*[अंतरराष्ट्रीय]*
१- रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्रकारांच्या बसवर गोळीबार, 3 जण जखमी
२- डोनाल्ड ट्रम्प यांची हिलरी क्लिंटनना जीवे मारण्याची धमकी ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राष्ट्रीय]*
३- चेन्नई; रेल्वेतील सर्वात मोठा दरोडा, चालत्या ट्रेनचं छत फोडून सुमारे 5 कोटी रुपये लंपास
४- देशातील पर्यटनस्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन'
५- प्रसुती रजा 26 आठवडे करण्याचा प्रस्ताव, विधेयक आज संसदेत
६- हृदय प्रत्यारोपणासाठीही ड्रोनचा वापर होणार
७- आत्महत्या रोखण्यासाठी सरसावले ‘अनिल’चे हात
८- मोदींना 'कोलांटीउडी'त मिळेल पदक- दिग्विजयसिंह
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[राज्य]*
९- अभिनेत्री हेमांगी कवी, सुहास परांजपेला म्हाडाची लॉटरी
१०- आता 4 वर्षांवरील मुलांना बाईकवर हेल्मेट सक्ती?
११- रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असे कंत्राटदारांकडून लिहून घ्या : हायकोर्ट
१२- किडनी रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांना अटक
१३- भिकाऱ्यांच्या नावे मुंबईतील मोक्याच्या जमिनीवर भुजबळांचा डल्ला?
१४- खासदारांनो, मोबाईलला चिकटून राहू नका!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[प्रादेशिक]*
१५- जाडेजाला सिंहासोबतचा सेल्फी पडला महागात; 20,000 दंड
१६- घराबाहेरची गर्दी महान अभिनेता असल्याचे लक्षण नाही - नसीरुद्दीन शहा
१७- महाड दुर्घटना : वडील अत्यवस्थ असतानाही 'त्यांनी' बजावले कर्तव्य
१८- 'हिंदूंचे निर्दालन रोखण्यासाठी हे करावेच लागेल'
१९- रग्बीच्या मैदानावर जिंकले 'त्या' दोघींचे प्रेम
२०- यकृत दानाने वाचवले वडिलांनी मुलीचे प्राण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*[इतर]*
२१- सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट 7’ने बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले!
२२- 'आयर्न लेडी' कॅटनिका होजूची सुवर्णची हॅट्ट्रीक
२३- मायकल फेल्प्सला 21वं ऑलिम्पिक सुवर्णपदक
२४- Rio 2016 : भारतीय बॉक्सर विकास क्रिशनची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक
२५- सानिया-मार्टिना विभक्त, टेनिस दुहेरीतील साथ संपुष्टात
२६- जलतरणपटू मायकेल फेल्प्सची 'गोल्डन' कामगिरी, जिंकलं 21वं सुवर्णपदक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र What's App वर मिळविण्यासाठी आपल्या What's App ग्रुपमध्ये 8975495656 व 8975485656 हे दोन्ही नंबर Add करा *

काय आहे प्रकरण?
भीक मागून जगणाऱ्यांचं आयुष्य दुसऱ्याच्या कर्मावर अवलंबून असतं. पण आपल्या नावावर कुणीतर कुबेर बनू शकतो, हे त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. घोटाळा म्हणजे काय हे कदाचित त्यांच्या गावीही नसेल. एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या
नावाचीही फाईल असेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नसेल आणि आपल्या नावावर असलेलं घर मंत्री आणि सरकारी बाबूंच्या नावावर झाल्याचं त्यांना माहितही नसेल. याच महाघोटाळ्याचा ‘एबीपी माझा’ने पर्दाफाश केला आहे.
चेंबूरमधली 1 लाख 13 हजार 924 स्क्वेअर मीटरची एक सरकारची जमीन. जी राखीव होती बेघर आणि भिकाऱ्यांसाठी. याच जमिनीवर झाला आहे 2 हजार 500 कोटींचा महाघोटाळा. ज्याचे कर्तेधर्ते माजी मंत्री छगन भुजबळ असल्याचा आरोप आहे. भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे. भिकाऱ्यांवर कारवाई करुन पोलीस त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवतात. तिथे झाडू बनवणे, मेणबत्त्या बनवणे अशी कामं शिकवून त्यांना पायावर उभं केलं जातं.

गेल्या वर्षभरात सानिया आणि मार्टिनानं नऊ किताब आणि डब्ल्यूटीए विजेतेपद जिंकून महिला दुहेरीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्या दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सानियानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली होती. सानिया यापुढच्या काळात चेक रिपब्लिकच्या बार्बरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळणार असून, अमेरिकेची कोको वॅन्देवेघे ही मार्टिनाची जोडीदार बनली आहे.

अभिनेत्री हेमांगी कवी, सुहास परांजपेला म्हाडाची लॉटरी
मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घराची अर्थात म्हाडाची लॉटरी आज जाहीर होत आहे. 972 घरांची सोडत सुरु आहे. या सोडतीकडे मुंबईत स्वतःचं घर असावं, असं स्वप्न उराशी बाळगून अर्ज केलेल्या अर्जदारांचे डोळे लागले आहेत.
LIVE : अभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपेला म्हाडाची लॉटरी
LIVE UPDATE : म्हाडाची सदनिका जुनी असल्यास म्हाडाकडून दुरुस्ती करुन दिली जाईल – रविंद्र वायकर गृहनिर्माण राज्यमंत्री
– म्हाडाच्या घरांच्या सोडतीला सुरुवात, कमलेश चौहान, वर्षा माने, निलेश सबरदांडे पहिले तीन विजेते
पुनर्विकास प्रकरणात बिल्डिंग उभी राहताच रहिवाशांना भाड्याच्या घराचे पैसे देणे बंद करतो..पण पालिकेने oc देण्यापर्यंत त्याने भाडयापोटी पैसे द्यावे यासाठी निर्णय प्रक्रिया सुरु आहे – रविंद्र वायकर, गृहनिर्माण राज्यमंत्री
मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घराची अर्थात म्हाडाची लॉटरी आज जाहीर होत आहे. 972 घरांची सोडत सुरु आहे. या सोडतीकडे मुंबईत स्वतःचं घर असावं, असं स्वप्न उराशी बाळगून अर्ज केलेल्या अर्जदारांचे डोळे लागले आहेत.
972 घरांसाठी तब्बल 1 लाख 35 हजार अर्ज म्हाडाकडे आले आहेत. वांद्रा पश्चिम इथल्या रंगशारदा हॉलमध्ये सकाळी 9 वाजता घरांची सोडत निघणार आहे.
बोरीवली, दहीसर, गोरेगाव, मालाड, मानखुर्द, चेंबूर, कुर्ला आणि पवई येथील घरांसाठी ही लॉटरी आहे. त्यामुळे सोडतीत कोणाचं नशीब चमकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
म्हाडांच्या घरांसाठी कलाकारांचे अर्ज
म्हाडाच्या घरासाठी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम तनुज महाशब्दे, ‘बँडीट क्वीन’ आणि ‘वॉटर’फेम अभिनेत्री सीमा बिस्वास, ‘ती फुलराणी’फेम अभिनेत्री हेमांगी कवी, ‘राधा ही बावरी’फेम अभिनेत्री श्रुती मराठेने अर्ज भरला आहे. याशिवाय शैला काणेकर, मेघना एरंडे, रसिका आगाशे, अनुपमा ताकमोघे, प्राजक्ता हनमघर, किरण सुतावणे, तेज सप्रू, शार्दुल सराफ, गौरव घाटणेकर, मनिष वाधवा, तबलावादक आदित्य कल्याणपूर, किरण कुलकर्णी, प्रतिभा शिंपी यांनीही अर्ज दाखल केला आहे. या कलाकारांनी पवई, प्रतीक्षा नगर, गोरेगाव, जुने मागाठाणे इथल्या घरासाठी अर्ज केला आहे
===========================================
आता 4 वर्षांवरील मुलांना बाईकवर हेल्मेट सक्ती?
नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोटारवाहन कायद्यात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. यानुसार 4 वर्षांवरील मुलांना दुचाकीवर बसताना हेल्मेट घालणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याचसोबत कारमधून प्रवास करत असताना मुलांना सेफ्टी बेल्ट लावणंही अनिवार्य केलं जाण्याची शक्यता आहे.
हा कायदा मोडणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. मात्र पगडी परिधान करणाऱ्या शिखांना या नियमातून वगळण्यात आलं आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हे विधेयक लोकसभेत सादर करताना राजकीय पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केलं आहे. देशात रस्ते अपघातात दररोज 400 लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे हे विधेयक मंजूर झालं तर अनेकांचे जीव वाचू शकतात.
या विधेयकात ड्रिंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ट्रॅफिक पोलिसांकडे दंड ठोठावण्यासोबतच नियम तोडणाऱ्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी रद्द करण्याचाही अधिकार असेल.
===========================================
रेल्वेतील सर्वात मोठा दरोडा, चालत्या ट्रेनचं छत फोडून सुमारे 5 कोटी रुपये लंपास
चेन्नई : देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडा चेन्नईत पडला आहे. चालत्या ट्रेनमधून सुमारे 5 कोटी 75 लाख रुपये दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. धक्कादायक म्हणजे चालत्या ट्रेनच्या छताला भगदाड पाडून दरोडा टाकल्याचं समोर आलं आहे. तामिळनाडूतील सलेममध्ये ही दरोड्याची घटना घडली.
सलेम-चेन्नई एक्स्प्रेसमधून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पैसे नेले जात होते. या ट्रेनमध्ये 226 बॉक्समध्ये तब्बल 340 कोटी रुपयांची रोख रक्कम होती. यापैकी दोन बॉक्स दरोडेखोरांनी लंपास केल्याचं निदर्शनास आलं आहे.

रेल्वे पोलिसांमधील वरिष्ठ अधिकारी एम रामासुब्रमनी यांनी सांगितले की, “या दरोड्याप्रकरणी आम्हाला काही धागेदोरे सापडले आहेत. मात्र, ते आताच जाहीर करु शकत नाही. शिवाय, किती रुपयांचा दरोडा पडला आहे, याबाबतही अद्याप ठोस माहिती नाही. सध्या पैशांची मोजणी सुरु आहे. त्यामुळे या क्षणी अधिकृतपणे काही माहिती देऊ शकत नाही. मात्र, जवळपास 5 कोटी रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली असण्याची शक्यता आहे.”
‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, एवढी मोठी रक्कम अर्थातच सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यात नेली जात होती. विशेष म्हणजे पोलीस उपायुक्त या सुरक्षारक्षकांचं नेतृत्त्व करत होते. मात्र, तरीही दरोडेखोरांनी 5 कोटी रुपये एवढ्या भल्यामोठ्या रकमेचा दरोडा टाकला.
===========================================
आता देशातील पर्यटनस्थळांवर 'सेल्फी डेंजर झोन'
नवी दिल्लीः पर्यटनस्थळी सेल्फी घेताना जीव जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात समोर आले आहेत. केंद्र सरकारने या प्रकाराला आळा घालण्यासाठी देशातील प्रमुख पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय सांस्कृतीक आणि पर्यटन मंत्री डॉ. महेश शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. पर्यटनस्थळांवर सेल्फी काढताना जीव जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे सरकारने पर्यटनस्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करण्याचे राज्यांना निर्देश दिले आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
सेल्फीमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात
महेश शर्मा यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून पर्यटन स्थळांवर ‘सेल्फी डेंजर झोन’ तयार करुन तशा सूचना करण्याचे निर्देश दिले आहेत. या ‘सेल्फी डेंजर झोन’वर सीसीटीव्ही लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाला हा विषय गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
===========================================
रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्रकारांच्या बसवर गोळीबार, 3 जण जखमी
रिओ दी जनेरोः रिओ ऑलिम्पिकमध्ये पत्रकारांना घेऊन जात असलेल्या बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 3 जण जखमी झाले आहेत. पत्रकार ऑलिम्पिकच्या वार्तांकनासाठी जात असताना बसच्या खिडकीवर अचानक गोळीबार करण्यात आला.
पत्रकारांच्या या बसमध्ये एकूण 12 जण होते. बसवर अचानक गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये बसच्या खिडकीत बसलेल्या पत्रकरांना काचा लागून जखम झाली आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
गोळीबार की दगडफेक?
दरम्यान बसवर गोळीबार करण्यात आला, की दगडफेक झाली हे अद्याप अस्पष्ट आहे, असं ऑलिम्पिक आयोजन समितीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. बसवर अचानक गोळीबार केल्याचा आवाज आला. त्यामुळे उपस्थित लोक कसलाही विलंब न करता जमिनीवर झोपले, असं एक ब्रिटिश पत्रकार आणि घटनेच्या साक्षीदाराने एपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
===========================================
प्रसुती रजा 26 आठवडे करण्याचा प्रस्ताव, विधेयक आज संसदेत
नवी दिल्ली : संसदेत आज नवं मॅटरनिटी लिव्ह म्हणजेच प्रसुती रजा वाढीचं विधेयक सादर होणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार महिलांना मिळणारी 12 आठवड्यांची प्रसुती रजा आता 26 आठवड्यांची करण्यात येणार आहे.
प्रसुती रजा वाढवण्यास कामगार मंत्रालयाची सहमती
प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली आहे.
रजा 12 आठवड्यांवरुन 26 आठवड्यांची करण्याचा प्रस्ताव
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. त्यात वाढ करून साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे.
सॅमसंग ‘गॅलेक्सी नोट 7’ने बुकिंगचे सर्व रेकॉर्ड तोडले!
मुंबई : गेल्या आठवड्यात लॉन्च झालेला सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. कोरियन हेरॉल्डच्या वृत्तानुसार, दोन दिवसात तब्बल 2 लाख ग्राहकांनी स्मार्टफोनसाठी पूर्वनोंदणी केली आहे.
विशेष म्हणजे ही संख्या स्मार्टफोन ‘गॅलेक्सी S7’च्या पूर्वनोंदणीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे ‘गॅलेक्सी नोट 7’ स्मार्टफोनची ग्राहकांमधील उत्सुकता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते आहे.
===========================================
मायकल फेल्प्सला 21वं ऑलिम्पिक सुवर्णपदक
फोटो सौजन्य : @Olympics ट्विटर हॅण्डल
रिओ दी जानेरो : अमेरिकेचा विश्वविक्रमवीर जलतरणपटू मायकल फेल्प्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मायकल फेल्प्सने आधी 200 मीटर बटलफ्लाय प्रकारात आणि मग फोर बाय टू हंड्रेड मीटर फ्रीस्टाईल रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
मायकल फेल्प्सचं रिओ ऑलिम्पिकमधील आतापर्यंतच तिसरं सुवर्णपदक आहे. तर ऑलिम्पिकमधलं हे 21वं सुवर्णपदक ठरलं असून फेल्प्सच्या नावावर आता ऑलिम्पिकमध्ये एकूण 25 पदकं जमा झाली आहेत. फेल्प्सने सोमवारी फोर बाय हंड्रेड फ्रीस्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
फेल्प्सने त्याच्या पहिल्याच म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 6 सुवर्ण आणि 2 कांस्य पदकाची कमाई करुन विक्रम रचला होता. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्णपदकं खिशात टाकली होती. 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये फेल्प्सने 4 सुवर्ण आणि 2 रौप्य पदक आणि आताच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
===========================================
Rio 2016 : भारतीय बॉक्सर विकास क्रिशनची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक
रिओ दी जनैरो : भारताचा बॉक्सर विकास क्रिशननं रिओ ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली आहे. पुरुषांच्या 75 किलो वजनी गटाच्या या सामन्यात विकास क्रिशननं अमेरिकेच्या चार्ल्स कॉनवेलचा 3-0 असा धुव्वा उडवला.
विकासचं निर्विवाद वर्चस्व
24 वर्षांच्या विकासनं या सामन्यात अगदी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. विकासनं पहिल्या फेरीत तिन्ही पंचांकडून प्रत्येकी 10 गुणांची कमाई करुन चार्ल्स कॉनवेलवर 3 गुणांची आघाडी घेतली. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही विकासनं चार्ल्स कॉनवेलला डोकं वर काढूच दिलं नाही.
उपउपांत्यपूर्व फेरीत तुर्कीच्या ऑन्डेर सिपालचं आव्हान
विकास क्रिशनसमोर उपउपांत्यपूर्व फेरीत आता तुर्कीच्या ऑन्डेर सिपालचं आव्हान असेल. विकास आणि ऑन्डेरमधला हा सामना भारतीय वेळेनुसार 13 ऑगस्टला पहाटे पावणेचार वाजता खेळवला जाईल.
===========================================
रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असे कंत्राटदारांकडून लिहून घ्या : हायकोर्ट
मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर यापुढे खड्डे पडणार नाहीत, असं कंत्राटदारांकडून लिहून घ्या, असे आदेश मुंबई हायकोर्टानं महापालिकेला दिले आहेत. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास झाल्याचा अनुभव न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी सुनावणीच्या वेळी सांगितला.
दक्षिण मुंबई ते बोरिवलीचा प्रवास खड्ड्यामधून करावा लागतो. त्यामुळे हा त्रास झाल्याचा किस्साही कानडे यांनी सांगितला. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र त्याची वेळेवर देखभाल केली जात नाही. त्यामुळे कोर्टानं आता खड्ड्याची जबाबदारी कंत्रादारावर निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्यांवरील खड्डे मुंबईकरांच्या पाचवीला पुजलेले आहेत. त्यात पावसाळ्यात या खड्ड्यांची समस्या अधिक प्रमाणात जाणवते. खरंतर मुंबईकरांना या समस्येची एक प्रकारे सवयच झाली आहे. मात्र, यामुळे पालिकेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संतापही आहे.
===========================================
किडनी रॅकेटप्रकरणी हिरानंदानी रुग्णालयाच्या 5 डॉक्टरांना अटक
मुंबई: मुंबईतील नामांकित हिरानंदानी रुग्णालयातून किडनी रॅकेट प्रकरणी 5 डॉक्टरांना अटक केली आहे. हिरानंदानी रुग्णालयात किडनी रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या 5 डॉक्टरांपैकी एक जण रुग्णालयाचा सीईओ आहे तर एक जण वैद्यकीय संचालक असल्याची माहिती समजते आहे.
मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. किती वर्षापासून हे रॅकेट सुरु होतं याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
याप्रकरणी पुरावा मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन पाचही डॉक्टरांना बेड्या ठोकल्या आहेत. उद्या या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत त्यांनी किती जणांचं अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण केलं आहे याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
===========================================
भिकाऱ्यांच्या नावे मुंबईतील मोक्याच्या जमिनीवर भुजबळांचा डल्ला?
मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी भिकाऱ्यांच्या नावावरील मुंबईतील मोक्याचे भुखंड लाटल्याची बातमी ‘एबीपी माझा’नं दाखवली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आहे. विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बोलावण्यात आली असून या बैठकीनंतर स्वतः चंद्राकांतदादा स्पष्टीकरण देणार आहेत.
काय आहे प्रकरण?
भीक मागून जगणाऱ्यांचं आयुष्य दुसऱ्याच्या कर्मावर अवलंबून असतं. पण आपल्या नावावर कुणीतर कुबेर बनू शकतो, हे त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. घोटाळा म्हणजे काय हे कदाचित त्यांच्या गावीही नसेल. एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या
नावाचीही फाईल असेल याची त्यांना यत्किंचितही कल्पना नसेल आणि आपल्या नावावर असलेलं घर मंत्री आणि सरकारी बाबूंच्या नावावर झाल्याचं त्यांना माहितही नसेल. याच महाघोटाळ्याचा ‘एबीपी माझा’ने पर्दाफाश केला आहे.
चेंबूरमधली 1 लाख 13 हजार 924 स्क्वेअर मीटरची एक सरकारची जमीन. जी राखीव होती बेघर आणि भिकाऱ्यांसाठी. याच जमिनीवर झाला आहे 2 हजार 500 कोटींचा महाघोटाळा. ज्याचे कर्तेधर्ते माजी मंत्री छगन भुजबळ असल्याचा आरोप आहे. भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे. भिकाऱ्यांवर कारवाई करुन पोलीस त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवतात. तिथे झाडू बनवणे, मेणबत्त्या बनवणे अशी कामं शिकवून त्यांना पायावर उभं केलं जातं.
===========================================
जाडेजाला सिंहासोबतचा सेल्फी पडला महागात; 20,000 दंड
(AP फाईल फोटो)
अहमदाबाद: भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला सिंहांसोबत सेल्फीप्रकरणी गुजरातच्या वनविभागानं वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जाडेजा सध्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजमध्ये असल्यानं त्याचे सासरे हरदेवसिंग सोळंकी यांनी त्याच्या वतीनं दंड भरल्याची माहिती वनविभागानं दिली आहे.
जाडेजासोबतच अभयारण्यातील कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. जून महिन्यात जाडेजानं त्याची पत्नी रिवासह जुनागडच्या गीर अभयारण्याला भेट दिली होती.
अभयारण्यात दोघांनी गाडीतून खाली उतरून सिंहांसोबत फोटो काढले होते. पण वनविभागाच्या नियमांनुसार अभयारण्यात पर्यटकांना गाडीतून खाली उतरण्यास मनाई आहे.
===========================================
सानिया-मार्टिना विभक्त, टेनिस दुहेरीतील साथ संपुष्टात
मुंबई : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या इंडो-स्विस जोडीनं आता टेनिस दुहेरीत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गेल्या वर्षभरात सानिया आणि मार्टिनानं नऊ किताब आणि डब्ल्यूटीए विजेतेपद जिंकून महिला दुहेरीत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्या दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सानियानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली होती. सानिया यापुढच्या काळात चेक रिपब्लिकच्या बार्बरा स्ट्रायकोवाच्या साथीनं खेळणार असून, अमेरिकेची कोको वॅन्देवेघे ही मार्टिनाची जोडीदार बनली आहे.
आता हृदय प्रत्यारोपणासाठीही ड्रोनचा वापर होणार
प्रातिनिधिक फोटो
ठाणे : हृदय प्रत्यारोपणासाठी जेव्हा एखाद्याच्या शरीरातून हृदय बाहेर काढले जाते, तेव्हा ते जीवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना तारेवरची करसरत करावी लागते. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील प्रत्येक क्षण डॉक्टरांसाठी महत्त्वाचा असतो. हा क्षण वाचवण्यासाठी मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पीटलने पुढाकार घेतला असून, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.
कार्डियाक ट्रान्सप्लांट टीमचे हेड डॉ. अन्वय मुळे यांनी फोर्टिस रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ”हृदयाचे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग फोर्टिस रुग्णालय आयआयटीसोबत करणार आहे. या प्रयोगामुळे वाहतूक कोंडीमुळे खर्च होणारा वेळ वाचणार आहे. हृदयाचे वजन अतिशय कमी असते. तेव्हा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत आम्हाला वेळेशीच संघर्ष करावा लागतो.”
ते पुढे म्हणाले की, ” सध्या या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून, यासाठीची आवश्यक परवानगी लवकरच विविध संस्थांसोबतच, पोलीस आणि विमानतळ प्रशासानाकडून घेण्यात येणार आहे.”
जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास हृदयाचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना वेळेची बचत होणार आहे. गेल्या एका वर्षात मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात 23 हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. मुळेंनी यावेळी दिली.
===========================================
डोनाल्ड ट्रम्प यांची हिलरी क्लिंटनना जीवे मारण्याची धमकी ?
- वॉशिंग्टन, दि. 10 - अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन एकमेकांविरोधात वक्तव्य करुन मतदारांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्रडोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरुन अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच हिलरी यांना राजकीय मार्गाने थांबवण्याबद्दल ट्रम्प बोलत होते असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विल्मिंग्टन येथील प्रचारसभेत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार समितीकडून या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 'ट्रम्प जे बोलत आहेत ते धोकायदायक आहे. राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा ठेवणा-या वक्तीने असं हिंसक वक्तव्य करु नये', असं हिलरी क्लिंटन यांचे प्रचार व्यवस्थापक रॉबी मूक बोलले आहेत.विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला आहे. देशाच्या सुरक्षेला ट्रम्प धोक्यात टाकू शकतात, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यात गुप्तचर आणि राजकीय विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे.ट्रम्प यांनी या तज्ज्ञांवर पलटवार करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टनच्या या उच्चभू्र नागरिकांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, आज जगात एवढी गोंधळाची परिस्थिती का निर्माण झाली आहे? ट्रम्प यांच्याबाबत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे की, आमच्यापैकी कोणीही डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार नाही. कारण, विदेशनीतीच्या दृष्टीने ट्रम्प हे अध्यक्ष आणि कमांडर इन चीफ बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. आम्हाला खात्री आहे की, ते जर अध्यक्ष झाले, तर ते अतिशय धोकादायक असतील. देशाची सुरक्षा आणि स्वास्थ्य ते धोक्यात टाकतील.
- डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 'हिलरी क्लिंटन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यापासून बंदुकीची मालकी असणारे किंवा बंदूक वापराच्या हक्कांचं समर्थन करणारे थांबवू शकतात', असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प यांनी अप्रत्यक्षरित्या हिलरी क्लिंटन यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं बोललं जात आहे.
===========================================
जलतरणपटू मायकेल फेल्प्सची 'गोल्डन' कामगिरी, जिंकलं 21वं सुवर्णपदक
- ऑनलाइन लोकमत -रिओ दी जानेरो, दि. 10 - ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सची यशस्वी घोडदौड सुरुच आहे. मायकल फेल्प्सने रिओतील जलतरण स्पर्धेत कारकिर्दीतील 21वं पदक सुवर्णपदक जिंकलं आहे. ४x२०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात मायकल फेल्प्सचा सहभाग असेल्लाय अमेरिकेला सांघिक सुवर्णपदक मिळाले आहे. एकाच दिवशी मायकल फेल्प्सने दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. याअगोदर झालेल्या २०० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्ण पदक मिळवत अगोदरर त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला होता.फेल्प्सचे ऑलिम्पिकमधील हे 21 वे सुवर्णपदक ठरले. त्याने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 25 पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत १९ गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. फेल्प्सला सोमवारी झालेल्या ४x१०० मी. फ्री-स्टाईल रिले प्रकारात सुवर्णपदक मिळाले होते. 21 सुवर्णपदकांसह 25 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.आपल्या पाचव्या ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या ३१ वर्षीय फेल्प्स याने अमेरिका संघाला रेयान हेल्ड, सीलेब ड्रेसल यांच्या साथीने चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात रिले टीमला गोल्ड मिळवून दिले होते. या खेळाडूंनी ३ मिनिटे आणि ९.९२ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदकावर ताबा मिळविला होता.
===========================================
घराबाहेरची गर्दी महान अभिनेता असल्याचे लक्षण नाही - नसीरुद्दीन शहा
- मुंबई, दि. १० - दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी ठरलेले अभिनेता नसीरुद्दीन शहा यांनी पुन्हा एकदा या मुद्यावर वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ' एखाद्याच्या ( अभिनेत्याच्या) घराबाहेर हजारो लोकांची गर्दी झाल्याने तो महान अभिनेता ठरत नाही,' असे नसीर यांनी म्हटले आहे. तसेच ' राजेश खन्ना जिवंत असताना चित्रपटसृष्टीतील लोकांनी त्यांचा किती केला होता' असा प्रश्नही त्यांनी विचारला.मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी त्यांना राजेश खन्नाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या गदारोळबद्दल विचारले असता नसीर यांनी हे वक्तव्य केले. ' माझ्या नजरेत राजेश खन्ना हे साचेबद्ध, निकृष्ट अभिनेता होते' अशी टीका नसीर यांनी केली होती. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागल्यावर तसेच राजेश खन्ना यांची मुलगी व अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिनेही सडेतोड उत्तर दिले होते. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी नसीर यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी दर्शवत त्यांच्यावर टीका केली होती. ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनीही नसीर यांच्या वक्तव्याचा निषेध करत राजेश खन्ना हे निर्विवादपणे स्टार असल्याचे म्हटले होते. ' मी राजेस खन्ना यांच्या बंगल्याबाहेर हजारोंची ( फॅन्स) गर्दी पाहिली होती. ते चित्रपटसृष्टीतील पहिले व शेवटचे सुपरस्टार होते' असे सलीम खान यांनी ट्विटरवर म्हटले होते.
===========================================
महाड दुर्घटना : वडील अत्यवस्थ असतानाही 'त्यांनी' बजावले कर्तव्य
- जयंत धुळप/ऑनलाइन लोकमतअलिबाग, दि. 9 - छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासात नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्तव्याप्रति निष्ठा सांगणारे 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे..' त्यागाचे विधान सर्वश्रुत आहे. त्याचीच प्रचिती महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे शोधकार्य राबवणारे महाडचे पोलीस निरीक्षक रवी शिंदे यांच्या कर्तव्य तत्परतेनं आली. शिंदेंच्या वडिलांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयातल्या आयसीयूमध्ये दाखल केलं. त्यावेळी जीवनाच्या शेवटचे क्षण मोजणा-या त्यांच्या वडिलांनी रवी शिंदे यांना भेटीसाठी सांगावा पाठवला. मात्र कर्तव्यनिष्ठ असणा-या रवींद्र शिंदे शोधकार्यात स्वतःला झोकून दिलं असल्यानं त्यांनी रुग्णालयात जाऊन वडिलांची भेटही घेतली नाही आणि त्यातच वडिलांचं निधन झालं.
===========================================

No comments:
Post a Comment