Thursday, 10 March 2016

नमस्कार लाईव्ह १०-०३-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की नव्हे, ड्रायव्हर होणार म्यानमारचे राष्ट्रपती 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
२- इशरतला शहीद ठरवल्यानेच 26/11 हल्ला , सोमय्यांचा आरोप 
३- भाजपमुळेच विजय मल्ल्या पळाले : राहुल गांधी 
४- बीएसएनएल आणि एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर 
५- तुरुंगात जाईल पण दंड नाही भरणार - रविशंकर 
६- 'बाबरी'च्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
७- मोदी आल्यापासून असहिष्णुता वाढली- अब्दुल्ला 
८- विजय मल्ल्या सुईएवढे लहान नाहीत- आझाद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- पायथागोरस, न्यूटनला अभ्यासक्रमात राहणारच 
१०- 'जेएनयू'तील पीएच.डी.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या 
११- मंगळूरू; अल्पवयीन मुले आठवड्याला पाहतात 7 तास पॉर्न 
१२- 'मल्ल्याला सरकार शांत बसू देणार नाही' - राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- बरेली; चिमुकलीसमोरच मातेवर सामूहिक बलात्कार 
१४- उत्तर प्रदेश; 'सप' आमदार इरफान अलींचे अपघाती निधन 
१५- साताराः दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू  
१६- मुखेड; आज पांडुर्णी येथे भव्य पशुमेळावा व रोगनिदान शिबीराचे आयोजन  
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- तुमची सही आणि तुमचा स्वभाव... 
१८- एका झटक्यात शाओमीच्या 'रेडमी नोट ३'ची विक्री
१९- टीम इंडियाचा क्रिकेटर ते हरियाणाचा डीएसपी, जोगिंदरचा प्रवास 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे रक्षण करावे लागते पण ज्ञान हे तुमचेच रक्षण करते
[रवींद्र ढवळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
ढ़िंचॉक फ्रेश 
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स 
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड 


========================================

इशरतला शहीद ठरवल्यानेच 26/11 हल्ला , सोमय्यांचा आरोप

इशरतला शहीद ठरवल्यानेच 26/11 हल्ला , सोमय्यांचा आरोप
नवी दिल्ली: लोकसभेत इशरत जहाँवरुन काँग्रेस आणि भाजपात जोरदार घमासान झालं. काँग्रेसनं इशरत जहाँला शहिदाचा दर्जा दिल्यामुळेच  मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ला झाला, असा  सनसनाटी आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला. 
दहशवतादी डेव्हिड हेडलीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेली साक्ष, तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेले गौप्स्फोट, आणि इशरतप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलल्याचा आरोपाबाबत लोकसभेत चर्चा झाली.
 भाजपच्या या आरोपानंतर काँग्रेसनं गोंधळ घालत कामकाज बंद केलं. 
त्याआधी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील काँग्रेसनं राजकारणासाठी दहशतवादाला धार्मिक रंग दिल्याचा आरोप केला. 
सर्व जगाला दहशतवादाने ग्रासलं आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करु नये, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं.
========================================

भाजपमुळेच विजय मल्ल्या पळाले : राहुल गांधी

भाजपमुळेच विजय मल्ल्या पळाले  : राहुल गांधी
नवी दिल्लीउद्योगपती विजय मल्ल्या यांनी भारत सोडून गेल्याच्या प्रकरणाचे पडसाद आता संसदेबाहेरही उमटायला लागले आहेत. 
भाजप सरकारने 9 हजार कोटी रुपयांच्या मोबदल्यात मल्ल्यांना देशाबाहेर जायला मदत केली, असा घणाघात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. भाजप सरकारच्या सर्व ‘फेअर अँड लव्हली’ योजना या चोर आणि लुटारुंसाठी असल्याचं सांगंत राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 
मल्ल्या देश सोडून गेल्याची माहिती सरकाने सुप्रीम कोर्टात दिली. मात्र मल्ल्या नेमका कसे देश सोडून गेला हे ना मोदी सांगतायत ना जेटली, असं म्हणतं राहुल गांधींनी भाजप सरकारच्या हेतूंवरचं शंका व्यक्त केली.
========================================

तुमची सही आणि तुमचा स्वभाव...

तुमची सही आणि तुमचा स्वभाव...
मुंबई: लोकांसमोर आपली ओळख बनविणारं आपलं हस्ताक्षर किंवा सही ही आपलं स्वभाव कसा आहे हे दर्शवतं. होय आपली सही देखील आपला स्वभाव कसा आहे हे दाखवते.
 तुमची सही काय सांगते:
 ज्या लोकांची सही ही सरळ आणि स्पष्ट असते ती लोकं सरळ स्वभावाची असतात आणि त्या व्यक्ती विशाल हृदयाच्या असतात. असे व्यक्ती समाजात बरीच प्रतिष्ठा मिळवितात
 जे लोकं सही स्पष्ट आणि गोलाकार स्वरुपात करतात असे लोक चांगले चिंतक असतात. तसेच असे लोक विचारक, लेखक, संपादक असतात यांच्यामध्ये कायम नवं काही तरी शोधण्याची वृत्ती असते. तसेच असे लोक भावनाप्रधान असतात. जीवनातील लक्ष्य प्राप्त करण्यासाठी ही लोकं काहीही करु शकतात.
 जी लोकं सहीचं पहिलं अक्षर मोठं लिहतात असे लोक विलक्षण प्रतिभावंत असतात. अशी लोकं आपलं काम वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्ण करतात. ज्यांच्या स्वाक्षरीतील पहिलं अक्षर मोठं आणि बाकी अक्षर छोटे छोटे असतात अशा व्यक्ती हळूहळू एका खास स्थानावर पोहचतात. अशा व्यक्तींना जीवनामध्ये सर्व सुख-सुविधा मिळतात.ज्या व्यक्ती वेगानं आणि अस्पष्ट अशी सही करतात अशा लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा लोकांना सुखी जीवनासाठी बरंच झगडावं लागतं. अशी लोकं प्रचंड मेहनती असतात. त्यांचा स्वभावही चतुर असतो. त्यामुळे त्यांना कोणी धोका देऊ शकत नाही.
 काही लोक आपल्या सहीच्या खाली दोन लाइन ओढतात. अशा लोकांच्या मनात कायम असुरक्षेची भावना असते. असे लोक कोणत्याही कामच्या यशाबाबत साशंक असतात. खर्च करण्यात यांचा कायमच हात आखडता असतो.
 जी लोकं पेन उचलता एकाच वेळी सही करतात असे लोक गूढ, लढाऊ प्रवृत्तीचे असतात.
 जी लोकं सहीनंतर एक टिंब किंवा काही खास चिन्ह देतात असे लोक फारच रचनात्मक असतात. त्यांना सजावट फारच आवडते. पण असे लोक जरासे घाबरट आणि लाजाळू असतात. 
ज्यांची सही मध्यम आकाराच्या अक्षराची असते अशी व्यक्ती प्रत्येक काम फारच चांगल्या पद्धतीने पार पाडते. अशा व्यक्ती कामामध्ये फारच संतुलित असतात. आपण जसे आहोत तसंच जगासमोर यांचं वर्तन असतं.
 ज्यांची सही सामान्यपणे तुटक असते असे लोक नकारात्मक विचारांचे असतात. यांना कोणत्याही कार्यामध्ये पहिले अपयशच दिसतं. 
जे लोकं आपली सही खालून वर करतात अशी लोकं कायम आशावादी असतात. निराशेचा भाव कधीही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. असे लोक देवावर विश्वास ठेवणारे असतात.
========================================

लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की नव्हे, ड्रायव्हर होणार म्यानमारचे राष्ट्रपती

लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की नव्हे, ड्रायव्हर होणार म्यानमारचे राष्ट्रपती?
म्यानमार : भारताचा शेजारी देश असलेल्या सध्या म्यानमारमध्ये लोकशाही व्यवस्था रुजू होऊ पाहत आहे सुरु आहेत. डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) पक्ष विजयी झाल्यानंतर पक्षाचे नेते यू हिन क्याव हे राष्ट्रपती होणार, हे स्पष्ट करण्यात आलं होतं. यू हिन क्याव हे आँग सान सू की यांचे निकटवर्तीय आणि आधीचे ड्रायव्हर होते.

म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की या राष्ट्रपतीदावर बसू शकणार नाहीत, हे आता निश्चित झालं आहे. राष्ट्रपदीपदावर बसण्यासाठी घटनेतील कलम अडचण येत असल्याने एनएलडीतर्फे हिन क्याव यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं.
central-executive

हिन क्याव कोण आहेत?

  • 70 वर्षीय हिन क्याव हे एनएलडी पक्षाच्या सर्वेसर्वा आँग सान सू की यांचे निकटवर्तीय आहेत.
  • नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (NLD) पक्षाते हिन क्याव हे कार्यकारी समितीचे सदस्य आहेत.
  • मितभाषी असलेले हिन क्याव विनम्र स्वभाव आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात.
  • हिन क्याव यांचे वडील प्रसिद्ध लेखक-कवी होते, तर सासरे यू ल्विन हे एनएलडी पक्षाचे सहसंस्थापक होते.
  • आँग सान सू की यांच्यापेक्षा एक वर्षाने लहान असणाऱ्या हिन क्याव यांनी 1962 साली यंगून विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी जगप्रसिद्ध ऑक्स्फर्ड विद्यापीठातून केली.
  • हिन क्याव हे सध्या एक चॅरिटेबल फाऊंडेशन चालवतात.
  • हिन क्याव यांची पत्नी विद्यमान खासदार असून एनएलडी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत.आँग सान सू की म्यानमारच्या राष्ट्रपती का बनू शकत नाहीत?

    लष्करशाहीने 2008 साली घटनेच्या मसुद्यात बदल केला होता. यावेळी राष्ट्रपती निवडीच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे बदल केले गेले होते. नव्या मुसद्यानुसार, एखाद्या व्यक्ती किंवा तिच्या नातेवाईकांकडे म्यानमारचं नागरिकत्त्व नसेल, ती व्यक्ती राष्ट्रपती बनू शकत नाही. आता झालंय असं की, आँग सान सू की यांच्या पतीसह मुलांकडे म्यानमारचं नागरिकत्त्व नाहीय. त्यामुळे घटनेनुसार आँग सान सू की राष्ट्रपतीपदावर बसू शकत नाहीत.

    म्यानमारचं राजकारण

    म्यानमारमध्ये काही महिन्यांपूर्वी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने 80 टक्के जागांवर विजयी होत इतिहास घडवला. 1962 साली म्यानमारमध्ये लष्करी सत्ता आली. मात्र, 1990 साली सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यात एनएलडीला भरभरुन मतं मिळाली. मात्र, हा जनमत लष्करशाहीने नाकारला आणि निकाल नामंजूर केला.

========================================

एका झटक्यात शाओमीच्या 'रेडमी नोट ३'ची विक्री


एका झटक्यात शाओमीच्या 'रेडमी नोट ३'ची विक्री!
मुंबई: शाओमीचा नवा स्मार्टफोन रेडमी नोट 3चा काल पहिला फ्लॅश सेल होता. हा फोन अॅमेझॉन आणि mi.comवर विक्रीसाठी उपलब्ध होता. रेडमी नोट 3 या दोन्ही वेबसाइटवर आऊट ऑफ स्टॉक झाला. या फोनचा दुसरा सेल 16 मार्चला होणार आहे.
 शाओमीनं ट्वीट करुन या फोनच्या पुढील सेलची माहिती दिली आहे. ज्याची बुकींग काल संध्याकाळी 6 वाजेपासून सुरु झाली आहे. मात्र, किती वेळात हे स्मार्टफोन सोल्ड आऊट झाले याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही.
 रेडमी नोट 3च्या बऱ्याच चाहत्यांची मात्र पहिल्याच सेलमध्ये बरीच निराशा झाली. कारण की हा स्मार्टफोन काही सेकंदांमध्येच सोल्ड आऊट झाला होता.
 तर ट्विटर मात्र, अनेकांनी शाओमीवर जोरदार टीका केली. असेल फ्लॅश सेल म्हणजे खोटे आणि पब्लिसिटी स्टंट असल्याचीही टीका करण्यात आली आहे.
========================================

टीम इंडियाचा क्रिकेटर ते हरियाणाचा डीएसपी, जोगिंदरचा प्रवास

टीम इंडियाचा क्रिकेटर ते हरियाणाचा डीएसपी, जोगिंदरचा प्रवास
मुंबई: टी 20 विश्वचषकासाठी यंदा टीम इंडियाला फेव्हरीट मानलं जातं आहे. यापूर्वी 2007 साली भारताने पाकिस्तानला लोळवून पहिला टी 20 विश्वचषक जिंकला होता. 
भारताने 2007 साली जिंकलेल्या टी 20 विश्वचषकाच्या फायनलमधील शेवटची ओव्हर सर्वांच्याच लक्षात आहे. धोनीने अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरसाठी चेंडू जोगिंदर शर्माच्या हाती सोपवला होता. विलन की हिरो हे ठरवणारी ती ओव्हर जोगिंदर शर्माने टाकली होती. याच ओव्हरने जोगिंदरला हिरो बनवलं होतं. 
जोगिंदरने मिसबाह उल हकची विकेट घेत, पाकिस्तानला धूळ चारली आणि भारताने विश्वचषक जिंकला. त्या सामन्यानंतर जोगिंदर शर्मा नवी इनिंग खेळत आहे. जोगिंदर सध्या हरियाणा पोलीस दलात डीएसपी अर्थात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहे. 
सुमारे 8 वर्षानंतर जोगिंदर काटेकोरपणे आपली पोलिसाची ड्युटी निभावत आहे. जोगिंदर शर्माने नुकतंच टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माच्या लग्नाला हजेरी लावली. 
जोगिंदर शर्माने कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर येत असलेल्या सिनेमामध्येही छोटीशी भूमिका साकरली आहे.
========================================
पायथागोरस, न्यूटनला अभ्यासक्रमात राहणारच
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल आणि एमटीएनएलवर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. बीएसएनएलवर सुमारे 7,666 कोटी रुपयांचे, तर एमटीएनएलवर 13,529 कोटी रुपयांचे कर्ज आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत दिली

बीएसएनएलला मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च आहे. त्यामुळे त्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. तसेच, जून 2010 मध्ये बीडब्ल्यूए आणि 3जी स्पेक्ट्रमसाठी 18,500 कोटी रुपये सरकारला द्यावे लागले होते. त्याचप्रमाणे एमटीएनएलला ब्रॉडबँड वायरलेस अ‍ॅक्सेस व 3जी स्पेक्ट्रम दरापोटी सरकारला रक्कम देण्यासाठी 7,666 कोटींचे कर्ज घ्यावे लागले होते.

एमटीएनएलच्या कर्मचा-यांवर होणारा खर्च मोठा आहे. एमटीएनएलला कर्मचा-यांवर सुमारे 5000 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला आहे. कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतनाच्या लाभापोटी 1500 कोटी रुपये द्यावे लागले आहेत, अशी माहिती प्रसाद यांनी सीली. दोन्ही दूरसंचार कंपन्यांच्या टेलिफोन पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक सहाय्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणावर देखील सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला होता.
========================================
पायथागोरस, न्यूटनला अभ्यासक्रमात राहणारच

नवी दिल्ली - राजस्थान सरकार शालेय अभ्यासक्रमातून पायथागोरस, न्यूटन आणि थॉमस एडिसनसह अन्य कोणत्याही पाश्‍चिमात्य विद्वानाचे नाव हटविणार नसल्याचे आज (गुरूवार) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत स्पष्ट केले.

फेब्रुवारी महिन्यात राजस्थानमधील काही वृत्तपत्रांमध्ये गणित आणि विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून पायथागोरस, न्यूटन आणि थॉमस एडिसन यांच्यासह अन्य काही पाश्‍चिमात्य विद्वानांचे नाव हटविण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्या रीताव्रता बॅनर्जी यांनी आज हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना इराणी यांनी त्याबाबतचा खुलासा केला. या बाबतच्या वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे सांगत सरकार अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
========================================
तुरुंगात जाईल पण दंड नाही भरणार - रविशंकर
नवी दिल्ली- ‘वर्ल्ड कल्चर फेस्टिव्हल‘ला राष्ट्रीय हरित लवादाने सशर्त मंजुरी देत आयोजकांना पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तुरुंगात जाईल पण दंड भरणार नाही, असे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे. 

यमुनेच्या वाळवंटात "आर्ट ऑफ लिव्हिंग‘चा कार्यक्रम 11 मार्च रोजी सुरू होत असून, तीन दिवस चालणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या कार्यक्रमाला बुधवारी (ता. 9) सशर्त परवानगी देत पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना रविशंकर म्हणाले, ‘न्यायालयाला वाटत असेल मला तुरुंगात टाकावे तर मला तुरुंगात जायला काही वाटणार नाही. परंतु, पाच कोटी रुपयांचा दंड भरणार नाही. कारण हा कार्यक्रम तात्पुरता आहे. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व वस्तू हलविण्यात येणार असून परिस्थिती जैसे थी होणार आहे. आम्हालाही यमुना नदीची काळजी आहे.‘ 

दरम्यान, या कार्यक्रमाच्या आयोजनावर कडक ताशेरे ओढणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने या कार्यक्रमावर जर आपण 26 कोटी रुपये खर्च करणार असाल, तर सर्व मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजनही आपणच करावे, असा चिमटा रविशंकर यांना काढला. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने यासंबंधीची काही कागदपत्रे राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर केली आहेत. "यमुना बचाव‘ या संस्थेने कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल केली होती. या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारताना सर्व पर्यावरणविषयक नियम पायदळी तुडविण्यात आले असल्याने तो रद्द केला जावा, अशी मागणी या संस्थेने केली होती.
========================================
'बाबरी'च्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

नवी दिल्ली - बाबरी मशीद प्रकरणासंदर्भात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारती आणि विश्‍व हिंदु परिषदेच्या (विहिंप) इतर नेत्यांविरोधातील गुन्हेगारी कारस्थानाचा आरोप रद्द ठरविण्यासंदर्भातील याचिकेची सुनावणी करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज (गुरुवार) असमर्थता दर्शविली. 

न्यायाधीश व्ही गोपाल गौडा व न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने कोणतेही कारण न देता हे प्रकरण दाखल करुन घेण्यास नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी अन्य खंडपीठासमोर करण्यासंदर्भात सरन्यायाधीशांनी निर्णय घ्यावा, अशी पुस्ती या खंडपीठाने यावेळी जोडली. हाजी मेहमूब अहमद आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अडवानींसहित इतर भाजप नेत्यांविरोधात आरोप रद्द ठरविण्यात यावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये केली होती.

याआधी, गेल्या वर्षी (2015) सप्टेंबर महिन्यात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयामध्ये आरोप रद्द करण्यासंदर्भातील याचिका कोणाच्याही दबावाखाली घेतली नसल्याचे स्पष्ट केले होते.
========================================
मोदी आल्यापासून असहिष्णुता वाढली- अब्दुल्ला

श्रीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण वाढल्याचे वक्तव्य जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. 

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रकरण, दलित विद्यार्थी रोहित वेमुलाची आत्महत्या या साऱ्या घटना मोदी आल्यापासून असहिष्णुता वाढली असल्याचे उदाहरण असल्याचे अब्दुल्ला म्हणाले. जम्मू काश्‍मीरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाचे सरकार असताना उधमपूर येथे एका ट्रक चालकाला जिवंत जाळले होते. त्यामुळे ही असहिष्णुता नव्हे तर दुसरे काय आहे, असा सवालही अब्दुल्ला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. तर उत्तरप्रदेशमध्ये एका व्यक्तीला गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून ठार करण्यात आले.
========================================
'जेएनयू'तील पीएच.डी.च्या विद्यार्थ्याची आत्महत्या
नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या अटकेपासून विद्यापीठातील वातावरण आधीच तणावपूर्ण असताना ही आत्महत्येची घटना समोर आली आहे.

‘जेएनयू‘मध्ये पीएच.डी. करणाऱ्या एका विद्यार्थ्याने दक्षिण दिल्लीतील बेर सराई परिसरात आज (गुरुवार) आत्महत्या केली आहे. दुष्यंत असे त्या 25 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे.
दुष्यंत बेर सराई भागात एका सदनिकेत भाड्याने राहत होता. या ठिकाणाहून पोलिसांनी आज सकाळी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला.
या घटनेचा अधिक तपशील अद्याप प्रतीक्षेत असून, आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

अफजल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल कन्हैय्या कुमार याच्यासह एकूण तीनजणांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेव्हापासून ‘जेएनयू‘मधील वातावरण तणावपूर्ण आहे.  

========================================
अल्पवयीन मुले आठवड्याला पाहतात 7 तास पॉर्न
मंगळूर- बंगळूर राज्यातील अल्पवयीन मुले आठवड्याला किमान सात तास पॉर्न पाहण्यासाठी घालवतात, अशी माहिती एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. 

अभिषेक क्‍लिफोर्ड हे लंडनमध्ये प्राध्यापक असून त्यांनी सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणादरम्यान राज्यातील विविध विद्यार्थ्यांकडून माहिती जाणून घेतली. 16 ते 21 वयोगटातील 66 टक्के विद्यार्थी व 30 टक्के विद्यार्थिनी आठवड्याला किमान सात तास पॉर्न पाहतात. गेल्या नऊ वर्षांपासून ते पाहात असल्याची माहिती मिळाली. 

क्‍लिफोर्ड म्हणाले, ‘राज्यातील बिदर, गडदा, म्हैसूर, छमराजनगर, मंद्या, धारवाड, बेळगाव व बंगळूर येथील विविध महाविद्यालयांमधील किमान 20 विद्यार्थ्यांना मैत्रीच्या नात्याने अश्‍लील व्हिडिओंबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी बलात्कारासह अश्‍लील व्हिडिओ पाहात असल्याचे सांगितले. महाविद्यालयामध्ये प्रवेश केल्यानंतर 1.7 लाख विद्यार्थ्यांनी प्रथम अश्‍लील व्हिडिओ पाहण्यास सुरवात केल्याचे सांगितले. राज्यातील विद्यार्थी आठवड्याला किमान सात तास पॉर्न पाहात असल्याचे आढळून आले.‘
========================================
चिमुकलीसमोरच मातेवर सामूहिक बलात्कार

बरेली (उत्तर प्रदेश) - एका 28 वर्षीय नवमातेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घृणास्पद घटना येथे घडल्यानंतर यासंदर्भातील माहिती आता उपलब्ध झाली आहे. बलात्कार करण्यात आलेल्या महिलेची तीन वर्षांची मुलगी या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित महिलेस नराधमांनी बळजबरीने दारु पाजल्याचेही उघड झाले आहे. या महिलेस या घटनेची माहिती देता आली नाही. मात्र या धक्‍कादायक घटनेवेळी बसच्या एका कोपऱ्यात लपून बसलेल्या चिमुकलीने सर्व प्रकाराची साक्ष पोलिसांसमोर दिली आहे. 

या महिलेस आरोपी रस्त्यावर उचलून ठेवत असताना मुलीने सावधरित्या बसबाहेर पलायन करत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटे या महिलेचे पती व इतर गावकरी महिलेचा शोध घेत आले असताना त्यांना बेशुद्धावस्थेतील महिला, मृत बाळ यांच्या बाजुला बसलेली ही चिमुकली आढळली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एक 28 वर्षीय महिला आपल्या 14 दिवसांच्या बाळाला घेऊन एका कार्यक्रमासाठी खापुरीया या गावाला सोमवारी गेली होती. कार्यक्रम संपल्यानंतर शिशगड गावाकडे येण्यासाठी रात्री बसची वाट पाहात होती. यावेळी एक खासगी बसमधील वाहकाने तिला वाहनात बसविले. बस पुढे गेल्यानंतर वाहक व चालकाने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चिमुकल्याला बसमधून जमिनीवर फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बलात्कारानंतर महिलेला एका बस स्थानकावर सोडून त्यांनी पळ काढला. बस चालक व वाहकाला अटक करण्यात आली आहे. ईश्वर लाल व पप्पू अशी दोघांची नावे आहेत. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.‘
========================================
'सप' आमदार इरफान अलींचे अपघाती निधन
बुदौन (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे आमदार इरफान अली यांच्या मोटारीला आज (गुरुवार) सकाळी अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान अली हे मोटारीतून प्रवास करत होते. बुदौ परिसरातील कछला घाटात एका वळणावर मोटारीला अपघात झाला. या अपघातात इरफान अली यांच्यासह अन्य दोघांचा जागीच मृत्यू झाला. इरफान अली हे बिलारी मतदार संघाचे आमदार होते.
========================================
'मल्ल्याला सरकार शांत बसू देणार नाही'

नवी दिल्ली - नऊ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज बुडवून फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना सरकार शांत बसू देणार नसल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले आहे. 

वृत्तसंस्थेशी बोलताना नक्वी म्हणाले, "मल्ल्याना अशाप्रकारे जाऊ देणार नाही लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ. त्यांना शांत बसू देणार नाही.‘ किंगफिशर एअरलाइन्सचे सर्वेसर्वा असलेल्या मल्ल्या यांनी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील 13 बॅंकांकडून कर्ज घेतले आहे. 2007 पासून कर्जाची परतफेड न झाल्याने थकबाकी नऊ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. दरम्यान 2 मार्च रोजी मल्ल्या युकेमध्ये निघून गेले आहेत. दरम्यान मल्ल्यांच्या प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला. "देशाबाहेर जाताना पकडता न यायला ते सुईएवढे लहान नाहीत‘, असे म्हणत विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासावर (सीबीआय) प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे.
========================================
साताराः दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू 
कऱ्हाड (सातारा)- कऱ्हाड ते पाटण रस्त्यावर दुचाकी व छोटा मालवाहतूक टेम्पोची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, साकुर्डी येथे बुधवारी (ता. 9) रात्री साडेअकराच्या सुमारास अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले युवक कऱ्हाडच्या शुक्रवार पेठेतील रहिवासी असून, बलबीम मोरे व अमीत जाधव अशी त्यांची नावे आहेत.
========================================
विजय मल्ल्या सुईएवढे लहान नाहीत- आझाद 
नवी दिल्ली - विजय मल्ल्या देशाबाहेर जाताना पकडता न यायला ते सुईएवढे लहान नाहीत, असे म्हणत विरोधी पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासावर (सीबीआय) प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आज (गुरुवार) मल्ल्या व किंगफिशर प्रकरणावरुन राज्यसभेत गदारोळ निर्माण झाला आहे. 

मल्ल्या यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस असतानादेखील त्यांना परदेशाबाहेर जाण्याची कशी परवानगी मिळाली, असा प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केला. परंतु आधीच्या सरकारनेच मल्ल्या यांना अवाजवी सुविधा दिल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. 

विरोधकांच्या प्रत्युतर देताना जेटली म्हणाले, विजय मल्ल्या यांना सर्वात प्रथम 2004 साली तर त्यानंतर 2008 साली बँकांतर्फे सुविधा देण्यात आली होती. मल्ल्यांना अधिकृतपणे कर्जबुडवे घोषित केल्यानंतरदेखील त्यांना या सुविधा कशा मिळाला याचा सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. सर्वात पहिल्यांदा 2009 साली मल्ल्या यांचे खाते बुडित असल्याचे घोषित करण्यात आले होते. तरीदेखील 2010 साली पुन्हा एकदा त्यांच्या खात्याची पुनर्रचना करण्यात आली होती. या तारखाच सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
========================================
मुखेड; आज पांडुर्णी येथे भव्य पशुमेळावा व रोगनिदान शिबीराचे आयोजन 
    [रियाझ शेख]
मुखेड :-
      सद्या दुष्काळ परिस्थिती पाहता जनावरांवर जिवघेण्या रोगावर मात करण्यासाठी जेष्ठ नेते जिल्हा परिषद सदस्य दशरथराव लोहबंदे यांच्या वतीने तालुक्यातील आदर्श गाव मौजे पांडुर्णी येथे आज ११ मार्च रोजी सकाळी ९ वाजता भव्य पशुमेळावा व मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती डाँ. राहुल कांबळे यांनी दिली. 
      दुष्काळ परिस्थितीमुळे पशुपालक अडचणीत सापडला आहे. जनावरांवर शत्रक्रिया, गाय पालन, शेळीपालन, चा-यांची नविन लागवडी व जनावरांवरील जिवघेण्या रोगावर मात करण्यासाठी सखोल मार्गदर्शनासाठी आज मौजे पांडुर्णी येथे भव्य पशुमेळावा व मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिबिरासाठी पशुवैद्यकिय महाविद्यालय उदगीर येथील तज्ञ डाँक्टरांची टिम लाभणार आहे. ज्यामध्ये डाँ.अनिल भीकाने विभागप्रमुख पशुऔषधी उपचार शात्र, डाँ. रविंद्र जाधव, डाँ.वकार अहमद, डाँ.प्राची ताकसांडे तसेच जिल्हा नियोजन समिति सदस्य व्यंकटराव लोहबंदे, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा असे अावाहण संयोजक डाँ.राहुल कांबळे केले आहे.
========================================

डेव्हिड हेडलीची २२ मार्चपासून होणार उलट तपासणी


  • मुंबई, दि. १० - 26/11 दहशतवादी हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडलीची 4 दिवस उलट तपासणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरुन ही उलट तपासणी होणार आहे. बचावपक्षाचे वकील अब्दुल वाहब खान ही उलट तपासणी करणार आहेत. 22 मार्च ते 25 मार्चपर्यंत ही उलट तपासणी होणार आहे. 
    दहशतवादी हल्याचा प्रमुख आरोपी अबु जुंदालचे वकील अब्दुल वाहब खान यांनी न्यायालयाकडे डेव्हिड हेडलीची उलट तपासणीकरण्यासाठी चार दिवस मागितले होते. न्यायाधीश जी ए सानप यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना अमेरिकन अधिका-यांशी संपर्क साधून डेव्हिड हेडलीला पुन्हा कधी बोलावू शकतो याची माहिती घेण्यास सांगितले होते. डेव्हीड हेडलीच्या उपलब्धतेची माहिती मिळाल्यानंतर न्यायालय पुढील तारखा ठरवणार होते. 
========================================

रिअल इस्टेट विधेयक राज्यसभेत मंजूर 


  • नवी दिल्ली, दि.  १०  - विकासकाडून घरखरेदी करणा-या ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारे रिअल इस्टेट विधेयक गुरुवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या मंजुरीमुळे देशातील गृहबांधणी क्षेत्राचे नियमन होणार आहे. 
    गृहखरेदीदारांना दिलेल्या मुदतीत घराचा ताबा न सोपवणा-या विकासकांना या विधेयकाच्या मंजुरीमुळे चाप बसणार आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने हे विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. 
    काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधेयकाला आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगितले होते. मागच्या आठवडयात काँग्रेसने पंतप्रधानांना पत्र लिहून या विधेयकाला प्राधान्य देण्याची मागणी केली होती. 
========================================

सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण


  • चेन्नई, दि. १० -  आयआरएनएसएस - १ एफ मालिकेतील सहाव्या दिशादर्शक उपग्रहाचे इस्त्रोने गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही-सी ३२ प्रक्षेपकाव्दारे हे प्रक्षेपण करण्यात आले. 
    आयआरएनएसएस - १ एफ उपग्रहाचे वजन १४२५ किलो आहे. अवकाशातील कच-याबरोबर टक्कर टाळण्यासाठी एक मिनिट उशिराने ४ वाजून एक मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. 
    आयआरएनएसएस मालिकेव्दारे भारत अमेरिकेच्या धर्तीवर स्वत:ची जीपीएस यंत्रणा विकसित करत आहे. आयआरएनएसएस यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी चार उपग्रह पुरेसे आहेत. भारताचा हा सहावा दिशादर्शक उपग्रह आहे. उर्वरित तीन उपग्रहांमुळे आयआरएनएसएसचे काम अधिक अचूक आणि प्रभावी होणार असल्याचे इस्त्रोच्या अधिका-यांनी सांगितले. 
    उड्डाणानंतर वीस मिनिटांनी पीएसएलव्हीने आयआरएनएसएस - १ एफला अवकाश कक्षेत स्थिर केले. या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचा सर्वसामान्य वापरकर्त्यांना प्रवासामध्ये दिशा समजून घेण्यासाठी  फायदा होणार आहे. 
    भारताला लागून असणा-या सर्व सीमांवरील १५०० किमीचा प्रदेश या उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे. ही दिशादर्शक प्रणाली विकसित करण्यासाठी १४०० कोटी रुपयांचा खर्च आला असून, या मालिकेतील सातवा उपग्रह मार्च अखेरपर्यंत प्रक्षेपित करण्याची योजना आहे.
========================================

No comments: