[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; अमेरिकेच्या हल्ल्यात 150 दहशतवादी ठार
२- लॉस एंजेलिस; मारिया शारापोव्हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
३- पाकिस्तानच्या सामन्यासाठी केवळ 250 व्हिजा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अकाऊंटमध्ये 150 रुपये आणि कन्हैयाला मारण्यासाठी 11 लाखांचं इनाम
५- पीएफवरील व्याजाच्या गोंधळावर जेटलींचं आज संसदेत उत्तर
६- धडक देणारी गाडी स्मृती इराणींच्या ताफ्यातील नाही : पोलिस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- बंगळूरू; विजय मल्ल्यांना झटका, 515 कोटीची बँक खाती फ्रीज
८- MEP टोल : माजी अति. सचिव आनंद कुलकर्णींचं पेन्शन रोखण्याची मागणी
९- बाईनं मादी नव्हे, माय वाटायला हवं : सिंधुताई सपकाळ
१०- ..तर पुढची निवडणूक राष्ट्रवादीसोबत लढवू : जानकर
११- 'हाय स्पीड'चे चार मार्ग महाराष्ट्रातून
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मांगीतुंगीतील भव्य मूर्तीची गिनीज बुकात नोंद
१३- सातारा; 8 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, आरोपी अटकेत
१४- मुक्रमाबाद; महाशिवराञी निमित्त महादेव मंदिरात परमरहस्य पारायण
१५- पाचोड; शिकवणी घेऊन मुलाला केले संगणक अभियंता
१६- मंठा; मंगळसूत्र गहाण ठेवून बांधले स्वच्छतागृह
१७- नाशिक; फक्त महिलांनाच प्रवेश देणारा... माँजी साहब दर्गा
१८- कोथरूड; जिद्द आणि कष्टांतून मुलाला पाठवलं परदेशी
१९- इंदूर; बायकोला विकणे आहे!; कर्जबाजारी पतीची ‘फेसबुक‘वर जाहिरात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कायमचा दुरावा, 'का रे दुरावा' घेणार प्रेक्षकांचा निरोप
२१- टी-20 विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये फ्री वायफाय मिळणार
२२- टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम
२३- शमीसाठी संघात जागा नाही, धोनीचे संकेत
२४- सिक्सर किंग महेंद्रसिंह धोनीचा नवा विक्रम
२५- लसिथ मलिंगा श्रीलंकेच्या कर्णधारपदावरुन पायउतार
२६- गूगलचा Nexus 6P पाच हजार रुपयांनी स्वस्त
२७- मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादावादीतून मुंबईत एकाची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
कृष्णा पांचाळ, आनंद बमाल्वा, किरण शिरामे, सुशांत कदम, शाम निलंगेकर, गजानन बाराते, रणजीत कुमार, सुमित देशमुख, सुनील पतंगे, स्वाती देशमुख, स्वप्नील पावडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका
(अरुण उकंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=====================================
=====================================
=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

जवळपास गेली सव्वा वर्ष ‘का रे दुरावा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ऑफिसमध्ये विवाहित व्यक्तींना नोकरी करण्यास परवानगी नसल्यामुळे एक जोडपं आपलं वैवाहिक आयुष्य लपवून एकाच ऑफिसमध्ये नोकरी करतं, अशी संकल्पना असलेली ‘का रे दुरावा’ वेगळ्या हाताळणीमुळे अल्पावधीत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली.
‘का रे दुरावा’च्या जागी ‘काहे पिया परदेस’ ही मालिका भेटीला येणार आहे. 28 मार्चपासून नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होणार आहे. पहिल्यांदाच मराठी मालिकेत मराठी-हिंदी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे.
जय-अदिती साकारणारे सुयश टिळक, सुरुची आडारकर यांच्याशिवाय अविनाश सर, आऊ यांसारखी देव टूर्समधली मंडळी, केतकर काका काकू या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. झी मराठी अवॉर्डसारख्या पुरस्कार सोहळ्यातही मालिकेने अनेक पुरस्कार पटकावले.
काहीच महिन्यांपूर्वी अडीच वर्ष चाललेल्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने निरोप घेतला होता. तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचा पहिला सीझनही नुकताच संपला.
=====================================
=====================================
विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी उचललेलं सात हजार कोटी रुपयाचं कर्ज थकलेलं आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या अटकेची मागणी केली आहे. एसबीआयसोबत सेटलमेंट होईपर्यंत मल्ल्यांची खाती गोठलेलीच राहणार आहेत. पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला सात हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने बंगळुरुच्या कर्ज वसुली लवादाकडे दाद मागितली होती.
बंगळुरुच्या कर्ज वसुली लवादामध्ये स्टेट बँकेच्या वतीने चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक मल्ल्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी, दुसरा मल्ल्यांचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी तर तिसरा मल्ल्या यांना डियाजिओकडून मिळणाऱ्या 75 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 500 कोटी रुपयांवर स्टेट बँकेचा पहिला हक्क आहे, हे सांगण्यासाठी आहे. तसंच चौथा अर्ज मल्ल्या यांची देशा-विदेशातील सर्व चल-अचल संपत्ती जप्त करावी या मागणीसाठी आहे.
मल्ल्या यांची यूबी म्हणजे यूनायडेट स्पिरीट ही कंपनी इग्लंडच्या डियाजिओ या मद्य कंपनीने विकत घेतली. त्या बदल्यात मल्ल्या यांना मिळणाऱ्या 500 कोटी रुपयांमधून स्टेट बँकेला सर्व प्रथम वसुली करण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही स्टेट बँकेने केली.
=====================================
=====================================
ताफ्यातील गाडीला झालेल्या अपघातानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अपघातग्रस्तांना मदत न केल्याचा आरोप झाला होता. मदतीची याचना करुनही स्मृती पुढे निघून गेल्याचा दावा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरच्या मुलीने केला आहे.
स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा अपघाताच्या 7 ते 8 मिनिटांनंतर घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर दोघं जखमी झाले होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
‘स्मृती इराणींच्या ताफ्यातील गाडीने आमच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्या स्वतःच्या गाडीतून बाहेर आल्या. मी त्यांच्याकडे मदतीची याचना केली. मात्र त्या निघून गेल्या’ असं डॉ. रमेश नगर यांची कन्या संदिलीने म्हटलं आहे.
‘माझ्या बहिणीने अक्षरशः हात जोडून स्मृती इराणींकडे मदत मागितली. पण त्या थांबल्या नाहीत’ या शब्दात संदिलीचा भाऊ अभिषेकनेही स्मृती यांनी मदत नाकारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे स्मृती इराणी यांनी ट्वीट करुन अपघातग्रस्तांना मदत पोहचवल्याचा दावा केला होता.
=====================================
मात्र त्यानंतर मलिंगाला वारंवार दुखापतींनी ग्रासलं. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान मलिंगाच्या गुडघेदुखीने उचल खाल्ली होती. श्रीलंकेला त्या स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर व्हावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवरच मलिंगानं आपल्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं केलं जावं अशी विनंती श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मलिंगाची विनंती स्वीकारली असून, श्रीलंकन टीमच्या कर्णधारपदी अँजलो मॅथ्यूजची नियुक्ती केली आहे.
=====================================

=====================================

=====================================

नेहा धुपिया सध्या ‘संता बंता प्रायव्हेट लिमिटेड’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी फिजीमध्ये गेली आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये ती बिकीनीत दिसणार आहे. यामुळे बिकीनी खरेदी स्वतःच करण्याचा निर्णय तिने घेतला.
फिजीतील मार्केटमध्ये तिने शोधाशोध केली आणि अखेर तिचा शोध एका बिकीनीवर संपला. विशेष म्हणजे ही बिकीनी तिला इतकी आवडली की नेहाने तिच्या पर्सनल कलेक्शनमध्येच या बिकीनाचा समावेश केला आहे.
=====================================

=====================================

धुरुमचूकवा ओबिना मायकल असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्या करणारा चुकवहुमा मायकल नावाबू हासुद्धा नायजेरियन नागरिक आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरमधील महेंद्र अपार्टमेंटमध्ये दोघे राहात होते. रात्री मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर सकाळी दोघे गॅलरीत फुटबॉल खेळत होते. यावेळी फुटबॉलपटू मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
त्यातूनच चुकवहुमाने काचेची बाटली फोडून तिने धुरुमचूकवाच्या गळ्यावर वार केले. त्यातच अतिरक्तस्त्राव झाल्याने धुरुमचूकवाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत व्यक्ती आणि आरोपी या दोघांचाही व्हिसा संपला होता आणि ते अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
=====================================

=====================================
शिकवणी घेऊन मुलाला केले संगणक अभियंता
पाचोड - पतीच्या अपघाती निधनानंतर खचून न जाता खासगी शिकवण्या घेऊन कुटुंबाचा भार पेलतानाच दोन्ही मुलांना संगणक अभियंता करण्याची जबाबदारी पाचोड (ता. पैठण) येथील सुलभाताई भाले यांनी पार पाडली आहे. अकाली "वैधव्य‘ आलेल्या महिलांसमोर त्यांनी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
सुलभाताई भाले (वय 40) यांचे पती सुधीर भाले यांचे वर्ष 2000 मध्ये अपघातात निधन झाले. सुखी संसाराचे स्वप्न क्षणात विखुरले. पतीचे निधन झाले तेव्हा साडेचार वर्षांचा सुयोग, दीड वर्षाचा विशाल या दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सुलभाताईंवर येऊन पडली. अशा परिस्थितीत खचून न जाता स्वतःला सावरत मुलांच्या माध्यमातून जीवनाचा "कवडसा‘ त्या शोधू लागल्या. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले असल्याने त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंब सावरले. घरातील धनी गेला म्हणून कुढत बसण्यापेक्षा जगण्याची लढाई लढून त्यांनी दोन्ही मुलांना शाळेत घातले. त्यांच्या शिक्षणाची विशेष काळजी घेतली. मुलांना वडिलांची कोणतीच उणीव भासू दिली नाही. मोठा मुलगा सुयोग नुकताच संगणक अभियंता झाला. तर विशाल हा संगणक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ते दोघेही पुण्याला असून सुलभा मात्र पाचोडला राहून त्यांच्या पुस्तकांपासून सर्व गरजा शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेऊन पूर्ण करते आहे. अचानक ओढवलेल्या संकटाशी जिद्दीने सामोरे जाऊन आपण जगण्याची लढाई लढली पाहिजे, असे सुलभाताई मोठ्या अभिमानाने सांगतात. आपण जिंकलेली जगण्याची लढाई पाहण्यास पती नसल्याचे दुःख त्यांना आहे.
=====================================
अमेरिकेच्या हल्ल्यात 150 दहशतवादी ठार
वॉशिंग्टन - आफ्रिका खंडामधील सोमालिया देशाची राजधानी असलेल्या मोगादिशु शहराच्या उत्तरेस सुमारे 120 मैल अंतरावर अल शबाब या सोमाली दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात 150 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.
अल शबाब सोमालियात अमेरिकन व आफ्रिकन युनियनच्या फौजांवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (पेंटॅगॉन) प्रवक्ते कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी दिली. हा हल्ला अत्यंत यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.
अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल शबाबच्या फौजांना आफ्रिकन युनियनच्या सैन्याने 2011 मध्ये मोगादिशुमधून हुसकावून लावले होते. मात्र अजूनही अल शबाबचे सामर्थ्य मोठे असून सोमालियातील पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या सरकारला उलथवून लावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
=====================================
मारिया शारापोव्हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
लॉस एंजेलिस - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या उत्तेजक पदार्थ (ड्रग) सेवन चाचणीमध्ये रशियाची जगप्रसिद्ध महिला टेनिसपटू मारिया शारापोव्हा दोषी आढळली आहे. पाच ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकाविलेली शारापोव्हा आरोग्यविषयक समस्येवर गेल्या दहा वर्षांपासून घेत असलेल्या एका औषधामुळे या चाचणीमध्ये दोषी आढळली आहे.
शारापोव्हावर येत्या 12 मार्चपासून निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने (आयटीएफ) केली आहे. या महिन्यात "मेल्डोनियम‘ सेवन केल्यामुळे दोषी आढळलेली शारापोव्हा ही तब्बल सातवी क्रीडापटू आहे. मेल्डोनियम हे द्रव्य मधुमेहाच्या विकारासंदर्भातील औषधोपचारासंदर्भात वापरले जाते. जागतिक उत्तेजक पदार्थ विरोधी संघटनेने गेल्या 1 जानेवारीपासून मेल्डोनियमवर बंदी घातली आहे.
""माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी माझ्या चाहत्यांना; टेनिसविश्वास निराश केले आहे. माझ्या या कृतीची जबाबदारी पूर्णत: माझ्यावर आहे. या कृतीचे परिणाम भोगावयास लागतील, याची जाणीव मला आहे. परंतु मला माझी कारकीर्द अशा प्रकारे संपवायची इच्छा नाही. या खेळामध्ये पुन्हा एकदा सहभागी होता येईल, अशी मला मनापासून आशा आहे,‘‘ असे शारापोव्हाने म्हटले आहे.
=====================================
मंगळसूत्र गहाण ठेवून बांधले स्वच्छतागृह
तळणी - यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असतानाही नायगाव (ता. मंठा) येथील महिलेने मंगळसूत्र गहाण ठेवून घरात स्वच्छतागृह बांधले. घेतलेल्या या धाडसी निणर्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज जागतिक महिला दिन साजरा होत असताना एका महिलेने केलेले हे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. नायगाव येथील शीला मधुकर राठोड (वय 30) या काबाडकष्ट करून दुष्काळी परिस्थितीवर मात करीत संसार चालवत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक. दीड ते दोन एकर शेती कोरडवाहू आहे; तसेच ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जाऊन उदरनिर्वाह चालविला जातो. उरलेल्या पैशात घराची दुरुस्ती केली.
स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर रात्री-अपरात्री जावे लागत होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूंत त्रास होत असे. घरी आलेल्या पाहुणे मंडळींसमोर लाजिरवाणे व्हावे लागत असल्याने त्यांनी आधी स्वच्छतागृह बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरात एक वेळेस उपाशी राहू; परंतु स्वच्छतागृह बांधू, असा निर्धार त्यांनी केला. मंगळसूत्र गहाण ठेवून स्वच्छतागृह बांधण्याच्या त्यांच्या निर्णयाला त्यांचे पती मधुकर राठोड यांनीही मंजुरी दिली. डोक्यावर हंडे घेऊन बांधकामासाठी पाणी आणले. पैसे वाचविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली काम केले. या कामात त्यांना पती मधुकर राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नायगावचे सरपंच अविनाश नाईक राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शीला राठोड यांचा सत्कार केला.
=====================================
फक्त महिलांनाच प्रवेश देणारा... माँजी साहब दर्गा

जिद्द आणि कष्टांतून मुलाला पाठवलं परदेशी
पुणे - दुष्काळाची दाहकता असह्य झाल्यानं पती, तीन मुलगे, दोन मुली, एक सवत असा कुटुंबकबिला घेऊन तिनं मराठवाड्यातलं पैठण सोडून पुणे गाठलं. धुणीभांडी, बिगारी काम केलं. सोसायट्यांमध्ये कचरा वेचला. स्वतःला अक्षरओळख नसतानाही चार मुलांना दहावीपर्यंत शिक्षण दिलं. धाकट्याला तर सातासमुद्रापार धाडलं. बिगारी कामासाठी ज्या विमाननगरला ती चालत जायची, तिथं मुलाच्या मोटारीतून जाऊन तिनं मुलाला विमानात बसताना पाहिलं. विमानानं झेप घेतली अन् श्रमसाफल्याचा तिचा आनंदही गगनात मावेनासा झाला.
बायकोला विकणे आहे!; कर्जबाजारी पतीची ‘फेसबुक‘वर जाहिरात
इंदूर - जगभर उद्या (8 मार्च) जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना पुरुष मानसिकता अद्याप किती हीन पातळीवर आहे, याचे उदाहरण पुढे आले आहे. एका कर्जबाजारी पतीने चक्क एक लाख रुपयांत आपली बायको विकणे आहे, अशी जाहिरात दिली आहे.
'हाय स्पीड'चे चार मार्ग महाराष्ट्रातून
विद्यमान रुळांची क्षमता वाढविण्यास सरकारची गती
नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन हे भलतेच खर्चिक प्रकरण असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे आहे त्याच रेल्वेरुळांची-मार्गांची क्षमता वाढवून त्यावरून प्रतितास किमान 160 किलोमीटर या वेगाने "गतिमान‘ या वेगवान गाड्या चालविण्याच्या प्रकल्पाला सरकारने गती दिली आहे. यातही अशा सहापैकी तब्बल चार सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्या महाराष्ट्रातून धावतील असे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
मुक्रमाबादे; महाशिवराञी निमित्त महादेव मंदिरात परमरहस्य पारायण
--------------------------
मुक्रमाबाद - रज्जाक कुरेशी
मुक्रमाबाद येथील पुरातन काळातील प्रसिध्द असलेले हेमाडपंथी महादेव मंदिर मध्ये परमरहस्य पारायणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला या परमरहस्य पारायणात 101 शिवभक्तानी पारायणाचा तप पुर्ण केला .
महाशिवराञी निमित्त सर्व शिवभक्तांना गावकर्याच्या वतीने विविध पदार्थाचे प्रसादाच्या स्वरूपात अल्पोहार देण्यात आले.व मंदिर समिती कडून रोषनाई, फुलांच्या हारांची सजावट मंदिर परिसरात करण्यात आली होती .या महाशिवराञी निमित्त हेमाडपंथी महादेव मंदिराकडे दर्शनासाठी पहाटे दोन वाजल्यापासुनच मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या , दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणाहून मोठ्या संख्याने शिवभक्तांची मंदीयाळी पहावयास मिळाली .
या सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे 4 ते 5 शिवपाठ, 8 ते 2 परमरहस्य पारायण, तद् नंतर 2 ते 3 यावेळे मध्ये शि.भ.प. राजेश्वर पाटील कुरुडगीकर यांचे प्रवचन झाले व 3 ते 4 यावेळेत गाथाभजन संपन्न झाले .यावेळी मंदिर समितीचे सदस्य मन्मथस्वामी जुकले, माजी सरपंच हुलप्पा मामा ईंदुरे, शंकरअण्णा खंकरे, अशोक कस्तुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती .
परमरहस्य पारायण सोहळा यशस्वीतेसाठी मन्मथ गंदीगुडे, संजय गोकुळे, चंद्रकांत ओदिलवार, शिवा वंटगीरे, संग्राम खडकीकर, गंगाधर गोगा, संदीप खंकरे, शुभम भंगे,मन्मथ खंकरे, आनंद कलपे, आदि शिवभक्तांनी परिश्रम घेतले .
१- वॉशिंग्टन; अमेरिकेच्या हल्ल्यात 150 दहशतवादी ठार
२- लॉस एंजेलिस; मारिया शारापोव्हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
३- पाकिस्तानच्या सामन्यासाठी केवळ 250 व्हिजा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अकाऊंटमध्ये 150 रुपये आणि कन्हैयाला मारण्यासाठी 11 लाखांचं इनाम
५- पीएफवरील व्याजाच्या गोंधळावर जेटलींचं आज संसदेत उत्तर
६- धडक देणारी गाडी स्मृती इराणींच्या ताफ्यातील नाही : पोलिस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- बंगळूरू; विजय मल्ल्यांना झटका, 515 कोटीची बँक खाती फ्रीज
८- MEP टोल : माजी अति. सचिव आनंद कुलकर्णींचं पेन्शन रोखण्याची मागणी
९- बाईनं मादी नव्हे, माय वाटायला हवं : सिंधुताई सपकाळ
१०- ..तर पुढची निवडणूक राष्ट्रवादीसोबत लढवू : जानकर
११- 'हाय स्पीड'चे चार मार्ग महाराष्ट्रातून
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१२- मांगीतुंगीतील भव्य मूर्तीची गिनीज बुकात नोंद
१३- सातारा; 8 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, आरोपी अटकेत
१४- मुक्रमाबाद; महाशिवराञी निमित्त महादेव मंदिरात परमरहस्य पारायण
१५- पाचोड; शिकवणी घेऊन मुलाला केले संगणक अभियंता
१६- मंठा; मंगळसूत्र गहाण ठेवून बांधले स्वच्छतागृह
१७- नाशिक; फक्त महिलांनाच प्रवेश देणारा... माँजी साहब दर्गा
१८- कोथरूड; जिद्द आणि कष्टांतून मुलाला पाठवलं परदेशी
१९- इंदूर; बायकोला विकणे आहे!; कर्जबाजारी पतीची ‘फेसबुक‘वर जाहिरात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कायमचा दुरावा, 'का रे दुरावा' घेणार प्रेक्षकांचा निरोप
२१- टी-20 विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये फ्री वायफाय मिळणार
२२- टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम
२३- शमीसाठी संघात जागा नाही, धोनीचे संकेत
२४- सिक्सर किंग महेंद्रसिंह धोनीचा नवा विक्रम
२५- लसिथ मलिंगा श्रीलंकेच्या कर्णधारपदावरुन पायउतार
२६- गूगलचा Nexus 6P पाच हजार रुपयांनी स्वस्त
२७- मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादावादीतून मुंबईत एकाची हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
कृष्णा पांचाळ, आनंद बमाल्वा, किरण शिरामे, सुशांत कदम, शाम निलंगेकर, गजानन बाराते, रणजीत कुमार, सुमित देशमुख, सुनील पतंगे, स्वाती देशमुख, स्वप्नील पावडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका
(अरुण उकंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=====================================
पीएफवरील व्याजाच्या गोंधळावर जेटलींचं आज संसदेत उत्तर
नवी दिल्ली: पीएफवर लागणाऱ्या कराच्या निर्णयावरचा गोंधळ आज दूर होण्याची शक्यता आहे. आज लोकसभेत होणाऱ्या चर्चेत अर्थमंत्री अरुण जेटली आज या गोंधळावर उत्तर देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पीएफवरच्या व्याजाचा निर्णय मागे घेण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्प मांडत असताना अरुण जेटलींनी पीएफच्या पैशांवर कर लागेल अशी घोषणा केली होती. त्यामुळे नोकरदार वर्गाच्या हक्काच्या पैशांवर सरकार डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला. या निर्णयाविरोधात लोकांनीही सोशल साईट्सच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे अखेर आज हा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रस्तावित ईपीएफ टॅक्स मागे घेतला जाणार असल्याची माहिती राजधानीतील उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. अर्थसंकल्पातील ईपीएफ टॅक्सबाबत देशभरात बरीच ओरड झाल्यानंतर पंतप्रधानांनी जेटली यांना आपल्या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली आहे.
प्रस्तावित ईपीएफ टॅक्सवर फक्त विरोधी पक्ष किंवा कामगार संघटनाच नव्हे, तर भाजपमधूनही मोठा विरोध झाला होता. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान कार्यालयात प्रस्तावित ईपीएफ टॅक्सबाबत एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्येच पंतप्रधानांनी अर्थमंत्री जेटली यांना ईपीएफ करप्रस्तावाचा फेरविचार करण्याची सूचना केली. त्यानुसार अर्थमंत्री जेटली यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना संसदेत निवेदन करण्याविषयीचं पत्रही दिलं होतं.
मांगीतुंगीतील भव्य मूर्तीची गिनीज बुकात नोंद
नाशिक: नाशिकमध्ये जैन धर्मीयांसाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या मांगीतुंगीतल्या भव्य मूर्तीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.
भगवान वृषभदेव यांची अखंड पाषाणात 108 फूट मूर्ती घडवण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मांगीतुंगीतल्या या भव्य मूर्तीचा उद्घाटन सोहळा पार पडला होता.
या मूर्तीसाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याने खास 18 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला होता.
ह्या मूर्तीच्या कामानंतर उरलेल्या निधीतून पायथ्याशी असलेल्या भिलवाड गावात लोकपयोगी काम केली जाणार आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पाकिस्तानच्या सामन्यासाठी केवळ 250 व्हिजा
मुंबई: टी ट्वेण्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या केवळ 250 चाहत्यांनाच सामन्याचा लाभ घेता येणार आहे. कारण भारताकडून केवळ 250 व्हिजाच देण्यात येणार आहेत.
भारतात आजपासून टी 20 विश्वचषक सामन्यांच्या पात्रता फेरीला सुरुवात होत आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला धरमशाला इथं पहिला सामना रंगणार आहे.
पाकिस्तानी संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी पाकिस्तानी चाहत्यांनी 250 व्हिजा देणार असल्याची माहिती गृहमंत्रालयानं दिली. यासाठी पाकिस्तानी चाहत्यांना 5 दिवसीय व्हिजा, सामन्याची तिकिटं, प्रवासी तिकिटं, परताव्याचे तिकिट आणि हॉटेल बुकिंग इत्यादी कागदपत्र दाखवणं आवश्यक असल्याचं गृहमंत्रालयानं सांगितलं.
पाकिस्तान उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर व्हिजाची संख्या वाढवण्यात येणार आहे. पाकिस्तानी चाहत्यांवर सुरक्षा रक्षकांची कडक नजर असेल.
टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी भक्कम
मुंबई: धोनीच्या टीम इंडियानं आशिया चषक जिंकून आयसीसीच्या ट्वेन्टी20 क्रमवारीत आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलं आहे. मिरपूरमध्ये बांगलादेशावरील विजयामुळं भारताच्या खात्यात आता 127 गुण जमा झाले आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात प्रत्येकी 118 गुण जमा आहेत.
दक्षिण आफ्रिकेला रविवारी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला, तरी त्यांचं रँकिंग वधारणार नसल्यानं, टीम इंडियाच ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या सलामीला अव्वल स्थानावर कायम राहील. आयसीसीच्या ट्वेन्टी20च्या जागतिक क्रमवारीत न्यूझीलंड चौथ्या, इंग्लंड पाचव्या, ऑस्ट्रेलिया सहाव्या, पाकिस्तान सातव्या तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे.
शमीसाठी संघात जागा नाही, धोनीचे संकेत
मिरपूर: आशिया चषकावर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी टी 20 विश्वचषकातही तोच संघ घेऊन मैदानात उतरण्याची चिन्हं आहेत. धोनीने तसे संकेतही दिले आहेत. त्यामुळे भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमीला अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळणं कठीण आहे.
“सध्या संघ संतुलित असून जसप्रीत बुमराह आणि आशिष नेहरा हे मध्यमती गोलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी शमीला संधी मिळणं कठीण आहे” असं धोनीने म्हटलं आहे.
दुखापतीमुळे मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आणि आशिया चषकातही खेळू शकला नाही.
“शमी फिट होईल की नाही हे आम्ही आताच सांगू शकत नाही. अजून त्याच्याकडे वेळ आहे. शमीकडे क्षमता आहे, त्यामुळेच त्याची टी 20 वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली आहे. तो नव्या आणि जुन्या चेंडूनेही यॉर्कर टाकू शकतो. मात्र बुमराहची जागा घेणं कठीण आहे. कारण बुमराहने नव्या चेंडूने उत्तम प्रदर्शन केलं आहे” असं धोनीने सांगितलं.
सातारा; 8 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, आरोपी अटकेत
सातारा: साताऱ्यात एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणी एका 15 वर्षीय मुलाला अटक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नंदनवन कॉलनीत राहणारी ही मुलगी काल संध्याकाळपासून बेपत्ता होती. 8 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडल्यानं खळबळ उडाली. अन्सारी बंगल्याजवळ राहणारी आठ वर्षाची चिमुकली कोमल चिकणे ही काल सायंकाळी घराजवळून अचानक बेपत्ता झाली.
तिचा शोध सुरु असतानाच अन्सारी बंगल्यातील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
दरम्यान, मुलगी तिथे कशी आली, तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत कसा गेला, ती बुडाली का या अनुषंगाने शवविच्छेदन करण्यात आलं. पण प्राथमिक अहवालानुसार, मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला, त्यानंतर मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकला होता.
सिक्सर किंग महेंद्रसिंह धोनीचा नवा विक्रम
सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीने रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दोन षटकार लगावले होते. आतापर्यंत 428 आंतरराष्ट्रीय सामन्यात 110 वेळा नाबाद राहून 44.68 च्या सरासरीने त्याने 14,746 धावा केल्या आहेत. यात 15 शतकं आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या वन डे आणि ट्वेन्टी-20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 300 षटकार पूर्ण केले आहेत. असा पराक्रम करणारा धोनी हा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू आहे.
महेंद्रसिंह धोनी टॉप फाईव्हमध्ये
सर्वाधिक सिक्सर ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. धोनीने रविवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात दोन षटकार लगावले होते. आतापर्यंत 428 आंतरराष्ट्रीय सामन्यात 110 वेळा नाबाद राहून 44.68 च्या सरासरीने त्याने 14,746 धावा केल्या आहेत. यात 15 शतकं आणि 93 अर्धशतकांचा समावेश आहे.
कायमचा दुरावा, 'का रे दुरावा' घेणार प्रेक्षकांचा निरोप
मुंबई : झी मराठीवरील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका ‘का रे दुरावा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लग्नानंतर गुपचूप चाललेली जय-अदिती यांची प्रेमकहाणी येत्या 26 मार्चला संपणार आहे.
जवळपास गेली सव्वा वर्ष ‘का रे दुरावा’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ऑफिसमध्ये विवाहित व्यक्तींना नोकरी करण्यास परवानगी नसल्यामुळे एक जोडपं आपलं वैवाहिक आयुष्य लपवून एकाच ऑफिसमध्ये नोकरी करतं, अशी संकल्पना असलेली ‘का रे दुरावा’ वेगळ्या हाताळणीमुळे अल्पावधीत प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली.
‘का रे दुरावा’च्या जागी ‘काहे पिया परदेस’ ही मालिका भेटीला येणार आहे. 28 मार्चपासून नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता प्रक्षेपित होणार आहे. पहिल्यांदाच मराठी मालिकेत मराठी-हिंदी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे.
जय-अदिती साकारणारे सुयश टिळक, सुरुची आडारकर यांच्याशिवाय अविनाश सर, आऊ यांसारखी देव टूर्समधली मंडळी, केतकर काका काकू या व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. झी मराठी अवॉर्डसारख्या पुरस्कार सोहळ्यातही मालिकेने अनेक पुरस्कार पटकावले.
काहीच महिन्यांपूर्वी अडीच वर्ष चाललेल्या ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने निरोप घेतला होता. तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचा पहिला सीझनही नुकताच संपला.
टी-20 विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये फ्री वायफाय मिळणार
मुंबई : आगामी ट्वेन्टी-20 विश्वचषक ही क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. मात्र त्याआधीच चाहत्यांना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषकादरम्यान स्टेडियममध्ये हायस्पीड फ्री वायफाय मिळणार आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड यासंदर्भातील घोषणा केली आहे.
कंपनीने यासाठी देशातील सहा स्टेडियममध्ये हजारो हायस्पीड एक्सेस पॉईंट इन्स्टॉल केले आहेत. या वायफायचा स्पीड अतिशय जलद असेल. तसंच स्टेडियममध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांना फ्री अनलिमिटेड इंटरनेट एक्सेस दिला जाईल, असा दावा कंपनीने केला आहे.
या स्टेडियममध्ये मिळणार फ्री वायफाय
• फिरोज शाह कोटला स्टेडियम, नवी दिल्ली
• वानखेडे स्टेडियम, मुंबई
• हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, धरमशाला
• चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
• ईडन गार्डन, कोलकाता
• पंजाब क्रिकेट एसोसिएशन, मोहाली
• वानखेडे स्टेडियम, मुंबई
• हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम, धरमशाला
• चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
• ईडन गार्डन, कोलकाता
• पंजाब क्रिकेट एसोसिएशन, मोहाली
विजय मल्ल्यांना झटका, 515 कोटीची बँक खाती फ्रीज
बंगळुरु : उद्योगपती विजय मल्ल्या यांना कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरण म्हणजेच डीआरटीने मोठा झटका दिला आहे. सात हजार कोटींची कर्ज बुडवणाऱ्या मल्ल्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली असून त्यांची 515 कोटींची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत.
विजय मल्ल्या यांनी किंगफिशर एअरलाईन्ससाठी उचललेलं सात हजार कोटी रुपयाचं कर्ज थकलेलं आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या अटकेची मागणी केली आहे. एसबीआयसोबत सेटलमेंट होईपर्यंत मल्ल्यांची खाती गोठलेलीच राहणार आहेत. पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या समूहाने विजय मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्सला सात हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी स्टेट बँकेने बंगळुरुच्या कर्ज वसुली लवादाकडे दाद मागितली होती.
बंगळुरुच्या कर्ज वसुली लवादामध्ये स्टेट बँकेच्या वतीने चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एक मल्ल्या यांच्या अटकेच्या मागणीसाठी, दुसरा मल्ल्यांचा पासपोर्ट जप्त करण्यासाठी तर तिसरा मल्ल्या यांना डियाजिओकडून मिळणाऱ्या 75 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 500 कोटी रुपयांवर स्टेट बँकेचा पहिला हक्क आहे, हे सांगण्यासाठी आहे. तसंच चौथा अर्ज मल्ल्या यांची देशा-विदेशातील सर्व चल-अचल संपत्ती जप्त करावी या मागणीसाठी आहे.
मल्ल्या यांची यूबी म्हणजे यूनायडेट स्पिरीट ही कंपनी इग्लंडच्या डियाजिओ या मद्य कंपनीने विकत घेतली. त्या बदल्यात मल्ल्या यांना मिळणाऱ्या 500 कोटी रुपयांमधून स्टेट बँकेला सर्व प्रथम वसुली करण्याची परवानगी मिळावी अशी मागणीही स्टेट बँकेने केली.
MEP टोल : माजी अति. सचिव आनंद कुलकर्णींचं पेन्शन रोखण्याची मागणी
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबईतील 5 एन्ट्री पॉईंट्सच्या व्यवहार्यतेची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या माजी अतिरिक्त सचिव आनंद कुलकर्णी यांचे निवृत्ती वेतन आणि इतर भत्ते रोखण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे.
टोलच्या झोलवरुन महाराष्ट्रात खळबळ उडाल्यानंतर सरकारनं जुलै 2015 मध्ये आनंद कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिचा अहवाल 31 ऑगस्ट 2015 पर्यंत देणं अपेक्षित होतं. मात्र त्यानंतर पुन्हा 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. मात्र तरीही कुलकर्णींनी अहवाल सादर केला नाही. अखेर 31 डिसेंबरच्या आत दोन्ही टोलबाबतचा अहवाल द्या असं सरकारनं बजावलं होतं. मात्र त्यानंतरही आनंद कुलकर्णी अहवाल सादर न करताच निवृत्त झाले. त्यामुळं टोलच्या झोलचं घोंगडं भिजत पडलं.
धडक देणारी गाडी स्मृती इराणींच्या ताफ्यातील नाही : पोलिस
नवी दिल्ली : डॉ. नगर यांच्या बाईकला धडक देणारी गाडी इराणींच्या गाड्यांच्या ताफ्यातील नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उलट इराणींनी मथुऱ्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्तांना मदत करण्याचे आदेश दिल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
ताफ्यातील गाडीला झालेल्या अपघातानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अपघातग्रस्तांना मदत न केल्याचा आरोप झाला होता. मदतीची याचना करुनही स्मृती पुढे निघून गेल्याचा दावा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डॉक्टरच्या मुलीने केला आहे.
स्मृती इराणी यांच्या गाड्यांचा ताफा अपघाताच्या 7 ते 8 मिनिटांनंतर घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता, तर दोघं जखमी झाले होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
‘स्मृती इराणींच्या ताफ्यातील गाडीने आमच्या कारला धडक दिली. त्यानंतर त्या स्वतःच्या गाडीतून बाहेर आल्या. मी त्यांच्याकडे मदतीची याचना केली. मात्र त्या निघून गेल्या’ असं डॉ. रमेश नगर यांची कन्या संदिलीने म्हटलं आहे.
‘माझ्या बहिणीने अक्षरशः हात जोडून स्मृती इराणींकडे मदत मागितली. पण त्या थांबल्या नाहीत’ या शब्दात संदिलीचा भाऊ अभिषेकनेही स्मृती यांनी मदत नाकारल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दुसरीकडे स्मृती इराणी यांनी ट्वीट करुन अपघातग्रस्तांना मदत पोहचवल्याचा दावा केला होता.
लसिथ मलिंगा श्रीलंकेच्या कर्णधारपदावरुन पायउतार
मुंबई : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मलिंगाच्या नेतृत्त्वाखालीच श्रीलंकेने 2014 सालचा ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला होता.
मात्र त्यानंतर मलिंगाला वारंवार दुखापतींनी ग्रासलं. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान मलिंगाच्या गुडघेदुखीने उचल खाल्ली होती. श्रीलंकेला त्या स्पर्धेच्या साखळी फेरीतूनच बाहेर व्हावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवरच मलिंगानं आपल्याला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळं केलं जावं अशी विनंती श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडे केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मलिंगाची विनंती स्वीकारली असून, श्रीलंकन टीमच्या कर्णधारपदी अँजलो मॅथ्यूजची नियुक्ती केली आहे.
गूगलचा Nexus 6P पाच हजार रुपयांनी स्वस्त
मुंबई : भारताची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या तीन दिवसांचा बिग शॉपिंग डेज सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन तसंच इतर गॅझेट्सवर सूट दिली जात आहे. याशिवाय एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यास 10 टक्के एक्स्ट्रा सूट देण्यात येत आहे. याची जास्तीत जास्त सूट 1750 रुपये आहे. हा सेल 7 ते 9 मार्चपर्यंत आहे.
या सेलमध्ये गूगलच्या 32 GB व्हेरिएंटच्या नेक्सस 6P वर फ्लॅट 5000 रुपयांची सूट देण्यात येत आहेत. एक्सचेंज ऑफरमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला हा फोन 20,000 रुपयांना मिळू शकतो. या फोनची इंटरनल मेमरी 2 GB असून रॅम 3 GB आहे. याशिवाय Moto X Play वर पाच टक्के सूट दिली जात आहे.
– मॉडेल- मोटोरोला मोटो G टर्बो एडिशन
> किंमत – 11, 299 रुपये (1,200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> ऑफर – जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 7,000 रुपयांपर्यंतची सूट
> किंमत – 11, 299 रुपये (1,200 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> ऑफर – जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 7,000 रुपयांपर्यंतची सूट
– मॉडेल- मोटोरोला मोटो X प्ले 16 GB
> ऑफर किंमत – 15,999 रुपये (1000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> एक्स्ट्रा ऑफर – जुन्या फोनच्या बदल्यात 9000 रुपयांपर्यंतची सूट
> ऑफर किंमत – 15,999 रुपये (1000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> एक्स्ट्रा ऑफर – जुन्या फोनच्या बदल्यात 9000 रुपयांपर्यंतची सूट
– मॉडेल – Nexus 6P
> किंमत – 34, 999 रुपये (5000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> ऑफर – जुन्या फोनच्या बदल्यात 20,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
> किंमत – 34, 999 रुपये (5000 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर)
> ऑफर – जुन्या फोनच्या बदल्यात 20,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट
– मॉडेल- iPhone 6s 16 GB
> किंमत – 41, 999 रुपये
> ऑफर – जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 21,000 रुपयांपर्यंतची सूट
> ऑफर – जुन्या फोनच्या एक्सचेंज ऑफरमध्ये 21,000 रुपयांपर्यंतची सूट
सेलमध्ये मेमरी कार्ड, स्मार्ट वॉच, लॅपटॉप, कॅमेरा, हेडफोन आणि टीव्हीवरही डिस्काऊंट मिळत आहे. लॅपटॉपवर 10,000 रुपयांपर्यंत सूट आहे.
बाईनं मादी नव्हे, माय वाटायला हवं : सिंधुताई सपकाळ
A
मुंबई : “बाईनं बाईची काळजी घेणं आवश्यक आहे. बाईला खंबीर बनावं लागेल, संघर्ष करावं लागेल. मात्र, बाईनं स्वत:च्या मर्यादा पाळायला हव्या.”, असा सल्ला लाखो अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी दिला. चिंधा साठे ते सिंधुताई सपकाळ हा संघर्षमय प्रवास त्यांनी ‘माझा कट्टा’वर मांडला.
स्त्रियांची असुरक्षितता आणि सामाजिक परिस्थितीबाबत बोलताना सिंधुताई म्हणाल्या, “बाई ही कुटुंबाचा कणा असते. संसाराातून बाई वजा केल्यास काही नाही. मात्र, बाईनं मर्यादा पाळायला हव्यात. बाईनं मादी नव्हे, माय वाटायलं हवं.”
“फुलांच्या पायघड्यावरुन चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहित असतं, वेदना कळत नसतात. म्हणून काट्यांशी दोस्ती करा. काट्यांनी म्हटलं पाहिजे, वेलकम, सुस्वागतम!”, असे म्हणत सिंधुताईंनी स्त्रियांना जगण्याशी संघर्ष करण्याचा सल्ला दिला.
बिकीनी खरेदीसाठी नेहा धुपिया फिजीत
चित्रपटासाठी बिकीनी खरेदी स्वतःच करण्याचा निर्णय तिने घेतला. फिजीतील मार्केटमध्ये तिने शोधाशोध केली आणि अखेर तिचा शोध एका बिकीनीवर संपला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या हॉट आणि बोल्ड दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा आपल्या सिनेमातील स्टाईलही तीच ठरवत असते. नेहा तिच्या आगामी चित्रपटातील बिकीनीच्या खरेदीसाठी स्वतःच फिजीतील मार्केटमध्ये फिरताना दिसली.
नेहा धुपिया सध्या ‘संता बंता प्रायव्हेट लिमिटेड’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी फिजीमध्ये गेली आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये ती बिकीनीत दिसणार आहे. यामुळे बिकीनी खरेदी स्वतःच करण्याचा निर्णय तिने घेतला.
फिजीतील मार्केटमध्ये तिने शोधाशोध केली आणि अखेर तिचा शोध एका बिकीनीवर संपला. विशेष म्हणजे ही बिकीनी तिला इतकी आवडली की नेहाने तिच्या पर्सनल कलेक्शनमध्येच या बिकीनाचा समावेश केला आहे.
अकाऊंटमध्ये 150 रुपये आणि कन्हैयाला मारण्यासाठी 11 लाखांचं इनाम
नवी दिल्ली : कन्हैया कुमारला गोळ्या घाला आणि 11 लाखांचं इनाम मिळवा, अशी घोषणा करणारे पोस्टर दिल्लीत शनिवारी लावण्यात आले होते. पूर्वांचल सेनेचे प्रमुख आदर्श शर्माने ही घोषणा केली केली. पण आदर्श शर्माने मोठ्या तोऱ्यात ही घोषणा केली खरी, मात्र त्याच्या बँक अकाऊंटमध्ये फक्त 150 रुपये आहेत.
भाड्याच्या घरात राहतो आदर्श शर्मा
बिहारच्या बेगूसरायमध्ये राहणारा आदर्श शर्मा अनेक महिन्यांपासून दिल्लीच्या रोहिणीमध्ये एका भाड्याच्या घरात राहतो. पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आदर्श शर्मा बेपत्ता आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून आदर्श गायब
पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, आदर्श शर्माने त्याचा मोबाईल फोन बंद केला आहे. शिवाय तो त्याच्या कुटुंबियांच्याही संपर्कात नाही. पोलिस त्याच्या मागावर आहेत.
जेएनयू विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला गोळी मारेल, त्याला 11 लाख रुपयांचं इनाम दिलं जाईल, असे पोस्टर पूर्वांचल सेना नावाच्या एका संघटनेने दिल्लीत ठिकठिकाणी लावले होते. या पोस्टरवर आदर्श शर्माचं नाव आणि मोबाईल नंबर लिहिला होता. या पोस्टरनंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो, वादावादीतून मुंबईत एकाची हत्या
नालासोपारा : द्रविड श्रेष्ठ की सेहवाग, शाहरुख चांगला की आमीर अशा चर्चा मित्रांच्या टोळक्यात हमखास रंगतात. आपल्या आवडत्या कलाकारांची बाजू मांडताना आपण कधीतरी हमरीतुमरीवरही येतो, मात्र फुटबॉलपटू मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो या वादातून नालासोपाऱ्यात एका नायजेरियन व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.
धुरुमचूकवा ओबिना मायकल असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्या करणारा चुकवहुमा मायकल नावाबू हासुद्धा नायजेरियन नागरिक आहे. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगरमधील महेंद्र अपार्टमेंटमध्ये दोघे राहात होते. रात्री मोठ्या प्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर सकाळी दोघे गॅलरीत फुटबॉल खेळत होते. यावेळी फुटबॉलपटू मेस्सी श्रेष्ठ की रोनाल्डो यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली.
त्यातूनच चुकवहुमाने काचेची बाटली फोडून तिने धुरुमचूकवाच्या गळ्यावर वार केले. त्यातच अतिरक्तस्त्राव झाल्याने धुरुमचूकवाचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत व्यक्ती आणि आरोपी या दोघांचाही व्हिसा संपला होता आणि ते अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
..तर पुढची निवडणूक राष्ट्रवादीसोबत लढवू : जानकर
पुणे : राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो, याचा प्रत्यय आज पुण्यात आला. कालपर्यंत राष्ट्रवादीच्या नावाने शंख फुंकणारे रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत एकाच व्यासपीठावर आले. एवढंच नाही तर संबंध असेच राहिले तर पुढील विधानसभा एकत्र लढवू, असा विश्वासही महादेव जानकरांनी व्यक्त केला आहे.
जानकर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भाजप आणि काँग्रेस एकच असल्याची टीका केली आहे. शिवसेनेची सत्ता आली तरी चालेल, असं म्हणत महादेव जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच सदाभाऊ खोत यांनीही आपली नाराजी बोलवून दाखवली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटंबियांना प्रत्येकी दहा हजारांची मदत करण्यात आली. त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सर्वात जास्त प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केले आहेत, असं प्रमाणपत्र शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी दिलं.
शिकवणी घेऊन मुलाला केले संगणक अभियंता
सुलभाताई भाले (वय 40) यांचे पती सुधीर भाले यांचे वर्ष 2000 मध्ये अपघातात निधन झाले. सुखी संसाराचे स्वप्न क्षणात विखुरले. पतीचे निधन झाले तेव्हा साडेचार वर्षांचा सुयोग, दीड वर्षाचा विशाल या दोन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सुलभाताईंवर येऊन पडली. अशा परिस्थितीत खचून न जाता स्वतःला सावरत मुलांच्या माध्यमातून जीवनाचा "कवडसा‘ त्या शोधू लागल्या. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले असल्याने त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेणे सुरू केले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंब सावरले. घरातील धनी गेला म्हणून कुढत बसण्यापेक्षा जगण्याची लढाई लढून त्यांनी दोन्ही मुलांना शाळेत घातले. त्यांच्या शिक्षणाची विशेष काळजी घेतली. मुलांना वडिलांची कोणतीच उणीव भासू दिली नाही. मोठा मुलगा सुयोग नुकताच संगणक अभियंता झाला. तर विशाल हा संगणक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. ते दोघेही पुण्याला असून सुलभा मात्र पाचोडला राहून त्यांच्या पुस्तकांपासून सर्व गरजा शाळेतील मुलांच्या शिकवण्या घेऊन पूर्ण करते आहे. अचानक ओढवलेल्या संकटाशी जिद्दीने सामोरे जाऊन आपण जगण्याची लढाई लढली पाहिजे, असे सुलभाताई मोठ्या अभिमानाने सांगतात. आपण जिंकलेली जगण्याची लढाई पाहण्यास पती नसल्याचे दुःख त्यांना आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यात 150 दहशतवादी ठार
अल शबाब सोमालियात अमेरिकन व आफ्रिकन युनियनच्या फौजांवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती, अशी माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (पेंटॅगॉन) प्रवक्ते कॅप्टन जेफ डेव्हिस यांनी दिली. हा हल्ला अत्यंत यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया त्यांनी या पार्श्वभूमीवर व्यक्त केली.
अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या अल शबाबच्या फौजांना आफ्रिकन युनियनच्या सैन्याने 2011 मध्ये मोगादिशुमधून हुसकावून लावले होते. मात्र अजूनही अल शबाबचे सामर्थ्य मोठे असून सोमालियातील पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेल्या सरकारला उलथवून लावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
=====================================
मारिया शारापोव्हा उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
शारापोव्हावर येत्या 12 मार्चपासून निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने (आयटीएफ) केली आहे. या महिन्यात "मेल्डोनियम‘ सेवन केल्यामुळे दोषी आढळलेली शारापोव्हा ही तब्बल सातवी क्रीडापटू आहे. मेल्डोनियम हे द्रव्य मधुमेहाच्या विकारासंदर्भातील औषधोपचारासंदर्भात वापरले जाते. जागतिक उत्तेजक पदार्थ विरोधी संघटनेने गेल्या 1 जानेवारीपासून मेल्डोनियमवर बंदी घातली आहे.
""माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी माझ्या चाहत्यांना; टेनिसविश्वास निराश केले आहे. माझ्या या कृतीची जबाबदारी पूर्णत: माझ्यावर आहे. या कृतीचे परिणाम भोगावयास लागतील, याची जाणीव मला आहे. परंतु मला माझी कारकीर्द अशा प्रकारे संपवायची इच्छा नाही. या खेळामध्ये पुन्हा एकदा सहभागी होता येईल, अशी मला मनापासून आशा आहे,‘‘ असे शारापोव्हाने म्हटले आहे.
=====================================
मंगळसूत्र गहाण ठेवून बांधले स्वच्छतागृह
स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर रात्री-अपरात्री जावे लागत होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूंत त्रास होत असे. घरी आलेल्या पाहुणे मंडळींसमोर लाजिरवाणे व्हावे लागत असल्याने त्यांनी आधी स्वच्छतागृह बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरात एक वेळेस उपाशी राहू; परंतु स्वच्छतागृह बांधू, असा निर्धार त्यांनी केला. मंगळसूत्र गहाण ठेवून स्वच्छतागृह बांधण्याच्या त्यांच्या निर्णयाला त्यांचे पती मधुकर राठोड यांनीही मंजुरी दिली. डोक्यावर हंडे घेऊन बांधकामासाठी पाणी आणले. पैसे वाचविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली काम केले. या कामात त्यांना पती मधुकर राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नायगावचे सरपंच अविनाश नाईक राठोड यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने शीला राठोड यांचा सत्कार केला.
फक्त महिलांनाच प्रवेश देणारा... माँजी साहब दर्गा
शनिशिंगणापूर आणि त्र्यंबकराज मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश देण्यावरून महाराष्ट्रात वाद पेटला असताना नाशिकच्या भद्रकालीमधील माँजी साहब दर्ग्याने फक्त महिलांनाच प्रवेश देऊन एक आगळी परंपरा जपली आहे. ३६४ वर्षांपासून या दर्ग्यात फक्त महिलांनाच प्रवेश देण्याची प्रथा आहे.
माँजी साहब दर्ग्याच्या स्वच्छतेपासून (खिदमत) धार्मिक विधी, लोबान देण्यापर्यंत सर्व कामे महिलांकडूनच करण्यात येतात. परिसरसह अन्य विविध ठिकाणच्या रोशन शेख, मैरुनीसा खान, रुकसाना खान, हसिना शेख, अमिना शेख या पाच महिलांकडून रोज सकाळ-सायंकाळ खिदमत केली जाते. ऊर्दू कालगणनेनुसार २४ सफर या दिवशी माँजी साहब यांचा संदल शरीफ येत असतो. त्यादिवशी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होतात.
आदल्या दिवशी नियाजचे आयोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारास दर्गा परिसरातून फुले मार्केट, मौलाबाबा दर्गा चौक, दूधबाजार, त्र्यंबक चौकी, खडकाळी या भागातून संदल शरीफची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीचा समारोप दर्गा परिसरात होतो. त्यानंतर मजार शरीफवर संदल लावले जाऊन गलेप व फुलांची चादर अर्पण केली जाते.
दरम्यान, विशेष फातेहा पठण व अन्य धार्मिक विधी महिलांच्या हस्तेच केला जातो. या वेळी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील महिलाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येऊन दर्शनाचा लाभ घेत नवस (मन्नत) करत असतात, तर काही महिला नवसपूर्ती करतात.
=====================================जिद्द आणि कष्टांतून मुलाला पाठवलं परदेशी
कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी वसाहतीत राहणाऱ्या कमल दिनकर ताकवले यांनी जिद्दीनं बांधलेल्या श्रमाच्या पूजेची ही सुफल कहाणी. दिनकर ताकवले यांची पहिली पत्नी लता हिला मूल न झाल्यानं त्यांनी कमल यांच्याशी विवाह केला. तीस वर्षांपूर्वी मराठवाड्यातील दुष्काळाच्या चटक्यात ताकवले कुटुंबही होरपळलं. अन्नालाही महाग झाल्यानं गाव सोडण्याचा निर्णय कमल यांनी घेतला अन् पुणे गाठलं. आधी विश्रांतवाडी आणि नंतर कोथरूडमध्ये वास्तव्य केलं. पती ज्या सोसायटीत रखवालदाराचं काम करायचे त्याच सोसायटीत व परिसरात कमल व लता धुणीभांडी आणि कचरा वेचण्याचं काम करायच्या.
दोघी सवती असूनही कुटुंबासाठी श्रम करायच्या. कमल मुलांची माउली, तर लता या माउलीची सावली. सात रुपयांवर दोघींनी बिगारी काम सुरू केलं. बांधकामाच्या ठिकाणी पाच कच्च्याबच्च्यांना घेऊन त्या जायच्या. या मुलांना मोकळ्या बॅरेलमध्ये ठेवा, असं ठेकेदार म्हणायचा. काम नसलं तरी चालंल पण मुलांना तिथं ठेवणार नाही, असा पवित्रा दोघी घ्यायच्या. सोसायटीमधल्या लोकांनी दिलेल्या अन्नावर या कुटुंबानं गुजराण केली. याच लोकांकडून दोन-दोन रुपये गोळा करून कमल यांनी कोमात गेलेल्या नातवाचा जीव वाचवला. सोसायटीच्या मदतीमुळेच हे सारं शक्य झाल्याचं कमल कृतज्ञतेनं नमूद करतात.
=====================================बायकोला विकणे आहे!; कर्जबाजारी पतीची ‘फेसबुक‘वर जाहिरात
इंदूर - जगभर उद्या (8 मार्च) जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना पुरुष मानसिकता अद्याप किती हीन पातळीवर आहे, याचे उदाहरण पुढे आले आहे. एका कर्जबाजारी पतीने चक्क एक लाख रुपयांत आपली बायको विकणे आहे, अशी जाहिरात दिली आहे.
‘फेसबुक‘वर बायको विकण्याची पोस्ट करणाऱ्याचे नाव दिलीप माली असे आहे. तो मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवाशी आहे. बायकोच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पोस्टनंतर पत्नीने आणि तिच्या नातेवाइकांनी माली याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिस मालीचा शोध घेत आहेत. मात्र, तो फरार आहे, अशी माहिती येथील विमानतळ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
=====================================
दिलीप याने "फेसबुक‘ वर हिंदीमध्ये पोस्ट केली असून बायकोचा आणि दोन वर्षांच्या मुलीचा फोटोही टाकला आहे. दिलीप म्हणतो, ""ज्या कोणाला माझी बायको विकत घ्यायची आहे. त्याने माझ्या मोबाईलवर संपर्क साधावा. मी काही लोकांकडून उसने पैसे घेतले आहेत. हे पैसे मला परत करायचे आहेत. पण माझ्याकडे पैसे नसल्याने बायकोला आणि मुलीला विकायचे आहे. त्यांची एक लाखाला विक्री केल्यास मिळालेल्या पैशातून मी कर्जाने घेतलेले पैसे परत करू शकतो.‘‘
पतीने दिलेल्या या जाहिरातीनंतर पत्नी आणि तिच्या नातेवाइकाने थेट पोलिस स्टेशनचा दरवाजा ठोठावून पतीविरोधात तक्रार दिली. पतीने दिलेली जाहिरात आक्षेपार्ह असून पतीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. माली याचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्याला दोन वर्षांची मुलगी आहे.
'हाय स्पीड'चे चार मार्ग महाराष्ट्रातून
विद्यमान रुळांची क्षमता वाढविण्यास सरकारची गती
नवी दिल्ली - मुंबई-अहमदाबाद मार्गावरील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन हे भलतेच खर्चिक प्रकरण असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे आहे त्याच रेल्वेरुळांची-मार्गांची क्षमता वाढवून त्यावरून प्रतितास किमान 160 किलोमीटर या वेगाने "गतिमान‘ या वेगवान गाड्या चालविण्याच्या प्रकल्पाला सरकारने गती दिली आहे. यातही अशा सहापैकी तब्बल चार सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्या महाराष्ट्रातून धावतील असे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केले आहे.
सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या दिल्ली-आग्रा या सेमी हायस्पीड ट्रेनची अखेरची चाचणी पुढील काही महिन्यांत होईल व ती गाडी धावू लागेल. यामुळे दिल्ली-आग्रा हे अंतर केवळ 105 मिनिटांत गाठले जाईल. यासाठी अर्थातच 25 टक्के जादा तिकीटदर राहतील. म्हणजे वातानुकूलित वर्गासाठी सध्याच्या 525 रुपयांपेक्षा जास्त म्हणजे किमान 625 रुपये प्रतिप्रवासी इतके भाडे आकारले जाईल. यापाठोपाठ अशा सहा मार्गांच्या सर्वेक्षणाला रेल्वे मंडळाने गती दिली आहे. हे काम लवकरात लवकर करून आपल्याला अहवाल द्या, अशी तंबी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. साहजिकच या सहा मार्गांवरच्या हाय स्पीड रेल्वेच्या प्रकल्पास गती मिळाली आहे. या प्रस्तावित सहा मार्गांमध्ये राज्यांतील मुंबई-गोवा, मुंबई-अहमदाबाद, नागपूर-विलासपूर व चेन्नई-नागपूर यांचा समावेश आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरक्षेबाबतचा "फिजिबलिटी अहवाल‘ रेल्वे मंडळाला मिळालाही आहे असे कळते. याशिवाय म्हैसूर-चेन्नई व दिल्ली-चंडीगड हे दोन मार्गही सरकारने हाय स्पीड गाड्यांसाठी प्रस्तावित केले आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत सूतोवाच केले होते; पण त्याचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. सध्याचेच "नेटवर्क‘ आधुनिक करून ताशी किमान 160 किलोमीटर या गतीने धावणाऱ्या या हाय स्पीड रेल्वेगाड्यांसाठी पायाभूत सुविधा वेगळ्या उभारण्याचा व्याप टळणार आहे.
=====================================मुक्रमाबादे; महाशिवराञी निमित्त महादेव मंदिरात परमरहस्य पारायण
--------------------------
मुक्रमाबाद - रज्जाक कुरेशी
मुक्रमाबाद येथील पुरातन काळातील प्रसिध्द असलेले हेमाडपंथी महादेव मंदिर मध्ये परमरहस्य पारायणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला या परमरहस्य पारायणात 101 शिवभक्तानी पारायणाचा तप पुर्ण केला .
महाशिवराञी निमित्त सर्व शिवभक्तांना गावकर्याच्या वतीने विविध पदार्थाचे प्रसादाच्या स्वरूपात अल्पोहार देण्यात आले.व मंदिर समिती कडून रोषनाई, फुलांच्या हारांची सजावट मंदिर परिसरात करण्यात आली होती .या महाशिवराञी निमित्त हेमाडपंथी महादेव मंदिराकडे दर्शनासाठी पहाटे दोन वाजल्यापासुनच मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या , दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणाहून मोठ्या संख्याने शिवभक्तांची मंदीयाळी पहावयास मिळाली .
या सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे 4 ते 5 शिवपाठ, 8 ते 2 परमरहस्य पारायण, तद् नंतर 2 ते 3 यावेळे मध्ये शि.भ.प. राजेश्वर पाटील कुरुडगीकर यांचे प्रवचन झाले व 3 ते 4 यावेळेत गाथाभजन संपन्न झाले .यावेळी मंदिर समितीचे सदस्य मन्मथस्वामी जुकले, माजी सरपंच हुलप्पा मामा ईंदुरे, शंकरअण्णा खंकरे, अशोक कस्तुरे, यांची प्रमुख उपस्थिती होती .
परमरहस्य पारायण सोहळा यशस्वीतेसाठी मन्मथ गंदीगुडे, संजय गोकुळे, चंद्रकांत ओदिलवार, शिवा वंटगीरे, संग्राम खडकीकर, गंगाधर गोगा, संदीप खंकरे, शुभम भंगे,मन्मथ खंकरे, आनंद कलपे, आदि शिवभक्तांनी परिश्रम घेतले .
No comments:
Post a Comment