Saturday, 26 March 2016

नमस्कार लाईव्ह २६-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक 
२- बगदाद; इराकमध्ये फुटबॉल सामन्यात आत्मघातकी स्फोट, 30 ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- हाफिजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता : हेडली
४- भारतीय ख्रिश्चन धर्मगुरू टॉम उझहन्नलिल यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न 
५- पठाणकोट हल्ला तपासासाठी पाकिस्तान पथकाला मिळाला 7 दिवसांचा व्हिसा 
६- ...तर भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले असते - कपिल मिश्रा, आम आदमी पक्ष 
७- राजस्थान; अपुरी कागदपत्रे; 35 पाक नागरिक ताब्यात 
८- मोदींच्या मुंबईतील सभेसाठी 3 कोटींवर खर्च! 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण 
१०- मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण 
११- स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिग्विजय यांचं राजकारण: अमृता फडणवीस 
१२- मुंबई; पहिल्यांदा विमान प्रवासातच पेटवली विडी; थेट पोलिसात रवानगी 
१३- एक्साईज ड्युटी रद्द करा, सराफांचा केंद्राला 24 तासांचा अल्टिमेटम 
१४- सहकारी महिलेचा विनयभंग, भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाचा राजीनामा 
१५- कानपूर; उत्तर प्रदेश: भीषण आगीत बालक ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- तिरुअनंतपुरम; श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला 
१७- जालना; कीर्तनाच्या महाप्रसादातून 90 भाविकांना विषबाधा
१८- कोलकाता; अल्पवयीन व्हॉलीबॉल खेळाडूची चाकूने वार करुन हत्या 
१९- मुंबई; मोलकरणीने केला मालकाचा विश्वासघात 
२०- साक्री तालुक्यात विवाह सोहळेही आता विकतच्या पाण्यावर 
२१- कापडणे; नोकरी सोडून पुतळे बनविण्याचा छंद तर नोकरीवालाच्या प्रतीक्षेत कन्या तिशीकडे
२२- जत; पाण्याच्या शोधात अनेक ‘लक्ष्मण’ घायाळ 
२३- वावी; ड्रम, बाटल्यांपासून बनविली चिमण्यांसाठी घरटी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- शाहिद आफ्रिदीचा रडीचा डाव सुरुच 
२५- वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२६- 'लोकमत आयकॉन पुरस्कार' फ्लॉवर एन फ्लॉवरचे संचालक श्रीकांत बाहेती यांना जाहीर; सायंकाळच्या बातमीपत्रात विशेष मुलाखत ]
२७- इसापूर धरणाचे 0.८ दलघमी पाणी 'आसना'मध्ये पोहचले 
२८- बाभळी बंधार्यापर्यंत पाणी सोडण्यास धर्माबादकरांचा एल्गार; रस्ता-रोको व बंदचे आवाहन 
२९- नांदेड-लोहा रोडवर दोन भीषण अपघातात पाचजन ठार 
३०- दीपनगर तरोडा [बु.] येथे आज धम्ममेळाव्याचे आयोजन 
३१- अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या मुलाच्या आईस पोलीस कोठडी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हृदयात नेहमीच परोपकाराची भावना बाळगतात. त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
(विठ्ठल वानखेडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनीषा ढोले, दत्तराव मोहित्ते, अमरीन शेख, कल्पेश ठाकूर, बालाजी शिंदे, दीपक मोहिते, गंगाराम पानपट्टे, अझहर इनामदार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 


==============================================

शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण



शिवसेना आमदाराकडून चवदार तळ्याचं शुद्धीकरण?
मुंबई : तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, य़ुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विमानतळावर शिवशाहीचा थाट उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर गडकिल्ल्यांची प्रतिकृती, ढोलताशे, तुताऱ्या, मावळ्यांच्या वेशातील शिवसैनिक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष जमले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर शिवजयंतीनिमित्त शिवशाही अवतरल्याचं चित्र आहे.
==============================================

मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण

मुंबई विमानतळाजवळ शिवशाही, शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
शिवसेना विभागप्रमुख अ‍ॅड. अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला जाणार आहे.
मुंबई : तिथीनुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, य़ुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विमानतळावर शिवशाहीचा थाट उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्यासमोर गडकिल्ल्यांची प्रतिकृती, ढोलताशे, तुताऱ्या, मावळ्यांच्या वेशातील शिवसैनिक, पारंपरिक वेशातील महिला-पुरुष जमले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर शिवजयंतीनिमित्त शिवशाही अवतरल्याचं चित्र आहे.
==============================================

हाफिजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता : हेडली

हाफिजला बाळासाहेबांना धडा शिकवायचा होता : हेडली
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना हाफिज सईद धडा शिकवणार होता, त्यामुळेच मी ‘मातोश्री’ची रेकी केली, शिवसेना भवन परिसराची चित्रफितही काढली, अशी खळबळजनक माहिती आज दहशतवादी डेव्हिड हेडली उर्फ दाऊद सय्यद गिलानीनं कोर्टात दिली.

मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माईंड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उलट तपासणी सुरु आहे. यावेळी हेडलीने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.

‘मातोश्री’ची रेकी
“हेडलीने यावेळी ‘मातोश्री’ या शिवसेनाप्रमुखांच्या निवासस्थानाची रेकी केल्याचं सांगितलं. हाफिज सईदला बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवायचा होता, त्याचसाठी मातोश्रीची  रेकी केली होती. बाळासाहेब ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी मला 6 महिन्यांचा वेळ द्या,असं आश्वासनही मी हाफिज सईदला दिलं होतं”, असं डेव्हिड हडेलीनं आज कोर्टात सांगितलं.
==============================================

शाहिद आफ्रिदीचा रडीचा डाव सुरुच

शाहिद आफ्रिदीचा रडीचा डाव सुरुच
मोहाली : बीसीसीआयनं फटकारल्यावरही पाकिस्तानच्या ट्वेन्टी20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी वादग्रस्त विधानं करण्यापासून थांबलेला नाही. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यानंतर बोलताना आफ्रिदीनं पुन्हा काश्मिरचा उल्लेख केला.

पीसीए स्टेडियमवरील या सामन्यात पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं पाकिस्तानचं या स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं.

या सामन्यानंतर पारितोषिक वितरणाच्या वेळेस आफ्रिदीनं बीसीसीआय आणि कोलकात्याच्या क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. त्यानंतर मोहालीत पाकिस्तान आणि काश्मीरमधून आलेल्या चाहत्यांचेही मी आभार मानतो असं सूचक वक्तव्य केलं.

याआधी 22 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध लढतीआधीही आफ्रिदीनं हीच आगळीक केली होती. त्यावर बीसीसीआयनं नाराजी व्यक्त केली होती.
==============================================

श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला 

श्रीशांत भाजपत डेरेदाखल, मतदारसंघही ठरला !
तिरुअनंतपूरम : आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली जेलची हवा खाऊन आलेला क्रिकेटपटू एस.श्रीशांतने अखेर राजकारणात प्रवेश केला आहे. श्रीशांत भाजपमध्ये डेरेदाखल झाला असून, त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचीही घोषणा  केली आहे.

आगामी केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीशांत भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीसाठी भाजपने श्रीशांतला उमेदवारी देण्याचं जाहीर केलं आहे. श्रीशांत तिरुअनंतपूरममधून निवडणूक लढवणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच श्रीशांत भाजपामध्ये प्रवेश करेल, अशी चर्चा होती.  त्या वृत्ताला आता दुजोरा मिळाला आहे.

केरळमध्ये भाजप संघटन कमकुवत आहे.  त्यामुळे या उमेदवारीनं काय फायदा होतो, हे वेळचं सांगणार आहे.

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी एस श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यास आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू , केरळ, पद्दुचेरीचा समावेश आहे. त्यामुळे भाजपनं आता मोर्चेबांधणीसाठी सुरूवात केली आहे.
==============================================

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक
मुंबई : हेरगिरीच्या संशयावरुन भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात अटक झाली आहे. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले असून जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला आहे.’ माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो.  ‘

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले यांना दिलेल्या डोसियरमध्ये जाधव यांचा पासपोर्ट दिला आहे. त्यावर त्यांचं नाव हस्नेन मुबारक पटेल असं लिहिलं असून इराणमार्गे ते पाकिस्तानात घुसल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, भारताला पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये रस नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी स्पष्ट केलं आहे.
==============================================

स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिग्विजय यांचं राजकारण: अमृता फडणवीस

स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून दिग्विजय यांचं राजकारण: अमृता फडणवीस
मुंबई: ‘अॅक्सिस बँकेवरुन दिग्विजय सिंह यांनी केलेलं राजकारण म्हणजे स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारलेली गोळी आहे.’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिग्विजय सिंहांवर टीकास्त्र सोडलं आहे.

एसआरएच्या बँक अकाऊंट संदर्भात जो निर्णय घेतला तो वरळी ब्रांचनं घेतला. मी लोअर परेलच्या शाखेत काम करते. त्यामुळे त्याचा काहीही संबंध नाही. असंही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंहांनी ट्विटवरुन फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते.

‘मिसेस फडणवीस या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा आहेत. अॅक्सिस बँकेसारख्या प्रायव्हेट बँकेला अचानक मोठा आर्थिक लाभ झाला. ही तर वशिलेबाजीची हद्द आहे.’ असं म्हणत दिग्विजय सिंहांनी देवेंद्र फडणवीसांवर ट्टिटवरुन हल्ला केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिग्विजय सिंहांना कायदेशीर नोटीसही बजावली आहे.
==============================================

पहिल्यांदा विमान प्रवासातच पेटवली विडी; थेट पोलिसात रवानगी

पहिल्यांदा विमान प्रवासातच पेटवली विडी; थेट पोलिसात रवानगी
प्रातिनिधिक फोटो
मुंबई: दिल्ली-मुंबई असा विमान प्रवास करणाऱ्या एका 58 वर्षीय इसमानं विमानाच्या प्रसाधनगृहातच विडी पेटवल्याची घटना घडली आहे. धूरामुळं तात्काळ ही घटना वैमानिकाच्या लक्षात आली आणि त्यानं क्रू मेंबरला याबाबत माहिती दिली.

पहिल्यादाच विमान प्रवास करणाऱ्या भाईंदरच्या विनोद कुमारनं विमानातील प्रसाधनगृहात जाऊन विडी पेटवली. मात्र, फायर अलार्म सिस्टीममुळे ही घटना तात्काळ लक्षात आल्यानं क्रू मेंबरनं त्याला बाहेर येण्यास भाग पाडलं.

विमान मुंबईत लॅण्ड होताच विनोद कुमारला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याच्याविरोधात गुन्हाही नोंदविण्यात आला. तसंच दोनशे रुपये त्याला दंडही ठोठवण्यात आला.

आपण पहिल्यांदाच विमान प्रवास करीत असल्यानं आपल्याला याबाबत काहीही माहिती नव्हती असं त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं.
==============================================

इराकमध्ये फुटबॉल सामन्यात आत्मघातकी स्फोट, 30 ठार

इराकमध्ये फुटबॉल सामन्यात आत्मघातकी स्फोट, 30 ठार
बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये एका फुटबॉल सामन्यावेळी आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला बॉम्बनं उडवून घेतलं. या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 65 प्रेक्षक जखमी झाले आहेत.
आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पोलीस अधिकारी अल असरिया यांच्या माहितीनुसार विजेत्या संघाला ट्रॉफी देत असताना हल्लेखोर गर्दीत उभा होता. त्यावेळी त्याने स्वतःला उडवून घेतलं.
बगदादच्या सिकंदरिया शहरात ही घटना घडली. या हल्ल्यात शहराचे महापौरही ठार झाले आहेत.
==============================================

जालन्यात कीर्तनाच्या महाप्रसादातून 90 भाविकांना विषबाधा

जालन्यात कीर्तनाच्या महाप्रसादातून 90 भाविकांना विषबाधा
जालना : जालन्यात कीर्तनाच्या प्रसादातून 90 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील सेवगावमध्ये महाप्रसादाच्यावेळी हा प्रकार घडला.

तुकाराम बीज कार्यक्रमानिमित्त सेवगावमध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसाद खाल्ल्यानंतर भाविकांना त्रास व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी तात्काळ सर्व भाविकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

काही जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत
==============================================

एक्साईज ड्युटी रद्द करा, सराफांचा केंद्राला 24 तासांचा अल्टिमेटम

एक्साईज ड्युटी रद्द करा, सराफांचा केंद्राला 24 तासांचा अल्टिमेटम
मुंबई : सराफांच्या 12 कोटींपेक्षा अधिल उलाढालीवर केंद्रानं लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी म्हणून सराफ व्यापारी आक्रमक झाल्याचं दिसत आहे. सराफांनी केंद्र सरकारला एक्साईज ड्युटी रद्द करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

3 लाख सराफ व्यापारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. आता सराफांच्या या पवित्र्यानंतर केंद्र सरकार झुकणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

वाढीव एक्साईज ड्युटीसंदर्भात मुंबई सराफा असोसिएशनच्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी “सणासुदीच्या काळातही दुकानं बंद ठेवा आणि सरकारला वठणीवर आणा. कारण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही”, असा सल्ला राज ठाकरेंनी सराफांना दिला.

जगभरातल्या मोठया व्यापाऱ्यांना पुढे आणण्यासाठी सरकारने एक्साईज ड्युटी वाढवल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. यावेळी सराफांनीही भाजपला मतदान करुन चूक केल्याचं सांगत ज्वेलर्स संघटनेनं ‘हमारी भूल कमल का फूल’ अशा घोषणा दिल्या.

यंदाच्या बजेटमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर वाढीव एक टक्का एक्साईज ड्युटी लावण्यात आली आहे. त्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून सराफा व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र सरकार त्यावर काहीच तोडगा काढत नसल्यानं आता सराफांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
==============================================

सहकारी महिलेचा विनयभंग, भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाचा राजीनामा

सहकारी महिलेचा विनयभंग, भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाचा राजीनामा
मुंबई : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आहे. पीडित तरुणीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली. ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात हे पत्र छापून आलं आहे. मला राजकीय षडयंत्रात गोवलं गेल्याचा दावा गणेश पांडे यांनी केला आहे.

गणेश पांडे या भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचं पीडितेनं सांगितलं.

4 मार्चच्या रात्री पांडेनं वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावलं आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केलं, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर ती तिथून निघालो असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे.

दरम्यान याप्रकरणी पीडितेनं कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नसून पक्षानं केलेली कारवाई पुरेशी असल्याचं म्हटलं आहे.
==============================================

भारतीय ख्रिश्चन धर्मगुरू टॉम उझहन्नलिल यांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न


  • नवी दिल्ली, दि. २६ - येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्याच्या माहितीला केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दुजोरा दिला आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. केरळमधील भारतीय नागरिक टॉम उझहन्नलिल यांचे येमेनमध्ये दहशतवादी संघटनेने अपहरण केलं आहे, भारत सरकार त्यांच्या सुटकेसाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याची माहितीदेखील सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 
    भारतीय वंशाचे ख्रिश्चन धर्मगुरू (पाद्री) टॉम उझहन्नलिल यांची कुख्यात दहशतवादी संघटना इसिस ( इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) 'गुड फ्रायडे'च्याच दिवशी हत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती. येमेनमध्ये राहणा-या ५६ वर्षीय टॉम उझहन्नलिल यांचे ४ मार्च रोजी अपहरण करण्यात आले आहे. आणि टॉम याच्या अपहरणांतर अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी सोशल मीडियावर त्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. 
    मार्च महिन्यात इसिसने येमेनमधील वृद्धाश्रमावर हल्ला करून ४ नन्ससह १६ जणांची हत्या केली होती व त्याचवेळी टॉम यू यांचे अपहरण केले होते. त्यानंतर टॉम यू यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी काही नन्सनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक मेसेज अपलोड केला होता, ज्यात टॉम यांना टॉर्चर करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याचे नमूद करण्यात आले होते. तसेच 'गुड फ्रायडे'ला त्यांची हत्या करण्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती.
==============================================

पठाणकोट हल्ला तपासासाठी पाकिस्तान पथकाला मिळाला 7 दिवसांचा व्हिसा


  • नवी दिल्ली, दि. २६ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी येणा-या पाकिस्तान तपास पथकाला 7 दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे. रविवारी हे पथक भारतात दाखल होणार आहे. पाकिस्तान तपास पथकाच्या मदतीने दहशतवाही हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यास मदत होईल अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) अपेक्षा आहे. 
    पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.
    इस्लामाबाद आपल्याकडे असेलली माहिती पुरवेल तसंच हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांची आणि जैश-ए-मोहम्मदच्या सहभागी दहशतवाद्यांची ओळख पटवण्यास मदत करेल अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेला आशा आहे. गेल्या आठवड्यात एनआयएने हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आपल्या वेबसाईटवर टाकत लोकांना पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले होते. माहिती देणा-यास एक लाखांचे बक्षीसदेखील जाहीर करण्यात आले होते. 
    पंजाब पोलीस महानिरीक्षक सलविंदर सिंग यांची नव्याने पुन्हा चौकशी करण्यात येणार असून एनआयएने शुक्रवारी समन्स पाठवले आहे. पाकिस्तान तपास पथकाच्या समोर एनआयए पुन्हा एकदा चौकशी करणार आहे.
==============================================

अल्पवयीन व्हॉलीबॉल खेळाडूची चाकूने वार करुन हत्या

  • कोलकाता, दि. २६ - बरसात येथे अल्पवयीन मुलीची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली आहे. आपल्या मैत्रिणींसोबत व्हॉलीबॉल खेळत असताना तरुणाने चाकूने वार करुन हत्या केली आहे. संगिता असं या पिडीत मुलीचं नाव असून ती एक व्हॉलीबॉल खेळाडू होती. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याची पोलिसांना शंका आहे. आरोपी सध्या फरार आहे. 
    आऱोपी सुब्रताने संगिताला प्रपोज केला होता मात्र संगीताने त्याला नकार दिला होता. संगिताची मॅच असल्याने ती मैदानावर प्रॅक्टीस करत होती. त्यावेळी सुब्रता तिथे आला आणि चाकूने वार करुन संगिताची हत्या केली. मी जेव्हा सुब्रताला चाकू घेऊन संगीताच्या दिशेने जाताना पाहिले तेव्हा खुर्चीच्या सहाय्याने मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. संगीताला मी माझ्या मागे उभं केलं होतं जेणेकरुन तिला वाचवता येईल. संगीताचं घर जवळच असल्याने घऱी जाण्याच्या हेतून संगीतने तेथून पळ काढला आणि सुब्रताने तिचा पाठलाग करत तिच्यावर वार केले अशी माहिती कोच स्वपन दास यांनी दिली आहे. 
    मैदानावर हजर असलेल्या इतर मुली ही घटना पाहून बेशुद्ध पडल्या. स्थानिकदेखील घाबरले असल्याने कोणीही आरोपी सुब्रताला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. संगीताला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. हत्येचं नेमकं कारण पोलिसांना कळू शकलेलं नाही मात्र एकतर्फी प्रेमातूनच ही हत्या झाल्याची पोलिसांना शंका आहे. 
    संगीताच्या कुटुंबियांनी याअगोदरही सुब्रताने संगीताला धमकावल्याचं सांगितलं आहे. पोलिसांकडे तक्रार करुनही पोलिसांनी लक्ष न दिल्याचा आऱोपही त्यांनी केला आहे. पोलिसांनी फेसबुकवरुन आरोपी सुब्रताचा फोटो मिळवला असून सध्या त्याचा शोध सुरु आहे.
==============================================

मोलकरणीने केला मालकाचा विश्वासघात

  • मुंबई : मोलकरणीला मुलीसमान समजून लाखोंची मालमत्ता तिच्या नावावर करण्याचा निर्णय एका जोडप्याने घेतला. त्याच मोलकरणीने पतीसोबत मिळून या घरावर डल्ला मारला आणि लाखोंचा ऐवज घेऊन ती फरार झाली. या प्रकरणी मालवणी पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बंगळुरूमधून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
    मालवणी चर्च परिसरात राहणाऱ्या मंजुळा भंडारी (५५) यांच्या घरी १३ मार्च रोजी हा प्रकार घडला. भंडारी यांचे पती पायाने अधू असल्याने त्यांना नीट चालता येत नाही. तसेच त्यांचा मुलगादेखील त्यांची देखरेख करत नसल्याने त्यांनी तीन महिन्यांपूर्वी रिया शेख नामक एका महिलेला घरी मोलकरीण म्हणून कामास ठेवले होते. रिया ही मूळची बंगळुरूची राहणारी असून तिने आसिफ शेख नावाच्या तरुणाशी लग्न केले आणि मुंबईला पळून आली. कामाच्या शोधात आलेल्या शेखला भंडारी यांनी आसरा दिला. तीन महिन्यांत शेखने भंडारी यांचा विश्वास संपादन केला. भंडारी आणि त्यांचे पती शेखवर डोळे झाकून विश्वास ठेवू लागले. दोघांनी चक्क त्यांची सर्व मालमत्ता शेखच्या नावावर करण्याचे ठरविले.
    शेखने असिफसोबत मिळून भंडारी यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा पाच लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या मालवणी पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला असता, ते दोघे बंगळुरूला पसार झाल्याचे एका ट्रॅव्हल एजंटकडून त्यांना समजले. त्यानुसार मालवणी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आणि त्यांनी या दोघांनाही ताब्यात घेतले. चोरीला गेलेला ऐवजही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्यांनी असा काही प्रकार अन्य ठिकाणीदेखील केला आहे का, याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत
==============================================
विवाह सोहळेही आता विकतच्या पाण्यावर
टंचाईचा सर्वाधिक फटका - खर्चात भरच, टॅंकरशिवाय पर्याय नाही 

म्हसदी - साक्री तालुक्‍यात पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. आजमितीस किमान नव्वद टक्के गावांत हा प्रश्‍न गंभीर आहे. घरगुती वापर किंवा पिण्याच्या पाण्यासाठी लढाई आहे, तिथे लग्न समारंभांचे काय ? असे म्हणत जवळपास प्रत्येक लग्नात विकतचे पाणी आणावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून लग्न तुमच्याकडे ठेवा, अशी विनवणी केली जात आहे. एकूणच दुष्काळ आणि पाणीटंचाईने समाजजीवनावर असे वेगवेगळे परिणाम होऊ लागले आहेत. 



साक्री तालुक्‍यात यंदा जानेवारीपासून पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. शेती व्यवसायासह अन्न व्यवसायात मंदीचे सावट आहे. त्यामुळे विवाह जमल्यावर पहिली चिंता भेडसावते ती पाण्याची. दुसरीकडे लग्न म्हणजे वर- वधू पित्याची धावपळ सुरू होते. सर्व बाबींची जुळवाजुळव करावी लागते. वाजंत्री, मंडप, घोडा याच्या तारखा दिल्या जातात. तशी आता पाण्याचीही ऑर्डर दिली जाते. 

लग्न म्हणजे यमजानाला तीन दिवस आधीपासून पाण्याची तरतूद करावी लागते. बेहेड, विराई, निळगव्हाण आदी गावात पावसाळ्यात देखील पाणी समस्या असते. या गावात लग्न किंवा अन्य कार्यक्रमांसाठी टॅंकर मधून पाणी आणल्याशिवाय पर्याय नसतो. बहुतेक ठिकाणी थंड पाण्याचे जार आणावे लागतात. तालुक्‍यात अपवादात्मक गावे सोडली तर अन्य गावांमध्ये पाणी समस्या आहेच. त्यामुळे लग्नविधीसारखे कार्यक्रम कसे पार पाडावेत असा प्रश्‍न ग्रामस्थांना पडत आहे. या समस्येने बहुतांश पालकांनी धसका घेतला आहे. 

पाणीप्रश्‍नी आता वरपित्यांना देखील तडजोड करावी लागत आहे. मुलाचे लग्न व्हावे म्हणून वरपिता देखील घरी लग्न ठेवू लागले आहेत. काहींनी पाण्याच्या समस्येमुळे जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुलामुलींचे साखरपुडा, जागरण गोंधळ, लग्न समारंभही उरकून घेतले आहेत. ज्यांची व्हायची आहेत अशांना पाणी समस्येची काळजी वाटत आहे.
==============================================
नोकरी सोडून पुतळे बनविण्याचा छंद!

कापडणे - किशोर सोनवणे हा तिशीतील युवक, जी.डी.आर्टची पदविका पूर्ण करून नोकरी करीत असताना मूर्तिकार असलेले वडील अचानक कोमात गेले. नोकरी सोडून त्यांच्या सेवेसाठी तो घरी आला. त्यांचे अपूर्ण काम सुरू केले. पाहता पाहता छंद जळला. मूर्तीपासून सुरवात केली, अवघ्या वर्षभरात भव्यदिव्य पुतळे बनवू लागला. कसमा पट्यासह खानदेशातही मागणी वाढली. किशोरचे वैशिष्ट म्हणजे आतापर्यंत त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे व मूर्तीही सर्वाधिक बनविल्या आहेत. अश्‍वारूढ, सिंहासनाधिष्टीत, तलवार बाजीचे आदी पुतळे बनविण्यात किशोर माहिर आहे.

किशोर सोनवणे बागलाण तालुक्‍यातील अजमेर सौंदाणे येथील आहेत. रात्रंदिवस केवळ महान नेत्यांच्या मूर्ती आणि पुतळे बनविण्यात हात गुंतलेले असतात. वयाच्या तिशीत उत्तर महाराष्ट्रात त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

किशोरला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे बनवायचा छंद आहे. आतापर्यंत त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले आदींचे पुतळे बनविले आहेत. राज्यासह बाहेरीलही विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. यात मेघदूत, टेम्पल वे आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

सौंदाणे येथे पुतळा तयार करून घेण्यासाठी तर नागरिक येतातच, पण वर्षभर पुतळे पाहण्यासाठीही तरुण मंडळींची गर्दी असते. इको फ्रेंडली गणपतीचे प्रात्यक्षिक दरवर्षी विविध शाळांवर ते करतात.
==============================================
'...तर भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले असते
नवी दिल्ली - जर क्रांतीकारक भगतसिंग आज जिवंत असते तर त्यांनी संसदेवर दोन-चार बॉम्ब फेकले असते, असे खळबळजनक विधान दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते कपिल मिश्रा यांनी केले आहे. 

‘आज देशाची स्थिती पाहता क्रांतीकारकांना अद्यापही संघर्ष करावाच लागला असता. जर आज भगतसिंग जिवंत असते तर त्यांनी संसदेतील रिकाम्या बाकड्यांवर दोन-चार बॉम्ब फेकले असते. तसेच महात्मा गांधी यांनाही सत्याग्रहाची चळवळ सुरू ठेवावी लागली असती‘, असे वक्तव्य मिश्रा यांनी केले. तसेच ‘जर पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी ‘भारतमाता की जय‘ म्हटले नाही तरीही भारतीय जनता पक्ष त्यांच्या पक्षासोबत जम्मू-काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापन करणार का?‘ असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.
==============================================
नोकरीवालाच्या प्रतीक्षेत कन्या तिशीकडे
ग्रामीण भागातील स्थिती - शेती, खासगी नोकरीवाल्या मुलांचीही तीच गत

कापडणे - घर पाहावे बघून आणि लग्न करावे बघून हे काही खोटे नाही याची प्रचिती सध्या ग्रामीण भागात येत आहे. नोकरीवालाच नवरा हवा या इच्छेमुळे अनेक कन्या तिशीला पोहोचल्या आहेत. वडिलांना ती चिंता सतावत असताना दुसरीकडे बेरोजगार मुलांचे वयही वाढत चालले आहे. त्यांनाही मुली मिळत नसल्याने विवाह जमणे कठीण झाले आहे.

एकूणच बदलत्या स्थितीशी जुळवून न घेतल्याने ग्रामीण भागात विवाह संस्थेबद्दल अनेक नवे प्रश्‍न निर्माण होत आहेत. शक्‍यतो नोकरीवाला जावई हवा असा सगळ्यांचाच आग्रह, त्यात गैरही नाही, पण सगळ्यांनाच नोकरी असलेला मुलगा मिळेल याचीही खात्री नाही. मिळालाच तर तो कंपनीत नोकरीला असतो. त्यालाही नाइलाजाने शेवटच्या क्षणी पसंती दिले जाते. या स्थितीत मुलींचे वय तिशीला पोहोचत आहे. त्यामुळे उपवर मुलगी हेही आई-वडिलांच्या चिंतेच कारण बनले आहे. मुलीचे वय पंचविशी-तिशी पार केल्यास अशांचे विवाह जमण्यात पुढे अनेक अडचणी येतात अन्‌ कुटुंबसंस्थेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. उशिरा विवाह अन्‌ उशिरा मुले-मुली हाही नंतरचा प्रश्‍न असतोच.
==============================================
अपुरी कागदपत्रे; 35 पाक नागरिक ताब्यात

जैसलमेर (राजस्थान) - पुरेशी कागदपत्रे नसतानाही राजस्थानमध्ये पोचलेल्या 25 पाकिस्तानी नागरिकांना राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 

पाकिस्तानमधील काही नागरिक मथुरा आणि हरिद्वारला धार्मिक उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी भारतात दाखल झाले होते. त्यांच्याकडे केवळ उत्तराखंडमधील हरिद्वार आणि उत्तर प्रदेशमधील काही धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठीचा व्हिसा होता. मात्र ते शुक्रवारी रात्री जोधपूरमधून एका खाजगी बसने राजस्थानमधील रामदेवरा येथे पोहोचले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या सर्व नागरिकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व नागरिक पाकिस्तानमधील मीरपूर, अमरकोट, थारपारकर आदी जिल्ह्यांमधील भारतात आले होते.
==============================================
उत्तर प्रदेश: भीषण आगीत बालक ठार

कानपूर (उत्तर प्रदेश) - येथील परादे बाजार परिसरात आज (शनिवार) पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका बालकाचा मृत्यू झाला आहे. 
आज पहाटे परादे बाजारातील 100 दुकानांना भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान आग लागल्यावर काही वेळातच अग्निशामक दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळलेले नाही. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. घटनास्थळी पोलिसही दाखल झाले असून आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.
==============================================
पाण्याच्या शोधात अनेक ‘लक्ष्मण’ घायाळ
चिमुरड्यांची पायपीट - वाड्यावस्त्यांवरही टंचाई उग्र
जत - त्या लहानग्यांचं वय तसं चिरमुरे लाडू खाण्याचं...खेळण्या-बागडण्याचं; पण दुष्काळानं ते हिरावून घेतलंय. हाती घागर...पाण्यासाठी मैलोन्‌ मैल पायपीट. हा त्यांचा दिनक्रम बनलाय. दोन दिवसांपूर्वी दगडाधोंड्यातून पाणी आणताना सायकल दगडावरून घसरली अन्‌ डोकं फुटलं...रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्या...तरीही डोक्‍याला पट्टी करून तो पाण्यासाठी धावत होता. अनेक दुष्काळी गावांनी अशा लक्ष्मणला जन्माला घातलयं. संखच्या वाड्यावस्त्यांवर नजरेला पडलेली ही मुले. पाण्याच्या शोधात असे अनेक लक्ष्मण घायाळ होताहेत.
संखच्या वाड्यावस्त्यांवर पाणी टंचाई उग्र बनली आहे. पाण्यासाठी चार पाच किलोमीटरची पायपीट ठरलेली. आई-वडील मजुरीला, घरातील मोठी माणसं कामाला गेली, की भर उन्हात पाण्यासाठी धावणारी शाळकरी मुले नजरेला पडतात. गावाकडे जाताना सहावीत शिकणारी लक्ष्मण, मुक्‍ताबाई ही भावंडं पाण्यासाठी सायकलीवरून जात होती. दगडधोंड्यातून पळणारी सायकल पंक्‍चर होईल या भीतीनं हवा मारण्याचा पंप देखील बरोबर. लक्ष्मण डोक्‍याला पट्टी बांधलेली दिसल्याने सहज चौकशी केली, तर टंचाईनं निर्माण केलेलं विदारक सत्य समजलं. 
==============================================
मोदींच्या मुंबईतील सभेसाठी 3 कोटींवर खर्च!
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 ऑक्‍टोबर 2015 रोजी मुंबईत झालेल्या सभेस 3 कोटी 36 लाख 81 हजार 388 रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. 

माहिती अधिकार विषयाचे कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या सभेच्या खर्चाबाबत माहिती अधिकारात प्रश्‍न विचारला होता. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मैदानात (एमएमआरडीए) मोदी यांची सभा झाली होती. या सभेसाठी एमएमआरडीएने जागा उपलब्ध करून दिल्याने त्यासाठी कोणताही खर्च झालेला नाही. मात्र, इतर सुविधांसाठी झालेल्या खर्चाची सविस्तर माहिती मिळाली आहे. ती खालीलप्रमाणे - 

  • मंडप उभारणी - 93 लाख 35 हजार 70 रुपये
  • खुर्च्या, बॅरिकेटस्‌, कारपेट, शौचालय, माईक, टेबल, सोफा, व्यासपीठ, फुलांची सजावट, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा - 1 कोटी 12 लाख 97 हजार 104 रुपये
  • सभेची जाहिरात - 20 लाख 85 हजार 647 रुपये;
  • कार्यक्रमाची माहिती देणारे 3000 पत्रके - 3 लाख 33 हजार 900 रुपये खर्च (प्रत्येक पत्रकाला 111 रुपये)
  • व्यासपीठावरील बोधचिन्ह, व्यासपीठामागील बॅनर्स, स्वागत कमान, दिशादर्शक आणि आभाराचे फलक आदी - 34 लाख 62 हजार 180
==============================================
ड्रम, बाटल्यांपासून बनविली चिमण्यांसाठी घरटी
वावी - उष्णतेचा तडाखा वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. अशा परिस्थितीत माणसे, जनावरे व पशूपक्षी यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. माणसे कसेतरी पाणी मिळवितात. परंतु, अबोल पक्ष्यांना पाणी व चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे पाथरे (ता. सिन्नर) येथील बाळासाहेब कुमावत या माध्यमिक शिक्षकाने टाकाऊ ड्रम, कॅन, बाटल्या यांचा वापर करून चिमण्यांसाठी वीसपेक्षा जास्त छोटी-छोटी घरटी बनविली आहेत. 

त्यांनी ही घरटी आपल्या घराशेजारील झाडे, गहिनीनाथ महाराजाचे मंदिर, शाळेचा परिसर त्याचबरोबर स्वत: कार्यरत असलेल्या देवपूर विद्यालयाच्या परिसरात लावली आहेत. या घरट्यांवर चिमण्यांची चित्रे लावून घरट्यांची आकर्षकता वाढविली आहे. घरट्यांमध्ये रोज पाणी व धान्य ठेवले जाते. त्यामुळे विसाव्यासाठी या घरट्यांकडे येणाऱ्या पक्ष्यांची तहान व भूक भागविली जाते. पत्नी प्रियंका यांच्या मदतीने श्री. कुमावत आपल्या घराच्या परिसरात लावलेल्या घरट्यांमध्ये रोज पाणी व धान्य ठेवतात, तर देवपूर येथील विद्यालयाच्या प्रांगणात ठेवलेल्या घरट्यांची जबाबदारी विद्यार्थी व शिक्षक पार पाडीत आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या घोषणांचे फलक या घरट्यांच्या शेजारी लावल्याने प्राणिमात्रांची काळजी करा, असा संदेश दिला जात आहे. या उपक्रमात त्यांना मुख्याध्यापक सुनील गडाख, पर्यवेक्षक परशराम रानडे आदींसह विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
मुक्‍या पक्ष्यांना थोडा वेळ विश्रांती घेता यावी, त्यांना पाणी व चारा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे सध्या दुर्मिळ झालेल्या पक्ष्यांचा चिवचिवाट या घरट्यांजवळ ऐकावयास मिळतो. याचा मोठा आनंद होतो. 
==============================================

वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत 


  • अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत माजी विजेत्या वेस्ट इंडिजने बलाढ्य द. आफ्रिकेला तीन गड्यांनी पराभूत करीत शुक्रवारी टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. उत्कृष्ट गोलंदाजी आणि शानदार क्षेत्ररक्षणाच्या बळावर द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांवर रोखल्यानंतर वेस्ट इंडिजने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ७ बाद १२३ धावा करीत गाठले.
    व्हीसीएच्या जामठास्थित खेळपट्टीवर विजयाचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचीही सुरुवातीला दमछाक झाली. ख्रिस गेल (४) आणि फ्लेचर(११) लवकर बाद होताच विंडीजची स्थिती २ बाद ३४ होती. मर्लोन सॅम्युअल्सने चिवट खेळी करीत सहा चौकारांसह ४४ चेंडूत सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सने दोन चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. विंडीजने १६ षटकांत ४ बाद ९९ धावा केल्या होत्या. १७ व्या षटकांत फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने सलग दोन चेंडूवर रसेल आणि कर्णधार सॅमी यांना बाद करीत आणखी चुरस निर्माण केली. पुढच्या षटकांत केवळ तीन धावा निघाल्याने विंडीजच्या गोटात खळबळ माजली. अखेरच्या दोन षटकांत २० धावांची गरज होती आणि सॅम्युअल्स खेळपट्टीवर होता. त्याने थर्डमॅनला दोन चौकार ठोकून सामना संपविण्याकडे वाटचाल केली. त्याच षटकांत डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला. अखेरच्या षटकात विंडीजला नऊ धावांचे आव्हान होते. रबाडाचा पहिला चेंडू ब्रेथवेटला निर्धावखेळला. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार खेचला. रबाडाने पुढचा चेंडू वाईड टाकल्यानंतर ब्रेथवेटने एक धाव घेतली. स्ट्राईक रामदीनकडे आला. त्याने मारलेला चेंडू अमलाच्या हाताला चाटून जाताच विंडीजचा विजय साकार झाला. द. आफ्रिकेकडून ताहिरने दोन गडी बाद केले. याआधी आंद्रे रसेल, ड्वेन ब्राव्हो, आणि ख्रिस गेल यांची अप्रतीम गोलंदाजी तसेच साजेशा सुरेख क्षेत्ररक्षणाच्या बळावर वेस्ट इंडिजने द. आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १२२ धावांत सहज रोखले.

No comments: