[अंतरराष्ट्रीय]
१- 'आयफोनसाठी आमचं डिझाईन चोरलं', 'मेजू'चा अॅपलवर गंभीर आरोप
२- बीजिंग; चीनमधील तरुण स्तंभलेखक झाला "बेपत्ता'
३- टोकियो; उत्तर कोरियाकडून आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप
५- बॉम्बच्या अफवेमुळे दोन विमानांचा दिल्लीत खोळंबा
६- सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जूनमध्ये
७- सरदारजींवरील ‘जोक्स’; ५ एप्रिलला सुनावणी
८- विदेशात असलात तरी वापरता येणार घरचा लँडलाइन फोन
९- 40 गिगावॅट 'रुफटॉप सौरऊर्जा' निर्मिती अशक्य
१०- पठाणकोट; पठाणकोट: लष्करी गणवेशातील महिलेला अटक
११- उमर खलिद,भट्टाचार्यला राष्ट्रद्रोहप्रकरणी जामीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- अर्थसंकल्प : काय महाग, काय स्वस्त
१३- राज्याच्या बजेटमध्ये योजनांचा पाऊस
१४- मुनगंटीवारांचं बजेट बळीराजाला समर्पित; कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद
१५- खास शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
१६- राज्यातील मुस्लिम हिंदूपेक्षा अधिक साक्षर
१७- 'शक्तिमान'वरील हल्ल्याने विराट कोहली संतापला
१८- साडेतीन लाख कोटींचे कर्ज; राज्यावरील कर्जाचा डोंगर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- गडचिरोलीत आरटीओ अधिकाऱ्याची दिरंगाई, जमावाचा चोप
२०- कोल्हापूर; अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात
२१- कोच्ची; हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण
२२- तीर्थपुरी; मोलमजुरी करत स्पर्धा परीक्षेत यश
२३- चंदिगढ; पंजाब-हरियानामधील पाणीवाटप प्रश्न पेटला
२४- देहरादून; गणेश जोशीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- कोलकाता; भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ईडन गार्डनवर तोडफोड
२६- मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पुतळा
२७- चार महिन्यांच्या तगड्या ट्रेनिंगनंतर 'बाहुबली'ची एण्ट्री
२८- आता तुमचा मेसेज बोल्ड आणि इटॅलिक करा, व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स
२९- अक्षय कुमार आणि रजनीकांतमध्ये होणार फुटबॉल सामना
३०- प्रसिद्ध नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे निधन
३१- क्रिकेट: बलाढ्य ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडचा दणका
३२- दुखापतीमुळे मलिंगा 'वर्ल्ड कप'मधून बाहेर
३३- मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा
३४- महावितरणची 'मार्चएंड'ची वसुली मोहीम धूम-धड्याक्यात
नांदेड मधील महावितरणने वसुली मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत अनेकांचे विजकनेक्शन कापण्यात आले. मार्चएंडचे गोंडस नाव देवून जबरी स्वरुपात हि मोहीम सुरु आहे. ज्यांच्या कडून पैशाची वसुली होवू शकते अशाच ठिकाणी जावून कुठलेही कारण न ऐकता वीज कनेक्शन तोडले जात आहे. ह्या मोहिमेत काही ठिकाणी नियमानुसार ज्यांचे कनेक्शन तोडता येवू शकत नाही अशांचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. वीज कनेक्शन जोडायचे असल्यास थकबाकी नसेल तरीही चालू बाकी भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे अवैद्य पद्धतीने वीज वापरणार्याचे प्रमाण वाढत असतांना त्याविरुद्ध कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही. आकडे बहाद्दरांना हात लावण्याची हिम्मत होत नाही. यामागचे गौडबंगाल काय आहे याचीच चर्चा दिवसभर शहरात चालू होती. प्रामाणिक ग्राहकांना त्रास व चोरांना सुविधा अशा पद्धतीने महावितारानांचा कारभार चालू आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे
(रितेश कोल्हे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================

कोलकात्यात सध्या सगळे रस्ते जणू ईडन गार्डन्स स्टेडियमकडेच जात आहेत, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण याच स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तिकिटांची मागणी आभाळाला भिडली आहे, तसंच तिकिटं मिळत नसल्याने चाहत्यांमधली नाराजीही वाढली आहे.
‘याचि देहि याचि डोळा’ या लढतीचे साक्षीदार होता येणार नसल्यानं नाराज चाहत्यांनी आज ईडन गार्डन्स बाहेर आंदोलनच सुरु केलं. खरं तर विश्वचषकाच्या सामन्याची तिकिटं लॉटरी पद्धतीनं विकली जात आहेत. त्यासाठी आधीच नोंदणी करणं गरजेचं होतं.
धरमशालाहून कोलकात्याला सामना हलवण्यात आल्यावर, नोंदणीसाठी 48 तासांचा अवधी देण्यात आला होता. तर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी संलग्न 121 क्लब्जनाही काही तिकिटं देण्यात आली होती. पण क्लब्जच्या अनेक सदस्यांनाही तिकिटं पुरलेली नाहीत. काळ्या बाजारात अवघ्या 500 रुपयांच्या तिकिटासाठी चाहते वीस हजारही देण्यास तयार असल्याचं बोललं जातं.
66 हजार क्षमतेचं ईडन गार्डन्स जगातलं दुसरं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. पण भारत पाकिस्तान सामन्यासाठी तिकिटांची मागणी पाहता अशी कित्येक ईडन गार्डन्स भरता येतील असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

देसाईगंजमध्ये दर महिन्याला आरटीओ शिबिराचं आयोजित केलं जातं. कोरची, कुरखेडा, देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातील नागरिक आपापली कामं घेऊन येतात. मात्र या शिबीराला निरीक्षक प्रशांत इंगवले उशिरा आले. इतकंच नाही तर आल्यानंतर त्यांनी कामात टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संतप्त जमावानं प्रशांत इंगवलेंना चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या राड्यामुळे देसाईगंज शहरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पण पोलिसांनी मध्यस्थी करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

मोलमजुरी करत स्पर्धा परीक्षेत यश
तीर्थपुरी : मुरमा (ता.घनसावंगी) येथील पंढरीनाथ मगनराव यादव या शेतमजुराच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेची तयारी केली. शिकवणी, क्लास न लावता स्वअध्ययनाच्या बळावर पंढरीनाथ आता राज्य लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर निरीक्षकपदाच्या परीक्षेत यशस्वी झाला आहे.
मगनराव यादव यांच्या कुटुंबात अठराविश्व दारिद्य्र असल्याने या कुटुंबातील प्रत्येकाला मजुरी केल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. मगनराव यांना दोन एकर जमीन असून, संपूर्ण आयुष्य इतर ठिकाणी मजुरी करण्यात घातले. मगनराव यादव यांना एकूण तीन मुले आहेत. दोघे ऊसतोडणी करत असून, सर्वांत लहान असलेल्या पंढरीनाथला पूर्वीपासून शिक्षणाची आवड होती. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घरच्या शेळ्या चारत तीर्थपुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले. दहावी पास होऊनही पैसे नसल्याने अकरावीला प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथील एका कृषी सेवा केंद्रात काम करून त्यानंतरच्या काळात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करून पदवीपर्यंतचे शिक्षण तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थिती गरिबीची व कुटुंबात शिक्षणाचा अंधार असल्याने स्वत:चा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागत होता.
===========================================
प्रसिद्ध नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे निधन

मुंबई- नृत्य हा श्वास मानून अनेक वर्षे ज्यांनी नृत्यसाधना केली, अनेक कलावंतांना घडवले अशा प्रतिथयश नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे शुक्रवारी (ता. 18) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.
अंधेरी येथील घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कथ्थक नृत्यांगना व अभिनेत्री मुलगी अर्चना जोगळेकर, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
पन्नासहून अधिक वर्षे "अर्चना नृत्यालय‘ ही कथ्थक अकादमी अंधेरी येथे त्या चालवत होत्या. 15 ऑगस्ट 1963 रोजी चंद्रपूरमध्ये अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर दादर, अंधेरी येथे त्याच्या शाखा काढल्या. 2003मध्ये नृत्यालयाची शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे सुरू झाली. त्याचे काम अर्चना जोगळेकर पाहतात.
मराठी चित्रपटसृष्टीत नामवंत कलाकार असलेल्या ऊर्मिला कानेटकर, रेशम टिपणीस, नेहा पेंडसे, मयूर वैद्य, फुलवा खामकर आदींनी त्यांच्याकडेच नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

40 गिगावॅट 'रुफटॉप सौरऊर्जा' निर्मिती अशक्य

नवी दिल्ली: भारताला येत्या 2022 पर्यंत 40 गिगावॅट ‘रुफटॉप सौरऊर्जा‘ निर्मितीचे लक्ष्य साध्य करावयाचे असल्यास सध्याच्या धोरणपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समुहाच्या अहवालानुसार समोर आली आहे.
भारताचे येत्या 2022 पर्यंत एकुण 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 40 गिगावॅट सौरऊर्जा ही रुफटॉप असेल तर उर्वरित सौरऊर्जेचा वापर जमिनीवरील प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. परंतु सध्या देशाची रुफटॉप सौरऊर्जा क्षमता सुमारे 0.525 गिगावॅट आहे. वर्तमान परिस्थितीतील धोरणांच्या साह्याने काम सुरु राहिल्यास 2022 पर्यंत केवळ 13.5 गिगावॅट सौरऊर्जेची निर्मिती शक्य आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
‘सोलार रुफटॉप पॉलिसी कोअॅलिशन‘ अंतर्गत ब्रिटनचा आंतरराष्ट्रीय विकास विभाग, क्लायमेट ग्रुप, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाऊंडेशन आणि नंद अँड जीत खेमका फाऊंडेशनच्या ‘स्केलिंग अप प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन रुफटॉप सोलार‘ अहवालानुसार, भारतासाठी 2022 पर्यंत 40 गिगावॅट रुफटॉप सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे अशक्यप्राय आहे

क्रिकेट: बलाढ्य ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडचा दणका
धरमशाला : एकही ‘स्टार‘ खेळाडू नसलेल्या न्यूझीलंडच्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ‘बलवान‘ संघांना पराभवाचा धक्का देण्याची मालिका आज (शुक्रवार) सुरुच ठेवली. ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडने आज बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी मात करत सलग दुसरा विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 गडी गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियास 20 षटकांमध्ये 134 धावांमध्येच रोखले.
न्यूझीलंडच्या 143 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरवात केली होती. शेन वॉटसन आणि उस्मान ख्वाजा या सलामीवीरांनी पहिल्या पाच षटकांतच 44 धावा चोपल्या. त्यानंतरही शांत चित्ताने आणि नियोजनबद्ध गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने सामना फिरवला. सहाव्या षटकात शेन वॉटसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडने नियमित अंतराने ऑस्ट्रेलियास धक्के दिले. अचूक गोलंदाजीला न्यूझीलंडच्या चपळ क्षेत्ररक्षणाचीही भक्कम साथ मिळाली. आवश्यक धावगती वाढत असल्याचे दडपण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आले. ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला.
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान भारतीय संघालाही पराभवाचा दणका दिला होता. आता सलग दोन विजयांसह न्यूझीलंडने गटातील अव्वल स्थान पटकाविले आहे.
तत्पूर्वी, सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि केन विल्यमसन यांची भक्कम सुरवात आणि अखेरीस ग्रॅंट एलियटने केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने 142 धावांपर्यंत मजल मारली.

दुखापतीमुळे मलिंगा 'वर्ल्ड कप'मधून बाहेर

मुंबई : गेल्या काही महिन्यांत अडखळत खेळणाऱ्या आणि विश्वकरंडक जेतेपद राखण्यासाठी झगडणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आज (शुक्रवार) आणखी एक धक्का बसला. हुकमी गोलंदाज लसिथ मलिंगाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. पायाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने जाहीर केले.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून मलिंगा दुखापतीमुळे त्रस्त आहे. गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने पुनरागमन केले होते. या सामन्यात त्याने 26 धावा देत चार गडी बाद केले होते. मात्र, याच सामन्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. पुरेशी तंदुरुस्ती नसल्यामुळे श्रीलंकेच्या संघाबरोबर तो भारतामध्ये दाखल झाला नव्हता. तंदुरुस्तीच्या चाचण्या झाल्यानंतर तो नंतर भारतात दाखल झाला. श्रीलंकेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्येही मलिंगा संघाबाहेरच होता. अखेर या दुखापतीतून लवकर सावरणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मलिंगाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मलिंगाच्या जागी बदली खेळाडूची निवड अद्याप झालेली नाही.
मलिंगाच्या नेतृत्वाखालीच श्रीलंकेने 2014 मध्ये ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. या स्पर्धेसाठीही कर्णधारपदी त्याचीच निवड झाली होती. पण दुखापतींमुळे मलिंगाने कर्णधारपद सोडले. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजकडे नेतृत्व सोपविण्यात आले.

पठाणकोट: लष्करी गणवेशातील महिलेला अटक
पठाणकोट (पंजाब)- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांसारखा गणवेशात असलेल्या एका महिलेला कॅन्टोमेंट भागातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
मामुन कॅन्टोमेंट भागामध्ये ‘सीआरपीएफ‘ दलाच्या जवानांसारखा गणवेश परिधान केलेली महिला आढळली. तिला अटक करण्यात आली असून, तिचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक आर. के. बक्षी म्हणाले, ‘संबंधित महिला 40 वर्षांची असून, येथील रहिवासी आहे. महिलेचे मानसिक संतुलन बिघडलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.‘ दरम्यान, पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर 2 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान हुतात्मा झाले होते.

उमर खलिद,भट्टाचार्यला राष्ट्रद्रोहप्रकरणी जामीन
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयु) गेल्या 9 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये देशद्रोही घोषणा देण्यात आल्यामुळे देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्याप्रकरणी उमर खलिद व अनिर्बन भट्टाचार्य या दोन विद्यार्थ्यांना येथील सत्र न्यायालय्याने आज (शुक्रवार) सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
पतियाळा हाऊस न्यायालयामधील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रीतेश सिंह यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. यासंदर्भातील औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, खलिद व भट्टाचार्य यांची तिहार न्यायालयामधून आज संध्याकाळपर्यंत सुटका करण्यात येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणातील सहआरोपी असलेल्या कन्हैय्या कुमार याला नुकत्याच मिळालेल्या जामीनाच्या धर्तीवर आपणांसही जामीन मिळावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. जेएनयुमधील कार्यक्रमादरम्यान कोणत्याही स्वरुपाच्या राष्ट्रद्रोही घोषणा दिलेल्या नसून या प्रकरणासंदर्भातील सर्व चित्रीकरण खोटे असल्याचा दावा दोघांनी केला होता.
===========================================
पंजाब-हरियानामधील पाणीवाटप प्रश्न पेटला
चंडीगड - सतलज व यमुना या नद्या जोडणाऱ्या कालव्याच्या बांधकामाविरोधात पंजाब राज्यामधील विधानसभेमध्ये आज (शुक्रवार) एकमताने ठराव संमत करण्यात आला. हरियानाबरोबर पाणीवाटप करणे शक्य नसल्याची भूमिका पंजाबने घेतली आहे; तर संतप्त हरियाना राज्याने पंजाबने सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याची टीका केली आहे. याचबरोबर, या प्रकरणी केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचे हरियानाकडून जाहीर करण्यात आले आहे.
सतलज-यमुना कालव्याच्या निर्मितीसाठी घेतलेल्या जमिनीसंदर्भात राजकारण न करण्याची तंबी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नुकतीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने संमत केलेला हा ठराव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी यासंदर्भातील ठराव मांडला होता. पंजाबमध्ये पाण्याची समस्या असून इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी राज्याकडे पाण्याचा एक थेंबही नसल्याचे बादल म्हणाले.
""तेव्हा या पार्श्वभूमीवर, हा कालवा बांधण्याची आवश्यकता याआधी कधी नव्हती आणि आताही ती नाही,‘‘ असे बादल यांनी सांगितले. बादल यांच्या या ठरावास इतर सर्व पक्षीय नेत्यांनी अनुमोदन दिले.
===========================================
गणेश जोशीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
डेहराडून (उत्तराखंड) - उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात डेहराडूनमध्ये आंदोलन करताना शक्तिमान नावाच्या घोड्याला मारहाण करणारे भाजपचे आमदार गणेश जोशी यांना आज (शुक्रवार) अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
जोशी यांना आज सकाळी अटक करण्यात आले. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री रावत यांनी जोशी यांच्या अटकेमागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले आहे.
आंदोलन करताना घोड्याला मारहाण करण्याच्या प्रकारावर जोशी यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत होती. या घटनेनंतर जोशी यांनी आपल्या या कृत्याचे समर्थन करताना सांगितले, की पोलिस आंदोलकांना निर्दयीपणे मारत होते. त्यानंतर आम्ही पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी घोड्यांचा वापर केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. यात चुकीचे काहीही झाले नाही. घोड्याला संपूर्ण दिवस पाणी व जेवण न दिल्याने तो खाली कोसळल्याचे जोशी म्हणाले. तसेच आपण जर दोषी ठरलो तर कोणत्याही शिक्षेला तयार असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी देहरादून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर पंतनगरमधील सहा आणि चार जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घोड्यावर उपचार केले. गुरुवारी रात्री मारहाणीमुळे घोड्याचा दुखावलेला पाय कापण्यात आला.
===========================================
चीनमधील तरुण स्तंभलेखक झाला "बेपत्ता'
बीजिंग - चीनमधील जिया जिया हा स्तंभलेखक (वय 30) हॉंगकॉंग येथे जात असताना अचानकपणे "बेपत्ता‘ झाल्याचे वृत्त आज (शुक्रवार) सूत्रांनी दिले. जिया हा मंगळवार रात्रीपासून बेपत्ता असून त्याच्या पत्नीने यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे एक निनावी पत्र प्रसिद्ध करण्यासंदर्भात जिया याने त्याच्या एका संपादक मित्रास नुकताच इशारा दिला होता. शी यांना उल्लेखून लिहिण्यात आलेल्या या पत्रामध्ये "अधिकाधिक सत्ता हस्तगत करण्याबरोबरच वैयक्तिक समर्थक निर्माण करण्याचा प्रयत्न‘ शी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
चिनी सरकारशी संबंधित असलेल्या एका संकेतस्थळावर हे पत्र प्रसिद्ध झाले होते. मात्र प्रसिद्ध झाल्यानंतर तत्परतेने हे पत्र हटविण्यात आले होते. ही मागणी "कम्युनिस्ट पक्षाच्या एकनिष्ठ पाठीराख्यांनी‘ केल्याचे पत्रात म्हटले होते. जिया याने आपला या पत्राशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. जिया हा चीनमधील सामाजिक-राजकीय विषयांवर स्तंभलेखन करणारा पत्रकार आहे.

उत्तर कोरियाकडून आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी
टोकियो : निर्बंध लादण्यात आल्यानंतर उत्तर कोरियाने कसलीही नरमाई न दाखवता पुन्हा एकदा पूर्वेकडील किनारपट्टीजवळ शुक्रवारी मध्यम पल्ल्याच्या स्वानातित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेतली.
अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, उत्तर कोरियाने या निर्बंधांना न जुमानता क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे कोरियन समुद्रकिनाऱ्यावर संयुक्त लष्करी सराव करणाऱ्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला ही एक प्रकारची चिथावणीच मानली जात आहे.
चाचणी घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने 800 किलोमीटर लांबपर्यंत जाऊन पूर्व किनाऱ्यावरील समुद्रामधील लक्ष्य गाठले. हे मध्यम पल्ल्याचे रोदोंग क्षेपणास्त्र असल्याचे दक्षिण कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तसे असल्यास जपानमध्ये हल्ला करण्याची क्षमता असणारे उत्तर कोरियाचे 2014 पासूनचे हे दुसरे क्षेपणास्त्र ठरेल.
===========================================

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल‘ कार्यक्रमामुळे घराघरात पोचलेला लोकप्रिय अभिनेता कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसॉद मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे.
जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत स्थान मिळविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा या म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. त्यांचे मोजमाप घेण्यासाठी म्युझियमचे कलाकार नुकतेच भारतात आले होते. त्याच वेळी त्यांनी कपिलचेही मोजमाप घेतल्याची माहिती मनोरंजनविषयक वृत्त देणाऱ्या वेबपोर्टलवर दिली आहे. मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिअट या हॉटेलमध्ये कलाकारांनी कपिलची भेट घेतली.
या म्युझियममध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या रॉय बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, हृतिक रोशन आणि माधुरी दीक्षित या तारकांचा समावेश आहे. आता त्यामध्ये कपिलच्या पुतळ्याची भर पडणार आहे. कपिलने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले.
===========================================
===========================================
===========================================
१- 'आयफोनसाठी आमचं डिझाईन चोरलं', 'मेजू'चा अॅपलवर गंभीर आरोप
२- बीजिंग; चीनमधील तरुण स्तंभलेखक झाला "बेपत्ता'
३- टोकियो; उत्तर कोरियाकडून आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप
५- बॉम्बच्या अफवेमुळे दोन विमानांचा दिल्लीत खोळंबा
६- सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जूनमध्ये
७- सरदारजींवरील ‘जोक्स’; ५ एप्रिलला सुनावणी
८- विदेशात असलात तरी वापरता येणार घरचा लँडलाइन फोन
९- 40 गिगावॅट 'रुफटॉप सौरऊर्जा' निर्मिती अशक्य
१०- पठाणकोट; पठाणकोट: लष्करी गणवेशातील महिलेला अटक
११- उमर खलिद,भट्टाचार्यला राष्ट्रद्रोहप्रकरणी जामीन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- अर्थसंकल्प : काय महाग, काय स्वस्त
१३- राज्याच्या बजेटमध्ये योजनांचा पाऊस
१४- मुनगंटीवारांचं बजेट बळीराजाला समर्पित; कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद
१५- खास शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
१६- राज्यातील मुस्लिम हिंदूपेक्षा अधिक साक्षर
१७- 'शक्तिमान'वरील हल्ल्याने विराट कोहली संतापला
१८- साडेतीन लाख कोटींचे कर्ज; राज्यावरील कर्जाचा डोंगर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- गडचिरोलीत आरटीओ अधिकाऱ्याची दिरंगाई, जमावाचा चोप
२०- कोल्हापूर; अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात
२१- कोच्ची; हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण
२२- तीर्थपुरी; मोलमजुरी करत स्पर्धा परीक्षेत यश
२३- चंदिगढ; पंजाब-हरियानामधील पाणीवाटप प्रश्न पेटला
२४- देहरादून; गणेश जोशीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- कोलकाता; भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ईडन गार्डनवर तोडफोड
२६- मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पुतळा
२७- चार महिन्यांच्या तगड्या ट्रेनिंगनंतर 'बाहुबली'ची एण्ट्री
२८- आता तुमचा मेसेज बोल्ड आणि इटॅलिक करा, व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स
२९- अक्षय कुमार आणि रजनीकांतमध्ये होणार फुटबॉल सामना
३०- प्रसिद्ध नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे निधन
३१- क्रिकेट: बलाढ्य ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडचा दणका
३२- दुखापतीमुळे मलिंगा 'वर्ल्ड कप'मधून बाहेर
३३- मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा
३४- महावितरणची 'मार्चएंड'ची वसुली मोहीम धूम-धड्याक्यात
नांदेड मधील महावितरणने वसुली मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत अनेकांचे विजकनेक्शन कापण्यात आले. मार्चएंडचे गोंडस नाव देवून जबरी स्वरुपात हि मोहीम सुरु आहे. ज्यांच्या कडून पैशाची वसुली होवू शकते अशाच ठिकाणी जावून कुठलेही कारण न ऐकता वीज कनेक्शन तोडले जात आहे. ह्या मोहिमेत काही ठिकाणी नियमानुसार ज्यांचे कनेक्शन तोडता येवू शकत नाही अशांचेही वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. वीज कनेक्शन जोडायचे असल्यास थकबाकी नसेल तरीही चालू बाकी भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एकीकडे अवैद्य पद्धतीने वीज वापरणार्याचे प्रमाण वाढत असतांना त्याविरुद्ध कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही. आकडे बहाद्दरांना हात लावण्याची हिम्मत होत नाही. यामागचे गौडबंगाल काय आहे याचीच चर्चा दिवसभर शहरात चालू होती. प्रामाणिक ग्राहकांना त्रास व चोरांना सुविधा अशा पद्धतीने महावितारानांचा कारभार चालू आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे
(रितेश कोल्हे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
===========================================
'आयफोनसाठी आमचं डिझाईन चोरलं', 'मेजू'चा अॅपलवर गंभीर आरोप
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी अॅपल आपल्या स्मार्टफोनमुळं कायमच चर्चेत असतं. मात्र, यंदाची चर्चा मात्र बराच वाद निर्माण करु शकते असं दिसून येत आहे.
चीनी स्मार्टफोन कंपनी मेजूनं अॅपलवर आरोप केला आहे की, अॅपलनं आयफोन 7चं डिझाईन मेजूचा येणारा नवा स्मार्टफोन प्रो6शी फारच मिळताजुळता आहे. gizmochina वेबसाइटनुसार, मैजूचे उपाध्यक्ष ली नेननं दावा केला आहे की, अॅपल आयफोन 7चं डिझाइन मेजूच्या नव्या स्मार्टफोनप्रमाणे आहे.
नुकतंच वीबोवर मेजू प्रो 6चे काही फोटो पोस्ट करण्यात आले होते. ज्यामध्ये फोनचं डिझाइन दाखविण्यात आलं होतं. कंपनीचे उपाध्यक्ष ली नेनच्या मते, ‘फॅक्टरीतील एका स्टाफच्या चुकीमुळे या स्मार्टफोनची इमेज लीक झाली. आम्ही या स्मार्टफोनच्या लूकबाबत मागील अनेक दिवसांपासून काम करीत आहोत आणि हा स्मार्टफोन आयफोन 7 पेक्षाही भारी असले.’
‘या स्मार्टफोनचं डिझाइन आणि लूक आयफोननं चोरलं’ असा आरोप नेन यांनी केला आहे. आता कंपनीनं दावा केला आहे. आयफोन7 हा मेजू प्रो 6 प्रमाणे दिसणारा असेल. आयफोन 7 प्रो हा या मार्च महिन्यात नव्हे तर सप्टेंबर महिन्यात लाँच होणार आहे. कंपनी 21 मार्चला 4 इंच बजेट आयफोनSe लाँच करणार आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ईडन गार्डनवर तोडफोड
कोलकाता : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यापूर्वीच कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर तोडफोड झाली आहे. भारत-पाक सामन्याची तिकिटं उपलब्ध नसल्यामुळे चाहत्यांनी ईडन गार्डनच्या मैदानावरील तिकीटबारीवर मारामारी केली. या घटनेनंतर ईडन गार्डनवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कोलकात्यात सध्या सगळे रस्ते जणू ईडन गार्डन्स स्टेडियमकडेच जात आहेत, असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण याच स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्याच्या तिकिटांची मागणी आभाळाला भिडली आहे, तसंच तिकिटं मिळत नसल्याने चाहत्यांमधली नाराजीही वाढली आहे.
‘याचि देहि याचि डोळा’ या लढतीचे साक्षीदार होता येणार नसल्यानं नाराज चाहत्यांनी आज ईडन गार्डन्स बाहेर आंदोलनच सुरु केलं. खरं तर विश्वचषकाच्या सामन्याची तिकिटं लॉटरी पद्धतीनं विकली जात आहेत. त्यासाठी आधीच नोंदणी करणं गरजेचं होतं.
धरमशालाहून कोलकात्याला सामना हलवण्यात आल्यावर, नोंदणीसाठी 48 तासांचा अवधी देण्यात आला होता. तर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालशी संलग्न 121 क्लब्जनाही काही तिकिटं देण्यात आली होती. पण क्लब्जच्या अनेक सदस्यांनाही तिकिटं पुरलेली नाहीत. काळ्या बाजारात अवघ्या 500 रुपयांच्या तिकिटासाठी चाहते वीस हजारही देण्यास तयार असल्याचं बोललं जातं.
66 हजार क्षमतेचं ईडन गार्डन्स जगातलं दुसरं सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. पण भारत पाकिस्तान सामन्यासाठी तिकिटांची मागणी पाहता अशी कित्येक ईडन गार्डन्स भरता येतील असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
मुनगंटीवारांचं बजेट बळीराजाला समर्पित
मुंबई : यंदाचा अर्थसंकल्प हा बळीराजाला समर्पित असेल, असं म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचा 2016-17 चा अर्थसंकल्प सादर केला.
शेतकऱ्यांसाठी यंदा 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली. केंद्राच्या अर्थसंकल्पाप्रमाणे राज्याच्या अर्थसंकल्पावरही जेटलींची छाप दिसून आली. राज्य सरकारनेही पायभूत सुविधांना प्राधान्य दिलं आहे. मात्र त्याचवेळी विविध योजनांचा पाऊसही मुनगंटीवार यांनी पाडला आहे.
दुसरीकडे मुंबईतील बहुचर्चित मेट्रो 3 प्रकल्पासाठी यंदा केवळ 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी तब्बल 180 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्प : काय महाग, काय स्वस्त
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी सपत्नीक सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यंदाचा अर्थसंकल्प हा बळीराजाला समर्पित आहे, असं मुनगंटीवार म्हणाले.
काय महाग, काय स्वस्त?
स्वस्त : एलईडी बल्ब, शैक्षणिक साहित्य, बॅटरी किंवा सौर उर्जेवर चालणारी वाहने, जुनी वाहने, सरकी आणि सरकी तेल, शेतीच्या काटेरी कुंपण आणि जाळी, इंजेक्शन, ब्रेस्ट कॅन्सर टेस्टसाठी वापरण्यात येणारी मॅमोग्राफी, बांबूपासून बनवलेलं फर्निचर, बेदाणे, मनुका
महाग : चहा, खोबरेल तेल, लॉटरी, 100 सीसी वरील वाहने, मार्बल आणि ग्रेनाईट, पेट्रोल, डिझेल, हिरे, सोने, दारु,
राज्याच्या बजेटमध्ये योजनांचा पाऊस
खास शिवजयंतीसाठी मनसेचा नवा झेंडा
मुंबई : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खास शिवजयंतीसाठी नवा झेंडा आणला आहे. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असून त्याखाली पक्षाचं नाव आहे.
भगव्या रंगाचा या झेंड्यावर अष्टकोनी आकारातील ‘प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषामुद्रा भद्रायराजते’ ही राजमुद्रा आहे. येत्या 26 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात येईल.
खरंतर शिवसेना तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीसाठी आग्रही असते. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करते. परंतु आता मनसेने खास शिवजयंतीला नवा झेंडा आणून शिवसेना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.
गडचिरोलीत आरटीओ अधिकाऱ्याची दिरंगाई, जमावाचा चोप
गडचिरोली : अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळे वैतागलेल्या लोकांनी थेट आरटीओ निरीक्षकाला मारहाण केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजमध्ये हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.
देसाईगंजमध्ये दर महिन्याला आरटीओ शिबिराचं आयोजित केलं जातं. कोरची, कुरखेडा, देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातील नागरिक आपापली कामं घेऊन येतात. मात्र या शिबीराला निरीक्षक प्रशांत इंगवले उशिरा आले. इतकंच नाही तर आल्यानंतर त्यांनी कामात टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
संतप्त जमावानं प्रशांत इंगवलेंना चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या राड्यामुळे देसाईगंज शहरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. पण पोलिसांनी मध्यस्थी करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
राज्यातील मुस्लिम हिंदूपेक्षा अधिक साक्षर
(प्रातिनिधिक फोटो)
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षणाच्या बाबतीत हिंदूपेक्षा मुस्लिम समाज अधिक जागरुक झाला आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातच ही बाब समोर आली आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 11.5 टक्के असलेल्या मुस्लिम समाजात 83.6 टक्के साक्षरता आहे. तर 79.8 टक्के हिंदू लोकसंख्येमध्ये साक्षरतेचं प्रमाण 81.8 टक्के आहे.
असं असलं तरी देशातील मुस्लिमांमधील साक्षरतेची सरासरी लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील मुस्लिम शिक्षणाच्या बाबतीत प्रगत आहेत.
दुसरीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण जैन समाजात असल्याचं सिद्ध झालं आहे. जैन समाजाता 95.3 टक्के नागरिक साक्षर आहेत.
राज्याचा 2015-16 चा आर्थिक पाहणी अहवाल काल विधीमंडळात सादर करण्यात आला.
2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत राज्याची लोकसंख्या 9.3 टक्के आहे. लोकसंख्येत उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो.
'शक्तिमान'वरील हल्ल्याने विराट कोहली संतापला
मुंबई : उत्तराखंडमध्ये सरकारविरोधी आंदोलनात शक्तिमान या पोलिसांच्या घोड्याला झालेल्या दुखपतीनंतर त्याचा पाय कापावा लागला. यावर टीम इंडियाचा स्टार क्रिकेट विराट कोहली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.
“शक्तिमानवरील हल्ल्यामुळे धक्का बसला आणि चीड आली. या सुंदर आणि मुक्या प्राण्यावर हल्ला म्हणजे निव्वळ भ्याडपणा आहे,” असं ट्वीट विराट कोहलीने केलं आहे.
“शक्तिमानच्या या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांवर लवकरच कारवाई होईल, अशी आशा आहे. शक्तिमान लवकर बरा व्हावा यासाठी आपण सगळे प्रार्थना करुया,” असंही विराटने म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात मसुरीचे भाजप आमदार गणेश दोशी यांना अटक करण्यात आली आहे
मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये पुतळा
मुंबई : छोट्या पदड्यावरील हुकुमी एक्का म्हणजेच कॉमेडियन कपिल शर्माने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ स्टॅण्डअप कॉमेडियन कपिल शर्माही जगप्रसिद्ध मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये दिसणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, प्रतिष्ठित मादाम तुसाँ संग्रहालयात कपिल शर्माच्या मेणाच्या पुतळ्याची वर्णी लागणार आहे. ज्या पथकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मोजमाप घेतलं त्याच पथकाने कपिलचे फोटो आणि मोजमाप घेतलं.
चार महिन्यांच्या तगड्या ट्रेनिंगनंतर 'बाहुबली'ची एण्ट्री
मुंबई : अभिनेता प्रभासचा ‘बाहुबली 2’ या सिनेमाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता सिनेमाच्या प्रदर्शनाकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. 14 एप्रिल 2017 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. खंड पडलेल्या या सिनेमाच्या शुटिंगने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
अभिनेता प्रभासने 4 महिन्यांच्या खास प्रशिक्षणानंतर पुन्हा एकदा ‘बाहुबली’च्या शुटिंगला सुरुवात केली आहे.
6 फूट 2 इंच उंचीचा प्रभास ‘बाहुबली’साठी प्रचंड मेहनत घेत आहे. खांद्यावर एक भलंमोठं शिवलिंग घेऊन जाणारा ‘बाहुबली’मधील हा सीन बॉलिवूडमधील एक उत्तम सीन म्हणून गणला गेला आहे.
या सीनसाठी प्रभासने तगडा व्यायाम आणि डाएट केला होता. सकाळी 20 अंडी खाण्यापासून ते जिमपर्यंत प्रभासने खूप मेहनत घेतली होती. आता पुन्हा प्रभासने शुटिंगला सुरुवात केल्याने बाहुबली टीम प्रचंड खूश आहे.
प्रभास हा सेटवरील आदर्श कलाकार म्हणून ओळखला जातो. ज्या ज्या डायरेक्टर्ससोबत प्रभासने काम केलं आहे, त्यांनी प्रभासला ‘डायरेक्टर्स बॉय’ संबोधलं.
दिग्दर्शक राजमौली जे सांगतील ते प्रभास उत्साहाने करतो. सीनच्या गरजेनुसार शरिराची ठेवण, व्यायाम, ट्रेनिंग सर्वकाही तो आवडीने करतो.
प्रभासने शरीरयष्टी कमावण्यासाठी परदेश न गाठता, देशातच राहून त्याने मेहनत घेतली.
‘बाहुबली 2’ मध्ये प्रभासचे खास तीन सीन आहेत, मात्र हे कोणते सीन आहेत याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
आता तुमचा मेसेज बोल्ड आणि इटॅलिक करा, व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स
मुंबई : व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग अॅपच्या अँड्राईड व्हर्जनमध्ये आता आणखी काही नवे फीचर्स अॅड करण्यात आले आहेत. त्यानुसार तुम्ही पोस्ट करत असलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमधील मजकूर बोल्ड आणि इटॅलिक करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
गूगल प्ले मध्ये व्हॉट्सअॅपचं नवं व्हर्जन 2.12.535 उपलब्ध आहे.
आपल्या मेसेजमधील जो भाग महत्वाचा असेल त्याला आपल्या सोईप्रमाणे बोल्ड किंवा इटॅलिक करता येणार आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर फक्त एकाच फॉन्ट आणि फॉन्टसाईजमध्ये पाठवण्याची सुविधा होती. काही दिवसांपूर्वी लिंक हायलाईटची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली होती. लिंक पॉपअप हायलाईटनंतर पीडीएफ किंवा वर्ड्स यासारखे डॉक्युमेंट्स शेअर करण्याची सुविधाही अलीकडेच व्हॉट्सअॅप धारकांना मिळाली होती.
डॉक्युमेंट्स शेअर करताना त्यामध्ये आणखी एक पर्याय देण्यात आला आहे. तो म्हणजे आता तुम्ही गूगल ड्राईव्हमध्ये सेव्ह असलेलं डॉक्युमेंटही शेअर करु शकता. यापूर्वी फक्त आपल्या स्मार्टफोन मेमरीमध्ये सेव्ह असलेलं डॉक्युमेंट्स शेअर करता येत होती.
आता व्हॉट्सअप यूजर्स आपल्या गूगल ड्राईव्हमध्ये असलेली पीडीएफ, वर्ड किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही शेअर करु शकतील. गूगल ड्राईव्हमधून या डॉक्युमेंट्स फाईल तुम्ही व्हॉट्सअॅपवर शेअर करतानाच त्या आपोआप पीडीएफमध्ये कन्व्हर्ट होतील.
अक्षय कुमार आणि रजनीकांतमध्ये होणार फुटबॉल सामना
- नवी दिल्ली, दि. १८ - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यामध्ये फुटबॉल सामना होणार आहे. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर हा हायव्होल्टेज सामना पार पडणार आहे. दोघेही फुटबॉल खेळणार असले तरी हा रिअल नसून रिल सामना असणार आहे. रजनीकांत आणि अक्षय सध्या 'रोबोट 2' चं शुटींग करत आहेत. त्याच चित्रपटातील फुटबॉलचा सिक्वेन्स जवाहरलाल नेहरु स्टेडिअमवर शुट केला जाणार आहे.या फुटबॉल सामन्याची थीम मुंबई विरुद्ध चेन्नई अशी असणार आहे. स्टेडिअममध्ये काही ठिकाणी कोप-यात हे पोस्टर पाहायला मिळत आहेत. चाहते मोठ्या संख्येने गर्दी करतील यासाठी शुटबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये जाणा-या लोकांनाही आत जाऊ दिल जात नाही आहे, जेणेकरुन आतमध्ये उभारण्यात आलेल्या सेटची माहिती बाहेर येऊ नये.
हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण
- कोच्ची, दि. १८ - हिंदू महिलेशी लग्न केल्याबद्दल चर्चने आपल्या सदस्याकडे स्पष्टीकरण मागितल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. बेन्नी थोम्माना यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी थोम्माना सेंट जोसेफ चर्चेचे सदस्य आहेत. 10 वर्षापुर्वी त्यांनी लिजा जयासुधन या हिंदू महिलेशी लग्न केलं होतं. बेन्नी थोम्माना आणि लिजा जयासुधन दोघेही आपापल्या धर्माच्या रुढी, परंपरांच पालन करतात. बेन्नी यांना मार्च 2016 मध्ये जेव्हा हे पत्र मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. बेन्नी यांनी चर्चचे धार्मिक विधी न करता लग्न केल्याप्रकरणी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी यांना चर्चच्या विशेष प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. विशेष विवाह कायद्याअंतर्गत 7 फेब्रुवारी 2005 मध्ये विवाहाची नोंदणी करण्यात आली आहे. मी कायद्याविरोध कोणतंही कृत्य केलेलं नाही. आम्हाला धमकावलं जात आहे. आम्हाला शांततेत आयुष्य जगायचं आहे असं बेन्नी यांनी सांगितलं आहे. न्यायाधिकरणासमोर आम्ही हजर होणार नाही. धर्मांतर करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्या धर्मांचं पालन करायचं हे आमची मुले ठरवतील असंही बेन्नी बोलले आहेत.
अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात
- कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राचा विकास दर उणे 2.7 टक्के असताना राज्य पुढे कसे जाणार अशी विचारणा त्यांनी केली.थोरात म्हणाले,‘राज्य सरकारने बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली हे महत्वाचे नाही. तुम्ही जी तरतूद करता त्यातील एक एक रुपया त्या क्षेत्रासाठी किती प्रामाणिकपणे खर्च होणार हे जास्त महत्वाचे आहे. मला नुसते आकडे आणि तरतूदी नकोत. त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. आज मराठवाडा,विदर्भात माणसे व जनावरेही पाण्यावाचून मरत आहेत. त्यांना पहिल्यांदा प्यायला पाणी द्या. त्याला जगविण्यासाठी तुम्ही ‘वॉर फुटिंग’वर काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. कारण माणूसच जगला नाही तर त्याचा स्वाभिमान कसा जागृत करणार याचा विचार व्हावा. जो शेतकरी आज मरायला लागला आहे, त्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. जो श्रीमंत आहे, त्याला तुमच्या मदतीची गरज नाही. परंतू जो मधला शेतकरी आहे, त्याच्यासाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवताना तोंडाला फेस येतो. म्हणून शेतीतील जाणत्या लोकांची मदत घेवून ज्या तरतूदी तुम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, त्या खरेच त्यांच्यार्पयत पोहोचल्या का याचा आढावा घेतला गेला पाहिजे. असे सामाजिक लेखापरीक्षण झाल्याशिवाय नुसत्या तरतूदी काय कामाच्या नाहीत.’
साडेतीन लाख कोटींचे कर्ज; राज्यावरील कर्जाचा डोंगर
- मुंबई : राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढतच आहे. आजमितीला ३ लाख ३३ हजार १६० कोटी रुपयांचे कर्ज राज्याच्या शिरावर आहे. चौदाव्या वित्त आयोगाने घालून दिलेल्या मर्यादेच्या ते आतच असल्याचा दावा सरकारने केला आहे. राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचे प्रमाण १६.९२ टक्के इतके आहे. राज्य स्थूल राज्य उत्पन्नात ५.८ टक्के वाढ होऊन ते १५ लाख २४ हजार ८४६ कोटी रुपयांवर गेले आहे. सरकारने विधिमंडळात गुरुवारी सादर केलेल्या राज्याच्या आर्थिक अहवालात राज्याच्या तिजोरीचे हे वास्तव समोर आले आहे.राज्य सरकारने निश्चित केलेले उत्पन्नाचे उद्दिष्ट यंदा साधले जाईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.२०१४-१५मध्ये शासनाचे महसुली उत्पन्न १ लाख ८० हजार ७९४कोटी रुपये होते. २०१५-१६(म्हणजे येत्या ३१ मार्चपर्यंत) ते १लाख ९८ हजार २३१ कोटी रुपये अपेक्षित आहे.तथापि, यापैकी डिसेंबर २०१५पर्यंत १ लाख २६ हजार ४५७ कोटी इतके महसुली उत्पन्न झाले. याचा अर्थ जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांत तब्बल ७१ हजार ७७४ कोटी रुपयांचे उत्पन्न होणे अपेक्षित होते. (विशेष प्रतिनिधी)आज अर्थमंत्र्यांची कसोटी...
राज्याच्या बजेटमध्ये कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद
- ऑनलाइन लोकमत -मुंबई, दि. १८ - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कृषीक्षेत्रासाठी 25 हजार कोटींची तरतूद केली असल्याचं सांगत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. कृषी क्षेत्राचा विकासदर 8 टक्यांपर्यंत पोहोचला आहे. शेतकरी या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 2016 - 17 शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.जलयुक्त शिवारसाठी १ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर शेतक-यांना सर्वात भरीव मदत यावर्षी सरकारने केली आहे. शेतक-यांसाठी राज्य आणि केंद्र सरकारची ४ हजार कोटींची तरतुद असून १८८५ कोटी राज्य सरकारने पीक विमासाठी तरतुद केली असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारंपारिक तंटे मिटवण्यासाठी पाणंद रस्ता योजनेची घोषणा यावेळी करण्यात आली.शेततळी, विहिरी, विद्युत पंप जोडणीसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अल्प व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.मत्स्यसंवर्धनासाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर कडधान्य आणि तेलबीयांसाठी 80 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन नव्या पशू महाविद्यालयांसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली असून कृषीप्रक्रिया उद्योग उभारणा-ला 25 टक्के किंवा 50 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवारांनी सांगितलं.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप
- नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे नेते जोरदार टीका सुरू करीत. डॉ. मनमोहन सिंग सरकारवर दरवाढीचे खापर फोडत.आता मात्र दरवाढीवर भाजपा नेते मूग गिळून गप्प आहेत.केंद्रामध्ये यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती प्रति गॅलन १२0 डॉलर्सवर गेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत होते. त्याबद्दल भाजपचे सर्वच नेते यूपीए सरकारला दोषी धरत होते. आजच्या घडीला जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव ४0 डॉलर्सच्या खाली आले आहेत. त्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर खाली येणे अपेक्षित होते. पण तसे न होता सतत दरवाढ सुरू असून, त्यामुळे सामान्यांमध्ये संताप आहे.डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक लवकरच आणखी महाग होण्याची शक्यता आहे.सर्व राज्यांच्या परिवहन मंडळाच्या (स्टेट ट्रान्सपोर्ट-एसटी) बसेस डिझेलवर धावतात. खासगी बसेसही डिझेलवर चालतात. त्यामुळे सर्व देशभर प्रवासी भाडे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात महागणार आहे.
बॉम्बच्या अफवेमुळे दोन विमानांचा दिल्लीत खोळंबा
- नवी दिल्ली : स्थानिक इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (आयजीआयए) बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर गुरुवारी उड्डाणाच्या तयारीत असलेली नेपाळ आणि भुवनेश्वरला जाणारी दोन विमाने थांबविण्यात आली होती. अखेर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.सकाळी १० वाजता विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला फोन येताच सुरक्षा संस्थांनी रॉयल नेपाळ एअरलाईन्स (दिल्ली-काठमांडू) आणि एअर इंडियाच्या ( दिल्ली- भुवनेश्वर) विमानातील प्रवाशांना बाहेर काढून तपासणी केली. बॉम्ब धोका आढावा समितीने (बीटीएसी) दोन्ही विमानातील प्रवाशांच्या बॅगांची दुसऱ्यांदा तपासणी केली. सुरक्षा संस्थांनी फोन नेमका कोणत्या क्रमांकावरून आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. एअर इंडियाच्या विमानाने चार खासदार प्रवास करीत होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान गेल्या वर्षी विविध विमानतळांवर अफवांचे ४४ कॉल आल्याची नोंद आहे.
सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जूनमध्ये
- नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कधी होतेय याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची उत्कंठा येत्या जूनमध्ये बहुधा संपुष्टात येईल. पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ, तामिळनाडू आणि आसाम राज्याच्या विधानसभांची निवडणूक चार एप्रिल ते १६ मे या दरम्यान होऊन १९ मे रोजी मतमोजणी होईल. २१ मेपर्यंत आचारसंहिता लागू असल्यामुळे वेतन आयोग लागू करण्याची अधिसूचना सरकार केवळ जूनमध्येच काढू शकेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.अर्थमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात वेतन आयोगाशी संबंधित निर्णय जाहीर करून सरकार आपली प्रतिमा कलंकित करू इच्छित नाही. त्याच वेळी निवडणुकीच्या कालावधीत विरोधकांना सरकारवर हल्ला करण्यासाठी आयते निमित्तही पुरवू इच्छित नाही. म्हणून सरकार सातवा वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना २१ मेनंतर जारी करण्याची जास्त शक्यता आहे.
सरदारजींवरील ‘जोक्स’; ५ एप्रिलला सुनावणी
- नवी दिल्ली : शीख समुदायांसंबंधी विनोद किंवा चुटकुल्यांच्या (जोक्स)प्रसारावर निर्बंध आणण्याबाबत शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या (शिगुप्रस) याचिकेसह अन्य याचिकांवर ५ एप्रिल रोजी सुनावणी करण्याला सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. अशा चुटकुल्यांचा व्यापारदृष्ट्या वापर केला जात असेल तर कारवाई केली जाऊ शकते, असेही सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अॅड. सतिंदरसिंग गुलाटी यांनी ज्याबाबत उपन्यायिक आदेश दिला जाऊ शकतो, असे भाग निश्चित करावे असेही खंडपीठाने म्हटले. अशा विनोदातून टर उडविली जात असल्याने संपूर्ण शीख समुदायामध्ये छळवणूक होत असल्याची भावना निर्माण असेल तर आम्ही निश्चितच काही मुद्यांकडे लक्ष देऊ शकतो. विशिष्ट भाषा आणि धर्मामुळे शिखांबाबत भेदभाव केला जात असून एक रुढीवादी धारणा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन गुलाटी यांनी न्यायालयात केले.
विदेशात असलात तरी वापरता येणार घरचा लँडलाइन फोन
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - बीएसएनलचे ग्राहक विदेशात असताना अॅपच्या माध्यमातून भारतातला लँडलाइन वापरू शकतिल आणि इंटरनॅशनलचा कॉल रेट न पडता स्थानिक दरात संवाद साधू शकतिल असे जाहीर करण्यात आले आहे.बीएसएनलने फक्स्ड मोबाईल टेलिफोनी (FMT) हे अॅप लाँच केले आहे, जे 2 एप्रिल रोजी कार्यान्वित होणार आहे. यासाटी मासिक शुल्क निश्चित करण्यात येत असल्याचे बीएसनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले.यामुळे FMT च्या माध्यमातून लँडलाइनचे रुपांतर मोबाइलमध्ये होणार असल्याचे श्रीवास्तव म्हणाले. बीएसएनएलच्या या अॅपमुळे फिक्स्ड लाइन व मोबाइल फोन कनेक्ट होणार आहेत. लँडलाइन फोनधारकांना एसएमएसची सुविधा देण्याचाही प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.या बदलांसाठी सध्याची नेटवर्क यंत्रणा बदलण्यात येत असून नवीन यंत्रणा 2 एप्रिल रोजी कार्यान्वित होणार आहे.दरम्यान, बीएसएनएलने जम्मूतल्या कटरा येथे वाय-फाय हॉट स्पॉट सुरू केला आहे. हा एका वर्षातला एक हजारावा हॉटस्पॉट आहे.
मोलमजुरी करत स्पर्धा परीक्षेत यश
मगनराव यादव यांच्या कुटुंबात अठराविश्व दारिद्य्र असल्याने या कुटुंबातील प्रत्येकाला मजुरी केल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य नाही. मगनराव यांना दोन एकर जमीन असून, संपूर्ण आयुष्य इतर ठिकाणी मजुरी करण्यात घातले. मगनराव यादव यांना एकूण तीन मुले आहेत. दोघे ऊसतोडणी करत असून, सर्वांत लहान असलेल्या पंढरीनाथला पूर्वीपासून शिक्षणाची आवड होती. पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत तर सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घरच्या शेळ्या चारत तीर्थपुरी येथील जिल्हा परिषद प्रशालेत पूर्ण केले. दहावी पास होऊनही पैसे नसल्याने अकरावीला प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे तीर्थपुरी येथील एका कृषी सेवा केंद्रात काम करून त्यानंतरच्या काळात बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती बिकट असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी एका खासगी कंपनीत काम करून पदवीपर्यंतचे शिक्षण तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात पूर्ण केले. परिस्थिती गरिबीची व कुटुंबात शिक्षणाचा अंधार असल्याने स्वत:चा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागत होता.
===========================================
प्रसिद्ध नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे निधन
मुंबई- नृत्य हा श्वास मानून अनेक वर्षे ज्यांनी नृत्यसाधना केली, अनेक कलावंतांना घडवले अशा प्रतिथयश नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे शुक्रवारी (ता. 18) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या.
अंधेरी येथील घरात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कथ्थक नृत्यांगना व अभिनेत्री मुलगी अर्चना जोगळेकर, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
पन्नासहून अधिक वर्षे "अर्चना नृत्यालय‘ ही कथ्थक अकादमी अंधेरी येथे त्या चालवत होत्या. 15 ऑगस्ट 1963 रोजी चंद्रपूरमध्ये अवघ्या एका विद्यार्थिनीला घेऊन त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर दादर, अंधेरी येथे त्याच्या शाखा काढल्या. 2003मध्ये नृत्यालयाची शाखा अमेरिकेतील प्रिन्स्टन (न्यू जर्सी) येथे सुरू झाली. त्याचे काम अर्चना जोगळेकर पाहतात.
मराठी चित्रपटसृष्टीत नामवंत कलाकार असलेल्या ऊर्मिला कानेटकर, रेशम टिपणीस, नेहा पेंडसे, मयूर वैद्य, फुलवा खामकर आदींनी त्यांच्याकडेच नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
===========================================
40 गिगावॅट 'रुफटॉप सौरऊर्जा' निर्मिती अशक्य
नवी दिल्ली: भारताला येत्या 2022 पर्यंत 40 गिगावॅट ‘रुफटॉप सौरऊर्जा‘ निर्मितीचे लक्ष्य साध्य करावयाचे असल्यास सध्याच्या धोरणपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, असे मत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समुहाच्या अहवालानुसार समोर आली आहे.
भारताचे येत्या 2022 पर्यंत एकुण 100 गिगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 40 गिगावॅट सौरऊर्जा ही रुफटॉप असेल तर उर्वरित सौरऊर्जेचा वापर जमिनीवरील प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. परंतु सध्या देशाची रुफटॉप सौरऊर्जा क्षमता सुमारे 0.525 गिगावॅट आहे. वर्तमान परिस्थितीतील धोरणांच्या साह्याने काम सुरु राहिल्यास 2022 पर्यंत केवळ 13.5 गिगावॅट सौरऊर्जेची निर्मिती शक्य आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
‘सोलार रुफटॉप पॉलिसी कोअॅलिशन‘ अंतर्गत ब्रिटनचा आंतरराष्ट्रीय विकास विभाग, क्लायमेट ग्रुप, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाऊंडेशन आणि नंद अँड जीत खेमका फाऊंडेशनच्या ‘स्केलिंग अप प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन रुफटॉप सोलार‘ अहवालानुसार, भारतासाठी 2022 पर्यंत 40 गिगावॅट रुफटॉप सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करणे अशक्यप्राय आहे
===========================================
क्रिकेट: बलाढ्य ऑस्ट्रेलियास न्यूझीलंडचा दणका
धरमशाला : एकही ‘स्टार‘ खेळाडू नसलेल्या न्यूझीलंडच्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर ‘बलवान‘ संघांना पराभवाचा धक्का देण्याची मालिका आज (शुक्रवार) सुरुच ठेवली. ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडने आज बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी मात करत सलग दुसरा विजय नोंदविला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 गडी गमावून 142 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियास 20 षटकांमध्ये 134 धावांमध्येच रोखले.
न्यूझीलंडच्या 143 धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज सुरवात केली होती. शेन वॉटसन आणि उस्मान ख्वाजा या सलामीवीरांनी पहिल्या पाच षटकांतच 44 धावा चोपल्या. त्यानंतरही शांत चित्ताने आणि नियोजनबद्ध गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने सामना फिरवला. सहाव्या षटकात शेन वॉटसन बाद झाल्यानंतर न्यूझीलंडने नियमित अंतराने ऑस्ट्रेलियास धक्के दिले. अचूक गोलंदाजीला न्यूझीलंडच्या चपळ क्षेत्ररक्षणाचीही भक्कम साथ मिळाली. आवश्यक धावगती वाढत असल्याचे दडपण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आले. ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला.
सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान भारतीय संघालाही पराभवाचा दणका दिला होता. आता सलग दोन विजयांसह न्यूझीलंडने गटातील अव्वल स्थान पटकाविले आहे.
तत्पूर्वी, सलामीवीर मार्टिन गुप्टील आणि केन विल्यमसन यांची भक्कम सुरवात आणि अखेरीस ग्रॅंट एलियटने केलेल्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडने 142 धावांपर्यंत मजल मारली.
===========================================
दुखापतीमुळे मलिंगा 'वर्ल्ड कप'मधून बाहेर
मुंबई : गेल्या काही महिन्यांत अडखळत खेळणाऱ्या आणि विश्वकरंडक जेतेपद राखण्यासाठी झगडणाऱ्या श्रीलंकेच्या संघाला आज (शुक्रवार) आणखी एक धक्का बसला. हुकमी गोलंदाज लसिथ मलिंगाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. पायाला झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त न झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने जाहीर केले.
गेल्या वर्षी डिसेंबरपासून मलिंगा दुखापतीमुळे त्रस्त आहे. गेल्या महिन्यात संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने पुनरागमन केले होते. या सामन्यात त्याने 26 धावा देत चार गडी बाद केले होते. मात्र, याच सामन्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. पुरेशी तंदुरुस्ती नसल्यामुळे श्रीलंकेच्या संघाबरोबर तो भारतामध्ये दाखल झाला नव्हता. तंदुरुस्तीच्या चाचण्या झाल्यानंतर तो नंतर भारतात दाखल झाला. श्रीलंकेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यामध्येही मलिंगा संघाबाहेरच होता. अखेर या दुखापतीतून लवकर सावरणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मलिंगाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मलिंगाच्या जागी बदली खेळाडूची निवड अद्याप झालेली नाही.
मलिंगाच्या नेतृत्वाखालीच श्रीलंकेने 2014 मध्ये ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. या स्पर्धेसाठीही कर्णधारपदी त्याचीच निवड झाली होती. पण दुखापतींमुळे मलिंगाने कर्णधारपद सोडले. त्यानंतर अँजेलो मॅथ्यूजकडे नेतृत्व सोपविण्यात आले.
===========================================
पठाणकोट: लष्करी गणवेशातील महिलेला अटक
पठाणकोट (पंजाब)- केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांसारखा गणवेशात असलेल्या एका महिलेला कॅन्टोमेंट भागातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (शुक्रवार) दिली.
मामुन कॅन्टोमेंट भागामध्ये ‘सीआरपीएफ‘ दलाच्या जवानांसारखा गणवेश परिधान केलेली महिला आढळली. तिला अटक करण्यात आली असून, तिचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक आर. के. बक्षी म्हणाले, ‘संबंधित महिला 40 वर्षांची असून, येथील रहिवासी आहे. महिलेचे मानसिक संतुलन बिघडलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याबाबत पुढील चौकशी सुरू आहे.‘ दरम्यान, पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर 2 जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जवान हुतात्मा झाले होते.
===========================================
उमर खलिद,भट्टाचार्यला राष्ट्रद्रोहप्रकरणी जामीन
पतियाळा हाऊस न्यायालयामधील अतिरिक्त सत्र न्यायाधीश रीतेश सिंह यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. यासंदर्भातील औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, खलिद व भट्टाचार्य यांची तिहार न्यायालयामधून आज संध्याकाळपर्यंत सुटका करण्यात येण्याची शक्यता आहे.
याप्रकरणातील सहआरोपी असलेल्या कन्हैय्या कुमार याला नुकत्याच मिळालेल्या जामीनाच्या धर्तीवर आपणांसही जामीन मिळावा, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती. जेएनयुमधील कार्यक्रमादरम्यान कोणत्याही स्वरुपाच्या राष्ट्रद्रोही घोषणा दिलेल्या नसून या प्रकरणासंदर्भातील सर्व चित्रीकरण खोटे असल्याचा दावा दोघांनी केला होता.
===========================================
पंजाब-हरियानामधील पाणीवाटप प्रश्न पेटला
सतलज-यमुना कालव्याच्या निर्मितीसाठी घेतलेल्या जमिनीसंदर्भात राजकारण न करण्याची तंबी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला नुकतीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब राज्याने संमत केलेला हा ठराव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी यासंदर्भातील ठराव मांडला होता. पंजाबमध्ये पाण्याची समस्या असून इतरांबरोबर वाटून घेण्यासाठी राज्याकडे पाण्याचा एक थेंबही नसल्याचे बादल म्हणाले.
""तेव्हा या पार्श्वभूमीवर, हा कालवा बांधण्याची आवश्यकता याआधी कधी नव्हती आणि आताही ती नाही,‘‘ असे बादल यांनी सांगितले. बादल यांच्या या ठरावास इतर सर्व पक्षीय नेत्यांनी अनुमोदन दिले.
===========================================
गणेश जोशीना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
जोशी यांना आज सकाळी अटक करण्यात आले. त्यानंतर दुपारी सव्वा बारा वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्री रावत यांनी जोशी यांच्या अटकेमागे कोणतेही राजकारण नसल्याचे सांगितले आहे.
आंदोलन करताना घोड्याला मारहाण करण्याच्या प्रकारावर जोशी यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत होती. या घटनेनंतर जोशी यांनी आपल्या या कृत्याचे समर्थन करताना सांगितले, की पोलिस आंदोलकांना निर्दयीपणे मारत होते. त्यानंतर आम्ही पोलिसांच्या लाठ्या झेलल्या. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी घोड्यांचा वापर केला. त्या वेळी झालेल्या झटापटीत घोड्याला दुखापत झाली. यात चुकीचे काहीही झाले नाही. घोड्याला संपूर्ण दिवस पाणी व जेवण न दिल्याने तो खाली कोसळल्याचे जोशी म्हणाले. तसेच आपण जर दोषी ठरलो तर कोणत्याही शिक्षेला तयार असल्याचे म्हटले होते.
या प्रकरणी देहरादून पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर पंतनगरमधील सहा आणि चार जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने घोड्यावर उपचार केले. गुरुवारी रात्री मारहाणीमुळे घोड्याचा दुखावलेला पाय कापण्यात आला.
===========================================
चीनमधील तरुण स्तंभलेखक झाला "बेपत्ता'
बीजिंग - चीनमधील जिया जिया हा स्तंभलेखक (वय 30) हॉंगकॉंग येथे जात असताना अचानकपणे "बेपत्ता‘ झाल्याचे वृत्त आज (शुक्रवार) सूत्रांनी दिले. जिया हा मंगळवार रात्रीपासून बेपत्ता असून त्याच्या पत्नीने यासंदर्भात तक्रार नोंदविली आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे एक निनावी पत्र प्रसिद्ध करण्यासंदर्भात जिया याने त्याच्या एका संपादक मित्रास नुकताच इशारा दिला होता. शी यांना उल्लेखून लिहिण्यात आलेल्या या पत्रामध्ये "अधिकाधिक सत्ता हस्तगत करण्याबरोबरच वैयक्तिक समर्थक निर्माण करण्याचा प्रयत्न‘ शी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
चिनी सरकारशी संबंधित असलेल्या एका संकेतस्थळावर हे पत्र प्रसिद्ध झाले होते. मात्र प्रसिद्ध झाल्यानंतर तत्परतेने हे पत्र हटविण्यात आले होते. ही मागणी "कम्युनिस्ट पक्षाच्या एकनिष्ठ पाठीराख्यांनी‘ केल्याचे पत्रात म्हटले होते. जिया याने आपला या पत्राशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता. जिया हा चीनमधील सामाजिक-राजकीय विषयांवर स्तंभलेखन करणारा पत्रकार आहे.
===========================================
उत्तर कोरियाकडून आणखी एक क्षेपणास्त्र चाचणी
अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, उत्तर कोरियाने या निर्बंधांना न जुमानता क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे कोरियन समुद्रकिनाऱ्यावर संयुक्त लष्करी सराव करणाऱ्या दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला ही एक प्रकारची चिथावणीच मानली जात आहे.
चाचणी घेण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने 800 किलोमीटर लांबपर्यंत जाऊन पूर्व किनाऱ्यावरील समुद्रामधील लक्ष्य गाठले. हे मध्यम पल्ल्याचे रोदोंग क्षेपणास्त्र असल्याचे दक्षिण कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तसे असल्यास जपानमध्ये हल्ला करण्याची क्षमता असणारे उत्तर कोरियाचे 2014 पासूनचे हे दुसरे क्षेपणास्त्र ठरेल.
===========================================
मोदींपाठोपाठ कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ आता ‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल‘ कार्यक्रमामुळे घराघरात पोचलेला लोकप्रिय अभिनेता कपिल शर्माचाही मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसॉद मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे.
जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तिंच्या यादीत स्थान मिळविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा या म्युझियममध्ये उभारण्यात येणार आहे. त्यांचे मोजमाप घेण्यासाठी म्युझियमचे कलाकार नुकतेच भारतात आले होते. त्याच वेळी त्यांनी कपिलचेही मोजमाप घेतल्याची माहिती मनोरंजनविषयक वृत्त देणाऱ्या वेबपोर्टलवर दिली आहे. मुंबईतील जे डब्ल्यू मॅरिअट या हॉटेलमध्ये कलाकारांनी कपिलची भेट घेतली.
या म्युझियममध्ये यापूर्वी अमिताभ बच्चन, सलमान खान, ऐश्वर्या रॉय बच्चन, शाहरूख खान, कतरिना कैफ, करिना कपूर, हृतिक रोशन आणि माधुरी दीक्षित या तारकांचा समावेश आहे. आता त्यामध्ये कपिलच्या पुतळ्याची भर पडणार आहे. कपिलने छोट्या पडद्यावरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले.
===========================================
===========================================
===========================================
No comments:
Post a Comment