[अंतरराष्ट्रीय]
१- अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर हल्ला
२- न्युयॉर्क; 340 दिवसांची अंतराळयात्रा पूर्ण, स्कॉट केली पृथ्वीवर
३- 65 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पठाणकोट हल्ला: मसूद अझरचा ताबा भारताला मिळणार
५- वीज बिलसंदर्भातील विधानाप्रकरणी खडसेंना न्यायालयाची नोटीस
६- सरकारची योजना म्हणजे 'फेअर अँड लव्हली', राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
७- राष्ट्रगीतातील 'सिंध' शब्द हटवा : शिवसेना खासदार
८- 'डान्सबारच्या आत कॅमेरे नको', सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
९- डान्स बार मालकांना 15 मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- विनोद तावडेंच्या घरावर काँग्रेसचा भव्य मोर्चा
११- मनसेची दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर दगडफेक
१२- राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- बंगळूरू; 'तो' दाता हरिशच्या अवयवदानाचा वारसा आईसह गावकरी चालवणार
१४- गुहागर; जवानाने पत्नीसह स्वतःवर झाडली गोळी, दोघे ठार
१५- चेन्नई; जयललितांचे टॅटू जबरदस्तीने मुलीच्या हातावर
१६- नोकरीसाठी शक्कल; स्वत:लाच काढले फ्लिपकार्टवर विकायला
१७- श्रीनगर; सियाचीनमध्ये जवानाचा मृतदेह आढळला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- 'बाहुबली 2' च्या प्रदर्शनाची तारीख १७-०२-२०१७
१९- दोन दिवसात शेअर बाजारात १ हजार अंकांची उसळी
२०- 'व्हॉटस्ऍप'द्वारे पाठविता येणार पीडीएफ फाईल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
ज्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव
(उदय देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=====================================

=====================================

=====================================

=====================================
=====================================

=====================================

‘हरिशच्या अकराव्याला (मृत्यूनंतर 11 व्या दिवशी होणाऱ्या विधीच्या वेळी) एका गावकऱ्याचा आम्हाला फोन आला. आमच्या गावकऱ्यांना नेत्रदानाचे फॉर्म भरायची इच्छा आहे, असं त्यांनी फोनवर सांगितलं.’ अशी माहिती नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. भुजंग शेट्टी यांनी दिली.
हरिशच्या आई गीताम्मा यांनीही नेत्रदानाचा निश्चय केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अवयवदानाविषयी गैरसमजुती न बाळगता केलेला हा निर्णय सुखद असल्याचं नेत्रपेढीतर्फे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे यात वय वर्ष 11 पासून 82 वर्षांपर्यंत विविध वयोगटातील 170 व्यक्तींचा समावेश आहे. याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील दीडशे गावकरी अवयवदानाचा फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत.
बंगळुरुत राहणारा हरिश फेब्रुवारी महिन्यात गावातील पंचायत निवडणुकीसाठी टुमकुरमधल्या गुब्बी या गावी गेला होता. मतदान करुन तो देवदर्शनासाठी निघाला. पण वाटेतच एका भरधाव ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली. यामुळे हरिशचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रकच्या खाली आला. या अपघातात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.
पुढची 20 मिनिटे हरिश बंगळुरुतल्या ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर फक्त एक कुतूहल बनून राहिला. अपघातावेळी बाजूने जाणाऱ्या नागरिकांनी हरिशला मदत करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. अपघाताच्या 20 मिनिटांनंतर अॅम्ब्युलन्स आली, तेव्हाही हरिश जिवंत होता. पण त्याआधी अॅब्युलन्समध्ये तो जे बोलला, त्याने हृदय पिळवटून टाकलं, “मी आता जगणार नाही, याची कल्पना आहे मला. पण मी जाण्याआधी माझे अवयवदान करा.”
हरिशने मृत्यूच्याही पलिकडे पाहण्याची दृष्टी जपली. त्यामुळेच त्याच्या डोळ्यांनी दोघे जण हे जग बघू शकले आहेत. पण त्याने दिलेल्या खऱ्याखुऱ्या दृष्टीपेक्षा दातृत्वाची दृष्टी सर्वात महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाला मिळणं हीच हरिशला खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
=====================================

=====================================

=====================================

=====================================

दीर्घकाळ अंतराळात राहिल्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही अंतराळयात्रा महत्त्वाची मानली जात होती. स्कॉट यांचा जुळा भाऊ मार्कसोबत त्यांच्या शारीरिक स्थितीची तुलना करुन हा अभ्यास केला जाईल.
केली, कॉर्निएंको आणि सर्गेई वोल्कोव यांच्यासह कझाखिस्तानातील स्टेपी मैदानात अंतराळयान उतरलं.
चार अंतराळयात्रांचे मिळून केली यांनी एकूण 520 दिवस अंतराळात घालवले आहेत. हा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील विक्रम मानला जातो.
केली यांनी अंतराळात उगवण्यासाठी काही बिया नेल्या होत्या. या बिया पृथ्वीवर आणल्या आहेत. अंतराळ आणि पृथ्वीवरील वातावरणाचा बियांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, हे तपासण्यात येईल.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
जवानाने पत्नीसह स्वतःवर झाडली गोळी, दोघे ठार
गुहागर : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआएएसएफ) एका काँस्टेबलने रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास गार्डच्या निवासी वसाहतीमध्ये गोळीबार करुन सीआएएसएफच्या दोन जणांना ठार केले. त्यानंतर पत्नीवर आणि स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा दलाचे कार्यालय (गार्ड क्वार्टर) आहे. या इमारतीमध्येच कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना शस्त्रास्त्रे देण्याचे व कर्तव्य संपल्यावर शस्त्रास्त्रे जमा करण्याचे कार्यालय आहे. 1 मार्चला रात्री 9.30 वाजता सहाय्यक पोलिस फौजदार बाळू गणपती शिंदे (मुळ गाव मालनगांव, ता. कवटेमहाकाळ, जि. सांगली), हवालदार रनिश पी. आर (मुळ गाव चेनोली, ता. पेरांब्रो, जि. कोजीकोडे, केरळ) आणि हवालदार हरिषकुमार गोंड (रा. गोटेगांव, जि. नरसिंगपूर, रा. मध्यप्रदेश) हे तिघेही आपले कर्तव्य संपून आपल्याजवळील शस्त्रात्रे जमा करण्यासाठी गार्ड क्वार्टर येथे चालले होते. गार्ड क्वार्टरच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर हरिषकुमारने त्याच्या जवळील इन्सास रायफलमधून बाळू शिंदेवर गोळी झाडली. ही गोळी शिंदे यांच्या पाठीतून छातीपर्यंत घुसली. आणि बाळू शिंदे जागीच ठार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून गार्ड क्वार्टरच्या पॅसेजमध्ये असलेला रनिश मागे वळला, म्हणून हरिषकुमारने त्याच्यावर समोरुन गोळ्या झाडल्या. थेट छातीवर गोळी लागल्याने रनिशचाही जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हरिषकुमार गार्ड क्वार्टरमधील एका खोलीत लपून बसला होता. ही संपूर्ण घटना रात्री 10.15 च्या सुमारास घडली. हरिषकुमार खोलीत लपून बसल्यावर उपस्थित जवानांनी शिंदे व रनिश यांना आरजीपीपीएलच्या मेडीकल सेंटरमध्ये नेले.
=====================================
जयललितांचे टॅटू जबरदस्तीने मुलीच्या हातावर

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे टॅटू एका विद्यार्थीनीच्या हातावर जबरदस्तीने कोरण्यात आल्याची तक्रार एका स्थानिक संस्थेने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
23 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये एआयएडीएमके मंत्र्यांसह ओ पन्नीरसेल्वमही उपस्थित होते. यावेळी एका मुलीच्या हातावर जबरदस्तीने जयललितांचे टॅटू कोरण्यात आले. "चेंज इंडिया‘ नावाच्या संस्थेने या प्रकाराची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये राजकीय कार्यक्रमासाठी बालकांचे शोषण रोखण्यासाठी सरकारला मार्गदर्शक तत्वे तयार करण्यास सांगण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान एआयएडीएमकेच्या प्रवक्त्याने संबंधित मुलीने आपल्यावर जबरदस्ती केली नसल्याचे सांगितले आहे. तसेच आमदार एम के अशोक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना अधिक काळजी घेण्याची सूचनाही नेत्यांना देण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
=====================================
नोकरीसाठी शक्कल; स्वत:लाच काढले विकायला

नवी दिल्ली - एखादा व्यक्ती नोकरी मिळविण्यासाठी काय करू शकतो याचे एक कल्पक उदाहरण समोर आले असून नोकरी शोधणाऱ्या एका तरुणाने स्वत:ला चक्क फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर विक्रीसाठी काढले आहे.
प्रकल्प व्यवस्थापकपदाची नोकरी मिळविण्याची इच्छा असलेल्या आकाश निरज नित्तल नावाच्या विद्यार्थ्यांने स्वत:ला विकायला काढले आहे. विशेष म्हणजे आकाश आयआयटी खरगपूरमधून पास झाला आहे. अनोख्या पद्धतीने नोकरी शोधावी या हेतूने त्याने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावर स्वत:ला विक्रीस काढल्याची जाहिरात दिली आहे. स्वत:बद्दल सांगताना आकाशने दिलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, "जेव्हा तुम्ही अष्टपैलू असता आणि देशातील सर्वांत हुशार व्यक्तींसोबत स्पर्धा करत असता त्यावेळी योग्य नोकरी मिळणे हे किती अवघड असतं हे तुम्हाला माहिती असतं. गर्दीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी करावे लागते. फ्लिपकार्टवर हे माझे प्रोफाईल आहे. आतापर्यंत मला एकही कॉल आलेला नसून मला आशा आहे की मी कोणाच्या तरी ओठांवर हसू फुलवू शकलो.‘
=====================================
राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर
पुणे/औरंगाबाद : पुणे (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठवडाभरापासून वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, गारपीट होत आहे. मंगळवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, मुदखेड, उमरी, नांदेड तालुके आणि पुण्यातील मावळ तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली.
बुधवारी दुपारनंतरही राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वररूपाच्या पावसाला सुरवात झाली होती. दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावासाचा जोर कायम होता. १३० मंडळांत विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाने फळबागा, कांदा, काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. आंबा मोहराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पुण्यात दुपारी काही वेळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा लगेच ऊन पडले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सर्वाधिक ४० मंडळांत अवकाळी पावसाची नोंद घेतली गेली. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडळांत, बीडमधील १६ मंडळांत, औरंगाबादमधील १७, जालना जिल्ह्यातील २५, तर परभणी जिल्ह्यातील ८ मंडळांत अवकाळी पावसाची कमी-अधिक प्रमाणात नोंद घेतली गेली आहे.
=====================================
65 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व

नवी दिल्ली- गेल्या दोन महिन्यांमध्ये 65 पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यामध्ये गायक अदनान सामी याचा समावेश आहे, अशी माहिती राज्यसभेत आज (बुधवार) देण्यात आली.
गृह राज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले, सन 2015 मध्ये 263 पाकिस्तानी व 344 इतर देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. यंदा 65 जणांना देण्यात आले. सन 2014 मध्ये 267 पाकिस्तानी व 352 इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.
=====================================
'व्हॉटस्ऍप'द्वारे पाठविता येणार पीडीएफ फाईल
माऊंटेन व्ह्यु (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय मेसेजिंग ऍप असलेल्या "व्हॉटस् ऍप‘द्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्य होणार आहे.

इन्स्टंट मेसेजिंग ऍप म्हणून ‘व्हॉटस् ऍप‘ने लोकप्रियता मिळविली आहे. या ऍपद्वारे जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण करता येते. संदेशांद्वारे टेक्स्ट, फोटोज्, व्हिडिओज्, फोन क्रमांकही पाठविता येतात. अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठविता येणे शक्य नव्हते. इतर स्पर्धेत असलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ‘व्हॉटस ऍप‘ही पीडीएफ फाईल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीडीएफशिवाय अन्य कोणत्याही फॉरमॅटची फाईल सध्यातरी पाठविता येणे शक्य होणार नाही.
व्हॉटस् ऍपच्या पुढील व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नसून लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस् ऍपद्वारे येईल, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
=====================================
सियाचीनमध्ये जवानाचा मृतदेह आढळला
श्रीनगर- सियाचीनमध्ये लष्कराला पाच दिवसांच्या शोधानंतर एका जवानाचा मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती लष्करी अधिकारयांनी आज (बुधवार) दिली.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचीनमधील उत्तरेकडील भागात लष्कराची गेल्या पाच दिवसांपासून शोध मोहिम सुरू होती. यादरम्यान बर्फात 200 फूट खाली एका जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. या जवानाची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात येथे हिमकडा कोसळून दहा जवान हुतात्मा झाले आहेत. सन 2013 पासून येथे 41 जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी (ता. 1) संसदेत दिली.
=====================================
अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर हल्ला
जलालाबाद (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानमधील जलालाबाद या शहरातील भारतीय दुतावासाबाहेर आज (बुधवार) दहशतवादी हल्ला झाला. येथील सरकारी सूत्रांच्या दाव्यानुसार, भारतीय दुतावास हेच हल्लेखोरांचे लक्ष्य होते.
या हल्ल्याच्या वेळी दुतावासामध्ये असणारे सर्व भारतीय सुरक्षित आहेत. मात्र, बॉम्बस्फोटात दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुतावासाच्या आवारामध्ये हल्लेखोरांनी बॉम्ब फेकला. ‘आयटीबीपी‘ आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांचे सैनिकांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या बॉम्बस्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्या आणि दारेही उध्वस्त झाली आणि किमान आठ गाड्यांचे नुकसान झाले.
जलालाबादमध्येच असलेल्या पाकिस्तानी दुतावासावर याच वर्षी जानेवारीमध्ये हल्ला झाला होता.

राष्ट्रगीतातील 'सिंध' शब्द हटवा : शिवसेना खासदार
नवी दिल्ली/मुंबई : देशभक्त आणि देशद्रोही असा वाद देशभरात उफाळला असतानाच, आता शिवसेना खासदाराच्या मागणीमुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राष्ट्रगीतामध्ये बदल सूचवला आहे. सावंत यांनी राष्ट्रगीतातील ‘सिंध’ या शब्दाला आक्षेप घेतला आहे. त्याऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरावा असं त्यांनी सूचवलं आहे.
अरविंद सावंत यांनी लोकसभा सभागृहात नियम 377 नुसार आपला मुद्दा मांडला. देशाचे महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आहे. मात्र भारतात ‘सिंध’ प्रांत अस्तित्त्वात नसल्याने त्याऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरला जावा, असं सावंत म्हणाले.
राष्ट्रगीतातील “पंजाब, सिंध, गुजरात, मराठा…” या ओळीतील ‘सिंध’शब्दाबाबत सावंत यांचा आक्षेप आहे. ‘सिंध’ नावाचा कोणताच प्रांत भारतात नाही, त्यामुळे संसदेने राष्ट्रगीतातील या शब्दाबाबत पुनर्विचार करावा, असं सावंत यांनी नमूद केलं.
अरविंद सावंत यांनी ट्विट करूनही याबाबत आपलं म्हणणं स्पष्ट केलं. “संसदेत 24 जानेवारी 1950 रोजी पारित झालेलंच योग्य राष्ट्रगीत गाणे गरजेचं आहे. त्यामुळेच ‘सिंध’ या शब्दाऐवजी ‘सिंधू’ हा शब्द वापरला जावा”, असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.
सरकारची योजना म्हणजे 'फेअर अँड लव्हली', राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या योजना म्हणजे ‘फेअर अँड लव्हली’ असून काळा पैसा सफेद करण्याची मोहीम सुरु आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी आज लोकसभेत केली. लोकसभेतील भाषणात राहुल गांधी प्रचंड आक्रमक दिसले. मोदी सरकारच्या अनेक योजना आणि निर्णयांसह देशातील सद्यपरिस्थितीवरील भूमिकेचा राहुल गांधींना कडक शब्दात समाचार घेतला.
“सरकारच्या योजना म्हणजे फेअर अँड लव्हली”
“पंतप्रधान मोदींनी नवी योजना आणली आहे. ‘फेअर अँड लव्हली’ योजना. काळा पैसा सफेद करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेद्वारे काळा पैसा सफेद केला जाणार आहे, शिवाय कुणाला अटकही केली जाणार नाही. पंतप्रधान मोदी 2013 मध्ये म्हणाले होते, ‘मी काळा पैसा संपवून टाकेन आणि दोषींना जेलमध्ये पाठवेन.’ मात्र, या योजनेद्वारे कुणालाही अटक केली जाणार नाही. यावरुनच कळतं आहे की, मोदी सरकार जनतेची फसवणूक करत आहे.” असा घणाघात राहुल गांधींनी आज लोकसभेत केला.
“रोहित वेमुलाची आत्महत्या केंद्र सरकारच्या दबावामुळं”
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणावरुनही राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरलं. “रोहित वेमुलाने अन्यायाविरोधात आवाज उठवला म्हणून त्याला दाबलं आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं.”, असा आरोप राहुल गांधींनी सरकारवर केला.
वीज बिलसंदर्भातील विधानाप्रकरणी खडसेंना न्यायालयाची नोटीस
जालना : वीज बिलासंदर्भातील वादग्रस्त विधानाप्रकरणी राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना जालन्याच्या जाफराबाद तालुका न्यायालयाने नोटीस बजावली आहे. वकिलामार्फत हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जालन्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी खडसेंविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.
एकनाथ खडसे यांनी अकोल्यात 22 नोव्हेंबर 2014 रोजी शेतकऱ्यांना मोबाईल बिल भरायला पैसे आहेत, मग वीज बिल का भरत नाही, असा बोचरा सवाल केला होता. त्यांच्या विधानानंतर बराच गदारोळ झाला होता.
त्यांच्या या वक्तव्याविरोधात जालना जिल्ह्यातील जाफराबादमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाकडून खडसेंना नोटीस बजावून वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
विनोद तावडेंच्या घरावर काँग्रेसचा भव्य मोर्चा
मुंबई : मंत्रिपदावर असतानाही लाभाचं पद स्वीकारल्याचा आरोप करत काँग्रेसने शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या विलेपार्लेमधील घरावर भव्य मोर्चा काढला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, खासदार राजीव सातव यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.
विनोद तावडे मंत्रिपदावर असूनही ते सहा कंपन्यांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार हे कायद्याच्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे तावडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली.
जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडेंना मंत्री पदावरुन हटवत नाहीत, तो पर्यंत काँग्रेस पक्षातर्फे विविध प्रकारे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेसने काढलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
विनोद तावडेंवरील आरोप
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानुसार, विनोद तावडे मंत्रीपदावर असतानाही एका कंपनीचे संचालक आहेत. शिवाय बिझनेस पार्टनर आणि मित्र दिलीप करंबळेकर यांना तावडेंनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचा अध्यक्ष बनवलं. मात्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या सदस्यांच्या यादीत तावडेंच्या या मित्राचं नावच नव्हतं.
मनसेची दुकानावरील इंग्रजी पाट्यांवर दगडफेक
मुंबई: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठीचं हत्यार उपसलं आहे. मनसेने मुंबईजवळच्या कांदिवलीत इंग्रजी पाट्यांविरोधात आंदोलन केलं. ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या आहेत, त्या दुकानांवर थेट दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच मराठी पाट्यांचा आग्रह धरण्यात येत आहे.
मनसेने पक्षस्थापनेपासूनच मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. यापूर्वीही मनसेने मराठी पाट्यांसाठी अनेकवेळा आंदोलनं केली होती. आता पुन्हा एकदा मनसेने मराठी पाट्यांसाठी एल्गार पुकारला आहे. त्याची सुरुवात त्यांनी कांदिवलीतून केली आहे.
कांदिवलीत मनसे कार्यकर्त्यांनी ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या आहेत, त्यावर हल्लाबोल केला. इंग्रजी नावाच्या पाट्या उखडून टाकण्यात आल्या. तसंच काही दुकानांवर तर दगडफेकही करण्यात आली.
'तो' दाता हरिशच्या अवयवदानाचा वारसा आईसह गावकरी चालवणार
बंगळुरु : अपघातात शरीराचे दोन तुकडे झाल्यावर मृत्यू समोर दिसत असतानाही अवयवदानाचा आदर्श निर्णय घेणाऱ्या हरिश नांजप्पाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. हरिशच्या मृत्यूनंतर त्याचं कारेगौडानहाली हे गाव त्याचा वारसा चालवणार आहे. गावातील 300 पैकी 170 रहिवाशांनी नेत्रदानाचा निश्चय केला आहे.
‘हरिशच्या अकराव्याला (मृत्यूनंतर 11 व्या दिवशी होणाऱ्या विधीच्या वेळी) एका गावकऱ्याचा आम्हाला फोन आला. आमच्या गावकऱ्यांना नेत्रदानाचे फॉर्म भरायची इच्छा आहे, असं त्यांनी फोनवर सांगितलं.’ अशी माहिती नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. भुजंग शेट्टी यांनी दिली.
हरिशच्या आई गीताम्मा यांनीही नेत्रदानाचा निश्चय केला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी अवयवदानाविषयी गैरसमजुती न बाळगता केलेला हा निर्णय सुखद असल्याचं नेत्रपेढीतर्फे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे यात वय वर्ष 11 पासून 82 वर्षांपर्यंत विविध वयोगटातील 170 व्यक्तींचा समावेश आहे. याचप्रमाणे आजूबाजूच्या गावातील दीडशे गावकरी अवयवदानाचा फॉर्म भरण्याच्या तयारीत आहेत.
बंगळुरुत राहणारा हरिश फेब्रुवारी महिन्यात गावातील पंचायत निवडणुकीसाठी टुमकुरमधल्या गुब्बी या गावी गेला होता. मतदान करुन तो देवदर्शनासाठी निघाला. पण वाटेतच एका भरधाव ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली. यामुळे हरिशचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रकच्या खाली आला. या अपघातात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.
पुढची 20 मिनिटे हरिश बंगळुरुतल्या ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर फक्त एक कुतूहल बनून राहिला. अपघातावेळी बाजूने जाणाऱ्या नागरिकांनी हरिशला मदत करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. अपघाताच्या 20 मिनिटांनंतर अॅम्ब्युलन्स आली, तेव्हाही हरिश जिवंत होता. पण त्याआधी अॅब्युलन्समध्ये तो जे बोलला, त्याने हृदय पिळवटून टाकलं, “मी आता जगणार नाही, याची कल्पना आहे मला. पण मी जाण्याआधी माझे अवयवदान करा.”
हरिशने मृत्यूच्याही पलिकडे पाहण्याची दृष्टी जपली. त्यामुळेच त्याच्या डोळ्यांनी दोघे जण हे जग बघू शकले आहेत. पण त्याने दिलेल्या खऱ्याखुऱ्या दृष्टीपेक्षा दातृत्वाची दृष्टी सर्वात महत्त्वाची आहे. ती प्रत्येकाला मिळणं हीच हरिशला खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
'बाहुबली 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली
मुंबई : ‘बाहुबली’ 2 या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर 17 फेब्रुवारी 2017 रोजी मिळणार आहे.
‘बाहुबली’चा सिक्वेल ‘बाहुबली 2’ ची सिनेचाहत्यांना अतिशय उत्सुकता आहे. मोस्ट अवेटेड हा सिनेमा पुढील वर्षी गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर देशभरात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिली. “एस एस राजामौली यांचा हा सिनेमा 14 एप्रिल 2017 म्हणजेच गुड फ्रायडेच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवेल, अशी अपेक्षा आहे,” असं तरन आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.
'डान्सबारच्या आत कॅमेरे नको', सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश
नवी दिल्ली: डान्सबारच्या नियमांबाबत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. डान्सबारच्या रेस्टॉरंट, परमिट रुम परिसरात कॅमेरे बसविण्याचा अटीला सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. केवळ डान्सबारच्या प्रवेशदारावरच सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानं डान्सबार मालकांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं डान्सबारच्या परवानगीसाठी राज्य सरकारकडून काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. या अटींविरोधात डान्सबार मालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावरच आज हा आदेश राज्य सरकारला देण्यात आला आहे.
बार मालकांवर परवान्यांसह लावलेले अनेक निर्बंध हे चुकीचे असल्याचं सुप्रीम कोर्टानं याआधीही म्हटलं होतं. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं बार बंदीस मनाई केली होती. त्यानंतर बारमालकांवर सरकारनं अनेक अटी लादल्या. त्यात बारमधील लाईव्ह फुटेज पोलीस स्टेशनला देणं. या अटीचाही समावेश होता. याविरोधात बार असोशिएशननं कोर्टात धाव घेतली होती.त्यावर अशा पद्धतीची अट ही व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला आहे. असं मत कोर्टानं व्यक्त केलं होतं.
पठाणकोट हल्ला: मसूद अझरचा ताबा भारताला मिळणार
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझरला भारताकडे सोपवण्यासाठी पाकिस्तान राजी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पहिल्यांदा पाकिस्तान स्वत: याबाबत तपास करणार आहे.
पठाणकोट हल्लाचा कट मसूदने रचल्याचा आरोप आहे. त्याबाबत भारताला अनेक पुरावेही मिळाले आहेत.
जर मसूद अझर दोषी असेल, तर त्याची अगोदर आम्ही चौकशी करू, असं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांनी म्हटलं आहे. जर मसूद दोषी आढळला, तर त्याच्याविरोधात पावलं उचलली जातील असं अझीज म्हणाले.
यामुळे मसूद भारताकडे चौकशीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे.
340 दिवसांची अंतराळयात्रा पूर्ण, स्कॉट केली पृथ्वीवर
न्यूयॉर्क : तब्बल एक वर्ष अंतराळात घालवल्यानंतर अमेरिकेचे अंतराळवीर स्कॉट केली आणि रशियन अंतराळवीर मिखाइल कॉर्निएंको पृथ्वीवर परतले आहेत. 340 दिवस अंतराळात व्यतीत केल्यानंतर ते परत आले आहेत.
दीर्घकाळ अंतराळात राहिल्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने ही अंतराळयात्रा महत्त्वाची मानली जात होती. स्कॉट यांचा जुळा भाऊ मार्कसोबत त्यांच्या शारीरिक स्थितीची तुलना करुन हा अभ्यास केला जाईल.
केली, कॉर्निएंको आणि सर्गेई वोल्कोव यांच्यासह कझाखिस्तानातील स्टेपी मैदानात अंतराळयान उतरलं.
चार अंतराळयात्रांचे मिळून केली यांनी एकूण 520 दिवस अंतराळात घालवले आहेत. हा आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरील विक्रम मानला जातो.
केली यांनी अंतराळात उगवण्यासाठी काही बिया नेल्या होत्या. या बिया पृथ्वीवर आणल्या आहेत. अंतराळ आणि पृथ्वीवरील वातावरणाचा बियांच्या वाढीवर कसा परिणाम होतो, हे तपासण्यात येईल.
अंतराळात म्हणजेच पृथ्वीच्या परिघाबाहेर उमललेल्या झिनिया या पहिल्या फुलाबाबत जानेवारी महिन्यात घोषणा करण्यात आली होती. 60 ते 80 दिवसात हे फूल अंतराळात उगवल्याची माहिती स्कॉट यांनी शेअर केली होती.
काळा पैसा सफेद करण्यासाठी मोदींची फेअर अँड लव्हली योजना - राहुल गांधी
- नवी दिल्ली, दि. २ - निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काळापैसा बाळगणा-यांना तुरुंगात टाकणार असे सांगत होते मात्र आता त्यांनाच वाचवण्यासाठी ते योजना घेऊन आले आहेत.काळा पैसा सफेद करण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सरकारने फेअर अँण्ड लव्हली योजना आणली आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत केंद्र सरकारवर हल्ला चढवला.राहुल गांधी यांनी सरकारच्या मेक इन इंडिया योजनेसह एकूण मोदींच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. निवडणुकीत मोदींनी रोजगार देऊ असे आश्वासन दिले होते पण कोणलाही रोजगार मिळालेला नाही. मनरेंगा इतकी वाईट योजना मी बघितलेली नाही असे नरेंद्र मोदी सांगतात पण अर्थमंत्री अरुण जेटली मला येऊन सांगतात मनरेगा इतकी चांगली योजना नाही. मग हीच बाब ते पंतप्रधानांना का सांगत नाहीत ? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.पंतप्रधानांनी आमचे ऐकावे, आम्ही त्यांचे शत्रू नाहीत. आम्ही तुमचा व्देष करत नाही असे राहुल म्हणाले. मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्यावेळी मोदींना मुंबईत जाऊ नका अशी भारत सरकारने विनंती केली होती. मात्र त्यांनी आमचे ऐकले का ? मोदी मुंबईत गेले आणि त्यामुळे कारवाईत अडथळे आले असा आरोप राहुल यांनी केला.मोदी कोणाचेही ऐकत नाहीत. त्यांनी नागा करारावर स्वाक्षरी केली त्याची गृहमंत्र्यांनाही माहिती नव्हती असे राहुल म्हणाले. भाषणाच्या आघोत राहुल गांधी गांधींजी आमचे आहेत, सावरकर तुमचे यात चूक काय ? असे विधान केले. राहुल गांधी यांच्या संपूर्ण भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निशाण्यावर होते. आता मोदी त्यांना काय उत्तर देतात याची उत्सुक्ता आहे.
डान्स बार मालकांना 15 मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- नवी दिल्ली, दि. २ - डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. 15 मार्चपर्यंत डान्स बार मालकांना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी डान्स बार मालकांना घातलेल्या अटींपैकी 7 अटींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा केली आहे. तसेच परमिट रुम आणि रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे.डान्स बारच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही लावण्याची सूचना करताना डान्सबारमधील सीसीटीव्हीचे लाईव्ह फीड पोलीस ठाण्यात देण्याची पोलिसांची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी घातलेल्या अटींविरोधात डान्स बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला फटका बसला असून डान्स बार मालकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
दोन दिवसात शेअर बाजारात १ हजार अंकांची उसळी
- मुंबई, दि. २ - केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सलग दुस-यादिवशी बीएसई सेन्सेक्सने ४०० अंकांची उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४६३ अंकांनी वाढून २४,२४२ अंकांवर तर, निफ्टी १४६ अंकांची वाढ नोंदवून ७३६८ वर बंद झाला. दोन दिवसात बीएसई सेन्सेक्समध्ये १ हजार अंकांची वाढ झाली आहे.मंगळवारी सेन्सेक्समध्ये ७७७ अंकांची वाढ झाली होती. गेल्या सात वर्षात एकाच दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ होती. मागच्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सातत्याने कोसळत होता मात्र अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेअर बाजारात आशादायक चित्र निर्माण झाले आहे.अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये वित्तीय तूट जीडीपीच्या ३.५ टक्के राहील असा अंदाज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वर्तवला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक तिमाही पतधोरण आढाव्याच्या नियोजित तारखे आधीच रेपो दरात ( बँका आरबीआयकडून ज्या दराने कर्ज घेतात तो दर) कपात करेल असा अंदाज असल्यामुळे शेअर बाजाराला तेजी दिसत आहे.
जवानाने पत्नीसह स्वतःवर झाडली गोळी, दोघे ठार
गुहागर : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआएएसएफ) एका काँस्टेबलने रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास गार्डच्या निवासी वसाहतीमध्ये गोळीबार करुन सीआएएसएफच्या दोन जणांना ठार केले. त्यानंतर पत्नीवर आणि स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.
रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षा व्यवस्था आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा दलाचे कार्यालय (गार्ड क्वार्टर) आहे. या इमारतीमध्येच कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना शस्त्रास्त्रे देण्याचे व कर्तव्य संपल्यावर शस्त्रास्त्रे जमा करण्याचे कार्यालय आहे. 1 मार्चला रात्री 9.30 वाजता सहाय्यक पोलिस फौजदार बाळू गणपती शिंदे (मुळ गाव मालनगांव, ता. कवटेमहाकाळ, जि. सांगली), हवालदार रनिश पी. आर (मुळ गाव चेनोली, ता. पेरांब्रो, जि. कोजीकोडे, केरळ) आणि हवालदार हरिषकुमार गोंड (रा. गोटेगांव, जि. नरसिंगपूर, रा. मध्यप्रदेश) हे तिघेही आपले कर्तव्य संपून आपल्याजवळील शस्त्रात्रे जमा करण्यासाठी गार्ड क्वार्टर येथे चालले होते. गार्ड क्वार्टरच्या प्रवेशद्वारापाशी आल्यावर हरिषकुमारने त्याच्या जवळील इन्सास रायफलमधून बाळू शिंदेवर गोळी झाडली. ही गोळी शिंदे यांच्या पाठीतून छातीपर्यंत घुसली. आणि बाळू शिंदे जागीच ठार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून गार्ड क्वार्टरच्या पॅसेजमध्ये असलेला रनिश मागे वळला, म्हणून हरिषकुमारने त्याच्यावर समोरुन गोळ्या झाडल्या. थेट छातीवर गोळी लागल्याने रनिशचाही जागीच मृत्यु झाला. त्यानंतर हरिषकुमार गार्ड क्वार्टरमधील एका खोलीत लपून बसला होता. ही संपूर्ण घटना रात्री 10.15 च्या सुमारास घडली. हरिषकुमार खोलीत लपून बसल्यावर उपस्थित जवानांनी शिंदे व रनिश यांना आरजीपीपीएलच्या मेडीकल सेंटरमध्ये नेले.
=====================================
जयललितांचे टॅटू जबरदस्तीने मुलीच्या हातावर
चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांचे टॅटू एका विद्यार्थीनीच्या हातावर जबरदस्तीने कोरण्यात आल्याची तक्रार एका स्थानिक संस्थेने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
23 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये एआयएडीएमके मंत्र्यांसह ओ पन्नीरसेल्वमही उपस्थित होते. यावेळी एका मुलीच्या हातावर जबरदस्तीने जयललितांचे टॅटू कोरण्यात आले. "चेंज इंडिया‘ नावाच्या संस्थेने या प्रकाराची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. तक्रारीमध्ये राजकीय कार्यक्रमासाठी बालकांचे शोषण रोखण्यासाठी सरकारला मार्गदर्शक तत्वे तयार करण्यास सांगण्याची विनंती करण्यात आली आहे. दरम्यान एआयएडीएमकेच्या प्रवक्त्याने संबंधित मुलीने आपल्यावर जबरदस्ती केली नसल्याचे सांगितले आहे. तसेच आमदार एम के अशोक यांना पक्षातून निलंबित करण्यात आले असून अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना अधिक काळजी घेण्याची सूचनाही नेत्यांना देण्यात आल्याचे प्रवक्त्याने सांगितले.
=====================================
नोकरीसाठी शक्कल; स्वत:लाच काढले विकायला
नवी दिल्ली - एखादा व्यक्ती नोकरी मिळविण्यासाठी काय करू शकतो याचे एक कल्पक उदाहरण समोर आले असून नोकरी शोधणाऱ्या एका तरुणाने स्वत:ला चक्क फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर विक्रीसाठी काढले आहे.
प्रकल्प व्यवस्थापकपदाची नोकरी मिळविण्याची इच्छा असलेल्या आकाश निरज नित्तल नावाच्या विद्यार्थ्यांने स्वत:ला विकायला काढले आहे. विशेष म्हणजे आकाश आयआयटी खरगपूरमधून पास झाला आहे. अनोख्या पद्धतीने नोकरी शोधावी या हेतूने त्याने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावर स्वत:ला विक्रीस काढल्याची जाहिरात दिली आहे. स्वत:बद्दल सांगताना आकाशने दिलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, "जेव्हा तुम्ही अष्टपैलू असता आणि देशातील सर्वांत हुशार व्यक्तींसोबत स्पर्धा करत असता त्यावेळी योग्य नोकरी मिळणे हे किती अवघड असतं हे तुम्हाला माहिती असतं. गर्दीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी करावे लागते. फ्लिपकार्टवर हे माझे प्रोफाईल आहे. आतापर्यंत मला एकही कॉल आलेला नसून मला आशा आहे की मी कोणाच्या तरी ओठांवर हसू फुलवू शकलो.‘
=====================================
राज्यभरात अवकाळी पावसाचा जोर
पुणे/औरंगाबाद : पुणे (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या आठवडाभरापासून वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस, गारपीट होत आहे. मंगळवारी दुपारनंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, मुदखेड, उमरी, नांदेड तालुके आणि पुण्यातील मावळ तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली.
बुधवारी दुपारनंतरही राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वररूपाच्या पावसाला सुरवात झाली होती. दुपारपर्यंतच्या ढगाळ वातावरणानंतर पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावासाचा जोर कायम होता. १३० मंडळांत विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाने फळबागा, कांदा, काढणीला आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले. आंबा मोहराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
पुण्यात दुपारी काही वेळ पाऊस पडल्यानंतर पुन्हा लगेच ऊन पडले. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मागील चोवीस तासांत सर्वाधिक ४० मंडळांत अवकाळी पावसाची नोंद घेतली गेली. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडळांत, बीडमधील १६ मंडळांत, औरंगाबादमधील १७, जालना जिल्ह्यातील २५, तर परभणी जिल्ह्यातील ८ मंडळांत अवकाळी पावसाची कमी-अधिक प्रमाणात नोंद घेतली गेली आहे.
=====================================
65 पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्व
नवी दिल्ली- गेल्या दोन महिन्यांमध्ये 65 पाकिस्तानी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यामध्ये गायक अदनान सामी याचा समावेश आहे, अशी माहिती राज्यसभेत आज (बुधवार) देण्यात आली.
गृह राज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले, सन 2015 मध्ये 263 पाकिस्तानी व 344 इतर देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. यंदा 65 जणांना देण्यात आले. सन 2014 मध्ये 267 पाकिस्तानी व 352 इतर देशातील नागरिकांना नागरिकत्व देण्यात आले आहे.
=====================================
'व्हॉटस्ऍप'द्वारे पाठविता येणार पीडीएफ फाईल
माऊंटेन व्ह्यु (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय मेसेजिंग ऍप असलेल्या "व्हॉटस् ऍप‘द्वारे आता लवकरच पीडीएफ फॉरमॅटमधील फाईल पाठविणे शक्य होणार आहे.
इन्स्टंट मेसेजिंग ऍप म्हणून ‘व्हॉटस् ऍप‘ने लोकप्रियता मिळविली आहे. या ऍपद्वारे जलद गतीने संदेशांची देवाणघेवाण करता येते. संदेशांद्वारे टेक्स्ट, फोटोज्, व्हिडिओज्, फोन क्रमांकही पाठविता येतात. अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठविता येणे शक्य नव्हते. इतर स्पर्धेत असलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग ऍपमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ‘व्हॉटस ऍप‘ही पीडीएफ फाईल पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीडीएफशिवाय अन्य कोणत्याही फॉरमॅटची फाईल सध्यातरी पाठविता येणे शक्य होणार नाही.
व्हॉटस् ऍपच्या पुढील व्हर्जनमध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र हे व्हर्जन अद्याप अधिकृतरित्या उपलब्ध झालेले नसून लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल. त्यानंतर त्याबाबतची सूचना व्हॉटस् ऍपद्वारे येईल, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
=====================================
सियाचीनमध्ये जवानाचा मृतदेह आढळला
लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सियाचीनमधील उत्तरेकडील भागात लष्कराची गेल्या पाच दिवसांपासून शोध मोहिम सुरू होती. यादरम्यान बर्फात 200 फूट खाली एका जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. या जवानाची ओळख पटलेली नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात येथे हिमकडा कोसळून दहा जवान हुतात्मा झाले आहेत. सन 2013 पासून येथे 41 जवान हुतात्मा झाले आहेत, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी (ता. 1) संसदेत दिली.
=====================================
अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासाबाहेर हल्ला
जलालाबाद (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानमधील जलालाबाद या शहरातील भारतीय दुतावासाबाहेर आज (बुधवार) दहशतवादी हल्ला झाला. येथील सरकारी सूत्रांच्या दाव्यानुसार, भारतीय दुतावास हेच हल्लेखोरांचे लक्ष्य होते.
या हल्ल्याच्या वेळी दुतावासामध्ये असणारे सर्व भारतीय सुरक्षित आहेत. मात्र, बॉम्बस्फोटात दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुतावासाच्या आवारामध्ये हल्लेखोरांनी बॉम्ब फेकला. ‘आयटीबीपी‘ आणि अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांचे सैनिकांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. या बॉम्बस्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्या आणि दारेही उध्वस्त झाली आणि किमान आठ गाड्यांचे नुकसान झाले.
जलालाबादमध्येच असलेल्या पाकिस्तानी दुतावासावर याच वर्षी जानेवारीमध्ये हल्ला झाला होता.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
No comments:
Post a Comment