[अंतरराष्ट्रीय]
१- लॉस एंजिल्स; ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली
२- अमेरिका गरीब देश बनलाय - ट्रम्प
३- आधुनिक तंत्रज्ञानामुळेही वाढतेय ग्लोबल वॉर्मिंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बळीराजासाठी मोदींचं हायटेक पाऊल, किसान सुविधा अॅप लाँच
५- शफकत अलींनी म्हटले चुकीचे पाकचे राष्ट्रगीत
६- कारगिलमध्ये हिमस्खलन;1 जवान बेपत्ता
७- सराफ संघटनांचा 18 दिवसांचा संप अखेर मागे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबईच्या महापौरांना आयुक्तांचा झटका, निधीत थेट 50 टक्क्यांची कपात
९- सरकारवर टीका केल्यास अनुदान नाही, उर्दू साहित्यिकांना सरकारचा इशारा
१०- मुंबईतील पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
११- पटना; गाय व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक
१२- दुष्काळानिमित्त पाणी वाचवण्याचे राज यांचे आवाहन; दुर्लक्ष केल्यास धडा शिकवण्याचा सल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नागपूर; क्रिकेटच्या सट्ट्याने आयुष्याचा 'खेळ'खंडोबा
१४- मुंबई; पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोंडसुख
१५- मुंबई; अनंत अंबानीने वजन ७० किलोने घटवले
१६- औरंगाबाद; मराठवाड्यात 74 तालुके टँकरवर अवलंबून
१७- पुणे; नऱ्हेत गोळीबारात एक जण जखमी
१८- नागपूर; दिव्यापुढे अडीच लाखांचा अडथळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- कोहलीचा धमाका, भारताने इडन गार्डन्सवर इतिहास रचला
२०- ....आणि विराट कोहली मास्टर ब्लास्टरसमोर नतमस्तक झाला
२१- टीम इंडियाच्या विजयानंतर साक्षी धोनी संतापली
२२- शूट संपवून दीपिका एक्स बॉयफ्रेण्ड रणबीरच्या घरी
२३- कोलकाता; हार्दिक पंड्याची चित्यासारखी झेप
२४- टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है : अख्तर
२५- रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है
२६- दबावात कसे खेळावे हे भारताकडून शिकावे-आफ्रिदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शेख फेरोज, इंद्रदेव पांडे, जिलानी खान, सलीम शेख, अनिल पांचाळ, स्वप्नील कांबळे, अनिकेत कोत्तावार, कैलास ढगे, सलोनी मुंदडा, गजानन नांदेडकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=========================================
=========================================

=========================================

‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झँडर केज’ या दीपिकाच्या हॉलिवूड डेब्यू सिनेमाचं कॅनडामध्ये शूट होतं. स्पॉटबॉय.कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका 18 मार्चला मायदेशी परतली. त्यानंतर मैत्रिणीच्या लग्नासाठी ती श्रीलंकेला जाणार होती.
मात्र संध्याकाळी उशिरा दीपिका रणबीर कपूरच्या घरी गेली. त्यानंतर दोघं बराच वेळ रणबीरच्या घरातल्या टेरेसवर गप्पा मारत बसले होते. कतरिनासोबत झालेल्या कथित ब्रेकअप नंतर रणबीर पुन्हा जुन्या प्रेयसीकडे वळला आहे का, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. तर दुसरीकडे दीपिकाचा बॉयफ्रेण्ड रणवीर सिंगला दीपिका आणि रणबीरच्या भेटीगाठींची कल्पना आहे का, याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
=========================================

हवामान, बाजारभाव, बियाणे, खतं, मशिन इत्यादी विषयी या अॅपवर माहिती देण्यात येईल. कृषी उन्नती मेळाव्यात शेकडो शेतकऱ्यांची टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भेट घेण्याची संधी मिळाली, शेतीत आधुनिकता, हायटेक्नॉलॉजी, सिंचन यासारख्या अनेक पैलूंवर चर्चेची संधी मिळाल्याची माहिती मोदींनी ट्विटरवर दिली आहे.
हा मेळा शेतकऱ्यांचं भाग्य बदलणारा मेळावा ठरेल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. गावं, गरीब आणि शेतकरी भारताचं भाग्य बदलतील. ईशान्य भारतातील पुढच्या हरितक्रांतीमध्ये सहभागी करुन घेणं आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बळीराजाचं उत्पन्न दुप्पट करणं, हे उद्दिष्ट असल्याचं मोदी म्हणाले.

मराठवाड्यात 74 तालुके टँकरवर अवलंबून
औरंगाबाद - मराठवाड्यातील 76 तालुक्यांपैकी 74 तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. हिंगोली आणि परभणी वगळता उर्वरित सहाही जिल्ह्यांत टॅंकरची संख्या सर्वाधिक आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव हे दोनच तालुके टँकरमुक्त आहेत.
शफकत अलींनी म्हटले चुकीचे पाकचे राष्ट्रगीत

पुणे : नऱ्हेत गोळीबारात एक जण जखमी
गाय व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक
=========================================
दबावात कसे खेळावे हे भारताकडून शिकावे-आफ्रिदी

कारगिलमध्ये हिमस्खलन;1 जवान बेपत्ता
सराफ संघटनांचा 18 दिवसांचा संप अखेर मागे
दिव्यापुढे अडीच लाखांचा अडथळा
दुष्काळानिमित्त पाणी वाचवण्याचे राज यांचे आवाहन; दुर्लक्ष केल्यास धडा शिकवण्याचा सल्ला
यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात कार्यकर्त्यांना केले. तसेच रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांपुढे आधी हात जोडा आणि त्यानंतरही त्याच पद्धतीने ते रंगपंचमी करत असतील तर मात्र त्यांच्यावर हात सोडा, असे आदेश त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांनी पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आदेश दिले. यंदा राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून सर्वानाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे होळीनिमित्ताने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच इतरांनाही पाण्याविनाच रंगपंचमी साजरी करण्यासाठी हात जोडून विनंती करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर होत असेल तर संबंधितांना आधी विनंती करा आणि त्यानंतरही त्यांनी ऐकले नाही तर मग त्यांच्यावर हात सोडण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या आदेशामुळे होळी सणाच्या काळात तवाणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
=========================================
१- लॉस एंजिल्स; ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली
२- अमेरिका गरीब देश बनलाय - ट्रम्प
३- आधुनिक तंत्रज्ञानामुळेही वाढतेय ग्लोबल वॉर्मिंग
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- बळीराजासाठी मोदींचं हायटेक पाऊल, किसान सुविधा अॅप लाँच
५- शफकत अलींनी म्हटले चुकीचे पाकचे राष्ट्रगीत
६- कारगिलमध्ये हिमस्खलन;1 जवान बेपत्ता
७- सराफ संघटनांचा 18 दिवसांचा संप अखेर मागे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- मुंबईच्या महापौरांना आयुक्तांचा झटका, निधीत थेट 50 टक्क्यांची कपात
९- सरकारवर टीका केल्यास अनुदान नाही, उर्दू साहित्यिकांना सरकारचा इशारा
१०- मुंबईतील पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
११- पटना; गाय व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक
१२- दुष्काळानिमित्त पाणी वाचवण्याचे राज यांचे आवाहन; दुर्लक्ष केल्यास धडा शिकवण्याचा सल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नागपूर; क्रिकेटच्या सट्ट्याने आयुष्याचा 'खेळ'खंडोबा
१४- मुंबई; पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोंडसुख
१५- मुंबई; अनंत अंबानीने वजन ७० किलोने घटवले
१६- औरंगाबाद; मराठवाड्यात 74 तालुके टँकरवर अवलंबून
१७- पुणे; नऱ्हेत गोळीबारात एक जण जखमी
१८- नागपूर; दिव्यापुढे अडीच लाखांचा अडथळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- कोहलीचा धमाका, भारताने इडन गार्डन्सवर इतिहास रचला
२०- ....आणि विराट कोहली मास्टर ब्लास्टरसमोर नतमस्तक झाला
२१- टीम इंडियाच्या विजयानंतर साक्षी धोनी संतापली
२२- शूट संपवून दीपिका एक्स बॉयफ्रेण्ड रणबीरच्या घरी
२३- कोलकाता; हार्दिक पंड्याची चित्यासारखी झेप
२४- टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है : अख्तर
२५- रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है
२६- दबावात कसे खेळावे हे भारताकडून शिकावे-आफ्रिदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शेख फेरोज, इंद्रदेव पांडे, जिलानी खान, सलीम शेख, अनिल पांचाळ, स्वप्नील कांबळे, अनिकेत कोत्तावार, कैलास ढगे, सलोनी मुंदडा, गजानन नांदेडकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=========================================
....आणि विराट कोहली मास्टर ब्लास्टरसमोर नतमस्तक झाला
कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डनवरी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा हिरो ठरला तो टीम इंडियाचा स्टायलिश आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहली. विराटने आजच्या खेळात अर्धशतकी खेळी अनोख्या पद्धतीने साजरी केली.“ज्या सचिननं मला खेळण्याची प्रेरणा दिली, त्याच्या उपस्थितीत हाऊसफुल ईडनवर मॅचविनिंग खेळी करता आली, याचं मला समाधान वाटतं”, अशी प्रतिक्रिया विराटनं दिलीय.
विराटने 37 चेंडूत अर्धशतक साजरा करत 55 धावांची खेळी केली. यामध्ये एका षटकारासह 7 चौकारांचा समावेश आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर साक्षी धोनी संतापली
रांची : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर देशभर जल्लोषाचं वातावरण पसरलं. मग यातून टीम इंडियाचा कर्णधार धोनीचं घर तरी कसं सुटेल? चाहत्यांना धोनीच्या रांचीतील घराबाहेर फटाके फोडत विजयोत्सवर साजरा केला. मात्र, यामुळे धोनीची पत्नी साक्षी धोनी कमालाची संतापली आणि तिने आपला राग ट्विटरवर व्यक्त केला.
टीम इंडिया विजयी झाली आणि देशभरात फटाके फुटायला सुरुवात झाली. धोनीच्या घराबाहेर त्याचे चाहते जमा झाले आणि फटाके फोडले. मोठमोठ्याने धोनीच्या घोषणाबाजी केली. यामुळे साक्षी धोनी कमालीची नाराज झाली. कारण धोनीची मुलगी गाढ झोपेत होती आणि घराबाहेर फुटणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने मुलगी उठण्याची शक्यता होती.
शूट संपवून दीपिका एक्स बॉयफ्रेण्ड रणबीरच्या घरी
मुंबई : हॉलिवूड सिनेमाचं शूटिंग आटपून बॉलिवूडची ‘मस्तानी’गर्ल दीपिका पदुकोन पुन्हा मुंबईत आली आहे. मुंबईत आल्यावर ती तिच्या मित्र-मैत्रिणींना भेटणं पसंत करते. यावेळी मात्र दीपिका चक्क तिच्या एक्स बॉयफ्रेण्ड रणबीर कपूरला भेटली.
‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झँडर केज’ या दीपिकाच्या हॉलिवूड डेब्यू सिनेमाचं कॅनडामध्ये शूट होतं. स्पॉटबॉय.कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिका 18 मार्चला मायदेशी परतली. त्यानंतर मैत्रिणीच्या लग्नासाठी ती श्रीलंकेला जाणार होती.
मात्र संध्याकाळी उशिरा दीपिका रणबीर कपूरच्या घरी गेली. त्यानंतर दोघं बराच वेळ रणबीरच्या घरातल्या टेरेसवर गप्पा मारत बसले होते. कतरिनासोबत झालेल्या कथित ब्रेकअप नंतर रणबीर पुन्हा जुन्या प्रेयसीकडे वळला आहे का, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. तर दुसरीकडे दीपिकाचा बॉयफ्रेण्ड रणवीर सिंगला दीपिका आणि रणबीरच्या भेटीगाठींची कल्पना आहे का, याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दीपिका-रणबीर यांनी ब्रेकअपनंतर तमाशा चित्रपटात एकत्र काम केलं होतं. वेगळे झाल्यानंतरही दोघं एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं आनंदाने सांगतात.
बळीराजासाठी मोदींचं हायटेक पाऊल, किसान सुविधा अॅप लाँच
नवी दिल्ली : भारतातल्या तमाम शेतकरी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हायटेक पाऊल उचललं आहे. कृषी उन्नती मेळ्यामध्ये बळीराजासाठी किसान सुविधा अॅप लाँच करण्याची घोषणी मोदींनी केली.
हवामान, बाजारभाव, बियाणे, खतं, मशिन इत्यादी विषयी या अॅपवर माहिती देण्यात येईल. कृषी उन्नती मेळाव्यात शेकडो शेतकऱ्यांची टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून भेट घेण्याची संधी मिळाली, शेतीत आधुनिकता, हायटेक्नॉलॉजी, सिंचन यासारख्या अनेक पैलूंवर चर्चेची संधी मिळाल्याची माहिती मोदींनी ट्विटरवर दिली आहे.
हा मेळा शेतकऱ्यांचं भाग्य बदलणारा मेळावा ठरेल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. गावं, गरीब आणि शेतकरी भारताचं भाग्य बदलतील. ईशान्य भारतातील पुढच्या हरितक्रांतीमध्ये सहभागी करुन घेणं आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बळीराजाचं उत्पन्न दुप्पट करणं, हे उद्दिष्ट असल्याचं मोदी म्हणाले.
सरकारवर टीका केल्यास अनुदान नाही, उर्दू साहित्यिकांना सरकारचा इशारा
मुंबई: सरकारी अनुदान घेणाऱ्या उर्दू लेखकांना यापुढे केंद्र सरकारची सेन्सॉरशीर असेल. कारण सरकारविरोधात लिहिलं तर अनुदान विसरा असा फतवाच केंद्र सरकारनं काढला आहे. त्यावरुन आता वाद सुरु झाला आहे.
यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो
विरोधकांना चिमटे काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसिद्ध उर्दू शायर निदा फाजली यांची ही शायरी संसदेत वाचली खरी, पण यापुढे ऊर्दू लेखकांवर केंद्र सरकार सेन्सॉरशिप आणू पाहतंय.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन समितीकडून उर्दू लेखकांसाठी एक अजब फतवा काढलाय.
*उर्दू लेखकांना आपल्या पुस्तकातील मजकूर सरकारविरोधी, देशद्रोही किंवा समाजात मतभेद निर्माण नसावा याची हमी द्यावी लागणार आहे.
भारताचा पैलवान योगेश्वर दत्तला रिओ ऑलिम्पिकचं तिकीट
मुंबई : भारताचा स्टार पैलवान योगेश्वर दत्तने रिओ ऑलिम्पिकचं तिकीट पक्क केलं आहे.आशियाई ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेत योगेश्वरने पुरुषांच्या 65 किलो वजनी फ्री स्टाईल गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याने तो रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला योगेश्वर दुसरा भारतीय पैलवान आहे. याआधी नरसिंह यादवने रिओ ऑलिम्पिकमध्ये आधीच जागा मिळावली आहे. स्वत: योगेश्वरने ट्विटवर याची माहिती दिली.
क्रिकेटच्या सट्ट्याने आयुष्याचा 'खेळ'खंडोबा
नागपूर: क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर सगळीकडे चढलेला असतो, हा काळ म्हणजे सट्टेबाजांसाठी सुगीचा काळ असतो. मात्र ही सट्टेबाजी अनेकांचं आयुष्य उद्धवस्त करते, असंच काहीसं घडलंय विजय हेमनानी यांच्याबाबतीत.
आयपीएल आणि सट्टा हे समीकरण आता नवीन नाही. ही कहाणी देखील आयपीएल आणि सट्ट्यानं उद्ध्वस्त केलेल्या एका कुटुंबाची आहे.
नागपुरमध्ये सायकलचं दुकान चालवणाऱ्या विजय हेमानानी सट्ट्यापायी पुरते कंगाल झाले आहेत.
पाकच्या पराभवानंतर कंदील बलोच ढसाढसा रडली, आफ्रिदीवर तोंडसुख
मुंबई : कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा करणारी पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री कंदील बलोच प्रचंड नाराज झालीय. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ईडन गार्डनवर विजयी झेंडा रोवला. त्यामुळे अभिनेत्री कंदील बलोचने पाकिस्तानी खेळाडूंवर संतप्त होत एका व्हिडीओद्वारे नाराजी व्यक्त केलीय.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीला निवृत्त होण्याचा सल्ला कंदील बलोचने दिला आहे. शिवाय, वकार युनूसवर तर अत्यंक जोरदार टीका केलीय.
कंदीलने तिच्या ऑफिशिअल फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर नाराज असलेल्या कंदीलने त्यांना पाकिस्तानात न येण्याची धमकी दिलीय.
काही दिवसांपूर्वी कंदील बलोचने घोषणा केली होती की, ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा विजय झाल्यास स्ट्रिप डान्स करणार. मात्र, ईडन गार्डनवर पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आणि कंदील बलोच कमालीची नाराज झालीय.
हार्दिक पंड्याची चित्यासारखी झेप
कोलकाता: हायव्होल्टेज टी 20 सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 18 षटकात 119 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. पाकिस्तानने निर्धारित 18 षटकात 5 बाद 118 धावा केल्या.
या सामन्यात हार्दिक पंड्याने चित्यासारखी झेप घेत पाकिस्तानचा सलामीवीर शर्जिल खानला बाद केलं. रैनाच्या गोलंदाजीवर शर्जिलने मोठा फटका मारला. मात्र हा फटका सीमारेषेपार जाऊ शकला नाही. त्याचवेळी सीमारेषेजवळ उभा असलेला हार्दिक पंड्या धावत आला आणि त्याने चित्यासारखी झेप घेत झेल टिपला.
टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है : अख्तर
कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील इतिहास भारताने बदलला आहे. धोनीच्या टीम इंडियाने टी 20 विश्वचषकात पाकिस्तानला 6 विकेट्सने धूळ चारत, विश्वचषक स्पर्धेत हरवण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
टीम इंडियाचा डॅशिंक फलंदाज विराट कोहलीने जबरदस्त नाबाद अर्धशतक झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 55 धावा केल्या. याबद्दलचा त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलं.
जेव्हा शोएबही म्हणाला होता, वा विराट
विराट कोहलीने आजही लाजवाब खेळी केली. त्याने यापूर्वी नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी खेळी केली होती. त्यावेळी कोहलीने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढत विजय मिळवून दिला होता. विराटनं 51 चेंडूंमध्ये सात चौकारांसह 49 धावांची खेळी केली होती, त्यावेळी शोएब अख्तर म्हणाला होता, दुनिया मे टॅलेंट बहुत लोगों के पास है, मगर प्रेशर में खुद से लढकर टीम को जिता देते है, उसे विराट कोहली कहते है.
मुंबईतील पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई : रेल्वेच्या काही तांत्रिक कामांसाठी आज म्हणजे रविवारी मेगब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर हा मेगाब्लॉक असून आजच्या मेगाब्लॉकमधून मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सुटका झाली आहे. विशेषत: सीएसटी-पनवेल मार्गावरील प्रवाशांना या मेगाब्लॉकचा काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सर्व लोकल 25-30 मिनिट उशिरानं धावतील.
हार्बर रेल्वे:
हार्बर मार्गावर सीएसटी ते माहीम अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान सीएसटी ते पनवेल आणि सीएसटी ते आंधेरदरम्यान एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल्स चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे:
पश्चिम रेल्वेमार्गावर आज बोरिवली ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या मेगाब्लॉकदरम्यान बोरिवली ते गोरेगावदरम्यान सर्व गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गांवरुन चालतील. काही लोकल्स रद्दही करण्यात येणार आहेत.
कोहलीचा धमाका, भारताने इडन गार्डन्सवर इतिहास रचला
कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील इतिहास भारताने बदलला आहे. धोनीच्या टीम इंडियाने टी 20 विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारत, विश्वचषक स्पर्धेत हरवण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
टीम इंडियाचा डॅशिंक फलंदाज विराट कोहलीने जबरदस्त नाबाद अर्धशतक झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने 37 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत नाबाद 55 धावा केल्या. याबद्दलचा त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ने गौरवण्यात आलं.
हायव्होल्टेज टी 20 सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 18 षटकात 119 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र धोनीच्या वाघांनी हे आव्हान 15.5 षटकात अवघ्या 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.
पावसामुळे व्यत्यय आणलेला हा सामना 18-18 षटकांचा खेळवण्यात आला. या सामन्यात धोनीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने निर्धारित 18 षटकात 118 धावा केल्या.
पाकिस्तानचं 119 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा – शिखर धवनने दणक्यात सुरुवात केली. रोहितने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून आपला इरादा जाहीर केला. मोहम्मद इरफानने टाकलेल्या या षटकात त्याने दोन चौकार ठोकले.
मुंबईच्या महापौरांना आयुक्तांचा झटका, निधीत थेट 50 टक्क्यांची कपात
मुंबई : कंत्राटदारांशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपानंतर अडचणीत आलेल्या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकरांना मुंबई महापालिका आयुक्तांनी मोठा झटका दिला आहे. महापौर स्नेहल आंबेकरांना मिळणारा महापौर निधी थेट पन्नास टक्क्य़ांनी कमी करण्यात आला आहे.
महापौर निधी थेट 50 टक्क्यांनी कमी केल्यानं 2016-17 या आर्थिक वर्षासाठी स्नेहल आंबेकरांना महापौर निधीपोटी 100 कोटींऐवजी फक्त 50 कोटी मिळणार आहेत.
कंत्राटदारांच्या मागणीनुसार महापौरांकडून नगरसेवक निधीचं वाटप होतं, असा आरोप मनसेकडून केला जातो आहे. तसंच नगरसेवकांच्या मागणीपत्रा शिवाय देखील स्नेहल आंबेकरांनी निधी मंजूर केल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडेंनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आंबेरकरांच्या निधीला कात्री लावण्यात आल्याचं बोललं जातं आहे.
तर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शह देण्यासाठी मित्र आणि विरोधकांनी एकत्रित येऊन ही खेळी खेळल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला आहे.
रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है
- मुंबई, दि. २० - भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर सोशल मिडीया, मॅसेंजिग अॅप व्हॉटस अॅपवरुन पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवणारे मॅसेजेस, फोटो फिरत आहेत. भारताच्या विजयानंतर व्हॉटस अॅपवर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रिया.Dear Pakistan,Bura Na Mano K(holi) haiइतिहास ना आजतकबदला है !और ना हि बदलेगा !!पाक कल भी हमसे हारा था !औरआज भी हारेगा !!वंदे मातरम्चीते की चाल, बाज की नजर और Kohli की batting पे संदेह नहीं करते!आज मैच में अमिताभ बच्चन को इसलिए बुलाया गया की।मैच जितने के बाद हम ये आधिकारिक तोर पर कह सके कीरिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैअब ये अफवाह कोन फैला रहा हैपाकिस्तान बोल रहा है...........हमे कश्मीर नही कोहली चाहिए..
अनंत अंबानीने वजन ७० किलोने घटवले
- मुंबई, दि. २० - आपल्या लठ्ठपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने आपले वजन निम्म्याहून अधिक म्हणजे ७० किलोने घटवले आहे.शनिवारी अनंत सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी आला तेव्हा त्याला बारीक झालेला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आयपीएल स्पर्धेमध्ये मुंबई इंडियन्स संघासोबत खुर्चीवर बसलेला अनंत नेहमीच सगळयांना दिसतो.मागच्या काही महिन्यात अनंतने आपले वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. जामनगरमधील रिलायन्स रिफायनरीमध्ये अमेरिकन फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली अनंतने आपले वजन घटवले. अनंतला दोन भावंडे आहेत. आकाश आणि इशा. अनंतला क्रिकेटची आवड असून त्याचा अध्यात्माकडे ओढा आहे.
मराठवाड्यात 74 तालुके टँकरवर अवलंबून
लहान- मोठ्या धरणांत अवघे चार- पाच टक्के पाणी शिल्लक आहे. ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या महिन्यात 19 मार्चपर्यंत मराठवाड्यातील टँकरची संख्या 2 हजार 378 पर्यंत पोचली. 1 हजार 750 गावे आणि 632 वाड्यांना या टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आठवडाभरात टँकरची संख्या तब्बल 189 ने वाढली आहे.
पाच हजार विहिरींचे पाणी आरक्षित
आणखी सुमारे तीन महिने टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. जलसाठे कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर भरायलाही पाणी मिळणार नाही, ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच आहे त्या विहिरींतील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यातील 3721 गावांमधील 5192 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
=========================================पाच हजार विहिरींचे पाणी आरक्षित
आणखी सुमारे तीन महिने टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. जलसाठे कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर भरायलाही पाणी मिळणार नाही, ही बाब लक्षात घेऊन आतापासूनच आहे त्या विहिरींतील पाणी फक्त पिण्यासाठी आरक्षित करण्यात येत आहे. सध्या मराठवाड्यातील 3721 गावांमधील 5192 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
शफकत अलींनी म्हटले चुकीचे पाकचे राष्ट्रगीत
कोलकता - भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचे गायक शफकत अमानत अली यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हणताना चुका केल्याची चर्चा ट्विटरवर सुरु आहे. या प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेटचाहत्यांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत असून, यापेक्षा लहान मुले चांगले राष्ट्रगीत गायली असती अशी टीका त्यांच्यावर होत आहे.
ईडन गार्डन्स मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात शफकत अली यांनी पाकिस्तानचे आणि अमिताभ बच्चन यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले. शफकत अली यांनी राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने म्हटले. त्यांनी दोन ठिकाणी चुका केल्या. त्यांच्यापेक्षा देशातील कोणतेही लहान मुल चांगले राष्ट्रगीत म्हणू शकले असते. तर, काही पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी अमिताभ बच्चन यांनी सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हटल्याची प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या सर्व चर्चेनंतर शफकत अलींनी नाराजी व्यक्त करत आपल्याला दुःख झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रगीत म्हणताना कोणतीही चूक झाली नसल्याचेही स्पष्ट केले आहे. तरीही माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मी माफी मागतो. आपल्या संघावर विश्वास ठेवा, असा सल्लाही शफकत अली यांनी दिला आहे.
=========================================पुणे : नऱ्हेत गोळीबारात एक जण जखमी
पुणे - नऱ्हे येथील भैरवनाथ मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्री भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर झालेल्या गोळीबारात तो जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. दीपक अशोक वाल्हेकर हे भांडणे सोडवण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर विनायक शिवाजी रानवडे यांनी गोळीबार केला. वाल्हेकर यांच्या गोळी हाताला गोळी लागली आहे. वाल्हेकर यांनी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
=========================================गाय व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक
पाटणा - झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यात गायींचा व्यापार करणाऱ्या दोन मुस्लिम व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी शनिवारी रात्री पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन व्यापाऱ्यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गोमाता संरक्षण समितीच्या सदस्याला अटक करण्यात आली आहे. मिथिलेश प्रसाद साहू उर्फ बंटी, प्रमोद कुमार साहू, मनोज कुमार साहू, अवधेश साहू आणि मनोज साहू अशी यांची नावे आहेत. या हत्या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असून, यांचा शोध घेण्यात येत आहे.
लाटेहर जिल्ह्यातील बलुमठ भागात शुक्रवारी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मझलूम अन्सारी (वय 32) आणि इम्तेयाज खान या दोन मुस्लिम व्यापाऱ्यांचे मृतदेह आढळून आले होते. तेव्हापासून परिसरात तणावग्रस्त परिस्थिती असून, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दबावात कसे खेळावे हे भारताकडून शिकावे-आफ्रिदी
कोलकता - महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दबाव कसा हाताळावा, याबाबत भारतीय क्रिकेट संघाकडून शिकण्याची गरज असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे.
ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा गडी राखून पराभूत केले. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 55 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानने दिलेल्या 119 धावांच्या आव्हानासमोर भारताची 3 बाद 23 अवस्था होऊनही भारताने सहज विजय मिळविला.
आफ्रिदी म्हणाला की, भारतीय खेळाडूंनी सरस कामगिरी केली. दबाव असूनही भारतीय संघाने चांगला खेळ केला आणि भारतीय फलंदाज परिपक्व झाले आहेत. दबावात कसे खेळायचे हे भारताकडून शिकले पाहिजे. कोहलीने अप्रतिम खेळी केली. आम्ही आणखी 30-25 धावा अधिक धावा करणे आवश्यक होते. खेळपट्टीवर चेंडू एवढा फिरेल असे वाटले नव्हते. फिरकी गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. आम्ही आता साखळीतील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
=========================================कारगिलमध्ये हिमस्खलन;1 जवान बेपत्ता
उधमपूर - जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात लष्कराच्या तळाजवळ हिमस्खलन झाल्याने एक जवान बेपत्ता झाला आहे. या जवानाचा शोध घेण्यात येत आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिल सेक्टरमध्ये 17,500 फूट उंचीवर असलेल्या लष्कराच्या तळाजवळ छोट्या भूकंपाच्या धक्क्यामुळे हिमस्खलन झाले. यामध्ये दोन जवान बेपत्ता झाले होते. तात्काळ मदतकार्य राबवून एक जवानाला बर्फाच्या ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आले. मात्र, अद्याप एक जवान बेपत्ता आहे.
कारगिलमध्ये सतत बर्फवृष्टी होत असल्याने जवानाच्या बचावकार्यात अडथळे येत आहेत.
=========================================सराफ संघटनांचा 18 दिवसांचा संप अखेर मागे
दागिन्यांवर एक टक्का उत्पादित शुल्क लावण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून सराफ संघटनांनी पुकारलेला संप अखेर काल (शनिवार) रात्री उशीरा मागे घेण्यात आला आहे. सरकारच्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून सराफांना विनाकारण कोणताही त्रास होणार नाही याची हमी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्यानंतर अखेर 18 दिवसांचा संप मागे घेण्यात आला.
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन (जीजेएफ), इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीबीजे) आणि जेम्स ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलसारख्या प्रमुख संघटनांसह सर्वच संघटना संप मागे घेण्यास तयार झाल्या आहेत.
"उत्पादन शुल्क मागे घेण्यात आलेले नाही. परंतु आमच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुन्हा ‘इन्स्पेक्टर राज‘ निर्माण होणार नाही याची अर्थमंत्र्यांनी आम्हाला हमी दिली आहे आणि याबाबत लवकरच काहीतरी अधिकृत निवेदन सादर होईल, अशी आशा आहे. खुप विचारविमर्श झाल्यानंतर सर्व संघटना संप मागे घेण्यास तयार झाल्या आहेत", असे जीजेएफचे अध्यक्ष श्रीधर जीव्ही यांनी सांगितले.
सराफ संघटनांनी 18 दिवस पुकारलेल्या संपामुळे या उद्योगाला सुमारे 25,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशातील 300 संघटनांमधील 3 लाख सराफांनी 2 मार्चपासून आपले व्यवहार बंद ठेवले होते. शिवाय, दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड सक्तीच्या निर्णयालादेखील सर्व सराफांचा विरोध होता.
देशातील सराफा उद्योगाची उलाढाल 3.15 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या उद्योगाची राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादनात 3.5 टक्के हिस्सेदारी आहे.
=========================================दिव्यापुढे अडीच लाखांचा अडथळा
विश्व शालेय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
नागपूर - आर्थिक परिस्थिती हा मुद्दा भारतीय क्रीडा क्षेत्रात नेहमीच खेळाडूंपुढे अडथळा ठरला आहे. या अडथळ्यामुळे अनेकांची कारकीर्द पुढे सरकू शकली नाही. याचे आणखी एक उदाहरण पुढे आले आहे. नागपूरपासून 70 किलोमीटर अंतरावर कुही तालुक्यात असलेल्या वेलतूर येथील दिव्या तनबा नखाते हिची हंगेरी येथे होणाऱ्या विश्व शालेय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, त्यासाठी अडीच लाख रुपये भारतीय शालेय महासंघाकडे निर्धारित वेळेत जमा करायचे आहेत. अन्यथा तिची संधी हुकण्याची दाट शक्यता आहे.
बुडापेस्ट (हंगेरी) येथे 21 ते 26 एप्रिलदरम्यान विश्व शालेय क्रॉस कंट्री स्पर्धा होत आहे. त्यासाठी मंगळूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर खेळाडूंची निवड करण्यात आली. मंगळूर येथे दिव्याने विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करताना 19 वर्षे मुलींच्या गटात पाचवे स्थान मिळविले होते. सुरुवातीला दिव्याची निवड झाल्याचा निरोपच मिळाला नव्हता. तिचे क्रीडा शिक्षक वनदेव ठाकरे यांनी धावपळ केल्यानंतर निवड झाल्याचे पत्र विद्याभारतीकडून मिळाले.
=========================================दुष्काळानिमित्त पाणी वाचवण्याचे राज यांचे आवाहन; दुर्लक्ष केल्यास धडा शिकवण्याचा सल्ला
यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात कार्यकर्त्यांना केले. तसेच रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्यांपुढे आधी हात जोडा आणि त्यानंतरही त्याच पद्धतीने ते रंगपंचमी करत असतील तर मात्र त्यांच्यावर हात सोडा, असे आदेश त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना दिले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांनी पाण्याविना रंगपंचमी साजरी करण्याचे आदेश दिले. यंदा राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून सर्वानाच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे होळीनिमित्ताने होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच इतरांनाही पाण्याविनाच रंगपंचमी साजरी करण्यासाठी हात जोडून विनंती करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे रंगपंचमीसाठी पाण्याचा वापर होत असेल तर संबंधितांना आधी विनंती करा आणि त्यानंतरही त्यांनी ऐकले नाही तर मग त्यांच्यावर हात सोडण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या आदेशामुळे होळी सणाच्या काळात तवाणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
=========================================
आधुनिक तंत्रज्ञानामुळेही वाढतेय ग्लोबल वॉर्मिंग
- पॅरिस : पृथ्वीच्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जगभर ‘वसुंधरा दिन’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जगाच्या विविध भागांत काही वेळ दिवे मालवून हवामान स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जगाशी जोडून घेण्यासाठी आपण वावरत असलेल्या अत्याधुनिक उपकरणांमुळेही पृथ्वीचे तापमान वाढत चालल्याचे एका ताज्या अभ्यासात आढळून आले आहे.बदलत्या हवामानामुळे पृथ्वीचे अस्तित्व संकटात आले आहे. पृथ्वी वाचविण्यासाठी जगभर १९ मार्चला ‘वसुंधरा दिन’ साजरा केला जातो. यानिमित्ताने जागतिक समुदायांत जनजागृती करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि स्वयंसेवी संघटना यांच्यातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आयफेल टॉवर ते एम्पायर स्टेट बिल्डिंग आणि तैपेयी येथे आणि इतरत्र स्थानिक वेळेनुसार रात्री ८.३० वाजता तासाभरासाठी दिवे बंद करण्यात आले
=========================================
अमेरिका गरीब देश बनलाय - ट्रम्प
- वॉशिंग्टन : दुबई आणि चीनमधील पायाभूत सुविधांशी तुलना करता अमेरिका आता तिसऱ्या जगतातील देश (विकसनशील देशांबाबत ही संज्ञा वापरली जाते.) बनला असून, आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ही परिस्थिती वेगाने बदलेल, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी ते सध्या प्रचार करीत आहेत.उताह येथील साल्ट लेक सिटीत समर्थकांना संबोधित करताना ते म्हणाले की, एकदा दुबई, चीनला जाऊन तेथील रस्ते, रेल्वे मार्गांचे जाळे पाहा. तेथे ताशी शेकडो मैल धावणाऱ्या बुलेट ट्रेन आहेत आणि तुम्ही न्यूयॉर्कला गेलात तर तुम्हाला सर्वकाही १०० वर्षांपूर्वीचे दिसेल. आपण निवडून येताच ही परिस्थिती बदलेल. आपल्या नेतृत्वाखाली अमेरिका इसिसला धूळ चारेल. आम्ही संपत्ती परत मिळवणार आहोत. कारण, आमचा देश गरीब बनला आहे. तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही एवढी प्रचंड तूट आहे.
=========================================
लॉस एंजिल्स; ड्रोन-जेटची टक्कर थोडक्यात टळली
- लॉस एंजिल्स : लुफ्थहंसा एअरलाईनचे जेट विमान आणि ड्रोन यांची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक टक्कर थोडक्यात टळली. यावेळी ड्रोन विमान जेटपासून २०० फूट अंतरावर होते. मानवी विमाने आणि मानवरहित ड्रोन यांच्यातील अपघात टळण्याची ही आणखी एक ताजी घटना आहे.लुफ्थहंसा एअरलाईन्सचा वैमानिक ए-३८० हे जेट विमान विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक वेळेनुसार दुपारी १-३० वाजता ड्रोन विमान त्याच्या विमानाकडे येताना दिसले, असे फेडरल उड्डयन प्रशासनाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.हा प्रकार घडला त्यावेळी जेट विमान पाच हजार फूट उंचीवर होते आणि विमानतळापासून पूर्वेला १४ मैल अंतरावर होते. विमानतळाच्या या दिशेला घनदाट लोकवस्ती असलेली उपनगरे आहेत. या भागावर विमानांची टक्कर झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेबाबत लुफ्थहंसा एअरलाईन्सचा प्रवक्ता लगेचच प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. सध्या मानवरहित ड्रोन विमाने लोकप्रिय असून असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत.
=========================================
=========================================
No comments:
Post a Comment