[अंतरराष्ट्रीय]
१- वर्ल्डकपसाठी येणाऱ्या पाक नागरिकांसाठी व्हिसा नियम शिथिल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- न्यायालयांनी द्यावी प्रलंबित खटल्यांची माहिती: पंतप्रधान
३- मोदी, संघ प्रचारकासारखे नव्हे, 'पीएम'सारखे वागा - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
४- आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च
५- 'आयुष'मध्ये मुस्लिमांना नोकरी नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार : अक्षय कुमार
७- मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, जावडेकरांचाही ग्रीन सिग्नल
८- ठाणे; पोलिसाचा अपघाती मृत्यू, प्राण सोडण्यापूर्वी नेत्रदानाचा मानस
९- नाशिक; बिल्डर आणि सरकारचं साटंलोटं, राज ठाकरेंचा घणाघात
१०- पीटर मुखर्जीने वरळीतील आलिशान घर विकायला काढलं
११- यशवंतरावांच्या आठवणीत रमले शरद पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मुंबई; वर्गाबाहेर अर्धनग्न उभं राहण्याची चिमुकल्यांना शिक्षा
१३- समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याची चाचपणी
१४- 23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी
१५- मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
१६- विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सलमानची मध्यस्तीही वाया, मलायका- अरबाजचा घटस्फोट निश्चित
१८- पहिल्या गर्लफ्रेंडकडून मराठी शिकलो - अक्षयकुमार
१९- 'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा
२०- भारत उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल- द्रविड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================
मालवणीतल्या श्री ट्यूशन क्लासेसमध्ये लहानग्यांना ही लज्जास्पद शिक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही जणांनी दोघांना बाहेर केल्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या प्रकारानंतर पीडित मुलं प्रचंड घाबरली असून तणावाखाली आहेत.
दोन्ही मुलांनी ट्यूशन क्लासमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण केला नव्हता. अभ्यास अपूर्ण असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना दुसरी एखादी शिक्षा देणं अपेक्षित होतं. मात्र संबंधित शिक्षकाने त्यांचे कपडे काढून त्यांना क्लासबाहेर उभं केल्याने संताप व्यक्त होत आहे.
===========================================

44 वर्षीय पोलिस नाईक चंद्रकांत साळुंखे यांना भरधाव टीएमटी बसने धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या साळुंखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपले दोन्ही डोळे दान करण्याचा मानस व्यक्त केला. साळुंखे यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी अहमदनगरला नेण्यात येणार आहे.
शुक्रवारी रात्री 11.30 वाजता मीरा भाईंदरहून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये आरोपी ड्रायव्हर गजानन शेजुळ चढला. ड्रायव्हर दारुच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करत बसमधील 30 ते 40 प्रवाशांनी त्याला खाली उतरवलं.
त्यानंतर बसचालक गजानन शेजारची बस घेऊन ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. अखेर गायमुख जकात नाक्याजवळ कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस चंद्रकांत साळुंखे यांना बसने धडक दिली.

यशवंतरावांच्या आठवणीत रमले शरद पवार
नाशिक- येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आज (शनिवार) पासून "यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आज त्यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी "विशाखा‘ व "रुक्मिणी‘ पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज यशवंतराव चव्हाणांच्या विविध आठवणीत चांगलेच रमले होते.
(छायाचित्रे- सोमनाथ कोकरे)

===========================================
न्यायालयांनी द्यावी प्रलंबित खटल्यांची माहिती: पंतप्रधान
पाटणा : ‘प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे एक वार्षिक निवेदन सर्व न्यायालयांनी नियमितपणे सुरू करावे,‘ अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) मांडली. यामुळे दीर्घ काळ प्रलंबित असलेल्या खटल्यांविषयीची माहिती सर्वांसमोर येईल, असे मोदी म्हणाले.
'मोदी, संघ प्रचारकासारखे नव्हे, 'पीएम'सारखे वागा'
पाटना (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पूर्णवेळ प्रचारकासारखे वागू नये, तर देशाच्या पंतप्रधानांसारखे वागावे असा सल्ला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिला आहे.
रेल्वे मार्गाच्या पुलाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मोदी एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलत होते. ते म्हणाले, मोदी यांनी बिहारला विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी ते दिले नाही. त्याबद्दल त्यांनी बिहारच्या जनतेची माफी मागावी, असेही यादव यावेळी म्हणाले. तसेच मोदी यांनी संघाच्या पूर्णवेळ प्रचारकासारखे नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांसारखे वागावे असा सल्लाही यादव यांनी दिला.
===========================================
भारत उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल- द्रविड
मुंबई - कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल, असे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने म्हटले आहे.
'आयुष'मध्ये मुस्लिमांना नोकरी नाही
नवी दिल्ली - जागतिक योगा दिनाच्यादिवशी अल्पमुदतीच्या प्रशिक्षक पदांसाठी मुस्लिम व्यक्तींना घेणे हे सरकारच्या धोरणाविरूद्ध असल्याचे माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे वृत्त चुकीचे असून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

‘जागतिक योगा दिनादिवशी अल्पमुदतीच्या कामासाठी किती मुस्लिम उमेदवारांनी अर्ज केला होता?‘, असा प्रश्न पुष्प शर्मा नावाच्या एका पत्रकाराने आयुष मंत्रालयाला माहिती अधिकारात विचारला होता. त्यावर मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात ऑक्टोबर 2015 पर्यंत अर्ज केलेल्या 3,841 मुस्लिम उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला योगा प्रशिक्षण किंवा शिक्षक म्हणून नियुक्त केलेले नाही, असे म्हटले आहे. मंत्रालयाने मुस्लिम उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले नसून 26 हिंदू प्रशिक्षकांना नियुक्त केल्याचे उत्तरात म्हटले आहे. सरकारच्या धोरणानुसार कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला मुलाखतीसाठी निमंत्रित केले नाही, निवड केली नाही किंवा परदेशात पाठलिवेले नाही असा खुलासाही मंत्रालयाने केला आहे.
===========================================
===========================================
मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा
===========================================
१- वर्ल्डकपसाठी येणाऱ्या पाक नागरिकांसाठी व्हिसा नियम शिथिल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- न्यायालयांनी द्यावी प्रलंबित खटल्यांची माहिती: पंतप्रधान
३- मोदी, संघ प्रचारकासारखे नव्हे, 'पीएम'सारखे वागा - बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव
४- आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च
५- 'आयुष'मध्ये मुस्लिमांना नोकरी नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार : अक्षय कुमार
७- मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, जावडेकरांचाही ग्रीन सिग्नल
८- ठाणे; पोलिसाचा अपघाती मृत्यू, प्राण सोडण्यापूर्वी नेत्रदानाचा मानस
९- नाशिक; बिल्डर आणि सरकारचं साटंलोटं, राज ठाकरेंचा घणाघात
१०- पीटर मुखर्जीने वरळीतील आलिशान घर विकायला काढलं
११- यशवंतरावांच्या आठवणीत रमले शरद पवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मुंबई; वर्गाबाहेर अर्धनग्न उभं राहण्याची चिमुकल्यांना शिक्षा
१३- समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याची चाचपणी
१४- 23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी
१५- मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
१६- विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सलमानची मध्यस्तीही वाया, मलायका- अरबाजचा घटस्फोट निश्चित
१८- पहिल्या गर्लफ्रेंडकडून मराठी शिकलो - अक्षयकुमार
१९- 'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा
२०- भारत उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल- द्रविड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================
वर्गाबाहेर अर्धनग्न उभं राहण्याची चिमुकल्यांना शिक्षा
मुंबई : ट्यूशनचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुरड्यांना अत्यंत घृणास्पद शिक्षा दिल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. दोघा विद्यार्थ्यांना अर्धनग्नावस्थेत तब्बल अर्धा दिवस क्लासबाहेर उभं केल्याची घटना मालवणीत घडली आहे.
मालवणीतल्या श्री ट्यूशन क्लासेसमध्ये लहानग्यांना ही लज्जास्पद शिक्षा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही जणांनी दोघांना बाहेर केल्याचा व्हिडिओ शूट केला आहे. या प्रकारानंतर पीडित मुलं प्रचंड घाबरली असून तणावाखाली आहेत.
दोन्ही मुलांनी ट्यूशन क्लासमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण केला नव्हता. अभ्यास अपूर्ण असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना दुसरी एखादी शिक्षा देणं अपेक्षित होतं. मात्र संबंधित शिक्षकाने त्यांचे कपडे काढून त्यांना क्लासबाहेर उभं केल्याने संताप व्यक्त होत आहे.
पोलिसाचा अपघाती मृत्यू, प्राण सोडण्यापूर्वी नेत्रदानाचा मानस
ठाणे : टीएमटीच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचं नेत्रदान करण्यात आलं आहे. पोलिस कर्मचारी चंद्रकांत साळुंखे यांनी अपघातानंतर उपचारादरम्यान नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
44 वर्षीय पोलिस नाईक चंद्रकांत साळुंखे यांना भरधाव टीएमटी बसने धडक दिली होती. गंभीर जखमी झालेल्या साळुंखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपले दोन्ही डोळे दान करण्याचा मानस व्यक्त केला. साळुंखे यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी अहमदनगरला नेण्यात येणार आहे.
शुक्रवारी रात्री 11.30 वाजता मीरा भाईंदरहून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये आरोपी ड्रायव्हर गजानन शेजुळ चढला. ड्रायव्हर दारुच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करत बसमधील 30 ते 40 प्रवाशांनी त्याला खाली उतरवलं.
त्यानंतर बसचालक गजानन शेजारची बस घेऊन ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. अखेर गायमुख जकात नाक्याजवळ कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिस चंद्रकांत साळुंखे यांना बसने धडक दिली.
आरोपी गजानन शेजुळ याला पोलिसांनी अटक केली असून 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, जावडेकरांचाही ग्रीन सिग्नल
मुंबई: आरे कॉलनीतल्या नियोजित मेट्रो 3 च्या कारशेडवरुन शिवसेना-भाजपात पुन्हा खडाखडी होण्याचे संकेत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी मेट्रो कारशेड आरे कॉलनीतच होणार, असे संकेत दिले असताना, आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरांनी त्याला दुजोरा दिला आहे.
मुंबईत आरे परिसरात मेट्रो कार शेड बनवण्यासाठी 350 झाडं तोडली जाणार आहेत हे योग्य नाही. पण त्यामुळे विकासही थांबयला नको. त्याचा पर्याय म्हणून आणखी किती झाडं लावू शकतो हे पाहावं. यालाच खरा शाश्वत विकास म्हणतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
मुंबईत झालेल्या इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन ऑफ सस्टनेबल डेव्हलपमेंट या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील व्यासपीठावर उपस्थित होते. आरे कॉलनीत कारशेड उभारण्याच्या प्रस्तावाचं समर्थन करण्यासाठी जावडेकरांनी दिल्ली मेट्रोचा दाखला दिला.
मात्र लोकांच्या जनभावना ऐकून घ्या, असं म्हणत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवलाय. शिवसेनेशिवाय मनसेचादेखील आरे कॉलनीत कारशेड उभारण्यास विरोध आहे. त्यामुळं आरे कॉलनीत मेट्रोचं कारशेड उभारताना भाजपला दोन्ही ठाकरे बंधूच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे.
बिल्डर आणि सरकारचं साटंलोटं, राज ठाकरेंचा घणाघात
नाशिक : राज्यातील 2 लाख अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घणाघात केला आहे. बिल्डर लॉबी मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अनधिकृत इमारती अधिकृत झाल्या, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला. शिवाय, रिक्षा परवाना आंदोलनातून माघार घेतली नसल्याचाही दावा त्यांनी केला. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
अनधिकृत इमारती अधिकृत करण्याआधी संबंधित दोषी बिल्डरांवर कारवाई का केली नाही, इमारती अधिकृत करण्याचे निकष काय, असे सवालही राज ठाकरेंनी विचारला. या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या परप्रातियांचा मुद्दाही त्यांनी यावेळी मांडला.
त्यासोबतच, “रिक्षा परवान्यांचं आंदोलन मनसेनं मागे घेतलेलं नाही. रिक्षा जाळणं हा काही पक्षाचा कार्यक्रम नाही, तो राग आहे. महाराष्ट्रातल्या भूमीपूत्राला नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे”, असंही ते म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी निम्मे उत्पन्न द्यायलाही तयार : अक्षय कुमार
मुंबई : जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशी तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करा. जो फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. शेतकऱ्यांसाठी माझ्या उत्पन्नातील अर्धा वाटा देण्यासही मी तयार आहे, असा दिलदारपणा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर व्यक्त केला.
बॉलिवूडचा जेंटलमन अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर आज दिलखुलास गप्पा मारल्या. शेतकऱ्यांप्रती असलेलं त्याचं संवेदनशील मन यानिमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आली.
टॅक्समध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद हवी
जसा स्वच्छ भारत टॅक्स लावला, तशीच तरतूद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी करायला हवी. यातून जमा होणारा पैसा फक्त शेतकऱ्यांना दिला जावा. मी स्वत: असा कर द्यायला तयार आहे, असं अक्षय म्हणाला.
सलमानची मध्यस्तीही वाया, मलायका- अरबाजचा घटस्फोट निश्चित?
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अरबाज आणि त्याची पत्नी मलायक अरोरा हे वेगळे होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण मलायका अरबाजपासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. दीर सलमान खानने समजावूनही मलायका मागे हटण्यास तयार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
मलायकला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या 18 वर्षांच्या संसाराचा काडीमोड होण्याची शक्यता बळावली आहे.
अरबाज आणि मलायकाने ‘पॉवर कपल’ या रिअलिटी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र जेमतेम तीन भागच हे दोघे एकत्र राहिले. या शोसाठी येताना दोघेही वेगवेगळ्या गाडीतून येत होते, दोघे वेगळे राहात होते. त्याचवेळी या दोघांचं काहीतरी बिनसल्याची चर्चा होती.
याशिवाय काही दिवसांपूर्वी मलायका वांद्रेस्थित घराला राम राम ठोकून 14 वर्षाय मुलांसोबत खारमधील अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेली आहे. याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते. मात्र ती बहिणीकडे गेली नाही.
इतकंच नाही तर मलायका अमृताच्या दुबईतील बर्थ डे पार्टीलाही गेली नव्हती. या पार्टीला अरबाज आल्यामुळेच मलायका गेली नव्हती.
समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याची चाचपणी
मुंबई: समुद्रातलं पाणी पिण्यालायक होऊ शकतं का, याबाबत महाराष्ट्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. समुद्रातल्या पाण्यावर पुनर्पक्रिया करुन ते पाणी वापरात आणण्यासाठी एक तज्ज्ञांची टीम चाचपणी करणार आहे.काल विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.ग्रामीण महाराष्ट्रापाठोपाठ दुष्काळाच्या झळा शहरात येऊन पोहोचल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार समुद्रातल्या पर्यायी पाण्याचा विचार करत आहे.अनेकदा शहरी आणि ग्रामीण भागात पाणी वाटपावरुन वाद उभे राहतात. त्यामुळे समुद्रातल्या पाण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यास, मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
23 वर्षांपूर्वी आज मुंबई हादरली होती 13 बाँबस्फोटांनी
- मुंबई, दि. 12 - संपूर्ण देशाला हादरवणारे 1993 चे मुंबई बाँबस्फोट आजच्या दिवशी घडवण्यात आले होते. 257 जणांचे प्राण घेणारे व 717 जणांना जायबंदी करणारे हे स्फोट मुंबईत 13 ठिकाणी घडवण्यात आले होते. दाऊद इब्राहिमने टायगर मेमन व याकूब मेमनच्या तसेच त्याच्या गुन्हेगारी जाळ्याच्या सहाय्याने हे बाँबस्फोट घडवले, ज्यापैकीयाकूबला याच वर्षी फाशी देण्यात आली.याच काळात शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची गेल्याच महिन्यात सुटका झाली. 21 मार्च 2013 रोजी 20 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम आजपर्यंत फरार असून ते पाकिस्तानात असल्याचे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सिद्ध केले आहे.बाबरी मशिदीचं पतन, मुंबईत उसळलेले दंगे आणि त्यानंतर हे बाँबस्फोट अशी हिंसक मालिका 1992 ते 1993 या काळात सुरू होती.या भयानक बाँबस्फोटांची सुरुवात दुपारी दीड वाजता मुंबई शेअर बाजारापासून झाली. बेसमेंटमध्ये कार पार्किंगमध्ये घडवलेल्या या बाँबस्फोटात 50 जणांनी जीव गमावला. त्यानंतर अर्ध्या तासाने मस्जिदजवळच्या मांडवी बँकेजवळ बाँबस्फोट झाला आणि त्यानंतर शिवसेना भवन, एअर इंडिया बिल्डिंग, काथा बाजार, पासपोर्ट ऑफिस अशा आणखी एकूण 11 ठिकाणी पुढील दोन तासांमध्ये बाँबस्फोट घडवण्यात आले.या स्फोटाचा घटनाक्रम :- दुपारी १.३० वाजता - मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजळ्यावर स्फोट, ८४ ठार तर २१७ जण जखमी- दुपारी २.१५ वाजता - नरसी नाथा स्ट्रीट, कथा बाजार, ४ ठार, १६ जखमी- दुपारी २.३० वाजता - पेट्रोल पंप, शिवसेना भवन, ४ ठार, ५० जखमी- दुपारी २.३३ वाजता - एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, २० ठार, ८७ जखमी- दुपारी २.४५ वाजता - मच्छीमार वसाहत, माहीम. ३ ठार, ६ जखमी- दुपारी २.२५ वाजता - सेंच्युरी बाझार, वरळी, ११३ ठार, २२७ जखमी- दुपारी ३.०५ वाजता - झवेरी बाझार, १७ ठार, ५७ जखमी- दुपारी ३.१० वाजता - हॉटेल सेना रॉक, बांद्रा- दुपारी ३.१३ वाजता - प्लाझा सिनेमा, दादर, १० ठार, ३७ जखमी- दुपारी ३.२० वाजता - हॉटेल जुहू सेंटर, ३ जखमी- दुपारी ३.३० वाजता- सहार विमानतळाजवळ- दुपारी ३.४० वाजता - हॉटेल एअरपोर्ट सेंटर, २ ठार, ८ जखमी1993 च्या बाँबस्फोटत स्फोटात प्रथमच आरडीएक्सचा वापर करण्यात आला. मुंबईकरांनी प्रथमच आरडीएक्स हा शब्द यावेळी ऐकला. दुसर्या महायुध्दानंतर सर्वाधिक आरडीएक्सचा वापर करण्यात 1993 च्या बाँबस्फोटात करण्यात आला होता.
आजच्या दिवशी महात्मा गांधींनी सुरू केला होता दांडी मार्च
- 86 वर्षांपूर्वी म्हणजे 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी दांडी मार्च सुरू केला. ब्रिटिशांनी भारतीयांच्या मिठ बनवण्याच्या व विकण्याच्या हक्कावर बंदी घातली तसेच जबर कर लावला आणि महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू करत जनआंदोलन आजच्या दिवशी सुरू केलं.मिठावरील कराचा सर्वाधिक फटका गरीबांना बसणार होता त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना शांततेच्या मार्गाने ब्रिटिशविरोधी आंदोलनात सहभागी करून घेण्यासाठी महात्मा गांधींनी या घटनेचा वापर केला आणि कायदेभंग आंदोलन उभारले.साबरमतीहून 78 सहकाऱ्यांसोबत महात्मा गांधींनी 241 मैल दूर असलेल्या दांडी या समुद्रकिनारी वसलेल्या गावाकडे चालायला सुरूवात केली. ज्यावेळी 5 एप्रिलला ते तिथे पोचले त्यावेळी या जनआंदोलनात सहभागी झालेल्यांची संख्या लाखाच्या घरात होती. तिथं मिठ उचलत सत्याग्रहींनी कायदेभंग केला. पोलीसांनी जवळपास 60 हजार सत्याग्रहींना अटक केली.21 मे रोजी सरोजिनी नायडू यांनी 2500 सत्याग्रहींसह धरासना मिठागारात सत्याग्रह केला. हे लोण नंतर पसरत गेलं, ज्याची परिणिती स्वातंत्र्यासाठी देशव्यापी जनआंदोलन उभारण्यात झाली.
पहिल्या गर्लफ्रेंडकडून मराठी शिकलो - अक्षयकुमार
- मुंबई, दि. 12 - माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडकडून मी मराठी शिकलो असं हसत हसत सांगणाऱ्या अभिनेता अक्षयकुमारने एका मुलाखतीत संवेदनशील अभिनेत्याचे दर्शन घडवले. लहान असताना बसमधून जाताना कंडक्टर काय बोलतोय ते मला कळायचं नाही, त्याचवेळी मी ठरवलं की मला मराठी आलं पाहिजे, आणि मी नंतर मराठी शिकलो असं तो म्हणाला.शेतकऱ्यांसाठी, समाजातल्या गरजूंसाठी एकूण उत्पन्नातलं अर्ध उत्पन्न जरी खर्च झालं तरी मला वाईट वाटणार नाही असं सांगणाऱ्या अक्षयकुमारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्या समाजानं एकत्र येऊन तोडगा काढायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली.दुष्काळ व आत्महत्याग्रस्त शेतकरी यासंदर्भातल्या बातम्या वाचल्यानंतर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरेंसारखंच अक्षयनेही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यासाठी हात पुढे केला.संस्कार हे आईवडिलांकडूनच होत असतात हे सांगताना मला माझ्या वडिलांकडून हे संस्कार मिळाले आणि मीदेखील माझ्या मुलांना गरजूंना मदत करायला हवी हे सांगण्याचा प्रयत्न करतो असं अक्षय म्हणाला. आपण नशीबवान आहोत म्हणून आपल्याला भरभरून मिळालं आहे, परंतु ज्यांच्या पदरात कमी पडलंय त्यांना आपण मदत करायला हवी अशी भावना त्यानं व्यक्त केली.जर कुठलीही व्यक्ती प्रामाणिकपणे विचार करेल तर हेच सांगेल की भारत हा अत्यंत सहिष्णू देश आहे असं तो म्हणाला. तसेच जुन्या चुकीच्या रुढ प्रथा परंपरा बंद व्हायला हव्यात असं आग्रही प्रतिपादनही त्यानं केलं. देव तुमच्याकडे काही मागत नाही, त्यामुळे त्याच्यासमोर नारळ फोडणं, तेल वाहणं हे बंद करायला हवं आणि या गोष्टी त्यांना द्यायला हव्यात ज्यांना त्याची गरज आहे, असं अक्षय म्हणाला.
'रात्रीस खेळ चाले'चं शूटिंग झालेला वाडा
- विजय पालकरमाणगाव, दि. १२ - 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेची सध्या बरीच चर्चा सुरू असून या वाड्याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या मालिकेचे शूटिंगही कृत्रिम सेट न उभारत कोकणातील ख-याखु-या वाड्यातच सुरू आहे. त्याबद्दलची ही माहिती खास तुमच्यासाठी...!सिंधुदुर्गातील कुडाळ आकेरी येथे शेटकर यांच्या वाड्याच चित्रित केली जात आहे. यापूर्वी या वाड्यात ' महानंदा' व ' गांरबीचा बापू' या चित्रपटांचे चित्रीकरण झाले होते. सिंधुदुर्गातील नैसर्गिक सौंदर्याची लोकेशन्स तसेच मानवनिर्मित जुनी घरं ही विविध सिनेनिर्मात्यांना आकर्षित करतात. मात्र या सीरियलमध्ये 'कोकणात भूत आहे' असे दाखवले जात आहे, त्यामुळे कोकणात पर्यटक येणार नाहीत अशी राजकीय पक्षांची ओरड झाल्यामुळे या सीरियलची जाहिराच आपोआप झाली.खरंतर सीरियलचे कथानक किमान दीडशे ते दोनशे भागांचे असतं. त्यामुळे एक दोन भागात त्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. या सीरियलमुळे स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ मिळालं, अनेकांना रोजगार मिळाला. भविष्यात कोकणातील नैसर्गिक सौंदर्याकडे सिनेमा निर्माते आकर्षित होतील व प्रत्येक ठिकाणी निसर्गाने उभारलेल्या नैसर्गिक सेटचा फायदा सीरियल व सिने निर्मात्यांना मिळेल, अशा प्रकारची अनेक ठिकाणी लोकेशन्स आहेत. त्याचाही विचार होऊन सिंधुदुर्गात जास्तीत जास्त सीरियल व सिने निर्माते कसे येतील हे पाहणे जिल्ह्याच्या विकासाचे ठरेल.
पीटर मुखर्जीने वरळीतील आलिशान घर विकायला काढलं
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. १२ - शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीने कायदेशीर लढाईसाठी आपलं वरळीतील घर विकायला काढलं आहे. एकेकाळी देश- परदेशात फिरत ऐशो-आरामचं आयुष्य जगणा-या पीटर मुखर्जीवर आता घर विकायची पाळी आली आहे. पीटर मुखर्जीचं वरळीतील मार्लो इमारतीच्या पाचव्या मजल्यावर 3000 स्क्वेअर फुटांचं डुप्लेक्स घर आहे. सध्या या घराची किंमत 15 ते 20 कोटींच्या घरात आहे.टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीप्रमाणे पीटर मुखर्जीवर शीना बोराच्या हत्येचा, कट रचल्याचा, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पीटर मुखर्जीने कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्वात महागड्या वकिलाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक सुनावणीला 3 ते 5 लाख रुपये वकिलाला फी द्यावी लागत आहे. आतापर्यंत पीटर मुखर्जीने 1.5 कोटी खर्च केले आहेत.
यशवंतरावांच्या आठवणीत रमले शरद पवार
नाशिक- येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आज (शनिवार) पासून "यशवंतराव चव्हाण आणि आधुनिक महाराष्ट्र‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आज त्यांच्या स्मृती संग्रहालयाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी "विशाखा‘ व "रुक्मिणी‘ पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज यशवंतराव चव्हाणांच्या विविध आठवणीत चांगलेच रमले होते.
(छायाचित्रे- सोमनाथ कोकरे)
===========================================
न्यायालयांनी द्यावी प्रलंबित खटल्यांची माहिती: पंतप्रधान
पाटणा उच्च न्यायालयाच्या शतकपूर्ती सोहळ्याचा समारोप पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत झाला. वार्षिक निवेदनाबरोबरच वकिलांची संघटना आणि न्यायालयांच्या कामकाजामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याविषयीही पंतप्रधान मोदी यांनी सूचना मागविल्या.
मोदी म्हणाले, "प्रत्येक न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या जुन्या खटल्यांविषयी माहिती देणारे निवेदन सर्व न्यायालयांनी वर्षातून एकदा प्रसिद्ध करावे, अशी कल्पना मला मांडायची आहे. काही खटले 40-50 वर्षांपासूनही प्रलंबित असू शकतील. अशी माहिती जाहीर झाली, तर न्यायालयाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊ शकते. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी त्यातून काही मार्ग निघू शकतील. एखाद्या कारणामुळे खटला प्रलंबित राहत असेल, तर त्यावर तोडगा निघण्यास यातून मदतच होईल.‘‘
==========================================='मोदी, संघ प्रचारकासारखे नव्हे, 'पीएम'सारखे वागा'
रेल्वे मार्गाच्या पुलाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मोदी एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलत होते. ते म्हणाले, मोदी यांनी बिहारला विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी ते दिले नाही. त्याबद्दल त्यांनी बिहारच्या जनतेची माफी मागावी, असेही यादव यावेळी म्हणाले. तसेच मोदी यांनी संघाच्या पूर्णवेळ प्रचारकासारखे नव्हे तर देशाच्या पंतप्रधानांसारखे वागावे असा सल्लाही यादव यांनी दिला.
===========================================
भारत उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल- द्रविड
ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेस 15 मार्चपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ एक गटात आहेत. भारताच्या सध्याच्या कामगिरीवरून अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारतीय संघालाच विजेता म्हणून घोषित केले आहे. पण, द्रविडने भारत उपांत्य फेरीपर्यंत नक्की जाईल, असे सांगून सुचक इशारा दिला आहे.
द्रविड म्हणाला की, भारत पहिल्या चार संघांमध्ये नक्की पोहचेल. पण, त्यानंतर ज्या संघाची त्यादिवशी कामगिरी सरस ठरेल, तोच विजेता ठरेल. भारतीय संघात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये खूप क्षमता आहे. गेल्या 24 महिन्यांपासून संघ चांगली कामगिरी करत आहे. हार्दिक पांड्या व पवन नेगीसारखे खेळाडू आठव्या आणि नवव्या क्रमांकावरही फलंदाजी करु शकतात. तसेच भारतातील खेळपट्ट्यांवर वापर करण्यासाठी संघात किमान सहा गोलंदाज आहेत. आशिष नेहरा व जसप्रीत बुमराह नव्या चेंडूने चांगली गोलंदाजी करत आहेत. माझी इच्छा आहे, की या संघाने परदेशात कसोटी खेळताना चांगली कामगिरी करावी. भारतीय क्रिकेटसाठी सध्याचा काळ चांगला आहे.
==========================================='आयुष'मध्ये मुस्लिमांना नोकरी नाही
नवी दिल्ली - जागतिक योगा दिनाच्यादिवशी अल्पमुदतीच्या प्रशिक्षक पदांसाठी मुस्लिम व्यक्तींना घेणे हे सरकारच्या धोरणाविरूद्ध असल्याचे माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून मिळाल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे वृत्त चुकीचे असून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
‘जागतिक योगा दिनादिवशी अल्पमुदतीच्या कामासाठी किती मुस्लिम उमेदवारांनी अर्ज केला होता?‘, असा प्रश्न पुष्प शर्मा नावाच्या एका पत्रकाराने आयुष मंत्रालयाला माहिती अधिकारात विचारला होता. त्यावर मंत्रालयाने दिलेल्या उत्तरात ऑक्टोबर 2015 पर्यंत अर्ज केलेल्या 3,841 मुस्लिम उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला योगा प्रशिक्षण किंवा शिक्षक म्हणून नियुक्त केलेले नाही, असे म्हटले आहे. मंत्रालयाने मुस्लिम उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले नसून 26 हिंदू प्रशिक्षकांना नियुक्त केल्याचे उत्तरात म्हटले आहे. सरकारच्या धोरणानुसार कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला मुलाखतीसाठी निमंत्रित केले नाही, निवड केली नाही किंवा परदेशात पाठलिवेले नाही असा खुलासाही मंत्रालयाने केला आहे.
===========================================
वर्ल्डकपसाठी येणाऱ्या पाक नागरिकांसाठी व्हिसा नियम शिथिल
- नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचे सामने पाहण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांकरिता भारताने आपले व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत. पाकिस्तानमधून भारतात क्रि केट सामने पाहण्यासाठी येणाऱ्यांना आता अर्जासोबत आपल्या परतीच्या विमान प्रवासाचे तिकीट जोडावे लागणार नाही. शिवाय ६५ वर्षांपेक्षा अधिक आणि १५ वर्षांहून कमी वयाच्या पाकिस्तानी नागरिकांना पोलीस ठाण्यात सूचना देण्यापासून सूट देण्यात आली आहे.आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना जवळपास १००० व्हिसा जारी केले जाण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने बघण्यासाठी सर्वाधिक प्रेक्षक पाकिस्तानमधून येतील, असा अंदाज आहे. ‘व्हिसा जारी करण्यासाठी आम्ही २०१२ चे नियम पाळत असलो, तरी यावेळी परतीच्या विमान तिकिटाचा पुरावा सादर करण्याचा आग्रह धरला जाणार नाही. असा पुरावा देणे गैरसोयीचे असल्याचे काही पाकिस्तानी नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्हिसा मिळविण्यासाठी आता फक्त भारतात येतानाचे विमान तिकीट आणि अर्जदाराच्या नावावर जारी केलेले क्रिकेट सामन्याचे तिकीट तसेच हॉटेलमधील आरक्षणाची पावती जोडावी लागेल,’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी येणाऱ्या पाीकस्तानी नागरिकांना सुरक्षा दिली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्याने हेही स्पष्ट केले आहे की, ६५ वर्षांवरील आणि १५ वर्षांखालील पाकिस्तानी नागरिकांना भारतातील क्रिकेट सामन्याच्या स्थळी उतरल्यानंतर पोलिसांना वर्दी देण्याचीही गरज पडणार नाही.
मेट्रोची कारशेड आरेमध्ये होणारच नाही; जावडेकरांच्या उपस्थितीत देसाईंचा इशारा
कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रोच्या आरे येथील नियोजित कारशेडच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप शनिवारी पुन्हा एकदा आमनेसामने आले. मुंबईत झालेल्या इंटरनॅशनल कॉन्व्हेंशन ऑफ सस्टनेबल डेव्हलपमेंट या कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री जावडेकरांनी आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. मेट्रोची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. मेट्रो कार शेड बनवण्यासाठी ३५० झाडे तोडली जाणार आहेत हे योग्य नाही. झाडे तुटली नाही पाहिजेत, हे खरे असले तरी त्यासाठी विकास थांबवता येणार नाही. त्याचा पर्याय म्हणून आणखी किती झाडे लावू शकतो हे पाहावे. त्यामुळे या परिसरातील चांगली झाडे न तोडता त्यांचे दुसरीकडे पुर्नरोपण केले जावे. यालाच खरा शाश्वत विकास म्हणतात, असे जावडेकर यांनी म्हटले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हेदेखील उपस्थित होते. देसाई यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विकासाच्या प्रक्रियेत जनभावना ऐकून घेण्याची गरज व्यक्त करत या प्रस्तावाला विरोध केला. याशिवाय, आरेमध्ये असा कोणताही विकास होणार नसून ही कारशेड दुसरीकडेच होईल, असा ठाम विश्वासही देसाईंनी यावेळी व्यक्त केला.
===========================================विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा
विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र असून तो देशातून पळून गेलेला नाही, असे विधान माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी शनिवारी केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना देवेगौडा यांनी मल्ल्यांचे समर्थन केले. यावेळी त्यांनी किंगफिशर एअलाईन्ससंदर्भात बोलताना सांगितले की, सध्याच्या काळात अनेक विमान कंपन्या तोट्यात व्यवसाय करत आहेत. त्यामुळे मल्ल्या यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या उद्योगपतीला लक्ष्य करण्यात काहीच अर्थ नसल्याचे देवेगौडा यांनी म्हटले.
===========================================
No comments:
Post a Comment