[अंतरराष्ट्रीय]
१- व्हियतनाम; भिन्न पितृत्वाची जुळी मुले!
२- मॉस्को; शारापोव्हाला धक्का, तीन मोठ्या ब्रँड्सकडून करार स्थगित
३- दोहा; ट्राफिक जाममध्ये वाघ अडकतो तेव्हा...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
५- यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आज, पूर्वेकडील राज्यातून दिसणार ग्रहण
६- बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
८- मेडीगड्डा करारामुळे तेलंगणात दिवाळी, महाराष्ट्रात शिमगा
९- विनाहेल्मेट विद्यार्थ्यांना कॉलेजप्रवेश नको, पुणे पोलिसांचं पत्र
१०- आरक्षणासाठी धनगर समाजाचं खंडेरायाला साकडं
११- राधे मॉंच्या भेटीवरून जानकर वादाच्या भोवऱ्यात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- बेळगाव; माजी मंत्र्यांच्या विहिरीत तब्बल 40 बॉम्ब सापडले
१३- म्हणून महिला दिनाच्या कार्यक्रमात महापौरांची मान खाली
१४- लांबसडक केसांना कात्री, कॅन्सरपीडितांसाठी महिलांचा त्याग
१५- पती निधनानंतर खंबीर उभ्या महिलांना हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन
१६- मुंबईतल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला पुत्रप्राप्ती
१७- वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- महिला दिन ८ मार्चलाच का?
१९- सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली
२०- पाक टीम भारतात येणार की नाही, संभ्रम कायम
२१- भारताविषयी इतका तिरस्कार का, आफ्रिदीचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
२२- घरच्यांसाठी मी नकोशी मुलगी होते : कंगना
२३- महिला दिन विशेष : महिलाा सुरक्षेसाठी सात बेस्ट अॅप
२४- तुमचा नवराही घरी येऊन हा प्रश्न विचारतो?....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
२६- विवाहितेची परराज्यात विक्री करणाऱ्या सात जणांना पोलीस कोठडी
२७- महिलांनी अन्यायाचा प्रतिकार करावा - दहिया
२८- अपंग कल्याण व पुनर्वसनावरील १ कोटी निधी अखर्चित
२९- मुखेड; पाणी भरण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनीच्या पायावर गेला टँकर. दुसरा विद्यार्थी गंभीर
३०- हिमायतनगर; दहावीच्या विद्यार्थिनीला फूस लावून पळविले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भगवान बहिरे, अतुल राठोड, शुभम चव्हाण, बंडू पावडे, सदाशिव पवळे, श्रीनिवास मोरे, सुरेश झंवर, आशुतोष जमदाडे, रजत अल्सातवार, अहेम शेख, मनोज बूब, मंगेश जोशी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
विवेक हाती धरून घेतलेले काम अखेरपर्यंत करीत राहणं, यात जीवनाची सार्थकता आहे
(शुभम आपरे नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================

2011 च्या विश्वचषकातील पराभवानंतर मायदेशी परतलेल्या पाकिस्तान संघाला पत्रकारांनी घेरलं. धरमशालामध्ये झालेल्या त्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती.
आफ्रिदीवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र एका प्रश्नावर आफ्रिदीनेच पत्रकारांना धारेवर धरलं.
भारताविरुद्ध पुढच्या वेळी खेळताना तुमच्यावर मानसिक दडपण असेल का, असा सवाल एका पत्रकाराने
आफ्रिदीला विचारला. तेव्हा उत्तर देताना आफ्रिदीनेच त्याला धारेवर धरलं.
पाकिस्तानी नागरिक भारतावर खार खाऊन का आहेत, हे मला कळत नाही. भारताविषयी तुमच्या मनात इतका तिरस्कार का आहे, इतरही अनेक संघ आहेत, मग भारताविषयीच कटुता का, असा प्रतिप्रश्न शाहिदने विचारला.
===========================================
===========================================
===========================================
मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील केमोथेरपीमध्ये अनेक महिलांचे केस गळतात. म्हणूनच अनेक महिलांनी आपले केस कापले, काही जणींनी पूर्ण टक्कल केलं.
केशदानाचा हा उपक्रम मुंबईच्या जसलोक रुग्णालयात राबवण्यात आला. महिला दिनानिमित्त दिवसभरात 80 हून अधिक महिलांनी आपले केस दान केले.
===========================================
माजी वर्ल्ड नंबर वन मारिया शारापोव्हाने आपण उत्तेजक तपासणीत दोषी आढळून आल्याचा गौप्यस्फोट केल्यापासून टेनिसविश्वात खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये एका पत्रकार परिषदेत मारियानं तशी कबुली दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेनं तिचं तात्पुरतं निलंबन केलं असून, पुढील सुनावणीनंतर शारापोव्हावर जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.
ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे, चौकशी चालू असेपर्यंत हा करार स्थगित राहील, असं म्हणत नाईकीने शारापोव्हाची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर टॅग ह्युअर या स्विस घड्याळ कंपनीने त्यांची डील नूतनीकृत न करण्याचं जाहीर केलं आहे. 31 डिसेंबर 2015 रोजी हा करार संपला होता, त्यानंतर हा करार न वाढवण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
===========================================
पुण्यातील अनेक महाविद्यालयांच्या हाती ही पत्रकं पडली आहेत. आणि त्याप्रमाणे महाविद्यालयांनी अंमलबजावणी करायलाही सुरुवात केली आहे.
===========================================
===========================================
===========================================
===========================================
गेली 18 वर्ष शिवशक्ती महिला मंडळ अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतं. पतीच्या पश्चात संकटांचा धीराने सामना करणाऱ्या सामान्य घरातील महिलांची यानिमित्ताने दखल घेण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 21 महिलांना हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन घडवण्यात आलं.
हेलिकॉप्टर राईडनंतर सर्व महिला आपले अनुभव कथन करणार आहेत.
===========================================
स्त्रीरोगतज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा आणि डॉ. कुसूम झवेरी यांनी हर्षाची प्रसूती केली. 1986 रोजी हर्षा या मुंबईतील पहिल्या टेस्ट टयुब बेबीचा जन्म झाला होता. हर्षाच्या जन्माच्या वेळीही डॉ. इंदिरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2003 साली वडिलांचे निधन झाल्यानंतर हर्षाने स्वबळावर समर्थपणे घर चालवण्याची जबाबदारी सांभाळली होती. आई-वडिलांकडून जे प्रेम, आनंद मिळाला तितकेच प्रेम आता आपल्या मुलाला देण्याची हर्षाची इच्छा आहे.

राधे मॉंच्या भेटीवरून जानकर वादाच्या भोवऱ्यात
मुंबई - वेगवेगळी विधाने करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणखी एका वादात सापडले आहेत. वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे मॉं यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जानकर बोरिवलीच्या आश्रमात दाखल झाले, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेची सारवासारव करताना जानकर यांची दमछाक झाली आहे.

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही महत्त्वाचं असेल.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विश्वास देण्याचं आव्हान सरकारपुढे आहे. तर याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत.
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभेचं हे दुसर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 9 मार्च ते 13 एप्रिल दरम्यान अधिवेशन चालणार असून 18 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आज, पूर्वेकडील राज्यातून दिसणार ग्रहण
मुंबई: या वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आज होणार आहे. मात्र, भारतात हे सूर्यग्रहण आंशिक पाहायला मिळालं. पूर्वेकडच्या राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसलं. इंडोनेशिया, सुमात्रा, ऑस्ट्रेलियात सूर्यग्रहण स्पष्टपणे पाहायला मिळालं.
नेहरु तारांगणाच्या संचालक डॉ. रत्ना श्री यांनी सांगितलं की, ‘जिथे जिथे सूर्योदय लवकर होतो तिथे ग्रहण जास्त पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच पूर्वेकडील राज्यांमध्ये हे सूर्यग्रहण पाहायला मिळालं.’
कधी होतं सूर्यग्रहण:
जेव्हा सूर्य आणि पृथ्वी आणि चंद्र सरळ एका रेषेत येतात त्यावेळी संपूर्ण सूर्यग्रहण होतं. अशावेळी भर दिवसाही अंधार होतो.
कुठे कुठे दिसणार सूर्यग्रहण:
भारतमध्ये सिलिगुडी, गुवाहटी, कूचबिहारी, पुरी, विशाखापट्टणण, चेन्नई आणि कन्याकुमारी यासह भारताच्या पूर्वेकडील राज्यात पाहायला मिळणार आहे. तसंच इम्फाळमध्ये जवळजवळ 1 तास 21 मिनिटं सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे.
सचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली
कोलकाता : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. विशेष म्हणजे स्वत: हार्दिक पंड्याने हे सांगितलं आहे. “तू 12 महिन्यांत भारतीय क्रिकेट संघासाठी खेळशील, असं सचिन मागील वर्षी आयपीएलदरम्यान म्हणाला होता,” असं पंड्याने सांगितलं.
पंड्याने पदापर्णानंतर 11 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये दहा विकेट्स घेतल्या असून पाच डावांमध्ये 62 धावाही ठोकल्या आहेत.
पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या म्हणाला की, “आयपीएलदरम्यान सचिन म्हणाला होता की, मी पुढील एक किंवा दीड वर्षात भारतासाठी खेळेन. यानंतर सात महिन्यांतच माझी भारतीय संघात निवड झाली.”
नेहराच्या सल्ल्यामुले गोलंदाजीत सुधारणा!
आशिष नेहरासोबतच्या जोडीबाबत विचारलं असता पंड्याने सांगितलं की, “नेहरा भाईने मला खुपच मदत केली आहे. मी नेहमीच त्याचा सल्ला घेतो. तो अनेक वर्ष भारतासाठी खेळाला आहे. त्याच्या सल्ल्यामुळे माझ्या गोलंदाजीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.”
पाक टीम भारतात येणार की नाही, संभ्रम कायम
नवी दिल्ली : टी 20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार की नाही, असा प्रश्न अजून कायम आहे. पाकिस्तानी संघाला आजच भारतात दाखल होणं आवश्यक होतं. मात्र पाक संघ आज येणार नसल्याची माहिती मिळत आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथं टी 20 सामना होत आहे. मात्र पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणावरुन इथं खेळण्यास नकार दिला आहे.
आधी हिमाचल सरकारने या सामन्याला सुरक्षितता पुरवण्यास नकार दिला होता. मात्र केंद्र सरकारने पाकला सुरक्षेची हमी दिली आहे.
खरंतर मंगळवारीच पाकिस्तानच्या पथकानं भारतातील सुरक्षा व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त केल्याची माहिती ट्वेन्टी20 विश्वचषकाचे टुर्नामेंट डिरेक्टर एम. के. श्रीधर यांनी दिली होती. आयसीसीनंही भारतातील सुरक्षा व्यवस्थेची हमी दिल्यानं पीसीबीनं आपला संघ भारतात पाठवण्याची तयारी सुरू केली. पाकिस्तानी खेळाडूंना आज दुपारपर्यंत निघण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आलं होतं.पण पाकिस्तान सरकारनं धरमशालामध्ये आपल्या खेळाडूंना पाठवण्यास नकार दिल्याचं समजतंय.
बेळगाव; माजी मंत्र्यांच्या विहिरीत तब्बल 40 बॉम्ब सापडले
बराच काळ हे बॉम्ब पाण्यात राहिल्यामुळे गंजून गेले आहेत. सापडलेल्या बॉम्बची पाहणी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी करणार आहेत. त्यांना याविषयी कळविण्यात आले आहे .
बेळगाव : संकेश्वर येथील शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना, 40 बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळच असलेल्या शेतात हे बॉम्ब सापडल्याने आश्चर्य आणि भीती व्यक्त होत आहे.
माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. गाळ काढताना सायंकाळी कामगारांना काही बॉम्ब आढळले. कामगारांनी घाबरून लगेच त्याची माहिती मालकांना दिली. मालकांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिस लगेच आले आणि त्यांनी तेथे सापडलेले चाळीस बॉम्ब ताब्यात घेतले.
बराच काळ हे बॉम्ब पाण्यात राहिल्यामुळे गंजून गेले आहेत. सापडलेल्या बॉम्बची पाहणी मराठा लाईट इन्फंट्रीचे अधिकारी करणार आहेत. त्यांना याविषयी कळविण्यात आले आहे . त्यांनी पहिल्यानंतरच हे बॉम्ब कोणते आणि कोठून आले असावेत यावर प्रकाश पडणार आहे .
म्हणून महिला दिनाच्या कार्यक्रमात महापौरांची मान खाली
मुंबई : मुंबईतील महापौर बंगल्यात महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावेळी ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्यांनी महापौरांना पुरस्कारवापसी केल्याने महापौर स्नेहल आंबेकर यांची मान शरमेनं खाली गेली.
गेल्या वर्षी ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्या महिलांना पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार वर्षभरात ‘राईट टू पी’ संदर्भात महिला शौचालयांचं काम मार्गी न लागल्यानं परत करण्यात आला. प्रशासनाच्या धीमेपणानं काम होऊ शकत नसल्याचं कारण महापौरांनी पुढे केलं.
‘राईट टू पी’ तर्फे पत्र :
महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुताऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनाचे संघटन (मुंबई) Right To PEE
दिनांक: 8 मार्च 2016
मा. स्नेहल आंबेकर
महापौर
बृहन्मुंबई महानगरपालिका
मुंबई
विषय : 2015 महापौर पुरस्कार परत करण्याबाबत
हे पत्र आम्ही आपणास अत्यंत खेदपूर्वक लिहित आहोत, आपणास माहित आहेच आम्ही मुंबई मधील 33 सामाजिक संस्था संघटना मिळून 2011 पासून गेली पाच वर्ष महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुताऱ्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एकत्रित प्रयत्न करीत आहोत.
आज ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन, वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी Right To PEE मोहिमेला sanitation मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासोबत महापौरांनी आश्वासनही दिले होते वर्षभरात किमान बदलाचे… पण तो बदल झाला नाही.
महापौर सन्मान हा प्रतिष्ठेचा सन्मान आहे त्यामुळे बदलाच्या प्रक्रियेने त्याचा सन्मान वाढला पाहिजे पण गेल्या वर्षभरात ना बजेटची अंमलबजावणी झाली, ना प्रत्यक्ष महिला मुताऱ्या, ना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह, ना आपणास याची दखल घ्यावीशी वाटली. 2016-17 मधील अर्थसंकल्पात तर महानगरपालिकेला तरतूद करण्याचाही विसरच पडला.
आमची भूमिका ठाम आहे हा पुरस्कार परत करण्याच्या माध्यमातून Right To PEE मोहिम आपणास प्रश्न विचारु इच्छिते की अजून किती काळ? एकीकडे स्वच्छ भारताचा डंका पिटतोय “स्मार्ट सिटी” चा प्लान करतोय आणि दुसरीकडे ह्याच स्मार्ट शहरात महिलांना लघवीच्या अधिकारासाठी गेली 5 वर्ष रस्त्यावर यावं लागतं याहून शरमेची दुसरी गोष्ट नाही.
एकीकडे आपण ज्या प्रश्नावर उल्लेखनीय काम करतोय म्हणून ज्या प्रशासनाकडून पुरस्कार दिला जातो तेच प्रशासन ह्याच प्रश्नाकडे असंवेदनशीलपणे पाहत असेल तर ह्या पुरस्काराची पाटी Right To PEE सोबत लावणे हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे जागतिक महिला दिनी आम्ही हा पुरस्कार परत करत आहोत.
भारताविषयी इतका तिरस्कार का, आफ्रिदीचा पत्रकाराला प्रतिप्रश्न
मुंबई : टी20 विश्वचषकाच्या तोंडावर टीम इंडियासह सर्वच सहभागी संघ कंबर कसून तयारी करत आहेत. भारताचा पारंपरिक शत्रू पाकिस्तान संघासोबत होणाऱ्या हाय व्होल्टेज मुकाबल्याची सर्वच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा टी20 कर्णधार शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
2011 च्या विश्वचषकातील पराभवानंतर मायदेशी परतलेल्या पाकिस्तान संघाला पत्रकारांनी घेरलं. धरमशालामध्ये झालेल्या त्या सामन्यात पाकिस्तानला भारताकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती.
आफ्रिदीवर पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र एका प्रश्नावर आफ्रिदीनेच पत्रकारांना धारेवर धरलं.
भारताविरुद्ध पुढच्या वेळी खेळताना तुमच्यावर मानसिक दडपण असेल का, असा सवाल एका पत्रकाराने
आफ्रिदीला विचारला. तेव्हा उत्तर देताना आफ्रिदीनेच त्याला धारेवर धरलं.
पाकिस्तानी नागरिक भारतावर खार खाऊन का आहेत, हे मला कळत नाही. भारताविषयी तुमच्या मनात इतका तिरस्कार का आहे, इतरही अनेक संघ आहेत, मग भारताविषयीच कटुता का, असा प्रतिप्रश्न शाहिदने विचारला.
तेव्हा तिरस्कार नाही, शत्रुत्वाविषयी आम्ही बोलतोय, अशी सारवासारव पत्रकाराने केली. त्यावर पाकिस्तानातील प्रत्येक घरात भारतीय टीव्ही शो पाहिला जातो, लग्न सोहळे भारतीय पद्धतीने केले जातात. तुम्ही भारताच्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार करायला हवा. क्रिकेट हा खेळ आहे, युद्ध नव्हे, असं म्हणत आफ्रिदीने पत्रकाराला झाडलं.
घरच्यांसाठी मी नकोशी मुलगी होते : कंगना
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत भलेही लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असेल, तिने अनेक पुरस्कार जिंकले असतील. पण घरचे माझ्या जन्माने खुश नव्हते, त्यांच्यासाठी मी नकोशी होते, असं सांगत कंगनाने जुन्या आणि दु:खद आठवणींना उजाळा दिला.
मुंबईत एका पत्रकार परिषदते कंगना रनौत बोलत होती. कंगनाला मोठी बहिणी रंगोली आणि छोटा भाऊ अक्षत आहे.
याशिवाय पुरुषांच्या आनंदाची काळजी करणारी निस्वार्थी महिला अशा पद्धतीने भारतीय महिलांना सादर करणं बंद करावं, असं आवाहन 28 वर्षीय कंगनाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केलं.
कंगना म्हणाली की, ” माझ्या आई-वडिलांना रंगोलीच्या आधी (बहिण) एक मुलगा होता, ज्याचा जन्माच्या दहा दिवसांतच मृत्यू झाला. त्याचं नाव हिरो होतं. माझे आई-वडिलांना त्याच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का बसला होता. त्यानंतर रंगोलीचा जन्म झाला, त्यांना खूप आनंद झाला. तिची चांगली काळजी घेण्यात आली.”
“पण ज्यावेळी माझा जन्म झाला तेव्हा माझे आई-वडिल विशेषत: माझी आईला हे स्वीकारणं कठीण जात होतं की, घरात आणखी एका मुलीचा जन्म झाला आहे. घरात पाहुणे आले की, मी नको असलेली मुलगी होती याची कहाणी त्यांच्यासमोर सांगितली जायची, हे माझ्या लक्षात आहे,” असंही कंगनाने सांगितलं.
हे वारंवार ऐकणं माझ्यासाठी वेदनादायी असायचं. मी कधीही मुलं मुलीपेक्षा श्रेष्ठ असतात हे जुने विचार मानत नाही, असंही कंगनाने ठामपणे सांगितलं.
मेडीगड्डा करारामुळे तेलंगणात दिवाळी, महाराष्ट्रात शिमगा
मुंबई : मेडीगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या करारामुळे तेलंगणात दिवाळी आणि महाराष्ट्रात शिमगा अशी स्थिती झाली आहे. तेलंगणा आणि महाराष्ट्रात झालेल्या या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे.
या करारामुळे सिरोंचा तालुक्यासह महाराष्ट्रातील काही गावं आणि शेकडो एकर बागायती जमीन पाण्याखाली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान करणारा हा करार मुख्यमंत्री फडणवीस यांनी का स्वीकारला असा प्रश्न विचारला जात आहे.
आज मुंबईत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मेडीगड्डा करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानंतर तेलंगणात अक्षरश: जल्लोष सुरु झाला आहे. सिरोंचातील पाच प्रकल्पांमुळे तेलंगणा हिरवंगार होणार आहे.
लांबसडक केसांना कात्री, कॅन्सरपीडितांसाठी महिलांचा त्याग
मुंबई : लांब आणि काळेभोर केस म्हणजे स्त्रियांच्या सौंदर्याचं प्रमाण मानलं जातं. मात्र महिला दिनाच्या निमित्ताने मुंबईतल्या काही महिलांनी इतर महिलांसाठी आपल्या या सौंदर्याचा त्याग केला. कॅन्सर पेशंटसाठी या महिलांनी मोठ्या हौसेने वाढवलेले केस कापून टाकले आहेत.
मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील केमोथेरपीमध्ये अनेक महिलांचे केस गळतात. म्हणूनच अनेक महिलांनी आपले केस कापले, काही जणींनी पूर्ण टक्कल केलं.
केशदानाचा हा उपक्रम मुंबईच्या जसलोक रुग्णालयात राबवण्यात आला. महिला दिनानिमित्त दिवसभरात 80 हून अधिक महिलांनी आपले केस दान केले.
शारापोव्हाला धक्का, तीन मोठ्या ब्रँड्सकडून करार स्थगित
मॉस्को : टेनिसस्टार मारिया शारापोव्हाच्या गौप्यस्फोटानंतर तिला एक धक्का मिळाला आहे. नाईकी पाठोपाठ पोर्श, टॅग ह्यूअर यासारख्या नामांकित ब्रँड्सनी शारापोव्हासोबत असलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी वर्ल्ड नंबर वन मारिया शारापोव्हाने आपण उत्तेजक तपासणीत दोषी आढळून आल्याचा गौप्यस्फोट केल्यापासून टेनिसविश्वात खळबळ माजली आहे. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये एका पत्रकार परिषदेत मारियानं तशी कबुली दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेनं तिचं तात्पुरतं निलंबन केलं असून, पुढील सुनावणीनंतर शारापोव्हावर जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.
ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे, चौकशी चालू असेपर्यंत हा करार स्थगित राहील, असं म्हणत नाईकीने शारापोव्हाची स्पॉन्सरशीप रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर टॅग ह्युअर या स्विस घड्याळ कंपनीने त्यांची डील नूतनीकृत न करण्याचं जाहीर केलं आहे. 31 डिसेंबर 2015 रोजी हा करार संपला होता, त्यानंतर हा करार न वाढवण्याचं त्यांनी ठरवलं आहे.
याशिवाय पोर्श या कार कंपनीनेही कुठल्याही अॅक्टिव्हिटीज करण्यास नकार दिला आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असं पोर्शतर्फे सांगण्यात आलं आहे.
विनाहेल्मेट विद्यार्थ्यांना कॉलेजप्रवेश नको, पुणे पोलिसांचं पत्र
पुणे : पुण्यात परिवहन मंत्र्यांनी हेल्मेटसक्ती केल्यानंतर सर्वपक्षीय विरोध झाला. काही दिवसांनी हेल्मेटसक्तीचं भूतही शिथील झालं. परंतु पुणे पोलीस आणि परिवहन खात्यानं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापरावं यासाठी थेट महाविद्यालयांनाच पत्रकं पाठवली आहेत.
हेल्मेटसक्तीमुळे उठलेलं वादळ जरासं शांत होत आहे, परंतु हेल्मेट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी आणि ते बंधनकारक करण्यासाठी आता पुणे पोलीस आणि परिवहन विभागानं पुढाकार घेतला आहे. दोन्ही विभागांकडून एक संयुक्त पत्रक पुण्यातील 1400 महाविद्यालयांना पाठवलं आहे.
पुण्यातील अनेक महाविद्यालयांच्या हाती ही पत्रकं पडली आहेत. आणि त्याप्रमाणे महाविद्यालयांनी अंमलबजावणी करायलाही सुरुवात केली आहे.
या सक्तीला पुणेकरांचा विरोध असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मात्र हेल्मेटसक्ती योग्य असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. पुणेकरांना हेल्मेटचं वावडं असलं तरी एका रात्रीत सक्ती करण्यापेक्षा ती हळूहळू प्रत्येक पातळीवर होताना दिसत आहे. दुचाकीवरुन भरधाव जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अंकुश ठेवण्याची आणखी एक जबाबदारी आता महाविद्यालयांच्या खांद्यावर आली आहे.
आरक्षणासाठी धनगर समाजाचं खंडेरायाला साकडं
मुंबई : येत्या अधिवेशनात पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आरक्षणासाठी धनगर समाज आता थेट त्यांचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरुच्या खंडेरायाला साकडं घालणार आहे. याशिवाय धनगर समाजाची जेजुरी गड ते विधानभवन अशी बाईक रॅली निघणार आहे, .
धनगर समाज उद्या सकाळी नऊ वाजता जेजुरी गडावर सरकारच्या नावाने भंडारा उधळत पूजा करणार आहे. त्यानंतर गडावरुन निघणारी धनगर समाजाची ही बाईक रॅली 10 तारखेला मुंबईत येणार आहे.सत्तेत आल्यावर पहिल्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असं आश्वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र सत्तेत येताच फडणवीस सरकाला याचा विसर पडला आहे, असा आरोपा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.
महिला दिन विशेष : महिलाा सुरक्षेसाठी सात बेस्ट अॅप
मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक अॅप्स सध्या प्ले स्टोअर तसंच आयस्टोअरवर उपलब्ध आहेत. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी सात सेफ्टी अॅप्स सांगत आहोत, ज्याद्वारे त्यांना कुठेही एकटी असल्याचं जाणवणार नाही.
सेफ्टीपिन (Safetipin)
महिलांसाठी बनलेल्या सेफ्टी अॅप्समध्ये हे सर्वोत्तम आहे. पर्सनल सेफ्टी लक्षात घेऊन हे अॅप बनवलं आहे. यात जीपीएस ट्रॅकिंग, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आणि सेफ लोकेशनचा रस्ता सांगण्यासारखे सर्व आवश्यक फीचर्स आहेत. यात सुरक्षित आणि असुरक्षित जागा पिन असतात. तुम्ही स्वत:देखील अशा जागा पिन करु शकता जिथे कोणतीही अडचण नसेल. तुम्ही यात अनसेफ जागाही पिन करु शकता, ज्यामुळे इतरांना मदत होईल. सेफ्टीपिन इंग्लिशसह हिंदी आणि स्पॅनिश भाषांमध्येही उपलब्ध आहे.

रक्षा- वुमन सेफ्टी अलर्ट (Raksha – women safety alert)
महिला सुरक्षित राहाव्या यासाठी रक्षा अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. यामधील एक बटण असं आहे, ज्यावर क्लिक केल्यावर तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमचं लोकेशन आणि अडचणींबाबत माहिती मिळेल. यात तुम्ही कॉन्टॅक्ट निवडू शकता, ज्यांना तुमच्या लोकेशनबाबत कळेल. अॅप सुरु न करताही तुम्ही वॉल्यूमचं बटण 3 सेकंद प्रेस करुन अलर्ट पाठवू शकता. यामध्ये SOS फंक्शनही आहे, ज्याद्वारे इंटरनेट नसलेल्या ठिकाणी अडकलात तरी SMS पाठवू शकता.
तुमचा नवराही घरी येऊन हा प्रश्न विचारतो?....
मुंबई : भारतातील अनेक घरात नवरा रात्री उशिरा घरी पोहोचतो आणि बायको जेवण वाढताना नवरा तिला विचारतो, आज संपूर्ण दिवस तू काय केलंस? कदाचित ही तुमच्याही घरातील नेहमीची कहाणी असेल.
जागतिक महिला दिनानिमित्त मायडिया या कंपनीने सर्व गृहिणींना सलाम केला आहे. गृहिणी हा 24 तासांचा जॉब आहे आणि त्यांच्यामुळे आपलं आयुष्य सुकर होतं, असा मेसेज या व्हिडीओद्वारे देण्यात आला आहे.
आपण 21 व्या शतकात जगत असलो तरी आजही अनेकांनी मानसिकता आणि विचार जुनेच असतात. घराबाहेर जाऊन पैसे कमावून आणणाऱ्यालाच महत्त्वाचं मानलं जातं. भलेही पत्नी किंवा गृहिणी दिवसभरात एक क्षणही आराम न करता काम करुन थकली असेल, तिला रात्री नवऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं, तिने दिवसभर काय केलं?
घरची कामं हे नेहमीच कमी दर्जाची मानली जातात. घरातलं काम असतंच किती, असं नवऱ्याला वाटत असतं. त्याच्या नजरेत गृहिणींचं काम फक्त टीव्ही पाहणं आणि शॉपिंग करणं इतकंच असतं.
पती निधनानंतर खंबीर उभ्या महिलांना हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन
प्रातिनिधीक फोटो
मुंबई : पतीच्या निधनानंतरही खंबीरपणे मुलांचा सांभाळ करणाऱ्या स्त्रियांना महिला दिनानिमित्त सलाम करण्यात आला. शिवशक्ती महिला असोसिएशनतर्फे अशाच काही महिलांना मुंबईत मोफत हेलिकॉप्टर सफर घडवली.
गेली 18 वर्ष शिवशक्ती महिला मंडळ अनोख्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतं. पतीच्या पश्चात संकटांचा धीराने सामना करणाऱ्या सामान्य घरातील महिलांची यानिमित्ताने दखल घेण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 21 महिलांना हेलिकॉप्टरने मुंबई दर्शन घडवण्यात आलं.
हेलिकॉप्टर राईडनंतर सर्व महिला आपले अनुभव कथन करणार आहेत.
मुंबईतल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला पुत्रप्राप्ती
मुंबई : टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने जन्माला आलेली मुंबईतली पहिली मुलगी आई झाली आहे. 29 वर्षांच्या हर्षा चावडाने सोमवारी सकाळी जसलोक रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीला हर्षाच्या घरी बाळाचं आगमन झालं.
स्त्रीरोगतज्ञ डॉ. इंदिरा हिंदुजा आणि डॉ. कुसूम झवेरी यांनी हर्षाची प्रसूती केली. 1986 रोजी हर्षा या मुंबईतील पहिल्या टेस्ट टयुब बेबीचा जन्म झाला होता. हर्षाच्या जन्माच्या वेळीही डॉ. इंदिरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हर्षाच्या जन्मानंतर डॉ. हिंदुजा यांनी जवळपास 15 हजार टेस्ट ट्यूब बेबींची प्रसुती केली आहे. टेस्ट ट्यूब अत्यंत सामान्य जीवन व्यतीत करु शकतात, हे अधोरेखित झाल्याची भावना डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी व्यक्त केली.
2003 साली वडिलांचे निधन झाल्यानंतर हर्षाने स्वबळावर समर्थपणे घर चालवण्याची जबाबदारी सांभाळली होती. आई-वडिलांकडून जे प्रेम, आनंद मिळाला तितकेच प्रेम आता आपल्या मुलाला देण्याची हर्षाची इच्छा आहे.
स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा
- नवी दिल्ली, दि. ९ - स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे.अलाहाबादमधील वकील उमेश शर्मा यांनी ही याचिका केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन केल्याने त्याचा आकर्षकपणा कमी होईल, त्यामुळे त्यावर देण्यात येणा-या धोक्याच्या सूचनेकडे लक्ष जाईल असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? जे अजिबात धुम्रपान करत नाहीत त्यांना कॅन्सर झाल्याच्या घटना आहेत तर दुसरीकडे धुम्रपान करुन देखील अनेक वर्ष जगणारी लोकदेखील आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्राकडून उत्तरदेखील मागवलं आहे.याचिकाकर्ते उमेश शर्मा यांना गुटखा आणि धुम्रपानाचं व्यसन आहे. ते सध्या जीभ आणि तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 2020 पर्यंत 1.5 दशलक्ष लोकांचा तंबाखू आणि धुमप्रानाच्या व्यसनामुळे मृत्यू होणार असल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आल्याचं उमेश शर्मा यांनी सांगितलं आहे.
बँकांची सर्वोच्च न्यायालयात याचिका मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना
- नवी दिल्ली, दि. ९ - उद्योगपती विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. मात्र बँकांनी याचिका करण्यास उशीर केला आहे कारण विजय मल्ल्या अगोदरच काही दिवसांपुर्वी देश सोडून गेले आहेत.१७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका केली आहे. न्यायालयानेदेखील बुधवारी या याचिकेवर सुनावणीला सहमती दर्शविली आहे. मात्र विजय मल्ल्या देश सोडून गेल्याची कल्पनाच बँकांना नाही आहे. विजय मल्ल्या यांच्या प्रवक्तेने मलाही ते कुठे आहेत याची माहिती नाही, मी फक्त मेलद्वारे त्यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.सार्वजनिक बँकांच्यावतीने अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याचिका सादर करताना तातडीने सुनावणीची विनंती केली होती. मल्ल्यांच्या विविध कंपन्यांनी कर्ज उचलले असल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह १७ सार्वजनिक बँकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. ही थकित रक्कम हजारो कोटी रुपयांच्या घरात असल्याचे रोहतगी यांनी सांगितले आहे. दियाजियोकडून ५१५ कोटींची डील झाल्यानंतर विजय माल्या यांनी लंडनमध्ये स्थायिक होण्याचे संकेत दिल्याने बँकांनी ही याचिका केली होती. या याचिकेत विजय मल्ल्या यांचा पासपोर्ट जप्त करण्याची तसंच त्यांची संपत्ती जाहीर करण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
वडवली हत्याकांड : सुबियाची आर्त हाक शेजाऱ्यांच्या कानावर गेली असती
- हसनैन वरेकरने बहिण बत्तुल आणि आई असगडी यांच्यावर सुऱ्याने वार केल्यानंतर तो बहिण सुबियाच्या मागे लागला. जीव वाचवण्याकरिता ती बेडरुममध्ये शिरली आणि तिने कडी लावून घेतली. सुबियाला धमकावण्याकरिता घराचा मुख्य दरवाजा उघडून हसनैन बाहेर आला होता. त्यावेळी सुबियाची आर्त हात ऐकून आजूबाजूचे धावून आले असते व त्यांनी हसनैनला पकडले असते तर हा क्रुरकर्मा पोलिसांच्या हाती लागला असता, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे मत आहे.सुबियाने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर यावे याकरिता तोतिची मुलगी अल्फीयाला ठार मारण्याची धमकी देत होता. ही धमकी देताना तो काही काळ घराबाहेर आला होता. परंतु लागलीच सावध होत त्याने पुन्हा घराचा मुख्य दरवाजा बंद केला. हसनैन बाहेर असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला जेरबंद केला असता तर आपल्या कृत्यामागील कारणमिमांसा करण्याकरिता तो आज कोठडीत असता. हसनैनने प्रथम दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. तो न तुटल्याने त्याने घराच्या बाहेर जाऊन सुबियाला धमकावले. घराबाहेर उभा राहून हसनैन काही काळ ओरडत होता. मात्र त्याच्याकडे लक्ष न देता सुबियाने बहिण शबिनाचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला. हसनैन घराबाहेर असताना पकडला गेला असता किंवा सुबियाला तो फोन सुरु करता आला असता तर कदाचित चित्र वेगळे असते, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.रात्री पावणेबारा वाजता सुबियाने पती सोजब भरमार यांना फोन केला व मुलगी सतत रडत असल्याने घ्यायला येण्याची विनंती केली होती, परंतु रात्र बरीच झालेली असल्यामुळे त्यांनी सकाळी येतो, असे सांगितले. सोजब तासभरात वरेकरांच्या घरी आले असते, तरी हसनैन हे कृत्य करायला धजावला नसता किंवा जिवंत पकडला गेला असता, असे काहींचे म्हणणे आहे.आणखी काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत..
व्हियतनाम; भिन्न पितृत्वाची जुळी मुले!
- हनॉई (व्हिएतनाम): व्हिएतनाममध्ये एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून जुळी मुले झाली असल्याची वस्तुस्थिती वैज्ञानिक चाचणीनंतर समोर आली आहे. अशी घटना विरळी असली, तरी वैज्ञानिकदृष्ट्या ती अघटित मात्र नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.ही जुळी मुले आता दोन वर्षांची आहेत. जन्मापासूनच रंगरूपाने वेगळ््या दिसणाऱ्या या मुलांमधील भिन्नता दिवसेंदिवस वाढत गेल्यावर कुटुंबात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मुले जुळी आहेत हे खरे, पण त्यातील एक मूल कदाचित प्रसूतिगृहात जन्माच्या वेळी बदलले गेले असावे, अशी शंकाही उपस्थित झाली. यातून निर्माण झालेला ताणतणाव असह्य झाल्यावर सोक्षमोक्ष करून घेण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या जुळ््या मुलांना घेऊन राजधानी हनॉईमधील ‘सेंटर फॉर जेनेटिक अॅनेलिसिस अँड टेक्नॉलॉजिस’मध्ये घेऊन आले. तेथे माता-पिता व दोन्ही जुळ््या मुलांच्या ‘डीएनए’ चाचण्या करण्यात आल्या. त्यातून या जुळ््यांची आई एकच असली, तरी बाप मात्र वेगवेगळे असल्याचा निष्कर्ष निघाला.व्हिएतनाम जेनेटिक असोसिएशनचे अध्यक्ष ले दिन्ह लुआँग यांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या निष्कर्षाने त्या जुळ््या मुलांच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. आता या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, यावर ते विचार करीत आहेत.सरकारी व्हिएतनाम न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, हे अजब जुळे जन्माला आलेले कुटुंब देशाच्या उत्तरेकडील होआ बिन्ह प्रांतातील आहे. या दाम्पत्यातील ३५ वर्षांचा पती हा या दोन जुळ््यांपैकी फक्त एकाचाच जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले आहे. या जुळ्यांपैकी एका मुलाचे केस दाट व कुरळे, तर दुसऱ्याचे विरळ व सरळ आहेत.डीएनए चाचणी करताना गोपनीयता पाळण्याची हमी देण्यात आल्याचे कारण देऊन वृत्तसंस्थेने या प्रकरणी अधिक तपशील दिलेला नाही.
ट्राफिक जाममध्ये वाघ अडकतो तेव्हा...!
- ऑनलाइन लोकमतदोहा, दि. ८ - एखादा वाघ ट्राफिक जाममध्ये अडकतो आणि वाहनांच्या रांगेत स्वत:ला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय असे मजेशीर वाटणारे पण अंगावर शहारे आणणारे दृश्य असलेला व्हिडिओ मंगळवारी सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला. हा फुटेज आॅनलाईन व्हायरल होताच कतार या छोट्याशा आखाती देशाची राजधानी असलेल्या दोहाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास चालविला आहे.अतिशय वर्दळीच्या दोहा एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या गर्दीत कारच्या मागे वाघ फिरत असतानाचे दृश्य सोशल मीडियावर कुतुहलाचा विषय ठरले. यू-ट्यूब आणि टिष्ट्वटरवरील २० सेकंदाच्या दृश्यात वाघ ट्राफिक लेनमधून धावतानाही दिसतो. तो एका ट्रकमधून पडल्याचे प्रारंभीच्या दृश्यात दिसते. आणखी एका दृश्यात वाघाला सुरक्षित पकडण्यात आल्याचे दिसते. श्रीमंत आखाती देशांमध्ये वाघ पाळणेही असाधारण मानले जात नाही. त्यामुळे हा वाघ पाळलेला तर नव्हता? याचा शोध घेतला जात आहे.
महिला दिन ८ मार्चलाच का?
- ऑनलाइन लोकमतदरवर्षी जगभरात ८ मार्च हा ' जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगभरातील विविध क्षेत्रातील महिलांचे कौतुक करत आणि त्यांच्याप्रती सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. तसेच अर्थ, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थही हा दिवस साजरा केला जातो. मात्र ८ मार्चलाच हा दिवस का साजरा होतो?८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने करत कामाच्या ठिकाणी सुधारणा करण्याची मागणी केली. दहा तासांचा दिवस व कामाच्या जागी सुरक्षितता या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. तसेच लिंग, वर्ण, संपत्ती व शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे करण्यात आली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला आणि तो पारितही झाला. त्यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
राधे मॉंच्या भेटीवरून जानकर वादाच्या भोवऱ्यात
मुंबई - वेगवेगळी विधाने करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून देणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आणखी एका वादात सापडले आहेत. वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे मॉं यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जानकर बोरिवलीच्या आश्रमात दाखल झाले, याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेची सारवासारव करताना जानकर यांची दमछाक झाली आहे.
जानकर यांनी राधे मॉं यांचे बुधवारी आशीर्वाद घेतले. मंत्रिपदासाठी जानकर यांनी राधे मॉंच्या आशीर्वादाचा आधार घेतल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर जानकर यांनी या वृत्ताचे खंडन केले. माझ्या मित्राने केलेल्या आग्रहास्तव आपण राधे मॉंच्या आश्रमात गेल्याचे स्पष्टीकरण जानकर यांनी दिले.
===========================================
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी भाजपला साथ दिली. निवडणुकीच्या प्रचारापासूनच जानकर यांनी वेगवेगळी विधाने करण्यास सुरवात केली. भाजपप्रणीत राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाही तर सरकारला खाली खेचू, असा इशारा त्यांनी अनेकदा दिला होता. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रसंगी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा कॉंग्रेसला समर्थन देण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. सध्या भाजपने त्यांना विधान परिषदेतील आमदार केले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरूनही जानकर यांनी भाजपला इशारे दिले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार कॉंग्रेसपेक्षा भयानक असल्याची टिप्पणी करणाऱ्या जानकर यांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आणखी खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भविष्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे त्यांनी जाहीर करून टाकले.
No comments:
Post a Comment