[अंतरराष्ट्रीय]
१- ढाका; एक 'स्पेलिंग मिस्टेक' आणि 67,01,50,00,000 रुपयांची चोरी टळली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- मल्ल्यांबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे-केजरीवाल
३- उपद्रवी लोकांवर सरकारने नियंत्रण ठेवावे-संघ
४- कन्हैयासह तिघांना जीवे मारण्याचे पोस्टर्स
५- आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहणार: मोदी
६- ‘सत्यमेव जयते’ वादात, आमीरच्या अडचणीत वाढ
७- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद
८- प्रशांत किशोर करणार कॉंग्रेसचा कायापालट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- - मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, मुख्यमंत्र्यांचे संकेत
१०- मनसे 10 मनपा निवडणुका लढवणार
११- मी नरमलो नाही, रिक्षा आंदोलन तात्पुरतं स्थगित - राज ठाकरे
१२- बांधकामे अधिकृत करण्यासाठी बिल्डरांशी डील:राज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- बुलढाणा; पित्याचा कुटुंबातील चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलीचा मृत्यू
१४- आश्रमशाळा बलात्कार प्रकरण: दोषी करंजुलेला फाशीऐवजी 10 वर्षांचा तुरुंगवास
१५- लोकलखाली उडी मारुनही तो जिवंत
१६- बिहार; लग्नास नकार देऊन मद्यपी नवरदेवाच्या थोबाडीत
१७- पुणे; प्रवीण भेटणार इंग्लंडच्या राणीला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- हिमायतनगर; एकघरी आश्रम शाळेच्या जेवणात आढळल्या अळ्या
२०- यीनुसेफच्या पथकाने केली मरडगा येथील शोषखड्ड्यांची पाहणी
२१- मांडवी; बलात्कार प्रकरणी फिरस्त्या कापड विक्रेत्यास अटक
२२- मुदखेड; अवैद्य रेतीचे ७९ साठे जप्त
२३- शिवसेना महिला आघाडीच्या पुत्रावर प्राणघातक हल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संदीप पाटील, दऊ माने, वसंत ताटे, वंदन शिंदे, शिवा कामीनवार, सचिन मुंडे, अशो खान, वाषु देव, मनोज इंगोले, वेंकट पवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================

===========================================

===========================================


===========================================

===========================================

===========================================

===========================================
===========================================
===========================================
आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहणार: मोदी
बांधकामे अधिकृत करण्यासाठी बिल्डरांशी डील:राज
नाशिक - अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा सरकारने निर्णय घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांना सरकारने पाठिंबा दिल्याचे मी म्हणू शकतो. या निर्णयाने सरकारने बांधकाम व्यावसायिकांसोबत व्यवहार (डील) केला असून, हा विषय माध्यमांकडून उठविला जात नाही, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मल्ल्यांबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे-केजरीवाल
उपद्रवी लोकांवर सरकारने नियंत्रण ठेवावे-संघ
रा. स्व. संघाचा केंद्र आणि राज्यांना सल्ला; तीन दिवसीय शिबिराला सुरवात
नागौर (राजस्थान) - उपद्रवी घटकांनी फार पूर्वीपासून देशातील विद्यापीठांना आपले कार्यक्षेत्र बनविले असून, सरकारने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांबद्दल निषेध व्यक्त करत संघाचे आज तीन दिवसीय विचारमंथन शिबिर सुरू झाले.
कन्हैयासह तिघांना जीवे मारण्याचे पोस्टर्स
प्रशांत किशोर करणार कॉंग्रेसचा कायापालट
उत्तर प्रदेश निवडणुकीची सूत्रे प्रियांका वद्रा यांच्याकडे?
लखनौ - उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा कायापालट करण्याचे काम राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी सुरू केले आहे. त्यानुसार, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील; तर प्रियांका वद्रा यांच्याकडे प्रचाराची सूत्रे दिली जातील, असे कळते. राज्यात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
लग्नास नकार देऊन मद्यपी नवरदेवाच्या थोबाडीत
बिहारमधील प्रकार; संतप्त नवरीने थोबाडीतही लगावली
पाटणा - मद्यपी नवरदेवाशी लग्न करण्यास वधूने नकार देत त्याला भरमंडपातून परत पाठविल्याची घटना मधुबनी जिल्ह्यात नवाटोली गावात नुकतीच घडली. वधूच्या रुद्रावतारामुळे नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या शेकडो नागरिकांना अक्षता न टाकताच रिकाम्या हाताने परतावे लागले.
प्रवीण भेटणार इंग्लंडच्या राणीला
सामाजिक कार्यामुळे तेविसाव्या वर्षी संधी
===========================================
१- ढाका; एक 'स्पेलिंग मिस्टेक' आणि 67,01,50,00,000 रुपयांची चोरी टळली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- मल्ल्यांबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे-केजरीवाल
३- उपद्रवी लोकांवर सरकारने नियंत्रण ठेवावे-संघ
४- कन्हैयासह तिघांना जीवे मारण्याचे पोस्टर्स
५- आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहणार: मोदी
६- ‘सत्यमेव जयते’ वादात, आमीरच्या अडचणीत वाढ
७- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद
८- प्रशांत किशोर करणार कॉंग्रेसचा कायापालट
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- - मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, मुख्यमंत्र्यांचे संकेत
१०- मनसे 10 मनपा निवडणुका लढवणार
११- मी नरमलो नाही, रिक्षा आंदोलन तात्पुरतं स्थगित - राज ठाकरे
१२- बांधकामे अधिकृत करण्यासाठी बिल्डरांशी डील:राज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- बुलढाणा; पित्याचा कुटुंबातील चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलीचा मृत्यू
१४- आश्रमशाळा बलात्कार प्रकरण: दोषी करंजुलेला फाशीऐवजी 10 वर्षांचा तुरुंगवास
१५- लोकलखाली उडी मारुनही तो जिवंत
१६- बिहार; लग्नास नकार देऊन मद्यपी नवरदेवाच्या थोबाडीत
१७- पुणे; प्रवीण भेटणार इंग्लंडच्या राणीला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- हिमायतनगर; एकघरी आश्रम शाळेच्या जेवणात आढळल्या अळ्या
२०- यीनुसेफच्या पथकाने केली मरडगा येथील शोषखड्ड्यांची पाहणी
२१- मांडवी; बलात्कार प्रकरणी फिरस्त्या कापड विक्रेत्यास अटक
२२- मुदखेड; अवैद्य रेतीचे ७९ साठे जप्त
२३- शिवसेना महिला आघाडीच्या पुत्रावर प्राणघातक हल्ला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
(वेदांत हंबर्डे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संदीप पाटील, दऊ माने, वसंत ताटे, वंदन शिंदे, शिवा कामीनवार, सचिन मुंडे, अशो खान, वाषु देव, मनोज इंगोले, वेंकट पवार,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================
मेट्रो 3 चं कारशेड आरे कॉलनीतच, मुख्यमंत्र्यांचे संकेत
मुंबई: ठाकरे बंधूंच्या विरोधानंतरही तसंच मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्थापलेल्या समितीचा अहवाल नजरेआड करत, मेट्रोचं प्रस्तावित कारशेड आरे कॉलनीतचं होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मेट्रोच्या कारशेड संदर्भातील नवीन अहवालबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माहिती दिली.
कमीत कमी झाडे तोडून मेट्रोचं कारशेड उभारणं शक्य असल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारकडून मेट्रोचं कारशेड उभारण्यासाठी हालचाली सुरू करण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.
आरे कॉलनीत मेट्रोचं कारशेड उभारण्यास शिवसेना आणि मनसेचा विरोध आहे. प्रस्तावित कारशेडमुळे 2 हजार 298 झाडं तोडली जाणार आहेत. त्यामुळे आरेचा हिरव्यागार पट्ट्यावर कुऱ्हाड चालू नये यासाठी सेना-मनसेने विरोध केला होता.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीत मुंबई मेट्रो लाईन-3 मधील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठीच्या प्रस्तावित कार डेपोमुळे होणारी संभाव्य वृक्षतोड रोखण्यासाठी या डेपोची जागा बदलावी, अशी मागणी विविध पर्यावरणप्रेमी संस्थांकडूनही करण्यात आली होती.
मनसे 10 मनपा निवडणुका लढवणार
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहाव्या वर्धापन दिनी रिक्षा आंदोलनाची हाक देऊन, कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग पेटवलेल्या राज ठाकरे यांनी नवी घोषणा केली आहे. आगामी वर्षात येणाऱ्या सर्व 10 महापालिकेच्या निवडणुका मनसे लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली.
तसंच मनसेच्या प्रचारासाठी स्वत: राज्यभर दौरे करणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली.
पित्याचा कुटुंबातील चौघांवर कुऱ्हाडीने हल्ला, मुलीचा मृत्यू
बुलडाणा : पतीने आपल्या पत्नीसह दोन मुली आणि एका मुलावर कुऱ्हाडीने वार केल्याची खळबळजनक घटना बुलडाण्यात घडली आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यातील कासारखेडमधील ही घटना आहे.
समाधान अंभोरे असे या आरोपीचं नाव आहे. तर हल्ल्यात दुर्दैवी अंत झालेल्या मुलीचं वय अवघं 15 वर्षे होतं. या हल्ल्यात पत्नीचं मिना अंभोरे, तर 13 वर्षीय मुलगी अंकिता अंभोरे आणि 10 वर्षीय मुलगा गोपाल अंभोरेही गंभीर जखमी झाले आहेत.
मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. जखमी पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना औरंगाबादच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कुटुंबातील चारही जण झोपेत असताना आरोपी पित्याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. दरम्यान, हल्लेखोर पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
===========================================
‘सत्यमेव जयते’ वादात, आमीरच्या अडचणीत वाढ
मुंबई : आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या अडचणीत वाढ झाली आहे. “जर उद्या सामान्यांनी केवळ अशोक स्तंभाचा वापर करायला सुरुवात केली, तर ते केंद्र सरकारला चालणार आहे का?” असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे. तसेच यावर आपले म्हणणे मांडण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत.
‘सत्यमेव जयते’ हे टायटल आमीर खानच्या सत्यमेव जयते शोकरता वापरण्यात आले आहे. या विरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आमीर खानच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
ममोरंजन राय नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे. यावर महाधिवक्त्यांच्या मार्फत केंद्र सरकारने आपले म्हणणे मांडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
एक 'स्पेलिंग मिस्टेक' आणि 67,01,50,00,000 रुपयांची चोरी टळली
ढाका : स्पेलिंग मिस्टेकमुळे अनेक चुकीचे प्रकार घडल्याचं अनेकांनी पाहिलं आहेत. पण एका स्पेलिंग मिस्टेकमुळे तब्बल 67 अब्ज रुपयांची चोरी टळल्याचं कधी ऐकलं आहे का?
होय हे खरं आहे. चुकीच्या स्पेलिंगमुळे 1 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 67 अब्ज रुपयांच्या ऑनलाईन चोरीचा प्रयत्न फसला.
काय आहे प्रकरण?
बांगलादेशमध्ये मागील महिन्यात ही घटना घडली. बांगलादेशच्या सेंट्रल बँक आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह यांच्यात पैशांचा ऑनलाईन व्यवहार सुरु होता. यावेळी हॅकर्सनी पेमेंट ट्रान्सफरशी संबंधिक क्रेडिन्शियल्स (पासवर्ड) चोरी केले होते.
या पासवर्डच्या मदतीने हॅकर्सनी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला बांगलादेश बँकेच्या खात्यातून फिलिपाईन्स आणि श्रीलंकन बँकांच्या काही खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी डझनभर विनंती केल्या.फेडरल रिझर्व्हने पहिल्या चार रिक्वेस्ट स्वीकारत 10 कोटी डॉलर्स ट्रान्सफर केले होते. फिलिपाईन्समध्ये 8 कोटी 10 लाख डॉलर पाठवण्यात आले. तर श्रीलंकेला दोन कोटी डॉलर पाठवले होते.
पण पाचवी रिक्वेस्टमध्ये श्रीलंकेतील ज्या एनजीओच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवायचे होते, हॅकर्सनी त्याच्या नावाचं स्पेलिंग चुकीचं लिहिलं होती. यानंतर फेडरल रिझर्व्हने ट्रान्सफर करण्याची प्रकिया थांबवली आणि रुटीन चेकिंगअंतर्गत बांगलादेश सेंट्रल बँकेकडून स्पष्टीकरण मागितलं. यानंतर या चोरीचा उलगडा झाला. हॅकर्सनी एनजीओच्या नावात असलेल्या फाऊंडेशनऐवजी चुकीने फंडडेशन लिहिलं होतं.
बांगलादेश बँकेचं म्हणणं आहे की, श्रीलंकेत पाठवलेले 2 कोटी डॉलर्स परत मिळाले आहे, पण फिलिपाईन्समध्ये पाठवलेले आठ कोटी 10 लाख डॉलर्स अजून मिळालेले नाहीत. आता फिलिपाईन्समध्ये अँटी-मनी लॉन्ड्रिंग अथॉरिटीजसोबत उर्वरित रक्कम मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
हॅकर्सनी बँकेतील 8 कोटी डॉलर म्हणजे सुमारे पाच अब्ज रुपयांची चोरी होणं हे इतिहातील सर्वात मोठी घटना आहे. परंतु एका स्पेलिंग मिस्टेकमुळे 67 अब्ज रुपयांची चोरी टळली हे सुदैवच म्हणावं लागेल.
आश्रमशाळा बलात्कार प्रकरण: दोषी करंजुलेला फाशीऐवजी 10 वर्षांचा तुरुंगवास
मुंबई : 19 विद्यार्थिनींवर बलात्कार आणि एका विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या रामचंद्र करंजुले याला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने रामचंद्र करंजुलेची फाशीची शिक्षा रद्द करुन त्याला 10 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच करंजुलेची शिक्षा कमी करताना उच्च न्यायालयाने त्याला हत्येच्या आरोपातूनही मुक्त केलं आहे.
रामचंद्र करंजुले हा पनवेलच्या कळंबोली येथील कल्याणी बालसेवा या आश्रमशाळेचा संस्थापक होता. त्या आश्रमशाळेतील 19 मुलींवर सामूहिक बलात्कार, तर एका मुलीची हत्या केल्याचा आरोप करंजुले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर होता.
सत्र न्यायालयाने 2013 मध्ये रामचंद्र करंजुलेला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात एकूण दहा आरोपी होती. त्यापैकी करंजुलेसह सहा जणांना दोषी ठरवत चौघांची सुटका केली होती. त्यानंतर सर्व दोषींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.या प्रकरणात हायकोर्टाने नानाभाऊ करंजुले, खांडू, कसबे, सोनाली बादाडे आणि पार्वती महाले यांना दोषी ठरवलं आहे. पण आता त्यांची शिक्षा कमी केली आहे. तसचं या गुन्ह्यातील दोन दोषींना प्रत्येकी 10 वर्षांची तर एका महिलेला एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर आणखी एक दोषी प्रकाश काकडेला हायकोर्टाने सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.
रामचंद्र करंजुले निर्दोष असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्याच्या वकिलांनी सांगितलं. करंजुलेची सात वर्षांची शिक्षा पूर्ण झाली असून आता केवळ तीन वर्षांची शिक्षाच शिल्लक आहे.
लोकलखाली उडी मारुनही तो जिवंत
मुंबई : सीएसटी रेल्वे स्थानकावर आत्महत्या करण्यासाठी एका तरूणानं रेल्वे खाली उडी मारली. मात्र नशिब बलवत्तर म्हणून 30 मिनिटानंतरही तरूण जिवंत होता.
बुधवारी सकाळी 8 च्या दरम्यान सीएसटीहून सुटणाऱ्या एका लोकलखाली अचानक एका माथेफिरूनं उडी घेतली. मोटरमनच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा तरूणावरून 3 डबे गेले होते. मोटरमननं लोकल थांबविली. पण आश्चर्य म्हणजे त्यानंतरही तो जिवंत होता.
स्टेशन मास्टर ,जीआरपी आणि आरपीएफच्या अथक प्रयत्नानंतर त्याला डब्यांच्या खालून बाहेर काढण्यात आलं. अर्धा तास लोकल खोळंबल्यानं प्रवाशांना त्रास झाला. तरूणाला जिवंत बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी त्याला चोप दिला.
मी नरमलो नाही, रिक्षा आंदोलन तात्पुरतं स्थगित - राज ठाकरे
- नाशिक, दि. १२ - ' रिक्षा परवान्यांचे आंदोलन मागे घेतलेलं नाही, मात्र कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पत्रक काढून आंदोलन तात्पुरतं स्थगितं केलं आहे' असे सांगत आपण नरमलो नसल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ' रिक्षाला आग लावणे हा काही आमच्या पक्षाचा कार्यक्रम नव्हे तर तो अमराठी, परप्रांतीयांना काम देण्याबद्दल व्यक्त केलेला राग आहे' असे त्यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेऴी त्यांनीराज्यातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर टीका केली.' महाराष्ट्रातील विविध भागांत हजारो मराठी मुलं रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना परप्रांतातून आलेल्यांना रिक्षा परवाने का द्यायचे? त्यांचा ठेका आपण का घ्यायचा, त्यांना पोलिस संरक्षण का द्यायचे? असा सवाल राज यांनी विचारला. राज्यातील मराठी मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, त्यांनाच रोजगाराच्या संधी, रिक्षा परवाने मिळाले पाहिजेत' अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.' नव्या रिक्षा परवान्यांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनास मी स्थगिती दिली असली तरी त्याचा अर्थ मी नरमलो असा होता नाही. केवळ काही राजकीय पक्षांनी किंवा समाजकंटकांनी या आंदोलनाचा फायदा घेऊ नये म्हणून तुर्तास या आंदोलनाला स्थगिती दिली आहे' असे राज यांनी स्पष्ट केले.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद
- रायपूर, दि. १२ - छत्तीसगडच्या कान्केर जिल्ह्यात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे (सीमा सुरक्षा दल) २ जवान शहीद झाले असून ४ जण जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, कन्केर जिल्ह्यातील बेचा गावाजवळील जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच बीएसएफच्या जवान शोधमोहिम सुरू केली असता, नक्षलवाद्यांनी गोळीबार करत हल्ला चढवला. त्यात २ जवान शहीद झाले तर ४ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले.गेल्या महिन्याभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे
आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहणार: मोदी
नवी दिल्ली - सध्या भारताने जगाच्या पाठीवर सर्वाधिक वेगाने व गुंतवणूकीसाठी अनुकूल अर्थव्यवस्थेचा नावलौकिक मिळविला असला, तरीही देशातील आर्थिक सुधारणांचा वेग कायम राहील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि जागतिक नाणेनिधीच्या(आयएमएफ) संयुक्त विद्यमाने नवी दिल्लीत सुरु असलेल्या ‘अॅडव्हान्सिंग एशिया‘ परिषदेतील मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आयएमएफने ऑक्टोबर 2017 पासून कोट्यात बदल करण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. यावेळी ते म्हणाले, "कोट्यात बदलाचा अर्थ एखाद्या देशाला अतिरिक्त आधार देणे असा होत नाही, परंतु हा प्रामाणिक व कायदेशीरतेचा मुद्दा आहे.",
आयएमएफच्या प्रमुख ख्रिस्तीन लॅगार्ड यांनीदेखील परिषदेत सहभागी झाल्या आहेत. चीन व जपानसह भारताचादेखील आयएमएफच्या आघाडीच्या 10 देशांमध्ये समावेश झाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. येत्या दहा वर्षात भारत हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरु शकतो, असे लॅगार्ड म्हणाल्या.
तसेच ठिसूळ जागतिक अर्थव्यवस्थेमुळे उद्धभवलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी आशियाई देशांनी आर्थिक विकासाला चालना देणारी आर्थिक धोरणे राबवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
===========================================बांधकामे अधिकृत करण्यासाठी बिल्डरांशी डील:राज
राज्यातील सर्व शहरांतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या घोषणेनंतर आज राज ठाकरे यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध करत, फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
राज ठाकरे म्हणाले, ‘‘बांधकामे अधिकृत करणे हा उपाय नाही. बांधकाम व्यावसायिकांना सवलती का देण्यात येत आहेत. बांधकाम व्यावसायिकांच्या लॉबी भेटून आल्या, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अनधिकृतचे अधिकृत करणे हे ठरविणार कसे? अशी सवयी लावणे चुकीचे आहे. बांधकाम व्यावसायिकांवर कोणतीही कारवाई न करता बांधकामे अधिकृत कशी करता येतील.‘‘
===========================================मल्ल्यांबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे-केजरीवाल
बँकांचे कर्ज बुडवूनही उद्योगपती विजय मल्ल्या यांना देशाबाहेर जाऊच कसे दिले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
विजय मल्ल्या यांनी बँकांचे 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. त्यांची चौकशी होत असताना त्यांनी देशाबाहेर पळ काढला आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजाविले आहे. त्यांना 18 मार्चपूर्वी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश आहेत. मल्ल्या देशाबाहेर पळाल्याने सीबीआय व केंद्र सरकारवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. आता केजरीवाल यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत.
केजरीवाल म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करत असलेले सीबीआय हे पंतप्रधानांना अहवाल पाठवत असते. त्यामुळे मल्ल्यांना देशाबाहेर पळवून लावण्याबाबत पंतप्रधानांनीच सीबीआयला परवानगी दिली असणार. मल्ल्या देशाबाहेर कसे गेले, याचे उत्तर पंतप्रधानांनी दिलेच पाहिजे.
===========================================उपद्रवी लोकांवर सरकारने नियंत्रण ठेवावे-संघ
रा. स्व. संघाचा केंद्र आणि राज्यांना सल्ला; तीन दिवसीय शिबिराला सुरवात
नागौर (राजस्थान) - उपद्रवी घटकांनी फार पूर्वीपासून देशातील विद्यापीठांना आपले कार्यक्षेत्र बनविले असून, सरकारने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज व्यक्त केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांबद्दल निषेध व्यक्त करत संघाचे आज तीन दिवसीय विचारमंथन शिबिर सुरू झाले.
रा. स्व. संघातील निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आज अत्यंत कडक सुरक्षेत सुरवात झाली. या वेळी संघाने वार्षिक अहवालही प्रसिद्ध केला. या अहवालात देशात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या हिंसक घटनांबद्दल काळजी व्यक्त करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी उपद्रवी घटकांना खूश ठेवण्याचे धोरण सोडून त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. "केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी शक्तींशी कठोरपणे व्यवहार करून सांस्कृतिक वातावरण निर्मळ ठेवावे, अशी आमची अपेक्षा आहे. यासाठी शैक्षणिक केंद्रे राजकारणाचे अड्डे बनता कामा नये. सरकारने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत विश्वास निर्माण करावा,‘ असे संघाने अहवालात म्हटले आहे.
===========================================कन्हैयासह तिघांना जीवे मारण्याचे पोस्टर्स
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले कन्हैया कुमार, उमर खालीद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पोस्टर्स दिल्लीत झळकले आहेत.
कन्हैया कुमारला गोळ्या घालणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे पोस्टर्स दिल्लीत नुकतेच झळकले होते. आता त्यानंतर शुक्रवारी रात्री कन्हैयासह तिघांना जीवे मारण्याची पोस्टर्स लागली आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता असलेल्या कन्हैयासह दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कन्हैयाला 6 महिन्यांचा अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
शुक्रवारी जंतर मंतर येथे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पोस्टर्स वाटण्यात आली. त्यानंतर सोशल मिडीयावर ती व्हायरल झाली. पोलिसांनी या पोस्टर्सबाबत चौकशी केली असता त्यांना अशी पोस्टर्स तेथे सापडली नाहीत. जेएनयूतील देशद्रोह्यांना गोळ्या घालणे हा राष्ट्रधर्म आहे, मी कन्हैया, उमर आणि अनिर्बान यांना गोळ्या घालणार असे पोस्टर्सवर लिहिले आहे. या पोस्टर्सवर बलवीर सिंग यांचे नाव असून, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत.
===========================================प्रशांत किशोर करणार कॉंग्रेसचा कायापालट
उत्तर प्रदेश निवडणुकीची सूत्रे प्रियांका वद्रा यांच्याकडे?
लखनौ - उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा कायापालट करण्याचे काम राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर यांनी सुरू केले आहे. त्यानुसार, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील; तर प्रियांका वद्रा यांच्याकडे प्रचाराची सूत्रे दिली जातील, असे कळते. राज्यात पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.
उत्तर भारतातील राजकीयदृष्ट्या सर्वांत महत्त्वाचे राज्य म्हणून ओळख असलेल्या उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना धोरणे आखून देणाऱ्या प्रशांत किशोर यांचे नाव बिहार निवडणुकीपासून प्रसिद्धीच्या झोतात आले. आता ते कॉंग्रेसचा कायापालट करण्याच्या तयारीत आहेत. चार दशके उत्तर प्रदेशावर सत्ता गाजविल्यानंतर गेली 27 वर्षे या राज्यात कॉंग्रेसची स्थिती बिकट आहे. ती सुधारण्याचे आव्हान प्रशांत किशोर यांना पेलावे लागणार आहे.
===========================================लग्नास नकार देऊन मद्यपी नवरदेवाच्या थोबाडीत
बिहारमधील प्रकार; संतप्त नवरीने थोबाडीतही लगावली
पाटणा - मद्यपी नवरदेवाशी लग्न करण्यास वधूने नकार देत त्याला भरमंडपातून परत पाठविल्याची घटना मधुबनी जिल्ह्यात नवाटोली गावात नुकतीच घडली. वधूच्या रुद्रावतारामुळे नवदांपत्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या शेकडो नागरिकांना अक्षता न टाकताच रिकाम्या हाताने परतावे लागले.
मंडपात वऱ्हाडी मंडळी जमली होती. वधू-वरही लग्नाच्या बोहल्यावर चढले होते. मात्र वराच्या तोंडातून दारूचा वास येऊ लागला. वधूलाही तो आला, त्यामुळे चिडलेल्या वधूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मी दारूड्या वराशी लग्न करणार नाही, असे शेकडो वऱ्हाडीसमोर ठणकावून सांगितले. त्याचवेळी तिने वराच्या थोबाडीतही लगावली, त्यामुळे वऱ्हाडी लोकांना अक्षता न टाकताच माघारी परतावे लागले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. असे सांगितले जाते की लग्नाचे विधी होईपर्यंत वातावरण शांत होते; परंतु मंडपात नवरदेव येऊन बसला आणि तेथेपासूनच घोळ सुरू झाला. त्याने उपस्थित महिलांसमवेत चाळे सुरू केले. हे पाहून वधू नाराज झाली आणि तिने नवरदेवाच्या थोबाडीत मारली. नवरदेवाने आपल्या मित्राबरोबर दारू घेतली होती. नवरदेव हा दहावीपर्यंत शिकलेला होता. वधूचे पिता नेती कामत यांनी सांगितले, की नवरदेवाचा व्यवहार पाहून आपल्या मुलीने त्याचासमवेत लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाला दारू एवढी चढली होती, की त्याने काही लोकांबरोबरही गैरवर्तन केले. कामत यांनी आपल्या मुलीने घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त करत अभिमान असल्याचे सांगितले.
===========================================प्रवीण भेटणार इंग्लंडच्या राणीला
पुणे - एक मध्यमवर्गीय कुटुंबातील युवक समाजासाठी काम करता यावे म्हणून स्वतःची सामाजिक संस्था सुरू करतो. त्याच्या या कामामुळे त्याला उच्चपदावर जाऊन काम करण्याची संधी मिळते आणि एके दिवशी थेट इंग्लंडच्या राणीलाच भेटण्याचा योग येतो. हा थक्क करणारा प्रवास आहे पुण्यातीलच एका युवकाचा!
प्रवीण निकम (वय २३) असे त्याचे नाव. ‘कॉमनवेल्थ युथ कौन्सिल’ (राष्ट्रकुल युवक समिती) या स्वायत्त संस्थेचा आशिया विभागाचा राष्ट्रकुल युवक प्रतिनिधी म्हणून गेल्या नोव्हेंबरमध्ये निवडला गेलेला प्रवीण शनिवारी (ता. १२) थेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांच्या हस्ते आपल्या पदाची सूत्रे बकिंगहॅम पॅलेस येथे स्वीकारणार आहे.
प्रवीण सध्या फर्ग्युसन महाविद्यालयात कायद्याचे पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. या निवडणुकीसाठी भारतासह मलेशिया, मालदीव व पाकिस्तान या देशांतील प्रतिनिधींनी अर्ज केले होते. मने या तरुण प्रतिनिधींनी वळविणे अपेक्षित होते. त्यानंतर सभागृहापुढे भाषणही द्यायचे होते. प्रवीण या वेळी ‘मासिक पाळी’ या विषयावर आरोग्य व सामाजिक बाजूंनी बोलला. याच भाषणामुळे त्याला संयुक्त राष्ट्रसंघटनेचे बान की मून यांना भेटण्याची संधी मिळाली. या कठीण प्रक्रियेतून प्रवीणची निवड झाली. त्याला ५३ पैकी ४८ देशांची मते मिळाली व तो निवडून आला.
No comments:
Post a Comment