जालना एपीएमसी मार्केटमधील घोटाळयाचे सूत्रधार आहेत. जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांविरोधात बोलणा-यांचे खून होतात असा आरोप मेनन यांनी केला. 

=====================================

दीपा, जीतू राय यांची खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस ?

  • First Published :17-August-2016 : 17:00:53

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १७ - रिओ ऑलिम्पिकमध्ये जिमनॅस्टीक्सच्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणारी दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू राय यांची यावर्षीच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात येऊ शकते. राजीव गांधी खेल रत्न भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. 
    वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. जिमनॅस्टीक्समध्ये ५२ वर्षात पात्र ठरलेली दीपा पहिली भारतीय जिमनॅस्ट होती. आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये दीपाने चमकदार कामगिरी केली. अवघ्या ०.१५० गुणांच्या फरकाने तिचे कांस्यपदक हुकले. 
    आपल्या खेळाने दीपाने सर्वांची मने जिंकून घेतली. प्रादूनोवा वॉल्ट या सर्वात धोकादायक प्रकारात तीने आपले प्रावीण्य सिद्ध केले. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात जीतू राय जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये जीतूनेही अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्याला पदकावर नेम साधता आला नाही. 

=====================================

आयसीसी टेस्ट रँकींगमध्ये टीम इंडिया नंबर १

  • First Published :17-August-2016 : 17:13:37

  • ऑनलाइन लोकमत 
    नवी दिल्ली, दि. १७ - आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाने पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले आहे. कोलंबो कसोटीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर १६३ धावांनी विजय मिळवताच भारताचे टेस्ट रँकिंगमध्ये पहिले स्थान निश्चित झाले. 
    पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात ३-० असा विजय मिळवून ११२ गुणांसह भारताला आपले पहिले स्थान कायम राखता येईल. चौथी कसोटी भारताने अनिर्णित राखली तर, ११० गुणांसह भारताची दुस-या स्थानी आणि पराभव झाला तर, १०८ गुणांसह चौथ्या स्थानी घसरण होईल. 
    पाकिस्तान १११ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी अनिर्णित राखली तर, भारताची दुस-या स्थानावर घसरण होईल. पाकिस्तानने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर विजय मिळवून मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर ३-० असा विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला १० गुण गमवावे लागले व त्यांची तिस-या स्थानी घसरण झाली. 

=====================================

पतीला संपवण्यासाठी खोलीत सोडला साप

  • First Published :17-August-2016 : 15:30:00Last Updated at: 17-August-2016 : 17:49:22

  • ऑनलाइन लोकमत 
    कोईमबतोर, दि. १७ - अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणा-या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. विशेष म्हणजे या हत्येमध्ये सर्पदंशाचा प्रयत्न झाला. तामिळनाडूतील कोईमबतोर शहरात हे हत्याकांड घडले. पतीचा मृत्यू ही हत्या नसून दुर्घटना वाटावी यासाठी सापाचा वापर केला. 
    या प्रकरणातील आरोपी सुंदरमचे शारदा बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. शारदला प्रेमसंबंधात पती सक्तीवेलचा अडथळा वाटत होता. म्हणून तिने पती सक्तीवेलला संपवण्यासाठी सुंदरमला १५ हजार रुपये दिले. नंतर जिम काढण्यासाठी तिने सुंदरमला पाच लाख देण्याचे आश्वासन दिले होते. 
    आधी त्यांनी सापाच्या विषप्रयोगाचा प्रयत्न केला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पत्तानपुदूर येथे एक विषारी साप पकडला व सक्तीवेलच्या खोलीत सोडला. पण साप सक्तीवेलला दंश न करता तिथून निघून गेला. त्यामुळे दोघांनी सक्तीवेलला मारहाण करुन संपवण्याचा निर्णय घेतला. 
    आठ ऑगस्टला सुंदरम, कृष्णा आणि शारदाने लाकडी काठीने सक्तीवेलला जीव जाईपर्यंत बेदम मारहाण केली. सक्तीवेलचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह घराच्या टाकीत टाकून दिला. कृष्णा  सुंदरमच्या दुकानात नोकरी करतो. नऊ ऑगस्टला या प्रकरणी शारदाला अटक झाल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. 
=====================================

मागवला मोबाईल, मिळाला दगड!

  • First Published :17-August-2016 : 04:57:33

  • नागपूर : आॅनलाईन विक्रीत आघाडीवर असलेल्या स्नॅपडील कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पाच जणांविरुद्ध येथील एका वकिलाने फसवणुकीची तक्रार अंबाझरी पोलिसांत दिली आहे. नऊ हजार मोजून त्यांच्या हाती मोबाईल म्हणून सिमेंटचा दगड असलेले पार्सल पडले. याबाबत तक्रार करुनही कोणीच दाद न दिल्याने आपण पोलिसांकडे धाव घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
    अ‍ॅड. अंकुर कपले यांनी ९ आॅगस्टला ९,२४५ रुपयांच्या मोबाईलची आॅर्डर नोंदविली. १४ आॅगस्टला ५.१५ वाजता कुरियर बॉय पार्सल घेऊन आला. त्याच्याकडे पैसे देऊन त्यांनी पार्सल ताब्यात घेतले. एक्स्प्रेस डिलेव्हरी एन जी हॅटिनेस, असे इंग्रजीत मजकूर असलेले पार्सल उघडल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यात मोबाईलऐवजी सिमेंटचा दगड होता. याबाबत त्यांनी कुरियर बॉयसह विविध संबंधितांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी दाद दिली नाही. परिणामी आपली फसवणूक झाल्याने शेवटी त्यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. 
=====================================

किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी

  • First Published :17-August-2016 : 04:25:02

  • मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणाचा अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) सखोल तपास करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी ईडीने मुंबई पोलिसांकडून गुन्ह्यांची कागदपत्रे मागविली आहेत. या रॅकेटमधून मनी लॉड्रिंगच्या
    दिशेने ईडीकडून तपास करण्यात येत आहे.
    या गुन्ह्यांत हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना अटक झाल्यानंतर या गुन्ह्यांचे गांभीर्य आणखीनच वाढले. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करत ईडी मनी लॉड्रिंग अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत आहेत. मात्र यामध्ये जर पोलीस अथवा सीबीआयने पैशांच्या देवाणघेवाणीचा गुन्हा दाखल केला असेल तरच ईडी
    हा गुन्हा नोंदवू शकते. त्यामुळे यामध्ये दाखल गुन्हा, त्यातील
    डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कनेक्शनचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान झालेल्या पैशांचा व्यवहार, त्यामधील सहभागांची पाळेमुळे खणून काढण्याचा ईडीचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.
=====================================

'क्लोन' क्रेडीट कार्डने नर्गिस फाखरीची ६ लाखांना फसवणूक

  • First Published :17-August-2016 : 13:00:00Last Updated at: 17-August-2016 : 14:50:24

  • ऑनलाइन लोकमत  
    मुंबई, दि. १७ - अभिनेत्री, मॉडेल नर्गिस फाखरीच्या अपरोक्ष तिच्या क्रेडीट कार्डचा वापर करुन तिची ६ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नर्गिसला या फसवणूकीची माहिती मिळताच तिने बँकेशी संपर्क साधून कार्ड ब्लॉक केले आणि मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. 
    नर्गिसच्या क्रेडीट कार्डचे क्लोनिंग करुन तिची फसवणूक करण्यात आली. ठगाने कार्डचे क्लोनिंग करुन अमेरिकेत सर्व व्यवहार करत एकूण ९०६२ डॉलर्स खर्च केले. 
    क्लोन कार्डावरुन कोणतीही वस्तू खरेदी झाली नाही फक्त पैसे काढण्यासाठी वापर झाला असे जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी सांगितले. कार्डावरुन व्यवहार झाले तेव्हा नर्गिस मुंबईत होती. मोबाईल संदेशावरुन तिला या व्यवहाराची माहिती मिळाली. 
=====================================

वसई : वादग्रस्त आशिर्वाद प्रार्थना केंद्राचे संचालक सेबेस्टीन मार्टिन यांचे निधन

  • First Published :17-August-2016 : 12:30:00Last Updated at: 17-August-2016 : 13:21:28

  • ऑनलाइन लोकमत
    वसई, दि. १७ -  भुईगाव येथील वादग्रस्त आशीर्वाद प्रार्थना केंद्राचे प्रमुख संचालक पास्टर सेबेस्टीन मार्टिन (58) यांचे आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. 
    प्रार्थना केंद्रात प्रार्थनेच्या नावाखाली बुवाबाजी चालत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी मार्टिन सह त्यांच्या 3 सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच प्रांताधिकार्यानी केंद्र बंदही केले होते. 
    याविरोधात मार्टिन समर्थकांनी मोर्चा कडून केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. 
    तीन महिन्यापूर्वी केंद्र सुरू झाले होते. पण मार्टिन डायबिटीस व ब्लडप्रेशर मुळे आजारी असल्याने केंद्रात येत नव्हते.  अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले. आज दुपारी  साडेचार वाजता भुईगाव चर्चमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
=====================================

बालगोविंदा आणि हंडीच्या २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर बंदी कायम

  • First Published :17-August-2016 : 13:15:00Last Updated at: 17-August-2016 : 14:26:22

  • ऑनलाईन कायम 
    मुंबई, दि. १७ - दहीहंडी उत्सव जवळ आला असताना सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवासंबंधी महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा २०१४ सालचा निर्णय कायम ठेवला आहे. 
    या निर्णयानुसार बाल गोविंदावरील बंदी कायम ठेवताना दहीहंडींची कमाल उंची २० फुटांपेक्षा जास्त नसावी असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या नियमांबद्दलचा संभ्रम दूर झाला आहे.
    सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे १८ वर्षांखालील गोविंदांना दहीहंडी पथकात सहभागी होता येणार नाही. दहीहंडी नियमांबद्दल सुस्पष्टता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. 
    मुंबईत दहीहंडी उत्सव न रहाता इव्हेंटचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंबईत गलोगल्ली लागणा-या लाखो रुपयांच्या हंडया फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये जीवघेणी स्पर्धा वाढत चालली होती. यामध्ये हंडी फोडताना पडून अनेक गोविंदा जखमी व्हायचे. काहींचा मृत्यू व्हायचा. म्हणून दहीहंडी उत्सवाला नियमांमध्ये बसवण्यासाठी उच्च न्यायालयाच याचिका दाखल झाल्या होत्या. 
    उच्च न्यायालयाने हंडीतील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन हंडीची उंचीवर काही मर्यादा आणल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या या निकालामुळे विक्रमी उंची गाठण्याची स्पर्धा करणारी गोविंदा पथके निराश होणार आहेत. 
    ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचे संघर्ष, सचिन भाऊ अहिर यांचे संकल्प दहीहंडी उत्सवाचे मुख्य आयोजक आहेत. गेल्यावर्षी जाचक नियमांचा कारण पुढे करुन या दोन्ही नेत्यांनी दहीहंडीचे आयोजन टाळले होते. 

=====================================

ड्रायव्हिंग परवान्यासाठी मराठी भाषेची सक्ती करा - राज ठाकरे


  • ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. १७ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी सकाळी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'वर्षा' बंगल्यावर दाखल झाले. सुमारे अर्धा तास ;चाललेल्या बैठकीत राज ठाकरे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात नाशिकमधील पूर, मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे तसेच मराठी तरूणांना ड्रायव्हिंगचा परवाना अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. 
    आज दुपारी 'कृष्णकुंज' येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यांसंबधी माहिती दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंबंधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मोठी गाजावाजा केला मात्र अद्याप तसे काही घडलेले नाही. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषा मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
    यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा उचलून धरत राज्यातील तरूणांनाच ड्रायव्हिंगचा परवाना देण्याची मागणी केली. ज्यांना ड्रायव्हिंग परवाना हवा असेल त्यांना मराठी भाषा येणे बंधनकारक केले पाहिजे, तसेच डोमिसाईल सर्टीफिकेट्सही सक्तीची करावीत, असेही राज म्हणाले. 
    मुसळधार पावासामुळे नुकताच आलेल्या पुरामुळे नाशिकचे अतोनात नुकसान झाले असून त्याच्या भरपाईकरता काही रकमेची तरतूद राज्याने करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे राज यांनी सांगितले. 
    आजच्या भेटीदरम्यान राज यांच्यासोबतबाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आदी  मनसे नेतेही उपस्थित होते. या दोघांची गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी भेट असून यापूर्वी 'नीट' परीक्षेप्रश्नी राज मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले होते. पुढील वर्षी होणा-या मुंबई पालिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण हळूहळू तापत असताना मुख्यमंत्री फडणवीस व राज यांच्या वाढत्या भेटींचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
=====================================

No comments: