Wednesday, 16 March 2016

नमस्कार लाईव्ह १६-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- वॉशिंग्टन; नासा लावणार अवकाशात आग  
२- लंडन; मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार नरेंद्र मोदींचा पुतळा 
३- नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; 22 मृत्युमखी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
४- एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन  
५- गांधीनगर; गुजरातमध्ये धर्मांतरासाठी केलेल्या अर्जांपैकी 94 टक्के अर्ज हिंदूंचे 
६- लखनऊ; असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस  
७- जय हिंद म्हणू; भारत माता की जय नाही - आमदार वारीस पठाण  
८- मोदींना केवळ दबावाची भाषा समजते- राहुल गांधी  
९- भाजप सर्वांत मोठा देशद्रोही- अरविंद केजरीवाल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- होळीला रेनडान्स किंवा पाण्याची नासाडी कराल, तर... 
११- मुंबईत महिलांसाठी 50 हजार स्वच्छतागृहं : मुख्यमंत्री 
१२- मुंबई आणि पुण्यातच 400 धनाढ्य शेतकरी 
१३- पुणे; दागिने उत्पादक सराफांनाच कर लागू 
१४- औरंगाबाद - घरकुल प्रकरणातील याचिका फेटाळल्या  
१५- दिल्ली; भारत-पाक सीमेवर 405 चकमकीच्या घटना - चौधरी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- रोहतक; कबड्डीपटूची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या 
१७- सौ. वर्षाताई भोसीकर यांनी २४ तीव्र कुपोषित बालके घेतली दत्तक 
१८- फरीदाबाद; सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन नववधू पसार 
१९- मुंबईच्या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा 
२०- कानपूर; आपल्याच आंदोलनात ABVP चा कार्यकर्ता भाजला  
२१- लखनौ; भाजप नेत्याची पक्षालाच आत्महत्येची धमकी  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- भाभी जी घर पर हैं' च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस 
२३- भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'मौका मौका'ची नवी जाहिरात 
२४- पाकिस्तानचा 55 धावांनी दणदणीत विजय 
२५- कोलकाता; प्रख्यात सनईवादक अली अहमद यांचे निधन 
२६- फेसबुकवर भारत-पाक क्रिकेट चाहत्यांची एकता 
२७- भारत माता की जय' हाच राष्ट्रवाद हवा- खेर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


=========================================

एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन 

LIVE : एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन
A
LIVE UPDATE :

अधिवेशन संपेपर्यंत एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन, विधानसभेत निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर, ‘भारत माता की जय’ म्हणण्यास नकार
——————-
संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट इम्तियाज जलील यांना निलंबित करण्याचा ठराव मांडणार
—————-
विधानसभेच्या अधिवेशनाचा कार्यकाळ संपेपर्यंत इम्तियाज जलील यांचं निलंबन करा, एकनाथ खडसेंची विनंती

आज सभागृहाचा काळा दिवस आहे. जलील यांना शरम वाटत नाही. इथे राहून खातात पण ‘भारत माता की जय’ म्हणायला लाज वाटते : गुलाबराव पाटील
=========================================

होळीला रेनडान्स किंवा पाण्याची नासाडी कराल, तर...

होळीला रेनडान्स किंवा पाण्याची नासाडी कराल, तर...
मुंबई : होळीच्या निमित्ताने रेनडान्स करत पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी कारवाई करण्याची मागणी होत आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याची नासाडी करणाऱ्यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याची मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना यासंदर्भात पत्र लिहून पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी साटम यांनी केली आहे.
मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या पाण्याची भीषण टंचाई आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही अशा स्थितीमध्ये शहरात मात्र होळीच्या नावावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. तो टाळावा आणि धुळवडीच्या निमित्ताने पालिका अधिकाऱ्यांनी पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर करवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
दरवर्षी होळीनिमित्त शहरात रेन डान्स केला जातो. ज्यात काही हजार लिटर पाणी वाया जातं. आता यावर्षी तरी असा पाण्याचा अपव्यय होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यंदा राज्यात असलेली पाणीबाणीची परिस्थिती पाहता सगळ्यांनी कोरडी होळी खेळावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जुलैपर्यंत सर्व शहरांतील स्विमिंग पूल बंद ठेवावेत अशी सूचनाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
=========================================

मुंबईत महिलांसाठी 50 हजार स्वच्छतागृहं : मुख्यमंत्री

मुंबईत महिलांसाठी 50 हजार स्वच्छतागृहं : मुख्यमंत्री
मुंबई : दिवसभर कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या मुंबईकर महिलांना स्वच्छतागृहांच्या अभावामुळे नामुष्की सहन करावी लागते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या एका घोषणेमुळे अशा लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत महिलांसाठी 50 हजार स्वच्छतागृहं बांधली जाणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत मुंबईत महिलांसाठी 50 हजार शौचालयं बांधण्याची घोषणा केली. ‘राइट टू पी’ मोहिमेविषयी वर्षभरात महापालिका प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेच्या निषेधार्थ महिला दिनी ‘राईट टू पी’ टीमने महापौरांना पुरस्कार परत केले होते. याची तातडीने दखल घेत महिलांची घुसमट थांबवण्यासाठी स्वच्छतागृहं बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2011 पासून मुंबईतील 33 सामाजिक संस्था एकत्र येऊन महिलांसाठी मोफत, स्वच्छ, सुरक्षित आणि सार्वजनिक मुताऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानं मुंबईकर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.


गेल्या वर्षी ‘राईट टू पी’च्या कार्यकर्त्या महिलांना पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार वर्षभरात ‘राईट टू पी’ संदर्भात महिला शौचालयांचं काम मार्गी न लागल्यानं महिलादिनीच परत करण्यात आला. प्रशासनाच्या धीमेपणानं काम होऊ शकत नसल्याचं कारण महापौरांनी पुढे केलं होतं.
=========================================

अमृता फडणवीसांविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

अमृता फडणवीसांविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेली जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. अंधश्रद्धेचं समर्थन केल्याप्रकरणी मिसेस मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

सामाजिक कार्यकर्ते अनिल कोकणे यांनी संबंधित याचिका दाखल केली होती. गेल्या महिन्यात पुण्यातील एका कार्यक्रमात अमृता यांनी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु स्वामी गुरुवानंद यांच्याकडून सोन्याची चेन स्वीकारल्यानंतर वाद उसळला होता.

एका सार्वजनिक कार्यक्रमात अंधश्रद्धेचं समर्थन करणं अमृता फडणवीसांना शोभत नाही. त्यांनी राज्यातील जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. कार्यक्रमात स्वामींनी हवेतून चेन काढून अमृता फडणवीसांना दिली, त्यानंतर मिसेस मुख्यमंत्र्यांनी स्वामींचे चरणस्पर्श केल्याचा आरोप झाला, मात्र अमृता यांनी ही भोंदूगिरी नसून स्वामींनी हातातलीच चेन दिल्याचं स्पष्टीकरण दिलं. ते वयाने ज्येष्ठ असल्यामुळे आशीर्वाद घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबई हायकोर्टाचे चीफ जस्टीस वाघेला आणि जस्टीस सोनाक यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. जर तुम्हाला जनहित याचिका दाखल करण्याबाबत माहिती नसेल, तर त्यावर सुनावणी होणार नाही. कोर्टाचा वेळ वाया घालवल्या प्रकरणी तुम्हाला दंडही होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला. अशा तक्रारी करण्यासाठी ही योग्य जागा नसून योग्य ठिकाणी तक्रार नोंदवा असंही खडसावलं.
=========================================

कबड्डीपटूची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या

कबड्डीपटूची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या
रोहतक हरियाणामध्ये एका कबड्डी खेळाडूची भररस्त्यात गोळी घालून हत्या करण्यात आली. रोहतकच्या रिठाल गावात ही घटना घडली आहे. स्कूटीवर आलेल्या दोन मारेकऱ्यांनी कबड्डीपटू सुखविंदर सिंहचा खून केला.

कबड्डीपटूचे प्राण जात नाहीत तोपर्यंत मारेकरी त्याच्यावर गोळ्या झाडत होते. यानंतर आरामात स्कूटीवर बसून तिथून फरार झाले. ही थरारक घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मारेकऱ्यांनी पहिल्यांदा सुखविंदरच्या छातीत गोळी झाली. हल्ल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. त्यानंतर मारेकरी त्याच्याजवळ आले आणि सुखविंदर सिंहवर गोळ्यांचा वर्षाव केला. सुखविंदरने जागीच प्राण सोडले.

सुखविंदर मंगळवारी रस्त्यावरुन जात होते, त्याचवेळी तिथे स्कूटीवरुन आलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर सुखविंदरला पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुटुंबियांच्या जबाबानंतर रोहतक पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलं आहे.

सुखविंदर सिंह हा राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर कबड्डीपटू होता. सीसीटीव्ही फूटेज हा या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
=========================================

मुंबई आणि पुण्यातच 400 धनाढ्य शेतकरी

मुंबई आणि पुण्यातच 400 धनाढ्य शेतकरी
मुंबई : शेतकऱ्यांना कृषी उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही, या तरतुदीचा फायदा घेऊन कित्येक कोट्यधीश आयकर भरणा चुकवतात, अशा सर्व बोगस शेतकऱ्यांना शोधण्याची कारवाई सुरु झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत काल याबाबतची माहिती दिली.

कोट्यधीश शेतकऱ्यांनी आयकर विभागाला सादर केलेल्या टॅक्स रिटर्नची फेरतपासणी करण्याचे आदेशही अर्थमंत्र्यांनी दिले आहेत.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने केलेल्या अभ्यासानुसार केल्या नऊ आर्थिक वर्षात जवळपास साडे सत्तावीसशे (2746) कोट्यधीशांनी तब्बल त्याचं एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीउत्पन्न असल्याचं सांगून त्यावर करसवलत मिळवली आहे. अशी करचुकवेगिरी करणाऱ्यात महानगरातील कोट्यधीश आणि छोटे-मोठे राजकारणी किंवा राजकारण्यांचे निकटवर्ती यांचीच संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

हे कर सवलत मिळवणारे कोट्यधीश खरोखरच शेतकरी असतील तर काहीच हरकत नाही, मात्र ते शेतकरी असल्याचा गैरफायदा घेत असतील आणि अन्य मार्गांनी मिळवलेला काळा पैसा शेतीच्या माध्यमातून पांढरा करत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

आपलं शेतीउत्पन्न एक कोटीपेक्षा जास्त असल्याचं सांगून करसवलत मिळवणारे अर्थातच मोठ्या शहरातील आहेत. म्हणजेच ज्या शहरांच्या आजूबाजूला शेतीच शिल्लक नाही, ते कोट्यधीश फक्त फार्महाऊस नावावर असल्याचं सांगून शेतीउत्पन्नावरील करसवलत मिळवत आहेत.
=========================================

'भाभी जी घर पर हैं' च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!

'भाभी जी घर पर हैं' च्या शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस!
मुंबई : छोट्या पडद्यावरील विनोदी मालिका ‘भाभी जी घर पर हैं!’ ची निर्माती कंपनी एटिड द्वितियने अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदेला कायदेशीर नोटीस बजावली आहे. शिल्पाने या मालिकेची शूटिंग बंद करुन दुसरा प्रोजेक्ट हाती घेतला आहे, असा आरोप शिल्पावर आहे.
 एडिट द्वितीयचे प्रमुख बेनफेर कोहलीचं म्हणणं आहे की, शिल्पाने वारंवार कराराचं उल्लंघन केलं आहे. शिल्पा करार तोडणाऱ्यांपैकी एक आहे, त्यामुळे तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. आमच्या वकिलांनी सांगितलेली आवश्यक पावलं तिच्याविरुद्ध उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 अँड टेलीव्हिजनवरील ‘भाभी जी घर पर हैं!’ या मालिकेतील अंगुरीच्या भूमिकेने शिल्पा अतिशय लोकप्रिय झाली. प्रॉडक्शन हाऊसने माझ्याकडून रोबॉटसारखं काम करुन घेतलं. शिवाय कंपनीला माझ्यासोबत आणखी एक विशेष करार करायचा आहे, असा दावा शिल्पा शिंदेने केला आहे.
 तसंच सेटवर काम करताना मी कधीही नखरे दाखवले नाहीत, असंही शिल्पाचं म्हणणं आहे. तर काही वृत्तानुसार शिल्पा लवकरच द कपिल शर्मा शोमध्ये दिसणार असल्याचं कळतं.
=========================================

सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन नववधू पसार

सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन नववधू पसार!
फरीदाबाद (हरियाणा) : फरीदाबाद जिल्ह्यातील दयालपूरमध्ये एका नववधूने सासरच्या मंडळींच्या जेवणात गुंगीचं औषध टाकून त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर ती आपल्या वडिलांसोबत पसार झाली. गुंगीचं औषध जेवणाच्या माध्यमातून पोटात गेल्याने 5 चिमुरड्यांसह 11 जणांची प्रकृती बिघडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पीडित कुटुंबातील मुलाचं लग्न झालं. त्यावेळी मुलीसोबत तिचे वडीलही सासरी आले. त्यानंत लग्नाच्या संध्याकाळीच नववधूने जेवणात गुंगीचं औषध मिसळून सासरच्या मंडळींना बेशुद्ध केलं आणि वडिलांसमोर पसार झाली.

पीडित कुटुंबीयांवर उपचार सुरु असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एसएमओ वीरेंद्र यादव यांच्या माहितीनुसार, जेवणातून गुंगीचं औषध पोटात गेल्यानं 11 जण बेशुद्ध होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. सर्वांवर उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

ज्या जेवणातून गुंगीचं औषध देण्यात आलं, ते जेवण तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं असून चौकशी सुरु आहे. मात्र, वडिलांसोबत पसार झालेली नववधू अद्याप सापडली नसून सासरच्या मंडळींना बेशुद्ध करण्यामागचं कारणंही स्पष्ट झालेलं नाही.
=========================================

भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'मौका मौका'ची नवी जाहिरात

भारत-पाकिस्तान सामन्याआधी 'मौका मौका'ची नवी जाहिरात!
मुंबई : ट्वेन्टी 20 विश्वचषकातील हायव्होल्टेज भारत-पाकिस्तान सामन्याआधी क्रिकेटरसिकांना पुन्हा एकदा ‘मौका मौका’ ही जाहिरात पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी विश्वचषकात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘मौका मौका’ ही जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या नव्या जाहिरातीत पाक चाहता शाहिद आफ्रिदीला टीम इंडियाला षटकार कसे मारायचे हे दाखवूनच दे, असं आवाहन करताना दिसत आहे.

यापूर्वी विश्वचषकात झालेल्या चारही सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे आता आपण म्हातारे झाले आहोत, किमान पाचव्यांदा तरी पाकिस्तानने भारताला पराभूत करावं, असं भावनिक आवाहन हा चाहता जाहिरातीत करताना दिसत आहे.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर येत्या 19 मार्च रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे.

पाहा व्हिडीओ

=========================================

गुजरातमध्ये धर्मांतरासाठी केलेल्या अर्जांपैकी 94 टक्के अर्ज हिंदूंचे 


  • गांधीनगर, दि. १६ - गुजरातमध्ये धर्मांतर करण्यासाठी राज्य सरकारकडे गेल्या 5 वर्षात 1838 अर्ज आले आहेत. ज्यामधील 1735 म्हणजे 94.4 टक्के अर्ज हे हिंदूंनी पाठवले असून धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.  सर्व धर्मातील लोकांनी हे अर्ज पाठवले आहेत. 
    टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने फक्त 878 अर्ज मंजूर केले असून त्यांना धर्मांतराची परवानगी दिली आहे. गुजरात राज्याच्या धर्मांतराच्या कायद्यानुसार धर्मांतर करण्याआधी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. 1735 अर्ज हिंदूंनी केले असून 57 मुस्लिम, 42 ख्रिश्चन आणि 4 पारशी नागरिकांनी हे अर्ज केले आहेत. शीख आणिबौद्ध धर्मातील एकाही नागरिकाने धर्मांतरासाठी अर्ज केलेला नाही. 
    तज्ञांच्या मते लग्न हा धर्मांतर करण्याचं एक कारण असू शकत. अनेकदा आपली होणारी पत्नी किंवा पती दुस-या धर्माचे असल्याने धर्मांतर करणं भाग असतं त्यामुळे काहींनी अर्ज केला असण्याची शक्यता आहे. हिंदूंनी पाठवलेले अर्ज हे जास्तकरुन सुरत,राजकोट, पोरबंदर, अहमदाबाद, जामनगर आणि जुनागड या शहरांतून आहेत. 
    'जर सरकारी आकड्यानुसार फक्त 1735 लोकांनी धर्मांतरासाठी अर्ज केला आहे, याचा अर्थ सरकारने सर्व अर्जांची छाननी केलेली नाही. अधिका-यांनी व्यवस्थित पाहणी केली असती तर हिंदू अर्जदारांचा आकडा 50 हजारापर्यत पोहोचला असता',
    असं गुजरात दलित संघटनेचे अध्यक्ष जयंत मनकंदिया यांनी म्हंटलं आहे. तर विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस भारवाड यांनी अशा प्रकारे धर्मांतर करणं देशविरोधी असल्यांचं बोलले आहेत.
=========================================

मुंबईच्या या तीन तरुणांची रेल्वेनं भारत परिक्रमा

  • योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
    मुंबई, दि. 16 - ओमकार दिवेकर, रजत भार्गव आणि समर्थ महाजन या तीन तरुणांनी ठरवलं की देशभर जाळं पसरलेल्या भारतीय रेल्वेच्या नजरेतून भारत बघायचा आणि त्यांनी 9 मार्चला 16 दिवसांचा प्रवास सुरू केला. मुंबईहून सौराष्ट्रला प्रयाण केल्यानंतर खाली दिलेल्या नकाशाप्रमाणे भारताला ते प्रदक्षिणा घालत आहेत. 
    या सगळ्या प्रवासाचं लाइव्ह प्रक्षेपण ओमकार टि्वटरवर करत आहे. या पोस्टमधले सगळे फोटो त्याच्याच टि्वटर हँडलवरून घेतलेले आहेत.
    राजस्थान, पंजाब, काश्मिर असं रेल्वेने फिरत फिरत चाललेल्या या मस्त कलंदरांनी त्यांना भेटत असलेले स्थानिक, त्यांचे विचार हेदेखील शेअर केले आहेत.
=========================================

आपल्याच आंदोलनात ABVP चा कार्यकर्ता भाजला 


  • कानपूर, दि. १६ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसीयांच्याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या आंदोलनात त्यांचाच कार्यकर्त्याच्या कपड्याने पेट घेतला व किरकोळ जखमी झाला. असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय' म्हणणार नाही असं वक्तव्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत होतं. आंदोलनादरम्यान असदुद्दीन ओवेसी यांचा पुतळा जाळण्यात आला. मात्र या आगीची ठिणगी लागून एबीव्हीपीचा कार्यकर्ता भाजल्यामुळे जखमी झाला. उपस्थित विद्यार्थ्यांनी लगेच त्याचे जळालेले कपडे काढून वाचवले. मात्र त्यात तो जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
=========================================

असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस


  • लखनऊ, दि. १६ - ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जीभ कापणा-याला 21 हजारांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष दुष्यंत तोमर याने हे बक्षीस जाहीर केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केल्याने माझ्या रागाचा पारा चढला आहे असं दुष्यंत तोमरने म्हंटलं आहे. 
    'ओवेसी यांचं वक्तव्य फक्त देशविरोधी नाही, तर यातून ते अजिबात देशभक्त नाहीत हे दिसतं', असं दुष्यंत तोमर बोलला आहे. दुष्यंत तोमर हा 2014-15 मध्ये विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं (ABVP) सदस्यपद देखील देण्यात आलं होतं.  ओवेसी यांची लोकसभा खासदारपदावरुन हाकलपट्टी केली पाहिजे अशी मागणीदेखील दुष्यंत तोमरने केली आहे. ओवेसी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लखनऊमध्ये न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. 
=========================================

मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये दाखल होणार नरेंद्र मोदींचा पुतळा


  • लंडन, दि. 16 - मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दाखल होणार आहे. पुढील महिन्यात लंडन, सिंगापूर, हाँगकाँग व बँकॉकमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये मोदींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
    जागतिक राजकारणातलं बडं प्रस्थ असं वर्णन म्युझियमने मोदींचं केलं आहे. नवी दिल्लीमध्ये म्युझियमचे कलाकार मोदींना भेटले आणि मोदींनी त्यांना हवी तसी पोजही दिली असल्याचे वृत्त आहे. 
    जगातल्या थोर लोकांचे पुतळे या म्युझियममध्ये आहेत, त्यामध्ये मला कसं काय स्थान मिळालं असा प्रश्न मोदींनी म्युझियमच्या संचालकांना विचारला होता. परंतु ज्यावेळी लोकांच्या पसंतीतून ही निवड करण्यात आल्याचे समजल्यावर मला दिलासा मिळाल्याची भावना मोदींनी म्युझियमला लिहिलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
    मादाम तुसाँच्या कलाकारांचं कौशल्य, व्यावसायिकपणा आणि कामावरील निष्ठा मनाला भिडल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदींची ओळख बनलेल्या कुर्त्यामध्येच त्यांनी या पुतळ्यासाठी पोज दिली आहे. पारपंरिक नमस्ते करताना मोदी या पुतळ्यामध्ये दिसणार आहेत. 
    टाइम मॅगेझिनच्या टॉप टेन पर्सन्समध्ये मोदी असून जागतिक बाजारात ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचेही म्युझियमने म्हटले आहे. मोदींचे पुतळे बनवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचे व दीड लाख ब्रिटिश पौंड खर्च आल्याचेही म्युझियमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
=========================================

दागिने उत्पादक सराफांनाच कर लागू

  • पुणे : यंदाच्या अर्थसंकल्पात दागिन्यांवर केंद्रीय उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, हा कर सरसकट सर्व सराफांना नाही. सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करणाऱ्या सराफांनाच हा कर भरावा लागणार आहे. छोटे सराफी व कारागिरांना हा कर भरावा लागणार नाही. सराफांनी गैरसमजुतीतून हा संप पुकारला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर व सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त भिखू राम यांनी पत्रकार परिषदेत दिले.
    या वेळी केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर व सीमा शुल्क विभागाचे प्रमुख आयुक्त गौतम भट्टाचार्य, विभागीय आयुक्त आशिष वर्मा, राजेश पांडे, नरेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. राम म्हणाले, की सराफांमध्ये या प्रस्तावित कराविषयी पूर्ण माहिती नसल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांनी हा बंद पुकारला. सरसकट सर्व सराफांना हा कर नाही. जे सोन्याच्या दागिन्यांचे उत्पादन करतात म्हणजे ते सोन्याचे दागिने घडवितात, ज्यांची वार्षिक उलाढाल ६ कोटींच्या पुढे आहे, त्यांनाच हा कर भरावा लागणार आहे. जे कारागिर सोन्याचे दागिने घडवितात त्यांना आणि ज्या सराफांची वार्षिक उलाढाल ६ कोटींपेक्षा कमी आहे त्यांना हा कर भरावा लागणार नाही. विशेष म्हणजे, इतर क्षेत्रातील उद्योजकांचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रूपयांच्या पुढे असले की त्यांना हा कर भरावा लागतो. मात्र सराफांसाठी ही मर्यादा दीड कोटी रूपयांवरून सहा कोटी रूपये करण्यात आली आहे.
=========================================
पाकिस्तानचा 55 धावांनी दणदणीत विजय
कोलकाता - नुकत्याच पार पडलेल्या आशिया करंडक स्पर्धेतील पराभवाचा बदला घेत पाकिस्तानने ट्‌वेंटी-20 क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत बांगलादेशचा 55 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला. पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने 19 चेंडूत 49 धावा केल्या आणि बांगलादेशचे दोन बळीही टिपत कर्णधाराला शोभेसी कामगिरी केली. 

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर टी-20 विश्‍वकरंडकासाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी संघाने विजयी सुरुवात केली. इडन गार्डनवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकच्या संघाने जबरदस्त खेळ करत बांगलादेशसमोर तब्बल 202 धावांचे विशाल आव्हान ठेवले. मोठे आव्हान असल्याने बांगलादेशच्या संघावर सुरुवातीपासूनच दबाव होता. त्यामुळे बांगलादेशचा कोणताही फलंदाज फारसा प्रभाव दाखवू शकला नाही. मात्र शकीब हसनने 40 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा जोडल्या. तमीम इक्‍बालने 20 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. शब्बीर रेहमानने 19 चेंडूत 5 चौकरांच्या सहाय्याने 25 धावा जोडल्या. वीस षटकात बांगलादेशचा संघ केवळ 146 धावा करू शकला. पाकिस्तानच्यावतीने मोहम्मद आमीर आणि शाहीद आफ्रिदीने प्रत्येकी दोन बळी टिपले. तर मोहम्मद आमीर आणि इमाद वसीम यांनी प्रत्येक एक बळी घेतला.
=========================================
औरंगाबाद - घरकुल प्रकरणातील याचिका फेटाळल्या 
औरंगाबाद- जळगाव येथील कोट्यवधी रुपयांच्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची उलटतपासणी व साक्ष तहकूब करून इतरांच्या साक्षी नोंदवाव्यात, अशी विनंती करणाऱ्या सात याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश एन. डब्ल्यू. सांबरे यांनी फेटाळून लावल्या. त्यामुळे डॉ. गेडाम यांच्या महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या साक्षीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जळगाव घरकुल गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या धुळे येथील विशेष न्यायालयासमोर सुरू आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची सरकारी पक्षातर्फे नोंदवली जाणारी साक्ष तहकूब करून अन्य काही साक्षीदारांच्या साक्षी नोंदवाव्यात, अशी विनंती करणारी याचिका धुळे येथील विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी फेटाळून लावल्याने उच्च न्यायालयात सात याचिका दाखल करून त्याला आव्हान देण्यात आले होते. डॉ. गेडाम यांनी साक्ष देताना आपले मत प्रदर्शित केले, तो भाग वगळण्यात यावा, पूर्ण साक्षीदरम्यान ज्या कागदपत्रांना निशाणी लावण्यात आली ती वगळण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करताना याबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. सुनावणीनंतर खंडपीठाने याचिका फेटाळून लावल्या.
=========================================
प्रख्यात सनईवादक अली अहमद यांचे निधन
कोलकत्ता - हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विश्‍वामधील अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेले प्रख्यात सनईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे आज (बुधवार) येथे प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. 

मूत्रपिंडाच्या आजाराशी झगडत असलेल्या खान यांना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पाच मुले व पाच मुली असा परिवार आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्यसंगीतामध्ये भरीव योगदान दिल्याबद्दल खान यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

वैशिष्ट्यपूर्ण वादन शैली व शास्त्रीय संगीताबरोबरच इतर उपशास्त्रीय प्रकारांवर असलेल्या प्रभुत्वामुळे खान यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते कोलकत्तामधील आयटीसी संगीत संशोधन अकादमीमध्ये शेवटपर्यंत शिकवित होते. खान यांना पश्‍चिम बंगाल राज्यसरकारकडून 2012 मध्ये ‘बंगभूषण‘ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. 
=========================================
जय हिंद म्हणू; भारत माता की जय नाही - आमदार वारीस पठाण 
मुंबई- आम्ही राज्यघटनेनुसार जय हिंद म्हणू शकतो पण भारत माता की जय नाही, असे वक्तव्य एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी आज (बुधवार) विधानसभेत केले. 

विधानसभेत भारत माता की जय म्हणण्यास एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी नकार दिला. यामुळे एमआयएम आमदारांच्या विरोधात सर्वपक्षीय आमदार संतप्त झाले. गदारोळामुळे विधानसभा तहकूब करण्यात आली. 
एमआयएमच्या आमदारांना निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेससह भाजप, शिवसेना आमदारांनी एकत्रपणे केली. 

दरम्यान, भारत माता की जय या मुद्दावरून विधानसभा पाच वेळा तहकूब झाली. एमआयएमच्या आमदारांना निलंबित करण्याची जोरदार मागणी झाली. दोन्ही आमदारांच्या निलंबनाच्या प्रस्तावाची तयारी सुरू आहे.
=========================================
भाजप नेत्याची पक्षालाच आत्महत्येची धमकी 
लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील प्रचारादरम्यान 2014 साली आरक्षित केलेल्या रेल्वेच्या प्रलंबित देयकाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला रेल्वेकडून नोटीस येत आहेत. जर भारतीय जनता पक्षाने उर्वरित रक्कम भरली नाही तर आपण आत्महत्या करू, अशी धमकी एका नेत्याने दिली आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथील भाजप नेते विनोद सामरिया यांनी मोदी यांच्या सभेत सहभागी होण्यासाठी पक्षाच्या समर्थकांच्या प्रवासासाठी आग्रा ते लखनौ दरम्यान संपूर्ण रेल्वे आरक्षित केली होती. ही रेल्वे सामरिया यांच्या नावे आरक्षित केली होती. सुरुवातीला पक्षाने केवळ 18 लाख 39 हजार 560 रुपये भरले होते. त्यानंतर आता 30 लाख 68 हजार 950 रुपये भरायचे आहेत. त्याबाबत सामरिया यांना रेल्वेने अनेकदा नोटीस पाठविली आहे. 

‘मी एक सामान्य शेतकरी आहे. सुरुवातीची रक्कम पक्षाने भरली. पुढील रक्कमही पक्षानेच भरायला हवी. मात्र अनेकदा विनंती करूनही पक्षाचे नेते केवळ आश्‍वासन देत आहेत‘ असे सामरिया यांनी सांगितले. याबाबत दिल्लीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली. पैसे जमा करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा आणि रेल्वे सुरेश प्रभू यांना पत्र लिहिलेल्याचे सामरिया यांनी सांगितले.
=========================================
भारत-पाक सीमेवर 405 चकमकीच्या घटना-चौधरी

नवी दिल्ली- काश्‍मीरमध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सन 2015 मध्ये 405 वेळा चकमकीच्या घटना घडल्या असून, यामध्ये 16 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती राज्य गृहमंत्री हरिभाई चौधरी यांनी आज (बुधवार) राज्यसभेत दिली. 

चौधरी म्हणाले, ‘सन 2015 मध्ये भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर 253 तर पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये 152 चकमकीच्या घटना घडल्या आहेत. या चकमकीमध्ये 16 नागरिक ठार तर 71 जण जखमी झाले आहेत. शिवाय, 72 घराचे नुकसान झाले आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये झालेल्या विविध चकमकींचा 7110 नागरिकांना फटका बसला आहे.‘
=========================================
वॉशिंग्टन; नासा लावणार अवकाशात आग 
वॉशिंग्टन - गुरुत्वाकर्षण नगण्य असलेल्या ठिकाणी आग कशी पसरेल, हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) अवकाशात एक प्रयोग करणार आहे. नासामधील जॉन एच ग्लेन संशोधन केंद्राकडून हा प्रयोग राबविण्यात येणार असून या प्रयोगांतर्गत अवकाशात मोठ्या प्रमाणात आग लावण्यात येणार आहे. स्पेसक्राफ्ट फायर एक्‍सपेरिमेंट (सफायर) असे या प्रयोगाचे नामकरण करण्यात आले आहे. अवकाशामधील आगीच्या "वर्तना‘चा अभ्यास करण्यासाठी हा प्रयोग येत्या 22 तारखेस राबविण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी नासा व नासाची व्यावसायिक भागीदार कंपनी ऑर्बिटर एटीके एकत्रितरित्या सायग्नस हे अवकाशयान अवकाशात पाठविणार आहे. या अवकाशयानाने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सोडल्यानंतर हा प्रयोग राबविण्यात येईल. वर्तमान व भविष्यकाळातील अवकाश मोहिमांसाठी हा प्रयोग आवश्‍यक असल्याचे या प्रयोगाशी संबंधित असलेले अभियंते गॅरी रफ यांनी सांगितले. 
=========================================
मोदींना केवळ दबावाची भाषा समजते- राहुल गांधी 

हैदराबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केवळ दबावाची भाषा समजते. दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारला आंध्र प्रदेशाचे काही देणे-घेणे नाही, असे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

गांधी म्हणाले, ‘मोदी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी मोठे आयोजन केले जाते. परंतु, त्यांना हे माहित नाही की, त्यांच्या या आयोजनामुळे काही नागरिकांना त्रासही होत असणार. आंध्र प्रदेशातील नागरिक मोठा संघर्ष करत आहेत. मोदी सरकारने मोठ-मोठी आश्वासने देत सत्ता मिळविली आहे. परंतु, आम्हाला त्यांच्याकडून काहीही मिळालेले नाही. केंद्र सरकार हे आंध्र प्रदेश सरकार बरोबर भेदभाव करत असल्याचे नागरिक सांगतात.‘ 

‘पंतप्रधानांवर सतत दबाव टाकावा लागणार आहे, कारण त्यांना केवळ दबावाचीच भाषा समजते. राज्यातील नागरिक केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतात तेव्हा फक्त चिखल व पाणी मिळते,‘ असेही गांधी म्हणाले
=========================================
फेसबुकवर भारत-पाक क्रिकेट चाहत्यांची एकता 
मेनलो पार्क (कॅलिफोर्निया) - ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडकात भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशातील क्रिकेटच्या चाहत्यांनी एकतेचे दर्शन घडविले आहे. भारतातील चाहत्यांनी त्यांच्या फेसबुकवरील प्रोफाईल फोटोभोवती पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे बोधचिन्ह तर पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बोधचिन्ह दर्शवून आम्ही एक असल्याचे दाखवून दिले आहे. ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडकाच्या पार्श्‍वभूमीवर फेसबुकने युजर्सना खास प्रोफाईल फ्रेम उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे की, "प्रोफाईलभोवती आपल्या संघाची फ्रेम लावून नेहमी आपल्या संघाला प्रोत्साहन दिले जाते. मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये हे चित्र वेगळे असून भारतीयांनी पाकिस्तानी फ्रेम तर पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय फ्रेम प्रोफाईलभोवती लावली आहे.‘ तसेच त्यासाठी #ProfilesForPeace हा हॅशटॅगही वापरण्यात आल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. "प्रोफाईल फ्रेम तयार करताना आमचा केवळ आपल्या संघाला पाठिंबा दर्शविणे हाच उद्देश होता. मात्र या घटनेमुळे आपल्याला कोणती गोष्ट तोडते त्यापेक्षा कोणी गोष्ट जोडते हे समजले आहे‘ असेही झुकेरबर्ग यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
=========================================
भारत माता की जय' हा
च राष्ट्रवाद हवा- खेर 

नवी दिल्ली - भारतीयांची राष्ट्रवादाची खरी व्याख्या केवळ "भारत माता की जय‘ हेच असायला हवी, अशा प्रतिक्रिया अभिनेते अनुमन खेर यांनी म्हटले आहे. 

खेर यांनी ट्‌विटरद्वारे "इतर सारे काही सोडून भारतवासियांसाठी राष्ट्रवादाची खरी व्याख्या केवळ भारत माता की जय हेच असायला हवे‘ असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. "माझ्या गळ्यावर कोणी धारदार सुरा ठेवला, तरी मी "भारतमाता की जय‘ असे म्हणणार नाही‘, असे वक्तव्य ऑल इंडिया मजलिसद-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुखअसदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी मंगळवारी राज्यसभेत म्हटले, "कामकाजात वारंवार अडथळे आणणे व धार्मिक ध्रुवीकरण देशाला पुढे नेणार नाही, तर धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणारी राज्यघटनाच पुढे नेईल. घटना जर तुम्हाला शेरवानी व टोपी घालण्याचेही बंधन ठेवत नाही. मी त्रिवार म्हणतो, की भारतमाता की जय‘ असे म्हणत ओवैसींवर टीका केली. तर मेरठमधील एका विद्यार्थ्यांने ओवैसींची जीभ कापणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
=========================================
नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; 22 मृत्युमखी 
अबुजा- नायजेरियातील मैदुगुरी शहरातील एका मशिदीमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये एकाने आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस व बचाव दलाचे पथक दाखल झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=========================================
भाजप सर्वांत मोठा देशद्रोही- अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्ष (भाजप) हा सर्वांत मोठा देशद्रोही पक्ष आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) ट्‌विटरवर म्हटले आहे. 

केजरीवाल म्हणाले, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा देणाऱयांपेक्षा भाजप हा सर्वांत मोठा देशद्रोही पक्ष आहे. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांनाच मोठे संरक्षण दिले जात आहे.‘

"जेएनयू‘मध्ये आम्ही आणखी एका जिनाचा जन्म होऊ देणार नाही, त्याने जन्म घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तेथेच गाडून टाकू, "जेएनयू‘सारखी संस्था राष्ट्रद्रोहींचा अड्डा बनता कामा नये, असे वक्तव्य नुकतेच भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी केले होते. यामुळे दिल्लीतील हवा पुन्हा एकदा तापली आहे. 
=========================================
========================================= 

No comments: