Wednesday, 9 March 2016

नमस्कार लाईव्ह ०९-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- फेसबुककडून भारतीय हॅकरला तब्बल 10 लाखांचं बक्षीस 
२- खग्रास सूर्यग्रहणाने झाकोळली इंडोनेशियाची सकाळ 
३- बीजिंग; आयफोनसाठी 18 दिवसांच्या अर्भकास विकले 
४- स्पेन; पीडित महिलेला न्यायाधीशांकडून लज्जास्पद प्रश्न 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- पोलिसांना खोटे कॉल करणाऱ्यांना आता 1 ते 3 वर्ष तुरुंगवास 
६- मुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो : मोदी 
७- कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशातून पळाले 
८- पाहा, राहुल गांधींचं शिक्षण झालं तरी किती...
९- सरकारकडे करदात्यांचे दीड लाख कोटी प्रलंबित
१०- पुरुषांपेक्षा स्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर  
११- कॉंग्रेसला मृत्यू सारखे वरदान- नरेंद्र मोदी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- 'छावणी बंद, लावणी सुरु', राज्यपालांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी 
१३- गोरखपूर; अनुपम खेर खऱ्या आयुष्यातही विलन : योगी आदित्यनाथ 
१४- अमेरिकेतील घटनेनंतर महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरची तपासणी 
१५- काश्‍मीरमध्ये जवान बलात्कार करतात- कन्हैया 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- भारत-पाक मॅच धरमशाला ऐवजी कोलकात्यात 
१७- पुजारी म्हणाला चप्पल काढून दर्शन घ्या, भक्ताने कानच चावला 
१८- माळढोक अभयारण्याचे क्षेत्र 887 वरून 4 किमी...! 
१९- औरंगाबादमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार 
२०- बरेली; बसमध्ये महिलेवर बलात्कार करून बाळाचा खून 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- कोलकातामध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना 
२२- एका मेसेजमुळे धोनी-साक्षीचं सूत जुळलं, कॅप्टन कूलची प्रेमकहाणी 
२३- बर्थडे स्पेशल : उस्ताद झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी 
२४- सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge भारतात दाखल, किंमत... 
२५- आम्ही सध्या सहाव्या गिअरमध्ये, पण...: धोनी 
२६- 'ती' अट मान्य केल्यानेच सैफशी लग्न : करिना कपूर 
२७- सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे
(गणेश पाटिल शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==========================================

कोलकातामध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना

कोलकातामध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना!
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांमधला ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा सामना धरमशालाऐवजी कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानचा संघ 16 मार्चला कोलकातामध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 19 मार्चला धरमशालामध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार होता.

पण हिमाचल प्रदेश सरकारनं या सामन्याला सुरक्षा पुरवण्यात असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर धरमशालातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने पथक पाठवलं. या पथकाच्या अहवालावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि गृहमंत्री चौधरी निसार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर पाकिस्तानने कोलकाता आणि मोहालीत आपले साखळे सामने खेळवले जावे अशी विनंती आयसीसी आणि बीसीसीआयकडे केली होती.

बीसीसीआयने कोलकात्यात हा सामना खेळवण्यास तयारी दर्शवली असून, आयसीसीने मान्यता दिल्याने हा सामना आता कोलकात्यात खेळवला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा संघ उद्या कोलकात्यात दाखल होणार आहे.
==========================================

पोलिसांना खोटे कॉल करणाऱ्यांना आता 1 ते 3 वर्ष तुरुंगवास

पोलिसांना खोटे कॉल करणाऱ्यांना आता 1 ते 3 वर्ष तुरुंगवास
Cell Phone
मुंबई : निनावी फोन येतो आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ होते. हे चित्र आता काही नवीन राहिलं नाही. पण अशा बहाद्दरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी आता कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं निनावी फोन करणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

बॉम्बची माहिती मिळताच अशीच एकदा पोलिसांनी कुर्ला स्टेशनवर सुरक्षा वाढवली. पोलिसांसोबतच श्वान पथकही मैदानात उतरलं होतं. काही मिनिटांत कुर्ला स्टेशनला छावणीचं रुप आलं. मात्र तासाभराच्या तपासणीनंतरही बॉम्ब मिळालाच नाही.

परत त्याच व्यक्तीने पोलिस कंट्रोल रुमला फोन केला. फोनवर ती व्यक्ती ‘असली पिक्चर तो अमिताभ का घर है। बॉम्ब वहा है’ अशी धमकी देतो. आता कंट्रोल रुमच्या माहितीवरुन पोलिसांची तुकडी बिग बींच्या घरासमोर जमली. इथेही त्यांना कोणताही बॉम्ब सापडला नाही.

पोलिसांना बॉम्ब मिळाला नाही, पण त्यांनी मोहम्मद मुश्ताक शेखला अटक केली. याकूब मेमनच्या फाशीचा बदला घेण्यासाठी पोलिसांना परेशान केल्याचं मुश्ताकनं कबूल केलं. हा निनावी फोन कॉलचा खेळ तब्बल तीन तास रंगला. त्याचे फोन येत गेले अन् पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहिले. त्याच्या एका फोनमुळे किती जणांना त्रास झाला. मुश्ताकला पोलिसांनी पकडलं खरं, मात्र त्याच्यावर जास्तीत जास्त कारवाई होणार का, हा प्रश्न कायम होता.
==========================================

मुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो : मोदी

मुझे गिराके अगर तुम संभल सको तो चलो : मोदी
नवी दिल्ली : सत्ता असताना काँग्रेसने मुलभूत कामं केली असती, तर आज माझ्यावर जन-धनची खाती उघडण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर खरमरीत टीका केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला मोदींनी आज राज्यसभेत उत्तर दिलं.

संसदेचं कामकाज सकारात्मक पद्धतीने चालवून देशासाठी रचनात्मक कार्य करण्यात हातभार लावा, असं आवाहन पंतप्रधानांनी काँग्रेसला केलं. मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शी) घेऊन जे सरकारच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी सत्तेत असताना दुर्बीण घेऊन काम केलं असतं, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दात काँग्रेसवर टीका केली.
स्पेक्ट्रम, कोळसा खाणी यातून सरकारनं आतापर्यंत साडे तीन लाख कोटींचं उत्पन्न जमवलं. विविध खाती स्वंयपूर्ण केली, असं सांगत त्यांनी सरकारचा लेखाजोखा मांडला. त्याशिवाय महाराष्ट्र सरकार आणि कोकाकोला कंपनीमध्ये होऊ घातलेल्या कराराचंही मोदींनी कौतुक केलं.
येत्या काळात विदर्भातली संत्री कोकाकोलाच्या अनेक उत्पादनात वापरली जाणार आहेत. करारानुसार कोकाकोलात संत्र्यांचा रस 5 टक्के वापरात येणार आहे. त्यामुळे विदर्भातल्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत ओळख मिळण्यास मदत होईल.
==========================================

कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशातून पळाले

कर्ज बुडवून विजय मल्ल्या देशातून पळाले!
मुंबई: 17 बँकांकडून 9 हजार कोटींहून अधिक कर्ज घेतलेले उद्योगपती विजय मल्ल्यांनी देश सोडला असल्याची माहिती आज सरकारने कोर्टात दिली आहे. अटॉर्नी जनरल मुकुल रहोतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. यावेळी लंडनमधील भारतीय दूतावासतर्फे विजय मल्ल्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

आजच्या सुनावणीत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मल्ल्यांची परदेशातील संपत्ती ही त्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा दुप्पट असल्याचं सांगितलं. यावरुन कोर्टाने बँकांनाही चांगलंच झापलं. त्यामुळे मल्ल्यांवर काही कारवाई होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याआधी विजय मल्ल्यांना डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल (डीआरटी)नं मोठा झटका दिला होता. डीआरटीनं त्यांना मिळणाऱ्या 515 कोटींची खाती फ्रीज करण्यात आली आहेत. त्यामुळे डीआरटीच्या पुढील आदेशापर्यंत मल्ल्या या खात्यांमधून पैसे काढू शकत नाही. एसबीआयच्या याचिकेवर डीआरटीनं हा निर्णय सुनावला आहे. डीआरटीची पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. त्या रकमेवर सगळ्यात आधी आमचा अधिकार आहे असं एसबीआयनं याचिकेदरम्यान सांगितलं होतं. कारण की, माल्यांनी बँकेचं कर्ज फेडलेलं नाही.
==========================================

अनुपम खेर खऱ्या आयुष्यातही विलन : योगी आदित्यनाथ

अनुपम खेर खऱ्या आयुष्यातही विलन : योगी आदित्यनाथ
गोरखपुर (यूपी) : अनुपम खेर पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही विलन आहेत, अशी टीका करत भाजप खासदार योगी आदित्यनाथ अभिनेता अनुपम खेर यांच्यावर पलटवार केला आहे. सगळ्यांना विलनची भूमिका माहित असते. अनुपम खेर पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही विलन आहेत, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

कोलकातामध्ये रविवारी झालेल्या टेलिग्राफ डिबेट ‘टॉलरन्स इज द न्यू इन्टॉलरन्स’ कार्यक्रमात अनुपम खेर यांनी आदित्यनाथ आणि साध्वी प्राची यांच्यावर निशाणा साधला होता. निरर्थक बडबड करणाऱ्यांना भाजपमधून काढून त्यांची रवानगी तुरुंगात करायला हवी, असं टीकास्त्र खेर यांनी केलं होते. यानंतर आदित्यनाथ यांनी खेर यांना विलन संबोधलं आहे.

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या टीकेमुळे नाराज झालेले योगी आदित्यनाथ पलटवार करत म्हणाले की, “अनुपम खेर यांनी सिद्ध केलं की, ते पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही विलन आहेत.”
==========================================

एका मेसेजमुळे धोनी-साक्षीचं सूत जुळलं, कॅप्टन कूलची प्रेमकहाणी


मुंबई : टीम इंडियाचा वन डे आणि ट्वेन्टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी सिंह रावत हे क्रिकेटजगतातील क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. आता या दोघांच्या आयुष्यात झिवा आली आणि त्यांचं त्यांचं त्रिकोणी कुटुंब पूर्ण झालं. पण धोनी आणि साक्षी भेटले कसे, त्यांची ओळख कशी झाली, त्यांचं प्रेम कसं खुलत गेलं, याची कहाणीही रंजक आहे… 
महिंद्रसिंह धोनी हा तमाम क्रिकेटचाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. पण अनेक तरुणींच्याही हृदयावर तो राज्य करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्या हेलिकॉप्टर शॉटमुळे तरुणांचा फेव्हरिट झाला तर हेअरस्टाईलमुळे मुलींचा हार्टथ्रोब झाला. पण क्रिकेटच्या मैदानावर विरोधकांचा पालापाचोळा करणारा कॅप्टन कूलची साक्षी सिंह रावतसमोर मात्र विकेट पडली.
==========================================

भारत-पाक मॅच धरमशाला ऐवजी कोलकात्यात

भारत-पाक मॅच धरमशाला ऐवजी कोलकात्यात?
नवी दिल्ली : टी 20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना धरमशाला इथून कोलकात्याला हलवण्याची चिन्हं आहेत. हा सामना कुठे खेळवायचा याबाबत आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ, असं आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितलं.

दरम्यान, टी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार की नाही, असा प्रश्न अजून कायम आहे. पाकिस्तानी संघाला आजच भारतात दाखल होणं आवश्यक होतं. मात्र पाक संघ आज येणार नसल्याची माहिती मिळत आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथं टी 20 सामना होत आहे. मात्र पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणावरुन इथं खेळण्यास नकार दिला आहे.

आधी हिमाचल सरकारने या सामन्याला सुरक्षितता पुरवण्यास नकार दिला होता. मात्र केंद्र सरकारने पाकला सुरक्षेची हमी दिली आहे.
==========================================

अमेरिकेतील घटनेनंतर महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरची तपासणी

अमेरिकेतील घटनेनंतर महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरची तपासणी
मुंबई : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कचाट्यात सापडल आहे. अमेरिकेतील एका 62 वर्षीय महिलेचा जॉन्सन अॅण्ड जॉन्सन बेबी पावडरच्या वापरामुळे अंडाशयाचा कॅन्सर होऊन मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एफडीएने जॉन्सनची उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

आम्ही बेबी पावडचे नमुने गोळा करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी सांगितलं. अमेरिकेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे प्रतिबंधात्मक पाऊल उचललं आहे. याशिवाय याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नागरिकांमध्ये जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीची उत्पादनं लोकप्रिय आहेत. तसंच देशासह महाराष्ट्रात कंपनीच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका होऊ नये, यासाठी त्याची पडताळणी सुरु असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
==========================================

पाहा, राहुल गांधींचं शिक्षण झालं तरी किती...

पाहा, राहुल गांधींचं शिक्षण झालं तरी किती...
मुंबई: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे. सध्या राहुलच्याच नेतृत्वात पक्ष काम करीत आहे. सध्या राहुल गांधी केंद्र सरकारला प्रत्येक मुद्द्यावर अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तसं पाहायला गेलं तर राहुल गांधींबद्दल बरीत माहिती अनेकांना आहे. मात्र, राहुल गांधी किती शिकले आहेत याबद्दल तुम्हाला माहिती आहे?

राहुल गांधी यांचं शालेय शिक्षण दिल्लीच्या मॉर्डन शाळेत झालं होतं. त्यानंतर ते जिथे राजीव गांधी शिकले होते त्या शाळेत शिक्षणासाठी गेले. 1981 ते 1983 सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधींना आपलं शिक्षण घरातूनच पूर्ण करावं लागलं.

राहुल गांधींनी हार्वर्ड विद्यापीठातील रोलिंस कॉलेज फ्लोरिडामध्ये 1994 साली कला शाखेतून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 1995 साली केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी महाविदायाल्यातून एमफिलची डिग्री मिळवली.

पदवी शिेक्षणानंतर राहुल गांधींनी 3 वर्ष काम केलं होतं. 2002 साली राहुल गांधी हे मुंबईतील अभियांत्रिकी आणि प्रोद्योगिक याच्याशी संबंधित एक कंपनी चालविण्यासाठी भारतात परत आले.

मार्च 2004 साली राहुल गांधींनी पहिल्यांदा राजकारणात उडी घेतली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडूनही आले.
==========================================

'छावणी बंद, लावणी सुरु', राज्यपालांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी

'छावणी बंद, लावणी सुरु', राज्यपालांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी
मुंबई ‘छावणी बंद, लावणी सुरु’ अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपला इरादा स्पष्ट केला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र विरोधकांनी सुरुवातीपासूनच सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

त्यातच राज्यपालांनी भाषणाची सुरुवात मराठीत मात्र संपूर्ण भाषण इंग्रजीत केल्याने, विरोधकांनी त्याविरोधातही घोषणाबाजी केली. ‘मराठीत बोला, मराठीत बोला’ अशा घोषणा देत विरोधकांनी राज्यपालांकडे मराठीत भाषण करण्याची मागणी केली.

दरम्यान, कर्जमाफी झाली पाहिजे, डान्सबार सुरु करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, चार पाणी बंद डान्स बार सुरु, अशा घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं.

डान्सबार बंदीबाबात कायदा करा, दोन्ही सभागृहात सहकार्य करु, असं आवाहन कालच विरोधी पक्षनेत्यांनी केलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही डान्सबार बंदीबाबत कायदा आणू असे संकेत दिले आहेत. मात्र हा मुद्दा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून गाजत असल्याचं दिसून येत आहे.
==========================================

पुजारी म्हणाला चप्पल काढून दर्शन घ्या, भक्ताने कानच चावला

1
पुजारी म्हणाला चप्पल काढून दर्शन घ्या, भक्ताने कानच चावला !
मुंबई : देशभरात सोमवारी महाशिवरात्रीचा उत्साह असताना इकडे ठाण्यात मात्र विचित्र घटना घडली. दर्शन रांगेतील वादावादीतून एका भक्ताने थेट पुजाऱ्यावर हल्ला करून, त्याचं बोट आणि कानाचा चावा घेतला. ठाण्याजवळच्या श्रीनगर परिसरातील शंकराच्या मंदिरात ही घटना घडली.

बाबुराव गंगाराम पाटील असं 70 वर्षीय पुजाऱ्याचं नाव आहे. तर शिवाजी नाना साळुंखे असं आरोपीचं नाव आहे.

महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी पुजाऱ्याने शिवाजी साळुंखे यांना चप्पल काढून मैदानात जाण्यास सांगितलं. तसंच रांगेत उभं राहून दर्शन घेण्याचं बजावलं. मात्र याच वादातून पुजारी पाटील आणि शिवाजी साळुंखे यांच्यात वादावादी झाली.

या वादातून प्रचंड चिडलेल्या शिवाजीने पुजारी बाबुराव पाटील यांच्या उजव्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. यावरच न थांबता त्याने पुजाऱ्याचा उजवा कानही चावला.

याप्रकारामुळे उपस्थित भक्तांनी शिवाजीला चांगलाच धुतला. मात्र पोलिसांनी गर्दीपासून त्याची सुटका केली. पण पोलिसांनाही त्याने धक्काबुक्की केली.
==========================================

फेसबुककडून भारतीय हॅकरला तब्बल 10 लाखांचं बक्षीस

फेसबुककडून भारतीय हॅकरला तब्बल 10 लाखांचं बक्षीस
मुंबई: फेसबुकच्या लॉग इन सिस्टममध्ये ‘बग’ शोधून काढणाऱ्या हॅकर आनंद प्रकाशला फेसबुकनं जवळजवळ 10 लाख रुपयांचं इनाम दिलं आहे. आनंद प्रकाशनं फेसबुकच्या सिक्युरिटी टीमनं 22 फेब्रुवारीला ‘बग’शी निगडीत एक रिपोर्ट पाठवला होता.

आनंद प्रकाश हा ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये सिक्युरिटी एक्सपर्टमधून म्हणून कार्यरत आहे. 2 मार्च रोजी फेसबुकनं त्याला 15 हजार डॉलर (10 लाख) बक्षीस दिलं. प्रकाशला ही रक्कम मिळाली देखील आहे. 2015 साली फेसबुकनं 9 लाख डॉलर रक्कम रिसर्च करणाऱ्यांवर खर्च केले आहेत.

बग शोधून बक्षीस पटकावण्यात भारत, इजिप्त आणि टोबेगो या देशातील हॅकर्स   काम करतात.

यूजर्सला कसं नुकसान पोहचवत होतं हा बग:

जर हा बग लॉग इन सिस्टमसोबत इंटर केल्यास हॅकर थेट यूजर्सच्या अकांउटमध्ये, घुसू ,शकतो.

ज्यामुळे तुमच्या अकाउंटमधनू फोटो मेसेज आणि डेबिट कार्डचं डिटेल्स चोरु शकतो.

आनंदनं आपल्या ब्लॉगमध्ये लिहलं आहे. की, फेसबुकनं ही मोठी समस्या शोधून हा या समस्येवर कामही सुरु झालं आहे. त्यासाठीच त्याला फेसबुककडून 10 लाखाचं बक्षीस देण्यात आलं आहे.

कोण आहे आनंद प्रकाश:

भादरा, राजस्थानमध्ये राहणारा आनंद प्रकाश हा वेल्लूर इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून कम्प्युटर सायन्समधून बीटेक केलं आहे.

आजवर बग शोधून त्यान 1 कोटी कमावले आहेत.

2015 साली एका रिपोर्टनुसार, फेसबुकमध्ये 80 बग होते.

बग शोधण्यासाठी आनंदला फेसबुकनं चौथा क्रमांक दिला आहे.
==========================================

बर्थडे स्पेशल : उस्ताद झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी

बर्थडे स्पेशल : उस्ताद झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी
मुंबई: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा आज वाढदिवस.. 9 मार्च 1951 ला जन्मलेल्या झाकीर हुसेन यांचं संगीत क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संग्रहित व्हिडीओ- हा व्हिडीओ जुलै 11, 2014 रोजी झालेल्या एका कार्यक्रमातील आहे.

शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांची जुगलबंदी, संपूर्ण व्हिडीओ (40 मिनीट)
==========================================

सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली

सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली!
कोलकाता : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. विशेष म्हणजे स्वत: हार्दिक पंड्याने हे सांगितलं आहे. “तू 12 महिन्यांत भारतीय क्रिकेट संघासाठी खेळशील, असं सचिन मागील वर्षी आयपीएलदरम्यान म्हणाला होता,” असं पंड्याने सांगितलं.

पंड्याने पदापर्णानंतर 11 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये दहा विकेट्स घेतल्या असून पाच डावांमध्ये 62 धावाही ठोकल्या आहेत.

पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या म्हणाला की, “आयपीएलदरम्यान सचिन म्हणाला होता की, मी पुढील एक किंवा दीड वर्षात भारतासाठी खेळेन. यानंतर सात महिन्यांतच माझी भारतीय संघात निवड झाली.”

नेहराच्या सल्ल्यामुले गोलंदाजीत सुधारणा!
आशिष नेहरासोबतच्या जोडीबाबत विचारलं असता पंड्याने सांगितलं की, “नेहरा भाईने मला खुपच मदत केली आहे. मी नेहमीच त्याचा सल्ला घेतो. तो अनेक वर्ष भारतासाठी खेळाला आहे. त्याच्या सल्ल्यामुळे माझ्या गोलंदाजीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.”
==========================================

खग्रास सूर्यग्रहणाने झाकोळली इंडोनेशियाची सकाळ

खग्रास सूर्यग्रहणाने झाकोळली इंडोनेशियाची सकाळ!
इंडोनेशियातून दिसलेलं सूर्यग्रहण (फोटो सौजन्य: Melati Nurguritno @supermelati)
या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आज.. भारतात पूर्व किनारपट्टीवर विशेषतः हैदराबाद, गुवाहाटी, पुरी या भागात प्रामुख्यानेे सूर्यग्रहण पाहता आलं. संपूर्ण सूर्यग्रहण म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाचा नयनमनोहारी दृश्य इंडोनेशियात पाहायला मिळालं.
ट्वीटर आणि पेरिस्कोपसारख्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगभरात इंडोनेशियातील सूर्यग्रहण संबंध जगभर पोहोचलं.. अनेक ट्वीपल्सनी त्यांना आलेला अनुभव जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला..
==========================================

सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge भारतात दाखल, किंमत...

सॅमसंग गॅलक्सी S7, S7 Edge भारतात दाखल, किंमत...
मुंबई गेल्या महिन्यात बार्सिलोनामध्ये सॅमसंगने गॅलक्सी सिरीजमधील S7 आणि S7 Edge हे त्यांचे महत्त्वाकांक्षी स्मार्टफोन लाँच केले होते. हेच स्मार्टफोन आता भारतातही लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनची भारतातील विक्री 18 मार्चपासून सुरु होत आहे.

17 मार्चपर्यंत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना सॅमसंग गियर VR सेट फ्री मिळणार आहे.

सॅमसंगच्या 23 जीबी असलेल्या गॅलेक्सी S7 ची किंमत 48,900 रुपये आणि S7 Edge ची किंमत 56,900 रुपये आहे.

सॅमसंगने युझर्सना कॉन्जियर्स सर्व्हिस अंतर्गत my galaxy अॅप दिलं आहे. यामध्ये चार मोठे पर्याय आहेत. माय असिस्टेंटमध्ये तुम्हाला फुलांची (बुके) ऑर्डर देता येईल. याशिवाय वेब चेकइन, रिमांइंडर, सॅमसंग कस्टमर केअरवर फास्ट ट्रॅक अक्सेस मिळेल. या अॅपच्या मदतीने तुम्ही सॅमसंगच्या कस्टमर केअर डेस्कशी चॅट करु शकता. तुम्हाला तातडीने रिप्लायही मिळेल.
==========================================

आम्ही सध्या सहाव्या गिअरमध्ये, पण...: धोनी

आम्ही सध्या सहाव्या गिअरमध्ये, पण...: धोनी
मुंबई: उत्कृष्ट तयारी, शानदार फॉर्म आणि घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा यामुळे भारतीय संघ यंदाच्या टी-20 विश्वचषकातील प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. असं असलं तरीही धोनी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाही.

भारतानं नुकतंच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर हरवलं. त्यानंतर लंकेलाही धूळ चारली आणि बांग्लादेशमधील आशिया कपही पटकावला. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा चाहत्यांना विश्वास आहे.

दरम्यान, धोनीनं विश्वचषकापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला की, ‘मला वाटतं आता आम्ही सहाव्या गिअरमध्ये आहोत. फॉर्मही चांगला आहे. पण आम्ही असं नाही म्हणू शकत की, टुर्नामेंट भारतात असल्यानं आम्हीच विजयी होऊ. कारण की, प्रत्येक टीमकडे योग्य संधी आहे.
2011 साली पटकावलेल्या विश्वचषकानंतर भारताकडून नक्कीच अपेक्षा उंचावल्या आहेत. आम्ही तयारी करीत असून सध्या आम्ही चांगल्या स्थितत आहे. असंही धोनी म्हणाला.
==========================================

'ती' अट मान्य केल्यानेच सैफशी लग्न : करिना कपूर


'ती' अट मान्य केल्यानेच सैफशी लग्न : करिना कपूर
मुंबई बॉलिवूडची बेबो गर्ल करिना कपूरने आपण नवाब सैफ अली खानसोबत लग्न का केलं याबाबतचा खुलासा केला आहे. लग्नाच्या सुमारे तीन वर्षानंतर करिनाने आपलं ‘राज’ जगजाहीर केलं आहे.

लग्नापूर्वी सैफ – करिना अनेकवेळा डेटिंगवर होते. याबाबतची चर्चा रंगल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नापूर्वी करिनाने सैफसमोर एक अट घातली होती.

‘मी आयुष्यभर बॉलिवूडमध्ये काम करेन आणि त्याला सैफने पाठिंबा द्यायला हवा’, ही अट करिनाने घातली होती. करिनाची ही अट सैफने राजीखुशीने मान्य केली आणि ही जोडी 2012 मध्ये बोहल्यावर चढली.

“आज मी एक पत्नी आहे. मी माझ्या आयुष्यात स्वत: काम करुन पैसा मिळवेन. यासाठी माझ्या नवऱ्याने मला पाठिंबा द्यावा, ही माझी एकमेव अट होती”, असं करिना म्हणाली.
==========================================
बीजिंग; सरकारकडे करदात्यांचे दीड लाख कोटी प्रलंबित
नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाकडे एकूण दीड लाख कोटी रुपयांचे कर परताव्यांचे दावे प्रलंबित असल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. 

लोकसभेत लेखी उत्तरात सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘प्राप्तिकर विभागाकडे 27 फेब्रुवारी 2016 पर्यंत परताव्यासाठी करदात्यांचे 1 लाख 50 हजार 529 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. या दाव्यांपैकी बहुतेक दावे हे चालू आर्थिक वर्षातील असून त्यासाठी केलेले बहुतेक अर्जही अलिकडच्या काही महिन्यांतील आहेत, असेही सिन्हा यांनी सांगितले. करदात्यांकडून प्राप्तिकर भरताना तो अंदाजित भरला जातो. त्यामध्ये बहुतेकदा अतिरिक्त कर भरला जातो. त्यानंतर आकारण्यात आलेला प्राप्तिकर आणि भरलेला प्राप्तिकर यामध्ये तफावत असते. त्यामुळे भरण्यात आलेला अतिरिक्त कर प्राप्तिकर खात्याकडून करदात्यांना व्याजसह परत केला जातो. त्यासाठीचे व्याजदर सरकारतर्फे ठरवले जातात. करदात्यांना प्राप्तिकर परतावे देण्याची प्रक्रिया वर्षभर सुरु असते.
==========================================
आयफोनसाठी 18 दिवसांच्या अर्भकास विकले
बीजिंग - चीनमध्ये एका जोडप्याने आयफोन विकत घेण्यासाठी त्यांचे 18 दिवसांचे बाळ 3,530 डॉलर्सला विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आग्नेय चीनमधील फुजिआन प्रांतामधील दुआन या अर्भकाच्या पित्याने चीनमधील सामाजिक संकेतस्थळावर यासंदर्भातील जाहिरात दिली होती. दुआन याला आयफोन व मोटरसायकल विकत घ्यावयाची होती. 

या अर्भकाची माता शिओ मेई ही छोटीमोठी कामे करुन उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करते; तर दुआनचा बहुतेक वेळ येथील इंटरनेट कॅफेमध्ये जातो. या अर्भकाचा जन्म झाल्यावेळी मातापित्यांचे वय अवघे 19 होते. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या जोडप्यास अर्भकाच्या पालनपोषणाचा खर्च पेलणे शक्‍य नव्हते. या पार्श्‍वभूमीवर, दुआन याने हे अर्भक विकण्यासाठी मेईला राजी केले. शिवाय, या अर्भकाच्या विक्रीमधून मिळणाऱ्या संपत्तीमधून त्याला आयफोन व मोटरसायकलही विकत घ्यावयाची होती. अर्भकाची विक्री करण्यात आल्यानंतर मेई फरार झाली. मात्र पोलिसांनी तिला अटक करण्यात यश मिळविले आहे. 

दरम्यान, दुआन याला तीन वर्षांचा कारावास झाला आहे. लहान मुलांची तस्करी ही चीनमधील अत्यंत गंभीर समस्या असून प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात असूनही या गैरप्रकारास अद्याप आळा घालता येणे शक्‍य झालेले नाही.
==========================================
पीडित महिलेला न्यायाधीशांकडून लज्जास्पद प्रश्न
माद्रिद (स्पेन)- एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पीडित महिलेला एका न्यायाधीशाने लज्जास्पद प्रश्न विचारल्याचा प्रकार स्पेनमधील एका न्यायालयात घडला. 

स्पेनमधील बसक्‍यू येथे एका महिलेवर बलात्कार झाला आहे. बलात्कारानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तिने तक्रारीमध्ये काही मुद्दे मांडले होते. न्यायालयात सुनावणीदरम्यान न्यायाधीश मारिया डेल कार्मेन मोलिना मानसिल्ला यांनी पीडित महिलेला विचारले की, ‘बलात्कार झाल्यानंतर शारीरिक व लैंगिक त्रास झाला का? बलात्कार होत असताना दोन्ही पाय व स्त्रीलिंगी अवयव दाबून ठेवले नाहीत का?‘ असे विक्षिप्त प्रश्न विचारले. 

न्यायाधीशाने विचारलेल्या या प्रश्नांमुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पीडित महिलेने न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, या घटनेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांमुळे ‘दामिनी‘ चित्रपटाची आठवण झाली.
==========================================
पुरुषांपेक्षा स्त्रियांकडूनच इंटरनेटचा अधिक वापर 

नवी दिल्ली - भारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांकडून इंटरनेटचा अधिक वापर होत असल्याची माहिती ‘गुगल‘ने दिली आहे. 

विविध वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत महिला इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. भारतातील स्त्रीया विशेषत: माता सौंदर्यापासून फॅशनपर्यंत आणि आरोग्यपासून फिटनेसपर्यंतच्या माहितीचा शोध घेण्यासाठी इंटरनेटचा अधिक वापर करतात. भारतातील प्रत्येक तीन मातांपैकी एक माता इंटरनेटचा वापर करते. तर चारपैकी केवळ एकच पिता इंटरनेटचा वापर करतो. भारतातील स्त्रियांचे जीवनमान बदलण्यात इंटरनेट महत्वाची भूमिका बजावत आहे. पुरुषांपेक्षा महिलांनी इंटरनेटवर अधिक वेळ खर्च करणे ही खूप मोठी गोष्ट असल्याचे मत "गुगल‘ने व्यक्त केले आहे. तसेच हे प्रमाण भविष्यात वाढण्याची शक्‍यताही व्यक्त केली आहे.
==========================================
काश्‍मीरमध्ये जवान बलात्कार करतात- कन्हैया

नवी दिल्ली- काश्‍मीरमध्ये सुरक्षेच्या नावाखाली जवान महिलांवर बलात्कार करतात, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याने जागतिक महिला दिनी केला आहे. 

कन्हैया म्हणाला, ‘मी, जवानांचा सन्मान करतो. परंतु, काश्‍मीरमध्ये जवान महिलांवर बलात्कार करत आहेत. आपल्यात आपापसांत मतभेद जरूर असतील. परंतु, देशाला व कायद्याला वाचविण्यासाठी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. देशातील विविध समस्यांपासून सुटका करण्यासाठी आम्ही लढा देत आहोत.‘ 

दरम्यान, ‘जेएनयू‘ विद्यापीठातील एका कार्यक्रमात कन्हैया याने देशविरोधात घोषणा दिल्याने त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो तिहार तुरुंगात होता. बुधवारी (ता. 2) त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
==========================================
माळढोक अभयारण्याचे क्षेत्र 887 वरून 4 किमी...!
सोलापूर - अत्यंत संवेदनशील बनलेल्या माळढोक अभयारण्याच्या खासगी जमीन संपादनाच्या निर्णयाबाबत राज्य सरकारने आज खूप मोठा निर्णय घेतला. एकूण 887. 65 चौरस किलोमीटर खासगी क्षेत्रापैकी अत्यावश्‍यक क्षेत्र म्हणून फक्त 4. 80 चौरस किलोमीटर क्षेत्र संपादित करून उर्वरित 882.84 चौरस किलोमीटर खासगी क्षेत्र अभयारण्यातून वगळण्यात आले आहे. यामुळे आता जमीन खरेदी-विक्री, गहाण ठेवण्यासह बॅंकेतून कर्ज देण्या-घेण्याच्या सर्वच बाबी करता येणार आहेत. याबाबत आजपासून अधिसूचना जारी केली असून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी "सकाळ‘ला दिली. 

याकामी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यास यश आले असून आता सोलापूरसह नगर जिल्ह्यातील जमिनींचे व्यवहार होण्यास चालना मिळणार आहे. 

1985 मध्ये सोलापूर व नगर जिल्ह्यातील 8496. 44 चौरस किलोमीटर माळढोक अभयारण्य क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने केलेल्या शिफारशीनुसार माळढोक पक्षी अभयारण्याच्या सीमेचे पुनर्गठण करण्याकरता व्ही. बी. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली होती. या समितीने पर्यावरण, प्राणी, वनस्पतीविषयक महत्त्व विचारात घेऊन माळढोक अधिवास, संरक्षण व संवर्धनासाठी अभयारण्याचे क्षेत्र 8496.44 चौरस किलोमीटरवरून 1222.61 चौरस किलोमीटर इतके ठेवण्याची शिफारस केली. यामध्ये 1229.24 चौरस किलोमीटर क्षेत्रात 323.09 चौरस किलोमीटर वनक्षेत्र, गायरान, शासकीय, शासकीय क्षेत्र 18.50 चौरस किलोमीटर व 887.65 चौरस किलोमीटर खासगी क्षेत्राचा समावेश होता. 
==========================================
औरंगाबादमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

औरंगाबाद - जागतिक महिला दिनाचा जागर शहरात सुरू असतानाच मंगळवारी (ता. आठ) एका बावीस वर्षीय विवाहितेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेने पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पीडित महिला जटवाडा परिसरात आई व दोन भावासोबत राहते. ती पतीपासून विभक्त असून एका महिला वकिलाकडे मदतनीस म्हणून कामाला आहे. पाच दिवसांपूर्वी तिच्या मोबाइलवर दीपक ढेपले (रा. बजाजनगर) या तरुणाने फोन केला. तिच्याशी सलगी वाढवून त्याने तिला भेटण्याचा आग्रह धरला. पीडितेने आपण ओळखत नसल्याचे सांगत भेटीस नकार दिला. मात्र, दीपकने सातत्याने फोन करून तिला भेटण्याचा आग्रह करून शिवीगाळ सुरू केली. सोमवारी सायंकाळपर्यंत पीडितेच्या मोबाइलवर दीपकने फोन करण्याचा सपाटाच लावला. वैतागून परस्पर त्रास देण्यापेक्षा समोर येऊन बोला असे ती म्हणाली. भेटण्याची हीच संधी साधून दीपकने तिला कार्तिकी हॉटेल चौकात भेटण्यासाठी बोलावले. रात्री आठच्या सुमारास ती कार्तिकी चौकात आली. काही वेळातच दीपक ढेपले, दीपक धुमाळ व प्रभू गुजर, असे तिघे एकाच दुचाकीवरून तेथे आले. त्यातील एकाने आपण दीपक असल्याचे तिला सांगितले. तिला त्यांनी सोबत येण्याचा आग्रह धरला, मात्र तिने नकार दिला. त्यांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपकने तिला त्याच्या दुचाकीवर बसवले व वडगाव कोल्हाटी येथे नेले. तेथे एका खोलीत तिच्यावर अत्याचार केले, काही वेळात दोघे तेथे पोचले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. बलात्कारानंतर पहाटे पाच वाजता दीपकने कार्तिकी चौकात आणून सोडले व घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पीडितेने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिघांवर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार व अपहरणाच्या गुन्ह्याची नोंद झाली. 
==========================================
कॉंग्रेसला मृत्यू सारखे वरदान- नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली- संसदेमधील कामकाजादरम्यान अडथळे आणले तर कॉंग्रेस पक्षावर आरोप होत नसून त्यांचे नावही येत नाही. कारण कॉंग्रेस पक्षाला मृत्यू सारखे वरदान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) म्हटले आहे. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या राज्यसभेतील अभिभाषणावर आभारप्रदर्शन करताना मोदी म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उशिरापर्यंत काम होत असून सर्वजण खूष आहेत. परंतु, यापूर्वी असे कधी झाले नाही. संसदेमधील कामकाजामध्ये कितीही अडथळे आणले नाही तरी कॉंग्रेसवर आरोप होत नाही. कारण, मृत्यूला एक वरदान आहे, की तो कधी बदनाम होत नाही. कर्करोगाने मरण आलं, तर कर्करोग बदनाम होतो, अपघातानं मृत्यू आला तर अपघात बदनाम होतो पण मृत्यू कधी बदनाम होत नाही. त्याप्रमाणे आम्ही टीका केली तर विरोधी पक्षावर टीका असे म्हटलं जातं, कॉंग्रेसवर टीका असे म्हटलं जात नाही.‘ 

‘सुशिक्षितांनाच निवडणुका लढवण्याचा अधिकार राजस्थानसारख्या राज्याने दिला आहे. अशिक्षिततेला गांभीर्याने न घेतल्यामुळे ही वेळ आली आहे. स्वातंत्र्यापूर्वी गायकवाड संस्थानमध्ये मुलीला शिक्षण दिले नाही तर दंड आकारला जात होता. त्यामुळे महिला साक्षर होत होत्या. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा प्रकार बंद झाला आणि अशिक्षितता वाढली,‘ असेही मोदी म्हणाले.
==========================================
बरेली; बसमध्ये महिलेवर बलात्कार करून बाळाचा खून
बरेली (उत्तर प्रदेश)- एका विवाहित महिलेवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करून तिच्या 14 दिवसांच्या बाळाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिशगड या गावामध्ये घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक 28 वर्षीय महिला आपल्या 14 दिवसांच्या बाळाला घेऊन एका कार्यक्रमासाठी खापुरीया या गावाला सोमवारी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर शिशगड गावाकडे येण्यासाठी रात्री बसची वाट पाहात होती. यावेळी एक खासगी बसमधील वाहकाने तिला वाहनात बसविले. बस पुढे गेल्यानंतर वाहक व चालकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चिमुकल्याला बसमधून जमिनीवर फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बलात्कारानंतर महिलेला एका बस स्थानकावर सोडून त्यांनी पळ काढला. महिला घरी न आल्यामुळे तिच्या घरच्यांनी व गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला. मंगळवारी सकाळी एका ठिकाणी महिला आढळून आली. यावेळी महिलेवर बलात्कार होऊन चिमुकल्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘ 

पोलिस अधीक्षक यमुना प्रसाद यांनी सांगितले की, ‘बस चालक व वाहकाला अटक करण्यात आली आहे. ईश्वर लाल व पप्पू अशी दोघांची नावे आहेत. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.‘
==========================================

No comments: