[अंतरराष्ट्रीय]
१- काबुल; अफगाणिस्तानच्या संसदेवर डागले क्षेपणास्त्र
२- टोकियो; जपान: दोन वर्षांच्या बंदिवासानंतर युवती मुक्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- लखनऊ; भारत माता की जय'साठी कोणावर जबरदस्ती नको - मोहन भागवत
४- कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह ६ जणांवर आरोपपत्र दाखल
५- कन्हैयाला फेसबुकवरून ठार मारण्याची धमकी
६- पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाक समितीचा तपास
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- भाजपत हिम्मत असेल तर सावरकरांना 'भारतरत्न' द्यावा : उद्धव ठाकरे
८- जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही - सुप्रिया सुळे
९- चेन्नई; सात हजार अंध:कारमय गावे झाली वीजसंपन्न
१०- जेएनयुमध्ये आता "जश्न-इ-आझादी'चे आयोजन
११- पुणे; आई, अभिषेकी बुवांना पुरस्कार अर्पण-महेश काळे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- लखनौ; लग्न मोडल्याने तरुण संतप्त, तरुणीचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट
१३- उज्जैनमध्ये लग्नात केलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचा मृत्यू
१४- हैद्राबाद विद्यापीठातील 25 विद्यार्थ्यांना जामीन
१५- बंगळूर; मद्यधुंद डॉक्टरने 6 जणांना उडविले; एकाचा मृत्यू
१६- नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील पोलीस भारती २९ मार्चपासून
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- अनुष्कावर जोक्स करणाऱ्यांची लाज वाटते', विराट भडकला
१८- आयपीएल 9 मध्ये झहीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार
१९- विराट भाऊची हवा, सोशल मीडियावर जोक्सचा धुमाकूळ
२०- विराटची फलंदाजी अदभुत, असामान्य या शब्दांपलीकडे - सुनील गावस्कर
२१- 'कहानी 2' च्या शुटींगला सुरुवात
२२- दिल्ली डेअरडेव्हिस'चे नेतृत्व झहीर खानकडे
२३- 'अलिबाबा'वरून फ्लिपकार्ट-स्नॅपडीलमध्ये जुंपली
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा. यश तुमच्या जवळच असते
(अरुण गिरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
============================================

भाजपत हिम्मत असेल तर सावरकरांना 'भारतरत्न' द्यावा : उद्धव ठाकरे
मुंबई : हिम्मत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे. शिवसेनेने यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केला आहे. त्यामुळे सावरकर यांना तात्काळ भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित करुन काँग्रेसचं थोबाड बंद करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सावरकरांच्या अवमानाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अन्यथा काँग्रेस आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. मात्र निव्वळ बदनामी मोहिमेचं ढोंग करणं बंद करा, मग आंदोलनाची गरज भासणार नाही, असा सल्लाही उद्धव यांनी भाजपला दिला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची हिम्मत करुन काँग्रेसचं तोंड बंद करावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
============================================
'जगाला नैतिकता शिकवता, मग पांडेवर कारवाई का नाही'
मुंबई: भाजयुमोत काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेवर दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यास भाजपची टाळाटाळ सुरु आहे.
त्यामुळे एरवी नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपनं गणेश पांडेला पाठिशी घालावं हे दुर्दैव असल्याची बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. इतकंच नव्हे तर आमच्या पक्षात पांडे असता तर त्याचं आम्ही काय केलं असतं याचा तुम्ही विचारही करु शकत नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपला खडे बोल सुनावलेत. त्या आज पुण्यात बोलत होत्या.
दुसरीकडे शिवसेनेनंही गणेश पांडेची हकालपट्टी पुरेशी नसल्याचं म्हणत भाजपवर शरसंधान साधलं.
इतकंच नव्हे तर याआधीही पांडेनं इतर महिलांशी असंच वर्तन केल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळं पांडेवर तातडीनं पोलीसात गुन्हा दाखल करा अशी मागणी नीलम गोऱ्हेंनी केली.
पांडेनं मथुरेत झालेल्या भाजयुमोच्या परिषदेवेळी महिला कार्यकर्तीशी अश्लील आणि असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला होता.
============================================
'अनुष्कावर जोक्स करणाऱ्यांची लाज वाटते', विराट भडकला!
मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठी खेळी करुन भारतीय संघाला विजय मिळवून देणारा टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली चांगलाच भडकला आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्काबाबत सोशल मीडियावर अनेक उपहासात्मक जोक्स व्हायरल झाले. अखेर या सर्व प्रकाराला वैतागून आज विराट कोहलीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरुन आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. एक फोटो अपलोड करुन त्यांनं याबाबत एक ट्वीट केलं आहे.
============================================
आयपीएल 9 मध्ये झहीर खान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार
मुंबई : भारताचा माजी कसोटीवीर झहीर खान आयपीएलच्या नवव्या मोसमात एका नव्या भूमिकेत दिसेल. जेपी ड्युमिनीऐवजी झहीरवर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून झहीर दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. पण संघात मोठी नावं असूनही दिल्ली डेअरडेव्हिल्सची गेल्या काही मोसमात पिछेहाटच होताना दिसली. आता कर्णधार झहीर खान, टीम मेन्टॉर राहुल द्रविड आणि प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्या हाताखाली दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नशीब पालटणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
============================================
लग्न मोडल्याने तरुण संतप्त, तरुणीचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट
लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये ठरलेलं लग्न मोडल्याने एका तरुणाने बनावट आयडी तयार करुन तरुणीचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड केला. याबाबत तरुणीच्या नातेवाईकांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
कोतवाली पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात राहणाऱ्या तरुणीचं मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत लग्न ठरलं होते. दोन्ही बाजूने लग्नास होकार आल्यानंतर पुढील कार्याची तयारी सुरु झाली. मात्र, एवढ्यात तरुणाच्या कुटुंबांकडून हुंड्याची मागणी सुरु झाली आहे.
हुंड्यावरुन तरुण आणि तरुणीच्या बाजूच्या लोकांनी अनेकदा चर्चाही केली. मात्र, कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे नातं ताणलं गेलं आणि अखेर ठरलेलं लग्न हुंड्यामुळे मोडलं.
लग्न मोडल्यानंतर काही दिवस गेले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तरुणीने आपलं फेसबुक अकाऊंट पाहिलं, तर तिला धक्काच बसला. कारण तिचा आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर शेअर केला गेला होता. तो फोटो पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली.
याबाबत जेव्हा तरुणीच्या नातेवाईकांना कळलं, तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर कळलं की, हा आक्षेपार्ह फोटो लग्न तुटलेल्या तरुणानेच पोस्ट केला आहे.
तरुणीने तरुणासह त्याच्या दोन्ही बहिणींविरोधात पोलीस तक्रार केली असून पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करत चौकशीही सुरु केली आहे.
============================================
विराट भाऊची हवा, सोशल मीडियावर जोक्सचा धुमाकूळ!
मुंबई: टी-20 विश्वचषकाच्या करो या मरो या सामन्यात विराटनं मिळवून दिलेला विजय प्रत्येक भारतीयाच्या कायम स्मरणात राहणारा आहे.
सध्या सोशल मीडियाचं युग असून इथं प्रत्येक गोष्टीचे झटपट प्रतिक्रिया पाहायला मिळतात. कालच्या सामन्यात विराटनं केलेली खेळीही अविस्मरणीय अशीच होती. त्याच्या याच मॅचविनिंग खेळीनंतर सोशल मीडियावर मात्र, काही उपहासात्मक पोस्टचा अक्षरश: पाऊसच पडला.
विराटच्या खेळीनंतर सोशल मीडियावर धुमाकूळ:
————
1. आकाशात उड़तो पक्षांचा थवा
आकाशात उड़तो पक्षांचा थवा
क्रिकेटच्या मैदानात फक्त विराट भाऊंची हवा
————
2. शर्मा, धवन और रैना के आउट होने के बाद ही तो मैच शुरू होता है
.

ये तीनों तो सिर्फ भूमिपूजन करने आ
ते है…
————
ते है…
————
3. 1 रूपयाचं चिंगम
कोहली दादा सिंघम….
————
————
4. कोहली: धोनी भाई, बहौत रन बनाने है
धोनी: अबे रन तुझे बनाने है, मै तो विनिंग शॉट मारने आया हूँ
————
5. स्मिथची कबुली-
5. स्मिथची कबुली-
शेवटच्या ओव्हरमधे नेहराच मार्गदर्शन कमी पडले..
————
6. कोहलीची आई कोहलीला फोन करते आणि शिखर धवन फोन उचलतो.

धवन: काकु विराट batting करतोय. नंतर करा.
कोहलीची आई: काय रे दर वेळेस तुच फोन उचलतो. तू batting करत नाहिस का?
————
7. सात आठ खायची तोंडं आणि एकटा कमावता बाप….तसं झालंय विराटचं.

म्हातारे वडील युवराज…
दोन शिक्षित पण नोकरी न टिकवणारी मुलं धवन आणि रोहित..
कर्ज वाढवणारे मेव्हणे रैना आणि जडेजा……
============================================
विराटची फलंदाजी अदभुत, असामान्य या शब्दांपलीकडे - सुनील गावस्कर
- मुंबई, दि. २८ - विराटच्या फलंदाजीचे वर्णन करायला अदभुत, असामान्य हे शब्द अपुरे आहेत. त्याची फलंदाजी या शब्दांपलीकडे आहे अशा शब्दात भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी विराटचे कौतुक केले आहे. आजच्या घडीला विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवून भारताला दिमाखात उपांत्यफेरीत पोहोचवणा-या विराट कोहलीवर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आजच्या घडीला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्याची फलंदाजी थक्क करुन सोडणारी आहे असे गावस्कर एनडीटीव्ही वृत्तवाहिनीवर बोलताना म्हणाले.कोहली दबावाखाली सर्वोत्तम खेळ करतो आणि संघ हिताला प्रथम प्राधान्य देतो हा त्याचा विशेष गुण आहे. संघाला धावांची गरज असताना किंवा धावांचा पाठलाग करताना तुम्ही कोहलीचा रेकॉर्ड बघा. त्याने प्रत्येकवेळी सामना जिंकून दिला आहे. तो निस्वार्थीपणे खेळतो.जेव्हा तुम्ही अशी मोठी इनिंग खेळता तेव्हा विजयी फटका मारण्याची तुमची इच्छा असते. पण कोहलीने स्ट्राईक धोनीकडे दिले. तो पूर्णपणे संघासाठी खेळतो अशी स्तुतीसुमने गावस्कर यांनी कोहलीवर उधळली.
============================================
भारत माता की जय'साठी कोणावर जबरदस्ती नको - मोहन भागवत
- लखनऊ, दि. २८ - 'भारत माता की जय' ही घोषणा देण्याची कोणावर सक्ती करु नका, त्यापासून दूर रहा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संघ स्वयंसेवकांना केले. आपले आचरण असे असले पाहिजे की, लोकांनी स्वत:हून 'भारत माता की जय' ही घोषणा दिली पाहिजे.त्यांच्या आतून ही घोषणा ओठांवर आली पाहिजे असे भागवत यांनी सांगितले. सोमवारी लखनऊमधील ऐतिहासिक 'स्मृती भवन' लोकार्पण करण्याच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सर्व समाज या विषयावर ते बोलत होते. राष्ट्रवादाच्या घोषणा स्वेच्छेने दिल्या पाहिजेत. त्या बंधकारक नाहीत. प्रत्येकजण आपला आहे. आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे असे भागवत यांनी सांगितले.रविवारी कोलकात्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी संपूर्ण जगाने भारत माता की जय बोलावे अशी आमची इच्छा असल्याचे म्हटले होते. एमआयएमचे अध्यक्ष असदउद्दीन ओवेसीही आज लखनऊमध्ये आहेत.
============================================
'कहानी 2' च्या शुटींगला सुरुवात
- मुंबई, दि. 28 - अभिनेत्री विद्या बालनने 'कहानी 2' चित्रपटाच्या शुटींगसाठी सुरुवात केली आहे. विद्या बालनने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 2012 मध्ये आलेल्या सस्पेन्स थ्रिलर 'कहानी' चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. कहानी चित्रपटात विद्या बालनने एका गरोदर महिलेची भुमिका निभावली होती. ज्यामध्ये विद्या आपल्या पतीच्या शोधात लंडनहून कोलकातामध्ये येते. विद्या बालनची ही भुमिका प्रेक्षकांना खुपच आवडली होती. विद्याला या चित्रपटासाठी अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले होते.पश्चिम बंगालमधील हिल स्टेशनवर या चित्रपटाचं शुटींग सुरु आहे. 'कहानी 2' चित्रपटाच्या शुटींगचा आज पहिला दिवस. येथील झाडे गुलजार साहब यांच्या मुसाफिर हू यारो गाण्यावर डोलत आहेत असं विद्या बालनने ट्विट केलं आहे. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी कहानी चित्रपटाची कथा लिहिली होती तसंच दिग्दर्शनही केलं होतं. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भुमिका निभावली होती तर नवाझुद्दीन सिद्दीकी, इंद्रनील सेनगुप्ता, सास्वता चॅटर्जी यांनीदेखील महत्वाच्या व्यकिरेखा साकारल्या होत्या.विद्या बालनने याअगोदरही आपल्या चित्रपटांसाठी पश्चिम बंगालमध्ये शुटींग केलं आहे. ज्यामध्ये 'इश्किया', 'नो वन किल्ड जेसिका', परिणीता तसंच आगामी 'तीन' या चित्रपटाचा समावेश आहे.
============================================
उज्जैनमध्ये लग्नात केलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचा मृत्यू
- मध्यप्रदेश, दि. 28 - उज्जैनमध्ये लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये नव-यामुलाच्या वडिलांचाच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचं सेलिब्रेशन करण्यासाठी फायरिंग करताना चुकून सुटलेली गोळी समोर उभ्या असलेल्या नव-यामुलाच्या वडिलांनाच लागली आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 27 मार्चची ही घटना आहे.व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नव-यामुलाचे वडीलच स्वत: फायरिंग करण्यासाठी सर्वांना सांगत आहे. मात्र या फायरिंगमध्ये आपलाच मृत्यू होईल याची त्यांना कल्पनाही नसावी. नव-यामुलाच्या वडिलांना गोळी लागल्याचं सुरुवातीला कोणाच्या लक्षातच आलं नाही. ज्याच्या बंदुकीतून गोळी सुटली त्यालादेखील काय झालं कळलं नव्हतं. गोळी डोक्याला लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेली व्यती नव-यामुलाचा वडील असल्याचं लक्षात आल्यानंतर सोहळ्याचं रुपांतर दुखात झालं.उत्तर भारतात लग्नादरम्यान फायरिंग करणं ही तशी प्रथाच झाली आहे. लग्नामध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतानादेखील अशाप्रकारे फायरिंग केली जाते. अशाप्रकारे करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि विना परवाना शस्त्र बाळगली जातात. मात्र तरीही अशा घटनांवर नियंत्रण येऊ शकलेलं नाही.
============================================
कलिना सेंट्रल लायब्ररी घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांसह ६ जणांवर आरोपपत्र दाखल
- मुंबई, दि. २८ - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणात अडकलेलेराष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरील अडचणी आणखीन वाढल्या असून कलिना सेंट्रल लायब्ररीप्रकरणी भुजबळांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी विशेष न्यायालयाथ भुजबळ, त्यांचे सीए रवींद्र सावंत यांच्यासह इतर सहा जणांवर १७ हजार ४०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. कलिना विद्यापीठातील राज्य सरकारच्या सेंट्रल लायब्ररीप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.कलिना विद्यापीठाचा भूखंड हडप केल्याची केस गंभीर असून, एसीबीच्या म्हणण्यानुसार, संबंधित भूखंड मुंबई विद्यापीठाचा होता. मात्र, या भूखंडावर लायब्ररी बांधण्याचे कंत्राट खासगी विकासकाला देण्यात आले. यासाठी भुजबळ यांना मोठ्या रकमेची लाच देण्यात आली.भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची आणि भूखंड हडप केल्याची चौकशी करून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती.
============================================
'दिल्ली डेअरडेव्हिस'चे नेतृत्व झहीर खानकडे
नवी दिल्ली : ‘आयपीएल‘च्या आगामी पर्वामध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘ या संघाचे नेतृत्व भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याच्याकडे सोपविण्यात आले आहे. झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही तो ‘आयपीएल‘मध्ये खेळत आहे.
गेल्या वर्षी झहीर ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘च्या संघात दाखल झाला होता. एकूण 14 पैकी सात सामन्यांमध्ये तो खेळला होता. यात त्याने सात बळी घेतले होते. ‘आयपीएल‘च्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांमध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘चा संघ अपयशीच ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मातब्बर खेळाडू असूनही त्यांना मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावता आलेली नाही. यंदा ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘च्या संघव्यवस्थापनाने संघाची पूर्णपणे नव्याने बांधणी करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची संघाचा मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली आहे. द्रविड म्हणाले, "भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना झहीरच्या योगदानाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. संघसहकाऱ्यांमध्येही झहीरविषयी आदराची भावना आहे.‘
'दिल्ली डेअरडेव्हिस'चे नेतृत्व झहीर खानकडे
गेल्या वर्षी झहीर ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘च्या संघात दाखल झाला होता. एकूण 14 पैकी सात सामन्यांमध्ये तो खेळला होता. यात त्याने सात बळी घेतले होते. ‘आयपीएल‘च्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांमध्ये ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘चा संघ अपयशीच ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक मातब्बर खेळाडू असूनही त्यांना मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावता आलेली नाही. यंदा ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स‘च्या संघव्यवस्थापनाने संघाची पूर्णपणे नव्याने बांधणी करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांची संघाचा मेंटॉर म्हणून निवड करण्यात आली आहे. द्रविड म्हणाले, "भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना झहीरच्या योगदानाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. संघसहकाऱ्यांमध्येही झहीरविषयी आदराची भावना आहे.‘
============================================
हैद्राबाद विद्यापीठातील 25 विद्यार्थ्यांना जामीन
हैदराबाद- हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू पी. अप्पाराव यांची हकालपट्टी करण्यासाठी व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 25 विद्यार्थ्यांसह दोन कर्मचाऱयांचा जामीन आज (सोमवार) मंजूर करण्यात आला.
पाच हजार रुपयांचा जामीन व प्रत्येक आठवड्याला गचीबोवली पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. आज संध्याकाळी उशिरा अथवा उद्या सकाळी त्यांची सुटका होणार आहे.
दरम्यान, हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्याप्रकरणी अप्पाराव यांना अटक करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.

सात हजार अंध:कारमय गावे झाली वीजसंपन्न!
चेन्नई - चालु आर्थिक वर्षांत 7 हजार गावांना वीजपुरवठा (इलेक्ट्रिफिकेशन) करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय उर्जा मंत्रालयातर्फे आज (सोमवार) करण्यात आली.
‘‘2015-16 वर्षाच्या काळामध्ये आत्तापर्यंत 7,012 गावांना वीजपुरवठा सुरु करण्यात यश आले आहे. उर्वरित 11,140 गावांपैकी 7,843 गावांना "ग्रीड‘द्वारे; तर भौगोलिक अडचण असलेल्या 3,148 गावांना "ग्रीड‘शिवाय वीजपुरवठा करण्यात येणार आहे. याचबरोबर, 449 गावांना राज्य सरकारांकडून वीज पुरविण्यात येणार आहे,‘‘ असे मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी ग्राम विद्युत अभियंता व इतर योजनांच्या अंमलबजावणीवरही नियमित देखरेख करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने 1 मे, 2018 पर्यंत (एक हजार दिवसांत) 18,452 गावांना वीज पुरवठा करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. याचबरोबर, मार्च 2019 पर्यंत देशातीला प्रत्येक नागरिकास 24 X 7 वीज देण्याचे ध्येयही केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून निश्चित करण्यात आले आहे.

'अलिबाबा'वरून फ्लिपकार्ट-स्नॅपडीलमध्ये जुंपली
जगातील सर्वात मोठी चीनी ई-कॉमर्स कंपनी असलेली अलिबाबा लवकरच भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. त्यावरून मात्र फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यांच्यात ट्विटरवरुन शाब्दिक युद्ध रंगले आहे.
भारतातील अनेक ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये अलिबाबाने गुंतवणूक केली आहे. त्यापैकी ई-कॉमर्स कंपनी पेटीएम आणि स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक आहे. तरीही भारतीय बाजारपेठेत स्वतंत्रपणे प्रवेश करणार असल्याची योजना अलिबाबाने केली आहे. ‘‘अलिबाबाने भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून भारतीय गुंतवणूकदार कंपनीने (स्नॅपडील) किती वाईट काम केले आहे,‘‘ असे फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल नाव न घेता स्नॅपडीलला म्हणाले.
सचिन बन्सल यांच्या ट्विटवर स्नॅपडीलचे संस्थापक कुणाल बहल म्हणाले की, मॉर्गन स्टॅनलेने फ्लिपकार्टचे सुमारे 5 अब्ज डॉलर बाजारमूल्य घालवले. त्यामुळे तुम्ही आता भाष्य करण्यापेक्षा फक्त स्वत:च्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा.‘‘

कन्हैयाला फेसबुकवरून ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने 31 मार्च पर्यंत दिल्ली सोडली नाही तर त्याला ठार मारू, अशी धमकी फेसबुकवरून देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, ‘कन्हैया व त्याचा मित्र उमर खालिद यांनी दुर्गाष्टमीपूर्वी म्हणजे 31 मार्चपर्यंत दिल्ली सोडली नाही तर ‘जेएनयू‘ परिसरामध्ये घुसून त्यांचे काम करू. शिवाय, ‘जेएनयू‘ने दोघांविरोधात काही कारवाई केली नाही तर आपण राजकीय सन्यांस घेऊ.‘
‘जम्मू-काश्मीरमध्ये महिलांवर भारतीय जवान बलात्कार करत असल्याचा आरोप कन्हैयाने केला आहे. जवानांवरील आरोप आपण कदापी सहन करणार नाही,‘ असेही जानी म्हणाले.

जपान: दोन वर्षांच्या बंदिवासानंतर युवती मुक्त
टोकियो - एका अल्पवयीन युवतीस सुमारे दोन वर्षांच्या दीर्घ काळापर्यंत बंदिवासात ठेवणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणास येथील पोलिस दलाने आज (सोमवार) अटक केली. या युवतीने तरुणाच्या बंदिवासामधून निसटण्यात यश मिळविल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. जपानची राजधानी असलेल्या टोकियोजवळील सैतामा या गावामधून या युवतीचे अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी 13 वर्षे वय असलेल्या या युवतीच्या अपहरणामुळे संपूर्ण जपानमध्ये खळबळ उडाली होती.
काबु तेराउची हा आरोपी खरेदीसाठी बाहेर पडला असताना या युवतीने बाहेर निसटण्यात यश मिळविले. तेराउची हा त्याच्या घरास कुलूप लावावयास विसरल्याने या युवतीस संधी मिळाली. बाहेर पडल्यानंतर या युवतीने येथील रेल्वे स्थानकावरुन घरी दुरध्वनी केला. त्याबरोबर, तिच्या आईने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस दलाने यानुसार तेराउचीस अटक केली आहे. त्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या युवतीच्या बंदिवासाच्या काळात तेराउची हा विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. तेराउची याने त्याच्या घरामध्ये युवतीस बंदिस्त करुन ठेवले होते. त्याने युवतीस साखळदंड वा अन्य बंधनात ठेवले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
जपान: दोन वर्षांच्या बंदिवासानंतर युवती मुक्त
काबु तेराउची हा आरोपी खरेदीसाठी बाहेर पडला असताना या युवतीने बाहेर निसटण्यात यश मिळविले. तेराउची हा त्याच्या घरास कुलूप लावावयास विसरल्याने या युवतीस संधी मिळाली. बाहेर पडल्यानंतर या युवतीने येथील रेल्वे स्थानकावरुन घरी दुरध्वनी केला. त्याबरोबर, तिच्या आईने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस दलाने यानुसार तेराउचीस अटक केली आहे. त्याने आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केल्याचेही निष्पन्न झाले आहे.
या युवतीच्या बंदिवासाच्या काळात तेराउची हा विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होता. तेराउची याने त्याच्या घरामध्ये युवतीस बंदिस्त करुन ठेवले होते. त्याने युवतीस साखळदंड वा अन्य बंधनात ठेवले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
============================================
अनुष्काची खिल्ली उडविणे लज्जास्पद- विराट
विराट कोहलीच्या कामगिरीवरून अनुष्का शर्मा हिला सोशल मीडियावर लक्ष्य करणाऱ्या चाहत्यांवर विराटने नाराजी व्यक्त केली आहे. अनुष्काला सोशल मीडियावर ‘ट्रोल‘ करणाऱ्यांची लाज वाटते अशी प्रतिक्रिया विराटने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
विराटने ‘SHAME‘ असे लिहिलेले चित्र ट्विटर पोस्ट केले असून, त्याखाली तो म्हणतो, "अनुष्काला अखंडपणे ‘ट्रोल‘ करणाऱ्यांची लाज वाटते. इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल काहीशी कणव वाटू द्या. तिने मला नेहमी फक्त सकारात्मकताच दिली आहे."
विराट कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यानंतर देशभरातील क्रिकेटरसिकांच्या उत्
साहाला उधाण आले. या उत्साहाच्या भरात अनेकांनी सोशल मीडियावर एकच पाढा वाचला तो म्हणजे "थँक्स अनुष्का... तू विराटला सोडल्याबद्दल!"
अनुष्का शर्मा आणि विराट वेगळे झाल्यामुळे विराटची कामगिरी उंचावल्याचे दावे क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर केले.
वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील दूरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींचा परस्परांशी संबंध जोडण्याची लोकांची सामुदायिक मानसिकता अनेकदा सेलिब्रिटींसाठी कसे मानहानीकारक ठरते हे या निमित्ताने पुन्हा निदर्शनास आले.
अनुष्काची खिल्ली उडविणे लज्जास्पद- विराट
विराट कोहलीच्या कामगिरीवरून अनुष्का शर्मा हिला सोशल मीडियावर लक्ष्य करणाऱ्या चाहत्यांवर विराटने नाराजी व्यक्त केली आहे. अनुष्काला सोशल मीडियावर ‘ट्रोल‘ करणाऱ्यांची लाज वाटते अशी प्रतिक्रिया विराटने ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
विराटने ‘SHAME‘ असे लिहिलेले चित्र ट्विटर पोस्ट केले असून, त्याखाली तो म्हणतो, "अनुष्काला अखंडपणे ‘ट्रोल‘ करणाऱ्यांची लाज वाटते. इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल काहीशी कणव वाटू द्या. तिने मला नेहमी फक्त सकारात्मकताच दिली आहे."
विराट कोहलीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळविल्यानंतर देशभरातील क्रिकेटरसिकांच्या उत्
अनुष्का शर्मा आणि विराट वेगळे झाल्यामुळे विराटची कामगिरी उंचावल्याचे दावे क्रिकेट रसिकांनी सोशल मीडियावर केले.
वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील दूरान्वये संबंध नसलेल्या गोष्टींचा परस्परांशी संबंध जोडण्याची लोकांची सामुदायिक मानसिकता अनेकदा सेलिब्रिटींसाठी कसे मानहानीकारक ठरते हे या निमित्ताने पुन्हा निदर्शनास आले.
============================================
पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाक समितीचा तपास
पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानमधून आलेल्या पाच सदस्यीय संयुक्त तपास समितीने आज (सोमवार) राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांची भेट घेतली.
एनआयएने या प्रकरणी चौकशी केलेल्या सलविंदर सिंग या पंजाब पोलिस दलामधील अधिकाऱ्याने केलेल्या; वा घेतलेल्या दुरध्वनींची माहिती या समितीने मागविली आहे. याचबरोबर, सिंग यांच्या कुटूंबीयांच्या दुरध्वनीसंदर्भातही या समितीने माहिती मागितली आहे. पठाणकोट हवाई तळाच्या कमांडरची चौकशी करु द्यावी, अशी विनंतीही या समितीने केली आहे. या हल्ल्यात ठार करण्यात दहशतवाद्यांच्या शवविच्छेदन व डीएनए अहवालांबरोबरच त्यांनी वापरलेल्या मोबाईल फोन्ससंदर्भातील माहितीही या समितीने मागविली आहे. मात्र या प्रकरणी दाखल झालेल्या प्राथमिक चौकशी अहवालानंतर हे मोबाईल फोन्स पाक समितीच्या स्वाधीन करणे "अवघड‘ असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
या प्रकरणी दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर व सीसीटीव्ही फुटेजही तपासण्याची आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे. पठाणकोट भागात तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांची निवेदनेही नोंदविण्याची आवश्यकता असल्याची समितीची भूमिका आहे. पाक अधिकाऱ्यांची ही समिती उद्या (मंगळवार) पठाणकोटला भेट देणार आहे. जैश-इ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर गेल्या 2 जानेवारी रोजी हल्ला चढविला होता.

जेएनयुमध्ये आता "जश्न-इ-आझादी'चे आयोजन
नवी दिल्ली - संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफझल गुरु याच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या वादळी कार्यक्रमानंतर जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयु) आता "जश्न-इ-आझादी‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. इतिहासकार बिपीन चंद्र यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमामध्ये चंद्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधील वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी प्रतिथयश वक्ते येणार आहेत.
याचबरोबर, जेएनयुमधील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार, उमर खलिद आणि अनिरुद्ध भट्टाचार्य हे विद्यार्थी नेतेही जेएनयुमध्ये गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांबद्दल मतप्रदर्शन करणार आहेत.

कन्हैय्या याने जेएनयुच्या आवारात परतल्यानंतर केलेल्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठामध्ये समाजामधील गरिबी, भ्रष्टाचार आणि हुंडा यांसारख्या समस्या व कुप्रथांपासून स्वातंत्र्य (आझादी) मिळविण्यासंदर्भातील संकल्पना लोकप्रिय झाली आहे. याआधी, विद्यापीठामध्ये राष्ट्रवाद या संकल्पनेवर आधारित दीर्घ चर्चासत्र घेण्यात आले होते. त्यामध्ये प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्यासहित अनेक वक्ते सहभागी झाले होते. तेव्हा आता विद्यापीठात "जश्न-इ-आझादी‘ हे चर्चासत्र घेण्यात येणार आहे.
दरम्यान, जेनयुमधील कार्यक्रमामध्ये राष्ट्रद्रोही घोषणा देण्यात आल्याच्या प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने कन्हैय्या कुमार याची हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे. खलिद व भट्टाचार्य यांचीही हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.

मद्यधुंद डॉक्टरने 6 जणांना उडविले; एकाचा मृत्यू
बंगळूर- मर्सिडीज मोटार चालविणाऱ्या मद्यधुंद डॉक्टरने सहा जणांना उडविले. यामध्ये एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डॉ. एन. एस. शंकर हे आपल्या मर्सिडीज या मोटारीमधून प्रवास करत होते. यावेळी मोटारीमध्ये त्यांची मुलगीही होती. वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन किलोमीटरच्या अंतरादरम्यान सहा वाहनांना ठोकरले. यावेळी झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. मोटार एका घराच्या भिंतीला जाऊन आदळल्यानंतर थांबली. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.‘
‘मोटार थांबल्यानंतर नागरिकांनी शंकर यांना बेदम मारहाण केली. त्यांनी मद्यसेवन केल्याचे आढळून आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर शंकर यांची नागरिकांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. शंकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे,‘ असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, शंकर यांनी मद्यसेवन केले नव्हते. मोटार चालविताना त्यांना ‘फिट‘ आल्यामुळे मोटारीवरील नियंत्रण सुटले, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

आई, अभिषेकी बुवांना पुरस्कार अर्पण-महेश काळे

पुणे - कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गायनासाठी आज (सोमवार) जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार मी माझी आई आणि अभिषेकी बुवा यांना अर्पण करत असल्याचे, पार्श्वगायक महेश काळे यांनी सांगितले.
दिल्लीत आज 63 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर महेश काळे यांनी ‘सकाळ‘च्या वार्ताहारांशी संवाद साधला.
महेश काळे म्हणाले की, माझी आई आणि अभिषेकी बुवा आज देहस्वरूपात असते, तर धावत जाऊन त्यांना भेटलो असतो. त्यांच्याशी ही बातमी शेअर केली असती. आज त्या दोघांची खूप आठवण येत आहे. त्यांच्या आशीर्वादाचा स्पर्श सतत माझ्या गाण्याला होता, आहे आणि राहील. ‘कट्यार‘ च्या टीमला याआधीच रसिकांच्या अलोट प्रेमाचा पुरस्कार मिळाला होताच. आज त्याच्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली. खूप आनंद वाटतोय. शास्त्रीय संगीत हे क्लासेसच नव्हे, तर मासेससाठीही आहे, हा पायंडा कट्यारने पाडला. हा राष्ट्रीय पुरस्कार या प्रयत्नांना मिळालेली पावतीच आहे. आपले गाणे स्वतःचे न राहता लोकांचे झाले, याहून अधिक आनंदाच काय बरे असेल. कलेला हवा राजाश्रय आणि लोकाश्रयही! मला, आम्हाला तो मिळाला. हा पुरस्कार माझ्या पाठीवर पडलेली या सर्वांची प्रेमळ थाप आहे. आता जबाबदारी वाढणार आहे. माझ्या मायदेशाने डोक्यावर ठेवलेला हा आशीर्वाद आहे. नवी संधी माझ्यापुढे उभी आहे आणि नव्या प्रयोगांसाठी मी मनापासून सज्ज आहे. शक्य तेवढा अधिक काळ भारतात घालवणार. माझं गाणं जिथे, तिथे मी!
============================================
अफगाणिस्तानच्या संसदेवर डागले क्षेपणास्त्र
काबूल - अफगाणिस्तानच्या संसदेच्या नव्या इमारतीवर आज (सोमवार) क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे वृत्त आहे. भारताच्या आर्थिक पाठबळावर बांधण्यात आलेल्या या संसदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत गेल्या डिसेंबर महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते.
अफगाणिस्तानमधील खासदारांशी चर्चा करण्यासाठी सुरक्षा दलाचे अधिकारी या इमारतीमध्ये प्रवेश करत असताना हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यामुळे जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप नाही. तसेच या हल्ल्याची जबाबदारी अद्यापी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. अफगाणिस्तानमधील सर्व भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची माहिती येथील भारतीय दूतावासाकडून या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे.
गेल्या दशकभरापेक्षा जास्त काळापासून हिंसाचार व अस्थिरतेच्या गर्तेत सापडलेल्या अशांत अफगाणिस्तानमधील राजकीय परिस्थिती भारताच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असून या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील राजकीय प्रभाव अधिकाधिक वाढविण्याच्या प्रयत्नांत भारतीय नेतृत्व आहे. भारताने अफगाणिस्तानमध्ये विविध मदतकार्ये व संरचनात्मक कार्यांसाठी सुमारे 2 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे आश्वासन दिले आहे.

नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यातील पोलीस भारती २९ मार्चपासून

No comments:
Post a Comment