[अंतरराष्ट्रीय]
१- बीजिंग; चीनने बनवला कृत्रिम सूर्य
२- वॉशिंग्टन; आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी
३- लंडन; १८ महिन्यात १३ मुलांना दिला जन्म
४- वॉशिंग्टन; 20 हजार डॉलर्समध्ये विकली गेली हिटलरकडील ' माईन काम्फ'ची कॉपी
५- सोल; उत्तर कोरियाकडून 5 क्षेपणास्त्रांची चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित ठेवू नये - नरेंद्र मोदी
७- आरक्षण दलितांचा हक्क, तो कोणीही हिरावू शकणार नाही : मोदी
८- एक काय घेऊन बसलात, भारतात आहेत 5,275 विजय मल्ल्या
९- कोलकाता; पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना चुकलो नाही, इडनवरील म्युझिक सिस्टीम खराब
१०- भारतीयांचा 11 लाख कोटी रुपये काळा पैसा?
११- पटना; भाजपचे दुटप्पी राजकारण- जेडीयू
१२- सिमीचा संघाच्या शिबिरास लक्ष्य करण्याचा प्रयत्न
१३- जेएनयूतील घोषणांवेळी कन्हैया आघाडीवर - अभाविप
१४- नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिलला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- श्रीहरी अणेंचं निलंबन निश्चित ?
१६- श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ
१७- अणेंचं डोकं शरिरापासून वेगळं करा : नितेश राणे
१८- सुनावणीसाठी जेलबाहेर आलेल्या समीर भुजबळांचा वडा-पाववर ताव
१९- दोन वर्षात राज्यातील १२, ४३३ औद्योगिक कंपन्यांना टाळे
२०- जम्मू; पीडीपीवर दबाव टाकण्याचा भाजपचा यत्न
२१- सराफांच्या संपामुळे ७० हजार कोटी बुडाले
२२- गुजरात हाय कोर्टात वकिलाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- मुंबई; पोटच्या मुलीवर प्रियकराच्या साथीनं लैंगिक अत्याचार
२४- अजून एक कन्हैय्या तयार होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने केला पाठ्यपुस्तकात बदल
२५- कानपूर; गाईंच्या प्रेमापोटी मुस्लिम व्यक्तीने केला पत्नीचा त्याग
२६- पुण्याजवळ आढळला उत्तर अमेरिकेतला रेड फालोरोप
२७- जळगाव; जळगावमध्ये बँकेवर दरोडा; 8 लाख लंपास
२८- तळेगाव; डंपरला धडकून फरपटत गेल्याने तरुणीचा मृत्यू
२९- आसामधून राज्यसभेच्या दोन जागांवर कॉंग्रेस विजयी
३०- यवतमाऴ जिल्ह्यात वणी येथे शस्त्रास्त्र जप्त.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- मैदानावरील जाहीरातीमध्ये कोहलीने धोनीला टाकले मागे
३२- 'सैराट'मधील ठेका धरायला लावणारं गाणं 'झिंगाट'
३३- अॅपलच्या सर्वात स्वस्त iPhoneचं आज लॉन्चिंग
३४- देशात अर्ध्या वाहन उद्योगावर 'मारुती'चे वर्चस्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वार्थामुळे शत्रू मित्र आणि मित्र शत्रू बनतात
(भगवान बहिरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
===================================================

उत्तर कोरियाकडून 5 क्षेपणास्त्रांची चाचणी
सोल- आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने आज पुन्हा एकदा मध्यम पल्ल्याच्या 5 क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. सर्व निर्बंध झुगारून देत उत्तर कोरियाने या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे.
अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही ते झुगारून देत उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपल्या लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
उत्तर कोरियाने दोन दिवसांपूर्वीच मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यानंतर हा संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावाचा भंग असून, तो खपवून घेण्यासारखा नाही, अशी टीका यूएननेही केली होती. यूनच्या सुरक्षा परिषदेने मार्च महिन्याच्या सुरवातीला उत्तर कोरियावर मोठे निर्बंध घातले आहेत.
===================================================
जळगावमध्ये बँकेवर दरोडा; 8 लाख लंपास

जळगाव- गाळण (ता. पाचोर) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपये लंपास केले.
आज (सोमवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हा दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी 7 लाख 92 हजार 180 रुपये लंपास केले.
बँकेचे सुरक्षा कर्मचारी भिमराव शिंदे यांना चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला. बँकेच्या शटरचे कुलूप तोडले. नंतर आतमध्ये जाऊन बँकेच्या तिजोरीचे कुलूप गॅस कटरने तोडून त्यातील पैसे पळवून नेले.
साधारणतः पहाटे दोन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हा दरोडा टाकला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
यपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी येथून 35 किलोमीटर अंतरावरील नांदरा (ता. पाचोरा) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे दहा लाख रुपयांची चोरी झाली होती.
===================================================
देशात अर्ध्या वाहन उद्योगावर 'मारुती'चे वर्चस्व
देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे. कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे.
चालू आर्थिक वर्षअखेर मारुती सुझुकीची बाजारपेठेतील हिस्सेदारी 47 टक्क्यांवर पोचणार आहे. मारुतीची भक्कम प्रतिस्पर्धी ह्युंडाईची वर्षअखेर 17.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. केवळ मारुती व ह्युंडाई कंपन्यांची बाजारपेठेत एकत्रितपणे 64 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित सर्व कंपन्यांची मिळून 36 टक्के हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही मोटार उत्पादक कंपनीची वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी नाही.
तिसऱ्या क्रमांकाची मोटार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीदेखील बाजारपेठेत केवळ 8.26 टक्के हिस्सेदारी आहे. बाजारपेठेतील हिस्सेदारी प्रतिस्पर्ध्यांच्या विक्रीवरदेखील अवलंबून असते. देशात सात कंपन्यांची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी वेगवेगळ्या कारणांमुळे घटली आहे. यामध्ये टाटा मोटर्स, टोयोटा, फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्सचादेखील समावेश आहे. प्रत्येक कंपनीच्या नव्या उत्पादनांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
मारुती सुझुकीचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक आर एस कलसी यांच्या मते, विविध कारणांमुळे कंपनीची बाजारपेठेतील हिस्सेदारी वाढण्यास मदत झाली आहे.
"यंदा कंपनीने 200 विक्री शोरुम्स व 125 नेक्सा(प्रिमियम) शोरूम्सची सुरु केली आहेत. बलेनो व ब्रेझासारख्या नव्या मोटारींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, आल्टो व वॅगनआरसारख्या जुन्या मोटारींनालादेखील मागणी वाढत आहे", असेही ते म्हणाले.
देशात विक्री होणाऱ्या आघाडीच्या पाचही मोटारी मारुती सुझुकीच्या आहेत.
===================================================
डंपरला धडकून फरपटत गेल्याने तरुणीचा मृत्यू

तळेगाव दाभाडे- डंपरची धडक बसून एक युवती डंपरसोबत फरफटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आंबी गावातील तळेगाव एमआयडीसी चौकाच्या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये गाडीचा चेंदा झाला.
विद्या बाळासाहेब दहातोंडे असे मृत्युमुखी पडलेल्या 22 वर्षीय युवतीचे नाव असून, ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. कॉलेजमधून ती तिचा भाऊ नीलेश बाळासाहेब दहातोंडे (वय 19) याच्यासोबत दुचाकीने घरी जात होती. त्यावेळी असताना डंपरशी धडक होऊन हा जखमी झाला.
वडगाव मावळहून एमआयडीसी रोडला खडी भरण्यासाठी हा डंपर चालला होता. त्यावेळी आंबी गावाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी चौकात हा अपघात झाल्यानंतर डंपरने 500 फुटांपर्यंत फरफटत नेले.

या परिसरात अलीकडच्या काही दिवसांमध्ये घडलेला हा चौथा अपघात आहे. ही घटना समजल्यावर येथील आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी एक तास ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. ती आग विझविण्यासाठी आलेला अग्निशामक बंब लोकांनी परत पाठवला.
===================================================
भारतीयांचा 11 लाख कोटी रुपये काळा पैसा?
नवी दिल्ली: कराश्रय (टॅक्स हॅवन) सुविधा असलेल्या देशांमध्ये जगभरातील सुमारे 6 ते 7 लाख कोटी डॉलरची मालमत्ता असावी असा अंदाज बँक ऑफ इटलीमधील तीन अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे. यापैकी भारतीयांची गुंतवणूक 152-181 अब्ज डॉलर म्हणजेच 9 ते 11 लाख कोटी रुपयांची असावी असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते ही केवळ शेअर्स आणि रोख्यांमधील गुंतवणूक आहे परंतु स्थावर मालमत्ता किंवा सोने यासारख्या प्रत्यक्ष मालमत्तांमध्ये कितपत गुंतवणूक आहे, याचा अंदाज बांधणे अशक्य आहे.
इटालियन अर्थतज्ज्ञांनी जागतिक नाणेनिधी(आयएमएफ) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या(बीआयएस) आकडेवारीचा अभ्यास करुन हा अंदाज वर्तविला आहे.
याच आठवड्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे गॅब्रियल झुकमन यांनी टॅक्स हॅवन्समध्ये 7.6 अब्ज डॉलर काळा पैसा असल्याचा अंदाज वर्तविला होता. शिवाय बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप(8.9 अब्ज डॉलर) आणि टॅक्स जस्टिस नेटवर्कने(21 अब्ज डॉलर) याच प्रमाणात अंदाज वर्तविला आहे.
भारतीय वृत्तपत्रांनी त्यांच्याशी संपर्क साधून या अघोषित मालमत्तेत भारतीयांची हिस्सेदारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी दोन मार्गांनी ही आकडेवारी शोधता येईल असे सांगितले. पहिल्या पर्यायानुसार, भारताची अघोषित मालमत्तेतील हिस्सेदारी आणि आंतरराष्ट्रीय जीडीपीमधील हिस्सेदारी सारखीच आहे असे गृहित धरावे. 2013 च्या आकडेवारीनुसार, भारताचा आंतरराष्टीय जीडीपीत 2.5 टक्के हिस्सा होता. त्यानुसार भारतातील 152-181 अब्ज डॉलर रकमेची(8.9 ते 10.5 लाख कोटी रुपये) मालमत्ता अघोषित आहे.
दुसऱ्या पर्यायानुसार, भारताची पोर्टफोलिओ अॅसेट्समधील गुंतवणूक ही जगभरातील एकुण पोर्टफोलिओ गुंतवणूकीच्या 0.07 टक्के आहे. एवढीच रक्कम अघोषित आहे असे गृहित धरल्यास भारताची टॅक्स हॅवन्समध्ये 25,000 ते 30,000 कोटी रुपयांची मालमत्ता अघोषित असण्याची शक्यता आहे.
===================================================
भाजपचे दुटप्पी राजकारण- जेडीयू
पाटणा- आमदारांना भेट म्हणून देण्यात आलेले मायक्रोवेव्ह ओवन परत करण्याचा निर्णय घेणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी व भारतीय जनता पक्ष हे खालच्या दर्जाचे व दुटप्पी राजकारण करीत आहेत, अशी टीका संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे.
बिहारमधील शिक्षण खात्याने विधानसभा सदस्यांना मायक्रोवेव्ह ओवन भेट दिले आहेत. राज्यातील शालेय शिक्षकांचे पगार थकीत असल्याच्या निषेधार्थ सुशीलकुमार मोदी व भाजपच्या दोन आमदारांनी ते ओवन परत करीत असल्याचे जाहीर केले.
त्यावर ‘जेडीयू‘चे उपाध्यक्ष निहोरा प्रसाद यादव म्हणाले, "सुशील मोदी हे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 2005 ते 2013 दरम्यान मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असतानादेखील अशा भेटवस्तू आमदारांना अर्थसंकल्पाच्या वेळी देण्यात येत होत्या."
"मोदींना शिक्षकांच्या पगाराची एवढी काळजी आहे तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी या भेटवस्तू का स्वीकारल्या," असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी त्यांच्या काळात या भेटवस्तूंचे वाटप का बंद केले नाही, असे यादव यांनी म्हटले आहे. भाजप दुटप्पी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
===================================================
पीडीपीवर दबाव टाकण्याचा भाजपचा यत्न

जम्मु - पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) जम्मु काश्मीर राज्यामध्ये सरकार बनविण्यासाठी इच्छुक असलेल्या काही आमदारांशी संपर्कात असल्याचे संकेत भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) आज (सोमवार) देण्यात आले. मात्र पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून नव्या अटी घालण्यात आल्यास त्या मान्य केल्या जाणार नसल्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला. भाजपचे येथील नेते रविंदर रैना यांनी यासंदर्भातील माहिती दिली. रैना हे जम्मु काश्मीरमधील नौशेरा येथील आमदार आहेत.
पीडीपीबरोबरील युती तुटल्यास सरकार बनविण्यासाठी भाजपपुढे अन्य पर्याय असून वेळ येताच ते जाहीर केले जातील, असा इशारा रैना यांनी दिला. मात्र सध्या जम्मु काश्मीर राज्यात दोन्ही पक्षांनी परस्पर आदर व परस्पर विश्वास दाखवित एकत्र सरकारची स्थापना करत राज्यातील जनतेच्या इच्छेचा आदर करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
"जम्मुमधील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केले; तर काश्मीरमधील जनतेने पीडीपीस पाठिंबा दर्शविला. तेव्हा दोन्ही पक्षांनी एकत्र सरकार स्थापन करणे, ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हा पर्याय असू शकत नाही,‘‘ असे रैना म्हणाले. पीडीपीमध्ये फूट पाडण्याचा कोणताही विचार नसल्याचेही यावेळी भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
===================================================
सिमीचा संघाच्या शिबिरास लक्ष्य करण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली - इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या चार सदस्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर हल्ला करण्याची आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुझफ्फरनगर येथे 2013 मध्ये झालेल्या दंगलीचा सूड म्हणून संघाच्या शिबिरावर हल्ला करण्यात येणार होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हे चार सदस्य मध्य प्रदेश राज्यातील खांडवा येथील तुरुंगामधून फरार झाले होते; मात्र सुरक्षा संस्थांनी अथक प्रयत्नांनंतर आरोपींना पुन्हा अटक करण्यात यश मिळविले. यानंतर आरोपींच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून ही बाब स्पष्ट झाली.
अमजद खान, झाकीर हुसेन, मेहबुब गुड्डू, सालिक उर्फ सल्लु अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या चौघांनी अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेच्या "इन्स्पायर‘ या मासिकामधून "सिलिंडर बॉम्ब‘ तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले होते. संघाच्या शिबिरावेळी या बॉम्बचा स्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु, या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बमध्ये ऐन वेळी बिघाड होऊन त्याचा दहशतवादी राहत असलेल्या घरामध्येच स्फोट झाला. या दहशतवाद्यांनी सुमारे वर्षभराच्या काळासाठी उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक घर भाड्याने घेतले होते.
दहशतवादी कृत्ये व इतर गुन्ह्यांसंदर्भातील तब्बल 17 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या सिमीच्या या सदस्यांचा कसून शोध घेण्यात येत होता.
===================================================
जेएनयूतील घोषणांवेळी कन्हैया आघाडीवर:अभाविप
१- बीजिंग; चीनने बनवला कृत्रिम सूर्य
२- वॉशिंग्टन; आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी
३- लंडन; १८ महिन्यात १३ मुलांना दिला जन्म
४- वॉशिंग्टन; 20 हजार डॉलर्समध्ये विकली गेली हिटलरकडील ' माईन काम्फ'ची कॉपी
५- सोल; उत्तर कोरियाकडून 5 क्षेपणास्त्रांची चाचणी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित ठेवू नये - नरेंद्र मोदी
७- आरक्षण दलितांचा हक्क, तो कोणीही हिरावू शकणार नाही : मोदी
८- एक काय घेऊन बसलात, भारतात आहेत 5,275 विजय मल्ल्या
९- कोलकाता; पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना चुकलो नाही, इडनवरील म्युझिक सिस्टीम खराब
१०- भारतीयांचा 11 लाख कोटी रुपये काळा पैसा?
११- पटना; भाजपचे दुटप्पी राजकारण- जेडीयू
१२- सिमीचा संघाच्या शिबिरास लक्ष्य करण्याचा प्रयत्न
१३- जेएनयूतील घोषणांवेळी कन्हैया आघाडीवर - अभाविप
१४- नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुढील सुनावणी ८ एप्रिलला
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- श्रीहरी अणेंचं निलंबन निश्चित ?
१६- श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ
१७- अणेंचं डोकं शरिरापासून वेगळं करा : नितेश राणे
१८- सुनावणीसाठी जेलबाहेर आलेल्या समीर भुजबळांचा वडा-पाववर ताव
१९- दोन वर्षात राज्यातील १२, ४३३ औद्योगिक कंपन्यांना टाळे
२०- जम्मू; पीडीपीवर दबाव टाकण्याचा भाजपचा यत्न
२१- सराफांच्या संपामुळे ७० हजार कोटी बुडाले
२२- गुजरात हाय कोर्टात वकिलाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२३- मुंबई; पोटच्या मुलीवर प्रियकराच्या साथीनं लैंगिक अत्याचार
२४- अजून एक कन्हैय्या तयार होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने केला पाठ्यपुस्तकात बदल
२५- कानपूर; गाईंच्या प्रेमापोटी मुस्लिम व्यक्तीने केला पत्नीचा त्याग
२६- पुण्याजवळ आढळला उत्तर अमेरिकेतला रेड फालोरोप
२७- जळगाव; जळगावमध्ये बँकेवर दरोडा; 8 लाख लंपास
२८- तळेगाव; डंपरला धडकून फरपटत गेल्याने तरुणीचा मृत्यू
२९- आसामधून राज्यसभेच्या दोन जागांवर कॉंग्रेस विजयी
३०- यवतमाऴ जिल्ह्यात वणी येथे शस्त्रास्त्र जप्त.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३१- मैदानावरील जाहीरातीमध्ये कोहलीने धोनीला टाकले मागे
३२- 'सैराट'मधील ठेका धरायला लावणारं गाणं 'झिंगाट'
३३- अॅपलच्या सर्वात स्वस्त iPhoneचं आज लॉन्चिंग
३४- देशात अर्ध्या वाहन उद्योगावर 'मारुती'चे वर्चस्व
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
स्वार्थामुळे शत्रू मित्र आणि मित्र शत्रू बनतात
(भगवान बहिरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात कुठेही शुभेच्छा पाठविण्यासाठी संपर्क करा फ्लॉवर एन् फ्लॉवर्स
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
===================================================
आरक्षण दलितांचा हक्क, तो कोणीही हिरावू शकणार नाही : मोदी
नवी दिल्ली: आरक्षण हा दलितांचा अधिकार आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही,असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
दिल्लीच्या विज्ञान भवनात साकारल्या जाणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं आज मोदींनी भूमीपूजन केलं. यावेळी ते बोलत होते.
देशाच्या पंतप्रधानपदी एक आंबेडकर भक्त बसल्यानं विरोधकांना जळफळाट होत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीका केली. शिवाय महिलांच्या समानाधिकारावरुन डॉ. आंबेडकरांना नेहरुंच्या कॅबिनेटमधून बाहेर पडावं लागलं होतं, याचाही दाखल यावेळी मोदींनी दिला.
आंबेडकरांना केवळ दलितांचे उद्धारकर्ते म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. ज्या पद्धतीनं जग मार्टिन ल्युथर किंगना बघतं त्याचप्रमाणे जगानं आंबेडकरांना पाहावं, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
सुनावणीसाठी जेलबाहेर आलेल्या समीर भुजबळांचा वडा-पाववर ताव
मुंबई: मुंबईतील विशेष ईडी न्यायालयाने आर्थिक गैर व्यवहारप्रकरणी माजी खासदार समीर भुजबळ यांना 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास आता महत्वाच्या टप्प्यावर असल्याने ईडीने समीर भुजबळांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुंबई विशेष ईडी न्यायालायने समीर भुजबळ यांची रवानगी 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत केली.
कोर्ट आवारात समीर भुजबळांची वडापाव पार्टी
दुसरीकडे समीर भुजबळ यांनी आज कोर्टाच्या आवारात बालपणीच्या मित्रांसोबत माझगाव स्पेशल वडापाव आणि चटणी सँडवीच पार्टी केली. समीर भुजबळ गेली ३५ ते ४० दिवस आर्थर रोड जेलमध्ये आहेत. मात्र आज सुनावणीसाठी जेलबाहेर आल्यानंतर, समीर यांनी वडापाव, सँडवीचवर ताव मारला.
श्रीहरी अणेंचं निलंबन निश्चित ?
मुंबई: राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाड्याबाबत केलेलं वक्तव्य त्यांना भोवण्याची चिन्हं आहेत. कारण अणेंच्या वक्तव्याशी सरकार सहमत नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलं. तसंच श्रीहरी अणेंवर कारवाई करण्याचेही संकेत खडसेंनी दिले.
दरम्यान, अणेंनी वेगळ्या मराठवाड्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत खडाजंगी पाहायला मिळाली. त्यामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या याबाबत स्वत: निवेदन देणार आहेत.
शिवसेना – भाजप बेबनाव
महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी शिवसेना-भाजपमधला बेबनाव पुन्हा वाढला आहे. श्रीहरी अणेंवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत सभागृह आणि कॅबीनेटच्या कामकाजावर शिवसेनेने बहिष्कार टाकला.
'सैराट'मधील ठेका धरायला लावणारं गाणं 'झिंगाट'
मुंबई : दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ सिनेमातील ‘झिंगाट’ हे ठेका धरायला लावणारं गाणं रिलीज झालं आहे. अजय-अतुलच्या संगीत आणि आवाजाने या गाण्याला अक्षरश: चार चाँद लावले आहेत.
उरात होतंय धडधड, लाली गालावर आली
आन अंगात भरलं वारं, ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बग बधीर झालोय
झिंग झिंग झिंग झिंगाट…
असे शब्द आणि ताल धरायला लावणारं संगीत यामुळे ‘झिंगाट’ गाण्याला चाहते अक्षरश: डोक्यावर घेतील, यात शंका नाही.
‘फॅन्ड्री’ सिनेमामुळे घराघरात पोहोचलेला दिग्दर्शक नागराज मंजुळेचा ‘सैराट’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच ‘सैराट’ जगभरात सुसाट सुटला आहे.
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाला भरभरुन दाद मिळाली.
यापूर्वी या सिनेमातील ‘याड लागलं गं’हे गाणंही चांगलंच गाजलं आहे. त्यानंतर आता ‘झिंगाट’ गाणं नक्कीच ठेका धरायला लावणारं आहे.
VIDEO:
अणेंचं डोकं शरिरापासून वेगळं करा : नितेश राणे
मुंबई : “अणेंचं डोकं शरिरापासन वेगळं करा, मग यांना कळेल की महाराष्ट्राला तोडणे म्हणजे काय असतं”, असा घणाघात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला. नितेश यांनी ट्विट करून आपला राग व्यक्त केला.
राज्याचे महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भापाठोपाठ स्वतंत्र मराठवाड्याची मागणी केली आहे. त्याविरोधात भाजपवगळता सर्वपक्षीयांनी आवाज उठवला आहे. अणेंविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. तर अणेंची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे.
काय म्हणाले श्रीहरी अणे?
आतापर्यंत वेगळ्या विदर्भाची भाषा करणारे राज्याचे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांना आता मराठवाडादेखील महाराष्ट्रापासून वेगळा करायचा आहे. कारण, विदर्भापेक्षा मराठवाड्यावर जास्त अन्याय झाला असून वेगळ्या मराठवाड्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असं अणे यांनी म्हटलं आहे.
त्यामुळं श्रीहरी अणेंना महाराष्ट्राचे नेमके किती तुकडे करायचेत असा संतप्त सवाल विचारला जातोय.
जालनामध्ये मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. त्या कार्यक्रमात बोलताना अणे यांनी वेगळ्या मराठवाड्या संदर्भात भाष्य केलं.
अॅपलच्या सर्वात स्वस्त iPhoneचं आज लॉन्चिंग
मुंबई : अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन आज लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सिलिकॉन व्हॅलीमधील अपल ऑडिटोरियममध्ये लॉन्चिंग सोहळा पार पडेल. या कंपनीत आयफोन 6 सारखे फीचर्स असण्याची शक्यता आहे. शिवाय याचं नाव आयफोन SE असू शकतं.
iPhone SE मधील ‘S’ आणि ‘E’चा अर्थ काय?
गेल्या काही महिन्यांपासून अॅपलच्या 4 इंचाच्या आयफोनवरुन जोरदार चर्चा सुरु आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या आयफोनचं नाव iPhone SE असं असेल, यातील S म्हणजे स्पेशल आणि E म्हणजे एडिशन आहे.
कसा असू शकतो iPhone SE?
9to5mac या वेबसाईटच्या माहितीनुसार, आगामी आयफोन SE हा फोन आयफोन 5S सारखा दिसणारा असेल. या वेबसाईटने आयफोनचा फोटोही रिलीज केला आहे. या फोटोमध्ये पॉवर बटन स्क्रीनवर नसून बाजूला आहे. 2013 मध्ये लॉन्च झालेल्या आयफोनसारखा आयफोन 5SE असेल, अशी शक्यता वेबसाईटने वर्तवली आहे.
अॅपल इन्सायडरच्या दाव्यानुसार, 4 इंचाचा स्मार्टफोन हॉट पिंक व्हेरिएंटमध्ये लॉन्च होणार आहे. हा आयफोन 6S सारखा नसून पिंक कलरलाही वेगळी शेड असेल. याआधी अशी चर्चा होती की, आयफोनचा रंग ग्रे किंवा सिल्व्हर असेल.
काही वृत्तानुसार, iPhone SE ची किंमत 400 ते 500 डॉलर म्हणजेच 25000 ते 33000 रुपयांपर्यंत असू शकते.
पोटच्या मुलीवर प्रियकराच्या साथीनं लैंगिक अत्याचार
मुंबई: आपल्या 15 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आईचा काळा चेहरा अखेर जगासमोर आला आहे. प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधात पती आड येत असल्यानं पत्नीनं मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपात पतीलाच जेलमध्ये धाडलं. मात्र, मुलीच्या जबाबानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला आहे. एका आईनंच आपल्या मुलीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडलं.
मिड-डे वृत्तपत्रातील वृत्तानुसार, 15 वर्षीय मुलीनं आपल्या वडिलांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवली होती. मात्र, चाइल्ड वेलफेयर कमेटीनं जेव्हा तिचं काउंसलिंग केलं तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आलं. आईचा प्रियकरच तिला आपल्या वासनेचा शिकार बनवत होता.
दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आईनच हा सगळा बनाव रचल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या आईचे अनिल नावाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. यामुळेच पीडित मुलीला आपल्या वडिलांजवळ जायचं होतं. त्यामुळेच आईनं आपल्या मुलीला धमकावून वडिलांविरोधात तक्रार द्यायला लावली.
मैदानावरील जाहीरातीमध्ये कोहलीने धोनीला टाकले मागे
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २१ - जाहीरात कमाईमध्ये भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंह धोनी देशात आजही अव्वल स्थानावर असला तरी, मैदानावरील उत्पादन जाहीरातीमध्ये विराट कोहलीने धोनीला मागे टाकले आहे. धोनी बॅटवर स्टीकर लावण्याचे सहा कोटी आकारतो तिथे कोहलीच्या बॅटवर एमआरएफचा स्टिकर आहे. त्याचे विराटला आठ कोटी रुपये मिळतात. त्याशिवाय सरावाच्यावेळी पोषाख आणि बूटांची जाहीरात करण्याचे विराटला आणखी दोन कोटी रुपये मिळतात असे सूत्रांनी सांगितले.मैदानाबाहेर टीव्ही उत्पादनांच्या जाहीरातीमध्ये अजूनही धोनीच आघाडीवर आहे. धोनी टीव्हीवरील जाहीरातीचे आठ कोटी रुपये घेतो तर, कोहली पाच कोटी आकारतो. सध्या सुरु असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धा सुरु होत आहे. त्यामुळे क्रिकेट किटमधून उत्पादनांच्या जाहीरातीसाठी नव्या खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे.क्रीडा साहित्याचे उत्पादन करणारी जर्मन कंपनी पुमाने बॅट, पोशाख आणि बुटांच्या जाहीरातीसाठी युवराज सिंगला चार कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.सुरेश रैना, रोहित शर्मा बॅटवर सिएटचा स्टिकर लावतात त्याचे त्यांना अडीच ते तीन कोटी मिळतात. अजिंक्य रहाणेला अशाच जाहीरातीसाठी दीड कोटी रुपये मिळतात. भारताचा सलामीवीर शिखर धवनला बॅटवर एमआरएफच्या स्टिकरचे तीन कोटी रुपये मिळतात.
१८ महिन्यात १३ मुलांना दिला जन्म
- ऑनलाइन लोकमतलंडन, दि. २१ - साधारणत: कुठल्याही स्त्रीच्या प्रसुतीला नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. पण इंग्लंडमध्ये एका महिलेने १८ महिन्यात १३ मुलांना जन्म दिला आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ? वास्तवात हे शक्य नाही पण इंग्लंडमध्ये एका महिलेने हजारो पाऊंडस कमावण्यासाठी कागदोपत्री बनावट मुले दाखवून ९.५८ लाख रुपयांचा प्रशासनाला गंडा घातला.रेबेका जॉन्स असे या महिलेचे नाव आहे. मॅंचेस्टरमध्ये रहाणा-या या महिलेने दोन मुलांसाठी टॅक्स क्रेडिटसचा दावा केला होता. त्यानंतर तिने अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी १३ मुले दाखवली. पहिल्या ३४ दिवसात तिने सात मुलांना हजर करुन पैसे उकळले. मुलांच्या बनावट नावाने तिन बँकेमध्ये खाती उघडली.रेबेकाला वास्तवात दोन मुले आहेत. पण नंतर तिने बनावट मुलांना जन्म दिल्याचे दाखवले. रेबेकाने जी मुले दाखवली त्यात तीन जुळी मुले होती. मुलांच्या जन्मतिथीमधला घोळ लक्षात आल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. रेबेकाला शिक्षेसाठी मॅंचेस्टर क्राऊन कोर्टात १५ एप्रिलला पाठवले जाईल.
श्रीहरी अणेंच्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेत गदारोळ
- - हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधकांची घोषणाबाजी.- सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब.मुंबई : राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भापाठोपाठ मराठवाडाही स्वतंत्र करण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी सोमवारी विधानपरिषदेचे कामकाज रोखून धरले. महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेल्या अणेंची हकालपट्टी होईपर्यंत सभागृहाचे चालू देणार नाही, असे सांगत विरोधकांनी कामकाज रोखून धरल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.सोमवारी सभागृहाचे नियमित कामकाज भरताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे श्रीहरी अणेंच्या वादग्रस्त विधानाचा मुद्दा उपस्थित केला. मुंडे म्हणाले की, यापुर्वी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अणेंनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. आता तर विदर्भासोबत वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली आहे. उद्या ते वेगळा खान्देश करा, मुंबई वेगळी करा अशी मागणी करतील. त्यामुळे अणे यांनी महाधिवक्तापदाववरुन हकालपट्टी करावी. महाधिवक्तयाची मते वैयक्तिक मानता येणार नाहीत असे संगत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. मुंडे यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला काँग्रेस सदस्य संजय दत्त, शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीची कपिल पाटील, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी पाठिंबा देत अणेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
दोन वर्षात राज्यातील १२, ४३३ औद्योगिक कंपन्यांना टाळे
- मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षात तब्बल १२ हजार ४३३ औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असल्याची कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. मात्र याच कालावधीत तब्बल ३० हजार ३५२ नवीन औद्योगिक कंपन्यांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याने महागड्या वीजदरामुळे उद्योग बंद झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला.राज्यातील महागड्या वीज दरामुळे उद्योग परराज्यात जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अनिल भोसले, किरण पावसकर, संदीप बाजोरिया आदी सदस्यांनी विचारला होता. राज्यातून २०१३-१४ मध्ये औद्यागिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी २०१४-१५ मध्ये औद्यागिक वीज वापरामध्ये ५.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरण कंपनीचा औद्यागिक ग्राहकांसाठीचा वीजदर सर्वात कमी असल्याचा दावा उर्जा मंत्री बावनकुळे यांनी केला. औद्योगिक ग्राहकांसाठी टाटा पॉवर ८.४० रुपये प्रति युनिट तर रिलायन्स कंपनी ७.२७ रुपये प्रति युनिट इतका दर आकारते. यातुलनेत महावितरणचा दर ७.२१ रुपये असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.वीज दर वाजवी राहावेत यासाठी महावितरणतर्फे दीर्घकालीन वीज खरेदी करार, संचालन व सुव्यवस्था खर्चावर नियंत्रण आदी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर वीज उत्पादनासाठी लागणारा कच्चा कोळसा, वहन खर्चात बचत करून वीज दरात कपात तसेच वीज प्रणालीत सुधारणा व तूट कमी करण्याबाबत संबंधित कंपन्यांना सूचना देण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.
बाबासाहेबांना दलितांपुरतं मर्यादित ठेवू नये - नरेंद्र मोदी
- ऑनलाइन लोकमत -नवी दिल्ली, दि. २१ - 'आपण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा तारणहार बनवत त्यांच्यावर अन्याय करत आहोत, बाबासाहेबांना मर्यादित ठेवू नये', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचा शीलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला. 'बाबासाहेब आपल्याला 1956मध्ये सोडून गेले, आज 60 वर्षानंतर आपण स्मारक बांधायला सुरुवात करत आहोत', अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.'बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक अमानुष घटनेविरोधात आवाज उठवणारे महापुरुष होते. ज्याप्रकारे सरदार पटेल यांनी राजकीय एकीकरणासाठी काम केलं त्याप्रमाणे बाबासाहेबांनी सामाजिक एकीकरणासाठी काम केलं. जेव्हा महिलांच्या हक्कांचा विषय आला तेव्हा जर महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळाचा भाग राहू शकत नाही असं सांगत बाबासाहेब मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते मात्र इतिहासातील ही गोष्ट लोक विसरले आहेत किंवा बदलली गेली आहे', असं सांगत महिला समान हक्कांचा विषय मोदींनी यावेळी मांडला.बाबासाहेब जर सरकारमध्ये राहिले असते तर मी जे आज करतो आहे ते त्यांनी 60 वर्षापुर्वीच केलं असतं. काही लोकांना आम्ही अजिबात आवडत नाही, आम्हाला पाहायला पण आवडत नाही, त्यांना आजार होतो, आणि आजारात माणूस काहीही बोलतो, मनावरचा ताबा सुटतो असं म्हणत मोदींनी यावेळी विरोधकांवर टीका केली.
अजून एक कन्हैय्या तयार होऊ नये यासाठी राजस्थान सरकारने केला पाठ्यपुस्तकात बदल
- ऑनलाइन लोकमत -जयपूर, दि. २१ - देशविरोधी घोषणा दिल्यावरुन देशद्रोहाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या कन्हैय्या कुमारचा आदर्श घेऊन अजून एक कन्हैय्या जन्माला येऊ नये यासाठी राजस्थान सरकार अभ्यासक्रमातच बदल करणार आहे. राजस्थानचे शिक्षामंत्री वासुदेव देवनानी यांनी ही माहिती दिली आहे.अभ्यासक्रमात बदल करुन स्वातंत्र्यसैनिकांची आत्मचरित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्येदेशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात महत्वाचे बदल केले जात आहेत. वासुदेव देवनानी यांनी विधानसभेत बोलताना ही माहिती दिली आहे. हेमू कलानी, महाराज दहरसेन आणि स्वामी तौरम यांची आत्मचरित्र या पुस्तकात समाविष्ट केली जाणार आहेत. तर जॉन किट्स, विल्यिअम ब्लेक यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आले आहेत.जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला अफजल गुरुच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कन्हैय्या कुमारवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याची नंतर जामीनावर सुटका करण्यात आली होती.
एक काय घेऊन बसलात, भारतात आहेत 5,275 विजय मल्ल्या
- ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सनेजवळपास 7000 कोटी रुपयांची बँकांची कर्जे बुडवल्याच्या बातम्या काही महिने झळकत आहेत. परंतु, आर्थिक समस्यांची कारणं देत किंवा नादारी जाहीर करत बँकांच्या पैशांवर डल्ला मारणारे 5,275 विजय मल्ल्या भारतात असल्याचे क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड किंवा सिबिलने म्हटले आहे. कर्जदारांच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांनी स्थापन केलेली ही संस्था आहे.विलफूल डिफॉल्टर किंवा स्वेच्छेने कर्जाचा हप्ता बुडवणाऱ्यांनी थकवलेली कर्जे गेल्या 13 वर्षांमध्ये नऊपटीनं वाढली आहेत. इंडियास्पेंडने सिबिलच्या माहितीचा आढावा घेतला असता, अशा 5,275 विलफूल डिफॉल्टर्सनी भारतीय बँकांचे 56,521 कोटी रुपये थकवल्याचे आढळले आहे.
गाईंच्या प्रेमापोटी मुस्लिम व्यक्तीने केला पत्नीचा त्याग
- ऑनलाइन लोकमतकानपूर, दि. २१ - गाईंची कत्तल केल्याच्या वा बीफ शिजवून खाल्याच्या संशयावरून एकीकडे मुस्लिमांना लक्ष्य केले जात असताना, दादरीची हिंसक घटना ज्या उत्तर प्रदेशमध्ये घडली त्याच उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम व्यक्तीने १४ गाईंच्या प्रेमापोटी आपल्या पत्नीचा त्याग केल्याची घटना समोर आली आहे.इटाह जिल्ह्यात राहणारे अफाक अली उर्फ मुन्ना यांच्या आयुष्यात ही घटना १३ वर्षांपूर्वी घडली असली तरी सध्या बीफच्या मुद्यावरून सुरू असलेल्य रणकंदनाच्या मुद्याच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरू शकते.वयाची पन्नाशी पार केलेले अफाक १५ व्या वर्षापासून गाई खरेदी करत असून आता त्यांच्याकडे १४ गाई आहेत. २००१ साली त्यांचे अफरोज जहानशी लग्न झाले. मात्र त्यांचे हे गाईंवरील निरातिशय प्रेम त्यांच्या पत्नीला सहन झाले नाही आणि तिने अफाकना त्यांच्या गाई किंवा आपण यापैकी कोणा एकाचीच निवड करण्यास सांगितले. मात्र अफाक यांनी आपल्या गाईंना उघड्यावर न टाकण्याचा निर्णय घेतल्याने अफरोज तत्काळ घर सोडून निघून गेली. गावातील पंचायत सदस्यांनी त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला मात्र अफाक यांचे गाईंवर अतिशय प्रेम असल्याने तो असफल ठरला.' मी कोण्या दुस-या स्त्रीमुळे नव्हे तर गाईंमुळे पत्नीपासून दुरावलो' असे सांगणा-या अफाक यांच्या चेह-यावर कोणताही खेद नव्हता तर एक स्मित होते, यावरूनच त्यांचे त्यांच्या गाईंवर किती प्रेम आहे, याची कल्पना येते. ' माझ्या या निर्णयाचे गावकरी कौतुक करतात पण माझ्या नातेवाईकांना मात्र हा निर्णय पटलेला नाही, ते मल टोमणे मारत असतात. या गाईंवरून माझी पत्नी माझ्याशी रोज भांडायची, मी त्यांना विकून टाकावे असा तिचा आग्रह होता. पण माझ्या अंतर्मनाने मला तसे करण्याची परवानगी दिली नाही. मला माझ्या (पत्नीपासून फारकत घेण्याच्या)निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही, मी शांतपणे जीवन जगत आहे' असे अफाक यांनी नमूद केले.अफाक आपल्या १४ गाईंची पाळीव प्राणी म्हणून नव्हे तर पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांना खाण्यासाठी चांगला चारा उपलब्ध करून देणे, त्यांच्या प्रकृतीची योग्य काळजी घेणे, वेळच्यावेळी पशुवैद्यांकडे नेणे या सर्व गोष्टी ते निगुतीने करतात.
पुण्याजवळ आढळला उत्तर अमेरिकेतला रेड फालोरोप
- राहुल उम्ब्रजकर, पुणेउत्तर अमेरिकेतील आर्टिक व युरेशिया भागात आढळणारा रेड फालोरोप हा पक्षी शुक्रवारी 18 मार्च रोजी भिगवणजवळच्या उजनी जलाशयात दिसला. यापूर्वी सर्वप्रथम हा पक्षी राहुल सचदेव जे पुण्याचे रहिवासी असून प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आणि पक्षीतज्ञ आहेत, यांना आणि सह छायाचित्रकार संगमेश्वर धत्तर्गी, जनकराजन सरवानन आणि श्रीहरी के यांच्या दृष्टीस आला होता. प्राथमिक दर्शनी हा रेड नेकड फालोरोप वाटला. पण सदर पक्ष्याच्या प्रतिमा पहिल्या नंतर सुप्रसिद्ध पक्षी निरीक्षक आणि पक्षी तज्ञ आदेश शिवकर यांनी सांगितले कि हा रेड फालोरोप आहे. आदेश शिवकर आणि राहुल सचदेव यांनी सांगितले कि सदर पक्ष्याचा एकतर स्थलांतर करताना रस्ता चुकला असावा किंवा तो त्याच्या थव्यातून दूर पडला असावा.यापूर्वी नागपूर व राजस्थानमध्ये या पक्ष्याचे दर्शन घडले होते आणि आता हा भिगवणमध्ये आढळला ही पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.मुख्यत्वे करून या पक्ष्यासाठी लागणारे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध असणे हि फार मोठी आणि जमेची बाजू आहे . ह्या पक्ष्याचे वैशिष्ट म्हणजे हा नॉर्थ अमेरिकेच्या आर्टिक आणि युरेशिया या भागात आढळतो. ह्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्याचे भिगवण येथे दर्शन म्हणजे खरोखर पक्षी निरीक्षक आणि पक्षी छायाचित्रकारांसाठी मेजवानीच होय, असे या दोन्ही पक्षी तज्ञांचे म्हणणे पडले.
चीनने बनवला कृत्रिम सूर्य
- ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. २१ - चीनमधील शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम सूर्य बनवण्यात यश संपादन केले असून हा सूर्य पाच कोटी डिग्रीहून अधिक उर्जा उत्सर्जित करू शकतो. ' दि एक्सपेरिमेंटल अॅडव्हान्स्ड सुपरकंडक्टिंग टोकमाक ( EAST)' असे नाव त्याला देण्यात आले असून ' हेफैई इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल सायन्स'ने हा कृत्रिम सूर्य बनवल्याचे पीपल्स डेलीने म्हटले आहे.हा कृत्रिम सूर्य 'नियंत्रित थर्मोन्युक्लिअर फ्युजन'च्या माध्यमातून अपरिमित अमर्याद शुद्ध उर्जा निर्माण करू शकतो, असे चायना अॅकॅडमी ऑफ इंजिनीआरिंग फिजीक्समधील संशोधक क्झु जिआन यांनी सांगितले.या सूर्यातील उष्णता व प्रकाश ड्युटेरियम व टिट्रियम नावाच्या दोन हायड्रोजन्समधून येते. सूर्याच्या एक हीलियम परमाणु फ्युजन प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात उर्जा बाहेर पडते, असेही ते म्हणाले. कृत्रिम सूर्यामध्येही हीच प्रक्रिया होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आठवडाभर मोबाईल चार्ज ठेवणारी बॅटरी
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. २१ - मोबाईल वापरणा-यांना नेहमीच चार्जिंगची काळजी घ्यावी लागते. कारण मोबाईलची बॅटरी चार्ज करायची राहून गेली तर, दिवसभरात अनेक अ़डचणींचा सामना करावा लागतो. पण शास्त्रज्ञांनी आता या समस्येवर उपाय शोधला आहे. पोसटेक येथील वैज्ञानिक चॉय आणि त्याचा पीएचडीचा विद्यार्थी कुन जूंग किम यांनी सिलिकॉन ऐवजी नवीन साहित्य वापरुन सॉलिड ऑक्साईड फ्यूल सेल (sofc) विकसित केला आहे.या बॅटरीमुळे तुमचे वारंवार मोबाईल चार्जिंगचे टेन्शन मिटणार आहे. ही बॅटरी आठवडाभर मोबाईलला पुरणार आहे. फक्त आठवडयातून एकदाच तुम्हाला मोबाईल चार्ज करावा लागेल.बहुतांश एसओएफसी बॅटरी बनवताना सिलिकॉनचा वापर केला जातो. सिलिकॉनची झिज लवकर होते. चॉय यांनी एसओएफसी बॅटरी बनवताना दुस-या साहित्याचा वापर केला. त्यांनी स्टेनलेस स्टिल, इलेक्ट्रोलाईट, इलेक्ट्रोपासून एसओएफसीची बॅटरी बनवली.या बॅटरीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत. लॅपटॉप, ड्रोन, स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणारी लिथियम आयऑन बॅटरीची जागा घेण्याची क्षमता या नव्या बॅटरीमध्ये आहे. या बॅटरीच्या वापरामुळे ड्रोन विमानही अधिक तासभर उड्डाण करु शकते.
पाकिस्तानचं राष्ट्रगीत गाताना चुकलो नाही, इडनवरील म्युझिक सिस्टीम खराब
- ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. २१ - पाकिस्तानी संघाप्रमाणेच इडन गार्डनवर पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाणारा गायक शफाकत अमानत अलीवर पाकिस्तानात जोरदार टिका सुरु आहे. राष्ट्रगीत गाताना शफाकत अलीने काही ठिकाणी चूक केल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. पाकिस्तानात सोशल मिडीयावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, शफाकत अलीला पाकिस्तानात पाय ठेऊ देऊ नका अशीही काहींची भावना आहे.रविवारी शफाकत अलीने टि्वट करुन माफी मागितली पण त्याच्याकडून चूक झाल्याचा आरोप त्याने फेटाळून लावला. इडन गार्डनवरील खराब म्युझिक सिस्टीममुऴे हे सर्व घडले असे शफाकतने म्हटले आहे. शनिवारी भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी इडन गार्डनवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताचे गायन झाले. भारताकडून अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले तर, पाकिस्तानकडून शफाकत अमानत अलीने राष्ट्रगीत म्हटले.शनिवारी खराब हवामानामुळे मला इडनवरील म्युझिक सिस्टीम चेक करता आली नाही. त्यामुळे मी थेट प्रेक्षकांसमोर लाईव्ह राष्ट्रगीत गाण्याचा धोका पत्करला. पण मी कुठेही राष्ट्रगीत चुकीचे म्हटले नाही. म्युझिक सिस्टीममधील तांत्रिक दोषांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असे शफाकत अमानत अली यांनी सांगितले.
20 हजार डॉलर्समध्ये विकली गेली हिटलरकडील ' माईन काम्फ'ची कॉपी
- ऑनलाइन लोकमत -वॉशिंग्टन, दि. २१ - जर्मनीतील हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या ' माईन काम्फ' या आत्मचरित्राच्या पर्सनल कॉपीचा लिलाव करण्यात आला असता ते तब्बल २० हजार डॉलर्सना (13 लाख 73 हजार रुपये) विकले गेले. हिटरलने कारागृहात असताना हे पुस्तक लिहिलं होतं. अलेक्झांडर हिस्टॉरिकल ऑक्शनमध्ये या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला. महत्वाचं म्हणजे हिटलरने स्वत: या पुस्तकाची खरेदी केली होती.'माईन काम्फ' हे पुस्तक पहिल्यांदा 1924 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकात हिटलरने आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दलं तसेच जनेतबद्दल असणारा द्वेष तसंच त्यांना नष्ट करण्यासाठी आपण रचलेली रणनीती याबद्द्ल सविस्तरपणे लिहिले होते.काही दिवसांपूर्वी या पुस्तकाचा लिलाव करण्यात आला असता तब्बल 20 हजार डॉलर्स देऊन अमेरिकेतील एका व्यक्तीने हे पुस्तक विकत घेतले. दरम्यान प्रत्यक्ष सहभागींशिवाय ऑनलाईन वा फोनच्या माध्यमातूनही काही लोक या लिलावात सहभागी झाले होेते.अमेरिकी सैन्याला दुस-या महायुद्धाच्या शेवटी 2 मार्च 1945 रोजी हे पुस्तक अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमध्ये सापडलं होतं. त्या पुस्तका;च्या पहिल्या पानावर " 2 मार्च 1945 रोजी अॅडॉल्फ हिटलरच्या अपार्टमेंटमधून" असं लिहून 11 अधिका-यांनी सही केली होती
सराफांच्या संपामुळे ७० हजार कोटी बुडाले
- मुंबई : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याच्या प्रस्तावाविरोधात देशात गेले अठरा दिवस झालेल्या संपामुळे तब्बल ७० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा ‘द जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने (जीजेईपीसी) केला आहे. सरकारने अबकारी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या सराफा संघटनांनी सरकारने व्यावसायिकांच्या समस्यांसदर्भात तीन सदस्य समिती स्थापन केल्यानंतर शनिवारी रात्री संप मागे घेतला. त्यानंतर जीजेईपीसीने पत्रकाद्वारे नुकसानीची आकडेवारी दिली आहे.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात दागिन्यांवरील कराचा उल्लेख केला. इनपूट क्रेडिटसह १ टक्का अबकारी कर दागिन्यांवर लावण्यात येणार आहे. इनपूट क्रेडिटविना हा कर १२.५ टक्के होईल, असे जेटली यांनी सांगितले होते. अर्थसंकल्पाच्या दिवशीच सराफा व्यापारी संपावर गेले. संघटनेचे अध्यक्ष श्रीधर जी व्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबकारी कराच्या मुद्याच्या अनुषंगाने, अबकारी कर विभागाचे अधिकारी सराफा संघटनांवर कोणतीही सक्ती करणार नाहीत तसेच ‘इन्स्पेक्टर राज’ पद्धतीने वर्तणूक मिळणार नाही याची हमी मिळाल्यानंतर हा संप मागे घेतला आहे. सरकारने अबकारी कर मागे घेतला नसला तरी केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.सराफा व्यापाऱ्यांचे आंदोलन मुळात दोन लाखांच्या खरेदीवरील कराविरोधात होते. सुरुवातीला ग्राहकाने दोन लाखांच्या सोन्याची खरेदी केल्यास त्याचा पॅन कार्ड नंबर नोंदविण्याचे बंधन होते. परंतु आता त्यात एक टक्का ‘टीसीएस’ (टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स) वसूल करून तो त्या ग्राहकाच्या पॅन नंबरनुसार शासनाकडे जमा करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याचे रिफंड मिळण्याची कोणतीही सोय नाही.
उत्तर कोरियाकडून 5 क्षेपणास्त्रांची चाचणी
अमेरिकेने अनेक निर्बंध लादले असतानाही ते झुगारून देत उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांनी आपल्या लष्कराला क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत.
उत्तर कोरियाने दोन दिवसांपूर्वीच मध्यम पल्ल्याच्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. त्यानंतर हा संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावाचा भंग असून, तो खपवून घेण्यासारखा नाही, अशी टीका यूएननेही केली होती. यूनच्या सुरक्षा परिषदेने मार्च महिन्याच्या सुरवातीला उत्तर कोरियावर मोठे निर्बंध घातले आहेत.
===================================================
जळगावमध्ये बँकेवर दरोडा; 8 लाख लंपास
जळगाव- गाळण (ता. पाचोर) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपये लंपास केले.
आज (सोमवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हा दरोडा टाकला. यामध्ये त्यांनी 7 लाख 92 हजार 180 रुपये लंपास केले.
बँकेचे सुरक्षा कर्मचारी भिमराव शिंदे यांना चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला. बँकेच्या शटरचे कुलूप तोडले. नंतर आतमध्ये जाऊन बँकेच्या तिजोरीचे कुलूप गॅस कटरने तोडून त्यातील पैसे पळवून नेले.
साधारणतः पहाटे दोन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हा दरोडा टाकला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
यपूर्वी 24 फेब्रुवारी रोजी येथून 35 किलोमीटर अंतरावरील नांदरा (ता. पाचोरा) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला होता. त्यामध्ये सुमारे दहा लाख रुपयांची चोरी झाली होती.
===================================================
देशात अर्ध्या वाहन उद्योगावर 'मारुती'चे वर्चस्व
देशातील अनेक मोटार उत्पादक कंपन्या आपल्या विक्रीत वाढ करण्याचा प्रयत्न करीत असताना मारुती सुझुकीला मात्र वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी कायम राखण्यात यश आले आहे. कंपनीची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी मागील 14 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोचली आहे.
चालू आर्थिक वर्षअखेर मारुती सुझुकीची बाजारपेठेतील हिस्सेदारी 47 टक्क्यांवर पोचणार आहे. मारुतीची भक्कम प्रतिस्पर्धी ह्युंडाईची वर्षअखेर 17.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. केवळ मारुती व ह्युंडाई कंपन्यांची बाजारपेठेत एकत्रितपणे 64 टक्के हिस्सेदारी आहे. उर्वरित सर्व कंपन्यांची मिळून 36 टक्के हिस्सेदारी आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही मोटार उत्पादक कंपनीची वाहन बाजारपेठेत दोन आकडी हिस्सेदारी नाही.
तिसऱ्या क्रमांकाची मोटार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचीदेखील बाजारपेठेत केवळ 8.26 टक्के हिस्सेदारी आहे. बाजारपेठेतील हिस्सेदारी प्रतिस्पर्ध्यांच्या विक्रीवरदेखील अवलंबून असते. देशात सात कंपन्यांची मोटार बाजारपेठेतील हिस्सेदारी वेगवेगळ्या कारणांमुळे घटली आहे. यामध्ये टाटा मोटर्स, टोयोटा, फोक्सवॅगन आणि जनरल मोटर्सचादेखील समावेश आहे. प्रत्येक कंपनीच्या नव्या उत्पादनांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.
मारुती सुझुकीचे सेल्स व मार्केटिंग विभागाचे कार्यकारी संचालक आर एस कलसी यांच्या मते, विविध कारणांमुळे कंपनीची बाजारपेठेतील हिस्सेदारी वाढण्यास मदत झाली आहे.
"यंदा कंपनीने 200 विक्री शोरुम्स व 125 नेक्सा(प्रिमियम) शोरूम्सची सुरु केली आहेत. बलेनो व ब्रेझासारख्या नव्या मोटारींना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय, आल्टो व वॅगनआरसारख्या जुन्या मोटारींनालादेखील मागणी वाढत आहे", असेही ते म्हणाले.
देशात विक्री होणाऱ्या आघाडीच्या पाचही मोटारी मारुती सुझुकीच्या आहेत.
===================================================
डंपरला धडकून फरपटत गेल्याने तरुणीचा मृत्यू
तळेगाव दाभाडे- डंपरची धडक बसून एक युवती डंपरसोबत फरफटत गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. आंबी गावातील तळेगाव एमआयडीसी चौकाच्या ठिकाणी हा अपघात झाला. यामध्ये गाडीचा चेंदा झाला.
विद्या बाळासाहेब दहातोंडे असे मृत्युमुखी पडलेल्या 22 वर्षीय युवतीचे नाव असून, ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. कॉलेजमधून ती तिचा भाऊ नीलेश बाळासाहेब दहातोंडे (वय 19) याच्यासोबत दुचाकीने घरी जात होती. त्यावेळी असताना डंपरशी धडक होऊन हा जखमी झाला.
वडगाव मावळहून एमआयडीसी रोडला खडी भरण्यासाठी हा डंपर चालला होता. त्यावेळी आंबी गावाच्या हद्दीतील तळेगाव एमआयडीसी चौकात हा अपघात झाल्यानंतर डंपरने 500 फुटांपर्यंत फरफटत नेले.
या परिसरात अलीकडच्या काही दिवसांमध्ये घडलेला हा चौथा अपघात आहे. ही घटना समजल्यावर येथील आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी एक तास ‘रास्ता रोको‘ आंदोलन केले. संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला. ती आग विझविण्यासाठी आलेला अग्निशामक बंब लोकांनी परत पाठवला.
===================================================
भारतीयांचा 11 लाख कोटी रुपये काळा पैसा?
नवी दिल्ली: कराश्रय (टॅक्स हॅवन) सुविधा असलेल्या देशांमध्ये जगभरातील सुमारे 6 ते 7 लाख कोटी डॉलरची मालमत्ता असावी असा अंदाज बँक ऑफ इटलीमधील तीन अर्थतज्ज्ञांनी वर्तविला आहे. यापैकी भारतीयांची गुंतवणूक 152-181 अब्ज डॉलर म्हणजेच 9 ते 11 लाख कोटी रुपयांची असावी असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते ही केवळ शेअर्स आणि रोख्यांमधील गुंतवणूक आहे परंतु स्थावर मालमत्ता किंवा सोने यासारख्या प्रत्यक्ष मालमत्तांमध्ये कितपत गुंतवणूक आहे, याचा अंदाज बांधणे अशक्य आहे.
इटालियन अर्थतज्ज्ञांनी जागतिक नाणेनिधी(आयएमएफ) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या(बीआयएस) आकडेवारीचा अभ्यास करुन हा अंदाज वर्तविला आहे.
याच आठवड्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे गॅब्रियल झुकमन यांनी टॅक्स हॅवन्समध्ये 7.6 अब्ज डॉलर काळा पैसा असल्याचा अंदाज वर्तविला होता. शिवाय बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप(8.9 अब्ज डॉलर) आणि टॅक्स जस्टिस नेटवर्कने(21 अब्ज डॉलर) याच प्रमाणात अंदाज वर्तविला आहे.
भारतीय वृत्तपत्रांनी त्यांच्याशी संपर्क साधून या अघोषित मालमत्तेत भारतीयांची हिस्सेदारी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी दोन मार्गांनी ही आकडेवारी शोधता येईल असे सांगितले. पहिल्या पर्यायानुसार, भारताची अघोषित मालमत्तेतील हिस्सेदारी आणि आंतरराष्ट्रीय जीडीपीमधील हिस्सेदारी सारखीच आहे असे गृहित धरावे. 2013 च्या आकडेवारीनुसार, भारताचा आंतरराष्टीय जीडीपीत 2.5 टक्के हिस्सा होता. त्यानुसार भारतातील 152-181 अब्ज डॉलर रकमेची(8.9 ते 10.5 लाख कोटी रुपये) मालमत्ता अघोषित आहे.
दुसऱ्या पर्यायानुसार, भारताची पोर्टफोलिओ अॅसेट्समधील गुंतवणूक ही जगभरातील एकुण पोर्टफोलिओ गुंतवणूकीच्या 0.07 टक्के आहे. एवढीच रक्कम अघोषित आहे असे गृहित धरल्यास भारताची टॅक्स हॅवन्समध्ये 25,000 ते 30,000 कोटी रुपयांची मालमत्ता अघोषित असण्याची शक्यता आहे.
===================================================
भाजपचे दुटप्पी राजकारण- जेडीयू
पाटणा- आमदारांना भेट म्हणून देण्यात आलेले मायक्रोवेव्ह ओवन परत करण्याचा निर्णय घेणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी व भारतीय जनता पक्ष हे खालच्या दर्जाचे व दुटप्पी राजकारण करीत आहेत, अशी टीका संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केली आहे.
बिहारमधील शिक्षण खात्याने विधानसभा सदस्यांना मायक्रोवेव्ह ओवन भेट दिले आहेत. राज्यातील शालेय शिक्षकांचे पगार थकीत असल्याच्या निषेधार्थ सुशीलकुमार मोदी व भाजपच्या दोन आमदारांनी ते ओवन परत करीत असल्याचे जाहीर केले.
त्यावर ‘जेडीयू‘चे उपाध्यक्ष निहोरा प्रसाद यादव म्हणाले, "सुशील मोदी हे नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली 2005 ते 2013 दरम्यान मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असतानादेखील अशा भेटवस्तू आमदारांना अर्थसंकल्पाच्या वेळी देण्यात येत होत्या."
"मोदींना शिक्षकांच्या पगाराची एवढी काळजी आहे तर त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी या भेटवस्तू का स्वीकारल्या," असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी त्यांच्या काळात या भेटवस्तूंचे वाटप का बंद केले नाही, असे यादव यांनी म्हटले आहे. भाजप दुटप्पी राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
===================================================
पीडीपीवर दबाव टाकण्याचा भाजपचा यत्न
जम्मु - पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) जम्मु काश्मीर राज्यामध्ये सरकार बनविण्यासाठी इच्छुक असलेल्या काही आमदारांशी संपर्कात असल्याचे संकेत भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) आज (सोमवार) देण्यात आले. मात्र पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांच्याकडून नव्या अटी घालण्यात आल्यास त्या मान्य केल्या जाणार नसल्याचा इशाराही भाजपकडून देण्यात आला. भाजपचे येथील नेते रविंदर रैना यांनी यासंदर्भातील माहिती दिली. रैना हे जम्मु काश्मीरमधील नौशेरा येथील आमदार आहेत.
पीडीपीबरोबरील युती तुटल्यास सरकार बनविण्यासाठी भाजपपुढे अन्य पर्याय असून वेळ येताच ते जाहीर केले जातील, असा इशारा रैना यांनी दिला. मात्र सध्या जम्मु काश्मीर राज्यात दोन्ही पक्षांनी परस्पर आदर व परस्पर विश्वास दाखवित एकत्र सरकारची स्थापना करत राज्यातील जनतेच्या इच्छेचा आदर करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
"जम्मुमधील जनतेने भाजपला मोठ्या प्रमाणावर मतदान केले; तर काश्मीरमधील जनतेने पीडीपीस पाठिंबा दर्शविला. तेव्हा दोन्ही पक्षांनी एकत्र सरकार स्थापन करणे, ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हा पर्याय असू शकत नाही,‘‘ असे रैना म्हणाले. पीडीपीमध्ये फूट पाडण्याचा कोणताही विचार नसल्याचेही यावेळी भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.
===================================================
सिमीचा संघाच्या शिबिरास लक्ष्य करण्याचा प्रयत्न
मुझफ्फरनगर येथे 2013 मध्ये झालेल्या दंगलीचा सूड म्हणून संघाच्या शिबिरावर हल्ला करण्यात येणार होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी हे चार सदस्य मध्य प्रदेश राज्यातील खांडवा येथील तुरुंगामधून फरार झाले होते; मात्र सुरक्षा संस्थांनी अथक प्रयत्नांनंतर आरोपींना पुन्हा अटक करण्यात यश मिळविले. यानंतर आरोपींच्या करण्यात आलेल्या चौकशीमधून ही बाब स्पष्ट झाली.
अमजद खान, झाकीर हुसेन, मेहबुब गुड्डू, सालिक उर्फ सल्लु अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. या चौघांनी अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेच्या "इन्स्पायर‘ या मासिकामधून "सिलिंडर बॉम्ब‘ तयार करण्याचे तंत्र शिकून घेतले होते. संघाच्या शिबिरावेळी या बॉम्बचा स्फोट करण्याची योजना आखण्यात आली होती. परंतु, या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉम्बमध्ये ऐन वेळी बिघाड होऊन त्याचा दहशतवादी राहत असलेल्या घरामध्येच स्फोट झाला. या दहशतवाद्यांनी सुमारे वर्षभराच्या काळासाठी उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे एक घर भाड्याने घेतले होते.
दहशतवादी कृत्ये व इतर गुन्ह्यांसंदर्भातील तब्बल 17 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या सिमीच्या या सदस्यांचा कसून शोध घेण्यात येत होता.
===================================================
जेएनयूतील घोषणांवेळी कन्हैया आघाडीवर:अभाविप
पुणे - दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) भारत के टुकडे होंगे सारख्या 32 घोषणा दिल्या. या कार्यक्रमात डाव्या संघटनांचा सक्रिय सहभागी होता. त्यांच्या सहभागाचे पुरावे आमच्याकडे आहेत. कन्हैय्या कुमार यात आघाडीवर होता, असा आरोप जेएनयूतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) अध्यक्ष आलोक सिंग याने आज (सोमवार) पत्रकार परिषदेत केला.
जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारीला घडलेल्या देशविरोधी घोषणांच्या संदर्भात आलोक सिंग व त्याचे सहकारी प्रशांत साठे, राम सातपुते यांनी पत्रकार परिषद घेतली. जेएनयूमध्ये आलोक लाईफ सायन्समध्ये पीएचडी करत आहे. देशभर ज्या घटनेचे पडसाद उमटले, त्या संदर्भात अभाविपची भूमिका मांडण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
आलोक सिंग म्हणाला की, 9 फेब्रुवारीला काय घडणार याची सुरवात 2 फेब्रुवारीला झाली होती. अफजल तेरे अरमान हम पूरा करेंगे, अशा चिठ्ठ्या जेएसयूच्या माध्यमातून वाटल्या गेल्या. त्यांना अफजलचा स्मृतिदिन साजरा करायचा होता. आम्ही कुलगुरुंना हे सर्व थांबवायला सांगितले. मात्र, यांनी भारत के टुकडे होंगे सारख्या 32 घोषणा दिल्या आणि तो कार्यक्रम घेतलाच. त्यांनी देशविरोधी घोषणा देत मोर्चा काढला. आम्ही त्यांना विनंती केली, की मोर्चा काढू नका. मात्र त्यांनी तेच केले. आम्ही पोलिसांत तक्रार केली. 10 फेब्रुवारीला पुन्हा एक पत्रक काढण्यात आले, की आम्ही भारत तोडण्याच्या घोषणा यशस्वीपणे दिल्या. अभाविपला यशस्वीपणे विरोध केला. या पत्रकात या पद्धतीने लिहिण्यात आले होते. या सगळ्या प्रकाराला फक्त विद्यार्थी परिषदेने विरोध केला. जेएनयूमध्ये डाव्या विचारांचे विद्यार्थी तिथले वातावरण बिघडवत आहेत. राजकीय पक्षांनी ही त्याला राजकीय वळण दिले. आमच्या विद्यापीठावर डाग लागला. स्कुल ऑफ सोशल सायन्सच्या तीन विद्यार्थ्यांनी जे आमचे कार्यकर्ते होते, त्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्या गेल्यामुळे त्यांनी आमच्या संघटनेचा राजीनामा दिला. अगदी प्राध्यापकांनी सुद्धा ही संपूर्ण घटना दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. आम्ही संविधानाला मानतो. आम्हालाही हिंसा नको. आमचा लढा देशविरोधी शक्ती विरोधी आहे. आमचे प्राध्यापक सुद्धा आमच्या विरोधात आहेत. आम्हाला दररोज त्यांच्याशी सुद्धा लढत राहावे लागत आहे. पण आम्ही पाय रोवून उभे आहोत. साम्यवादी महिलाविरोधी असून, ते दुटप्पी वागणूक देतात. लोकांनी हे समजून घ्यावे. आम्ही जोपर्यंत इथे पाय रोवून आहोत, अशी घटना आम्ही पुन्हा कधीही घडू देणार नाही. दिल्ली सरकारने दिलेली ‘क्लीन चीट‘ आम्हाला अमान्य आहे.
===================================================
No comments:
Post a Comment