[अंतरराष्ट्रीय]
१- दोन प्राचीन भारतीय मूर्ती अमेरिकेत जप्त
२- न्यूयॉर्क; वेतनाच्या बदल्यात सैनिकांना बलात्काराची मुभा
३- वॉशिंग्टन; गोंधळामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली रद्द
४- जम्मू सियालकोट मार्ग उघडल्यास पाकिस्तानात जाणे सोपे होईल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांकडून RSS ची ISISशी तुलना
६- मीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांची टिवटिव
७- साध्वी प्राचींवर प्रेम करतो, मात्र कुणी याला ‘लव्ह जिहाद’ बोलू नये: आझम खान
८- पंतप्रधानांचा चमचा म्हटलंत तरी चालेल : अनुपम खेर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मोहित कंबोज यांचं ऑफिस फोडलं, राज ठाकरेंना धमकी दिल्यानं मनसे आक्रमक
१०- माणदेशी माणसे आत्महत्या करत नाहीत : शरद पवार
११- RSS प्रमाणेच 'इसिस'लाही आमचा विरोध- आझाद
१२- टोलमुक्तीचे ‘बिल’ आठशे कोटींवर
१३- रिक्षा आंदोलनाबाबत मनसेचे घूमजाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- विरार; कारसमोर यूटर्न घेतल्याचा राग, धनदांडग्याचा हवेत गोळीबार
१५- हैदराबाद; ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींचा निधी
१६- मेरठ: इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
१७- औरंगाबाद; चीनमधील आई-वडिलांना भेटणार 53 वर्षांनंतर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव
१९- टी-20 विश्वचषकासाठी आफ्रिदी अँड कंपनी भारतात दाखल
२०- 40 कोटी रुपयांसाठी अनुष्का-विराटचं ब्रेकअप
२१- म्हणून टीम इंडियाच्या विजयानंतर धोनी स्टम्प काढून नेतो
२२- 'मोगली'मध्ये प्रियांका, इरफानचा आवाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- इसापूर धरणाचे पाणी १४ मार्चला सोडणार
२४- लोह्यात दिवसा घरफोडी, लाखांचा ऐवज लंपास
२५- देगलूर; फर्निचर दुकानास भीषण आग
२६- शालेय पोषण आहार शिजवना-यांना दरवाढीचा दिलासा
२७- किनवट; बनावट जात प्रमाणपत्र काढणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी
२८- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज ९ केंद्रावर मतदान
२९- जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्यांना ६० कोटींचा फटका
३०- मुक्रमाबाद; तग्याळ मनरेगा प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह १३ जणांवर गुन्हे दाखल
३२- किनवट येथे ८ मे रोजी मातंग समाजाचा सामुहिक मेळावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गिरीश नारखेडे, जळबाजी बुचले, संतोष देशमुख, साईनाथ कस्तुरे, सागर बियाणी, दिगंबर पोलावार, मंजोष कांबळे, सागर बागडे, शैलेंद्र मोरे, कपिल राठोड,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
========================================

विरोधक मला कमी लेखण्यासाठी चमचा म्हणतात, मात्र मला त्यात कुठलाच कमीपणा वाटत नाही, असा पवित्रा खेर यांनी घेतला आहे. मी मोदीच काय, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांचाही चमचा आहे, असं खेर आनंदाने सांगतात.
========================================

========================================

‘माझ्या पोस्ट रिटायरमेंट प्लानसाठी मी या स्टम्प काढून नेतो. मी स्टम्प्स घरी घेऊन जातो. पुढे जेव्हा मी एखादी स्टम्प पाहीन, तेव्हा ही स्टम्प त्या मॅचमधली होती, हे माझ्या लक्षात येईल.’ असं धोनी सांगतो.
धोनी जरी हे कारण पुढे करत असला, तरी त्यामागे आणखी एक गुपित असल्याचं म्हटलं जातं. याला कारणीभूत आहे माहीचा बालमित्र कुलबिंदर. एका नेपाळी वॉचमनचा मुलगा कुलबिंदर हा धोनीचा शालेय वयातला बेस्ट फ्रेण्ड. त्याने धोनीचे गुण हेरले आणि क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
रांचीचा धोनी आज जगभरात सुप्रसिद्ध झाला. मात्र कृष्ण सुदाम्याला विसरला नाही, तसाच धोनी कुलबिंदरला विसरला नसल्याचं म्हटलं जातं.
कुलबिंदरने आता स्वतःचं एक छोटंसं घर बांधलं आहे. मात्र धोनीच्या या बालमित्राच्या घराभोवती कुंपणच नाही. असं असूनही आपल्या श्रीमंत मित्राकडे त्याने एक दमडीही मागितली नाही.
========================================
माणदेशी माणसे आत्महत्या करत नाहीत : शरद पवार
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अर्थतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ. विजय केळकर यांना शरद पवार यांच्या हस्ते यंदाच्या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन डॉ. केळकर यांना गौरवण्यात आले.
डॉ. केळकर हे माणदेशी असल्याचा दाखला देत पवार म्हणाले की, आज माणदेशी माणूस काठमांडूपासून केरळपर्यंत प्रत्येक शहरात स्वत:चा ठसा उमटवत आहे. सोने आणि चांदी कारागिर क्षेत्रात माणदेशी माणसांचा हात कुणीही धरू शकत नाही. कायम दुष्काळी भागातील माणसांनी कौशल्याने परिस्थितीवर मात केल्याचे सांगत पवार यांनी माणदेशी माणसे खूप कर्तबगार आहेत, असे कौतुकोद्गार काढले.
========================================
RSS प्रमाणेच 'इसिस'लाही आमचा विरोध- आझाद
नवी दिल्ली - ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचा जसा विरोध आहे, त्याचप्रमाणे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेलाही करतो,‘ असे विधान राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. संघ परिवार आणि इसिसला एकाच पारड्यात तोलून आझाद हे दोन धर्मीयांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका होत आहे.
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींचा निधी

हैदराबाद - तेलंगण राज्य सरकार यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समुदायावरील कल्याणकारी योजनांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याचे वृत्त आज (रविवार) सूत्रांनी दिले.
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अधिकाधिक सकारात्मक पाऊले उचलणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिले होते. राजधानी हैदराबाद येथे ब्राह्मण भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राव यांच्यातर्फे याआधीच करण्यात आली आहे. ब्राह्मण समुदायाने राव यांना नुकत्याच झालेल्या ग्रेटर हैदराबादच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भरभरुन मतदान केले होते.
याबरोबरच, शेजारील आंध्र प्रदेश सरकारनेही ब्राह्मण प्राधिकरणाची स्थापना केली असून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समुदायासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या या योजनांचे ब्राह्मण समुदायातर्फे स्वागत करण्यात आले आहे.
========================================
मेरठ: इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
टोलमुक्तीचे ‘बिल’ आठशे कोटींवर
रिक्षा आंदोलनाबाबत मनसेचे घूमजाव
मुंबई - कायदा हातात घेतल्यास होणाऱ्या कडक कारवाईची भीती आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी दाखवलेला अनुत्साह यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमराठी भाषकांच्या रिक्षांविरोधातील आंदोलन स्थगित केल्याची चर्चा आहे.
चीनमधील आई-वडिलांना भेटणार 53 वर्षांनंतर
प्रोमिला दास यांची 1962 च्या युद्धात झाली होती ताटातूट
औरंगाबाद - चीनबरोबर झालेल्या 1962 च्या युद्धप्रसंगात चिनी मूळ असलेल्या चहा मळ्यातील अनेक मजुरांना मायदेशात पाठविण्यात आले. यामुळे अनेकांचे संबंध कायमचे तुटले; पण आसाममध्ये सोडून गेलेल्या आपल्या मुलीचा शोध चीनवासी झालेल्या खोखोई लियोंग यांना तब्बल 30 वर्षांनी लागला.
'मोगली'मध्ये प्रियांका, इरफानचा आवाज
मुंबई - हॉलिवूडमधील ‘द जंगल बुक‘ ऍनिमेटेड चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला असून, या चित्रपटातील पात्रांना प्रियांका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर आणि शेफाली शहा यांचा आवाज देण्यात आला आहे.
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
१- दोन प्राचीन भारतीय मूर्ती अमेरिकेत जप्त
२- न्यूयॉर्क; वेतनाच्या बदल्यात सैनिकांना बलात्काराची मुभा
३- वॉशिंग्टन; गोंधळामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली रद्द
४- जम्मू सियालकोट मार्ग उघडल्यास पाकिस्तानात जाणे सोपे होईल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांकडून RSS ची ISISशी तुलना
६- मीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांची टिवटिव
७- साध्वी प्राचींवर प्रेम करतो, मात्र कुणी याला ‘लव्ह जिहाद’ बोलू नये: आझम खान
८- पंतप्रधानांचा चमचा म्हटलंत तरी चालेल : अनुपम खेर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मोहित कंबोज यांचं ऑफिस फोडलं, राज ठाकरेंना धमकी दिल्यानं मनसे आक्रमक
१०- माणदेशी माणसे आत्महत्या करत नाहीत : शरद पवार
११- RSS प्रमाणेच 'इसिस'लाही आमचा विरोध- आझाद
१२- टोलमुक्तीचे ‘बिल’ आठशे कोटींवर
१३- रिक्षा आंदोलनाबाबत मनसेचे घूमजाव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- विरार; कारसमोर यूटर्न घेतल्याचा राग, धनदांडग्याचा हवेत गोळीबार
१५- हैदराबाद; ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींचा निधी
१६- मेरठ: इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
१७- औरंगाबाद; चीनमधील आई-वडिलांना भेटणार 53 वर्षांनंतर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव
१९- टी-20 विश्वचषकासाठी आफ्रिदी अँड कंपनी भारतात दाखल
२०- 40 कोटी रुपयांसाठी अनुष्का-विराटचं ब्रेकअप
२१- म्हणून टीम इंडियाच्या विजयानंतर धोनी स्टम्प काढून नेतो
२२- 'मोगली'मध्ये प्रियांका, इरफानचा आवाज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- इसापूर धरणाचे पाणी १४ मार्चला सोडणार
२४- लोह्यात दिवसा घरफोडी, लाखांचा ऐवज लंपास
२५- देगलूर; फर्निचर दुकानास भीषण आग
२६- शालेय पोषण आहार शिजवना-यांना दरवाढीचा दिलासा
२७- किनवट; बनावट जात प्रमाणपत्र काढणाऱ्या चौघांना पोलीस कोठडी
२८- जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज ९ केंद्रावर मतदान
२९- जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्यांना ६० कोटींचा फटका
३०- मुक्रमाबाद; तग्याळ मनरेगा प्रकरणी तत्कालीन तहसीलदारांसह १३ जणांवर गुन्हे दाखल
३२- किनवट येथे ८ मे रोजी मातंग समाजाचा सामुहिक मेळावा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गिरीश नारखेडे, जळबाजी बुचले, संतोष देशमुख, साईनाथ कस्तुरे, सागर बियाणी, दिगंबर पोलावार, मंजोष कांबळे, सागर बागडे, शैलेंद्र मोरे, कपिल राठोड,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
========================================
काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांकडून RSS ची ISISशी तुलना
नवी दिल्ली : काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची तुलना आयसीसशी केली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी आझाद यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे.
काल जमीयत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या बैठकीत आझाद यांनी हे वक्तव्य केलं होतं. दहशतवादाच्या बाबतीत धर्म हा मुद्दा असू शकत नाही. अतिरेकी कारवाया करणारे मुस्लीम आणि संघ एकच असल्याचं वक्तव्य आझाद यांनी कालच्या सभेत केलं होतं.
आझाद हे काँग्रेसचे गुलाम, भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांची टीका
या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेवर टीकेची झोड उठवली आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात संघाने नेहमी देशसेवेचं काम केलं आहे. त्यामुळे आझादांचं वक्तव्य हे काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी दाखवणारं असल्याची टीका भाजपने केली आहे. मध्यप्रदेशातील भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनीही आझाद हे काँग्रेसचे गुलाम असल्याची टीका केली आहे.
मीडिया मला टार्गेट करतंय, विजय मल्ल्यांची टिवटिव
नवी दिल्ली : देशातील 17 बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या उद्योगपती विजय मल्ल्यानी आता ट्विटरवरुन टिवटिव करायला सुरुवात केली आहे. “प्रसारमाध्यमं मला जाणून बुजून टार्गेट करत आहे”, असा आरोप मल्ल्यांनी केला आहे.
Vijay Mallya
@TheVijayMallya
Member of Parliament, India, Chairman, The UB Group Co-owner & Team Principal Sahara Force India Formula 1
साध्वी प्राचींवर प्रेम करतो, मात्र कुणी याला ‘लव्ह जिहाद’ बोलू नये: आझम खान
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री आझम खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. याच आझम खान यांनी आग्र्यातील एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांच्यावरील प्रश्नाला वादग्रस्त उत्तर दिलं. “साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो, मात्र कुणी याला लव्ह जिहादचं नाव देऊ नये.”, असे आझम खान एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
आझम खान म्हणाले, “मी तर साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो. मात्र, कुणीही याला लव्ह जिहादचं नाव देऊ नये. मी तर हेही म्हणतोय की, जेवढे हे कुमार-कुमारी आहेत, त्यांचं लग्न करुन द्यावं, तेव्हाच या लोकांचं नैराश्य कमी होऊ शकतं.”“साध्वी प्राची यांच्याबद्दल अशाप्रकारे विधान करणारे आझम खान विकृत असून त्यांच्या आई-मुलीबातही ते असेच विचार करु शकतात”, अशा शब्दात भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी आझम खान यांचा समाचार घेतला आहे.
मोहित कंबोज यांचं ऑफिस फोडलं, राज ठाकरेंना धमकी दिल्यानं मनसे आक्रमक
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मालाडच्या ऑफिसवर मनसेच्या कार्यकर्तांनी दगडफेक केली. उत्तर भारतीयांचं मुंबईमध्ये तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु, असं खुलेआम पत्र लिहून कंबोज यांनी राज ठाकरेंना धमकी दिली होती.
मोहित कंबोज हे मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष आहेत.
शिवाय, तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात मोहित कंबोज यांनी म्हंटलं होतं..
मनोज कंबोज यांनी धमकीचं हे पत्र फेसबुकवरही टाकलं आहे. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक होत कंबोज यांच्या ऑफिसवर दगडफेक केली आणि ऑफिस फोडलं.
टी20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात टीम इंडियाचा पराभव
फोटो : एपी
मुंबई : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक सामन्याच्या तोंडावर टीम इंडियाला पराभवाला सामोरं जाण्याची वेळ आली. या विश्वचषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेकडून तीन धावांनी निसटती हार स्वीकारली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची तीन बाद 48 अशी घसरगुंडी उडाली होती. पण शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी चौथ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी भारतीय डावाला आकार दिला.
त्याच वेळी त्या दोघांनाही निवृत्त करण्याचा धाडसी निर्णय भारतीय संघव्यवस्थापनानं घेतला. त्या वेळी चार षटकांत विजयासाठी 55 धावांचं आव्हान स्वीकारून धोनी आणि युवराज मैदानात उतरले. त्यांनी दक्षिण आफ्रिकी फलंदाजांना हल्ला चढवून चार षटकांत 52 धावा वसूल केल्या. पण भारताला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले.
टी-20 विश्वचषकासाठी आफ्रिदी अँड कंपनी भारतात दाखल
कोलकाता : शाहिद आफ्रिदीचा पाकिस्तान संघ ना ना करता करता, अखेर भारत दौऱ्यावर आज दाखल झाला. भारतातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात खेळण्यासाठी पाकिस्तान संघाचं काल रात्री पावणेआठच्या सुमारास कोलकात्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं.
19 मार्चला कोलकात्यात भारत-पाक लढत
शाहिद आफ्रिदी आणि त्याच्या शिलेदारांचं कोलकात्याच्या क्रिकेटरसिकांनी जल्लोषात स्वागत केलं. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानचा सलामीचा सामना 16 मार्चला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. पण सुधारित कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तान संघांमधला चुरशीचा सामनाही आता धरमशालाऐवजी 19 मार्चला कोलकात्यातच खेळवण्यात येईल.
पाकिस्तानच्या धरमशालामध्ये खेळण्याला शहीद जवानांच्या कुटंबियांकडून झालेल्या विरोधानंतर हिमाचल प्रदेश राज्य सरकारनंही या सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विनंतीनुसार भारत-पाकिस्तान सामना कोलकात्यात हलवण्यात आला.
कारसमोर यूटर्न घेतल्याचा राग, धनदांडग्याचा हवेत गोळीबार
विरार : यू टर्न घेतल्याच्या रागातून एका धनदांडग्याने हवेत गोळीबार केल्याची खळबळजनक घटना विरारमध्ये घडली आहे. आदित्य मानिकताला असं या धनदांडग्याचं नाव असून तो प्रसिद्ध कुमार मेटल्स कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे.
तक्रारदार जयेश कुडु यांनी आपल्या आय-टेन गाडीतून मुंबई-अहमदाबाद मार्गावरील शिरासाड फाटा इथं यु टर्न घेतला. यावेळी त्यांच्या पाठीमागे जग्वारमध्ये असलेल्या आदित्यला आपल्या गाडीसमोर यू टर्न घेतल्याचा राग आला. या रागातून त्याने गाडीखाली उतरुन बंदुकीचे तीन राऊंड हवेत फायर केले. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ पसरली होती.
दरम्यान, आदित्य मानिकतालासोबत त्याचा ड्रायव्हर मनोजकुमार मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र दोघांनाही अटक न केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पंतप्रधानांचा चमचा म्हटलंत तरी चालेल : अनुपम खेर
नवी दिल्ली : तुम्ही मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चमचा (खुषमस्करा) म्हटलंत तरी चालेल, मला काही फरक पडत नाही, असं विधान ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केलं आहे. उलट भारतासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या मोदींचा उदोउदो लहान मुलं का करत नाहीत, असं आश्चर्य त्यांनी व्यक्त केलं आहे.
‘आम्ही बालपणी लाल बहादूर शास्त्री यांचे गोडवे शाळांमध्ये गायचो, मग आताची मुलं पंतप्रधान मोदींचा जयघोष का करु शकत नाहीत,’ असा सवालही अनुपम खेर यांनी विचारला आहे. ‘आपले पंतप्रधान देशासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. जगात त्यांनी देशाची प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न केले आहेत, मात्र विरोधकांना प्रत्येक गोष्टीत त्यांच्या चुकाच दिसतात,’ असं ‘इंडिया टीव्ही’वरील ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात ते म्हणाले.
मोदी सतत देशाबाबत विचार करत असतात. यापूर्वी कुठल्याच पंतप्रधानाने लाल किल्ल्यावर महिला स्वच्छतागृहांचा विषय मांडला नाही, असं खेर यांनी अधोरेखित केलं. एखाद्याची बालदी म्हणून हिणवलं जाण्यापेक्षा मोदींचा चमचा म्हणवून घ्यायला मला आवडेल, असं अनुपम खेर म्हणतात.
विरोधक मला कमी लेखण्यासाठी चमचा म्हणतात, मात्र मला त्यात कुठलाच कमीपणा वाटत नाही, असा पवित्रा खेर यांनी घेतला आहे. मी मोदीच काय, अमिताभ बच्चन, दिलीप कुमार यांचाही चमचा आहे, असं खेर आनंदाने सांगतात.
40 कोटी रुपयांसाठी अनुष्का-विराटचं ब्रेकअप
नवी दिल्ली : टी 20 विश्वचषकासाठी विराट कोहली जोरदार मेहनत घेत असतानाच विराटच्या अनुष्कासोबत झालेल्या ब्रेकअपच्या चर्चाही चवीने चघळल्या जात आहेत. त्यातच 40 कोटी रुपयांसाठी विराट-अनुष्कामध्ये दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
विराटने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलं, मात्र करियरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुष्काने विराटला नकार दिल्याचं वृत्त होतं. मात्र एका हिंदी वृत्तपत्राने दोघांच्या ब्रेकअप आणखी एक कारण असल्याचा दावा केला आहे.
संबंधित वृत्तपत्राला अनुष्काच्या जवळच्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार अनुष्काची मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात विराटने 40 कोटी रुपये गुंतवले होते. रणबीर कपूर आणि करण जोहरसारखी मोठी नावं असल्यामुळे चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र 120 कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा बुडला. आणि केवळ 24 कोटींची कमाई केली.
प्रेमात पैसा आड आला, दोघांमध्ये ताणतणाव सुरु झाले, आणि ते वेगळे झाले, असं म्हटलं जात आहे. विराट आणि अनुष्काच्या नात्याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही.
म्हणून टीम इंडियाच्या विजयानंतर धोनी स्टम्प काढून नेतो
मुंबई : टीम इंडियाच्या प्रत्येक विजयानंतर कॅप्टन कूल धोनी स्टम्प काढून नेताना प्रत्येक क्रिकेट चाहत्याने पाहिलं असेल. मात्र धोनीला ही सवय का लागली, याचं कारण तुम्हाला माहित आहे का? धोनीच्या बालपणात या गोष्टीचं गुपित दडलं आहे.
‘माझ्या पोस्ट रिटायरमेंट प्लानसाठी मी या स्टम्प काढून नेतो. मी स्टम्प्स घरी घेऊन जातो. पुढे जेव्हा मी एखादी स्टम्प पाहीन, तेव्हा ही स्टम्प त्या मॅचमधली होती, हे माझ्या लक्षात येईल.’ असं धोनी सांगतो.
धोनी जरी हे कारण पुढे करत असला, तरी त्यामागे आणखी एक गुपित असल्याचं म्हटलं जातं. याला कारणीभूत आहे माहीचा बालमित्र कुलबिंदर. एका नेपाळी वॉचमनचा मुलगा कुलबिंदर हा धोनीचा शालेय वयातला बेस्ट फ्रेण्ड. त्याने धोनीचे गुण हेरले आणि क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
रांचीचा धोनी आज जगभरात सुप्रसिद्ध झाला. मात्र कृष्ण सुदाम्याला विसरला नाही, तसाच धोनी कुलबिंदरला विसरला नसल्याचं म्हटलं जातं.
कुलबिंदरने आता स्वतःचं एक छोटंसं घर बांधलं आहे. मात्र धोनीच्या या बालमित्राच्या घराभोवती कुंपणच नाही. असं असूनही आपल्या श्रीमंत मित्राकडे त्याने एक दमडीही मागितली नाही.
माणदेशी माणसे आत्महत्या करत नाहीत : शरद पवार
मुंबई : माणदेश हा अनादी काळापासून दुष्काळी भाग आहे, पण तिथली माणसं दुष्काळाला कंटाळून आत्महत्या करत नाहीत. बुद्धिमत्ता व कौशल्याच्या जोरावर या माणदेशींनी जगभरात आपले स्थान निर्माण केले आहे, असे उद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी काढले.
यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अर्थतज्ज्ञ, पद्मविभूषण डॉ. विजय केळकर यांना शरद पवार यांच्या हस्ते यंदाच्या यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन डॉ. केळकर यांना गौरवण्यात आले.
डॉ. केळकर हे माणदेशी असल्याचा दाखला देत पवार म्हणाले की, आज माणदेशी माणूस काठमांडूपासून केरळपर्यंत प्रत्येक शहरात स्वत:चा ठसा उमटवत आहे. सोने आणि चांदी कारागिर क्षेत्रात माणदेशी माणसांचा हात कुणीही धरू शकत नाही. कायम दुष्काळी भागातील माणसांनी कौशल्याने परिस्थितीवर मात केल्याचे सांगत पवार यांनी माणदेशी माणसे खूप कर्तबगार आहेत, असे कौतुकोद्गार काढले.
========================================
RSS प्रमाणेच 'इसिस'लाही आमचा विरोध- आझाद
जमियत उलेमा- ए- हिंद या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेत बोलताना कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले आझाद म्हणाले, ‘काही मुस्लिम देशांमध्ये अराजकता पसरविण्यात मुस्लिमही सहभागी आहेत. मात्र त्यांना तसे करण्यास भाग पडण्यामागे काही कारणे आहेत. ते अशा घटनांमध्ये का सहभागी होत आहेत, याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही संघाला जसा विरोध करतो, तसाच इसिससारख्या संघटनांनाही विरोध करतो. आम्हा मुस्लिमांमधील काही जण चुकीच्या गोष्टी करत असतील, तर ते कोणत्याही प्रकारे संघापेक्षा कमी नाहीत.‘‘
हिंदू, मुस्लिम अथवा शीख धर्मातील सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढा देण्याचे आवाहन आझाद यांनी या वेळी केले. भारत हा सर्व धर्मांसाठी आहे. जातीयवादी लोक दोन माणसांमध्ये अंतर निर्माण करतात, त्यामुळे ते देश आणि जगासाठी घातक आहेत, असेही आझाद या वेळी म्हणाले. दादरीप्रकरणी बाजू लावून धरल्याप्रकरणी त्यांनी पत्रकारांचे आणि लेखकांचे कौतुक केले.
========================================हिंदू, मुस्लिम अथवा शीख धर्मातील सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढा देण्याचे आवाहन आझाद यांनी या वेळी केले. भारत हा सर्व धर्मांसाठी आहे. जातीयवादी लोक दोन माणसांमध्ये अंतर निर्माण करतात, त्यामुळे ते देश आणि जगासाठी घातक आहेत, असेही आझाद या वेळी म्हणाले. दादरीप्रकरणी बाजू लावून धरल्याप्रकरणी त्यांनी पत्रकारांचे आणि लेखकांचे कौतुक केले.
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी 100 कोटींचा निधी
हैदराबाद - तेलंगण राज्य सरकार यावर्षीच्या राज्य अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समुदायावरील कल्याणकारी योजनांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करणार असल्याचे वृत्त आज (रविवार) सूत्रांनी दिले.
ब्राह्मणांच्या कल्याणासाठी राज्य सरकार अधिकाधिक सकारात्मक पाऊले उचलणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून दिले होते. राजधानी हैदराबाद येथे ब्राह्मण भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राव यांच्यातर्फे याआधीच करण्यात आली आहे. ब्राह्मण समुदायाने राव यांना नुकत्याच झालेल्या ग्रेटर हैदराबादच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भरभरुन मतदान केले होते.
याबरोबरच, शेजारील आंध्र प्रदेश सरकारनेही ब्राह्मण प्राधिकरणाची स्थापना केली असून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये ब्राह्मण समुदायासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारच्या या योजनांचे ब्राह्मण समुदायातर्फे स्वागत करण्यात आले आहे.
========================================
मेरठ: इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
मेरठ - उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरठ जिल्ह्यातील कुडी गावात ही दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने ही इमारत कोसळली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर, दोघे जण जखमी आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.
========================================टोलमुक्तीचे ‘बिल’ आठशे कोटींवर
मुंबई - जनआंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य सरकारने मोजक्या नाक्यांवर टोलमुक्तीचा निर्णय घेतला, पण नुकसान व भरपाईपोटी ७९८ कोटी रुपये कंत्राटदार कंपन्यांना द्यावे लागणार आहेत.
टोलमुक्तीच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने ३१ मे २०१५ पासून राज्यातील १२ टोलनाके बंद केले, तर एसटी बस व स्कूल बसना ५३ नाक्यांवर टोलमधून सूट देण्यात आली. त्यापोटी कंत्राटदारांना ७९८ कोटी रुपये सरकारकडून द्यावे लागतील, अशी माहिती ‘आरटीआय’द्वारे समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वर्षभरात बंद केलेले टोलनाके व सूट दिलेल्या वाहनांची माहिती विचारली होती. त्याला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ३८ पैकी ११ टोलनाके बंद केल्यामुळे २२६ कोटी ५१ लाख परताव्यापोटी कंत्राटदाराला देणे बाकी असल्याचे म्हटले आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाकडील ५३ पैकी एक टोलनाका बंद करण्यात आल्याने १६८ कोटींचा परतावा द्यायचा आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५३ टोलनाक्यांवर बस, स्कूल बस, कार व जीप यांना सूट दिल्यामुळे कंत्राटदाराला ४०३ कोटी ९३ लाखांची भरपाई २०१५-१६ मध्ये द्यावी लागेल, असे उत्तर दिले गेले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० एप्रिल २०१५ मध्ये विधानसभेत टोलमुक्तीची घोषणा केली होती. त्यानंतर ३१ मे २०१५ पासून निर्णयाची अंमलबजावणी झाली. त्याच पद्धतीने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबईतील पाच टोलनाक्यांबाबत निर्णय घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली, पण ते निवृत्त झाल्यानंतर तो अहवालदेखील रेंगाळला.
========================================रिक्षा आंदोलनाबाबत मनसेचे घूमजाव
मुंबई - कायदा हातात घेतल्यास होणाऱ्या कडक कारवाईची भीती आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी दाखवलेला अनुत्साह यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमराठी भाषकांच्या रिक्षांविरोधातील आंदोलन स्थगित केल्याची चर्चा आहे.
दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ललकारी देत पुन्हा एकदा हिंसाचाराची कास धरण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी तूर्तास मागे ठेवल्याने त्यांच्या घूमजाव प्रकरणात भर पडली आहे. आपण निवडणूक लढवणार या घोषणेपासून घेतलेली माघार, टोल आंदोलनाला प्रतीकात्मक प्रारंभ करून ते आटोपते घेण्याच्या मालिकेत आणखी एक भर पडली असल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. या माघारीमागचे कारण सरकार पातळीवरून केलेले दूरध्वनी, तसेच ऑटोनिर्मितीतील ज्येष्ठ उद्योजकाने पाठवलेला निरोप असल्याचीही चर्चा केली जाते आहे.
राज ठाकरे यांच्या शब्दाखातर रस्त्यावर येणाऱ्या कार्यकर्त्यांवर सध्या गुन्हे नोंदविले गेले आहेत. सरकारदरबारी कोणतीही पदे नसताना या आरोपांसंबंधीची लढाई लढणे आज संघटनेसाठी कठीण झाले आहे. न्यायालयात जामीन मागण्यासाठी जाणेही सध्या कठीण झाले असल्याने नव्या आंदोलनासाठी तयारी करणे कठीण असल्याचा संघटनेतला सूर होता. राज ठाकरेच सर्वेसर्वा असलेल्या पक्षात असा निरोप देणे शक्य नसले, तरी पक्षातील अस्वस्थता पुरेशी बोलकी होती. त्यातच महापालिका निवडणुकीची तयारी हा सध्या महत्त्वाचा मुद्दा असल्याने नगरसेवकही या विषयावर काहीसे मूक होते असे समजते. महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र सादर करणाऱ्या राज ठाकरे यांनी केवळ मराठी मतांवर डोळा ठेवून जाळपोळ करण्याचा घाट घातल्याबद्दल सर्व स्तरांतून व्यक्त होणारी नाराजीही निर्णय बदलामागचे कारण असल्याचे बोलले जाते. अधिवेशन सुरू असताना कायदा हातात घेतला गेला तर कडक कलम लावण्याच्या हालचाली सुरू झाल्यानेही मनसेने माघार घेण्यास प्रारंभ केल्याचे मानले जाते. या संदर्भात राज्यातील सर्वोच्च नेतृत्वाने मनसे अध्यक्षांना निरोप पाठवला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र, या संदर्भात कोणताही दुजोरा मिळू शकला नाही. राज ठाकरे यांनी नव्या रिक्षा रस्त्यावर आल्या नसल्याने सध्याच आंदोलन सुरू केले जाणार नाही असे नमूद केले आहे. संसद आणि विधिमंडळ अधिवेशन सुरू असल्याने कडक कारवाईची शक्यता होती. हे आंदोलन काही काळाने सुरू झाले तर त्याचा निवडणुकीसाठी योग्य उपयोग होईल अशी माहिती एका मुंबईकर नेत्याने दिली; मात्र अयोग्य ठरणारे निर्णय घोषित करून त्यापासून माघार घेण्याची राज यांची पद्धत लक्षात घेता हे आंदोलन कधीच होणार नाही, असा अंदाज सेनेतून व्यक्त केला जातो आहे.
========================================चीनमधील आई-वडिलांना भेटणार 53 वर्षांनंतर
प्रोमिला दास यांची 1962 च्या युद्धात झाली होती ताटातूट
औरंगाबाद - चीनबरोबर झालेल्या 1962 च्या युद्धप्रसंगात चिनी मूळ असलेल्या चहा मळ्यातील अनेक मजुरांना मायदेशात पाठविण्यात आले. यामुळे अनेकांचे संबंध कायमचे तुटले; पण आसाममध्ये सोडून गेलेल्या आपल्या मुलीचा शोध चीनवासी झालेल्या खोखोई लियोंग यांना तब्बल 30 वर्षांनी लागला.
प्रोमिला दास (चिनी नाव लिंची लियोंग) या 1962 मध्ये अवघ्या सहा वर्षांच्या होत्या. आई-वडिलांचा शोध लागल्यानंतर त्या कुटुंबासह चीनच्या युनान प्रांतातील गुआंग झी येथे रविवारी (ता. 13) तब्बल 53 वर्षांनंतर भेटायला जाणार आहेत. आसाममध्ये चहाची शेती करण्यासाठी ब्रिटिशांनी 1838 नंतर अनेक चिनी नागरिकांना भारतात आणले होते. स्वातंत्र्योत्तर काळातही हे लोक भारतातच होते. अनेकांनी आसाम आणि परिसरातील राज्यांमधील आदिवासी मुलींशी लग्न करून आपला संसार थाटला होता. खोखोई लियोंग हे त्यांतील एक. मिझो जमातीच्या मुलीशी लग्न करून त्यांनी येथेच राहणे पसंत केले. 1962 मध्ये भारत- चीनदम्यानच्या युद्धात चिनी वंशाच्या लोकांना सरकारने मायदेशी पाठविले होते. त्या वेळी मामाच्या गावाला असलेल्या सहा वर्षांच्या प्रोमिलाला तिनसुखिया जिल्ह्यातील केईहुंग येथे सोडून खोखोई लियोंग यांना आपल्या दोन मुली व पत्नीसह चीनला जावे लागले.
चीनला पोचल्यानंतर खोखोई लियोंग यांनी आपल्या मुलीला आसामी भाषेत तब्बल तीस वर्षे अनेक पत्रे लिहिली. यातील एक पत्र प्रोमिला दास यांना 1992 मध्ये मिळाले. त्याआधारे चीनमधील आई-वडिलांना आसाममध्ये असलेल्या प्रोमिला यांचा शोध लागला.
========================================'मोगली'मध्ये प्रियांका, इरफानचा आवाज
दूरदर्शनवरून सादर झालेल्या ‘मोगली’ मालिकेतील ‘जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहेनके फूल खिला है फूल खिला है’ हे गीत लहान मुले आणि मोठ्यांमध्येही खूप लोकप्रिय झाले होते. जंगलामध्ये प्राण्यांबरोबर राहणारा हा ‘मोगली’ मुलांचा ‘हिरो’ झाला होता. ‘द जंगल बुक’ हा चित्रपट 8 एप्रिलला प्रदर्शित होत असून, भारतीय वंशाचा अमेरिकन नागरिक नील सेठी मोगलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दूरदर्शनवरील ‘मोगली’ या मालिकेतील ‘शेर खान’ या पात्राला नाना पाटेकर यांनी आवाज दिला होता. आता पुन्हा एकदा नाना ‘शेर खान’साठी (वाघ) आवाज देणार असून, ओम पुरी हे मोगलीचा जीवलग मित्र ‘बगिरा’ (चित्ता) या पात्राला आवाज देतील. प्रियांका चोप्रा ही ‘का’ (अजगर) या पात्राला तर इरफान खान ‘बल्लू’ (अस्वल) या पात्राला आवाज देणार आहे. अभिनेत्री शेफाली ही ‘रक्षा’ (लांडगा) या पात्राला आवाज देईल. बिल मुरे, बेन किंग्सले, इदरिस एल्बा, ल्युपिटा न्योंगओ, स्कार्लेट जॉन्सन, क्रिस्तोफर वॉकेन आणि जियानकार्लो स्पोसितो यांनी इंग्रजीतील ‘द जंगल बुक’ला आवाज दिले आहेत.
================================================================================

No comments:
Post a Comment