[अंतरराष्ट्रीय]
वॉश्गिंटन; वारंवार फोन बघणं आरोग्यासाठी हानिकारक
पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
प्राध्यापक गिलानींना जामीन मंजूर
देहरादून; बहुमत मिळाले नाही तर राजीनामा-हरीश रावत
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना झटका
शत्रुघ्न सिन्हांनी 'खामोश' राहू नये- नितीश,लालू
जेएनयूमधले जामीनावर सुटलेले विद्यार्थी हिरो नाही - अनुपम खेर
T20 महिला वर्ल्ड कप - भारताची पाकिस्तानविरोधात अडखळत सुरुवात
कंपनी कर्ज फेडत नसेल तर व्यक्तिगत गॅरंटरकडून वसूल करा - अर्थखाते
जाट आंदोलनाबाबत मोदी सरकारची कठोर भूमिका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
भुजबळांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या
दिग्विजय सिंह यांचं मिसेस फडणवीसांवर ट्विटरास्त्र
मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस आयुक्त अजूनही घराविना
मुंबईतील छमछम तूर्तास लांबणीवर, परवाने रद्द
शक्तिमान घोड्यावर हल्ला करणा-या भाजपा आमदार गणेश जोशींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
हरियाणाच्या 'युवराज'साठी 9 कोटींचा भाव
पुणे; ...म्हणून मी जिनयला घेऊन जात आहे, आजोबांची सुसाईड नोट
कोलकाता; IndvsPak : पाऊस थांबावा यासाठी होमहवन
नाशिक; युवा संशोधकांच्या अनोख्या प्रयोगांनी सारेच थक्क
नागपूर; साडेसात लाख लिटर पाण्याची बचत; महापालिकेचा उपक्रम
ठाणे; कळव्यात तरुणीवर गोळीबार
रांची; पुन्हा दादरी? झारखंडमध्ये २ मुस्लिम पशू व्यापा-यांना मारून झाडाला लटकवले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानचीच सरशी...
कोलकाता; कोहलीने वचन पाळलं, भारत-पाक सामन्यापूर्वी आमीरला गिफ्ट
...तर आफ्रिदीला पाकमध्ये अधिक प्रेम मिळेल
अस्ताना; योगेश्वर दत्त रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
नवा चित्रपट : कपूर अँड सन्स; ‘अपूर्ण‘ कुटुंबाची परिपूर्ण गोष्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
**********************
T-20 क्रिकेटचा लाईव्ह स्कोअर पहा आता नमस्कार लाईव्हच्या App वर
App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
============================================

============================================

============================================

============================================
...म्हणून मी जिनयला घेऊन जात आहे, आजोबांची सुसाईड नोट

============================================
============================================

============================================

============================================

राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या चार डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तूर्तास डान्सबार पुन्हा उघडू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
अटींची पूर्तता न झाल्याने चार डान्सबारना दिलेले परवाने रद्द केले. राज्य सरकारनं डान्सबारच्या परवानगीसाठी काही अटी ठेवल्या होत्या. या अटींविरोधात डान्सबार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
बार मालकांवर परवान्यांसह लावलेले अनेक निर्बंध हे चुकीचे असल्याचं सुप्रीम कोर्टानं याआधीही म्हटलं होतं. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं बार बंदीस मनाई केली होती. त्यानंतर बारमालकांवर सरकारनं अनेक अटी लादल्या. त्यात बारमधील लाईव्ह फुटेज पोलीस स्टेशनला देणं. या अटीचाही समावेश होता. याविरोधात बार असोशिएशननं कोर्टात धाव घेतली होती. त्यावर अशा पद्धतीची अट ही व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला आहे. असं मत कोर्टानं व्यक्त केलं होतं.
============================================

तपास अधिकाऱ्यांना अब्देसलामच्या बोटावरील ठश्यांचे नमुने ब्रसेल्समध्ये एका हॉटेलच्या अपार्टमेंटमध्ये
मिळाले. त्यानंतर ब्रसेल्समधल्या मोलेनबीन परिसरात छापा टाकला असता पोलिसांनी गोळीबार करत अब्देसलामसह 5 जणांना अटक केली. यावेळी सलाहच्या पायाला गोळी छाटून गेली.
पॅरिसवरील हल्ल्यानंतर संशयित म्हणून सलाहचे फोटो सर्वत्र झळकत होते. मात्र स्मोकिंग जॉईंट्सवर दिसणारा, क्लीन शेव्ह्ड असलेला हा पोरगा असं कृत्य करुच शकत नाही, असा विश्वास परिसरातील लोकांनी व्यक्त केला होता. 27 वर्षांचा सलाह वयाच्या 14 व्या वर्षी मोरोक्कोच्या राहत्या घरुन पळून आला होता.
सलाह अब्देसलामला फुटबॉल, बाईक्सचं प्रचंड वेड होतं. शिवाय अनेकदा गे बारमध्ये जात असल्याचंही काही जणांनी सांगितलं आहे. मध्य ब्रसेल्समधील एका गे बारच्या बारटेंडरनेही सलाह समलैंगिक व्यक्तींसोबत तो फिरत असल्याची माहिती दिली आहे.
पॅरिसमध्ये गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 130 नागरिक मृत्युमुखी पावले होते.
============================================
प्राध्यापक गिलानींना जामीन मंजूर
बहुमत मिळाले नाही तर राजीनामा-हरीश रावत
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना झटका
टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना "जोर का झटका‘ दिला आहे. या योजनांच्या सध्याच्या व्याजदरात साधारणपणे अर्धा ते सव्वा टक्क्यांपर्यंतची कपात करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला असून, नवे व्याजदर एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लागू होतील.
अल्पबचत योजनांवरील सध्याचे व्याजदर हे बॅंकांच्या तुलनेत अधिक आहेत. पण ते बाजारातील प्रचलित व्याजदराशी सुसंगत ठेवण्याच्या उद्देशाने त्यात कपात करण्याचा आणि दर तिमाहीला आढावा घेऊन नवे व्याजदर तिमाही तत्त्वावर जाहीर करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केला होता. त्या वेळी अल्पबचत योजनांपैकी फक्त 1, 2, 3 वर्षीय मुदत ठेवी, किसान विकास पत्र आणि आवर्ती ठेव योजनांवरील व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु आज प्रत्यक्षात सर्वच योजनांवर कपातीची कुऱ्हाड चालविण्यात आली आणि तीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त टक्क्यांनी! फक्त टपाल कार्यालयातील बचत बॅंक (एसबी) खात्याचा व्याजदर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
============================================
...तर आफ्रिदीला पाकमध्ये अधिक प्रेम मिळेल

उपखंडातील प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्कंठा आहे तो सामना आता सादर होत आहे. भारत-पाक हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी त्यांच्या शेजारीच असलेल्या ढाक्यामध्ये काही दिवसांपूर्वी एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळची खेळपट्टी काहीशी ओलसर होती. अडखळत्या सुरवातीनंतर भारताने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यानंतर दोन्ही संघांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे शनिवारच्या सामन्यासाठी चांगली तयारी करण्यास वेळ मिळाला. कोलकता हे ढाक्यापेक्षा फार लांब नसले तरी ईडन गार्डनची खेळपट्टी ढाक्यापेक्षा वेगळी आहे. या खेळपट्टीवर गवत नसेल, हिरव्या रंगाचा लवलेशही नसेल, जे काही असेल ते फिरकीस साथ देणारे असेल.
विजय अत्यावश्यक असल्यामुळे भारतावर अधिक दडपण असेल. जर पराभव झाला तर आव्हान संपल्यातच जमा होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवास भारतीय जबाबदार आहेत, त्यांनी केवळ तो सामनाच गमावला नाही तर पराभवातही मोठे अंतर राहिल्याने उपांत्य फेरीसाठी नेट रनरेटचा विचार झाला तर मोठा फटका बसू शकतो. साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याचे श्रेय न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांना जाते, सर्वात मोठे श्रेय त्यांच्या संघ व्यवस्थापनाचे आहे. कारण खेळपट्टीचे स्वरूप त्यांनी अचूकपणे ओळखून वेगवान गोलंदाजाला वगळून फिरकी गोलंदाज खेळण्याचे धाडस केले.
शत्रुघ्न सिन्हांनी 'खामोश' राहू नये- नितीश,लालू

============================================
युवा संशोधकांच्या अनोख्या प्रयोगांनी सारेच थक्क
सेंसरच्या सहाय्याने दुचाकीच्या गतीचे नियंत्रण करण्यासोबत वाहतुकीचे सर्व नियम पालन करण्यासंदर्भातील उपाययोजना असो किंवा सोलर रिक्षाद्वारे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा किंवा वाइन उत्पादन करताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी पाण्यासोबत खत व बायोगॅस निर्मिती. अशा विविध तंत्रांची मांडणी युवा संशोधकांनी केली. येथील क.का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित "कर्मवीर एक्स्पो‘मध्ये देशभरातील युवा संशोधकांनी सहभाग नोंदविला. आज (ता. 19) या प्रदर्शनाचा समारोप होईल.
साडेसात लाख लिटर पाण्याची बचत; महापालिकेचा उपक्रम
नागपूर : महापालिकेने 24 तासांत साडेसात लाख लिटर पाण्याची बचत करण्याचा अनोखा विक्रम केला. महापालिका जानेवारी 2014 पासून दर पौर्णिमेला शहरात 1 तास विद्युत दिवे बंद करते. या उपक्रमाला नागरिकांनीही साथ देत पौर्णिमेला एक तास विद्युत उपकरणे, घरातील दिवे बंद केले. त्यामुळे 22 फेब्रुवारी 2016 रोजीच्या पौर्णिमेपर्यंत 64 हजार 189 युनिट विजेची बचत केली. एका युनिटसाठी पाचशे लिटर पाण्याचा वापर केला जातो. या अर्थाने महापालिकेने साडेसात लाख लिटर पाण्याची बचत केली.
योगेश्वर दत्त रिओ ऑलिंपिकसाठी पात्र

नवा चित्रपट : कपूर अँड सन्स
प्रत्येकच कुटुंब बाहेरून सुखी, आनंदी दिसत असलं, तरी ते असतंच असं नाही. कुटुंबातील प्रत्येकाच्या अपेक्षा, स्वप्नं आणि संघर्ष वेगळा असतो आणि त्याची एकाकी धडपडही सुरूच असते. शकुन बत्रा दिग्दर्शित ‘कपूर अँड सन्स‘ हा चित्रपट आजच्या जमान्यातील अशाच एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. विनोदाचा आधार घेत दिग्दर्शक प्रत्येक पात्राचं अंतरंग उलगडून दाखवतो. एकत्र राहू पाहणाऱ्या प्रत्येकच कुटुंबाला काही मौल्यवान टिप्स चित्रपट कथेच्या ओघात देऊन जातो. साधी, सोपी कथा, खुसखुशीत व भावनिक प्रसंगांची मालिका, चांगलं संगीत, सर्वच कलाकारांचा देखणा अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. मध्यंतरापूर्वी बराच वेळ रेंगाळणारी व उत्कंठा ताणून ठेवण्यात कमी पडलेली कथा ही त्रुटी आहे.
============================================
============================================
============================================
============================================
============================================
============================================
============================================
============================================
============================================
============================================
वॉश्गिंटन; वारंवार फोन बघणं आरोग्यासाठी हानिकारक
पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
प्राध्यापक गिलानींना जामीन मंजूर
देहरादून; बहुमत मिळाले नाही तर राजीनामा-हरीश रावत
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना झटका
शत्रुघ्न सिन्हांनी 'खामोश' राहू नये- नितीश,लालू
जेएनयूमधले जामीनावर सुटलेले विद्यार्थी हिरो नाही - अनुपम खेर
T20 महिला वर्ल्ड कप - भारताची पाकिस्तानविरोधात अडखळत सुरुवात
कंपनी कर्ज फेडत नसेल तर व्यक्तिगत गॅरंटरकडून वसूल करा - अर्थखाते
जाट आंदोलनाबाबत मोदी सरकारची कठोर भूमिका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
भुजबळांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या
दिग्विजय सिंह यांचं मिसेस फडणवीसांवर ट्विटरास्त्र
मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस आयुक्त अजूनही घराविना
मुंबईतील छमछम तूर्तास लांबणीवर, परवाने रद्द
शक्तिमान घोड्यावर हल्ला करणा-या भाजपा आमदार गणेश जोशींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
हरियाणाच्या 'युवराज'साठी 9 कोटींचा भाव
पुणे; ...म्हणून मी जिनयला घेऊन जात आहे, आजोबांची सुसाईड नोट
कोलकाता; IndvsPak : पाऊस थांबावा यासाठी होमहवन
नाशिक; युवा संशोधकांच्या अनोख्या प्रयोगांनी सारेच थक्क
नागपूर; साडेसात लाख लिटर पाण्याची बचत; महापालिकेचा उपक्रम
ठाणे; कळव्यात तरुणीवर गोळीबार
रांची; पुन्हा दादरी? झारखंडमध्ये २ मुस्लिम पशू व्यापा-यांना मारून झाडाला लटकवले
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानचीच सरशी...
कोलकाता; कोहलीने वचन पाळलं, भारत-पाक सामन्यापूर्वी आमीरला गिफ्ट
...तर आफ्रिदीला पाकमध्ये अधिक प्रेम मिळेल
अस्ताना; योगेश्वर दत्त रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
नवा चित्रपट : कपूर अँड सन्स; ‘अपूर्ण‘ कुटुंबाची परिपूर्ण गोष्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
चांगल्या कर्माची फळे चांगलीच असतात, मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही
(भास्कर पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
**********************
T-20 क्रिकेटचा लाईव्ह स्कोअर पहा आता नमस्कार लाईव्हच्या App वर
App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
============================================
भुजबळांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या
मुंबई : मनी लाँड्रिग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अटक झाल्यानंतर आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थर रोड कारागृहात जाऊन भुजबळ यांची भेट घेतली. विशेष म्हणजे माध्यमांशी बोलताना सुळे यांनी विषयाला बगल देणंच पसंत केलं.
भुजबळांची भेट घेतल्यानंतर माध्यमांनी सुप्रिया सुळेंकडे त्याबाबत विचारणा केली. त्यावेळी सुळे यांनी केवळ ‘हॅपी होली’ एवढीच प्रतिक्रिया दिली. थेटपणे छगन भुजबळांवरच्या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं.
छगन भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत त्यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातच असेल. छगन भुजबळांसोबतच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचीही कसून चौकशी सुरु आहे.
जे काका-पुतण्याच्या मागे लागले होते, ते काका-पुतण्याच आता तुरुंगात गेले आहेत, असं मार्मिक भाष्य भुजबळांच्या अटकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं.
दिग्विजय सिंह यांचं मिसेस फडणवीसांवर ट्विटरास्त्र
मुंबई : काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. दिग्विजय यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांबाबत ट्वीट करुन आरोप केले आहेत.
‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील एसआरए (झोपडपट्टी पुनर्विकास) विकासकांना अॅक्सिस बँकेच्या फक्त वरळी शाखेत अकाऊण्ट उघडायला सांगितलं आहे.’ असं दिग्विजय यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
‘तुम्हाला याचं कारण माहित आहे का? मिसेस फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. अॅक्सिस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला. ही तर वशिलेबाजीची हद्द आहे.’ अशा आशयाचं ट्वीट दिग्विजय यांनी केलं आहे.
दिग्विजय सिंह यांच्या ट्वीटवर मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पत्नी काय उत्तर देणार, किंवा त्यांच्याविरोधात कुठली कारवाई करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हरियाणाच्या 'युवराज'साठी 9 कोटींचा भाव
हरियाणा : एखाद्या रेड्याची किंमत फारफार तर लाखात आपण ऐकली असेल, मात्र हरियाणातला युवराज नावाच्या रेड्याची किंमत तब्बल 9 कोटी रुपये आहे. युवराज हे हरियाणातल्या जमीनदाराच्या गोठ्यातलं उमदं जनावर. याला रेडा म्हणण्याची हिम्मत होत नाही, कारण याचा रुबाब एखाद्या राजपुत्रापेक्षा कमी नाही.
गोठ्यातल्या इतर ललनांना भुरळ पडावी अशी युवराजची शरीरयष्टी. नाकात भली मोठी रिंग आणि डोळ्यात जणू सुरमा. मुऱ्हा जातीच्या या युवराजनं अखिल भारतीय कृषी महोत्सवात पहिला नंबर पटकावला आहे.
या युवराजला खरेदी करण्यासाठी एका व्यक्तीनं एक दोन नाही तर तब्बल 9 कोटी रुपये मोजण्याची तयारी दाखवली आहे.
युवराजचा खुराकही तगडा आहे. दिवसाला अडीच हजार रुपयांचा खर्च एकट्या युवराजवर केला जात आहे. याचं वीर्य विकून वर्षाकाठी तब्बल 80 लाख रुपयाची कमाई केली जात आहे.
युवराजचा अख्ख्या देशात बोलबाला आहे. त्याचं नाव युवराज ठेवण्यामागेही मजेशीर किस्सा आहे. युवराजच्या बहिणीनं म्हणजे लक्खो राणीनंही या चॅम्पियन्शिपमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे या भावा-बहिणींना पाहण्याचा मोह केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही आवरला नाही.
आपल्या कृषीप्रदान देशात मुऱ्हा जात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्याच्या गोठ्यात मुऱ्हा जातीची म्हैस आली म्हणजे त्याची भरभराट झालीच म्हणून समजा. त्यामुळे आपल्या गोठ्यात एकातरी युवराजाने आणि लक्खो राणीनं जन्म घ्यावा असं प्रत्येक बळीराजाला वाटलं तर नवल नको.
...म्हणून मी जिनयला घेऊन जात आहे, आजोबांची सुसाईड नोट
पुणे : शांतीनगर जैन सोसायटी, कोंढवा
पुणे : दहा वर्षांच्या नातवाचा खून करुन आजोबाने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. कोंढवा बुद्रुकमधील शांतीनगर जैन सोसायटीमध्ये आज सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.
जिनय शाह असं खून झालेल्या नातवाचं नाव असून सुधीर दगडूमल शाह (वय 65 वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिनय आजोबांसोबत झोपला होता. पहाटेच्या सुमारास सुधीर यांनी पहिल्यांदा जिनयचा गळा आवळून खून केला. त्यानंतर इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
सुधीर शाह हे मूळचे शिरुरचे असून तिथे त्यांची मोठी जमीन आहे. सुरुवातीला ते पुण्यातील शांतीनगर जैन सोसायटीमध्येच ते भाड्याने राहत होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी तिथे स्वत:चा फ्लॅट घेतला होता. आज सकाळी सोसायटीतील रहिवाशांची ट्रीप गेली. त्यानंतर पाचच्या सुमारास माॅर्निंग वाॅक करणाऱ्या एका मुलाने सोसायटीची चक्कर मारली तेव्हा काही नव्हते. मात्र दुसऱ्या राऊंडला आजोबांची बाॅडी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर त्याने त्या इमारतीतील सर्व रहिवाशांना उठवलं. त्यांनी ही बाॅडी शाह आजोबांची असल्याचे सांगितलं. त्यानंतर ते शाह यांच्या फ्लॅटच्या दिशेने जिना चढून गेले, तर तेथे लोकांना जिन्याच्या दरवाजा मागे जिनयचा मृतदेह दिसला.
वारंवार फोन बघणं आरोग्यासाठी हानिकारक
वॉश्गिंटन: मोबाइलपासून एक क्षणही दूर राहणं आजच्या तरुणाईला पसंत नाही. पण तुम्हाला जर अशी सवय असेल तर सावधान! कारण की, ही सवय घातक ठरु शकते.
एका नव्या संशोधनानुसार वारंवार स्मार्टफोन पाहण्याची सवय ही संतुष्ट प्रक्रियेला प्रभावित करते. अमेरिकेतील टेंपल विद्यापीठातील मनोवैज्ञानिक हेनरी विल्मर आणि जेसन यांनी या संशोधनाच्या माध्यमातून स्मार्टफोनचे होणार दुष्परिणाम समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
या संशोधनासाठी 91 कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रश्नावली देण्यात आली होती. तसंच इतर परिक्षणाद्वारेही त्यांची याबाबतची माहिती जाणून घेतली.
संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, सोप्या पद्धतीनं वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिकउपकरणांचा अधिकाधिक वापर नियंत्रणावर दुष्परिणाम करतो. तसंच तात्काळ निकाल हवा अशी भावना वाढीस लागते.
विल्मरच्या मते, ‘वारंवार स्मार्टफोन बघंण ही सवय घातक ठरु शकते. त्यामुळे संतुष्ट होण्याच्या भावनेला प्रभावित करु शकते.’
हे संशोधन ‘स्पिंगर’ मासिकात प्रकाशित करण्यात आलं आहे.
कोहलीने वचन पाळलं, भारत-पाक सामन्यापूर्वी आमीरला गिफ्ट
कोलकाता : ईडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट असलं तरी क्रिकेटचाहते या लढतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण ट्वेन्टी 20 विश्वचषकातील या सामन्यापूर्वी भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने पाकिस्तानी जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरला भेट म्हणून स्वत:ची बॅट दिली.
आशिया चषकादरम्यान विराट कोहलीने आमीरला भेट म्हणून बॅट देण्याचं वचन दिलं होतं. ते वचन पाळत विराटने आमीरला बॅट दिली.
मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस आयुक्त अजूनही घराविना
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि एक अतिशय महत्त्वाचं शहर म्हणजे मुंबई. पण या शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले मुंबई पोलिस आयुक्त स्वत:च अजून बेघर आहेत. आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर एका महिन्यापासून वरळीतील ऑफिसर्स मेसमध्ये राहत आहेत. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच असं घडलं आहे की, आयुक्तांना राहायला घर नाही.
सामान्यत: मुंबई पोलिस आयुक्त दक्षिण मुंबईतील सरकारी निवासस्थानात राहतात, जे आयुक्तालयाजवळच आहे. पण योग्य जागेअभावी दत्तात्रय पडसलगीकर सध्या वरळीतील पोलिस सर्व्हिस ऑफिसर्स मेसमध्ये राहत आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीहून परतल्यानंतर पोलिस आयुक्त पडसलगीकर सध्या मेसच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये राहत आहेत. मात्र ही रुम त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला योग्य नसल्याचंही काही जण बोलत आहे.
गुप्तचर यंत्रणा अर्थात ‘आयबी’मध्ये कार्यरत असलेल्या पडसलगीकर यांना पुन्हा ‘होम केडर’ म्हणजेच महाराष्ट्रासाठी रिलिव्ह करावं, असं पत्र महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहविभागाला पाठवलं होतं. त्यानंतर दत्तात्रय पडसलगीकर यांनी 31 जानेवारी 2016 रोजी मुंबई पोलिस आयुक्तपदाची सुत्रं स्वीकारली.
मुंबईतील छमछम तूर्तास लांबणीवर, परवाने रद्द
मुंबई : मुंबईतल्या डान्स बारच्या रिओपनिंगचा मुहूर्त तूर्तास लांबणीवर पडला आहे. पोलिसांच्या निलंबनानंतर चार डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
राज्य सरकारतर्फे देण्यात आलेल्या चार डान्सबारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तूर्तास डान्सबार पुन्हा उघडू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
अटींची पूर्तता न झाल्याने चार डान्सबारना दिलेले परवाने रद्द केले. राज्य सरकारनं डान्सबारच्या परवानगीसाठी काही अटी ठेवल्या होत्या. या अटींविरोधात डान्सबार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
बार मालकांवर परवान्यांसह लावलेले अनेक निर्बंध हे चुकीचे असल्याचं सुप्रीम कोर्टानं याआधीही म्हटलं होतं. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं बार बंदीस मनाई केली होती. त्यानंतर बारमालकांवर सरकारनं अनेक अटी लादल्या. त्यात बारमधील लाईव्ह फुटेज पोलीस स्टेशनला देणं. या अटीचाही समावेश होता. याविरोधात बार असोशिएशननं कोर्टात धाव घेतली होती. त्यावर अशा पद्धतीची अट ही व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला आहे. असं मत कोर्टानं व्यक्त केलं होतं.
फ्रान्समधला गे तरुण ते पॅरिस हल्ल्यातील संशयित दहशतवादी
नवी दिल्ली : पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला संशयित आयसिस दहशतवादी सलाह अब्देसलामसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये मोठं ऑपरेशन राबवून ही कारवाई करण्यात आली.
तपास अधिकाऱ्यांना अब्देसलामच्या बोटावरील ठश्यांचे नमुने ब्रसेल्समध्ये एका हॉटेलच्या अपार्टमेंटमध्ये
मिळाले. त्यानंतर ब्रसेल्समधल्या मोलेनबीन परिसरात छापा टाकला असता पोलिसांनी गोळीबार करत अब्देसलामसह 5 जणांना अटक केली. यावेळी सलाहच्या पायाला गोळी छाटून गेली.
पॅरिसवरील हल्ल्यानंतर संशयित म्हणून सलाहचे फोटो सर्वत्र झळकत होते. मात्र स्मोकिंग जॉईंट्सवर दिसणारा, क्लीन शेव्ह्ड असलेला हा पोरगा असं कृत्य करुच शकत नाही, असा विश्वास परिसरातील लोकांनी व्यक्त केला होता. 27 वर्षांचा सलाह वयाच्या 14 व्या वर्षी मोरोक्कोच्या राहत्या घरुन पळून आला होता.
सलाह अब्देसलामला फुटबॉल, बाईक्सचं प्रचंड वेड होतं. शिवाय अनेकदा गे बारमध्ये जात असल्याचंही काही जणांनी सांगितलं आहे. मध्य ब्रसेल्समधील एका गे बारच्या बारटेंडरनेही सलाह समलैंगिक व्यक्तींसोबत तो फिरत असल्याची माहिती दिली आहे.
पॅरिसमध्ये गेल्या वर्षी 13 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 130 नागरिक मृत्युमुखी पावले होते.
प्राध्यापक गिलानींना जामीन मंजूर
नवी दिल्ली - भारतविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एस. ए. आर. गिलानी यांना आज (शनिवार) दिल्ली सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.
गिलानी यांनी प्रेस क्लबमध्ये देशविरोधी घोषणाबाजी केल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. गिलानी यांनी अफजल गुरु आणि मकबूल बट यांना हुतात्मा सांगून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी घोषणा दिल्याचा आरोप आहे. तेव्हापासून ते कोठडीत होती.
आज दिल्ली सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दीपक गर्ग यांनी गिलानी यांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचे गिलानी यांनी न्यायालयात सांगितले. संसदेवरील हल्ल्याप्रकरणी प्राध्यापक गिलानी यांना 12 डिसेंबर 2001 रोजी अटक करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने त्यांची सुटका केली होती.
============================================बहुमत मिळाले नाही तर राजीनामा-हरीश रावत
डेहराडून - विधानसभेत आमचे सरकार बहुमत सिद्ध न करू शकल्यास पदाचा राजीनामा देईल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावल्याने हरीश रावत यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे. भाजपनेही राजकीय संधी साधत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री आणि खासदार भगतसिंह कोशीयारी, उत्तराखंडचे भाजप प्रभारी श्याम जाजू आणि सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी मध्यरात्री राज्यपाल के. के. पौल यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. कॉंग्रेसमधील बंडखोर आमदारांना हाताशी धरून सरकार स्थापन करण्याचा भाजपचा इरादा आहे.
यावर आज (शनिवार) सकाळी हरीश रावत यांनी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर रावत म्हणाले की, आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची चूक मान्य केली जाणार नाही.
============================================सर्वसामान्य गुंतवणूकदारांना झटका
टपाल खात्याच्या (पोस्ट) माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या मासिक उत्पन्न योजना (एमआयएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मुदत ठेव (टीडी), आवर्ती ठेव (आरडी), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या सर्व अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर कपातीची कुऱ्हाड चालवून सरकारने सर्वसामान्य, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना "जोर का झटका‘ दिला आहे. या योजनांच्या सध्याच्या व्याजदरात साधारणपणे अर्धा ते सव्वा टक्क्यांपर्यंतची कपात करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला असून, नवे व्याजदर एक एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी लागू होतील.
अल्पबचत योजनांवरील सध्याचे व्याजदर हे बॅंकांच्या तुलनेत अधिक आहेत. पण ते बाजारातील प्रचलित व्याजदराशी सुसंगत ठेवण्याच्या उद्देशाने त्यात कपात करण्याचा आणि दर तिमाहीला आढावा घेऊन नवे व्याजदर तिमाही तत्त्वावर जाहीर करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात केंद्र सरकारने जाहीर केला होता. त्या वेळी अल्पबचत योजनांपैकी फक्त 1, 2, 3 वर्षीय मुदत ठेवी, किसान विकास पत्र आणि आवर्ती ठेव योजनांवरील व्याजदरात पाव टक्क्याने कपात करण्याचे संकेत देण्यात आले होते. परंतु आज प्रत्यक्षात सर्वच योजनांवर कपातीची कुऱ्हाड चालविण्यात आली आणि तीदेखील अपेक्षेपेक्षा जास्त टक्क्यांनी! फक्त टपाल कार्यालयातील बचत बॅंक (एसबी) खात्याचा व्याजदर 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
...तर आफ्रिदीला पाकमध्ये अधिक प्रेम मिळेल
उपखंडातील प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्कंठा आहे तो सामना आता सादर होत आहे. भारत-पाक हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी त्यांच्या शेजारीच असलेल्या ढाक्यामध्ये काही दिवसांपूर्वी एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळची खेळपट्टी काहीशी ओलसर होती. अडखळत्या सुरवातीनंतर भारताने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यानंतर दोन्ही संघांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे शनिवारच्या सामन्यासाठी चांगली तयारी करण्यास वेळ मिळाला. कोलकता हे ढाक्यापेक्षा फार लांब नसले तरी ईडन गार्डनची खेळपट्टी ढाक्यापेक्षा वेगळी आहे. या खेळपट्टीवर गवत नसेल, हिरव्या रंगाचा लवलेशही नसेल, जे काही असेल ते फिरकीस साथ देणारे असेल.
विजय अत्यावश्यक असल्यामुळे भारतावर अधिक दडपण असेल. जर पराभव झाला तर आव्हान संपल्यातच जमा होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवास भारतीय जबाबदार आहेत, त्यांनी केवळ तो सामनाच गमावला नाही तर पराभवातही मोठे अंतर राहिल्याने उपांत्य फेरीसाठी नेट रनरेटचा विचार झाला तर मोठा फटका बसू शकतो. साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याचे श्रेय न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांना जाते, सर्वात मोठे श्रेय त्यांच्या संघ व्यवस्थापनाचे आहे. कारण खेळपट्टीचे स्वरूप त्यांनी अचूकपणे ओळखून वेगवान गोलंदाजाला वगळून फिरकी गोलंदाज खेळण्याचे धाडस केले.
संघ कायम ठेवण्यावर धोनी प्राधान्य देत असल्यामुळे पाकविरुद्ध बदलाची शक्यता कमी आहे. पाकिस्तानची वेगवान गोलंदाजीतील ताकद पाहता भारतीय संघ अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवण्याऐवजी पंड्याची निवड कायम ठेवेल. बडोद्याच्या या फलंदाजाकडे चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्याची क्षमता आहे. त्यामुळे धोनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवेल.
============================================शत्रुघ्न सिन्हांनी 'खामोश' राहू नये- नितीश,लालू
पाटणा - भाजप खासदार शत्रुध्न सिन्हा यांनी कायम सत्याबाबत बोलत रहावे, त्यांनी शांत राहू नये, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘एनिथिंग बट खामोश‘ या आत्मचरित्र्याचे नितीश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्याहस्ते शुक्रवारी प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता. नितीश कुमार, लालूप्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी या कार्यक्रमात एकमेकांवर खूप स्तुतीसुमने उधळली. पूनम धिल्लाँ, शेखर सुमन, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश इक्बाल अहमद अन्सारी हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नितीश कुमार हे माझ्या भावाप्रमाणे असून, ते बिहारचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचे, शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले. तर नितीश आणि लालू म्हणाले की, त्यांच्या स्वतःच्याच पक्षाकडून दुर्लक्ष होत असले तरी, त्यांनी शांत राहू नये. आपला आवाज सतत उठवत रहावा.
============================================IndvsPak : पाऊस थांबावा यासाठी होमहवन
कोलकाता : ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला काही मिनिटे शिल्लक आहेत. मात्र सामन्याच्या उत्साहावर विरजण घालणारी बाब म्हणजे या सामन्यावर असलेलं पावसाचं सावट.
कोलकात्यात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास झालेल्या पावसानं भारतीय क्रिकेटरसिकांना आधीच एक धक्का दिला आहे. त्यात हवामान खात्यानं सायंकाळीही पावसाचा अंदाज वर्तवल्यानं भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे.
भारत-पाकिस्तान संघांमधल्या सामन्यावर पावसानं पाणी फेरलं तर, दोन्ही संघांना एकेक गुण देण्यात येईल. कारण सुपर टेनमधल्या साखळी सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यात सलामीच्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर पाकिस्ताननं बांगलादेशला हरवून ट्वेन्टी20 विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. या परिस्थितीत टीम इंडियाची उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्याची मोहीम अडचणीत येऊ शकते.
दुसरीकडे अनेक ठिकाणी चाहते पाऊस थांबावा आणि भारतानं विश्वचषकातली विजयी परंपरा कायम राखत पाकिस्तानवर मात करावी,यासाठी प्रार्थना करत आहेत.
मुंबईत क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयासाठी अनेक होमहवन केले, तर पावसाच्या व्यत्यय येऊ नये, यासाठी वाराणसीत लोकांनी सामूहिकरित्या प्रार्थना केली.
युवा संशोधकांच्या अनोख्या प्रयोगांनी सारेच थक्क
सेंसरच्या सहाय्याने दुचाकीच्या गतीचे नियंत्रण करण्यासोबत वाहतुकीचे सर्व नियम पालन करण्यासंदर्भातील उपाययोजना असो किंवा सोलर रिक्षाद्वारे सौरऊर्जेवर चालणारी रिक्षा किंवा वाइन उत्पादन करताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी पाण्यासोबत खत व बायोगॅस निर्मिती. अशा विविध तंत्रांची मांडणी युवा संशोधकांनी केली. येथील क.का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित "कर्मवीर एक्स्पो‘मध्ये देशभरातील युवा संशोधकांनी सहभाग नोंदविला. आज (ता. 19) या प्रदर्शनाचा समारोप होईल.
उद्घाटन क्रॉम्प्टन ग्रीव्हजचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्युत विभाग व आयटी लोकल नेटवर्क, नाशिक यांच्यातर्फे आयोजित कर्मवीर एक्स्पोच्या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशीनाथदादा टर्ले, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, मनीष गुप्ता (जनरल मॅनेजर, पॉवरिका), विश्वस्त डी. एस. शिंदे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, नॉबर्ट डिसूझा, धीरज मेथीकर, चंद्रकांत मोहीकर आदी उपस्थित होते. भारतातून 139 समूहांच्या माध्यमातून 700 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कर्नाटक (16), केरळ (4), मध्य प्रदेश (4), ओडिशा (4), आंध्र प्रदेश (12) येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
============================================साडेसात लाख लिटर पाण्याची बचत; महापालिकेचा उपक्रम
नागपूर : महापालिकेने 24 तासांत साडेसात लाख लिटर पाण्याची बचत करण्याचा अनोखा विक्रम केला. महापालिका जानेवारी 2014 पासून दर पौर्णिमेला शहरात 1 तास विद्युत दिवे बंद करते. या उपक्रमाला नागरिकांनीही साथ देत पौर्णिमेला एक तास विद्युत उपकरणे, घरातील दिवे बंद केले. त्यामुळे 22 फेब्रुवारी 2016 रोजीच्या पौर्णिमेपर्यंत 64 हजार 189 युनिट विजेची बचत केली. एका युनिटसाठी पाचशे लिटर पाण्याचा वापर केला जातो. या अर्थाने महापालिकेने साडेसात लाख लिटर पाण्याची बचत केली.
ऊर्जाबचत तसेच पर्यावरणासाठी तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी शहरात ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संघटनेसोबत दर पौर्णिमेला शहरातील एका भागातील दिवे, विद्युत उपकरणे बंद करण्याचा उपक्रम सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना नागपूर महापालिकेच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. 15 जानेवारी 2015 पासून महापालिकेने हा उपक्रम सुरू केला. दर पौर्णिमेला एक तास पथदिवे, घरातील विद्युत उपकरणे, दिवे बंद करीत नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद दिला. यातून पालिकेने गेल्या 24 महिन्यांत 64 हजार 189.16 युनिटची बचत केली. या उपक्रमामुळे शहरात पर्यावरणाचाही समतोल साधण्यास मदत होत असल्याचे पुढे आले. पाण्याची बचत करतानाच महापालिकेने ऊर्जानिर्मितीसाठी लागणाऱ्या 32 हजार टन कोळशाचीही बचत केली. या मोहिमेत 32 हजार नागरिकांनी भाग घेतला.
============================================योगेश्वर दत्त रिओ ऑलिंपिकसाठी पात्र
अस्ताना - भारताचा प्रमुख कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने यावर्षी रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भारताकडून खेळण्याचे निश्चित केले आहे.
आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत योगेश्वरने 65 किलो वजनी गटात अंतिम फेरीत स्थान मिळवीत आपले ऑलिंपिकमधील स्थान निश्चित केले. ऑलिंपिकसाठी पात्र होणारा योगेश्वर हा दुसरा कुस्तीपटू आहे. यापूर्वी नरसिंग यादवने ऑलिंपिकमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे.
या स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविणारे दोन कुस्तीपटू ऑलिंपिकसाठी पात्र ठरणार होते. लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक मिळविणाऱ्या योगेश्वरची अंतिम फेरीत ऍडम बतिरोव याच्याशी लढत होणार आहे.
============================================नवा चित्रपट : कपूर अँड सन्स
‘अपूर्ण‘ कुटुंबाची परिपूर्ण गोष्ट
योगश्वरचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्क
- मुंबई, दि. १९ - भारतीय कुस्तीपटू योगेश्वर दत्तने आपलं रिओ ऑलिम्पिकसाठी तिकीट पक्क केलं आहे. योगेश्वर दत्त याने ट्विटरवरुन स्वत: ही माहिती दिली आहे. आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत योगेश्वरने पुरुषांच्या 65 किलो वजनी फ्री स्टाईल गटाच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याने त्याचं तिकीट पक्क झालं आहे. नरसिंह यादवनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा योगेश्वर दत्त दुसरा खेळाडू ठरला आहे.अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापुर्वी योगेश्वर दत्तने तीन सामने जिंकले. जु साँग किम याचा 8-1 ने पराभव करत योगेश्वर दत्तने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये व्हीएतनामच्या झुआनचा 12-2ने पराभव करत सरळ सेमी फायनमध्ये पोहोचला आणि त्यानंतर सेमीफायनलमध्ये कोरियाच्या ली सुयुंग चुलला 7-2 ने पराभूत केलं. अॅडम बातिरोव्हसोबत योगेश्वर दत्तची अंतिम लढत होणार आहे.
जेएनयूमधले जामीनावर सुटलेले विद्यार्थी हिरो नाही - अनुपम खेर
- नवी दिल्ली, दि. १९ - 'देशविरोधात बोलणारे असं सेलिब्रेशन करत आहेत जणू काही ते ऑलिम्पिक मेडल जिंकून आले आहेत', अशी टीका अभिनेता अनुपम खेर यांनी केली आहे. आपल्या 'बुद्धा इन ट्राफीक जाम' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जेएनयूमध्ये आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेच अध्यक्षकन्हैय्या कुमार याच्यावर खेर यांनी टीका केली. 'तो जामीनावर बाहेर आहे, त्याचं इतकं भव्य स्वागत करायला तो काही ऑलिम्पिकमधून मेडल जिंकून आलेला नाही' असं खेर बोलले आहेत. 'जो देशविरोधात बोलतो त्याला आपण हिरो बनवून कसं काय सेलिब्रेशन करु शकतो ? त्याने कोणतं ऑलिम्पिक मेडल मिळवले आहे का ? तो जामीनावर बाहेर आहे, तो सचिन, सायना किंवा हनुमंतअप्पा नाही आहे', असं कन्हैय्याचं नाव न घेता अनुपम खेर यांनी टीका केली आहे.चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही घोषणाबाजी करण्यात आल्या. याअगोदर खेर यांनी परिस्थिती चिघळत असल्याने चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी जेएनयू नकार देत असल्याच आरोप केला होता, जो विद्यापीठाने फेटाळला होता. देशात जे काही चुकीचं चालू आहे त्याबद्दल तुम्ही बोलता मात्र टीका करण्याऐवजी देशासाठी तुम्ही काही योगदान दिलं आहे का ? असा सवालही अनुपम खेर यांनी यावेळी विचारला.
T20 महिला वर्ल्ड कप - भारताची पाकिस्तानविरोधात अडखळत सुरुवात
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. १९ - टी20 वर्ल्ड कपमध्ये धोनी ब्रिगेड पाकिस्तानविरोधात मैदानात उतरण्याआधी महिला क्रिकेट संघ पाकिस्तान संघाचा सामना करत आहे. दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानात हा सामना सुरु आहे. पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.पाकिस्तानविरोधात भारताची सुरुवात मात्र अडखळत झाली आहे. भारताने 3 ओव्हरमध्येच 2 विकेट गमावले आहेत. दुस-याच ओव्हरमध्ये वनिता 2 धावांवर झेलबाद झाली तर तिस-या ओव्हरमध्ये स्मृती मंधना एक धाव करुन पायचीत झाली. भारताने सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्याने भारताला सावरुन खेळावं लागणार आहे. भारताने पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशला हरवल्यामुळे भारत आपली विजयी मालिका सुरु ठेवेल अशी आशा आहे.2012च्या वर्लडकपमध्ये पाकिस्तानने भारतात पराभव केला होता मात्र 2014 मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्युत्तर देत पराभव केला होता. मिताली राजला 1500 धावा पुर्ण करण्यासाठी 48 धावांची गरज आहे. त्यानंतर मिताली राज टी20मध्ये 1500 धावा करणारी पहिली आशियाई महिला खेळाडू ठरणार आहे. संध्याकाळी धोनी ब्रिगेड नागपुरमध्ये पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघदेखील पाकिस्तानला हरवून धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास वाढवण्याच्या तयारीने मैदानात उतरली आहे.
कळव्यात तरुणीवर गोळीबार
- ठाणे : एकतर्फी प्रेमातून जवळची नातेवाईक असलेल्या १५वर्षीय तरुणीवर गोळीबार करणाऱ्याला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाल्याने मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात तिला दाखल केले आहे. तर, ठाणे न्यायालयाने २२ मार्चपर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे.आरोपी कमलकांत सैनी (१९) हा मूळचा राजस्थानमधील डवसा जिल्ह्यातील आहे. गेल्या १५ दिवसांपासून आपल्या मामेबहिणीकडे तो वास्तव्यासाठी आला होता. तिचे शालेय शिक्षण सुरू असून, शुक्रवारी सकाळी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तिने ‘होकार’ देण्यासाठी तो पाठी लागला होता. यातूनच त्याने तिच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी दिली.सकाळी ८.४५ वा.च्या सुमारास त्याने तिच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ती तिच्या मानेच्या भागात रुतली. जखमी अवस्थेतच तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केले. मात्र, कळव्यात ही शस्त्रक्रिया होऊ न शकल्यामुळे तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दोघांच्याही नातेवाइकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
पुन्हा दादरी? झारखंडमध्ये २ मुस्लिम पशू व्यापा-यांना मारून झाडाला लटकवले
- रांची, दि. १९ - घरात गोमांस शिजवून खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये मोहम्मद इखलाख या इसमाचा जमावाच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेची झारखंडमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. आठ म्हशींना बाजारात घेऊन जाणा-या दोन मुस्लिम व्यापा-यांना बेदम मारहाण करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगल्याची खळबळजनक घटना रांचीपासून १०० किमी अंतरावर घडली. शुक्रवारी संध्याकाळी लातेहार जिल्ह्यातील बलुमाठ जंगलात दोन व्यापा-यांचे झाडाला टांगलेले मृतदेह आढळून आले. पशु संरक्षण समितीच्या सदस्यांनी हे कृत्य केल्याची शंका व्यक्त होत आहे.मोहम्मद मजलूम (३५) आणि आझाज खान उर्फ इब्राहिम (वय १५) अशी त्या दोघांची नावे असून ते पशू व्यापारी होते. अज्ञातांनी त्यांना मारहाण करून, त्यांची हत्या करून त्यांचे हात मागे बांधून व तोंडात कापडचा बोळा कोंबून मृतदेह झाडाला लटकवले होते.' ज्याप्रकारे त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकावण्यात आले होते, ते पाहून हत्या करणा-यांच्या मना किती घृणा भरली होती याची कल्पना येऊ शकते' अशी माहिती पोलिसांनी दिली.या घटनेमागे हिंदू कट्टरवाद्यांचा हात असल्याचा दावा झारखंड विकास मोर्चाचे स्थानिक आमदार प्रकाश राम यांनी केला आहे. ते दोघे पशू व्यापारी असल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप गावक-यांनी केला असून या घटनेविरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली.दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
कंपनी कर्ज फेडत नसेल तर व्यक्तिगत गॅरंटरकडून वसूल करा - अर्थखाते
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 18 - किंगफिशर एअरलाइन्स आणि विजय मल्ल्या यांच्या प्रकरणावरून अर्थखात्याने बोध घेतला आहे. जर कंपन्या कर्ज बुडवत असतील तर व्यक्तिगत हमीधारकांना पाचारण करा असा सल्ला अर्थखात्याने सरकारी बँकांना दिला असल्याचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. कंपनीने कर्ज बुडवले तर व्यक्तिगत गॅरंटीधारकांची मालमत्ता विकून पैसे वसूल करण्याचा मार्ग फारच थोड्या प्रकरणात दिसून आला आहे. त्यामुळे एक सर्क्युलर काढून हा उपाय अमलात आणावा असे सरकारी बँकांना सांगण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. कंपन्यांना कर्ज देताना कंपनीच्या हमीबरोबरच तिच्या प्रवर्तकांकडून हमीपत्र लिहून घेण्याचा प्रघात आहे. अशा हमीदारांकडून कशाप्रकारे कर्जाची वसुली करता येईल याची यादीच अर्थखात्याने दिली आहे. त्याचप्रमाणे, कर्ज घेणाऱ्या कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर सतत लक्ष ठेवावे असा सल्लाही केंद्रीय अर्थखात्याने बँकांना दिला आहे
जाट आंदोलनाबाबत मोदी सरकारची कठोर भूमिका
- - हरीश गुप्ता, नवी दिल्लीसंपूर्ण देशाचे हरियाणातील जाट आंदोलनाकडे लक्ष लागले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनाविरोधात कठोर भूमिका घेतल्यामुळेच आंदोलक नेत्यांनी आंदोलन दोन आठवडे लांबणीवर टाकले आहे. प्रदेश भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरुद्ध धुसफूस चालविली असताना मोदींनी त्यांना अभय दिले आहे.महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पटेल, राजस्थानातील गुज्जर, तसेच उत्तर प्रदेशातील जाट समुदायानेही आपापल्या राज्यांमध्ये आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. संपुआ सरकारने जाटांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले होते, त्यामुळेच हरियाणातील आंदोलन हे मोदींसाठी कसोटीचे ठरणार आहे.हरियाणातील हिंसक आंदोलनात ३५ जण मृत्युमुखी पडले तसेच ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा विरोधकांचा आरोप आहे. जाट आंदोलकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर केंद्र सरकारने केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलिसांची मोठ्या प्रमाणात तैनाती करीत चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यासाठी सज्जता केली होती. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विधिमंडळात आरक्षण विधेयक पारित करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले आहे.हरियाणातील काँग्रेस सरकारने जाटांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले असले तरी भाजपने निवडणूक काळात आरक्षणाचे गाजर दाखविले होते; मात्र कायदेशीर अडथळे दूर करण्यासाठी काहीही केलेले नाही.
पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक
- ब्रसेल्स, दि. 19 - पॅरीसमध्ये 130 जणांचे प्राण घेणाऱ्या जिहादी हल्ल्यांसाठी सहाय्य करणारा इसिसचा दहशतवादी सलाह अबदेसलाम याला दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. बेल्जियमच्या न्यायमंत्र्याने ही माहिती दिली. नोव्हेंबरमधल्या या हल्ल्यांनंतर सलाह हा फरार होता. मोलेनबीक या शहरातील एका फ्लॅटमध्ये घातलेल्या धाडीमध्ये सलाहबरोबर असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. दहशतवादविरोधी पथकाने घातलेल्या या छाप्यात एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.कोण आहे सलाह अबदेसलाम- उत्तर मोरोक्कोतल्या दांपत्याच्या पोटी ब्रसेल्समध्ये 1989 मध्ये सलाह जन्माला आला.- त्याने वयाच्या 14 व्या वर्षी घराला आग लावली होती.- पॅरीसवरील हल्ल्यापूर्वी सलाहची ओळख सिगारेट पित नाक्यावर उभा राहणारा आणि भावाच्या ब्राहिमच्या बारमध्ये पडलेला असणारा अशी होती.- मोटरबाईक्स आणि फुटबॉलचं वेड असलेला सलाह असं काही करू शकेल यावर विश्वास बसत नसल्याचं मत शेजाऱ्यांनी व्यक्त केलं होतं.- मी ओळखत असलेला सलाह हाच आहे हे पचत नसल्याचं मत एका मित्रानं व्यक्त केलं होतं.- कुणाप्रतीही द्वेष मला कधी त्याच्या बोलण्यात जाणवला नसल्याचं मत एकानं व्यक्त केलं.- सलाह हा समलिंगींच्या बारमध्ये पण जात होता अशी माहिती असून हल्ल्यांपूर्वी काही आठवडे आधीच तो अशाच एका बारमध्ये आढळला होता.
ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानचीच सरशी...
- कोलकाता, दि. १९ - पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, आजच्या सामन्यात ते परंपरागत प्रतिस्पर्धी असलेल्या भारताला हरवून पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरतील का, याबाबत उत्सुकता आहे. एकीकडे भारतीय चाहते भारताच्या विजयासाठी प्रार्थना करत असतानाच पाकिस्तानी संघाची ईडन गार्डनवरील कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते.ईडन गार्डनमध्ये पहिला वन-डे सामना १८ जानेवारी १९८७ रोजी खेळला गेला. त्यात पाकिस्तानने दोन गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर २८ ऑक्टोबर १९८९ रोजी पाकिस्तानने भारताचा ७७ धावांनी तर १३ नोव्हेंबर २००४ रोजी ६ गडी राखून विजय मिळवला होता. ३ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ८५ धावांनी विजय मिळवला होता. ईडन गार्डनवर आतापर्यंत केवळ दोन टी-२० सामने खेळले गेले असून, त्यात एका लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे, तर एक सामना रद्द झाला होता.वर्ल्डकपच्या सर्व प्रकारांमध्ये भारताची पाकिस्तान विरोधातील आतापर्यंतची कामगिरी अजिंक्य असली तरी, ईडन गार्डनची आकडेवारी मात्र पाकिस्तानच्या बाजूने जाणारी आहे. वनडे आणि कसोटीमध्ये मिळून भारत पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर आतापर्यंत ११ सामने झाले. त्यापैकी भारताने फक्ते १ सामना जिंकला असून, ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत तर अन्य ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
No comments:
Post a Comment