ग्रां.प.सदस्य हेमंत खंकरे यांनी केले स्वखर्चाने टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा ..........
मुक्रमाबाद - रज्जाक कुरेशी
मुक्रमाबाद येथील वार्ड क्र .2 मधील लोकांची पाण्यासाठी होणारी भटकंती पाहून वार्ड मधील अपक्ष ग्रा.प.सदस्य हेमंत खंकरे यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करुन नागरिकांची तहान भागवीत आहेत .
या उपक्रमाचे उदघाटन जि.प.चे माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुभाष पाटील दापकेकर, डाँ.जगदीश गायकवाड , सुभाषअप्पा बोधने, पञकार संघाचे अध्यक्ष गंगाधर चामलवाड, यांची प्रमुख उपस्थिती होती .


No comments:
Post a Comment