[अंतरराष्ट्रीय]
१- सिरीया; दोन महिलांचं धाडस, सीरियातील ISISच्या जुलमी राजवटीचं चित्रण
२- भारतप्रेम महागात, आफ्रिदीला कायदेशीर नोटीस
३- कराची; भारताचे कौतुक करता? लाज वाटू द्या: मियांदाद
४- बोर्न; मॅसॅच्युसेट्समध्ये आढळले अतिदुर्मिळ राईट व्हेल्स
५- वॉशिंग्टन; 27 टक्के मुस्लिम दहशतवादी - ट्रंप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- इशरत जहाँ गहाळ फाईल प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
७- भुवनेश्वर; अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
८- जातिवर आरक्षण धोरणाचा पुनर्विचार नाही: जेटली
९- संघानी बिकनी घातली तरी फरक नाही- पुनिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकऱ्यांना द्या : नाना
११- कोल्हापूरला टोलमुक्ती, बारामतीला का नाही? : अजित पवार
१२- बाळासाहेब ते अक्षयकुमार सर्वांना भारावून टाकणारे दादा
१३- हे सरकार दाऊदला काय परत आणणार: शिवसेना
१४- शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सांगली; सांगलीतल्या झोपडीत सापडलेल्या तीन कोटीचं गूढ उकललं
१६- लातूर; गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी
१७- लुधियाना; बेपत्ता झालेली चिमुकली नग्नावस्थेत आढळली
१८- नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा एकावर हल्ला
१९- चेन्नई; प्रेमविवाह केल्याने दलित युवकाची हत्या
२०- सोलापूर; महापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी
२१- इगतपुरी; टिश्यू कल्चर संशोधनाने किशोर राष्ट्रीय पातळीवर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 24 मार्चपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी
२३- भारत-न्यूझीलंड सामन्याने सुपर टेनच्या लढाईला सुरुवात
२४- आफ्रिदी तू भारतातच राहा, पाकिस्तानात येऊ नको - पाक क्रिकेटप्रेमी
२५- आईचे पिढीजात घर खरेदी करून तिला भेट देणे हीच 'माझी विश' - आमिर खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनाचे दोन नियम - बहरा फुलासारखं; पसरा सुगंधासारखं
[वैष्णवी बोद्दुल्ला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
======================================
======================================

======================================

======================================

======================================

======================================

======================================

एका स्थानिक अॅडव्होकेटकडून शाहिद आफ्रिदीला नोटीस बजावण्यात आली आहे. “जितना प्यार भारत में मिलता है, उतना प्यार पाकिस्तान मे भी नहीं मिलता है” असं आफ्रिदी म्हणाला होता.
======================================

======================================
======================================
======================================
======================================
======================================
हे सरकार दाऊदला काय परत आणणार: शिवसेना
नवी दिल्ली - आर्थिक फसवणूक व गैरव्यवहाराचा आरोप असलेले किंगफिशर एअरलाईन्स या बुडित कंपनीचे संचालक व उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यासंदर्भातील केंद्र सरकारच्या मवाळ धोरणास शिवसेनेकडून आज (सोमवार) लक्ष्य करण्यात आले.
"ललित मोदी वा विजय मल्ल्या यांसारख्या व्यक्तींना मुळात भारत सोडून इतर देशांत जाता येतेच कसे? त्यांच्या हालचालींची माहिती ठेवण्यासाठी आपल्याकडे इतक्या सुरक्षा संस्था आहेत. हे पूर्णत: व्यवस्थेचे अपयश असून मल्ल्या यांच्या व्यक्तिगत सामर्थ्य व प्रभावाचा येथे काहीही संबंध नाही. भारताचे नागरिक असलेल्या मल्ल्या यांनाही परत आणू न शकणाऱ्या सरकारकडून मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा "डॉन‘ दाऊद इब्राहिम याला भारतात परत आणण्यासंदर्भातील मोठमोठे दावे केले जात आहेत,‘‘ अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली
======================================
जातिवर आरक्षण धोरणाचा पुनर्विचार नाही: जेटली
नवी दिल्ली - देशातील जातिवर आधारित आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव नसून सध्याचे धोरणच कायमच राहिल, असे केंद्र सरकारतर्फे आज (सोमवार) स्पष्ट करण्यात आले. समाजामधील समृद्ध वर्गांस रोजगार व शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आरक्षण असू नये, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे नुकतीच जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, सरकारचे हे स्पष्टीकरण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे.
आरक्षणासंदर्भातील धोरण हे असेच सुरु राहिल, असे राज्यसभेचे नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये सांगितले. संघाच्या या भूमिकेसंदर्भात समाजवादी पक्ष ब बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी संसदेमध्ये विरोध व्यक्त केल्यानंतर सरकारतर्फे आरक्षणाचा पुनर्विचार होणार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. याचबरोबर, संघानेही सध्याचे आरक्षणासंदर्भातील धोरण बदलावे वा रद्द करावे, असे विधान केले नसल्याची पुस्ती जेटलींनी यावेळी जोडली.
सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी सध्याचे आरक्षण धोरण बंद पाडण्याचे हे कारस्थान असल्याची टीका यावेळी केली; तर बसपच्या नेत्या मायावती यांनी राज्यघटनेमध्ये दलित व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची स्पष्ट तरतूद केली असतानाही संघाच्या नेत्यांनी आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप केला.
======================================
भारताचे कौतुक करता? लाज वाटू द्या: मियांदाद
कराची: ‘पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या मायदेशापेक्षा भारतामध्ये जास्त प्रेम आणि आपुलकी मिळते,‘ या शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी कडाडून टीका केली. ‘अशी वक्तव्ये करणाऱ्या खेळाडूंना लाज वाटायला हवी,‘ असे मियांदाद म्हणाले.
ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि अनुभवी शोएब मलिकने भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ‘भारतामध्ये कधीही असुरक्षित वाटले नाही,‘ असा सूर आफ्रिदी आणि मलिकने लावला होता. विशेष म्हणजे, भारतातील सुरक्षाविषयक ‘चिंते‘मुळे पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास विलंब केला होता. "भारतामध्ये खेळणे आम्हाला नेहमीच आवडते. पाकिस्तानपेक्षा जास्त पाठिंबा आम्हाला भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मिळतो,‘ असे आफ्रिदी म्हणाला होता. यावर मियांदाद यांनी टीका केली.
======================================
24 मार्चपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी
संघानी बिकनी घातली तरी फरक नाही- पुनिया
लखनौ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पॅंट किंवा बिकनीत राहिले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, असे कॉंग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोशाखात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पांढरा हाप शर्ट आणि खाकी हाप चड्डीऐवजी आता पांढरा शर्ट आणि तपकिरी रंगाची फुल पॅंट असा स्वयंसेवकांचा यापुढे पोशाख असणार आहे. यावर बोलताना पुनिया म्हणाले, ‘आरएसएस‘ वाल्यांच्या डोक्यामध्येच विष आहे. यामुळे त्यांनी पॅंट अथवा बिकनी घातली तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही.‘
‘भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेत असून ते त्यांच्यात बदल करत आहेत. अर्धी चड्डीच्या जागेवर त्यांनी पूर्ण पॅंट आणली आहे,‘ असे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
======================================
लुधियाना; बेपत्ता झालेली चिमुकली नग्नावस्थेत आढळली
लुधियाना (पंजाब)- बेपत्ता झालेली दोन वर्षांची चिमुकली रेल्वे कॉलनीजवळ नग्नावस्थेत आढळून आली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी येथे आलेल्या चिमुकलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी घराशेजारील 14 वर्षांचा मुलगा तेथे दिसला होता. काही वेळानंतर मुलगी घराबाहेर न दिसल्याने शोध सुरू करण्यात आला. एका बंद खोलीमध्ये जाऊन पाहिले असता मुलगी नग्न व बेशुद्धावस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती पोलिसांना देऊन चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.‘
पोलिसांनी सांगितले की, ‘याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. संबंधित मुलगाही बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी बलात्कार व खुनाचा प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमकुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.‘
======================================
मॅसॅच्युसेट्समध्ये आढळले अतिदुर्मिळ राईट व्हेल्स
बोर्न (मॅसॅच्युसेट्स) - अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स या राज्यातील अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीस लागून असलेल्या "केप ओड बे‘ भागामध्ये देवमाशांच्या प्रजातीमधील (व्हेल) अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या राईट व्हेल्सचे वास्तव्य आढळून आले आहे. राईट व्हेल्स हे जगातील अत्यंत दुर्मिळ प्रजातींपैकी एक मानले जातात.
राईट व्हेल्सची जगातील एकूण संख्या सुमारे 500 आहे. या संख्येपैकी निम्मे राईट व्हेल्स केप कोड बे येथे आढळल्याने जीवशास्त्रज्ञ, अभ्यासक व छायाचित्रकारांच्या उत्साहात वाढ झाली आहे. या सागरी भागामध्ये राईट व्हेल्ससाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचे मत येथील सागरी अभ्यास विभाग केंद्रामधील अधिकारी चार्लस मेयो यांनी व्यक्त केले आहे.
======================================
शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा एकावर हल्ला
नाशिक - जिल्ह्यातील नळवाडीच्या कांगने मळा येथे आज (सोमवार) सकाळी बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला करत त्याला जखमी केले.
======================================
चेन्नई; प्रेमविवाह केल्याने दलित युवकाची हत्या
महापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी
सोलापूर - शास्त्रशुद्ध शिक्षण न घेताही गायन क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झालेली येथील रती कसबे हिने थेट गगनभरारी घेतली आहे. मलेशियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय गीत गायन स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. ती महापालिका कॅम्प प्रशालेत शिकत आहे. एप्रिल किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात रती मलेशियाला रवाना होईल.
आई विशाखा यांना गायनाची आवड. त्या होमगार्ड अधिकारी आहेत. महाविद्यालयात असल्यापासून त्यांना गायनाची आवड. विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्या सहभागी होतात. आई गात असल्याचे पाहूनच रतीही गाणे म्हणायला शिकली. गोड गळा लाभल्याने अतिशय सफाईदारपणे आणि लयबद्ध गाण्यात तिने हातखंडा मिळवला आहे. स्टुडंट ऑलिंपिक संस्थेने आयोजिलेल्या गायन स्पर्धेत ती सहभागी झाली आणि सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे तिची मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.
रती हिने केवळ गायन क्षेत्रातच नव्हे तर चित्रकला क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध सामाजिक संस्थांतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके मिळविली आहेत. तिने मिळविलेली पदके आणि ट्रॉफीजने त्यांचे घर भरून गेले आहे. गायन क्षेत्रात तिने यश मिळवले असले तरी, तिला एरॉनॉटिकल इंजिनिअर बनविण्याचा संकल्प तिच्या आईने केला आहे. त्यासाठी त्या अहोरात्र कष्ट घेत आहेत. रतीने दहावीची परीक्षा दिली आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कलागुणांनी तिने केवळ आपल्या कुटुंबीयांचेच नव्हे तर महापालिका शाळेचेही नाव मोठे केले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कलागुण नसतात, हा समज तिने खोटा ठरविला आहे.
======================================
टिश्यू कल्चर संशोधनाने किशोर राष्ट्रीय पातळीवर
के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकणाऱ्या किशोर एकनाथ ठाकूर याने केलेल्या टिश्यू कल्चर संदर्भातील उपयुक्त संशोधनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षक एकनाथ ठाकूर यांच्या मुलाने हलाखीच्या परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्याचा शोधनिबंध "रिसर्च जनरल मल्टिलॉजिक सायन्स‘ या मान्यवर विज्ञानपत्रिकेत प्रकाशित होईल.

======================================
27 टक्के मुस्लिम दहशतवादी - ट्रंप
१- सिरीया; दोन महिलांचं धाडस, सीरियातील ISISच्या जुलमी राजवटीचं चित्रण
२- भारतप्रेम महागात, आफ्रिदीला कायदेशीर नोटीस
३- कराची; भारताचे कौतुक करता? लाज वाटू द्या: मियांदाद
४- बोर्न; मॅसॅच्युसेट्समध्ये आढळले अतिदुर्मिळ राईट व्हेल्स
५- वॉशिंग्टन; 27 टक्के मुस्लिम दहशतवादी - ट्रंप
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- इशरत जहाँ गहाळ फाईल प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
७- भुवनेश्वर; अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
८- जातिवर आरक्षण धोरणाचा पुनर्विचार नाही: जेटली
९- संघानी बिकनी घातली तरी फरक नाही- पुनिया
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकऱ्यांना द्या : नाना
११- कोल्हापूरला टोलमुक्ती, बारामतीला का नाही? : अजित पवार
१२- बाळासाहेब ते अक्षयकुमार सर्वांना भारावून टाकणारे दादा
१३- हे सरकार दाऊदला काय परत आणणार: शिवसेना
१४- शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- सांगली; सांगलीतल्या झोपडीत सापडलेल्या तीन कोटीचं गूढ उकललं
१६- लातूर; गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी
१७- लुधियाना; बेपत्ता झालेली चिमुकली नग्नावस्थेत आढळली
१८- नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा एकावर हल्ला
१९- चेन्नई; प्रेमविवाह केल्याने दलित युवकाची हत्या
२०- सोलापूर; महापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी
२१- इगतपुरी; टिश्यू कल्चर संशोधनाने किशोर राष्ट्रीय पातळीवर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- 24 मार्चपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी
२३- भारत-न्यूझीलंड सामन्याने सुपर टेनच्या लढाईला सुरुवात
२४- आफ्रिदी तू भारतातच राहा, पाकिस्तानात येऊ नको - पाक क्रिकेटप्रेमी
२५- आईचे पिढीजात घर खरेदी करून तिला भेट देणे हीच 'माझी विश' - आमिर खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
जीवनाचे दोन नियम - बहरा फुलासारखं; पसरा सुगंधासारखं
[वैष्णवी बोद्दुल्ला, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
======================================
दोन महिलांचं धाडस, सीरियातील ISISच्या जुलमी राजवटीचं चित्रण
अल-राक्का (सीरिया) : आयसिस या इस्लामिक दशहतवादी संघटनेची जगभरात दहशत आहे. सीरिया हा आखाती देश तर आयसिसचा अडड्डा मानला जातो. याच देशातील आयसिसचा निर्दयीपणा दोन धाडसी महिलांनी छुप्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
अल-राक्का शहरात राहणाऱ्या ओम मोहम्मद आणि ओम ओमरान या दोन महिलांनी आयसीसच्या जुलमी राजवटीतील जनजीवन छुप्या व्हिडीओ कॅमेऱ्याने चित्रीत केलं आहे. अल-राक्का हे शहर इस्लामिक स्टेटचं सीरियामधील मुख्यालय आहे.
पकडल्या गेल्या असत्या तर या दोघींना दगडाने ठेचून मारलं असतं, यावरुनच त्यांनी किती मोठा धोका पत्करला होता, हे लक्षात येतं. एक्स्प्रेसिन (expressen) या स्विडीश वृत्तपत्रासाठी या दोन महिलांनी हे धाडस केलं.
2014 साली अल राक्कावर आयसीसने ताबा मिळवला, तेव्हापासून शहरावर अवकळा पसरली आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांना झाला. सुमारे 14 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये आयसीसच्या निर्दयीपणाचे अनेक नमुने आढळतात.
एकट्या महिलेला बाहेर पडता न येणं, डबल बुरखा घालण्याची सक्ती, इतकंच काय दुकानात बॉक्सवरील महिलांच्या फोटोलाही काळं फासलेलं असणं, तिला हिजाब घातला आहे, असं दुकानदाराने सांगणं, महिलेला तिचा गुन्हा न सांगताच दगडाने ठेचून मारायची शिक्षा देणं. तिथे सगळा गाव गोळा होतो, गाडीतून दगड आणतात, वली म्हणजे तिथला धर्मगुरु पहिला दगड मारतो, त्यानंतर सगळे जण तुटून पडतात, त्या बाईचे प्राण जाईपर्यंत.
बाळासाहेब ते अक्षयकुमार सर्वांना भारावून टाकणारे दादा
मुंबई : विस्कटलेले केस, ओठांवर तलवारकट मिशी, गळ्यात जाड काळा दोरा, पांढरा ढगळा शर्ट आणि लांब नाड्याची चड्डी असा मिश्किल दिसणारा माणूस कोण? हे कोणालाही विचारलं तर एकच नाव समोर येईल ते म्हणजे दादा कोंडके. द्विअर्थी विनोदांनी हास्याची सीमा ओलांडून जगाला दखल घ्यायला लावणाऱ्या दादा कोंडके यांचा आज स्मृतीदिन.
कुणी वेंधळट म्हटलं, तर कुणी भोळा, पण दादा हे दादाच होते आणि मराठी सिनेसृष्टीत त्यांची दादागिरी होती. एके 56 रायफलमधून गोळ्यांसारखे सुटणारे संवाद, सुसाट सुटलेल्या गाडीचा अचानक करकचून ब्रेक दाबावा, तसा जाणीवपूर्वक घेतलेला पॉज, यामुळे दादांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
आज कृष्णा कोंडके कोण हे विचारलं तर कदाचित कोणालाही सांगता येणार नाही. कारण या नावाचा माणूस दादा कोंडके नावानेच जगाला माहित होता. 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईच्या नायगावमध्ये दादांचा जन्म झाला. गिरणी कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्म झाल्याने त्यांचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं.
भारत-न्यूझीलंड सामन्याने सुपर टेनच्या लढाईला सुरुवात
मुंबई : शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानी फौज भारतभूमीवर दाखल झाली आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या लढाईचं वातावरण खऱ्या अर्थानं तापायला सुरुवात झाली. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधल्या चुरशीच्या सराव सामन्यानं त्या वातावरणाला जणू तडतडणारी फोडणी दिली. म्हणूनच क्रिकेटरसिक म्हणत आहेत…. अब आएगा वर्ल्ड कप का असली मजा.
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या महायुद्धाची नांदी पात्रता फेरीनं झाली असली तरी, या महायुद्धातल्या सुपर टेनच्या लढायांना मंगळवारी तोंड फुटेल. पात्रता फेरीत आलेल्या दोन संघांसह सुपर टेनमध्ये दहा संघांचा समावेश आहे. या दहा संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे.
आफ्रिदी तू भारतातच राहा, पाकिस्तानात येऊ नको
मुंबई: भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं, असं म्हणणाऱ्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहिद अफ्रिदीला, आता त्यांच्या देशातील क्रीडाप्रेमींच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर तर आफ्रिदीला अक्षरश: शिव्या घालत आहेत.
टी 20 विश्वचषकासाठी भारतात दाखल झाल्यानंतर, पाकिस्तान संघाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. “जितना प्यार भारत में मिलता है, उतना प्यार पाकिस्तान मे भी नहीं मिलता है” असे आफ्रिदी यावेळी म्हणाला होता.
आफ्रिदीच्या याच वक्तव्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांचा संताप झाला आहे. ट्विटरवरतर आफ्रिदीविरोधात मोहिमच उघडली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकऱ्यांना द्या : नाना
उस्मानाबाद : सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातव्या वेतन आयोगाचा पैसा शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशी मागणी अभिनेता नाना पाटेकर यांनी केली आहे. नाम फाऊंडेशनने आज तुळजापूरच्या अणदूर इथे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. त्यावेळी नाना बोलत होते.
सातव्या वेतन आयोगाची रक्कम प्रचंड मोठी आहे. शिवाय अनेक कर्मचाऱ्यांना न मागता पैसा मिळतो, मग गरजू शेतकऱ्यांनाही पैसा का मिळू नये. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाणारा पैसा अधिक आहे. त्यामुळे तो पैसा शेतकऱ्यांकडे वळवा, असं नाना पाटेकर यांचं म्हणणं आहे.
याशिवाय नाना पाटेकर यांनी श्रीमंतांच्या संपत्तीवर एक टक्के अधिभार लावण्याचंही समर्थन केलं. अभिनेता अक्षय कुमारने ‘माझा कट्टा’वर श्रीमंतांवरील एक टक्का अधिभार लावण्याचा मुद्दा मांडला होता.
कोल्हापूरला टोलमुक्ती, बारामतीला का नाही? : अजित पवार
मुंबई : कोल्हापूर टोलमुक्तीनंतर राज्यात आगामी काळात बारामती टोलमुक्त होण्यासाठी आंदोलन होऊ शकतं. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत बारामती टोलमुक्तीचा मुद्दा उपस्थित केला.
भारतप्रेम महागात, आफ्रिदीला कायदेशीर नोटीस
लाहोर : टी20 विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीला भारतप्रेम महागात पडण्याची शक्यता आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळत असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी आफ्रिदीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
एका स्थानिक अॅडव्होकेटकडून शाहिद आफ्रिदीला नोटीस बजावण्यात आली आहे. “जितना प्यार भारत में मिलता है, उतना प्यार पाकिस्तान मे भी नहीं मिलता है” असं आफ्रिदी म्हणाला होता.
सांगलीतल्या झोपडीत सापडलेल्या तीन कोटीचं गूढ उकललं
सांगली : मिरज इथल्या झोपडीतून मिळालेले 3 कोटी हे कर्नाटकातल्या एका खासदाराच्या संस्थेत भरायला जाणाऱ्या गाडीतून चोरल्याची कबुली आरोपी मैनुद्दीन मुल्लाने दिली आहे. पण तो खासदार कोण याबाबत मात्र पोलिसांनी कोणतीही माहिती माध्यमांना दिली नाही.
मैनुद्दीनच्या कबुलीनाम्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने बेळगाव जिल्ह्यातल्या चिक्कोडी येथे छापा टाकला. पण त्या छाप्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही.मैनुद्दीनला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे मैनुद्दीनकडून जप्त करण्यात आलेली बुलेट ही एका पोलीस कर्मचाऱ्याच्या नावे खरेदी केल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही, तर ही बुलेट तो या पोलिसाला भेट देणार होता, असंही कळतंय.
काय होतं हे प्रकरण? मैनुद्दीन मुल्लाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे?
सांगलीतल्या बैथलेहेम नगरात घबाड मिळालं. लाख दोन लाखांचं नाह,. तर तब्बल 3 कोटींचं आणि तेही झोपडीतून.
मैनुद्दीन मुल्ला… चाळीशीतला इसम… ज्याचे खाण्याचे वांदे होते… तो अचानक बुलेट घेऊन फिरु लागला… पण हीच चंगळ त्याच्या अंगलाट आली…
गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आला, त्यांनी चौकशी केली असता मैनुद्दीनकडून दीड लाख हस्तगत केले. अधिक चौकशी करताना त्याच्या घरात 3 कोटी असल्याचं समोर आलं.
गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी
- लातूर, दि. १४ - 'मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही', असं वक्तव्य ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. उदगीरमधील रॅलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांना भारत माता की जय घोषणा देण्यास शिकवावं लागेल असं म्हटलं होत, त्यावर टीका करत असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.'मी ती घोषणा देत नाही. तुम्ही काय करणार आहेत भागवत साहेब. तुम्ही माझ्या गळ्यावर चाकू ठेवलात तरी मी ती घोषणा देणार नाही', असं वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. आपल्या संविधानात कोठेही भारत माता की जय ही घोषणा प्रत्येकाने दिली पाहिजे असं सांगितलं गेलेलं नाही. जेएनयूच्या वादावर बोलताना मोहन भागवत यांनी आजकालच्या मुलांना 'भारत माता की जय' बोलायला शिकवावं लागेल असं म्हटल होतं. यावेळी बोलताना ओवेसी यांनी इशरत जहाँच्या कुटुंबाला पाठिंबा देणार असल्याचंही म्हंटल आहे.
इशरत जहाँ गहाळ फाईल प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
- नवी दिल्ली, दि. १४ - इशरत जहाँ चकमक प्रकरणातील महत्वाच्या फाईल गहाळ झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली आहे.टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेतीखाली ही समिती तपास करणार आहे. गेल्याच आठवड्यात राजनाथ सिंग यांनी लोकसभेत बोलताना इशरत जहाँ प्रकरणातील महत्वाची कागदपत्र गहाळ झाल्याची तसंच याप्रकरणी अंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती दिली होती.गुजरात उच्च न्यायालयात 29 सप्टेंबर 2009 मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातून महत्वाची कागदपत्र गहाळ झाली असल्याची माहितीही राजनाथ सिंग यांनी दिली होती. त्यावेळचे गृहसचिव जी के पिल्लई यांनी ऍटर्नी जनरल यांना लिहिलेली 2 पत्रं गहाळ आहेत. तसंच दुस-या प्रतिज्ञातपत्राचा ड्राफ्ट ज्यामध्ये पी चिदंबरम यांनी फेरफार केल्याचा आरोप आहे तेही गहाळ असल्याचं सांगितलं होतं. नरेंद्र मोदींना गोवण्यासाठी युपीए सरकारने हे सर्व केल्याचा आरोपदेखील राजनाथ सिंग यांनी केला होता.
आईचे पिढीजात घर खरेदी करून तिला भेट देणे हीच 'माझी विश' - आमिर खान
- मुंबई, दि. १४ - वाराणसीत माझ्या आईचे पिढीजात घर आहे, ते खरेदी करून तिला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे, असे बर्थडे बॉय (अभिनेता) आमिर खानने सांगितले. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो असलेला आमिर खान आज ५१ वा वाढदिवस साजरा करत असून त्यानिमित्त त्याने आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.तुझी बर्थडे विश काय, आजचा काय प्लॅन आहे, वाढदिवसाला काही संकल्प करतोस का? अशा अनेक प्रश्नांना आमिरने दिलखुलास उत्तरं दिली. माझ्या कुटुंबावर, आईवर माझं खूप प्रेम आहे. वाराणसीत माझ्या आईच मोठ पिढीजात घरं आहे, ते तिला भेट देता आलं तर मला खूप आनंद होईल, असे आमिरने सांगितले. ' दरवर्षी एखादी नवी गोष्ट वा कला शिकावी असा माझा संकल्प असतो आणि तो पूर्ण व्हावा यासाठी मी कसून प्रयत्न करतो' असेही आमिरने सांगितले.तुझा ड्रीम रोल काय असा प्रश्न विचारण्यात आला असता ' ड्रीम रोल तर बरेच आहेत, पण महाभारतातील कर्ण, कृष्ण यांच्या व्यक्तिरेखा मला खूप भावतात, प्रेरणादायी वाटतात. तशी एखादी भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल' असे आमिरने नमूद केले.
अग्नी-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- भुवनेश्वर, दि. १४ - भारतात तयार करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या न्युक्लर अग्नी-१ या अण्वस्त्रवाह क्षेपणास्त्राची ओदिशाच्या किनारपट्टीजवळ यशस्वी चाचणी करण्यात आली. जमीनीवरुन जमीनीवर ७०० कीमी पर्यंत हल्ला करण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. भारतीय लष्कराने आज सकाळी ९:११ वाजता अब्दुल कलामबेटावरुन (व्हीलर बेटे) यशस्वी चाचणी घेण्यात आली.१२ टन वजन व १५ मीटर लांबी असलेल्या अग्नि-१ क्षेपणास्त्रावरुन १ टनापेक्षा जास्त वजनाची स्फोटके वाहून नेता येणे शक्य आहे. याचबरोबर, स्फोटकांचे वजन (पेलोड) कमी करुन क्षेपणास्त्राचा पल्ला वाढविता येणेही शक्य आहे. भारतीय लष्कराच्या क्षेपणास्त्रांच्या ताफ्यामधील अग्नि हे क्षेपणास्त्र अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.या क्षेपणास्त्राच्या प्रवासमार्गाचे अत्याधुनिक रडार व नौदलाच्या जहाजांच्या सहाय्याने काटेकोर निरीक्षण करण्यात आले असे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हे सरकार दाऊदला काय परत आणणार: शिवसेना
"ललित मोदी वा विजय मल्ल्या यांसारख्या व्यक्तींना मुळात भारत सोडून इतर देशांत जाता येतेच कसे? त्यांच्या हालचालींची माहिती ठेवण्यासाठी आपल्याकडे इतक्या सुरक्षा संस्था आहेत. हे पूर्णत: व्यवस्थेचे अपयश असून मल्ल्या यांच्या व्यक्तिगत सामर्थ्य व प्रभावाचा येथे काहीही संबंध नाही. भारताचे नागरिक असलेल्या मल्ल्या यांनाही परत आणू न शकणाऱ्या सरकारकडून मुंबईतील गुन्हेगारी विश्वाचा "डॉन‘ दाऊद इब्राहिम याला भारतात परत आणण्यासंदर्भातील मोठमोठे दावे केले जात आहेत,‘‘ अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली
======================================
जातिवर आरक्षण धोरणाचा पुनर्विचार नाही: जेटली
आरक्षणासंदर्भातील धोरण हे असेच सुरु राहिल, असे राज्यसभेचे नेते व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेमध्ये सांगितले. संघाच्या या भूमिकेसंदर्भात समाजवादी पक्ष ब बहुजन समाज पक्षाच्या खासदारांनी संसदेमध्ये विरोध व्यक्त केल्यानंतर सरकारतर्फे आरक्षणाचा पुनर्विचार होणार नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. याचबरोबर, संघानेही सध्याचे आरक्षणासंदर्भातील धोरण बदलावे वा रद्द करावे, असे विधान केले नसल्याची पुस्ती जेटलींनी यावेळी जोडली.
सपाचे नेते रामगोपाल यादव यांनी सध्याचे आरक्षण धोरण बंद पाडण्याचे हे कारस्थान असल्याची टीका यावेळी केली; तर बसपच्या नेत्या मायावती यांनी राज्यघटनेमध्ये दलित व इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची स्पष्ट तरतूद केली असतानाही संघाच्या नेत्यांनी आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप केला.
======================================
भारताचे कौतुक करता? लाज वाटू द्या: मियांदाद
कराची: ‘पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या मायदेशापेक्षा भारतामध्ये जास्त प्रेम आणि आपुलकी मिळते,‘ या शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी कडाडून टीका केली. ‘अशी वक्तव्ये करणाऱ्या खेळाडूंना लाज वाटायला हवी,‘ असे मियांदाद म्हणाले.
ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि अनुभवी शोएब मलिकने भारताची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ‘भारतामध्ये कधीही असुरक्षित वाटले नाही,‘ असा सूर आफ्रिदी आणि मलिकने लावला होता. विशेष म्हणजे, भारतातील सुरक्षाविषयक ‘चिंते‘मुळे पाकिस्तान सरकारने त्यांच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी देण्यास विलंब केला होता. "भारतामध्ये खेळणे आम्हाला नेहमीच आवडते. पाकिस्तानपेक्षा जास्त पाठिंबा आम्हाला भारतीय क्रिकेटप्रेमींकडून मिळतो,‘ असे आफ्रिदी म्हणाला होता. यावर मियांदाद यांनी टीका केली.
======================================
24 मार्चपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी
मुंबई - पुढील आठवड्यात सलग चार दिवस शेअर बाजारासह बँकाही बंद राहणार आहे.
धूलिवंदन, गुड फ्रायडे, चौथा शनिवार आणि रविवार असे सलग चार दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन होळी आणि धूलिवंदनपासून रविवारपर्यंत देशभरातील बँका बंद राहणार आहेत. होळी आणि धूलिवंदन असे सणवार असल्याने एटीएममध्ये देखील रोख रक्कमेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना जवळ पुरेसे पैसे बाळगावे लागतील.
-24 मार्च (गुरूवार) - होळी
-25 मार्च (शुक्रवार) - गुडफ्रायडे
-26 मार्च (शनिवार) - (दुसर्या आणि चौथ्या शनिवारी सुटी)
-27 मार्च (रविवार)
======================================संघानी बिकनी घातली तरी फरक नाही- पुनिया
लखनौ- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) पॅंट किंवा बिकनीत राहिले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, असे कॉंग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पोशाखात बदल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पांढरा हाप शर्ट आणि खाकी हाप चड्डीऐवजी आता पांढरा शर्ट आणि तपकिरी रंगाची फुल पॅंट असा स्वयंसेवकांचा यापुढे पोशाख असणार आहे. यावर बोलताना पुनिया म्हणाले, ‘आरएसएस‘ वाल्यांच्या डोक्यामध्येच विष आहे. यामुळे त्यांनी पॅंट अथवा बिकनी घातली तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही.‘
‘भारतीय जनता पक्ष सध्या सत्तेत असून ते त्यांच्यात बदल करत आहेत. अर्धी चड्डीच्या जागेवर त्यांनी पूर्ण पॅंट आणली आहे,‘ असे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
======================================
लुधियाना; बेपत्ता झालेली चिमुकली नग्नावस्थेत आढळली
लुधियाना (पंजाब)- बेपत्ता झालेली दोन वर्षांची चिमुकली रेल्वे कॉलनीजवळ नग्नावस्थेत आढळून आली आहे. तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेशातून रोजगारासाठी येथे आलेल्या चिमुकलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘मुलगी घराबाहेर खेळत होती. यावेळी घराशेजारील 14 वर्षांचा मुलगा तेथे दिसला होता. काही वेळानंतर मुलगी घराबाहेर न दिसल्याने शोध सुरू करण्यात आला. एका बंद खोलीमध्ये जाऊन पाहिले असता मुलगी नग्न व बेशुद्धावस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती पोलिसांना देऊन चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.‘
पोलिसांनी सांगितले की, ‘याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झाला. संबंधित मुलगाही बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी बलात्कार व खुनाचा प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमकुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.‘
======================================
मॅसॅच्युसेट्समध्ये आढळले अतिदुर्मिळ राईट व्हेल्स
राईट व्हेल्सची जगातील एकूण संख्या सुमारे 500 आहे. या संख्येपैकी निम्मे राईट व्हेल्स केप कोड बे येथे आढळल्याने जीवशास्त्रज्ञ, अभ्यासक व छायाचित्रकारांच्या उत्साहात वाढ झाली आहे. या सागरी भागामध्ये राईट व्हेल्ससाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्याने त्यांची संख्या वाढत असल्याचे मत येथील सागरी अभ्यास विभाग केंद्रामधील अधिकारी चार्लस मेयो यांनी व्यक्त केले आहे.
======================================
शिवस्मारकाच्या जागेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुंबई - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) सकाळी पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज सकाळी अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या जागेवर जाऊन पाहणी केली. लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुमिपूजन होणार आहे. मेटे यांनी यापूर्वीच भूमिपूजन महाराष्ट्रदिनी 1 मेच्या दरम्यान होणार असल्याचे सांगितले होते. अखेर शिवस्मारकाच्या हालचालींना वेग आल्याचे आज दिसून आले.
2004 च्या विधानसभा निवडणुकांत शिवस्मारकाचे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला केंद्रातील भाजप सरकारने नुकताच हिरवा कंदील दाखविला होता. पर्यावरण खात्याच्या एका मंजुरीसाठी गेली 7-8 वर्षे रेंगाळलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
======================================नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा एकावर हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, बाजरीच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने शांताराम फकिरा गंगोडे यांच्या दंडाचा चावा घेतला. या हल्ल्यात ते जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.
चेन्नई; प्रेमविवाह केल्याने दलित युवकाची हत्या
चेन्नई - तमिळनाडुमधील तिरुपुर जिल्ह्यातील उडुमपेट गावात उच्चवर्णीय युवतीशी प्रेमविवाह केल्याने एका 22 वर्षीय दलित तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
ऑनर किलिंगमधून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. व्ही. संकर (वय 22) या दलित तरुणाने एस. कौशल्या (वय 19) या तरुणीशी नुकताच विवाह केला होता. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. रविवारी या दोघांना उडुमपेटमधील एका दुकानासमोर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर, या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांना सर्वांसमोर मारहाण करण्यात आली. काही नागरिकांनी मारहाण करणाऱ्यांची मोबाईलमध्ये छायाचित्रे घेतली आहेत. हल्लेखोरांनी लवकरच अटक करण्यात येईल. मुलीच्या कुटुंबीयांची कसून चौकशी करण्यात येत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
======================================महापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी
आई विशाखा यांना गायनाची आवड. त्या होमगार्ड अधिकारी आहेत. महाविद्यालयात असल्यापासून त्यांना गायनाची आवड. विविध ठिकाणी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्या सहभागी होतात. आई गात असल्याचे पाहूनच रतीही गाणे म्हणायला शिकली. गोड गळा लाभल्याने अतिशय सफाईदारपणे आणि लयबद्ध गाण्यात तिने हातखंडा मिळवला आहे. स्टुडंट ऑलिंपिक संस्थेने आयोजिलेल्या गायन स्पर्धेत ती सहभागी झाली आणि सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे तिची मलेशिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.
रती हिने केवळ गायन क्षेत्रातच नव्हे तर चित्रकला क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध सामाजिक संस्थांतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये तिने अनेक पदके मिळविली आहेत. तिने मिळविलेली पदके आणि ट्रॉफीजने त्यांचे घर भरून गेले आहे. गायन क्षेत्रात तिने यश मिळवले असले तरी, तिला एरॉनॉटिकल इंजिनिअर बनविण्याचा संकल्प तिच्या आईने केला आहे. त्यासाठी त्या अहोरात्र कष्ट घेत आहेत. रतीने दहावीची परीक्षा दिली आहे. आपल्या वैविध्यपूर्ण कलागुणांनी तिने केवळ आपल्या कुटुंबीयांचेच नव्हे तर महापालिका शाळेचेही नाव मोठे केले आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कलागुण नसतात, हा समज तिने खोटा ठरविला आहे.
======================================
टिश्यू कल्चर संशोधनाने किशोर राष्ट्रीय पातळीवर
प्लॅंट टिश्यू कल्चर प्रणालीचा वापर करून केलेल्या या संशोधनाने रोपटी, लहान झाडे, भाजीपाला, औषधी वनस्पती विषाणूमुक्त राहणार आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरीत टिश्यू कल्चरची संकल्पना जर शेतीत वापरली, तर शेतीच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. यासाठी किशोरने मायक्रोप्रोपोगेशन आणि पॅथोकेमिकल या पद्धतीचा व नंतर सारणीसह वर्गीकरण पद्धतीचा अवलंब केला आहे.
27 टक्के मुस्लिम दहशतवादी - ट्रंप
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रंप यांनी मुस्लिम समुदायाबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत जगातील मुस्लिम नागरिकांच्या एक चतुर्थांश नागरिक दहशतवादी असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वी मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये असे वक्तव्य केले होते. आता त्यांनी पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुस्लिम समुदायाविरोधात वक्तव्य केले.
ट्रंप म्हणाले की, जगभरातील मुस्लिम नागरिकांपैकी 27 टक्के मुस्लिम नागरिक हे दहशतवादी आहेत. ही संख्या आगामी काळात 35 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. असे झाल्यास जगात पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्यांच्यात खूप तिरस्कार भरला आहे. जगातील 1.6 अब्ज मुस्लिम नागरिकांपैकी 1 लाख नागरिक जिहादसाठी लढत आहेत. तुम्ही या नागरिकांचे सर्वेक्षण करु शकता, त्यानंतर मला सांगा.
======================================
No comments:
Post a Comment