[अंतरराष्ट्रीय]
१- भारतात दहशतवादी शिरल्याची पाकच्या NSAची माहिती
२- दक्षिण कोरिया अधिक निर्बंध लादणार
३- बांगलादेश करणार राजधर्म इस्लामचा त्याग
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
५- फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात - अनुपम खेर
६- सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा मंगळवारपासून
७- साध्वी, योगींसारख्यांना कारागृहात टाका - खेर
८- जेएनयु प्रकरण; फक्त नारेबाजी म्हणजे देशद्रोह नव्हे - वकील मिहीर देसाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- बुलढाणा; अपंगांसाठी मागण्या रास्त, मात्र बच्चू कडूंचा सूर चुकला
१०- नागपूर; ऊर्जाखात्याची ब्रॉडबँड सुविधा, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
११- डंपर आंदोलन काँग्रेसनं चिघळवलं, सेना-भाजपचा आरोप
१२- जळगाव; अपंग पिता अन् आईसमोर बाळ चोरलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- मुंबईत 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू
१४- मुंबईत बाईकर्स गँगविरोधात धडक मोहीम, वांद्रे ते विलेपार्ले नाकाबंदी
१५- तेलंगणामध्ये गँगरेपमधील आरोपींना हॉस्पिटलमध्ये घुसून महिलांचा चोप
१६- नांदेड; माहिती अधिकार तपास समितीची सर्व कार्यकारिणी बरखास्त
१७- नांदेड; एकता नगर भिमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी-2016
१८- लखनौ; अभियंते बनले यशस्वी 'चहावाले'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला
२०- भारत- बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट
२१- तुझ आयुष्य कायम 'रंगीला' राहूं दे - राम गोपाल वर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्य जितकं कठीण, तितके तुम्ही मजबूत.
जितके तुम्ही मजबूत, तितकं आयुष्य सोप्प....!!!
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
====================================

====================================

जिल्हा परिषदेच्या आवारात अपंगाच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कडूंनी प्रशासनाचा वेळकाढूपणा चारचौघात काढून दाखवला. यावेळी चर्चेसाठी आलेल्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांना कडूंनी चांगलंच सुनावलं.
”पैसा काय तुमच्या बापाचा आहे का, चर्चेची नुसती निमंत्रण देता, तुम्हाला शरम नाही का वाटत?” अशा शब्दात कडूंनी मुधोळ यांना सुनावलं.
यावेळी अपंगाच्या प्रश्नासाठी कडू यांचा कळवळा कितीही योग्य असला तरीही चारचौघात एका महिला अधिकाऱ्यासमोर आपला राग कसा व्यक्त केला जावा याबाबत कडूंनी थोडं तारतम्य बाळगायला हवं होतं.
====================================

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाला याची माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवेसाठी बीएसएनएल व्यतिरिक्त इतर कंपन्यांना संधी दिली जाणार आहे.
सध्या तोट्यात असलेल्या महा जेनको या कंपनीला याचा फायदा होईल असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं आहे.
====================================

गिरगावातल्या फणसेवाडीमध्ये बोअरवेलच्या साफसफाईचं काम सुरु होतं. रविवारी सकाळी बाळू जावळे आणि वसंत जावळे हे दोघंही बोअरवेलच्या 40 फूट खोल खड्ड्यात अडकले.
====================================
====================================

====================================

====================================

====================================

====================================
====================================
नांदेड; एकता नगर भिमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी-2016
====================================
====================================
दक्षिण कोरिया अधिक निर्बंध लादणार
सोल : उत्तर कोरियाने अणुयुद्धासाठी तयार राहण्याचा इशारा दिल्यानंतर दक्षिण कोरियाने त्यांच्यावर अधिक कडक निर्बंध टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे दोन देशांमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. याच परिस्थितीत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने संयुक्त लष्करी सरावास सुरवात केल्याने उत्तर कोरियाचीही तीव्र प्रतिक्रिया येणे शक्य आहे.
उत्तर कोरियावरील नवी निर्बंधे येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे दक्षिण कोरियाने सांगितले आहे.
====================================
लखनौ; अभियंते बनले यशस्वी 'चहावाले'
लखनौ : येथील दोन अभियंत्यांनी आपली नोकरी सोडून घरपोच चहा पोचवून चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला... त्यांनी सुरवातीला एक लाख रूपये भांडवल गुंतवले, मात्र चहाच्या व्यवसायात आपले ‘इंजिनीअरिंग माइंड‘ वापरत एका वर्षात 70 लाख रूपये कमावलेत.
अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा हे तरुण चहाविक्रीच्या व्यवसायातून एका वर्षात यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी होती. ‘चाय कॉलिंग‘ असे ब्रँड तयार करून त्यांनी स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. ते चहाची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देतात. खासगी कार्यालयांपासून ते शासकीय, निम-शासकीय कार्यालयांतही अनेक ग्राहक त्यांनी जोडले आहेत.
‘चाय कॉलिंग’ नावाने त्यांनी एका वर्षापूर्वी ९ टी-स्टॉल सुरू केले. त्यापैकी ६ बरेलीमध्ये तर ३ नोएडामध्ये आहेत. या माध्यमातून त्यांनी वर्षभरात ७० लाख रुपयांची कमाई केली. आता देशातील इतरही शहरांत टी-स्टॉल सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
====================================
सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा मंगळवारपासून

नवी दिल्ली - केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा येत्या मंगळवारी सुरू होणार आहे. याआधीच्या टप्प्यातून सरकारने 1050 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
सुवर्णरोखे योजनेअंतर्गत 8 मार्च ते 14 मार्चपर्यंत रोख्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर चालू महिन्यात 29 मार्च 2016 रोजी रोखे जारी करण्यात येतील, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि टपाल कार्यालयात रोखे विकण्यात येतील. सरकारने नोव्हेंबरमध्ये प्रथम सुवर्णरोख्यांची विक्री केली होती. त्याद्वारे 925 किलो सोने जमा झाले होते.
अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने व्यक्तिगत स्तरावर सुवर्ण रोख्यांची खरेदी केल्यास भांडवली जमा करातून सवलत दिली जाईल, असेही प्रस्तावित करण्यात आले. सध्या 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सुवर्णरोख्यांची विक्री करण्यात येत आहे. म्हणजेच 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सोन्यासाठी रोखे जारी करण्यात आले आहेत. त्यासाठी 5 ते 7 वर्षाची मुदत आहे.
====================================
बांगलादेश करणार राजधर्म इस्लामचा त्याग

ढाका - देशात इतर धर्मीय अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये औपचारिक राजधर्म असे इस्लामचे असलेले स्थान रद्द करण्याचा येथील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांत ख्रिश्चन, हिंदु आणि शिया मुस्लिम या अल्पसंख्यांकांवर सुन्नी मूलतत्त्ववादी संघटनांकडून हिंसक हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तेव्हा इस्लामचे राजधर्म म्हणून असलेले स्थान रद्द करण्यात यावे, अशा आशयाच्या याचिकेवर येथील सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे.
इस्लाम हा बांगलादेशचा औपचारिक राजधर्म असल्याचे 1988 मध्ये घोषित करण्यात आले होते. मात्र ही तरतूद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या या याचिकेस बांगलादेशमधील अनेक अल्पसंख्यांक नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अर्थात, सुमारे 90% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या या देशामध्ये अशा स्वरुपाच्या मोहिमेस कितपत पाठिंबा मिळेल, याविषयी शंका आहे. उर्वरित लोकसंख्येपैकी 8% लोकसंख्या ही हिंदु धर्मीय असून; उरलेल्या 2 टक्क्यांमध्ये ख्रिश्चन धर्मीयांसहित इतर अल्पसंख्याकांचा समावेश होतो.
====================================
साध्वी, योगींसारख्यांना कारागृहात टाका - खेर
कोलकता - देशभरात असहिष्णुता असे म्हणणे चुकीचे आहे. योगी आदित्यनाथ आणि साध्वी प्राचीसारख्यांना कारागृहात टाकले पाहिजे, असे मत बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे.
जळगाव; अपंग पिता अन् आईसमोर बाळ चोरलं
====================================
===================================
====================================
१- भारतात दहशतवादी शिरल्याची पाकच्या NSAची माहिती
२- दक्षिण कोरिया अधिक निर्बंध लादणार
३- बांगलादेश करणार राजधर्म इस्लामचा त्याग
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
५- फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात - अनुपम खेर
६- सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा मंगळवारपासून
७- साध्वी, योगींसारख्यांना कारागृहात टाका - खेर
८- जेएनयु प्रकरण; फक्त नारेबाजी म्हणजे देशद्रोह नव्हे - वकील मिहीर देसाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- बुलढाणा; अपंगांसाठी मागण्या रास्त, मात्र बच्चू कडूंचा सूर चुकला
१०- नागपूर; ऊर्जाखात्याची ब्रॉडबँड सुविधा, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
११- डंपर आंदोलन काँग्रेसनं चिघळवलं, सेना-भाजपचा आरोप
१२- जळगाव; अपंग पिता अन् आईसमोर बाळ चोरलं
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- मुंबईत 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू
१४- मुंबईत बाईकर्स गँगविरोधात धडक मोहीम, वांद्रे ते विलेपार्ले नाकाबंदी
१५- तेलंगणामध्ये गँगरेपमधील आरोपींना हॉस्पिटलमध्ये घुसून महिलांचा चोप
१६- नांदेड; माहिती अधिकार तपास समितीची सर्व कार्यकारिणी बरखास्त
१७- नांदेड; एकता नगर भिमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी-2016
१८- लखनौ; अभियंते बनले यशस्वी 'चहावाले'
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला
२०- भारत- बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट
२१- तुझ आयुष्य कायम 'रंगीला' राहूं दे - राम गोपाल वर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आयुष्य जितकं कठीण, तितके तुम्ही मजबूत.
जितके तुम्ही मजबूत, तितकं आयुष्य सोप्प....!!!
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
====================================
नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
सिंधुदुर्ग : काँग्रेस आमदार नितेश राणेंना 10 मार्चपर्यंत पोलिस कोठडी बजावण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी नितेश राणेंसह 39 जणांना कणकवली न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे आणि 38 आंदोलनकर्त्यांना आज दुपारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पोलिसांनी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने 10 मार्चपर्यंत कोठडी सुनावली. आंदोलकांच्या वतीने अॅड संग्राम देसाई, अॅड अमोल सामंत, अॅड राजेंद्र रावराणे काम पाहत आहेत. परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असून आमदार नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांसह आंदोलकाच्या समर्थकांनी गर्दी केली होती.
अपंगांसाठी मागण्या रास्त, मात्र बच्चू कडूंचा सूर चुकला
बुलडाणा : अपंगांच्या प्रश्नावर नेहमी आंदोलन करणारे आमदार बच्चु कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बुलडाण्यात आंदोलनावेळी आमदार बच्चू कडूंची एका महिला अधिकाऱ्यासोबत चांगलीच बाचाबाची झाली.
जिल्हा परिषदेच्या आवारात अपंगाच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या कडूंनी प्रशासनाचा वेळकाढूपणा चारचौघात काढून दाखवला. यावेळी चर्चेसाठी आलेल्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांना कडूंनी चांगलंच सुनावलं.
”पैसा काय तुमच्या बापाचा आहे का, चर्चेची नुसती निमंत्रण देता, तुम्हाला शरम नाही का वाटत?” अशा शब्दात कडूंनी मुधोळ यांना सुनावलं.
यावेळी अपंगाच्या प्रश्नासाठी कडू यांचा कळवळा कितीही योग्य असला तरीही चारचौघात एका महिला अधिकाऱ्यासमोर आपला राग कसा व्यक्त केला जावा याबाबत कडूंनी थोडं तारतम्य बाळगायला हवं होतं.
ऊर्जाखात्याची ब्रॉडबँड सुविधा, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
नागपूर : ऊर्जा खात्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून आता राज्यात एक नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. महावितरणच्या राज्यभरात पसरलेल्या जाळ्याचा वापर करुन ऊर्जा खातं ब्रॉडबँड सेवा सुरु करणार आहे.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाला याची माहिती दिली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सेवेसाठी बीएसएनएल व्यतिरिक्त इतर कंपन्यांना संधी दिली जाणार आहे.
सध्या तोट्यात असलेल्या महा जेनको या कंपनीला याचा फायदा होईल असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं आहे.
मुंबईत 40 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या दोघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईच्या गिरगाव परिसरातील बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन्ही इसमांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाळू जावळे आणि वसंत जावळे अशी दोघा मृतांची नावं आहेत.
गिरगावातल्या फणसेवाडीमध्ये बोअरवेलच्या साफसफाईचं काम सुरु होतं. रविवारी सकाळी बाळू जावळे आणि वसंत जावळे हे दोघंही बोअरवेलच्या 40 फूट खोल खड्ड्यात अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बाळू आणि वसंत या दोघांना बाहेर काढून उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला.
डंपर आंदोलन काँग्रेसनं चिघळवलं, सेना-भाजपचा आरोप
मुंबई : ओरोसमधील जिल्हाधिकारी कार्यालयात डंपर आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडप्रकरणी शिवसेना-भाजपच्या कोकणातील नेत्यांनी मुख्यंत्र्यांची भेट घेतली. शांततेत चालणाऱ्या डंपर आंदोलनाला काँग्रेसने पोलिसांच्या सहकार्याने जाणीवपूर्वक हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना-भाजपने केली आहे.
शिवसेना-भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. दिपक केसरकर, विनायक राऊत, वैभव नाईक, प्रमोद जठार, संदेश पारकर हे नेते यावेळी उपस्थित होते.
“गौण खनिजांशी संबंधित आंदोलन सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले. काल व्यवसायिकांनी शांतपणे आंदोलन सुरु केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लाठीहल्ला करायला लावला. आंदोलन शांततेत असताना लाठी हल्ला करण्यात आला. यात वैभव नाईक, राजन तेली, तसंच भाजप तालुकाध्यक्ष यांनाही मारहाण झाली. मुख्यमंत्र्यांना या बद्दल नाराजी दर्शविली आहे .”, असे भाजप नेते माधव भंडारी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कोकण विभागीय आयुक्त तानाजी संत्रे यांची एकसदस्यीय समिती नेमली आहे. येत्या चार दिवसांत ही समिती मुख्यमंत्र्यांना अहवाल देणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या सहकार्याने काँग्रेसने गुंड आणून कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना-भाजपने केला आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भारतात दहशतवादी शिरल्याची पाकच्या NSAची माहिती
नवी दिल्ली : गुजरातच्या कच्छ भागातून समुद्राच्या मार्गाने 10 अतिरेकी भारतात घुसण्याची शक्यता आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीचं ही माहिती अजित दोबाल यांना दिली आहे.
पाकिस्तानच्या या माहितीनंतर आयबीने गुजरात आणि इतर महत्वाच्या शहरांमध्ये अति दक्षतेचा इशारा दिलाय. खबरदारीचा उपाय म्हणून एनएसजीचं एक पथक अहमदाबादमध्ये दाखलं झालं आहे. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार लष्कर ए तोयबाचे 8 ते 10 अतिरेकी गुजरातच्या किनारी भागात हल्ला करण्याची शक्यता आहे.
महाशिवरात्रीचा सण आणि संसदेचं अधिवेशन हे अतिरेक्यांच्या टार्गेटवर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. आयबीच्या इशाऱ्यानंतर बीएसफच्या जवानांनी सीमेलगतच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे.
====================================
मुंबईत बाईकर्स गँगविरोधात धडक मोहीम, वांद्रे ते विलेपार्ले नाकाबंदी
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी रात्री 12 नंतर सुसाट वेगाने बाईक चालवणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. रेसिंग गँगविरोधात वाहतूक पोलिसांच्या टीमनं एक मोहीचं उघडली आहे. वांद्रे ते विलेपार्लेदरम्यान पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे.शनिवारी रात्र मुंबई पोलिसांची एक टीम वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर उतरली आणि बाईक रेसिंग गँगवर कडक कारवाई केली.
कारावाई करणाऱ्या पोलिसांच्या टीममध्ये 15 महिला पोलीस, तर 20 हून अधिक पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस विभागाचे अधिकाऱ्यांचा समावेशा आहे. ग्लासवर ब्लॅक फिल्म, हेल्मेट नसणारे बाईकस्वार इत्यादींवर कडक कारवाई करण्यात आली.
बाईक रेसिंग लावणाऱ्या या गँगवर कारवाईदरम्यान काही प्रमाणात वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. मात्र, पोलिसांच्या या मोहीमेमुळे वाहतूक नियमंची पायमलल्ली करणाऱ्यांवर नक्कीच जरब बसणार आहे.
तेलंगणामध्ये गँगरेपमधील आरोपींना हॉस्पिटलमध्ये घुसून महिलांचा चोप
हैदराबाद : तेलंगणामध्ये महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये घुसून सामूहिक बलात्कारातील आरोपींना चोप दिला. पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा असलेल्या एका 22 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जी श्रीनिवास आणि एम अंजैया यांनी अनुसूचित जातीच्या एका तरुणीवर बलात्कार केला, तर एम राकेश याने त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ शूट केला. पीडित तरुणी पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी एका कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. तीन आरोपींपैकी एक आरोपी याच क्लासमधील विद्यार्थी आहे.”
“तिन्ही आरोपी दोन तरुणींना डोंगर भागात घेऊन गेले. मात्र, त्यातील एकीने या नराधमांच्या तावडीतून पळ काढला. दोन आरोपींनी पीडित महिलेवर बलात्कार केला, तर तिसऱ्याने व्हिडीओ शूट केला.”, असे पोलिसांनी सांगितले.
पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना या घटनेबाबत सांगितल्यानंतर 24 फेब्रुवारीला नातेवाईकांनी नराधमांना चोप दिला. या आरोपींना सध्या वारंगलमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
या सर्व घटनेबाबत परिसरातील महिला संघटनांना माहिती मिळाली, तेव्हा त्या महिलांनी वारंगलमधील हॉस्पिटलमध्ये घुसून आरोपींना चोप दिला.
आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला
मिरपूर : टीम इंडिया आणि बांगलादेशी फौज आज टी-20चा आशिया चषक जिंकण्यासाठी मिरपूरच्या मैदानात उतरणार आहे. टीम इंडियानं सलामीच्या साखळी सामन्यात बांगलादेशला हरवलेलं असलं, तरी मश्रफे मोर्तझाची फौज ही नव्या आत्मविश्वासाचं बळ घेऊन फायनलच्या मैदानात दाखल झाली आहे.
भारताचा आतापर्यंत पराभव नाही, तरीही लढत चुरशीचीच!
मालिकेत आतापर्यंत भारतानं एकही सामाना हारला नाही. त्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्की उंचावलेला आहे. तर दुसरीकडं बांगलादेशी संघाचं घरच्या मैदानांवर होणारं प्रदर्शन नक्कीचं चांगलं आहे. त्यामुळं आजच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढाई पाहायला मिळणार हे नक्की.
बांगलादेशच्या आशिया चषक जिंकण्याच्या मार्गातलं मोठं आव्हान आहे, ती महेंद्रसिंग धोनीची अपराजित टीम इंडिया.
नांदेड; माहिती अधिकार तपास समितीची सर्व कार्यकारिणी बरखास्त
नांदेड दि.6: एलएसएम (लोकसेवा सामाजिक मंडळ) संचालित माहिती अधिकार तपास समितीच्या राज्य आणि त्यांच्या नियंत्रणात काम करणार्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय अनंतवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एका लेखी पत्राद्वारे ही माहिती कळवून यापुढे संघटनेच्या नावाने अन्य कोणी पत्रव्यवहार केल्यास त्यास फसवणूक समजून संबधितांविरोधात गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
माहिती अधिकार तपास समिती ही संस्था सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक 392/2011 नुसार नोंदणीकृत असून संस्थेच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावर पदाधिकारी व कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव संपूर्ण पदाधिकारी व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून यापुढे केवळ आपल्याच नावाने केला जाणारा संस्थेचा सर्व पत्रव्यवहार गृहित धरावा आणि आधीच्या पदाधिकार्यांनी केलेला पत्रव्यवहार व वर्तनाशी आपला किंवा संस्थेचा संबध राहणार नाही, असे अनंतवार यांनी या पत्रात कळविले आहे.
संस्थेच्या नावाचा गैरवापर केल्यास गुन्हा नोंदवून त्याची प्रत दिल्यास आपण प्रशासनास सहकार्य करु, अशी ग्वाही त्यांनी या पत्रात दिली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
नांदेड; एकता नगर भिमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी-2016
एकतानगर भीमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर
नांदेड दि.6ः भारतीय बौद्ध महासभेअंतर्गत एकतानगर वाडी (बु.)येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी नुकतीच येथे किसनराव धूतराज यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन एकतानगर भीमजयंती मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
भीमजंयती मंडळाची कार्यकारिणी अशीः देवानंद कदम यांना अध्यक्ष तर उपाध्यक्ष म्हणून रमेश दुधमल यांच्यासह सचिव-अनिल सावते, लक्ष्मण खरात, सहसचिव-संभाजी हडसनकर, सुरेश गायकवाड, टेलर संघटक-नितीन सावते, बालाजी मोरे, सहसंघटक-राजेश्वर वाघमारे, आकाश दवणे,कोषाध्यक्ष-बळीराम एंगडे, सहकोषाध्यक्ष-नंदकुमार बनसोडे,मोहन वाघमारे, सदस्य-सचिन बेंद्रीकर, किरण पारखे, गायकवाड साहेब, सावळे साहेब, संतोष गजभारे, दत्ता सावते, भगवान सोनकांबळे, नामदेवराव सरोदे, उदय नांदेडकर, रवी कांबळे, दिगांबर राऊत, विठ्ठलराव हैबते, देविदास हैबते, गौतम जोंधळे, यादव वाघमारे, कुणाल सावते आदींची निवड करण्यात आली. यावेळी एकतानगर येथील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
====================================भारत- बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट
- ऑनलाइन लोकमतमिरपूर, दि. ६ - आशिया कप टी-२० स्पर्धेत भारत आणि बांगलादेशमध्ये होणा-या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. मिरपूरमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे सामन्यापूर्वी सरावासाठी मैदानावर उतरलेले दोन्ही संघाचे खेळाडू ड्रेसिंगरुमध्ये परतले असून, खेळपट्टीवर पुन्हा कव्हर घालण्यात आले आहे. मिरपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.
====================================
फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात - अनुपम खेर
- ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. ६ - या देशातील फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात. मात्र गरीबाला त्याच्या उदरनिर्वाहाची, जगण्याची चिंता आहे. त्यामुळे त्याला या वादात रस नाही असे मत बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेत अनुपम खेर यांनी व्यक्त केले.असहिष्णूता हा मुळात चर्चेचा मुद्दाच नाही. फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात. तुम्ही रस्त्यावरच्या माणसाला असहिष्णूतेबद्दल विचाराल तर तो असहिष्णूतेबद्दल बोलणार नाही. कारण त्याला दोनवेळच्या जेवणाची चिंता आहे. कोलकात्यात टेलिग्राफच्या कार्यक्रमात बोलताना खेर यांनी हे मत व्यक्त केले.ज्यांच्या ग्लासामध्ये शॅम्पियन आहे ते फक्त असहिष्णूतेबद्दल बोलतात. तुम्ही भारतात रहाता की, अमेरिकेत ? आणीबाणीच्यावेळी देशात खरी असहिष्णूता होती. तेव्हा तुम्ही सरकार विरोधात बोललात की, तुम्हाला तुरुंगात टाकले जायचे असे खेर म्हणाले.सोशल मिडियावर सक्रीय असणा-या अनुपम खेर यांनी सहिष्णू-असहिष्णू वादात जाहीरपणे नरेंद्र मोदी सरकारचे समर्थन केले आहे. शाहरुख खान, आमिर खान या आपल्या बॉलिवूडमधल्या सहकलाकारांवरही त्यांनी असहिष्णतूच्या मुद्दावरुन वेळोवेळी कडाडून टीका केली आहे.
====================================
तुझ आयुष्य कायम 'रंगीला' राहूं दे - राम गोपाल वर्मा
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ६ - रुपेरी पडद्यापासून दूर गेलेल्या उर्मिला मातोंडकरने अचानक एकदिवस येऊन आपल्या लग्नाची बातमी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भले उर्मिलाने कोणला काही थांगपत्ता लागू न देता गपचूप विवाह केला म्हणून काही जण नाराज असतील पण, तिच्या या निर्णयामुळे अनेकांना मनापासून आनंद झाला. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्माचाही समावेश आहे.उर्मिलाला बॉलिवूडमध्ये सेट करण्याचे आणि तिच्यातील अभिनेत्रीला शोधण्याचे श्रेय राम गोपाल वर्माला जाते. रामूने 'रंगीला'मधून उर्मिलामधील उत्तम अभिनेत्री जगासमोर आणली. त्यानंतर सत्या, भूत, मस्त या चित्रपटातून त्याने उर्मिलाकडून उत्तम अभिनय करुन घेतला.मी आतापर्यंत काम केलेल्या अभिनेत्रींपैकी सर्वात सुंदर अभिनेत्रीची बातमी ऐकून खरोखर आनंद झाला. तिच आयुष्य कायम 'रंगीला' रहाव यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा असे टि्वट रामूने केलं आहे.
दक्षिण कोरिया अधिक निर्बंध लादणार
सोल : उत्तर कोरियाने अणुयुद्धासाठी तयार राहण्याचा इशारा दिल्यानंतर दक्षिण कोरियाने त्यांच्यावर अधिक कडक निर्बंध टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे दोन देशांमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. याच परिस्थितीत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने संयुक्त लष्करी सरावास सुरवात केल्याने उत्तर कोरियाचीही तीव्र प्रतिक्रिया येणे शक्य आहे.
उत्तर कोरियावरील नवी निर्बंधे येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे दक्षिण कोरियाने सांगितले आहे.
====================================
लखनौ; अभियंते बनले यशस्वी 'चहावाले'
लखनौ : येथील दोन अभियंत्यांनी आपली नोकरी सोडून घरपोच चहा पोचवून चहाविक्रीचा व्यवसाय सुरू केला... त्यांनी सुरवातीला एक लाख रूपये भांडवल गुंतवले, मात्र चहाच्या व्यवसायात आपले ‘इंजिनीअरिंग माइंड‘ वापरत एका वर्षात 70 लाख रूपये कमावलेत.
अभिनव टंडन आणि प्रमित शर्मा हे तरुण चहाविक्रीच्या व्यवसायातून एका वर्षात यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी होती. ‘चाय कॉलिंग‘ असे ब्रँड तयार करून त्यांनी स्टार्टअप व्यवसाय सुरू केला. ते चहाची घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) देतात. खासगी कार्यालयांपासून ते शासकीय, निम-शासकीय कार्यालयांतही अनेक ग्राहक त्यांनी जोडले आहेत.
‘चाय कॉलिंग’ नावाने त्यांनी एका वर्षापूर्वी ९ टी-स्टॉल सुरू केले. त्यापैकी ६ बरेलीमध्ये तर ३ नोएडामध्ये आहेत. या माध्यमातून त्यांनी वर्षभरात ७० लाख रुपयांची कमाई केली. आता देशातील इतरही शहरांत टी-स्टॉल सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
====================================
सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा मंगळवारपासून
नवी दिल्ली - केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या सुवर्णरोखे योजनेचा तिसरा टप्पा येत्या मंगळवारी सुरू होणार आहे. याआधीच्या टप्प्यातून सरकारने 1050 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
सुवर्णरोखे योजनेअंतर्गत 8 मार्च ते 14 मार्चपर्यंत रोख्यांसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर चालू महिन्यात 29 मार्च 2016 रोजी रोखे जारी करण्यात येतील, असे अर्थमंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. आणि टपाल कार्यालयात रोखे विकण्यात येतील. सरकारने नोव्हेंबरमध्ये प्रथम सुवर्णरोख्यांची विक्री केली होती. त्याद्वारे 925 किलो सोने जमा झाले होते.
अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारने व्यक्तिगत स्तरावर सुवर्ण रोख्यांची खरेदी केल्यास भांडवली जमा करातून सवलत दिली जाईल, असेही प्रस्तावित करण्यात आले. सध्या 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सुवर्णरोख्यांची विक्री करण्यात येत आहे. म्हणजेच 5 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम वजनाच्या सोन्यासाठी रोखे जारी करण्यात आले आहेत. त्यासाठी 5 ते 7 वर्षाची मुदत आहे.
====================================
बांगलादेश करणार राजधर्म इस्लामचा त्याग
ढाका - देशात इतर धर्मीय अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये औपचारिक राजधर्म असे इस्लामचे असलेले स्थान रद्द करण्याचा येथील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांत ख्रिश्चन, हिंदु आणि शिया मुस्लिम या अल्पसंख्यांकांवर सुन्नी मूलतत्त्ववादी संघटनांकडून हिंसक हल्ले होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तेव्हा इस्लामचे राजधर्म म्हणून असलेले स्थान रद्द करण्यात यावे, अशा आशयाच्या याचिकेवर येथील सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरु आहे.
इस्लाम हा बांगलादेशचा औपचारिक राजधर्म असल्याचे 1988 मध्ये घोषित करण्यात आले होते. मात्र ही तरतूद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या या याचिकेस बांगलादेशमधील अनेक अल्पसंख्यांक नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. अर्थात, सुमारे 90% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या या देशामध्ये अशा स्वरुपाच्या मोहिमेस कितपत पाठिंबा मिळेल, याविषयी शंका आहे. उर्वरित लोकसंख्येपैकी 8% लोकसंख्या ही हिंदु धर्मीय असून; उरलेल्या 2 टक्क्यांमध्ये ख्रिश्चन धर्मीयांसहित इतर अल्पसंख्याकांचा समावेश होतो.
====================================
साध्वी, योगींसारख्यांना कारागृहात टाका - खेर
देशभरात असहिष्णुता असल्याच्या चर्चेवरून गदारोळ सुरु असताना कोलकता येथे एका चर्चासत्रात अनुपम खेर यांनी हे वक्तव्य केले आहे. यापूर्वी अनुपम खेर यांनी दिल्लीत एक मोर्चा काढून असहिष्णुतेबाबत बोलणाऱ्यांवर आणि पुरस्कार परत करणाऱ्यांविरोधात जोरदार टीका केली होती. या चर्चासत्रात काँग्रेसचे रणदीप सुरजेवालाही सहभागी होते. त्यांनी बाबूलाल गौर, मोहन भागवत आणि भाजप नेत्यांकडून होत असलेल्या बेताल वक्तव्यांची यादीच प्रसिद्ध करत देशातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली.
यावर खेर म्हणाले की, साध्वी प्राची, योगी आदित्यनाथ असे काही जण पक्षात आहेत की ज्यांना पक्षातून बाहेर केले पाहिजे. त्यांना समज दिली पाहीजे. आपण अशा लोकांमुळे पूर्ण देशात असहिष्णुता असल्याचे बोलत आहोत. बहुमताने निवडून आलेल्या मोदी सरकारला चुकीचे ठरविण्यासाठीच हा असहिष्णुता शब्द पुढे आणण्यात आला. मोदींच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या प्रत्येकाला चुकीचे ठरविण्यात येत आहे. आपण 46 वर्षांच्या काँग्रेस उपाध्यक्षांना युथ आयकॉन कसे म्हणू शकता. आपल्या देशात फक्त श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तीच असहिष्णुतेबाबत बोलू शकतात.
====================================जळगाव; अपंग पिता अन् आईसमोर बाळ चोरलं
जळगाव - शहरातील भिलपुरा येथील गरिबीने खंगलेल्या दाम्पत्याच्या काळजाचा तुकडा जिल्हा रुग्णालयातून डोळ्यांदेखत चोरीला गेला. मुलांच्या सहाऱ्याने गरिबी अन् अपंगत्व भरून निघेल हे स्वप्न दोघेही बघत असतानाच या स्वप्नावर चोरट्या डाकीनीने घाला घातला. मदतीला याचना करणारा पिता अन् निसर्गतःच अडखळत बोलणारी आई आपल्या बाळाच्या विरहाने दिवसभर उपाशी होते. रात्री नऊ वाजताही हात जोडून पोलिसांना शोधून देण्याच्या याचना करण्यात येत होती.
भिलपुरा येथील लालशा बाबांच्या दर्ग्याच्या मागील बाजूस झोपडीवजा घरात वास्तव्याला असलेल्या फारुख खान व नसरीन या दाम्पत्याला २ फेब्रुवारीला मुलगा झाला. फारुख दोघं पायांनी जन्मजात अपंग असल्याने घरा जवळच शाळकरी मुलांसाठी गोळ्या- बिस्किटे विक्री करून चरितार्थ चालवतात, नसरीनही थोडी बोबडी बोलते. गबाळं राहणं असलं तरी संसार मात्र नेटका, कुठली तक्रार नाही की, भांडण नाही. जिल्हा रुग्णालयात नसरीन बाळंतीण झाली, दुसरी वेळ असताना तिचे सिझेरीयन झाले, बाळ सुदृढ आणि ठणठणीत होते. डिस्चार्ज झाल्यावर आनंदाने आपल्या छोट्याशा घरात आई-बाळ पोचले. दोघेही मुलेच असल्याने त्यांच्या रूपात अल्लाहने कुबड्या दिल्याची भावना फारुखमध्ये तर त्यांचे ममत्व संसारातील अंध:कार दूर करेल, असे स्वप्न नसरीन बघत होती.
एक महिना होत नाही तोवर नसरीनच्या सिझरच्या टाक्यांची जखम ओलीच असल्याने तिने परत डॉक्टरांना दाखवल्याने जोखीम नको म्हणून तिला ॲडमिट करून घेण्यात आले होते. अशातच आज एक महिना दोन दिवसाचे बाळ जिल्हा रुग्णालयातून चोरीला गेल्याने पती-पत्नी सकाळपासून रात्री नऊ पर्यंत उपाशीच होते, सकाळी दवाखान्यातील रस्ते अन् कोपरे पाहून आई मुलाच्या विरहाने धायमोकलून रडत होती, तर पिता कोणाला सांगू, कोण आणून देईल माझी हरवलेली काठी.. अशा अपेक्षेने याला-त्याला मदतीच्या याचना करीत होता.
========================================================================
===================================
====================================
No comments:
Post a Comment