Sunday, 6 March 2016

नमस्कार लाईव्ह ०६-०३-२०१६ चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- भारतीय शास्त्रज्ञांना जगाची दारं खुली! - डॉ. आशुतोष कोतवाल 
२- पाकला ‘एफ-१६’ विमाने देण्याची अधिसूचना जारी 
३- वॉशिंग्टन- अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले 
४- पाकिस्तानात अल्पवयीन मुलीची विवाहमंडपातून पोलिसांनी केली सुटका 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
५- देशावर मोठ्या हल्ल्याचं सावट, महाशिवरात्रीदरम्यान घातपाताचा कट 
६- नितेश राणेंच्या अटकेनंतर नारायण राणेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक 
७- स्मृती इराणींच्या ताफ्याला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी 
८- भारत सहिष्णूच, मात्र द्वेष पसरवणाऱ्यांवर मोदींनी नियंत्रण ठेवावं: आमीर खान 
९- जेएनयूतील देशविरोधी घोषणांमागे आयबीचा हात: प्राध्यापक जयंती घोष 
१०- पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात, ते करुन दाखवतात, राष्ट्रपतींकडून कौतुक 
११- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही-राहुल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- अब्दुल करिम टुंडा पुराव्याअभावी सुटला, दहशतवाद्यांसाठी बॉम्ब बनवल्याच्या आरोपातून मुक्तता 
१३- चेन्नई; खाजगी शाळांनाही राष्ट्रगीत अनिवार्यच- न्यायालय  
१४- गुजरातमध्ये दहा "फिदायीन' दहशतवादी घुसले... 
१५- कन्हैयाला गोळी घाला, ११ लाख मिळवा 
१६- संघ परिवार लादतोय असहिष्णुता-इरफान हबीब  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- औरंगाबाद; आमटेंचा आवाज ऐकताच 'रेणू' आली भानावर 
१८- पुसद; फेसबुकवरील पोस्टमुळे 92 हजारांची मदत 
१९- हैदराबाद; शिक्षिकेशी छेडछाड, मंत्र्याच्या मुलाला अटक 
२०- लुधियाना; १५ वर्षीय विद्यार्थिनीचे कन्हैयाला खुल्या डिबेटचे आव्हान 
२१- औरंगाबाद; जामिनासाठी पैसे नसल्याने ५०० आरोपी तुरुंगातच 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला 
२३- पटना पायरेट्स प्रो कबड्डी चॅम्पियन, यू मुम्बावर मात 
२४- ‘कोसला’ उदाहर्णार्थ रंगभूमीवर वगैरे... 
२५- मिरपूर; हिशेब चुकते करण्यासाठी 'टीम इंडिया' सज्ज 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२६- भोकर; उन्हाची तीवृत्ता वाढली; शाळा भरणार दोन सत्रात 
२७- मनापा विरोशी पक्षनेतेपदी प्रमोद खेडकर 
२८- दोन बसचालकात हाणामारी; हदगाव आगारातील प्रकार 
२९- पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हावेत - सभापती अनुजा तेहरा 
३०- रताळ्याचे उत्पादन घटले; शेतकरी चिंतेत 
३१- देगलूर; सराफा बाजार तीन दिवसांपासून बंद 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
आत्माराम राजेगोजे, शंकर घोरडवाड, सुनील हंबर्डे, वैजनाथ धर्मेकर, अमीर शेख, राजरत्न साळवे, सौरभ गोपरे, कुणाल भिडे 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
 स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका
(अरुण उकंडे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


=========================================

नितेश राणेंच्या अटकेनंतर नारायण राणेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक

नितेश राणेंच्या अटकेनंतर नारायण राणेंची कार्यकर्त्यांसोबत बैठक
सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात काल वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनाला गालबोट लागलं. वाळूवाहतुकीसाठी जिल्हाधिकारी लादलेल्या अटींविरोधात हे आंदोलन होतं. त्याचा विरोधात काँग्रेस आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.मात्र, जिल्हाधिकारी बोलायला तयार नाहीत, असा आरोप करत राणे आणि डंपर चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. 
पोलिसांच्या मध्यस्तीनंतरही काही उपयोग न झाल्यानं त्यांनी लाठीचार्ज सुरु केला आणि नितेश राणे यांच्यासह 25 कारय्कर्त्यांना अटकेत घेतलं गेलं. या पार्श्वभूमीवर आज नारायण राणेंनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठकही बोलावली आहे. 
या तोडफोडीआधी डंपर चालकांनी मुंबई-गोवा महामार्गावर आपले डंपर आणले होते. ज्यामुळे वाहतूकीची मोठा बोजवाराही उडाला. 
दरम्यान, सिंधुदुर्गात नितेश राणेंना अटक झाल्यानंतर त्याचे काही प्रमाणात पडसाद कल्याणमध्ये उमटताना दिसले. नितेश राणेंच्या समर्थनासाठी काल मध्यरात्री स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी ऑटोरिक्षा आणि टॅक्सी बंद केल्या. सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत स्वाभिमानचे अनेक कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरले होते. दरम्यान आजही काही प्रमाणात या संपाची धग कल्याण परिसरात जाणवते आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत नितेश राणेंची सुटका करण्याचा मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तोपर्यंत सुटका न झाल्यास स्वाभिमानची रिक्षा टॅक्सी संघटना बेमुदत संपावर जाणार आहे.
=========================================

आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला

आशिया चषक 2016 : टीम इंडियाचा आज बांगलादेशशी अंतिम मुकाबला
मिरपूर टीम इंडिया आणि बांगलादेशी फौज आज टी-20चा आशिया चषक जिंकण्यासाठी मिरपूरच्या मैदानात उतरणार आहे. टीम इंडियानं सलामीच्या साखळी सामन्यात बांगलादेशला हरवलेलं असलं, तरी मश्रफे मोर्तझाची फौज ही नव्या आत्मविश्वासाचं बळ घेऊन फायनलच्या मैदानात दाखल झाली आहे. 
भारताचा आतापर्यंत पराभव नाही, तरीही लढत चुरशीचीच! 
मालिकेत आतापर्यंत भारतानं एकही सामाना हारला नाही. त्यामुळं भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्की उंचावलेला आहे. तर दुसरीकडं बांगलादेशी संघाचं घरच्या मैदानांवर होणारं प्रदर्शन नक्कीचं चांगलं आहे. त्यामुळं आजच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढाई पाहायला मिळणार हे नक्की. 
बांगलादेशच्या आशिया चषक जिंकण्याच्या मार्गातलं मोठं आव्हान आहे, ती महेंद्रसिंग धोनीची अपराजित टीम इंडिया.
=========================================

स्मृती इराणींच्या ताफ्याला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी

स्मृती इराणींच्या ताफ्याला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 5 जण जखमी
नवी दिल्ली काल रात्री केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. दिल्ली-आग्रादरम्यान मथुरा एक्स्प्रेस वेवर दोन तरुण दुचाकीवरुन जात असताना एका हौंडा सिटी कारनं त्यांना टक्कर मारली.
स्मृती इराणींचा ताफा या होंडा सिटी कारच्या पाठीमागे होता. वेग जास्त असल्यानं त्यांच्या ताफ्यातील पहिली कार त्या अपघातग्रस्त होंडा सिटीवर अदळली. त्यांच्या पाठोपाठ सर्वच कार एकमेकांवर आदळल्या.होंडा सिटीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर स्मृती इराणींसह तीन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. दरम्यान स्मृती इराणींनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वजण सुखरुप असल्याचं सांगितलं.
=========================================

भारत सहिष्णूच, मात्र द्वेष पसरवणाऱ्यांवर मोदींनी नियंत्रण ठेवावं: आमीर खान

भारत सहिष्णूच, मात्र द्वेष पसरवणाऱ्यांवर मोदींनी नियंत्रण ठेवावं: आमीर खान
नवी दिल्ली ‘वाढत्या असहिष्णुते’वरील वक्तव्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अभिनेता आमीर खानने पुन्हा एकदा सहिष्णू-असहिष्णुतेवर वक्तव्य केलं आहे. “भारत देश सहिष्णूच आहे. मात्र, देशात द्वेष पसरवणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियंत्रण ठेवावं.”, असं आमीरने आवाहन केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमीर बोलत होता. 
“काही लोक देशात द्वेष पसवत आहेत. देश तोडण्याची भाषा करत आहेत आणि याप्रकरचे लोक सर्व धर्मात आहेत. केवळ पंतप्रधानच या सर्व गोष्टींना थांबवू शकतात. कारण ते पंतप्रधान आहेत.”, असे आमीर खान म्हणाला. 
भारत सोडून जाण्याच्या वक्तव्यावर आमीरला विचारलं असता, तो म्हणाला, “भारतात असहिष्णुता वाढत आहे, असे म्हटलं होतं. भारत असहिष्णु आहे, असे कधीच म्हटलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भारतात असहिष्णुता वाढत आहे आणि भारत असहिष्णु आहे, या दोन वाक्यात फरक आहे. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”
=========================================

जेएनयूतील देशविरोधी घोषणांमागे आयबीचा हात: प्राध्यापक जयंती घोष



नवी दिल्ली जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दिलेल्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या नाहीत, असा आरोप विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक जयंती घोष यांनी केलं आहे. 
“9 फेब्रुवारीला झालेल्या घटनेत तीन अज्ञात व्यक्ती होत्या, ज्यांनी मुखवटे घातले होते. त्यामुळे ते कोण होते हे कळलं नाही. त्यांनीच देश विरोधी घोषणा दिल्या”, असे जयंती घोष म्हणाल्या. 
कन्हैया कुमार अटक आणि सुटका वादानंतर दिल्ली विद्यापिठात देशभक्तीपर विशेष वर्गाचं आयोजन करण्यात येतं आहे. त्याच विशेष व्याख्यान मालिकेत जयंती घोष एनडीएच्या देशविरोधी योजनांवर व्याखान दिलं. 
त्याबरोबर ते मुखवटे घातलेले अज्ञात माणसं अयबी. म्हजेच इंटेलिजन्स ब्युरोचे असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. सोबतच हा सर्व प्रकार जेएनयूची बदनामी करण्याचासाठी केला गेला असल्याचं त्या म्हणाल्या.
=========================================

पटना पायरेट्स प्रो कबड्डी चॅम्पियन, यू मुम्बावर मात

पटना पायरेट्स प्रो कबड्डी चॅम्पियन, यू मुम्बावर मात
मुंबई पटना पायरेट्सनं चुरशीच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या यू मुम्बाचा असा 31-28 असा पराभव करून प्रो कबड्डी लीगच्या विजेतेपदावर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.
अखेरच्या मिनिटाला हा सामना 28-28 असा बरोबरीत असताना पटना पायरेट्सकडून कर्णधार मनप्रीतसिंगऐवजी दीपक नरवाल कोर्टवर उतरला. त्यानं पहिल्याच चढाईत एक गुण वसूल केला. पुढच्याच चढाईत अनुपकुमारनं केलेली चूक पटनाला आणखी एक गुण देऊन गेली. मग संदीप नरवालनं अखेरच्या चढाईत जीवाकुमारला टिपून पटना पायरेट्सला तीन गुणांनी विजय मिळवून दिला. 
नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यावर पटना पायरेट्सनं सुरुवातीला निर्विवाद वर्चस्व गाजवलं. 
पटना पायरेट्सनं सातव्याच मिनिटाला यू मुम्बावर पहिला लोण चढवला होता. पण अनुपकुमारच्या चढाया आणि मोहित चिल्लरच्या पकडींच्या जोरावर यू मुम्बानं सामन्यावर हळूहळू जम बसवला. पण अखेरच्या क्षणी झालेल्या चुकांनी यू मुम्बाच्या हातून सामना आणि विजेतेपद निसटलं. पटना पायरेट्सच्या विजयात रोहितकुमार आणि संदीप नरवालनं निर्णायक भूमिका बजावली.
=========================================

देशावर मोठ्या हल्ल्याचं सावट, महाशिवरात्रीदरम्यान घातपाताचा कट

देशावर मोठ्या हल्ल्याचं सावट, महाशिवरात्रीदरम्यान घातपाताचा कट
नवी दिल्ली महाशिवरात्री आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लष्करानं विशेष अलर्ट दिला आहे. वेस्टर्न आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल के जे सिंग यांनी ही माहिती दिली आहे. 
महाशिवरात्र आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात दहशतवादी हल्ल्याचे इनपुट्स मिळाले आहेत. त्यामुळे यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहशतवादी एका अशा हल्ल्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होऊ शकते. 
घुसखोरीची शक्यता पाहून बीएसएफने बॉर्डरवर सुरक्षा वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
=========================================

अब्दुल करिम टुंडा पुराव्याअभावी सुटला, दहशतवाद्यांसाठी बॉम्ब बनवल्याच्या आरोपातून मुक्तता

अब्दुल करिम टुंडा पुराव्याअभावी सुटला, दहशतवाद्यांसाठी बॉम्ब बनवल्याच्या आरोपातून मुक्तता
नवी दिल्ली दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं लष्कर ए तोयबाचा संशयित दहशतवादी अब्दुल करीम टुंडाची आणखी एका प्रकरणातून सुटका केली आहे. 
1997 मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशच्या दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यास मदत केल्याचा टुंडावर आरोप होता. मात्र पुराव्याअभावी टुंडाची सुटका करण्यात आली. 
टुंडाला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी असल्याचं सांगत बॉम्ब स्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. 
दिल्लीतल्या एकूण चारपैकी तीन गुन्ह्यांमधून याआधीच त्याची सुटका झाली आहे आणि आज आणखी एका गुन्ह्यातून पटियाला कोर्टाकडून टुंडाची सुटका करण्यात आली. मात्र अजूनही देशभरात विविध गुन्हे टुंडावर दाखल आहेत.
=========================================

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात, ते करुन दाखवतात, राष्ट्रपतींकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात, ते करुन दाखवतात, राष्ट्रपतींकडून कौतुक
नवी दिल्ली : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. महिला लोकप्रतिनिधींच्या पहिल्या राष्ट्रीय बैठकीत राष्ट्रपती बोलत होते. 
राष्ट्रपतींनी यावेळी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजना सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘पंतप्रधान जे बोलतात, ते करतात’, असेही यावेळी राष्ट्रपती म्हणाले. 
महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात कोणताही हलगर्जीपणा करायला नका, असेही मत राष्ट्रपतींनी मांडलं, 
प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या सहभागाशिवाय त्यांच्या सशक्तीकरणाची कल्पनाच होऊ शकत नाही, असेही राष्ट्रपती म्हणाले.
=========================================

‘कोसला’ उदाहर्णार्थ रंगभूमीवर वगैरे...

‘कोसला’ उदाहर्णार्थ रंगभूमीवर वगैरे...
पुणे : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते ज्येष्ठा साहित्यिक भालचंद्र नेमाडेंची ‘कोसला’ ही मराठीतील सर्वाधिक वाचली आणि चर्चिली गेलेली कादंबरी. 53 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कोसलातील ‘पांडुरंग सांगवीकर’ या 25 वर्षीय तरुणाची गोष्ट आजच्या पिढीलाही आपली वाटते आणि आता नेमाडेंच्या पांडुरंग सांगवीकरची गोष्ट पहिल्यांदाच रंगमंचावर अवतरणार आहे. 
नाट्यरूपातील कोसलाचा पहिला प्रयोग शनिवारी पुण्यातील जोत्सना भोळे सभागृहात होणार आहे. 
नेमाडेंच्या या पांडुरंग सांगवीकरणी गेली पन्नास वर्ष मराठी वाचकांना भुरळ पाडली आहे. या पन्नास वर्षात कोसला आणि नेमाडेंबद्दल उलट सुलट जेवढं लिखाण झालंय तेवढं मराठीतील कुठल्याच पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल झालेलं नाही. तरीही कोसलाच्या नव-नव्या आवृत्ती निघणं सुरूच आहे. परंतु 53 वर्षात पहिल्यांदाच कोसलाच नाट्य रुपांतर रसिकांना पाहायला मिळणार आहे.
 सारा क्रिएशन या नाट्य संस्थेतर्फे कोसलातील काही उतारे आणि नेमाडेंच्याच देखणी या काव्यसंग्रहातील काही कविता एकत्र करून दीड तासाचं प्रायोगिक नाटक सादर केलं जाणार आहे.
=========================================
खाजगी शाळांनाही राष्ट्रगीत अनिवार्यच- न्यायालय 
चेन्नई : खाजगी शाळांमध्येही सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य आहे; असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच, खाजगी शाळांमध्ये राष्ट्रगीत होते की नाही याची तपासणी करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्यातील शिक्षण व केंद्रातील मनुष्यबळ विकास खात्याला दिले आहेत.

भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी एन. सेल्वातिरुमल यांनी यासंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली होती. राष्ट्रगीत काही खाजगी शाळांमध्ये घेण्यात येत नाही, त्यामुळे सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करावे; अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर घेण्यात आलेल्या सुनावणीनंतर मुख्य न्यायाधीश संजय किशन कौल, एम.एम. सुंदरेश यांनी वरील आदेश दिले.

यापूर्वीही कोलकता उच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांनी शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. केंद्रीय शालांत परीक्षा मंडळ आणि अन्य शैक्षणिक संस्थांनीही त्यासाठी परिपत्रक जारी केले असून ते सर्व शाळांना बंधनकारक असल्याचे न्यायालयाने सांगितले.
=========================================
आमटेंचा आवाज ऐकताच 'रेणू' आली भानावर 
औरंगाबाद - "एखाद्या हिंस्र श्‍वापदालाही जीव लावला, तर त्यालाही जीव लावणाऱ्यांचा लळा लागतो,‘ याची प्रचीती आली सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट रेणूवर लक्ष ठेवून असलेल्या कर्मचाऱ्यांना. गेल्या चार दिवसांपासून तिने खाद्याला तोंडही लावले नव्हते. त्यामुळे अंगात त्राण नसल्याने रेणू अशक्‍त झाली. मात्र, डॉ. अनिकेत आमटे यांनी मोबाईलच्या स्पीकरवरून "रेणू‘ अशी हाक ऐकली आणि हेमलकसा येथील आमटेज ऍनिमल पार्कमधून प्राणिसंग्रहालयात आलेल्या रेणूने धडपडत मान उंचावली; परंतु आजूबाजूला आमटे कुटुंबीयांपैकी कोणीच न दिसल्याने ती पुन्हा खाली मान करून पिंजऱ्यात पडून राहिली. 

सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात पंधरा दिवसांपूर्वी दाखल झालेल्या बिबट्यांच्या जोडीपैकी रेणू या मादी बिबटची प्रकृती मंगळवारपासून (ता. एक) खालावली आहे. तिच्यावर तज्ज्ञ डॉक्‍टरांचे पथक औषधोपचार करीत असून, प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे; मात्र शनिवारी (ता. पाच) तिच्या प्रकृतीत फारसा फरक पडलेला नाही. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या ऍनिमल पार्कमधून रेणूला इथे आणले आहे. लहानपणापासून या पार्कमध्येच वाढलेल्या रेणूचा आमटे कुटुंबातील सदस्यांशी इतका लळा लागलेला आहे, की नुसत्या आवाजानेही ती त्यांना ओळखते. सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील सूत्रांनी सांगितले, की शनिवारी तिला उपचारासाठी पॉलिक्‍लिनिकमध्ये ठेवले. चार-पाच दिवसांपासून तिची अन्नावरची वासना उडाल्याने तिच्यात त्राण राहिले नाही, याविषयी यापूर्वीच डॉ. अनिकेत आमटे यांना माहिती देऊन, येण्याची विनंती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने केली होती. अधिकाऱ्यांनी सकाळी पुन्हा डॉ. आमटे यांना मोबाईलवर संपर्क केल्यानंतर त्यांनी रेणूजवळ मोबाईल नेण्याचे सांगितले. त्याप्रमाणे मोबाईलचा स्पिकर ऑन करून तिच्या पिंजऱ्याजवळ नेल्यानंतर अनिकेत आमटे यांनी तिला " रेणू...रेणू ‘ अशी हाक मारली आणि धास्तावलेले मूल आजी-आजोबांसाठी खाडकन डोळे उघडून उठण्याचा प्रयत्न करते, तसेच रेणूनेही डोळे उघडून धडपडत मान उंचावून आवाजाच्या दिशेने पाहिले; पण काही क्षणच. तिला आवाज देणारे श्री. आमटे जवळ न दिसल्याने तिने पुन्हा मान खाली घेतली आणि पडून राहिली. हा प्रसंग पाहणारे सर्वजण अवाक्‌ झाले. 
=========================================
पुसद; फेसबुकवरील पोस्टमुळे 92 हजारांची मदत
पुसद (जि. यवतमाळ) - अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना मिसरुड फुटलेल्या कोवळ्या मुलांची "अण्णा कॅन्टीन‘चे मालक राजू बोजेवार यांनी पालकाच्या भूमिकेत काळजी घेतली. हीच मुले मोठी झाल्यावर दूरदेशी गेली. एकेदिवशी अचानक अण्णाची हलाखीची परिस्थिती "फेसबुक‘वर उमटली; अन्‌ सारी तरुणाई एकवटली. काही तासांतच मदतीची "पोस्ट‘ पुढे आली. अण्णाच्या बॅंक अकाउंटमध्ये 92 हजारांची रक्कम जमा झाली. तरुणाईने अण्णाच्या ऋणानुबंधांची अनोखी उतराई केली. 

माणुसकीचा संस्कार प्रतिबिंबित करणारी ही घटना आहे, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील "ऍल्युमनी‘ तरुणाईची. महाविद्यालयाच्या स्थापनेसोबतच 1983 मध्ये कारला रोडवर राजू बोजेवार यांनी कॅन्टीन सुरू केली. त्यावेळी दिल्ली, हरियाना, पंजाब, राजस्थान, जम्मू-कश्‍मीर अशा भारताच्या विविध भागांतून विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पुसदला येत. त्यांना चहा, नाश्‍ता राजूअण्णा करीत. बरेचदा मुलांकडे पैसे नसत. मात्र, अण्णांनी उधारीच्या वहीकडे कधी बघितले नाही. मोठ्या प्रेमाने खाऊ घालताना अडचणीत सापडलेल्या मुलांना त्यांनी पैसेही पुरविले. 1990-91च्या दंगलीत अण्णांनी मुलांना मोठा आधार दिला. त्यांच्या या प्रेमळपणामुळे मुलेही अण्णांच्या कॅन्टीनभोवती पिंगा घालत. ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्यानंतर बी. ई. डिग्री पूर्ण होताच अण्णांची कॅन्टीन सोडणे मुलांना कठीण जाई. पंजाबच्या चरणजितसिंह मिनास हे या अण्णा कॅन्टीनचे फॅन होते. ते सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीचे मालक आहेत. गंमत म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्याशी त्यांनी करार केला आहे. याच मिनास यांनी पुसदच्या अण्णा कॅन्टीनच्या आठवणी "अण्णाज कॅन्टीन‘ या इंग्रजी पुस्तकातून जागवल्या. या पुस्तकाचे प्रकाशन त्यांनी 2012मध्ये बीएनसीओई ऍल्युमनी मिटमध्ये केले. अशी ही अण्णांची कॅन्टीन तरुणाईच्या मनात घर करून होती. 
=========================================
गुजरातमध्ये दहा "फिदायीन' दहशतवादी घुसले...
अहमदाबाद - गुजरात राज्यामध्ये दहा दहशतवादी दहशतवादी हल्ला घडविण्याच्या उद्देशार्थ घुसल्याचा इशारा पाकिस्तानकडून देण्यात आल्यानंतर राज्यामधील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली असून या दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासीर खान जनुजा यांनी भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांना हा इशारा दिला आहे. 

देशात उद्या (सोमवार) महाशिवरात्रीच्या सणादरम्यान मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार हे लष्करे तैयबा आणि जैश-इ-मुहम्मद या दहशतवादी संघटनांचे "फिदायीन‘ दहशतवादी आहेत. पाकिस्तानकडून अशा स्वरुपाची माहिती प्रथमच देण्यात आली आहे. 

गुजरात राज्यामधील सर्व सुरक्षा संस्था दहशतवाद्यांचा युद्धपातळीवर शोध घेत असून राज्यातील सर्व मोठी शहरे आणि जिल्ह्यांमध्ये अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्याचे पोलिस महासंचालक पी सी ठाकूर यांनी या पार्श्‍वभूमीवर आणीबाणीचा बैठक घेतली आहे. याचबरोबर, पुढील सूचना मिळेपर्यंत राज्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि प्रशासनामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. संसदेमध्ये सध्या सुरु असलेले अधिवेशन आणि महाशिवरात्रीसारख्या मोठ्या सणाच्या पार्श्‍वभूमीवर देशात भीती व खळबळ उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असल्याचे एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे.
=========================================
हिशेब चुकते करण्यासाठी 'टीम इंडिया' सज्ज
मीरपूर - दहापैकी नऊ सामन्यांत विजय मिळवून ऍक्‍सिलेटरवर पाय ठेवलेली "टीम इंडिया‘चा विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेपूर्वी आशियातील श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सज्ज झाली आहे. दुसरीकडे घरच्या वातावरणाचा फायदा घेत बांगलादेशनेही कंबर कसली आहे. यानंतरही भारताचे पारडे चांगलेच वरचढ आहे. 

आशिया करंडक टी-20 स्पर्धेत गेल्या शनिवारी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले होते. भारताने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवले असले तरी रविवारी पुन्हा भारत-पाक सामना होईल, अशी अटकळ होती; परंतु पाकिस्तानची शिकार करून बांगलादेशने भारताला आव्हान दिले. संघ व्यवस्थापक रवी शास्त्री हा अंतिम सामना आमच्यासाठी केवळ एक लढत आहे, असे सांगत असले तरी भारताला बांगलादेशचे काही हिशेब चुकते करायचे आहेत.
या मोसमाच्या सुरवातीला भारतीय संघ बांगलादेशमध्ये एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका प्रथमच हरला होता. त्या वेळी काही भारतीय खेळाडूंची विटंबना केलेली पोस्टर्स झळकली होती. या स्पर्धेत भारताने सलामीलाच बांगलादेशचा धुव्वा उडवून आमच्या वाटेला जाऊ नका, असा इशारा दिला होता. आता उद्या पराभवाची परतफेड भारताला करायची आहे.
एरवी बांगलादेशच्या खेळपट्ट्या उपखंडातील पारंपरिक फिरकीस साथ देणाऱ्या असतात; परंतु या वेळी हिरवे गवत ठेवून वेगवान गोलंदाजांसाठी पोषक वातावरण तयार केले. भारतीय संघ या सापळ्यात सापडला नाही. पाकिस्तान, श्रीलंका या माजी विजेत्यांना पराभूत करून भारताने संघाचा समतोल सिद्ध केला.
=========================================
कन्हैयाला गोळी घाला, ११ लाख मिळवा
दिल्लीत झळकलेल्या पोस्टर्सवरून नवा वाद; पोलिसांची सुरक्षा

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला गोळ्या घाला आणि अकरा लाख रुपये मिळवा, अशा आशयाची पोस्टर्स दिल्लीत झळकल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्याशिवाय भाजपच्या एका युवा नेत्याने कन्हैयाची जीभ कापा, पाच लाख रुपये मिळवा, अशी घोषणा करून या आगीत तेल ओतण्याचे काम केले.
या सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कन्हैयाला पूर्ण सुरक्षा पुरविली आहे. कन्हैयाच्या विद्यापीठ आणि बाहेरील हालचालींबाबत आम्हाला वेळोवेळी माहिती द्या, असे निर्देश पोलिसांनी विद्यापीठाला दिले आहेत. कन्हैया तुरुंगातून सुटल्यानंतर ताबडतोब विद्यापीठाच्या प्रशासनाला पोलिसांनी पत्र पाठविले होते. 

कन्हैया विद्यापीठाच्या बाहेर कोठे जातो? त्याच्या प्रवासाचा मार्ग काय असेल? याची माहिती आधीच आम्हाला द्या, त्यामुळे त्याला संरक्षण देणे शक्‍य होईल. तसेच संभाव्य दुर्घटना टाळता येईल, असे दिल्ली पोलिसांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. पतियाळ हाउस न्यायालयाच्या आवारामध्ये १७ फेब्रुवारी रोजी कन्हैयावर झालेला हल्ला लक्षात घेऊन पोलिसांनी हे खबरदारीचे उपाय योजले आहेत. आता कन्हैया जेव्हा विद्यापीठाच्या कॅम्पसमधून बाहेर पडेल, तेव्हा पोलिसांचे एक पथक त्यांच्यासोबत असेल. तसेच विद्यापीठामध्येही त्याला सुरक्षित राहता यावे म्हणून पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. 
‘पूर्वांचल सेना’ नावाच्या संघटनेने कन्हैया कुमारला ‘गोळी घालून ठार मारा आणि ११ लाख रुपये बक्षीस मिळवा’, अशी घोषणा केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या आशयाची पोस्टर दिल्लीतील काही भागांमध्ये लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे प्रेस क्‍लबच्या शेजारीच हे पोस्टर लावण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे पोस्टर फाडून टाकले. 
=========================================
प्रो कबड्डीत पाटणा एक्‍स्प्रेसच अखेर सरस
मोक्‍याच्यावेळी अनुप कुमारकडून झालेल्या चुकांमुळे मुंबईचे उपविजेतेपदावरच समाधान 
नवी दिल्ली - पाटणा एक्‍स्प्रेसच्या धडाडत्या इंजिनास जोरदार ब्रेक लावत विजयाची दशकपूर्ती करणाऱ्या मुंबईला मोक्‍याच्या क्षणी संयम राखता आला नाही. कॅप्टन कुल अनुप कुमारकडून अखेरच्या मिनिटात झालेल्या चुकीने सर्व मेहनतीवर पाणी फिरले आणि पाटणाने मुंबईचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न उद्‌ध्वस्त केले. पाटणाने निर्णायक लढतीत अखेर 31-28 अशी बाजी मारली. 

पाटण्याचा सुरवातीचा बचावाचे यशस्वी आक्रमण अनुप कुमारने परतवले होते. सामन्यात आठ गुण घेत त्याने प्रतिकूल परिस्थितीत मुंबईच्या बचावात भक्कम कामगिरी बजावली होती. रिषांक देवाडिगा चढाईत अपयशी ठरत आहे, हे लक्षात आल्यावर त्याने शब्बीर बापूचे अस्त्रही चांगले वापरले होते. त्याने मुंबईला सामन्यात परत आणले असे वाटले, त्याचवेळी तो चढाईच्या जोषात परतण्याच्या नादात मैदानाबाहेर गेला आणि मुंबईच्या प्रतिकाराच्या आशाच संपल्या. जो जीता वही सिकंदर हेच खरे असते, याची प्रचितीच पाटणा समर्थकांना आली. पाटणाने एक कोटीचे बक्षीस जिंकताना मुंबईला पन्नास लाखांवर समाधान मानण्यास भाग पाडले. 
=========================================
संघ परिवार लादतोय असहिष्णुता-इरफान हबीब
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी हत्याकांड हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याची आत्महत्या, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा आरोप या सर्व घडामोडी म्हणजे एका साखळीतील दुवे आहेत, असा आरोप अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या इतिहास विभागातील माजी प्राध्यापक आणि इतिहास संशोधक इरफान हबीब यांनी केला. 

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रात बसून देशावर असहिष्णुता आणि जातीय फाळणी लादत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
"मुंबई कलेक्‍टिव्ह‘ या व्यासपीठावर डाव्या विचारांच्या संघटनांनी "सेलिब्रिटिंग फ्रीडम अँड प्लुरलिझम‘ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र भरवले आहे. त्यात परिसंवाद, कथाकथन, कवितावाचन अशा कार्यक्रमांतून असहिष्णुता, राष्ट्रवाद, देशद्रोह आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली जात आहे. या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनावेळी ज्येष्ठ पत्रकार एन. राम, "जेएनयू‘चे प्रा. गोपाळ गुरू उपस्थित होते. प्रत्येक भारतीय नागरिकाला राष्ट्रवादी असल्याचे सिद्ध करण्यासाठी रा. स्व. संघ किंवा भाजपच्या प्रमाणपत्राची आवश्‍यकता काय, असा प्रश्‍न प्रा. हबीब यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यपूर्व काळात संघाने ब्रिटिशांच्या विरोधात "ब्र‘ही उच्चारला नव्हता; ते केवळ हिंदू राष्ट्राची मागणी रेटत होते, असे ते म्हणाले. प्रा. गुरू यांनी राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येवर चर्चा करण्याची आवश्‍यकता आहे, असे मत व्यक्‍त केले.

‘संघ परिवार इतिहासाचे पुनर्लेखन कसे करत आहे‘ या परिसंवादात ज्येष्ठ इतिहासकार के. एम. श्रीमाली यांनी भाजप आणि रा. स्व. संघावर ताशेरे ओढले. 
=========================================
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू देणार नाही-राहुल
राहुल गांधी यांचे प्रतिपादन, आसाममधील निवडणूक सभेदरम्यान केंद्र सरकारवर टीका 
बोरघाट (आसाम) - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आठ हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी भारतीय जनता पक्षाला खेळू देणार नाही, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज येथे केले. आसाममधील निवडणूक सभेदरम्यान नागाव जिल्ह्यात राहुल बोलत होते. 

भाजपवर टीका करताना राहुल म्हणाले की, जेएनयूमध्ये आठ हजार विद्यार्थी असून, त्यापैकी एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तरपूर्व भारतातील आहेत. या विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करण्याचा भाजपला कोणताही अधिकार नाही. या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी त्यांना खेळू देणार नाही. जेएनयूमधील विद्यार्थ्यांनी कोणतेही अनुचित काम केलेले नाही. त्याचमुळे कॉंग्रेस या विद्यार्थ्यांच्या सोबत आहे, असेही राहुल यांनी या वेळी बोलताना सांगितले.

राष्ट्रद्रोहाचा आरोप करून कन्हैयाकुमारला तुरुंगात डांबले, मात्र मी जेव्हा त्याचे 9 फेब्रुवारीचे वीस मिनिटांचे भाषण ऐकले, तेव्हा त्यामध्ये देशविरोधी एकही शब्द नव्हता. त्यांना अटकच करायची होती, तर त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या दोन-तीन लोकांना का केली नाही? असा सवाल करत दोषींना अटक करून तुम्हाला जे काही गुन्हे त्यांच्यावर लावायचे असतील ते लावावेत, असेही राहुल म्हणाले.
=========================================
भारतीय शास्त्रज्ञांना जगाची दारं खुली! - डॉ. आशुतोष कोतवाल
‘भारतीय शास्त्रज्ञांनी आणि अमेरिकी शास्त्रज्ञांनी एकत्र काम केलं पाहिजे,’ असं मत अमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेतले वरिष्ठ शास्त्रज्ञ चार्ल्स इलाची यांनी नुकतंच व्यक्त केलं. भारताच्या यशस्वी मंगळमोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर इलाची यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. थोडक्‍यात, भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान अमेरिका आणि अन्य देशही आता मान्य करत आहेत. संशोधनासाठी आणि त्यातल्या महत्त्वपूर्ण सहभागासाठी भारतीय शास्त्रज्ञांना आता जगाची दारं सन्मानानं खुली होत आहेत. कुठल्या क्षेत्रात आणि कशा प्रकारे या संधी आहेत आणि त्यांचे भारताला काय फायदे होतील, याविषयी... 

मी पुण्यात नुकताच आलो होतो. पुण्यामधील ‘आयसर’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च) या संस्थेमधील वैज्ञानिकांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा मुख्य विषय होता- ‘जागतिक स्तरावर होणाऱ्या वैज्ञानिक  प्रकल्पांमध्ये भारताचे योगदान किती प्रमाणात व कशी प्रकारे होऊ शकेल’ हा !. त्याच वेळी नासाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचे आपल्या देशातल्या शास्त्रज्ञांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले. आज जागतिक पातळीवर भारतीय शास्त्रज्ञ महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. सहकार्याचा असा हात पुढं येणं स्वाभाविक आहे. वैज्ञानिक क्षेत्राच्या संदर्भात आपल्या देशातले वातावरण मला सकारात्मक दृष्टीनं बदलताना दिसत आहे. भारतीय तरुण पिढीची वैज्ञानिक जाणीव सबळ होत आहे. या पिढीजवळ बौद्धिक क्षमता आणि तडफ खूप आहे. या पिढीला जागतिक स्तरावर अधिक समर्थपणे पोचवण्यासाठी काही धोरणात्मक पावले उचलली जावीत आणि मनुष्यबळाच्या क्षमतांचा कमाल मर्यादेपर्यंत वापर कसा करता येईल, याचा सखोल विचार व्हावा असं वाटतं.
=========================================

हैदराबाद; शिक्षिकेशी छेडछाड, मंत्र्याच्या मुलाला अटक

  • ऑनलाइन लोकमत 
    हैदराबाद, दि. ६ - शिक्षिकेसोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याच्या आरोपाखाली हैदराबाद पोलिसांनी रविवारी सकाळी आंधप्रदेश सरकारमधील मंत्र्याच्या मुलाला अटक केली. सुशील रावेला असे आरोपीचे नाव असून, तो आंध्रप्रदेशचे सामाजिक कल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांचा मुलगा आहे. 
    २० वर्षीय शिक्षिकेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सुशील आणि त्याच्या ड्रायव्हरला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी सुशीलला अटक केली त्याला आज न्यायदंडाधिका-यासमोर हजर करण्यात येणार आहे. 
    सुशील आणि रमेशला नोटीस बजावली होती. त्यानंतर आज सकाळी ते स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली अशी माहिती बंजारा हिल्स विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त उदय कुमार रेड्डी यांनी दिली. 
    पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती गुरुवारी शाळेच्य वाटेवर असताना आमदाराचा स्टिकर असलेली गाडी तिचा पाठलाग करत होती. गाडी जवळ आल्यानंतर ड्रायव्हर आणि आत बसलेल्या आरोपीने शेरेबाजी केली व आपल्याला आत खेचून घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. आपण आरडाओरडा केल्यामुळे जवळच असलेला नवरा आणि स्थानिक मदतीला धावून आले आणि त्यांनी आपली सुटका केली असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 
=========================================

१५ वर्षीय विद्यार्थिनीचे कन्हैयाला खुल्या डिबेटचे आव्हान


  • लुधियाना, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका करणारा जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला लुधियानामधील एका १५ वर्षीय विद्यार्थीनीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विषयावर खुल्या डिबेटचे आव्हान दिले आहे. जान्हवी बेहेल असे या विद्यार्थीनीचे नाव असून, अलीकडेच २६ फेब्रुवारीला प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानातील योगदानासाठी तिला सन्मानित करण्यात आले होते. 
    नरेंद्र मोदींची भारतातील नागरीकांनी पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तिखट शब्दात टीका करण्यापूर्वी विचार कर असा सल्ला जान्हवीने कन्हैयाला दिला आहे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे पण याचा अर्थ आपण मर्यादा ओलांडावी असा होत नाही. 
    कन्हैया कुमार आणि आणखी काही जण आपल्या राजकीय फायद्यासाठी मूलभूत अधिकाराचा गैरवापर करत आहेत असा आरोप जान्हवीने हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना केला. मी कन्हैया कुमार सांगेल तिथे, सांगेल तेव्हा त्याच्याबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर खुली चर्चा करायला तयार आहे. 
    घरात बसून बोलणे सोपे असते. त्यापेक्षा कन्हैयाने पंतप्रधानांसारखे कार्य करण्यावर लक्ष दिले पाहिजे. कैन्हयाने नरेंद्र मोदींवर टीका करण्यापेक्षा ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांच्याविषयी बोलला असता तर बरे झाले असते असे जान्हवीने म्हटले आहे. जान्हवी डीएव्ही पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी आहे. रक्षा ज्योती फाऊंडेशन या एनजीओची ती सक्रीय सदस्यही आहे. स्वच्छ भारत अभियानातील योगदानाबद्दल तिला अलीकडे प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आले होते. 
=========================================

औरंगाबाद; जामिनासाठी पैसे नसल्याने ५०० आरोपी तुरुंगातच!


  • जामिनासाठी पैसे नसल्याने राज्यातील विविध कारागृहांमध्ये ५००पेक्षा अधिक कैदी वर्षानुवर्षे खितपत पडल्याचे वास्तव समोर आले आहे. या आरोपींकडे जातमुचलक्याचे १० ते १५ हजार रुपयेही नाहीत. एकीकडे कारागृहांमध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसताना प्रशासनाला मात्र त्यांचा सांभाळ करावा लागत आहे, अशी माहिती ‘राईटस् आॅफ सिटिझन इन डेमोक्रॅटिक इंडिया’ संस्थेला माहिती अधिकारातून मिळाली.
    देशात दरवर्षी २८ लाखांहून अधिक गुन्हे दाखल होतात. त्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २ लाख ५० हजार गुन्हे दरवर्षी दाखल होतात. ९९ टक्के गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक होते. राज्यातील कारागृहांमध्ये सध्या २५ हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यात ५००पेक्षा अधिक आरोपींच्या कुटुंबीयांना जामिनाचे पैसे गोळा करता न आल्याने ते तुरुंगातच आहेत. महाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृहे आहेत. त्यात ३१ जिल्हा, १३ खुली, १ खुली वसाहत आणि १७२ उप-कारागृहांचा समावेश आहे. या कच्च्या कैद्यांना जामीन मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जामिनास कोणाला किती पैसे लागणार, याचा आढावा घेत आहोत.
=========================================

पाकला ‘एफ-१६’ विमाने देण्याची अधिसूचना जारी

  • वॉशिंग्टन : भारत आणि अनेक वरिष्ठ अमेरिकी संसद सदस्यांच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकारने पाकिस्तानला आठ एफ-१६ लढाऊ विमानांची विक्री करण्याची केंद्रीय अधिसूचना जारी केली.
    राजपत्रात शुक्रवारी ही अधिसूचना प्रकाशित झाली. तीत म्हटले आहे की, ‘एफ-१६ लढाऊ विमानांची प्रस्तावित विक्री दक्षिण आशियातील एका व्यूहात्मक साथीदाराच्या सुरक्षेत सुधारणा घडवून आणण्यासह अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा उद्दिष्टांच्या पूर्ततेस हातभार लावते. या अत्याधुनिक विमानांची एकूण किंमत ७० कोटी डॉलर असल्याचे या अधिसूचनेत म्हटले असून, पाकिस्तान सरकारने ही विमाने देण्याची मागणी केली होती, असेही यात सांगण्यात आले आहे.
    भारताने पाकिस्तानला एफ-१६ विमाने देण्यास तीव्र विरोध केला होता. अशा शस्त्रांच्या हस्तांतरणामुळे दहशतवादविरोधी लढाईस मदत मिळेल हा अमेरिकेचा तर्कही भारताने फेटाळला होता.
    पाकला विमाने देण्याविरुद्ध मला पाठिंबा द्या, असे आवाहन रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी सिनेटमधील आपल्या सहकाऱ्यांंना केले. अमेरिकी करदात्यांच्या अनुदानातून पाकला लष्करी सामग्रीची विक्री हा दहशतवादविरोधी लढाईत मदत करण्यासाठी राजी करण्याचा मार्ग होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
=========================================

वॉशिंग्टन- अमेरिकी मतदारांना आॅनलाईन बनविले

  • वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखविणारी व्यक्ती अस्तित्वातच नाही; परंतु ती इटलीची कादंबरीकार असल्याचे समोर आले आहे. ही दुहेरी भूमिका गेल्या आठ महिन्यांपासून साकारणारी व्यक्ती अलेसँड्रो नार्दोन (३९) असून त्याने अलेक्स अँडरसन असे नाव आॅनलाईनवर प्रचारासाठी घेतले होते.
    कॅलिफोर्नियाचा काँग्रेसमन म्हणून अँडरसनने दूरचित्रवाणी वाहिन्यांवर छाप पाडली होती. रिपब्लिकन पक्षातर्फे इच्छुक असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात असल्याचे अलेसँड्रो आॅनलाईन सांगत होता. आपण खरेखुरे अलेक्स अँडरसन नसल्याचे त्याने स्वत:च जाहीर केल्यानंतरही प्रचारासाठीची बनावट वेबसाईट (संकेतस्थळ) आणि टिष्ट्वटर अकाऊंट तो चालूच ठेवणार आहे, कारण त्या दोन्हींवर त्याला अनेक अमेरिकन चाहते लाभले आहेत, असे त्याने सांगितले.
    अलेसँड्रो नार्दोन म्हणाला की, ‘‘मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी झोपायला जातो त्यावेळी अमेरिका जागी होत असते. मी माझ्या कॉम्प्युटरसमोर बसतो आणि अलेक्स अँडरसनचे आयुष्य जगू लागतो. क्लार्क केंट हा जसा टेलिफोन बुथवर जाऊन सुपरमॅन बनायचा तसेच हे होते.’’ अलेसँड्रो नार्दोन हा मार्केटिंग कन्सल्टंट व उत्तर इटलीतील स्थानिक माजी राजकारणी आहे. फावल्या वेळेत तो कादंबऱ्याही लिहितो.
    नार्दोन व त्याच्या मित्रांच्या गटाने अलेक्स अँडरसन याला पाठिंबा मिळविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. त्याच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर (अ‍ेी१्रूं्र२ल्लङ्म६) २६,४०० फालोअर्स, तर दोन लाखांपेक्षा जास्त व्हिजिटर्सनी त्याच्या या बनावट प्रचार संकेतस्थळाला क्लिक केले आहे. अँडरसनचे प्रचाराचे संकेतस्थळ हे प्रारंभी तुम्हाला त्याची भूमिका पटविण्यात यशस्वी ठरते. अँडरसनला अमेरिकेतून चर्चेसाठी अनेक निमंत्रणे आली व प्रसारमाध्यमांना मुलाखती द्या, असेही म्हटले गेले
=========================================

पाकिस्तानात अल्पवयीन मुलीची विवाहमंडपातून पोलिसांनी केली सुटका

  • ऑनलाइन लोकमत - 
    लाहोर, दि. ५ - पाकिस्तान पोलिसांनी 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह रोखत तिची सुटका केली आहे. कुटुंबातील वाद सोडवण्यासाठी या अल्पवयीन मुलीचा 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाशी विवाह करुन देण्यात येत होता. भरपाई म्हणून हे लग्न करुन देण्याचा हुकूम देणा-या 4 गावक-यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 
    पंजाब प्रांतात हा सोहळा पार पडत होता. याठिकाणी संबंध सुधारण्यासाठी, भरपाई म्हणून तसंच भांडण मिटवण्यासाठी लग्न लावून देण्याची प्रथा आहे. ग्रामपंचायतीच्या मंडळींनी दोन कुटुंबातील वाद मिटवण्यासाठी हा विवाह करुन देण्यास सांगितलं होतं. ग्रामपंचायतीच्या या चारही सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 
    पिडीत मुलीच्या वहिनीचा आरोग्याच्या समस्येमुळे मृत्यू झाला होता मात्र मृत्यू झालेल्या मुलीच्या घरच्यांना हत्या केल्याचा संशय होता अशी माहिती पोलिस अधिक्षक रशीद यांनी दिली आहे. 3 मार्चला ग्रामपंचायतीने या पिडीत मुलीला भरपाई म्हणून तिच्या वहिनीच्या घरच्यांना देण्याचे आदेश दिले होते.  तिच्या वहिनीच्या 14 वर्षीय चुलत भावाशी तिचं लग्न करुन देण्यास तसंच 1 लाख 50 हजार रुपये देण्यासंही सांगण्यात आलं होतं. पोलिसांनी कारवाई करत अखेर हा विवाह रोखला आणि अटकेची कारवाई केली.
=========================================
=========================================

No comments: