[अंतरराष्ट्रीय]
१- मास्को; चिमुकलीचं शीर हातात घेऊन महिलेची रस्त्यावरुन बिनधास्त रपेट
२- बिजींग; चीनमध्ये १८ लाख कामगारांवर संक्रांत
३- इस्लामाबाद; शरीफ यांना ओसामाकडून पैसा
४- वॉशिंग्टन; पाकचे पथक भारत दौऱ्यावर येणार
५- वॉशिंग्टन; लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- सिगरेटचे चटके देऊन इशरतबाबतचं प्रतिज्ञापत्र बदललं : मणी
७- 'काजोल, मलायका, पतीला सांगा पानमसाल्याची जाहिरात बंद कर' - दिल्ली सरकार
८- मुंबई; पंतप्रधानांना घालणार ५००० बोटींचा घेराव
९- जेएनयूतील दोन व्हिडिओंमध्ये फेरफार
१०- इशरत प्रकरणाची पुनर्तपासणी करा- शत्रुघ्न सिन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- उस्मानाबाद; एसटी कर्मचाऱ्याची बसमध्येच गळफास लावून आत्महत्या
१२- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावला तरुणाची गाड्यांवर दगडफेक
१३- दुष्काळी भागासाठी ‘टँक वॅगन’ सोडणार का?
१४- नांदेड; गावकऱ्यांचा दिलदारपणा! दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न
१५- जळगाव; गरिबांच्या लेकरांची पाटी राहणार कोरीच
१६- राज्य आर्थिक संकटात, पण आमदारांची चंगळ
१७- जातपंचायतींना सरकारचा चाप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- गुहागर; बाचाबाचीतून सुरक्षा रक्षकाचा गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू
१९- पतीच्या मारहाणीच्या जखमा मेकअपने लपवायचे : करिष्मा कपूर
२०- पौड; दीड कोटी भरल्यानंतर अॅम्बी व्हॅलीचे दारे उघडली
२१- नागपूर; 'ब्रेन डेड'नंतर १८४ व्यक्तींना अवयवदान
२२- उस्मानाबाद; छावणी बंद, लावणी सुरू - विखे पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 'रात्रीस खेळ चाले' मालिकेविरोधात पोलिसात तक्रार
२४- राहुल द्रविड आयपीएलमधील नव्या इनिंगसाठी सज्ज
२५- ढाका; पंड्याच्या सलग तीन चेंडूवर विकेट; मात्र तरीही हॅटट्रिक नाही
२६- आशिया चषक : भारताची श्रीलंकेवर पाच विकेट्सनी मात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- ट्रकच्या धडकेत किनवटचे 'DYSP' गंभीर जखमी, तीन कर्मचाऱ्यांना लागला मार
२८- मुस्लीम बांधवांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
२९- महापालिकेने मुदतीपूर्वीच गुंडाळली घरकुल योजना
३०- दहावीच्या परीक्षांना सुरुवात; पहिल्याच दिवसी नऊशे विद्यार्थ्यांची दांडी
३१- महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळ्यासाठी आयजी कार्यालयाशेजारच्या जागेचा विचार
३२- शिवसैनिक म्हणून जनतेची सेवा करणार- कल्याणकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भारत कदम, राम कदम, उल्हास रणवीर, प्रकाश राठोड, श्याम गिरी, सचिन पवाडे, रामराव खंदारे, रविराज छोकरे, उर्मिला आगाशे, शुभम चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================

===========================================


===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================
===========================================

===========================================
जळगाव; गरिबांच्या लेकरांची पाटी राहणार कोरीच
===========================================
जेएनयूतील दोन व्हिडिओंमध्ये फेरफार
इशरत प्रकरणाची पुनर्तपासणी करा- शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली - इशरत जहॉं चकमक प्रकरणाची पुनर्तपासणीच्या करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
सिन्हा यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी इशरत जहॉं प्रकरणाची पुनर्तपासणी करायला हवी. "प्रभावी‘ माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेल्या दुहेरी भूमिकेचे आरोप तपासायला हवेत. जे या प्रकरणात सहभागी नाहीत त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी आहे. "पुनर्तपासणी करून "दूध का दूध पाणी का पाणी होना जरूरी है‘ ‘ इशरत जहॉं चकमक प्रकरणात दुसऱ्यांदा बनविण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर माझ्याकडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.व्ही.एस. मणी यांनी म्हटले आहे. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉ या महिला दहशतवाद्यासंदर्भात 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती तत्कालीन गृहसचिव जी के पिल्ले यांनी दिली आहे.
===========================================
नागपूर; 'ब्रेन डेड'नंतर १८४ व्यक्तींना अवयवदान
राज्य आर्थिक संकटात, पण आमदारांची चंगळ

जातपंचायतींना सरकारचा चाप
मुंबई - समाजात एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे अथवा जातपंचायतीच्या जाचक निवाड्याने समाजातून बहिष्कृत करण्याच्या घटनांना आता कायमचा चाप लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज अशा प्रकारच्या अमानवी प्रकाराला कायद्याने पायबंद घालणारे विधेयक विधिमंडळात मांडण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
छावणी बंद, लावणी सुरू - विखे पाटील
१- मास्को; चिमुकलीचं शीर हातात घेऊन महिलेची रस्त्यावरुन बिनधास्त रपेट
२- बिजींग; चीनमध्ये १८ लाख कामगारांवर संक्रांत
३- इस्लामाबाद; शरीफ यांना ओसामाकडून पैसा
४- वॉशिंग्टन; पाकचे पथक भारत दौऱ्यावर येणार
५- वॉशिंग्टन; लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- सिगरेटचे चटके देऊन इशरतबाबतचं प्रतिज्ञापत्र बदललं : मणी
७- 'काजोल, मलायका, पतीला सांगा पानमसाल्याची जाहिरात बंद कर' - दिल्ली सरकार
८- मुंबई; पंतप्रधानांना घालणार ५००० बोटींचा घेराव
९- जेएनयूतील दोन व्हिडिओंमध्ये फेरफार
१०- इशरत प्रकरणाची पुनर्तपासणी करा- शत्रुघ्न सिन्हा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- उस्मानाबाद; एसटी कर्मचाऱ्याची बसमध्येच गळफास लावून आत्महत्या
१२- वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावला तरुणाची गाड्यांवर दगडफेक
१३- दुष्काळी भागासाठी ‘टँक वॅगन’ सोडणार का?
१४- नांदेड; गावकऱ्यांचा दिलदारपणा! दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न
१५- जळगाव; गरिबांच्या लेकरांची पाटी राहणार कोरीच
१६- राज्य आर्थिक संकटात, पण आमदारांची चंगळ
१७- जातपंचायतींना सरकारचा चाप
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- गुहागर; बाचाबाचीतून सुरक्षा रक्षकाचा गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू
१९- पतीच्या मारहाणीच्या जखमा मेकअपने लपवायचे : करिष्मा कपूर
२०- पौड; दीड कोटी भरल्यानंतर अॅम्बी व्हॅलीचे दारे उघडली
२१- नागपूर; 'ब्रेन डेड'नंतर १८४ व्यक्तींना अवयवदान
२२- उस्मानाबाद; छावणी बंद, लावणी सुरू - विखे पाटील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 'रात्रीस खेळ चाले' मालिकेविरोधात पोलिसात तक्रार
२४- राहुल द्रविड आयपीएलमधील नव्या इनिंगसाठी सज्ज
२५- ढाका; पंड्याच्या सलग तीन चेंडूवर विकेट; मात्र तरीही हॅटट्रिक नाही
२६- आशिया चषक : भारताची श्रीलंकेवर पाच विकेट्सनी मात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- ट्रकच्या धडकेत किनवटचे 'DYSP' गंभीर जखमी, तीन कर्मचाऱ्यांना लागला मार
२८- मुस्लीम बांधवांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण
२९- महापालिकेने मुदतीपूर्वीच गुंडाळली घरकुल योजना
३०- दहावीच्या परीक्षांना सुरुवात; पहिल्याच दिवसी नऊशे विद्यार्थ्यांची दांडी
३१- महात्मा बसवेश्वर अश्वारूढ पुतळ्यासाठी आयजी कार्यालयाशेजारच्या जागेचा विचार
३२- शिवसैनिक म्हणून जनतेची सेवा करणार- कल्याणकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
भारत कदम, राम कदम, उल्हास रणवीर, प्रकाश राठोड, श्याम गिरी, सचिन पवाडे, रामराव खंदारे, रविराज छोकरे, उर्मिला आगाशे, शुभम चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दु:ख सहन करायला काय हरकत आहे
(पंकज सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
===========================================
सिगरेटचे चटके देऊन इशरतबाबतचं प्रतिज्ञापत्र बदललं : मणी
नवी दिल्ली: मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा आरोपी डेव्हिड हेडलीने जबाबात इशरत जहाँचं नाव घेतल्यानंतर, पुन्हा एकदा इशरत जहाँवरून राळ उठली आहे.
इशरत जहाँ खटल्यात गृहमंत्रालयातील माजी सचिव आरवीएस मणी यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. इशरत अतिरेकी असल्याचं प्रतिज्ञापत्र बदलण्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारने आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचं मणी यांनी ‘टाईम्स नाऊ’ या वाहिनीला सांगितल्याचं कळतंय.
गुप्तचर विभागाला तोंडावर पाडण्यासाठी एसआयटी प्रमुख सतिश वर्मा यांनी आपल्यावर प्रतिज्ञापत्र बदलण्यासाठी दबाव टाकला होता. मी या गोष्टीसाठी नकार दिल्यानंतर वर्मांनी मला सिगरेटचे चटकेही दिल्याचं मणींनी सांगितलं.
यूपीए सरकारमध्ये मणींच्या कार्यकाळात इशरत जहाँ खटल्यात दोन प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. ज्यामध्ये पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरत अतिरेकी असल्याचं तर दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात याच्या विरुद्ध माहिती होती. त्यामुळे या माहितीतून मणींनी तत्कालीन गृहमंत्री पी.चिदंबरम यांच्यावर आरोप केले आहेत.
दरम्यान, कालच केंद्रीय दूरसंचार मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही इशरत जहाँबाबतचं प्रतिज्ञापत्र बदलण्यासाठी मणी यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. तसंच नरेंद्र मोदा आणि अमित शाह यांना गोवण्यासाठीच पी चिदंबरम यांची ही चाल होती, असंही रवीशंकर प्रसाद म्हणाले होते.
याशिवाय माजी गृहसचिव जी के पिल्लई यांनीही तत्कालिन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी इशरत एन्काऊंटरच्या प्रतिज्ञापत्रातून तीचं लष्कर कनेक्शन असलेला संदर्भ वगळण्यास सांगितल्याचं म्हटलं.
या सर्व प्रकारानंतर भाजपने काँग्रेस आणि पी चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
'रात्रीस खेळ चाले' मालिकेविरोधात पोलिसात तक्रार
मुंबई : झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ अडचणीत येण्याची शक्यता आहे. भूत-प्रेत, आत्मा यासारख्या अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असल्याच्या आरोपातून चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
22 मार्चपासून सुरु झालेल्या या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्याच भागात नाईकांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा होणार असतो, मात्र मंगलकार्याआधीच कुटुंबप्रमुख अण्णा यांचं निधन होतं आणि धक्कादायक घटनांना सुरुवात होते.
कोकणामध्ये भूतांच्या गोष्टी अनेकदा ऐकवल्या जातात. पूर्वापारपासून चालत आलेल्या या दंतकथांना कोणताही आधार नाही. अशाच काल्पनिक कथांवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं प्रक्षेपण सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता होतं.
या मालिकेच्या माध्यमातून कोकणाची बदनामी होत असल्याचा आक्षेप तक्रारकर्त्याने घेतला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्या अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उस्मानाबाद; एसटी कर्मचाऱ्याची बसमध्येच गळफास लावून आत्महत्या
उस्मानाबाद: उस्मानाबाद आगारातील मेकॅनिकने एसटीमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली. लातूरला जाणारी एसटी ड्रायव्हरने सकाळी बस स्थानकात आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
उस्मानाबाद बस स्थानकाच्या लगत असलेल्या एसटी डेपोमधील बस मध्येच मेकॅनिकनं गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. दिलीप सोनटक्के असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव असून तो 45 वर्षाचा होता.
रात्रीपाळीला असतानाच त्यानं आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. MH 20 -BL 1053 या बसमध्ये त्यानं गळफास लावून घेतला. सकाळी बस लातूरकडे जाण्यासाठी स्थानकावर आली असता प्रवाशांना याच बसमध्ये प्रेत लटकताना दिसलं. त्यानंतर तात्काळ पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली.
'काजोल, मलायका, पतीला सांगा पानमसाल्याची जाहिरात बंद कर'
नवी दिल्ली : बॉलिवूडमधील चार सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या पत्नींना दिल्ली सरकारने साकडं घातलं आहे. आपल्या पतीला पानमसाला, पान सुपारी यांच्या जाहिराती न करण्याची विनंती करा, अशी मागणी काजोल, मलायकासह चौघींकडे करण्यात आली आहे.
सिंघम अभिनेता अजय देवगनची पत्नी काजोल, सलमानचा भाऊ, अभिनेता अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा खान, शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा यांच्याकडे दिल्ली सरकारने पतीला समजवण्याची मागणी केली आहे.
पान मसाल्यासारख्या उत्पादनांची जाहिरात न करण्याबाबत अभिनेत्यांकडून कोणतंही उत्तर न आल्यामुळे अखेर दिल्ली सरकारने त्यांच्या अर्धांगिनींकडे धाव घेतली आहे. आपल्या पतीला या उत्पादनांच्या जाहिराती न करण्याचा आग्रह धरा, असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली सरकारचे अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. एस. के. अरोरा यांनी चौघींना पत्र लिहून मागणी केली.
जनहितासाठी आपल्या पतीला अशा जाहिरातींमध्ये न झळकण्याबाबत समजवा. ते पब्लिक फिगर असल्यामुळे नकळत त्यांचं अनुकरण होतं, असा उल्लेख पत्रात आहे.
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गोरेगावला तरुणाची गाड्यांवर दगडफेक
मुंबई : मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरुन जाणाऱ्या गाड्यांवर रात्री उशिरा एका तरुणाने दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत काही जण जखमी झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
सोमवारी रात्री गोरेगावजवळ 10 ते 12 गाड्यांवर या तरुणाने दगडफेक केली. अचानक झालेल्या या दगडफेकीत अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, तसंच इतर भागांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या घटनेत काही जण जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान आरोपी तरुणाला वनराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तो मानसिक रुग्ण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
बाचाबाचीतून सुरक्षा रक्षकाचा गोळीबार, दोघांचा जागीच मृत्यू
गुहागर: गुहागरच्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये सुरक्षारक्षकानंचं आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीआयएसएफच्या जवानांमध्ये झालेल्या बाचाबाचीतून हे थरार नाट्य घडलं.
हरिशकुमार गौड या सुरक्षारक्षकानं हा गोळीबार केला. गोळीबारात बी.जी शिंदे या वरिष्ठ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्यानं कॉन्टेबल बी रनेशवरही गोळी झाडली. त्याचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं पत्नीसह स्वत:वरही गोळी झाडली. या दोघांनाही कंपनीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर कंपनी परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. हरिशकुमार गौडला शांत करण्यासाठी त्याच्या गरोदर पत्नीला त्याच्यासमोर करण्यात आलं होतं. मात्र, त्यानं पत्नीसह स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि नंतर पत्नी आणि स्वत:वर गोळी झाडली.
पतीच्या मारहाणीच्या जखमा मेकअपने लपवायचे : करिष्मा
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात मोठं खानदान असलेल्या कपूरांची लेक म्हणजे करिष्मा सासरी आनंदात नसल्याचं समोर आलं होतं. पती संजय कपूरसोबत सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना आता वेगळंच वळण लागलं आहे. पती आपल्याला खूप मारहाण करायचा, त्या जखमा आपण मेकअपच्या मदतीने लपवायचो असा दावा करिष्माने केला आहे.
करिष्मा कपूरने आपल्या पतीच्या गैरवर्तणुकीबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. ‘आमचा मुलगा 4 महिन्यांचा असताना त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे आम्ही ठरवलेल्या इंग्लंड ट्रीपवर येणं मला शक्य नव्हतं. यामुळे नाराज झालेला संजय एकटाच निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी आपण इंग्लंडला गेला असता त्याने आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 4 महिन्यांच्या बाळाची काळजी न करता रात्रभर तो गायब असायचा. गोल्फ खेळण्यात बिझी असायचा.’ असा गौप्यस्फोट करिष्माने केला आहे.
‘आम्ही हनिमूनला गेलो असताना संजय त्याच्या भावाशी फोनवर बोलत होता. त्यावेळी करिष्मा तिच्या माहेरहून किती पैसे आणू शकेल, यावर दोघा भावांमध्ये चर्चा सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांनंतरच हे ऐकून मला प्रचंड धक्का बसला.’ असं करिष्मा कपूर सांगते.
‘एकदा संजयने त्याच्या आईने मला भेट दिलेला ड्रेस घालण्याचा हट्ट धरला. मात्र मी प्रेग्नंट असल्यामुळे तो मला घट्ट होत होता. पण संजय हे ऐकून घेण्यास तयारच नव्हता आणि त्याने आईला माझ्या कानफटात मारायला सांगितलं.’ असा दावाही करिष्माने केला आहे.
राहुल द्रविड आयपीएलमधील नव्या इनिंगसाठी सज्ज
मुंबई : भारताच्या अंडर 19 संघाला विश्वचषकाचं उपविजेतेपद मिळवून दिल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड आता आपल्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या आगामी मोसमात द्रविडने दिल्ली डेअरडेव्हिल्सचं मेन्टॉरपद स्वीकारलं आहे.
आयपीएलच्या गेल्या तीन मोसमांमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी ढासळली आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात दिल्लीचा संघ सातव्या स्थानावर होता. तर 2013 आणि 2014 साली दिल्लीचा संघ तळाशी होता.
त्या पार्श्वभूमीवर टीमची कामगिरी उंचावण्यासाठी मेन्टॉर म्हणून द्रविडची तर प्रशिक्षकपदी पॅडी अपटन यांची नेमणूक करण्यात आली आहे. द्रविड आणि अपटन जोडीने याआधी राजस्थान रॉयल्स संघासाठी एकत्र काम केलं होतं
पंड्याच्या सलग तीन चेंडूवर विकेट; मात्र तरीही हॅटट्रिक नाही
त्यानंतर कालच्या सामन्यातील पहिल्याच बॉलवर हार्दिक पंड्याने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला माघारी धाडलं.
ढाका/मिरपूर : भारताचा स्टार अष्टपैलू आणि कर्णधार धोनीचा फेव्हरिट न्यू कमर हार्दिक पंड्याने सलग तीन चेंडूवर विकेट्स घेतल्या, पण तरीही हॅटट्रिकचा विक्रम मात्र त्याच्या नावावर जमा झाला नाही. कारण पंड्याने सलग तीन विकेट्स घेतल्या असल्या तरी त्या वेगवेगळ्या सामन्यातील आहेत. म्हणजेच पाकविरुद्ध शेवटच्या दोन तर श्रीलंकेविरुद्ध पहिल्याच चेंडूवर.आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने दोन बॉल्सवर दोन विकेट्स घेतल्या होत्या. पंड्याने 17.2 षटकांत मोहम्मद समीला बाद केलं. तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या 9 बाद 83 अशी होती. त्यानंतर पुढच्याच बॉलवर म्हणजे 17.3 षटकांत त्याने मोहम्मद आमीरला त्रिफळाचीत केलं. त्यावेळी पाकिस्तानचा डाव 10 बाद 83 आटोपला.त्यानंतर आजच्या सामन्यातील पहिल्याच बॉलवर हार्दिक पंड्याने श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला माघारी धाडलं. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेऊनही पंड्या हॅटट्रिकपासून वंचित राहिला.
आशिया चषक : भारताची श्रीलंकेवर पाच विकेट्सनी मात
मिरपूर: धोनीच्या टीम इंडियानं श्रीलंकेला पाच विकेट्सनी हरवून आशिया चषकातला सलग तिसरा विजय साजरा केला. या विजयाबरोबरच भारताचा अंतिम फेरीतला प्रवेशही जवळपास निश्चित झाला आहे. विराट कोहलीची 56 धावांची नाबाद खेळी आणि गोलंदाजांची उत्तम कामगिरी यामुळे भारताने शानदार विजयाची नोंद केली.
मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर झालेल्या या लढतीत श्रीलंकेने भारताला विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं होतं. पण शिखर धवन आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्याने भारताची 2 बाद 16 अशी बिकट अवस्था झाली होती. मात्र विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं. त्याने आधी सुरेश रैना आणि मग युवराज सिंहच्या साथीने भागीदारी रचल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.
त्याआधी भारतीय गोलंदाजांनी लंकेला 20 षटकांत 9 बाद 138 असं रोखलं होतं. भारताकडून जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि आर अश्विनने प्रत्येकी दोन तर आशिष नेहराने एक विकेट काढली.
===========================================
मास्को; चिमुकलीचं शीर हातात घेऊन महिलेची रस्त्यावरुन बिनधास्त रपेट
मॉस्को: रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका लहान मुलीचं शीर हातात घेऊन घोषणा देणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मॉस्कोतील एका मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.
अटक झालेली महिला एका घरात मुलांना सांभाळायचं काम करायची. प्राथमिक माहितीनुसार, मुलाचे आई-वडिल आणि त्याचा मोठा भाऊ घरातून बाहेर गेल्यावर तिने साडेतीन वर्षांच्या मुलीची हत्या केली आणि घर पेटवून दिलं. त्यानंतर मुलीचं शीर घेऊन ही महिला रस्त्यावर फिरताना आढळली.
संबंधित महिलेने चिमुकलीची अतिशय निर्घृण हत्या केली. आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मुलीचा मृतदेह आढळला.
हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या प्रकरणाने मॉस्कोवासी हादरुन गेले आहेत.
दुष्काळी भागासाठी ‘टँक वॅगन’ सोडणार का?
- मुंबई: दूध किंवा तेलाने भरलेल्या टँक वॅगनप्रमाणे दुष्काळी भागात पाण्याचे टँक वॅगन नेणे शक्य आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारकडे करत याबाबत पुढील सुनावणीवेळी उत्तर देण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागाबरोबरच शहरातही पाण्याची कमतरता जाणवत असल्याने जूनपर्यंत या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना व नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले. बीड व मराठवाडा याठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने ‘स्यू-मोटो’ दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या वेळी खंडपीठाने लातूर, उस्मानाबदमध्ये पाणीटंचाई असल्याने रुग्णालये शस्त्रक्रिया पुढे ढकलत असल्याने याबद्दल सरकार काय पावले उचलणार, अशी विचारणा केली होती. त्यावर मंगळवारच्या सुनावणीवेळी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य अधिकाऱ्यांना रुग्णालयासाठी पुरेसे पाणी टँकरद्वारे पुरवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली.यावेळी खंडपीठाने लातूर व उस्मानाबाद येथे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नसल्याने याठिकाणी पाण्याचे टँक वेगन सोडणे शक्य आहे का? अशी विचारणा करत सरकारला याबाबत १७ मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
गुहागरमध्ये सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात २ ठार
- रत्नागिरी, दि. २ - रत्नागिरीच्या गुहागर येथे एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षकाने सहका-याशी झालेल्या बाचाबाचीनंतर केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गुहागरच्या रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायवेट लिमिटेड कंपनीमध्ये सीआयएसएफच्या जवानांमध्ये काही कारणावरून वाद झाला, त्याचे रुपांतर बाचाबाचीत झाले. त्यानंतर हरिशकुमार गौड या सुरक्षारक्षकाने आपलाच सहकारी, बी.जी.शिंदे यांच्यावर गोळीबार केला, त्यात तो जागीच ठार झाला. त्यानंतर गौडने दुस-या इसमावरही गोळी झाडली, त्याचाही जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेनंत गौड याने पत्नीसह स्वत:वरही गोळी झाडली, त्या दोघांवरही एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई; पंतप्रधानांना घालणार ५००० बोटींचा घेराव
- मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न शिवस्मारक समितीकडून सुरू आहे. मात्र कफ परेड येथील जागेवर पंतप्रधानांनी भूमिपूजनाचा प्रयत्न केल्यास ५ हजार यांत्रिक बोटींनी घेराव घालण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे.समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल म्हणाले की, शिवस्मारकाला मच्छीमारांचा विरोध नसून कफ परेड येथील जागेवर स्मारक उभारण्यास विरोध आहे. स्मारक उभारणीसाठी सरकारसमोर हाजीअली समुद्रकिनारा, महालक्ष्मी रेसकोर्स आणि बँडस्टँड व कार्टर रोड येथील खडकाळ समुद्रकिनाऱ्यांचा पर्याय आहे. मात्र स्मारक उभारणीसाठी लागणाऱ्या २० हजार कोटींमधील वाट्यासाठी कफ परेड येथील समुद्रकिनाऱ्यावरच स्मारक उभारण्याचा अट्टाहास सुरू असल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. याउलट कार्टर रोड येथील खडकाळ भागात अवघ्या २०० कोटींमध्ये स्मारक उभे करता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.कृत्रिम बेट उभारल्यास येथील २० हजारांहून अधिक मच्छीमारांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. शिवाय येथील समुद्रजीव नष्ट होणार असून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचाही ऱ्हास होण्याची शक्यता तांडेल यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील १६ सामाजिक संघटनांनी अरबी समुद्रात प्रकल्प उभारण्यास विरोध दर्शवला आहे. सरकारने शिवस्मारकाची जागा न बदलल्यास हरित आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा तांडेल यांनी दिला आहे.
पौड; दीड कोटी भरल्यानंतर अॅम्बी व्हॅलीचे दारे उघडली
- पौड (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील आंबवणे परिसरात १६ गावांच्या १० हजार एकर क्षेत्रावर विस्तारलेला सर्वात मोठा गृहप्रकल्प व रिसॉर्ट कंपनी म्हणून ओळख असलेल्या अॅम्बी व्हॅली कंपनीने मागील तीन वर्षांचा ४ कोटी ८३ लाख रुपयांचा बिगर शेतसारा थकविल्याने मुळशी महसूल विभागाने अॅम्बी व्हॅलीला सील ठोकले. या धडक कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील अशा बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.मुळशीचे निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले की, थकबाकी भरण्यासंदर्भात सातत्याने नोटिसा देऊनही कंपनीने तीन वर्षांतील एकूण ४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. त्यासंदर्भात सहारा कंपनीला ५ जानेवारी २०१६ रोजी अंतरिम नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही कंपनीने भरणा केला नाही. अखेर मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे, मंडल अधिकारी मंगेश शिंगटे, अव्वल कारकून अनिल शेडगे, माणिक साबळे, तलाठी प्रकाश वाघमारे, प्रमोद आलेकर, सुरेश चौरे, सुधीर निंबाळकर, संजय दाते यांच्या पथकाने सकाळी कंपनीच्या चारही प्रवेशद्वारांना सील ठोकले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ हालचाली करून दुपारीच दीड कोटी रुपयांचा धनादेश महसूल विभागाकडे जमा केल्यावर सील काढण्यात आले. (प्रतिनिधी)> अन्य २८ मोठे थकबाकीदार : मुळशी तालुक्यात कोका-कोला, लवासा यांसारखे अन्यही २८ मोठे थकबाकीदार असून त्यांच्याकडे जवळपास १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. - नागेश गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, मुळशी
बिजींग; चीनमध्ये १८ लाख कामगारांवर संक्रांत
- बीजिंग : कोळसा आणि पोलाद क्षेत्रातील १८ लाख कामगारांची कपात करण्याची योजना चीन सरकारने आखली आहे. आर्थिक मंदीची झळ बसलेल्या या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या महासत्तेची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय अध्यक्ष शी जिनसिंग यांनी घेतला आहे. याचाच भाग म्हणून ही कर्मचारी कपात केली जाणार आहे. चीनचे मनुष्यबळ आणि सामाजिक सुरक्षामंत्री सिन येमिन यांनी ही घोषणा केली. मात्र ही कर्मचारी कपात केव्हा करणार हे त्यांनी जाहीर केले नाही. अलीकडील काही दशकांत चीनने आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून निर्यातीवर आधारित उद्योग उभारणीस प्राधान्य दिले होते. या उद्योगात सरकारनेच मोठी गुंतवणूक केली होती. या उद्योगातच कमी कुशल असलेल्या कामगारांना मोठा वाव मिळाला होता. त्यातून चीनच्या शहरांमधील अशा कामगारांची संख्या वेगाने वाढली; पण सरकारने क्षमतेपेक्षा जास्त गुंतवणूक केली. त्यामुळे संबंधित उद्योगातही क्षमतेपेक्षा जास्त कामगार भरती झाली. परिणामत: या उद्योगांना आपल्या वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात कमी कराव्या लागल्या व उत्पादनाचा कमी दर याचा अर्थ तोटा. एक प्रकारे सरकारच्या सबसिडीची ही हानीच होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून चीनने आपल्या धोरणात बदल केला असून, निर्यातीवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यापेक्षा देशांतर्गत खप वाढविण्याच्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. आता जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून जात असताना चीनला हे धोरण स्वीकारण्याशिवाय पर्याय उरला नाही. संपूर्ण जगात चीनची निर्यात सर्वाधिक होती. या निर्यातीच्या आधारेच चीनने गेल्या काही दशकांत सर्वाधिक वेगाने वृद्धी केली
- ===========================================
इस्लामाबाद; शरीफ यांना ओसामाकडून पैसा
- इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीसाठी अल कायदाचा प्रमुख ओसामा बीन लादेन याच्याकडून पैसा मिळाला होता, अशी खळबळजनक माहिती एका पुस्तकामुळे प्रकाशात आली आहे.बेनझीर भुत्तो यांच्याविरुद्धच्या निवडणुकीसाठी नवाझ शरीफ यांनी ओसामाकडून पैसा घेतला होता, असा दावा खालिद ख्वाजा : शहीद-ए-अमन या पुस्तकात करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे प्रमुख असलेले खालिद ख्वाजा यांच्या पत्नी शम्मा खालिद यांनी हे पुस्तक लिहिले आहे.देशात इस्लामी राजवट आणण्याच्या नवाझ शरीफ यांच्या विधानांमुळे ओसामा बीन लादेन आणि स्वत: खालिद ख्वाजा हे दोघेही त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र शरीफ आपल्या त्या घोषणेपासून दूर गेले, असेही शम्मा खालिद यांनी पुस्तकात नमूद केले आहे.जागतिक जिहाद संकल्पनेचे सर्वेसर्वा अब्दुल्ला आझम यांनी आपले पती ख्वाजा खालिद यांची आणि ओसामा यांची ओळख करून दिली होती. आझम हे पॅलेस्टिनी सुन्नी नेते होते आणि अरब देशातून जिहादी तयार करण्यासाठी त्यांनी मोठा निधी जमा केला होता. त्यांच्यामुळे ओसामा अफगाणिस्तानात आला, याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे. खालिद यांच्या हत्येमध्ये भारतीय गुप्तचर संघटना रॉ आणि अमेरिकेची सीआयए ही संघटना यांचा हात होता, असा आरोपही पुस्तकात करण्यात आला आहे.
वॉशिंग्टन; पाकचे पथक भारत दौऱ्यावर येणार
- वॉशिंग्टन : पठाणकोट हल्ल्याप्रकरणी तपास करीत असलेले पाकिस्तानी पथक येत्या काही दिवसांत भारताचा दौरा करू शकते, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेची तारीख लवकरच निश्चित होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.अमेरिका-पाकिस्तान व्यूहात्मक चर्चेदरम्यान प्राथमिक टिपणी करताना अजीज म्हणाले की, चर्चा पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना पठाणकोट हल्ल्यांमुळे धक्का बसणे ही दुर्दैवी बाब आहे.पंतप्रधान शरीफ यांनी हल्ल्यानंतर तात्काळ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून चौकशीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते, असेही ते म्हणाले.
वॉशिंग्टन; लादेनने पैसा मागे ठेवला जिहादसाठी
- वॉशिंग्टन : अल-काईदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याने त्याच्या २ कोटी ९० लाख डॉलर इतक्या रकमेतील बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी मागे ठेवली होती. त्याची वेगवेगळी पत्रे आणि अन्य कागदपत्रे यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे.आपल्या मृत्यूनंतर बहुतेक रक्कम आंतरराष्ट्रीय जिहादसाठी वापरावी, असे त्याने लिहून ठेवले आहे.२०११ मध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी पाकिस्तानात त्याचा खात्मा केल्यानंतर ११३ दस्तऐवज हाती लागले आहेत. त्यात एक पत्र त्याच्या पैशाच्या वाटपाबाबत आहे. हे पत्र त्याचे मृत्यूपत्र म्हणून समजले जात आहे.
नांदेड; गावकऱ्यांचा दिलदारपणा! दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचं थाटामाटात लग्न
नांदेड : एक मेक सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, या म्हणीचा प्रत्यय नुकताच नांदेड जिल्ह्यात आला. नायगाव तालुक्यातील देगाव इथ एका शेतकऱ्याच्या मुलीचा विवाह तीन वर्षांपूर्वी जमला होता. पण सातत्याने झालेल्या नापिकीने हे लग्न पुढे ढकलले गेले.
ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच गावकऱ्यांनी पुढाकार घेत अतिशय थाटामाटात या शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न लावून दिले.
ललिता आणि दीपक यांचे लग्न थाटात लागले. सनई चौघड्यांचे सूर संपूर्ण देगावात घुमले. जेवणाच्या मोठ्या मोठ्या पंगतीत बसल्या. वऱ्हाडी मंडळीला अगदी चमचमीत जेवण देण्यात आले. आता हे सर्व चित्र पाहिल्यावर ललिताचे वडील सधन असावेत असा समज होईल. पण प्रत्यक्षात तसं नाहीय. ललिताचे घर म्हणजे सारवलेल्या फक्त चार भिंती. यावरुन तिच्या घरची आर्थिक परिस्थिती किती बिकट आहे, हे लक्षात येईल.
ललिताचे लग्न तीन वर्षांपूर्वी दीपक सोबत जमले. पण शेतात सततच्या नापिकीने लग्न सतत पुढे ढकलले गेले. शेवटी लग्न लावा किंवा सोयरिक मोडा असा निरोप आला. ही बाब गावकऱ्यांना समजली. संपूर्ण गावाने मदत केली आणि ललिताचं थाटात लग्न लागलं.
गावात असलेल्या शंकर मनुरकर यांना जेव्हा ललितच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी स्वत:च्या खिशातून काही हजार रुपये लग्नसाठी देण्याची तयारी दर्शवली. बघता बघता संपूर्ण गावाने यथाशक्ती पैसा दिला.
जळगाव; गरिबांच्या लेकरांची पाटी राहणार कोरीच
प्रशिक्षणाला केवळ २० कर्मचारी - २५ टक्के प्रवेशाचा दुसऱ्या वर्षीही तोच खेळ
जळगाव - बालकांचा मोफत हक्क कायद्यानुसार २०१५ - १६ मध्ये शहरी भागात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रकिया राबविण्यात आली. परंतु संपूर्ण प्रक्रियाच गुंतागुंतीची असल्याने शहरी भागात प्रवेश प्रकिया पूर्णपणे फसली आणि आरक्षित २५ टक्के जागांपैकी अवघ्या चार टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला. अशाच पद्धतीने राज्यभरात ऑनलाइन प्रक्रियेचा सावळा गोंधळ झाला आहे. असे असले तरी यंदाही शिक्षण विभागाने पुन्हा तोच खेळ सुरू केला आहे. आज गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रवेशासंदर्भात देण्यात आलेल्या प्रशिक्षणाने या नव्या खेळांची पुन्हा इनिंग सुरू झाली आहे.
२५ टक्के प्रवेश ऑनलाइन प्रकियेत अडकल्याने राज्यभरात खासगी शाळांमध्ये आरक्षित जागांपैकी २० टक्के पेक्षा अधिक जागा रिक्तच राहिल्यात. जळगाव शहरातील ३४ शाळांमध्ये ५९५ आरक्षित जागांपैकी ४३१ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सन २०१६ - १७ ची २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्याअंतर्गत आज अलफैज उर्दू हायस्कूल येथे गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, एमआयएस को-ऑर्डीनेटर, डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात जिल्हाभरातून केवळ पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. मागील वर्षाप्रमाणेच यंदाचेही ऑनलाइन प्रवेश देण्यात येणार असून, तंतोतंत प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशिक्षणादरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे मागील वर्षी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.
जेएनयूतील दोन व्हिडिओंमध्ये फेरफार
नवी दिल्ली - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) 9 फेब्रुवारीला झालेल्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या 9 व्हिडिओंपैकी दोन व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिला आहे.
प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैयाकुमार याच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात येत आहे. पोलिस याठिकाणी देण्यात आलेल्या व्हिडिओंची चौकशी करत आहे.
दिल्ली सरकारने हे व्हिडिओ हैदराबादमधील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडिओंपैकी दोन व्हिडिओत फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दोन व्हिडिओ क्लिप्समध्ये काही व्यक्तींचे आवाज मिसळण्यात आले आहेत. या आधीही बाहेरच्या व्यक्तींकडून देशाविरोधात घोषणा देण्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची सहकारी शिल्पी तिवारी यांनी या व्हिडिओंमध्ये फेरफार केल्याचा आरोप होत आहे.
===========================================इशरत प्रकरणाची पुनर्तपासणी करा- शत्रुघ्न सिन्हा
नवी दिल्ली - इशरत जहॉं चकमक प्रकरणाची पुनर्तपासणीच्या करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.
सिन्हा यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले, "प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेसाठी इशरत जहॉं प्रकरणाची पुनर्तपासणी करायला हवी. "प्रभावी‘ माजी गृहमंत्री चिदंबरम यांच्यावर करण्यात आलेल्या दुहेरी भूमिकेचे आरोप तपासायला हवेत. जे या प्रकरणात सहभागी नाहीत त्यांना आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी आहे. "पुनर्तपासणी करून "दूध का दूध पाणी का पाणी होना जरूरी है‘ ‘ इशरत जहॉं चकमक प्रकरणात दुसऱ्यांदा बनविण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर माझ्याकडून जबरदस्तीने स्वाक्षऱ्या करून घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर.व्ही.एस. मणी यांनी म्हटले आहे. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉ या महिला दहशतवाद्यासंदर्भात 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती तत्कालीन गृहसचिव जी के पिल्ले यांनी दिली आहे.
===========================================
नागपूर; 'ब्रेन डेड'नंतर १८४ व्यक्तींना अवयवदान
नागपूर - मेंदू मृत्यूतून (ब्रेनडेड) मिळालेले दान मोठे आहे, असे म्हणता येईल. यावर्षी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राबवण्यात आलेल्या अवयवदानाच्या चळवळीतून ५८ मेंदूमृत्यू व्यक्तींच्या अवयवदानातून तब्बल १८४ जणांच्या पदरात दान पडले.
डॉक्टरांनी मेंदूमृत्यू घोषित केल्यावर त्याचे काही वेळात अवयवदान करता येतात. परंतु, मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी खऱ्या अर्थाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अवयवदानाचा धर्म निभावण्यासाठी कुटुंबीयांना तयार करणे कठीण काम आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे २०१५ या सालात मेंदूमृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ होती. गतवर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी ती वाढली आहे. यातील ५८ मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची सहमती दर्शवली. त्यानुसार, अवयवदान स्वीकारण्यात आले. नातेवाइकांच्या या सकारात्मक विचारसरणीतून यावर्षी राज्यातील १८४ व्यक्तींना नवजीवन मिळाले. अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची प्रतीक्षा यादी दरवर्षी वाढत आहे. यात सर्वाधिक गरज नेत्रदानकर्त्यांची आहे. त्यापाठोपाठ किडनी, यकृत, हृदय आदी अवयवांची गरज आहे. विविध रुग्णालयांमध्ये मेंदूमृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती कळविण्यासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयाने १०२ टोलफ्री क्रमांक दिला आहे.
===========================================राज्य आर्थिक संकटात, पण आमदारांची चंगळ
मुंबई - सरकारी तिजोरीवरील कर्जाचा बोजा, राज्यावरील अस्मानी संकट आणि राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती अशा संकटांचा राज्य सरकार सामना करत असले, तरी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची मात्र चंगळ होणार आहे. दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात प्रत्येक आमदाराला ‘वन बीएचके’चा कक्ष देण्यात आला असला, तरी यापुढे त्यांना प्रतिमहिना तब्बल ५० हजार रुपयांचा निवासी भत्ता मिळणार आहे. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी सध्या १० लाखांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येत होते. आता ही मर्यादा दुप्पट करण्यात येणार आहे.
राज्याच्या विधानसभेत २८९ तर विघान परिषदेत ७८ आमदार आहेत. त्यांच्या निवासासाठी आकाशवाणी, मनोरा, मॅजेस्टिक आणि विस्तारित आमदार निवासात प्रत्येक दोन कक्ष देण्यात येतात. ब्रिटिशकालीन मॅजेस्टिक आमदार निवास धोकादायक अवस्थेत असल्याने ते खाली करण्यात आले आहे. त्यामुळे अन्य आमदार निवासात प्रत्येकी एकच कक्ष देण्यात आला आहे. पूर्वी दोन कक्ष असतानाही निवास भत्ता म्हणून त्यांना प्रत्येक महिन्याला २५ हजार रुपये देण्यात येत होते. आता एकच कक्ष असल्याने त्यात आणखी २५ हजार रुपयांची वाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. म्हणजेच यापुढे आमदारांना ५० हजार रुपयांचा निवासी भत्ता मिळेल. आमदारांना वाहन खरेदी करण्यासाठी याआधी १० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मिळत होते. यापुढे २० लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे. सध्या आमदारांचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यापोठी सुमारे ७० हजार रुपये प्रतिमहिना वितरित करण्यात येत आहे.
===========================================जातपंचायतींना सरकारचा चाप
मुंबई - समाजात एखाद्या कुटुंबाला वाळीत टाकणे अथवा जातपंचायतीच्या जाचक निवाड्याने समाजातून बहिष्कृत करण्याच्या घटनांना आता कायमचा चाप लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज अशा प्रकारच्या अमानवी प्रकाराला कायद्याने पायबंद घालणारे विधेयक विधिमंडळात मांडण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.
समाजातील विशिष्ट कुटुंब किंवा अनेक कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या समाजविघातक प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण (अटकाव, प्रतिबंध व सुधार) हे विधेयक विधिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यावर आज मंत्रिमंडळाने एकमत केले.
राज्यातील नागरिकांत एकोपा राहावा, गावागावातला संघर्ष कायमचा संपावा, सामाजिक बहिष्कृत करण्याचे घटनाबाह्य प्रकार रोखावेत या हेतूने हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी अर्थसंकल्पी अधिवेशनात सामाजिक बहिष्काराच्या वाढत्या घटनांबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्या वेळी या विषयावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना सामाजिक बहिष्कारासारख्या अमानवी प्रथा रोखण्यासाठी शासन कायदा करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार हे विधेयक सादर करण्यात येत आहे.
सामाजिक बहिष्काराच्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सध्या प्रचलित असलेले कायदे पुरेसे नाहीत. त्यामुळे नवीन अधिनियम तयार करणे आवश्यक होते. या नवीन अधिनियमानुसार सामाजिक बहिष्कार टाकणे ही कृती गुन्हा ठरविण्यात आली असून, ती दखलपात्र आणि जामीनपात्र ठरविण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या गुन्हेगारास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा एकाच वेळी दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
===========================================छावणी बंद, लावणी सुरू - विखे पाटील
उस्मानाबाद - दुष्काळी भागात चारा छावण्या, टॅंकर सुरू होऊ नयेत, अशीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट होत आहे. ठिकठिकाणी पाणीटंचाई गंभीर होत असताना टॅंकरच्या मंजुरीला विलंब केला जात आहे. डान्स बारच्या निमित्ताने लावणी महत्त्वाची, पण छावणी बंद, अशीच काहीशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडे नाकर्तेपणाबद्दल अधिकाऱ्यांची मुख्यमंत्रीच पाठ थोपटत आहेत. त्यामुळे जनतेने तक्रार कोणाकडे करायची, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केला.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त काही गावांना भेटी दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. सरकारच्या उपाययोजना कागदावरच आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रोजगार हमी योजनेवरील कामांना मंजुरी दिलेली नाही. जिल्ह्यातील चारा छावण्यांचे 28 कोटी रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे. त्यावरून सरकारला छावण्या बंद करायच्या आहेत, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळाचे अनुदान दिलेले नाही. 2012 -2013 मधील अनुदानवाटपाबद्दल उत्तर नाही. टॅंकर भरण्यासाठी वीजपुरवठ्याचे कारण पुढे केले जाते, पण जनरेटरची सोय केली जात नाही. दुष्काळी भागातील घरदार सध्या पाण्याचे मागे आहे. अशा स्थितीत सरकारला गांभीर्य नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरकारचा कारभार सुरू आहे.‘
चाऱ्याबद्दल बनावट माहिती, आकडे दिले जात असल्यामुळे राज्य अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. एकीकडे मुंबईत डान्सबारना परवाना देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून छावणी बंद व लावणी सुरू अशी शासनाची भूमिका दिसत आहे. चारा- पाण्याअभावी जनावरे मरतात. ती विकताही येत नाहीत आणि सांभाळताही येत नाहीत, अशी स्थिती आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा करताना गोग्राम सुरू करण्याची घोषणा सरकारने केली होती, ती फसवी असल्याचे स्पष्ट होत आहे. दुष्काळी परिस्थितीत पालकमंत्री जिल्ह्यात येत नसतील तर त्यांनी जिल्हा सोडावा. त्यांच्या बेफिकिरीचे परिणाम जनता भोगत आहे. पाण्याअभावी लोक स्थलांतर करू लागले आहेत, हे सरकारचे अपयश आहे, असे सांगून विखे पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात दुष्काळ, टंचाईसंदर्भात ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिली.
===========================================
No comments:
Post a Comment