[अंतरराष्ट्रीय]
१- वॉशिंग्टन; 'महात्मा गांधीं'बद्दल चुकीची पोस्ट टाकल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत
२- चिमुकल्यांसाठी ‘गुगल’चे सहजसोपे ‘किडल’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मोदी सरकारचा नोकरदारांना झटका, पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स
४- पेट्रोलच्या दरात भरघोस कपात, मात्र डिझेल महागलं
५- मोदींनी नितीश कुमारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
६- कन्हैय्याचा देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ नाही
७- गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तुरुंगवास
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला
९- सुटा-बुटातील प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न- सेना
१०- विरार: पोलिस ठाण्यात घुसून चार महिला पोलिसांना मारहाण
११- सूत्र न बदलल्याने महाराष्ट्राला १३ हजार कोटींचा फटका
१२- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरला आग, एकाचा मृत्यू
१३- मुंबईत नव्या बांधकामांना बंदी
१४- अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मौन - शाहरुख खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- लातूर; एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ
१६- छत्तीसगड; पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार
१७- लष्कर भरती परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमदेवारांना द्यावी लागली अंडरवेअरवर परीक्षा
१८- दौंडजवळ रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांकडून वार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- अक्षय, हृतिकला भिडण्यासाठी आमीरने 'दंगल'ची तारीख बदलली?
२०- मिरपूर; आशिया चषकात आज टीम इंडियाची श्रीलंकेशी टक्कर
२१- क्वांटिकोचा नवा प्रोमो, प्रियंकाचा बोल्ड सीन
२२- वर्षा जाधवची ‘विशेष’ नृत्यसाधना
२३- भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याची इच्छा-मलिक
२४- बहुचर्चित... बहुप्रतीक्षित शाहरुखच्या ‘फॅन’चा ट्रेलर रिलीज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
निवास खोखर, प्रतापसिंघ खोसला, आईनाथ सोनकांबळे, दिनेश कुमार, राजकुमार भुसार, मधुर वाघमारे, कुमारी मिताली, शिवाजी सावरगावे, अर्जुन यादव, विठ्ठल ताटे, सुनील माहुरे, विठ्ठल मोरे, रमेश चित्ते, सूर्या चव्हाण, बाबुराव क्षीरसागर, बहादूर गिरी, रोमकी अख्तर, हरिहर तीप्सेटवार, किशोर परदेसी, मोहम्मद अथर, दिनकर जाधव, प्रवीण बरलावार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानकाळाच्या त्यागातून निर्माण होत असतो
(ईश्वर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
====================================

नोकरदारांनी रिटायरमेंट फंडमध्ये आपले पैसे गुंतवून ठेवावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक सेवा आणि ईपीएफओतर्फे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सर्व्हिस टॅक्समधून सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. ही सूट 1 एप्रिल 2016 पासून लागू होईल. आतापर्यंत त्यावर 14 टक्के कर आकारला जात होता.
====================================

====================================

====================================

====================================

====================================

====================================

====================================

====================================
====================================
====================================
====================================
====================================
====================================
चिमुकल्यांसाठी ‘गुगल’चे सहजसोपे ‘किडल’
मुंबईत नव्या बांधकामांना बंदी
वर्षा जाधवची ‘विशेष’ नृत्यसाधना

भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याची इच्छा-मलिक

अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मौन - शाहरुख खान
मुंबई - देशात अहिष्णुता वाढत असल्याच्या वक्तव्यावरून टीकेचा धनी बनलेला अभिनेता शाहरुख खान याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ मौन राखण्याचा अधिकारही होत असल्याचे म्हटले आहे.
सुटा-बुटातील प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न- सेना

मुंबई - शेती, सिंचन आणि ग्रामविकास यासाठी अर्थसंकल्पात ज्या भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या पाहता "सुटा-बुटातील सरकार‘ ही प्रतिमा पुसण्याचा काही अंशी का होईना प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे, हे मान्य करावेच लागेल. अशा शब्दांत शिवसेनेने "सामना‘ या अग्रलेखाद्वारे अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
यापूर्वी रेल्वेच्या अर्थसंकल्पाचेही "प्रयत्नांचा संकल्प‘ असल्याचे म्हणत शिवसेनेने स्वागत केले होते. त्यानंतर आता सोमवारी अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सेनेने स्वागत केले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, "देशातील सर्वात कष्टात जीवन जगणाऱ्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्याचे काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या केंद्रीय सरकारला शेतकरीविरोधी ठरवून हे "सुटा-बुटातले सरकार‘ आहे, असा शिक्का विरोधकांनी मारला होता. हे सामान्यांचे नव्हे तर मूठभर उद्योगपतींचे सरकार आहे, अशी हवा निर्माण करण्यात विरोधक थोडेफार का होईना यशस्वी झाले होते. बिहारच्या निवडणुकांतही त्याची चुणूक दिसली. या आरोपांची नोंद केंद्रीय सरकारने घेतली असावी, असेच अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या "शेतीनिष्ठ‘ अर्थसंकल्पावरून वाटते. शेती, सिंचन आणि ग्रामविकास यासाठी अर्थसंकल्पात ज्या भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या पाहता "सुटा-बुटातील सरकार‘ ही प्रतिमा पुसण्याचा काहीअंशी का होईना प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे हे मान्य करावेच लागेल. जेटली यांनी "जेट‘ विमानाच्या उड्डाणाप्रमाणे शेतीच्या प्रगतीचे आणि वेगवान विकासाचे सुंदर चित्र अर्थसंकल्पात रेखाटले आहे. ते प्रत्यक्षात उतरायला हवे!‘
====================================
दौंडजवळ रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांकडून वार
कन्हैय्याचा देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ नाही
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशविरोधी घोषणा देत असतानाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी दिली.
कन्हैय्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला कन्हैय्या कुमारने जामीनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयासमोर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान न्यायाधीश प्रतिमा राणी यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली. "कन्हैय्या देशविरोधी घोषणा देत असल्याचा व्हिडिओ आहे का?‘ असा प्रश्न न्यायालयाने अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला. त्यावर दिल्ली पोलिसांच्या वतीने उत्तर देताना मेहता यांनी अशाप्रकारचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. तसेच ज्यावेळी देशविरोधी घोषणा देण्यात येत होत्या त्यावेळी तेथे खाजगी वेशात हजर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांनी काही कारवाई का नाही केली, अशी विचारणाही केली. तसेच कन्हैय्या कुमारच्या जामीनावर सुनावणी 2 मार्चपर्यंत लांबणीवर टाकला.
====================================
गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तुरुंगवास

नवी दिल्ली - शासकीय दुकानांचे वितरण करताना केलेल्या गैरव्यवहाराबद्दल माजी केंद्रीय मंत्री पी. के. थुंगॉन यांना साडे तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
यापूर्वी 1998 साली थुंगॉन यांनी नागालॅण्डमधील सिंचन प्रकल्पासाठी आलेल्या केंद्राच्या निधीचा गैरवापर केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यासह अन्य तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये थुंगॉन यांना जुलै 2015 साली साडेचार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे थुंगॉन हे सध्या तुरुंगातच आहेत. 1993-94 साली शासकीय दुकानांच्या वितरणामध्ये केलेल्या गैरव्यवहारप्रकरणीही ते दोषी ठरले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर त्यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. थुंगॉन यांना न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच गुन्हेगारी कट केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
====================================
भारत-पाक सामना धर्मशाळात नको-मुख्यमंत्री
शिमला - ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा सामना धर्मशाळात नको, अशी मागणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांनी केली आहे.
====================================
====================================
१- वॉशिंग्टन; 'महात्मा गांधीं'बद्दल चुकीची पोस्ट टाकल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत
२- चिमुकल्यांसाठी ‘गुगल’चे सहजसोपे ‘किडल’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मोदी सरकारचा नोकरदारांना झटका, पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स
४- पेट्रोलच्या दरात भरघोस कपात, मात्र डिझेल महागलं
५- मोदींनी नितीश कुमारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
६- कन्हैय्याचा देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ नाही
७- गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तुरुंगवास
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला
९- सुटा-बुटातील प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न- सेना
१०- विरार: पोलिस ठाण्यात घुसून चार महिला पोलिसांना मारहाण
११- सूत्र न बदलल्याने महाराष्ट्राला १३ हजार कोटींचा फटका
१२- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरला आग, एकाचा मृत्यू
१३- मुंबईत नव्या बांधकामांना बंदी
१४- अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मौन - शाहरुख खान
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- लातूर; एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ
१६- छत्तीसगड; पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार
१७- लष्कर भरती परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमदेवारांना द्यावी लागली अंडरवेअरवर परीक्षा
१८- दौंडजवळ रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांकडून वार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- अक्षय, हृतिकला भिडण्यासाठी आमीरने 'दंगल'ची तारीख बदलली?
२०- मिरपूर; आशिया चषकात आज टीम इंडियाची श्रीलंकेशी टक्कर
२१- क्वांटिकोचा नवा प्रोमो, प्रियंकाचा बोल्ड सीन
२२- वर्षा जाधवची ‘विशेष’ नृत्यसाधना
२३- भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याची इच्छा-मलिक
२४- बहुचर्चित... बहुप्रतीक्षित शाहरुखच्या ‘फॅन’चा ट्रेलर रिलीज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
निवास खोखर, प्रतापसिंघ खोसला, आईनाथ सोनकांबळे, दिनेश कुमार, राजकुमार भुसार, मधुर वाघमारे, कुमारी मिताली, शिवाजी सावरगावे, अर्जुन यादव, विठ्ठल ताटे, सुनील माहुरे, विठ्ठल मोरे, रमेश चित्ते, सूर्या चव्हाण, बाबुराव क्षीरसागर, बहादूर गिरी, रोमकी अख्तर, हरिहर तीप्सेटवार, किशोर परदेसी, मोहम्मद अथर, दिनकर जाधव, प्रवीण बरलावार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
उद्याचा भविष्यकाळ वर्तमानकाळाच्या त्यागातून निर्माण होत असतो
(ईश्वर देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
====================================
एका हाताने दुष्काळ गाडणारा 76 वर्षांचा ढाण्या वाघ
लातूर: लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं 1972 आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. 76 वर्षाचा हा शेतकरी एका हातावर 45 वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. स्वत:च्या कष्टावर निव्वळ शेतीतून साम्राज्य उभ्या केलेल्या या शेतकऱ्याचं शेतकऱ्यांना आवाहन आहे. आत्महत्येचा विचार जरी मनात आला तर फक्त एकदा माझ्याकडं या, तुमचे विचार गळून पडतील.महादेवअप्पा चिद्रे…अपघातात खांद्यापासून एक हात गमावलाय. पण जिद्दीच्या जोरावर…45 वर्षाच्या सरावानं, एक हाताने हे काय काय करत नाही, तेही विना अपघात..
बुलेट…चार चाकी..ट्रॅक्टर…घोड्यावर रपेट ही कामं महादेवअप्पा सहज करतात. 76 वर्षाच्या अप्पांना आजही ओव्हर टेक करून कोणीही पुढं गेल्याचं चालत नाही.
अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं दवणहिप्परगा. कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला. त्या वर्षी 72 चा तीव्र दुष्काळ होता. अचानक वडील वारले. आई एकटी. घरात पाच बहिणी. डॉक्टरांनी हात खांद्यापासून काढून टाकला. पीढीजात 40 एकर शेतात गवत आणि झाडं-झुडपं होती. अशावेळी अप्पा खचले नाहीत. हातात कुदळ घेतली..एका हाताचे चार हाथ केले..
====================================अप्पांचं गाव लातूर जिल्ह्यातलं देवणी तालुक्यातलं दवणहिप्परगा. कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला. त्या वर्षी 72 चा तीव्र दुष्काळ होता. अचानक वडील वारले. आई एकटी. घरात पाच बहिणी. डॉक्टरांनी हात खांद्यापासून काढून टाकला. पीढीजात 40 एकर शेतात गवत आणि झाडं-झुडपं होती. अशावेळी अप्पा खचले नाहीत. हातात कुदळ घेतली..एका हाताचे चार हाथ केले..
मोदी सरकारचा नोकरदारांना झटका, पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स
नवी दिल्ली : अर्थसंकल्पातून मोदी सरकारने नोकरदार वर्गाला मोठा झटका दिला आहे. पीएफ काढताना आता तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. एक एप्रिल 2016 पासून पीएफ काढताना 60 टक्के रकमेवर टॅक्स वसूल केला जाईल.
2016-17 वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी याबाबत घोषणा केली. या निर्णयाचा फटका तब्बल 6 कोटी नोकरदारांना बसणार आहे. आतापर्यंत पाच वर्षांच्या सलग सेवाकाळानंतर ईपीएफ खात्यातून रक्कम काढताना कोणताही कर भरावा लागत नसे. पीएफमधून काढलेली 60 टक्के रक्कम ही तुमच्या त्या वर्षीच्या नियमित करपात्र उत्पन्नात जोडली जाईल. यामुळे तुमचे टॅक्स स्लॅब बदलू शकतात.
पुढील महिन्यापासून पीएफ खात्यामधून काढलेली 60 टक्के रक्कम टॅक्सेबल असेल, तर 40 टक्के रकमेवर सूट मिळेल. ईपीएफओ प्रमाणेच इतर मान्यताप्राप्त पीएफ स्कीममधून रक्कम काढतानाही 1 एप्रिल 2016 पासून हा नियम लागू होईल.2016-17 वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री अरुण जेटलींनी याबाबत घोषणा केली. या निर्णयाचा फटका तब्बल 6 कोटी नोकरदारांना बसणार आहे. आतापर्यंत पाच वर्षांच्या सलग सेवाकाळानंतर ईपीएफ खात्यातून रक्कम काढताना कोणताही कर भरावा लागत नसे. पीएफमधून काढलेली 60 टक्के रक्कम ही तुमच्या त्या वर्षीच्या नियमित करपात्र उत्पन्नात जोडली जाईल. यामुळे तुमचे टॅक्स स्लॅब बदलू शकतात.
नोकरदारांनी रिटायरमेंट फंडमध्ये आपले पैसे गुंतवून ठेवावेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचं या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वार्षिक सेवा आणि ईपीएफओतर्फे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवेत सर्व्हिस टॅक्समधून सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. ही सूट 1 एप्रिल 2016 पासून लागू होईल. आतापर्यंत त्यावर 14 टक्के कर आकारला जात होता.
राज्यात आजपासून दहावीची परीक्षा, 17 लाख विद्यार्थी परीक्षेला
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडण्याच्या दृष्टीने ‘टर्निंग पॉइंट’ समजली जाणारी दहावीची लेखी परीक्षा आजपासून सुरु होत आहे. राज्यभरात जवळपास साडे सतरा लाख विद्यार्थी एसएससीच्या परीक्षेला बसणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील परीक्षा घेतली जाते. या विभागां अंतर्गत 4 हजार केंद्रांवर परीक्षा व्यवस्था केली आहे. मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी सात याप्रमाणे 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. ‘एबीपी माझा’ तर्फे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना परीक्षेसाठी शुभेच्छा!
अक्षय, हृतिकला भिडण्यासाठी आमीरने 'दंगल'ची तारीख बदलली?
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान त्याच्या आगामी चित्रपटांच्या तारखा वर्षभर आधीपासूनच ठरवतो. तारें जमीं पर, 3 इडियट्स, धूम 3, पीके सारखे काही चित्रपट आमीरने ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा धडाका लावला होता. वर्षाला एखादाच चित्रपट करणारा हा सुपरस्टार सिनेमाच्या रिलीजच्या तारखा आधीच निश्चित करतो. अगदी आगामी दंगलच्या बाबतीतही त्याने तेच केलं होतं, मात्र…
23 डिसेंबर 2016 रोजी दंगल चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त निश्चित झाला होता. मात्र आता आमीरने चक्क तारीख बदलण्याचं निश्चित केल्याचं वृत्त आहे. हृतिक रोशन आणि अक्षयकुमार या बॉलिवूडमधील तितक्याच ताकदीच्या सुपरस्टारला आमीर भिडणार आहे. अक्षयचा रुस्तम आणि हृतिकचा मोहंजोदारो 12 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहेत.
आमीरने आपल्या चित्रपटाची तारीख काही दिवस नाही, तर तब्बल चार महिने अलिकडची निवडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आमीरने हा बदल नेमका का केला, याबाबत कोणताही खुलासा नाही.
जाणकारांच्या मते, हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित मोहंजोदारो चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाऊ शकतो. मोहंजोदारो आणि दंगल हे दोन्ही चित्रपट यूटीव्हीच्या बॅनरखाली तयार झाल्यामुळे एकाच आठवड्यात हे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, आपापसात स्पर्धा करणार नाहीत, अशी अटकळ आहे.
दुसरीकडे अक्षयकुमार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिनाच्या आसपास चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा निवडतो. बेबी, ब्रदर्स, एअरलिफ्ट सारखे चित्रपट त्याने राष्ट्रीय सणांच्या आसपास प्रदर्शित केल्यामुळे अक्षय मात्र याच तारखेवर ठाम राहण्याची शक्यता आहे.
आशिया चषकात आज टीम इंडियाची श्रीलंकेशी टक्कर
मिरपूर: बांगलादेश आणि मग पाकिस्तानला लोळवणारी टीम इंडिया आता सज्ज झालीय श्रीलंकेचा मुकाबला करण्यासाठी. बांगलादेशातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाचा आज श्रीलंकेशी सामना होत आहे. मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याची सुरूवात होईल.
मिरपूरच्या मैदानात विराट कोहलीनं एक खिंड लढवली म्हणूनच भारताला पाकिस्तानवर विजय मिळवता आला होता. त्यामुळं श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया आपलं नाक कापलं जाणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेईल.
आशिया चषकातल्या सलामीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मिळवलेल्या विजयानं धोनी ब्रिगेडचा आत्मविश्वास उंचावला आहे. दुसरीकडे श्रीलंकेनं युएईला नमवून विजयी सलामी दिली खरी, पण यजमान बांगलादेशकडून श्रीलंकेला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
बांगलादेशकडून झालेला हा पराभव श्रीलंकेच्या शिलेदारांच्या जिव्हारी लागला आहे. त्यात नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं श्रीलंकेला 2-1 असं हरवलं होतं. त्यामुळं श्रीलंका संघ ताज्या पराभवांची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. धोनीच्या टीम इंडियाला ती बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.
पेट्रोलच्या दरात भरघोस कपात, मात्र डिझेल महागलं
नवी दिल्ली : अर्थसंकल्पानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलच्या दरात भरघोस कपात केली आहे. पेट्रोल 3.02 रुपयांनी स्वस्त झालं आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होती.
दरम्यान, पेट्रोलचे दर कमी करतानाच सरकारने डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेल प्रतिलिटर 1.47 रुपयांनी महागलं आहे.
पेट्रोलचे जुने दर
शहर दर
दिल्ली 59.63
कोलकाता 64.64
मुंबई 65.73
चेन्नई 59.10
दिल्ली 59.63
कोलकाता 64.64
मुंबई 65.73
चेन्नई 59.10
डिझेलचे जुने दर
शहर दर
दिल्ली 44.96
कोलकाता 48.33
मुंबई 51.52
शहर दर
दिल्ली 44.96
कोलकाता 48.33
मुंबई 51.52
क्वांटिकोचा नवा प्रोमो, प्रियंकाचा बोल्ड सीन
वॉशिंग्टन: अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या नव्या प्रोमोमध्येही प्रिंयका चोप्राच्या हॉट सीनचा सिलसिला सुरुच आहे. त्यामुळे आता या नव्या प्रोमोमध्येही प्रियंकाच्या हॉट अदा पाहायला मिळणार आहे. ‘क्वांटिको’ टीव्ही मालिकेमुळे अमेरिकेत प्रियंका बरीच चर्चेत आहे. या मालिकेत प्रियंकानं एफबीआय अधिकारी एलेक्स पेरिश नावाच्या एका तरुण महिला अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेतील आपल्या अभिनयानं प्रियंकानं जागतिक पातळीवर आपली दखल घ्यायला लावली. दरम्यान, प्रिंयकाला ‘पीपल्स च्वॉईस’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
विरार: पोलिस ठाण्यात घुसून चार महिला पोलिसांना मारहाण
पालघर: विरारमध्ये चार महिला पोलिसांना स्टेशनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. अर्नाळा सागरी पोलिस स्टेशनमध्ये ही दोन बहिणींनी पोलिसांना मारहाण केली. प्रज्ञा सिंह आणि गार्गी सिंह अशी या आरोपी महिलांची नावं आहे.
या दोन बहिणींनी अर्नाळा सागरी पोलिस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी करण्यासाठी संध्याकाळी 6.30 ला त्या पोलिस ठाण्यात आल्या होत्या. पण तिथे येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आमची तक्रार हिंदी किंवा इंग्लिशमध्ये का घेतली नाही, असा बोलत गोंधळ घातला. शिवाय अश्लिल शिवीगाळ करु लागल्या.
त्यांचा गोंधळ वाढल्यानंतर महिला पोलिस रुपाली भोईर त्यांना समजावू लागल्या. परंतु या बहिणींनी त्यांना धक्काबुक्की केली. हे पाहताच इतर महिला पोलिस कर्मचारी तिथे आल्या. त्यानंतर या आरोपी बहिणींनी जयंती राजगुरु आणि अवती मनीषा यांच्या हातावर चावा घेतला. तर राजगुरु यांच्या पायालाही चावा घेतला.
दरम्यान, पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण करणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
बहुचर्चित... बहुप्रतीक्षित शाहरुखच्या ‘फॅन’चा ट्रेलर रिलीज
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या आगामी ‘फॅन’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. एका चाहत्याची आपल्या रोल मॉडेलला भेटण्याची धडपड या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
आधी पोस्टर, त्यानंतर ‘जबरा..जबरा..’ हे गाणं आणि आता ट्रेलर…. गेल्या काही दिवसांपासून सिनेरसिक ‘फॅन’च्या ट्रेलरची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘फॅन’च्या ट्विटर हँडलवरुन ट्रेलर रिलीज करण्यात आला असून यू ट्यूबवर या ट्रेलरने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.
या सिनेमात शाहरुख मुख्य भूमिकेत असून फॅनच्या रोलमध्ये शाहरुख कमी वयाचा दाखवण्यात आला आहे. शाहरुख ‘आर्यन खन्ना’ नावाची भूमिका साकारत असून, त्याचा ‘फॅन’ गौरव असतो.
यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘फॅन’चं दिग्दर्शन मनीश शर्मा आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.
पाहा ट्रेलर :
छत्तीसगडमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार
- रायपूर, दि. १ - छत्तीसगड-तेलंगणच्या सीमेवर आज झालेल्या चकमकीत पोलिसांनी ८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. हे नक्षलवादी छत्तीसगड येथून खम्ममच्या दिशेने जात असल्याचे माहिती मिळताचा पोलिसांनी सापळा रचून त्यांना घेरले. नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार करताच पोलिसांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले, त्यात ८ नक्षलवादी ठार झाले. दरम्यान नक्षलवादी व पोलिसांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याचे समजते.सविस्तर वृत्त लवकरच
लष्कर भरती परीक्षेदरम्यान चीटिंग टाळण्यासाठी उमदेवारांना द्यावी लागली अंडरवेअरवर परीक्षा
- मुझफ्फरपूर, दि. १ - लष्कर वा पोलिसांच्या भरती परीक्षेदरम्यान तुम्ही उमेदवारांना हाफ पँटमध्ये मध्ये धावताना अनेक वेळा पाहिलं असेल मात्र बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये लष्कराच्या परीक्षेदरम्यान एक वेगळाच नजारा बघायला मिळाला. हे उमेदवार केवळ अंतर्वस्त्र घालून परीक्षा देत होते, परीक्षेदरम्यान कोणीही चीटिंग अथवा कॉपी करू नये यासाठी लष्करातर्फेच हा धक्कादायक आदेश देण्यात आला होता.रविवारी मुझफ्फरपूरमध्ये लष्करात क्लार्क भरती करण्यासाठी परीक्षा घेण्यात आली, सुमारे ११५० उमेदवार या परीक्षेसाठी बसले होते. मात्र परीक्षा केंद्रावर सर्व उमदेवारांना अंतर्वस्त्र वगळता अंगावरील सर्व कपडे काढून तशीच परीक्षा देण्याचा आदेश लष्कराच्या अधिका-यांतर्फे देण्यात आला. परीक्षेच्या तणावात असलेल्या सर्व उमेदवारांना या आदेशामुळे धक्काच बसला.गेल्या वेळी घेण्यात आलेल्या परीक्षेत अनेक उमदेवार कॉपी करताना आढळले होते, यावेळेस त्या प्रकाराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व कोणीही कॉपी करू नये यासाठीच असा आदेश दिल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.या आदेशामुळे सर्व उमदेवारांना खुल्या मैदानात अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर बसून उत्तरपत्रिका लिहावी लागली. जमीन ओबडधोबड असल्याने अनेकांना उत्तर लिहीताना बराचा त्रासही झाला.
मोदींनी नितीश कुमारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- नवी दिल्ली, दि. १ - देशोदेशींच्या राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची असणारी मैत्रीपूर्ण जवळीक हा चर्चेचा विषय आहे आणि एका चांगल्या मित्राप्रमाणे ते त्यांना वाढदिवस वा विशेष प्रसंगानिमित्त शुभेच्छाही देत असतात. त्याचप्रमाणे आज मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांना दिर्घाआयुष्य लाभो आणि त्यांचे स्वास्थ ठिक राहावे असेही म्हटले आहे.
'महात्मा गांधीं'बद्दल चुकीची पोस्ट टाकल्याने डोनाल्ड ट्रम्प अडचणीत
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. १ - भारताचे राष्ट्रपिता 'महात्मा गांधी'चा चुकीचा कोट टाकल्याने अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत. ट्रम्प यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक पोस्ट टाकली असून ते महात्मा गांधी यांचे वाक्य असल्याचे नमूद केले आहे, मात्र त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटला असून गांधीजींनी असे कधीच म्हटले नव्हते असा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे." प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर ते तुमच्यावर हसतील आणि मग ते तुमच्याशी भांडतील, (मात्र) अखेर तुमचा विजय होईल - महात्मा गांधी"... अशी पोस्ट अनेक वादग्रस्त विधानासांठी चर्चेत असलेल्या ट्रम्प यांनी समर्थकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मात्र हे वाक्य गांधीजींचे नाहीच, त्यांनी असे कधीही म्हटले नव्हते असा दावा अमेरिकी मीडियाने केला असून चुकीची पोस्ट शेअर केल्याबद्दल ट्रम्प यांची खिल्ली उडवली जात आहे.
सूत्र न बदलल्याने महाराष्ट्राला १३ हजार कोटींचा फटका
- अर्थसंकल्पात राज्यांबाबत मदतीचे सूत्र केंद्र सरकारने न बदलल्याने महाराष्ट्राला यंदाही १३ हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने काही योजना रद्द केल्याने आणि काही योजनांमधील आपला वाटा कमी केल्याने राज्याच्या तिजोरीवर हा भार पडणार आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ६ फेब्रुवारीला देशातील वित्तमंत्र्यांची एक बैठक नवी दिल्लीत बोलविली होती. महाराष्ट्राच्या वतीने वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर या बैठकीत सहभागी झाले होते. तीत, केंद्र पुरस्कृत योजनांसाठी आर्थिक वाटपाची जुनीच पद्धत कायम ठेवत केंद्र सरकारने राज्याला वाढीव वाटा द्यावा, अशी मागणी केसरकर यांनी केली होती. मोदी सरकारने निधी वाटपाचे नवे सूत्र आणत अनेक योजनांमधील केंद्रीय वाटा कमी केला आहे. त्याचा फटका गेल्या वर्षी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही बसला होता. यंदा तब्बल १२ हजार ९७० कोटी रुपयांची मदत त्यामुळे कमी होण्याची भीती केसरकर यांनी त्या बैठकीत व्यक्त केली होती. एलबीटी रद्द केल्याने राज्य सरकारला ६ हजार कोटी रुपयांचे अनुदान महापालिकांना द्यावे लागले आहे. टोलमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर १२०० कोटी रुपयांचा भार पडला आहे. तर, दुष्काळ निवारणासाठी आतापर्यंत ४ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे जवळपास ११ हजार २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडला आहे. अशा परिस्थितीत आर्थिक कसरत करीत असलेल्या राज्य सरकारला मदतीचे सूत्र केंद्र सरकार बदलेल अशी आशा होती पण ती फोल ठरली आहे.
- ====================================
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकरला आग, एकाचा मृत्यू
- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली येथे एका तेलाच्या टँकरला लागलेल्या आगीत चालकाचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की चालक जागीच जळून खाक झाला. खोपोली येथे आडोशी गावाजवळ सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली. टँकरच्या केबिनमध्ये लागलेली आग क्षणार्धात पसरली आणि संपूर्ण टँकर जळला. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती कळू शकलेली नाही.
चिमुकल्यांसाठी ‘गुगल’चे सहजसोपे ‘किडल’
इंटरनेट अर्थात माहिती महाजालाचे लहान मुलांमध्ये वाढते आकर्षण लक्षात घेऊन ‘गुगल’ या लोकप्रिय सर्च इंजिन कंपनीने लहान मुलांसाठी खास ‘किडल’ नावाने सर्च इंजिन सुरू केले आहे. इंटरनेट लर्निंगच्या हल्लीच्या जगात लहान मुलांमध्ये इंटरनेटच अप्रूप असतं. पण इंटरनेटवर आता प्रौढ आशय सर्च करण्याचे प्रमाण वाढले असल्याने पालक आपल्या चिमुकल्याच्या इंटरनेटवरील वावराबाबत साशंक असतात. इंटरनेटवर चांगल्याखेरीज अनेक वाईट गोष्टींचाही भरणा आहे. त्यामुळे इंटरनेटपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी कित्येक पालक धडपडत असतात, किंबहुना तसा त्यांचा आग्रहच असतो. पण त्यांच्या मदतीला गुगल धावून आलंय. ‘गुगल’ने सुरू केलेल्या ‘किडल’ या खास लहान मुलांसाठीच्या सर्च इंजिनवर कोणत्याही प्रकारच्या प्रौढ आशय सर्च होत नाही. या सर्च इंजिनवर सर्व प्रकारच्या पोर्न साईट्स आणि छायाचित्रांना प्रतिबंध करण्यात आला आहे. ‘किडल’मुळे मुलांवर कोणतीही बंधनं न घालता मुलांना त्यांच्या अपेक्षांप्रमाणे (व तुम्हाला कोणतीही काळजी न लावता) इंटरनेट वापरता येईल, अशी सोय गुगल कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. ‘किडल’वर शोध घेऊन काढण्यात आलेला कोणताही मजकूर वा चित्र, चित्रफीत ही मुलांच्या दर्जाचीच असेल. हा मजकूर, चित्र, चित्रफीत हे ‘किडल’चे संपादक आधी स्वत: निवडून घेतील आणि तो शाळकरी वयाच्या मुलांच्या दर्जाचा आहे की नाही याची खातरजमा करतील. अशाप्रकारे, किडलमधून उपलब्ध होणारा मजकूर (साईट्स व पेजेस) विशेष चाळणीमधून जाणार आहे. त्यामुळे ज्या पालकांच्या अपरोक्ष मुलं इंटरनेट वापरतात, त्या पालकांनी आता निर्धास्त राहायला हरकत नाही.
====================================मुंबईत नव्या बांधकामांना बंदी
मुंबईतील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच २०१९ पर्यंत तरी ही स्थिती बदलण्याची चिन्हे नाहीत, असा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबईतील नव्या बांधकामांना बंदी घालण्याचे आदेश दिले. पुनर्विकास बांधकामांना न्यायालयाने अभय दिले असले तरी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. १ मार्चपासून हा आदेश लागू होईल आणि कचरा व्यवस्थापन नियम व आदेशांची अंमलबजावणी होईपर्यंत ही बंदी अशीच राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील कचराभूमीची संपत चाललेली क्षमता आणि पर्यायी जागा देण्यास राज्य सरकारकडून केली जाणारी टाळाटाळ यासाठी पालिकेने उच्च न्यायालयात धाव घेत देवनार व मुलुंड कचराभूमीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने या याचिकेवर निकाल देताना पालिकेची ही मागणी मान्य करत दोन्ही कचराभूमींना ३० जून २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्याच वेळेस मुंबईतील नव्या बांधकामांना बंदी घातली. नव्या बांधकामांसाठीचे अर्ज आल्यास त्यावरील प्रक्रिया पालिका सुरू करू शकते. मात्र या बांधकामांना आवश्यक असलेले आयओडी आणि सीसी प्रमाणपत्र दिले जाऊ नये. शिवाय कचरा व्यवस्थापनाबाबतच्या विविध योजनांबाबत सरकारने विकास नियमावलीमध्ये दुरुस्ती केली. तरी कचरा व्यवस्थापनाचे नियम आणि न्यायालयाने त्याबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी केली जात नाही तोपर्यंत विकास नियमावलीतली दुरुस्तीचीही अंमलबजावणी करू नये, असेही न्यायालयाने सरकारला बजावले आहे.
====================================वर्षा जाधवची ‘विशेष’ नृत्यसाधना
पिंपरी - हो! ती ‘विशेष’ विद्यार्थिनी आहे आणि तिची नृत्यकलाही ‘विशेष’ म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांच्या तोडीस तोड आहे. सलग चार वर्षे सेमी क्लासिकल नृत्यप्रशिक्षण घेत वर्षा जाधव (वय १३) या संत तुकारामनगर येथील विशेष विद्यार्थिनीने अवाक् करणारे नृत्यकौशल्य आत्मसात केले आहे. ‘आम्हा विशेष विद्यार्थ्यांना संधी दिल्यास आम्हीही तुमच्यापेक्षा कमी नाही’ हाच संदेश विशेष मुलांच्या पालकांना वर्षाच्या नृत्यातून मिळतो.
वर्षा संभाजीनगर-चिंचवड येथील साई संस्कार संस्था मतिमंद विद्यालयात चौथीत शिकते. तिची आई गृहिणी, वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. वर्षा सध्या ५० टक्के विशेष आहे (आधी ५९ टक्के होते). तिचे मतिमंदत्व ‘डाउन सिंड्रोम’ या प्रकारचे आहे. ती चांगले नृत्य करत असल्याने शाळेच्या स्नेहसंमेलनातही तिचा नेहमी सहभाग असायचा. तिची नृत्याची आवड पाहून पालकांनी नृत्यवर्गाला घातले अन् नृत्यात तिने गती घेतली आहे. वर्षाचे नृत्य पाहताना तिला विशेष म्हणायचे का? असा प्रश्न पडतो.
====================================भारताविरुद्ध अंतिम सामना खेळण्याची इच्छा-मलिक
मीरपूर - आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तरी, अंतिम सामन्यात भारताविरुद्धच खेळण्याची पाकिस्तानी खेळाडूंची इच्छा असल्याचे, पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने म्हटले आहे.
साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव केला होता. भारताने पाकिस्तानचा डाव अवघ्या 83 धावांत संपुष्टात आणला होता. या पराभवानंतर पाकिस्तानने यूएई संघाचा सात गडी राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला आहे. पाकिस्तानचा अद्याप बांगलादेश आणि श्रीलंका संघाशी सामना शिल्लक आहे. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
मलिक म्हणाला की, शेर-ए-बांगला स्टेडियममधील खेळपट्टीशी जुळवून घेण्यात आम्ही असमर्थ ठरलो होतो. त्यामुळे आम्हाला भारताविरुद्ध साखळी फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण, आता संघातील प्रत्येक खेळाडू अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. पराभवानंतर आम्ही निराश झालो होतो, पण आता प्रत्येकजण अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रय़त्नशील आहे.
====================================अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मौन - शाहरुख खान
शाहरुख खान आपल्या आगामी ‘फॅन‘ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात बोलत होता. शाहरुखने देशात असहिष्णुता वाढत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपण असे बोललो नसल्याचे म्हटले होते. आता शाहरुखने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मत व्यक्त केले आहे.
शाहरुख अनुभवाच्या बाबतीत विचारले असता त्याने हे वक्तव्य केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत मी खूप शांत आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकता नाईट रायडर्स यांच्यातील सामना सुरु असताना मी फक्त आऊट एवढेच बोलू शकतो.
====================================सुटा-बुटातील प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न- सेना
मुंबई - शेती, सिंचन आणि ग्रामविकास यासाठी अर्थसंकल्पात ज्या भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या पाहता "सुटा-बुटातील सरकार‘ ही प्रतिमा पुसण्याचा काही अंशी का होईना प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे, हे मान्य करावेच लागेल. अशा शब्दांत शिवसेनेने "सामना‘ या अग्रलेखाद्वारे अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
यापूर्वी रेल्वेच्या अर्थसंकल्पाचेही "प्रयत्नांचा संकल्प‘ असल्याचे म्हणत शिवसेनेने स्वागत केले होते. त्यानंतर आता सोमवारी अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सेनेने स्वागत केले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, "देशातील सर्वात कष्टात जीवन जगणाऱ्या शेतकरीवर्गाला दिलासा देण्याचे काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या केंद्रीय सरकारला शेतकरीविरोधी ठरवून हे "सुटा-बुटातले सरकार‘ आहे, असा शिक्का विरोधकांनी मारला होता. हे सामान्यांचे नव्हे तर मूठभर उद्योगपतींचे सरकार आहे, अशी हवा निर्माण करण्यात विरोधक थोडेफार का होईना यशस्वी झाले होते. बिहारच्या निवडणुकांतही त्याची चुणूक दिसली. या आरोपांची नोंद केंद्रीय सरकारने घेतली असावी, असेच अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या "शेतीनिष्ठ‘ अर्थसंकल्पावरून वाटते. शेती, सिंचन आणि ग्रामविकास यासाठी अर्थसंकल्पात ज्या भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत त्या पाहता "सुटा-बुटातील सरकार‘ ही प्रतिमा पुसण्याचा काहीअंशी का होईना प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे हे मान्य करावेच लागेल. जेटली यांनी "जेट‘ विमानाच्या उड्डाणाप्रमाणे शेतीच्या प्रगतीचे आणि वेगवान विकासाचे सुंदर चित्र अर्थसंकल्पात रेखाटले आहे. ते प्रत्यक्षात उतरायला हवे!‘
====================================
दौंडजवळ रेल्वेत प्रवाशांवर चोरट्यांकडून वार
दौंड - दौंड रेल्वे स्थानकाबाहेर आज (सोमवार) पहाटे हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये दौंडजवळ चाेरट्यांकडून दाेन महिला प्रवाशांवर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. चाेरट्यांनी दौंड स्थानकापासूनच या मायलेकींवर पाळत ठेवली हाेती. रेल्वे अर्थसंकल्पात सुरक्षेवर भर देण्यात आला असताना हा प्रकार झाला आहे.
आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या हावडा-पुणे एक्स्प्रेसनेे दौंड रेल्वे स्थानक साेडल्यावर दौंड-पुणे लाेहमार्गाच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळील आऊटरला गाडीतील ३ ते ४ तरूणांनी समिक्षा सिन्हा व तिची आई या मायलेकींवर पाळत ठेवली. दाेघींशिवाय तिसरा कोेणी नाही आणि त्यांच्याकडील वस्तू पाहून त्यांनी गाडीची चेन आेढली. गाडी स्लाे हाेताच त्यांनी बाहेरून खिडकीत हात घालून त्यांच्याकडील वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केल्याने दाेघींच्या हातावर, बेटांवर व दंडावर चाकूने वार करून त्यांनी बँग पळवून नेली. वार केल्याने डब्ब्यात माेठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अवघ्या काही मिनिटांमध्ये अंधारात हा प्रकार झाल्याने मायलेकी प्रचंड भेदरल्या आहेत. सहप्रवासी व दौंड-पुणे-दौंड असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले.
चोरीस गेलेल्या एेवजाची नेमकी माहिती उपलब्ध नाही. दाेघींवर दौंड शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
====================================कन्हैय्याचा देशविरोधी घोषणांचा व्हिडिओ नाही
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशविरोधी घोषणा देत असतानाचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी दिली.
कन्हैय्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला कन्हैय्या कुमारने जामीनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयासमोर सोमवारी सुनावणी झाली. दरम्यान न्यायाधीश प्रतिमा राणी यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून माहिती मागवली. "कन्हैय्या देशविरोधी घोषणा देत असल्याचा व्हिडिओ आहे का?‘ असा प्रश्न न्यायालयाने अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांना विचारला. त्यावर दिल्ली पोलिसांच्या वतीने उत्तर देताना मेहता यांनी अशाप्रकारचा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. तसेच ज्यावेळी देशविरोधी घोषणा देण्यात येत होत्या त्यावेळी तेथे खाजगी वेशात हजर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांनी काही कारवाई का नाही केली, अशी विचारणाही केली. तसेच कन्हैय्या कुमारच्या जामीनावर सुनावणी 2 मार्चपर्यंत लांबणीवर टाकला.
====================================
गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला तुरुंगवास
नवी दिल्ली - शासकीय दुकानांचे वितरण करताना केलेल्या गैरव्यवहाराबद्दल माजी केंद्रीय मंत्री पी. के. थुंगॉन यांना साडे तीन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
यापूर्वी 1998 साली थुंगॉन यांनी नागालॅण्डमधील सिंचन प्रकल्पासाठी आलेल्या केंद्राच्या निधीचा गैरवापर केला होता. त्या प्रकरणी त्यांच्यासह अन्य तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये थुंगॉन यांना जुलै 2015 साली साडेचार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे थुंगॉन हे सध्या तुरुंगातच आहेत. 1993-94 साली शासकीय दुकानांच्या वितरणामध्ये केलेल्या गैरव्यवहारप्रकरणीही ते दोषी ठरले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयासमोर त्यांच्या प्रकरणाची सुनावणी झाली. थुंगॉन यांना न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी भ्रष्टाचारविरोधी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच गुन्हेगारी कट केल्याप्रकरणी दोषी ठरवले.
====================================
भारत-पाक सामना धर्मशाळात नको-मुख्यमंत्री
शिमला - ट्वेंटी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणारा सामना धर्मशाळात नको, अशी मागणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांनी केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 मार्चला धर्मशाळामध्ये सामना होणार आहे. या सामन्याची जोरदार तयारी सुरु असताना मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांनी सामना न घेण्याची मागणी केली. आशिया करंडकात नुकताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळविला होता. त्यामुळे विश्वकरंडकातील या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
वीरेंद्र सिंह म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलिकडून भारतीय हद्दीत प्रवेश करुन जवानांवर हल्ले होत आहेत. पाकिस्तान भारताविरोधी आपल्या भूमिकेत बदल करत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्हाला धर्मशाळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होवू द्यायचा नाही. देशातील इतर कोणत्याही शहरात हा सामना घेण्यास आमची हरकत नाही. या प्रकरणी मी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. हिमाचल प्रदेशातील नागरिकांचा रोष पत्करून हा सामना खेळविणे योग्य वाटत नाही.
====================================
Narendra Modi
No comments:
Post a Comment