[अंतरराष्ट्रीय]
१- कैरो; इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचा अपहरणकर्ता अटकेत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- पठाणकोट: पाकच्या तपास पथकात ISIचा अधिकारी
३- सहाराची संपत्ती विकण्यास सेबीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
४- सर्व अत्यावश्यक सेवांसाठी एकच नंबर 112
५- चेन्नई; 'इस्रो' एकावेळी करणार 22 उपग्रहांचे प्रक्षेपण
६- मोदी 15 लाख रुपये देण्यात अपयशी- राहुल
७- '112' राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाला मंजुरी
८- गोध्रा व शिखविरोधी दंगलींत फरक:कन्हैय्या कुमार
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- मी निर्दोष, नार्को टेस्टसाठीही तयार : गणेश पांडे
१०- रिअल इस्टेट कायदा पास तर झाला, आता अमलबजावणी करा - मुंबई ग्राहक पंचायत
११- आमदार बच्चू कडूंची मंत्रालयीन कर्मचा-याला मारहाण
१२- ५२७५ कर्जदारांनी थकविले तब्बल ५६,६२१ कोटी रुपये!
१३- पुणे; कन्हैयाला पुण्यात सभेसाठी परवानगी देऊ नका - भाजयुमो
१४- गणेश पांडेवर कारवाई झालीच पाहिजे : उद्धव ठाकरे
१५- मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दहा जण दोषी, तिघे निर्दोष
१६- फर्ग्युसन प्रकरणावरून विरोधकांचा सभात्याग!
१७- देहरादून; उत्तराखंडमध्ये बहुमत सिद्ध करण्यास परवानगी
१८- पाकच्या तपास पथकात हाफिजही असू शकतो-सेना
१९- मुंबई:2002-03 साखळी स्फोट प्रकरणी 10 दोषी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- अहमदनगर; बबनराव पाचपुतेंवर थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीची नामुष्की
२१- पुणे; अबकारी कराविरोधात सराफ रस्त्यावर, मुंबई-पुणे महामार्गावर रास्तारोको
२२- तामिळनाडू; अबब ! 39 हजार रुपयांत झाला पवित्र लिंबाचा लिलाव
२३- मेदिनीनगर; झारखंडचे आमदार बिदेशसिंह यांचे निधन
२४- नागपूर; रमीझ राजाकडे किशोरदांची 5000 गाणी!
२५- कोल्हापूर; चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा मृत्यू
२६- लोहा; टेळकी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- ट्वेन्टी 20 क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर
२७- एक वेळ असं वाटलं की आपण विश्वचषकातून बाहेर जाऊ: कोहली
२८- शाओमीनं पूर्ण केलं आश्वासन, 31 मार्चला भारतात mi 5चं लाँचिंग
२९- बंगाली ब्युटी बिपाशा बसूच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
३०- विराट कोहलीनंतर गावस्करांची अनुष्कासाठी बॅटींग
३१- सरबजित'च्या मदतीसाठी धावली ऐश्वर्या
३२- नागपूर; डॉ. समर्थ यांनी फडकविला वैदर्भी झेंडा
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो अन रिकामा खिसा याच दुनियेतील मानसं दाखवतो
(ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===============================================

मी निर्दोष, नार्को टेस्टसाठीही तयार : गणेश पांडे
मुंबई : माझ्यावरील विनयभंगाचे सर्व आरोप खोटे आहेत. एवढ्या मोठ्या आरोपामुळे मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसला आहे. मात्र तरीही मी कोणत्याही चौकशीला तयार आहे. प्रसंगी माझी नार्को टेस्ट करा, चौकशीनंतर अटकही झाली तरी हरकत नाही, असं भाजयुमोचा निलंबित अध्यक्ष गणेश पांडे म्हणाला.
सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या गणेश पांडेंने पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावतानाच 4 मार्चला नेमकं काय घडलं, याबाबत सविस्तार सांगितलंच, शिवाय पुरावेही सादर केले.
===============================================
कन्हैयाला पुण्यात सभेसाठी परवानगी देऊ नका - भाजयुमो
पुणे: देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या कन्हैया कुमारला कॅम्पसमध्ये कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नये, असं पत्र भाजयुमोनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिलं आहे.
सध्या परिक्षेचा काळ सुरू आहे, त्यामुळे शैक्षणिक वातावरण दूषित होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकते, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जर परवानगी दिली, तर ज्याठिकाणी कन्हैयाचा कार्यक्रम असेल, तिथे लोकशाही मार्गानं विरोध करू असंही या पत्रात म्हटलंय.
दरम्यान कन्हैयाला एनएसयूआय संरक्षण देणार असल्यानं येत्या काळात कन्हैयाच्या सभेवरून राडा होण्याची शक्य़ता आहे.
===============================================
गणेश पांडेवर कारवाई झालीच पाहिजे : उद्धव ठाकरे
मुंबई: कुठल्याही स्थितीत भाजयुमोचा अध्यक्ष गणेश पांडेवर पोलीस कारवाई झालीच पाहिजे, त्याच्याकडे पक्ष आणि कार्यकर्ता म्हणून नव्हे तर आरोपी म्हणून बघा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
गेल्या 4 दिवसांपासून ज्या पद्धतीनं भाजप गणेश पांडेला वाचवण्याचा प्रयत्न करतंय, त्यावरही उद्धव ठाकरेंनी तिरकस कटाक्ष टाकला.
देवनार डम्पिंग ग्रांउडला संरक्षण द्या
काही लोक जळलेल्या कचऱ्यावर राजकीय पोळ्या भाजत आहेत. डीसीपी रँकचे अधिकारी देवनार डम्पिंग ग्राऊंडपरिसरात दिले पाहिजे. देवनारबद्दलसुद्धा राजकारण न करता आरोपीवर कारवाई झाली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
===============================================
इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचा अपहरणकर्ता अटकेत
EGYPTAIR YK987-2826 737-800 K64643-15
कैरो : इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करणाऱ्याला पाच तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अटक करण्यात आली आहे. तर ओलीस ठेवलेल्या सातही जणांची सुखरुप सुटका केल्याची माहिती सायप्रस सरकारने ट्विटवरुन दिली आहे.
संबंधित बातमी : इजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण
एअरबस एमएस 181 या विमानात सात क्रू मेंबर्ससह 55 प्रवासी होते. अपहरण केल्यानंतर सायप्रस सरकारने बातचीत करण्याचा प्रस्ताव दिला होता. यानंतर अपहकर्त्याने केबिन क्रू आणि चार परदेशी नागरिक वगळता सर्व प्रवाशांची सुटका केली होती.
===============================================
बबनराव पाचपुतेंवर थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीची नामुष्की
अहमदनगर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर थकबाकी प्रकरणी मालमत्ता जप्तीची नामुष्की ओढवली आहे. 286 कोटी 60 लाख 38 हजारांच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या पुणे शाखेने पाचपुतेंविरोधात ही कारवाई केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरला पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्याला साठ दिवसांत थकबाकी भरण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र, आजपर्यंत पैसे न भरल्यानं 23 मार्चला मालमत्तेचा ताबा घेण्यात आला आहे.
यामध्ये हिरडगाव आणि देवदैठणचा कारखाना, जमीन, मशनरी को जनरेशन प्लॅंट आणि पुणे, श्रीगोंद्यातील मालमत्तेचा ताबा घेतला आहे. त्याचबरोबर अॅक्सिस बँकेनंही 13 कोटी 20 लाखाच्या वसुलीसाठी कारवाई सुरु केली आहे. तर कारखान्याकडे शेतकऱ्यांची 38 कोटींची एफआरपी थकली आहे. त्यासंदर्भात कारखान्याला जप्तीची नोटीसही बजवली आहे. त्यामुळं हक्काचे पैसे कधी मिळतील याकडे शेतकऱ्यांचं लक्ष्य लागलं आहे.
===============================================
ट्वेन्टी 20 क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर
मुंबई : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियावरील विजयाचा शिल्पकार विराट कोहलीने ट्वेन्टी 20च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ट्वेन्टी20च्या ताज्या क्रमवारीत फलंदाजांमध्ये विराट पहिल्या स्थानावर आहे.
ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सुपर टेनमधील चार सामन्यांत विराटनं 92च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. त्यामुळंच विराटनं ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फिन्चला मागे टाकून रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं. पण कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर कुठल्याही फलंदाजाला जागतिक क्रमवारीत टॉप पंधरामध्येही जागा मिळालेली नाही.
दुसरीकडे गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या रवीचंद्रन अश्विनची पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्रीने ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या चार सामन्यांत सहा विकेट्स काढून अव्वल स्थान गाठलं आहे.
दरम्यान, ट्वेन्टी20 संघांच्या क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. तर न्यूझीलंड दुसऱ्या, वेस्ट इंडीज तिसऱ्या आणि इंग्लंड पाचव्या स्थानावर आहे.
1. विराट कोहली
2. अॅरॉन फिन्च
3. मार्टिन गप्टिल
4. फॅफ ड्यू प्लेसिस
5. अॅलेक्स हेल्स
6. ख्रिस गेल
7. केन विल्यमसन
8. एस.मस्कदझा
9. एम. शाझाद
10. शेन वॉटसन
2. अॅरॉन फिन्च
3. मार्टिन गप्टिल
4. फॅफ ड्यू प्लेसिस
5. अॅलेक्स हेल्स
6. ख्रिस गेल
7. केन विल्यमसन
8. एस.मस्कदझा
9. एम. शाझाद
10. शेन वॉटसन
===============================================
एक वेळ असं वाटलं की आपण विश्वचषकातून बाहेर जाऊ: कोहली
मोहाली: भारताला विजय मिळवून देणाऱ्या धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना एक वेळ असं वाटलं होतं की आता भारत विश्वचषकाचा बाहेर जाईल.
होय… दहा षटकानंतर कोहलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. त्याला अजूनही विश्वास बसत नाही की, धोनी आणि त्यानं कठीण लक्ष्य पूर्ण केलं.
बीसीसीआय टीव्हीशी बोलताना कोहली म्हणाला की, ‘पहिल्या दहा ओव्हरनंतर मला असं वाटलं होतं. की आपण विश्वचषकातून बाहेर जाणार आहोत. पण धोनीच्या साथीनं विजयापर्यंत कसं पोहचलं तेच समजलं नाही. मैदानात काय सुरु आहे ते देखील मला कळत नव्हतं. पण मी संघासाठी चांगली कामगिरी करु शकलो याचा फार आनंद आहे. जेव्हा धोनीनं विजय चौकार ठोकला त्यावेळी मी फारच भावूक झालो होतो.’ असं कोहली म्हणाला.
‘त्या विजयी चौकारानंतर मी खूपच भावूक झालो. यासाठीच तर आम्ही खेळत असतो. हा भारतासाठी अविस्मरणीय असा क्षण होता. आजवर मी अशी खेळी केली नव्हती. ज्यामध्ये तीन षटकात 39 धावा हव्या होत्या. तर दुसरीकडे कर्णधार धोनी सोबतीला असल्यानं आम्ही विजयापर्यंत पोहचलो.’ असंही कोहली म्हणाला.
===============================================
मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दहा जण दोषी, तिघे निर्दोष
मुंबई : 2002 आणि 2003 मधील मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणी दहा जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, तर तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. टाडा कोर्टाने याप्रकरणी निकाल दिला आहे.
13 पैकी 10 आरोपी दोषी सिद्ध झाले असून मोहम्मद नदीम पालोबा, हारुन रशिद लोहार, अद्नान बिलाल मुल्ला या तिघांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी शिक्षेची सुनावणी उद्या करण्यात येणार आहे.
डिसेंबर 2002 आणि मार्च 2003 दरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. 6 डिसेंबर 2002 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ मॅक्डोनाल्डमध्ये, 27 जानेवारी 2003 रोजी पार्ल्याच्या भाजी मार्केटमध्ये तर 13 मार्च 2003 रोजी मुलुंड रेल्वे स्टेशनजवळ लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 27 जण जखमी झाले होते.
===============================================
शाओमीनं पूर्ण केलं आश्वासन, 31 मार्चला भारतात mi 5चं लाँचिंग
मुंबई: चायनीज स्मार्टफोन कंपनीनं भारतीय यूजर्सना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. स्मार्टफोन mi5ला 31 मार्चला लाँच करण्यात येणार आहे.
हा स्मार्टफोन मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2016मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचवेळी कंपनीनं हा स्मार्टफोन मार्चच्या अंतिम आठवड्यात लाँच करण्याचं आश्वासन दिलं होतं.
हा स्मार्टफोन 3 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. 32 जीबी व्हेरिएंटची किंमत जवळजवळ 21,000 रु. तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 24,000 रु. असणार आहे. तर 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 28,000 रु. असू शकते. मात्र, भारतात हे तीनही स्मार्टफोन लाँच करण्यात येणार की नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
या स्मार्टफोनचा लूक नुकताच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलक्सी S7 सारखा आहे.
mi 5 स्मार्टफोनचे खास फीचर्स:
– 5.15 इंच फूल एचडी डिस्प्ले, रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल
– प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 820 क्वॉलकॉम
– 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 4 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
– 4जी, ब्ल्यूटूथ, वाय-फाय आणि NFC सपोर्ट
– 3000 mAh बॅटरी क्षमता
===============================================
सर्व अत्यावश्यक सेवांसाठी एकच नंबर 112
नवी दिल्ली: यापुढे अत्यावश्यक सेवांसाठी विविध नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही, केवळ 112 हा एकच नंबर डायल केल्यास, सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध होतील. ट्राय अर्थात ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ने हा प्रस्ताव टेलिकॉम मंत्रालयापुढे ठेवला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
देशभरात एकच अत्यावश्यक नंबर
संपूर्ण देशभरात 112 हा अत्यावश्यक सेवा नंबर लागू करण्यात आला आहे. यापूर्वी अत्यावश्यक सेवांसाठी 100, 101, 102 आणि 108 यासारखे नंबर लक्षात ठेवावे लागत होते. मात्र आता त्याची गरज भासणार नाही. असं असलं तरी 100, 101, 102 आणि 108 हे नंबरही पुढील वर्षभर चालूच राहणार आहेत. वर्षभरानंतर हे नंबर बंद होतील.
===============================================
पठाणकोट: पाकच्या तपास पथकात ISIचा अधिकारी
पठाणकोट: पठाणकोट हल्ल्याच्या तपासासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी पथकात पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा आयएसआयचा अधिकाऱ्याचा समावेश आहे. तन्वीर अहमद असं या अधिकाऱ्याचं नाव असून पाकिस्तानच्या 5 सदस्यीय पथकात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
काही वेळापूर्वी अमृतसरमध्ये दाखल झालेलं पथक आता पठाणकोटला रवाना झालं आहे. या पथकाविरोधात काँग्रेस चांगलच आक्रमक झालं आहे. पथकात आयएसआयच्या अधिकाऱ्याचा समावेश केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी पठाणकोटमध्ये आंदोलन केलं.
जी आयएसआय संघटना भारताविरुद्ध उघडपणे अतिरेकी कारवाया करते, त्यांचा अधिकारी पठाणकोट हल्ल्याचा तपास कसा करु शकतो? असं विचारत काँग्रेसने या पथकाला आपला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
===============================================
बंगाली ब्युटी बिपाशा बसूच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
मुंबई : बॉलिवूडची बंगाली ब्यूटी बिपाशा बसू आणि तिचा अभिनेता बॉयफ्रेण्ड करण सिंग ग्रोव्हर पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. दोघांचे कुटुंबीय लग्नासाठी नाखुश असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती, मात्र बिपाशा आणि करण यांनी आपापल्या पालकांची समजूत काढल्याचं चित्र आहे.
बिपाशा आणि करण 30 एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईच्या उपनगरातील एका हॉटेलची लग्नासाठी निवड झाल्याचंही म्हटलं जातं. अर्थात दोघांपैकी एकाकडूनही या वृत्ताला अधिकृत दुजोरा आलेला नाही.
बिपाशा बसूच्या पूर्वायुष्यामुळे करण सिंग ग्रोव्हरचे पालक लग्नासाठी राजी नसल्याचं म्हटलं जातं. तर करणचं हे तिसरं लग्न असल्यामुळे बिपाशाचे कुटुंबीय लग्नाला तयार नसल्याचं वृत्त होतं. करणचं यापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न झालं होतं.
काही आठवड्यांपूर्वी बिपाशाने आपल्या लग्नाबाबत वावड्या उठवणाऱ्यांना ट्विटरवरुन झापलं होतं. ‘मला हवं तेव्हा घोषणा करेन, किंवा करणार नाही. शेवटी हे माझं आयुष्य आहे. धन्यवाद’ असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. मात्र आता सारं काही आलबेल झालं असावं, अशी आशा आहे.
===============================================
अबकारी कराविरोधात सराफ रस्त्यावर, मुंबई-पुणे महामार्गावर रास्तारोको
पुणे: सोन्याच्या दागिन्यांवर लावलेला वाढीव १ टक्का अबकारी कर मागे घेतला जावा यासाठी पुन्हा एकदा सराफा व्यावसायिक आक्रमक झाले आहेत.
सायन-पनवेल महामार्गासह जुन्या मुंबई-पुणे हायवे वर सराफांचं आंदोलन सुरु आहे. सराफांनी देहूरोड पोलीस स्टेशनजवळ रास्ता रोको केल्यानं काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तर तिकडे अकोल्यातही सराफा व्यावसायिकांनी रेल रोको आंदोलन केलं.
सकाळी अकोला रेल्वे स्थानकावर आलेली अकोला काचीगुडा इंटरसिटी एक्सप्रेस २० मिनिटांसाठी थांबवून ठेवण्यात आली होती. रेल रोको करणाऱ्या ३० सराफांवर कारवाई करुन नंतर सोडून देण्यात आलं.
केंद्रानं लावलेला १ टक्के अबकारी कर अन्यायकारक असून त्यामुळे परमिट राज अस्तित्वात येईल असा आरोप सराफांकडून केला जातो आहे.
===============================================
सहाराची संपत्ती विकण्यास सेबीला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. २९ - गुंतवणुकदारांचे बुडालेले पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला सहाराची संपत्ती विकण्याची परवानगी दिली आहे. सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी जामीनाचे 10 हजार कोटी रुपये उभे करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 27 एप्रिलला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.हा निर्णय देताना न्यायालयाने संपत्ती विकताना काही अटीदेखील घातल्या आहेत. ज्यामध्ये बाजारभावानुसार 90 टक्याहून जास्त किंमत मिळत असेल तर संपत्तीचा लिलाव करण्यात यावा मात्र जर 90 टक्यांपेक्षा कमी भाव मिळत असेल तर संपत्ती विकण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सेबी 86 ठिकाणची संपत्ती विकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. या पैशातून सुब्रतो रॉय यांच्या जामीनासाठी रक्कम उभारण्याचादेखील प्रयत्न केला जाणार आहे.सहाराच्या सर्व संपत्तीची कागदपत्रे सेबीच्या हवाली असून यामध्ये एकूण 40 हजार कोटींची संपत्ती असल्याचा दावा सहाराने केला आहे. सहाराची देशाबाहेरदेखील मोठी संपत्ती आहे. ज्यामध्ये न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेल तसंच लंडनमधील ग्रोसवेनर हाऊसचा समावेश आहे. सुब्रतो रॉय यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे 24 हजार कोटी परत न केल्याने सहाराच्या सुब्रतो राय यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली. ते सध्या तिहार जेलमध्ये आहेत.
===============================================
अबब ! 39 हजार रुपयांत झाला पवित्र लिंबाचा लिलाव
- ऑनलाइन लोकमतविल्लीपूरम (तामिळनाडू), दि. 29 - सैतानापासून वाचण्यासाठी लिंबू मिरचीच्या तोरणाचा वापर अनेक हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे. जेवणात चव आणण्यापलीकडे लिंबांचं स्थान हिंदूंच्या मनात असल्याचं वेगवेगळ्या प्रघातांवरून दिसतं. याचाच एक वेगळा अनुभव विल्लीपूरममधल्या एका मंदीरात नुकताच आला आहे. येथे झालेल्या पवित्र लिंबाच्या लिलावाला चक्क 39 हजार रुपयांची बोली लागली. नगुनी उथीराम या उत्सवामध्ये हा अघटित प्रकार घडला आहे.तिरुवनैनतूरमधल्या मंदीरात सुरू असलेला मुरुगा या देवाचा 11 दिवस चालणारा उत्सव नुकताच समाप्त झाला. शेवटच्या दिवशी मंदीर प्रशासनाने पवित्र लिंबाचा लिलाव केला. ज्या कुणाच्या घरी सदर लिंबू जाते त्या कुटुंबाची भरभराट होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या पवित्र लिंबासाठी चढाओढ लागते. अखेर, जयरामन व अमरावथी या दांपत्यानं 39 हजार रुपयांची बोली लावत पवित्र लिंबू मिळवले असून आता आपली भरभराट होईल याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नाही.
===============================================
विराट कोहलीनंतर गावस्करांची अनुष्कासाठी बॅटींग
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. २९ - टी-20 वर्ल्ड कपमधील भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजयानंतर सोशल मिडियावर अनुष्काच्या नावाने सुरु असलेल्या जोक्सवरुन विराट कोहलीने संताप व्यक्त केल्यानंतर आताभारताचे माजी कर्णधार लिटील मास्टर सुनील गावस्कर यांनीदेखील अनुष्काची बाजू मांडली आहे. 'अनुष्का अत्यंत चांगली मुलगी असून तिने विराट कोहलीच्या आयुष्यावर क्रिकेटर म्हणून असो अथवा माणूस म्हणून सकारात्मक छाप सोडली आहे', असं सुनील गावस्कर बोलले आहेत.एनडीटीव्हीशी बोलताना सुनील गावस्कर यांनी हे मत व्यक्त केलं आहे. अनुष्कावर टीका करणा-यांनी सुनील गावस्करांनी 'निराश' म्हंटलं आहे. 'विराट आणि अनुष्का एकत्र खुप चांगले दिसतात. विराट जेव्हा एक बॅट्समन म्हणून उभा राहत होता तेव्हा अनुष्काने त्याला स्थिरता दिली असल्याचं', सुनील गावस्कर बोलले आहेत.विराट कोहलीनेदेखील सोशल मिडियावर सुरु असलेल्या या गोंधळावर आपला राग व्यक्त केला होता. 'अनुष्काला लक्ष्य करणा-यांनो थोडी शरम बाळगा'. अनुष्काकडून मला नेहमीच सकारात्मकता शिकायला मिळाली आहे असे टि्वट करुन विराटने उत्तर दिले होते.
===============================================
रिअल इस्टेट कायदा पास तर झाला, आता अमलबजावणी करा - मुंबई ग्राहक पंचायत
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या रिअल इस्टेट विधेयकावर राष्ट्रपतींनी 25 मार्च रोजी सही केल्याने रिअल इस्टेट कायदा अस्तित्वात आला आहे. या नव्या कायद्यामुळे महाराष्ट्राचा गृहनिर्माण कायदा रद्दबातल ठरला आहे. ग्राहक हित जोपासणा-या केंद्रिय रिअल इस्टेट (नियमन व विकास) कायदा 2016 चे स्वागत करत असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.रद्दबातल झालेल्या महाराष्ट्राच्या गृहनिर्माण कायद्यातून म्हाडा सिडको सारख्या शासकीय गृहनिर्माण यंत्रणांना वगळण्यात आले होते, त्यामुळे म्हाडा/सिडकोचे लक्षावधी ग्राहक या कायद्यातील लाभांपासून वंचित रहात होते. त्याच प्रमाणे पुनर्विकासाच्या रहिवाशांनाही या कायद्यातून वगळण्यात आले होते. आज निम्म्याहून अधिक मुंबई पुनर्विकासाच्या प्रक्रियेतून जात आहे, अशा वेळेस पुनर्विकासातील जुन्या रहिवाश्यांना कायद्याचं संरक्षण आवश्यक असताना त्यांना वगळून महाराष्ट्रातील कायदा कोणाचं संरक्षण करु इच्छित आहे या बद्दलच शंका निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या कायद्याप्रमाणे करार करायच्या आधी सदनिकेच्या वीस टक्के रक्कम आगाऊ घेण्याची मुभा होती. मात्र केंद्रिय कायद्यात ही रक्कम केवळ दहा टक्क्यांवर मर्यादित करण्यात आली आहे.
===============================================
आमदार बच्चू कडूंची मंत्रालयीन कर्मचा-याला मारहाण
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. २९ - आमदार बच्चू कडू यांनी यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीनंतर मंत्रालयाची कर्मचा-यांनी एकत्र येऊन विरोध केला आहे. कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन केलं आहे.एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या मारहाणीनंतर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी बच्चू कडू यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
===============================================
५२७५ कर्जदारांनी थकविले तब्बल ५६,६२१ कोटी रुपये!
- - मनोज गडनीस, मुंबईसुमारे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून फरार झालेल्या विजय मल्ल्या यांची सध्या चर्चा जोरात असली तरी त्यांच्याप्रमाणे देशातील सुमारे ५२७५ लहान-मोठ्या कर्जदारांनी देशातील विविध बँकांचे तब्बल ५६,५२१ कोटी रुपये थकविले असल्याची माहिती पुढे आली आहे. ही आकडेवारी केवळ ज्यांना बँकांनी ‘स्वेच्छेने कर्ज बुडविणारे’ लोक म्हणून घोषित केले आहे त्यांचीच आहे. ज्यांना अद्याप घोषित केलेले नाही; परंतु ज्यांनी कर्जे थकविली आहेत, अशा कर्जदारांची संख्या ७४३६ इतकी असून त्यांनी बँकांची ११५,३०१ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. सर्व बँका व वित्तीय संस्थांची थकीत कर्जाच्या एकत्रित आकडेवारीने चार लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केलाआहे.थकीत कर्जाचे वाढते प्रमाण लक्षात घेत बँकांनी थकीत कर्जाचा आणि ते थकविणाऱ्या कर्जदाराचा तपशील गोळा करण्याचे काम कर्जदाराची पत जोखणाऱ्या ‘सिबिल’ (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो, इंडिया) ला दिले आहे.
===============================================
झारखंडचे आमदार बिदेशसिंह यांचे निधन
मेदिनीनगर (झारखंड)- कॉंग्रेसचे झारखंडमधील आमदार बिदेशसिंह (वय 67) यांचे हृदयविकाराने सोमवारी (ता. 28) मध्यरात्री मेदिनीनगर येथे निधन झाले. त्यांना मध्यरात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. बिदेशसिंह हे पांकी मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. राज्यपाल द्रौपदी मरुमु आणि मुख्यमंत्री रघुवर दास यांनी बिदेशसिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
झारखंडचे आमदार बिदेशसिंह यांचे निधन
===============================================
'इस्रो' एकावेळी करणार 22 उपग्रहांचे प्रक्षेपण
चेन्नई : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) वतीने मे महिन्यात एकूण 22 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.
‘नासा‘ या अमेरिकन संस्थेने 2013 मध्ये 29 उपग्रहांचे एकावेळी प्रक्षेपण करून विक्रम प्रस्थापित केला होता.
पीएसएलव्ही-सी३४ या प्रक्षेपकाच्या साह्याने कार्टोसॅट-२सी या उपग्रहाचे मे महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर लहान व सूक्ष्म अशा प्रकारच्या 21 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या उपग्रहांमध्ये अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांच्या उपग्रहांचा समावेश असेल.
विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे संचालक के सिवन म्हणाले, "इस्रोच्या वतीने 22 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे नियोजित आहे. इस्रोने यापूर्वी एकावेळी दहा उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले होते. उपग्रहांची संख्या आता दुप्पटीपेक्षा जास्त करण्याचा विचार चालू आहे. मे महिन्यात हे प्रक्षेपण होईल अशी आशा आहे."
'इस्रो' एकावेळी करणार 22 उपग्रहांचे प्रक्षेपण
‘नासा‘ या अमेरिकन संस्थेने 2013 मध्ये 29 उपग्रहांचे एकावेळी प्रक्षेपण करून विक्रम प्रस्थापित केला होता.
पीएसएलव्ही-सी३४ या प्रक्षेपकाच्या साह्याने कार्टोसॅट-२सी या उपग्रहाचे मे महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर लहान व सूक्ष्म अशा प्रकारच्या 21 उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. या उपग्रहांमध्ये अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांच्या उपग्रहांचा समावेश असेल.
विक्रम साराभाई अंतराळ संस्थेचे संचालक के सिवन म्हणाले, "इस्रोच्या वतीने 22 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे नियोजित आहे. इस्रोने यापूर्वी एकावेळी दहा उपग्रहांचे एकत्र प्रक्षेपण केले होते. उपग्रहांची संख्या आता दुप्पटीपेक्षा जास्त करण्याचा विचार चालू आहे. मे महिन्यात हे प्रक्षेपण होईल अशी आशा आहे."
===============================================
फर्ग्युसन प्रकरणावरून विरोधकांचा सभात्याग!
मुंबई - देशद्रोही घोषणाबाजी संदर्भात चोवीस तासात तीन वेगवेगळी पत्र देणाऱ्या फर्ग्युसनच्या प्राचार्यांना निलंबित करा, अशी आग्रही मागणी सरकार मान्य करत नसल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज (मंगळवार) सभात्याग करत विधानसभेच्या कामकाजात असहकार पुकारला. तब्बल सहा वेळा विधानसभेचे कामकाज तहकुब करत सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी सायंकाळी सभात्याग केला. मात्र विरोधकांच्या अनुपस्थितीतच विधानसभेचे कामकाज सुरू ठेवत सरकारने विरोधकांना टोला दिला.
सहा वेळा विधानसभा तहकुब झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील ज्वलंत प्रश्न पुन्हा उपस्थित केला. या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलिसांना दिलेली तीन वेगवेगळी पत्रे सभागृहात सादर केली. पण एका विशीष्ट गटाच्या दबावाखाली प्राचार्य समाजाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका करत त्यामुळे प्राचार्यांचे निलंबन केलेच पाहिजे अशी मागणी केली.
दरम्यान, चवदार तळ्याच्या पाण्याचे जलपुजन करणार्या अधिकाऱ्यांचेही निलंबन करावे अशी मागणीही त्यांनी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सरकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेला विरोध करत असून चवदार तळ्याचे जलपुजन करणाऱ्या अधिकार्याला पाठिशी घालत आहे. फर्ग्युसनच्या प्राचार्यांच्या भूमिकेचेही सरकार समर्थन करत असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला. या मागण्यासह शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

रमीझ राजाकडे किशोरदांची 5000 गाणी!
किशोरदांचे जबरदस्त फॅन - नागपूरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञ
रमीझ राजाकडे किशोरदांची 5000 गाणी!
नागपूर - बॉलीवूडमधील गायक व चित्रपट कलावंतांबद्दल जितकी क्रेझ भारतात आहे, तितकीच पाकिस्तानमध्येदेखील आहे. पाकिस्तानचे अनेक खेळाडू भारतीय कलावंतांचे चाहते आहेत. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक रमीझ राजाही त्यापैकीच एक. रमीझ हे ‘सुरों के गायक’ किशोरकुमार यांचे ‘फॅन’ आहेत. त्यांच्याकडे किशोरदांनी गायिलेल्या तब्बल पाच हजार गाण्यांचा खजिना आहे. हा खुलासा त्यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. 
आयसीसी टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिज-अफगणिस्तान यांच्यात रविवारी जामठा मैदानावर झालेल्या सामन्यात समालोचन करण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी बॉलीवूड, भारत-पाक क्रिकेट आणि नागपूरच्या आठवणींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. रमीझ म्हणाले, भारतीय सिनेमा पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय आहे. बॉलीवूडमधील सर्वच चित्रपट पाकिस्तानमध्ये आवडीने पाहिले जातात. मीही त्याला अपवाद नाही. चित्रपटांपेक्षा मी किशोरदांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वी सप्टेंबरमध्ये इंग्लंड येथे त्यांची शेवटची ‘म्युझिक कॉन्सर्ट’ पाहिली होती. तो अनुभव मी कदापि विसरू शकत नाही.
===============================================
चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा मृत्यू
शिराळा (कोल्हापूर)- वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील सवादकारवाडी जवळील खिलारवाडी परिसरातील शेतात उपासमारीमुळे नर जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाला. उपासमारीमुळे मृत्यू होण्याची शिराळा तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. वनक्षेत्रपाल ता. बा. मुळीक, डॉ. एस. के. जाधव यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की रविवारी (27) शेतीच्या कामासाठी गेलेल्या स्थानिक लोकांनी बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी डी. के. यमगर, बी. डी. मुदगे, दादासो शेटके, बाळासो गायकवाड, साधू पाटील, पशुधन अधिकारी डॉ.एस. के. जाधव, डॉ. एस. ई. पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. रात्री अंधार असल्याने सोमवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालयाजवळ त्याचे श्ववविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अहवाल मिळाला आहे. तो बिबट्याचे वय साधारण आठ-नऊ महिने आहे. तो नर आहे.
चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्याचा मृत्यू
याबाबत मिळालेली माहिती अशी, की रविवारी (27) शेतीच्या कामासाठी गेलेल्या स्थानिक लोकांनी बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी डी. के. यमगर, बी. डी. मुदगे, दादासो शेटके, बाळासो गायकवाड, साधू पाटील, पशुधन अधिकारी डॉ.एस. के. जाधव, डॉ. एस. ई. पवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. रात्री अंधार असल्याने सोमवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालयाजवळ त्याचे श्ववविच्छेदन करण्यात आले. त्याचा मृत्यू उपासमारीने झाल्याचा अहवाल मिळाला आहे. तो बिबट्याचे वय साधारण आठ-नऊ महिने आहे. तो नर आहे.
===============================================
मोदी 15 लाख रुपये देण्यात अपयशी- राहुल
दिफू (आसाम) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार काळा पैसा परत आणून देशातील प्रत्येक नागरिकाला पंधरा लाख रुपये देण्यात ते अपयशी ठरल्याची टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
आसामामधील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी येतात, आश्वासने देतात आणि निघून जातात. काळा पैसा परत आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. विजय मल्ल्या आधी मंत्री झाले आणि त्यानंतर सहजपणे देशाबाहेर निघून गेले. कॉंग्रेस सरकारच्या काळात आसामला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आल्याने राज्याला हजारो कोटी रुपयांचा निधी मिळत होता. मात्र मोदींनी हा दर्जा काढून घेऊन या निधीपासून राज्याला वंचित ठेवले.‘ तसेच ‘गेल्या 15 वर्षांत कॉंग्रेसने आसाममध्ये शांतता ठेवली आहे. हे आमचे सर्वांत मोठे यश आहे. ज्यावेळी मी आसाममध्ये येतो त्यावेळी मुख्यमंत्री तरुण गोगई मला राज्यातील लोकांबद्दल, विकासाबद्दल सांगतात. आम्हाला देशातील प्रत्येकाला समान अधिकार द्यायचे आहेत. कॉंग्रेसमध्ये विविधतेत एकता‘, असेही गांधी यावेळी म्हणाले.
मोदी 15 लाख रुपये देण्यात अपयशी- राहुल
आसामामधील प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी येतात, आश्वासने देतात आणि निघून जातात. काळा पैसा परत आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. विजय मल्ल्या आधी मंत्री झाले आणि त्यानंतर सहजपणे देशाबाहेर निघून गेले. कॉंग्रेस सरकारच्या काळात आसामला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आल्याने राज्याला हजारो कोटी रुपयांचा निधी मिळत होता. मात्र मोदींनी हा दर्जा काढून घेऊन या निधीपासून राज्याला वंचित ठेवले.‘ तसेच ‘गेल्या 15 वर्षांत कॉंग्रेसने आसाममध्ये शांतता ठेवली आहे. हे आमचे सर्वांत मोठे यश आहे. ज्यावेळी मी आसाममध्ये येतो त्यावेळी मुख्यमंत्री तरुण गोगई मला राज्यातील लोकांबद्दल, विकासाबद्दल सांगतात. आम्हाला देशातील प्रत्येकाला समान अधिकार द्यायचे आहेत. कॉंग्रेसमध्ये विविधतेत एकता‘, असेही गांधी यावेळी म्हणाले.
===============================================
उत्तराखंडमध्ये बहुमत सिद्ध करण्यास परवानगी
उत्तराखंडमध्ये बहुमत सिद्ध करण्यास परवानगी
डेहराडून - उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, उत्तराखंड उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) हरिश रावत यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 31 मार्चला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या वेळी काँग्रेस बंडखोर आमदारांनाही मतदानाचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उत्तराखंडचे हटविण्यात आलेले माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला नैनीतालमधील उत्तराखंड उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यास मंजुरी दिली आहे. रावत यांनी याचिका दाखल केल्यानंतर न्यायाधीश यू. सी. ध्यानी यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून या प्रकरणी आज सुनावणी केली. रावत यांच्या वतीने त्यांचे कायदेशीर सल्लागार अभिषेक मनू सिंघवी यांनी याचिका दाखल केली. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. रावत यांच्या वतीने सिंघवी यांनी बाजू मांडली, तर केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व राकेश थापलियाल यांनी केले.
दरम्यान, उत्तराखंड विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनीही त्यांच्या निलंबनाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यामुळेच उत्तराखंडमधील हरिश रावत यांचे सरकार अडचणीत सापडले होते. त्यानंतर झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रविवारी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला.
===============================================
पाकच्या तपास पथकात हाफिजही असू शकतो-सेना
मुंबई - पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकात (जेआयटी) लष्करे तैयबाचा प्रमुख हाफिज सईदही असू शकतो, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
पठाणकोटच्या हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी आज (मंगळवार) सकाळी पाकिस्तानचे संयुक्त पथक (जेआयटी) पठाणकोटमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, ‘पाकिस्तानमधून येणाऱ्या दहशतवाद्यांना, क्रिकेटर्सना आणि कलाकारांना सुरक्षा पुरवली जाते. तर आपले लोक मारली जात आहेत. पाकिस्तानकडून दररोज मारण्यात येणाऱ्या आपल्या जवानांना कधीही सुरक्षा मिळत नाही. प्रत्येकालाच माहिती आहे की पठाणकोटच्या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध आहे. तरीही जेआयटीला विशेष वागणूक देण्यात येते, हा देशाचा अपमान आहे.‘ आयएसआयचे अधिकारीही जेआयटीमध्ये असल्याने हाफिज सईदही त्यामध्ये असू शकतो अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली.
जेआयटीमध्ये लाहोर गुप्तचर विभागाचे उप महासंचालक मोहम्मद अझिम अर्शद, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) लेफ्टनंट कर्नल तनविर अहमद, लष्करी गुप्तचर खात्याचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा आणि सीटीडीचे तपास अधिकारी शाहीद तनवीर यांचा समावेश आहे.

सरबजित'च्या मदतीसाठी धावली ऐश्वर्या
पाकिस्तानात चुकून प्रवेश केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आणि तेथील तुरुंगातच अखेर झालेल्या सरबजितसिंग या भारतीय शेतकऱ्याच्या कहाणीवर निर्माण करण्यात येत असलेल्या चित्रपटाचे ‘शूटिंग‘ मागील काही दिवसांपासून रखडले होते. पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी सीमेवर चित्रपटातील काही प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात येणार होते. मात्र, सरकारकडून त्यास परवानगी न मिळाल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.
‘सरबजित‘ असे नाव असलेल्या या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे, तर सरबजितची बहीण दलबीरकौरच्या भूमिकेत विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या ओमांग कपूरने अटारी सीमेवरील चित्रीकरणास परवानगी मिळावी म्हणून बरीच धावपळ केली. मात्र, त्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही आणि चित्रपटाचे चित्रीकरण रखडल्यामुळे ‘बजेट‘ कोलमडण्याची वेळ आली होती.
सरबजित'च्या मदतीसाठी धावली ऐश्वर्या
‘सरबजित‘ असे नाव असलेल्या या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत आहे, तर सरबजितची बहीण दलबीरकौरच्या भूमिकेत विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक असलेल्या ओमांग कपूरने अटारी सीमेवरील चित्रीकरणास परवानगी मिळावी म्हणून बरीच धावपळ केली. मात्र, त्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही आणि चित्रपटाचे चित्रीकरण रखडल्यामुळे ‘बजेट‘ कोलमडण्याची वेळ आली होती.
===============================================
डॉ. समर्थ यांनी फडकविला वैदर्भी झेंडा
एक हजार किमी सायकल शर्यतीत मिळविले ऐतिहासिक यश
डॉ. समर्थ यांनी फडकविला वैदर्भी झेंडा
नागपूर - घाटांचा रस्ता, खडकाळ मार्ग, अंगाची लाहीलाही करणारे ऊन, धो-धो पाऊस आणि अंधारावर मात करीत नागपूरचे ॲथलिट डॉ. अमित समर्थ यांनी रविवारी नवी दिल्ली ते वाघा बॉर्डर ही एक हजार किमी अंतराची ‘ब्रेव्हेट’ सायकल शर्यत पूर्ण केली. ही शर्यत पूर्ण करणारे ते विदर्भातील पहिले ॲथलिट ठरले.
३५ वर्षीय डॉ. समर्थ यांनी शर्यतीदरम्यान आलेले अनुभव सोमवारी पत्रपरिषदेत कथन केले. या साहसी उपक्रमाची सुरुवात २५ मार्च रोजी सकाळी सहाला ऐतिहासिक इंडिया गेट येथून झाली. दिल्ली ते वाघा बॉर्डर आणि परत वाघा बॉर्डर ते दिल्ली हे एक हजार किमी अंतर सायकलपटूला ७५ तासांत पूर्ण करावयाचे होते. मात्र, डॉ. समर्थ यांनी ५४ तासांतच अंतर कापले. शर्यतीत देशभरातील सायकलपटूंनी भाग घेतला. पानिपत, अमृतसर, अंबाला, लुधियाना, कर्नालमार्गे झालेल्या या शर्यतीदरम्यान अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. तब्बल दहावेळा त्यांची सायकल पंक्चर झाली. शिवाय अंधार व पावसामुळे प्रचंड व्यत्यय आला. हायवे असल्याने ट्रॅफिकही भयंकर होते. या कामगिरीमुळे ते जगातील सर्वांत जुन्या व प्रतिष्ठेच्या ‘रेस ॲक्रॉस अमेरिका’ (रॅम)साठी पात्र ठरले. या शर्यतीत आतापर्यंत एकही भारतीय वैयक्तिक गटात यशस्वी ठरला नाही. त्यातही इतिहास घडविण्याचा त्यांचा मानस आहे. नऊ वेळा ‘आयर्न मॅन’ किताब पटकाविणाऱ्या डॉ. समर्थ यांनी काही महिन्यांपूर्वी पुणे ते गोवा ही साडेसहाशे किमी अंतराची डेक्कन क्लिफहॅंगर शर्यत अवघ्या ३६ तासांत पूर्ण केली.
व्यवसायाने डॉक्टर असलेले अमित समर्थ प्रो हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून विदर्भातील युवकांना सायकल चालविण्याबद्दल प्रेरित करीत आहेत. पत्रपरिषदेला अनिरुद्ध राईच, सुरेश बाजोरिया, भानू राजगोपालन, रितू जैन व मुकुल समर्थ उपस्थित होते.
===============================================
'112' राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाला मंजुरी
'112' राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांकाला मंजुरी
नवी दिल्ली - अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे भारतातही ‘112‘ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करावा या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली आहे.
अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘911‘ आणि ब्रिटनमध्ये ‘999‘ हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो. याच धर्तीवर भारतातही ट्रायने राष्ट्रीय स्तरावर एक क्रमांक आपत्कालीन स्थितीत नागरिकांना वापरता यावा, यासाठी विचार केला आहे. भारतात 100 (पोलिस), 101 (अग्निशामन), 102 (रुग्णवाहिका) आणि 108 (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो. पण, आता या सर्व सुविधा ‘112‘ क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.
"दूरसंचार मंत्रालयाने एकच आपात्कालीन क्रमांक ठेवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. आता केंद्रीय दूरसंचार विभागाकडून याचा मसुदा तयार केला जाईल व केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांची परवानगी घेतली जाईल. येत्या काही महिन्यांमध्ये हा क्रमांक सुरु केला जाईल", अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
ट्रायने म्हटले आहे, की या क्रमांकावर येणाऱ्या दूरध्वनींना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच एसएमएसलाही उत्तर देण्यात येईल. घटनास्थळापर्यंत मदत पोहचविण्यासाठी दूरध्वनी करणाऱ्याची सर्व माहिती संबंधित विभागांना तत्काळ देण्यात येईल. त्यामुळे मदत पोचविण्यास मदत होणार आहे.
===============================================
गोध्रा व शिखविरोधी दंगलींत फरक:कन्हैय्या कुमार
नवी दिल्ली - गुजरात येथे 2002 मध्ये झालेली दंगल व 1984 मधील शिखविरोधी दंगल, यांमध्ये "फरक‘ असल्याचे मत जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) विद्यार्थी संघटनेचा कन्हैय्या कुमार याने आज (मंगळवार) व्यक्त केले.
आणीबाणी व फॅसिस्टवादामध्ये मुलभूत भेद असल्याचे सांगत कुमार याने, गुजरातमधील दंगल ही राज्यव्यवस्थेच्या मोठ्या पाठिंब्याच्या आधारावर घडविण्यात आल्याचा आरोप केला. "गुजरातमधील दंगल ही राज्यशासनाच्या पाठिंब्याने घडविण्यात आली; तर 84 मधील दंगल हा निव्वळ हिंसक जमावाची उस्फुर्त प्रतिक्रिया असल्याचे,‘ मत त्याने व्यक्त केले.
"आणीबाणी व फॅसिस्टवादामध्ये मुलभूत फरक आहे. आणीबाणीच्या काळात केवळ एका पक्षाच्या गुंडांनी दडपशाही केली; तर फॅसिस्टवादांतर्गत एकंदरच राज्यव्यवस्थेची गुंडगिरी पहावयास मिळते. यामुळे 2002 व 1984 या सालांमध्ये घडलेल्या दंगलींमध्ये फरक आहे. सध्या आपल्याला जातीयवादी फॅसिस्टवादाचा धोका आहे. हिटलरप्रमाणेच मोदींनाही समाजातील बुद्धिवंतांचा पाठिंबा नसून यामुळेच विद्यापीठांवर हल्ले केले जात आहेत. मोदी यांच्या राजवटीस भारतातील कोणत्याही बुद्धिमंताचा पाठिंबा नाही,‘‘ असे कुमार म्हणाला. याचबरोबर, सध्याच्या "इस्लामोफोबिया‘च्या काळामध्ये कोणत्याही विषयासंदर्भातील निष्कर्ष काढण्याआधी इतिहासाचा अभ्यास करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्याने मांडले.

मुंबई:2002-03 साखळी स्फोट प्रकरणी 10 दोषी
मुंबई:2002-03 साखळी स्फोट प्रकरणी 10 दोषी
मुंबई - मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी आज (मंगळवार) टाडा विशेष न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरविले आहे. तर, तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली.
डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात रेल्वेमध्ये मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले येथे झाले होते. या स्फोटप्रकरणी 13 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आज तब्बल 13 वर्षांनी विशेष न्यायालयाने 10 जणांना दोषी ठरविले आहे. तिघांची पुरेश्या पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे. या सर्व दोषींना उद्या (बुधवार) होणाऱ्या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
साकिव नाचन, फरहान मवीक, आतीफ, डै अन्सारी, नूर अली, नूर मोहम्मद, नासीर मुल्ला, गुलाम अकबर, मुजम्मील, नसीर अशी न्यायालयाने दोषी ठरविण्यात आलेल्यांची नावे आहेत.
===============================================

No comments:
Post a Comment