[अंतरराष्ट्रीय]
१- इराणकडून भारताने केली अतिरिक्त तेलाची आयात
२- उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- आंध्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वांना वाळू फुकट
४- चेन्नई; जयललिता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या तयारीत
५- जेएनयू वाद : कन्हैया कुमारला दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
६- इशरत जहॉं चकमक हा पूर्वनियोजित कट-सतिश वर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- देवनार डंम्पिंग ग्राऊण्डवर तोडगा शोधा, सचिनचं पालिका आयुक्तांना पत्र
८- संजय दत्तला स्वच्छतादूत म्हणून महापालिकेचे निमंत्रण
९- अहमदाबाद; सॅम माणकेशॉ.. फिल्ड मार्शल नव्हे तर खेळाडू - गुजरात सरकारचा प्रताप
१०- हिमाचलात वीरभद्र, महाराष्ट्रात अभद्र - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
११- अब की बार, डान्स बार - राज ठाकरे
१२- काश्मीर खोऱ्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सोलापूर; बार्शीत 3 महिन्यांच्या चिमुरडीला 2 महिन्यात 20 हार्ट अटॅक
१४- मुंबई; अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका, दोन महिला दलालांना अटक
१५- मांजरांच्या उपद्रवावर नसबंदीचा उतारा, मुंबई मनपाचा विचार
१६- कल्याणहून थेट सीएसटीपर्यंत लोकल, मध्य रेल्वेचा विचार
१७- पुणे-सातारा महामार्गावर वडापला अपघात, भोरचे चौघे मृत्युमुखी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- अमृता देवेंद्र फडणवीस यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
१९- मारुती मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांची वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- एक्साईज ड्युटीच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांचा बंदचा इशारा
२१- नायगाव बीएसएनएल कार्यालयाला ठोकले सील; साडेनऊ लाखाचा थकीत महसूल
२२- गोकुंदा; घराला आग लागून दीड लाखाचे नुकसान
२३- एमजीएम कडून शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत
२४- नांदेडच्या शिवसेनेत फेरबदल; अनेकांची लागली वर्णी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संजोय हझ्रा, बलवंत भागानगरे, लोकेश पाईकराव, मुंजाजी व्यवहारे, अर्सम खान, महेश पोलावार, विजय परदेसी, काम्मोदिनी गुप्ता, इरफान कुरेशी, विठ्ठल कदम, नारायण चंद्रवंशी, अनिल देशमुख, जि.के. क्षीरसागर, प्रदीप कुमार, विक्रम कदम, यशपाल भिसे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=====================================

=====================================

देवनार डम्पिंग ग्राऊण्डमुळे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या प्रकृतीला त्रास होत आहे. या परिसरातील
नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मदत करावी, असं त्याने पत्रात म्हटलं आहे. शिवाजीनगर आणि बैंगनवाडीसारखे परिसर प्रदूषणाचे आगार झाले आहेत. मुंबई कचरा व्यवस्थापनात मागे पडत असल्याचं मागेच हायकोर्टाने अधोरेखित केलं होतं, असंही सचिनने नमूद केलं आहे.
सचिन तेंडुलकरने देवनारच्या शिवाजीनगर परिसराती तीन वसाहतींना भेट दिली होती. त्यानंतर स्थानिकांचे प्रश्न पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याचा निर्णय त्याने घेतला. पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छता, आरोग्य आणि बँकेच्या सुविधा, माध्यमिक शाळा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी मर्यादित प्रमाणात असल्याचं सचिनने पत्रात म्हटलं आहे.
परिसरातील लहान मुलं देवनार डम्पिंग ग्राऊण्डमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर खेळताना दिसतात, असं लिहित सचिनने गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहतांनाही यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
=====================================

आदिती गिलबिले ही अवघ्या चार महिन्यांची मुलगी, धीरोदात्तपणे मृत्यूचा सामना करत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आदितीला अत्यंत दुर्मीळ अशा हृदयरोगाने ग्रासलं. अॅनॉमलस लेफ्ट कोरोनरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आर्टरी (ALCAPA) असं वैद्यकीय परिभाषेतील नाव असलेला विकार तिला झाला. हा रोग तीन लाखात एखाद्या बाळाला होतो, अशी माहिती आहे.
जानेवारीमध्ये म्हणजे दोन महिन्यांची असताना आदितीला संबंधित रोगाची लक्षणं दिसू लागली. आदिती अत्यंत चिडचिडी झाली, तिचं श्वसन आणि स्तनपान अनियमित होऊ लागलं, तिला घाम फुटायचा, इतकंच काय तर तिच्या वजनावरही परिणाम झाला, असं आदितीची आई प्रिती गिलबिले सांगतात. एके दिवशी ती सलग तीन तास रडत राहिली, तेव्हा आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं.
बार्शीच्या डॉक्टरांनी हृदयाशी निगडीत काहीतरी आजार असल्याचं सांगून पुण्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पुण्यात आदितीला संबंधित हृदयविकाराचं निदान करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात 21 फेब्रुवारी रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.
=====================================

=====================================

यशस्वी बँकर, होममेकर इथपासून सुरु झालेला अमृता फडणवीस यांचा प्रवास आता बॉलिवूडपर्यंत येऊन पोहचला आहे. यापूर्वी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं. मात्र जय गंगाजलमुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली झाली आहेत.
अमृता फडणवीस यांनी चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रियंकासाठी आवाज दिला आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा गायक अरिजीत सिंग याच्यासोबत त्यांनी ‘सब धन माटी’ हे द्वंद्वगीत गायलं आहे.
या गाण्याला सुप्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलैमान यांचं संगीत लाभलं असून मनोज मुंताशीर यांच्या लेखणीतून गाणं उतरलं आहे.
=====================================

गेल्या काही वर्षांत शहरामध्ये मांजरांचा उपद्रव वाढल्याची ओरड ऐकायला मिळाली. त्यामुळे नसबंदी करुन मांजरांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी जोर धरु लागली.
कोर्टाने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी घातल्यानंतर त्रासातून मुंबईकरांची सुटका कशी करायची, असा प्रश्न पालिकेला पडला होता. मात्र काही सामाजिक संस्थांच्या मदतीने पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला. म्हणूनच मांजरांचीही नसबंदी करण्याचा विचार पुढे आला.
‘प्राणी उत्पत्ती नियंत्रण’ योजनेत मांजरांचाही समावेश व्हावा या मतावर मुंबई महापालिकेतल्या सर्व गटनेत्यांचं एकमत झालं आहे.
मुंबईत सध्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाते. मांजर एकावेळी दोन ते पाच पिल्लांना जन्म देते. त्यामुळे मांजरांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता महापालिका मांजरांचीही नसबंदी करण्याच्या विचारात आहे.
=====================================

गर्दीच्या वेळी लोकलवरचा भार कमी करण्यासाठी कल्याण ते सीएसटी दरम्यान थेट लोकल चालवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवीन प्रस्तावानुसार कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या या थेट सीएसटी स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत. ही सेवा कितपत यशस्वी ठरु शकते याची आधी चाचपणी घेतली जाणार आहे.
सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये या लोकल सोडल्यास गर्दीच्या समस्येतून थोड्याफार प्रमाणात उतारा मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते सीएसटी प्रवास जलद होईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिवाय दारात उभं राहताना होणारी भांडणं, दादागिरीही कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
=====================================

युथ आयकॉन आणि देशातील महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे तुम्ही आमच्या दोन मोहीमांमध्ये सहभागी व्हावं, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छता राखण्यात नागरिक उद्युक्त होतील, अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे दिल्ली सरकारच्या अभियानात सहभागी होण्यासाठी संजय दत्तनेही उत्सुकता दर्शवली आहे. आपण या मोहीमेत सहभागी होण्यास आनंदाने तयार आहोत, असं संजय दत्तच्या वतीने कळवण्यात आलं आहे. 42 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी संजयची मुक्तता झाली.
संजय दत्तप्रमाणे इतरही काही अभिनेते, क्रिकेटपटू, हॉकीपटूंना या अभियानात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र अद्याप कुठलीच गोष्ट निश्चित झाली नसल्याचं सांगितलं जातं.
दिल्ली शहर देशातील स्मार्ट सिटीच्या यादीत वरच्या स्थानावर आणण्यासाठी पालिकेकडून संजय दत्तला निमंत्रण देण्यात आलं आहे. तुरुंगवारी करुन आलेल्या संजूबाबाला दिलेलं हे निमंत्रण वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.
=====================================

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर वडाप म्हणजेच काळी पिवळी जिप उलटून काँक्रीटच्या कठड्याला धडकली. शिरवळहून भोरला जाताना हा अपघात झाला.
या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. अपघातग्रस्त पाचही युवक पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचे रहिवासी होते.
=====================================

=====================================

=====================================
=====================================
=====================================
इशरत जहॉं चकमक हा पूर्वनियोजित कट-सतिश वर्मा
नवी दिल्ली - इशरत जहॉं चकमक प्रकरणी दररोज नवनवे खुलासा होत असताना आता ही चकमक पूर्वनियोजित असल्याची धक्कादायक माहिती भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) निवृत्त अधिकारी सतीश वर्मा यांनी दिली आहे.
वर्मा हे इशरत प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकाचे सदस्य होते. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना वर्मा यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. इशरतसह अन्य तीन जणांना चकमकीपूर्वी गुप्तचर यंत्रणेने ताब्यात घेतले होते. वास्तविक इशरतचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याबाबत कोणीतीही गुप्त माहिती उपलब्ध नव्हती. तिला बेकायदेशीररित्या तुरुंगात ठेवले आणि त्यानंतर तिला ठार केले, असा खुलासा वर्मा यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव आर. व्ही. एस. मणी यांचे आरोपही शर्मा यांनी फेटाळून लावले. मणी यांनी 2009 साली दोन वेळा इशरतचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध नसल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तर तत्कालीन गृहसचिव जी के पिल्ले हे गुप्तचर यंत्रणेतील अधिकार नसल्याचे म्हणत त्यांचेही आरोप नाकारले आहेत.
=====================================
मारुती मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांची वाढ
इराणकडून भारताने केली अतिरिक्त तेलाची आयात
नवी दिल्ली - पाश्चिमात्य देशांनी कच्च्या तेलाची निर्यात करण्यासाठी इराणवर लादलेले निर्बंध हटवल्यानंतर भारताने मागील महिन्यात 21 टक्के अतिरिक्त तेलाची आयात केली आहे.
अमेरिका व युरोपीय महासंघातील देशांनी जानेवारी महिन्यात इराणवर जाचक आर्थिक निर्बंध हटविल्याची घोषणा केली होती. त्यामुळे विविध देशांत गोठविण्यात आलेली इराणची 50 अब्ज डॉलर्सची मालमत्ता मुक्त झाली. तसेच जागतिक बाजारपेठेत तेल विकण्याचा मार्गही मोकळा झाला. भारताने फेब्रुवारीमध्ये इराणमधून दिवसाला 2 लाख 15 हजार 500 बॅरल्सची आयात केली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत त्यामध्ये 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये भारताने इराणकडून दिवसाला केवळ 1 लाख 11 हजार बॅरल्सचीच आयात केली होती. भारतावर असलेल्या पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे मागीलवर्षी फेब्रुवारीपासून इराणकडून तेलाची आयात बंद झाली होती.
=====================================
अब की बार, डान्स बार - राज ठाकरे
मुंबई - डान्स बारबाबत मुख्यमंत्री महोदयांचा गृहपाठ कमी पडला की तुमची इच्छाशक्ती नाही? की तुमचे बारमालकांबरोबर काही संगनमत झालय? आम्हाला एकच समजते अब की बार, डान्स बार, अशी जोरदार टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
काश्मीर खोऱ्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार
शिरवळजवळ अपघातात चौघांचा मृत्यू
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
१- इराणकडून भारताने केली अतिरिक्त तेलाची आयात
२- उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- आंध्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वांना वाळू फुकट
४- चेन्नई; जयललिता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या तयारीत
५- जेएनयू वाद : कन्हैया कुमारला दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
६- इशरत जहॉं चकमक हा पूर्वनियोजित कट-सतिश वर्मा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- देवनार डंम्पिंग ग्राऊण्डवर तोडगा शोधा, सचिनचं पालिका आयुक्तांना पत्र
८- संजय दत्तला स्वच्छतादूत म्हणून महापालिकेचे निमंत्रण
९- अहमदाबाद; सॅम माणकेशॉ.. फिल्ड मार्शल नव्हे तर खेळाडू - गुजरात सरकारचा प्रताप
१०- हिमाचलात वीरभद्र, महाराष्ट्रात अभद्र - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
११- अब की बार, डान्स बार - राज ठाकरे
१२- काश्मीर खोऱ्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सोलापूर; बार्शीत 3 महिन्यांच्या चिमुरडीला 2 महिन्यात 20 हार्ट अटॅक
१४- मुंबई; अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका, दोन महिला दलालांना अटक
१५- मांजरांच्या उपद्रवावर नसबंदीचा उतारा, मुंबई मनपाचा विचार
१६- कल्याणहून थेट सीएसटीपर्यंत लोकल, मध्य रेल्वेचा विचार
१७- पुणे-सातारा महामार्गावर वडापला अपघात, भोरचे चौघे मृत्युमुखी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- अमृता देवेंद्र फडणवीस यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
१९- मारुती मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांची वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२०- एक्साईज ड्युटीच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांचा बंदचा इशारा
२१- नायगाव बीएसएनएल कार्यालयाला ठोकले सील; साडेनऊ लाखाचा थकीत महसूल
२२- गोकुंदा; घराला आग लागून दीड लाखाचे नुकसान
२३- एमजीएम कडून शेतकऱ्यांना दोन लाखांची मदत
२४- नांदेडच्या शिवसेनेत फेरबदल; अनेकांची लागली वर्णी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
संजोय हझ्रा, बलवंत भागानगरे, लोकेश पाईकराव, मुंजाजी व्यवहारे, अर्सम खान, महेश पोलावार, विजय परदेसी, काम्मोदिनी गुप्ता, इरफान कुरेशी, विठ्ठल कदम, नारायण चंद्रवंशी, अनिल देशमुख, जि.के. क्षीरसागर, प्रदीप कुमार, विक्रम कदम, यशपाल भिसे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही
(ऋषिकांत कदम, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
=====================================
आंध्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वांना वाळू फुकट
विजयवाडा : महाराष्ट्रात वाळू माफियांनी उच्छाद मांडला असताना, तिकडे आंध्र प्रदेश सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशात वाळू चक्क फुकटात देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारने घेतला आहे.
चंद्राबाबूंच्या या निर्णयामुळे आंध्र प्रदेश हे फुकटात वाळू मिळणारं देशातील पहिलं राज्य ठरणार आहे.
चंद्राबाबू सरकारने वाळूतून मिळणाऱ्या महसूलावर पाणी सोडून हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्य सरकारचा तब्बल 200 कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.
देवनार डंम्पिंग ग्राऊण्डवर तोडगा शोधा, सचिनचं पालिका आयुक्तांना पत्र
मुंबई : क्रिकेटचा विक्रमादित्य आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहिलं आहे. देवनार डम्पिंग ग्राऊण्डच्या प्रश्नी कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती सचिनने पत्रातून केली आहे. मुंबईतून दररोज 10 हजार मेट्रिक टन कचरा येतो, तो शहरातील तीन डम्पिंग ग्राऊण्ड्समध्ये टाकला जातो.
देवनार डम्पिंग ग्राऊण्डमुळे परिसरातील झोपडपट्टीवासियांच्या प्रकृतीला त्रास होत आहे. या परिसरातील
नागरिकांचं जीवनमान सुधारण्यास पालिका अधिकाऱ्यांनी मदत करावी, असं त्याने पत्रात म्हटलं आहे. शिवाजीनगर आणि बैंगनवाडीसारखे परिसर प्रदूषणाचे आगार झाले आहेत. मुंबई कचरा व्यवस्थापनात मागे पडत असल्याचं मागेच हायकोर्टाने अधोरेखित केलं होतं, असंही सचिनने नमूद केलं आहे.
सचिन तेंडुलकरने देवनारच्या शिवाजीनगर परिसराती तीन वसाहतींना भेट दिली होती. त्यानंतर स्थानिकांचे प्रश्न पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणण्याचा निर्णय त्याने घेतला. पिण्याचं पाणी, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छता, आरोग्य आणि बँकेच्या सुविधा, माध्यमिक शाळा यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी मर्यादित प्रमाणात असल्याचं सचिनने पत्रात म्हटलं आहे.
परिसरातील लहान मुलं देवनार डम्पिंग ग्राऊण्डमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर खेळताना दिसतात, असं लिहित सचिनने गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहतांनाही यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
बार्शीत 3 महिन्यांच्या चिमुरडीला 2 महिन्यात 20 हार्ट अटॅक
फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया
सोलापूर : सोलापुरातली चार महिन्यांची ‘मिरॅकल बेबी’ सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या चिमुरडीला दोन महिन्यांच्या कालावधीत हृदयविकाराचे तब्बल 20 झटके आल्याची माहिती आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आदिती गिलबिले ही अवघ्या चार महिन्यांची मुलगी, धीरोदात्तपणे मृत्यूचा सामना करत आहे, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आदितीला अत्यंत दुर्मीळ अशा हृदयरोगाने ग्रासलं. अॅनॉमलस लेफ्ट कोरोनरी आर्टरी फ्रॉम पल्मनरी आर्टरी (ALCAPA) असं वैद्यकीय परिभाषेतील नाव असलेला विकार तिला झाला. हा रोग तीन लाखात एखाद्या बाळाला होतो, अशी माहिती आहे.
जानेवारीमध्ये म्हणजे दोन महिन्यांची असताना आदितीला संबंधित रोगाची लक्षणं दिसू लागली. आदिती अत्यंत चिडचिडी झाली, तिचं श्वसन आणि स्तनपान अनियमित होऊ लागलं, तिला घाम फुटायचा, इतकंच काय तर तिच्या वजनावरही परिणाम झाला, असं आदितीची आई प्रिती गिलबिले सांगतात. एके दिवशी ती सलग तीन तास रडत राहिली, तेव्हा आम्ही तिला डॉक्टरकडे नेलं.
बार्शीच्या डॉक्टरांनी हृदयाशी निगडीत काहीतरी आजार असल्याचं सांगून पुण्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. पुण्यात आदितीला संबंधित हृदयविकाराचं निदान करण्यात आलं. त्यानंतर मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात 21 फेब्रुवारी रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.
अल्पवयीन मुलीची पोलिसांकडून सुटका, दोन महिला दलालांना अटक
मुंबई: मुंबई पोलिसांनी काल गोरेगाव परिसरातून एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. गोरेगाव मधील साईदीप इमारतीत या मुलीला केवळ 1 लाख 80 हजार रुपयांमध्ये विकत असताना पोलिसांनी तिला सोडवलं. या कारवाईत दोन महिला दलालांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचं वय अवघं 10 ते 12 वर्ष आहे.
मुलीला केवळ 1 लाख 80 हजार रुपयांमध्ये विकण्याचा सौदा झाला होता. या इमारतीत महिला वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना सापळा रचून या महिलांना अटक केली. दरम्यान, अल्पवयीन मुलीची सध्या पोलीस बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलीचे आपण मावशी असल्याचं अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिलांनी पोलिसांना सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील एका घरात आरोपी महिला भाड्याने राहत होत्या. तसेच अनेक वर्षापासून त्या वेश्या व्यवसायही चालवित होत्या. दरम्यान, पोलिसही या प्रकरणी काहीही बोलण्यास तयार नाहीत.
अमृता देवेंद्र फडणवीस यांचं बॉलिवूडमध्ये पदार्पण
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रकाश झा यांच्या आगामी ‘जय गंगाजल’ चित्रपटासाठी अमृता यांनी पार्श्वगायन केलं आहे.
यशस्वी बँकर, होममेकर इथपासून सुरु झालेला अमृता फडणवीस यांचा प्रवास आता बॉलिवूडपर्यंत येऊन पोहचला आहे. यापूर्वी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं. मात्र जय गंगाजलमुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली झाली आहेत.
अमृता फडणवीस यांनी चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रियंकासाठी आवाज दिला आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा गायक अरिजीत सिंग याच्यासोबत त्यांनी ‘सब धन माटी’ हे द्वंद्वगीत गायलं आहे.
या गाण्याला सुप्रसिद्ध संगीतकार सलीम-सुलैमान यांचं संगीत लाभलं असून मनोज मुंताशीर यांच्या लेखणीतून गाणं उतरलं आहे.
मांजरांच्या उपद्रवावर नसबंदीचा उतारा, मुंबई मनपाचा विचार
मुंबई : आतापर्यंत तुम्ही कुत्र्यांची नसबंदी ऐकली असेल, पण यापुढे मांजरांची नसबंदी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत कुत्र्यांसोबत मांजरांच्या संख्येत वाढ झाल्याने त्यांची नसबंदी केली जाऊ शकते.
गेल्या काही वर्षांत शहरामध्ये मांजरांचा उपद्रव वाढल्याची ओरड ऐकायला मिळाली. त्यामुळे नसबंदी करुन मांजरांची संख्या नियंत्रित करण्याची मागणी जोर धरु लागली.
कोर्टाने भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यास बंदी घातल्यानंतर त्रासातून मुंबईकरांची सुटका कशी करायची, असा प्रश्न पालिकेला पडला होता. मात्र काही सामाजिक संस्थांच्या मदतीने पालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येत असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला. म्हणूनच मांजरांचीही नसबंदी करण्याचा विचार पुढे आला.
‘प्राणी उत्पत्ती नियंत्रण’ योजनेत मांजरांचाही समावेश व्हावा या मतावर मुंबई महापालिकेतल्या सर्व गटनेत्यांचं एकमत झालं आहे.
मुंबईत सध्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाते. मांजर एकावेळी दोन ते पाच पिल्लांना जन्म देते. त्यामुळे मांजरांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. यावर आळा घालण्यासाठी आता महापालिका मांजरांचीही नसबंदी करण्याच्या विचारात आहे.
कल्याणहून थेट सीएसटीपर्यंत लोकल, मध्य रेल्वेचा विचार
मुंबई : कल्याणच्या पुढील स्थानकांवरुन सुटणाऱ्या जलद गाड्यांमध्ये डोंबिवली-ठाण्यासारख्या स्थानकांवर चढताना अनेकांना ‘आज कुछ तुफानी करते है’ चा फील येतो. मात्र यावर उतारा म्हणून अतिजलद लोकल सुरु करण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे.
गर्दीच्या वेळी लोकलवरचा भार कमी करण्यासाठी कल्याण ते सीएसटी दरम्यान थेट लोकल चालवण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे ठाण्याच्या पुढे राहणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नवीन प्रस्तावानुसार कल्याण, डोंबिवली आणि ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या या थेट सीएसटी स्थानकावर थांबवण्यात येणार आहेत. ही सेवा कितपत यशस्वी ठरु शकते याची आधी चाचपणी घेतली जाणार आहे.
सकाळी आणि संध्याकाळी पिक अवर्समध्ये या लोकल सोडल्यास गर्दीच्या समस्येतून थोड्याफार प्रमाणात उतारा मिळेल, अशी आशा मध्य रेल्वेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही चाचणी यशस्वी ठरल्यास कल्याण ते सीएसटी प्रवास जलद होईल.
गेल्या काही महिन्यांमध्ये लोकलमधून पडून झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शिवाय दारात उभं राहताना होणारी भांडणं, दादागिरीही कमी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
संजय दत्तला स्वच्छतादूत म्हणून महापालिकेचे निमंत्रण
नवी दिल्ली : नुकताच येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर पडलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संजयला दिल्ली महानगरपालिकेकडून स्वच्छ भारत अभियन आणि स्मार्ट सिटीचा ब्रँड अॅम्बेसेडर होण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
युथ आयकॉन आणि देशातील महत्त्वाची व्यक्ती असल्यामुळे तुम्ही आमच्या दोन मोहीमांमध्ये सहभागी व्हावं, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. यामुळे शहरात स्वच्छता राखण्यात नागरिक उद्युक्त होतील, अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे दिल्ली सरकारच्या अभियानात सहभागी होण्यासाठी संजय दत्तनेही उत्सुकता दर्शवली आहे. आपण या मोहीमेत सहभागी होण्यास आनंदाने तयार आहोत, असं संजय दत्तच्या वतीने कळवण्यात आलं आहे. 42 महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी संजयची मुक्तता झाली.
संजय दत्तप्रमाणे इतरही काही अभिनेते, क्रिकेटपटू, हॉकीपटूंना या अभियानात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र अद्याप कुठलीच गोष्ट निश्चित झाली नसल्याचं सांगितलं जातं.
दिल्ली शहर देशातील स्मार्ट सिटीच्या यादीत वरच्या स्थानावर आणण्यासाठी पालिकेकडून संजय दत्तला निमंत्रण देण्यात आलं आहे. तुरुंगवारी करुन आलेल्या संजूबाबाला दिलेलं हे निमंत्रण वादाला तोंड फोडण्याची शक्यता आहे.
पुणे-सातारा महामार्गावर वडापला अपघात, भोरचे चौघे मृत्युमुखी
सातारा : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या हद्दीत वडाप उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर वडाप म्हणजेच काळी पिवळी जिप उलटून काँक्रीटच्या कठड्याला धडकली. शिरवळहून भोरला जाताना हा अपघात झाला.
या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे. अपघातग्रस्त पाचही युवक पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचे रहिवासी होते.
जयललिता राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याच्या तयारीत
चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे.जयललिता यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या मुक्ततेसाठी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. या मारेकऱ्यांनी 24 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे. त्यामुळए माणूसकीच्या दृष्टीकोनातून त्यांची तुरुंगातून सुटका करायला हवी, असं या पत्रात लिहिलं आहे.
यापूर्वीही सुटकेसाठी केंद्राकडे परवानगी
तामिळनाडू सरकारने याआधीही मारेकऱ्यांना माफी मिळावी, यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. लोकसभा निवडणुकीदरम्यान जयललिता यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्यासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मागितली होती. हा संवेदनशिल निर्णय घेण्यासाठी चर्चा आणि सल्ला घ्यायला हवा, असं सरकारने स्पष्ट केलं होतं.
केंद्राच्या सल्ल्याशिवाय राज्य निर्णय घेऊ शकत नाही
तामिळनाडू सरकारने सीआरपीसीच्या कलम 435 अंतर्गत माफीची विचारणा केली होती. कायद्यात नमूद केलं आहे की, केंद्राशी चर्चा केल्याशिवाय राज्य सरकार अशा अधिकारांचा वापर करु शकत नाही, असं कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलं होतं.
जेएनयू वाद : कन्हैया कुमारला दिलासा, अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारला दिल्ली हायकोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैयाला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आज 20 दिवसांनी कन्हैयाला जामीन मिळाला आहे.
कन्हैयाला 10 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिल्ली हायकोर्टाने जामीन दिला आहे. मात्र, पुढील चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करण्यासही कोर्टाने कन्हैयाला सांगितले आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच 12 फेब्रुवारीला कन्हैय्याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैयावर आहे. कन्हैयाला जामीन देण्यास सुरुवातील पोलिसांनी विरोध केला होता. मात्र, त्यानंतर पोलिसांनी कन्हैयाला जमीन अर्ज करण्यास परवानगी दिली.
दिल्ली हायकोर्टात कन्हैयाच्या वकिलांनी जेएनयूतील घोषणांच्या कथित व्हिडीओचे फॉरेन्सिक अहवाल सादर केले. यातील दोन व्हिडीओ प्रक्रिया केलेले आढळले. कन्हैयाच्या वकिलांचं म्हणणं ऐकून दिल्ली हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.
अहमदाबाद; सॅम माणकेशॉ.. फिल्ड मार्शल नव्हे तर खेळाडू - गुजरात सरकारचा प्रताप
- अहमदाबाद, दि. ३ - भारतीय लष्करात 'फिल्ड मार्शल' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख... मात्र गुजरात सरकारच्या मते ते एक खेळाडू होते. गुजरात सरकारच्या वेबसाईटवर ' लँड ऑफ लिंजड्स' (गुजरातमधील महान व्यक्तीमत्व) या विभागात माणकेशॉ यांचा उल्लेख क्रीडा क्षेत्रात करण्यात आला आहे.१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते. ते ' सॅम बहाद्दूर' या नावानेही प्रसिद्ध होते. चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत माणकेशॉ दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबतच्या युद्धात सहभागी होते. लष्करातील एवढा दैदिप्यमान इतिहास असलेल्या माणकेशॉ यांना गुजरात सरकारने मात्र ' खेळाडूं'च्या पंक्तीत स्थान दिले आहे.या वेबसाईटमध्ये अशा अनेक चुका आहेत. जनरल राजेंद्रसिन्हजी जाडेजा यांचे नावही खेळाडूंच्या विभागात लिहीण्यात आले आहे. तर गुजरातमध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारे गिजूभाई बधेका यांना जमशेदजी टाटा, प्रेमचंद रायचंद आणि कस्तुरभाई लालभाई यांच्यासोबतीने उद्योजकांच्या यादीत बसवण्यात आले आहे. १८८५ साली जन्मलेले बधेका हे मूलत: एक वकील होते. तर वाघेला राजवंशाच्या काळात प्रसिद्ध जैन मंदिरांची वास्तू उभारणारे १३ व्या शतकातील वास्तुशास्त्रज्ञ वास्तुपाल तेजपाल यांना उद्योजक संबोधण्यात आले आहे. भगवान कृष्ण आणि मीराबाई यांना साहित्याच्या विभागात स्थान देत त्यांना साहित्यकार संबोधण्यात आले आहे.
हिमाचलात वीरभद्र, महाराष्ट्रात अभद्र - उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
- मुंबई, दि. ३ - भारत- पाकिस्तान सामना आपल्या राज्यात खेळू देण्यास नकार देणा-या हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कौतुक करत महाराष्ट्रतील नेत्यांनीही यातून धडा घ्यावा असा टोला हाणला आहे. कांगडात रद्द होणार्या पाक सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करू व चोख बंदोबस्त देऊ अशी एखादी आरोळी जालन्यातून किंवा नागपुरातून उठू नये, 'हिमाचलमध्ये वीरभद्र व महाराष्ट्रात अभद्र' असे यापुढे तरी घडू नये असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांवर टीका केली आहे.पाकिस्तानमुळे भारतीय जवानांचे रक्त सांडत असताना आपण त्यांच्या क्रिकेटच्या प्रेमात का पडत आहोत? सैनिकांचे बलिदान पायदळी तुडवून कुणास पाकड्यांच्या क्रिकेट प्रेमास गोंजारत बसायचे असेल त्याने देशभक्तीवर प्रवचने झोडण्याची गरज नाही, अशी टीकाही उद्धव यांनी केली. जे राज्यकर्ते व जे जुगारी क्रिकेटवाले पाकिस्तानबरोबरचा एखादा क्रिकेट सामना, पाकड्या कलाकारांच्या मैफली लाथाडू शकत नाहीत त्यांच्याकडून देशवासीयांनी काय अपेक्षा करावी? असा सवालही त्यांनी विचारला आहे. कांगडाची भूमी ही शहीद सैनिकांच्या भावनांचे प्रतीक आहे व त्याच भावना हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी या भावनांवर चिंतन केले तर आपल्या राज्यातील शहीद सैनिकांचे आत्मे महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी करतील.जेएनयूमध्ये देशद्रोहाचे नारे लावणार्यांच्या विरोधात निवृत्त सैनिकांनी एक मोर्चा दिल्लीत काढला. या जर देशभावना असतील तर मग कांगडातील सैनिक व शहिदांच्या कुटुंबीयांच्या भावना म्हणजे पालापाचोळा नाही हेसुद्धा समजून घेतले पाहिजे असे सांगत देशभावना म्हणजे सोयीचे राजकारण करण्यासाठी निर्माण होणारे बुडबुडे नव्हे असे उद्धव यांनी म्हटले.
इशरत जहॉं चकमक हा पूर्वनियोजित कट-सतिश वर्मा
वर्मा हे इशरत प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपासणी पथकाचे सदस्य होते. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना वर्मा यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. इशरतसह अन्य तीन जणांना चकमकीपूर्वी गुप्तचर यंत्रणेने ताब्यात घेतले होते. वास्तविक इशरतचे दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याबाबत कोणीतीही गुप्त माहिती उपलब्ध नव्हती. तिला बेकायदेशीररित्या तुरुंगात ठेवले आणि त्यानंतर तिला ठार केले, असा खुलासा वर्मा यांनी केला आहे.
केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव आर. व्ही. एस. मणी यांचे आरोपही शर्मा यांनी फेटाळून लावले. मणी यांनी 2009 साली दोन वेळा इशरतचे लष्कर-ए-तैयबाशी संबंध नसल्याची प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तर तत्कालीन गृहसचिव जी के पिल्ले हे गुप्तचर यंत्रणेतील अधिकार नसल्याचे म्हणत त्यांचेही आरोप नाकारले आहेत.
=====================================
मारुती मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांची वाढ
नवी दिल्ली - मारुती सुझुकीने आपल्या सर्व मोटारींच्या किंमतीत 34,494 रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात देशात विक्री होणाऱ्या सर्व वाहनांवर अतिरिक्त कर लादल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
मारुतीचे सियाझ व एर्टिगासारखे हायब्रिड मॉडेल्स कर कक्षाच्या बाहेर आहेत. त्यामुळे या मोटारींच्या किंमतीत कोणताही बदल करणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. परंतु अद्याप कंपनीने प्रत्येक मॉडेलच्या किंमतीत होणारी नेमकी वाढ व ती केव्हापासून लागू होईल हे नमूद करण्यात आलेले नाही.
वायू प्रदुषण व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक मदतीसाठी सरकारतर्फे हा कर लादण्यात आला आहे.
=====================================इराणकडून भारताने केली अतिरिक्त तेलाची आयात
अमेरिका व युरोपीय महासंघातील देशांनी जानेवारी महिन्यात इराणवर जाचक आर्थिक निर्बंध हटविल्याची घोषणा केली होती. त्यामुळे विविध देशांत गोठविण्यात आलेली इराणची 50 अब्ज डॉलर्सची मालमत्ता मुक्त झाली. तसेच जागतिक बाजारपेठेत तेल विकण्याचा मार्गही मोकळा झाला. भारताने फेब्रुवारीमध्ये इराणमधून दिवसाला 2 लाख 15 हजार 500 बॅरल्सची आयात केली आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत त्यामध्ये 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये भारताने इराणकडून दिवसाला केवळ 1 लाख 11 हजार बॅरल्सचीच आयात केली होती. भारतावर असलेल्या पाश्चिमात्य देशांच्या दबावामुळे मागीलवर्षी फेब्रुवारीपासून इराणकडून तेलाची आयात बंद झाली होती.
=====================================
अब की बार, डान्स बार - राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) मनसेच्या ट्विटर अकाउंटवरून राज्यात पुन्हा डान्स बार सुरु करण्याबाबत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. डान्स बारला परवाना देण्यासाठी राज्य सरकारने घातलेल्या विशिष्ट अटी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवित सरकारची कोंडी केली होती.
राज ठाकरे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना 2013 मधअये विधानसभेने एकमुखाने निर्णय घेऊन डान्सबार वर बंदी आणली होती. त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्य सरकारनी गृहपाठ नीट केला नाही आणि त्यांची राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सर्वोच्च न्यायालयात नीट बाजू मांडली नाही. आता काय झाल मुख्यमंत्रीमहोदय. सरकार जितकी आस्था डान्सबार सुरु होण्याबाबत दाखवते, तशीच त्यांनी इतर विषयांवरही दाखवली तर जनता त्यांना मनापासून दुवा देईल. अच्छे दिन डान्सबार मालकांचे आल्याचे हे लक्षात आले आहे. संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेला भाजप केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना काय करते हे पहावे लागेल.
=====================================उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी
सेऊल - संयुक्त राष्ट्रसंघाकडून (यूएन) निर्बंध घातल्यानंतरही काही वेळातच आज (गुरुवार) उत्तर कोरियाकडून कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली आहे.
दक्षिण कोरियाने आज केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की उत्तर कोरियाने उत्तरेकडील समुद्र किनाऱ्यावरून कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. उत्तर कोरियाच्या या चाचण्यांमुळे दक्षिण कोरियाला धोका निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांना उत्तर कोरियाने उत्तर दिले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर दोन दशकांसाठी निर्बंध घातले आहेत. उत्तर कोरियाने नुकतेच हायड्रोजन बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले होते. पण, उत्तर कोरियाने यूएनच्या निर्बंधांना न जुमानता पुन्हा एकदा चाचणी घेतली आहे.
=====================================काश्मीर खोऱ्यात चकमकीत 3 दहशतवादी ठार
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुरक्षा रक्षकांना एका घरात तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या घरावर हल्ला करत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. हे सर्व दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. या दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
आशिक हुसेन भट्ट, मोहम्मद इसाक पॅरे आणि असिफ अहमद मीर अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. उधमपूर जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्यांमध्ये भट्ट सहभागी होता.
=====================================शिरवळजवळ अपघातात चौघांचा मृत्यू
सातारा - शिरवळहून-भोरकडे जाणाऱ्या प्रवासी जीपला शिरवळजवळ मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळजवळील ट्यूबवेल कंपनीसमोर ही प्रवासी जीप पलटी होऊन चार जण जागीच ठार झाले. दोन गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. जीपमधील सर्व प्रवासी भोरमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतांमध्ये प्रशांत अंकुश राऊत (वय २५, रा. राऊतवाडी ता. भोर) गणेश गुलाब बोणे (वय १५, रा. सारोळा ता. भोर) दस्तगीर नबीलाल नाणकेकर (वय २८, रा. सारोळा ता. भोर) अतुल नंदकुमार बरकडे (वय ३०, रा. गुणंद ता. भोर) यांचा समावेश आहे. तर, हणमंत अंकुश निगडे (वय २८, रा. भोंगवली ता. भोर) गंभीर जखमी आहेत.
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
No comments:
Post a Comment