[अंतरराष्ट्रीय]
१- ब्रुसेल्स हल्ला: प्रमुख संशयितास अटक
२- न्यूयॉर्क; दहशतवाद्यांना 'टॉर्चर' करा : डोनाल्ड ट्रम्प
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मुंबईची निधी चाफेकर ब्रसेल्स हल्ल्यात जखमी
४- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ
५- 'होंडा'च्या मोटारी एप्रिलपासून सहा हजारांनी महाग
६- गुंतवणुकदरांनो, डॉलरसोबत पाणीही आणा - पृथ्वीराज चव्हाण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- पुणे; फर्ग्युसन कॉलेजमध्ये जितेंद्र आव्हाडांना धक्काबुकी, गाडीवर दगडफेक
८- पुणे; पत्रात 'असल्यास' शब्द लिहायचा राहिला, फर्ग्युसन कॉलेज प्राचार्यांची सारवासारव
९- फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांवर गुन्हा नोंदवा : आव्हाड
१०- नाशिक; भाजप महिला मेळाव्यात राडा, शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा
११- सोलापूर; जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्यता
१२- नाशिक; दोन कोटी विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- अमित देशमुखांच्या बर्थ डेचा थाट, दुष्काळी लातुरात हजारो लिटर पाणी वाया
१४- नागपूर; पत्नीच्या छळामुळं प्राध्यापक पतीची आत्महत्या
१५- ठाणे; आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू
१६- स्फोटात जखमी झालेल्या निधीच्या देखभालीसाठी पती ब्रसेल्सला जाण्याची शक्यता
१७- पहा व्हिडीओ; फुगे मारण्याच्या नादात मुलगा बाल्कनीतून खाली पडला, नशीबानं जीव वाचला
१८- नाशिक; टंचाईग्रस्तांना कायमस्वरूपी जलसेवा देण्याचा प्रयत्न
१९- नांदेड - सांगवीतील ग्रामस्थांनी दिले शाळेसाठी साठ हजार रुपये
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- रोबो 2 मधील अक्षयचा आगळावेगळा लूक ऑनलाईन लीक
२१- सचिनसारख्या खास फटक्यासाठी विराटचा सराव
२२- भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान शाहरुखची कॉमेंट्री
२३- कंदिल बलुच विराट कोहलीच्या प्रेमात, ट्विटरवर जाहीर कबुली
२४- लग्नापासून आर्थिक स्थैर्य मिळाले नाही - मलायका
२५- अफगाणिस्तानची झुंज अपयशी; इंग्लंडचा विजय
२६- सलामीवीरांच्या अपयशामुळे रहाणेला संधी द्या!
२७- 'त्या' सामन्यानंतर शाहिद आफ्रिदी होणार निवृत्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
अडचणीच्या काळातच आपल्या तत्वाची खरी परीक्षा अडते. आपण प्रामाणिक आहोत का नाही, हे अडचण आल्याशिवाय काळात नाही
(नंदाराज ठाकरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===============================================

या फोटोमध्ये अक्षयचे पांढरे केस, घाबरवणारे डोळे, भुवयांचे विचित्र केस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. अक्षयने घातलेल्या काळ्या कोटावरही पिसं चिकटलेली आहेत. एकूणचा अक्षय हा काळाच्या पुढचा व्हिलन असल्याचं दिसून येतंय.
दिग्दर्शक शंकर यांनी अद्याप अधिकृतपणे लूक रिलीज केलेला नाही. मात्र दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर आलेल्या काही उतावळ्या फॅन्सनी त्यांचे फोटो काढून ऑनलाईन व्हायरल केले असावेत.

रोबो 2 मधील अक्षयचा आगळावेगळा लूक ऑनलाईन लीक
मुंबई : अक्षयकुमार आणि रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित रोबो 2 चित्रपटाबाबत सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या अक्षयकुमारचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अक्षयचा विचित्र लूक त्याच्या फॅन क्लब्जमध्ये लीक झाला आहे.
या फोटोमध्ये अक्षयचे पांढरे केस, घाबरवणारे डोळे, भुवयांचे विचित्र केस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. अक्षयने घातलेल्या काळ्या कोटावरही पिसं चिकटलेली आहेत. एकूणचा अक्षय हा काळाच्या पुढचा व्हिलन असल्याचं दिसून येतंय.
दिग्दर्शक शंकर यांनी अद्याप अधिकृतपणे लूक रिलीज केलेला नाही. मात्र दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर आलेल्या काही उतावळ्या फॅन्सनी त्यांचे फोटो काढून ऑनलाईन व्हायरल केले असावेत.
अक्षय पहिल्यांदाच तमिळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे मोठ्या कालावधीनंतर खलनायक साकारत आहे. 2.0 हा सिनेमा रोबो म्हणजेच एन्थिरन चित्रपटाचा सिक्वल आहे.
फर्ग्युसन कॉलेजमध्ये जितेंद्र आव्हाडांना धक्काबुकी, गाडीवर दगडफेक
पुणे: पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर आव्हाड यांच्या गाडीवर विद्यार्थ्यांनी तुफान दगडफेक केली.
भारतीय जनता युवा मोर्चा अर्थात भाजयुमोने ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे.
===============================================
पत्नीच्या छळामुळं प्राध्यापक पतीची आत्महत्या
नागपूर: सोशल मीडियावर सतत चॅटिंग, त्यामुळे निर्माण होणारं संशयाचं भूत आणि पत्नीकडून कायदेशीर कारवाईची धमकी. यामुळं नागपूरमधील एका पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. एक युवा प्राध्यापक आणि उदयास येत असलेल्या सिनेमेटोग्राफरने आत्महत्यासारखा टोकाचं पाऊल उचललं. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून प्राध्यापक अभिजित मस्के यांनी पत्नी पीडित पुरुषांची व्यथा जगासमोर आणली आहे.
महिलांच्या संरक्षणासाठी कायदे आवश्यक असले. तरी त्याचा गैरवापर होऊन निर्दोष तरुणांचा बळी जाऊ देऊ नका अशी विनंती अभिजित म्हस्केच्या आईनं सरकारला केली आहे. वृद्ध अश्विनी आणि अशोक मस्के यांचा मुलगा प्राध्यापक अभिजित नागपूरच्या व्हीएमव्ही महाविद्यालयात कार्यरत होता. सिनेमेटोग्राफर असलेल्या अभिजित लघुपट तयार करीत होता. मात्र, हळव्या मनाच्या प्रा. अभिजित मस्के यांनी १६ मार्च रोजी गळफास लाऊन आत्महत्या केली आणि गेले १० महिने मस्के कुटुंबियांनी सोसलेल्या त्रासाचा असा कटू अंत झाला.
===============================================
अमित देशमुखांच्या बर्थ डेचा थाट, दुष्काळी लातुरात हजारो लिटर पाणी वाया
ज्या लातुरात ग्लासभर पाण्यासाठी लोकं वणवण फिरतायत, तिथं आमदारांच्या जंगी वाढदिवसासाठी पाण्याचा अपव्यय लाजिरवाणा आहे.
‘एबीपी माझा’नं या उधळपट्टीवर जाब विचारल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उन्हाळी शिबिरासाठी हे मैदान जिल्हा क्रीडा विभागानं तयार केल्याचं म्हणत हात वर केलेत.
मात्र संवेदनशील लातूरकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.
===============================================
पत्रात 'असल्यास' शब्द लिहायचा राहिला, फर्ग्युसन कॉलेज प्राचार्यांची सारवासारव
पुणे : देशविरोधी घोषणांप्रकरणी पोलिसांना लिहिलेल्या पत्रानंतर फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांनी सारवासारव केली आहे. पत्रात ‘असल्यास’ शब्द लिहायचा राहिला, असं स्पष्टीकरण प्राचार्य रविंद्रकुमार परदेशी यांनी दिलं आहे.
महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांच्या समूहाने देशविरोधी घोषणा दिल्या. त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करणारं पत्र प्राचार्यांनी डेक्कन पोलिसांना पाठवलं आहे.
===============================================
फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांवर गुन्हा नोंदवा : आव्हाड
मुंबई: पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील कथित देशविरोधी घोषणाबाजीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणांचा आरोप लावणाऱ्या प्राचार्याचं निलंबन करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
तसंच परवानगीविना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यक्रम कसा होऊ दिला, असाही सवाल विरोधकांचा आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात काल देशविरोधी घोषणा झाल्याचा दावा नव्हे, तर शंका होती, असं घुमजाव प्राचार्य रवींद्रकुमार परदेशी यांनी केलं आहे. महत्वाचं म्हणजे जे पत्र पोलिसांना कॉलेजनं लिहिलं होतं, त्यात ”असल्यास” हा शब्द चुकून राहिल्यानं तो कॉलेजचा दावा ठऱवला गेला असंही त्यांनी म्हटलं.
काय आहे प्रकरण?
फर्ग्युसन कॉलेजमध्ये मंगळवारी जेएनयूच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अलोक सिंहचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अलोक सिंह फर्ग्युसन कॉलेजमध्ये आला होता. परवानगी नसताना हा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता.
मात्र आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांनी कन्हैय्या अभाविपविरुद्ध घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध दर्शवला. तर जेएनयू विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि रोहित वेमुलाच्या समर्थनातही घोषणाबाजी केली.
===============================================
मुंबईची निधी चाफेकर ब्रसेल्स हल्ल्यात जखमी
मुंबई: आयसीसच्या अतिरेक्यांनी काल बेल्जियमची राजधानी ब्रसेल विमानतळावर 3 स्फोट घडवून 34 जणांचा बळी घेतला. पण हा हल्ला किती भयानक असू शकतो याचा प्रत्यय केवळ एका फोटोतून दिसून येतोय.
अंधेरीच्या चकाला परिसरात राहणाऱ्या जेट एरवेजची कर्मचारी निधी चाफेकर या हल्ल्यात जखमी झाल्या. ब्रसेल्स विमातळावरचा निधीचा फोटो सध्या सोशल मीडियावरुन जगभरात व्हायरल झालाय. स्फोटानंतर निधी यांचा युनिफॉर्म फाटला . त्यानंतर जखमी झालेली निधी विमानतळावरच्याच एका बाकड्यावर आगतिकासारख्या बसून होत्या, पण त्यांना तोपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही.
निधी यांच्या तब्येतीबाबत कुटुंबाला सध्या कोणतीच माहिती मिळत नाही. त्यामुळे चाफेकर कुटुंब चिंताग्रस्त आहे.
===============================================
आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू
ठाणे : आई-वडिलांवर हल्ला करुन मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला आहे. वर्तक नगरमधील इमारत क्रमांक 27 मधील ही घटना आहे.
या घटनेत आई विद्या पेडणेकर यांचा मृत्यू झाला असून वडील सिताराम पेडणेकर जखमी झाले आहेत. तसंच मुलगा प्रथमेश पेडणेकरही जखमी आहे. सर्व जखमींना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
प्रथमेशच्या हाताच्या नसा कापल्या असून त्याच्या मानेवरही जखमा असल्याचं कळतं.
दरम्यान, आई-वडिलांवर हल्ला करुन प्रथमेश आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे.
===============================================
'दोन स्पेशल'ला मानाचे 5 पुरस्कार
मुंबई: झी नाट्यगौरव…. गौरव रंगभूमीचा…. रंगभूमीला अमरत्व प्रदान करणाऱ्या नाट्यवेड्या कलाकारांचा.
ज्यांनी रंगभूमी जपली… फुलवली…. जिवंत ठेवली आणि मायबाप रसिकजणांना कलेचं भरभरुन दान दिलं त्या नाट्यपंढरीतल्या वारकऱ्यांचा हा गौरव सोहळा.
या वर्षीच्या झी गौरव पुरस्कारांमध्ये बाजी मारली ती ‘दोन स्पेशल’ या नाटकाने… सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नाटक यासह तब्बल 5 मानाचे पुरस्कार ‘दोन स्पेशल’ नाटकाला मिळाले.
व्यावसायिक रंगभूमीवरची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली अमृता सुभाष. ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकासाठी तिला या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
प्रायोगिक रंगभूमीसाठी देण्यात येणारा सर्वोतकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार इला भाटे यांना देण्यात आला. पै पैशांची गोष्ट या नाटकातील भूमिकेसाठी त्यांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात विशेष लक्ष्यवेधी नाट्यकृती या पुरस्काराने हा शेखर खोसला कोण आहे या नाटकाला सन्मानित करण्यात आलं.
===============================================
सचिनसारख्या खास फटक्यासाठी विराटचा सराव
बंगळुरू: मैदान टी-20 चं असो किंवा एकदिवसीय सामन्याचं, टीम इंडियाचा डॅशिंग फलंदाज विराट कोहली सध्या भलत्याच फॉर्मात आहे. विश्वचषकात आज बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीने एका खास फटक्याची तयारी केली. प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या देखरेखीखाली विराटने रिव्हर्स पॅडल स्वीप फटका खेळण्याचा सराव केला.
क्रिकेटच्या मैदानात पॅडल स्विपचा फटका मास्टर ब्लास्टर सचिनने आणला होता. यानंतर अनेकांनी त्या फटक्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही जमलं नाही. मात्र आता विराटच्या खेळाचं खुद्द सचिननेही कौतुक केलं होतं. त्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूने निर्माण केलेला फटक्याचा सराव करुन विराट आज मैदानात काय धमाल उडवतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
===============================================
भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान शाहरुखची कॉमेंट्री
बंगळुरु : अभिनेता शाहरुख खान टी 20 विश्वचषकातील भारताच्या सामन्यात समालोचन अर्थात कॉमेंट्री करणार आहे. शाहरुख आजच्याच सामन्यात म्हणजे भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्यावेळी कॉमेंट्री करताना दिसेल.
इंग्रजी वृत्तपत्र ‘मुंबई मिरर‘ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आजच्या सामन्यादरम्यान शाहरुख कॉमेंट्री बॉक्समध्ये कपिल देव आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरसोबत कॉमेंट्री करणार आहे.
हा सामना बंगळुरूत खेळला जाणार आहे, मात्र शाहरुख खान मुंबईच्या स्टुडिओमध्ये बसून कॉमेंट्री करणार आहे. शाहरुख त्याच्या आगामी ‘फॅन‘ या सिनेमाच्या प्रमोशनानिमित्त आज हजेरी लावणार आहे.
दरम्यान, शाहरुखला कोलकात्यातील भारत-पाकिस्तान सामना पाहता आला नव्हता. त्याबद्दल त्याने ट्विटवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. “ईडन गार्ड्न्सवरील मस्ती आणि मॅच मिस केली. दुबईत काम पूर्ण केल्यानंतर हायलाईट्स पाहिली. मात्र भारताला फायनलमध्ये जिंकताना मैदानातून जरूर पाहणार“, असं शाहरुख म्हणाला.
शाहरुख सध्या त्याच्या ‘फॅन‘ या सिनेमाच्या डबिंगमध्ये आणि ‘रईस‘च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.
===============================================
भाजप महिला मेळाव्यात राडा, शिवसेनेच्या 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा
नाशिक : शिवसेनेने भाजपच्या महिला मेळाव्यात केलेल्या तोडफोडीमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप महिला नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांच्यासह 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे यात दरोड्यासारख्या गंभीर आरोपांचाही समावेश आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण आहेत याचा शोध घ्यावा, अशी मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
स्वतंत्र मराठवाड्यावरुन शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी नाशिक-पुणे महामार्गावर श्रीकृष्ण लॉन्सवर असलेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात धुडगूस घालत तोडफोड केली. भाजपच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दुपारी वेगळ्या मराठवाड्याच्या मागणीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
शिवसेनेने महिलांवर केलेला हल्ला संस्कृतीला न शोभणारा असल्याची टीका भाजप आमदार आणि शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप महिला मेळावा उधळल्यानंतर भाजप कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यांनी नाशिक-पुणे हायवेवर रास्ता रोको केला.
===============================================
कंदिल बलुच विराट कोहलीच्या प्रेमात, ट्विटरवर जाहीर कबुली
नवी दिल्ली : झटपट प्रसिद्धीच्या मोहापायी अनेक जण कुठल्याही थराला जाण्याची शक्यता असते. पाकिस्तानी संघाने टीम इंडियाला पराभूत केल्यास स्ट्रीप डान्स करण्याच्या गमजा मारल्यानंतर पाकिस्तानी मॉडेल कंदील बलूच आता विराट कोहलीच्या मागे लागली आहे.
कंदीलने ट्विटरवरुन आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाक सामन्याचा हिरो म्हणजे विराट कोहलीच्या प्रेमात बुडाल्याचं तिने ट्विटरवर म्हटलं आहे. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये तिने अनुष्का शर्माचाही उल्लेख केला आहे.
===============================================
टी 20 विश्वचषकात कोलकात्यातील ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रिप डान्स करण्याची घोषणा कंदील बलोचने केली होती. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवत ईडन गार्डनवर विजयी झेंडा रोवला. त्यामुळे कंदीलने पाकिस्तानी खेळाडूंवर संतप्त होत एका व्हिडीओद्वारे नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीला निवृत्त होण्याचा सल्ला कंदील बलोचने दिला आहे. शिवाय, वकार युनूसवर तर अत्यंक जोरदार टीका केलीय. कंदीलने तिच्या ऑफिशिअल फेसबुक अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ढसाढसा रडताना दिसतेय. पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीवर नाराज असलेल्या कंदीलने त्यांना पाकिस्तानात न येण्याची धमकी दिलीय.
===============================================
स्फोटात जखमी झालेल्या निधीच्या देखभालीसाठी पती ब्रसेल्सला जाण्याची शक्यता
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ - अंधेरीत रहाणा-या चाफेकर कुटुंबासाठी मंगळवारचा दिवस अन्य दिवसांसारखाच होता. पण दुपारी एक वाजता ब्रसेल्सवरुन आलेला घरातला फोन खणखणला आणि घरातील संपूर्ण वातवरणच बदलून गेले. आनंदाच्या जागी चाफेकर कुटुंब दु:ख, वेदना, चिंतेमध्ये बुडून गेले. जेट एअरवेजमध्ये इनफ्लाईट मॅनेजर म्हणून काम करणारी निधी चाफेकर ब्रसेल्स विमानतळावरील स्फोटात जखमी झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.निधी आणि अमित मोटवानी हे जेटचे क्रू मेंबर्स या स्फोटात जखमी झाले आहेत. अमित मोटवानी खारला रहातो. निधीला अँटवरर्प येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निधीची देखभाल आणि काळजी घेण्यासाठी कुटुंबातील सदस्याची ब्रसेल्सला जाण्याची व्यवस्था जेट एअरवेजकडून करुन देण्यात आली आहे. निधीला वैद्यकीय उपाचरांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी ब्रसेल्स येथील जेटचे कर्मचारी रुग्णालयाच्या संपर्कात असल्याची माहिती जेटकडून देण्यात आली आहे. निधीचे पती रुपेश चाफेकर ब्रसेल्सला जाण्याची शक्यता आहे.निधी काही ठिकाणी भाजली असून, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्याशी बोलता येईल अशी अपेक्षा आहे असे रुपेशने सांगितले. निधीची माहिती मिळाल्यानंतर रुपेश लगेच ऑफीसमधून घरी निघून आला. निधी आणि रुपेशला अकरावर्षांची मुलगी असून, ती सारखी आईबद्दल विचारत आहे. निधी ऑगस्ट १९९६ पासून जेट एअरवेजमध्ये नोकरी करत असून, ती सिनीयर क्रू मेंबर आहे. ब्रसेल्सवरुन जेटचे विमान मुंबईसाठी उड्डाण करणार होते. मात्र त्याआधीच स्फोट झाला.
===============================================
लग्नापासून आर्थिक स्थैर्य मिळाले नाही - मलायका
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २३ - मलायका आणि अरबाज खान त्यांचे १७ वर्षांचे वैवाहीक नाते संपवणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच नुकतेच दोघांचे डिनरसाठी एकत्र आल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यामुळे घटस्फोट ही निव्वळ अफवा होती असे अनेकांना वाटले. पण स्पॉटबॉय.कॉम या एंटरटेनमेन्टच्या वेबसाईटच्या वृत्तानुसार मलायका आणि अरबाजमध्ये काहीही आलबेल नसून, मलायकाने नुकतीच प्रसिद्ध वकिल वंदना शहा यांची भेट घेतली. वदंना शहा या घटस्फोटाचे खटले हाताळतात.मलायकाने आपल्या निर्णयावर फेरविचार करावा यासाठी अरबाजचा भाऊ सलमान खान प्रयत्न करत आहे. स्पॉटबॉय.कॉमच्या वृत्तानुसार मलायकाला तिचा १४ वर्षांचा मुलगा अरहानचा ताबा हवा आहे. अरबाजला मुलाला भेटण्यापासून रोखणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.लग्नापासून कोणतेही आर्थिक स्थैय मिळाले नसल्याचीही तिची तक्रार आहे. आपण सामन्य सूनेसारखे घरगुती आयुष्य जगावे अशी अरबाजच्या कुटुंबियांची इच्छा आहे पण ती आपल्याला मान्य नाही असे तिने सांगितले. मलायकाने अजून घटस्फोटासाठी अर्ज केला नसला तरी, कुठल्याही दिवशी हे घडू शकते.
===============================================
फुगे मारण्याच्या नादात मुलगा बाल्कनीतून खाली पडला, नशीबानं जीव वाचला
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. २३ - होळी म्हटलं की रंगांची उधळण आली नी पाण्यानं खेळणं आलं. परंतु या खेळाचा आनंद लुटताना नीट काळजी घेतली नाही आणि लहान मुलांकडे लक्ष ठेवलं नाही तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय दिल्लीमध्ये मंगळवारी आला. रस्त्यावरच्या मुलांना फुगे मारून भिजवताना आपण कुठे आहोत याचं भान राहिलं नाही आणि एक सात आठ वर्षाचा चिमुरडा गॅलरीतून खाली पडला. सुदैवानं त्याचं घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे त्याचा जीव बचावला असून त्याच्या पाठिला व मानेला मार लागला आहे.अथर्व जिंदाल हा मुलगा राणी बाग परिसरातल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आला होता. आपल्या भावांसोबत बाल्कनीमध्ये उभा राहून रस्त्यावरील मुलांना तो फुगे मारत होता. फुगे मारण्यासाठी तो रेलिंगवर चढला होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने बाल्कनीमधून खाली पडला. पहिल्या माळ्यावरुन खाली पडल्याने त्याच्या पाठीच्या कण्याला, डोक्याला आणि मानेला जबर मार बसला आहे. उपचारासाठी त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे.अथर्वला नेताजी सुभाष चंद्र परिसरातील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. त्याची तब्बेत सध्या स्थिर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांना नेमकी जागा माहित नसल्याने त्यांनी सर्व रुग्णालयात चौकशी सुरु केली. काही तासातच पोलिसांना शोध लागला आणि त्यांनी कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाने यामध्ये कोणी जबाबदार नसल्यांचं म्हणलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.
===============================================
अफगाणिस्तानची झुंज अपयशी; इंग्लंडचा विजय
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नगण्य अनुभव असतानाही बलाढ्य संघांना कडवी झुंज देण्याची कामगिरी अफगाणिस्तानच्या संघाने आज (बुधवार) इंग्लंडविरुद्धही कायम राखली. ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील साखळी सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडची अवस्था एकवेळ 7 बाद 85 अशी केली होती. मोईन अलीने शेवटच्या दोन षटकांत फटकेबाजी करत इंग्लंडला 7 बाद 142 धावसंख्येपर्यंत पोचविले. त्यानंतर फलंदाजी ढेपाळल्यामुळे अफगाणिस्तानला इंग्लंडविरुद्ध 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानला 20 षटकांत नऊ गडी गमावून 127 धावांपर्यंतच मजल मारता आली.
विश्वकरंडक स्पर्धेतील गेल्या दोन्ही सामन्यांत अफगाणिस्तानच्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळविली होती. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजांसमोरही अफगाणिस्तानने 172 धावांपर्यंत मजल मारून फलंदाजीतील ताकद दाखवून दिली होती. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने गोलंदाजीतील भेदकताही दाखवून दिली.
अफगाणिस्तानची झुंज अपयशी; इंग्लंडचा विजय
विश्वकरंडक स्पर्धेतील गेल्या दोन्ही सामन्यांत अफगाणिस्तानच्या कामगिरीने सर्वांची वाहवा मिळविली होती. दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजांसमोरही अफगाणिस्तानने 172 धावांपर्यंत मजल मारून फलंदाजीतील ताकद दाखवून दिली होती. इंग्लंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात अफगाणिस्तानने गोलंदाजीतील भेदकताही दाखवून दिली.
===============================================
ब्रुसेल्स हल्ला: प्रमुख संशयितास अटक
ब्रुसेल्स : ब्रुसेल्स विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख संशयित नजीम लाचराओई याला आज (बुधवार) अटक केल्याचे वृत्त स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी दिले आहे. विमानतळावरील हल्ल्यातील संशयितांची छायाचित्रे कालच प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी दोघांची नावे खालिद आणि इब्राहिम अल बाक्राओई असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणात अटक झालेल्या लाचराओई याचा संबंध पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्याशीही असल्याचा संशय आहे. ब्रुसेल्स विमानतळावर काल (मंगळवार) झालेल्या हल्ल्यात किमान 31 जण ठार आणि 260 जण जखमी झाले होते. खालिद आणि इब्राहिम या दोघांचेही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा संशय बेल्जियममधील सुरक्षा यंत्रणांना होता. दरोडा टाकताना पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी 2010 मध्ये इब्राहिमला नऊ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. बेकायदा शस्त्रे बाळगल्यामुळे खालिदला 2011 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
ब्रुसेल्स विमानतळावरी हल्ल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांचे ‘सीसीटीव्ही‘ चित्रिकरण जाहीर केले होते. यात खालिद, इब्राहिम आणि नजीम हे तिघेही दिसत आहेत.

जलसंकटातून नक्षलवाद निर्माण होण्याची शक्यता
सोलापूर : गावं टिकली नाही तर शहरांचे अस्तित्व शून्य राहील. धरणाची तोंडं शहराकडे वळताहेत. गावोगावी जलसंकट निर्माण झाल्याने गावांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. जलसंकटाचे निवारण तातडीने होणे गरजेचे आहे; अन्यथा दुसरा नक्षलवाद जलसंकटातून निर्माण होईल, अशी चिंता महाराष्ट्र राज्य आदर्श ग्रामयोजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून ड्रीम फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अभिनव फार्मर्स क्लब, पुणे यांच्या वतीने आयोजित चौथ्या जलसाक्षरता संमेलनात हिवरेबाजारचे श्री. पवार यांची प्रकट मुलाखत झाली. मुलाखतीमधून त्यांनी त्यांचा सामाजिक जीवनप्रवास उलगडला. येथील हुतात्मा स्मृती मंदिरात प्रकट मुलाखत झाली. निवेदक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी श्री. पवार यांची मुलाखत घेतली.
श्री. पवार यांनी सांगितले, ""समाजकारण आणि राजकारणात मी अपघाताने आलो. गावपातळीवर सामाजिक उपक्रम राबवताना गावातील राजकारणाचा अनुभव आला. गावातील महिलांनी पाणीसमस्येचे वास्तव दाखवून दिले. त्यानंतर पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध उपक्रमांना सुरवात केली. हिवरेबाजार गावात एकही बोअर नाही. गावातील विहिरींना पुनरुज्जीवित केले. गावातील जमिनी विकण्यावर बंदी आणली. "लोटा‘पद्धत बंद करून घरोघरी स्वच्छतागृहे बांधली. ज्यातून प्रेरणा मिळत गेली, त्या प्रेरणेला कृतीची जोड देत गेलो. त्यामुळे हिवरेबाजार गावाला देशात आदर्श करू शकलो.‘‘
===============================================
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ
नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 6 टक्क्यांनी वाढून 125 टक्के करण्याची घोषणा केली आहे. सध्या सुमारे 1 कोटी कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना 119 टक्के महागाई भत्ता दिला जातो.फेब्रुवारी महिन्यातच सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची योजना केली होती.
महागाई भत्त्यातील वाढीचा 48 लाख कर्मचारी व 55 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार आहे. गेल्या वर्षभरातील महागाई दराच्या आकडेवारीचा अभ्यास करुन सरकारतर्फे वर्षात दोनवेळा महागाई भत्त्यात बदल केला जातो. यापुर्वी ऑक्टोबर 2015 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्के वाढ करण्यात आली होती.

'होंडा'च्या मोटारी एप्रिलपासून सहा हजारांनी महाग
मुंबई : होंडा कार इंडिया पुढील महिन्यापासून आपल्या मोटारींच्या किंमत 6,000 रुपयांची वाढ करण्याची योजना करीत आहे. परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी कंपनीने मोटारींच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 79,000 रुपयांची वाढ घोषित केली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन उद्योगावर इन्फ्रास्ट्रक्चर सेसची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच मोटार कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली होती.
कंपनीकडून भारतात मोटारींच्या सहा मॉडेल्सची विक्री केली जाते. कंपनीची प्राथमिक व सर्वात स्वस्त ‘मोटार ब्रायो‘ 4.31 लाख रुपयांची आहे. एसयुव्ही सीआरव्ही ही सर्वात अत्याधुनिक व महागडी मोटार 26 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
"परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मोटारींच्या सर्वच मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची योजना करीत आहोत.", अशी माहिती कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिली आहे. परंतु प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत किती वाढ होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
'होंडा'च्या मोटारी एप्रिलपासून सहा हजारांनी महाग
चालू महिन्याच्या सुरुवातीलाच कंपनीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 79,000 रुपयांची वाढ घोषित केली होती. केंद्रीय अर्थसंकल्पात वाहन उद्योगावर इन्फ्रास्ट्रक्चर सेसची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे सर्वच मोटार कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली होती.
कंपनीकडून भारतात मोटारींच्या सहा मॉडेल्सची विक्री केली जाते. कंपनीची प्राथमिक व सर्वात स्वस्त ‘मोटार ब्रायो‘ 4.31 लाख रुपयांची आहे. एसयुव्ही सीआरव्ही ही सर्वात अत्याधुनिक व महागडी मोटार 26 लाख रुपयांना उपलब्ध आहे.
"परदेशी विनिमय दराचा उत्पादन खर्चावर होणारा प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मोटारींच्या सर्वच मॉडेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची योजना करीत आहोत.", अशी माहिती कंपनीच्या एका प्रवक्त्याने दिली आहे. परंतु प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत किती वाढ होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
===============================================
दोन कोटी विद्यार्थ्यांची एप्रिलमध्ये चाचणी
नाशिक : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नसल्याचा गैरसमज तयार झाल्याने राज्यातील गुणवत्ता ढासळली. त्यातून सावरण्यासाठी सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. त्याअंतर्गत पाच व सहा एप्रिलला राज्यातील दोन कोटी विद्यार्थ्यांची तिसरी चाचणी होत आहे. या चाचणीसाठीचे भाषा व गणिताचे पेपर जिल्हास्तरावर पोचले असून, ते तालुकास्तरावर रवाना करण्यात येत आहेत.

राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका देऊन सप्टेंबर ते ऑक्टोबर 2015 मध्ये पहिली पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचे मूल्यमापन करून जवळपास 50 टक्के शाळांनी विद्यार्थ्यांना मिळालेले गुण "सरल‘ प्रणालीत अपलोड केले होते. मात्र, त्यासाठी सक्ती करण्यात आली नव्हती. राज्याच्या विविध भागांतून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पहिल्या पायाभूत चाचणीत 25 ते 30 टक्के विद्यार्थी "ड‘ श्रेणीत आढळून आले होते. त्यामुळे स्वाभाविकपणे अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे कौशल्य शिक्षकांना पणाला लावावे लागले. पुढे शाळास्तरावरून संकलित मूल्यमापन चाचणी घेण्यात आली. त्याचे मूल्यमापन करून शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय गुणांच्या नोंदी करून ठेवल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे पाठवण्यात आलेल्या पेपरच्या आधारे पाच एप्रिलला भाषा, तर सहा एप्रिलला गणित विषयाची परीक्षा घेतली जाणार आहे. इतर विषयांच्या परीक्षेसाठी शिक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहेत. ही परीक्षा सर्व व्यवस्थापनाच्या आठ माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांसाठी बंधनकारक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चाचणीमधील लेखी प्रश्नाबरोबरच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा त्याचदिवशी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. चाचणीमधील विषयनिहाय एकूण गुणांची नोंद "सरल‘ प्रणालीत करावयाची आहे. याखेरीज राज्यस्तरावरून ई-निविदा पद्धतीने पुण्याच्या मॅस्कॉन कॉप्युटर्स सर्व्हिसेसची त्रयस्थ संस्था म्हणून निवड करण्यात आली. या संस्थेच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यातील पाच शाळांत चाचणी घेण्यात येणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील दोन हजार शंभर शाळांत ही चाचणी होईल.
===============================================
सलामीवीरांच्या अपयशामुळे रहाणेला संधी द्या!
ट्वेन्टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या टप्प्यावर असताना भारताला पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे टॉनिक मिळाले. पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळवलेला विजय निश्चितच आत्मविश्वास उंचावणारा असेल. भारतीय संघाकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात असले तरी तशी कामगिरी त्यांना करता आलेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे सलामीवीरांचे अपयश. विराट कोहलीने कठीण परिस्थितीतून मार्ग काढला. क्रिकेट विश्वातील सर्व प्रकारांत तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे; पण तो जर लवकर बाद झाला, तर संघाला भक्कमपणे सावरणारा एकमेव फलंदाज आहे आणि तो म्हणजे अजिंक्य रहाणे.
आशिया करंडक स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात अजिंक्य रहाणे अपयशी ठरला; पण त्या अपयशावर त्याची गुणवत्ता ठरवू नये. कोणत्याही प्रकारच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्यासाठी तो समर्थ आहे. क्षेत्ररक्षणातही तो सक्षम आहे. विजयी संघात बदल करायचा नसतो हे मान्य असले, तरी पहिल्या दोन सामन्यांत फलंदाजीबाबत काय घडले याचाही विचार व्हायला हवा.
ट्वेन्टी-20 प्रकारात सर्वसाधारण संघही धक्कादायक निकाल लावू शकतो. 3-4 षटकांत सामन्याचे चित्र पालटू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेशला कसोटी सामन्यात फारशी चांगली प्रगती करता आली नसली तरी टी-20 प्रकारात त्यांची ताकद वाढली आहे. कमीत कमी धावा देणारे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना साथ देणारे चांगले क्षेत्ररक्षकही त्यांच्याकडे आहेत. तसेच त्यांच्या काही फलंदाजांकडे टोलेबाजी करण्याचीही क्षमता आहे. भारतीय संघ त्यांच्याविरुद्ध बऱ्याचदा खेळलेला आहे; तसेच आता पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय संघ सावध राहील, अशी अपेक्षा आहे.

दहशतवाद्यांना 'टॉर्चर' करा : डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क : बेल्जियममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारामध्येही उमटत आहेत. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून इच्छूक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ यांनी कट्टर मुस्लिमांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली. तसेच, ‘पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील संशयितास ‘टॉर्चर‘ करून माहिती मिळविली असती, तर ब्रुसेल्सवरील हल्ला टाळता आला असता,‘ असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
‘इसिस‘ या कट्टर दहशतवादी संघटनेच्या प्रभावाखाली असलेल्या देशांमधून येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा रोखण्यासाठी अमेरिकेने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत क्रुझ यांनी मांडले. ब्रुसेल्समध्ये काल (मंगळवार) झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस‘ने स्वीकारली. तसेच, यापुढेही असे अनेक हल्ले करण्याची धमकीही ‘इसिस‘ने दिली आहे.
या पार्श्वभूमीवर टेड क्रुझ म्हणाले, "मुस्लिम समाजाची वस्ती असलेल्या ठिकाणी गुप्तचर यंत्रणांची बारीक नजर असणे अत्यावश्यक आहे. अशाने कट्टरवादाकडे वळणाऱ्यांना वेळीच रोखता येऊ शकेल.‘‘ क्रुझ यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनीही या मतास पाठिंबा दर्शविला.

'त्या' सामन्यानंतर शाहिद आफ्रिदी होणार निवृत्त
मोहाली- पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदी याने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतनंतर टी-20 क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेत मंगळवारी दिले.
भारताविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यावर या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी पाकिस्तानसाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. तो सामना गमावल्यानंतर मनोधैर्य खचलेला कर्णधार आफ्रिदी म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा आगामी सामना हा त्याचा अखेरचा टी-20 सामना असू शकतो.
"तो (ऑस्ट्रेलियाविरुद्धचा) सामना माझ्यासाठी अखेरचा असू शकेल," असे आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर सूत्रसंचालकाशी बोलताना सांगितले.
आफ्रिदीने या स्पर्धेनंतर निवृत्त व्हावे असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सोमवारी त्याला सांगितले आहे. दरम्यान, 180 धावांचे आव्हान हे बचावासाठी चांगले होते, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने म्हटले आहे.
'त्या' सामन्यानंतर शाहिद आफ्रिदी होणार निवृत्त
भारताविरुद्ध मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यावर या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी पाकिस्तानसाठी न्यूझीलंडविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. तो सामना गमावल्यानंतर मनोधैर्य खचलेला कर्णधार आफ्रिदी म्हणाला की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा आगामी सामना हा त्याचा अखेरचा टी-20 सामना असू शकतो.
"तो (ऑस्ट्रेलियाविरुद्धचा) सामना माझ्यासाठी अखेरचा असू शकेल," असे आफ्रिदीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर सूत्रसंचालकाशी बोलताना सांगितले.
आफ्रिदीने या स्पर्धेनंतर निवृत्त व्हावे असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सोमवारी त्याला सांगितले आहे. दरम्यान, 180 धावांचे आव्हान हे बचावासाठी चांगले होते, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने म्हटले आहे.
===============================================
टंचाईग्रस्तांना कायमस्वरूपी जलसेवा देण्याचा प्रयत्न
जुने नाशिक : पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी जलसेवा उपलब्ध करून देण्याचा मानस करीत तो प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न पिंजरघाट (जुने नाशिक) येथील समाजसेवक अलीमभाऊ पीरजादा यांच्याकडून करण्यात आला. याद्वारे त्यांनी आगळावेगळा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.

"समाजसेवा हीच ईश्वर सेवा‘ या तत्त्वावर चालणारे अलीमभाऊ पीरजादा नेहमी विविध कामांतून समाजसेवा करीत आले आहेत. समाजातील गोरगरिबांसाठी त्यांनी धर्मार्थ रुग्णालय सुरू केले आहे. वेळोवेळी त्याठिकाणी मोफत सर्वरोग निदान शिबिर घेतले जाते. त्याचप्रमाणे शासकीय किवा खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नागरिकांसाठी धावून जाणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. तसेच, त्यांनी महापालिका हद्दीतील नागरिकांसाठी मोफत रुग्णसेवाही उपलब्ध करून दिली आहे. अशा अनेक प्रकारे समाजकार्याचा विडा उचललेले श्री. पीरजादा यांना कित्येक दिवसांपासून जुने नाशिक भागातील नागरिकांची पिण्यासाठी होणारी वणवण भेडसावत होती. नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी काही तरी केले पाहिजे, याचा विचार करीत त्यांनी तो विचार आज प्रत्यक्षात अस्तित्वात आणला व जागतिक जल दिनाचे दिवसाचे औचित्य साधत त्यांनी आपले पिता (कै.) अल्लाउद्दिन बडेसाहब पीरजादे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बडी दर्गा परिसरात स्वखर्चातून कूपनलिका करून घेतली.
आज सकाळपासून कूपनलिका करण्याचे काम हाती घेत ते पूर्ण करण्यात आले. ही कूपनलिका सर्वांसाठी खुली असणार आहे. कूपनलिकेमुळे जुने नाशिक विशेषतः पिंजरघाट, बडी दर्गा परिसर, जोगवाडा, डिंगर आळी, तांबट लेन येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सद्यस्थितीतील पाणीटंचाईमुळे येथील रहिवाशांना पाण्याच्या शोधात अन्य ठिकाणी जावे लागते; पण या कूपनलिकेमुळे त्यांची वणवण थांबणार आहे. तसेच, हव्या त्या वेळी पाणी मिळण्यास मदत होईल. पाण्याची पातळी समतोल राहण्यासाठी काही वेळ तेथील पाणीपुरवठा बंद राहील; पण त्यानंतर पुन्हा पाणी सुरू करून देण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
===============================================
गुंतवणुकदरांनो, डॉलरसोबत पाणीही आणा
मुंबई : ‘‘मेक इन इंडिया‘ आणि ‘मेक इन महाराष्ट्र‘मधील उद्योगांचे करार म्हणजे केवळ शब्द व आकड्यांचा खेळ असून सरकारच्या दाव्यात तफावत आहे,‘ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (बुधवार) विधानसभेत केला. ‘मराठवाड्यासाठी दीड लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार झाल्याचा दावा सरकार करत आहे. पण मराठवाड्यात प्यायलाही पाणी नसताना कोणते उद्योग तिथे जाण्यास तयार आहेत, त्याची माहिती द्या. अन्यथा, ‘बॅगा भरून डॉलर घेऊन गुंतवणूक करायला येताना सोबत पाण्याचे टॅंकरही घेऊन या‘ असे आवाहन सरकारने उद्योजकांना केले आहे का?‘ असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्रात पाण्याचे भयानक संकट आहे. मराठवाड्यातील पाण्याच्या संकटाला सरकारचा ढिसाळपणा कारणीभूत आहे. पाण्याचे संकट आहे, हे ऑगस्टमध्येच समजले होते. पण मुख्य शहरांच्या पाणीपुरवठ्यावर सरकारने पर्याय शोधले नाहीत.‘‘ ‘राज्य सरकारने शेती क्षेत्रात 26 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याच्या थापा मारू नका,‘ असे सांगत सर्व क्षेत्रांतील योजनांचा खर्च एकत्र करून आकड्यांचा खेळ केला असल्याची टीकाही त्यांनी केली. शेती आणि शेतकऱ्यांसाठी केवळ 12 हजार 881 कोटी रुपयांची तरतूद केल्याचा दावा चव्हाण यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारनेही अर्थसंकल्पामध्ये दिशाभूल केल्याचे चव्हाण म्हणाले.
...तर राजकारण सोडेन!
राज्यावर आघाडी सरकारने कर्जाचा डोंगर केल्याची टीका सध्याचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना करत होते, याचा दाखला देत ‘या सरकारने एक रुपया तरी कर्ज कमी करून दाखवले, तर मी राजकारण सोडून देईन‘ असे आवाहनच पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. ‘लोकप्रिय घोषणा, टोल व एलबीटी माफ केल्याने राज्यावर आर्थिक बोजा पडल्याचे सरकारने मान्य केले. त्यामुळे आताही कर्ज काढावे लागत आहेच. कर्ज काढा, पण राज्यातला शेतकरी सुखी करा,‘ असेही चव्हाण म्हणाले.

नांदेड - सांगवीतील ग्रामस्थांनी दिले शाळेसाठी साठ हजार रुपये
नांदेड - सांगवीतील ग्रामस्थांनी दिले शाळेसाठी साठ हजार रुपये
नांदेड,23- शाळा आपली गाव आपला या भावनेतून ग्रामस्थ आता पुढे येत असून अर्धापूर तालुक्यातील सांगवी खुर्द या गावातील लोकांनी प्रमाणिकपणे ग्राम पंचायतीकडे कर भरुन शाळेसाठी साठ हजार रुपयांचे साहित्य उपलब्ध करुन दिले याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी ग्रामस्थ सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्हयात शैक्षणीक गुणवत्ता वाढविण्याचे शाळांमध्ये प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी रक्कम जमा केली. साधारणपणे कर भरण्यास कुणी इच्छुक नसतात परंतु ग्रामसेविका उषा इंगोले आणि शाळेचे मुख्याध्यापक एम.आर.पाटील, शिक्षक व्ही.बी.देशमुख यांनी ग्रामस्थांच्या बैठका बोलावून व ग्रामस्थांना वारंवार विनंती करुन शाळा विकासाचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देऊन ग्राम पंचायतीचा कर लोकांनी भरला व त्यातून डिजिटल शाळेसाठी साहित्य दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या गावास भेट देऊन शाळेची पाहणी केली व ग्रामसेवक, शिक्षकांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद सदस्य नागोराव इंगोले, पंचायत समिती अर्धापूरचे उपसभापती सुनिल आटकोरे, सरपंच सौ.छाया सोनटक्के, उपसरपंच वंदना मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम जाधव, गट शिक्षणाधिकारी सुर्यकांत कडेलवार आदींची उपस्थिती होती. यावेळी डिजिटल शाळांचे उदघाटन अभिमन्यू काळे यांच्याहस्ते करण्यात आले. गंगाराम मुळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
अभिमन्यू काळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद केला. मुलांचे वाचन घेतले, भागाकार, गुणाकार, बेरीज करुन घेतली. डिजिटल वर्गात पाठ कसा शिकविल्या जातो त्यांचं सादरीकरण पाहिले. यावेळी ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
चौकट -
ज्ञानरचनावादी/डिजिटल शाळांचा सत्कार -
ज्या शाळा ज्ञानरचनावादानुसार अध्यापन करतात, रंगरंगोटी केली आहे. डिजिटल वर्ग केला आहे अशा शाळांमधील उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांचा विशेष सत्कार शिक्षण समितीच्या आगामी सभेत करणार असल्याचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले आहे. तसेच सन 2016-17 या वर्षात 100 टक्के गुणवत्ता प्राप्त होईल असे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Qandeel Baloch
No comments:
Post a Comment