[अंतरराष्ट्रीय]
१- इस्तंबूल येथे महिला हल्लेखोरांचा हल्ला
२- 'सुरक्षेच्या हमीनंतरच पाक संघ भारतात जाणार'
३- पेंटॅगॉनकडून हॅकर्सना हॅकिंगसाठी निमंत्रण
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- हे मी नाही... राजीव गांधी म्हणाले होते : मोदी
५- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर राहुल गांधी म्हणतात...
६- वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
७- राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्यासाठी तामिळनाडू सरकारची तयारी
८- मारेकऱ्यांबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई
९- शाळांना सीसीटीव्ही देण्यासाठी निधी नाही-इराणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- ऐन उन्हाळ्यात वीजदरवाढीचा शॉक
११- 'यू मुम्बा'च्या खेळाडूंसोबत शेतकऱ्यांचा सेल्फी
१२- इराणने सुटका केलेले मच्छिमार चेन्नईत दाखल
१३- 'भारत माता की जय' म्हणा सांगावे लागते–भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- कानपूर; वडिलांच्या आजारपणाबाबत चिमुरड्यांचं मोदींना पत्र आणि...
१५- कपडे फाटले नाहीत, मग विनयभंग कसा : मुंबई पोलीस
१६- गोव्यात सेल्फी काढताना कोसळून 5 जण जखमी
१७- दिल्लीत आढळली बेवारस बॅग; बॉम्बची अफवा
१८- मथुरा येथे दोन दिवसीय भाजप युवा राष्ट्रीय अधिवेशन
१९- सॉफ्टवेअर इंजिनिअरची हैदराबादमध्ये हत्या
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- कमाईत पैलवान योगेश्वरची धोनी, कोहलीला धोबीपछाड
२१- बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाक फलंदाजांवर सडकून टीका
२२- मोबाईल अॅपमधून रक्तदाब मोजणे धोकादायक
२३- चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवर ऑनलाईनही बंदी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
हृदयात नेहमीच परोपकाराची भावना बाळगतात. त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते
(विठ्ठल वानखेडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
**********************
========================================
हे मी नाही... राजीव गांधी म्हणाले होते : मोदी
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत चौफेर फटकेबाजी केली. सुरुवातीपासूनचं नरेंद्र मोदींच्या निशाण्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार होते. मात्र यावेळी काँग्रेसला टोलेबाजी करताना, मोदींनी काँग्रेसचंच शस्त्र वापरलं. मोदींनी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि इंदिरा गांधींची उदाहरणं देत, काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.
संसदेचं कामकाज चालवण्याची जबाबदारी सर्व खासदारांची आहे, हे मी नव्हे तर राजीव आणि इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या, असं म्हणत मोदींनी टोलेबाजीला सुरुवात केली.
राजीव गांधी, इंदिरा गांधींचा उल्लेख
काँग्रेसला टोले लगावण्यासाठी मोदींनी काँग्रेसचंच शस्त्र वापरलं. यासाठी त्यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या भाषणांचा उल्लेख केला. देशाची कमजोरी जगासमोर दाखवू नका, असं इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या. तसंच देशासाठी जी विधेयकं महत्त्वाची आहेत, ती पारित होऊ द्या, असं आवाहन करत मोदींनी राजीव गांधींचा दाखला दिला.
========================================
ऐन उन्हाळ्यात वीजदरवाढीचा शॉक
नागपूर : ऐन उन्हाळ्यात वीजदरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. कारण ऊर्जा खात्यानं वीजेच्या दरांमध्ये 5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
एमईआरसी अर्थात महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन याबाबतचा निर्णय काही दिवसात जाहीर करेल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली.
सामान्य ग्राहकांना याचा भार सहन करावा लागणार असला तरी उद्योजकांना मात्र वीजदरवाढीचा फटका बसू नये यासाठी वेगळी योजना आणण्याचा प्रस्ताव असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे. तसंच ‘अॅश फ्लाय’ दुबई आणि सिंगापूरला निर्यात करुन उर्जा खात्याला अधिकचा 500 कोटीचा महसूल मिळण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.
========================================
कानपूर; वडिलांच्या आजारपणाबाबत चिमुरड्यांचं मोदींना पत्र आणि...
कानपूर : आपल्या वडिलांच्या आजारपणामुळे आपण आर्थिक विवंचनेत असल्याचं कानपूरच्या दोन भावंडांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे कळवलं. लहानग्यांच्या या पत्राची तात्काळ दखल घेत पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वडिलांच्या उपचाराचा खर्च मोफत करणार आहे.
सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय सुशांत मिश्रा आणि त्याचा 8 वर्षांचा धाकटा भाऊ तन्मय यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं.
‘आम्ही अत्यंत गरीब कामगार मनोज मिश्रा यांची मुलं आहोत. आमच्या वडिलांना गंभीर आजार झाला आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. आतापर्यंत नातेवाईक आणि मित्रांच्या आर्थिक सहाय्यामुळे उपचार सुरु आहेत. मात्र आता सर्व स्रोत जवळपास बंद झाले आहेत.’ असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
========================================
कपडे फाटले नाहीत, मग विनयभंग कसा : मुंबई पोलीस
मुंबई: तरुणीचे कपडे फाटले नसतील तर तो विनयभंग ठरत नाही. असं अजब तर्कट इतर कुठे नाही तर चक्क मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी मांडलं. आणि कपडे फाटले नसल्यानं एका तरुणीची विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास त्यांनी नकार दिला.
मुंबई पोलिसांचा असंवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला. विनयभंगाची तक्रार नोंदवण्यास आलेल्या एका मणिपुरी तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे.
शनिवारी संध्याकाळी ही तरुणी कलिनातल्या बाजारात गेली असता, एक व्यक्ती तिच्या अंगावर थुंकली तसंच तिला मारहाणही करण्यात आली. तीनं याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी केवळ एनसी नोंदवून तिची बोळवण केली.
एफआयआर दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या या अटीबाबत ऐकून या तरुणीला धक्काच बसला. तरीही एका एनजीओच्या मदतीनं तिनं आपली तक्रार तर दाखल केली. शिवाय या पोलिसाविरोधातही तक्रार केली.
दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर कायदे कडक झाले. पण पोलिसांची असंवेदनशीलता काही कमी झाली नाही. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे.
========================================
कमाईत पैलवान योगेश्वरची धोनी, कोहलीला धोबीपछाड
मुंबई : कुस्तीपटू योगेश्वर दत्त हा कमाईच्या बाबतीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीपेक्षा खूपच पुढे आहे. हे वाचून आश्चर्य वाटेल पण योगेश्वरची प्रति मिनिट कमाई धोनीपेक्षा फारच जास्त आहे.
विविध लीगचा सर्व्हे करणारी भारतीय खेळ वेतन अहवाल 2016 मध्ये हा खुलासा झाला आहे.जर खेळाडूंच्या प्रति मिनिट कमाईबाबत बोलायचं झाल्यास परदेशी खेळाडूंमध्ये टेनिसपटू अँडी मरे आघाडीवर आहे. अँडी मरे आयपीटीएलमध्ये प्रति मिनिट 14.34 लाखांची कमाई करतो. भारतीयांमध्ये योगेश्वर दत्तची प्रति मिनिट कमाई 1.65 लाख रुपये आहे. तर क्रिकेटपटूंमध्ये युवराज सिंहची कमाई सर्वाधिक म्हणजे 1.01 लाख आहे.
धोनीसह विराट कोहली आणि सुरेश रैनाची कमाई 75 हजारांपेक्षा कमी आहे
========================================
बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाक फलंदाजांवर सडकून टीका
कराची : बांगलादेशकडून झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी भडास काढली आहे. बांगलादेशने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी धुव्वा उडवून पाकिस्तानला आशिया चषकातून गाशा गुंडाळायला लावला. त्यानंतर माजी खेळाडूंनी संघावर विशेषत: आग ओकली आहे.
माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर म्हणाला की, अशा पद्धतीने आशिय कपमधून बाहेर पडणं निराशाजनक आहे. मला आशा होती की, आमचा संघ बांगलादेस आणि श्रीलंकेला पराभूत करुन भारतासोबत फायनलमध्ये खेळले.
तर पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाह उल हकने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे. “आमच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली, पण फलंदाज सपशेल अपयशी ठरले. निवड समितीच्या सदस्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंना संधी दिली. यापेक्षा आणखी काय करायचं होतं?”
याशिवाय पाकिस्तानचा चॅम्पियन ऑफ स्पिनर सईद अजमलने कर्णाधाराच्या काही निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं. तो म्हणाला की, “सातव्या किंवा आठव्या षटकात शोएब मलिकच्या हाती बॉल द्यायला हवा होतो. क्षेत्ररक्षणातही अनेक चुका झाल्या.”
========================================
'यू मुम्बा'च्या खेळाडूंसोबत शेतकऱ्यांचा सेल्फी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दीडशे शेतकऱ्यांनी बुधवारी 'यू मुम्बा'च्या शिलेदारांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हे सगळे शेतकरी केळी आणि डाळींबाचं उत्पादन घेतात.
मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दीडशे शेतकऱ्यांनी बुधवारी ‘यू मुम्बा’च्या शिलेदारांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हे सगळे शेतकरी केळी आणि डाळींबाचं उत्पादन घेतात.
आयएनआय अॅग्री या यू मुम्बाचे मालक रॉनी स्क्रूवाला यांची भागीदारी असलेल्या कंपनीमुळं हा योग जुळून आला.
यू मुम्बाच्या कबड्डीपटूंना भेटल्यानं या शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवा रंग भरला. आपल्या आवडत्या खेळाडूंसोबत कुणी सेल्फी काढत होतं, कुणी गप्पा मारत होतं.
खेळाडूंनीही आढेवेढे न घेता त्यांच्याशी संवाद साधला. प्रो कबड्डी लीग गावागावात आणि घराघरात जाऊन पोहोचलीय, त्याचंच हे प्रतिबिंब म्हणायला हवं. कबड्डीचे हे हीरोही सर्वसामान्य कुटुंबांतूनच आले आहेत. यू मुम्बाचा कर्णधार अनूप कुमारसारखे अनेक जण मातीशी आपलं नातं विसरलेले नाहीत, हेही यानिमित्तानं दिसून आलं.
========================================
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेवर राहुल गांधी म्हणतात...
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या सुटकेच्या चर्चा सुरु असतानाच राहुल गांधी यांनी मौन सोडलं आहे. दोषींना सोडण्याचा निर्णय सरकारचा असेल, त्यांच्या निर्णयावर काहीही बोलणार नाही, असं राजीव गांधींचे पुत्र आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी स्पष्ट केलं आहे.
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या मुक्ततेसाठी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. या मारेकऱ्यांनी 24 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीकोनातून त्यांची तुरुंगातून सुटका करायला हवी, असं या पत्रात लिहिलं आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणी फाशी जन्मठेपेत रुपांतरित झालेले दोषी संथन, मुरुगन, पेरारीवलन आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारे नलिनी श्रीहरन, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि जयकुमार या सात जणांच्या सुटकेचे आदेश राज्य सरकारने दिले होते.
========================================
वय वाढलं पण समज नाही - पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
- नवी दिल्ली, दि. ३ - काही जणांना वय वाढलं तरी बऱ्याच गोष्टी उशीरा लक्षात येतात, आणि काहीवेळा तर लक्षातच येत नाहीत असं सूचकपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी राहूल गांधींवर बोचरी टीका केली. संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं घणाघाती हल्ला चढवला. साठ वर्षे झाली तरी गरीबी गेली नाही कारण काँग्रेसनेच गरीबीची मूळं या देशात घट्ट केली आणि मनरेगासारख्या योजना आजही सुरू ठेवाव्या लागण्याची मजबुरी आली असे ते म्हणाले. आमची प्रत्येक योजना काँग्रेसचीच असल्याचा आरोप केला जातो, असं सांगताना काँग्रेस तर रेल्वेपण आम्हीच सुरू केली असा दावा करतील असंही उपहासानं सांगितलं. काँग्रेसच्या अनेक योजना आम्ही सुरू ठेवल्या आहेत, मात्र, त्या कार्यक्षम केल्या आहेत आणि त्यांच्यातील भ्रष्टाचार समूळ उपटण्याचा प्रयत्न केला आहे असा दावा मोदींनी केला. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना प्रस्तावित केलेले एक विधेयक राहूल गांधींनी पत्रकार परिषदेत फाडून टाकले होते, याची आठवण करून देत अत्यंत ज्येष्ठ असलेल्या मनमोहन सिंगांशी असं वागणं दु:खदायक होतं असं संगितलं.संसदेचं कामकाज चालू दिल जातं नाही यावर विचार करण्याची गरज आहे. मात्र विरोधकांमधील न्यूनगंडामुळेच विरोधक संसदेच कामकाज चालू देत नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे. संसदेचं कामकाज चालू न देणं हे देशाचं आणि विरोधकांचं नुकसान आहे. लोकांसाठी विरोधक संसदेच आवाज उठवत असतात आणि जर संसदेचं कामकाज होत नसेल तर हे लोकांचं आणि देशाचं नुकसान आहे. संसदेचं कामकाज होत नसल्याने देश चिंतित असल्याचं मोदी बोलले आहेत .
========================================
राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्यासाठी तामिळनाडू सरकारची तयारी
- चेन्नई, दि. ३ - तामिळनाडू सरकारने राजीव गांधींच्या मारेक-यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या सातही मारेक-यांनी 20 वर्षाहून जास्त काळ कारागृहात शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना सोडण्याचा विचार तामिळनाडू सरकार करत आहे. तामिळनाडू सरकारने याप्रकरणी केंद्राचं मत मागितल आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता त्यामुळे तामिळनाडू सरकारने केंद्राकडे विचारणा केली आहे.केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ज्ञानदेसीकन यांना यासंबंधी पत्र पाठवलं आहे. सातही आरोपींनी केलेल्या याचिकेवर तामिळनाडू सरकार विचार करत असून त्यांची जन्मठेपेची शिक्षा माफ करण्याचा विचार सरकार करत आहे. सर्व दोषींनी 24 वर्ष कारागृहात आपली शिक्षा भोगली आहे त्यामुळे त्यांना मुक्त करण्याचा सरकार विचार करत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.काँग्रेसने नोंदवली नाराजीदरम्यान तामिळनाडू सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने नाराजी नोंदवली आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने निर्णय घेतला पाहिजे, असे मत काँग्रेस उपाध्यक्ष नोंदवले आहे. तर या निर्णयापेक्षा अधिक वाईट गोष्ट असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली. तामिळनाडू सरकारच्या पत्राला केंद्राने महत्व देण्याची गरज नाही, मारेक-यांना सोडण्यात येऊ नये अशी मागणीही त्यांनी लोकसभेत केली.
========================================
मोबाईल अॅपमधून रक्तदाब मोजणे धोकादायक
- ऑनलाइन लोकमतमियामी, दि. ३ - शरीरातील रक्तदाब मोजण्यासाठी काही मोबाईल अॅप विकसित झाली आहेत. या मोबाईल अॅपमधून रक्तदाबाची जी आकडेवारी मिळते ती चुकीची असून, यामुळे रुग्णाची दिशाभूल होते असे अमेरिकी संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. इन्स्टंट ब्लड प्रेशर नावाचे मोबाईल अॅप आतापर्यंत एकलाखापेक्षा जास्त मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले आहे.ऑगस्ट २०१५ मध्येच अॅपल स्टोरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले तरी अजूनही ब्लड प्रेशर मोजण्यासाठी या अॅपचा वापर सुरु आहे असे जॉन्स हॉपकीन्स विद्यापीठ स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी सांगितले. या अॅपने रक्तदाब मोजताना १० पैकी ८ रुग्णांच्या रक्तदाबाचे चुकीचे निदान केले, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.या अॅपवर अवलंबून राहिल्यामुळे रक्तदाबाशी संबंधित विविध आजार असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीला गंभीर धोका उदभवू शकतो असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. अमेरिकेच्या जेएएमएमध्ये हा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला आहे. हाताच्या दंडाला पट्टा बांधून रक्तदाब मोजण्याची पद्धत योग्य असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
========================================
मारेकऱ्यांबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई
नवी दिल्ली - राजीव गांधी यांच्या सात मारेकऱ्यांना मुक्त करण्याबाबत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कारवाई करेल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे.
राजीव गांधी यांच्या सात मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय तमिळनाडू घेतला आहे. या निर्णयाबाबत केंद्र सरकारचा अभिप्राय मागविला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहसचिव राजीव मिहर्षी यांना तमिळनाडूचे मुख्य सचिव के. नानदेसिकन यांना पत्र लिहिले आहे. याबाबत लोकसभेत माहिती देताना राजनाथसिंह म्हणाले, "राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याची मागणी अतिशय दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधानांनी देशासाठी प्राण दिले आहेत. त्यांचा योग्य सन्मान करायला हवा. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडत्वासाठी ते आवश्यक आहे. जर या मारेकऱ्यांना सोडण्याची परवानगी दिली तर भविष्यात इतर राज्यही अशी मागणी करू शकतात.‘ तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.
राजीव गांधी यांच्या सात मारेकऱ्यांना मुक्त करण्याचा निर्णय तमिळनाडू घेतला आहे. या निर्णयाबाबत केंद्र सरकारचा अभिप्राय मागविला आहे. या संदर्भात केंद्रीय गृहसचिव राजीव मिहर्षी यांना तमिळनाडूचे मुख्य सचिव के. नानदेसिकन यांना पत्र लिहिले आहे. याबाबत लोकसभेत माहिती देताना राजनाथसिंह म्हणाले, "राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सोडण्याची मागणी अतिशय दुर्दैवी आहे. माजी पंतप्रधानांनी देशासाठी प्राण दिले आहेत. त्यांचा योग्य सन्मान करायला हवा. देशाच्या एकतेसाठी आणि अखंडत्वासाठी ते आवश्यक आहे. जर या मारेकऱ्यांना सोडण्याची परवानगी दिली तर भविष्यात इतर राज्यही अशी मागणी करू शकतात.‘ तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही ते पुढे म्हणाले.
========================================
गोव्यात सेल्फी काढताना कोसळून 5 जण जखमी
पणजी (गोवा)- अंजुना गावामध्ये उंच कड्यावरून सेल्फी घेताना पाच जण खाली कोसळल्याने जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी आज (गुरुवार) दिली.
पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पर्यटक उंच कड्यावरून सेल्फी काढत होते. यावेळी तोल गेल्यामुळे ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.‘
पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पर्यटक उंच कड्यावरून सेल्फी काढत होते. यावेळी तोल गेल्यामुळे ते खाली कोसळले. गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.‘
========================================
दिल्लीत आढळली बेवारस बॅग; बॉम्बची अफवा
वसंत विहार परिसरातील मॉडर्न स्कूलमध्ये आज (गुरूवार) दुपारी दिल्ली पोलिसांना दुपारी 12 वाजून 15 मिनिटांची त्याबाबत माहिती देणारा दूरध्वनी आला. दिल्ली पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसह, शाळेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी तपासणी केल्यानंतर काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. दिल्ली पोलिसांनी ट्विटरद्वारेही याची माहिती दिली. पोलिसांना आलेला दूरध्वनी म्हणजे अफवा असल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच शाळा पूर्ववत सुरू झाली या घटनेची नेटिझन्समध्ये जोरदार चर्चा असून ट्विटरवर "मॉडर्न स्कूल‘ हा विषय टॉप ट्रेण्डमध्ये आढळून आला आहे.
========================================
इस्तंबूल येथे महिला हल्लेखोरांचा हल्ला
इस्तंबूल - तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे पोलिस दलाच्या दंगलनियंत्रक विभागाच्या मुख्यालयावर दोन महिला हल्लेखोरांनी हातबॉंब फेकत हल्ला केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
ग्रेनेडबरोबरच या हल्लेखोरांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केल्याचेही सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये कोणीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नसून पोलिसांनी हा भाग सामान्य नागरिकांसाठी बंद केला आहे. या महिला हल्लेखोर आता शेजारच्या इमारतीमध्ये अडकल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्यामागील उद्देश अद्यापी स्पष्ट झालेला नाही.
पश्चिम आशिया व एकंदरच जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रास जोडणाऱ्या तुर्कस्तानचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुर्कस्तानमधील राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव आशिया व जगातील इतर भागांवर कायमच पडत आला असून वर्तमान स्थितीमध्येही या देशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे परिणाम जाणवू लागले आहेत.
ग्रेनेडबरोबरच या हल्लेखोरांनी पोलिसांवर जोरदार गोळीबार केल्याचेही सूत्रांनी सांगितले. या हल्ल्यामध्ये कोणीही मृत्युमुखी पडल्याचे वृत्त नसून पोलिसांनी हा भाग सामान्य नागरिकांसाठी बंद केला आहे. या महिला हल्लेखोर आता शेजारच्या इमारतीमध्ये अडकल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्यामागील उद्देश अद्यापी स्पष्ट झालेला नाही.
पश्चिम आशिया व एकंदरच जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनामधून भूमध्य समुद्र व काळ्या समुद्रास जोडणाऱ्या तुर्कस्तानचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुर्कस्तानमधील राजकीय घडामोडींचा मोठा प्रभाव आशिया व जगातील इतर भागांवर कायमच पडत आला असून वर्तमान स्थितीमध्येही या देशातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीचे परिणाम जाणवू लागले आहेत.
========================================
शाळांना सीसीटीव्ही देण्यासाठी निधी नाही-इराणी
नवी दिल्ली- शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे केंद्रीय मानव संसाधनमंत्री स्मृती इराणी यांनी आज (गुरुवार) सांगितले.
राज्यसभेत बोलताना इराणी म्हणाल्या, ‘देशातील विविध शाळा या राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आहे. परंतु, केंद्र सरकारकडे निधी देण्यासाठी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.‘
शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेत आहे. केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असेही इराणी यांनी सांगितले.
राज्यसभेत बोलताना इराणी म्हणाल्या, ‘देशातील विविध शाळा या राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आहे. परंतु, केंद्र सरकारकडे निधी देण्यासाठी असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.‘
शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झालेली आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेत आहे. केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, असेही इराणी यांनी सांगितले.
========================================
सॉफ्टवेअर इंजिनिअरची हैदराबादमध्ये हत्या
आज (गुरूवार) पहाटे साडे चार वाजता संजय सिकंदराबादमधील स्वप्नलोक कॉम्प्लेक्सच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर त्याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या एका सुरक्षारक्षकाने माहिती देताना सांगितले की, "चार व्यक्ती मोटारीमध्ये आले. त्यांनी त्यांनी खूप मारहाण केली. काही वेळाने पोलिस आले आणि त्यांनी मोटारीचा पाठलाग केला. मात्र हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नाही.‘
हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासणी सुरू आहे.
========================================
'सुरक्षेच्या हमीनंतरच पाक संघ भारतात जाणार'
भारतात 8 मार्चपासून ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेस सुरवात होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला धर्मशाळा येथे सामना होणार आहे. हा सामना धर्मशाळामध्ये खेळवू नये, असे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हेच अंतिम निर्णय घेतील असे म्हटले आहे.
खान म्हणाले की, विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघाला सुरक्षा पुरविण्याची हमी भारत सरकारने दिल्यानंतरच पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची परवानगी दिली जाईल. याबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) ही जबाबदारी आहे.
========================================
चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांवर ऑनलाईनही बंदी
"क्या कूल हैं हम 3‘ आणि "मस्तीजादे‘ या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेत एका स्वयंसेवी संस्थेने याबाबत चंडीगड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. "क्या कूल हैं हम 3‘ या चित्रपटातील 139 दृश्ये तर "मस्तीजादे‘ या चित्रपटातील 381 दृश्ये वगळून त्यांना सेन्सॉर बोर्डाने या दोन्ही चित्रपटांना "ए‘ प्रमाणपत्र दिले होते. मात्र तरीही सेन्सॉर बोर्डाने नाकारलेल्या दृश्यांसह हे दोन्ही चित्रपट इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सेन्सॉर बोर्डाला निर्देश दिले आहेत. यापुढे चित्रपट निर्मात्यांना ऑनलाईन माध्यमांसह इतर कोणत्याही माध्यमात सेन्सॉर बोर्डाने वगळलेली दृश्ये दाखविण्यात येणार नाहीत, असे प्रतिज्ञापत्र सेन्सॉर बोर्डाला लिहून द्यावे लागणार आहे. या माध्यमातून सेन्सॉर बोर्ड ऑनलाईन माध्यमही आपल्या अधिपत्याखालील आणण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.
========================================
इराणने सुटका केलेले मच्छिमार चेन्नईत दाखल
चेन्नई- आंतरराष्ट्रीय सागरी सिमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी 49 भारतीय मच्छिमारांना अटक केली होती. नुकतीच त्यांची सुटका झाली आली असून ते शहरामध्ये आज (गुरुवार) दाखल झाले आहेत.
फादर ए छुरछील्ल यांनी सांगितले की, ‘1 डिसेंबर 2015 रोजी 49 मच्छिमारांना इराणने ताब्यात घेतले होते. यामध्ये तमिळनाडू, गुजरात व दुबईमधील 5 मच्छिमारांचा समावेश होता. सर्व मच्छिमार दुबई येथील एका मच्छिमार कंपनीसाठी काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते इराणच्या ताब्यात होते. सरकारने पाठपुरावा केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर मच्छिमारांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहे.‘
फादर ए छुरछील्ल यांनी सांगितले की, ‘1 डिसेंबर 2015 रोजी 49 मच्छिमारांना इराणने ताब्यात घेतले होते. यामध्ये तमिळनाडू, गुजरात व दुबईमधील 5 मच्छिमारांचा समावेश होता. सर्व मच्छिमार दुबई येथील एका मच्छिमार कंपनीसाठी काम करत होते. गेल्या तीन महिन्यांपासून ते इराणच्या ताब्यात होते. सरकारने पाठपुरावा केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर मच्छिमारांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले आहे.‘
========================================
पेंटॅगॉनकडून हॅकर्सना हॅकिंगसाठी निमंत्रण
पेंटॅगॉनच्या सायबर व्यवस्थेमधील त्रुटी शोधून काढल्यास रोख पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या निधीची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही; मात्र व्यवस्थेमधील हुडकून काढलेला दोष जितका गंभीर असेल; तितकी पुरस्काराची रक्कम जास्त असेल, असे संकेत देण्यात आले आहेत.
"पेंटॅगॉनमधील अधिकाऱ्यांनी चाकोरीबद्ध व्यवस्थेपलीकडे विचार करावा, यासाठी माझे कायमच प्रयत्न असतात. या नव्या कार्यक्रमाच्या माध्यमामधून अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट होणार आहे,‘‘ असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाचे हे निमंत्रण केवळ अमेरिकन नागरिकांसाठीच आहे.
========================================
'भारत माता की जय' म्हणा सांगावे लागते–भागवत
नागपूर - आपल्या देशातील नव्या पिढीला “भारत माता की जय” असे म्हणा हे सांगावे लागते, ही दुर्दैवाची बाब असल्याची खंत व्यक्त करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अप्रत्यक्षरित्या जेएनयूमधील आंदोलनावर निशाणा साधला.
रेशीमबाग येथील गजानन महाराज मंदिरात मातृशक्ती पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना डॉ. भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या माजी न्यायमुर्ती मीरा खडक्कार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
डॉ. भागवत म्हणाले, “मातृशक्तीचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसावी. घरातील मातेपासून मातृभूमीपर्यंत मातेचा जयजयकार करणे ही स्वाभाविक बाब असायला हवी. पण, आपल्या देशात “भारत माता की जय” म्हणा असे सांगण्याची वेळ आज आली आहे. कारण असे म्हणू नका हे सांगणारे लोकही या देशात आहेत आणि ते जास्त दृष्टीत पडतात.”
========================================

No comments:
Post a Comment