Wednesday, 30 March 2016

नमस्कार लाईव्ह ३०-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- अफगणिस्तानमध्ये चकमकीत 15 सैनिकांचा मृत्यू 
२- पाकिस्तानकडून 55 भारतीय मच्छिमारांना अटक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- आता ईडीकडून भुजबळांविरोधात 20 हजार पानी आरोपपत्र 
४- रस्ते अपघातातील जखमींना मदत करा, पोलिसांकडून मनस्ताप होणार नाही 
५- दृष्टीहीन यूजर्ससाठी ट्विटरच नवं फीचर, ठरणार बरंच फायदेशीर 
६- सरसंघचालक भागवत देणार मशिदीला भेट 
७- दिल्लीत न्यायालयाबाहेर गोळीबार; 2 जखमी 
८- मल्ल्यांकडून 4000 कोटींच्या परतफेडीचा प्रस्ताव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट 
१०- गणेश पांडेवर वरिष्ठांचा वरदहस्त - तक्रारदार महिला मैथिली जावकर 
११- गणेश पांडेच्या मनी-मसल्स पॉवरला घाबरले : मैथिली जावकर 
१२-पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे 
१३- वृद्धाला लाथ घालणे किरकोळ- भाजप खासदार 
१४- छत्तीसगड - दंतेवाडा येथील कुआकोंडा भागात भुसुरुंग स्फोटात 7 जवान शहीद. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- चिंचवड; क्षुल्लक कारणावरुन बहिणीकडून भावाचा गळा आवळून खून 
१६- शिमला; आश्चर्य ! या मंदिराचं छत कोणीच बांधू शकत नाही 
१७- उत्तराखंडमध्ये लोकशाहीचा मृत्यू की हत्या?- सेना 
१८- आसारामबापूंच्या समर्थकांवर अजामीनपात्र वॉरंट 
१९- माओवाद्यांच्या बॉम्ब हल्ल्यात 7 जवान हुतात्मा  
२०- भंडारा - पवनी तालुक्यातील गुडगावा येथे वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- विश्वचषकातून युवराज आऊट, मनीष इन 
२२- मी एकवेळ पोपशी अफेअर करेन..' ट्वीटमुळे हृतिकला नोटीस 
२३- यो यो हनी सिंह आणि बाहशाह पार्टीत भिडले 
२४- सलमान मामा बन गया, अर्पिताला पुत्ररत्न, नाव ठेवलं... 
२५- सलमान खानच्या भाच्याचा पहिला फोटो पहा 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो अन रिकामा खिसा याच दुनियेतील मानसं दाखवतो
(ओम परमार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 

================================================

गणेश पांडेच्या मनी-मसल्स पॉवरला घाबरले : मैथिली जावकर

मुंबई : “गणेश पांडेविरोधात मी तक्रार केली असती, तर एकटी पडले असते, जी मी आता पडले आहे.  गणेश पांडेकडे मनी आणि मसल्स पॉवर आहे. त्याच्यावर दिग्गजांचा वरदहस्त आहे, त्यामुळे मी एकटी त्याच्याविरोधात कशी तक्रार दाखल करणार?, मात्र आता जे झालं ते खूप झालं, आता मी नक्कीच तक्रार दाखल करणार, असं विनयभंगाचा आरोप केलेल्या तक्रारदार मैथिली जावकर यांनी सांगितलं.

गणेश पांडे विनयभंगप्रकरणानंतर मैथिली जावकर पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या. त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना 4 मार्चला नेमकं काय झालं आणि इतके दिवस तक्रार का केलं नाही? याबाबत सर्व खुलासा केला.

गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध

गणेश पांडेविरोधात मी तक्रार करुच शकत नव्हते. कारण गणेश पांडे हा सर्वच बाजूंनी सक्षम आहे. त्याच्याकडे मनी आणि मसल पॉवर आहे. त्यांची पार्श्वभूमी तपासली तर गुन्हेगारांशी संबंध लक्षात येईल. हेमंत पुजारी खटल्यात गणेश पांडेची दोन-तीन वेळा पोलिसात चौकशी झाली आहे. इतकंच नाही तर पोलिसाला मारहाण केल्याचा आरोपही गणेश पांडेवर आहे, असा दावा मैथिली जावकर यांनी केला.

गुन्हा दाखल करणार
गणेश पांडेविरोधात बोलण्यास इतर लोक घाबरतात, माझ्या बाजूने कोणीही बोलणारं नव्हतं.  गणेश पांडेच्या भीतीने मी आजपर्यंत पोलिस तक्रार दाखल केली नव्हती. मात्र आता मी तक्रार दाखल करणार असं मैथिली जावकर म्हणाल्या.

================================================

रस्ते अपघातातील जखमींना मदत करा, पोलिसांकडून मनस्ताप होणार नाही!

नवी दिल्ली कुठेही अपघात झाला की लोकं फक्त बघ्याची भूमिका घेतात, मात्र मदतीसाठी कुणी धावत नाही. कारण अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल अशी भीती त्यांना सतावत असते. मात्र आता अपघातग्रस्तांना मदत करताना पोलिसांची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण रस्ते अपघातासंदर्भात वाहतूक मंत्रालयानं तयार केलेल्या निर्देशांना सुप्रीम कोर्टाची मंजुरी मिळालीय.. काय आहेत ते निर्देश पाहुयात या रिपोर्टमध्ये

पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेकजण इच्छा असूनही अपघातग्रस्तांना मदत करण्याचं टाळतात. परिणामी अपघातग्रस्तांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र, यापुढे पोलिसांचं कोणतंही भय न बाळगता तुम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावू शकता. कारण यासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं तयार केलेल्या निर्देशांवर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे.

================================================

विश्वचषकातून युवराज आऊट, मनीष इन

मुंबई : ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. घोट्याच्या दुखापतीमुळे युवराज सिंहने ट्वेन्टी20 विश्वचषकातून माघार घेतली असून, त्याच्याऐवजी मनीष पांडेचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना युवराजचा घोटा दुखावला होता. टीम इंडिया मुंबईत दाखल झाली, तेव्हाही युवराज चालताना काहीसा लंगडत असल्याचं दिसलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून बीसीसीआयने आधीच मनीष पांडेला मुंबईत बोलावून घेतलं होतं. युवराजची दुखापत बरी न झाल्याने त्याचं वर्ल्डकप कॅम्पेन अखेर संपुष्टात आलं आहे.

युवराजच्या जागी कोण खेळणार?

दुसरीकडे मनीष पांडेला पंधरा जणांच्या भारतीय संघात स्थान मिळालं असलं, तरी अंतिम अकरामध्ये कुणाचा समावेश होणार हे अजून गुलदस्त्यातच आहे. युवराजऐवजी अजिंक्य रहाणे, मनीष पांडे आणि पवन नेगी या तिघांपैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते.

टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री यांना अजिंक्य रहाणेला संघात खेळवायचं आहे. तर धोनीला स्पिनर पवन नेगीला सामन्यात खेळवण्याच्या बाजूने आहेत. तसंच कोहलीची पसंती मनीष पांडेला आहे.

================================================

पाकशी चर्चा करता, मग सराफांशी का नाही? : उद्धव ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सराफांच्या बाजूने उभे राहिले आहेत. केंद्र सरकारने सराफांचा प्रश्न सोडवला नाही, तर शिवसेना सराफांच्या बाजूने आंदोलन करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

अबकारी करात एक टक्का वाढ केल्याने सराफ आक्रमक झाले आहेत. त्याला उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे.

जनतेने नव्या आशेने नवं सरकार निवडून दिलं. एकेकाळी या देशात सोन्याचा धूर निघत होता, पण आता सुवर्णकारांच्या घरातल्या चुलीतून धूर बाहेर पडत नाही. पाकिस्तानच्या ज्या लोकांनी पठाणकोटवर हल्ला केला, त्यांना रेड कार्पेट आणि सुवर्णकारांशी चर्चा नाही. ‘मेक इन इंडिया’चे ढोल पिटले, परदेशी उद्योगजकांशी चर्चा केली, पण सुवर्णकारांशी चर्चा का नाही”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

सराफांच्या प्रश्नाबाबत शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी, असा सल्लाही उद्धव यांनी दिला.
================================================

आता ईडीकडून भुजबळांविरोधात 20 हजार पानी आरोपपत्र

मुंबई: अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह एकूण ४४ जणांच्या विरोधात 20 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं.

मनी लाँड्रिंग कायद्याखाली ईडीने आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष इडी न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केलं.

या आरोपपत्रात समीर आणि छगन भुजबळ यांच्यासह पंकज भुजबळांनाही इडीने आरोपी केल्याचे इडीच्या सूत्रांनी सांगितलं. तर, कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि इतर अशा एकूण ४४  जणांवर ईडीने आरोपपत्रात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप ठेवला आहे.

समीर भुजबळ संचालक असलेल्या एकूण ६४ कंपन्यांमार्फत जवळपास 870 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने आरोप पत्रात केला आहे. त्यापैकी 170 कोटी रुपयांचे कागदोपत्री पुरावे सापडले असून, समीर भुजबळ यांच्या कंपण्यांचे शेअर्स ठेकेदारांनी चढत्या भावाने विकत घेऊन समीर भुजबळ यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. त्या बदल्यात गुंतवणुकदारांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विविध कामे देण्यात आली.

शिवाय 125 कोटी रुपये समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपण्यांनी विविध ठिकाणी गुंतवणूक केले, त्याबाबत समीर भुजबळ हे योग्य ते पुरावे देवू शकले नाहीत. या सर्व कोट्यावधी रुपयांच्या अफरातरफरीची चौकशी करुन इडीने हे आरोपपत्र दाखल केले आहे.

नुकतंच कलिना भूखंड घोटाळाप्रकरणात लाचलुचपत विभागानेही भुजबळांविरोधात 17 हजार 400 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.
================================================

क्षुल्लक कारणावरुन बहिणीकडून भावाचा गळा आवळून खून

चिंचवड: घरात लाईट फिटींग अंडरग्राऊंड का करून घेतली नाही या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात बहिणीनेच आपल्या भावाचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काल चिंचवड येथे घडली.

नदीम अहमद शकील अन्सारी (वय 21) असे खून करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे. या प्रकरणी वडील शकील अहमद इमामउद्दीन अन्सारी (वय 47), व बहीण नाजीया बानू अहमद शकील अन्सारी (वय- 24), शाहीन शकील अन्सारी (वय 24) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नदीम याने आपल्या वडिलांकडे घराच्या पहिल्या मजल्याचे काम करण्यासाठी 50 हजार रुपये दिले होते. यावेळी घरातील लाईट फिटींगचे काम अंडरग्राऊंड का केले नाही या शुल्लक कारणावरून वडील आणि मुलात भांडण सुरू झालं. यावेळी नदीम याने रागाच्या भरात त्याच्या दोन्ही बहिणी शाहीन आणि नाजीयाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत दोन्ही बहिणींनी त्याच्या गळ्यात स्टोल अडकवून त्याचा गळा आवळून त्याचा खून केला.
================================================

मी एकवेळ पोपशी अफेअर करेन..' ट्वीटमुळे हृतिकला नोटीस

मुंबई : कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील कायदेशीर वाद सुरु असतानाच क्रिशस्टार आणखी एका गोष्टीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कंगनासोबत अफेअरच्या सुरु झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी केलेल्या ट्वीटमुळेच हृतिकला नोटीस बजावण्यात आली आहे.

‘माझं एकवेळ पोपसोबत अफेअर असल्याची शक्यता ग्राह्य धरु, पण भारतीय प्रसारमाध्यमं ज्या महिलांची नावं माझ्याशी जोडत आहेत, त्यांच्याशी नाहीच’ अशा आशयाचं ट्वीट हृतिक रोशनने 28 जानेवारी रोजी केलं होतं.
================================================

यो यो हनी सिंह आणि बाहशाह पार्टीत भिडले

यो यो हनी सिंह आणि बाहशाह पार्टीत भिडले
नवी दिल्ली : एकेकाळी जिवलग मित्र असलेले, मात्र आता पक्के वैरी झालेले रॅपर यो यो हनी सिंह आणि बादशाह नुकतेच एका पार्टीत भिडले. दिल्लीत एक खासगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीतच दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर त्यांची बाचाबाची हाणामारीपर्यंत पोहोचली. त्यानंतर तिथल्या लोकांनी दोघांना दूर केलं.

भांडणाचं कारण
हनी सिंहने 10 मार्च रोजी त्याचा पंजाबी सिनेमा जोरावरचा ट्रेलर लॉन्च केला होता. यावेळी मीडियाशी बोलताना हनीने स्वत:ला रोल्स रॉयस आणि बादशाहला नैनो म्हटलं होतं. यामुळे बादशाह नाराज होता. दिल्लीत दोघं आमनेसामने आल्यावर त्यांच्यात जोरदार भांडण झालं. हा वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यावर उपस्थित लोकांना मध्ये पडावं लागलं.

================================================

सलमान मामा बन गया, अर्पिताला पुत्ररत्न, नाव ठेवलं...

सलमान मामा बन गया, अर्पिताला पुत्ररत्न, नाव ठेवलं...
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सल्लूची लाडकी बहिण अर्पिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुष शर्माने ही गोड बातमी शेअर केली आहे. नातवाच्या आगमनामुळे खान कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
================================================

सलमान खानच्या भाच्याचा पहिला फोटो!

सलमान खानच्या भाच्याचा पहिला फोटो!
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सल्लूची लाडकी बहिण अर्पिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. अर्पिता आणि आयुषच्या बाळाचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे.

या फोटोमध्ये सलमानचा मेहुणा म्हणजेच अर्पिताचा पती आयुषसह खान कुटुंब बाळाला न्याहाळत आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत असल्याचं दिसत आहे.
================================================

दृष्टीहीन यूजर्ससाठी ट्विटरच नवं फीचर, ठरणार बरंच फायदेशीर!

दृष्टीहीन यूजर्ससाठी ट्विटरच नवं फीचर, ठरणार बरंच फायदेशीर!
मुंबई: मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरनं मंगळवारी आपल्या नव्या फीचरची घोषणा केली आहे.  ट्विटरचं हे नवं फीचर दृष्टीहीनांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.

ट्विटरवर अपलोड करण्यात येणाऱ्या फोटोंसोबत इतरही माहिती (Descriptions) टाकता येणार आहे. त्यामुळे विशेष डिव्हाइस वापरणाऱ्यांना ब्रेल लिपीमधून फोटो बाबत माहिती समजू शकणार आहे.

आयओएस आणि अँड्रॉईडमधील ट्विटर अॅप सेटिंगमध्ये जाऊन  “Compose image descriptions.” हा ऑप्शन अॅक्टिव्हेट करावा लागणार आहे. ही सेंटीग केल्यानंतर जेव्हा तुम्ही  ट्विटरवर एखादा फोटो अपलोड कराल तेव्हा descriptionsसाठी विचारणा करण्यात येईल.

दृष्टीहीन ट्विटर यूजर्सना यामुळे बराच फायदा होणार आहे. फोटो descriptionsमुळे त्यांना फोटोविषयी माहिती समजू शकणार असून त्यामागील उद्देशही समजू शकेल.

फोटोखाली देण्यात येणारी माहीती ही तुम्हाला 420 शब्दात देता येणार आहे. या फीचरमुळे सर्च इंजिनमध्ये विशिष्ट ट्वीटही शोधता येणार आहे.
================================================

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट

कायद्याने महिलांना कुठेच प्रवेश नाकारु शकत नाही : हायकोर्ट
मुंबई : कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश नाकारला जाऊ शकत नसताना शनि शिंगणापूरला महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो? असा सवाल मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला विचारला आहे. महिलांना प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगत हायकोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारायचा असेल तर तसा कायदा करा किंवा मंदिराच्या पावित्र्याचा प्रश्न असेल तर दोन दिवसात यावर आपली भूमिका स्पष्ट करा, असं सांगत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

शनि शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश नाकारला गेला त्या विरोधात पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत हे आदेश दिले.

राज्य सरकारने महिलांना प्रवेश बंदी करण्याऐवजी त्यांना सुरक्षितपणे प्रवेश दिला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. जर महिलांना शनि शिंगणापूर येथे प्रवेश नाकारला जातो किंवा त्या मुद्द्यांवरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असेल तर जिल्हाधिकारी, पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
================================================


गणेश पांडेवर वरिष्ठांचा वरदहस्त - तक्रारदार महिला मैथिली जावकर

  • ऑनलाइन लोकमत - 
    मुंबई, दि. ३० - 'भारतीय जनता युवा मोर्चाचा (भाजयुमो) माजी मुंबई अध्यक्ष गणेश पांडेवर वरिष्ठांचा वरदहस्त आहे', असा आरोप गैरवर्तन केल्याची तक्रार करणा-या मैथिली जावकर यांनी केला आहे. 'गणेश पांडेविरोधात बोलण्यास इतर लोक घाबरतात, माझ्या बाजूने कोणीही बोलणारं नव्हत. त्यादिवशी काय झालं होतं, हे फक्त प्रियदर्शनी सोहोनीला माहित होतं. गप्प राहण्याशिवाय माझ्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, मी काहीही करु शकत नव्हते', असं मैथिली जावकर बोलल्या आहेत. गणेश पांडेविरोधात गैरवर्तनाची तक्रार केल्यानंतर प्रथमच मैथिली जावकर यांनी समोर येत आपलं म्हणण मांडलं आहे. 
    एबीपी माझा दिलेल्या मुलाखतीत मैथिली जावकर यांनी आपली बाजू मांडली आहे. गणेश पांडेने नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे त्याला उत्तर देत मैथिली जावकर यांनी  'माझी, गणशे पांडे आणि तिथे असणा-या सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे', अशी मागणी केली आहे. यामध्ये विणा दिवेकर, योगेश गीरकर, हिमांशू पडवळ, अमित शेलार,अमोल जाधव,निर्माला यादव, सिद्धार्थ शर्मा यांची नावं घेत या सर्वोच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. 
    'गणेश पांडे गैरवर्तन करत असताना भीतीमुळे कोणीही समोर आलं नाही. आशिष शेलार यांनी मला आणि गणेश पांडेला बोलावून आमचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. दोघांची बाजू ऐकल्यानंतर आशिष शेलार यांनी गणेश पांडेचा राजीनामा घेतला होता. गणेश पांडेवरील कारवाईनंतर समाधानी होते, पण त्यांनी सार्वजनिकरित्या आरोप केल्यावर तक्रार करणार असल्याचं', मैथिली जावकर बोलल्या आहेत.  'गणेश पांडेचे अंडरवर्ल्डशी संबंध,गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्या भीतीनेच मी तक्रार केली नाही', असंही मैथिली जावकर बोलल्या आहेत.
================================================

आश्चर्य ! या मंदिराचं छत कोणीच बांधू शकत नाही


  • ऑनलाइन लोकमत -
    शिमला, दि. ३० - मंडी जिल्ह्यात असलेल्या शिकारी मातेच्या मंदिराचं छत हा एक कौतुकाचा विषय आहे. कारण आजपर्यंत कोणीच या मंदिराचं छत बांधू शकलेला नाही. पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलेल्या या मंदिराचं छप्पर बांधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र कोणालाच यश मिळालं नाही. पांडवांनी जाणुनबुजून या मंदिराचं छत बांधल नव्हतं, खुल्या आकाशाखाली त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती त्यामुळेच देवीला खुल्या आकाशाखाली राहणं आवडतं असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
    हिमाचल प्रदेशातील चौहार खो-यात एका उंच शिखरावर हे मंदिर वसलेलं आहे. समुद्रसपाटीपासून 2850मीटर उंचीवर हे मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासादरम्यान तपश्चर्या केली होती त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पांडवांना युद्धात कौरवांचा पराभव करुन विजयी होण्याचा आशिर्वाद दिला होता. त्यानंतर पांडवांनी जाताना मंदिराची स्थापना केली होती असं सांगितलं जात. मात्र त्यांनी मंदिराच छप्पर का बांधलं नाही ? याबाबत नेमकं कारण कोणाला माहित नाही. या छतामागचं नेमक रहस्य काय ? याचा उलगडा अजूनपर्यंत झालेला नाही.  
    हिवाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते ज्यामुळे सर्व गाव बर्फाखाली येतं. मात्र इतकी बर्फवृष्टी होऊनदेखील मंदिरावर बर्फ अजिबात राहत नसल्याचं ग्रामस्थ सांगतात. या देवीला शिकारी माता का म्हणतात ? यामागेदेखील एक गोष्ट आहे. मंदिराच्या ठिकाणी अगोदर घन जंगल होतं. अनेक शिकारी याठिकाणी राहायचे. शिकारीला जाण्यापुर्वी देवीच्या मंदिरात येऊन प्रार्थना करायचे आणि त्यांना त्यात यशही मिळायचं. त्यानंतर या मंदिराला शिकारी मातेचं मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 
================================================


No comments: