Friday, 25 March 2016

नमस्कार लाईव्ह २५-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अ‍ॅरिझोना प्रायमरीत ट्रम्प-हिलरी विजयी 
२- बेल्जियम; बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी 
३- बेल्जियम हल्ल्यातील जखमी निधी चाफेकर कोमात - पीटीआय 
४- अर्जेंटिनात ओबामांचा टँगो डान्स, उपस्थितांना आश्चर्याचा धक्का 
५- नेदरलँड्सचे महान फुटबॉलर योहान क्रायफ यांचं निधन 
६- ब्रुसेल्समधील 214 भारतीय मायदेशी परतले 
७- लाहोर; भगतसिंगांबाबत ब्रिटनच्या राणीने माफी मागावी 
८- लंडन; कमी मित्र असणे हुशार असण्याचं लक्षण - सर्व्हे 
९- ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेट एअरवेज करणार 'एअरलिफ्ट' 
१०- नैरोबी; दुस-या महिलेचा फोटो फेसुबकवर टाकला म्हणून गरोदर पत्नीने केली पतीची हत्या 
११- बोस्टन, पॅरिस आणि ब्रसेल्स... तीनही हल्ल्यांतून वाचला १९ वर्षांचा तरूण 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
१२- उद्धव ठाकरेंनाही अमेरिकेला बोलावण्याचा प्लॅन होता : हेडली 
१३- पंतप्रधान मोदी ट्विटवर कट्टर विरोधकाचे फॉलोअर 
१४- हैदराबाद; कन्हैया कुमारवर चप्पल भिरकावली 
१५- जगातील 50 महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल 
१६- रेल्वेत ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या आरक्षणात वाढ 
१७- दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने हायअलर्ट 
१८- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी आले होते - हेडली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१९- नासाने शेअर केलेल्या फोटोचं रहस्य काय? 
२०- 'लष्कर'ने केला होता बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न - डेव्हिड हेडली 
२१- बालपणापासून भारताचा द्वेष करतो- हेडली 
२२- मुलांचाही बळी द्यायला तयार होती इंद्राणी- पीटर 
२३- विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणावर "फुली' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२४- गोरखपूर; भारत-बांगलादेश थरारामुळे चाहत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू 
२५- अंबरनाथ; होळी खेळायला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत 
२६- सोलापूर; नदीपात्रात वाळूच्या खड्ड्यात बुडून बहिणींचा मृत्यू 
२७- लातूर; अमित देशमुखांना जाग, लातुरातील व्हॉलीबॉल स्पर्धा रद्द 
२८- पुणे; फर्ग्युसन राड्याप्रकरण अज्ञातांवर गुन्हा 
२९- लखनौ; होळीदरम्यान झालेल्या मारहाणीत 30 ठार 
३०- नांदेडकरांनी अनुभवली दुष्काळाची होळी 
३२- शीख समाजाचा 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' पारंपारिक कार्यक्रम उत्साहात  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३३- बंगळूरू; भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान विराटचं देशप्रेमाचं अनोखं दर्शन 
३४- सुरतवासियांसोबत सनी लिऑनची होळी, ठुमकेही लगावले 
३५- सुरत; ...आणि भडकलेल्या सनीने पत्रकाराच्या थोबाडीत लगावली 
३६- नांदेडकरांनी अनुभवली दुष्काळाची होळी; 
३७- शीख समाजाचा 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' पारंपारिक कार्यक्रम उत्साहात 
३८- ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनची निवृत्तीची घोषणा 
३९- मोहाली; ..आणि 'त्या' प्रश्नावर कॅप्टन कूल धोनी भडकला 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही जेवढ इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देइल
(पवन चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भीमराव भुरे, पी.डी. माने, मोहम्मद नासिर, रमेश सब्रराळे, सचिन भंडारे, प्रसन्ना जोंधळे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


==========================================

उद्धव ठाकरेंनाही अमेरिकेला बोलावण्याचा प्लॅन होता : हेडली

उद्धव ठाकरेंनाही अमेरिकेला बोलावण्याचा प्लॅन होता : हेडली
मुंबई: बदला घेण्याच्या भावनेनंच भारताविरोधात षडयंत्र रचल्याची माहिती डेव्हिड कोलमन हेडलीनं आपल्या जबाबात दिली आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उलट तपासणी सुरु आहे. यावेळी हेडलीने शिवसेना, बाळासाहेब आणि भारतद्वेष का? याबाबतचा खुलासा केला. 
…म्हणून भारताबद्दल तिरस्कार 
1971 च्या युद्धावेळी भारतानं केलेल्या विमान हल्ल्यात आमची शाळा उद्ध्वस्त झाली होती. यामुळे तिथे काम करणारे लोक मारले गेले. तेव्हापासूनच माझ्या मनात भारताबद्दल तिरस्कार निर्माण झाला, असं हेडली म्हणाला. 
या घटनेनंतरच भारताचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच भारताविरोधी द्वेषाची बीजं रोवल्याचं हेडलीनं सांगितलं. त्यादृष्टीने काश्मिरी लोकांना मदत करण्याचा मानसही होता, असं हेडली म्हणाला. 
शिवसेनेसाठी अमेरिकेत निधी संकलन कार्यक्रमाचं नियोजन 
दरम्यान, अमेरिकेत शिवसेनेसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम आयोजित करुन बाळासाहेबांना बोलावण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी राजाराम रेगेंच्या संपर्कातही होतो. याबाबात लष्कर ए तोयबाशी केवळ चर्चा झाली होती. जर बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसती तर, उद्धव ठाकरे किंवा अन्य शिवसेना नेत्यांना या कार्यक्रमाला बोलवण्याचा विचार होता. मात्र त्यावेळी अमेरिकेत त्यांच्यावर हल्ल्याचा कोणताही कट नव्हता, असंही स्पष्टीकरण हेडलीने दिलं.
==========================================

बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी

बॉम्बस्फोटानंतर ब्रसेल्समध्ये अडकलेले भारतीय मायदेशी
बेल्जियम : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये अडकेलेले भारतीय आज दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. जेट एअरवेजचं 9W 1229 हे विशेष विमान आज पहाटे 5 वाजता दिल्लीत दाखल झालं. 214 प्रवाशांसह आलेल्या या विमानातून 70 जण दिल्ली विमानतळावर उतरले, तर उर्वरित प्रवासी मुंबईला रवाना झाले. 
ब्रसेल्स विमानतळावर मंगळवारी झालेल्या चार शक्तीशाली स्फोटात 34 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जण जखणी झाले होते. मात्र यानंतर अनेक भारतीय ब्रसेल्समध्ये अडकले आहेत.
brussels airport blast
दरम्यान, दोन विमानांनी भारतीयांना मायदेशी परत आणण्यात येणार होतं. मात्र एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने एकाच विमानातून 214 जणांना भारतात आणलं. आता हेच विमान पुन्हा ब्रसेल्समध्ये जाऊन आणखी काही भारतीयांना आणणार आहे. हे विमान संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईहून ब्रसेल्ससाठी टेक ऑफ करणार आहे. 
मायदेशी परतलेले हे भारतीय रिकाम्या हातानेच परतले आहे. त्यांच्याकडे कोणतंही सामान नाही. इतकंच नव्हे तर त्यांच्या हॅण्डबॅग आणि पर्सही त्यांच्याजवळ नाहीत.
==========================================

भारत-बांगलादेश थरारामुळे चाहत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

भारत-बांगलादेश थरारामुळे चाहत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
गोरखपूर : ट्वेन्टी20 विश्वचषकात बंळगुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि बांगलादेशमधील सामना अतिशय रोमांचक झाला. अखेरच्या षटकात अनेकांचे श्वास रोखले गेले, हृदयाचे ठोके चुकले. पण या सामन्यामुळे एका चाहत्याला जीव गमवावा लागला. सामन्यातील थरारामुळे  उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्याच्या बिस्तोली गावातील एका वृद्धाचा मृत्यू झाला. 
एका इंग्लिश वेबसाईटच्या वृत्तानुसार, सामन्याच्या अखेरच्या षटकात एका वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अटीतटीच्या लढतीत भारताने बांगलादेशवर 1 धावेने विजय मिळवला. 
ओम प्रकाश शुक्ला असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शुक्ला टीव्हीवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहत होते. सामना अतिशय रंगात आला होता. अखेरच्या षटकात बांगलादेशच्या मुशफिकूर रहीमने हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावले. सामना कोण जिंकणार भारत की बांगलादेश, याची उत्सुकता होती. पण त्याचवेळी शुक्ला यांच्या छातीत दुखायला लागलं आणि थोड्या वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
 ओम प्रकाश शुक्ला अनेक वर्ष दिल्लीत किराणा दुकान चालवत होते. मात्र सध्या ते कुटुंबीयांसोबत गोरखपूरमध्ये राहत होते. त्यांना तीन मुलं आहेत
==========================================

नासाने शेअर केलेल्या फोटोचं रहस्य काय?

नासाने शेअर केलेल्या फोटोचं रहस्य काय?
मुंबई: भारतात शेतकऱ्यांनी शेतजमिनींना लावलेल्या आगींचा एक फोटो नुकताच अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने रिलीज केला आहे. ज्यामध्ये भारताच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये या आगी लागल्याचं दिसतंय. 
पिकांची काढणी झाल्यानंतर नवीन पीक लागवडीआधी आग लावण्याची पद्धत भारतात आहे. तुम्हाला या चित्रात जिथं लाल रंगाचे ठिपके दिसत आहेत, तिथं या आगी लावण्यात आल्यात. 
भारताच्या आदिवासी समाजांमध्ये गेल्या हजारो वर्षांपासून लागवडीआधी आग लावण्याची परंपरा आहे .ज्याचा फोटो नासानं टिपला आहे. 
*नासा दरवर्षी असे सॅटेलाईट फोटो जारी करतं. 
*जास्त करुन जिथे गहू भात लागवड होते, त्या भारत आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांतातली सॅटेलाईट चित्र असतात. 
*महाराष्ट्रात कोकणातही भात काढणीनंतर पिकाचे अवशेष जागेवरच जाळले जातात. त्याला शेतकरी राब भाजणे किंवा राब जाळणे म्हणतात. तसेच पश्चिम महाराष्ट्रात किंवा एकूणच ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणीनंतर पाचट जाळतो. 
*पाचट/पिकांचे अवशेष उचलणं, बाहेर काढणे याला मजुरी, पैसा, वेळ जातो. हे व्यवस्थापन शेतकऱ्याला जीकिरीचं वाटतं, म्हणून तो जाळण्याचा शॉर्ट कट निवडतो. 
*पण यात लाखो टन सेंद्रीय पदार्थांचा नाश होतो, त्यामुळे पिकांचे अवशेष जाळू नये.
==========================================

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान विराटचं देशप्रेमाचं अनोखं दर्शन

भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान विराटचं देशप्रेमाचं अनोखं दर्शन
बंगळुरु : टीम इंडियाचा स्टार क्रिकेट विराट कोहली त्याच्या खेळाने लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवतोच. परंतु आता कोहलीच्या देशभक्तीनेही तमाम भारतीयांना त्याचा अभिमान वाटत असेल.
क्रिकेटर्स पैशांसाठी खेळतात असा आरोप त्यांच्यावर अनेकदा होतो. पण पैशांपेक्षा देश मोठा आहे, हे विराट कोहलीने दाखवून दिलं आहे. हे आरोप खोटं ठरवणारा विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
ट्वेन्टी20 विश्वचषकातील बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच्या भारत आणि बांगलादेश सामन्याचा हा व्हिडीओ आहे. या सामन्यात विराट कोहली बाऊंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याचवेळी चाहत्यांनी ‘विराट… विराट…’ म्हणत चीअर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विराटने त्यांच्याकडे पाहिलं आणि ‘विराट…विराट…’ नाही तर ‘इंडिया…इंडिया…’ ओरडा, असा इशारा केला.
एका चाहत्याने हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर ट्विटरवर शेअर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं असून कोहलीचं प्रचंड कौतुक होत आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला वाटेल की विराट कोहलीचं क्रिकेटपेक्षाही देशावर अधिक प्रेम आहे.
==========================================

...आणि भडकलेल्या सनीने पत्रकाराच्या थोबाडीत लगावली

...आणि भडकलेल्या सनीने पत्रकाराच्या थोबाडीत लगावली
सूरत : होळीच्या कार्यक्रमासाठी सुरतमध्ये गेलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला एका वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलं. तिथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने सनीला अश्लील प्रश्न विचारला. यावर भडकलेल्या सनीने त्याच्या दोन कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. 
सनी लिओनी होळीच्या कार्यक्रमासाठी सूरतला गेली होती. यावेळी एक पत्रकार कार्यक्रमाचं कार्ड घेऊन सनी लियोनीच्या हॉटेल रुमपर्यंत पोहोचला. तिथे त्याने सनीला अश्लील प्रश्न विचारले. त्यानंतर संतापलेल्या सनीने त्याच्या दोन थोबाडीत मारली. इतकंच नाही तर चिडलेल्या सनीने पत्रकार परिषदही रद्द केली. 
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सनी धुळवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. सनीने अगदी रंगात येऊन गाण्यांवर ठुमकेही लगावले. सनीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी बरीच गर्दीही केली होती.
==========================================

पंतप्रधान मोदी ट्विटवर कट्टर विरोधकाचे फॉलोअर

पंतप्रधान मोदी ट्विटवर कट्टर विरोधकाचे फॉलोअर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी केजरीवार यांना धुलिवंदनाला अनोखं गिफ्ट दिलं. नरेंद्र मोदींनी धुळवडीच्या दिवशीच अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. 
मोदींनी ट्विटरवर फॉलो केल्यानंतर केजरीवाल आणि सिसोदिया या दोघांनीही याबद्दल त्यांचे आभार मानले. तसंच आज राग-रुसवा विसरण्याचा दिवस असून ते दिल्लीच्या भविष्यासाठी चांगले ठरेल, असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
तर मनिष सिसोदियांनी होळीच्या निमित्ताने पंतप्रधानांकडे एक इच्छा व्यक्त केली आहे. दिल्ली विधानसभेने वर्षभरात संमत केलेली अनेक विधेयकं गृहमंत्रालयाकडे प्रलंबित असून ती लवकरात लवकर संमत करावी, अशी मागणी सिसोदियांनी केली आहे.धुळवडीनिमित्त पंतप्रधान मोदींनी एकूण 150 जणांना ट्विटरवर फॉलो केलं, ज्यात अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस नेते अहमद पटेल, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते शशी थरुर आणि ओडिशाचे मुख्मयंत्री नवीन पटनायक तसंच डावे नेते सिताराम येचुरी यांचा समावेश आहे. 
नरेंद्र मोदी त्यांच्या पर्सनल ट्विटर हॅण्डलवर सुमारे 1300 जणांन फॉलो करतात, ज्यात अनेक पक्षांच्या नेते आहेत. मोदींचे ट्विटरवर 10.4 million फॉलोअर आहेत तर केजरीवालांना 7.28 million फॉलो करतात.
==========================================

बाळासाहेबांच्या हत्येच्या कटातील 'तो' दहशतवादी कोण?

बाळासाहेबांच्या हत्येच्या कटातील 'तो' दहशतवादी कोण?
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट लष्कर ए तोयबानं आखला होता असा गौप्यस्फोट डेव्हिड हेडलीनं केला. इतकंच नव्हे तर या प्रकरणी एका दहशतवाद्याला अटक केली होती, मात्र तो नंतर पसार झाल्याचंही हेडली म्हणाला. त्यामुळं तत्कालीन आघाडी सरकार आणि पोलीस यंत्रणेनं कुणाच्या सांगण्यावरुन ही माहिती दडवली? असा सवाल विचारला जातो आहे. 
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.. तमाम शिवसैनिकांचं दैवत. ज्या साहेबांच्या एका हाकेवर तमाम महाराष्ट्रातले शिवसैनिक धावून यायचे,  त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट रचला होता, असा गौप्यस्फोट हेव्हिड हेडलीनं केला. 
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, बाळासाहेबांवर हल्ला करण्यासाछी लष्कर ए तोयबानं धाडलेल्या एका दहशतवाद्याला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र तो पसार झाला. राजाराम रेगेंच्या मदतीनं शिवसेना भवनात शिरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती हेडलीनं दिली होती. मात्र आता उलटतपासणीत हेडलीच्या गौप्यस्फोटानंतर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 
बाळासाहेबांवर हल्ल्याच्या प्रयत्नात ज्या दहशतवाद्याला अटक केली, तो पसार कसा झाला? त्याची माहिती पोलिसांनी लपवली का? अशा प्रश्नांना तोंड फुटलं आहे. शिवसेनेनंही आता पोलिसांनी यासंदर्भात खुलासा करण्याची मागणी केली आहे. 
बाळासाहेब हे करिश्मा असलेले नेते होते. त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, अशा नेत्याच्या हत्येचा कट तत्कालीन सरकार आणि पोलिसांनी का लपवला? यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकणार यात शंका नाही.
==========================================

बेल्जियम हल्ल्यातील जखमी निधी चाफेकर कोमात, पीटीआयचं वृत

बेल्जियम हल्ल्यातील जखमी निधी चाफेकर कोमात, पीटीआयचं वृत
ब्रसेल्स (बेल्जियम): बेल्जियममध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या मुंबईच्या निधी चाफेकर कोमात गेल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मात्र, निधी यांची प्रकृती स्थिर असल्याती माहिती जेट एअरवेजकडून देण्यात येते आहे. 
मुंबईतील अंधेरीच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चाफेकर जेट एअरवेजमध्ये फ्लाईट अटेंडन्ट म्हणून काम करतात. मंगळवारी ब्रसेल्स विमानतळावर झालेल्या हल्ल्यात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, ब्रसेल्समध्ये अडकलेले जेट एअरवेजचे 28 कर्मचारी उदया भारतात दाखल होत आहेत. पहाटे पाच वाजता दिल्ली विमानतळावर त्यांचं आगमन होईल. त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील.

==========================================

अर्जेंटिनात ओबामांचा टँगो डान्स, उपस्थितांना आश्चर्याचा धक्का

अर्जेंटिनात ओबामांचा टँगो डान्स, उपस्थितांना आश्चर्याचा धक्का
अर्जेंटिना: आपल्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या बराक ओबामांनी एका पार्टीत टँगो डान्स करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पत्नी मिशेलसह लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. 
अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनी बराक ओबामांसाठी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीत टँगो डान्स करणाऱ्या तरूणीनं बराक ओबामांना डान्स करण्याची विनंती केली. 
सुरूवातीला नकार देणारे ओबामा थोड्या वेळांनी मात्र डान्स करण्यासाठी तयार झाले. ओबामांनंतर त्यांची पत्नी मिशेल यांनीही मग ठेका धरला. याआधी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या बराक ओबामा आणि मिशेल यांनी कोळी गाण्यावर ताल धरला होता.
==========================================

होळी खेळायला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत

होळी खेळायला नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या, प्रियकर अटकेत
अंबरनाथ: होळी खेळायला नकार दिल्यानं प्रियकरानं प्रेयसीवर वार करुन हत्या केल्याची खळबळजनक  घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथमधील दुर्गापाड्यात घडली असून यात प्रभावती अस मृत्यू झालेल्या महिलेच नाव आहे. 
मनोरंजन आणि प्रभावती हे ओरिसा राज्यातील एकाच गावचे रहिवासी आहेत. विवाहित असणाऱ्या प्रभावतीचे मनोरंजनसोबत प्रेमसबंध जुळले याची माहिती प्रभावतीच्या नवऱ्यालाही होती. मात्र, त्यानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. 
आज सकाळी प्रभावती आणि मनोरंजन यांच्यात होळी खेळण्यावरुन वाद झाला. त्या रागातून आरोपी मनोरंजनने चाकून वार करीत प्रभावतीची हत्या केली. तर स्वत:वरही वार करीत त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनोरंजनला अटक करुन त्याला उपचारासाठी उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
==========================================

सुरतवासियांसोबत सनी लिऑनची होळी, ठुमकेही लगावले

सुरतवासियांसोबत सनी लिऑनची होळी, ठुमकेही लगावले!
सूरत: गुजरातच्या सुरतमध्ये अभिनेत्री सनी लिओनी हिनं आज होळीच आनंद लुटला. आपल्या चाहत्यासोबत रंगांची उधळण करत सनीने यंदाची होळी साजरी केली. आपली आवडती अभिनेत्री आपल्यासोबत होळी साजरी करत असल्यानं सनीच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह पहायला मिळाला. तसेच सनीही होळीच्या रंगात रंगली. 
सनीला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी बरीच गर्दीही केली होती. त्याचवेळी सनीनं सगळ्यांना हात हलवित अभिवादनही केले. 
आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सनी धुळवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाली. सनीला पाहण्यासाठी चाहत्यांची मात्र एकच झुंबड उडाली होती.
==========================================

नदीपात्रात वाळूच्या खड्ड्यात बुडून बहिणींचा मृत्यू

नदीपात्रात वाळूच्या खड्ड्यात बुडून बहिणींचा मृत्यू
सोलापूर : पाणी पिण्यासाठी नदीपात्र गेलेल्या दोन बहिणींचा वाळूच्या खड्यात पडून मृत्यू झाला. यशोधरा (वय 11) आणि रुक्मिणी लोहार (वय 13) असं या दुर्दैवी सख्ख्या बहिणींचं नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुसुर गावातल्या भीमा नदीपात्रातील दुर्घटना. 
पाणी पिण्यासाठी दोन्ही बहिणी नदीपात्रात गेल्या होत्या. मात्र पात्रातील वाळू उपसल्यामुळे तिथे खड्डा पडला होता. या खड्यात पाणी साचलं होतं. मात्र त्याचा अंदाज न आल्याने दोन्ही बहिणी या खड्ड्यात बुडाल्या. 
दोन्ही बहिणी आईसोबत गुरं राखण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला.
==========================================

कन्हैया कुमारवर चप्पल भिरकावली

कन्हैया कुमारवर चप्पल भिरकावली
हैदराबाद : दिल्लीच्या जेएनयूतील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर चप्पल भिरकावण्यात आली. हैदराबाद विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. 
चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा विद्यार्थी भारत माता की जयच्या घोषणा देत होता. 
रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी त्यानं हैदराबाद विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळी तो बोलत असताना हा प्रकार घडला. 
देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार हा दिल्लीतल्या जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी असून तिथल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षही आहे. 
9 फेब्रुवारीला दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरुचा स्मृतीदिन साजरा केला होता. त्यानिमित्त कथित देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयासह काही विद्यार्थ्यांवर होता. या आरोपाखाली त्याची जेलमध्येही रवानगी झाली होती.
==========================================

अमित देशमुखांना जाग, लातुरातील व्हॉलीबॉल स्पर्धा रद्द


अमित देशमुखांना जाग, लातुरातील व्हॉलीबॉल स्पर्धा रद्द!
लातूर :  भीषण पाणीटंचाईतही व्हॉलीबॉल स्पर्धांसाठी पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी अखेर स्पर्धा रद्द करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. अमित देशमुख यांच्या लातुरातील कार्यालयाने यासंदर्भातील पत्रक जारी केलं आहे.

अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 28 तारखेपासून लातुरातील जिल्हा क्रिडा संकुलातील व्हॉलीबॉलच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्याचं मैदान तयार करण्यासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी सुरु होती. पाण्यासाठी भांडणं आणि दंगली होऊ नयेत म्हणून जिथे प्रशासनानं जमावबंदी लागू केली आहे, त्याच लातुरात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसासाठी पाण्याची उधळपट्टी केली.
==========================================

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनची निवृत्तीची घोषणा

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनची निवृत्तीची घोषणा
मुंबई: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कायमचं निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर वॉटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. मोहालीत सरावाआधी शेन वॉटसननं आपल्या सहकाऱ्यांसमोर निवृत्तीची घोषणा केली. 
शेन वॉटसननं गेल्या वर्षी झालेल्या अॅशेस मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. तसंच गेल्या सप्टेंबरपासून वॉटसनच्या वन डे सामन्यांच्या कारकीर्दीलाही पूर्णविराम मिळाला आहे. शेन वॉटसनच्या नावावर 59 कसोटी सामन्यांमध्ये 3731 धावा जमा आहेत. त्यानं 90 वन डे सामन्यांमध्ये 5757 धावा केल्या आहेत. 
वॉटसननं एक अष्टपैलू म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या नावावर कसोटीत 75 आणि वन डे 168 विकेट्स जमा आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीतही वॉटसननं 56 सामन्यांत 1400 धावा केल्या असून, त्याच्या नावावर 46 विकेट्स जमा आहेत. शेन वॉटसनचा ऑस्ट्रेलियाच्या 2007 आणि 2015 सालच्या वन डे विश्वविजेत्या संघातही समावेश होता.
==========================================

नेदरलँड्सचे महान फुटबॉलर योहान क्रायफ यांचं निधन

नेदरलँड्सचे महान फुटबॉलर योहान क्रायफ यांचं निधन
नेदरलँड्सचे महान फुटबॉलर योहान क्रायफ यांचं फुफ्फुसाच्या कर्करोगानं आज बार्सिलोनामध्ये निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. योहान क्रायफ यांनी 1964 ते 1984 या वीस वर्षांच्या कालावधीत फुटबॉलविश्वावर आपल्या अनोख्या शैलीचा ठसा उमटवला. योहान क्रायफ यांच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सनं 1974 साली फिफा विश्वचषकाचं उपविजेतेपद मिळवलं होतं. 
1978 सालच्या विश्वचषक उपविजेत्या नेदरलँड्सच्या संघातही त्यांचा समावेश होता. योहान क्रायफ यांनी नेदरलँड्सकडून 48 सामन्यांमध्ये 33 गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. योहान क्रायफ यांनी व्यावसायिक फुटबॉलमध्येही मोठं नाव कमावलं. क्रायफ यांनी आएक्स आणि बार्सिलोनासारख्या युरोपातल्या बलाढ्य संघांचं प्रतिनिधित्त्व केलं. 
व्यावसायिक फुटबॉलमध्ये योहान क्रायफ यांच्या नावावर 661 सामन्यांमध्ये 369 गोल जमा आहेत. योहान क्रायफ यांना 1971, 1973 आणि 1974 साली बॅलन डी ओर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर क्रायफ यांनी आएक्स आणि बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदाचीही भूमिका बजावली. क्रायफ यांनी बार्सिलोनाला चारवेळा स्पॅनिश ला लीगाचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.
==========================================

फर्ग्युसन राड्याप्रकरण अज्ञातांवर गुन्हा

फर्ग्युसन राड्याप्रकरण अज्ञातांवर गुन्हा
पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात झालेल्या राड्याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड काल कन्हैय्याकुमारच्या समर्थकांना पाठिंबा देण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात पोहोचले होते. त्यावेळी आव्हाड यांना भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. इतकंच नव्हे तर त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. 
अखेर पोलिसांना राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पिस्तुल काढावं लागलं. 
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपनं परवानगीविना एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.  त्याला आंबेडकरवादी विद्यार्थ्यांचा विरोध होता. मात्र, या विरोधादरम्यान देशविरोधी घोषणा झाल्याचा दावा प्राचार्यांनी केल्यानं हा वाद आणखीनच चिघळला. पण त्यांनी नंतर सारवासारव केली होती. 
भाजयुमोविरोधात तक्रार
दुसरीकडे पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटच्या काही विद्यार्थ्यांनीही भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली आहे.  कन्हैय्याच्या समर्थनार्थ आयोजित चर्चासत्र घेऊ नये., तसं झाल्यास मारहाण करु, अशी धमकी मिळाल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याविरोधात डेक्कन पोलिस स्थानकात तक्रारही देण्यात आली आहे. 
फर्ग्युसन महाविद्यालयात झालेल्या राड्यानंतर अभाविपचा एक गट रानडे इन्सि्टयूटमध्ये आला होता. त्यावेळीही विरोध झाल्यानं या वादाला तोंड फुटलं होतं.
==========================================

IndvsBan : व्हॉट्सअॅपवर विनोदांचा पाऊस 




==========================================

..आणि 'त्या' प्रश्नावर कॅप्टन कूल धोनी भडकला

..आणि 'त्या' प्रश्नावर कॅप्टन कूल धोनी भडकला
मोहाली : कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी एक प्रश्नावर मात्र चांगलाच भडकला. बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नावर धोनी चिडला.

भारतीय संघाला चांगल्या रन रेटने जिंकणं गरजेचं होतं, मात्र कसाबसा विजय पदरात पडला, त्यावर तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. धोनीने पत्रकाराला थांबवत सणसणीत उत्तर दिलं.

“तुमच्या आवाज आणि प्रश्नावरुन असं वाटतंय की तुम्हाला भारताच्या विजयाने दु:ख आहे. क्रिकेटचा सामन्यात स्क्रिप्ट नसते. नाणेफेक हरल्यानंतर ज्या पिचवर आम्ही फलंदाजी केली तिथे जास्त धावा का झाल्या नाहीत याचं विश्लेषण आम्हाला करावं लागतं. बाहेर बसून तुम्ही या गोष्टीचं विश्लेषण करत नसाल, तर हा प्रश्न विचारु नका,” असा सल्लाही धोनीने दिला.

पाहा व्हिडीओ
==========================================
बालपणापासून भारताचा द्वेष करतो- हेडली
मुंबई - ‘7 डिसेंबर 1971 रोजी भारतीय लष्कराने केलेल्या बॉम्बहल्ल्यात माझी शाळा उध्वस्त झाली होती. शाळेतील अनेकजण त्यात ठार झाले होते. तेव्हापासून माझ्या मनात भारताबद्दलचा द्वेष आहे‘, असे अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हेडलीने सांगितले आहे. 

मुंबईतील विशेष सत्र न्यायालयात अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला, मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी घेतली जात आहे. या तपासणीचा आज तिसरा दिवस आहे. हेडलीने गुरुवारी ‘लष्करै तैयबाच्या निशाण्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते‘, असा गौप्यस्फोट केला होता. आज (शुक्रवार) त्याने ‘बाळासाहेबांना अमेरिकेत बोलावणार होतो. मात्र त्यावेळी त्यांच्यावर हल्ल्याचा विचार नव्हता‘, अशी माहिती हेडलीने दिली. तसेच ‘बालपणी शाळेवर हल्ला झाल्यापासून मी भारत आणि भारतीयांचा द्वेष करत आहे. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्करे तैयबाला मदत करत असून मला भारताचे जास्तीत जास्त नुकसान करायचे आहे‘, असेही तो म्हणाला. आपल्याला अमेरिकेतील कारागृहात कोणत्याही प्रकारच्या विशेष सवलती मिळत नसून आपण कोणत्या कारागृहात आहोत हे सांगू शकत नसल्याचेही हेडलीने सांगितले. 

सत्र न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे आरोपी अबु जिंदाल याचे वकील अब्दुल वहाब खान हे हेडलीची उलटतपासणी घेत आहेत.
==========================================
मुलांचाही बळी द्यायला तयार होती इंद्राणी- पीटर
मुंबई- शीना बोरा हत्येसंबंधीच्या गुंतागुंतीच्या प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. "इंद्राणी मुखर्जी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी स्त्री असून, तिचे ध्येय गाठण्यासाठी ती तिच्या पोटच्या मुलांचाही बळी द्यायला तयार होती," असे पीटर मुखर्जी यांनी सांगितले आहे.

इंद्राणी हिने माध्यम क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती मानले जाणारे पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केले होते. तिची मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणीसह पीटर व इतर दोघांना अटक करण्यात आली आहे. या खटल्यात अटकेत असलेल्या मुखर्जी यांनी त्यांच्या पत्नीबद्दल जबाब नोंदविताना प्रथमच इंद्राणीविरुद्ध जबाब दिला आहे. 

मुखर्जी यांनी जामिनासाठी दुसऱ्यांदा अर्ज केला असून, सीबीआयने त्यांच्यावर ठेवलेले आरोप खोटे आहेत असा दावा त्यांनी केला. सीबीआयच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने फेब्रुवारीमध्ये त्यांचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता.
==========================================
जगातील 50 महान नेत्यांच्या यादीत केजरीवाल
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध फॉर्च्यून या माध्यम मासिकाने जगातील 50 महान नेत्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा समावेश आहे. आम आदमी सरकारच्या सम-विषम वाहतूक योजनेबद्दल फॉर्च्यूनने केजरीवाल यांचे विशेष कौतुक केले आहे.

केजरीवाल यांनी याबद्दल ट्विट केले आहे. प्रथम वॉशिंग्टन पोस्टने आम आदमी क्लिनिकची स्तुती केली होती. आणि आता फॉर्च्यूनने दिल्लीत राबविण्यात आलेल्या वाहतुकीच्या सम-विषम योजनेचे कौतुक केले आहे. जानेवारीमध्ये 15 दिवसांसाठी सम-विषम योजनेचा प्रयोग यशस्वीपणे राबविला होता. जगभरातील 50 नेत्यांच्या यादी केजरीवाल यांचा 42 वा क्रमांक आहे. केजरीवाल यांनी आपल्या कारकिर्दीची जोखीम पत्करून ही महत्त्वाकांक्षी योजना राबविली आणि दिल्लीतील गर्दी व प्रदूषण कमी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यादीमध्ये पाचवे स्थान मिळविले होते, मात्र यावर्षी त्यांना 50 जणांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. भारताला व्यापारास अधिक पुरक बनविणे, महिलांविरोधातील गुन्हे आटोक्यात आणणे व स्वच्छता याबाबत मागील वर्षी फॉर्च्यूनने मोदींची स्तुती केली होती. अॅमेझॉनचे जेफ बेझॉस यांनी या यादीमध्ये अव्वल क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय टिम कूक, पोप फ्रान्सिस यांचा या यादीत पुन्हा समावेश करण्यात आला आहे. तसेच, अमेरिकेतील देशांतर्गत व जागतिक आव्हानांसमोर बराक ओबामा यांनी शरणागती पत्करल्याने त्यांना सलग तिसऱ्या वर्षी या यादीतून वगळण्यात आले आहे.
==========================================
होळीदरम्यान झालेल्या मारहाणीत 30 ठार
लखनौ (उत्तर प्रदेश) - गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये होळी साजरी करताना विविध ठिकाणी झालेल्या भांडणात 30 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. 
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, होळीनिमित्त गोळीबार, दोन गटांतील भांडणे आदी प्रकारांमुळे 30 जण ठार झाले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटांत झालेल्या भांडणामध्ये 19 जण ठार झाले. माडियॉन आणि गोसाईगंज परिसरात झालेल्या भांडणामध्ये दोन जण ठार झाले. तर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना झालेल्या अपघातांमध्ये पाच जण ठार तर 40 जण जखमी झाले. राज्यातील बहुतेक रुग्णालये अपघातांतील जखमींनी भरून गेले होते. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती. तसेच चोख बंदोबस्तही ठेवला होता. तरीही हे प्रकार रोखण्यात पोलिस अपयशी ठरले.
==========================================
ब्रुसेल्समधील 214 भारतीय मायदेशी परतले


नवी दिल्ली/ब्रुसेल्स : इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमच्या राजधानीतून 214 पीडित भारतीय नागरिक आज (शुक्रवार) पहाटे मायदेशी परतले. 
बेल्जियन राजधानी ब्रुसेल्समध्ये अनेक भारतीय नागरिक अडकून पडले होते. ते आज भारतात सुखरूप पोचले. त्यापैकी 70 नागरिक दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले, तर बाकीचे नागरिक मुंबईला रवाना झाले. जेट एअरवेजच्या एका विशेष विमानाने या सर्व नागरिकांना दिल्लीत आणण्यात आले. 
ब्रुसेल्स येथील विमानतळ आणि मेट्रोमध्ये आत्मघाती हल्ले करून दहशवताद्यांनी चार शक्तीशाली स्फोट घडविले होते. त्यामध्ये 34 जणांचा मृत्यू झाला, तर दोनशेहून अधिक लोक जखमी झाले होते. 
==========================================
अर्जेंटिनात ओबामा दांपत्याने केला टँगो डान्स
ब्युनोस एरीस (अर्जेंटिना) : विदेश दौऱ्यांमध्ये तेथील लोकांशी समरस होत त्यांची मने जिंकण्यात हातखंडा असणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची झलक पुन्हा एकदा दिसली. अर्जेंटिनाच्या दौऱ्यामध्ये एका पार्टीत कलाकारांसोबत ठेका धरत ओबामांनी टँगो डान्स केला. 

यापू्र्वी, भारत दौऱ्यावर आले असताना बराक ओबामा आणि मिशेल या जोडीने मुंबईत एका गाण्यावर शालेय विद्यार्थ्यांसोबत सहभागी होत कोळी नृत्यावर ठेका धरला होता.
ओबामा हे सध्या त्यांच्या पत्नी मिशेल यांच्यासह अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर आहेत. अर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरिशिओ मॅक्री यांनी बराक ओबामांसाठी शाही भोजन व संगीत मैफलीचे आयोजन केले होते. 

==========================================
रेल्वेत ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या आरक्षणात वाढ
नवी दिल्ली : ज्येष्ठ नागरिक व 45 पेक्षा अधिक वयाच्या महिला, तसेच गर्भवती महिलांसाठी रेल्वेमधील आरक्षण ५० टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्येक रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 90 बर्थ उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरक्षणात वाढ करावी अशी प्रवाशांची मागणी होती. त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक आरक्षण कोट्याची घोषणा केली होती. त्याला अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
नव्या आरक्षणानुसार ज्येष्ठ नागरिकांसह 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला, तसेच गर्भवती महिलांनाही आरक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे महामंडळाचे सदस्य मोहंमद जमशेद यांनी दिली. 
==========================================
भगतसिंगांबाबत ब्रिटनच्या राणीने माफी मागावी
लाहोर - महान क्रांतिकारी भगतसिंग यांना 1931मध्ये दिलेल्या फाशीसाठी ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या वारसांना पैसे दिले पाहिजेत, अशी मागणी पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. 

भगतसिंग यांच्या 85व्या हुतात्मा दिनानिमित्त बुधवारी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहिला कार्यक्रम येथून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या चाक 10-जीबी, बंग चाक, जरानवाला, फैसलाबाद जिल्हा या भगतसिंग यांच्या जन्मस्थळी झाला. वेगवेगळ्या भागांतून आलेल्या अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या भगतसिंगांनाआदरांजली वाहिली. 

दुसरा कार्यक्रम 23 मार्च 1931 रोजी राजगुरू आणि सुखदेव या सहकाऱ्यांसमवेत भगतसिंग यांना फासावर चढविण्यात आलेल्या शादमन चौकात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ब्रिटनच्या राणीने (क्वीन एलिझाबेथ) स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारांना फाशी दिल्याबद्दल माफी मागितली पाहिजे आणि त्यांच्या वारसांना पैसे दिले पाहिजेत, अशा मागण्या करण्यात आल्या. भगतसिंग यांना आजीवन कारावास ठोठावण्यात आला होता. मात्र, नंतर अन्य बनावट प्रकरणात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली, असे या कार्यकर्त्यांनी नमूद केले. 

आम्ही हा ठराव राणीकडे पाठविण्यासाठी इस्लामाबादमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयांत सादर करणार आहोत. भगतसिंग यांच्या फाशीसाठी माफी मागावी, यासाठी आम्ही ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करू. 
==========================================
दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने हायअलर्ट
नवी दिल्ली - पाकिस्तानी लष्करातील माजी सैनिकासोबत सहा हार्डकोअर दहशतवाद्यांनी सीमारेषा ओलांडून भारतात घुसखोरी केली असून, महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा त्यांचा इरादा आहे, असा इशारा गुप्तचर संस्थांनी दिल्यानंतर तीन राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला. यामध्ये दिल्ली, आसाम आणि पंजाब यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
पाकिस्तानी लष्कराचा माजी सैनिक महंमद खुर्शीद आलम ऊर्फ जहॉंगीरने सहा दहशतवाद्यांसमवेत 26 फेब्रुवारी रोजी पठाणकोट सीमेवरून भारतात घुसखोरी केली होती. आसाममधील दहशतवाद्यांच्या भरती प्रक्रियेची धुरा त्याने सांभाळली होती. दिल्लीतील हॉटेल्स आणि रुग्णालये दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत, असे केंद्रीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. आसाममधील बारपेटा जिल्ह्यातील मदरशास आलमने "सप्टेंबर-2015‘मध्ये भेट दिली होती. येथे पाच दिवस त्याचे वास्तव्य होते. आसाममधील काही दुर्गम भागामध्ये दहशतवाद्यांचे जाळे विणण्याचे काम जहॉंगीरने केले असून, काही स्थानिक लोकदेखील त्याला मदत करत असल्याचा संशय तपाससंस्थांना आहे.
==========================================
टी-20 विश्वकरंडकानंतर शेन वॉट्‌सनची निवृत्ती
नवी दिल्ली- ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 
चौतीस वर्षीय वॉट्‌सनने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे. दरम्यान, ट्‌वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते. 
पत्रकारांशी बोलताना वॉट्‌सन म्हणाला, ‘धर्मशाळा येथे एके दिवशी सकाळी लवकर उठलो होतो. वातावरण व परिसर खूपच छान होते. मला काही कळत नव्हते परंतु निवृत्तीची ही योग्य वेळ असल्याचे जाणवत होते. ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना आजपर्यंत आनंद लुटला आहे. आता दुसऱया खेळाडूला संधी द्यायला हवी.‘ 
दरम्यान, वॉट्‌सनने 24 मार्च 2002 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण होते. 190 एकदिवसीय सामन्यात 40.54च्या सरासरीने 6365 धावा केल्या असून 168 गडी बाद केले आहेत. एकदिवसीय सामन्यात 9 शतके व 33 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. 2 जानेवारी 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यास सुरवात केली होती. 59 कसोटी सामन्यांमध्ये 35.19च्या सरासरीने 3731 धावा केल्या असून 75 गडी बाद केले आहेत. कसोटीमध्ये 4 शतके व 24 अर्धशतके झळकावली आहेत. 20 फेब्रुवारी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 पदार्पण केले होते.
==========================================
विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणावर "फुली'
कनिष्ठ महाविद्यालयीन म्हणजेच अकरावी आणि बारावीतील मुलींना शाळेप्रमाणेच मोफत शिक्षण देण्यात येत असल्याचा ढोल सरकार वाजवते. मात्र, हे "मोफत शिक्षण‘ केवळ तीनशे रुपयांच्या शुल्कापर्यंतच मर्यादित असून, प्रत्यक्षात महाविद्यालयांकडून विद्यार्थिनींवर प्रयोगशाळांपासून ते ओळखपत्रांपर्यंतच्या कारणांनी पाचशे ते पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे "शुल्क‘ लादले जात असल्याचे "सकाळ‘च्या तपासणीत आढळून आले आहे. 
राज्यात विद्यार्थिनींच्या शिक्षणाची हेळसांड होऊ नये म्हणून तत्कालीन राज्य सरकारने 1986 मध्ये एक निर्णय जारी करून बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली. शासकीय, अशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित या शाळांना ही योजना लागू करण्यात आली. त्या वेळी शुल्काचे दरही निश्‍चित करण्यात आले. महापालिका क्षेत्र आणि अन्य क्षेत्रासाठी वेगवेगळे शुल्क असून, त्यांची बेरीज अंदाजे प्रतिविद्यार्थिनी सुमारे अडीचशे रुपये येते. हे पैसे सरकारकडून विद्यार्थिनींच्या संख्येनुसार महाविद्यालयांना देण्याची तरतूद आहे. मात्र, विद्यार्थिनींचे हे अडीचशे रुपयांचे शुल्क माफ झाल्याचा पालकांचा आनंद टिकत नाही, याचे कारण हे शुल्क जरी माफ करण्यात आले तरी संस्थाचालक इतर अनेक कारणे दाखवत पाचशे रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतची रक्कम पालकांकडून वसूल करतात. अनुदानित महाविद्यालयांना सरकारी अनुदान मिळत असल्याने त्यांचा इतर शुल्काचा हा "दर‘ पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, विनाअनुदानित महाविद्यालयांकडून आकारला जाणारा दर सामान्यांची छाती दडपवणारा आहे. तो दर पाच हजारांपासून पंचवीस हजारांपर्यंत जातो. हे "शुल्क‘ कधी इमारत विकास निधीच्या नावे घेतले जाते, तर कधी परीक्षा शुल्काच्या. कधी "मॅगझिन फी‘च्या तर कधी जिमखाना फीच्या नावाखाली. 
==========================================

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी आले होते - हेडली


  • मुंबई, दि. २५ - 'माझ्या वडिलांचा 25 डिसेंबर 2008 मध्ये मृत्यू झाल्यानंतर तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी माझ्या घरी सांत्वनासाठी आले होते', अशी माहिती मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने दिली आहे. 26/11 हल्ल्याप्रकरणी अमेरिकेत शिक्षा भोगत असलेल्या हेडलीचीमुंबईच्या विशेष सत्र न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलटतपासणी सुरु आहे. त्यावेळी त्याने ही माहिती दिली आहे. 
    'मी लष्कर-ए-तोयबासोबत काम करत असल्याचं माझ्या वडिलांना स्वत: सांगितलं होतं. माझ्या वडिलांनी याला विरोध दर्शवला होता. माझे वडील, भाऊ आणि काही नातेवाईकांचा पाकिस्तान निर्मितीत सहभाग होता मात्र त्यांची माहिती मी उघड करत करु शकत नसल्याचं', डेव्हिड हेडलीने सांगितलं आहे. 'अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवाही हल्ला प्रकरणी माझी कधीच चौकशी झालेली नाही. पुर्व पत्नी फैजाने केलेल्या तक्रारीच्या आधारावर मात्र पाकिस्तानमध्ये एकदा अटक करण्यात आली होती', अशी माहिती डेव्हिड हेडलीने दिली आहे.
    दरम्यान शुक्रवारी सकाळी उलटतपासणीदरम्यान '७ डिसेंबर १९९७१ रोजी भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्बहल्ला केला होता, त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो असल्याचा', खुलासा हेडलीने केला आहे. 'लहानपणापासून माझ्या मनात भारतीयांबद्दल द्वेष आहे, ७ डिसेंबर १९९७१ रोजी भारतीय विमानांनी माझ्या शाळेवर बॉम्बहल्ला केला होता, त्या हल्ल्यात शाळेतील अनेक करणा-या कर्मचा-यांचा मृत्यू झाला. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच मी लष्कर-ए-तोयबामध्ये सहभागी झालो', अशी माहिती हेडलीने दिली आहे. 
==========================================

कमी मित्र असणे हुशार असण्याचं लक्षण


  • लंडन, दि. २५ - अनेकजण मला जास्त मित्र नसल्याची तक्रार करत असतात. जास्त मित्र नसल्याने अनेकजणांना आपण एकटे असल्याची भावना येत असते. तुम्ही तुमचा खुप वेळ मला जास्त मित्र का नाहीत असा विचार करण्यात घालवता का ? असं असेल तर मग तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर फक्त तुमच्या मोजक्या मित्रांसोबत वेळ घालवत असाल आणि त्यातून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एका रिसर्चनुसार कमी मित्र असणे हे हुशार असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे माणूस जास्त तणावाखाली येत नाही आणि आनंदी राहतो.  
    ब्रिटिश जरनल ऑफ सायकॉलॉजीने केलेल्या रिसर्चनुसार कमी मित्र असणारे लोक हे इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीच्या मानसशास्त्रज्ञ सतोषी आणि नोरमन ली यांनी हा रिसर्च केला आहे. 18 ते 28 वयोगटातील 15 हजार जणांवर हा रिसर्च करण्यात आला आहे.  
    या रिसर्चमध्ये त्यांनी आपल्या पुर्वजांचा दाखला दिला आहे. आपले पुर्वंज ज्या वातावरणात, परिस्थितीत राहिले त्यामुळे ते जीवनात आनंदी होते आणि याचा फायदा आपल्याला आजच्या काळात कसा होऊ शकतो याबद्दल यामध्ये सांगण्यात आलं आहे. 
==========================================

ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेट एअरवेज करणार 'एअरलिफ्ट'


  • नवी दिल्ली, दि. २४ - ब्रसेल्समध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यासाठी जेट एअरवेज आपली 3 विमाने पाठवणार आहे. अॅम्सटरडॅमहून ही विमाने उड्डाण करणार असून मुंबई, दिल्ली आणि टोरंटो या 3 शहरात लँडींग करणार आहेत. ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल आहे. बेल्जियममधील ब्रसेल्स येथे विमानतळावर आणि त्यापाठोपाठ मेट्रो स्टेशनवर मंगळवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ३४ ठार तर २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये जेट एअरवेजचे 2 क्रू मेंबरदेखील जखमी झाले आहेत. 
    जेट एअरजवेजच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 9W 227 हे विमान स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता अॅम्सटरडॅमहून मुंबईसाठी उड्डाण करणार आहे. तर 9W 1229 हे विमान 4 वाजता दिल्लीसाठी उड्डाण करेल. अॅम्सटरडॅमहून एक विमान टोरंटोसाठी पाठवण्यात येणार आहे. 9W 1230 हे विमान 6 वाजता उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे. 
    ब्रसेल्स विमानतळावर नेमके किती प्रवासी अडकले आहेत याबाबत मात्र जेट एअरजवेजने कोणतीच माहिती दिलेली नाही. युरोपमधून बाहेर पडण्यासाठी जेट एअरजवेजच्या दृष्टीने अॅम्सटरडॅम हे प्रमुख ठिकाण असणार आहे. ब्रसेल्स विमानतळ मात्र गुरुवारीदेखील बंदच राहणार आहे.
==========================================

दुस-या महिलेचा फोटो फेसुबकवर टाकला म्हणून गरोदर पत्नीने केली पतीची हत्या


  • नैरोबी (केनिया), दि. २४ - फेसबुकवर फोटो टाकण्यावरुन झालेल्या वादात 19 वर्षीय गरोदर तरुणीने चाकूने वार करुन आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना केनियामध्ये घडली आहे. केल्विन असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. केल्विन विद्यार्थी तसंच उद्योन्मुख फुटबॉलपटू होता. केल्विनने आपल्या फेसबुक अकाऊंटच्या वॉलवर दुस-या महिलेचा फोटो टाकला होता. यावरुन केल्विन आणि त्याची पत्नी शेईला यांच्यात वाद झाला. आणि या वादातूनच शेईलाने चाकूने वार करुन केल्विनची हत्या केली. 
    माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पोहोचले तेव्हा केल्विनचा मृत्यू झाला होता. शेईला मृतदेहाच्या बाजूलाच बसलेली होती. केल्विनच्या गळ्यावर वार करण्यात आले आहेत. तसंच घटनास्थळावरुन चाकू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 
    पोलिसांनी आरोपी पत्नीला न्यायालायात हजर केले असून तपासासाठी न्यायालयाकडे अजून वेळ मागितला आहे. पोलिसांनी शेईलाची मानसिक तपासणीदेखील करणार असल्याचं सांगितलं आहे. 
==========================================

बोस्टन, पॅरिस आणि ब्रसेल्स... तीनही हल्ल्यांतून वाचला १९ वर्षांचा तरूण


  • न्यूयॉर्क, दि. २४ - '  देव तारी त्याला कोण मारी?' ही म्हण अमेरिकेतील एका १९ वर्षांच्या तरूणाबाबत तंतोतंत खरी ठरली आहे आणि तेही तब्बल ३ वेळा... अमेरिकेतील उताहमध्ये राहणार मॅसन वेल्स हा १९ वर्षीय तरूण बोस्टन, पॅरिस आणि मंगळवारी ब्रसेल्समध्येझालेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला आहे. देवाच्या कृपेनेच तो आज सुखरूपरित्या जिवंत आहे.
    बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्समधील विमानतळावरझालेल्या हल्ल्यावेळी मॅसन वेल्स विमानतळापासून अगदी जवळ होता, त्यामुळे तो जखमी झाला मात्र त्याचा जीव अगदी थोडक्यात वाचला. यापूर्वी बोस्टन व पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांदरम्यानही वेल्स तेथेच होता, मात्र नशिब बलवत्तर असल्याने त्याला कोणतीही इजा झाली नाही व त्याचा जीव धोक्यात सापडला नाही. 
    २०१३ साली एप्रिलमध्ये बोस्टन येथे मॅरेथॉनमध्ये बाँबहल्ला झाला होता, तेथे वेल्सची आई मॅरेथॉनसाठी आली होती. त्यावेळी वेल्सही वडिलांसोबत बोस्टनमध्ये होता आणि त्यांच्यापासून अवघ्या काही अंतरावरच प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट झाला. मात्र सुदैवाने वेल्स व त्याचे वडील या स्फोटातून सुखरुप बचावले.
    तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळेसही वेल्स शहरातच होता, मात्र तो शहराच्या दुस-या भागात असल्यामुळे त्याला काहीही दुखापत झाली नाही.
    आणि मंगळवारी ब्रसेल्समधील स्फोटादरम्यान तर तो विमानतळाजवळच होता, यावेळी तो हल्ल्यात जखमी झाला खरा मात्र त्याचा जीव थोडक्यात वाचल्याने त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. 
    ‘ मॅसन तब्बल तीन वेळा हल्ल्यांमधून वाचला आहे. आमची आशा आहे की त्याच्या आयुष्यातील सर्व संकटं आता संपली असतील’ अशी प्रतिक्रिया मॅसनचे वडील चॅड वेल्स यांनी दिली. 
==========================================

'लष्कर'ने केला होता बाळासाहेब ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न - डेव्हिड हेडली


  • मुंबई, दि. २४ - कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'ने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक खुलासा मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याच्या खटल्याप्रकरणातील माफीचा साक्षीदार
    असणा-या डेव्हिड हेडलीने केला. फेब्रुवारी महिन्यात त्याची विशेष सरकारी वकिलांनी तपासणी घेतली होती, त्यानंतर बुधवार २३ मार्चपासून त्याची उलटतपासणी सुरू असून, आज (गुरूवार) तपासणीच्या दुस-या दिवशी त्याने अनेक महत्वाच्या बाबींवर खुलासे केले.
    ' साजिद मीरच्या सांगण्यावरून मी दोनवेळा शिवसेना भवनला भेट देऊन तेथील पाहणी केली होती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे (लष्करचे) लक्ष्य होते. माझ्याकडे तपशीलवार माहिती नाही, पण हो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता, पण ते त्यातून बचावले. त्या हल्लेखोराला अटकही करण्यात आली होती, मात्र काही दिवसातच तो पोलिस कोठडीतून पसार झाला' असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला. 
    यापूर्वीही हेडलीने साक्षीदरम्यान खळबळजनक माहिती दिली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजाराम रेगे यांच्याद्वारे मन वळवून अमेरिकेत बोलवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) होता, अशी खळबळजनक माहिती त्याने साक्षीदरम्यान विशेष न्यायालयाला दिली. बाळासाहेब ठाकरे व त्यांचा मुलगा अमेरिकेत आल्यानंतर त्यांची ‘काळजी’ अमेरिकेतील डॉ. तहव्वूर राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य घेणार होते, अशीही माहिती हेडलीने न्यायालयाला दिली.
==========================================

अ‍ॅरिझोना प्रायमरीत ट्रम्प-हिलरी विजयी

  • वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅरिझोना येथील प्रायमरीत विजय मिळविला, परंतु उटा येथे दोन्ही उमेदवारांना आपल्या निकटच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
    नोव्हेंबरमध्ये निवडणूक होत आहे. उमेदवार निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. त्याचाच भाग म्हणून राज्या राज्यात उमेदवार निवडीसाठी मतदान घेतले जात आहे.
==========================================
नांदेडकरांनी अनुभवली दुष्काळाची होळी; 
                    होळीसारखा मोठा सन काल सर्वत्र साजरा झाला. सोशल मिडियामध्ये सर्वत्र ह्होलीचा उत्साह शिगेला पोहचला होता. होळीनंतर लगेचच विविध रंगी रंगांची उधळण करणारा रंगाचा सन साजरा केला जातो. दरवर्षी नांदेडकर पाण्याने व रंगाने हा सन साजरा करतात. परंतु या वर्षी पडलेल्या मोठ्या दुष्काळामुळे होळीच्या सणामध्ये रंग भरलाच नाही. थोड्याफार प्रमाणात रंग खेळला गेला. त्यातही पाणी वाचविण्यासाठी सुक्या रंगाची उधळणच झाली. ह्यानिमित्ताने लोकांमध्ये पर्यावरणविषयी व पाण्याविषयी जागृती निर्माण झाली झार तुरळक ठिकाणी पाण्याचा वापर करून रंग खेळला गेला व एकंदरीतच दुष्काळाच्या किनार्यातील होळीचा रंग या वर्षी नांदेडकर तसेच संपूर्ण मराठवाड्यातही दिसून आला. 
==========================================
शीख समाजाचा 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' पारंपारिक कार्यक्रम उत्साहात 
सालाबाद प्रमाणे या वर्षीही होळीची पारंपारिक मिरवणूक नगर कीर्तन अशा विविध कार्यक्रमांनी नांदेडच्या सचखंड  गुरुद्वारात होळी सणाचा कार्यक्रम 'जो बोले सो निहाल, सत श्री अकाल' च्या गजरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात, गुलालाची उधळण करत साजरा करण्यात आला. 

No comments: