[अंतरराष्ट्रीय]
१- अलाहाबाद; आयसिसमध्ये सहभागास नकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याची हत्या
२- ब्रसेल्स; शोधमोहीम वेगात
३- वॉशिंग्टन; तरुण, लठ्ठ लोक हृदयविकाराचे बळी
४- वॉशिंग्टन; व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र
५- इसिसविरोधी लढाईत अमेरिकी मुस्लिम भागीदार
६- पाकमधील अंतर्गत बाबीत भारताकडून हस्तक्षेप - पाक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- फिफा वर्ल्डकप ओळख निर्माण करण्याची आणि फुटबॉल खेळ प्रत्येक गावात पोहोचवण्याची संधी - पंतप्रधान
८- फसवणुकीमुळे बँकांना ४ वर्षांत ३० हजार कोटींचा फटका; देशभरात गुंतवणूक घोटाळा
९- कुलभूषणला महिन्यापूर्वीच अटक
१०-नागरिक निरोगी असतील तर भारत निरोगी- मोदी
११- बोनस देण्याच्या कायद्यात महत्त्वाचे बदल
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- मंत्रालयासमोर विष प्यायलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
१३- मुंबईत डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण
१४- महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी
१५- तीर्थयात्रा लवकरच होणार सुपरफास्ट
१६- ठाणे; लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची...- एक रिक्षा चालक
१७- शेतकऱ्याच्या मृत्यूने राजकारण तापणार; मुख्यमंत्र्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
१८- प्रसंगी कायदा तोडून विदर्भ घेऊ : ऍड. अणे
१९- भाजपला 'धक्का' देत पुतळ्याचे अनावरण
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- लातूर; सहा महिन्यांसाठी गृह खातं द्या, सगळ्यांना सरळ करतो : रामदास कदम
२१- नागपूर; ....तर विदर्भ आंदोलन बंद करेन : श्रीहरी अणे
२२- अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बनसोड यांचं अपघाती निधन
२३- म्हैसूरमध्ये अपघातात तिघांसोबत संवेदनशीलतेचा मृत्यू
२४- दिल्लीत आठवर्षांच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर बलात्कार
२५- कोची; केरळमधील नर्सचा मुलासह लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात झाला मृत्यू
२६- उत्तराखंड; 9 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२७- 251 रुपयांत स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
२८- ऑस्ट्रेलियाविरोधात कॅप्टन धोनीचा ‘गेम प्लॅन’ तयार
२९- सनी लिऑनच्या 'वन नाईट स्टँड'चा बोल्ड टिझर रिलीज
३०- म्हणून अंकिता आणि सुशांत सिंग राजपूतच्या नात्यात दुरावा
३१- युवीचा आज मोहालीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना
३२- मोहालीच्या मैदानात आज धोनी ब्रिगेडची टक्कर ऑस्ट्रेलियाशी
३३- भारत-बांगलादेश सामन्याची चौकशी व्हावी - तौसीफ अहमद
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
३४- विहिरीत आढळले एकः कुटुंबातील तीन मृतदेह; परंडा तालुक्यातील राजुरी शिवारातील घटना
३५- नांदेड शहर व जिल्हाभरात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी
३६- चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा प्रकार निंदनीय
३७- उमरीत बोगस कापूस बियाण्यांची होळी
३८- निवघा बाजार; नेवरवाडी येथे मुलाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेसाठी दिली एक लाखाची मदत
३९- नरसीफाटा; डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ जोडपी होणार विवाहबद्ध
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[आजचे वाढदिवस]
रामदास कदम, स्नितीन भाऊ, सचिन कंधारकर, रवींद्र कौडगे, उझैर खान, दिनेश शेळके, संदीप लाक्का
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नियमितपणा हा माणसाचा मित्र आहे, तर आळस हा त्याचा कट्टर शत्रू असतो
(राजवीर सोनटक्के, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
मनीषा ढोले, दत्तराव मोहित्ते, अमरीन शेख, कल्पेश ठाकूर, बालाजी शिंदे, दीपक मोहिते, गंगाराम पानपट्टे, अझहर इनामदार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढ़िंचॉक फ्रेश
फळांचा राजा "आंबा' आता आपल्या शहरात दाखल.....
देवगडचा "हापूस आंबा", नैसर्गिक पद्धतीने पिकलेला..
संपर्क - 9423785456, 7350625656
पता- फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
G-2 सेंटर पॉईट, शिवाजी नगर, नांदेड
==============================================

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीकोनातून हा सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत भारताला एकाही सामन्यात विरोधी संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेलं नाहीये. त्याचाच फटका भारताच्या धावगतीवरही दिसून येतोय.
ऑस्ट्रेलियाची धावगती ही सध्याच्या तुलनेत भारतापेक्षा सरस आहे. त्यामुळे कांगारुंना मोठ्या फरकाने हरवण्याचं ध्येय आज धोनी ब्रिगेडसमोर असणार आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड तितकासा चांगला राहिलेला नाहीये, त्यामुळे यात सुधारणा करुन उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघही कसून तयारी करताना दिसतोय.

251 रुपयांत स्मार्टफोन देणाऱ्या कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल
नवी दिल्ली : 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन देण्याचा दावा करणाऱ्या रिगिंग बेल्स कंपनीच्या मालकाविरोधात नोएडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर नोएडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
रिंगिंग बेल्स कंपनीचे मालक मोहित अग्रवाल आणि कंपनीचे प्रेसिडंट अशोक चढ्ढा या दोघांविरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं, “251 रुपयांमध्ये स्मार्टफोन बनवणं अशक्य आहे. कंपनी ग्राहकांना मुर्ख बनवत आहे.”
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, “प्राथमिक चौकशीनुसार या प्रकरणात गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आम्ही गुन्हा नोंदवला असून पोलिसांचं एक पथक याबाबत चौकशी करत आहेत. चौकशीसाठी आवश्यक कागदपत्र सादर करण्याबाबत कंपनीला सांगितलं आहे.”
रिंगिंग बेल्स कंपनी चौकशीदरम्यान पोलिसांना सहकार्य करण्यास तयार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
==============================================
मंत्रालयासमोर विष प्यायलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू
मुंबई: होळीच्या दिवशी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या माधव कदम या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं या मागणीसाठी त्यानं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जीटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
कदम यांनी काही महिन्यांपूर्वीसुद्धी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी ते बचावले नाहीत. सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे त्यामुळे मी आत्महत्या करतोय अशी पोस्टसुद्धा त्यांनी फेसबुकवर टाकली होती.
==============================================
सहा महिन्यांसाठी गृह खातं द्या, सगळ्यांना सरळ करतो : रामदास कदम
लातूर : मुख्यमंत्र्यांनी मला सहा महिन्यांसाठी गृह खातं द्यावं. सगळ्यांना सरळ करतो, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीने ओवेसी यांच्यावर घणाघात केला आहे. ते उदगीरमधील बोलत होते.
‘भारत माता की जय’वरुन ओवेसींवर निशाणा
“मशिदीवर पाच स्पीकर लावणं, हे कोणत्या संविधानात लिहिलं आहे? ज्या जमिनीवर डोकं टेकवून नमाज पढता, त्या भूमातेचा जयजयकार करायला काय हरकत आहे?” असा सवाल रामदस कदम यांनी केला.
असदुद्दीन ओवेसींना महाराष्ट्र बंदी करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं रामदास कदम यांनी यावेळी सांगितले. शिवाय, सर्वच मुस्लीम देशद्रोही नाहीत. लवकरच आपण हैदराबादेत सभा घेणार असल्याची माहितीही रामदास कदम यांनी यावेळी दिली.
==============================================
....तर विदर्भ आंदोलन बंद करेन : श्रीहरी अणे
नागपूर: विदर्भ वेगळा झाल्यावर आम्ही काय खाऊ, याची चिंता तुम्ही करु नका, पण जर विदर्भ वेगळा झालाच, तर तुम्हाला खायला काय मिळेल, याची चिंता करा, असा सल्ला आज राज्याचे माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांना दिला.
पदाच्या राजीनाम्यानंतर आज पहिल्यांदाच ते नागपुरात आले आणि संविधान चौकात त्यांनी वेगळ्या विदर्भाबात लोकांपुढे आपली जाहीर भूमिका मांडली.
==============================================
मुंबईत डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण
मुंबई : डाव्या विचारांच्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना माटुंगा पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली.
हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार होता. त्याची परवानगी मागण्यासाठी डाव्या विचारांच्या संघटना पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जाब विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. यावेळी पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केल्याचं संघटनांचं म्हणणं आहे या घटनेनंतर पोलिसांनी 10 ते 15 जणांना ताब्यात घेतलं आहे.
मोर्चाची परवानगी मागण्यास आलेल्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण कुणाच्या आदेशानंतर झाली, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.
==============================================
अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बनसोड यांचं अपघाती निधन
अमरावती : अमरावतीचे माहिती आयुक्त दत्तात्रय बनसोड यांच्या कुटुंबावर काळानं घाला घातला आहे. कर्नाटकच्या कारवारमध्ये त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
या अपघातात दत्तात्रय बनसोड, त्यांच्या पत्नी अलका, ड्रायव्हर आणि मुलगा पंकज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर हुबळीच्या केईएम रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज दुपारी कारवारवरून हुबळीला जात असताना दत्तात्रय बनसोड यांची कार झाडाला आदळल्यामुळं हा अपघात घडला. बनसोड यांच्या निधनामुळं प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
एक मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी दत्तात्रय बनसोड यांची ओळख होती. बनसोड उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी तुळजाभवानी मंदिरातील अनेक सुधारणा केल्या होत्या.
==============================================
ऑस्ट्रेलियाविरोधात कॅप्टन धोनीचा ‘गेम प्लॅन’ तयार
मोहाली : ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियाचा कर्णधार धोनीने आपला ‘गेम प्लॅन’ तयार केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना कायमच चुरशीचा आणि रंगतदार ठरतो. यावेळीही अशीच परिस्थिती असेल, यात शंका नाही. त्यात उद्याचा सामना वीस षटकांचा, त्यामुळे चुरस वाढवणार हे नक्की.
मोहालीमधील सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा सामना गमावल्यास टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर जाईल. त्यामुळे धोनी ब्रिगेडसमोर एकच ध्येय आहे, तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा पराभव.
इतिहास धोनीच्या बाजूने!
भारतातील मैदानांवर टीम इंडियाचं ऑस्ट्रेलियाविरोधातील कामगिरी नेहमीच सर्वोत्कृष्ट ठरली आहे. आतापर्यंत भारतीय मैदानावर टीम इंडिया दोन वेळा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळली. दोन्ही वेळा टीम इंडियानेच विजयी झेंडा फडकावला. टी-20 फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत 12 वेळा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यामध्ये 8 वेळा टीम इंडियाचा विजय झाला, तर चारवेळा ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. म्हणजेच विजयी इतिहास धोनी ब्रिगेडच्या बाजूनेच आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
==============================================
म्हैसूरमध्ये अपघातात तिघांसोबत संवेदनशीलतेचा मृत्यू
म्हैसूर : म्हैसूरच्या रस्त्यावर झालेल्या अपघातात तीन जणांच्या मृत्यूबरोबरच बघ्यांच्या संवेदनाही मेल्या, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना मदत करण्याऐवजी त्यांचं व्हिडिओ शूटिंग करण्यात धन्यता मानणाऱ्या उपस्थितांची असंवेदनशीलता समोर आली.
म्हैसूरच्या कोल्लेगला परिसरात महेश, रमेश आणि मंजुनाथ हे तिघं बाईकवरुन जात होते. त्यावेळी राज्य परिवहनच्या बसने त्या तिघांच्या बाईकला धडक दिली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले हे दोघेजण, कुणीतरी आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्या अशी विनवणी करत होते. मात्र येणारे-जाणारे केवळ त्यांचं नाव, पत्ता आणि इतर चौकशी करतानाच दिसून आले. म्हैसूरच्या रस्त्यावरची ही टोकाची असंवेदनशीलता कॅमेऱ्यात कैद झाली.
अखेर गर्दीतल्या एकानं अँब्युलन्स बोलावली खरी, मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यानं हॉस्पिटलला नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
==============================================
आयसिसमध्ये सहभागास नकार, शिक्षकाकडून विद्यार्थ्याची हत्या
अलाहाबाद : आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकाने 11 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमधील कासेरुआ खुर्द गावात रवी या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली.
रवीचे पिता पप्पूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 वर्षांच्या आपल्या मुलाला त्याचे शिक्षक इरफान आयसिसमध्ये सहभागी होण्यास दबाव टाकत होते. मात्र रवीने तसं करण्यास साफ नकार दिल्याने इरफानने त्याची हत्या केली.
सायकल देण्याच्या बहाण्याने इरफान रवीला बाहेर घेऊन गेला. मात्र उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. अखेर पाल कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली.
एफआयआरमध्ये कुटुंबीयांनी आयसिसबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही. शिक्षकाने सायकल देण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर नेल्याचा उल्लेख केला आहे. 19 तारखेला रवी बेपत्ता झाला, तर मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
==============================================
सनी लिऑनच्या 'वन नाईट स्टँड'चा बोल्ड टिझर रिलीज
मुंबई : पॉर्न व्हिडीओ ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री सनी लिऑन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे. तिचा नवा सिनेमा ‘वन नाईट स्टँड’चा टीझर रिलीज झाला असून सनीने पुन्हा एकदा बोल्ड अवतारात दिसत आहे.
चित्रपटात सनीसोबत नवोदित अभिनेता, मॉडेल तनुज विरवानी मुख्य भूमिकेत आहे. उर्विल (समुद्र) आणि सेलेना (आभाळ) अशी दोघा व्यक्तिरेखांची नावं आहेत. समुद्र आणि आकाश कधीही भेटत नाहीत, आणि ते जेव्हा भेटतात तेव्हा जगाचा अंत होतो, असे संवाद सनीच्या तोंडी आहेत.
कथानकानुसार पहिल्या भेटीत दोघं एकमेकांच्या जवळ येतात, मात्र ती फक्त एका रात्रीपुरती मर्यादित गोष्ट होती, असं सनी सांगते आणि सिनेमात पुढे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचते.
पाहा टीझर :
==============================================
म्हणून अंकिता आणि सुशांत सिंग राजपूतच्या नात्यात दुरावा
मुंबई : बॉलिवूडसाठी ब्रेकअप नवीन नाहीत, मात्र सध्या चित्रपटसृष्टीला ब्रेकअपचं ग्रहण लागलंय की काय, अशी भीती निर्माण होणारी स्थिती आहे. सुशांत सिंग रजपूत आणि अंकिता लोखंडे वेगळे होत असल्याच्या चर्चा सध्या जोरावर आहेत. मात्र त्यामागील अनेक कारणांचा पिंगा या चर्चेभोवती होताना दिसत आहे.
गेल्या 6 वर्षांपासून एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेलं एक अत्यंत रोमँटिक कपल ब्रेकअप करत असल्याच्या वृत्तामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. अद्याप ब्रेकअपला अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सुशांतने संबंधित पत्रकाराशी बोलताना ‘मला याबद्दल सध्या काही बोलायचं नाही. ही फार काही चांगली फीलिंग नाहीये. प्लीज समजून घ्या’ असं म्हटलं.
याशिवाय दोघांनी ट्वीट करताना व्यक्त केलेली एकटेपणाची सूचक भावना बरंच काही बोलून जाते. सुशांत सिंग राजपूत आणि परिणिती चोप्रा यांच्यातील वाढती जवळीक ब्रेकअपला कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं, तर इंडिया.कॉमच्या माहितीनुसार अंकिताचं मद्यप्रेम सुशांत-अंकितातील दुराव्याचं कारण आहे.
==============================================
महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी
UPDATE : महिलेचा विनयभंग करणाऱ्या गणेश पांडेची भाजपमधून हकालपट्टी, भाजपा मुंबई युवा मोर्चाची कार्यकारणीही बरखास्त
मुंबई : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजयुमोच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागला आहे. पीडित तरुणीनं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई झाली. ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात हे पत्र छापून आलं आहे. मला राजकीय षडयंत्रात गोवलं गेल्याचा दावा गणेश पांडे यांनी केला आहे.
गणेश पांडे या भाजयुमोच्या मुंबई शहराध्यक्षाने मथुरेत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपला विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. भाजयुमोच्या एका परिषदेनिमित्त देशभरातले कार्यकर्ते मथुरेतल्या एका हॉटेलात उतरले होते. तेव्हा ही घटना घडल्याचं पीडितेनं सांगितलं.
4 मार्चच्या रात्री पांडेनं वारंवार फोन करुन, मेसेज करुन मला आपल्या रुमवर बोलावलं आणि तिथे गेल्यावर अश्लील वर्तन केलं, असा आरोप तिने केला आहे. इतकंच नव्हे तर ती तिथून निघालो असता त्याने हात पकडण्याचाही प्रयत्न केल्याचं तिने म्हटलं आहे.
दरम्यान याप्रकरणी पीडितेनं कोणतीही पोलीस तक्रार दाखल केली नसून पक्षानं केलेली कारवाई पुरेशी असल्याचं म्हटलं आहे.
गणेश पांडे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गटाचा समर्थक आहे. 1998 पासून भाजपचा वॉर्ड अध्यक्ष आहे. 2007 ते 2010 पर्यंत उत्तर-मध्य मुंबईचा जिल्हाध्यक्ष होता. 2013 मध्ये मुंबईचा उपाध्यक्ष होता. 2013 मध्येच भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष बनला.
==============================================
युवीचा आज मोहालीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना?
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचा सामना हा युवराजसिंगचा मोहालीतला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरण्याची शक्यता आहे. याआधी मोहालीत भारत एकदाच आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 सामना खेळला आहे.
2009 साली झालेल्या त्या लढतीत टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्ध 207 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यावेळी युवराजनं तीन विकेट्स काढल्या होत्या आणि मग नाबाद 60 धावांची खेळी करुन भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
सध्या युवराजसिंगचा फॉर्म ढासळलेला असला तरी एका जमान्यात याच युवराजची भारताचा मॅचविनर अशी ओळख होती. 2007 साली टीम इंडियाला ट्वेन्टी ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकून देण्यात युवीची मोलाची भूमिका होती. आता आपल्या घरच्या मैदानात युवी काय कामगिरी बजावतो, यावर सर्वांची नजर राहील.
==============================================
मोहालीच्या मैदानात आज धोनी ब्रिगेडची टक्कर ऑस्ट्रेलियाशी
मोहाली : बांगलादेशवर अवघ्या एका धावेने मात केलेल्या भारतीय संघाची गाठ आज ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. मोहालीतल्या मैदानात हा सामना रंगणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीकोनातून हा सामना महत्वाचा आहे. आतापर्यंत भारताला एकाही सामन्यात विरोधी संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवता आलेलं नाहीये. त्याचाच फटका भारताच्या धावगतीवरही दिसून येतोय.
ऑस्ट्रेलियाची धावगती ही सध्याच्या तुलनेत भारतापेक्षा सरस आहे. त्यामुळे कांगारुंना मोठ्या फरकाने हरवण्याचं ध्येय आज धोनी ब्रिगेडसमोर असणार आहे.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड तितकासा चांगला राहिलेला नाहीये, त्यामुळे यात सुधारणा करुन उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघही कसून तयारी करताना दिसतोय.
==============================================
देशभरात गुंतवणूक घोटाळा
- महाराष्ट्रासह देशभरातील पॉन्झी कंपन्यांविरुद्ध आता जवळजवळ तपासयुद्ध पुकारले गेल्याचे संकेत मिळाले आहेत. आरबीआयने १०४ कंपन्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश असलेल्या प्रकरणांमध्ये विशेष तपास चालविला आहे.या कंपन्यांकडे सार्वजनिक गुंतवणूक केली गेल्याचा संशय असल्याचे आरबीआयने सरकारला सांगितले आहे. सीबीआय, सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच कंपनी व्यवहार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेबी आणि विशेष तपास संघटनांनी (एसएफआयओ) पॉन्झी/ चिटफंड कंपन्यांबाबत स्वतंत्र तपास चालविला आहे. शेकडो गरीब गुंतवणूकदारांचा पैसा या कंपन्यांमध्ये गुंतविला गेला आहे. विविध तपास संस्थांकडून गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले असता गुंतवणुकीची आकडेवारी ३३,१४१ कोटी रुपयांवर जाते. महाराष्ट्रातील ४६९७.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या किमान १८ कंपन्यांविरुद्ध तपास करून कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
==============================================
फिफा वर्ल्डकप ओळख निर्माण करण्याची आणि फुटबॉल खेळ प्रत्येक गावात पोहोचवण्याची संधी - पंतप्रधान
- नवी दिल्ली, दि. २७ - पुढच्यावर्षी होणा-या फिफा अंडर-१७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेमुळे संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण करण्याची एक चांगली संधी आहे. आपण या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहोत. आधी फुटबॉलमध्ये भारताची कामगिरी चांगली होती पण आता फिफाच्या क्रमवारीत आपली घसरण झाली आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात बोलताना म्हणाले.दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान 'मन की बात' कार्यक्रमाव्दारे देशवासियांना संबोधित करतात. यावेळी मोदींनी भारतात होणा-या अंडर -१७ फिफा वर्ल्डकपचे महत्व लक्षात आणून दिले. यावेळी त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानवर विजय मिळवणा-या टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यासाठी संघाला शुभेच्छा दिल्या.फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने फुटबॉल देशाच्या प्रत्येक गावात, कानाकोप-यात आपण पोहोचवले पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला युवकांमध्ये फुटबॉलची आवड निर्माण करता येईल तसेच चांगले स्पोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याचीही संधी आहे असे मोदी म्हणाले.शेतक-यांसाठी ही वेळ महत्वाची आहे. त्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पिकासाठी वापर करायचा आहे. आपणही पाणी वाचवण्याचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी काम केले पाहिजे. शेतक-यांसाठी किसान सुविधा अॅप लॉंच केले असून, त्यावर शेतीसंबंधित सर्व माहिती आहे. शेतक-यांनी हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्यावे असे मोदींनी सांगितले.
==============================================
दिल्लीत आठवर्षांच्या चिमुकलीची हत्या केल्यानंतर बलात्कार
- नवी दिल्ली, दि. २७ - दिल्लीमध्ये एका नराधमाने आठवर्षाच्या मुलीची हत्या करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या सीमेवरील बादली भागामध्ये शुक्रवारी रात्री या मुलीचा मृतदेह सापडला होता. चंदन भुकान (१९) असे आरोपीचे नाव आहे.त्याने गुरुवारी रात्री मुलीचे अपहरण करुन तिची हत्या केली नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या मृतदेहाजवळ एक चप्पल सापडली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलगी गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होती. शवविच्छेदन अहवालानुसार मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. त्यांना घटनास्थळावर महत्वाचे पुराव सापडले होते. त्याआधारावर त्यांनी तपास केला. घटनास्थळाजवळ वीट भट्टीचा एका कारखाना आहे. तेथे काम करणा-या ७० कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान चंदन भुकान या वीटभट्टी मजूराने गुन्हयाची कबुली दिली.
==============================================
कुलभूषणला महिन्यापूर्वीच अटक
- - डिप्पी वांकाणी, मुंबईमुंबईतील कुलभूषण जाधव यास पाकिस्तानमध्ये एक महिन्यापूर्वीच अटक करण्यात आली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. कुलभूषण याने एका महिन्यापूर्वी पत्नीशी शेवटचा संपर्क साधला होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.कुलभूषण हा रॉ संघटनेचा हस्तक असल्याच्या आरोपावरून त्याला पाकिस्तानात अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच, जाधव कुटुंबीय परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी शनिवारी दिल्लीला रवाना झाले आहेत. ते पवईतील ज्या हाउसिंग सोसायटीमध्ये राहतात, त्या इमारतीच्या आसपास कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.बोलायला कोणीच तयार नाहीजाधव कुटुंबीय पवईच्या ज्या इमारतीत राहतात, तिथे कडक पोलीस बंदोबस्त आहे. कुलभूषणला अटक केल्याचे वृत्त येताच तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला, त्याच्या इमारतीतील कोणीही त्याच्या वा कुटुंबाविषयी बोलायला तयार झाले नाही. काहींनी तर आम्ही त्या कुटुंबाला ओळखत नसल्याचेच सांगून टाकले.
==============================================
तीर्थयात्रा लवकरच होणार सुपरफास्ट
- रस्त्यांच्या विकासासाठी मिळालेल्या तब्बल २७ हजार कोटींच्या पॅकेजमधून सोलापूर शहरासह जिल्ह्याचाही चेहरामोहरा बदलणार आहे. सोलापुरात दोन उड्डाणपूल होणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालखी मार्गाचेही चौपदीकरण या पॅकेजमधून होणार आहे. पंढरपूरसह तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रांशी सोलापूरची असलेली कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन रस्त्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यासाठी दिलेल्या या रस्ते पॅकेज कामाचा कोनशिला समारंभ केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी येथे पार पडला़ या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते़ जुना पुणे नाका ते विजापूर रोडवरील सोरेगावपर्यंत आणि हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती ते विजापूर रोडवरील पत्रकार भवनापर्यंत अशा दोन प्रमुख मार्गांवर सुमारे १ हजार कोटी रुपये खर्चून दोन उड्डाण पूल बांधले जाणार आहेत़ सोलापूर-विजापूर तसेच सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर, सोलापूर ते कोल्हापूर, पंढरपूर ते देहू आणि पंढरपूर ते आळंदी हे पालखी मार्ग, तुळजापूर ते अक्कलकोट या नवीन महामार्गांची घोषणा गडकरी यांनी भाषणात केली़
==============================================
ब्रसेल्स; शोधमोहीम वेगात
- ब्रसेल्स : बेल्जियममध्ये धाड आणि अटक सत्रातून फ्रान्समधील हल्ल्याच्या नव्या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या शोध मोहिमेला शनिवारी आणखी गती दिली. ब्रसेल्स हल्ल्यानंतर सरकार बचावाच्या पवित्र्यात आहे. विमानतळ व मेट्रोवरील हल्ला रोखण्यासाठी जे शक्य होते ते सर्व आम्ही केले होते, असे प्रमुख मंत्री म्हणत आहेत. काल अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली. पॅरिस हल्ल्यानंतर नव्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता फ्रान्सचे अधिकारी वर्तवीत असून या तिघांना त्याचसंदर्भात अटक करण्यात आली आहे.ब्रसेल्स हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. फैसल सी. असे या संशयिताचे नाव आहे. ब्रसेल्स येथील विमानतळ मंगळवारपूर्वी उघडणार नसल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
==============================================
तरुण, लठ्ठ लोक हृदयविकाराचे बळी
- वॉशिंग्टन : धूम्रपान करणारे तरुण हृदयविकाराचे, उच्च रक्तदाबाचे आणि मधुमेहाचे बळी ठरत असल्याचे एका नवीन संशोधनात आढळून आले आहे.यावर संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या पथकात भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. या संशोधनात ३,९०० पेक्षा अधिक अशा रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. या सर्वांना कशामुळे हृदयविकार जडला गेला, त्याची कारणे काय? यावर अभ्यास करण्यात आला. या सर्वांवर १९९५ ते २०१४ या काळात अमेरिकेतील क्विन्सलँड क्लिनिकमध्ये उपचार करण्यात आले होते. त्याच्यावर हृदयविकाराशी संबंधित एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन किवी एसटी सेगमेंट एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन यासाठी उपचार करण्यात आले होते. या संशोधन पथकाचे प्रमुख व क्वीन्सलँड क्लिनिकचे समीर कपाडिया म्हणाले की, जेव्हा लोक नियमित तपासणीसाठी येतात तेव्हा त्यांना वजन कमी करण्याचा आणि शारीरिक मेहनत करण्याचा सल्ला दिला जातो. एसटीएमआयमध्ये हृदयातील मुख्य धमण्यात अडथळे आल्याने त्या बंद होतात व रक्तपुरवठा थांबतो. त्यातून हृयविकाराचा झटका येतो. हे टाळण्यासाठीच व्यायाम करण्यास सांगितले जाते.
==============================================
व्हाईट हाऊसच्या ‘ईस्टर एग’मध्ये होणार योग सत्र
- वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर सोमवारी होणाऱ्या ईस्टर एग सोहळ्यादरम्यान हजारो अमेरिकींना योग करण्याची संधी मिळणार असून, योग प्रशिक्षक त्यांना योगाचे धडे देणार आहेत.ओबामांचा व्हाईट हाऊसमधील हा शेवटचा ईस्टर एग उत्सव आहे. ईस्टर एग सोहळ्याच्या आयोजनासाठी व्हाईट हाऊसच्या विस्तीर्ण हिरवळीचे १० वेगवेगळे विभाग करण्यात आले असून, त्यातील एक विभागाचे योग गार्डन असे नामकरण करण्यात आले आहे.
==============================================
इसिसविरोधी लढाईत अमेरिकी मुस्लिम भागीदार
- वॉशिंग्टन : इस्लामिक स्टेटविरुद्धच्या लढाईत अमेरिकी मुस्लिम महत्त्वाचे भागीदार असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रिपब्लिकनची उमेदवारी मिळवू इच्छिणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढविला. मुस्लिम समुदायाला बदमान करण्याचे प्रयत्न उधळून लावायला हवेत, असे आवाहनही ओबामांनी केले. ओबामा आपल्या साप्ताहिक वेब आणि रेडिओ भाषणात म्हणाले की, ‘इसिसच्या द्वेषयुक्त आणि हिंसक दुष्प्रचाराविरुद्धची लढाई जिंकण्याचा आमचा पण आहे. ही संघटना इस्लामच्या विचारांना विकृत रूपात सादर करते. तरुण मुस्लिमांना कट्टरवादी बनविणे हे या संघटनेचे लक्ष्य आहे, असे ओबामा म्हणाले. ट्रम्प व क्रूझ यांनी अलीकडेच केलेल्या मुस्लिमविरोधी विधानांचा अप्रत्यक्ष उल्लेख करीत ओबामा म्हणाले की, इसिसच्या उच्चाटनात अमेरिकी मुस्लिम आमचे प्रमुख भागीदार आहेत. त्यामुळे अमेरिकी मुस्लिम आणि आमच्या देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला बदमान करण्याच्या प्रयत्नांना आमचा विरोध आहे.
==============================================
केरळमधील नर्सचा मुलासह लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात झाला मृत्यू
- कोची, दि. २६ - मूळच्या केरळमधील असणारी एक नर्स व तिच्या दीड वर्षांच्या मुलाचा लिबियामध्ये रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली.२५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास झावैया येथे ही घटना घडली. सुनू सत्यम व प्रणव असे त्या दोघांचे नाव असून एक रॉकेट त्यांच्या घरात घुसून झालेल्या स्फोटात ते मृत्यूमुखी पडले. त्यावेळी सुनू यांचे पती विपिन कुमार कामावर गेले असल्याने ते बचावले.सुनू सत्यम या झावैया मेडिकल सेंटरमध्ये काम करत होत्या. या हल्ल्यात इतर काही जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.आपण याप्रकरणाची संपूर्ण माहिती मागवली असून सुनू यांच्या पतीशी संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून नमूद केले.
==============================================
फसवणुकीमुळे बँकांना ४ वर्षांत ३० हजार कोटींचा फटका
- नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांत फसवणुकीमुळे २६ सरकारी बँकांना ३० हजार कोटी रुपयांचा चुना लागला असून, या बँका आता २५ हजार कोटी रुपयांच्या बेल आऊट पॅकेजची प्रतीक्षा करीत आहेत.२०११ ते २०१५ या काळात या बँकांचे फसवणुकीमुळे ३०,८७६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वित्तमंत्रालयाकडे असलेल्या कागदपत्रावरून असे दिसते की, यातील बहुतेक फसवणुकीची प्रकरणे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची असून, तपास संस्था या प्रकरणांची चौकशी करीत आहेत.ताज्या घटनेनुसार सीबीआयने उदयपूरमधील एक सीए आणि जयपूरमधील एका व्यावसायिकाने सिंडिकेट बँकेचे एक हजार कोटी रुपयांनी नुकसान केल्याच्या आरोपाखाली दोघांनाही अटक केली आहे. याशिवाय किंगफिशर एअरलाईन्सने बँकांचे कर्ज डकार येथे नेण्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करीत आहे. सिंडिकेट बँकेचे मुख्यालय कर्नाटकात आहे. चार वर्षांत या बँकेला ४४५ प्रकरणात ११३३ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यातील बहुतेक प्रकरणे एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची आहेत. याशिवाय स्टेट बँक आॅफ इंडिया आणि या बँकेच्या पाच सहकारी बँकांना फसवणुकीमुळे ५,८८१ कोटी रुपयांची झळ बसली आहे. स्टेट बँकेशी निगडित फसवणुकीची २,०४९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे स्टेट बँकेचे ३४६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय स्टेट बँक आॅफ हैदराबादला फसवणुकीच्या १३९ प्रकरणांतून ८७६.४३ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.
==============================================
नागरिक निरोगी असतील तर भारत निरोगी- मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) रेडिओद्वारे "मन की बात‘ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.
या कार्यक्रमात मोदी यांनी सांगितलेल्या काही प्रमुख बाबी -

- फुटबॉलद्वारे जागतिक स्तरावर भारताला नाव उंचावण्याची संधी आहे. 17 वर्षाखालील फिफा फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा 2017 मध्ये होत आहेत. ही स्पर्धा म्हणजे भारतासाठी एक संधी आहे.
- भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्ध जिंकलेल्या सामन्यांबद्दल त्यांचे अभिनंदन.
- सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे वर्ष मधुमेहासाठी समर्पित केले आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे आपली जीवनशैली आहे.
==============================================
लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची...- एक रिक्षा चालक
ठाणे - सुमारे 12 वर्षे उन्हापावसात इमानेइतबारे तो रिक्षा चालवतो आहे. घाम गाळून, रक्त आटवून मिळवलेल्या पैशांतून घेतलेली रिक्षाही त्याच्या नावावर नाही. परप्रांतीयाच्या परवान्यावर तो रिक्षा चालवतोय... अकाली वृद्धत्व आलेल्या या तरुणाचे नाव आहे किशोर गायकवाड. या वेळीही सरकारकडून रिक्षा परवाना न मिळाल्यामुळे तो हवालदिल झाला आहे. ठाणे शहरातील आझादनगर परिसरात राहणाऱ्या किशोरने थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनाच पत्र लिहून कैफियत मांडली आहे. मराठी असल्यामुळेच आपल्याला रिक्षा परवाना मिळत नाही, असं किशोरचं म्हणणं आहे. "लाज वाटते मला मराठी म्हणून जन्मल्याची‘ असं रिक्षाचालकाच्या सीटच्या मागे लिहून त्याने संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
मराठी माणसाच्या अस्मितेवर फुंकर घालणाऱ्या "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय‘ या महेश मांजरेकरच्या चित्रपटात "मराठी असणं म्हणजे डाऊन मार्केट‘ असा संताप व्यक्त केला आहे. असाच हातचा बाजार जात असल्याची "घाटीगिरी‘ मराठी रिक्षाचालक व्यक्त करत आहेत. साला, आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ; खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे, गांडुळालाही मागणी आहे; पण मराठी माणसाला फुटक्या कवडीइतकीही किंमत नाही, अशी चीड किशोरसारखे मराठी रिक्षाचालक व्यक्त करत आहेत. मराठी माणूस रोगापेक्षा धसक्यानेच मरतो. धसका भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा आणि भविष्यकाळाचाही, असे चित्रपटातील भोसले उद्विग्न होऊन म्हणतो; पण किशोर व त्याचे तरुण सहकारी रोगाचा नायनाटच करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत.
परप्रांतांतून आलेल्या गुप्ता, मिश्रा, यादव, तिवारी, शर्मा आणि वर्मा यांना महाराष्ट्रात राहायला आल्याबरोबर लगेच कसे रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळतात, असा सवाल किशोरने विचारला आहे. मराठी माणसाचे नाव घेत मोठे झालेले राज्यकर्ते, आरटीओ कार्यालयातील मराठी अधिकारी आणि एजंट मलई खाऊन परप्रांतीयांवर उपकार करतात आणि मराठी माणसाला वाऱ्यावर सोडतात, असा आपला अनुभव असल्याचे किशोरने पत्रात म्हटले आहे.
किशोरच्या घरी आई, वडील, बायको आणि दोन मुले आहेत. त्याचे वडील स्कूल बस चालवतात; पण वयोमानानुसार त्यांना तेही झेपेनासे झाले आहे. 12 वर्षांत किशोरने तीन वेळा दुसऱ्याचा रिक्षा परवाना घेऊन रिक्षा चालवली. पहिल्या पाच वर्षांसाठी परवानाधारकाला किशोरने 20 हजार रुपये दिले होते. दुसऱ्या पाच वर्षांसाठी 80 हजार रुपये आणि आता तिसऱ्या वेळी पाच वर्षांसाठी 1 लाख 20 हजार रुपये मोजून किशोर दुसऱ्याच्या परवान्यावर रिक्षा चालवत आहे. परिवहन विभागाकडून गेल्या महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीतही किशोरला परवाना मिळाला नाही. आता पुढच्या पाच वर्षांसाठी दुसऱ्याचा परवाना घेताना दीड लाखाहून अधिक रक्कम मोजावी लागेल. हे पैसे आणायचे कुठून, या विवंचनेने किशोरला घेरले आहे.

भारत-बांगलादेश सामन्याची चौकशी व्हावी
कराची - ट्वेंटी-20 विश्वकरंडकात भारतीय संघाने बांगलादेशवर मिळविलेला विजय संशयास्पद असून, या सामन्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) चौकशी करावी, अशी मागणी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू तौसिफ अहमद यांनी केली आहे.
भारत-बांगलादेश सामन्याची चौकशी व्हावी
भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशवर एक धावेने विजय मिळविला. बांगलादेशला शेवटच्या तीन चेंडूवर विजयसाठी दोन धावांची गरज असताना बांगलादेशच्या खेळाडू असमर्थ ठरले होते. भारताच्या या विजयानंतर तौसिफ अहमद यांनी शंका उपस्थित केल्या आहेत.
तौसिफ म्हणाले की, भारत व बांगलादेश यांच्यातील सामन्याचा निकाल संशयास्पद आहे. सामन्याचा शेवट ज्याप्रमाणे झाला, तो मला योग्य वाटत नाही. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने या सामन्याची चौकशी करावी. बांगलादेशच्या संघात आता अनुभवी खेळाडू आहेत. त्यांनी सामना टाय करण्याऐवजी मोठे फटके मारण्याचे का प्रयत्न केले, हे मला समजणे अवघड जात आहे.
==============================================
बोनस देण्याच्या कायद्यात महत्त्वाचे बदल
बोनस देण्याचा कायद्याच्या कलम २ (१३) व कलम १२ मध्ये सरकारने दुरुस्ती केले असून, गेल्या हिवाळी अधिवेशनात हे बदल संसदेने मान्य केले आहेत. राष्ट्रपतींनीही या बदलास मान्यता दिली असून, बदलांचे कायद्यात रूपांतर झाल्याची अधिसूचना नववर्षाच्या प्रारंभी प्रकाशित केली गेली आहे. हे बदल पूर्वलक्ष्यी प्रभावाने म्हणजे एक एप्रिल २०१४ पासून लागू करण्यात आले आहेत. खरे पाहिले तर दुरुस्ती विधेयकात प्रस्तावित केलेले बदल एक एप्रिल २०१५ पासून अमलात येणार होते. तथापि, शेवटच्या क्षणी पंतप्रधानांच्या आग्रही सूचनेनुसार सरकारनेच हे बदल एक एप्रिल २०१४ पासून लागू करावेत, अशी सरकारी विधेयकास सरकारी दुरुस्ती मांडली व ती आवाजी मताने मान्य झाली. त्यामुळे हे बदल एक एप्रिल २०१४ पासून अमलात आले आहेत. या बदलांमुळे सरकारवर ६२०३ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, संघटित-असंघटित क्षेत्रातील काही कोटी कामगारांचा फायदा होणार आहे व म्हणून हे बदल महत्त्वाचे आहेत.
बदलापूर्वी या कायद्याअंतर्गत कोणत्याही उद्योगात कोणतीही व्यक्ती (रोजगाराच्या अटी लिखित स्वरूपात असो अगर नसो) जर कुशल, अकुशल, पर्यवेक्षकीय व्यवस्थापन, प्रशासकीय, तांत्रिक वा कारकुनी सेवा प्रदान करीत असेल व त्याचे वेतन दरमहा रु. दहा हजारांपेक्षा जास्त नसेल तर त्या व्यक्तीचा कलम २ (१३) अंतर्गत ‘कर्मचारी’ या संज्ञेत समाविष्ट करण्यात आला आहे. याच कायद्याच्या कलम १२ अंतर्गत बोनस कशाप्रकारे निर्धारित करण्यात यावा, हे स्पष्ट केले आहे. जर कर्मचाऱ्याचा पगार रु. तीन हजार पाचशेपेक्षा अधिक असेल तर कलम १० व ११ अंतर्गत मिळणारा बोनस त्या कर्मचाऱ्याचा पगार रु. तीन हजार पाचशेच आहे, असे समजून त्याच्या वार्षिक वेतनावर किमान ८.३३ टक्के बोनस देण्याची तरतूद पूर्वीच करण्यात आली आहे. जर वेतन रु. तीन हजार पाचशेपेक्षा कमी असेल तर किमान वार्षिक वेतनाच्या ८.३३ टक्के किंवा रु. शंभर यातील वाढीव रक्कम बोनस म्हणून निश्चित केलेली आहे. बोनस देणारा ‘उद्योग’ फायद्यात असला वा नसला तरी ही बोनसही रक्कम देय मानण्यात आली आहे. जर उद्योग अधिक फायद्यात असेल तर कमाल बोनसची रक्कम वीस टक्के इतकी मर्यादित करण्यात आली आहे. कोणत्याही कारखान्यात दहा किंवा अधिक वा कोणत्याही आस्थापनेत (संस्थेत) वीस किंवा अधिक कर्मचारी काम करीत असतील, तर अशा संस्थेस हा बोनस देण्याचा कायदा लागू आहे. वरील बोनसपात्र वेतन व कमाल मर्यादा २००७ मध्ये ठरविण्यात आल्या होत्या व पूर्वलक्ष्यी तारखेपासून कार्यवाहीत आल्या होत्या.
बोनस देण्याच्या कायद्यात महत्त्वाचे बदल
==============================================
उत्तराखंड; 9 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द
उत्तराखंड; 9 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द
नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असताना विधानसभा अध्यक्ष गोविंदसिंह कुंजवाल यांनी शनिवारी रात्री काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (रविवार) उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत बैठक होणार आहे.
सरकार वाचविण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी या नऊ बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर निर्णय घेत कुंजवाल यांनी यांचे सदस्यत्व रद्द केले. उत्तराखंड विधानसभेत 28 मार्चला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. हरीश रावत यांनी आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
शनिवारी हरीश रावत यांनी आपणास लाच आणि खरेदी करण्याचा कसा प्रयत्न केला याविषयीची स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने देशात पुन्हा राजकीय वादळ उठले. वादग्रस्त व्हिडिओनंतर भारतीय जनता पक्षाने रावत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तर हा आपणाविरोधात रचलेला कट होता, असे समर्थन स्वत: रावत यांनी केले. उत्तराखंडमधील कॉंग्रेसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्याने रावत सरकार अल्पमतात आले आहे. तर बंडखोराच्या साह्याने सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला आहे.
==============================================
शेतकऱ्याच्या मृत्यूने राजकारण तापणार
विषप्राशनाची घटना; मुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुंबई - मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडविली. या घटनेने राजकारण तापण्याचे संकेत असून, सोमवारी (ता. 28) विधिमंडळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. संपूर्ण कर्जमाफी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 302 कलमांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या मृत्यूने राजकारण तापणार
सलग दोन वर्षे दुष्काळाचे अनुदान मिळाले नाही, म्हणून नांदेडच्या माधव कदम या तरुण शेतकऱ्याने सरकारच्या निषेधार्थ बुधवारी मंत्रालयाच्या दारात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अत्यवस्थ स्थितीत त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
सरकार दुष्काळाचा निधी देत नसल्याने मागील वर्षीदेखील माधव कदम यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत विषप्राशन करून आत्मत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतरही सरकारने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे आश्चर्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारवर टीका करत, कर्जमाफीसाठी सरकार किती वाट पाहणार आहे, असा सवाल केला. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांवर आता 302 चा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल केला.
==============================================
प्रसंगी कायदा तोडून विदर्भ घेऊ : ऍड. अणे
नागपूर - राज्य सरकारच्या महाधिवक्तापदी असताना वेगळ्या विदर्भासह मराठवाड्याचा मुद्दा छेडून भाजपची कोंडी करणारे ऍड. श्रीहरी अणे यांनी आज नागपुरात येताच या पक्षावर तोंडसुख घेतले. भाजप वेगळ्या विदर्भाबाबत जनमताचा कौल घेण्यास साशंक आहे. ते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. आता जनमत तुम्हाला दाखवून दिले जाईल. तेलंगणाप्रमाणे हिंसक जनमत पाहायचे की सभ्य मार्गाने? असा सवालही त्यांनी केला. वेळप्रसंगी कायदा तोडून विदर्भ घेऊ, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

महाधिवक्तापदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आज प्रथमच नागपुरात आले. विदर्भवाद्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. संविधान चौकात जाहीर सभेत अणे यांनी भाजपसह कॉंग्रेसवरही शरसंधान साधतानाच शिवसेनेसह मनसेवरही टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्राने विदर्भाचा पैसा चोरल्याचा आरोप करीत अणे म्हणाले, ""पश्चिम महाराष्ट्रातील नेते विदर्भातील नेत्यांमध्ये पैसा नेण्याची क्षमता नसल्याचा युक्तिवाद करतात. ही बाब मान्य केल्यास यशवंतराव ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत एकालाही ते विदर्भाचेही मुख्यमंत्री आहे, असे का वाटले नाही? विदर्भ, मराठवाड्याला जबरदस्तीने महाराष्ट्राशी जोडण्यात आले. महाराष्ट्राने कधीच विदर्भ, मराठवाड्याला राज्याचा भाग समजले नाही.‘‘
शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे मित्र आहे; परंतु मराठावाड्याच्या मुद्यावरून त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने माझ्यावर राग काढला. त्यांना तसे बोलावे लागते, असा टोला लगावत अणे यांनी शिवसेनेबाबत आकस नसल्याचे स्पष्ट केले. माझा बोलविता धनी कोण? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. म्हणून ते अभिनंदनास पात्र असल्याचे ते म्हणाले. राज्य सरकारने विदर्भासाठी जनमत घ्यावे, 51 टक्के नागरिकांनी विदर्भ मागितला नाही, तर ही मागणीच सोडून देईल. विदर्भासाठी विध्वंसक मार्गाने जाण्याची गरज नाही. कायद्यावर माझा विश्वास असून, जे काही करायचे ते कायदेशीर प्रक्रियेनेच करू; परंतु प्रकरण हाताबाहेर गेल्यास शेवटची नाही; तर शेवट करणारी लढाई असेल. कायद्याचे उल्लंघन करण्याची वेळ नका आणू; अन्यथा कायदा तोडून सत्याग्रह करण्याचा इशाराच त्यांनी दिला.
==============================================
भाजपला 'धक्का' देत पुतळ्याचे अनावरण
मुंबई - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हातावर तुरी देत गनिमी काव्याने शिवजयंतीच्या मुहूर्तावर उरकून टाकले. विमानतळ प्राधिकरणातर्फे बसविण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या अनावरणाचा भव्यदिव्य कार्यक्रम भारतीय कामगार सेनेने आयोजित करीत भाजपला या कार्यक्रमापासून चार हात दूर ठेवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करता यावे, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार गेले अनेक दिवस प्रयत्न करीत होते. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्यासाठीची तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. छत्रपतींच्या या पुतळ्याच्या अनावरणापासून शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना दूर ठेऊन पुन्हा एकदा शिवसेनेवर शिरजोरी करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. जो भारतीय कामगार सेनेने हाणून पाडला. विमानतळाच्या पार्श्वभूमीवर कामगार सेनेने भव्यदिव्य स्वरूपात साजरा केलेल्या या पुतळ्याचे अनावरण मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर उद्धव ठाकरे, युवा सेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र भाजपचे कोणीच पदाधिकारी या उद्घाटनाकडे फिरकलेले नाही.
यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इंदू मिलच्या आणि मेट्रो तीनच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून भाजपने उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. तशाच पद्धतीने शिवसेनेला या पुतळ्याच्या उद्घाटनापासूनही दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न शिवसेनेने हाणून पाडला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिवसेनेच्या शंभर दीडशे शाखाप्रमुखांनी एकत्र येत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली या पुतळ्याचे जबरदस्तीने उद्घाटन केले होते.

पाकमधील अंतर्गत बाबीत भारताकडून हस्तक्षेप
जाधव हे बलुचिस्तानातील बंडखोर गटांना पैसा आणि प्रशिक्षण देत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. "रॉ‘च्या माध्यमातून भारत पाकिस्तानाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी इराणच्या अध्यक्षांकडे केली आहे. पाकिस्तान मागील अनेक वर्षांपासून असा दावा करत असला, तरी भारताने मात्र पाकिस्तानचा दावा वेळोवेळी फेटाळून लावला आहे.
"तो‘ अधिकारी कुलभूषण जाधव दरम्यान, पाकिस्तानने "रॉ‘च्या एका अधिकाऱ्याला अटक केल्याचा दावा केला असून, कुलभूषण जाधव असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला असून, जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या त्यांचा सरकारशी कुठलाही संबंध नाही.
पाकमधील अंतर्गत बाबीत भारताकडून हस्तक्षेप
इस्लामाबाद - पाकिस्तानातील अंतर्गत घडामोडींमध्ये भारताची रिसर्च अँड ऍनालिसिस विंग (रॉ) ही संघटना हस्तक्षेप करत असल्याची तक्रार पाकिस्तानने इराणकडे केली आहे. पाकिस्तानात, विशेषतः बलुचिस्तानात "रॉ‘ बंडखोरांना मदत करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. इराणचे अध्यक्ष हसन रुहानी दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर आले असून, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी आज त्यांची भेट घेतली. या वेळी भारताची "रॉ‘ ही संघटना बलुचिस्तानातील बंडखोरांना पाठबळ देत असून, पैसा आणि प्रशिक्षण देत असल्याचे शरीफ यांनी रुहानी यांना सांगितल्याचे पाकिस्तान सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जाधव हे बलुचिस्तानातील बंडखोर गटांना पैसा आणि प्रशिक्षण देत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. "रॉ‘च्या माध्यमातून भारत पाकिस्तानाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची तक्रार पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी इराणच्या अध्यक्षांकडे केली आहे. पाकिस्तान मागील अनेक वर्षांपासून असा दावा करत असला, तरी भारताने मात्र पाकिस्तानचा दावा वेळोवेळी फेटाळून लावला आहे.
"तो‘ अधिकारी कुलभूषण जाधव दरम्यान, पाकिस्तानने "रॉ‘च्या एका अधिकाऱ्याला अटक केल्याचा दावा केला असून, कुलभूषण जाधव असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानचा दावा भारताने फेटाळला असून, जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या त्यांचा सरकारशी कुठलाही संबंध नाही.
==============================================
==============================================

No comments:
Post a Comment