[अंतरराष्ट्रीय]
१- आता पाकिस्तानातही होळी, दिवाळीची सुट्टी
२- थिम्पू; 1 लाख 8 हजार झाडं लावून बाळाचं स्वागत
३- दुबई; वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा 500 वर्षांनी शोध
४- इंग्लंडमधला सिगारेट ओढणारा पक्षी
५- पेशावरमध्ये बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रिया सुळे
७- लॅण्डिंग करताना विमानाचं टायर फुटलं, 168 प्रवासी थोडक्यात बचावले
८- भारतात घुसलेल्या 10 पैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा
९- मी त्रिवार म्हणतो, भारतमाता की जय- जावेद अख्तर
१०- दागिन्यांवरील शुल्क वाढ मागे नाही - जेटली
११- देशविरोधी घोषणा बाहेरच्यांनी दिल्या- समिती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मानेवर सुरा ठेवला, तरी म्हणेन 'भारत माता की जय' - केंद्रीय मंत्री नजमा हेप्तुल्ला
१३- भुजबळांची अटक म्हणजे काळाने उगवलेला सूड! - उद्धव ठाकरे
१४- लालूंचं फेसबुक अकाऊंट हॅक
१५- 'त्या' भाजप आमदाराची हकालपट्टी करा:मेनका
१६- राज्यातील स्विमिंग पूल जुलैपर्यंत बंद, राज्य सरकार लिहिणार महापालिकांना पत्र
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- पिंपरी-चिंचवड; ... तर अवघ्या 36 तासात पाक जगाच्या नकाशावरुन नष्ट
१८- भोपाळ; घरात शौचालय नसल्यास नाही मिळणार भाजी - मध्य प्रदेशातील अनोखा उपक्रम
१९- हैदराबाद; टीव्ही अँकरची आत्महत्या, कारण अस्पष्ट
२०- मध्यप्रदेश; पंचायतीने चरित्रहीन म्हंटल्याने आणि 5 हजारांचा दंड ठोठावल्याने महिलेची आत्महत्या
२१- कंटेनर बंद पडल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
२२- रायपूर चर्च हल्ला प्रकरणी सात जणांना अटक
२३- नागपूर; ड्रेनेजपाईप लाइन साफ करताना चौघांचा म्रुत्यू, विषारी गॅसमुळे म्रुत्यू झाल्याचा आंदाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- विश्वचषकाचा मुहूर्त साधत धोनीच्या आयुष्यावरील सिनेमाचा टीजर लाँच
२५- चिंता नको, टीम इंडिया आम्ही तुमच्यासोबत आहोत - अमिताभ बच्चन
२६- भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडचा 47 धावांनी दणदणीत विजय
२७- टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघाची विजयी सलामी
२८- भारत-पाकिस्तान सामना एक तास पाहता येणार नाही
२९- एका 'भारतीया'समोर धोनीच्या टीम इंडियाचं लोटांगण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३०- गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
३१- आयुक्तांनी ८८ बिल कलेक्टर्सचे वेतन तीन महिन्यांपासून रोखले
३२- नायगाव; १७ मार्च रोजी मोफत आरोग्य सर्व रोगनिदान शिबीर
३३- देगलूर; शॉटसर्किटमुळे गाडी कारखान्याला आग, ४ चार लाखांचे नुकसान
३४- मांडवी परिसरातील दहा ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात पण विचारांचा भक्कम पाया असणारी मानसे कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभे राहतात
(अजय कागदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
श्रीकांत बाहेती, बालाजी गिरी, ज्योती दवे, नामदेव काकडे, श्रीराम इंदुरे, अमोल काळे, सचिन इंगळे, प्रमोद पाटील,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=======================================
=======================================

=======================================
=======================================
=======================================
=======================================

=======================================
=======================================
भारताकडून अनुजा पाटील आणि पूनम यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. त्याआधी मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेल्लास्वामी वनिता आणि वेदा कृष्णमूर्तीच्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी 20 षटकांत 5 बाद 163 धावांची मजल मारली होती.
मितालीनं 42, हरमनप्रीतनं 40, वनितानं 38 आणि वेदानं नाबाद 36 धावांची खेळी केली. हरमनप्रीतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारतीय महिलांना आता दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मुकाबला करायचाय. ही लढत 19 मार्चला नवी दिल्लीत खेळवली जाईल.
=======================================
=======================================

5 फेब्रुवारी रोजी राजा खेसर आणि राणी जेत्सुन यांना पुत्ररत्न झालं. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे 6 मार्चला एक लाख स्वयंसेवकांनी देशभरात वृक्षारोपण केलं. विशेष म्हणजे यात भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचाही समावेश होता.

बौद्ध धर्मानुसार झाड हा पालनकर्ता, दाता यांचं प्रतीक असतो. दीर्घायुष्य, आरोग्य, सौंदर्य आणि ममता अशा अनेक भावभावना वृक्षाशी निगडीत आहेत. बोधिवृक्षाची संकल्पना त्यातून आल्याचं या मोहिमेचे प्रमुख तेंझिन लेकफेल यांनी सांगितलं.
108 या आकड्याला बौद्ध धर्मात पवित्र मानलं जातं. म्हणूनच 108 हजार म्हणजेच 1 लाख 8 हजार झाडांची लागवड करुन नव्या जीवाचं स्वागत केल्याचं सांगितलं जातं.
=======================================
=======================================
विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच चांदीची काही दुर्मीळ नाणीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहेत. वास्को द गामाच्या काकांनी ही पोर्तुगीज जहाज समुद्रात नेलं होती, मात्र हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडालं होतं. मे 1503 मध्ये घडलेल्या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली.
2013 मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत.
इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. 1499 मध्ये वास्कोच्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे.
=======================================
पाकिस्तान वारंवार दहशतवाद्या कारवाया करुन भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र भारताने ठरवल्यास अवघ्या 36 तासात पाकिस्तानचे अस्तित्त्व जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, असा विश्वास सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केला आहे.
अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव आणि संदीप वाघेरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत भानुप्रताप बर्गे यांनी बर्गे यांनी देशातील वाढता दहशतवाद या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
=======================================
मी त्रिवार म्हणतो, भारतमाता की जय- जावेद अख्तर
नवी दिल्ली - कामकाजात वारंवार अडथळे आणणे व धार्मिक ध्रुवीकरण देशाला पुढे नेणार नाही, तर धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारी राज्यघटनाच पुढे नेईल. घटना तर तुम्हाला शेरवानी व टोपी घालण्याचेही बंधन ठेवत नाही. मी त्रिवार म्हणतो, की भारतमाता की जय, असे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राज्यसभेत सांगितले.
'त्या' भाजप आमदाराची हकालपट्टी करा:मेनका
देशविरोधी घोषणा बाहेरच्यांनी दिल्या- समिती

सगळ्यांना आत टाका, आम्ही मराठे घाबरत नाही : सुप्रिया सुळे
नवी दिल्ली : सगळ्यांना तुरुंगात टाकलं तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही मराठे आहोत, कधीच डगमगत नाही, असं आव्हान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिलं आहे. भुजबळांपाठोपाठ अजित पवार आणि सुनील तटकरे तुरुंगात जातील, असं विधान भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केली होतं. त्यानंतर ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुळे यांनी ही भावना व्यक्ती केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “किरीट सोमय्या टीका करतात आणि प्रसारमाध्यमं त्यांची वक्तव्य उचलून धरतात. पण टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असायला हवी. आम्ही प्रसारमाध्यमांशी सुसंवाद ठेवतो याचा अर्थ त्यांनी आम्हाला ‘पप्पू’ समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे.”
‘आम्ही मराठे घाबरत नाही‘
‘आम्हाल तुरुंगात डांबलं तरी घाबरणार नाही, मराठे आहोत, डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली की नाही हे नंतर स्पष्ट होईल. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ आणि समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असंही सुळे यांनी स्पष्ट केलं.
लॅण्डिंग करताना विमानाचं टायर फुटलं, 168 प्रवासी थोडक्यात बचावले
मुंबई : मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. लॅण्डिंग करताना एअर इंडियाच्या विमानाचं टायर फुटलं. सुदैवाने क्रू मेंबरसह विमानातील सर्व 168 प्रवासी सुखरुप आहेत.
ही घटना मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. एअर इंडियाचं फ्लाईट AI630 हे विमान नागपूरहून मुंबईला आलं होतं. लॅण्डिंग होत असताना विमानाच्या डाव्या बाजूचं टायर अचानक फुटलं. यामध्ये प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण परसलं होतं.
त्यानंतर झालेल्या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत काही वयोवृद्धांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. दरम्यान, उपचारासाठी डॉक्टरांची टीम उशिरा आल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. या घटनेनंतर मुख्य रनवे काही काळासाठी बंद करण्यात आला होता.
भारत-पाकिस्तान सामना एक तास पाहता येणार नाही
मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकात टीम इंडियाने सलामीचा सामना गमावला असला तरी क्रिकेटचाहते भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु 19 मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यादरम्यान तुम्हाला एक तास टीव्ही करावा लागणार आहे. कारण 19 मार्च रोजी जगभरात अर्थ अवर साजरा करण्यात येणार आहे.
स्टेडियमध्ये जाऊन क्रिकेट सामना पाहणाऱ्यांपेक्षा घरी टीव्हीवर मॅच पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पण याच दिवशी जगभरात अर्थ अवरसाठी दिवे एक तास बंद ठेवण्यात येणार आहेत.
19 मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनवर रात्री सात वाजता भारत-पाकिस्तान सामन्याला सुरुवात होईल. मात्र 19 मार्चलाच अर्थ अवरसाठी भारतात रात्री साडे आठ ते साडे नऊ दरम्यान बत्ती गुल करण्यात येणार आहे.
एका 'भारतीया'समोर धोनीच्या टीम इंडियाचं लोटांगण
नागपूर : ट्वेन्टी 20 विश्वचषकात टीम इंडियाला घरच्याच मैदानात न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. 127 धावाचं मोजकं आव्हानही भारताला पार करता आलं नाही. अवघ्या 79 धावात टीम इंडियाचा डाव आटोपला आणि भारत 45 धावांनी पराभूत झाला.
खरंतर एकटा शिखर धवन एकटाच एवढ्या धावा करु शकतो. हिटमॅन रोहित शर्माने स्वत:च्या जीवावर इतक्या धावा ठोकल्या असत्या. सुरेश रैना भारताला विजयपथावर घेऊन गेला असता. तर युवराज या धावसंख्येच्या एक चतुर्थांश धावा केवळ षटकात करु शकतो.
पण असं काय झालं की, हा सामना भारताच्या हातातून निसटला. याचं कारण ठरला एका भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा खेळाडू ईश सोढी.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांना एकापाठोपाठ ईश सोढीच्या फिरकीसमोर बाद होताना पाहिली. फक्त 18 धावा देऊन त्याने तीन विकेट्स घेतल्या.
आता पाकिस्तानातही होळी, दिवाळीची सुट्टी
इस्लामाबाद : भारतीयांच्या मनात पाकिस्तानबद्दल एक नकारात्मक प्रतिमा आहे. याला अनेक कारणंही आहेत. मात्र, ही प्रतिमा काही प्रमाणात बदलू शकेल, असा एक निर्णय पकिस्तान सरकारने घेतला आहे.
पाकिस्तानच्या संसदेने एक प्रस्ताव पारित केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांना आपले सण साजरे करण्यासाठी आपल्या हक्काची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्येही यापुढे होळी, दिवाळी आणि ईस्टर या सणांसाठी सुट्टी असेल. पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांना अशाप्रकारे धार्मिक सण साजरे करण्याची सुट्टी मिळणा आहे.
पीएमएल-एनचे खासदार रमेश कुमार वांकवानी यांनी संसदेत प्रस्ताव मांडला की, “सरकारने अल्पसंख्यांकांचे सण असलेल्या होळी, दिवाळी आणि ईस्टर या सणांसाठी अधिकृत सुट्टी जाहीर करावी.” रमेश वांकवानी यांचा प्रस्ताव पाकिस्तान सरकारने मंजूर केला. मात्र, यावर उत्तर देतना धार्मिक खातं ज्यांच्या अखत्यारित येतं, त्या राज्यमंत्री पीर अमीनुल हसनत शाह यांनी म्हटलं, “अल्पसंख्यांकांना त्यांच्या सणांनिमित्त सुट्टी द्यावी, हे गृहमंत्रालायाने याआधीच सरकारी कार्यालयांना आदेश दिले आहेत.”
भारतात घुसलेल्या 10 पैकी 3 दहशतवाद्यांचा खात्मा
नवी दिल्ली : गुजरातमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी घुसलेल्या 10 पैकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. याआधी पाकिस्तानचे एनएसए नासिर खान यांनी भारतात अतिरेकी घुसल्याची माहिती दिली होती.
पाकिस्तानने अधिकृतरित्या भारताला अशाप्रकारची माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतानेही यावर तातडीने कारवाई करत तीन दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना मारलं. पण अजूनही सात दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
पाकिस्तानकडून दहा अतिरेकी समुद्रामार्गे गुजरातच्या सीमेतून भारतात घुसले आहेत. यानंतर गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी संपूर्ण राज्यात तपास अभियान सुरु केलं होतं. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या तिघांची ओळखही पटवण्यात आली आहे.
मात्र भारतीय यंत्रणांनी या वृत्ताबाबात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
भारताचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडचा 47 धावांनी दणदणीत विजय
नागपूर: टी-20 विश्वचषकातील सलामीच्या सामन्यातच भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडनं भारतावर तब्बल 47 धावांनी विजय मिळवित भारतीय संघाला अक्षरश: धूळ चारली. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
न्यूझीलंडनं 20 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 126 धावांपर्यंत मजल मारली. तर 127 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 79 धावांवर बाद झाला. कर्णधार धोनी, कोहली आणि अश्विन सोडता एकाही फलंदाजाला दोन अंकी खेळी करता आली नाही.
भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर रैना आणि युवराजही खराब फटके मारुन बाद झाले. त्यानंतर या धक्क्यातून भारत अखेरपर्यंत सावरुच शकला नाही. दरम्यान, न्यूझीलंडकडून सॅन्तनर 4 गडी बाद केले, तर फिरकीपटू सोदीनं चमकदार कामगिरी करीत 3 गडी टिपले.
टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघाची विजयी सलामी
बंगळुरु : ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतीय महिलांनी बांगलादेशच्या महिला टीमला 72 धावांनी हरवून
विजयी सलामी दिली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने बांगलादेशला
विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. पण बांगलादेशला 20 षटकांत पाच बाद 91 धावाच करता आल्या.
विजयी सलामी दिली. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने बांगलादेशला
विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं होतं. पण बांगलादेशला 20 षटकांत पाच बाद 91 धावाच करता आल्या.
भारताकडून अनुजा पाटील आणि पूनम यादवनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. त्याआधी मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेल्लास्वामी वनिता आणि वेदा कृष्णमूर्तीच्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी 20 षटकांत 5 बाद 163 धावांची मजल मारली होती.
मितालीनं 42, हरमनप्रीतनं 40, वनितानं 38 आणि वेदानं नाबाद 36 धावांची खेळी केली. हरमनप्रीतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारतीय महिलांना आता दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा मुकाबला करायचाय. ही लढत 19 मार्चला नवी दिल्लीत खेळवली जाईल.
टी-20 विश्वचषकातील सलामीच्या सामन्यातच भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडनं भारतावर तब्बल 47 धावांनी विजय मिळवित भारतीय संघाला अक्षरश: धूळ चारली. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
मानेवर सुरा ठेवला, तरी म्हणेन 'भारत माता की जय'
नवी दिल्ली : एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या वक्तव्याचा देशभरातून समाचार घेतला जात आहे. ‘माझ्या मानेवर कोणी सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणेन’ असा टोला केंद्रीय मंत्री नजमा हेप्तुल्ला यांनी हाणला आहे.
‘माझ्या मानेवर कोणी सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणेन. माझ्या मृत्यूनंतर माझा आत्माही भारत माता की जय म्हणेल’ असं नजमा हेप्तुल्ला यांनी सांगितलं.
गळ्यावर सुरी ठेवून ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगितलं, तरी म्हणणार नाही असं उद्दाम वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं. ‘मै भारत माता की जय नही बोलूँगा, कभी नही बोलूँगा, क्या कर लिजीएगा भागवत’असं खुलं आवाहन ओवेसींनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लातूरमधील जाहीर सभेत केलं.
‘भारत माता की जय’, हा जयघोष अनिवार्य असल्याचं घटनेत लिहिलेलं नाही, असा दावाही यावेळी ओवेसींनी केला. ‘भारत माता की जय’ म्हणायला लहान मुलांना शिकवायला हवं, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना ओवेसींनी काही केलंत तरी जयघोष करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
1 लाख 8 हजार झाडं लावून बाळाचं स्वागत
थिम्पू : झाडांची कमी होणारी संख्या ही फक्त भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांची समस्या आहे. वनसंपत्ती कमी झाल्यास त्याचे दुरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. याचीच जाण ठेवत भूतानच्या राजघराण्याने राजपुत्राचं स्वागत अनोख्या पद्धतीने केलं. तब्बल 1 लाख 8 हजार वृक्षांची लागवड करुन हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
5 फेब्रुवारी रोजी राजा खेसर आणि राणी जेत्सुन यांना पुत्ररत्न झालं. त्यानंतर महिन्याभराने म्हणजे 6 मार्चला एक लाख स्वयंसेवकांनी देशभरात वृक्षारोपण केलं. विशेष म्हणजे यात भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोबगे, मंत्रिमंडळातील तीन मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांचाही समावेश होता.
बौद्ध धर्मानुसार झाड हा पालनकर्ता, दाता यांचं प्रतीक असतो. दीर्घायुष्य, आरोग्य, सौंदर्य आणि ममता अशा अनेक भावभावना वृक्षाशी निगडीत आहेत. बोधिवृक्षाची संकल्पना त्यातून आल्याचं या मोहिमेचे प्रमुख तेंझिन लेकफेल यांनी सांगितलं.
108 या आकड्याला बौद्ध धर्मात पवित्र मानलं जातं. म्हणूनच 108 हजार म्हणजेच 1 लाख 8 हजार झाडांची लागवड करुन नव्या जीवाचं स्वागत केल्याचं सांगितलं जातं.
विश्वचषकाचा मुहूर्त साधत धोनीच्या आयुष्यावरील सिनेमाचा टीजर लाँच
मुंबई: टी-20 विश्वचषकाचा मुहूर्त साधन कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर बेतलेला ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ सिनेमाचा पहिला टीजर आज लाँच करण्यात आला.
48 सेंकदाचा हा टीजर उत्कृष्ट असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत जगासमोर एक वेगळी कहाणी घेऊन येत आहे. एक तिकीट कलेक्टर ते टीम इंडियाचा कर्णधार हा प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
कायपोछे, पीके सारख्या चित्रपटात दिसलेला सुशांत सिंह या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली आहे. धोनीचा परफॉर्मन्स आणि खेळीचं तो बारकाईने निरीक्षण करत आहे. धोनीची पत्नी अर्थात साक्षीच्या भूमिकेत फगली चित्रपटात झळकलेली कियारा अडवाणी दिसणार आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा नीरज पांडे यांच्या खांद्यावर आहे. नीरज पांडे यांचे अ वेनस्डे, स्पेशल 26, बेबी यासारखे चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांची वाहवा मिळवून गेले होते. मात्र, या सिनेमासाठी सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
वास्को द गामाच्या बुडालेल्या जहाजाचा 500 वर्षांनी शोध
वास्को द गामाच्या काकांनी ही पोर्तुगीज जहाज समुद्रात नेलं होती, मात्र हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडालं होतं. मे 1503 मध्ये घडलेल्या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली.
दुबई : 16 व्या शतकात युरोपातून भारतात समुद्री मार्गाने प्रवास करणारा पहिला युरोपियन वास्को द गामाचं बुडालेलं जहाज अखेर सापडलं आहे. 500 वर्षांपूर्वी बुडालेल्या जहाजाचे अवशेष ओमानजवळ समुद्रात हाती लागले आहेत.
विशेष म्हणजे जहाजाच्या अवशेषांसोबतच चांदीची काही दुर्मीळ नाणीही पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहेत. वास्को द गामाच्या काकांनी ही पोर्तुगीज जहाज समुद्रात नेलं होती, मात्र हिंदी महासागरात अल-हलानियाह बेटाजवळ जोरदार वादळामुळे जहाज बुडालं होतं. मे 1503 मध्ये घडलेल्या दुर्घटनेत जहाजाचे कमांडर विसेन्ट सॉडरसह सर्वांना जलसमाधी मिळाली.
2013 मध्ये ब्ल्यू वॉटर रिकव्हरीज आणि ओमान मिनिस्ट्री ऑफ हेरिटेज अँड कल्चरने शोधमोहीम सुरु केली. वास्को द गामाच्या दुसऱ्या भारत दौऱ्यात दोन जहाजांपैकी एक जहाज वादळात बेपत्ता झालं होतं. सापडलेले अवशेष याच जहाजाचे असल्याच्या निष्कर्षावर अधिकारी पोहचले आहेत.
इंडियो नावाची दुर्मीळ चांदीची नाणी, सिरॅमिक्स, एक घंटा अशा वस्तू सापडल्या आहेत. 1499 मध्ये वास्कोच्या पहिल्या भारतभेटीनंतर ही नाणी बनवल्याची माहिती आहे.
... तर अवघ्या 36 तासात पाक जगाच्या नकाशावरुन नष्ट
पिंपरी-चिंचवड : भारत-पाक सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती अधूनमधून सुरु असतानाच, भारताने ठरवल्यास पाकला जगाच्या नकाशावरुनच पुसून टाकलं जाऊ शकतं, असं विधान करण्यात आलं आहे. पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान वारंवार दहशतवाद्या कारवाया करुन भारताला जेरीस आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र भारताने ठरवल्यास अवघ्या 36 तासात पाकिस्तानचे अस्तित्त्व जगाच्या नकाशावरुन नष्ट होईल, असा विश्वास सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केला आहे.
अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव आणि संदीप वाघेरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शिवचरित्र व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत भानुप्रताप बर्गे यांनी बर्गे यांनी देशातील वाढता दहशतवाद या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता.
इंग्लंडमधला सिगारेट ओढणारा पक्षी
- लंडन, दि. १६ - सिगारेट आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असूनही धुम्रपान करणा-या व्यक्ती धुम्रपान सोडत नाहीत. ते सिगारेट ओढण्याचा आनंद घेतात.माणसाप्रमाणे पक्ष्यांनादेखील धुम्रपानात आनंद मिळतो का ? हा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे इंग्लंडमध्ये सिगारेट ओढणा-या मॅगपी पक्ष्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मँचेस्टर शहरातील एका भितींवर हा मॅगपी पक्षी चोचेमध्ये सिगारेट पकडून बसला आहे.@WillMcHoebag या टि्वटर वापरकर्त्याने हा फोटो टि्वट केला आहे. हा फोटो खरा आहे की, बनवला आहे यावरुन टि्वटर युझर्समध्ये वाद रंगला आहे. 'मिनव्हाईल इन मॅंचेस्टर' अशी या फोटोला कॅप्शन दिली आहे.
चिंता नको, टीम इंडिया आम्ही तुमच्यासोबत आहोत - अमिताभ बच्चन
- मुंबई, दि. १६ - आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सलामीच्याच सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे टीम इंडियावर चहूबाजूंनी टीका होत असताना बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चन मात्र टीम इंडियाच्या पाठिशी उभे राहिले आहेत.सोशल मिडीयावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी टीम इंडियाचेसमर्थन केले आहे. आपल्या टी-२० संघाला पराभवामुळे धक्का बसला आहे. पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. टीम इंडिया चिंता करु नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असा संघाचा हुरुप वाढवणारा संदेश बच्चन यांनी टि्वटरवरुन दिला आहे.सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. माफक १२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अवघ्या ७९ धावांमध्ये आटोपला.
भोपाळ; घरात शौचालय नसल्यास नाही मिळणार भाजी - मध्य प्रदेशातील अनोखा उपक्रम
- भोपाळ, दि. १६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचा परिणाम हळूहळू संपूर्ण देशभरात, गावा-गावात जाणवायला लागला आहे. मध्य प्रदेशातील रतलाममधील एका गावातील नागरिकांनी तर उघड्यावर शौचास जाणा-यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू वा सुविधा देणे बंद केले आहे. रतलामच्या भुटेडा गावात ज्यांच्या घरात शौचालय नसेल वा जे उघड्यावर शौच करण्यास जात असतील अशा लोकांना गावातील व्यावसायिकांनी भाजी विकणे, केस कापणे अशा सेवा देण्यास नकार दिला आहे.काही दिवसांपूर्वी मी 'स्वच्छ भारत अभियान' मोहिमेच्या एका सत्रात सहभागी झालो होतो. उघड्यावर शौचाला जाणे ही फक्त वाईट सवय नसून त्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, हे मी गावक-यांना समजावून सांगितले. त्यानंतर गावक-यांनी स्वत:हून पुढाकार घेत अनेक योजना राबवण्याचा विचार सुरू केला' असे या कल्पनेचा जनक असलेल्या लोकेश शर्माने सांगितले. त्याची ही कल्पना पटून अनेक गावक-यांनी त्याची साथ दिली ज्यामध्ये धीरूभाई हे भाजी विक्रेते आणि गावातील एकमेव न्हावी अमरू लाल सेन यांचा समावेश आहे.त्यानुसार ' उघड्यावर शौचाला जाणारी एखादी व्यक्ती माझ्या दुकानात आल्यास मी त्याची दाढी करण्यास वा त्याच्या कुटुंबियांचे केस कापून देण्यास नम्रपणे पम स्पष्ट शब्दांत नकार देतो' असे अमरू लाल सेन यांनी सांगितले. ' मात्र मी त्या नागरिकातची समजूत काढतो आणि त्याने घरात शौचालय बांधून त्याचा उपयोग करण्यास सुरूवात केल्यास तो माझ्या दुकानात आल्यावर मी त्याला एकदा मोफत सेवा देईन अशी ऑफर त्याला देतो' असेही त्यांनी नमूद केले.
भुजबळांची अटक म्हणजे काळाने उगवलेला सूड! - उद्धव ठाकरे
- मुंबई, दि. १६ - ' गृहमंत्री असताना आपले न ऐकणा-या अनेक नेत्यांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा गैरवापर करून तुरुंगात पाठवणारे भुजबळ आज त्याच मार्गाने तुरूंगात गेले आहेत. हा राजकीय नव्हे तर काळाने उगवलेला सूड आहे ' अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आल्यानंतर बराच गदारोळ माजला. पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी ही अटक म्हणजे राजयकीय सूड असल्याचा आरोप केला होता. 'हा अन्याय आहे. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई होत आहे!’ असे खुद्द भुजबळ म्हणाले होते. मात्र उद्धव यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांना चांगलीच चपराक लगावत 'राजकीय स्वार्थासाठी झालेले (भुजबळ यांचे) हे अध:पतन आहे' असल्याची टीका केली आहे. या अध:पतनास भुजबळ स्वत:च जबाबदार असल्याचा टोलाही उद्धव यांनी लगावला.
हैदराबाद; टीव्ही अँकरची आत्महत्या
- ऑनलाइन लोकमतहैदराबाद, दि. १६ - जेमिनी म्युझिक या तेलगु संगीत वाहिनीची महिला निवेदीका के.निरोशाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. निरोशा २३ वर्षांची होती. बुधवारी सकाळी सिकंदराबाद येथील पीजी हॉस्टेलच्या रुममध्ये निरोशा मृतावस्थेत आढळली.तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेलगु न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार म्युझिक चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करण्यापूर्वी निरोशाने पत्रकार म्हणून काम केले होते. आत्महत्या करण्याच्या काही मिनिटं आधी तिने फोन केला होता असे पोलिसांनी सांगितले.प्रेम प्रकरणातील नैराश्यातून ही आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. निरोशाचा प्रियकर रितविक कॅनडामध्ये रहातो. तिचे पालक चित्तूर जिल्ह्यातील सोमाला मंडलमध्ये रहतात. पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
लालूंचं फेसबुक अकाऊंट हॅक
- पाटणा, दि. १६ - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. लालूंचं अकाऊंट हॅक करुन त्याच्यावरुन आक्षेपार्ह पोस्टदेखील टाकण्यात आल्या. 12 मार्चला एका कार्यकर्त्यांने हा मुद्दा उचलल्यानंतर ही गोष्ट लक्षात आली.8 मार्च ते 12 मार्च असे एकूण चार दिवस अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या चार दिवसांत लालूंच्या फेसबुक अकाऊंटचा गैरफायदा घेत आक्षेपार्ह फोटो, कमेंट्स पोस्ट करण्यात आल्या. लालूंचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. सायबर सिक्युरिटीच्या मदतीने लालूंच फेसबुक अकाऊंट बंद करण्यात आलं असून नवीन अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल असं सांगितलं आहे.
पेशावरमध्ये बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू
- इस्लामाबाद, दि. १६ - पाकिस्तानातील पेशावरमध्ये सरकारी कर्मचा-यांना घेऊन जाणा-या बसमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. बसमध्येच ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून हा हल्ला करण्यात आला.बस कर्मचा-यांनी घेऊन सुनेहरी मशीद रोडवर पोहोचली असताना हा बॉम्बस्फोट झाला. बसमध्ये स्फोट झाला तेव्हा बसमध्ये 50 कर्मचारी उपस्थित होते. मृतांमध्ये एक महिला आणि लहान मुलाचादेखील समावेश आहे.बसमध्ये आईडी बॉम्ब ठेवण्यात आला होता. 8 किलोहून जास्त स्फोटक बसमध्ये ठेवण्यात आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.जखमींना लेडी रिडींग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती गंभीर असून आठ जणांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी सर्व परिसरात नाकाबंदी केली असून सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे.
मी त्रिवार म्हणतो, भारतमाता की जय- जावेद अख्तर
नवी दिल्ली - कामकाजात वारंवार अडथळे आणणे व धार्मिक ध्रुवीकरण देशाला पुढे नेणार नाही, तर धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारी राज्यघटनाच पुढे नेईल. घटना तर तुम्हाला शेरवानी व टोपी घालण्याचेही बंधन ठेवत नाही. मी त्रिवार म्हणतो, की भारतमाता की जय, असे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी राज्यसभेत सांगितले.
मोदी सरकारच्या अल्पमतामुळे व विरोधकांच्या बहुमतामुळे सत्तांतरानंतरही कायमच तप्त असणाऱ्या राज्यसभेत मंगळवारी मात्र शांतता, सौदार्ह आणि निरोप घेता....चे हळवे वातावरण दिसले. सभागृहाचा निरोप घेताना जावेद अख्तर यांनी त्रिवार "भारतमाता की जय‘चा जयजयकार करून ओवेसी प्रवृत्तींना दिलेले प्रत्युत्तर व गोंधळाचे पर्व संपून दर्जेदार चर्चांचे दिवस या सभागृहात परतून येतील का? हा मणिशंकर अय्यर यांचा सवाल उपस्थितांची दाद घेऊन गेला.
=======================================
राज्यसभेतून या वेळी किमान 74 सदस्य निवृत्त होत आहेत. त्यातील पहिल्या 10 ते 12 जणांच्या फळीला आज सभागृहातून निरोप दिला गेला. अख्तर, अय्यर, केपीएस गिल, टी. एन. सीमा, भालचंद्र मुणगेकर, विमला कश्यप सूद आदींनी भावना व्यक्त केल्या. संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी निवृत्त सदस्य जनतेच्या लोकलसभेचे कायमच सदस्य राहतील व जोवर ते "परलोकसभेत‘ जाणार नाहीत तोवर त्यांचा लोकांमधील हक्क कायम राहील, असे सांगताच हास्यकल्लोळ उसळला.
दागिन्यांवरील शुल्क वाढ मागे नाही - जेटली
मुंबई - अर्थसंकल्पात प्रस्तावित दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्क मागे घेणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी (ता.15) स्पष्ट केले. यामुळे सराफ संघटनांना दणका बसला आहे. संपामुळे जवळपास 12 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा करत जोपर्यंत शुल्क वाढ मागे घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा पवित्रा इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने घेतला आहे.
जेटली म्हणाले की, शुल्क वाढ ही वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने प्रस्तावित केली आहे. शुल्क वाढीबरोबर सवलतीही देण्यात आली आहे. त्यामुळे शुल्क वाढ मागे घेण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांत जीएसटीची अंमलबजावणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र या निर्णयाने सराफ संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ज्याप्रमाणे पीएफवरील कर मागे घेण्यात आला तशीच शुल्क वाढ मागे घेतली जाईल, अशी आशा संघटनांना होती. मात्र अर्थमंत्र्यांनीच शुल्कवाढीबाबत स्पष्ट केल्याने संघटनांची निराशा झाली आहे. 2005 आणि 2012 मध्ये लादलेली शुल्क वाढ मागे घेण्यासाठी सरफांना मोठा संघर्ष करावा लागला होता. आताही तशाच प्रकारचा संघर्ष करण्याची तयारी संघटनांनी केली असून लवकरच सर्व संघटनांनी बैठक होणार आहे.
======================================='त्या' भाजप आमदाराची हकालपट्टी करा:मेनका
नवी दिल्ली - दांडक्याने अमानुषपणे मारहाण करून घोड्याचा पाय तोडणारे उत्तराखंडमधील मसुरी येथील भाजप आमदार गणेश जोशी यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केली आहे.
गणेश जोशी यांनी घोड्याला मारहाण करत त्याचा पाय तोडल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात आंदोलन करताना हा संतापजनक प्रकार घडला होता. आंदोलनातील कार्यकर्त्यांनी सुरवातीला घोड्याच्या तोंडावर मारले, त्यानंतर जोशींनी घोड्याच्या पायावर दांडक्याने प्रहार करत त्याला खाली पाडले. या घोड्याच्या पायावर इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. शक्तिमान असे नाव असलेल्या या घोड्यावर आतापर्यंत प्रशिक्षणासाठी 98 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.
मेनका गांधी म्हणाल्या की, एका व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे पूर्ण पक्षावर ताशेरे ओढले जातात. त्यामुळे वेळ न दवडता त्यांची लगेच पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे.
=======================================देशविरोधी घोषणा बाहेरच्यांनी दिल्या- समिती
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) 9 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणा बाहेरुन आलेल्यांनी दिल्याची माहिती चौकशी समितीच्या अहवालात देण्यात आली आहे.
जेएनयूतील उच्चस्तरीय समितीकडून या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. या समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की त्यादिवशी देण्यात आलेल्या घोषणा या बाहेरुन आलेल्या गटाकडून देण्यात आल्या. या घोषणांना दुर्दैवीरित्या जेएनयूतील विद्यार्थ्यांकडून सहमती दर्शविण्यात आली. विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांकडून बाहेरुन आलेल्यांना रोखण्यात आले नाही. तसेच त्यांना देशविरोधी घोषणा देण्यापासूनही थांबविण्यात आले नाही. या कार्यक्रमाला प्रशासनाची परवानगी नसतानाही असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशविरोधी घोषणांसाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार व त्याच्या अन्य सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कन्हैया सध्या सहा महिन्यांच्या अंतरिम जामीनावर आहे. तर, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य कोठडीत आहेत. या चौकशी समितीने 21 विद्यार्थ्यांना कारणेदाखवा नोटीस पाठविली आहे.
=======================================
No comments:
Post a Comment