[अंतरराष्ट्रीय]
१- इसिसमध्ये अंतर्गत दुफळीची चिन्हे
२- ऐतिहासिक "पालमिरा'वर पुन्हा सीरियाचे नियंत्रण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- देहरादून; उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
४- आता केवळ एका फोनवर रेल्वेचं तिकीट रद्द करा
५- बँकांचे पैसे घेऊन पसार झालेल्यांना जेलमध्ये टाकणार : मोदी
६- आयडीबीआय बँक कर्मचारी सोमवारपासून संपावर
७- मोदी सरकारचे देशापेक्षा धर्माला महत्त्व-येचुरी
८- भारताचे हवाईदल प्रमुख इस्राईल दौऱ्यावर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- देवनार आगीला शिवसेनाच जबाबदार, किरीट सोमय्यांचा आरोप
१०- लखनऊ; मुलायम सिंह यांच्या सूनबाईही राजकीय आखाड्यात
११- कॅन्व्हासवर अवतरली कुसुमाग्रजांची सुंदर नगरी
१२- मुंबई-पुणे सायकल शर्यतीत दिलवरसिंग विजेता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- जळगावात पारा चाळीशीपार, उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता
१४- धुळ्यात चहा, चॉकलेटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर गँगरेप
१५- भंडाऱ्यात पैशांच्या भांडणावरुन थोरल्या भावाची कुऱ्हाडीने हत्या
१६= सोलापुरात कंटेनरच्या धडकेत सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू
१७- अलाहाबाद; आयसिसमध्ये सहभागास नकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- युवीचा आज मोहालीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना
१९- धक्कादायक निकाल, अफगाणिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय
२०- 'कपूर ऍण्ड सन्स'ने केला 100 कोटीचा व्यवसाय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्य जितकं कठीण,
तितके तुम्ही मजबूत.
जितके तुम्ही मजबूत,
तितकं आयुष्य सोप्प....!!!
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल शिवप्रसाद राठी यांची नमस्कार लाईव्हनी घेतलेली एक्सक्लूसीव्ह मुलाखत
लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल प्रथमतः नमस्कार लाईव्ह तर्फे आपले हार्दिक अभिनंदन.....!
पश्र १- सर, लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल आपल्या थोडक्यात आपले मत वा भावना सांगा
उत्तर- आपल्या सुप्त गुणांना वाव मिळविण्यासाठी आयकॉन पुरस्काराच्या माध्यमातून जन सामन्यापर्यंत कार्याची नोंद पोहोचल्याचा आनंद होत आहे.
प्रश्न २ - आपण या उद्यागाची सुरुवात कशी केली? प्रथम कोणत्या अडचणी आल्या?
उत्तर- ज्याही कार्याची सुरुवात मी केली त्य अडचणींना मी महात्व्हाच दिले नाही. त्यामुळे सर्व अडचणी आपोआपच बाजूला झाल्या.
प्रश्न २- आपल्याला कुणाकुणाचे सहकार्य लाभले?
उत्तर- मला सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्य व ग्राहकांना देव समजून कार्य करत राहिलो. त्य सहकार्याच्या जोरावर यशाचे सर्व टप्पे संपादित केले व यशापर्यंत पोहचलो.
प्रश्न ३- आपल्या यशाचे श्रेय कोणास द्याल?
उत्तर- आजपर्यंतच्या कार्यात ग्राहक, मित्र, आप्त, घरचे सर्व मंडळीचि सहकार्यने आयकॉन पुरस्कारापर्यंत पोहचलो आहे.
प्रश्न ४- आपले भविष्यातील आणखी ध्येय कोणते?
उत्तर- आणखी मोठ्या पुरस्कारापर्यंत पोहचण्याची इच्छाशक्ती आहे.
प्रश्न ५- नवीन उद्योजकांसाठी कोणता संदेश द्याल?
उत्तर-नवीन उद्योजकांनी कष्ठ करत यश मिळवावे ही इच्छाशक्ती बाळगावी, अशा त्यांना माझ्या शुभेच्छा
धन्यवाद सर...आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल...
आपल्यास लोकमत आयकॉन मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा नमस्कार लाईव्ह तर्फे हार्दिक अभिनंदन
============================================

‘देशातल्या बँकांची परिस्थिती बिघडायला काँग्रेस सरकार जबाबदार असून, त्यांच्या कार्यकाळात धनाढ्य उद्योगपतींना बँकांचा पैसा कर्जाच्या स्वरुपात वाटला गेला. जे उद्योगपती बँकांचे पैसे घेऊन पसार झालेत त्यांना मी भारतात परत आणून जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’ असं म्हणत मोदींनी नाव न घेता मल्ल्याला इशारा दिला.

2009 साली झालेल्या त्या लढतीत टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध 207 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी युवराजनं तीन विकेट्स काढल्या होत्या आणि मग नाबाद 60 धावांची खेळी करुन भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
सध्या युवराजसिंगचा फॉर्म ढासळलेला असला तरी एका जमान्यात याच युवराजची भारताचा मॅचविनर अशी ओळख होती. 2007 साली टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकून देण्यात युवीची मोलाची भूमिका होती. आता आपल्या घरच्या मैदानात युवी काय कामगिरी बजावतो, यावर सर्वांची नजर राहील.

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण मराठवाड्यातल्या बीड आणि परभणी जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड हंगाम संपवून हे मजुर परतीच्या दिशेनं जात होते. त्यावेळी मागच्या दिशेनं आलेल्या एका कंटेनरनं त्यांच्या ट्रॅक्टरला धडक दिली.
अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. मुस्तकीम बेग, मुमताज बेग, मैरुन बेग, विमल डांबळे, विराज डांबळे आणि आरोही ढाले अशी मृतांची नावं आहेत.

रवीचे पिता पप्पूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांच्या आपल्या मुलाला त्याचे शिक्षक इरफान आयसिसमध्ये सहभागी होण्यास दबाव टाकत होते. मात्र रवीने तसं करण्यास साफ नकार दिल्याने इरफानने त्याची हत्या केली.
सायकल देण्याच्या बहाण्याने इरफान रवीला बाहेर घेऊन गेला. मात्र उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. अखेर पाल कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली.
एफआयआरमध्ये कुटुंबीयांनी आयसिसबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. शिक्षकाने सायकल देण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर नेल्याचा उल्लेख केला आहे. 19 तारखेला रवी बेपत्ता झाला, तर मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

देवनार आगीला शिवसेनाच जबाबदार, किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे आता राज्यात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये धूर तयार व्हायला लागला आहे. देवनारला लागलेल्या आगीला सत्ताधारी शिवसेना जबाबदार असून, दलाल आणि कंत्राटदारांशी शिवसेनेचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
देवनार डम्पिंगच्या कंत्राटात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून यातील नावं लवकरात लवकर समोर आणण्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. शिवाय, देवनार आग प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचं सोमय्यांनी सांगितले.
आज देवनार डम्पिंग ग्राऊंडसमोर किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी शिवसेनेवर आरोप करताना सोमय्यांनी याप्रकरणात न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.
============================================
जळगावात पारा चाळीशीपार, उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची शक्यता
जळगाव : जळगावात यंदा उष्माघाताचा पहिला बळी गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील 45 वर्षीय भागवत काळबैले यांचा अचानकपणे मृत्यू झाला.
जिल्हा बँकेत कामावर असणारे भागवत काळबैले परवा मार्च एंडिगची कामं आटोपून घरी परतले. घरी आल्यावर त्यांना चक्कर येऊन अस्वस्थ व्हायला झालं. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर काही काळ बरं त्यांना बरं वाटलं.
त्यानंतर रात्री पुन्हा त्यांना त्रास सुरु झाला. अखेर पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. काल जळगावात तब्बल 43 डिग्री तापमान नोंदवलं गेलं, त्याआधी जळगावातला पारा हा 42 डिग्री इतका होता.
============================================
उत्तराखंडमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू
देहरादून : उत्तराखंडमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. 9 काँग्रेस बंडखोर आमदारांनी पक्षाचा पाठिंबा काढल्यानंतर हरीश रावत यांचं सरकार डळमळीत झालं होतं.
उद्या सभागृहात रावत यांना आपलं बहुमत सिद्ध करायचं होतं. पण त्याआधीचं उत्तराखंडात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने 9 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. यामुळे उद्याच्या दिवशी सरकार वाचेल असा हरीश रावत यांना विश्वास होता. पण राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर काँग्रेसच्या सगळ्या हालचालीं फोल ठरल्या आहेत.
दरम्यान आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री हरिश रावत यांनी आपल्यावरील घोडेबाजाराचे सर्व आरोप फेटाळले आहेत. सत्तेसाठी केंद्रातलं भाजप सरकार छोट्या राज्यांवर दबाव टाकत असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
============================================
धुळ्यात चहा, चॉकलेटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर गँगरेप
धुळे : धुळ्यातील दोंडाईचा परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहीक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चहा आणि चॉकलेटचं आमिष दाखवत तीन नराधमांनी पीडित अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं आणि त्यानंतर आळीपाळीने मुलीवर बलात्कार केला.
22 मार्च ते 24 मार्च दरम्यान दोंडाई शहरातील म्हाळसा नगर-दादावाडी रस्त्यावर असणाऱ्या शेतात नराधमांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी आरोपींविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तीनही आरोपी अद्याप फरार असून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
============================================
भंडाऱ्यात पैशांच्या भांडणावरुन थोरल्या भावाची कुऱ्हाडीने हत्या
भंडारा : भंडारा जिल्ह्यात पैशांच्या भांडणावरुन अल्पवीयन मुलाने आपल्या मोठ्या भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भूपेश अतकरी असं मृत भावाचं नाव आहे.
होळीच्या आदल्या दिवशी आरोपी भावाने आपल्या वडिलांची खोटी सही करुन त्यांच्या खात्यातून पैसे काढले. याचा जाब विचारायला भूपेशने आपल्या भावाला रागाच्या भरात कानाखाली लगावली. त्याचाच राग मनात ठेऊन अल्पवयीन मुलाने आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली.
सुरुवातीला झाडावरुन पडल्याने भावाचा मृत्यू झाल्याचा बनावही आरोपीने केला. पण पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तपासाची सूत्र वळवली अवघ्या काही तासातचं आरोपीने आपला गुन्हा मान्य केला. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन भावाला अटक केली आहे.
============================================
मुलायम सिंह यांच्या सूनबाईही राजकीय आखाड्यात
लखनऊ : समाजवादी पक्षाने अध्यक्ष मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांना लखनऊ कँट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
समाजवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते शिवपाल सिंह यादव यांनी याबाबत माहिती दिली. अपर्णा यादव या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. सामाजिक कामांच्या माध्यमातून त्या सार्वजनिक स्तरावर सक्रीय असतात. मात्र, आता सक्रीयपणे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत.
वरिष्ठ पत्रकार आणि उत्तर प्रदेशमध्ये माहिती आयुक्त असलेले अरविंद सिंह बिष्ठ यांच्या त्या कन्या आहेत.
अपर्णा यांच्या रुपाने यदव कुटुंबातील आणखी एक जण राजकारणात पाऊल ठेवत आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मुलायम सिंह यांच्या कुटुंबातील बहुतांश जण आधीपासूनच राजकारणातील महत्त्वाच्या पदांवर आहेत.
मुलायम सिंह यांची थोरली सून आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिम्पल यादव कन्नौज लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
============================================
आता केवळ एका फोनवर रेल्वेचं तिकीट रद्द करा
नवी दिल्ली : रेल्वेतिकीट रद्द करणं आता आणखी सोपं होणार आहे. एप्रिलपासून केवळ एका फोनवर कन्फर्म तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु केली जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना 139 नंबर डायल करुन कन्फर्म तिकीटची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. त्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल. पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काऊंटरवर जावं लागेल. त्यानंतर पासवर्ड सांगून तिकीटचे पैस परत मिळतील.”
रेल्वे प्रवास भाडे नियमांमध्ये बदल केल्यानंतरही प्रवाशांना आरक्षित तिकीट रद्द करण्यात अडथळे येत होते, ज्यामुळे पैसे परत मिळत नव्हते. गरजू प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावी, म्हणून रेल्वे तिकीट रद्द करण्याची रक्कम दुप्पट करण्यात आली होती.
अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, “तिकीट दलाल आणि ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवास भाड्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. यामुळे काही गरजू प्रवाशांना अडथळ्यांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळेच आता ट्रेनचं तिकीट रद्द करण्यासाठी 139 ची सुविधा सुरु करण्यात आली आहे.”
============================================
बँकांचे पैसे घेऊन पसार झालेल्यांना जेलमध्ये टाकणार : मोदी
आसाम : 17 हून अधिक बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन लंडनला पसार झालेल्या विजय मल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मल्ल्याचं नाव न घेता मोदींनी टीका केली.
‘देशातल्या बँकांची परिस्थिती बिघडायला काँग्रेस सरकार जबाबदार असून, त्यांच्या कार्यकाळात धनाढ्य उद्योगपतींना बँकांचा पैसा कर्जाच्या स्वरुपात वाटला गेला. जे उद्योगपती बँकांचे पैसे घेऊन पसार झालेत त्यांना मी भारतात परत आणून जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही’ असं म्हणत मोदींनी नाव न घेता मल्ल्याला इशारा दिला.
============================================
युवीचा आज मोहालीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा सामना हा युवराजसिंगचा मोहालीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरण्याची शक्यता आहे. याआधी मोहालीत भारत एकदाच आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 सामना खेळला आहे.
2009 साली झालेल्या त्या लढतीत टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध 207 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी युवराजनं तीन विकेट्स काढल्या होत्या आणि मग नाबाद 60 धावांची खेळी करुन भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
सध्या युवराजसिंगचा फॉर्म ढासळलेला असला तरी एका जमान्यात याच युवराजची भारताचा मॅचविनर अशी ओळख होती. 2007 साली टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकून देण्यात युवीची मोलाची भूमिका होती. आता आपल्या घरच्या मैदानात युवी काय कामगिरी बजावतो, यावर सर्वांची नजर राहील.
============================================
सोलापुरात कंटेनरच्या धडकेत सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू
सोलापूर : सोलापुरात कंटेनरच्या धडकेत सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. विजापूरच्या होर्टी गावाजवळ काल रात्री दोन वाजता हा अपघात घडला.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण मराठवाड्यातल्या बीड आणि परभणी जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड हंगाम संपवून हे मजुर परतीच्या दिशेनं जात होते. त्यावेळी मागच्या दिशेनं आलेल्या एका कंटेनरनं त्यांच्या ट्रॅक्टरला धडक दिली.
अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. मुस्तकीम बेग, मुमताज बेग, मैरुन बेग, विमल डांबळे, विराज डांबळे आणि आरोही ढाले अशी मृतांची नावं आहेत.
============================================
आयसिसमध्ये सहभागास नकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याची हत्या
अलाहाबाद : आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमधील कासेरुआ खुर्द गावात रवी या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली.
रवीचे पिता पप्पूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांच्या आपल्या मुलाला त्याचे शिक्षक इरफान आयसिसमध्ये सहभागी होण्यास दबाव टाकत होते. मात्र रवीने तसं करण्यास साफ नकार दिल्याने इरफानने त्याची हत्या केली.
सायकल देण्याच्या बहाण्याने इरफान रवीला बाहेर घेऊन गेला. मात्र उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. अखेर पाल कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली.
एफआयआरमध्ये कुटुंबीयांनी आयसिसबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. शिक्षकाने सायकल देण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर नेल्याचा उल्लेख केला आहे. 19 तारखेला रवी बेपत्ता झाला, तर मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
============================================
धक्कादायक निकाल, अफगाणिस्तानचा वेस्ट इंडिजवर विजय
नागपूर, दि. २७ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. नवख्या अफगाणिस्तानच्या संघाने बलाढय वेस्ट इंडिजवर सहा धावांनी विजय मिळवला.
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यासारख्या बलाढय संघांवर विजय मिळवून दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश करणा-या वेस्ट इंडिजवर नवख्या अफगाणिस्तानसमोर पराभवाची नामुष्की ओढवली.
प्रथम फलंदाजी करणा-या अफगाणिस्तानने वीस षटकात सात बाद १२३ धावा करुन विजयासाठी १२४ धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजला निर्धारीत वीस षटकात आठ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारता आली.
============================================
No comments:
Post a Comment