[अंतरराष्ट्रीय]
1- ...तर अर्ध्या तासात जम्मूहून पाकला जाणे शक्य
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
2- पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये चीनी लष्कर
3- हवाई प्रवाशांना आता जादा भरपाई
4- बदलणे म्हणजे हिंदुत्व गमावणे नव्हे : मा.गो. वैद्य
5- सीबीआयला घाबरत नाही, युती नाही- मायावती
6- मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही- कॉंग्रेस
7- कॉंग्रेसला झाला 'आरएसएस फोबिया' - जितेंद्र सिंह
8- बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा- राम गोपाल वर्मा
9- जनधन योजनेतील 28 टक्के खाती निष्क्रिय
10- विमानप्रवासात मृत्यू, दुखापतींबद्दल भरपाईत वाढ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
11- कारवाईच्या भीतीत जगणाऱ्यांचा विचार करा : मुख्यमंत्री
12- दिंडोशीमधे भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, मोहित कंबोजला मारहाण
13- मेट्रो कारशेडवरून युतीमध्ये मतभेद
14- रायपुर; नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद
15- पुणे; आधी चंद्र, मग मंगळ...आणि आता थेट युरेनस
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
16- औरंगाबाद; रेणूच्या बछड्यांबाबत हयगय नव्हती, प्राणीसंग्रहालयाचा दावा
17- परभणी; अवकाशातून पडलेलं भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या
18- फिरोझाबाद; नवरदेवाच्या आयटम साँगच्या हट्टामुळे विवाह मोडला
19- लद्दाखमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी
20- सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन
21- सांगली; मागितलं सिगारेट अन् मिळाला गुलाब
22- हरिमपूर; गावात केवळ महिलाच साजरी करतात होळी
23- कोरेगाव; दुष्काळग्रस्त हिवरे विकते शुद्ध पाणी!
24- कोल्हापूर; आईच्या आक्रोशाने फोडला 'वर्दी'लाही पाझर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
25- भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं : शाहिद आफ्रिदी
26- सलमानकडून डायसीला 'कार' गिफ्ट
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा. यश तुमच्या जवळच असते
(अरुण गिरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
=====================================

वर्षानुवर्षे कारवाईच्या भीतीत जगणाऱ्या कुटुंबांचाही विचार करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
राज्यातल्या दोन लाख अनधिकृत इमारती अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घोषित केला. त्याला विरोध करताना हा निर्णय बिल्डरांच्या हितासाठी घेतला असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, यावेळी अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बिल्डरांचं काय? यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं नाही.
=====================================

काही दिवसांपूर्वी आमटेंच्या हेमलकसातून रेणूला औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आणलं गेलं. त्यानंतर आमटे कुटुंबापासून दुरावलेल्या रेणूनं अचानक अन्नत्याग केला. अशा अवस्थेतच रेणूनं तीन बछड्यांना जन्म दिल्यानं अन्नत्यागाच्या काळात ती गर्भवती असल्याचं उजेडात आलं.
मात्र, तिच्या गर्भावस्थेबद्दल आमटे कुटुंब आणि प्राणीसंग्रहालय यांनी परस्परविरोधी माहिती दिली आहे.
रेणू गर्भवती असल्याची कल्पना दिली होती, असा दावा आमटे कुटुंबीयांनी केला आहे. तर याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती, असं प्राणीसंग्रहालय प्रशासनाचं म्हणणं आहे.
=====================================

=====================================

=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन
सांगली ः जगभरातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या सांगलीच्या बेदाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने "सांगलीचा बेदाणा‘ जी. आय. मानांकन (भौगोलिक उपदर्शन) देवून गौरवला आहे. जगभरात निर्यात करताना हे मानांकन हिरव्या, पिवळ्या बेदाण्याचे मुल्य वाढवणारे ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या मानांकनासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रेट मिशन ग्रुपचे गणेश हिंगमिरे यांनी याविषयीची तांत्रिक माहिती सांगितली.
ते म्हणाले, ""केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाकडून देशातील वैशिष्टपूर्ण उत्पादनांना हे मानांकन दिले जाते. पहिले मानांकन दार्जिलिंगच्या चहाला मिळाले. त्या यादीत आता सांगलीच्या बेदाण्याचा समावेश झाला. ही ही मानाची बाब आहे. 1972 पासूनची द्राक्ष लागवड, त्यावरील संशोधन अहवाल जोडून प्रस्ताव सादर केला होता. इथली माती, पाणी व निसर्गाची रचना या गोष्टी द्राक्षनिर्मिती व त्यातून बेदाणा निर्मितीसाठी सर्वात आदर्श ठरल्या. त्यामुळे भौगोलिक उपदर्शन मानांकन मिळू शकले. देशातून अशा एकूण 75 शेतमालांचे प्रस्ताव मानांकनाच्या प्रतिक्षेत आहेत. कोकणचा हापूस आणि सांगलीच्या हळदीआधी इथल्या बेदाण्याने हे मान पटकावला आहे.‘‘
=====================================
मागितलं सिगारेट अन् मिळाला गुलाब
नो स्मोकिंग डे- ‘सकाळ‘ला पान असोसिशनची साथ, सांगलीकरांचा प्रतिसाद
सांगली- आठवडाभराच्या कामाच्या ताणातून रविवारच्या सुटीनं निवांतपणा मिळालेला... सिगारेटचा एक दीर्घ "कश‘ मारून नाकातून धूर सोडण्याचा इरादा होता... पानपट्टीवर पोहचून "एक सिगारेट द्या‘ अशी मागणी केली पण हाती गुलाब ठेवला गेला. "गेट वेल सून‘ असं सांगत पानपट्टीचालकाने "नो स्मोकिंग‘चे आवाहन केले. सांगली शहरातील पाचशे पानपट्ट्यांवर आज दिवसभर हे चित्र होते.
जागतिक "नो स्मोकिंग डे‘च्या निमित्ताने "सकाळ‘ने सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि नागरिक जागृती मंचच्या सहकार्याने आयोजित केलेल्या "सिगारेटला सुटी, आरोग्याशी गट्टी‘ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. "सकाळ‘च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या तरुणांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. शहरातील सर्व पानपट्ट्यांवर पोस्टर झळकली. तरुणांसह सर्वांमध्ये त्याचीच चर्चा होती. आज सिगारेटला सुटी हा चर्चेतील विषय होता. अनेकांनी या उपक्रमाला साथ देण्याच्या इराद्याने सिगारेट ओढली नाही. "सकाळ‘ला तसे कळवलेदेखील.
येथील मित्रमंडळ चौकातील जमादार पान शॉप आणि पटेल चौकातील राजाराम पान शॉपमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. त्या ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांनी किमान आजचा दिवस सिगारेट ओढणार नाही, उद्यापासून त्याचे प्रमाण कमी करू अन् एक दिवस सिगारेटमुक्त जीवन जगू, अशी ग्वाही दिली. हे या उपक्रमाचे पहिले यश.
=====================================
"त्या' गावात केवळ महिलाच साजरी करतात होळी

हमीरपूर (उत्तर प्रदेश) - दरवर्षी देशभरातील स्त्री-पुरुष होळीचा सण उत्साहात साजरा करतात. मात्र उत्तर प्रदेशधील मीरपुर जिल्ह्यातील कुंडरा गावात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महिलाच होळी खेळतात. तर होळीच्या दिवशी पुरुष नेहमीप्रमाणे काम करतात.
होळीच्या दिवशी कुंडरा गावातील पुरुष नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी जातात. तर गावातील रामसीतेच्या मंदिरात गावातील महिला एकत्र येतात आणि धुमधडाक्यात होळीचा सण साजरा करतात. तीस वर्षांपूर्वीपर्यंत गावातील महिला आणि पुरुष एकत्रपणे रामसीतेच्या मंदिरात होळी साजरी करत होते. एकदा एका दरोडेखोराने गावातीलच एका व्यक्तीला पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गोळी मारून ठार केले. तेव्हापासून पुढे काही वर्षे गावात होळी साजरी केली जात नव्हती.
होळी साजरी करावी यासाठी गावातील महिला पुरुषांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र पुरुषांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे एकदा गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन रामसीतेच्या मंदिरात जाऊन होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गावातील महिला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी एरवी साडीच्या पदराने चेहरा झाकणाऱ्या महिला केवळ होळीच्याच दिवशी चेहऱ्यावरील पडदा दूर करून मनसोक्तपणे हसत, खेळत, नाचत होळी साजरी करतात. गावातील प्रत्येक सूनेला कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात येऊ नये म्हणून सर्व पुरुष होळीच्या दिवशी शेतात जाऊन काम करतात.
=====================================
बदलणे म्हणजे हिंदुत्व गमावणे नव्हे : मा.गो. वैद्य
नागपूर - हिंदू समाज कालानुसार बदलत गेला आहे. हिंदू म्हणजे इतिहासाचा मागोवा घेत भविष्याच्या दिशेने आगेकूच करणारा वर्तमान समाज आहे. बदल झाला म्हणजे हिंदुत्व गमावणे नव्हे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश बदलणार असून खाकी हाफ चड्डी अपेक्षेप्रमाणे आता हद्दपार होणार असून, त्याऐवजी तपकिरी रंगाची फुल पँट असणार आहे. या निर्णयावर वैद्य यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
वैद्य म्हणाले, "आजवर हिंदू समाजाने वेळोवेळी बदल स्वीकारले आहेत. हिंदू समाजाचा प्रवास पाहता नव्याचा स्वीकार करताना जुने सर्व त्यागलेले नाही. जे शाश्वत आहे ते कायम ठेवत नव्याचा स्वीकार त्या-त्या वेळेनुसार केला पाहिजे."
"मी धोतर घालतो नवीन पिढी पँट घालते; हा बदल होणारच. उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालतो डिसेंबरमध्ये स्वेटर घालतो. हे सर्व बदल वेळेनुसार असतात. ते होतच राहणार," असे वैद्य यांनी सांगितले.
=====================================
दुष्काळग्रस्त हिवरे विकते शुद्ध पाणी!
वाठार स्टेशन - महाराष्ट्रभर दुष्काळ व पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. पाण्यासाठी दाही दिशा फिरण्यापेक्षा गावातील सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविण्याचा अनोखा यशस्वी प्रयोग दुष्काळी भागातील हिवरे गावाने (ता. कोरेगाव) सरपंच अजित खताळ यांच्या पुढाकारातून यशस्वी केला आहे. एवढेच नव्हे तर गावातील लोकांना दहा रुपयांत 20 लिटर शुद्ध पाणी घरपोच देण्याची योजनाही अमलात आणली आहे. परिणामी परिसरातील गावांमधूनही येथील पाण्याची मागणी वाढू लागली आहे.
सीबीआयला घाबरत नाही, युती नाही- मायावती

लखनौ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असून मी कोणालाच घाबरत नसल्यामुळे या घटनेनंतर बहुजन समाज पक्ष त्यांच्यासोबत युती करेल, असे कदापिही समजू नये. विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढू, असा निर्धार बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्यक्त केला आहे.
मायावती म्हणाल्या, आपल्यासंघटनेला भाजपसोबत घेऊन सांप्रदायिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांची अनेक छुपी कारस्थाने चालू आहेत. पण मी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देणार नाही. २०१७ च्या निवडणुकीत भाजपबरोबर आम्ही युती करणार नाही. त्यासाठी मी एकटीच समर्थ आहे, असे त्यांनी सांगितले.
=====================================
मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही- कॉंग्रेस

नवी दिल्ली - देशातील बॅंकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारची कृपा असून त्यामुळेच ते भारतात परतणार नाहीत, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते टॉम वडक्कन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "केंद्र सरकारची मल्ल्यांवर कृपा असल्याने त्यांचा भारतात येण्याचा विचार नाही. केंद्र सरकार जे वक्तव्य करत आहे ते ठीक आहे. पण त्यांच्या हद्दपारी किंवा त्यासंबंधी काहीही सांगण्यात आलेले नाही‘ हैदराबाद न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंट सगळे होऊन गेल्यानंतर काढल्याचेही ते म्हणाले. हैदराबाद न्यायालयाने मल्ल्या यांच्यासह किंगफिशर एअरलाईन्स मुख्य वित्त अधिकारी ए. रघुनाथ यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांना 13 एप्रिलपूर्वी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
=====================================
आईच्या आक्रोशाने फोडला 'वर्दी'लाही पाझर
कोल्हापूर - ‘पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला चार बुकं शिकता आलं नाही साहेब... पण मिळेल ते काम तो करायचा. चार पैसे साठवून भावंडांना शिकवायचा. असा बाळ रमेश आम्हाला सोडून गेला... साहेब, सोडू नकासा त्यास्नी...‘‘ असा आकांत मांडत आजरा जळितकांडातील मृत रमेश नायक याच्या आईने केलेला आक्रोश आज मुख्यालयातील वर्दीलाही पाझर फोडून गेला. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून मुख्यालयातील खाकी वर्दीतल्यांचे डोळे पाणावले.
आधी चंद्र, मग मंगळ...आणि आता थेट युरेनस
भारताचा चढता खगोल आलेख; आग्रा येथे युरेनस ग्रहावर संशोधन सुरू
पुणे - लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात ज्याविषयी वाचले आणि मोठेपणी ज्याच्याशी ऐकीव संदर्भातही संबंध राहिला नाही, अशा दुर्लक्षित आणि अल्प माहिती उपलब्ध असणाऱ्या ग्रहांपैकी एक म्हणजे युरेनस. याच युरेनसचा शोध लागल्याला रविवारी (ता. 13) 235 वर्षे पूर्ण होत आहेत. या ग्रहाविषयी आग्रा शहरातील शास्त्रज्ञांचा एक गट संशोधन करत आहे.
कॉंग्रेसला झाला 'आरएसएस फोबिया' - जितेंद्र सिंह

जम्मू - कॉंग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फोबिया झाल्याची टीका केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले, ‘ज्यावेळी कथुया येथील मतदारसंघातून गुलाम नबी आझाद पराभूत झाले त्यावेळी त्यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. रा.स्व.संघ ही कोणतीही दहशतवादी संघटना नसून राष्ट्रीय संघटना आहे. ही तुलना चुकीची आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही‘
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचा जसा विरोध आहे, त्याचप्रमाणे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेलाही विरोध करतो‘ असे म्हणत टीका केली आहे.
=====================================
बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा- राम गोपाल वर्मा

मुंबई- "मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे," असा आश्चर्यजनक सल्ला देत चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना दिला आहे.
रामूने दिवसभरात मल्ल्यांना असभ्य भाषेत सल्ले देणारे सहा ट्विट केले. रामूने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "बिकिनी गर्लचा प्रस्ताव कदाचित बँका मान्य करणार नाहीत, मात्र बँकर्स हा प्रस्ताव आनंदाने मान्य करतील."
मल्ल्या यांनी बँकांकडून कर्ज घेऊन कमावलेली बिकिनी गर्ल्सची संपत्ती यापूर्वीच बँकर्सकडे सुरक्षा ठेव म्हणून ठेवली असावी. त्यामुळेच बँका तक्रार करण्यास पुढे येत नाहीत; असेही त्यांनी म्हटले आहे.
दीपिका पदुकोन, नर्गिस फाखरी, ईशा गुप्ता, कतरीना कैफ यांसारख्या मल्ल्यांच्या कॅलेंडर गर्ल्सनी बँकर्सना प्रभावित केले असावे, असे रामूने म्हटले आहे.
=====================================
जनधन योजनेतील 28 टक्के खाती निष्क्रिय
पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे.
मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते हे केवळ सरकारी अनुदान किंवा लाभ मिळवण्यासाठी आहे या गैरसमजातून एका व्यक्तीच्या नावाने दोन खाती उघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
"जन धन योजनेअंतर्गत आपण पहिल्यांदा खाते उघडलेले नाही असे 33 टक्के ग्राहकांनी सांगितले आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीतदेखील 14 टक्के ग्राहकांचे हेच मत होते. नव्या फेरीत अनेक नागरिकांनी दुसऱ्यांदा खाती उघडली आहेत. यापैकी कित्येक खाती वापरात नाहीत.", असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जनधन योजनेअंतर्गत डिसेंबर 2014 मध्ये सर्वात पहिल्या फेरीत अनेक नागरिकांची बँक खाती उघडण्यात आले. त्यानंतर जुलै 2015 मध्ये दुसरी फेरी पार पडली. मायक्रोसेव्हने तिसऱ्यांदा या योजनेची प्रगती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले.
आतापर्यंत 62 टक्के लोकांनी आपले जनधन बँक खाते आधार कार्डाशी जोडल्याचे सांगितले. मागील अहवालात हे प्रमाण 52 टक्के होते. जानेवारी 20 पर्यंत या योजनेअंतर्गत 20.38 बँक खाती उघडण्यात आली आहेत.
=====================================
विमानप्रवासात मृत्यू, दुखापतींबद्दल भरपाईत वाढ
नवी दिल्ली : विमान प्रवासात प्रवाशांची झालेली हानी भरुन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्याचा ठराव राज्यसभेत मंजुर झाला आहे. लोकसभेत पुर्वीच हा ठराव मंजुर झाला आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळून हा कायदा अस्तित्वात आला तर देशातील विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दराने नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
प्रस्तावित ठरावानुसार, विमानात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याची भरपाई स्पेशल ड्रॉइंग राइट्सच्या आधारावर द्यावी लागणार आहे. मृत्यू किंवा शारिरीक दुखापतीसाठी व्यक्तीला 4,150 एसडीआरच्याऐवजी 4,694 एसडीआरची भरपाई मिळणार आहे. सामानाचे नुकसान झाल्यास किंवा ते मिळण्यास उशीर झाल्यास आता 1,000 एसडीआरच्याऐवजी 1,131 एसडीआर भरपाई मिळणार आहे. शिवाय, कार्गोला झालेल्या विलंबामुळे मिळणारी भरपाई 17 एसडीआरच्याऐवजी 19 एसडीआर करण्यात आली आहे.
महागाई दराच्या आधारावर पाच वर्षातून एकदा इंटरनॅशनल सिव्हील एविएशन ऑरगायनेझशनकडून नुकसान भरपाई मर्यादेत बदल केले जातात.
स्पेशल ड्रॉइंग राइट्स
जागतिक नाणेनिधीने 16 देशांच्या चलनाची किंमत लक्षात घेऊन एसडीआर अर्थात स्पेशल ड्रॉइंग राइट्सचे मूल्य निश्चित केले आहे. भारतीय चलनानुसार, एका एसडीआरची किंमत 93.45 रुपये आहे.

कारवाईच्या भीतीत जगणाऱ्यांचा विचार करा : मुख्यमंत्री
नागपूर : ज्यांचं स्वतःचं धोरण बिल्डरधार्जीणं आहे, त्यांनी इमारती अधिकृत करण्यावरुन विरोधी सूर लावू नये, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे. नागपुरात रस्त्याच्या भूमीपूजनावेळी ते बोलत होते.
वर्षानुवर्षे कारवाईच्या भीतीत जगणाऱ्या कुटुंबांचाही विचार करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
राज्यातल्या दोन लाख अनधिकृत इमारती अधिकृत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घोषित केला. त्याला विरोध करताना हा निर्णय बिल्डरांच्या हितासाठी घेतला असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र, यावेळी अनधिकृत इमारती उभारणाऱ्या बिल्डरांचं काय? यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं नाही.
रेणूच्या बछड्यांबाबत हयगय नव्हती, प्राणीसंग्रहालयाचा दावा
औरंगाबाद : औरंगाबादमधल्या रेणू या मादी बिबट्याच्या बछड्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येत आहे. वनविभागाने रेणूच्या तीन बछड्यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे, तर महापालिका आयुक्त बकोरिया यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी आमटेंच्या हेमलकसातून रेणूला औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आणलं गेलं. त्यानंतर आमटे कुटुंबापासून दुरावलेल्या रेणूनं अचानक अन्नत्याग केला. अशा अवस्थेतच रेणूनं तीन बछड्यांना जन्म दिल्यानं अन्नत्यागाच्या काळात ती गर्भवती असल्याचं उजेडात आलं.
मात्र, तिच्या गर्भावस्थेबद्दल आमटे कुटुंब आणि प्राणीसंग्रहालय यांनी परस्परविरोधी माहिती दिली आहे.
रेणू गर्भवती असल्याची कल्पना दिली होती, असा दावा आमटे कुटुंबीयांनी केला आहे. तर याबाबत आम्हाला काहीही माहिती नव्हती, असं प्राणीसंग्रहालय प्रशासनाचं म्हणणं आहे.
'ते' भांडं नासा घेणार, तोतया पत्रकाराला परभणीत बेड्या
परभणी : आपल्याकडे असलेल्या एका भांड्यावर आकाशातून वीज पडली, ते भांडे नासा खरेदी करणार आहे, अशी बतावणी करुन दोन कोटींना लुबाडणाऱ्या तोतया पत्रकाराला परभणीत अटक करण्यात आली आहे. हबीब अहमद अब्दुल्ला उर्फ हम्मु चाऊस असं या भामट्याचं नाव आहे.
पुढील संशोधनासाठी आपल्याला 2 कोटींची आवश्यकता आहे, असं सांगत हबीबने काही लोकांकडून 2 कोटी 17 लाख रुपये उकळले. या व्यवहारातून 15 हजार कोटी रुपये मिळणार असल्याची थाप ठोकत आता पैसे देणाऱ्यांना 15 हजार कोटींमधला अर्धा हिस्सा देण्याचा वायदाही त्याने केला.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. तक्रारीवरुन पोलिसांनी शनिवारी रात्री परभणीतल्या राधिका पॅलेस हॉटेलमधून आरोपी हबीबला अटक केली आहे. त्याच्यावर नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं : शाहिद आफ्रिदी
कोलकाता : भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळतं, असं मत पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद अफ्रिदीनं व्यक्त केलं आहे. काल रात्री पाकचा संघ कोलकात्यात दाखल झाला. त्यानंतर आज पाकिस्तान संघानं घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यानं हे मत व्यक्त केलं.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये चीनी लष्कर
- नवी दिल्ली, दि. १३ - भारतीय हद्दीत लडाखमध्ये वारंवार घुसखोरी करणा-या चीनी लष्कराचा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये वावर आढळून आला आहे. उत्तरकाश्मीरमध्ये नावगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानला लागून असणा-या सीमाभागात चीनी लष्कराचे अधिकारी कार्यरत आहेत.पाकिस्तानी लष्काचे जे संदेश इंटरसेप्ट केले आहेत त्यानुसार सीमाभागात इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी चीनी लष्कर इथे आले आहे. भारतीय लष्कराने अद्यापपर्यंत याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, भारतीय लष्कराने चीनी लष्कराच्या उपस्थितीबद्दल गुप्तचरयंत्रणांना सर्तक केले आहे.सर्वप्रथम २०१५ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी लष्कर दिसले होते. त्यानंतर आता तंगधार सेक्टरच्या जवळही चीनी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. या भागात चीनची सरकारी कंपनी झेलम-नीलम ९७० मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारत आहे.पीओकेमधील लीपव्हॅलीमध्ये पर्यायी रस्ता म्हणून चीनने बोगदा बांधणीचेही काम हाती घेतले आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर उभारत आहे. त्यासाठीच चीनी अधिका-यांच्या पीओकेमधील फे-या वाढल्याचे रणनितीक तज्ञांचे मत आहे. या प्रकल्पातंर्गत कराचीतील ग्वादर बंदर चीनमधील शिनजिंयागला जोडले जाणार आहे.
दिंडोशीमधे भाजप-मनसे कार्यकर्ते भिडले, मोहित कंबोजला मारहाण
- मुंबई, दि. १३ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकावणा-या मुंबई भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंबोज याला रविवारी मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. आप्पापाडा, कुरार व्हीलेज येथे बॉडीगार्ड आणि पोलीस संरक्षणात कंबोज एका कार्यक्रमाला आला होता.त्यावेळी मनसेचे विभागअध्यक्ष अरुण सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी बॉडीगार्डच्या गराड्यात घुसून मोहित कंबोजवर हल्ला केला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला. मनसे कार्यकर्त्यांना अटक झालेली असून कुरार पोलीस स्थानकाबाहेर मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमले आहेत.शनिवारी मोहित कंबोजने राज ठाकरे यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रामध्ये मुंबईमध्ये उत्तर भारतीयांचं तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी काही नुकसान केलं तर त्याच्यापेक्षा दुप्पट नुकसान तुमचं करु अस लिहील होत.तुम्हाला प्रेमाची भाषा समजत नसेल आणि फक्त मारहाणीचीच भाषा समजत असेल, तर ईंट का जवाब पथ्थर से देंगे असंही या पत्रात कंबोज यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर शनिवारी रात्री कंबोजच्या मालाड येथील कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.
सलमानकडून डायसीला 'कार' गिफ्ट
- मुंबई, दि. १३ - बॉलिवूडमध्ये सलमान खान अनेकांसाठी गॉडफादर आहे. पक्की मैत्री आणि दिलदार स्वभावासाठी ओळखला जाणारा सलमान आपल्याबरोबरच्या सहकलाकारांना मदत करताना फायदा-तोटयाचा अजिबात विचार करत नाही. त्यामुळेच बॉलिवूडमध्ये सलमानच्या शब्दाला वजन आहे.सलमानच्या दिलदारपणाचे आणखी एक उदहारण समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसास सलमानने 'जय हो' ची को-स्टार डायसी शहाला एक नवी आलिशान गाडी भेट केली आहे.सलमान आणि डायसीमध्ये चांगली मैत्री आहे. यापूर्वी कतरिना कैफ बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. त्यावेळीही सलमानने तिला आलिशान गाडी भेट केली होती. पण प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर कॅटने ती गाडी विकून टाकली.
नवरदेवाच्या आयटम साँगच्या हट्टामुळे विवाह मोडला
- फिरोझाबाद, दि. १३ - लग्नाच्या रात्री नववधूवर नव-यासोबत बॉलिवूडच्या आयटम सॉंगवर डान्स करण्याची जबरदस्ती केली म्हणून नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची घटना उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात घडली.विवाहसोहळा सुरु असताना नव-याच्या मित्रांनी नवविवाहीत जोडप्याकडे आयटम साँगवर डान्स करण्याचा आग्रह धरला. पण नववधूने नकार दिला. ती स्टेजवरच थांबली. त्यानंतर नव-याने डान्स फ्लोअरवर जाऊन मित्रांसोबत जाऊन ठेका धरला.त्यानंतर नवरा स्टेजवर आला व नववधूला सोबत डान्स करण्यासाठी जबरदस्ती करु लागला. त्यावेळी नववधूच्या काकांनी मध्ये हस्तक्षेप केला. पण चिडलेल्या नवरदेवांनी थेट त्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या वधूने गळयातील हार काढून फेकून दिला आणि लग्न मोडल्याचे जाहीर करुन स्टेजवरुन निघून गेली.क्षणार्धात लग्न मोडल्यामुळे संतापलेल्या वरपक्षाची वधूपक्षाबरोबर वादावादी सुरु झाली. विषय हाणामारीपर्यंत गेला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. नवरदेव त्याच्या वडिलांसह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पण लिखित तक्रार न नोंदवल्यामुळे पोलिसांनी त्यांची सुटका केली.
मेट्रो कारशेडवरून युतीमध्ये मतभेद
- मुंबई : मुंबईकर दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरे कॉलनीत उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत झाला; मात्र आता त्याबाबत सत्ताधारी भाजपा व सेनेतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एकाच व्यासपीठावर मेट्रो-३च्या डेपोबाबत परस्परविरोधी मते मांडली. त्यासाठी निमित्त ठरले ते शनिवारी झालेल्या राष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्ट परिषदेचे.जावडेकर यांनी शाश्वत विकासाचा विचार करून आरे कॉलनीत कारशेड उभारल्याने पर्यावरणाचे फारसे नुकसान होणार नसल्याचे सांगत त्याला समर्थन दिले; तर देसाई यांनी त्याला विरोध दर्शवित आरेमध्ये कसलाही विकास होणार नसून, मेट्रोची कारशेड दुसरीकडेच होईल, असे ठामपणे जाहीर केले. त्यामुळे सत्ताधारी युतीतील अन्य अनेक विषयांतील विरोध चव्हाट्यावर असताना आता ‘मेट्रो-३’ची त्यामध्ये भर पडली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादाला मोठे महत्त्व येणार आहे
- =====================================
लद्दाखमध्ये पुन्हा चीनची घुसखोरी
- लेह : चीनच्या सैनिकांनी लद्दाख क्षेत्रात पुन्हा एकदा घुसखोरी केली. हे सैनिक सीमा ओलांडून पानगोंग तलावाजवळ भारतीय हद्दीत सुमारे ६ किमी आत घुसले होते. परंतु, भारत-तिबेट सीमा पोलिसांनी (आयटीबीपी) त्यांना दोन तासांच्या आत माघारी पाठविले.संरक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गेल्या ८ मार्चची आहे. या दिवशी पीपल्स लिबरेशन आर्र्मीचे (पीएलए) ११ सैनिक पानगोंगजवळ फिंगर-८ आणि सिरजाप-१मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून (एलएसी) भारतीय हद्दीत दाखल झाले होते. त्यांचे नेतृत्व कर्नल स्तरावरील एक अधिकारी करीत होता. चीनचे सैनिक चार गाड्यांमधून भारताच्या ठाकुंच सुरक्षा चौकीत आले आणि भारतात ५.५ किमी आतपर्यंत पोहोचले.चिनी सैनिकांच्या या समूहाचा सामना गस्तीवर असलेल्या इंडो-तिबेटियनबॉर्डर (आयटीबीपी) पोलिसांशी
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद
- रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलावर (बीएसएफ) नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद, तर चार जखमी झाले.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या बांदे पोलीस स्टेशनअंतर्गत बेचा गावातील जंगलात नक्षलवाद्यांनी शनिवारी पहाटे बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. त्यात १२२ व्या बटालियनचे जवान विजयकुमार आणि राकेश नेहरा शहीद, तर अन्य चार जवान जखमी झाले. जवानांचे हे पथक पंखाजूर क्षेत्रातील छोटेबेटिया छावणीतून नक्षलविरोधी मोहिमेवर रवाना झाले होते. हे पथक बेचा गावातील जंगल आणि नदीजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तरात कारवाई केली. सुमारे एक तास चकमकीनंतर नक्षलवादी पळून गेले. दरम्यान, चकमकीची माहिती मिळताच अतिरिक्त कुमक घटनास्थळी रवाना करण्यात आली. जखमी जवानांना बाहेर काढून हेलिकॉप्टरने रायपूरला पाठविण्यात आले.दुसरीकडे बस्तर क्षेत्रातील नक्षलवाद्यांनी बनावट चकमकीत लोकांना ठार मारण्यात येत असून खोटे आत्मसमर्पण करवून घेतले जात असल्याचा आरोप केला आहे. सोबतच या विरोधात बंदचे आवाहनही केले आहे.
=====================================
हवाई प्रवाशांना आता जादा भरपाई
- नवी दिल्ली : विमान अपघातात मृत्यू होणे, जखमी होणे, सामान हरवणे किंवा अक्षम्य उशीर यासाठी हवाई प्रवाशांना मिळणाऱ्या भरपाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. या संबंधीचे हवाई वाहतूक दुरुस्ती विधेयक संसदेत नुकतेच मंजूर करण्यात आले आहे.हवाई अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास यापुढे १.०५ कोटी रुपयांपर्यंत भरपाई मिळू शकेल. सध्या ही भरपाई ९३ लाख होती. ही रक्कम स्पेशल ड्रॉइंग राईट्स (एसडीआर)द्वारे मोजण्यात येणार आहे.एसडीआरचे चलनमूल्य अमेरिकन डॉलर, युरो, जापनीज येन आणि पाऊंड स्टर्लिंगच्या बाजार विनिमय दरावर अवलंबून असेल. एक एसडीआर म्हणजेच सुमारे ९३ रुपये होय.यापुढे विमानाला उशीर झाल्यास ४.३६ लाखांपर्यंतची भरपाई मिळेल. सध्या ही भरपाई ३.८६ लाख रुपये देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना (आयसीएओ) पाच वर्षांतून एकदा अशा भरपाईची मर्यादा वाढवते.
...तर अर्ध्या तासात जम्मूहून पाकला जाणे शक्य
- सुरेश डुग्गर, सुचेतगढ (जम्मू फ्रंटियर)अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे. तो खुला व्हावा, असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी दरवेळी दोन देशांतील संबंध आडवे येतात.जम्मूहून सियालकोट अंतर आहे केवळ २५ किलोमीटर अंतरावर आणि दोन्ही देशातील सीमा आहे तेथून ११ किलोमीटर अंतरावर. जम्मू-सियालकोट मार्गामध्येच दोन देशांतील सीमा आणि चौकी येते. स्वातंत्र्यापूर्वी येथून ये -जा सततच होत असे. पण १९४७ साली दोन देश वेगळे झाले आणि श्रीनगर-रावळपिंडी मार्गाप्रमाणे हा मार्गही बंद झाला.जम्मू-सियालकोट सीमा ही कायम शांततेचे प्रतीक मानली गेली आहे. आतापर्यंत येथून ना कधी अतिरेकी कारवाया झाल्या, ना कधी दोन देशांतील सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले.श्रीनगर-मुझफ्फराबाद आणि पुंछ-रावळकोट मार्ग व्यापारासाठी का होईना, पण याआधी खुले झाले. मात्र जम्मू-सियालकोट मार्ग मात्र बंदच राहिला. हा मार्ग खुला व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री पै. मुफ्ती महमद सईद यांनी अनेकदा प्रयत्नही केला. पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. भारत आणि पाकिस्तान यांना जोडणारा हा मार्ग अतिशय चांगल्या स्थितीत आहे.भारतीय जकात चौकी आणि पाकिस्तानची पिली चौकी याच मार्गावर आहे आणि दोन्ही देशांतील सैन्यांच्या संयुक्त बैठका याच ठिकाणी होतात. त्यामुळे हा मार्ग खुला व्हावा, असे जम्मू-काश्मीरमधील जनतेला वाटते. हा मार्ग खुला झाला, तर त्यांना २0 तास प्रवास करून वाघा बॉर्डरवर जावे लागणार नाही. सध्या तोच मार्ग प्रवासासाठी खुला आहे.
सांगलीच्या बेदाण्याला जी. आय. मानांकन
सांगली ः जगभरातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी धडपडणाऱ्या सांगलीच्या बेदाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने "सांगलीचा बेदाणा‘ जी. आय. मानांकन (भौगोलिक उपदर्शन) देवून गौरवला आहे. जगभरात निर्यात करताना हे मानांकन हिरव्या, पिवळ्या बेदाण्याचे मुल्य वाढवणारे ठरेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या मानांकनासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रेट मिशन ग्रुपचे गणेश हिंगमिरे यांनी याविषयीची तांत्रिक माहिती सांगितली.
ते म्हणाले, ""केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाकडून देशातील वैशिष्टपूर्ण उत्पादनांना हे मानांकन दिले जाते. पहिले मानांकन दार्जिलिंगच्या चहाला मिळाले. त्या यादीत आता सांगलीच्या बेदाण्याचा समावेश झाला. ही ही मानाची बाब आहे. 1972 पासूनची द्राक्ष लागवड, त्यावरील संशोधन अहवाल जोडून प्रस्ताव सादर केला होता. इथली माती, पाणी व निसर्गाची रचना या गोष्टी द्राक्षनिर्मिती व त्यातून बेदाणा निर्मितीसाठी सर्वात आदर्श ठरल्या. त्यामुळे भौगोलिक उपदर्शन मानांकन मिळू शकले. देशातून अशा एकूण 75 शेतमालांचे प्रस्ताव मानांकनाच्या प्रतिक्षेत आहेत. कोकणचा हापूस आणि सांगलीच्या हळदीआधी इथल्या बेदाण्याने हे मान पटकावला आहे.‘‘
=====================================
मागितलं सिगारेट अन् मिळाला गुलाब
नो स्मोकिंग डे- ‘सकाळ‘ला पान असोसिशनची साथ, सांगलीकरांचा प्रतिसाद
सांगली- आठवडाभराच्या कामाच्या ताणातून रविवारच्या सुटीनं निवांतपणा मिळालेला... सिगारेटचा एक दीर्घ "कश‘ मारून नाकातून धूर सोडण्याचा इरादा होता... पानपट्टीवर पोहचून "एक सिगारेट द्या‘ अशी मागणी केली पण हाती गुलाब ठेवला गेला. "गेट वेल सून‘ असं सांगत पानपट्टीचालकाने "नो स्मोकिंग‘चे आवाहन केले. सांगली शहरातील पाचशे पानपट्ट्यांवर आज दिवसभर हे चित्र होते.
जागतिक "नो स्मोकिंग डे‘च्या निमित्ताने "सकाळ‘ने सांगली जिल्हा पान असोसिएशन आणि नागरिक जागृती मंचच्या सहकार्याने आयोजित केलेल्या "सिगारेटला सुटी, आरोग्याशी गट्टी‘ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. "सकाळ‘च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या तरुणांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला. शहरातील सर्व पानपट्ट्यांवर पोस्टर झळकली. तरुणांसह सर्वांमध्ये त्याचीच चर्चा होती. आज सिगारेटला सुटी हा चर्चेतील विषय होता. अनेकांनी या उपक्रमाला साथ देण्याच्या इराद्याने सिगारेट ओढली नाही. "सकाळ‘ला तसे कळवलेदेखील.
येथील मित्रमंडळ चौकातील जमादार पान शॉप आणि पटेल चौकातील राजाराम पान शॉपमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. त्या ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांनी किमान आजचा दिवस सिगारेट ओढणार नाही, उद्यापासून त्याचे प्रमाण कमी करू अन् एक दिवस सिगारेटमुक्त जीवन जगू, अशी ग्वाही दिली. हे या उपक्रमाचे पहिले यश.
=====================================
"त्या' गावात केवळ महिलाच साजरी करतात होळी
हमीरपूर (उत्तर प्रदेश) - दरवर्षी देशभरातील स्त्री-पुरुष होळीचा सण उत्साहात साजरा करतात. मात्र उत्तर प्रदेशधील मीरपुर जिल्ह्यातील कुंडरा गावात गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महिलाच होळी खेळतात. तर होळीच्या दिवशी पुरुष नेहमीप्रमाणे काम करतात.
होळीच्या दिवशी कुंडरा गावातील पुरुष नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी जातात. तर गावातील रामसीतेच्या मंदिरात गावातील महिला एकत्र येतात आणि धुमधडाक्यात होळीचा सण साजरा करतात. तीस वर्षांपूर्वीपर्यंत गावातील महिला आणि पुरुष एकत्रपणे रामसीतेच्या मंदिरात होळी साजरी करत होते. एकदा एका दरोडेखोराने गावातीलच एका व्यक्तीला पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून गोळी मारून ठार केले. तेव्हापासून पुढे काही वर्षे गावात होळी साजरी केली जात नव्हती.
होळी साजरी करावी यासाठी गावातील महिला पुरुषांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र पुरुषांनी त्यांचे ऐकले नाही. त्यामुळे एकदा गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन रामसीतेच्या मंदिरात जाऊन होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आजपर्यंत गावातील महिला होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी एरवी साडीच्या पदराने चेहरा झाकणाऱ्या महिला केवळ होळीच्याच दिवशी चेहऱ्यावरील पडदा दूर करून मनसोक्तपणे हसत, खेळत, नाचत होळी साजरी करतात. गावातील प्रत्येक सूनेला कार्यक्रमात सहभागी होण्यापासून रोखण्यात येऊ नये म्हणून सर्व पुरुष होळीच्या दिवशी शेतात जाऊन काम करतात.
=====================================
बदलणे म्हणजे हिंदुत्व गमावणे नव्हे : मा.गो. वैद्य
नागपूर - हिंदू समाज कालानुसार बदलत गेला आहे. हिंदू म्हणजे इतिहासाचा मागोवा घेत भविष्याच्या दिशेने आगेकूच करणारा वर्तमान समाज आहे. बदल झाला म्हणजे हिंदुत्व गमावणे नव्हे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश बदलणार असून खाकी हाफ चड्डी अपेक्षेप्रमाणे आता हद्दपार होणार असून, त्याऐवजी तपकिरी रंगाची फुल पँट असणार आहे. या निर्णयावर वैद्य यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
वैद्य म्हणाले, "आजवर हिंदू समाजाने वेळोवेळी बदल स्वीकारले आहेत. हिंदू समाजाचा प्रवास पाहता नव्याचा स्वीकार करताना जुने सर्व त्यागलेले नाही. जे शाश्वत आहे ते कायम ठेवत नव्याचा स्वीकार त्या-त्या वेळेनुसार केला पाहिजे."
"मी धोतर घालतो नवीन पिढी पँट घालते; हा बदल होणारच. उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालतो डिसेंबरमध्ये स्वेटर घालतो. हे सर्व बदल वेळेनुसार असतात. ते होतच राहणार," असे वैद्य यांनी सांगितले.
=====================================
दुष्काळग्रस्त हिवरे विकते शुद्ध पाणी!
वाठार स्टेशन - महाराष्ट्रभर दुष्काळ व पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे. पाण्यासाठी दाही दिशा फिरण्यापेक्षा गावातील सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कायमचा मिटविण्याचा अनोखा यशस्वी प्रयोग दुष्काळी भागातील हिवरे गावाने (ता. कोरेगाव) सरपंच अजित खताळ यांच्या पुढाकारातून यशस्वी केला आहे. एवढेच नव्हे तर गावातील लोकांना दहा रुपयांत 20 लिटर शुद्ध पाणी घरपोच देण्याची योजनाही अमलात आणली आहे. परिणामी परिसरातील गावांमधूनही येथील पाण्याची मागणी वाढू लागली आहे.
अत्यंत आडवळणी व दुर्लक्षित म्हणून हिवरेचा आजवर उल्लेख व्हायचा. गावाचा उंबरा 450, तर लोकसंख्या एक हजार 378. शेती व मेंढपाळ हा अनेकांचा व्यवसाय. जमलंच तर नोकरी. गावाच्या तिन्ही बाजूंनी सह्याद्रीच्या रांगा. परिणामी काळी कसदार जमीन कमी अन् माळरान, पडीक जमीनच अधिक. त्यामुळे कृषी विद्यापीठामधून पदवी घेतलेले अजित खताळ व गावकरी पाण्यासाठी वणवण फिरायचे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी यशस्वीरीत्या राबवलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्यासाठीची भटकंती थांबली असून, परिसराचे नंदनवन झाले. गावात अंतर्गत रस्ते व शिवारातील रस्ते व्यवस्थित नाहीत; परंतु गावकऱ्यांनी प्रथम प्राधान्य दिले ते पाणी मुरवण्याला. सुरवातीच्या प्रयत्नातच गावकऱ्यांना साथ मिळाली ती "सकाळ रिलीफ फंडा‘ची. नंतर शासकीय अधिकाऱ्यांनाही मदतीची भूमिका घेत जलसंधारणाच्या चळवळीला बळ दिले.
=====================================सीबीआयला घाबरत नाही, युती नाही- मायावती
लखनौ : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) माध्यमातून आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत असून मी कोणालाच घाबरत नसल्यामुळे या घटनेनंतर बहुजन समाज पक्ष त्यांच्यासोबत युती करेल, असे कदापिही समजू नये. विधानसभा निवडणूक आम्ही स्वतंत्रपणेच लढू, असा निर्धार बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी व्यक्त केला आहे.
मायावती म्हणाल्या, आपल्यासंघटनेला भाजपसोबत घेऊन सांप्रदायिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांची अनेक छुपी कारस्थाने चालू आहेत. पण मी त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ देणार नाही. २०१७ च्या निवडणुकीत भाजपबरोबर आम्ही युती करणार नाही. त्यासाठी मी एकटीच समर्थ आहे, असे त्यांनी सांगितले.
=====================================
मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही- कॉंग्रेस
नवी दिल्ली - देशातील बॅंकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यावर केंद्रातील मोदी सरकारची कृपा असून त्यामुळेच ते भारतात परतणार नाहीत, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे.
कॉंग्रेस प्रवक्ते टॉम वडक्कन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, "केंद्र सरकारची मल्ल्यांवर कृपा असल्याने त्यांचा भारतात येण्याचा विचार नाही. केंद्र सरकार जे वक्तव्य करत आहे ते ठीक आहे. पण त्यांच्या हद्दपारी किंवा त्यासंबंधी काहीही सांगण्यात आलेले नाही‘ हैदराबाद न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंट सगळे होऊन गेल्यानंतर काढल्याचेही ते म्हणाले. हैदराबाद न्यायालयाने मल्ल्या यांच्यासह किंगफिशर एअरलाईन्स मुख्य वित्त अधिकारी ए. रघुनाथ यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांना 13 एप्रिलपूर्वी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
=====================================
आईच्या आक्रोशाने फोडला 'वर्दी'लाही पाझर
कोल्हापूर - ‘पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला चार बुकं शिकता आलं नाही साहेब... पण मिळेल ते काम तो करायचा. चार पैसे साठवून भावंडांना शिकवायचा. असा बाळ रमेश आम्हाला सोडून गेला... साहेब, सोडू नकासा त्यास्नी...‘‘ असा आकांत मांडत आजरा जळितकांडातील मृत रमेश नायक याच्या आईने केलेला आक्रोश आज मुख्यालयातील वर्दीलाही पाझर फोडून गेला. हृदय पिळवटून टाकणारे हे दृश्य पाहून मुख्यालयातील खाकी वर्दीतल्यांचे डोळे पाणावले.
विम्याचे 35 कोटी हडपण्यासाठी साने गुरुजी वसाहतीमधील बांधकाम व्यावसायिक अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक यांनी नियोजनबद्ध कट रचून रमेश नायक याचा खून केला. आजरा-आंबोली रस्त्यावर रमेशचा गळा दाबून खून करून मृतदेह मोटारीत घालून ती पेटवून देऊन स्वतःच्या अपघाताचा बनाव केला. पोलिसांनी तो उघडकीस आणला. याप्रकरणी पवार बंधूंना अटक केली. आज जबाब नोंदविण्यासाठी मृत रमेशची आई शांताबाई आणि वडील कृष्णाप्पा नायक पोलिस मुख्यालयात सकाळी आले होते. त्यांच्यासोबत इतर नातेवाईकही होते.
=====================================आधी चंद्र, मग मंगळ...आणि आता थेट युरेनस
भारताचा चढता खगोल आलेख; आग्रा येथे युरेनस ग्रहावर संशोधन सुरू
पुणे - लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात ज्याविषयी वाचले आणि मोठेपणी ज्याच्याशी ऐकीव संदर्भातही संबंध राहिला नाही, अशा दुर्लक्षित आणि अल्प माहिती उपलब्ध असणाऱ्या ग्रहांपैकी एक म्हणजे युरेनस. याच युरेनसचा शोध लागल्याला रविवारी (ता. 13) 235 वर्षे पूर्ण होत आहेत. या ग्रहाविषयी आग्रा शहरातील शास्त्रज्ञांचा एक गट संशोधन करत आहे.
प्रणव शर्मा (वय 23) हा विद्युत अभियांत्रिकी तरुण आपल्या टीमसह युरेनसचा वेध घेत आहे. अमेरिकेतील "नासा‘ या अवकाश संशोधन संस्थेच्या
"न्यू होरायझन्स‘ या मोहिमेसाठी प्रणव काम करत असून, येत्या सहा महिन्यांत युरेनसबद्दलची काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे या संशोधनातून मिळतील, असा आत्मविश्वास त्याने "सकाळ‘शी बोलताना व्यक्त केला.

आग्रा येथे युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी एक वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे. "नासा‘सोबत असणाऱ्या अमेरिकेतील
प्लॅनेटरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या हेन्री थ्रूप यांच्यासोबत युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांच्या छायाचित्रांचा अभ्यास प्रणव संगणकाच्या साहाय्याने करीत आहे.
या छायाचित्रांच्या अचूक विश्लेषणासाठी "अल्गोरिदम‘ विकसित करण्याची जबाबदारी त्याच्याकडे आहे.

प्रणव म्हणाला, ‘गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात "नासा‘ने त्यांची "न्यू होरायझन्स‘ ही महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम सुरू केली. "न्यू होरायझन्स‘ हे यान मानवी इतिहासात पहिल्यांदाच प्लुटो ग्रहापर्यंत पोचले. त्याच प्रवासात हे यान युरेनस ग्रहावरून पुढे गेले होते. त्या वेळी मिळविलेल्या युरेनसच्या छायाचित्रांच्या आधारे महत्त्वपूर्ण माहितीचे विश्लेषण होत आहे. त्यातून युरेनस संदर्भात प्रथमच काही निरीक्षणे उपलब्ध होतील.‘‘
=====================================कॉंग्रेसला झाला 'आरएसएस फोबिया' - जितेंद्र सिंह
जम्मू - कॉंग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फोबिया झाल्याची टीका केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले, ‘ज्यावेळी कथुया येथील मतदारसंघातून गुलाम नबी आझाद पराभूत झाले त्यावेळी त्यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे पराभव झाल्याचे म्हटले होते. रा.स्व.संघ ही कोणतीही दहशतवादी संघटना नसून राष्ट्रीय संघटना आहे. ही तुलना चुकीची आणि त्यामध्ये काहीही तथ्य नाही‘
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आमचा जसा विरोध आहे, त्याचप्रमाणे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेलाही विरोध करतो‘ असे म्हणत टीका केली आहे.
=====================================
बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा- राम गोपाल वर्मा
मुंबई- "मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे," असा आश्चर्यजनक सल्ला देत चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना दिला आहे.
रामूने दिवसभरात मल्ल्यांना असभ्य भाषेत सल्ले देणारे सहा ट्विट केले. रामूने ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, "बिकिनी गर्लचा प्रस्ताव कदाचित बँका मान्य करणार नाहीत, मात्र बँकर्स हा प्रस्ताव आनंदाने मान्य करतील."
मल्ल्या यांनी बँकांकडून कर्ज घेऊन कमावलेली बिकिनी गर्ल्सची संपत्ती यापूर्वीच बँकर्सकडे सुरक्षा ठेव म्हणून ठेवली असावी. त्यामुळेच बँका तक्रार करण्यास पुढे येत नाहीत; असेही त्यांनी म्हटले आहे.
दीपिका पदुकोन, नर्गिस फाखरी, ईशा गुप्ता, कतरीना कैफ यांसारख्या मल्ल्यांच्या कॅलेंडर गर्ल्सनी बँकर्सना प्रभावित केले असावे, असे रामूने म्हटले आहे.
=====================================
जनधन योजनेतील 28 टक्के खाती निष्क्रिय
पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत व एकुण खात्यांपैकी सुमारे 28 टक्के खाती निष्क्रिय आहेत, असा दावा मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केला आहे.
मायक्रोसेव्हने 17 राज्यांमधील 42 जिल्हे व एका केंद्रशासित प्रदेशाचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, जन धन खाते हे केवळ सरकारी अनुदान किंवा लाभ मिळवण्यासाठी आहे या गैरसमजातून एका व्यक्तीच्या नावाने दोन खाती उघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
"जन धन योजनेअंतर्गत आपण पहिल्यांदा खाते उघडलेले नाही असे 33 टक्के ग्राहकांनी सांगितले आहे. पहिल्या व दुसऱ्या फेरीतदेखील 14 टक्के ग्राहकांचे हेच मत होते. नव्या फेरीत अनेक नागरिकांनी दुसऱ्यांदा खाती उघडली आहेत. यापैकी कित्येक खाती वापरात नाहीत.", असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जनधन योजनेअंतर्गत डिसेंबर 2014 मध्ये सर्वात पहिल्या फेरीत अनेक नागरिकांची बँक खाती उघडण्यात आले. त्यानंतर जुलै 2015 मध्ये दुसरी फेरी पार पडली. मायक्रोसेव्हने तिसऱ्यांदा या योजनेची प्रगती तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले.
आतापर्यंत 62 टक्के लोकांनी आपले जनधन बँक खाते आधार कार्डाशी जोडल्याचे सांगितले. मागील अहवालात हे प्रमाण 52 टक्के होते. जानेवारी 20 पर्यंत या योजनेअंतर्गत 20.38 बँक खाती उघडण्यात आली आहेत.
=====================================
विमानप्रवासात मृत्यू, दुखापतींबद्दल भरपाईत वाढ
नवी दिल्ली : विमान प्रवासात प्रवाशांची झालेली हानी भरुन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेत वाढ करण्याचा ठराव राज्यसभेत मंजुर झाला आहे. लोकसभेत पुर्वीच हा ठराव मंजुर झाला आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळून हा कायदा अस्तित्वात आला तर देशातील विमान वाहतूक कंपन्यांना प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दराने नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
प्रस्तावित ठरावानुसार, विमानात एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याची भरपाई स्पेशल ड्रॉइंग राइट्सच्या आधारावर द्यावी लागणार आहे. मृत्यू किंवा शारिरीक दुखापतीसाठी व्यक्तीला 4,150 एसडीआरच्याऐवजी 4,694 एसडीआरची भरपाई मिळणार आहे. सामानाचे नुकसान झाल्यास किंवा ते मिळण्यास उशीर झाल्यास आता 1,000 एसडीआरच्याऐवजी 1,131 एसडीआर भरपाई मिळणार आहे. शिवाय, कार्गोला झालेल्या विलंबामुळे मिळणारी भरपाई 17 एसडीआरच्याऐवजी 19 एसडीआर करण्यात आली आहे.
महागाई दराच्या आधारावर पाच वर्षातून एकदा इंटरनॅशनल सिव्हील एविएशन ऑरगायनेझशनकडून नुकसान भरपाई मर्यादेत बदल केले जातात.
स्पेशल ड्रॉइंग राइट्स
जागतिक नाणेनिधीने 16 देशांच्या चलनाची किंमत लक्षात घेऊन एसडीआर अर्थात स्पेशल ड्रॉइंग राइट्सचे मूल्य निश्चित केले आहे. भारतीय चलनानुसार, एका एसडीआरची किंमत 93.45 रुपये आहे.
No comments:
Post a Comment