[अंतरराष्ट्रीय]
१- भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर आढळले बोगदा
२- वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढणाऱयाचा मृत्यू
३- पाक: क्रिकेट सामना हरल्याने एकाची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- स्टेट बँकेकडून विजय मल्ल्यांच्या अटकेची मागणी, देश सोडणार असल्याचा संशय
५- कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर, संघानं प्रतिक्रिया द्यावी इतका मोठा नाही: RSS
६- भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं : कन्हैया
७- लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन
८- 'मोहन भागवतजी, तुमच्या प्रचारकांना ज्ञान द्या - दिग्विजयसिंह
९- वर्णद्वेषाबद्दल राहुल गांधींना भाजप देणार नोटीस
१०- खासगी क्षेत्रातील आरक्षणावर मोदींचे मौन!- समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- मुख्यमंत्र्यांसह 25 मंत्री आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यात
१२- मुंबईवर पावसाचा शिडकाव, नाशकात मुसळधार
१३- मुंबईत लॅन्ड करताना विमान रनवेच्या बाहेर, वेळापत्रक कोलमडलं
१४- राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार : बापट
१५- औसा; सोनालीच्या निर्धाराला आमदारांची साथ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- खर्रामुळे वैदर्भियांचा घात, तोंडाच्या कॅन्सरमध्ये नागपूरकर अव्वल
१७- कल्याणमध्ये 15 लाखांच्या खंडणीसाठी 7 वर्षांच्या नयनचा निर्घृण खून
१८- धुळे; 10 लाख मनपात भरा, तरच पुढील साक्षीला येईन : प्रवीण गेडाम
१९- कोलकाता; 'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान
२०- जयपूर; ७७ वर्षांची व्यक्ती तब्बल ४७ व्यांदा देणार दहावीची परीक्षा
२१- जेवळी; पाण्याच्या एका एका घागरीसाठी संघर्ष
२२- छत्तीसगढ; नक्षलवाद्यांशी चकमक; 2 जवान हुतात्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 10 हजारात फिंगरप्रिंट सेंसर, शाओमीचा 'रेडमी नोट 3' लाँच
२४- एकाच दिवशी टीम इंडियाचे दोन क्रिकेटर बोहल्यावर
२५- 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरचा गुपचूप विवाह
२६- आशिय चषक: भारताकडून युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ४४ अर्ज दाखल
२८- महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समिती जिल्हास्तरीय कार्यकारणी जाहीर
२९- दिग्रस शिवारातील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला
३०- भाजप महानगर कार्यकारणीच्या घोषणेने उठविले निष्ठावंतांच्या असंतोषांचे वादळ
३१- मुंबईत कार्यरत पोलीस निरीक्षकावर नांदेडमध्ये गुन्हा
३२- बारडच्या युवकांकडून व्यसनमुक्तीचा संदेश
३३- विषबाधेतून पाच जनावरांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनोजराज भंडारी, संतोष साखरे, मुलाराम पोत्लीया, कपिल तळणीकर, नील राचेवार, हरी केदार, राजेश्वर पिल्लेवार, प्रसाद शिंदे, दिनेश रेड्डी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
==========================================

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार : बापट

==========================================
==========================================

==========================================
==========

================================

==========================================

==========================================
==========================================
==========================================
==========================================
सोनालीच्या निर्धाराला आमदारांची साथ
औशाचे बसवराज पाटील देणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीला नोकरी
==========================================
'मोहन भागवतजी, तुमच्या प्रचारकांना ज्ञान द्या - दिग्विजयसिंह
भागवत यांनी गुरूवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या देशातील नव्या पिढीला भारत माता की जय म्हणा असे सांगावे लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे टीका केली आहे. "होय, मोहन भागवतजी भारताला "वसुधैव कुटुंबकम्‘ साठी मानले जाते. सर्वधर्मसमभाव हा भारताचा आदर्श आहे. तुमच्या प्रचारकांना हे ज्ञान द्या‘, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. याशिवाय जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कन्हैय्याचे भाषण दाखविणाऱ्या एका वृत्तवाहिनीवर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करणार का?, असा प्रश्नही दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे.
==========================================
पाण्याच्या एका एका घागरीसाठी संघर्ष
वडगावातील सर्व हातपंप कोरडे
वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढणाऱयाचा मृत्यू
वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पिस्तुलाचा चाप ओढला गेल्याने डोक्यात गोळी घुसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘त्रेचाळीस वर्षांचा नागरिक व त्याची मैत्रिण मिळून सेल्फी काढत होते. यावेळी नागरिकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या हातून चाप ओढला गेल्याने गोळी थेट डोक्यात घुसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मैत्रिणीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.‘
दरम्यान, गेल्या वर्षी सेल्फी घेताना जगभरामध्ये किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
==========================================
वर्णद्वेषाबद्दल राहुल गांधींना भाजप देणार नोटीस

नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये वर्णद्वेष पसरविणारे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष त्यांना नोटीस बजावणार आहे.
गांधी यांनी लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान "फेअर ऍण्ड लव्हली‘ चा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन मेघपाल म्हणाले, ‘काळा पैसे समोर आणण्याच्या सरकारच्या योजनेला "फेअर ऍण्ड लव्हली‘ योजना म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. वर्णद्वेषाप्रमाणे भासणाऱ्या ‘फेअर ऍण्ड लव्हली‘च्या जाहिरातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यातून काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये भेदभाव निर्माण होतो. तसेच उत्तर व दक्षिण भागामध्ये (देशाच्या या भागात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये) भेदभाव निर्माण होतो. जुन्या पक्षाकडून जबाबदार पदावर असताना अशा प्रकारचे वक्तव्य अस्वीकार्य आहे.‘ या प्रकरणी भारतीय जनता पक्ष त्यांना (राहुल गांधी) नोटीस बजावणार असल्याचेही मेघपाल यांनी यावेळी सांगितले.
==========================================
पाक: क्रिकेट सामना हरल्याने एकाची आत्महत्या

लाहोर (पाकिस्तान) - पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागल्याने 50 वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पंजाब सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद शफिक नावाच्या व्यक्तीने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी पाकच्या बाजूने सट्टा लावला होता. याकामी त्याचा भाऊ मोहम्मद रमझाननेही त्याला मदत केली होती. त्यांनी वेतनातून मिळालेले 30 हजार रुपये सट्ट्यामध्ये लावले होते. मात्र या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्याने त्यांना ही रक्कम गमवावी लागली. यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या मोहम्मद शफिकने जुन्या अनारकली परिरसरातील सिंचन विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत बोलताना मोहम्मद रमझानने सांगितले की, सामन्यातील सट्ट्यावर पैसे हरल्याने आपल्या भावाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून मोहम्मद शफिक क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती या प्रकरणातील तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने दिली.
==========================================
छातीसगढ; नक्षलवाद्यांशी चकमक; 2 जवान हुतात्मा
सुकमा (छत्तीसगड) - सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले असून इतर 14 जण जखमी झाले आहेत.
सुकमा जिल्ह्यातील बस्तर परिसरात दब्बानरका येथे गुरुवारी दुपारी साडे बाराच्या गस्तीवर असलेल्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने चकमक सुरू झाली. ती चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान दोन जवान हुतात्मा झाले आहेत. सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांनी संयुक्त नक्षलवाद्यांविरूद्ध संयुक्त मोहिम उघडली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही.
==========================================
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर आढळले बोगदा
श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)जवानांना एक बोगदा आढळून आला आहे. या भुयारातून दहशतवादी घुसखोरी करत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
‘बीएसएफ‘चे महासंचालक राकेश शर्मा यांनी सांगितले की, ‘भारत-पाक सीमेवर जवानांना एक छिद्र आढळून आले. जवानांनी तेथे खोदले असता 30 मिटर लांब व 10 ते 12 फुट उंच व 3 ते 4 फुट रुंदीचे एक मोठा बोगदा आढळून आला. हा बोगदा पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना या बोगद्यातून पाठविण्यासाठी प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे.‘
पाकिस्तानमधील अफजल चौकीजवळ हा बोगदा जात आहे. सुरुंग इंग्रजी एल अक्षराच्या आकाराचे आहे. यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बैठकीचे आयोजन करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. परंतु, त्यांनी वादग्रस्त ठिकाण असल्यामुळे प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
==========================================
खासगी क्षेत्रातील आरक्षणावर मोदींचे मौन!
नवी दिल्ली - खासगी क्षेत्रात मागास व इतर मागासवर्गीयांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाबाबतचा कायदा करण्याबाबत नरेंद्र मोदी सरकारनेही मौन बाळगले आहे. सरकार याबाबत सकारात्मक असले, तरी संबंधित घटकांमध्ये अशा आरक्षणाबाबत सर्व सहमती नाही, असे सांगून राज्यसभेत समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी या प्रश्नावर हात झटकले.
खासगी क्षेत्रांतही मागास व इतर मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांप्रमाणे आरक्षण मिळावे, याबाबत डी. राजा, पवन वर्मा व इतरांनी आज विचारलेल्या प्रश्नावर गेहलोत यांनी स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. गेहलोत म्हणाले, की "यूपीए‘ सरकारने या प्रश्नावर 2004 व 2006 मध्ये उच्चस्तरीय समिती नेमली होती. पंतप्रधानांच्या सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकारी यात आहेत. समितीने फिक्की, असोचेम, सीआयआय यासह राज्याराज्यांतील उद्योग संस्थांबरोबर अनेकदा बैठका घेतल्या. ओबीसी आयोगाने नुकताच म्हणजे 8 फेब्रुवारीला यावर एक अहवाल दिला. त्यानुसार ओबीसींसाठी खासगी क्षेत्रात 27 टक्के आरक्षणाची शिफारस केली गेली आहे. या आयोगाने ती आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन केल्याचे सरकारचे मत आहे. कारण मागासवर्गीयांसाठी सध्या असलेले साडेबावीस टक्के आरक्षण व नवे आरक्षण पाहता ही मर्यादा न्यायालयाने घातलेल्या मर्यादेच्या बाहेर जाते. हा पेच सरकारला सोडवावा लागणार आहे. यावर सरकार आणखी एक समिती नेमणार आहे. प्रश्न हा आहे की यावर संबंधितांतच अजून सर्व सहमती झालेली नाही.
==========================================
१- भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर आढळले बोगदा
२- वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढणाऱयाचा मृत्यू
३- पाक: क्रिकेट सामना हरल्याने एकाची आत्महत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- स्टेट बँकेकडून विजय मल्ल्यांच्या अटकेची मागणी, देश सोडणार असल्याचा संशय
५- कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर, संघानं प्रतिक्रिया द्यावी इतका मोठा नाही: RSS
६- भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं : कन्हैया
७- लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन
८- 'मोहन भागवतजी, तुमच्या प्रचारकांना ज्ञान द्या - दिग्विजयसिंह
९- वर्णद्वेषाबद्दल राहुल गांधींना भाजप देणार नोटीस
१०- खासगी क्षेत्रातील आरक्षणावर मोदींचे मौन!- समाजकल्याणमंत्री थावरचंद गेहलोत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- मुख्यमंत्र्यांसह 25 मंत्री आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यात
१२- मुंबईवर पावसाचा शिडकाव, नाशकात मुसळधार
१३- मुंबईत लॅन्ड करताना विमान रनवेच्या बाहेर, वेळापत्रक कोलमडलं
१४- राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार : बापट
१५- औसा; सोनालीच्या निर्धाराला आमदारांची साथ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- खर्रामुळे वैदर्भियांचा घात, तोंडाच्या कॅन्सरमध्ये नागपूरकर अव्वल
१७- कल्याणमध्ये 15 लाखांच्या खंडणीसाठी 7 वर्षांच्या नयनचा निर्घृण खून
१८- धुळे; 10 लाख मनपात भरा, तरच पुढील साक्षीला येईन : प्रवीण गेडाम
१९- कोलकाता; 'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान
२०- जयपूर; ७७ वर्षांची व्यक्ती तब्बल ४७ व्यांदा देणार दहावीची परीक्षा
२१- जेवळी; पाण्याच्या एका एका घागरीसाठी संघर्ष
२२- छत्तीसगढ; नक्षलवाद्यांशी चकमक; 2 जवान हुतात्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 10 हजारात फिंगरप्रिंट सेंसर, शाओमीचा 'रेडमी नोट 3' लाँच
२४- एकाच दिवशी टीम इंडियाचे दोन क्रिकेटर बोहल्यावर
२५- 'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरचा गुपचूप विवाह
२६- आशिय चषक: भारताकडून युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ४४ अर्ज दाखल
२८- महात्मा बसवेश्वर पुतळा कृती समिती जिल्हास्तरीय कार्यकारणी जाहीर
२९- दिग्रस शिवारातील बंधाऱ्याचे दरवाजे चोरीला
३०- भाजप महानगर कार्यकारणीच्या घोषणेने उठविले निष्ठावंतांच्या असंतोषांचे वादळ
३१- मुंबईत कार्यरत पोलीस निरीक्षकावर नांदेडमध्ये गुन्हा
३२- बारडच्या युवकांकडून व्यसनमुक्तीचा संदेश
३३- विषबाधेतून पाच जनावरांचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनोजराज भंडारी, संतोष साखरे, मुलाराम पोत्लीया, कपिल तळणीकर, नील राचेवार, हरी केदार, राजेश्वर पिल्लेवार, प्रसाद शिंदे, दिनेश रेड्डी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनात नेहमी जिंकण्याची अशा नसावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते
(साईनाथ शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
==========================================
स्टेट बँकेकडून विजय मल्ल्यांच्या अटकेची मागणी, देश सोडणार असल्याचा संशय
मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियाने मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या अटकेची मागणी केली आहे. विजय मल्ल्या यांचा पासपोर्टही जप्त करण्यात यावा अशी मागणी एसबीआयने केली. विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी उचललेलं सात हजार कोटी रूपयाचं कर्ज थकलेलं आहे.
या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने बंगळुरूच्या कर्ज वसुली लवादाकडे दाद मागितली आहे. कर्ज वसुली लवाद म्हणजे डेट रिकव्हरी ट्रिब्युनलकडे मल्ल्याविरोधात कारवाईची मागणी करताना स्टेट बँकेने त्यांच्या अटकेची तसंच पासपोर्ट जप्त करण्याचीही मागणी केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला सात हजार कोटी रूपयांचा कर्जपुरवठा केला आहे.
बंगळुरूच्या कर्ज वसुली लवादामध्ये स्टेट बँकेच्या वतीने चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक मल्ल्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी, दुसरा मल्ल्यांचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी तर तिसरा मल्ल्या यांना डियाजिओकडून मिळणाऱ्या 75 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 500 कोटी रूपयांवर स्टेट बँकेचा पहिला हक्क आहे, हे सांगण्यासाठी आहे. तसंच चौथा अर्ज मल्ल्या यांची देशा-विदेशातील सर्व चल-अचल संपत्ती जप्त करावी या मागणीसाठी आहे.
मल्ल्या यांची यूबी म्हणजे यूनायडेट स्पिरीट ही कंपनी इग्लंडच्या डियाजिओ या मद्य कंपनीने विकत घेतली. त्या बदल्यात मल्ल्या यांना मिळणाऱ्या 500 कोटी रूपयांमधून स्टेट बँकेला सर्व प्रथम वसुली करण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही स्टेट बँकेने केली.
कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर, संघानं प्रतिक्रिया द्यावी इतका मोठा नाही: RSS
मुंबई: जेएनयूत कन्हैयाकुमारने दिलेल्या भाषणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कन्हैया म्हणजे टोपीवाला उंदीर असं म्हणत, मनमोहन वैद्यांनी त्याच्या भाषणावर टीका केली.
संघाने प्रतिक्रिया द्यावी इतकं कन्हैयाचं भाषण मोठं नाही असंही वैद्य म्हणाले. त्यामुळे आमच्या प्रतिक्रियेपेक्षा कोर्टानं कन्हैयाविषयी जे मत नोंदवलं आहे ते अधिक गंभीर असल्याचं वैद्य यांनी स्पष्ट केलं.
कन्हैयाच्या भाषणावर काय म्हणाले संघाचे प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य:
कन्हैयाचं भाषण संघानं प्रतिक्रिया देण्यासारखं नाही. मात्र, मी जेव्हा दुसऱ्या वर्गात होतो तेव्हा मला एक धडा होता. एका उंदराला एक सुंदर टोपी मिळाली ज्यावर एक गोंडा होता.त्या उंदरानं ती टोपी घातली आणि बाजारात दिमाखात फिरू लागला.
त्याचवेळी ओरडूही लागला की माझ्या टोपीसारखी टोपी तर राजाकडेही नाही. ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजानं सैनिकांकरवी त्याला पकडून दरबारात आणलं. त्यावरही उंदरानं आपलं हेच म्हणणं कायम ठेवलं. राजानं त्याची टोपी काढून घेतली. तर उंदीर ओरडायला लागला की राजा भिकारी माझी टोपी घेतली.
भारतापासून नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं : कन्हैया
नवी दिल्ली : देशद्रोहाचा आरोप असलेला जेएनयू छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारची आज तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर जेएनयूमध्ये त्याचं हिरोसारखं स्वागत झालं. कन्हैयाने जेएनयू कॅम्पसमध्ये भाषण करत मोदी सरकारवर सडकून टीका केली.
पंतप्रधान मोदी मन की बात करतात, पण ऐकत नाहीत, या शब्दांत त्याने मोदींना टोला लगावला. तसंच भाजप सरकारने कारस्थान रचून मला जेलमध्ये टाकल्याचा आरोप कन्हैय्याने केला. आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य नाही तर भारतामध्ये स्वातंत्र्य हवं, असंही कन्हैया म्हणाला.
कन्हैयाने मोदींसोबतच एबीव्हीपीवरी जोरदार हल्ला चढवला. “आम्ही ABVP ला शत्रू मानत नाही, विरोधक मानतो. ABVP ने जेएनयूमधील त्यांचा पराभव आठवावा. मी ABVP ची शिकार करणार नाही, कारण शिकार त्यांचीचे केली जाते, जे शिकारीसाठी लायक आहेत,” असं कन्हैया कुमार म्हणाला.
मुंबईवर पावसाचा शिडकाव, नाशकात मुसळधार
मुंबई : राज्यातील विविध भागात हजेरी लावलेल्या अवकाळी पावसाने मुंबईसह ठाण्याच्या अनेक भागात शिडकाव केला. मुंबईत बोरिवली-कांदिवली परिसरात पावसाने हजेरी लावली. तर ठाणे-वसई-विरार भागातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.
याशिवाय काही भागात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. उष्णता वाढत असतानाच पावसाच्या शिडकाव्यामुळे मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
तिकडे मुंबईजवळच्या पालघर जिल्ह्यातही पाऊस पडत आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस संपूर्ण मुंबई व्यापणार असंच चित्र पाहायला मिळत आहे.
नाशकातही दमदार पाऊस
मुंबईसह नाशकात पहाटे 5 वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून नाशिक आणि जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सलग पाच दिवस पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतीवर पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे.
मुख्यमंत्र्यांसह 25 मंत्री आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यात
कृषीमंत्री एकनाथ खडसे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळ दौऱ्यावर अनुपस्थित
मुंबई: मुख्यमंत्र्यांसह राज्यमंत्रिमंडळातले अनेक मंत्री आज मराठवाड्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री लातूरला पोहोचतील. त्यानंतर लाबोटा गावाला भेट देती.
इतर मंत्रीही आज ट्रेननं नेमून दिलेल्या तालुक्याच्या दौऱ्यावर जातील. दुपारी 1 वाजता निलंग्यामध्ये अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली जाणार आहे आणि संध्याकाळी सहा वाजता सर्व मंत्र्यांची लातूरला आढावा बैठक होणार आहे. राज्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, प्रशासनानं पोहोचवलेल्या सर्व सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळतोय का? याचा आढावा मंत्री घेणार आहेत.
दरम्यान, राज्यमंत्रिमंडळाच्या दुष्काळ दौऱ्याला कालपासून सुरुवात झाली. कॅबीनेटमधल्या तीन मंत्र्यांनी मराठवाड्यातील 3 दुष्काळग्रस्त तालुक्यांना भेट दिली. तर उर्वरित मंत्री काल रात्री लातूर एक्स्प्रेसनं मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
10 हजारात फिंगरप्रिंट सेंसर, शाओमीचा 'रेडमी नोट 3' लाँच
मुंबई : चायनीज कंपनी शाओमीने आणखी एक भन्नाट स्मार्टफोन बाजारात आणला आहे. शाओमीने ‘रेडमी नोट 3’ लाँच केला आहे. जबरदस्त फीचर्समुळे हा फोन अनेक मोठ्या कंपन्यांना टक्कर देईल, अशी आशा कंपनीला आहे.
‘रेडमी नोट 3’ या फोनची किंमत 9,999 रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे शाओमीचा हा पहिला फिंगरप्रिंट सेंसरचा फोन आहे. या फोनचा फिंगरप्रिंट सेंसर इतका फास्ट आहे की तो अवघ्या 3 सेकंदात काम सुरु करतो.यापूर्वी शाओमीने त्यांचा सर्वात महागडा फोन mi5 मध्येही फिंगरप्रिंट सेंसर दिला नव्हता. तो ‘रेडमी नोट 3’ या फोनमध्ये दिला आहे.
या फोनच्या 3GB रॅम असलेल्या मॉडेलची किंमत 11,999 रुपये आहे.
‘रेडमी नोट 3’चे फीचर्स
*डिस्प्ले : 5.5 इंच
*रेझुलेशन :1080X1920
* भारतातील पहिला स्नॅपड्रॅगन 650 प्रोसेसर
*5 मेगापिक्सल फ्रंट, 16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, झूम केल्यानंतरही फोटो फाटणार नाही
*कॅमेऱ्यामध्ये ऑटोफोकस
*सेल्फी फोटोची क्वालिटी उत्तम असल्याचा दावा
*फिंगरप्रिंट सेंसर
* मेटल बॉडीमुळे पाठीमागील बाजू दणकट
* बॅटरी 4050mAh : कंपनीचा दावा – नेक्सस6 पी, गॅलेक्सी नोट 5 आणि एचटीसी या फोनपेक्षाही जास्त बॅकअप देत असल्याचा दावा.
*भारतातील चारही LTE बँड सपोर्ट करण्याची क्षमता या फोनमध्ये आहे.
==========================================
मुंबईत लॅन्ड करताना विमान रनवेच्या बाहेर, वेळापत्रक कोलमडलं
मुंबई: काल रात्री दहाच्या सुमारस मुंबई विमानतळावर जेट एअरवेजचं विमान रनवेच्या बाहेर गेलं. नवी दिल्लीवरून मुंबईसाठी निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते विमान रनवेवर आदळलं. त्यामुळं हे विमान मुंबई विमानतळावर लँडींगच्या वेळी रनवेच्या बाहेर गेलं.
सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नसून सर्व प्रवासी सुखरुप आहेत. दरम्यान विमानाला मध्यरात्री रनवेवर आणण्यात आलं. मात्र या घटनेचा परिणाम थेट विमानसेवेवर झाला. या प्रकारानंतर काही काळ प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं.
त्यामुळं अनेक विमानांना उडाणासाठी जवळपास 3 तास उशीर झाला. तर काही विमानं अहमदाबादकडं वळवण्यात आली.
आशिय चषक: भारताकडून युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा
मिरपूर : महेंद्र सिंह धोनीच्या टीम इंडियाने युएईचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून ट्वेन्टी-20 आशिया चषकात आपला सलग चौथा विजय साजरा केला. भारतीय संघाने या सामन्याआधीच आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
यामुळं टीम इंडियानं या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हरभजन सिंग आणि पवन नेगी ही म्यानातली अस्त्रंही परजून पाहिली. या पार्श्वभूमीवर युएईवरचा दणदणीत विजय हा भारतीय संघाचा फायनलसाठीचा आत्मविश्वास उंचावणारा ठरला आहे.
आशिया चषकात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अवघ्या 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माला लय सापडली. रोहितने 28 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि एका षटकारासह 39 धावांची खेळी केली. रोहित बाद झाल्यावर शिखर धवनने नाबाद 16 तर युवराज सिंहने नाबाद 25 धावांची खेळी करुन भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी युएईला वीस षटकांत 9 बाद 81 धावांवर रोखलं होतं. भारताकडून भुवनेश्वर कुमारने दोन विकेट्स काढल्या, तर जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, हरभजन सिंह, पवन नेगी आणि युवराज सिंहनं प्रत्येकी एक विकेट काढून भारताच्या विजयाला हातभार लावला.
राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार : बापट
मुंबई : येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलेंडर आणि रॉकेलचे दर कमी होणार आहेत. ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी यासंदर्भातील माहिती दिली. पेट्रोलवर 95 पैसे, डिझेलवर 66 पैसे आणि घरगुती इंधनावर काही प्रमाणात सूट मिळणार आहे.
तेल कंपन्यांकडून लावला जाणारा अधिभार कमी करण्यासाठी गिरीष बापट यांनी आज पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला.
तेल कंपन्या राज्य विशेष अधिभाराद्वारे अतिरिक्त वसुली करत असल्याची तक्रार फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिशने केली होती. यानंतर बापट यांनी तेल कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत तेल कंपन्यांनी अतिरिक्त वसुली केल्याचं मान्य केलं. त्यानंतर तेल कंपन्यांनी राज्य विशेष अधिभार कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पाठवला होता.
या प्रस्तावाचा पाठपुरावा करत बापट यांनी आज प्रधान यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्र्यांनीही या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे येत्या आठ दिवसांत राज्यात पेट्रोल, डिझेल तसंच घरगुती इंधनावरही काही प्रमाणात सूट मिळेल.
==========================================
एकाच दिवशी टीम इंडियाचे दोन क्रिकेटर बोहल्यावर
मुंबई : एकाच दिवशी टीम इंडियाचे दोन क्रिकेटर विवाहबद्ध झाले आहेत. भारताचा जलदगती गोलंदाज धवल कुलकर्णी आणि धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पा आज लग्नाच्या बेडीत अडकले.
मुंबईतील एका खासगी सोहळ्यात धवल कुलकर्णी श्रद्धा खरपुडेसह विवाहबद्ध झाला. श्रद्धा व्यवसायाने फॅशन कोऑर्डिनेटर आहे. श्रद्धा ही महाराष्ट्र पोलिसातून निवृत्त झालेले अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रल्हाद खरपुडे यांची कन्या आहे.
तर बंगलोरमधील शानदार सोहळ्यात रॉबिन उथप्पाने टेनिसपटू शीतल गौतमसोबत आयुष्यभरासाठी लगीन गाठ बांधली.
धवल आणि श्रद्धाचा विवाह मराठमोळ्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्यात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. श्रद्धाने नऊवारी साडी परिधान केलं होती.
तर रॉबिन उथप्पा आणि शीतल गौतम यांचा लग्न ख्रिश्चन विधी आणि पंरपरेनुसार पार पडला. रॉयल ब्लू रंगाचा ब्लेझर घातलेला रॉबिन आणि व्हाईट गाऊन परिधान केलेली शीतल अतिशय सुंदर दिसत होते.
'रंगीला' गर्ल उर्मिला मातोंडकरचा गुपचूप विवाह
मुंबई : प्रिती झिंटानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री बोहल्यावर चढली आहे. मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज विवाहबद्ध झाली आहे. काश्मिरमधील बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीरसोबत 42 वर्षीय उर्मिलाने लगीनगाठ बांधली आहे.
या विवाहसोहळ्याला फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राशिवाय इतर कोणीही बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित नव्हते. पण तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी मात्र विवाहला हजेरी लावली.
उर्मिला मातोंडकरनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विवाहाला कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. हा कौटुंबिक सोहळा असल्याने आम्ही त्याबाबत अतिशय गुप्तता पाळली. आमच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा द्या, असं उर्मिला मातोंडकरने सांगितलं.
रंगीला, सत्या, भूत यांसारख्य अनेक चित्रपटांमधील उर्मिलाच्या भूमिका प्रचंडा गाजल्या. मोठ्या पडद्यानंतर ती छोट्या पडद्यावर रमली. ती अनेक रिअॅलिटी शोची जज होती.
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने दोनच दिवसांपूर्वी 10 वर्ष लहान बॉयफ्रेण्डसोबत वयाच्या 41 वर्षी विवाह केला होता.
==========
खर्रामुळे वैदर्भियांचा घात, तोंडाच्या कॅन्सरमध्ये नागपूरकर अव्वल
नागपूर : खर्रा… विदर्भात एकही पान टपरी अशी सापडणार नाही, जिथे हा खर्रा मिळत नाही. मात्र या खर्राने हजारो विदर्भावासियांना मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. नागपूर हे देशाची ‘मावा किंवा खर्रा राजधानी’ बनली आहे, असं रिजनल कॅन्सर सेंटर्सच्या बैठकीत समोर आलं आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार विदर्भात चार हजारहून अधिक लोकांना कॅन्सरने ग्रासलं आहे.
तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये महिलांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे.
नागपुरात निकोटिन सेवनाचे गुटखा, खर्रा, तंबाकू आणि सिगरेट हे चार प्रकार आहेत. आता गुटख्यावरी बंदी असली तरी तो सर्रास मिळतो.
खर्रासारख्या तंबाखुजन्य पदार्थापासून लोकांना कसं दूर ठेवायचं असा प्रश्न डॉक्टरांना सतावत आहे. कारण तंबाखूच्या व्यसनाच्या विळख्यात अल्पवयीन मुलंही अडकू लागले आहेत.
कल्याणमध्ये 15 लाखांच्या खंडणीसाठी 7 वर्षांच्या नयनचा निर्घृण खून
कल्याण : कल्याण-डोंबिवली ही शहरं पुन्हा एकदा अपहरणाच्या घटनेने हादरली आहेत. 15 लाखांच्या खंडणीसाठी सात वर्षांच्या नयन जैन या चिमुरड्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
नयनच्या वडिलांच्या दुकानात काम करणाऱ्या राजेंद्र दुबेनंच नयनच्या अपहरणाचा कट आखला होता. त्याच्या सुटकेसाठी आरोपींनी 15 लाखांची खंडणी मागितली होती. नयनच्या वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन घडलेल्या प्रकराची माहिती दिली.
पोलिसांची 300 पथकं नयनचा शोध घेती. मोठ्या शिताफिने तपास करत पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. खंडणीचे पैसे घेण्यासाठी आरोपी ज्या ठिकाणी येणार होते, त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला. राजेंद्र मोरेसह विजय दुबे आणि खुशवाह या दोन साथीदारांनी पकडण्यात पोलिसांना यश आलं खरं, मात्र नयनला वाचवण्यात ते अपयशी ठरले. कारण राजेंद्र मोरे आणि त्याच्या साथीदारांनी नयनची हत्या करुन त्याचा मृतदेह मुरबाडी नदीत फेकला होता.
दरम्यानच्या काळात कल्याण-डोंबिवली परिसरात खंडणीसाठी सहा मुलांचं अपहरण झालं असून त्यापैकी चौघांची हत्या करण्यात आली आहे. अपहरण आणि हत्यासत्रामुळे कल्याण-डोंबिवली परिसरातील पालकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
10 लाख मनपात भरा, तरच पुढील साक्षीला येईन : प्रवीण गेडाम
धुळे : डॉ. प्रवीण गेडाम… नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची धुरा संभाळणारे तरुण आयएएस अधिकारी. आपल्या कार्यशैलीसाठी प्रवीण गेडाम चांगलेच प्रसिद्ध आहेत. मात्र सध्या गेडाम यांची चर्चा सुरू आहे, ती त्यांनी केलेल्या एका न्यायालयीन अर्जामुळे.
वेळ वाया घालवणाऱ्या आरोपींच्या वकिलांनी नाशिक मनपात 10 लाख रुपये भरावे, तरच पुढील साक्षीला येईन, असा अर्ज नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी धुळे न्यायालयात केला आहे.
सुरेश जैनसारख्या नेत्यांना तुरुंगाची हवा खायला भाग पाडणाऱ्या जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात, डॉ. प्रवीण गेडाम तक्रारदार आणि साक्षीदारही आहेत. मात्र या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांकडून चालढकलपणा सुरु असल्याचा आरोप प्रवीण गेडाम यांनी केला आहे. आयुक्तासारख्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी प्रवीण गेडाम यांनी आरोपींच्या वकिलांकडून दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
घोटाळे, भ्रष्टाचार किंवा इतर फौजदारी खटल्यात जेवढा विलंब होतो, तेवढा तो खटला कमकुवत होतो. मात्र वकिलांच्या या वेळकाढूपणाला डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. तसंच नुकसान भरपाई मागितली आहे.
लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन
- नवी दिल्ली, दि. ४ - लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांचं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. दिल्लीतील राहत्या घऱी ह्रद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे. 1996 ते 1998 काळात पी ए संगमा 11 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पी ए संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र 2004 मध्ये शरद पवार युपीएत समील झाल्यानंतर त्यानी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता.लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत पी ए संगमा यांच्या निधनाची माहिती दिली. लोकसभेत पी ए संगमा यांना आदरांजली वाहिण्यात आली. आदरांजली वाहिल्यानंतर लोकसभेचं कामकाज मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. लोकसभेचं कामकाज हसतमुखाने कसं कराव हे मी पी ए संगमा यांच्याकडून शिकल्याची भावना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. पी ए संगमा यांचा लोकसभा अध्यक्षपदाचा कार्यकाळ न विसरण्यासारखा असल्याचं मोदी बोलले आहेत.
'पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्यास शीर उडवू - भाजपा नेते दिलीप घोष यांचे वादग्रस्त विधान
- कोलकाता, दि. ४ - सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त विधानांच्या काळात पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानेही भर टाकली आहे. ' पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणा-याचे शीर उडवण्यात येईल' असा धमकीवजा इशारा भाजपाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिला. बुधवारी बीरभूम येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी हे विधान केल्याचे समजते.' नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारची पाकिस्तान व बांग्लादेशविरोधातील भूमिका कठोर आहे. आता दिवस बदलले आहेत, आम्ही अशा गोष्टी बिलकूल खपवून घेणार नाही. जर कोणीही पाकिस्तान जिंदाबाद वा देशविरोधी घोषणा दिल्यास त्यांना वरून ६ इंच कापण्यात येईल. जे कोणीही राष्ट्रविरोधी घोषणा देतील त्यांनी कठोर शिक्षा करण्यात येईल' असे घोष यांनी स्पष्ट केले.दरम्यान या आठवड्यातच भाजपाच्या आणखी दोन नेत्यांवर आक्षेपार्ह व वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी आग्रा येथील शोकसभेत आक्षेपार्ह जातीय वक्तव्य केले होते, त्यावरून गदारोळही निर्माण झाला होता. तसेच भाजपाचे आणखी एक नेते बाबूलाल यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती.
७७ वर्षांची व्यक्ती तब्बल ४७ व्यांदा देणार दहावीची परीक्षा
- जयपूर, दि. ४ - एखादी व्यक्ती कोणत्याही परीक्षेत किती वेळा नापास होऊ शकेल ? एक, दोन वा जास्तीत जास्त १० वेळा! पण राजस्थानमधील शिवचरण यादव हे ७७ वर्षीय इसम गेल्या ४६ वर्षांपासून १०वीची परीक्षा देत असून प्रत्येक वेळेस एखादा विषय राहिल्याने ते नापास झाले आहेत. यावर्षी १० मार्चपासून बोर्डाची परीक्षा सुरू होणार असून ते ४७ व्यांदा परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे इतक्या वेळा अपयश मिळूनही ते खचले नसून कोणत्याही परिस्थितीत आपण या परीक्षेत उत्तीर्ण होऊच, असा निर्धार करून ते यंदाही रात्रभर जागून अभ्यास करण्यात मग्न आहेत.राजस्थनाच्या अलवर जिल्ह्यातील खोहारी गावात राहणारे ७७ वर्षांचे शिवचरण यादव हे वाड-वडिलांच्या काळापासून असलेल्या घरात एकटेच राहतात. येत्या १० मार्चपासून राज्यातील दहावीची परीक्षा सुरू होणार असून यावर्षी तरी आपण नक्की यशस्वी होऊ असा विश्वास त्यांना आहे. आणि जोपर्यंत १० वी उत्तीर्ण होणार नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही असा 'पण' त्यांनी केला आहे.शिवचरण सांगतात, ' १९६८ साली मी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली, मात्र त्यावर्षी मी नापास झालो. तेव्हापासून असंच सुरू आहे, मी काही विषयांत उत्तीर्ण होतो, पण माझे इतर काही विषय अडकतात. जर गणित आणि विज्ञानात चांगले मिळाले तर मी हिंदी आणि इंग्रजीत नापास होता. सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९५ साली मी दहावी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अगदीच नजीक पोहोचलो, त्यावर्षी मी जवळजवळ सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालो, पण नेमका गणितात नापास झालो. पण तरीही मी प्रयत्न करणं सोडलं नाही. गेल्या ३० वर्षांपासून मी माझ्या पूर्वजांच्या घरात एकटाच राहत आहे. सरकारतर्फे वृद्धांना देण्यात येणारे पेन्शन आणि शेजारील मंदिरातून मिळणार प्रसाद यावर मी आत्तापर्यंत गुजारण केली. मात्र यावर्षी मी नक्कीच पास होईन' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोनालीच्या निर्धाराला आमदारांची साथ
औसा - दैनिक ‘सकाळ’ने ‘शेतीचे झाले सरण’ या वृत्तमालिकेत लखनगाव (ता. औसा, जि. लातूर) येथील पंडित भानुदास लांडगे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या सोनाली लांडगे या मुलीची व्यथा गुरुवारच्या (ता. ३ मार्च) अंकात मांडली होती. या बातमीचा परिणाम म्हणून औशाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटील यांनी या मुलीला उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेत कायम आणि चांगल्या पगाराची नोकरी देण्याचा निर्धार केला आहे. या मुलीच्या भेटीसाठी ते उद्या (ता. चार) लखनगावला जाणार आहेत.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे सध्या कोणत्या स्थितीत जगताहेत, यावर आधारित ‘शेतीचे झाले सरण’ ही वृत्तमालिका ‘सकाळ’ने सुरू केली आहे. आजच्या अंकात सोनाली पंडित लांडगे (रा. लखनगाव, ता. औसा) या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीची ‘सहानुभूती नको... स्वाभिमानाने जगायचे आहे...’ या मथळ्याखाली मुलीच्या कुटुंबीयांची व्यथा मांडणारी बातमी प्रसिध्द केली होती. ही मुलगी एमसीएस झाली आहे. दोन भावांचे आणि तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न या मुलीपुढे होता. तिने ‘सकाळ’च्या माध्यमातून समाजाला व शासनाला ‘मला मदत नको, मला नोकरी द्या’, जेणेकरून मी माझ्या लहान भावांना शिकवून वडिलांचे स्वप्न पूर्ण करीन, असे भावनिक आवाहन केले होते. तिच्या या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार बसवराज पाटील यांनी या मुलीला उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेत कायम आणि चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतीत त्यांनी बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून शुक्रवारी ते मुलीला भेटण्यास जात आहेत.
'मोहन भागवतजी, तुमच्या प्रचारकांना ज्ञान द्या - दिग्विजयसिंह
भागवत यांनी गुरूवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या देशातील नव्या पिढीला भारत माता की जय म्हणा असे सांगावे लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर दिग्विजयसिंह यांनी ट्विटरद्वारे टीका केली आहे. "होय, मोहन भागवतजी भारताला "वसुधैव कुटुंबकम्‘ साठी मानले जाते. सर्वधर्मसमभाव हा भारताचा आदर्श आहे. तुमच्या प्रचारकांना हे ज्ञान द्या‘, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला आहे. याशिवाय जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कन्हैय्याचे भाषण दाखविणाऱ्या एका वृत्तवाहिनीवर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करणार का?, असा प्रश्नही दिग्विजयसिंह यांनी उपस्थित केला आहे.
==========================================
पाण्याच्या एका एका घागरीसाठी संघर्ष
जेवळी - माळरानाचा परिसर, अद्यापपर्यंत कोणतीही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसलेला, वर्षभर टॅंकरच्या पाण्यावर तहान भागविणारे दोन हजार लोकसंख्येचे वडगाव (गांजा, ता. लोहारा) येथे यंदा अभूतपूर्व पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. येथील नागरिकांना एका एका घागरीसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.
लोहारा तालुक्यातील दोन हजार २२२ लोकसंख्या असलेले वडगाव (गांजा) हे गाव अंतर्गत भागात वसलेले आहे. येथे मोठी नदी, प्रकल्प नाही. भूकंपानंतर मोठी पडझड झाल्याने शासनाकडून अनुदान मिळाल्यानंतर अर्धे गाव जुन्या वस्तीत, तर अर्धे गाव एक किलोमीटरवर वसले आहे. या गावात यापूर्वी ग्रामपंचायत स्थापनेपासून कोणतीही पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली नही. गेल्या वर्षी राष्ट्रीय पेयजल योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात माळेगाव साठवण तलावात विहीर व पंपगृहाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामाच्या मंजुरीसाठी व रकमेअभावी काम रखडले आहे. पावसाळ्यातले काही दिवस सोडले तर इतर वेळा टॅंकरवर अवलंबवून राहावे लागते. यंदा तर गावातील तीनपैकी दोन कूपनलिका बंद असून, एक कोरडी पडण्याचा मार्गावर आहे. सर्व सहा हातपंप बंदच आहेत. गाव व शिवारात पाणी उपलब्ध होत नसल्याने ३० मे २०१५ पासून या गावाला दोन टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यातूनही पाणीपुरवठा अपुरा पडत असून, पाणी घेण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. हे दोन्ही टॅंकर येथून २० किलोमीटरवर असलेल्या माकणी प्रकल्पातून पाणी भरून आणण्यात येत होते. अनेकवेळा दिवसभरात टॅंकरची एकच खेप होत आहे. आता गेल्या १५ दिवसांपासून माकणी प्रकल्पातील जलशुद्धीकरण यंत्रणेचा वीजपुरवठा थकीत बिलापोटी पुरवठा खंडित केल्याने येथील टॅंकर बंद असून, हे टॅंकर वडगाव येथील बसस्थानकावर थांबून आहेत.
==========================================वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढणाऱयाचा मृत्यू
वॉशिंग्टन- डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात पिस्तुलाचा चाप ओढला गेल्याने डोक्यात गोळी घुसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ‘त्रेचाळीस वर्षांचा नागरिक व त्याची मैत्रिण मिळून सेल्फी काढत होते. यावेळी नागरिकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच्या हातून चाप ओढला गेल्याने गोळी थेट डोक्यात घुसली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मैत्रिणीने उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.‘
दरम्यान, गेल्या वर्षी सेल्फी घेताना जगभरामध्ये किमान 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
==========================================
वर्णद्वेषाबद्दल राहुल गांधींना भाजप देणार नोटीस
नवी दिल्ली - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये वर्णद्वेष पसरविणारे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष त्यांना नोटीस बजावणार आहे.
गांधी यांनी लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान "फेअर ऍण्ड लव्हली‘ चा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे खासदार अर्जुन मेघपाल म्हणाले, ‘काळा पैसे समोर आणण्याच्या सरकारच्या योजनेला "फेअर ऍण्ड लव्हली‘ योजना म्हणत राहुल गांधी यांनी टीका केली आहे. वर्णद्वेषाप्रमाणे भासणाऱ्या ‘फेअर ऍण्ड लव्हली‘च्या जाहिरातीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यातून काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये भेदभाव निर्माण होतो. तसेच उत्तर व दक्षिण भागामध्ये (देशाच्या या भागात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये) भेदभाव निर्माण होतो. जुन्या पक्षाकडून जबाबदार पदावर असताना अशा प्रकारचे वक्तव्य अस्वीकार्य आहे.‘ या प्रकरणी भारतीय जनता पक्ष त्यांना (राहुल गांधी) नोटीस बजावणार असल्याचेही मेघपाल यांनी यावेळी सांगितले.
==========================================
पाक: क्रिकेट सामना हरल्याने एकाची आत्महत्या
लाहोर (पाकिस्तान) - पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागल्याने 50 वर्षाच्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पंजाब सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद शफिक नावाच्या व्यक्तीने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी पाकच्या बाजूने सट्टा लावला होता. याकामी त्याचा भाऊ मोहम्मद रमझाननेही त्याला मदत केली होती. त्यांनी वेतनातून मिळालेले 30 हजार रुपये सट्ट्यामध्ये लावले होते. मात्र या सामन्यात पाकिस्तान पराभूत झाल्याने त्यांना ही रक्कम गमवावी लागली. यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या मोहम्मद शफिकने जुन्या अनारकली परिरसरातील सिंचन विभागाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत बोलताना मोहम्मद रमझानने सांगितले की, सामन्यातील सट्ट्यावर पैसे हरल्याने आपल्या भावाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून मोहम्मद शफिक क्रिकेटच्या सामन्यांवर सट्टा लावत असल्याची माहिती या प्रकरणातील तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने दिली.
==========================================
छातीसगढ; नक्षलवाद्यांशी चकमक; 2 जवान हुतात्मा
सुकमा (छत्तीसगड) - सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) दोन जवान हुतात्मा झाले असून इतर 14 जण जखमी झाले आहेत.
सुकमा जिल्ह्यातील बस्तर परिसरात दब्बानरका येथे गुरुवारी दुपारी साडे बाराच्या गस्तीवर असलेल्या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने चकमक सुरू झाली. ती चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान दोन जवान हुतात्मा झाले आहेत. सीआरपीएफ, स्थानिक पोलिसांनी संयुक्त नक्षलवाद्यांविरूद्ध संयुक्त मोहिम उघडली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चकमकीबाबत अद्याप सविस्तर माहिती प्राप्त झालेली नाही.
==========================================
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवर आढळले बोगदा
‘बीएसएफ‘चे महासंचालक राकेश शर्मा यांनी सांगितले की, ‘भारत-पाक सीमेवर जवानांना एक छिद्र आढळून आले. जवानांनी तेथे खोदले असता 30 मिटर लांब व 10 ते 12 फुट उंच व 3 ते 4 फुट रुंदीचे एक मोठा बोगदा आढळून आला. हा बोगदा पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना या बोगद्यातून पाठविण्यासाठी प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे.‘
पाकिस्तानमधील अफजल चौकीजवळ हा बोगदा जात आहे. सुरुंग इंग्रजी एल अक्षराच्या आकाराचे आहे. यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याची शक्यता आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना बैठकीचे आयोजन करण्यासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. परंतु, त्यांनी वादग्रस्त ठिकाण असल्यामुळे प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले.
==========================================
खासगी क्षेत्रातील आरक्षणावर मोदींचे मौन!
खासगी क्षेत्रांतही मागास व इतर मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांप्रमाणे आरक्षण मिळावे, याबाबत डी. राजा, पवन वर्मा व इतरांनी आज विचारलेल्या प्रश्नावर गेहलोत यांनी स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. गेहलोत म्हणाले, की "यूपीए‘ सरकारने या प्रश्नावर 2004 व 2006 मध्ये उच्चस्तरीय समिती नेमली होती. पंतप्रधानांच्या सचिवांसह अनेक वरिष्ठ अधिकारी यात आहेत. समितीने फिक्की, असोचेम, सीआयआय यासह राज्याराज्यांतील उद्योग संस्थांबरोबर अनेकदा बैठका घेतल्या. ओबीसी आयोगाने नुकताच म्हणजे 8 फेब्रुवारीला यावर एक अहवाल दिला. त्यानुसार ओबीसींसाठी खासगी क्षेत्रात 27 टक्के आरक्षणाची शिफारस केली गेली आहे. या आयोगाने ती आपल्या अधिकारकक्षेच्या बाहेर जाऊन केल्याचे सरकारचे मत आहे. कारण मागासवर्गीयांसाठी सध्या असलेले साडेबावीस टक्के आरक्षण व नवे आरक्षण पाहता ही मर्यादा न्यायालयाने घातलेल्या मर्यादेच्या बाहेर जाते. हा पेच सरकारला सोडवावा लागणार आहे. यावर सरकार आणखी एक समिती नेमणार आहे. प्रश्न हा आहे की यावर संबंधितांतच अजून सर्व सहमती झालेली नाही.
No comments:
Post a Comment