Saturday, 5 March 2016

नमस्कार लाईव्ह ०५-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- पाकिस्तान संघाला संपूर्ण सुरक्षा देणार, बीसीसीआयची पीसीबीला हमी 
२- लंडन; कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- शत्रुघ्न सिन्हांचं कन्हैयाला समर्थन, सुटकेचं स्वागत 
४- अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार 
५- माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू नका - राहुल गांधी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
६- कन्हैय्याची जीभ कापणा-यास देईन ५ लाखांचे इनाम - भाजयुमो नेत्याची वादग्रस्त घोषणा 
७- राज्यात गेल्या वर्षी सर्वाधिक (3228) शेतकरी आत्महत्या  
८- केआरके कन्हैया कुमारला दोन लाख रुपये देणार 
९- 'मराठा असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं', तावडेंचा धक्कादायक आरोप 
१०- उत्तर प्रदेशात सरपंच मात्र वसईत चोरी 
११- बनावट स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड, 3 वकिलांसह 9 जणांना अटक 
१२- डोंबिवलीत कंपनीला भीषण आग 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- विमान उतरत असतानाच टायर फुटून अपघात; १२८ जणांचे वाचले प्राण 
१५- दिल्ली; ऑपरेशनदरम्यान फुप्फसात ब्लेड राहिल्याने २ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू 
१६- अमृता फडणवीसांच्या गायनावर प्रकाश झा म्हणाले. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- प्रो कबड्डी लीग : यू मुम्बा-पटना पायरेट्स अंतिम लढत 
१८- पुणेरी पलटनचा धुव्वा, पटना पायरेट्स फायनलमध्ये 
१९- स्मार्टफोनचा अधिक वापर, होऊ शकतो हा गंभीर आजार 
२०- जॉन अब्राहमच्या 'रॉकी हॅण्डसम'चा ट्रेलर रिलीज 
२१- भारत-पाकिस्तान सामन्याचे भवितव्य अधांतरी 
२२- गंगाजल; दुबळे कथानक अन् परफॉर्मन्सही  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- किनवट; आदिवासी कृती समितीच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा 
२४- लोहा; फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून कर्जदार पती-पत्नीला मारहाण 
२५- भोकरचा लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी जेरबंद 
२६- प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आटो-टक्सी चालकांचे धरणे आंदोलन 
२७- हदगाव तालुक्यातील सत्तर शाळा डिजिटल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
अशोक कांबळे, विठ्ठल चीलीपिपरे, अनिल मुंडकर, सचिन कपाळे, संतोष जाधव, संभाजीराव रावणगावकर, एम.डी. गायकवाड, पप्पू चौदन्ते, राजवीर शर्मा, समीर खान, रवीकिरण शिंदे, शंकर महाजन, विद्याशंकर विश्वकर्मा, स्वप्नील कुलकर्णी, प्रवीण कोलाने, शिवराज लोहेकर, राजेंद्र तळणीकर, हरीश पाटील, भगवान बोडके, महेश महाजन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
नियमितपणा हा माणसाचा मित्र आहे, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो
(राजवीर सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


==================================

शत्रुघ्न सिन्हांचं कन्हैयाला समर्थन, सुटकेचं स्वागत

शत्रुघ्न सिन्हांचं कन्हैयाला समर्थन, सुटकेचं स्वागत!
नवी दिल्ली: जेएनयू विदयार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमाराच्या सुटकेनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी त्याला आपलं समर्थन दिलं आहे. मात्र, आता भाजपमध्येही काही जण कन्हैयाला समर्थन देत आहेत. भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी कन्हैयाला आपलं समर्थने दिलं असून त्याला मिळालेल्या जामीनावर आपण खुश असल्याचंही ते म्हणाले. 
आजवर शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाबाबतची आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. बिहार निवडणुकीपासून पक्षाच्या विरोधात अनेकदा बोलताना ते दिसले. भाजपमधील नेतृत्वावरही त्यांनी अनेकदा टीकास्त्र सोडलं. आता तर शत्रुघ्न यांनी कन्हैयाला समर्थन देत पक्षावरच निशाणा साधला आहे.
==================================

'मराठा असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं', तावडेंचा धक्कादायक आरोप

'मराठा असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं', तावडेंचा धक्कादायक आरोप
उस्मानाबाद: ‘राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली कामं केली. मात्र आपण मराठा असल्यामुळे मला टार्गेट केलं जातं आहे.’ असा धक्कादायक आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला आहे. तावडे उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दुधाची बाटली फेकली. 
या प्रकारानंतर तावडेंचे पीए संतोष सुर्वे यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली. त्याबाबत विचारणा केली असताना असताना विनोद तावडेंनी हा आरोप केला. विनोद तावडेंच्या वक्तव्याचा रोख नेमका कुणाकडे आहे? याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. 
==================================

उत्तर प्रदेशात सरपंच मात्र वसईत चोरी

उत्तर प्रदेशात सरपंच मात्र वसईत चोरी!
वसई : वसई पोलिसांनी एका अशा चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत, ज्याची कार्यपद्धती ऐकून तुम्ही देखील चक्रावून जाल. चोरीच्या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेला अस्लम शेख उत्तर प्रदेशातील एका गावचा माजी सरपंच आहे. मुंबईसह वसई-विरारमध्ये चोरी करुन तो उत्तर प्रदेशात प्रतिष्ठेचं पांघरुण घ्यायचा.
 मुंबई आणि उपनगरांमध्ये चोरी करुन अस्लम शेखने उत्तर प्रदेशात कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली आहे. एवढंच नव्हे तर चोरी करण्यासाठी हा महाभाग उत्तर प्रदेश ते मुंबई विमानाने ये-जा करायचा. शेख हा 2010 ते 2015 या कालावधीत उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील रामपूर रजवाडा गावचा सरपंच होता. 
आरोपी अस्लम शेखने मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई, विरार या परिसरात किती घरात हात साफ केला आहे याची गणतीच नाही. एक स्कॉर्पिओ, एक झायलो अशा दोन गाड्या, एक हॉटेल, 20 दुकाने अशी त्याची संपत्ती असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अस्लम 10 ते 15 मिनिटांत घर फोडून पसार होत. 11 जानेवारी 2016 रोजी अस्लमने वसईतील साईनगर भागात चोरी केली होती. मात्र ती चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवून अलाहाबाद येथून त्याला अटक केली.
==================================

प्रो कबड्डी लीग : यू मुम्बा-पटना पायरेट्स अंतिम लढत

प्रो कबड्डी लीग : यू मुम्बा-पटना पायरेट्स अंतिम लढत
नवी दिल्ली : प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या मोसमाची फायनल अनुप कुमारची यू मुम्बा आणि मनप्रीत सिंहची पटना पायरेट्स यांच्यात होईल. यू मुम्बाने सलग तिसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
 उपांत्य फेरीत यू मुम्बाने निलेश शिंदेच्या बंगाल वॉरियर्सचा 41-29 असा धुव्वा उडवला.
 या सामन्यात यू मुम्बाच्या खेळाडूंनी चढाईत आणि पकडीत गुणांची अक्षरश: लयलूट केली. यू मुम्बानं बंगाल वॉरियर्सवर मध्यांतरापर्यंत 26-8 अशी एकूण 18 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे बंगाल वॉरियर्सला या सामन्यात परतण्याची संधीच मिळाली नाही. 
यू मुम्बाकडून रिशांक देवाडिगाने चढाईत 11 आणि पकडीत 2 अशी एकूण 13 गुणांची वसूली केली. अनुप कुमार आणि मोहित चिल्लरनेही यू मुम्बासाठी प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली.
 बंगाल वॉरियर्सकडून नितीन तोमरने आठ, तर उमेश म्हात्रे आणि विजीन थांगदुराईने प्रत्येकी सहा गुणांची वसूली केली. पण त्यांची ही खेळी बंगाल वॉरियर्सला विजय मिळवून देऊ शकली नाही.
==================================

पुणेरी पलटनचा धुव्वा, पटना पायरेट्स फायनलमध्ये

पुणेरी पलटनचा धुव्वा, पटना पायरेट्स फायनलमध्ये
नवी दिल्ली : पटना पायरेट्सने पुणेरी पलटणचा 40-21 असा 19 गुणांनी धुव्वा उडवून प्रो कबड्डी लीगच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. प्रो कबड्डी लीगची फायनल गाठण्याची पटना पायरेट्सची ही पहिलीच वेळ आहे. 
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या उपांत्य सामन्यावर पटना पायरेट्सने निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पटनाने सामन्याच्या नवव्या मिनिटालाच पुणेरी पलटणवर पहिला लोण दिला. मग प्रदीप नरवालने एकाच चढाईत चार गुण वसूल करून पटनाला दुसरा लोण मारुन दिला. त्यामुळे पटनाला मध्यंतरालाच 25-7 अशी 18 गुणांची मजबूत आघाडी घेता आली. मग निर्धारित वेळेत पटना पायरेट्सने 40-21 अशी बाजी मारली.
 या सामन्यात पटना पायरेट्सकडून प्रदीप नरवालने चढाईत सर्वाधिक दहा गुणांची कमाई केली. रोहित कुमारने सात आणि संदीप नरवालने पाच गुण वसूल करुन पटनाच्या विजयात हातभार लावला. पुणेरी पलटणकडून एकाही खेळाडूला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
==================================

स्मार्टफोनचा अधिक वापर, होऊ शकतो हा गंभीर आजार

स्मार्टफोनचा अधिक वापर, होऊ शकतो हा गंभीर आजार!
मुंबई: स्मार्टफोनशिवाय आपण एकही मिनिट राहू शकत नाही? असं असेल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे. बाजारात येणारे नवनवीन स्मार्टफोन नेहमीच भुरळ घालतात. किशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोनविषयी बरीच उत्सुकता असते पण त्याचा परिणाम त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. एका नव्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे.
 दरम्यान, स्मार्टफोनच्या वापरामुळं मेंदूशी निगडीत काही विकारांबाबत माहिती मिळालेली नाही. पण सलग याचा वापर केलात तर याचा नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.
 अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनियोसच्या या संशधोनातील प्रमुख लेखक एलिजैंड्रओ लेरासच्या मते, ‘समाजात नव्या तंत्रज्ञानाबद्दल कायमच सुरुवातीला भीतीचं वातावरण राहिलं आहे.’ टीव्ही, व्हिडिओ गेम आणि स्मार्टफोन हे सध्याचं नवं तंत्रज्ञान आहे.
 या संशोधनात 300 कॉलेज विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून मोबाईल, इंटरनेट आणि त्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. मोबाइल आणि इंटरनेटचा वापरमुळे मानसिक स्वास्थावर काही परिणाम होतो का? याकडे संशोधकाचं लक्ष आहे.
==================================

अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार

अफजल नव्हे, रोहित वेमुला आदर्श : कन्हैया कुमार
नवी दिल्ली : अफजल गुरु हा माझा आदर्श नाही, तर माझा आदर्श रोहित वेमुला आहे, असे जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार म्हणाला. दिल्लीतील पत्रकार परिषदेत कन्हैया बोलत होता. यावेळी त्याने विविध मुद्द्यांवर त्याने आपली मतं मांडली.
कन्हैयाच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे:
– जेएनयूमधील कोणताही विद्यार्थी देशविरोधी नाही – कन्हैया कुमार
– घटनाबाह्य असलेल्या कोणत्याही गोष्टीला जेएनयू समर्थन करत नाही- कन्हैया कुमार
– आम्ही तुमच्या मुला-बाळांसारखेच, दहशतवादी नाही – कन्हैया कुमार
– आम्हाला स्वातंत्र्याचा अर्थ माहित आहे, देशापासून स्वातंत्र्य नको, देशात स्वातंत्र्य हवं – कन्हैया कुमार
– पंतप्रधानांशी वैयक्तिक नाही, वैचारिक मतभेद; मनभेद नाही, त्यामुळे ‘मन की बात’ करत नाही: कन्हैया
– देशद्रोह आहे की नाही, हे न्यायालय सिद्ध करेल. त्यावर बोलल्यास न्यायालयाचा अपमान ठरेल – कन्हैया कुमार
– अफजल गुरु हा अखंड भारतातील काश्मीरचा नागरिक होता :कन्हैया कुमार
– अफजल गुरु घटनेनुसार भारतीय नागरिक, त्याला कायद्याने शिक्षा दिली आहे – कन्हैया कुमार
– जेएनयूतील विद्यार्थ्यांनी मला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडलं आहे, त्यापुढे मी अद्याप काही विचार केला नाही- कन्हैया कुमार
– आम्ही स्वातंत्र्याची मागणी करत आहोत, हक्कांची मागणी करत आहोत – कन्हैया कुमार
==================================

बनावट स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड, 3 वकिलांसह 9 जणांना अटक

बनावट स्टॅम्प पेपर विकणारी टोळी गजाआड, 3 वकिलांसह 9 जणांना अटक
मुंबई : बनावट स्टॅम्प आणि जुन्या तारखेचे स्टॅम्प पेपर विकणाऱ्या टोळीचा मुंबईच्या प्रॉपर्टी सेलनं पर्दाफाश केला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये तीन वकिलांचाही समावेश आहे. 
गेल्या काही दिवसांपासून वांद्रे, अंधेरी आणि किल्ला कोर्ट परिसरात बनावट स्टॅम्पची विक्री सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. तसंच काही व्यवहारांसाठी बनावट स्टॅम्प पेपर्सचा वापर होत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. या माहितीची खातरजमा करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलचे अधिकारी विशेष लक्ष ठेवून होते. अखेर आज पोलिसांनी तीन वकिलांसह 9 जणांना ताब्यात घेऊन स्टॅम्प पेपरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. 
आरोपींकडून 15 हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर 57 वर्षांपुर्वीचा स्टॅम्प पेपर देखील आरोपींकडे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
==================================

अमृता फडणवीसांच्या गायनावर प्रकाश झा म्हणाले.

अमृता फडणवीसांच्या गायनावर प्रकाश झा म्हणाले....
मुंबई : साधारणत: एखाद्या सिनेमाची चर्चा त्यात काम करणाऱ्या स्टार, सिनेमाची कथा किंवा त्या सिनेमाला मिळालेल्या देश-विदेशातील पुरस्कारावरुन होत असते. मात्र, प्रकाश झा दिग्दर्शित ‘जय गंगाजल’ सिनेमाची चर्चा ‘सब धन माटी’ या भजनामुळे सुरु झाली आहे. 
‘सब धन माटी’ अचानक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या भजनाची गायिका. हे भजन गायलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी. 
हे भजन गाण्यासोबतच अमृता फडणवीस या हिंदी सिनेसृष्टीत आगमन करत आहेत. “याआधी मी मराठी सिनेमांमध्ये गायन केलं आहे. मात्र, फार काही पुढे जाता आलं नाही. ‘जय गंगाजल’च्या माध्यमातून एक नवी सुरुवात आहे, असं समजूया.”, असे अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.
 अमृता फडणवीस या दुसऱ्या एका सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड करत असताना प्रकाश झा यांना त्यांना ऐकलं. त्यानंतर प्रकाश झा यांना वाटलं, ‘सब धन माटी’ हे भजन अमृत फडणवीस उत्तमपणे गाऊ शकतात.
==================================

जॉन अब्राहमच्या 'रॉकी हॅण्डसम'चा ट्रेलर रिलीज


जॉन अब्राहमच्या 'रॉकी हॅण्डसम'चा ट्रेलर रिलीज
मुंबई : ‘दृश्यम’नंतर निशिकांत कामत आता नवा अॅक्शन पॅक्ड सिनेमा घेऊन येत आहे. जॉन अब्राहमच्या ‘रॉकी हॅण्डसम’ या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिक्स पॅक बॉडी, अॅक्शन पॅक्ड असेलला हा सिनेमा घेऊन जॉन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
ट्रेलरमध्ये जॉन रॉकीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन, इमोशन आणि रोमान्सचा तडका आहे.
 सिनेमाची कहाणी रॉकी नावाच्या एका व्यक्तीच्या सूडाची आहे. एका घटनेनंतर त्याचं आयुष्य बदलतं आणि मग सुरु होतो सूड घेण्याचा सिलसिला. 
चित्रपटा जॉन अब्राहम अॅक्शन स्टंट करताना दिसत आहे. सिनेमात श्रुती हसनही प्रमुख भूमिकेत आहे. मराठमोळा निशिकांत कामत या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. 25 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
पाहा ट्रेलर
==================================

केआरके कन्हैया कुमारला दोन लाख रुपये देणार

केआरके कन्हैया कुमारला दोन लाख रुपये देणार!
मुंबई : बॉलिवूडचा वादग्रस्त चेहरा कमाल आर खान अर्थात केआरकेने देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. कन्हैयाने तुरुंगातून सुटल्यानंतर गुरुवारी रात्री जे मोठं भाषण दिलं, ते ऐकल्यानंतर केआरकेने हा निर्णय घेतला आहे. 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी कन्हैया कुमार एखाद्या हिरोप्रमाणे सादर केलं. आता या यादीत केआरेचाही समावेश झाला आहे. “कन्हैया कुमारला त्याच्या भाषणासाठी दोन लाख देणार आहे. माझ्या दिल्लीतील ऑफिसमधून कोणतरी ते पैसे घ्यावेत,” असं ट्वीट केआरकेने केलं आहे.
==================================

पाकिस्तान संघाला संपूर्ण सुरक्षा देणार, बीसीसीआयची पीसीबीला हमी

पाकिस्तान संघाला संपूर्ण सुरक्षा देणार, बीसीसीआयची पीसीबीला हमी
मुंबई : ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठीच्या भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने पीसीबीला पाकिस्तान संघाच्या पूर्ण सुरक्षेची हमी दिली आहे. भारत दौऱ्यातल्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वेन्टी-20 विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी गुरुवारी दिली होती. 
बीसीसीआय आणि भारत सरकारने पाकिस्तान संघाच्या सुरक्षेची लेखी हमी दिल्यानंतरच ट्वेन्टी-20 विश्वचषकात खेळण्याची तयारी पीसीबीचे कार्याध्यक्ष शहरयार खान यांनी दाखवली होती. 
त्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, ट्वेन्टी-20 विश्वचषकात सहभागी होत असलेल्या पाकिस्तानसह साऱ्या संघांना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल. पाकिस्तान संघाला कडक सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची आहे, पीसीबीने सुरक्षाव्यवस्थेची चिंता करु नये. 
ट्वेन्टी -20 विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर यायचं की, नाही, याविषयीचा निर्णय पीसीबीनेच घ्यायचा आहे. पण पीसीबीने एवढं लक्षात ठेवावं की, ते आयसीसीला उत्तरदायी आहेत, असंही शुक्ला यांनी पुढे म्हणाले.
==================================

डोंबिवलीत कंपनीला भीषण आग


  • डोंबिवली, दि. ५ - डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात भीषण आग लागली आहे. मानपाडा रोडवरील शनि मंदिराजवळ असलेल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीत शनिवारी सकाळी ही लागली. तसेच कंनीजवळच गॅस सिलेंडरचे गोदाम असल्याने आग आणखीन भडकली.
    ही आग एवढी भीषण आहे की ब-याच अंतरावरूनही आगीच्या ज्वाळा व धूराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
==================================

भारत-पाकिस्तान सामन्याचे भवितव्य अधांतरी

  • फुलप्रूफ सुरक्षेची बीसीसीआयची हमी
    कराची : पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतात पाक संघाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली असून विश्वचषक टी-२० क्रिकेटसाठी संघ पाठविण्याआधी भारतातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तान सुरक्षा पथक पाठविणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच संघ पाठविण्याचा अंतिम निर्णय होणार असल्याने धर्मशाला येथील भारत-पाक लढतीचे भविष्य अधांतरीच आहे.
    पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली यांना पाकिस्तान संघाला पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी भारतात सुरक्षा पथक पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेची हमी मिळाल्यानंतरच आम्ही आपला संघ पाठवू शकतो, अशी परिस्थिती आहे. सरकारने आम्हाला विश्वचषक टी-२० मध्ये खेळण्याची आधीच परवानगी दिली आहे पण धर्मशाला येथील भारत-पाक सामन्याच्या आयोजनाबाबत सुरक्षेच्या चिंतेचा अहवाल पंतप्रधानांना सोपविण्यात आला.’
    पंतप्रधान सचिवालयाने देखील पाकचा विश्व टी-२० तील सहभाग सुरक्षा दलाच्या अहवालावर आलंबून असल्याचे म्हटले आहे. निसार अली यांनी इस्लामाबाद येथे एका बैठकीदरम्यान संपूर्ण माहिती शरीफ यांना दिली. त्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानी संघासाठी नवी दिल्लीतील पाक दूतावासामार्फत आयोजकांकडून फुलप्रूफ सुरक्षा मिळणार असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले.
    आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या दारुण पराभवानंतर देशात जो जनक्षोभ उसळला त्यावरून पराभवावर अहवालदेखील पंतप्रधान कार्यालयाने मागितला आहे.
==================================

कन्हैय्याची जीभ कापणा-यास देईन ५ लाखांचे इनाम - भाजयुमो नेत्याची वादग्रस्त घोषणा


  • नवी दिल्ली, दि. ५ - जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आणि नुकताच देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगात जाऊन आलेला कन्हैया कुमार याच्यासंदर्भात उत्तर प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने अतिशय खळबळजनक व वादग्रस्त विधान केले आहे. ' जो कोणी कन्हैया कुमारची जीभ छाटून दाखवेल त्याला ५ लाखांचे इनाम देण्यात येईल' अशी घोषणा उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातीलभारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेल्या कुलदीप वर्ष्णेय यांनी केली. 
    ' देशविरोधातील घोषणा दिल्यानंतर कन्हैया आता सर्वांना लक्ष्य करत आहे. त्याला धडा शिकवण्याची गरज आहे. त्याची जीभ छाटून देणा-या ५ लाखांचे बक्षिस देण्यात येईल' असे वर्ष्णेय म्हणाले. 
    देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून कन्हैया कुमार तिहार कारागृहात होता. गुरूवार, ३ मार्च रोजी त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. दरम्यान काल दिलेल्या भाषणादरम्यान त्याने ' माझा आदर्श नव्हे संसदेवर हल्ला करणारा अफझल गुरू नव्हे तर रोहित वेमुला आह' असे स्पष्ट केले होते. 
==================================

दिल्ली; ऑपरेशनदरम्यान फुप्फसात ब्लेड राहिल्याने २ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू


  • नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका दोन वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. ऑपरेशनदरम्यान फुफ्फुसांत सर्जिकल ब्लेड राहिल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी त्या चिमुरडीच्या पालकांनी डॉक्टरांविरोधात पोलिसांत दाखल केली आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, या दोन वर्षांच्या चिमुरडीच्या फुफ्फुसात पस झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतरही तिची प्रकृती सुधारली नाहीच. त्यामुळे तिची पुन्हा तपासणी करण्यात आली असता आधीचे ऑपरशन करताना तिच्या फुफ्फुसात सर्जिकल ब्लेड राहिले होते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आणि त्या मुलीची तब्येत आणखीनच बिघडली. त्यानंतर तिच्यावर दुस-यांदा शस्त्रक्रिया करून ते ब्लेड बाहेर काढण्यात आले, मात्र त्याचा काहीह उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस त्या चिमुरडीची प्रकृती आणखी खालावत गेली आणि अखेर तिचा मृत्यू झाला. 
    दिल्लीतील वजिराबाद भागात राहणा-या त्या मुलीच्या पालकांनी डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत त्यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली. ही तक्रार मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडेही पाठवण्यात आली असून, त्या तपासत डॉक्टर दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. 
==================================

गंगाजल; दुबळे कथानक अन् परफॉर्मन्सही 

  • सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या प्रकाश झा यांचे चित्रपट बहुधा बिहारची पार्श्वभूमी असणारे असतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी अजय देवगणसोबत गंगाजल चित्रपट बनविला होता. काही पोलीस अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांच्या डोळ्यांत अ‍ॅसिड टाकण्याचे दृश्य यात होते. प्रकाश झा यांनी अनेक वर्षांनंतर आता ‘जय गंगाजल’ बनविला आहे. अर्थात अजय देवगणच्या गंगाजलशी याचा काही संबंध नाही. साम्य एवढेच आहे की, दोन्ही चित्रपटांत पोलिसांशी संबंधित भ्रष्टाचार, अंतर्गत कटकारस्थाने आणि गुन्हेगारांशी हातमिळवणी हे दिसून येते. या चित्रपटातही एक प्रामाणिक पोलीस अधिकारी बेईमान पोलीस आणि नेते व गुन्हेगार यांच्याशी दोन हात करतो.
    हे कथानक पोलीस अधिकारी आभा कपूरचे (प्रियंका चोप्रा) आहे. तिची बदली बांदीपूर जिल्ह्यात होते. येथे पोलिसातील भ्रष्ट अधिकारी बी.एन. सिंह (प्रकाश झा), आमदार (मानव कौल) आणि छोटे आमदार (निनाद कामत) यांची प्रशासनावर पकड आहे. अर्थात ते मनमानीही करतात. कायदा तोडणाऱ्या या गटाशी आभा कपूर संघर्ष करते आणि कठीण परिस्थितीतही त्यांना आपली जागा दाखवून देते.
    उणिवा : प्रकाश झा यांनी या वेळेस कथानकात नवे असे काही केले नाही, जे की पहिल्या चित्रपटात पाहिले नाही. आपल्याच चित्रपटातील कथानकाचा काही भाग पुन्हा दाखविण्यात त्यांनी संकोच केलेला नाही. प्रामाणिक पोलीस अधिकारी, बेईमान गुन्हेगार आणि नेते यांच्याशी संबंधित चित्रपटात जे काही दाखविले जाते ते सर्व यात दाखविले आहे. तेही वास्तवतेपासून दूर फिल्मी शैलीत.
    प्रकाश झा यांनी नवीन काय केले असेल तर स्वत:ला अभिनेत्याच्या स्वरूपात पडद्यावर दाखविले आहे. विनासंकोच हे सांगितले जाऊ शकते की, ते अभिनयात फारसा प्रभाव पाडू शकलेले नाहीत. आगामी काळात हेच बरे राहील की त्यांनी स्वत:ला पडद्यापासून दूर ठेवावे. प्रियंका चोप्राच्या अभिनयातही सहजता किंवा नवेपणा वाटत नाही. असे वाटते की तिने मन लावून अभिनय केलेला नाही. प्रियंकाचे चाहते हा चित्रपट पाहून फारसे खूश होणार नाहीत. मानव कौल हे चांगले अभिनेते आहेत. पण, बहुतेक वेळा ओव्हर अ‍ॅक्टिंगचे शिकार होतात. निनाद यांचा अभिनय चांगला आहे. गीत-संगीताच्या बाबतीत चित्रपट सर्वसाधारणच आहे. एकूणच हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारसा प्रभाव पाडू शकणार नाही, असे दिसते. प्रियंका चोप्राचे चाहते कदाचित हा चित्रपट एकवेळेस पाहणे पसंत करतील.
==================================
विमान उतरत असतानाच टायर फुटून अपघात; १२८ जणांचे वाचले प्राण
  • मुंबई : १२0 प्रवासी, आठ क्रू मेंबर्स या सर्वांना घेऊन विमान उतरत असतानाच अचानक टायर फुटून झालेला अपघात आणि त्याचवेळी प्रसंगावधान राखून वैमानिकाने उतरविलेले विमान... ही घटना एखाद्या हिंदी चित्रपट किंवा हॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशीच आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत
    सुदैवाने मात्र कोणीही जखमी झालेले नाही.
    विमानतळावर जेट एअरवेजचे विमान उतरत असताना गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमान सुरक्षित उतरले. दुर्घटना टळल्याने १२० प्रवासी आणि ८ कर्मचाऱ्यांचे प्राण बचावले.
    जेट एअरवेजचे ‘९ डब्ल्यू ३५४’ विमान दिल्लीहून मुंबईला आले. यामध्ये एकूण १२८ प्रवासी प्रवास करत होते. मुंबई विमानतळावर हे विमान लँड करत असताना अचानक या विमानाचा टायर फुटला. यात विमानाचे गिअर अचानक तुटल्यानेच अपघात झाला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान व्यवस्थितरीत्या विमानतळावर उतरविले. त्यामुळे अपघात टळला आणि सगळ्यांचे प्राण वाचले. त्यानंतर दहा तासांच्या रिकव्हरी आॅपरेशननंतर बिघडलेले विमान जेट एअरवेजच्या हँगरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
    घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करून पर्यायी रनवेवर विमान उतरवण्यात येत होते. या घटनेचा विमानसेवेवर थेट परिणाम झाल्याने बराच वेळ विमानांना उड्डाणासाठी उशीर झाला तर काही विमाने अहमदाबादकडे वळवण्यात आली होती. दुपारनंतर विमानसेवा पूर्ववत झाली. 
==================================

कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित

  • लंडन : कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ही लस यशस्वी ठरल्यास कर्करोगांसाठी ही एक महान देणगी ठरणार आहे.
    या लसीचा प्रयोग कर्करोग झालेल्या एका महिलेवर करण्यात आला आहे. एखाद्या रुग्णाला लस दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोगाचा नायनाट करण्याचे या संशोधनामागे सूत्र आहे.
    या लसीत एक खास प्रकारचे प्रोटीन एन्झाईम असून तो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. या इंजेक्शनमुळे शरीरात अशा अ‍ॅन्टीबॉडिज बनतील की त्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतील. या अ‍ॅन्टीबॉडिज कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करतील, पण शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पेशी नष्ट करणार नाहीत. ही चाचणी यशस्वी होवो की न होवो, पण ती नक्कीच सुरक्षित असल्याचा आमचा विश्वास असून आम्हाला या चाचणीच्या निष्कर्षाची प्रतीक्षा आहे, असे एका शास्त्रज्ञाने सांगितले.
    या भयावह रोगावर अद्याप खात्रीशीर उपचार सापडलेले नाहीत, त्यामुळेच या लसीच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी सांगितले, हा सारा वृत्तांत ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
    या संशोधकांच्या पथकातील एक आघाडीचे संशोधन सर्गियो क्यू जादा म्हणाले की, आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांमध्ये ही उपचार पद्धती विशिष्ट पद्धतीची असून पहिल्यांदाच ती अवलंबिण्यात आली आहे. आमच्यासाठी हा एक अभूतपूर्व अनुभव असून तो यशस्वी ठरण्यास केवळ ट्यूमर नष्ट करणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीज तयार करण्यावर भर देऊ.
    हे संशोधन अजून प्राथमिक स्थितीत असून ते यशस्वी झाल्यास रुग्णांना कर्करोगापासून मुक्ती मिळणार आहे.
==================================
राज्यात गेल्या वर्षी सर्वाधिक (3228) शेतकरी आत्महत्या 
नवी दिल्ली - गेल्या वर्षभरात (2015) मरण कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये एकट्या महाराष्ट्रातल्या तब्बल 3228 शेतकऱ्यांचा समावेश असल्याची कबुली केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिली. गेल्या 14 वर्षांतील राज्यातील या सर्वाधिक आत्महत्या असल्याचे मोदी सरकारने म्हटले आहे. आत्महत्याग्रस्त विभागांत अमरावती (1179) व औरंगाबाद (1130) या दोन विभागांतील सर्वाधिक शेतकरी असल्याचेही कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने गतवर्षी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. आता केंद्रानेच ही संख्या त्याच्या तिपटीहून जास्त असल्याचे कबूल केले आहे. 

दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी या अस्मानी संकटांमुळे गतवर्षी देशातील किमान 10 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद सरकारदरबारी झाली आहे. त्याच्या जवळपास एकतृतीयांश शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. राज्यापुरते बोलायचे तर 2001 नंतर इतक्‍या प्रचंड संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचे 2015 हे पहिलेच वर्ष ठरले आहे. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर राधामोहन सिंह यांनी असेही कबूल केले की, आत्महत्याग्रस्त 3228 शेतकऱ्यांपैकी केवळ 1818 जणच प्रत्येकी एक लाख रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले. एकूण 1841 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची प्रकरणे भरपाईसाठी पात्र ठरली. त्यातही 1818 जणांच्याच कुटुंबीयांना प्रत्येकी लाखाची भरपाई मिळाली. उर्वरित 23 शेतकऱ्यांनी मरणाला जवळ करताना भरपाई मिळण्यासाठीही पात्र न ठरण्याइतकी कोणती त्रुटी ठेवली होती हे सांगण्याची तसदी कृषिमंत्र्यांनी घेतली नाही. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने पाठविलेल्या आकडेवारीनुसार 2015 या वर्षात 3228 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील 1841 प्रकरणे भरपाईच्या निकषांत बसली. 903 प्रकरणांत भरपाईसाठीच्या अटींची पूर्तता न झाल्याने ती फेटाळण्यात आली. 484 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत
==================================
माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू नका - राहुल गांधी
गुवाहाटी - लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात राहुल गांधींना लक्ष्य केल्यामुळे माझ्यावर व्यक्तिगत हल्ले चढवू नका, असे मत राहुल गांधी यांनी आज व्यक्त केले. मोदींनी आधी आपली आश्‍वासने पूर्ण करावीत; नाहीतर बिहारप्रमाणेच आसामची जनताही तुम्हाला घरी पाठवेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. मोदींनी माझावर हल्ला चढविला खरा; पण त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मात्र ते अद्यापही देत नाहीत, असा आरोप करत राहुल यांनी आज पुन्हा मोदींच्या खोट्या आश्‍वासनांवर हल्ला चढविला. मला त्यांच्याबद्दल आदर आहे, ते देशाचे पंतप्रधान आहेत; परंतु त्यांना मी चार प्रश्‍न विचारले होते, त्यांनी एकाही प्रश्‍नाचे उत्तर अद्याप दिलेले नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. 
==================================

No comments: