[अंतरराष्ट्रीय]
१- संयुक्त अरब अमिरातीला पावसाचा जबर फटका
२- लंडन; उडणाऱ्या विमानाचे दार उघडण्याचा दारुड्याचा प्रयत्न
३- उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- स्मृती इराणींच्या कारने अपघात झाल्यानंतर चुकीचा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव
५- जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधानांचाच फोटो का ? सरकारचाच सवाल
६- अर्थसंकल्प आणि मोदी सरकारचे पाच यू-टर्न
७- इशरत जहॉं प्रकरणासंबंधीची फाईल गायब
८- राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सरकार शांत- जेडीयू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- नव्या रिक्षा पेटवून द्या, राज ठाकरेंची चिथावणी
१०- सेनेच्या दसरा मेळाव्याला मनसेच्या पाडवा मेळाव्याचं आव्हान
११- औरंगाबाद; आमटेंपासून दुरावलेल्या रेणूच्या दोन बछड्यांचाही मृत्यू
१२- विधानभवनात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
१३- “अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- 'मनुस्मृती’वर बंदी नाही; प्रकाशकाचा दावा
१५- वसई; कॉमेडियन रहमान खानला बलात्काराच्या आरोपाखाली अटक
१६- घरापासून दुरावलेल्या रेणूची परवड आजही सुरुच
१७- रेल्वेच्या शौचालयातून होते दुधाची वाहतूक
१८- गडचिरोली; भाजप नेते आत्राम यांच्या घरातून शिंग,बंदुका जप्त
१९- जोधपुर; काळवीट शिकार; सलमानने नोंदविला जबाब
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- whatsapp यूजर्ससाठी येणार नवे अपडेट, बरंच काही बदलणार
२१- कपिलची बायको काजोलच्या भावासोबत लग्न करणार
२२- टीम इंडियातील आणखी एक क्रिकेटपटू विवाहबंधनात
२३- कोलकातामध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना
२४- गेलला सराव सामन्यातच गुंडाळा, भारत-विंडीज आज आमने- सामने
२५- ओमनच्या मक्सूदने चित्त्यासारखी झेप घेत झेल टिपला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शंकर कोल्हे, गजानन देशमुख, विजय अटकोरे, गंगाधर रानवालकर, विकाश त्रिपाठी, रविंदर रोसे, प्रमोद माने, संजय शिरापुरे, मन्मथ खंदारे, साईनाथ सिरपुरे, विजय जैन, दिगंबर गायकवाड,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
कितीही दुःख आलं तरी, हसत ठेवा चेहरा..........
[देविसिंघ राजवंशी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=========================================

=========================================

सुमोनाचा होणारे पती सम्राट मुखर्जी हा बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा भाऊ आहे. सम्राट सुमोनापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे. गेली 4 वर्ष सम्राट आणि सुमोना एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सम्राटने काही बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आशुतोष गोवारीकरच्या ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटातही त्याने गणेश घोषची व्यक्तिरेखा साकारली होती.
=========================================

27 वर्षीय मोहित शर्मा आणि श्वेता यांचे गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मूळ कोलकात्याची असलेली 27 वर्षीय श्वेता हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
क्रिकेटपटू उन्मुक्त चंद, विरेंद्र सेहवाग, परविंदर अवाना, जोगिंदर शर्मा यांनी दिल्लीतील लीला पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्याला हजेरी लावली होती.
टाचेच्या दुखण्यामुळे मोहित शर्मा सध्या संघाबाहेर आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकालाही त्याला मुकावं लागलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून तो मागील पर्वापर्यंत खेळत होता.
=========================================

=========================================

बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावरुनच गुढी पाडव्याला उत्तर देतील. यावर्षी 8 एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्कवरुन त्याचा श्रीगणेशा करेल.
शिवाजी पार्कावर सभा घेण्यासाठी मनसेने यापूर्वीही प्रयत्न केले. पण कोर्टाच्या कचाट्यामुळे राज ठाकरेंना ती संधी मिळाली नाही. पण 20 जानेवारी 2016 रोजी दिलेल्या कोर्टाच्या नव्या आदेशानुसार शिवाजी पार्कावर वर्षातील 45 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहेत. याचाच आधार घेत महापालिकेने मनसेला पाडव्यानिमित्त सभा घेण्याची परवानगी दिली आहे.
यापूर्वीही राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कावर 3 सभा झाल्या. 19 मार्च 2006, 3 मे 2008 आणि ऑक्टोबर 2009 मध्ये या सभा झाल्या.
लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभांच्या निवडणुकीत लोकांनी मनसेला झिडकारलं. येत्या काही महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकणं राज ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे.
=========================================

रेणूला प्रकाश आमटेंच्या हेमलकसातून औरंगाबादला आणण्यात आलं. मात्र आपल्या माणसापासून दुरावल्यामुळे रेणू अस्वस्थ झाली. तिनं अन्नपाणीही त्यागलं होतं. त्यातच तिने तीन पिल्लांना जन्म दिला. पण त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. योग्य उपचार आणि आपल्या लोकांपासून दुरावल्यानंतर रेणूची प्रकृती आणखी खालावली आहे.

भाजप नेते आत्राम यांच्या घरातून शिंग,बंदुका जप्त
काळवीट शिकार; सलमानने नोंदविला जबाब

इशरत जहॉं प्रकरणासंबंधीची फाईल गायब

=========================================
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सरकार शांत- जेडीयू

नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकांना डिवचत असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार शांत आहे, अशी टीका संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे.
जेडीयूचे नेते के.सी. त्यागी यांनी म्हटले की, "निवडणुकांतील पराभवामुळेच निराश झालेले राज ठाकरे गरीब उत्तर भारतीयांविरूद्ध वक्तव्य करत आहेत.‘ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील सरकार ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल शांत बसून असल्याबद्दलही त्यागी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "ते (राज ठाकरे) लोकांना डिवचत असतानाही महाराष्ट्र सरकार या प्रकरणी शांत बसून आहे.‘
परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले सत्तर हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीसाठी व त्यांच्या लाभासाठी देण्यात येत आहेत. हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात येत आहे. सत्तर टक्के परवाने परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत, मराठी तरुणांवर हा अन्याय असल्याचे म्हणत नवीन रिक्षा दिसल्यास जाळून टाका, असा खळबळजनक आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
=========================================
उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी

whatsapp यूजर्ससाठी येणार नवे अपडेट, बरंच काही बदलणार
मुंबई: Whatsappने आपल्या यूजर्ससाठी अनेक नवीन अपडेट आणले आहेत. इमोजी, डॉक्युमेंट, थर्ड पार्टी अॅप शेअरिंग यासारखे फीचर तर नुकतेच आले आहेत. आता पुन्हा एकदा व्हॉट्सअॅपनं यूर्जससाठी नवं अपडेट आणलं आहे.
नव्या अपडेटनुसार, सेटिंग फीचरमध्ये बरेच महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सेटिंग ऑप्शन आणि यूजरचं प्रोफाइल आणखी आकर्षक पद्धतीनं दिसेल.
हे अपडेट अद्याप प्ले-स्टोअरवर आलेलं नाही. यासाठी बीटा टेस्टरवर लॉग-इन करावं लागणार आहे. सध्या या अपडेटच्या बीटा व्हर्जनवर काम सुरु आहे. लवकरच हे अपडेट प्ले स्टोअरवरही येईल.
नव्या अपडेटमध्ये सेटिंग मेन्यूला अधिक सोपं करण्यात आलं आहे. आता तुम्हाला प्रोफाइल आणि स्टेटस दोन्ही ऑप्शन एकत्र पाहायला मिळणार आहे. यासाठी वेगवेगळी सेटींग ऑप्शन एकाच जागी मिळणार आहे.
डेटा यूजेज देखील तुम्हाला सेटिंगच्या ऑप्शनमध्येच मिळणार आहे. हेल्प ऑप्शनमध्ये बदल करण्यात आला असून about and help असं त्याचं नवं नाव असणार आहे.
प्रोफाइल पिक्चर आता पूर्वीप्रमाणे चौकोनी नाही तर गोलाकार पाहायला मिळेल. नव्या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप पूर्णपणे फ्री करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर पेमेंटचा ऑप्शनही हटविण्यात आला आहे. नव्या अपडेटमध्ये अॅपचा स्पीड आणि बग यातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत.
कपिलची बायको काजोलच्या भावासोबत लग्न करणार
कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्ये कपिलच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी सुमोना चक्रवर्ती विवाहबंधनात अडकत आहे.
मुंबई : टीव्हीवरील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री यावर्षी विवाहबंधनात अडकत आहे. कॉमेडी नाईट्स विथ
कपिलमध्ये कपिलच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी सुमोना चक्रवर्ती विवाहबंधनात अडकत आहे.
कपिलमध्ये कपिलच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणारी सुमोना चक्रवर्ती विवाहबंधनात अडकत आहे.
सुमोनाचा होणारे पती सम्राट मुखर्जी हा बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा भाऊ आहे. सम्राट सुमोनापेक्षा 11 वर्षांनी मोठा आहे. गेली 4 वर्ष सम्राट आणि सुमोना एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सम्राटने काही बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. आशुतोष गोवारीकरच्या ‘खेले हम जी जान से’ या चित्रपटातही त्याने गणेश घोषची व्यक्तिरेखा साकारली होती.
टीम इंडियातील आणखी एक क्रिकेटपटू विवाहबंधनात
भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक शिलेदार लग्नबंधनात अडकला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मा मंगळवारी गर्लफ्रेण्ड श्वेतासोबत विवाहबद्ध झाला.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा आणखी एक शिलेदार लग्नबंधनात अडकला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहित शर्मा मंगळवारी गर्लफ्रेण्ड श्वेतासोबत विवाहबद्ध झाला.
27 वर्षीय मोहित शर्मा आणि श्वेता यांचे गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. मूळ कोलकात्याची असलेली 27 वर्षीय श्वेता हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे.
क्रिकेटपटू उन्मुक्त चंद, विरेंद्र सेहवाग, परविंदर अवाना, जोगिंदर शर्मा यांनी दिल्लीतील लीला पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्याला हजेरी लावली होती.
टाचेच्या दुखण्यामुळे मोहित शर्मा सध्या संघाबाहेर आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकालाही त्याला मुकावं लागलं. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून तो मागील पर्वापर्यंत खेळत होता.
कोलकातामध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामना
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांमधला ट्वेन्टी-20 विश्वचषकाचा सामना धरमशालाऐवजी कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानचा संघ 16 मार्चला कोलकातामध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 19 मार्चला धरमशालामध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळवला जाणार होता.
पण हिमाचल प्रदेश सरकारनं या सामन्याला सुरक्षा पुरवण्यात असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर धरमशालातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सरकारने पथक पाठवलं. या पथकाच्या अहवालावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि गृहमंत्री चौधरी निसार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर पाकिस्तानने कोलकाता आणि मोहालीत आपले साखळे सामने खेळवले जावे अशी विनंती आयसीसी आणि बीसीसीआयकडे केली होती.
बीसीसीआयने कोलकात्यात हा सामना खेळवण्यास तयारी दर्शवली असून, आयसीसीने मान्यता दिल्याने हा सामना आता कोलकात्यात खेळवला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा संघ उद्या कोलकात्यात दाखल होणार आहे.
सेनेच्या दसरा मेळाव्याला मनसेच्या पाडवा मेळाव्याचं आव्हान
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना होऊन 10 वर्ष झाली. या वर्षापासून मनसे शिवतीर्थावर गुढीपाडवा उत्सव साजरा करणार आहे. त्यामुळे ज्या शिवतीर्थावरुन बाळासाहेबांचा दसरा मेळावा व्हायचा तिथंच राज ठाकरेंची सभा होईल.
बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावरुनच गुढी पाडव्याला उत्तर देतील. यावर्षी 8 एप्रिलला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्कवरुन त्याचा श्रीगणेशा करेल.
शिवाजी पार्कावर सभा घेण्यासाठी मनसेने यापूर्वीही प्रयत्न केले. पण कोर्टाच्या कचाट्यामुळे राज ठाकरेंना ती संधी मिळाली नाही. पण 20 जानेवारी 2016 रोजी दिलेल्या कोर्टाच्या नव्या आदेशानुसार शिवाजी पार्कावर वर्षातील 45 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहेत. याचाच आधार घेत महापालिकेने मनसेला पाडव्यानिमित्त सभा घेण्याची परवानगी दिली आहे.
यापूर्वीही राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कावर 3 सभा झाल्या. 19 मार्च 2006, 3 मे 2008 आणि ऑक्टोबर 2009 मध्ये या सभा झाल्या.
लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभांच्या निवडणुकीत लोकांनी मनसेला झिडकारलं. येत्या काही महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यात मनसेच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकून टाकणं राज ठाकरेंसमोरचं मोठं आव्हान आहे.
आमटेंपासून दुरावलेल्या रेणूच्या दोन बछड्यांचाही मृत्यू
औरंगाबाद : औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयात असलेल्या रेणूची व्यथा काही कमी झाली नाही. रेणू या बिबट्याच्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिला, पण त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
रेणूला प्रकाश आमटेंच्या हेमलकसातून औरंगाबादला आणण्यात आलं. मात्र आपल्या माणसापासून दुरावल्यामुळे रेणू अस्वस्थ झाली. तिनं अन्नपाणीही त्यागलं होतं. त्यातच तिने तीन पिल्लांना जन्म दिला. पण त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. योग्य उपचार आणि आपल्या लोकांपासून दुरावल्यानंतर रेणूची प्रकृती आणखी खालावली आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयामध्ये एका नर बिबट्याची जागा रिकामी झाली. ती भरण्यासाठी प्रकाश आमटेंच्या हेमलकसातल्या राजाची निवड झाली. पण राजा आणि रेणू दुरावले, तर दोघेही अस्वस्थ होतील अशी शंका होती. त्यामुळे अखेर राजासह रेणूलाही औरंगाबादला हलवण्यात आलं.
घर दुरावलेल्या रेणूची तब्येत ढासळली. प्रकाश आणि मंदाताईंच्या आठवणींनी रेणूनं अन्न-पाणी सोडलं. तब्येत बिघडल्यानं रेणू आणि राजाचीही ताटातूट झाली आणि मग राजाही अस्वस्थ झाला. अखेर डॉक्टरांनी त्यावर तात्पुरता उपाय म्हणून अनिकेत आमटेंना फोन केला आणि मग नुसता फोनवरचा आवाज ऐकून रेणूची घालमेल आणखी वाढली. ती अनिकेतला शोधू लागली…
पिंजरे लहान आहेत की मोठे याची त्यांना पर्वा नाही.. खायला मिळतं की नाही… याचीही तमा त्यांना नाही… त्यांना हवी आहे, तीच माया, तेच प्रेम… जे त्यांच्या आई-बापांनी त्यांना दिलं… आमटेंच्या हेमलकसात… त्यामुळे
या मुक्या प्राण्यांची व्यथा कुणी ऐकणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या मुक्या प्राण्यांची व्यथा कुणी ऐकणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अर्थसंकल्प आणि मोदी सरकारचे पाच यू-टर्न
नवी दिल्ली : यूपीए सरकारच्या कार्यकाळात असे अनेक आर्थिक मुद्दे होते, ज्याचा तत्कालीन विरोधक अर्थात भाजप विरोध करत असत. यामध्ये ‘जीएसटी’ आणि आधार कार्ड हे प्रमुख होते.
भाजपने यूपीए सरकारला काळ्या पैशांच्या मुद्द्यावर घेरलं होतं. शिवाय निवडणुकीदरम्यान आश्वासन दिलं होतं की, 100 दिवसांत काळा पैसा परदेशातून भारतात आणला जाईल.
तसंच काळा पैसा असणाऱ्यांविरोधाही कारवाई केली जाईल, असंही म्हटलं होतं. पण अर्थसंकल्पात काला पैसा जमा करणाऱ्यांसाठई ‘एमनेस्टी’ची तरतूद केली होती.
कॉमेडियन रहमान खानला बलात्काराच्या आरोपाखाली अटक
वसई : स्टॅण्डअप कॉमेडियन रहमान खान याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. रहमानला कुर्ल्यातून अटक करण्यात आली. रहमान खानने ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी सर्कस’च्या माध्यमातून या क्षेत्रात ओळख निर्माण केली होती.
तक्रारदार महिला आणि रहमान खान यांची ओळख एक वर्षापूर्वी सोशल मीडियाचं अॅप व्ही चॅटवर झाली होती. रहमान खानने तिच्याकडून 2 लाख रुपये उधार घेतले होते. यानंतर महिलेने पैशांची मागणी केल्यावर त्याने तिला वसईतील एका हॉटेलमध्ये बोलावलं आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे. रहमानने बलात्काराचा व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही महिलेने आहे.
30 वर्षीय महिलेने 29 फेब्रुवारी रोजी रहमान खानविरोधात सांताक्रूझ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरणी वसईच्या वळीव पोलिस स्टेशनकडे सोपवण्यात आलं. अटक केल्यानंतर रहमानला वसई कोर्टात सादर केलं. त्यानंतर कोर्टाने त्याने 14 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रहमानने अनेक चित्रपट आणि मॅड इन इंडिया, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीजन 3 या कॉमेडी शोमध्ये काम केलं आहे.
गेलला सराव सामन्यातच गुंडाळा, भारत-विंडीज आज आमने- सामने
कोलकाता : ट्वेन्टी20 विश्वचषकाआधी आपल्या पहिल्या सराव सामन्यात आज भारताला वेस्ट इंडीजचा मुकाबला करायचा आहे. भारत आणि वेस्ट इंडीज संघांमधला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याची सुरूवात होईल.
2007 साली पहिल्या वहिल्या ट्वेन्टी20 विश्वचषकात टीम इंडियानं धोनीच्याच नेतृत्त्वाखाली विजेतेपद मिळवलं होतं. यंदाही यजमान म्हणून भारताला जाणकारांनी झुकतं माप दिलं आहे.
दुसरीकडे 2012 सालच्या ट्वेन्टी20 विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडीजची कामगिरी गेल्या काही दिवसांत चढउतारांनी भरलेली ठरली. मात्र ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेलसारख्या खेळाडूंना आयपीएलमुळं भारतीय वातावरणात खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्याचाच फायदा विंडीजला या विश्वचषकात होऊ शकतो.
त्यामुळे सराव सामन्यापासूनच गेल नावाच्या वादळाला रोखण्याचं आव्हान टीम इंडियासमोर आहे.
ओमनच्या मक्सूदने चित्त्यासारखी झेप घेत झेल टिपला
धरमशाला: ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडला पराभवाचा धक्का बसला. ओमाननं आयर्लंडवर दोन विकेट्स राखून मात केली आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात आपला पहिला विजय साजरा केला.
या सामन्यात ओमनच्या झिशान मक्सूदने जबरदस्त झेल पकडून, जागतिक क्रिकेटला आपल्या क्षेत्ररक्षणाची झलक दाखवली. मक्सूदने हवेत झेप घेत एका हाताने आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगचा झेल टिपला आणि क्रिकेटविश्वाला शानदार कॅचची दखल घेण्यास भाग पाडलं.
क्रिकेट इतिहासात ज्या काही भन्नाट कॅचेसचा समावेश आहे, त्यामध्ये आता मक्सूदने टिपलेल्या झेलचीही नोंद होईल.
घरापासून दुरावलेल्या रेणूची परवड आजही सुरुच
औरंगाबाद: घरापासून दुरावलेल्या मादी बिबट्या रेणूची परवड आजही सुरुच आहे. कारण रेणूच्या अत्यवस्थ होण्याच्या प्रकरणावरून आमटे कुटुंबीय आणि प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनामध्ये मतमतांतरे असल्याचं समोर आलं आहे.
रेणू ही गर्भवती असल्याची माहिती नव्हती अशी माहिती प्राणी संग्रहालय प्रशासनाने दिली आहे. तर दुसरीकडे रेणू गर्भवती असल्याची माहिती प्रशासनाला दिली होती, असा दावा आमटे कुटुंबियांनी केला आहे.
असं असलं, तरी रेणूवरचे उपचार हे योग्य रितीने झाल्याची प्रतिक्रिया अनिकेत आमटे यांनी दिली आहे. पण जर प्रशासनाला याची माहिती होती, तर रेणूवर योग्य आणि वेळीच उपचार का झाले नाहीत? तिच्यावर गॅस आणि अॅसिडिटीवरचे उपचार का करण्यात आले? रेणू गर्भवती असतानाही सुमारे 12 तासांचा प्रवास का करायला लावला? असे प्रश्न समोर येत आहेत.
औरंगाबादच्या प्राणी संग्रहालयत रिक्त झालेली जागा भरण्यासाठी आमटेंच्या हेमलकसा अनाथालयातून रेणू आणि राजाला आणण्यात आलं होतं. त्यानंतर रेणूची तब्येत खालावली. त्यातच रेणू गर्भवती असल्याचं लक्षात आलं. पण तिच्या तिन्ही बछड्यांना वाचवण्यात अपयश आलं. शिवाय रेणूही सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
विधानभवनात सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे. याशिवाय सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली.
अरे गोपाला गोपाला , देवकीनंदन गोपाला, घोटला घोटाला युती सरकारचा घोटाला, अशा घोषणा विरोधक देत आहेत.
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विरोधक आणखी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. कारण डान्सबार, धनगर आरक्षण, दुष्काळ आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंचा वाद हे मुद्दे विरोधकांच्या रडारवर आहेत.
डान्सबार बंदीबाबात कायदा करा, दोन्ही सभागृहात सहकार्य करु, असं आवाहन विरोधी पक्षनेत्यांनी केलं आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज याबाबत लक्षवेधी उपस्थित करतील. त्यावरून विरोधक आक्रमक होण्याचे संकेत आहेत.
याशिवाय प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे धनगर आरक्षणाबाबतच पहिला प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे या बाळासाहेबांच्या स्मारकावरुन लक्षवेधी उपस्थित करण्याचे संकेत आहेत.
सरकार दुष्काळावरुन गंभीर नसल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळं दुष्काळाच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
“अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे”
मुंबई : राज्यात 70 हजार रिक्षा परवाने परप्रांतियाना दिले जाणार आहेत, असा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंनी 70 हजाराचा आकडा कुठून आणला ते माहित नाही, असा प्रश्न विचारत रावतेंनी राज ठाकरेंवर पलटवार केला.
“मराठी येईल त्यांनाच परवाने देण्याची घोषणा मी केली होती. त्यांना मराठी येते की नाही, हे बघितल्याशिवाय त्यांना परवाने देता येणार नाही, या मतावर ठाम असल्यामुळे आतापर्यंत जवळ-जवळ 35,267 लोक परवान्यांसाठी आले होते. त्यातले 9,114 लोकं मराठी येत नसल्याने बाहेर निघाली. त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे आणि ती कायद्याची तरतूद आहे. हे जर बेगडी मराठी प्रेम असेल, तर त्यांचं मराठीप्रेम त्यांना लख लाभो.”, अशा शब्दात रावतेंनी राज ठाकरेंवर सडेतोड उत्तर दिलं.
मुलाखतीसाठी आलेल्या ज्या व्यक्तींना मराठी आले नाही, त्यांना परवाने दिले नाहीत. त्यामुळे 70 हजाराचा आकडा राज ठाकरेंनी कुठून आणला, हे मला माहित नाही, असेही रावते म्हणाले. यावेळी रावतेंनी संत रामदास स्वामींच्या पंक्तींचा आधार घेत राज ठाकरेंना टोला लगावाला. रावते म्हणाले, “अभ्यासोनी प्रकट व्हावे, ना तरी झाकोन राहावे, प्रकटोनी नासावे, हे बरे नव्हे”
आता परिवहन मंत्री दिवकार रावतेंच्या उत्तरानंतर मनसेकडून कोणती प्रतिक्रिया येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नव्या रिक्षा पेटवून द्या, राज ठाकरेंची चिथावणी
मुंबई: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हिंसक आंदोलनाची हाक दिली आहे. नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास, त्यामधील प्रवाशांना उतरुन थेट रिक्षा जाळून टाका असं चिथावणीखोर भाषण राज ठाकरे यांनी केलं आहे.
मुंबईत मनसेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमत्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात 72 टक्के परप्रांतियांना परवाने दिल्याचा आरोपही राज यांनी केला. याशिवाय राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी 70 हजार रिक्षांचे परवाने दिल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. यामध्ये राहुल बजाज यांना 1190 कोटींचा फायदा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
जे काँग्रेसच्या राज्यात, तेच भाजपच्या
रिक्षाचे परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवे. ज्या गोष्टी काँग्रेसच्या राज्यात सुरू होत्या त्याच गोष्टी भाजपच्याही राज्यात चालू आहेत. एक गोष्ट सांगतो, याच्यापुढे चाक अडकणार नाही. गेल्या दहा वर्षात अनेक चढ-उतार आले. पण हे सर्व होतच राहतं. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नशिबात विजय-पराभव या गोष्टी चालूच राहतात. लता मंगेशकर या एकमेव व्यक्ती आहेत, ज्यांनी आयुष्यात कधीच उतरता आलेख पाहिला नाही. मोठमोठ्या व्यक्तींच्या आयुष्यात चढ-उतार आले, त्यामुळे आपल्याबाबतीतही ते झालं असेल तर त्यात नवीन काहीच नाही. आपण ज्या उद्देशाने पक्ष काढलेला आहे, तो उद्देश बाजूला सारून चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
स्मृती इराणींच्या कारने अपघात झाल्यानंतर चुकीचा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. १० - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीने अपघात झाल्यानंतर पोलीस तक्रारीत गाडीचा चुकीचा क्रमांक देण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील प्रमुखाने हा दबाव टाकल्याचा आरोप अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टर रमेश नागर यांच्या मुलाने केला आहे.अभिषेक नागरने याप्रकरणी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना पत्र लिहिलं आहे. अभिषेक नागरने राष्ट्रपतींना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. स्मृती इराणींविरोधात कारवाई करण्यात नाही आली तर कुटुंबासोबत उपोषणाला बसण्याचा इशारादेखील अभिषेक नागरने दिला आहे.अपघातात माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ड्रायव्हरने तेथून पळ काढला आणि स्मृती इराणी दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. माझ्या वडिलांचा मृतदेह तसाच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर माझ्यावर पोलीस तक्रारीत DL 3C BA 5315 हा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण मी या क्रमांकाची कोणतीच गाडी पाहिलेली नव्हती. आणि या क्रमांकाची गाडी जर असेल तर मला ती पाहायची आहे. पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने हा नंबर पोलीस तक्रारीत दिला नाही तर गुन्हा नोंद न करण्याची धमकी दिली. पोलिसांनी कार जप्त केल्याचा दावा केला मात्र दाखवण्यास नकार दिला असं या पत्रात लिहिलं गेलं आहे.पोलिसांनी मात्र अशाप्रकारे कोणताही दबाव टाकला गेल्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे. कोणीही डॉक्टरच्या मुलावर दबाव टाकला नव्हता. त्यानेच दिल्लीत नोंद असलेल्या कारचा क्रमांक दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे.
=========================================
जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधानांचाच फोटो का ? सरकारचाच सवाल
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली. दि. १० - सरकारी जाहिरातींमध्ये आपलेही फोटो छापण्यात यावेत यासाठी भाजपाच्याच मंत्र्यांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एकीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मंत्र्यांना महत्व देत नसल्याचा, सर्व श्रेय स्वत: घेत असल्याचा आरोप करत असताना आता त्यांचेच मंत्री आपल्यालाही श्रेय देण्याची मागणी करु लागले आहेत. अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी सरकारी जाहीरातींमध्ये फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती आणि भारताचे मुख्य न्यायाधीश यांचाच फोटो वापरण्याच्या दिलेल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे.जाहीरातींमध्ये फक्त पंतप्रधानांचा फोटो दाखवला जात आहे. यामुळे इतर मंत्र्यांचं महत्व कमी होत आहे. प्रत्येक मंत्री हा पंतप्रधानांएवढाच महत्वाचा आहे. फक्त तीन व्यक्तींचे फोटो छापण्यास परवानगी देणे याला काही आधार नाही. मुख्यमंत्री आणि केंद्रातील इतर मंत्र्यांचे फोटो का नाही ? आपल्याकडे लोकशाही आहे आणि व्यक्तिमत्व निष्ठा तयार करणं चुकीच ठरेल असं मुकूल रोहतगी यांनी न्यायालयात सांगितलं आहे.जर एखाद्या मंत्र्याने काम केलं आहे तर त्याला ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची परवानगी दिली पाहिजे, नाहीतर पुढच्या निवडणुकीत लोक त्यांना निवडून देणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आपल्या सांघिक रचनेच्या विरोधात आहे. राज्यातील मुख्यमंत्रीही पंतप्रधानांइतकाच महत्वाचा आहे. त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यापासून त्यांना रोखू शकत नाही असं मत मुकूल रोहतगी यांनी नोंदवलं आहे. गेल्यावर्षी 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत सरकारी जाहिरातींवर फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती आणि भारताचे मुख्य न्यायाधीश यांचाच फोटो वापरण्याचे आदेश दिले होते.
'मनुस्मृती’वर बंदी नाही; प्रकाशकाचा दावा
- योगेश पांडे, नागपूर‘मनुस्मृती’ या बंदी असलेल्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून त्याची विक्री सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.राज्यातील राजकारण यामुळे तापले असताना संबंधित पुस्तकाच्या प्रकाशकाने मात्र ‘मनुस्मृती’वर बंदी नसून कायदेशीररीत्या पुस्तक प्रकाशित करण्याचा अधिकार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या पुस्तकाबाबत केंद्र व राज्य शासनाची नेमकी काय भूमिका आहे व प्रकाशकाच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे यासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.महिलांबाबत विक्षिप्त लिखाण असलेल्या या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे राज्यात संताप निर्माण झाला आहे. या गं्रथाचे भाषांतरकार, प्रकाशक, मुख्य वितरक आणि विक्रेत्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी व गं्रथाची विक्री त्वरित थांबवण्यात यावी, अशी मागणीदेखील होत आहे. यासंदर्भात या पुस्तकाचे पुण्यातील प्रकाशक राजेश सूर्यवंशी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून मनुस्मृतीच्या संस्कृत ग्रंथाचे मराठी भाषांतर असलेल्या ‘सार्थ श्रीमनुस्मृती’ या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आजपर्यंतयाला कोणीही आक्षेप घेतलेलानाही. या पुस्तकावर अद्याप कायदेशीररीत्या शासन किंवा न्यायालयाने बंदी घातलेली नाही. त्यामुळे आम्ही याचे प्रकाशन करत आहोत. जर बंदी असती तर आम्ही प्रकाशन केलेच का असते, असा प्रश्न सूर्यवंशी यांनी उपस्थित करीत बंदी असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले.> सरकारची भूमिका काय?डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा विरोध करत पुस्तकाचे जाहीरपणे दहन केले होते. ग्रंथात महिलांना कमी लेखण्यात आले असून चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार माणसाला श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्यात आले आहे. बंदीनंतरही हे पुस्तक कसे उपलब्ध होते, हा प्रश्न आहे. शासनाची पुस्तकाबाबत काय भूमिका आहे, असाही सवाल विचारण्यात येत आहे.>विरोधामागे राजकारणाचा आरोपया पुस्तकाचे भाषांतर विष्णूशास्त्री बापट यांनी अगोदरच करून ठेवले होते. या भाषांतराचे प्रकाशनदेखील अनेक वर्षांपासून होत आहे. देशातील विविध ठिकाणीमनुस्मृतीचे हिंदी, गुजराती यासारख्या विविध ५ ते ६ भाषांमध्ये भाषांतर झाले असून बाजारात ती पुस्तके विकली जात आहेत. विविध प्रकाशकांनी याचे प्रकाशन केले आहे. असे असताना केवळ मराठी प्रतच कशी काय दिसून आली असा प्रश्न उपस्थित करीत असा विरोध होणे यात कुठेतरी राजकारण दिसून येत आहे, असा आरोपदेखील सूर्यवंशी यांनी केला.>>विक्री करून दाखवाच - आव्हाडठाणे : दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारने बंदी घातलेल्या मनुस्मृतीची ठाण्यात विक्री करण्याची हिंमत करूनच दाखवा, असे आव्हान आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मनस्मृतीमध्ये वेगवेगळ््या जाती व महिलांबाबत व्यक्त झालेले विचार इतके बुरसटलेले आहेत की, पुरोगामी समाज अशा प्रतिगामी ग्रंथाला कदापि स्वीकारणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आव्हाड म्हणाले की, बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती जाळली. त्याच बाबासाहेबांनी सर्व जाती-धर्म, स्त्री-पुरुषांना समानता देणारी राज्यघटना देशाला दिल्यावर आता पुन्हा बंदी असलेल्या मनस्मृतीची विक्री करून समाजात गैरसमज का निर्माण केले जात आहेत, हेच कळत नाही. अगोदर अशी वादग्रस्त पुस्तके बाजारात आणायची आणि मग त्याला विरोध केल्यावर आमच्यावर जातीयवादाचा आरोप करायचा, हा गलिच्छ राजकारणाचा भाग आहे.इस्लामचा शरीयत असो की हिंदूंची मनुस्मृती देशाने राज्यघटना स्वीकारल्यावर आपोआपच हेधार्मिक ग्रंथ गैरलागू ठरतात. सामाजिक हित लक्षात घेऊनपुस्तक विक्रेत्यांनी मनुस्मृतीची विक्री करु नये. तसेच सरकारनेही त्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.>अमानुषतेला सरकारचे समर्थन आहे काय ?राहुल अवसरे ल्ल नागपूरबंदी असलेल्या संस्कृतमधील मनुस्मृती ग्रंथाचे मराठीत प्रकाशन करून मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असताना महिला, दलित, पीडित आणि शोषितांना गुलामगिरीकडे नेणाऱ्या मनुस्मृतीतील अमानुषतेला सरकारचे समर्थन आहे काय, असा सवाल केला जात आहे.राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेला कलंकित करणाऱ्या मनुस्मृतीची २५ डिसेंबर १९२७ रोजी जाहीरपणे होळी केली होती. महाराष्ट्र सरकारनेही दहा वर्षांपूर्वी या ग्रंथाच्या प्रकाशन व विक्रीवर बंदी घातली होती. काही काळ अंधारात गडप झालेल्या या ग्रंथाचे आताच नव्या स्वरूपात प्रकाशन करून कशी काय विक्री केली जात आहे, असा सवालही निर्माण झाला आहे.
रेल्वेच्या शौचालयातून होते दुधाची वाहतूक
- गजानन चोपडे, नागपूरआरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या दुधाची रेल्वेच्या शौचालयातून वाहतूक असल्याचे वास्तव उघड झाले आहे. गोंदियाहून सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातील शौचालयात दुधाचे कॅन ठेवले जातात. त्यामुळे नागपूरला पुरविण्यात येणारे हे दूध आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. विशेष म्हणजे, रेल्वे व्यवस्थापन आणि पोलिसांसमोर हा प्रकार चालतो. त्या विरोधात कोणीही आवाज उठवलेला नाही.शौचालयातील दुधाच्या कॅनचे छायाचित्र प्रस्तुत प्रतिनिधीने काढले. ते पाहिल्यानंतरही एकही अधिकारी त्यावर बोलायला तयार नाही. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून नागपूरसाठी दररोज १५ ते २० हजार लीटर दुधाचा पुरवठा केला जातो. गोंदिया, तिरोडा, तुमसर, वरठी स्थानकांहून दूध घेतले जाते. व्यावसायिक कोणत्याही डब्यात चढतात. जागा दिसेल तेथे दुधाचे कॅन ठेवण्यात येतात. प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून काही जण चक्क शौचालयात दुधाचे कॅन ठेवतात. प्रस्तुत प्रतिनिधीने शौचालयात जाऊन बघितले असता, दुधाचे दोन कॅन आढळले.२००५ मध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन खा. शिशुपाल पटले यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्र एक्स्पे्रसला दुधाची वाहतूक करण्यासाठी एक विशेष डबा जोडला आहे. आजही तो कायम आहे. मात्र, जागेनुसार आरक्षित डब्यात दुधाचे कॅन ठेवले जातात.दुधाची वाहतूक करण्यासाठी एक डबा पुरेसा नसून, अजून एका डब्याची आवश्यकता आहे. आरक्षित डब्यातून दुधाची वाहतूक करणे हे नियमाचे उल्लंघन आहे, असे एका व्यावसायिकानेही मान्य केले.
संयुक्त अरब अमिरातीला पावसाचा जबर फटका
- अबुधाबी : संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्रीय हवामान खात्याने देशाच्या अनेक भागांत बुधवारी जोरदार पाऊस आणि पूर आल्याचे जाहीर केले. गुरुवारपासून शाळा तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. जोरदार पाऊस, गारा, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचे हवामान आणखी आठवडाभर असेच राहील असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. शिवाय त्सुनामीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी पाऊस आणि पुराने वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.दुबईतील काही रस्त्यांवर (विशेषत: जेबल अली भाग) खूपच पूर आला होता, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली व कार पुराच्या पाण्यात अडकून पडू लागल्या. शेख झायेद रस्ता पाण्याने वेढला गेला होता. दुबई पोलिसांनी सांगितले की, आणीबाणीच्या परिस्थितीतील ३,२०० फोन कॉल्स आले. आम्ही सकाळी सहा ते दुपारी एक या कालावधीत वाहतुकीच्या २५३ अपघातांची नोंद केली.कार्यालयात जर कार ठेवण्यात आली असेल तर ती तेथेच ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले.शहराभोवतीच्या अनेक रस्त्यांवर पूर आला असून, मीडिया सिटी, नॉलेज व्हिलेज, जुमेईराह ३ आणि जुमेईराह १ मध्ये पूर आला आहे. हवामान केंद्राने देशात अस्थिर हवामान असेल असे म्हटले.
उडणाऱ्या विमानाचे दार उघडण्याचा दारुड्याचा प्रयत्न
- लंडन : विमान ३० हजार फूट उंचीवर असताना ब्रिटिश प्रवाशाने त्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान तातडीने फ्रान्समधील विमानतळावर उतरविण्यात आले. ३० ते ३५ वयाचा हा प्रवासी दारूच्या नशेत होता.‘डेली मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार ईझी जेट कंपनीचे हे १८० प्रवाशांचे एअरबस ए ३२० विमान सोमवारी मार्केच (मोरोक्को) येथून लंडनच्या गेटविक येथे जात होते.प्रवाशांनी सांगितले की, हा प्रवासी विमानात बसताच दारू पिवू लागला. विमानाचे उड्डाण होताच तो स्वत:ला आवरू शकला नाही व जागेवरून उठून तो दार उघडण्यासाठी निघाला. त्याच्या मैत्रिणीने त्याला अडवायचा प्रयत्न केल्यावर त्याने तिलाही ढकलून दिले.ईझी जेटच्या प्रवक्त्याने हा प्रकार दुर्मिळ असून तो आम्ही गांभीर्याने घेतला आहे. या व्यक्तीवर आम्ही खटला चालवू, असे सांगितले. फ्रान्सचे पोलीसही या घटनेची चौकशी करीत आहेत.
भाजप नेते आत्राम यांच्या घरातून शिंग,बंदुका जप्त
गडचिरोली - भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांच्या घरात वनकर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात चितळाचे शिंग, मांसाचे तुकडे, काडतुसे तसेच बंदुका सापडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत आत्राम यांच्या घरात चौकशी सुरू होती. आघाडी सरकारच्या काळातील राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे ते लहान बंधू होत. धर्मरावही त्यावेळी चिंकारा शिकार प्रकरणात चांगलेच गाजले होते.
अहेरी परिक्षेत्रात येणाऱ्या रामपूर बिटातील दोडेपल्ली या गावातील आनंदराव तोर्रेम यांच्या घरी चितळ कापत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यांनी तोर्रेम यांच्या घरी छापा टाकून चितळाचे मांस व वापरण्यात आलेल्या अवजारासह त्याला ताब्यात घेतले. चौकशी सुरू केली असता, मोठी धक्कादायक माहिती पुढे आली. राजनगरीतील भाजप नेते तथा जि. प. गडचिरोलीचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम यांनीच शिकार केली. माझ्या बैलबंडीतून आणून आपण ती कापल्याची माहिती तोर्रेम यांनी वनाधिकाऱ्यांना दिली.
मंगळवारी (ता. आठ) उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांसह चितळाची शिकार केलेल्या ठिकाणचा मोक्का पंचनामा केला. काडतुसांचा शोध घेतला; पण ते मिळाले नाहीत. नंतर लगेच उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांनी सर्च वॉरंट काढून मंगळवारी दुपारी तीनला रवींद्रबाबा आत्राम यांच्या घराची झडती घेतली. त्यात शिकार केलेल्या चितळाचे खूर, चरबी, केस आढळून आले. विविध प्रकारच्या बंदुका, काडतुसे, जुने शिंगे आढळून आली. चौकशीदरम्यान रवींद्रबाबा आत्राम हे घरी नसल्यामुळे त्यांना ११ मार्चला चौकशीकरिता नोटीस बजावण्यात आल्याची माहिती चौकशी अधिकारी रवी अग्रवाल यांनी दिली. या प्रकरणातील आरोपी आनंदराव तोर्रेम याला अहेरी न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी दिली आहे. उर्वरित पाच आरोपींचा शोध वनविभाग घेत आहे.
=========================================काळवीट शिकार; सलमानने नोंदविला जबाब
जोधपूर- काळवीट शिकार प्रकरणी शस्त्रास्त्र बंदी कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या खटल्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने आज (गुरुवार) जोधपूर न्यायालयात जबाब नोंदविला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 एप्रिलला होणार आहे.
सलमानला जबाब नोंदविण्यासाठी आज हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज सलमान न्यायालयात हजर झाला होता. सलमानचा जबाब नोंद झाल्यानंतर या प्रकरणात अखेरची सुनावणी होणार आहे.
एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये गेला असताना सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणी खटला सुरू असून मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाचा निकाल देण्यात येणार होता, मात्र काही साक्षीदारांच्या तपासणीसाठी परवानगी देण्यात आल्याने प्रकरण प्रलंबित राहिले.
=========================================इशरत जहॉं प्रकरणासंबंधीची फाईल गायब
नवी दिल्ली - इशरत जहॉं चकमक प्रकरणासंबंधीची फाईल गृह मंत्रालयाला मिळत नसल्याचे वृत्त एका स्थानिक इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
इशरत जहॉं चकमक प्रकरणी तत्कालिन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दुसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तसेच या प्रकरणी तत्कालिन महाधिवक्ता यांनीही आपले मत नोंदवले होते. मात्र या सर्व नोंदी असलेली आणि फाईल गृहमंत्रालयातूून गहाळ झाली आहे. या प्रकरणी 6 ऑगस्ट 2009 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात इशरत जहॉंसह अन्य तिघे दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मात्र 30 सप्टेंबर 2009 साली दिलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हे सर्व जण दहशतवादी नसल्याचे म्हटले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या तत्कालिन सरकारने नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
इशरत जहॉं चकमक प्रकरणी तत्कालिन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दुसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र सादर केले होते. तसेच या प्रकरणी तत्कालिन महाधिवक्ता यांनीही आपले मत नोंदवले होते. मात्र या सर्व नोंदी असलेली आणि फाईल गृहमंत्रालयातूून गहाळ झाली आहे. या प्रकरणी 6 ऑगस्ट 2009 साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात इशरत जहॉंसह अन्य तिघे दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मात्र 30 सप्टेंबर 2009 साली दिलेल्या दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हे सर्व जण दहशतवादी नसल्याचे म्हटले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या तत्कालिन सरकारने नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर सरकार शांत- जेडीयू
नवी दिल्ली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लोकांना डिवचत असूनही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार शांत आहे, अशी टीका संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे.
जेडीयूचे नेते के.सी. त्यागी यांनी म्हटले की, "निवडणुकांतील पराभवामुळेच निराश झालेले राज ठाकरे गरीब उत्तर भारतीयांविरूद्ध वक्तव्य करत आहेत.‘ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील राज्यातील सरकार ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल शांत बसून असल्याबद्दलही त्यागी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "ते (राज ठाकरे) लोकांना डिवचत असतानाही महाराष्ट्र सरकार या प्रकरणी शांत बसून आहे.‘
परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले सत्तर हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीसाठी व त्यांच्या लाभासाठी देण्यात येत आहेत. हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात येत आहे. सत्तर टक्के परवाने परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत, मराठी तरुणांवर हा अन्याय असल्याचे म्हणत नवीन रिक्षा दिसल्यास जाळून टाका, असा खळबळजनक आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
=========================================
उत्तर कोरियाकडून दोन क्षेपणास्त्रांची चाचणी
सेऊल - उत्तर कोरियाने पूर्वेकडील किनाऱ्यावर दोन कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाने केला आहे.
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियातील वोन्सन शहराजवळील किनाऱ्यावर या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. आज पहाटे 5.20 मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. सेऊलपासून हे ठिकाण 500 किमी अंतरावर आहे. उत्तर कोरियाकडून सतत कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने उत्तर कोरियावर निर्बंध घालूनही त्यांच्यावर क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. उत्तर कोरियाने जानेवारीत हायड्रोजन बॉम्ब आणि गेल्या महिन्यात रॉकेट चाचणी घेतली होती.
==================================================================================
=========================================
No comments:
Post a Comment