[अंतरराष्ट्रीय]
१- लाहोर; पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 69 जणांचा मृत्यू
२- अलास्कात सॅन्डर्स विजयी, हिलरी पराभूत
३- वॉशिंग्टन; भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली
४- न्यूयॉर्क; महिलांबद्दल अनुदार उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- ऑस्ट्रेलियावर मात करत भारताचा 'विराट' विजय
६- कोलकाता; पश्चिम बंगालमध्ये अजानसाठी पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवलं
७- अजानसाठी भाषण थांबवणं ही मोदींची नौटंकी : अबू आझमी
८- युवराजच्या वडिलांची कर्णधार धोनीवर पुन्हा एकदा जहरी टीका!
९- ६३वे राष्ट्रीय पुरस्कार - बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
१०- सराफ ांना अधिकारी त्रस्त करणार नाहीत - जेटली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- पोरबंदर; गुजरातमध्ये भाजप खासदाराची मुजोरी चव्हाट्यावर, वृद्धाला लाथाडताना कॅमेऱ्यात कैद
१२- मेहबूबा मुफ्ती ' भारतमाता की जय' म्हणतील का? - उद्धव ठाकरे
१३- धूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग
१४- ३०० गड-किल्ल्यांवर फडकणार भगवा!
१५- तीन महिन्यांत मुंबईत झाले १५वे अवयवदान
१६- शिक्षण संस्थेला म्हाडाची नोटीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- विजयाच्या जल्लोषाला गालबोट, नागपूरमध्ये गर्दीवर पोलिसांचा लाठीचार्ज
१८- मीरा रोड; सौदीतून सुटकेसाठी मीरा रोडच्या महिलेची व्हॉट्सअॅपवरुन हाक
१९- रायपुर; कोळसा खाण गैरव्यवहार;'इस्पात'चे संचालक दोषी
२०- पुणे; "फर्ग्युसन'मधील वादावर पुणेरी प्रतिक्रियांचे वादळ
२१- कोलकाता; 'भारत माता की..' जगाने म्हटले पाहिजे-भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- बाद झाल्यावर शिवीगाळ, इंग्लडच्या जेसन रॉयवर आयसीसीची कारवाई
२३- कोहलीने टोलवलेल्या चेंडूमुळे महिलेच्या चेहऱ्याला दुखापत
२४- 'शिवाय'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगन थोडक्यात बचावला
२५- आम्ही वेगळे झालोय - मलायका- अरबाजचे स्पष्टीकरण
२६- भारताच्या विजयाची चार कारणं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- शिधापत्रिका-आधार लिंकिंग; जिल्ह्यात 100 टक्के काम पूर्ण, राज्यात प्रथम क्रमांक
२८- पूर्णा रस्त्यावरील सौदर्य प्रसाधनाच्या गोदामात स्फोट
२९- भोकर; गुरुद्वारा दर्शनासाठी जाणाऱ्या चारचाकी वाहनाला अपघात, एक ठार पाच जखमी
३०- कंधार मॉडेल शहर बनविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - चिखलीकर
३१- काकांडी गावात पाणीटंचाईचा बळी; टयाँकरखाली चिरडून बालक ठार
३२- तरोडानाका येथे कपडे धुण्याच्या बनावट पावडरसह टेम्पो जप्त
३३- भोकर; मातुळ येथे दि.३० रोजी अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन
३४- सांगावीत धम्मउपासिका शिबिरास उत्साहात सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
दीपक पेटवार, प्रथमेश गवळी, पप्पू ढवळे, प्रिया सावळे, राहील व्यास, योगेश नाईक, अनिकेत कुलकर्णी, राहुल जाधव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=============================================












१- लाहोर; पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 69 जणांचा मृत्यू
२- अलास्कात सॅन्डर्स विजयी, हिलरी पराभूत
३- वॉशिंग्टन; भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली
४- न्यूयॉर्क; महिलांबद्दल अनुदार उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- ऑस्ट्रेलियावर मात करत भारताचा 'विराट' विजय
६- कोलकाता; पश्चिम बंगालमध्ये अजानसाठी पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवलं
७- अजानसाठी भाषण थांबवणं ही मोदींची नौटंकी : अबू आझमी
८- युवराजच्या वडिलांची कर्णधार धोनीवर पुन्हा एकदा जहरी टीका!
९- ६३वे राष्ट्रीय पुरस्कार - बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
१०- सराफ ांना अधिकारी त्रस्त करणार नाहीत - जेटली
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- पोरबंदर; गुजरातमध्ये भाजप खासदाराची मुजोरी चव्हाट्यावर, वृद्धाला लाथाडताना कॅमेऱ्यात कैद
१२- मेहबूबा मुफ्ती ' भारतमाता की जय' म्हणतील का? - उद्धव ठाकरे
१३- धूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग
१४- ३०० गड-किल्ल्यांवर फडकणार भगवा!
१५- तीन महिन्यांत मुंबईत झाले १५वे अवयवदान
१६- शिक्षण संस्थेला म्हाडाची नोटीस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- विजयाच्या जल्लोषाला गालबोट, नागपूरमध्ये गर्दीवर पोलिसांचा लाठीचार्ज
१८- मीरा रोड; सौदीतून सुटकेसाठी मीरा रोडच्या महिलेची व्हॉट्सअॅपवरुन हाक
१९- रायपुर; कोळसा खाण गैरव्यवहार;'इस्पात'चे संचालक दोषी
२०- पुणे; "फर्ग्युसन'मधील वादावर पुणेरी प्रतिक्रियांचे वादळ
२१- कोलकाता; 'भारत माता की..' जगाने म्हटले पाहिजे-भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- बाद झाल्यावर शिवीगाळ, इंग्लडच्या जेसन रॉयवर आयसीसीची कारवाई
२३- कोहलीने टोलवलेल्या चेंडूमुळे महिलेच्या चेहऱ्याला दुखापत
२४- 'शिवाय'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगन थोडक्यात बचावला
२५- आम्ही वेगळे झालोय - मलायका- अरबाजचे स्पष्टीकरण
२६- भारताच्या विजयाची चार कारणं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- शिधापत्रिका-आधार लिंकिंग; जिल्ह्यात 100 टक्के काम पूर्ण, राज्यात प्रथम क्रमांक
२८- पूर्णा रस्त्यावरील सौदर्य प्रसाधनाच्या गोदामात स्फोट
२९- भोकर; गुरुद्वारा दर्शनासाठी जाणाऱ्या चारचाकी वाहनाला अपघात, एक ठार पाच जखमी
३०- कंधार मॉडेल शहर बनविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - चिखलीकर
३१- काकांडी गावात पाणीटंचाईचा बळी; टयाँकरखाली चिरडून बालक ठार
३२- तरोडानाका येथे कपडे धुण्याच्या बनावट पावडरसह टेम्पो जप्त
३३- भोकर; मातुळ येथे दि.३० रोजी अखिल भारतीय बौद्धधम्म परिषदेचे आयोजन
३४- सांगावीत धम्मउपासिका शिबिरास उत्साहात सुरुवात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
दीपक पेटवार, प्रथमेश गवळी, पप्पू ढवळे, प्रिया सावळे, राहील व्यास, योगेश नाईक, अनिकेत कुलकर्णी, राहुल जाधव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपण अशा ठिकाणी पोहचले पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी काम केले पाहिजे
(रमेश तालीमकर, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=============================================
ऑस्ट्रेलियावर मात करत भारताचा 'विराट' विजय
मोहाली : डॅशिंग विराट कोहलीच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी धुव्वा उडवून,ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
मोहालीच्या मैदानात भारतानं 161 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 39 धावांची गरज होती. तेव्हा विराटनं एक षटकार आणि सहा चौकारांची बरसात केली.
मग शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीनं षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि भारतानं सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय साजरा केला.
विराटनं 51 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. विराटनं युवराजसह चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली आणि मग धोनीसह 67 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला
=============================================
पश्चिम बंगालमध्ये अजानसाठी पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवलं
कोलकाता (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेदरम्यान अजान सुरु झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी आपलं भाषण मध्येच थांबवलं. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुमधडाका सुरु झाला आहे.
पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा झाली. यावेळी मोदी भाषण करत असताना सभेच्या नजीक असणाऱ्या मशिदीमध्ये अजान सुरु झालं. त्यामुळं मोदींनी अजान संपेपर्यंत आपलं भाषण बंद केलं.
अजान सुरु असताना मोदींनी भाषण थांबवलं म्हणून उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंतप्रधान मोदींची कौतुक केलं.
17 हून अधिक बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन लंडनला पसार झालेल्या विजय मल्ल्यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं. देशातल्या बँकांची परिस्थिती बिघडायला काँग्रेस सरकार जबाबदार असून, त्यांच्यात कार्यकाळात धनाढ्य उद्योगपतींना बँकांचा पैसा कर्जाच्या स्वरुपात वाटला गेला, असा हल्लाबोलही मोदींनी केला.
=============================================
गुजरातमध्ये भाजप खासदाराची मुजोरी चव्हाट्यावर, वृद्धाला लाथाडताना कॅमेऱ्यात कैद
पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर लोकसभा मतदारसंघाचे खासदार विठ्ठल रदादिया यांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद झालीय. एका धार्मिक कार्यक्रमात विठ्ठल रदादिया वृद्ध माणसाला लाथाडतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
खासदारांच्या या मुजोरीबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय. मात्र विठ्ठल रदादिया यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत.
अंधश्रद्धा पसरवणाऱ्या माणसाला हाकलण्यासाठी आपण ते कृत्य केल्याचं रदादियांकडून सांगण्यात येतंय. 2012 मध्ये मतदान केंद्रावरील कार्यकर्त्यावर बंदुक रोखल्याप्रकरणी विठ्ठल रदादिया चर्चेत आले होते.
=============================================
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोट, 69 जणांचा मृत्यू
लाहोर : पाकिस्तानमधलं लाहोर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. गुलशन ए इक्बाल पार्कात झालेल्या बॉम्बस्फोटात 69 जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर 300 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
गुलशन ए इक्बाल पार्क या गर्दीच्या परिसरात हा स्फोट झाला. त्यावेळी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून बचाव दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर सुरक्षा दलाने पार्क आणि जवळपासचा परिसर ताब्यात घेतला.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवाज शरीफांना फोन करुन हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. दहशतवादाबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता विरोधात लढण्याची गरज असल्याचंही मोदींनी नमूद केलं.
=============================================
बाद झाल्यावर शिवीगाळ, इंग्लडच्या जेसन रॉयवर आयसीसीची कारवाई
नवी दिल्ली: इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय आणि वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीवर अखिलाडू वृत्तीसाठी आयसीसीनं कारवाई केली आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात जेसन रॉय पायचीत झाला. पण पंचांनी दिलेल्या निर्णयावर त्यानं नाराजी व्यक्त करत थेट शिवीगाळ केली.
जेसन रॉय एवढ्यावरच थांबला नाही तर पॅव्हेलियनमध्ये परतताना त्यानं आपली बॅट आणि हेल्मेटही फेकून दिलं. त्यामुळं जेसनला आयसीसीनं सामन्याच्या मानधनाच्या 30 टक्के रकमेचा दंड ठोठावला.
याच सामन्यात श्रीलंकेच्या डावातील तिसऱ्या षटकांत डेव्हिड विलीनं मिलिंद शिरिवर्धनाला बाद केल्यावर शिविगाळ केली आणि शिरिवर्धनाला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. त्यामुळं विलिला सामन्यातील मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
=============================================
विजयाच्या जल्लोषाला गालबोट, नागपूरमध्ये गर्दीवर पोलिसांचा लाठीचार्ज
फोटो सौजन्य: एएनआय
नागपूर: टी-20 विश्वचषकातील निर्णायक सामन्यात विजय मिळवून कांगारुंना घराचा रस्ता दाखवला. या विजयाचं देशभरात जोरदार सेलिब्रेशन होत असताना नागपूरमध्ये मात्र, या जल्लोषाला काल गालबोट लागलं.
भारताने ऑस्टेलियाचा पराभव केल्यानंतर हजारो क्रिकेटप्रेमींची लक्ष्मीभुवन चौकात गर्दी उसळली. त्यावेळी काही तरूणांनी गोंधळ घातला. यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
टीम इंडिया ने ऑस्ट्रेलिया चा पराभव केल्यानंतर लक्ष्मीभुवन चौकावर काही मिनिटातच हजारो क्रिकेट प्रेमींची गर्दी जमली होती. मात्र, क्रिकेट प्रेमी हटत नसल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
=============================================
कोहलीने टोलवलेल्या चेंडूमुळे महिलेच्या चेहऱ्याला दुखापत
मोहाली : विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत भारताला खऱ्या अर्थाने ‘विराट’ विजय मिळवून दिला, मात्र सामना सुरु होण्यापुर्वी कोहलीचा सराव एका महिलेला चांगलाच महागात पडला. कोहलीने फटकावलेला चेंडू चेहऱ्यावर बसून एका महिलेला दुखापत झाली.
कोहलीने सराव करत असताना चेंडू स्टेडियमच्या दिशेने भिरकावला. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या सुरक्षा महाजन या महिलेच्या तोंडावर चेंडू लागला. कोहलीने टोलावलेला चेंडू चेहऱ्यावर आपटल्याने महिलेला दुखापत झाली. त्यानंतर तिला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र गंभीर इजा झाली नसल्याने तिला डिस्चार्जही देण्यात आला.
विशेष म्हणजे मॅच संपल्यानंतर कोहलीने महिलेच्या तब्येतीची विचारपुसही केली. सध्या महाजन यांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती टीमच्या सुत्रांनी दिली आहे.
विराट कोहलीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सहा विकेट्सनी हरवलं आणि ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
मोहालीच्या मैदानात भारतानं 161 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. या सामन्यात अखेरच्या तीन षटकांमध्ये भारताला विजयासाठी 39 धावांची गरज होती. तेव्हा विराटनं एक षटकार आणि सहा चौकारांची बरसात केली.
विराटनं 51 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा फटकावल्या. त्याच्या या खेळीमध्ये नऊ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. विराटनं युवराजसह चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली आणि मग धोनीसह 67 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताला विजय मिळवून दिला.
=============================================
अजानसाठी भाषण थांबवणं ही मोदींची नौटंकी : अबू आझमी
कोलकाता : कोलकात्यात प्रचारसभा घेत असताना अजान सुरु झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीनं भाषण थांबवलं. मात्र मुंबईचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पंतप्रधान मोदींना नौटंकीबाज असं हिणवलं आहे.
‘मोदींनी गुजरातमध्ये मश्जिद पायदळी तुडवले, कुराण जाळले आणि आता ते पश्चिम बंगालमध्ये आलेल्या निवडणुकीमध्ये मतं मिळवण्यासाठी हा ड्रामा करत आहेत’ असा आरोप अबू आझमी यांनी केला.
पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये पंतप्रधान मोदींची पहिली जाहीर सभा झाली. यावेळी मोदी भाषण करत असताना सभेच्या नजीक असणाऱ्या मशिदीमध्ये अजान सुरु झालं. त्यामुळं मोदींनी अजान संपेपर्यंत आपलं भाषण बंद केलं.
अजान सुरु असताना मोदींनी भाषण थांबवलं म्हणून उपस्थितांनी टाळ्या वाजवून पंतप्रधान मोदींची कौतुक केलं.
=============================================
'शिवाय'च्या शूटिंगदरम्यान अजय देवगन थोडक्यात बचावला
मुंबई : बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगन सध्या बल्जेरियामध्ये ‘शिवाय’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान अजय जीवघेण्या अपघातातून बचावल्याचं वृत्त आहे.
‘शिवाय’ हा अजय देवगनचा महत्त्वाकांक्षी अॅक्शनपॅक्ड थ्रिलर चित्रपट आहे. सोफिया शहरातील एका वर्दळीच्या रस्त्यावर एका पाठलागाच्या दृश्याचं चित्रीकरण सुरु होतं. सीनमध्ये अजय एका गाडीच्या बोनेटवर बसलेला असून ती कार अत्यंत वेगाने पळते. यावेळी रस्त्यावरील रहदारीची काळजी घेण्यात आली होती, तसंच सर्व प्रकारची सुरक्षाही घेण्यात आली होती.
स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार एक कार अचानक चित्रीकरण परिसरात घुसली आणि अजय बसलेल्या कारला तिने धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्या गाडीचा चेंदामेंदा झाला. ही घटना अनपेक्षितपणे घडली, मात्र क्रू मेंबर्सच्या समयसूचकतेमुळेच अजयला कार धडकायच्या काही जण आधी बोनेटवरुन बाजूला खेचण्यात आलं.
‘शिवाय’ सिनेमा 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. साईशा सैगल, अॅबिगेल ईम्स, एरिका कार यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
दरम्यान अजय ‘शिवाय’च्या चित्रीकरणातून ब्रेक घेणार असून सोमवारी नवी दिल्लीत पद्मश्री स्वीकारण्यास हजर राहणार आहे.
=============================================
सौदीतून सुटकेसाठी मीरा रोडच्या महिलेची व्हॉट्सअॅपवरुन हाक
मीरा रोड : ‘मुझे मेरे भारत जाना है, मुझे आज़ाद करो, भारत सरकार मेरी मदद करो, सुषमा मैडम मेरी मदद करो’ अशी आर्त हाक मीरा रोडला राहणाऱ्या मिस्बाह शेखची. या महिलेने आपल्या पतीला व्हॉट्सअपवर ही क्लिप पाठवून सौदीत अडकल्याची माहिती दिली आहे.
सौदी अरेबियाला एका अरबाकडे घरकाम करण्यासाठी महिला हवी असल्याने फैजल नावाच्या व्यक्तीच्या विश्वासावर मिस्बाह सौदी अरेबियाला गेली. मात्र तो अरब क्षमतेपेक्षा जास्त काम करायला लावायचा, तिचं मानसिक शोषण करायचा असा आरोप तिने केला आहे.
आपल्या मातृभूमीत परतण्याची तिला आस लागली आहे. हा संदेश तिला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यापर्यंत पोहचवायचा आहे. म्हणूनच व्हॉट्सअप क्लिपद्वारे तिने भारत सरकारला आर्त हाक दिली आहे.
=============================================
भारताच्या विजयाची चार कारणं
मोहाली : मोहालीच्या मैदानात टीम इंडियाने कांगारुंची 6 विकेट्स राखून धूळदाण केली आणि सेमी फायनलमध्ये धडक मारली. भारताचा डॅशिंग फलंदाज विराट कोहलीने संपूर्ण जगाला हेवा वाटावा अशी फलंदाजी केली. कोहलीने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलंच, पण अशक्यप्राय वाटणारं ऑस्ट्रेलियाचं 161 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.
कोहलीने अवघ्या 51 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीला त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला.
एकवेळ टीम इंडियाची अवस्था 9 षटकात 3 बाद 59 अशी होती. त्यानंतर भारताने 19.1 षटाकांत 4 बाद 161 अशी विजयाला गवसणी घालत, अशक्यप्राय विजय शक्य केला.
भारताच्या विजयाची चार कारणं –
1) विराट कोहली :
भारताच्या विजयाचं पहिलं कारण म्हणजे विराट कोहलीची धडाकेबाज फलंदाजी. कोहलीने अवघ्या 51 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. या खेळीला त्याने 9 चौकार आणि 2 षटकारांचा साज चढवला. त्याने गरजेच्यावेळी संयमी आणि आवश्यक होती तेव्हा फटकेबाजी केली. त्यामुळेच भारताला विजयाला गवसणी घालता आली.
2). रनिंग बिटवीन द विकेट :
कोहलीने युवराजच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी रचली. मात्र दुखापतीमुळे युवराजला धावता येत नव्हतं. त्यामुळे विराट कोहलीकडे क्षमता असूनही तो धावा घेऊ शकत नव्हता. पण युवराज बाद झाला आणि धोनी मैदानात आला, तेव्हा मात्र कोहलीने धावांची गती वाढवली. या दोघांनी कांगारूंच्या क्षेत्ररक्षणाचं अभेद्य कवच भेदून अनेक चोरट्या धावा घेतल्या. जिथे एक धाव मिळणं कठीण होतं, तिथं कोहली-धोनीने 2 धावा मिळवल्या. यामुळेच ऑस्ट्रेलियाची भांबेरी उडाली.
3) गोलंदाजी :
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पहिल्या चार षटकातच 53 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे कांगारू 200 धावांचा टप्पा ओलांडेल असं वाटत होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत कांगारूंना 160 धावांत रोखलं.
नेहराशिवाय युवराज सिंह आणि रवींद्र जाडेजा या पार्टटाईम गोलंदाजांनी 6 षटकात केवळ 39 धावा दिल्या. त्यामुळेच कांगारुंना 160 धावांत रोखणं शक्य झालं.
4) कॅप्टन कूल धोनी :
दबावात नेतृत्त्व कसं करायचं, हे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा दाखवून दिलं.
एकीकडे कोहीलीच्या धडाकेबाज खेळीमुळे भेदरलेल्या संघाला सावरण्यास ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अपयशी ठरला. मात्र दुसरीकडे 4 षटकांत 53 धावा जाऊनही धोनीने भारतीय गोलंदाजांना जो विश्वास दिला, तो त्याच्या नेतृत्त्वाला साजेसा होता. भारताने मॅचमध्ये पुनरागमन करण्याचं मुख्य कारण हेच होतं.
पराभवाला धोनी घाबरत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या डोक्यात चाली सुरु असतात. शांत डोक्याने रचलेल्या चालींनी धोनी टीम इंडियाला विजयापर्यंत नेऊन ठेवतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
=============================================
युवराजच्या वडिलांची कर्णधार धोनीवर पुन्हा एकदा जहरी टीका!
नवी दिल्ली: टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंहच्या वडिलांनी कर्णधार धोनीवर जोरदार टीका करीत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ऑस्ट्रेलियासोबत होणाऱ्या सामन्याआधी योगराज सिंह यांनी धोनीवर थेट आरोप केले होते.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, योगराज सिंह म्हणतात की, ‘माझ्या मुलासोबत दुजाभाव केला होत आहे. दोन वर्ष क्रिकेटपासून दूर राहिलेल्या युवराजनं ज्या पद्धतीनं पुनरागमन केलं. ते कुणालाही शक्य नाही.’ असं योगराज म्हणाले.
‘टीमचा कर्णधार या नात्यानं धोनीला आशा ठेवायला हवी की, तो चांगला खेळ करु शकतो. मात्र, धोनी त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत आहे.’ असं म्हणत योगराज यांचा तोल सुटला आणि त्यांनी अपशब्द वापरत धोनीवर निशाणा साधला.
‘धोनीला नेमकं काय साध्य करायचं आहे? फलंदाजीमध्ये वारंवार बदल करत राहिल्यानं खेळाडूच्या मनात शंका निर्माण होते. पण मी माझ्या मुलाला सांगितलं आहे. की, काळजी करण्याचं कारण नाही. तुझी योग्य वेळ नक्कीच येईल.’
एवढ्यावरच न थांबता योगराज सिंह पुढेही म्हणाले की, ‘धोनीमध्ये ताकद असेल तर त्यांनां दोन वर्ष संघातून बाहेर राहून पुन्हा संघात येऊन दाखवावं. एकीकडे फिरकीसाठी उत्तम खेळपट्टी असूनही त्यानं युवराजला गोलंदाजी दिली नाही. 2011 विश्वचषकात युवराजनं 15 विकेट घेतल्या होत्या.’
दरम्यान, याआधीही योगराज सिंह यांनी धोनीवर जहरी टीका केली होती.
=============================================
६३वे राष्ट्रीय पुरस्कार - बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट तर बिग बी सर्वोत्कृष्ट अभिनेता
- नवी दिल्ली, दि, २८ - सर्वोच्च मानाचे समजले जाणा-या ६३व्याराष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून आबालवृद्धांना भुरळ घालणा-या 'बाहुबली' चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली आहे. तर चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आणि बॉलवूडची 'क्वीन' कंगना राणवतला दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
=============================================
मेहबूबा मुफ्ती ' भारतमाता की जय' म्हणतील का? - उद्धव ठाकरे
- नवी दिल्ली, दि. २८ - 'भारतमाता की जय’वरून देशात सुरू असलेला वाद अद्याप शमलेला नसतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीकाश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावर भाष्य करत 'सध्या राष्ट्रवादावर चर्चा झडत असताना जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील काय'? असा सवाल करत उद्धव यांनी बाजपाच्या राष्ट्रप्रेमाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. देशविरोधी मुक्ताफळे उधळणा-या, कश्मीरात हिंदुस्थानविरुद्ध घोषणा देणार्यांना सहानुभूती दाखवणा-या मेहबूबा मुफ्ती यांची आता संसदेवर हल्ला करणार्या अफझल गुरूच्या बाबतीत काय भूमिका आहे? असा थेट सवालही त्यांनी अग्रलेखातून विचारला आहे.भाजपने मेहबुबा यांच्याबरोबर नवा डाव मांडला, पण लाखो कश्मिरी पंडितांच्या जीवनाचा डाव अतिरेक्यांनी उधळून लावला आहे. आता काश्मीरात पीडीपी-भाजप सरकारचा नवा पाळणा एकदाचा हलला आहे असून निदान आता तरी कश्मीर खोर्यात शांतता नांदो व देशावरचे ओझे कमी होवो! अशी अपेक्षा उद्धव यांनी अग्रलेखात व्यक्त केली आहे.
=============================================
धूर येऊ लागल्याने एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिग
- मुंबई, दि. २८ - एअर इंडियाच्या हैदराबादहून मुंबईला येणा-या विमानाचे मुंबई विमानतळावर सोमवारी सकाळी इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. विमानाच्या सामान कक्षातून धूर येऊ लागल्याने सकाळी ८.३० च्या सुमारास फ्लाईट ६२०चे इमर्जन्सी लँडिग करावे लागले.दरम्यान विमानातील सर्व १२० प्रवाशांना आप्तकालीन मार्गाने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने कोणलाही दुखापत झालेली नाही. दरम्यान विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून पर्यायी धावपट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे.
=============================================
हो, आम्ही वेगळे झालोय - मलायका- अरबाजचे स्पष्टीकरण
- मुंबई, दि. २८ - बॉलिवूड कपल मलायका अरोरा आणि अरबाज खानहे दोघे विभक्त होणार असल्याची ब-याच काळापासून फिरत असलेली अफवा आता अखेर खरी ठरली असून मलायका आणि अरबाज या दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्या दोघांनीही 'डीएनए' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या जॉईंट स्टेटमेंमध्ये ते एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मलायकाचे बिझनेसमनशी सूत जुळल्यामुळे वा मीडियात फिरत असलेली इतर कारणे ही आपल्या विभक्त होण्यास कारणीभूतठरल्याचा त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दर्शवला असून कोणत्याही वकिलाकडे गेल्याचे वृत्तही त्यांनी फेटाळले.दरम्यान या जॉईंट स्टेटमेंटमध्ये त्यांनी 'चुकीची माहिती पसरवणा-या' त्यांच्या 'तथाकथित मित्रांवर'ही निशाणा साधला आहे. तसेच हे लग्न वाचवण्यासाठी अरबाजचा भाऊ अभिनेता सलमान खानने मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न, अरबाजच्या कुटुंबियांना मलायकाच्या लाईफस्टाईलमुळे असलेला प्रॉब्लेम आहे वा लग्नापासून आपल्याला कोणतेही आर्थिक स्थैय मिळाले नाही, अशी मलायकाने केलेली तक्रार... या सर्व वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत या वृत्तांचा घटस्फोटाशी कोणताही संबंध नसल्याचे अरबाज व मलायकाने स्पष्ट केले आहे.तसेच ' हा आमचा वैयक्तिक प्रश्न असून आम्ही दोघे शांत आहोत याचा कोणीही फायदा घेऊ नये. जेव्हा आम्ही दोघेही तयार असू तेव्हा आम्ही या विषयावर भाष्य करू. आमच्या दोघांसाठीही ही अतिशय कठीण वेळ असून आम्हाला आमची स्पेस द्या' अशी विनंती त्यांनी मीडियाला केली आहे.
=============================================
३०० गड-किल्ल्यांवर फडकणार भगवा!
- मुंबई : गेल्या ३५० वर्षांत प्रथमच राज्यातील ३०० गड-किल्ल्यांवर एकाच दिवशी भगवा ध्वज फडकवण्याची किमया घडणार आहे. ३० मार्चला ‘स्वराज्य सिद्धी संकल्प दिवस’ म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानने ही मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी सुमारे ३ हजारांहून अधिक कार्यकर्ते तयारी करीत आहेत.याआधी ३० मार्च १६४५ रोजी रोहिडेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्यानंतर छत्रपतींनी प्रतिकूल परिस्थितीत रयतेचे राज्य स्थापन केले. त्याच शुभ दिवसाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानने ३०० किल्ल्यांवर स्वराज्याची पताका व स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प केल्याचे प्रतिष्ठानचे संपर्क प्रमुख गणेश रघुवीर यांनी सांगितले.रघुवीर यांनी सांगितले की, प्रत्येक किल्ल्यावर भगवी पताका फडकविण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभाग, केंद्र पुरातत्त्व विभाग, वन विभाग आणि संबंधित सनदा तत्त्वावर दिलेल्या मान्यवरांच्या अधिकृत परवानग्या घेण्यात आल्या आहेत. राज्य पुरातत्त्व विभागांतर्गत ४६ आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागांतर्गत ३८ किल्ले येत असून, उरलेले बहुतांश किल्ले वनविभागांतर्गत येतात. किल्ल्यांवर स्वच्छता मोहीमही राबवली जाईल. त्यात गडावरील प्लॅस्टिक कचरा (बाटल्या), पाला-पाचोळा, काचेचे तुकडे गोळा केले जातील. यावेळी वृक्षतोड तसेच ऐतिहासिक वास्तूला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
=============================================
तीन महिन्यांत मुंबईत झाले १५वे अवयवदान
- मुंबई : वसईत राहणाऱ्या ४३वर्षीय इसमाला डोकेदुखी आणि अन्य त्रास जाणवू लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने या पुरुषास ब्रेनहॅमरेज झाले. त्यामुळे २३ मार्चला याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या पत्नीने अवयवदानास संमती दिल्याने तिघांना जीवनदान मिळाले.४३वर्षीय इसमाला २१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पुरुषाचा रक्तदाब वाढला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. ब्रेनहॅमरेज झाल्यानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्या वेळी ब्रेनडेड पुरुषाच्या भावाला अवयवदानाविषयी सांगितले. त्यानंतर त्यांच्या पत्नीला विचारले. त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन झाल्यावर त्यांनी अवयवदानाला संमती दिली, असे रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुचेता देसाई यांनी सांगितले.ब्रेनडेड व्यक्तीच्या मावशीने डॉक्टरांना सांगितले, हा आमचा पवित्र महिना आहे. त्यामुळे त्याचे अवयव दान केल्यास नक्कीच आम्हाला समाधान मिळणार आहे. अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. शक्य असणाऱ्या सर्व अवयवांचे दान करण्यास कुटुंबीयांनी संमती दिली होती.या पुरुषाचे मूत्रपिंड आणि यकृत दान करण्यात आले. एक मूत्रपिंड आणि यकृत हिंदुजा रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले आहे. तर, एक मूत्रपिंड जसलोक रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले आहे. या रुग्णाचे नातेवाईक हृदय दान करायलाही तयार होते. मात्र, हृदय प्रत्यारोपणासाठी रुग्ण प्रतीक्षा यादीत नसल्यामुळे हृदय दान केले नाही, असेही डॉ. देसाई यांनी सांगितले.
=============================================
शिक्षण संस्थेला म्हाडाची नोटीस
- मुंबई : भाडेपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तींनुसार चारकोप येथील भूखंड तात्काळ या परिसरातील मुले आणि रहिवाशांसाठी खुला करावा अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पत्र म्हाडाने विद्या शिक्षण प्रसारक मंडळाला पाठवले आहे.विद्या शिक्षण प्रसारक मंडळाने २७ आॅक्टोबर २00५ रोजी झालेल्या करारानुसार म्हाडाकडून चारकोप येथील भूखंड क्रमांक १, आरएससी - १२, सेक्टर - ३ हा भूखंड म्हाडाकडून वार्षिक एक रूपया करारावर घेतला आहे. एकूण ४९३६.२९ चौ.मी. क्षेत्रफळाच्या या भूखंडाचा ताबा या शिक्षण संस्थेने घेतला. त्यातील शाळेच्या इमारतीसाठी २२५१.0६ चौ.मी. तर खेळाच्या मैदानासाठी २६८५.२३ चौ.मी. देण्यात आलाआहे.भाडेपट्टा करारनाम्यातील अटी आणि शर्तीमधील अनुक्रमांक ड मध्ये खेळाच्या मैदानासाठी २६८५.२३ चौ.मी.चा भूखंड मुलांसाठी आणि चारकोप कांदिवलीतील रहिवाशांसाठी खुला ठेवण्यात यावा, असे नमूद आहे.मात्र संस्थेने या मैदानाचा पूर्णत: कब्जा करून येथील स्थानिक रहिवाशांना आणि मुलांना या मैदानाचा वापर करण्यास मनाई केल्याची तक्रार युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अॅन्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम यांनी म्हाडाकडे केली. त्या तक्रारीची गंभीर दखल घेत म्हाडाच्या मुंबईमंडळाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी संस्थेला हे पत्र पाठवले आहे.
=============================================
अलास्कात सॅन्डर्स विजयी, हिलरी पराभूत
- वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत डेमोक्रॅटस्चे सिनेटर बर्नी सॅन्डर्स यांनी अलास्का, वॉशिंग्टन आणि हवाई कॉकसमध्ये हिलरी क्लिंटन यांना पराभूत करून त्यांच्यातील मताधिक्य कमी केले आहे.मतमोजणी झालेल्या एकूण मतांपैकी सॅन्डर्स (७४) यांना वॉशिंग्टनमध्ये ७२ टक्क्यांपेक्षा जास्त तर अलास्कात ८० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली; मात्र डेलिगेटस्चा विचार करता ६८ वर्षीय हिलरी यांचे मताधिक्य अजूनही कायम आहे. वॉशिंग्टन या महत्त्वपूर्ण राज्यात त्यांना पराभवाची झळ सोसावी लागल्याने त्यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. वॉशिंग्टन राज्यात १०० पेक्षा जास्त डेलिगेटस् आहेत. त्यातील एक मोठा हिस्सा सॅन्डर्स यांच्या बाजूने वळला आहे. हवाई येथे अमेरिकी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच निवडून गेलेल्या हिंदू तुलसी गब्वार्ड यांनी सॅन्डर्स यांना समर्थन दिले होते. त्यांनी सॅन्डर्स यांना पाठिंबा देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वोच्च पदाचा राजीनामा दिला होता. त्या सॅन्डर्स यांच्यासोबत एका जाहिरातीतही दिसतात. अलास्कात सॅन्डर्स यांच्या पत्नीने काही दिवस प्रचार केला होता. तेथे १६ डेलिगेटस् आहेत. वॉशिंग्टन आणि अलास्कात प्रायमरी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सॅन्डर्स आपल्या समर्थकांना उद्देशून बोलताना म्हणाले की, आमच्या प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून त्याचा आता कोणीही इन्कार करू शकत नाही. आमची स्थिती आता सुधारत आहे. आम्ही विजयाच्या मार्गावर आहोत. आता विस्कोंसिन येथे पाच एप्रिल रोजी प्रायमरी निवडणूक होत आहे.
=============================================
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाने अमेरिकेची चिंता वाढवली
- वॉशिंग्टन, दि. २७ - भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या चाचण्यांमुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढणार असून, प्रादेशिक शांततेवरही परिणाम होतो असे अमेरिकेने म्हटले आहे. कुठल्याही अण्विक आणि क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या कार्यक्रमाची आम्हाला चिंता वाटते.त्यामुळे अण्विक स्पर्धेचा धोका वाढतो असे अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले. भारताच्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल टोनर यांना विचारले असता त्यांनी आम्ही आमची चिंता भारताच्या कानावर घातली आहे असे सांगितले.भारताबरोबर आमची याविषयावर काय व्दिपक्षीय सविस्तर चर्चा झाली ते सांगू शकत नाही पण आम्ही आमची चिंता कानावर घातली असे टोनर यांनी सांगितले. भारताने अलीकडेच स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्र वाहू के-४ क्षेपणास्त्राची चाचणी केली. त्यावर अमेरिकेने टीका केली आहे. भारताची अण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतवर हे के-४ मिसाईल तैनात करण्यात येणार आहे.
=============================================
महिलांबद्दल अनुदार उद्गार डोनाल्ड ट्रम्प यांना महागात पडणार
- न्यूयॉर्क : अमेरिकी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचारात देशातील प्रमुख महिलांवर केलेले वैयक्तिक हल्ले पाहता त्यांना ही बाब निवडणुकीत महागात पडू शकते.रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यासाठी डोनॉल्ड ट्रम्प आणि सिनेटर टेड क्रूझ यांच्यात तीव्र स्पर्धा असून काही दिवसांपूर्वी या दोघांनीही परस्परांच्या पत्नींवर तीव्र टीका केली. त्यातून प्रचाराची पातळी घसरली.ट्रम्प यांनी प्रमुख महिलांना उद्देशून ‘बिम्बो’, ‘क्रुमे’, ‘लठ्ठ डुक्कर’ असे शब्द वापरले. ते महिलांना आवडलेले नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या ट्रम्प यांना हे शब्दप्रयोग अडचणीत आणू शकतील.या आठवड्यात ट्रम्प आणि त्यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ यांनी परस्परांवर खालच्या पातळीवरून हल्ले करताना त्यात दोघांच्या पत्नींना ‘लक्ष्य’ केले. ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलेनिया हिचे विवस्त्र छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. त्या छायाचित्राखाली ‘एक छायाचित्र हजार शब्दाचे काम करते’ असे लिहिण्यात आले होते. हे छायाचित्र प्रसिद्ध होताच क्रूझ यांची पत्नी हैदी हिचेही एक छायाचित्र सोशल मीडियात आले. त्यामुळे क्रूझ संतापले. त्यांनीही ट्रम्प यांना माझ्या पत्नीला यात ओढू नका, असे बजावले. या पाठोपाठ एका दैनिकात क्रूझ यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे प्रसिद्ध झाले. या घटनांमुळे विशेषत: ट्रम्प यांची महिलांमधील प्रतिमा ढासळली असल्याचे दिसून आले आहे. ३९ टक्के रिपब्लिकन समर्थक महिलांनी ट्रम्प यांच्या विरोधात मत नोंदविले, असे सीएनएन ओआरसीच्या चाचणीत आढळून आले आहे.
=============================================
सराफ ांना अधिकारी त्रस्त करणार नाहीत - जेटली
- नवी दिल्ली : उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ ज्वेलर्स व्यापारी संपावर गेले असून, या संपाचा आता चौथा आठवडा सुरू होत आहे. दरम्यान, ज्वेलर्स व्यापाऱ्यांना कर अधिकारी त्रस्त करणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असा शब्द अर्थमंत्री जेटली यांनी दिला आहे.अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे स्पष्ट केले की, चैनीच्या किमती उत्पादनांना करातून सूट देता येणार नाही. पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की, सोने आणि अन्य आभूषणे हे जीएसटी प्रणालीचा एक भाग आहेत. सोन्याच्या दागिन्यांवरील एक टक्का उत्पादन शुल्क यातच समाविष्ट होईल. कोणत्याही लक्झरी वस्तूंना कर द्यावा लागेल. अर्थसंकल्पात दागिन्यांवर एक टक्का उत्पादन शुल्काचा प्रस्ताव आहे.तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापनासरकारने या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. हे शुल्क प्राथमिक निर्मिती करणाऱ्यालाच लागणार आहे. कारागीर अथवा छोट्या व्यावसायिकांना लागणार नाही, असेही ते म्हणाले.संप सुरूच राहणार : उत्पादन शुल्काचा निर्णय मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील, असा इशारा सराफा व्यापाऱ्यांनी दिला आहे. व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना कन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स, आॅल इंडिया ज्वेलर्स अॅण्ड सुवर्णकार फेडरेशन यांनी आज स्पष्ट केले आहे की, उत्पादन शुल्काबाबत प्रस्ताव मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत संप सुरू राहील. या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.
=============================================
कोळसा खाण गैरव्यवहार;'इस्पात'चे संचालक दोषी
कोळसा खाण गैरव्यवहार;'इस्पात'चे संचालक दोषी
रायपूर - कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणात झारखंड इस्पात खासगी कंपनीच्या दोन संचालकांना विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
या गैरव्यवहाराची चौकशी करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने आज (सोमवार) झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आर. एस रुंगठा आणि आर. सी. रुंगठा यांना सुनावणीनंतर तात्काळ अटक करण्यात आली. या दोन्ही संचालकांना फसवणूक आणि गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 31 मार्चला होणार असून, या सुनावणीवेळी शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार असताना कोळसा खाण वाटप गैरव्यवहार उघडकीस आला होता. या गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही आरोप करण्यात आलेले आहेत.
=============================================
"फर्ग्युसन'मधील वादावर पुणेरी प्रतिक्रियांचे वादळ
"फर्ग्युसन'मधील वादावर पुणेरी प्रतिक्रियांचे वादळ
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात डाव्या आणि उजव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये नुकताच वाद झाला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यात उडी घेतल्याने या वादाला फोडणी मिळाली. या वादाविषयी काही पुणेरी नेत्यांनी खासगीत व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आमच्या हाती लागल्या आहेत. त्याची खात्री करण्यासाठी संबंधितांना फोन केला असता, त्यांनी आपण असे बोललोच नव्हतो, असा दावा केला. या प्रतिक्रिया म्हणजे चार दिवस आधीच "एप्रिल फूल‘ करण्याचा प्रकार असल्याचे काहींनी सांगितले.
=============================================
'भारत माता की..' जगाने म्हटले पाहिजे-भागवत
कोलकता - आम्हाला भारताला श्रीमंत बनविण्याबरोबच शोषणमुक्त देश बनवायचे आहे. हा देश स्वावलंबी बनवा आणि संपूर्ण जगाने "भारत माता की जय‘ची घोषणा द्यावी असे आम्हास वाटते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे केले.
कै. मदनलाला अग्रवाल यांच्यावरील पुस्तक प्रकाशन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले, ""संपूर्ण जगाने भारताला सॅल्यूट केला पाहिजे असा भारत घडण्याची गरज आहे. देशाच्या विभाजनानंतर पाकिस्तानने भारत नावाचा दावा केला नाही; त्याचे कारण असे की भारतामध्ये जी गुणवत्ता आहे ती त्यांनी स्वीकारली नाही; संघाचे नेतृत्व करीत आहे हे मी माझे भाग्य समजतो.‘‘
=============================================
दृष्टीहिनांमध्ये पेरायची आहेत प्रकाशाची बीजं...!
दृष्टीहिनांमध्ये पेरायची आहेत प्रकाशाची बीजं...!
होलिकोत्सवातील रंगपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा होणार आहे. पण, स्वतःच्या आयुष्यातील अनेक संघर्षांवर मात करून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे, सुखाचे रंग पेरणारी माणसं, ही मुलखावेगळीच. मूळची उस्मानाबादची, किल्लारीच्या भूकंपात तीन दिवस मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून राहिलेली आणि त्यानंतर दृष्टी जाऊनही शिक्षणाचा एकेक टप्पा पार करत सध्या नॅशनल इन्शुरन्समध्ये असिस्टंट म्हणून कार्यरत असलेल्या शाहूबाई औसेकर हिची ही अनोखी सक्सेस स्टोरी रंगपंचमीच्या निमित्तानं....!
शाहूबाईला प्रेमाने सारे प्रतिभाही म्हणतात. गेल्या नोव्हेंबरमध्ये ती नॅशनल इन्शुरन्सची असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिची ही कथा नॅशनल इन्शुरन्सच्या इतर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केवळ कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचू लागली. साहजिकच या यशोगाथेतून अनेकांना प्रेरणादायी रंगांची अनुभूती मिळू लागली. काय आहे, शाहूबाईचा प्रवास ? ती इथंपर्यंत कशी पोचली ?
=============================================
No comments:
Post a Comment