Friday, 4 March 2016

नमस्कार लाईव्ह ०४-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- येमेनमध्ये वृद्धाश्रमावर गोळीबारात १६ ठार, मृतांमध्ये चार भारतीय नन्स 
२- भारत करणार होता पाकिस्तानवर हल्ला- लादेन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार 
४- मोदींवर थेट हल्लाबोल, JNUमधील कन्हैयाचं भाषण 
५- RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी 
६- गोडसे समर्थकांवर कारवाई करा- राजनाथसिंह 
७- 'नरेंद्र मोदी ऍप' वापरा; सीबीएसईची सूचना 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
८- बिहारमधील मराठी 'सिंघम' लवकरच महाराष्ट्र पोलीस दलात 
९- उस्मानाबाद; विनोद तावडेंच्या पीएची गुंडगिरी, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण 
१०- पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा जाहीर, 19 मे रोजी निकाल 
११- तावडेंच्या ताफ्यावर दूध फेकण्याचा प्रयत्न 
१२- बीड; मंत्र्यांचा दुष्काळी दौरा; सामान्यांना वावच नाही 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- शिप्रा बेपत्ता प्रकरणाचं 'क्राईम पेट्रोल' कनेक्शन 
१४- नाशिक; घर वेळेत ताब्यात न देणाऱ्या बिल्डरला 10 महिन्यांची जेल 
१५- सातारा; मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय, जात पंचांची बापाला अघोरी मारहाण 
१६- ‘बेस्ट’मध्ये मोबाइल चार्जिंग 
१७- नाशिक; 'ऑटोकाप' कामगारांना पोलिसांचा लाठीमार 
१८- मुक्रमाबाद येथील फोटोग्राफरच्या मुलाची गरुड झेप 
१९- कंधार; जलयुक्त शिवार पाणीस्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक - सौ. वर्षाताई भोसीकर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- पाकविरुद्धच्या जबरदस्त खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन 
२१- मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर 
२२- सलमानच्या चाहत्याने अखेर 'तिला' मिळविलेच  
२३- 'जगात कुठेही खेळवा; 'टीम इंडिया' सर्वोत्तमच' - धोनी 
२४- 'वर्ल्ड कप'नंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक 
२५- सलमान खान हाजिर हो! : काळवीट शिकार खटला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हृदयात नेहमीच परोपकाराची भावना बाळगतात. त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
(विठ्ठल वानखेडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.

=====================================

अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार

अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार

नवी दिल्ली : अफजल गुरु हा माझा आदर्श नाही, तर माझा आदर्श रोहित वेमुला आहे, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार म्हणाला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत कन्हैया बोलत होता. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर त्याने आपली मतं मांडली.
कन्हैयाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे:
– जेएनयूमधील कोणताही विद्यार्थी देशविरोधी नाही – कन्हैया कुमार
– घटनाबाह्य असलेल्या कोणत्याही गोष्टीला जेएनयू समर्थन करत नाही- कन्हैया कुमार
– आम्ही तुमच्या मुला-बाळांसारखेच, दहशतवादी नाही – कन्हैया कुमार
– आम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ माहित आहे, देशापासून स्वातंत्र्य नको, देशात स्वातंत्र्य हवं – कन्हैया कुमार
– पंतप्रधानांशी वैयक्तिक नाही, वैचारिक मतभेद; मनभेद नाही, त्यामुळे ‘मन की बात’ करत नाही: कन्हैया
– देशद्रोह आहे की नाही, हे न्यायालय सिद्ध करेल. त्यावर बोलल्यास न्यायालयाचा अपमान ठरेल – कन्हैया कुमार
– अफजल गुरु हा अखंड भारतातील काश्मीरचा नागरिक होता :कन्हैया कुमार
– अफजल गुरु घटनेनुसार भारतीय नागरिक, त्याला कायद्याने शिक्षा दिली आहे – कन्हैया कुमार
– जेएनयूतील विद्यार्थ्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडलं आहे, त्यापुढे मी अद्याप काही विचार केला नाही- कन्हैया कुमार
– आम्ही स्वातंत्र्याची मागणी करत आहोत, हक्कांची मागणी करत आहोत – कन्हैया कुमार
=====================================

बिहारमधील मराठी 'सिंघम' लवकरच महाराष्ट्र पोलीस दलात

 

मुंबई : बिहार पोलीस दलात कार्यरत असलेला मराठमोळा ‘सिंघम’, अर्थात पोलीस अधिक्षक शिवदीप लांडे लवकरच महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 
बदलीसाठी अर्ज
पाटणा इथं डॅशिंग काम करून, एसपी शिवदीप लांडे आख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजेच महाराष्ट्रात परतायचं आहे. महाराष्ट्रात बदली मिळावी म्हणून लांडे यांनी अर्जही केला आहे. 
या अर्जाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, गृहविभागाला अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 
विजय शिवतारेंचे जावई 
आयपीएस शिवदीप लांडे यांनी या अर्जाबाबत बोलण्यास नकार दिला आहे. मात्र त्यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपद्दा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

=====================================

शिप्रा बेपत्ता प्रकरणाचं 'क्राईम पेट्रोल' कनेक्शन

शिप्रा बेपत्ता प्रकरणाचं 'क्राईम पेट्रोल' कनेक्शन
नवी दिल्ली : नोएडातून रहस्यमयरित्या बेपत्ता झालेली फॅशन डिझायनर शिप्रा मलिक प्रकरणाचा गुंता पोलिसांनी सोडवला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार शिप्राचं अपहरण झालं नव्हतं तर ती स्वत: कौटुंबिक वादामुळे घर सोडून गेली होती. 
टीव्ही सीरियल क्राईम पेट्रोल पाहिल्यानंतर तिने घर सोडण्याचा प्लॅन आखला होता. मात्र टीव्हीवर बातमी पाहिल्यानंतर ती परतही आली, असा दावा मेरठ रेंजच्या डीआयजी लक्ष्मी सिंह यांनी केला आहे.
=====================================

विनोद तावडेंच्या पीएची गुंडगिरी, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण

विनोद तावडेंच्या पीएची गुंडगिरी, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण
उस्मानाबाद: सत्तेची हवा नेत्यांच्या बगलबच्च्यांच्या डोक्यात किती भिनलीय याचं जिवंत उदाहरण आज उस्मानाबाद जिल्ह्यात बघायला मिळालं. 
दुष्काळ दौऱ्यानिमित्त आज शिक्षणमंत्री विनोद तावडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते येडशीत पाहणीसाठी आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दुधाला भाव मिळत नाही, शेतकऱ्याला मदत मिळत नाही, म्हणून संताप व्यक्त केला. तसंच तावडेंच्या दिशेनं दुधाच्या पिशव्या आणि अंडी भिरकावली. याचा राग आल्यानं तावडेंचे पीए संतोष सुर्वे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्यावर हल्ला केला. 
पोलिसांच्या देखत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला भाजप नेते मिलिंद पाटील, गोविंद कोकाटे आणि श्यामराव देशमुख यांनीही मदत केली. अखेर पत्रकारांनी हस्तक्षेप केल्यानंतर तावडेंना भान आलं आणि त्यांनी हा प्रकार थांबवला.
=====================================

घर वेळेत ताब्यात न देणाऱ्या बिल्डरला 10 महिन्यांची जेल

घर वेळेत ताब्यात न देणाऱ्या बिल्डरला 10 महिन्यांची जेल
प्रातिनिधिक फोटो
नाशिक : घर वेळेत बांधून न दिल्याच्या कारणावरून एका बिल्डरला चक्क 10 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
सुरेश पाटील असं बिल्डरचं नाव असून तक्रारदार देविदास भरसट यांनी दाखल केलेल्या खटल्यावरून नाशिक ग्राहक न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. 
काय आहे प्रकरण? 
देविदास भरसट यांनी रो हाऊससाठी 1 लाख 10 हजारांची रक्कम बिल्डर सुरेश पाटील यांना दिली होती. पण बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यानं भरसट यांनी बिल्डर सुरेश पाटील यांच्याकडे रक्कम परत मागितली. मात्र तो टाळाटाळ करत होता. 
या सर्व प्रकाराला वैतागून देविदास यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. न्यायलयाने पाटील यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले. मात्र बिल्डर पाटील यांनी पैसे परत केले नाहीत.
=====================================

पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा जाहीर, 19 मे रोजी निकाल

पाच राज्यांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारखा जाहीर, 19 मे रोजी निकाल
मुंबई : निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या तामिळनाडू, आसाम, केरळ, पश्चिम बंगाल, पद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहे. यासोबतच आचारसंहिता लागू झाली आहे. पाच राज्यातील एकूण 17 कोटी मतदार या निवडणुकीत सहभाग नोंदवणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. 
आसाममध्ये दोन टप्प्यात निवडणूक होईल. इथे 4 आणि 11 एप्रिल रोजी मतदान पार पडेल. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 4,11,17,21,25,30 आणि 5 मेर रोजी मतदान पार पडेल. 
तसंच पद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्पात निवडणूक होईल. या तीन राज्यांमध्ये 16 मे रोजी मतदान केलं जाईल. तर सर्व राज्यातील निवडणुकीचे निकाल 19 मे रोजी जाहीर होतील. 
आसाममध्ये 25,000, केरळमध्ये 21,498, तामिळनाडूमध्ये 65,616, पश्चिम बंगालमध्ये 77,237 आणि पद्दूचेरीमध्ये 913 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी सुरक्षा व्यवस्थेच वाढ करण्यात आली आहे. 
पेड न्यूजसंदर्भात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.
=====================================

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय, जात पंचांची बापाला अघोरी मारहाण

मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय, जात पंचांची बापाला अघोरी मारहाण
सातारा: राज्यातला जात पंचायतींचा जाच काही संपण्याचं नाव घेत नाही. वाई तालुक्यातल्या पाचवडमध्ये गोपाळ जात पंचायतीत लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरुन एका बाप मुलीला आमानुष मारहाण करण्यात आली. भरपंचायतीत अत्याचारी बापाला आणि त्याच्या मुलीलाही दोरखंडानं बांधून जनावरांप्रमाणे मारहाण करण्यात आली. तसंच ७ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. 
याप्रकरणी एका आरटीआय कार्यकर्त्यानं भुईज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अद्याप कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं नाही. सख्ख्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन भर चौकात चक्क दोरखंडानं बांधून बापाला आणि मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार सुरु असताना अख्खा समाज बघ्याच्या भूमिकेत होता. 
जातपंचांनी मुलीलाही दोरखंडानं बांधून मारलं. समाजातून बहिष्कृत केलं. इतकंच नव्हे तर 7 हजाराचा दंडही ठोठावला. माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन भिसेंनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करुन पोलिसात तक्रार दिली. 
भिसेंच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गावात धाड टाकली. मात्र पीडित बाप आणि मुलगी दोघंही गायब झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगळं पथक रवाना केलं आहे.
=====================================

तावडेंच्या ताफ्यावर दूध फेकण्याचा प्रयत्न

LIVE - तावडेंच्या ताफ्यावर दूध फेकण्याचा प्रयत्न
लातुर/बीड/उस्मानाबाद: मराठवाड्यात मंत्रिमंडळाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे. आज सकाळी लातूरमध्ये दाखल झालेल्या सर्व मंत्र्यांनी आपापल्या गावाला भेटी द्यायला सुरुवात केली आहे. या प्रत्येक भेटीत राज्यातल्या सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. 
पंकजा मुंडेंचा शेतकऱ्यांशी संवाद 
बीडच्या गेवराई गावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाणीटंचाईमुळे ज्या मुलीचा मृत्यू झाला, त्या विहीरीलाही पंकजा मुंडेनी भेट दिली. यानंतर गावातल्या महिलांशी पंकजा मुंडेशी पाणीटंचाईसंदर्भात बैठक घेतली. 
विष्णु सावरांकडून पाहणी 
तर दुसरीकडे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी लातूर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी सरकारी योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत की नाही याचा सावरांनी आढावा घेतला.
=====================================

मोदींवर थेट हल्लाबोल, JNUमधील कन्हैयाचं भाषण

मोदींवर थेट हल्लाबोल, JNUमधील कन्हैयाचं संपूर्ण भाषण
नवी दिल्ली: जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला गुरुवारी जामीन मिळाल्यानंतर तिहार जेलमधून त्याची सुटका झाली. जेलमधून सुटल्यानंतर कन्हैयानं जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण केलं. त्याच्या या भाषणाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 
आपल्या भाषणात कन्हैयानं पंतप्रधान मोदी आणि संघावर तोफ डागली. ‘भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं.’ असंही कन्हैया त्यावेळी म्हणाला. 
कन्हैयाचं जेएनयूमधील भाषण जसंच्या तसं: 
इस देश के संविधान में…इस देश के कानून में…और इस देश की न्याय प्रक्रिया में भरोसा है . इस बात का भी भरोसा है कि बदलाव ही सत्य है और बदलेगा . हम बदलाव के पक्ष में खड़े हैं और ये बदलाव होकर रहेगा . पूरा भरोसा है अपने संविधान पर . पूरे तरीके से खड़े होते हैं अपने संविधान की उन तमाम धाराओं को लेकर जो प्रस्तावना में कही गई हैं…समाजवाद…धर्मनिरपेक्षता…समानता…उनके साथ खड़े हुए हैं. 
मैं विशेष रूप से धन्यवाद देना चाहता हूं इस देश के बड़े-बड़े महानुभावों को जो संसद में बैठकर बता रहे हैं कि क्या सही हैं क्या गलत है. इसको वो तय करने का दावा कर रहे हैं. उनको धन्यवाद. उनकी पुलिस को धन्यवाद. मीडिया के उन चैनलों को भी धन्यवाद देना चाहता हूं . हमारे यहां एक कहावत है कि बदनाम हुए तो क्या हुआ. नाम नहीं हुआ. कम से कम जेएनयू को बदनाम करने के लिए ही उन्होंने प्राइम टाइम पर जगह दी. इसके लिए मैं धन्यवाद देना चाहता हूं. 
=====================================

पाकविरुद्धच्या जबरदस्त खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन

पाकविरुद्धच्या जबरदस्त खेळीनंतर अनुष्काचा विराटला फोन
मुंबई : टीम इंडियाचा डॅशिंग फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं पुन्हा एकदा ‘ऑल इज वेल’ असल्याचं दिसून येतंय. कारण विराट – अनुष्काची तुटलेली तार पुन्हा एकदा जुळण्याच्या मार्गावर आहे. 
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटच्या फलंदाजीच्या जोरावर, भारताने एकहाती विजय मिळवला. जगभरातून विराटच्या फलंदाजीचं कौतुक झालं. पाकिस्तानी खेळाडूही विराटबद्दल भरभरून बोलत होते. मग अनुष्काही मागे कशी राहिल? 
अनुष्काने विराटला थेट कॉल करून त्याचं अभिनंदन केलं. पूर्वी अनुष्का विराटला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजेरी लावत होती. 
काही दिवसांपूर्वीच विराट-अनुष्कामध्ये काहीतरी बिनसल्याचं समोर आलं होतं. ते दोघे एकमेकांपासून दूर झाले होते. इतकंच नाही तर सोशल साईट्सवर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलं होतं. विराट कोहली लग्नासाठी तयार होता. मात्र अनुष्काने करिअरमुळे त्याला नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये बिनसलं होतं. 
मात्र अनुष्काच्या एका कॉलमुळे पुन्हा एकदा या दोघांचे सूर जुळण्याची चिन्हं दिसत आहेत.
=====================================

मनोज कुमार यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर


  • नवी दिल्ली, दि. ४ - हरीयाली और रास्ता, वो कौन थी, हीमालय की गोद में, उपकार, नील कमल, पूरब और पश्चिम आणि क्रांती या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे महान अभिनेते मनोज कुमार यांना यंदाचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. मनोज कुमार यांनी अभिनय तर केलाच पण त्याचबरोबर ते यशस्वी दिग्दर्शकही होते. त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मितीही केली. १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. मनोज कुमार यांच्या हिंदी चित्रपटातील प्रवासाला १९५७ साली सुरुवात झाली. १९५७ साली फॅशन चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर १९६० साली कांच की गुडिया चित्रपटात मनोज कुमार यांना मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ला प्रस्थापित केले आणि त्यांचा यशाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. १९६५ साली आलेल्या शहीद चित्रपटापासून त्यांची राष्ट्रभक्त नायक अशी नवी ओळख निर्माण झाली. उपकार हा १९६७ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. देशभक्तीवर आधारीत या चित्रपटात त्यांनी सैनिक आणि शेतकरी अशी दुहेरी भूमिका केली. आजही अनेकांच्या ओठावर येणारे 'मेरे देश की धरती' हे गाणे या चित्रपटातील आहे. मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटातून देशभक्तीपर नायक रंगवल्याने भारत कुमार ही नवी ओळख त्यांना मिळाली. 
=====================================

RSS, भाजपा देशवासियांवर विचारधारा थोपवत आहे - राहुल गांधी


  • आसाम, दि. ४ - देशांत प्रत्येक धर्म, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा आदर झाला पाहिजे, मात्र आरएसएस आणि भाजपाची लोक देशात प्रत्येकावर आपली विचारधारा थोपवत आहेत असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आसाममध्ये रॅलीदरम्यान ते बोलत होते.  भाजपाची लोक जिथे जातात तिथे एका भारतीयाला दुस-या भारतीयाविरोधात लढवतात, यांची हीच विचारसरणी आहे असंही राहुल गांधी बोलले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या एक तासाच्या भाषणात माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची भाषण वाचून दाखवली मात्र उत्तर काहीच दिलं नाही. अरुण जेटली यांनी फेअर अॅण्ड लव्हली स्कीम आणली आहे, त्या माध्यमातून भारतातील चोर लोक आपला काळा पैसा सफेद करत आहेत. मी पंतप्रधानांना बोललो तुम्ही काळा पैसा परत आणणार होतात मात्र तुमच्या मंत्र्याने ही कोणती स्कीम लाँच केली असं राहुल गांधी बोलले आहेत.
=====================================

येमेनमध्ये वृद्धाश्रमावर गोळीबारात १६ ठार, मृतांमध्ये चार भारतीय नन्स


  • अदेन,दि. ४ -  येमेनच्या दक्षिणेला असलेल्या अडेन येथील एका वृद्धाश्रमावर शुक्रवारी अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी वुद्धाश्रमात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जण ठार झाले असून, यात ४ भारतीय नन्सचा समावेश आहे.  
    वृद्धाश्रमात घुसल्यानंतर त्यांनी नन्सना एकाबाजूला केले व त्यांच्यावर गोळया झाडल्या. त्यानंतर त्यांनी वृद्धांच्या हातात बेडया ठोकल्या व त्यांच्यावर अंदाधुंद गोळया झाडल्या. अदेनच्या शेख ओसमान जिल्ह्यामध्ये हा वृद्धाश्रम आहे.  
    सौदीच्या फौजांनी शिटी हौथी बंडखोरांच्या ताब्यातून अदेनचा ताबा मिळवल्यापासून येथे अराजकाचे राज्य आहे. येथे नावालाही कायदा राहिलेला नाही. इसिसने अदेनमधील या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 
=====================================

‘बेस्ट’मध्ये मोबाइल चार्जिंग

  • मुंबई : मुंबईतील बेस्टच्या बस ‘स्मार्ट’ करण्याच्या दिशेने बेस्ट उपक्रमाने पावले टाकली आहेत़ प्रशासनातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या नवीन ३०३ बसगाड्यांमध्ये मोबाइल चार्जिंगची सुविधा असणार आहे़ या बसगाड्यांची लांबी अधिक असल्याने प्रवासही आरामदायी होणार आहे़ तसेच वाय-फाय सेवेबाबतसुद्धा चाचपणी सुरू आहे़आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिका पालक संस्था म्हणून १०० कोटी रुपये अनुदान देणार आहे़ नियमित बसगाड्यांची ११ मीटर असलेली लांबी वाढवून १२ मीटर करण्यात आली आहे़ तसेच बसमध्ये मोबाइल चार्जिंगसाठी दोन ठिकाणी सोय असणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत आज प्रशासनाने सादर केला़ मात्र केवळ दोन चार्जिंग पॉर्इंट्सने लोकांची गैरसोयच होईल़ याऐवजी प्रत्येक आसनामागे चार्जिंगची सोय करावी, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़ तसेच बस पुरविणाऱ्या ठेकेदाराकडूनच सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यावेत व वाय-फाय सेवा उपलब्ध करावी, अशी सूचना सदस्यांनी केली़
=====================================
सलमानच्या चाहत्याने अखेर 'तिला' मिळविलेच 


नाशिक- सध्या शहरातील सिग्नलवर ‘ती‘ थांबते तेव्हा आजूबाजूचे सर्वच लोक ‘तिच्याकडे‘ पाहतात... तिचा रुबाब, तिचा आवाज नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. ती सर्वांच्याच औत्सुक्‍याचा विषय बनली आहे... ती म्हणजे ‘सुझुकी इंट्रूडर‘ (Intruder)! ही 20 लाख रुपये किमतीची व 8 फूट लांबीची मोटारसायकल शहरभर चर्चेचा विषय बनली आहे. 
दुचाकीमध्ये खूपच मोठी व लांबलचक गाडी शहरात दाखल झाल्याने या गाडीबद्दल तरुणाईमध्ये चर्चा आहे. लव आडगावकर या युवकाने अलीकडेच ही बाईक घेतली आहे. मुंबईमध्ये अभिनेता सलमान खानला या गाडीवर पाहिल्यानंतर हीच मोटारसायकल आपल्याला घ्यायची अशी त्याची इच्छा झाली. सलमानच्या घरी जाऊन या गाडीविषयी माहिती घेतली. मग तीच सलमानची निळ्या रंगाची गाडी घेण्याचे ठरविले, आणि ती घेतलीही. काही दिवसांनी तशीच नवी गाडी घेण्यासाठी सुझुकीच्या शोरूममध्ये बुक केली. दीड ते दोन महिन्यात ही जपानवरून समुद्रमार्गे मुंबईत पोचली. ही गाडी ताब्यात मिळाल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया सलमान खानचा फॅन लव आडगावकर सांगत होता. 
या गाडीची देखभाल करण्यासाठी दर महिन्याला कंपनीचे ‘मोबाईल सर्व्हिस सेंटर‘ नाशिकमध्ये येते व गाडीची देखभाल सर्विहसींग केली जाते. दररोजही स्वच्छतेकडे घरातील सर्वजण लक्ष देतात. या मोटार सायकलचा आकार अवाढव्य म्हणजे जवळपास 7 ते 8 फूट लांब असल्याने नाशिककरांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. ही गाडी कुटुंबाची इतकी प्रिय झाली आहे की काका श्‍याम आडगावकर 50 ते 52 वर्षांचे आहेत पण त्यांनाही या गाडीवरून सौर करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे ते ही गाडी चालवतात, सुट्टीच्या दिवशी सकाळी थंड वातावरणात या आरामदायी गाडीवरून रपेट मारण्याची मजा काही औरच आहे. गोकूळ, कुश, महेश या आडगावकर युवकांची ही गाडी गळ्यातील ताईतच बनली आहे. या गाडीची क्षमता 1800 सीसी (18 हॉर्स पॉवर) असल्याने प्रवास अत्यंत आरामदायी होते. दोन सायलन्सर असले तरी रस्त्याने जाताना सर्वांच्चा नजरा या मोटार सायकलकडे वळतातच. या भव्य मोटार सायकल मुळे आडगावकर कुटुंबीयांची शान तर वाढलीच आहे पण शहरात सद्या आशा प्रकारची एकमेव मोटार सायकल असल्याने वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. 
रस्त्यात, सिग्नलला ही गाडी थांबताच बरेचसेच युवक आपल्या मोबाईमध्ये या गाडी, बंदिस्त करतात, काही सेल्फीही काढतात. आता पर्यंत बंगलोर, महाबळेश्‍वर, मुंबई या ठिकाणी या मोटार सायकलवरून प्रवास केला आहे. एका लिटरमध्ये दहा किलोमीटर ऍव्हरेज असलेल्या या गाडीच्या पेट्रोल टाकीची क्षमता 20लिटरची आहे. त्यामुळे टाकी फूल केल्यावर 200 किलोमीटर ती जाते. 
वैशिष्ट्ये- 
1800 सीसी. (18हॉर्स पॉवर). 
20लाख रुपये किंमत. 
2480 एमएम लांब 
1130 एमएम उंच 
347 किलो वजन. 
4 स्ट्रोक इंजिन. 
2 सिलिंडर, 2 सायलन्सर. 
लिक्विड कुलंट रेडिएटर. 
व्ही ट्विन इंजिन. 
कोब्रा एक्‍झॉस्ट. 
दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्‍स. 

=====================================
'जगात कुठेही खेळवा; 'टीम इंडिया' सर्वोत्तमच'
मीरपूर : ‘सध्याचा भारतीय संघ कमालीचा समतोल असून हा संघ जगाच्या पाठीवर कुठेही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो,‘ असा विश्‍वास कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शुक्रवार) व्यक्त केले. ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये गेल्या दहापैकी नऊ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे. 

संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या विजयानंतर धोनी म्हणाला, "यंदाच्या वर्षभरात ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये आम्ही जो संघ उतरविला, त्यातील समतोल पाहता हा संघ कुठल्याही वातावरणामध्ये, कुठेही सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. विशेषत:, ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये तर हा संघ अजोड आहे. या संघात आमच्याकडे तीन चांगले वेगवान गोलंदाज आहेत. दोन दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत आणि गरज पडल्यास गोलंदाजी करू शकणारे आणखी दोन-तीन खेळाडू आहेत. माझ्या मते, हा समतोल उत्तम आहे. इतके असूनही गोलंदाजीमध्ये काही जास्त धावा गेल्या, तरीही आठ सक्षम फलंदाज आमच्याकडे आहेत.‘‘ 

क्रिकेटमध्ये ‘यापूर्वी काय झाले होते‘ याला फार महत्त्व नाही. विशेषत:, ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये केवळ एखादी खेळीही दोन संघांमधील निर्णायक ठरू शकते. त्यामुळे ‘बलवान‘ संघ किंवा ‘कमकुवत‘ संघामधील फरक हा प्रत्यक्ष सामन्यामधील कामगिरीचाच असतो. 
- महेंद्रसिंह धोनी, भारतीय संघाचा कर्णधार 
=====================================
मंत्र्यांचा दुष्काळी दौरा; सामान्यांना वावच नाही
दिलासा देण्याऐवजी उपाययोजनांची पाहणी 
---
बीड : मोठा गाजावजा करत शुक्रवारी (ता. चार) सुरू झालेला दहा मंत्र्यांच्या जिल्ह्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यांने शेतकऱ्यांच्या पदरात फार काही पडेल अशी शक्‍यता नाही. यावेळी दुष्काळाबाबत केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यातच मंत्र्यांनी धन्यता मानली. गुत्तेदार आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना समस्या मांडता आल्या नाही. 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (बीड), परिवहन मंत्री दिवाकर रावते (अंबाजोगाई), सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (परळी), जिल्ह्याच्या पाकमंत्री पंकजा मुंडे (गेवराई), पुरवठा मंत्री गिरीष बापट (बीड), उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (केज), सहकार राज्यमंत्री दादा भुसे (शिरुर कासार), राज्यमंत्री दिपक केसरकर (वडवणी), राज्यमंत्री दिलीप कांबळे (पाटोदा), राज्यमंत्री संजय राठोड (आष्टी) या दहा मंत्र्यांनी शुक्रवारी दुष्काळी पाहणी दौरा केला. आजारामुळे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा माजलगाव तालुक्‍याचा दौरा रद्द झाला. बहुतेक मंत्र्यांनी दुष्काळी दाहकता जाणून घेण्याऐवजी सध्या सुरु असलेल्या दुष्काळावरील तोकड्या उपाययोजना पाहण्यातच धन्यता मानली. मंत्र्यांनी रोहयोची कामे, शेततळे आदी ठिकाणी भेटी दिल्या. 50 हजारांत शेततळे शक्‍य नसल्याने एक लाख 10 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटोदा तालुक्‍याचा दौरा करणाऱ्या दिलीप कांबळे यांच्याकडे केली. गढूळ पाणी येत असल्याची तक्रार करुन रेल्वेमार्गात जमिन गेल्याचा मावेजा देण्याची मागणी आष्टी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी संजय राठोड यांना केली. शिरुर तालुक्‍यात रायमोह येथे शेतकऱ्यांनी दादा भुसे यांचे वाहन आडवून कर्जमाफीची मागणी केली.
दौऱ्यात मंत्र्यांना अनेक ठिकाणी गुत्तेदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी गराडा घातल्याने शेतकऱ्यांना समस्या मांडायला वावच मिळाला नाही. दुष्काळी दौऱ्यात तरी या गराड्याला दुर करण्याची सुचना मंत्र्यांनी केली नाही. तर बीडमध्ये सुधीर मुनगंटीवार विश्रामगृहावर आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत आतमध्ये प्रवेश केला. 
=====================================
'वर्ल्ड कप'नंतर भारतीय संघाला नवा प्रशिक्षक
नवी दिल्ली: आगामी ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारतीय संघासाठी नवा मुख्य प्रशिक्षक नेमला जाणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर भारतामध्ये ‘इंडियन प्रीमिअर लीग‘ होईल आणि त्यानंतर जुलै-ऑगस्टमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ वेस्ट इंडीजला रवाना होईल. त्या मालिकेपूर्वी प्रशिक्षकाची निवड होणार आहे. 
मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी एका समितीवर सोपविण्यात आली आहे. ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर या समितीची अंतिम बैठक होईल. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय संघासाठी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक नेमण्यासाठीही ही समिती सूचना करणार आहे. 
गेल्या वर्षी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर डंकन फ्लेचर यांचा प्रशिक्षकपदाचा करार संपुष्टात आला होता. त्यानंतर संघासाठी पूर्णवेळ प्रशिक्षकाची नियुक्ती झालेली नाही. माजी खेळाडू रवी शास्त्री यांच्यावर ‘संघ संचालक‘ म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय संजय बांगर (फलंदाजी), भारत अरुण (गोलंदाजी) आणि आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण) हे तीन सहायक प्रशिक्षकही आहेत. या तिघांसह रवी शास्त्री यांचा करार ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर संपणार आहे.
=====================================
भारत करणार होता पाकिस्तानवर हल्ला- लादेन 

वॉशिंग्टन- पाकिस्तानचे तुकडे करून तो पाच-सहा प्रांतांमध्ये विभागणी करायची अशी अमेरिकेची योजना होती. त्यानंतर भारतीय फौजा स्वतंत्रपणे किंवा अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानवर हल्ला करतील, असे भाकित कुख्यात दहशतवादी व अल-कायदाचा पूर्वीचा प्रमुख ओसामा बिन लादेन याने केले होते.
अमेरिकेची तथाकथित योजना उलटविण्यासाठी पाकिस्तानमध्ये जिहाद करून तेथील लष्कराशी लढून पाकला अस्थिर करायचे आणि पाकवर नियंत्रण मिळवायचे, असा कट ओसामा बिन लादेनने रचला होता. 
अमेरिकन गुप्तचर संस्थांनी 1 मार्च रोजी ओसामाची पत्रे उघड केली आहेत. ओसामाने जिहाद इन पाकिस्तान या एका 42 पानी पुस्तिकेत लादेनने वरील दावे केले आहेत. 
ओसामाने त्यामध्ये म्हटले होते की, भारत 134 लढाऊ विमाने खरेदी करणार असून, जगाच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा संरक्षण व्यवहार असेल. अरबी समुद्रात अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत भारतीय नौदलाच्या कवायती, तसेच सियाचीनमध्ये ब्रिटन लष्करासोबतचे प्रशिक्षण म्हणजे पाकवरील हल्ल्याची तयारी आहे.
=====================================
गोडसे समर्थकांवर कारवाई करा- राजनाथसिंह

नवी दिल्ली- महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गुणगाण गाणाऱ्यांबाबत सावध पवित्रा घेत मोदी सरकारने त्यांच्यापासून अंतर ठेवले आहे. ‘राष्ट्रपित्याच्या हत्येबद्दल कोणी आनंद साजरे करीत असेल तर अशा नथुराम गोडसेच्या समर्थकांविरोधात राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे,‘ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावून सांगितले. 

राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथसिंह यांनी गुरुवारी हे स्पष्ट केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कथेरिया व इतर भाजप नेत्यांनी एका सभेत चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल विरोधकांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेच्या वेळी नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाचा मुद्दाही चर्चेला आला. 

या चर्चेला उत्तर देताना राजनाथसिंह म्हणाले, ‘नथुराम गोडसेची पूजा कशी काय शक्य आहे? त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे. 
कथेरियांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘कथेरिया यांच्या वक्तव्याचे चित्रीकरण आम्ही पाहिले असून, त्यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समुदायाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. तसेच, उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्येही कथेरिया यांचा उल्लेख नाही. अन्य तीन व्यक्तींची नावे आहेत,‘ असे राजनाथ यांनी सांगितले.

नथुराम गोडसेला भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी राष्ट्रवादी संबोधले, त्याचप्रमाणे हिंदू महासभेचा गोडसेचे मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. नरेंद्र मोदी हे ‘कमकुवत‘ पंतप्रधान असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. 
=====================================
नाशिक; 'ऑटोकाप' कामगारांना पोलिसांचा लाठीमार
नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीमधील इलेक्‍ट्रॉनिक इंटर लॉकिंग प्रणाली तयार करणाऱ्या ऑटोकाप कंपनीतील व्यवस्थापन आणि कामगारांमधील वाद चिघळला आहे. या कंपनीच्या कामगारांचा गेल्या 25 दिवसांपासून संप सुरू आहे. आज वादाचा कळस झाला. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. 

या कंपनीत कायम 147 कामगार आहेत. यापूर्वी कामगारांच्या संघटनेने वेतनाचा करार केला आहे. मागीलवेळी 3 हजार 700 रुपयांची वेतनवाढ दिल्याने यावेळी 4 हजारांची वेतनवाढ मिळावी, अशी कामगारांची मागणी आहे. पण व्यवस्थापनाने कंपनीची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट केले. मग कामगारांनी मागीलवेळीएवढी वेतनवाढ मिळावी, अशी मागणी लावून धरली. 
अशातच, कच्चा माल आणि उत्पादन कंपनीबाहेर नेण्याची तयारी व्यवस्थापनाने केली असताना गेल्या काही दिवसांपूर्वी कामगारांनी विरोध दर्शवला होता. आता औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीतून माल बाहेर काढत असताना कामगार अडवणूक करत आहेत, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.
=====================================
सलमान खान हाजिर हो! : काळवीट शिकार खटला 

जोधपूर- काळवीट शिकार प्रकरणी शस्त्रास्त्र बंदी कायद्याअंतर्गत सुरू असलेल्या एका खटल्यात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा जबाब नोंदविण्यासाठी त्याला 10 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.  

"खटल्यातील सरकारी पक्षाचे पुरावे सादर करणे संपले आहेत. जोधपूर जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने आरोपीचा (सलमान खान) जबाब नोंदविण्यासाठी 10 मार्चची तारीख दिली आहे," असे सलमानचे वकील हस्तिमल सारस्वत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

तत्कालीन जिल्हाधिकारी रजत मिश्रा यांची फेरतपासणी करण्यात यावी अशी मागणी सलमानच्या वकिलाने केली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी दलपत सिंग राजपुरोहित यांनी ती मागणी फेटाळून लावली. एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये गेला असताना सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. याप्रकरणी खटला सुरू असून मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये न्यायालयाचा निकाल देण्यात येणार होता, मात्र काही साक्षीदारांच्या तपासणीसाठी परवानगी देण्यात आल्याने प्रकरण प्रलंबित राहिले. मागील वर्षी 29 एप्रिल रोजी सलमान येथील न्यायालयात हजर राहिला होता. 
=====================================
'नरेंद्र मोदी ऍप' वापरा; सीबीएसईची सूचना

नवी दिल्ली - आपले अनुभव पंतप्रधानांसोबत शेअर करता यावेत यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ‘नरेंद्र मोदी ऍप‘ची माहिती द्यावी, असे निर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सर्व शाळांना दिले आहे. 
मोदी यांनी "मन की बात‘ या रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षेतील अनुभव शेअर करण्याबाबत सांगितले होते. त्यासाठी ऍपचा उपयोग करावा असेही सांगितले होते. आता या ऍपचा प्रसार करण्यासाठी सीबीएसईची मदत घेण्यात येत आहे. या ऍपद्वारे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनी आपले परिक्षेबद्दलचे अनुभव शेअर करावेत, अशा सूचना सीबीएसईने सर्व शाळांना दिल्या आहेत. या बाबत सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, "सर्व शाळांतील प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना ऍप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करून परिक्षेच्या काळातील ताण कशाप्रकारे दूर करता याचे अनुभव शेअर करण्यास सांगावे.
=====================================
मुक्रमाबाद येथील फोटोग्राफरच्या मुलाची गरुड झेप ............

मुक्रमाबाद -   प्रतीनीधी
केरळ येथे नुकतेच पार पडलेल्या पदवी,पदवीधर समारंभात मुक्रमाबाद येथील रहिवासी असलेल्या फोटोग्राफर माधवराव वाघमारे यांचा मुलगा किरण वाघमारे यांना मास्टर आँफ फिशरी सायन्स या पदवीने सन्मानीत करण्यात आले.
केरळ राज्याचे पशु व मत्स संवर्धनमंञी के.बाबु व विध्यापीठाचे कुलगुरु मधुसुदना कुरप यांच्या प्रमुख उपस्थितीत किरण वाघमारे यांना पदवी बहाल करण्यात आली. यावेळी नवी दिल्लीचे डायरेक्टर जनरल फिशरिज जीना यांचा केरळ येथे विद्यापीठात मोलाचे मार्गदर्शन लाभले .मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान या व मास्टर  आँफ फिशरी  ही पदवी मिळाल्याबद्दल  दिनेश शिबलेकर , लक्ष्मण आवडके , गोपाळ सुन्नेवाड , सुधाकर ओबरे, इम्रान पठाण, मनोज मानेकर यांच्यासह गावकर्या कडुन अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
=====================================
जलयुक्त शिवार पाणीस्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक - सौ. वर्षाताई भोसीकर 



=====================================

No comments: