[अंतरराष्ट्रीय]
१- विजय मल्ल्यांचा लंडनमध्ये अलिशान महाल, 30 एकरावर ‘लेडीवॉक’
२- न्यूयॉर्क; नग्न व्हिडिओ शूट, महिला पत्रकाराला 370 कोटींची नुकसानभरपाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- दिल्ली टू लंडन, फ्लाईट नंबर 9W 122... विजय मल्ल्या भारताबाहेर
४- पळालो नाही, कामानिमित्त परदेशात : विजय मल्ल्या
५- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या गणवेशाचं काँग्रेस कनेक्शन
६- आर्म्स अॅक्ट प्रकरण : कोर्टात जात विचारल्यावर सलमान म्हणाला...
७- गरीब महिलांना मोफत ‘गॅस’
८- धडा शिकवण्यासाठी त्याने केला कन्हैयावर हल्ला
९- कर्ज, वीजबिल माफ करा'; विरोधकांनी सुनावले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- मल्ल्या पळून जाणार हे शेंबडे पोरही सांगू शकत होते, उद्धव ठाकरे सरकारवर बरसले
११- 'रिक्षा जाळपोळप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा- शशांक राव
२१- शिक्षित तरुणीचे शारीरिक संबंध हा बलात्कार नाही - उच्च न्यायालय
२२- जेएनयू कॅम्पसमध्ये कन्हैया कुमारवर हल्ला
२४- मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड
२५- दीपशिखाची घटस्फोटित पतीविरोधात पोलिसात तक्रार
२६- नाशिक; पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा
२७- मुंबईतून नागपूर गाठा चार तासांत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२८- मुंबईत अंधेरी आरटीओबाहेर अज्ञातांनी रिक्षा जाळली
२९- पटना; देशातील सर्वात तरुण पॅनकार्डधारक, वय अवघं...
३०- मुंबईला हरवून शेष भारतला इराणी ट्रॉफीचं जेतेपद
३१- आयसिसला बायोडेटा पाठवणाऱ्याला नवी मुंबईत नोकरी
३२- लातूरला जाणारे पाणी रोखले; टँकर पॉइंटची तोडफोड
३३- ‘खाकी वर्दी’साठी डॉक्टर, वकील, इंजिनियर रांगेत
३४- मुंबई; अंध-अपंगांना ‘बेस्ट’ मोफत
३५- केशवनगर; व्हॉट्सऍपमुळे चुकली परीक्षेची वेळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३६- आयपीएल 2016 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
३७- गिनीज बुकमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या नावे विक्रम
३८- रोहितचा धमाका, 57 चेंडूत 98*, 7 सिक्सर, 9 चौकार
३९- टी-20 वर्ल्डकपमध्ये एक अशी टीम, ज्यामध्ये 5 भारतीय आणि 6 पाकिस्तानी वंशाचे खेळाडू!
४०- बाजीराव'सोबत आशाताईंच्या नातीचा सेल्फी, निमित्त.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
रवी पाठक, सुरेश पाटील, राजेश शर्मा, गजानन पवार, आकाश खानसोळे, आलीगुल बुग्ती, हनुमान पोहरे, प्रलोभ कुलकर्णी,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=============================================

मुंबई इंडियन्सच्या होमपीचवर म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. तर 29 मे 2016 रोजी मुंबईतच आयपीएलचा अंतिम सामना होईल.
51 दिवसांमध्ये चार प्ले ऑफ धरुन एकूण 60 सामने होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, मोहाली, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, रायपूर या दहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जातील.
=============================================

=============================================

=============================================

ऐकायला विचित्र वाटणारा हा विक्रम सोनाक्षीच्या नावे जमा झाला आहे. नखं रंगवण्याच्या अर्थात नेलपेंट लावण्याच्या स्पर्धेत सोनाक्षी सहभागी झाली होती. तेव्हा एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी नेलपेंट लावण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने अनेक स्त्रियांसोबत सोनाक्षी या विक्रमाची मानकरी ठरली.
लहानपणापासूनच आपलं नाव गिनीज बुकमध्ये यावं, हे आपलं स्वप्न होतं. आज अखेर ते पूर्णत्वास आलं, अशा भावना सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केल्या आहेत.
कलर कॉस्मॅटिक निर्माते इंग्लॉट आणि त्यांचे भारतीय भागीदार मेजर ब्रँड्सच्या सोबतीने सोनाक्षीने या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
=============================================

=============================================

कुमार सजल आणि स्मृती सिन्हा यांनी 21 फेब्रुवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्यासाठी अर्ज करण्यात आला आणि आशीला 26 तारखेला पॅनकार्ड प्राप्त झालं.
यापूर्वी जयपूरचा आर्यन चौधरी सर्वात तरुण पानकार्डधारक होता. सात दिवसांचा असताना त्याला पॅनकार्ड मिळालं होतं.
=============================================

=============================================

संबंधित व्यक्तीला सात महिन्यांपूर्वी इराक दुतावासाबाहेरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ब्लॉगर आणि माजी पत्रकार असलेल्या या व्यक्तीवर बेरोजगारीची वेळ आली. त्यामुळेच त्याने आयसिस भरतीचं खूळ डोक्यात घेतल्याचं लक्षात घेऊन एटीएसने त्याला मदत केली.
खारघरमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहणाऱ्या या व्यक्तीला आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर समाज आणि नातेवाईकांनी दूर सारलं. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी एटीएसने त्याला मदत केली.
इराकची विभागणी होऊन एका भागावर आयसिसचं राज्य असेल, आणि आपल्याला राजकीय प्रवक्तेपद मिळेल, हा त्याचा विचार होता. मुस्लीम असलो, तरी आपण देशभक्त आहोत आणि आपल्याला दहशतवादी व्हायचं नाही, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
=============================================

जनाईने सुद्धा गाण्याचं शिक्षण घेतलं आहे. तिने नुकतंच ‘सिक्स पॅक’ या तृतीयपंथीयांच्या बँडसोबत एका गाण्याचे चित्रीकरण केले. याचवेळी रणवीर सिंगशी तिची भेट झाली. नातीचा सेल्फी आजी आशा भोसले यांनी हा ट्विटरवर शेअर केला आहे.
रणवीरनेही आशा भोसलेंच्या ट्वीटला उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. सोबतच आशाताईंची नात जनाईचे कौतुकही त्यानं केलं आहे. जनाई ही तिच्या आजीसारखीच प्रेमळ, प्रतिभावान आणि सुंदर आहे, असं रणवीरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
=============================================

2008 मध्ये नॅशविले हॉटेलमध्ये मायकल डेविड बॅरेटने इरिन यांचा गुपचूपपणे नग्न व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ बॅरेटने ऑनलाईन पोस्ट केला. याची कुणकुण लागल्यानंतर इरिन यांनी बॅरेटसह दोन अन्य कंपन्यांवर मानहानीचा दावा ठोकला.
शिकागोतील एका विमा कंपनीत मॅनेजर असलेल्या मायकलने आपला गुन्हा कबूल केला होता. पैसे कमवण्यासाठीच आपण हे कृत्य केल्याचं त्याने मान्य केलं. जेव्हा टीएमझेड या वेबसाईटने त्याला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला.
=============================================
केशवनगर; व्हॉट्सऍपमुळे चुकली परीक्षेची वेळ
केशवनगर : व्हॉट्सऍपचे वेड लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच लागले आहे. या व्हॉट्सऍपवर येणारी माहिती ही अनेकदा चुकीची असते. परंतु, त्यावर आल्याने अनेक जण विश्वास ठेवतात. असाच विश्वास ठेवून एका विद्यार्थ्याने परीक्षेची वेळ चुकविली. व्हॉट्सऍपवरील चुकीच्या वेळापत्रकानुसार तो परीक्षा केंद्रावर गेला आणि त्याचा भूगोलाचा पेपर द्यायचा राहिला.
रोहन रमेश इंदरंगी असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घोरपडीतील एका नगरसेवकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट तयार केली होती. त्यामध्ये त्यांनी परीक्षेचे वेळापत्रकही टाकले होते. परंतु, भूगोलाच्या परीक्षेची वेळ चुकविली होती. या वेळेनुसार रोहन परीक्षा देण्यासाठी दुपारी 2 वाजता हडपसर येथील आर. आर. शिंदे साधना विद्यालयात गेला. तेव्हा त्याला समजले की 2 वाजता तर परीक्षा संपली. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 2 होती. त्यानंतर या विद्यार्थ्याने घडलेला प्रकार शिक्षक शरद बोराटे यांना सांगितला. तेव्हा शिक्षकांनी त्याला आता काहीच करता येणार नाही, असे सांगितले.
लोणकर विद्यालयातील शिक्षक शरद बोराटे म्हणाले, "या प्रकारात विद्यार्थ्याचीही चूक आहे. शाळेने वेळापत्रक दिलेले असतानाही विद्यार्थी वाचत नाहीत. या विद्यार्थ्याला शाळेत भेटण्यासाठी निरोप पाठविला आहे. या झालेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी व्हॉट्सऍपवरचा अतिवापर करणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्याला वैकल्पिक विषय देता येईल किंवा जुलै 2016 मध्ये फेरपरीक्षेला बसता येईल.‘‘
=============================================
मुंबईतून नागपूर गाठा चार तासांत
नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होणार; भारतीय रेल्वे मंत्रालय आणि स्पेन रेल्वेचा प्रकल्प
शिक्षित तरुणीचे शारीरिक संबंध हा बलात्कार नाही - उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाने निकालात नोंदवले निरीक्षण
धडा शिकवण्यासाठी त्याने केला कन्हैयावर हल्ला
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला धडा शिकवण्यासाठी एका तरुणाने त्याच्या कानफडात मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास कन्हैया प्रशासकीय इमारतीच्या परिसरात राष्ट्रीयता या विषयावर भाषण देत होता. त्यावेळी विकास चौधरी नावाचा एक तरुण त्याच्या समोर आला आणि त्याने कानफडात मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी रोखले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी अंती विकास जेएनयूचा विद्यार्थी नसून गाजियाबादचा निवासी असल्याचे समोर आले आहे. कन्हैयाला धडा शिकवण्यासाठी त्याने हल्ला केल्याचे सांगितले.
त्याला जवळच्या पोलिस स्थानकात नेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. हल्ल्याबाबत बोलताना कन्हैया म्हणाला, ‘तुम्ही मला मारण्यापूर्वी रोहित वेमुलाबद्दल विचार करा. ज्यावेळी तुम्ही एका रोहितला माराला त्यावेळी अनेक रोहित पुढे येतील. तुम्ही आता अन्य कोणाला मारण्याचा प्रयत्न केलात तर अनेक जण उभे राहतील.‘
=============================================
कर्ज, वीजबिल माफ करा'; विरोधकांनी सुनावले
मुंबई - दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफी अन् विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्क नाही, तर पूर्ण शैक्षणिक फीमाफी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सत्ताधाऱ्यांना विधानसभेत सुनावले. सरकारचा नियोजनशून्य कारभार आणि प्रशासनावर नसलेली मांड यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आधार तुटला असून, दिलासा देणारा एकही निर्णय होत नसल्याने आत्महत्या वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम २०९३ अन्वये प्रस्ताव मांडत राज्यातल्या भीषण दुष्काळाबाबत आज चर्चा उपस्थित केली. या चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. वर्षभरात ३६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतानाही सरकार अजूनही वाटच पाहत असल्याची खंत विखे पाटील यांनी केली. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप केंद्रे स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे आता सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांचेच समुपदेशन करण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार बळिराजाचं नसून व्यापाऱ्यांचे आहे. हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी व्यापाऱ्यांना दिली जात आहे. एलबीटी माफ केला जात आहे, पण बळिराजाचे कर्ज माफ करण्यास सरकार तयार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. दुष्काळाच्या चर्चेत शिवसेनेचे आमदार काय बोलतात याबाबतची उत्सुकता होती.
मागील वर्षीच्या सर्व अधिवेशनात शिवसेना आमदार गुलाबराव पाटील व अर्जुन खोतकर यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेच्या या दोन तोफा सत्तेत असतानाही सरकारच्या चुकांवर कुठेही पांघरूण घालताना दिसले नव्हते. मात्र, आज दुष्काळी चर्चेच्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी गुलाबराव पाटील यांचे नाव पुकारले, त्या वेळी त्यांनी हात जोडून मी बोलणार नाही असे बसूनच सूचित केले. यामुळे विरोधी बाकावरील आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला.

पळालो नाही, कामानिमित्त परदेशात : विजय मल्ल्या
नवी दिल्ली : आपण देशातून पळालो नसून व्यावसायिक असल्यानं कामासाठी परदेशात आलो आहे, असे उद्योगपती विजय मल्ल्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
Vijay Mallya
@TheVijayMallya
Member of Parliament, India, Chairman, The UB Group Co-owner & Team Principal Sahara Force India Formula 1
'रिक्षा जाळपोळप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा नोंदवा'
मुंबई: अंधेरीतील रिक्षा जाळपोळप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवा अशी मागणी मुंबई ऑटोमेन्स युनिअनचे अध्यक्ष शशांक राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
रिक्षाचालकांना सुरक्षा पुरवा उद्या कुणीही उठून रिक्षाचालकांविरोधात आंदोलनं करेल. उद्या जर यांनी रिक्षावाल्यांचे घरं जाळलं तर या जंगलराजला जबाबदार कोण. असा सवाल विचारत अध्यक्ष शशांक राव यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहलं आहे. दरम्यान, याचप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शशांक राव यांनी केली आहे.
दरम्यान, ९ मार्चला मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी नव्या परवानाधारक रिक्षा जाळून टाकण्याचं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. काल अंधेरीच्या आरटीओ कार्यालयाबाहेर उभ्या असणाऱ्या रिक्षाला अज्ञातांनी आग लावली. तसेच घटनास्थळी मनसेचा झेंडाही आढळून आला. त्यामुळे याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर संशयाची सुई वळताना दिसते आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा हिंसक आंदोलनाची हाक दिली. नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास, त्यामधील प्रवाशांना उतरुन थेट रिक्षा जाळून टाका असं चिथावणीखोर भाषण राज ठाकरे यांनी केलं होतं.
मुंबईत अंधेरी आरटीओबाहेर अज्ञातांनी रिक्षा जाळली
मुंबई : मुंबईत अज्ञातांनी एका रिक्षाची जाळपोळ केली आहे. अंधेरी आरटीओबाहेर ही घटना घडली आहे. जाळपोळ झाली त्यावेळी रिक्षात सुदैवाने कोणीही प्रवासी नव्हतं.
याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदवून रिक्षा जाळणाऱ्यांचा शोध सुरु आहे.
नवीन परवान्याच्या रिक्षा दिसल्या तर त्या जाळा, अशी चिथावणी मनसे अध्यक्षराज ठाकरे यांनी दिली होती. मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यानंतर आज अंधेरीतील चार बंगला परिसरात अज्ञातांनी रिक्षाची जाळपोळ केली. त्यामुळे या घटनेमागे मनसेचा हात असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे.
रोहितचा धमाका, 57 चेंडूत 98*, 7 सिक्सर, 9 चौकार
कोलकाता : महेंद्रसिंह धोनीच्या टीम इंडियाने विश्वचषक मोहीमेची सुरुवात विजयाने केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामन्यात भारताने 45 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कोलकात्याच्या ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. पण वेस्ट इंडिजचा डाव 19 षटकं 2 चेंडूत 140 धावांत आटोपला.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा या मॅचचा हिरो ठरला. रोहितने गेलला लाजवेल अशी फलंदाजी केली. कारण रोहितने अवघ्या 57 चेंडूत धुवाँधार 98 धावा कुटल्या. यामध्ये त्याने 9 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार ठोकले.
याशिवाय सिक्सर किंग युवराज सिंहनेही चांगलीच फटकेबाजी केली. युवराजने 20 चेंडूत 3 चौकार आणि एका सिक्सरसह 31 धावा केल्या. तर सलामीवीर शिखर धवननेही 17 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने 21 धावा ठोकल्या.
दुसरीकडे अजिंक्य रहाणेला फलंदाजीत जम बसवण्यात अद्याप यश आलेलं नाही. कारण रहाणे अवघ्या 7 धावा करून माघारी परतला. तर रवींद्र जाडेजा 10, पवन नेगी 8, हार्दिक पंड्या 0 आणि सुरेश रैनाने नाबाद 1 धावा केल्या.
टी-20 वर्ल्डकपमध्ये एक अशी टीम, ज्यामध्ये 5 भारतीय आणि 6 पाकिस्तानी वंशाचे खेळाडू!
मुंबई : सध्या क्रिकेट रसिकांमध्ये टी-20 वर्ल्डकपचा फिव्हर आहे. या वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी एक अशी टीम भारतात दाखल झाली आहे, जिच्यामध्ये पाच भारतीय वंशाचे, तर 6 पाकिस्तानी वंशाचे खेळाडू आहेत. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तानी वंशाचे हे खेळाडू चांगली कामगिरीही करत आहेत. ही टीम म्हणजे ओमन.ओमन टीमने उत्तम कामगिरी करत बुधवारी आयर्लंडला पराभूत केलं. आयर्लंडच्या टीमने एकेकाळी पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजसारख्या संघांना पारभूत केलं होतं. त्यामुळे नवख्या ओमन टीमने आयर्लंडला हरवणं, मोठं यश मानलं जात आहे. विशेष म्हणजे ओमन टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये जास्तीत जास्त भारत आणि श्रीलंकन वंशाचे लोक आहेत.
मुनीश अन्सारी, अजय लाचेता, जतिंदर सिंह, राजेश कुमार आणि वैभव वाटेगावकर अशी या भारतीय वंशाच्या पाच खेळाडूंची नावं आहेत.
पाच भारतीय वंशाचे खेळाडू
मुनीश अन्सारी : मुनीशचा जन्म इंदौरमध्ये झाला असून त्याच्या खेळाचं कौतुक दस्तुरखुद्द राहुल द्रविड आणि वसीम अक्रम यांनीही केलं आहे. विशेष म्हणजे नेट प्रॅक्टिसदरम्यान मुनीश अन्सारीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही बाद केलं आहे. आतापर्यंत मुनीशला भारतातील सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, ओमन संघाकडून त्याची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे. मुनीश 140 हून अधिकच्या वेगाने गोलंदाजी करतो.
=============================================विजय मल्ल्यांचा लंडनमध्ये अलिशान महाल, 30 एकरावर ‘लेडीवॉक’
लंडन : देशातील 17 बँकांना 9 हजार कोटींचा चुना लावून पसार झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्यांचा शोध ‘एबीपी न्यूज नेटवर्क’नं घेतला आहे. लंडनपासून तासाभराच्या अंतरावरच्या तिवेन शहरात मल्ल्याचा 30 एकरावर ‘लेडीवॉक’ नावाचा आलिशान बंगला आहे.
दिल्ली टू लंडन, फ्लाईट नंबर 9W 122... विजय मल्ल्या भारताबाहेर
नवी दिल्ली : देशातील एकूण 17 बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या उद्योजक विजय मल्ल्यांनी भारताबाहेर पलायन केलं आहे. विजय मल्ल्या त्यांचेच जुने स्पर्धक नरेश गोयल यांच्या जेट एअरवेज फ्लाईटने भारताबाहेर गेल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियातील वृत्तात देण्यात आली आहे.
जेट एअरवेजच्या फ्लाईटने लंडनला रवाना
विजय मल्ल्या 2 मार्चला जेट एअरवेजच्या ‘9W 122’ या दुपारी दीड वाजताच्या फ्लाईटने दिल्लीहून लंडनला रवाना झाले. अरपोर्टवर चेक इनवेळी मल्ल्या यांच्याकडे 7 बॅग होत्या, अशी माहिती मिळते आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मल्ल्या जवळपास 12 वाजण्याच्या सुमारास IGI एअरपोर्टवर पोहोचले. मल्ल्यांसोबत एक महिलाही होती. जेट एअरवेजने मल्ल्या यांच्यासाठी एक स्पेशल स्टाफ अपॉईंट केला, ज्यांनी मल्ल्या यांना टर्मिनल-3 पर्यंत पोहोचवलं. टर्मिनल-3 वर मल्ल्या जवळपास एक तास थांबले होते. जेट एअरवेजकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलं नाही.
जेएनयू कॅम्पसमध्ये कन्हैया कुमारवर हल्ला
नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने कन्हैयाला थप्पड लगावत शिवीगाळ केली. कन्हैया विद्यापीठातील अॅडमीन ब्लॉकमध्ये काही विद्यार्थ्यांशी बोलत असताना हा प्रकार घडला.
कन्हैयावर हल्ला केलेल्या व्यक्तीचं नाव विकास असल्याचं कळतं. हल्लेखोर जेएनयूमधील नसल्याचंही समजतं. जेएनयू कॅम्पसच्या सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं असून पोलिसांनी याबाबत कळवण्यात आलं आहे.
देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या कन्हैया कुमारला धडा शिकवण्यासाठी हल्ला केल्याचं विकासने सांगितलं.
मनसैनिकांकडून भाजप आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा जाळून दाखवावी, मग कार्यकर्त्यांना सांगावं, असं वक्तव्य सागर यांनी केलं होतं. त्यानंतर मनसैनिकांनी कांदिवली पश्चिममधील योगेश सागर यांचं कार्यालय फोडलं.
राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी फडणवीस सरकारने 70 हजार रिक्षांचे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास त्या जाळा, अशी चिथावणी राज ठाकरे यांनी दिली होती. मनसेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
राज ठाकरेंच्या या विधानावर कांदिवलीच्या चारकोपमधील भाजप आमदार योगेश सारग यांनी प्रतिक्रिया देत, राज यांनी पहिल्यांदा स्वत: रिक्षा चालवावी, असं आव्हान दिलं. त्यानंतर मनसेने खळ्ळ खटॅक स्टाईलने आमदार सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.
आयपीएल 2016 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
मुंबई : ‘आयपीएल’च्या आगामी पर्वाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलला शुभारंभ होणाऱ्या नवव्या पर्वाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि नवे गडी पुणे सुपरजायंट्समध्ये होणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या होमपीचवर म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. तर 29 मे 2016 रोजी मुंबईतच आयपीएलचा अंतिम सामना होईल.
51 दिवसांमध्ये चार प्ले ऑफ धरुन एकूण 60 सामने होणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, मोहाली, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, रायपूर या दहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जातील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या गणवेशाचं काँग्रेस कनेक्शन
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे तीन शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहते ती खाकी हाफ पॅन्ट, पांढराशुभ्र शर्ट आणि डोक्यावर काळी टोपी परीधान केलेल्या स्वयंसेवकाची आकृती. स्वतः सरसंघचालक असो किंवा नुकताच संघाच्या शाखेत भरती झालेला चिमुकला, संघाच्या कोणत्याही कार्यक्रमात या गणवेशाला सूट नाही.
पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अनोखी ओळख असलेला हा गणवेश बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरु असल्याचं कळतं. राजस्थानमध्ये होणाऱ्या संघाच्या प्रतिनिधी सभेमध्ये तसा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. ज्या खाकी हाफ पॅन्टवरुन विरोधकांकडून संघावर विनोद केले जातात, तिला इतिहासजमा करण्याचा कार्यकर्त्यांचा मानस असल्याचं समजतं.
खास गोष्ट म्हणजे, काँग्रेस अधिवेशनात परिधान केला जाणाऱ्या गणवेशाप्रमाणेच संघाचा सुरुवातीचा गणवेश होता. जवाहरलाल नेहरुंचा जुना फोटो पाहिल्यास त्यांचा अवतार एखाद्या संघाच्या कार्यकर्त्यापेक्षा कमी वाटत नाही. आता संघाने काँग्रेसच्या गणवेशाची कॉपी केली की, काँग्रेसने संघाच्या गणवेशाची कॉपी केली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. प्रत्यक्षात तत्कालीन काँग्रेसच्या गणवेशाला साधर्म्य पावणारा गणवेश संघाकडून वापरला जायचा. काँग्रेसप्रमाणेच संघाचे कार्यकर्तेही खाकी शर्ट आणि काळे बूट परिधान करायचे.
आर्म्स अॅक्ट प्रकरण : कोर्टात जात विचारल्यावर सलमान म्हणाला...
जोधपूर : काळवीट शिकारीप्रकरणात आर्म्स अॅक्टचा आरोप असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान आज जोधपूर कोर्टात हजर झाला. मी निर्दोष आहे, असं त्याने जबाबात स्पष्ट केलं. संबंधित प्रकरण हे राजस्थानच्या कनकनी गावात ऑक्टोबर 1998 मध्ये घडलं होतं. सलमान खान याआधी 29 जानेवारी, 2014 आणि 29 एप्रिल 2015 रोजी न्यायालयात हजर झाला होता.
मागील सुनावणीप्रमाणे यावेळीही न्यायाधीशांनी सलमानला त्याची जात विचारली. यावर सलमान म्हणाला, मी भारतीय आहे.
1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान, अवैध शस्त्राने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर आहे. त्याच प्रकरणाची सुनावणी आज जोधपूर कोर्टात सुरु असून सुनावणीसाठी सलमान खान आज स्वत: हजर होता.
कोर्टात झालेले प्रश्न-उत्तर
न्यायाधीश – तुमचं नाव, वडिलांचं नावं आणि व्यवसाय?
सलमान – माझं नाव सलमान खान आणि वडिलांचं नाव सलीम खान आहे. मी मुंबईत राहतो. अभिनय हा माझा व्यवसाय आहे
न्यायाधीश – आणि जात कोणती?
सलमान – माझं नाव सलमान खान आणि वडिलांचं नाव सलीम खान आहे. मी मुंबईत राहतो. अभिनय हा माझा व्यवसाय आहे
न्यायाधीश – आणि जात कोणती?
जात विचारल्यावर सलमान खान शांत झाला आणि न्यायाधीशांकडे पाहत राहिला. त्यानंतर बोलला… माझी जात भारतीय आहे.
न्यायाधीश – साक्षीदार आणि वन अधिकारी शिवचरण बोहराचं म्हणणं आहे की, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असताना तुम्ही तिथे उपस्थित होता.
सलमान – त्यांचा जबाब चुकीचा आहे.
न्यायाधीश – शस्त्र सलीम यांनी दिले होते, असं साक्षीदार उदय राघवनने सांगितलं आहे. शिवाय, एफआयआरवर सलमानची स्वाक्षरी आहे. तसंच उदयचीही स्वाक्षरी आहे
सलमान – याबाबत मला कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी दबाव टाकून माझी स्वाक्षरी घेतली.
न्यायाधीश – सर्व साक्षीदार तुझ्याविरोधात जबाब देत आहेत, तुला काही बोलायचं आहे का?
सलमान – एका वृत्तपत्रात या प्रकरणाबाबत अतिशयोक्तीने छापलं आहे. यानंतर वनविभा आणि मीडियाच्या दबावामुळे माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मी पूर्णत: निर्दोष आहे. मला फसवण्यात आलं आहे.
न्यायाधीश – निर्दोष असल्याचे पुरावे तुझ्याकडे आहेत का, तुला ते सादर करायचे आहेत का?
सलमान – होय, मला काही पुरावे सादर करायचे आहेत.
न्यायाधीश – या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी तू कोर्टात पुरावे सादर कर
सलमान – होय, मला काही पुरावे सादर करायचे आहेत.
न्यायाधीश – या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 4 एप्रिल रोजी होणार आहे. त्या दिवशी तू कोर्टात पुरावे सादर कर
गिनीज बुकमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या नावे विक्रम
महिला दिनाच्या निमित्ताने अनेक स्त्रियांसोबत सोनाक्षी या विक्रमाची मानकरी ठरली.
मुंबई : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या नावाची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. सोनाक्षीने नोंदवलेल्या एका आगळ्यावेगळ्या विक्रमामुळे ती गिनीजची विक्रमवीर झाली आहे.
ऐकायला विचित्र वाटणारा हा विक्रम सोनाक्षीच्या नावे जमा झाला आहे. नखं रंगवण्याच्या अर्थात नेलपेंट लावण्याच्या स्पर्धेत सोनाक्षी सहभागी झाली होती. तेव्हा एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी नेलपेंट लावण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. महिला दिनाच्या निमित्ताने अनेक स्त्रियांसोबत सोनाक्षी या विक्रमाची मानकरी ठरली.
लहानपणापासूनच आपलं नाव गिनीज बुकमध्ये यावं, हे आपलं स्वप्न होतं. आज अखेर ते पूर्णत्वास आलं, अशा भावना सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केल्या आहेत.
कलर कॉस्मॅटिक निर्माते इंग्लॉट आणि त्यांचे भारतीय भागीदार मेजर ब्रँड्सच्या सोबतीने सोनाक्षीने या अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.
दीपशिखाची घटस्फोटित पतीविरोधात पोलिसात तक्रार
मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 8’ ची स्पर्धक दीपशिखा नागपालने घटस्फोटित पती केशव अरोराविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील बंगुर नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दीपशिखाच्या आरोपानुसार, “केशव अरोरा घरात आला आणि पैशांची मागणी करु लागला. पैसे देण्यास इन्कार केल्याने त्याने मला बेदम मारहाण केली. यामध्ये माझ्या नाकातून रक्त वाहू लागलं आणि शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत.”
“या घटनेनंतर मला धक्का बसला. तो एक पुरुष आहे आणि काहीही केलं तर बचावेल, असं त्याला वाटलं. पण मी रडणार नाही तर त्याच्या प्रत्येक कृत्याचं धडा त्याला शिकवणारच,” असं दीपशिखा म्हणाली.
अनेक बॉलिवूड सिनेमात भूमिका साकारलेली दीपशिखा केशव अरोरासह 2013 मध्ये डान्स रिअलिटी शो ‘नच बलिए’ मध्येही दिसली होती. दीपशिखाने ‘कोयला’ (1997), ‘बादशाह’ (1999), ‘रिश्ते’ (2002), ‘पार्टनर’ (2007) आणि ‘गांधी टू हिटलर’ (2011) या सिनेमात काम केलं होतं.
दीपशिखाचं हे दुसरं लग्न होतं. 2012 मध्ये तिने केशव अरोराशी लग्न केलं होतं. त्यापूर्वी म्हणजेच 1997 मध्ये तिने मल्याळम आणि हिंदी अभिनेता जीत उपेंद्रसोबत संसार केला होता. जीत उपेंद्रपासून तिला विधीका आणि विवान ही दोन मुलं आहेत.
देशातील सर्वात तरुण पॅनकार्डधारक, वय अवघं...
पाटणा : बिहारमधल्या एका चिमुरडीने देशातील सर्वात तरुण पॅनकार्डधारक होण्याचा मान पटकवला आहे. आशी या चिमुरडीला पाचव्या दिवशी पॅनकार्ड हाती पडलं आहे.
कुमार सजल आणि स्मृती सिन्हा यांनी 21 फेब्रुवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिच्यासाठी अर्ज करण्यात आला आणि आशीला 26 तारखेला पॅनकार्ड प्राप्त झालं.
यापूर्वी जयपूरचा आर्यन चौधरी सर्वात तरुण पानकार्डधारक होता. सात दिवसांचा असताना त्याला पॅनकार्ड मिळालं होतं.
आपल्या लेकीचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येण्यासाठी शिफारस केल्याची माहिती आशीचे पिता सजल यांनी दिली.
यापूर्वीचे सर्वात तरुण पॅनकार्डधारक
आयुष राजन (ओदिशा) 3 महिने
कृष्णा टॅकर (मुंबई) 56 दिवस
अक्षिता (चेन्नई) 49 दिवस
बिपाशा मोडक (प. बंगाल) 22 दिवस
आहना मोदी (राजकोट) 10 दिवस
आर्यन चौधरी (जयपूर) 7 दिवस
कृष्णा टॅकर (मुंबई) 56 दिवस
अक्षिता (चेन्नई) 49 दिवस
बिपाशा मोडक (प. बंगाल) 22 दिवस
आहना मोदी (राजकोट) 10 दिवस
आर्यन चौधरी (जयपूर) 7 दिवस
मुंबईला हरवून शेष भारतला इराणी ट्रॉफीचं जेतेपद
मुंबई : नमन ओझाच्या शेष भारत संघाने मुंबईला चार विकेट्स राखून हरवून इराणी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर शेष भारत संघाने तब्बल 480 धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि ऐतिहासिक विजय साजरा केला.
इराणी करंडकाच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम शेष भारत संघाच्या नावावर जमा झाला आहे. याआधी शेष भारत संघानेच 1982-83च्या मोसमात दिल्लीविरुद्ध 424 धावा करुन विजय साजरा केला होता. तो विक्रम शेष भारताने आता मोडीत काढला आहे.
शेष भारत संघाच्या या विजयात फैज फजल, करुण नायर, शेल्डन जॅक्सन, सुदीप चॅटर्जी आणि स्टुअर्ट बिन्नीने निर्णायक भूमिका बजावली. विदर्भाच्या फैज फजलने 127 धावांची खेळी करुन शेष भारत संघाच्या विजयाचा पाया घातला. करुण नायरचं शतक मात्र 8 धावांनी हुकलं. तो 92 धावांवर बाद झाला. त्याशिवाय शेल्डन जॅक्सनने नाबाद 59 आणि सुदीप चॅटर्जी तसंच स्टुअर्ट बिन्नीने प्रत्येकी 54 धावांची खेळी करुन शेष भारत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
आयसिसला बायोडेटा पाठवणाऱ्याला नवी मुंबईत नोकरी
मुंबई : दहशतवादी संघटना आयसिसमध्ये भरती होण्याच्या इच्छेने बायोडेटा पाठवणाऱ्या इसमाला अखेर नोकरी मिळाली आहे. मात्र आयसिसमध्ये नव्हे, तर नवी मुंबईतील एका शोरुममध्ये सेल्समनची नोकरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एटीएसच्या मदतीने त्याला रोजगार मिळण्यास मदत झाली.
संबंधित व्यक्तीला सात महिन्यांपूर्वी इराक दुतावासाबाहेरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. ब्लॉगर आणि माजी पत्रकार असलेल्या या व्यक्तीवर बेरोजगारीची वेळ आली. त्यामुळेच त्याने आयसिस भरतीचं खूळ डोक्यात घेतल्याचं लक्षात घेऊन एटीएसने त्याला मदत केली.
खारघरमध्ये पत्नी आणि दोन मुलांसह राहणाऱ्या या व्यक्तीला आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेतल्यानंतर समाज आणि नातेवाईकांनी दूर सारलं. त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी एटीएसने त्याला मदत केली.
इराकची विभागणी होऊन एका भागावर आयसिसचं राज्य असेल, आणि आपल्याला राजकीय प्रवक्तेपद मिळेल, हा त्याचा विचार होता. मुस्लीम असलो, तरी आपण देशभक्त आहोत आणि आपल्याला दहशतवादी व्हायचं नाही, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
बाजीराव'सोबत आशाताईंच्या नातीचा सेल्फी, निमित्त.
मुंबई : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई आणि बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अर्थात रणवीर सिंग यांचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका गाण्याच्या निमित्ताने दोघांची गाठ पडली आणि भेट त्यांनी कॅमेरात कैद केली.
जनाईने सुद्धा गाण्याचं शिक्षण घेतलं आहे. तिने नुकतंच ‘सिक्स पॅक’ या तृतीयपंथीयांच्या बँडसोबत एका गाण्याचे चित्रीकरण केले. याचवेळी रणवीर सिंगशी तिची भेट झाली. नातीचा सेल्फी आजी आशा भोसले यांनी हा ट्विटरवर शेअर केला आहे.
रणवीरनेही आशा भोसलेंच्या ट्वीटला उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. सोबतच आशाताईंची नात जनाईचे कौतुकही त्यानं केलं आहे. जनाई ही तिच्या आजीसारखीच प्रेमळ, प्रतिभावान आणि सुंदर आहे, असं रणवीरने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
नग्न व्हिडिओ शूट, महिला पत्रकाराला 370 कोटींची नुकसानभरपाई
न्यूयॉर्क : हॉटेलमध्ये गुपचूप नग्न व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अमेरिकन महिला क्रीडा पत्रकाराला नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. फॉक्स स्पोर्ट्सच्या 37 वर्षीय पत्रकार इरीन अँड्र्यूज यांना 5.5 कोटी डॉलर म्हणजे सुमारे 370 कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे.
2008 मध्ये नॅशविले हॉटेलमध्ये मायकल डेविड बॅरेटने इरिन यांचा गुपचूपपणे नग्न व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हा व्हिडिओ बॅरेटने ऑनलाईन पोस्ट केला. याची कुणकुण लागल्यानंतर इरिन यांनी बॅरेटसह दोन अन्य कंपन्यांवर मानहानीचा दावा ठोकला.
शिकागोतील एका विमा कंपनीत मॅनेजर असलेल्या मायकलने आपला गुन्हा कबूल केला होता. पैसे कमवण्यासाठीच आपण हे कृत्य केल्याचं त्याने मान्य केलं. जेव्हा टीएमझेड या वेबसाईटने त्याला पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला.
केशवनगर; व्हॉट्सऍपमुळे चुकली परीक्षेची वेळ
केशवनगर : व्हॉट्सऍपचे वेड लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच लागले आहे. या व्हॉट्सऍपवर येणारी माहिती ही अनेकदा चुकीची असते. परंतु, त्यावर आल्याने अनेक जण विश्वास ठेवतात. असाच विश्वास ठेवून एका विद्यार्थ्याने परीक्षेची वेळ चुकविली. व्हॉट्सऍपवरील चुकीच्या वेळापत्रकानुसार तो परीक्षा केंद्रावर गेला आणि त्याचा भूगोलाचा पेपर द्यायचा राहिला.
रोहन रमेश इंदरंगी असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. घोरपडीतील एका नगरसेवकाने बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक पोस्ट तयार केली होती. त्यामध्ये त्यांनी परीक्षेचे वेळापत्रकही टाकले होते. परंतु, भूगोलाच्या परीक्षेची वेळ चुकविली होती. या वेळेनुसार रोहन परीक्षा देण्यासाठी दुपारी 2 वाजता हडपसर येथील आर. आर. शिंदे साधना विद्यालयात गेला. तेव्हा त्याला समजले की 2 वाजता तर परीक्षा संपली. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते 2 होती. त्यानंतर या विद्यार्थ्याने घडलेला प्रकार शिक्षक शरद बोराटे यांना सांगितला. तेव्हा शिक्षकांनी त्याला आता काहीच करता येणार नाही, असे सांगितले.
लोणकर विद्यालयातील शिक्षक शरद बोराटे म्हणाले, "या प्रकारात विद्यार्थ्याचीही चूक आहे. शाळेने वेळापत्रक दिलेले असतानाही विद्यार्थी वाचत नाहीत. या विद्यार्थ्याला शाळेत भेटण्यासाठी निरोप पाठविला आहे. या झालेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांनी व्हॉट्सऍपवरचा अतिवापर करणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्याला वैकल्पिक विषय देता येईल किंवा जुलै 2016 मध्ये फेरपरीक्षेला बसता येईल.‘‘
=============================================
मुंबईतून नागपूर गाठा चार तासांत
नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर होणार; भारतीय रेल्वे मंत्रालय आणि स्पेन रेल्वेचा प्रकल्प
औरंगाबाद : स्पेनच्या मदतीने देशात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यातूनच बुलेट ट्रेनच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन हायस्पीड रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. दोन टप्प्यांत देशातील प्रमुख मार्गांवर हायस्पीड रेल्वे धावणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई ते नागपूर या नवीन मार्गाचे नियोजन असल्याची माहिती अभ्यास दौऱ्यावर आलेल्या स्पेनच्या जे. जे.ओटेटिओ यांनी गुरुवारी (ता.10) पत्रकारांना दिली. हा कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुंबई-नागपूर हे अंतर सुमारे चार तासांत कापले जाईल.
राज्याच्या राजधानी व उपराजधानीला जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याच प्रकल्पाच्या अभ्यास दौऱ्यासाठी गुरुवारी स्पेनच्या चार सदस्यीय समितीने मध्यवर्ती बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाला भेट दिली. या मार्गाविषयी रेल्वे अधिकारी आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रमुख वैशिष्ट्ये
=============================================हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची प्रमुख वैशिष्ट्ये
- मुंबई-नागपूर पहिला टप्पा
- मुंबई-कोलकाता दुसरा टप्पा
- तीन हजार किलोमीटरचे अंतर जोडले जाणार
- दीड वर्ष चालणार सर्वेक्षण
- प्रकल्पासाठी आठ वर्षांचा कालावधी अपेक्षित
- नवीन सर्व्हिस स्टेशन वाढणार आहे.
- स्वतंत्र डबल लाईनसह विविध सुविधा उपलब्ध करणार
- डोंगर घाटातून न जाता पर्यायी मार्गाचा होतोय अभ्यास
- रेल्वेस्थानक व बसस्थानक राहणार एकमेकांजवळ
- सध्याचा रेल्वेमार्ग कायम ठेवून नवीन मार्ग उभारण्याचा मानस
- भारतीय रेल्वे विकास निगम लिमेटडअंतर्गत प्रोजेक्ट
शिक्षित तरुणीचे शारीरिक संबंध हा बलात्कार नाही - उच्च न्यायालय
उच्च न्यायालयाने निकालात नोंदवले निरीक्षण
मुंबई छ शिक्षित तरुणींना शारीरिक संबंधांमुळे होणाऱ्या परिणामांची माहिती असते. त्यामुळे प्रियकराबरोबर आलेले असे संबंध सहमतीचे असून हा बलात्कार ठरू शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने निकालात नोंदवले आहे.
लग्नाच्या भूलथापा देऊन बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर गुरुवारी न्या. मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीला जामीन मंजूर करण्यास तक्रारदार तरुणीच्या वतीने विरोध करण्यात आला. या आरोपीचे तक्रारदार तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. यातूनच त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. मात्र प्रेमभंग झाल्यावर तिने त्याच्याविरोधात बलात्काराची फौजदारी फिर्याद दाखल केली. दोघांचे प्रेमसंबंध 2015 मध्ये होते आणि त्यातून ती गर्भवतीही राहिली होती. मात्र तरुणाने गर्भपात करण्यास भाग पाडले आणि मग तिच्याशी संबंध तोडले, असे तक्रारदार तरुणीचे वकील अनिकेत निकम यांनी सांगितले.
न्यायालयाने त्यांच्या युक्तिवादाचे खंडन केले. आपल्या समाजात काही प्रकारच्या बाबी गृहीत धरल्या जातात. मात्र जी मुलगी शिक्षित आणि प्रगल्भ असते तिला अशा संबंधांचे परिणाम माहीत असतात. ती त्यासाठी नकार देऊ शकते. ती नकार देत नाही तेव्हा असे संबंध सहमतीने प्रस्थापित होतात. परदेशात अशा संबंधांना तरुणीची मान्यता आहे असेच समजले जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. संबंधित आरोपीला न्यायालयाने 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
=============================================धडा शिकवण्यासाठी त्याने केला कन्हैयावर हल्ला
गुरुवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास कन्हैया प्रशासकीय इमारतीच्या परिसरात राष्ट्रीयता या विषयावर भाषण देत होता. त्यावेळी विकास चौधरी नावाचा एक तरुण त्याच्या समोर आला आणि त्याने कानफडात मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी रोखले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी अंती विकास जेएनयूचा विद्यार्थी नसून गाजियाबादचा निवासी असल्याचे समोर आले आहे. कन्हैयाला धडा शिकवण्यासाठी त्याने हल्ला केल्याचे सांगितले.
त्याला जवळच्या पोलिस स्थानकात नेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. हल्ल्याबाबत बोलताना कन्हैया म्हणाला, ‘तुम्ही मला मारण्यापूर्वी रोहित वेमुलाबद्दल विचार करा. ज्यावेळी तुम्ही एका रोहितला माराला त्यावेळी अनेक रोहित पुढे येतील. तुम्ही आता अन्य कोणाला मारण्याचा प्रयत्न केलात तर अनेक जण उभे राहतील.‘
=============================================
कर्ज, वीजबिल माफ करा'; विरोधकांनी सुनावले
मुंबई - दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिलमाफी अन् विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्क नाही, तर पूर्ण शैक्षणिक फीमाफी केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सत्ताधाऱ्यांना विधानसभेत सुनावले. सरकारचा नियोजनशून्य कारभार आणि प्रशासनावर नसलेली मांड यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा आधार तुटला असून, दिलासा देणारा एकही निर्णय होत नसल्याने आत्महत्या वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नियम २०९३ अन्वये प्रस्ताव मांडत राज्यातल्या भीषण दुष्काळाबाबत आज चर्चा उपस्थित केली. या चर्चेत सहभागी होताना राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. वर्षभरात ३६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतानाही सरकार अजूनही वाटच पाहत असल्याची खंत विखे पाटील यांनी केली. शेतकऱ्यांसाठी समुपदेशन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप केंद्रे स्थापन झालेली नाहीत. त्यामुळे आता सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांचेच समुपदेशन करण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली. हे सरकार बळिराजाचं नसून व्यापाऱ्यांचे आहे. हजारो कोटी रुपयांची कर्जमाफी व्यापाऱ्यांना दिली जात आहे. एलबीटी माफ केला जात आहे, पण बळिराजाचे कर्ज माफ करण्यास सरकार तयार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. दुष्काळाच्या चर्चेत शिवसेनेचे आमदार काय बोलतात याबाबतची उत्सुकता होती.
मागील वर्षीच्या सर्व अधिवेशनात शिवसेना आमदार गुलाबराव पाटील व अर्जुन खोतकर यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेच्या या दोन तोफा सत्तेत असतानाही सरकारच्या चुकांवर कुठेही पांघरूण घालताना दिसले नव्हते. मात्र, आज दुष्काळी चर्चेच्या वेळी विधानसभा अध्यक्षांनी गुलाबराव पाटील यांचे नाव पुकारले, त्या वेळी त्यांनी हात जोडून मी बोलणार नाही असे बसूनच सूचित केले. यामुळे विरोधी बाकावरील आमदारांना आश्चर्याचा धक्का बसला.
=============================================
No comments:
Post a Comment