[अंतरराष्ट्रीय]
१- विज्ञानाचा चमत्कार! अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी
२- बॉइझी; ऑस्कर विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे निधन
३- मध्य रेल्वेच्या मायक्रोसाईटचे वेबपेज ‘अल कायदा’कडून हॅक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- तुमच्या पीएफवर नेमका किती टॅक्स लागेल?
५- शेती उत्पादन दुप्पट करणे अशक्य-मनमोहनसिंग
६- भाजपच्या मते कथेरिया देशभक्त- केजरीवाल
७- कथेरिया यांच्या प्रक्षोभक भाषणावरून गदारोळ
८- किर्ती चिदंबरम यांच्यावरून संसदेत गदारोळ
९- चिदंबरम यांचे "लष्कर-ए-तैयबा'शी संबंध तपासा - सुब्रमण्यम स्वामी
१०- इस्लाममधील तलाक,बहुपत्नीत्व बेकायदेशीर ठरवा - शायरा बानू
११- संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 10% जादा तरतूद
१२- पीएफच्या मुद्दलावर नाही, तर व्याजावर कर; पीपीएफ करमुक्तच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- पुणे; 4 कोटीपैकी 1 कोटी भागवले, अॅम्बी व्हॅलीवरील कारवाई रोखली
१४- दादर; शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं 'फुकट वडापाव' आंदोलन
१५- पटना; अंडरवेअरवर परीक्षा का? संरक्षण मंत्रालयाची लष्करप्रमुखांकडे विचारणा
१६- इशरत जहाँ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका
१७- भारत-पाक सामन्याचे भवितव्य अधांतरी, सुरक्षा पुरविण्यास हिमाचल सरकारची असमर्थता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; मनसे कार्यकर्त्यांची मुजोरी, बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड
१९- 3 मिनिटांत 206 बैठका, औरंगाबादच्या पठ्ठ्याचा रेकॉर्ड
२०- बुलढाणा; संत गजानन महाराजांचा 138 वा प्रगट दिन सोहळा
२१- भोपाल; बलात्काराचा प्रयत्न करणाऱयाचे कापले लिंग
२२- मणिपूर ; इरॉम शर्मिला यांचे बेमुदत उपोषण सुरुच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- महिषासूर चर्चेप्रकरणी टीव्ही निवेदिकेला शिवीगाळ
२४- सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन
२५- शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा व्हिडीओ व्हायरल
२६- 10 वर्षांनी लहान बॉयफ्रेण्डसोबत प्रीती झिंटाचा विवाह
२७- रिलायन्सचे दोन नवे स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही जेवढ इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देइल
(पवन चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
==============================================

सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी मुझफ्फरपूरमध्ये लष्करभरतीची परीक्षा दिली. यावेळी कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांना सर्व कपडे उतरवून फक्त अंडरवेअरवर बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. या परीक्षेला शेकडो विद्यार्थी फक्त अंतर्वस्त्रावर बसल्याचे फोटो समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.
कपड्यांमध्ये लपवून कॉपी आणल्याच्या किंवा मोबाईल फोन आणल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे असे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं. बिहारच्या शाळांमध्ये इमारतींवर चढून खिडकीतून कॉपी पुरवल्याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षांत समोर आली होती.

शेगावात दोन ते तीन लाख भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेगावात दीड ते दोन हजार भजनी, दिंड्या आणि पालख्या दाखल झाल्या आहेत. संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो गजाननभक्त शेगावात दाखल होतात.
138 वर्षांपूर्वी संत गजानन महाराज शेगावच्या बंकत लालाच्या घरी धार्मिक कार्यक्रम असताना उष्ट्या पत्रावळी शोधन करताना प्रगट झाले, अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे. हा प्रगट दिन गण गण गणात बोतेच्या गजरात शेगावात मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होत आहे.

ऑस्कर विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे निधन
बॉइझी- ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
कूल हँड ल्यूक या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. पॉल न्यूमन यांना मारणाऱ्या एका ताकदवान गँगस्टरची भूमिका केनेडी यांनी साकारली होती.
केनेडी यांच्या नातूने त्यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारावर द हॉलिवूड रिपोर्टर अँड व्हरायटीने हे वृत्त दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. केनेडी यांचे अमेरिकेतील इदाहो राज्यातील बॉइझी येथे रविवारी पहाटे निधन झाले.
मनोरंजन व्यवसाय क्षेत्रातील कुटुंबात 1925 मध्ये न्यूयॉर्क येथे केनेडी यांचा जन्म झाला. ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन फौजांमध्ये दाखल झाले होते. लष्करात 16 वर्षे सेवा केल्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे अपघाताने ते अभिनय क्षेत्रात आले. अष्टपैलू अभिनेता असणारे 6 फूट 4 इंचाची धिप्पाड देहयष्टी लाभलेले केनेडी यांनी अनेक चित्रपट व टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले.
==============================================
शेती उत्पादन दुप्पट करणे अशक्य-मनमोहनसिंग

नवी दिल्ली- पुढील पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान व अर्थशास्त्रज्ञ मनमोहनसिंग यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन 2016-17चा अर्थसंकल्प सोमवारी (ता. 29) सादर केला. यावर बोलताना मनमोहनसिंग म्हणाले, ‘यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. परंतु, हे अशक्य आहे. हे कसे शक्य होईल, हे सरकार सांगू शकत नाही.‘

भाजपच्या मते कथेरिया देशभक्त- केजरीवाल

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष कथेरियासारख्या व्यक्तींना देशभक्त मानत असल्याचे वक्तव्य राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
आग्रा येथे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांचा खून झाला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका शोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री राम शंकर कथेरिया यांनी बोलताना प्रक्षोभक शब्दांचा वापर केला होता. "दुसरा अरुण मारला खुन्यांना लटकविले पाहिजे‘, असे विधानही केले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी "कथेरिया हे भाजपच्या मते "देशभक्त‘ आहेत‘ असे म्हणत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. कथेरिया यांच्या विधानामुळे संसदेत त्यांच्याविरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये यावरून अनेकवेळा कामकाज बंद पडले.

कथेरिया यांच्या प्रक्षोभक भाषणावरून गदारोळ
केंद्रीय मंत्री राम शंकर कथेरिया यांनी उत्तर प्रदेशात आग्रा येथे एका जाहीर सभेत बोलताना केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे संसदेत त्यांच्याविरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये यावरून अनेकवेळा कामकाज बंद पडले.
राम शंकर यांच्या विधानांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने केली. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांचा खून झाल्याने रविवारी आयोजित शोकसभेत बोलताना कथेरिया म्हणाले, "हे सर्व देशातील तरुणांसोबत घडत आहे. ही हिंदू समुदायाविरोधातील कट कारस्थाने आहेत. आपल्याला सशक्त बनले पाहिजे आणि हा संघर्ष केला पाहिजे. आज अरुण मरण पावले, उद्या दुसरा अरुण मृत्युमुखी पडेल... दुसरा अरुण मारला जाण्याआधी खून्यांना लटकविले पाहिजेत."
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री असलेल्या कथेरिया यांनी आपण असे विधान केल्याचे आज अमान्य केले.
‘माझे भाषण म्हणून जे वृत्तपत्रांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी कोणत्याही समाजाचे नाव घेतले नाही. मी फक्त म्हणालो की खून्यांना फाशी दिली पाहिजे.‘
कथेरिया यांच्याशिवाय इतर अनेकांनीही यावेळी प्रक्षोभक भाषणे केली.
‘मुस्लिमांना हिंदूंच्या ताकदीबद्दल इशारा दिला पाहिजे,‘ असे फत्तेपूर सिक्री येथील भाजपचे खासदार चौधरी बाबूलाल त्यावेळी म्हणाले.

चिदंबरम यांचे "लष्कर-ए-तैयबा'शी संबंध तपासा
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे ‘लष्कर-ए-तैयबा‘ या दहशतवादी संघटनेशी काही संबंध आहेत का हे तपासणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं या महिला दहशतवाद्यासंदर्भात केंद्र सरकारने 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातीलवादग्रस्त बदल तत्कालीन चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी म्हणाले, ‘गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय काही फाईल्सची सखोल चौकशी करत आहे. भारतीय दंड संहितेनुसार हा गंभीर गुन्हा असून खोटी माहिती दिल्याबद्दल चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. तसेच चिदंबरम यांचे ‘लष्कर-ए-तैयबा‘शी काही संबंध आहेत का हे देखील नार्को चाचणी घेऊन तपासणे आवश्यक आहे.‘
पिल्ले यांचा संदर्भ देत स्वामी म्हणाले, "‘करदार वर्ग हा मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे काम करत असतो. या प्रकरणात त्यांनी शपथपत्रासह फाईल सादर केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वेगळेच शपथपत्र सदर करण्यात आले. चिदंबरम यांनी त्यांच्या हातांनी ते बदलले. पिल्ले यांनी आणखी काय सांगणे अपेक्षित आहे?‘ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशरत जहा प्रकरणी महाधिवक्ता यांना चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सूचना करावी, असे आवाहन स्वामी यांनी अलिकडेच मोदी यांना केले आहे.
==============================================
इस्लाममधील तलाक,बहुपत्नीत्व बेकायदेशीर ठरवा
नवी दिल्ली - मुस्लिम समाजासाठी लागू असलेल्या मुस्लिम पर्सनल कायद्यामधील घटस्फोटाची पद्धत (तलाक) व बहुपत्नीत्व या प्रथा भारतीय राज्यघटनेमधील कलम 14,15,21 आणि 25 चे उल्लंघन करणाऱ्या असल्याने बेकायदेशीर ठरविण्यात याव्यात, अशा आशयाची याचिका शायरा बानु या मुस्लिम महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
आपल्या पतीने सातत्याने क्रुरतेची वर्तणुक केल्यानंतर बेकायदेशीररित्या घटस्फोट दिल्याचे शायरा बानु यांनी या याचिकेत म्हटले आहे. हा घटस्फोट तीनवेळा तलाक पद्धतीनुसार दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्राचा अभिप्राय मागविला आहे. या प्रकरणी न्यायाधीश अनिल आर दवे आणि ए के गोएल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
"मुस्लिम महिलांविरोधातील लैंगिक भेदभावाच्या धोरणाचे परीक्षण करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण याआधीच सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. विवाह व वारशासंदर्भातील कायदे हे धर्माचा भाग असू शकत नाहीत; शिवाय बदलत्या काळाबरोबर कायदेही बदलणे आवश्यक असल्याची न्यायालयाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर, तलाकसंदर्भातील तरतुदीची वैधता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार व दस्तऐवज संदर्भासाठी अभ्यासले जाऊ शकतात,‘‘ असे सूत्रांनी सांगितले आहे.
==============================================
किर्ती चिदंबरम यांच्यावरून संसदेत गदारोळ
एअरसेल-मॅक्सिस करारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा किर्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अण्णा द्रमुकच्या (एआयएडीएमके) खासदारांनी आज (सोमवार) संसदेत गदारोळ घातला. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.
या करारात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी किर्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अण्णा द्रमुकच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. ‘वुई वॉन्ट ऍक्शन‘, ‘एनडीए सरकार टेक ऍक्शन‘ अशा घोषणा देण्यात आल्या. या गदारोळामुळे सुरवातीला कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार किर्ती चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस करारातून आर्थिक फायदा झाला होता. तसेच त्यांची जगभरात बांधकाम व्यावसायात गुंतवणूक आहे. या सर्व प्रकरणाची अंमलबजावणी संचलनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी अण्णा द्रमुकच्या खासदारांनी केली.

बलात्काराचा प्रयत्न करणाऱयाचे कापले लिंग
भोपाळ (मध्य प्रदेश)- आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे महिलेने लिंग कापल्याची घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवार्दे गावात रविवारी (ता. 28) रात्री ही घटना घडली. रामकरण प्रजापती (वय 29) याने गावातील एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने धारदार चाकूने त्याचे लिंग कापले. यामुळे रामकरण रक्तबंबाळ झाला. उपचारासाठी तो स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी डॉक्टरांनी माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, रामकरणवर मनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 10% जादा तरतूद

नवी दिल्ली : ‘समान हुद्दा समान निवृत्तीवेतन‘ (ओआरओपी) योजनेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 9.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढील आर्थिक वर्षात (2016-17) संरक्षण क्षेत्रासाठी 2.58 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये संरक्षण क्षेत्राकरीता 2.33 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात संरक्षण क्षेत्रातील तरतुदीविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही. तिन्ही संरक्षण सेवांसाठी एकूण 78,586 कोटी रुपयांचा भांडवली खर्च येणार आहे.
पुढील आर्थिक वर्षासाठी नियोजित असलेल्या 19.78 लाख कोटी रुपयांच्या एकूण सरकारी भांडवली खर्चापैकी 17.2 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी खर्च केली जाणार आहे. यामध्ये संरक्षण बजेटसोबत पेन्शन बजेटचादेखील समावेश आहे. यंदा सर्वात जास्त वाढ पेन्शन बजेटसाठी आहे. पुढील वर्षात पेन्शनसाठी 82,332 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मागील वर्षी हा आकडा 60,238 कोटी रुपये होता.

महिषासूर चर्चेप्रकरणी टीव्ही निवेदिकेला शिवीगाळ
नवी दिल्ली- वृत्तवाहिनीवरील चर्चेचे सूत्रसंचालन करणे एका लोकप्रिय मल्याळम निवेदिकेला चांगलेच महागात पडले. महिषासूर जयंतीबद्दल चर्चा करताना दुर्गादेवीचा अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांना 2000 हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोबाईलवर शिवीगाळ केली.
‘महिषासूराची जयंती साजरी करणे देशद्रोह मानला जाऊ शकतो का‘ या विषयावर टीव्हीवरील एका कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी दुर्गादेवीला ‘वेश्या‘ म्हटल्याबद्दल त्यांना विविध हिंदुत्ववादी गट, संघटनांचे समर्थक व कार्यकर्त्यांकडून एशियानेट न्यूज टीव्हीच्या सिंधू सूर्याकुमार यांच्या मोबाईलवर शिवीगाळ करणारे 2000 कॉल आल्याचे सूर्याकुमार यांनी सांगितले.
सिंधू यांचा मोबाईल क्रमांक काही व्हॉट्सऍप समूहांमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना मोबाईलवरून शिवीगाळ करण्यास सुरवात झाली.
त्या म्हणाल्या, "मला प्रत्येक मिनिटाला कॉल येत आहेत. मी दुर्गेचा अवमान केल्याचा त्यांचा आरोप आहे. अनेकांनी मला वेश्या म्हटले. त्यातील अनेकजणांना काहीही माहीत नव्हते तरीही ते शिव्या देत होते."
याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
==============================================
==============================================
==============================================
==============================================
पीएफच्या मुद्दलावर नाही, तर व्याजावर कर; पीपीएफ करमुक्तच
भारत-पाक सामन्याचे भवितव्य अधांतरी, सुरक्षा पुरविण्यास हिमाचल सरकारची असमर्थता
मध्य रेल्वेच्या मायक्रोसाईटचे वेबपेज ‘अल कायदा’कडून हॅक
==============================================
१- विज्ञानाचा चमत्कार! अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी
२- बॉइझी; ऑस्कर विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे निधन
३- मध्य रेल्वेच्या मायक्रोसाईटचे वेबपेज ‘अल कायदा’कडून हॅक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- तुमच्या पीएफवर नेमका किती टॅक्स लागेल?
५- शेती उत्पादन दुप्पट करणे अशक्य-मनमोहनसिंग
६- भाजपच्या मते कथेरिया देशभक्त- केजरीवाल
७- कथेरिया यांच्या प्रक्षोभक भाषणावरून गदारोळ
८- किर्ती चिदंबरम यांच्यावरून संसदेत गदारोळ
९- चिदंबरम यांचे "लष्कर-ए-तैयबा'शी संबंध तपासा - सुब्रमण्यम स्वामी
१०- इस्लाममधील तलाक,बहुपत्नीत्व बेकायदेशीर ठरवा - शायरा बानू
११- संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 10% जादा तरतूद
१२- पीएफच्या मुद्दलावर नाही, तर व्याजावर कर; पीपीएफ करमुक्तच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१३- पुणे; 4 कोटीपैकी 1 कोटी भागवले, अॅम्बी व्हॅलीवरील कारवाई रोखली
१४- दादर; शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं 'फुकट वडापाव' आंदोलन
१५- पटना; अंडरवेअरवर परीक्षा का? संरक्षण मंत्रालयाची लष्करप्रमुखांकडे विचारणा
१६- इशरत जहाँ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका
१७- भारत-पाक सामन्याचे भवितव्य अधांतरी, सुरक्षा पुरविण्यास हिमाचल सरकारची असमर्थता
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; मनसे कार्यकर्त्यांची मुजोरी, बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड
१९- 3 मिनिटांत 206 बैठका, औरंगाबादच्या पठ्ठ्याचा रेकॉर्ड
२०- बुलढाणा; संत गजानन महाराजांचा 138 वा प्रगट दिन सोहळा
२१- भोपाल; बलात्काराचा प्रयत्न करणाऱयाचे कापले लिंग
२२- मणिपूर ; इरॉम शर्मिला यांचे बेमुदत उपोषण सुरुच
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- महिषासूर चर्चेप्रकरणी टीव्ही निवेदिकेला शिवीगाळ
२४- सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन
२५- शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा व्हिडीओ व्हायरल
२६- 10 वर्षांनी लहान बॉयफ्रेण्डसोबत प्रीती झिंटाचा विवाह
२७- रिलायन्सचे दोन नवे स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
तुम्ही जेवढ इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देइल
(पवन चौधरी, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
==============================================
विज्ञानाचा चमत्कार! अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी
न्यूयॉर्क : अमेरिकेतील क्लिवलँड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी विज्ञानाची कमाल दाखवून दिली आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशयाचं प्रत्यरोपण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे.
एका महिलेने आपलं गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेनुसार गर्भाशय दान करण्यात आलं. गर्भाशय दान करण्याचा निर्णय घेणाऱ्या 26 वर्षीय महिलेची वैयक्तिक माहिती उघड करण्यात आलेली नाही.
गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया तब्बल 9 तास चालली. आणखी 10 गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्याचा मानसही क्लिवलँड हॉस्पिटलने व्यक्त केला आहे.
गर्भाशयाशी संबंधित काही कारणांमुळे अनेक महिलांना मूल होत नाही. धक्कादायक म्हणजे जगातील जवळपास तीन ते चार टक्के महिला यामुळे मातृत्त्वापासून वंचित राहतात. त्यामुळेच क्लिवलँड हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केलेलं गर्भाशय प्रत्यारोपण अत्यंत महत्त्वाचं आणि क्रांतिकारक मानलं जात आहे.
‘अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिन’चे अध्यक्ष ओविन डेविस यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “गर्भाशय प्रत्यारोपण वैज्ञानिक, नैतिकदृष्ट्य अत्यंत कठीण मानलं जातं.”
यापुढे ओविन डेविस म्हणाले, “गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी झाल्याने अशा महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, ज्यांना काही कारणामुळे गर्भाशय काढावं लागलं. त्याचसोबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या देशांमध्ये सरोगसीला परवानगी नाही, अशा देशांमधील महिलांनाही आता मातृत्त्वापासून वंचित राहता येणार नाही.”
मनसे कार्यकर्त्यांची मुजोरी, बिल्डरच्या कार्यालयाची तोडफोड
मुंबई : शिवसेनेनंतर आता मनसेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी समोर आली आहे. मिरारोडच्या नया नगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अनधिकृत वाचनालय हटवण्यावरुन मनसे कार्यकर्त्यांनी बांधकाम व्यासायिकाच्या कार्यालयाची तोडफोड केली. सीसीटीव्ही फुटेजवरुन कार्यकर्त्यांचा शोध घेतला जात असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
यापूर्वी युवासेनेचा पदाधिकारी सुनील महाडिकने फुकटच्या वडापावसाठी एका विक्रेत्याला जबर मारहाण केली होती. यानंतर महाडिकची पक्षातून निलंबित करण्यात आलं.
4 कोटीपैकी 1 कोटी भागवले, अॅम्बी व्हॅलीवरील कारवाई रोखली
पुणे: देश-विदेशी पर्यटकांचं ‘विकेंड स्पॉट’ म्हणून परिचीत असलेली अॅम्बी व्हॅलीवरील कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. सहारा समुहानं 1 कोटी रूपये भरल्यानंतर ही कारवाई थांबवण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
राज्य सरकारचा बिगर शेती कर थकवल्यानं मुळशी तहसीलदारांनी अॅम्बी व्हॅलीवर कारवाई करत रिसॉर्टला टाळं ठोकलं होतं.
गेल्या अनेक महिन्यांपासून अॅम्बी व्हॅलीनं थकवलेल्या कराची रक्कम तब्बल 4 कोटी 82 लाख इतकी आहे. याबाबत वारंवार नोटिसा देऊनही विकासकांकडून काहीच उत्तर न आल्यानं अखेर अॅम्बी व्हॅलीचं गेट सील करण्यात आलं. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली होती.. मात्र आता 1 कोटी भरल्य़ानं कारवाई थांबवण्यात आली आहे.
तुमच्या पीएफवर नेमका किती टॅक्स लागेल?
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर सध्या एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे ईपीएफ (प्रॉव्हिडंट फंड) अर्थात भविष्य निर्वाह निधी. नोकरदाराच्या या हक्काच्या पैशावरून सरकारच्या निर्णयामुळे गोंधळ उडाला आहे.
मात्र या वादानंतर मोदी सरकारने ईपीएफओबाबत यू टर्न घेतला आहे. आता पीएफच्या 60 टक्के रकमेच्या व्याजावर टॅक्स आकारण्यात येईल, असं स्पष्टीकरण सरकारने दिलं आहे.
याशिवाय ज्यांचा पगार 15 हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना ईपीएफवर टॅक्स नसेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
केंद्र सरकारचा कालचा निर्णय
नोकरदारांच्या पगारातून जमा झालेला फंड अर्थात ईपीएफओचे पैसे काढताना त्यातील 60 टक्के रकमेवर सरसकट टॅक्स लादण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयाचा फटका तब्बल 6 कोटी नोकरदारांना बसणार होता. आतापर्यंत पाच वर्षांच्या सलग सेवाकाळानंतर ईपीएफ खात्यातून रक्कम काढताना कोणताही कर भरावा लागत नव्हता. त्यामुळे सरकारच्या या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला. मात्र प्रचंड वादानंतर मोदी सरकारने यातून पळवाट काढली.
शिवसेनेविरोधात स्वाभिमानचं 'फुकट वडापाव' आंदोलन
दरम्यान, शिवसेना - स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांतील संभाव्य बाचाबाची टाळण्यासाठी, तसंच प्रतिबांधत्मक कारवाई म्हणून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दादर टीटी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.
मुंबई : काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेकडून शिवसेनेविरोधात “फुकट वडापाव” आंदोलन करण्यात आलं.
शिवसेना पदाधिकारी सुनिल महाडिकने फुकट वडापावसाठी दुकानदाराला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे अनोखं आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर परिसरात फुकट वडापाव वाटून हे प्रतिकात्मक आंदोलन केलं.
दरम्यान, शिवसेना – स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांतील संभाव्य बाचाबाची टाळण्यासाठी, तसंच प्रतिबांधत्मक कारवाई म्हणून पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दादर टीटी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला.
3 मिनिटांत 206 बैठका, औरंगाबादच्या पठ्ठ्याचा रेकॉर्ड
औरंगाबाद : औरंगाबादच्या आप्पासाहेब गायकवाड यांनी बैठकांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आप्पासाहेब गायकवाड यांनी 3 मिनिटांत 206 बैठका काढून नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
मागच्या वर्षी गायकवाड यांनी 1 तास 47 मिनीटात 4 हजार 4 बैठका काढून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. यानंतर गायकवाडांनी गिनीज बुकमध्ये रेकॉर्डसाठी विचारणा केली असता त्यांना 3 मिनीटात 201 बैठकांचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यानुसार आप्पासाहेबांनी 3 मिनिटात 206 बैठका काढत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
अंडरवेअरवर परीक्षा का? संरक्षण मंत्रालयाची लष्करप्रमुखांकडे विचारणा
पाटणा : बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये लष्कराची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना कपडे उतरवून फक्त अंतर्वस्त्रांवर परीक्षा देण्यास लावल्याचं समोर आल्यानंतर सर्वच स्तरातून टीका होत आहे. या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांना खुलासा करण्यास सांगितलं आहे.
सुमारे 1100 विद्यार्थ्यांनी मुझफ्फरपूरमध्ये लष्करभरतीची परीक्षा दिली. यावेळी कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी त्यांना सर्व कपडे उतरवून फक्त अंडरवेअरवर बसण्याच्या सूचना देण्यात आल्या. या परीक्षेला शेकडो विद्यार्थी फक्त अंतर्वस्त्रावर बसल्याचे फोटो समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.
कपड्यांमध्ये लपवून कॉपी आणल्याच्या किंवा मोबाईल फोन आणल्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली होती, त्यामुळे असे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं. बिहारच्या शाळांमध्ये इमारतींवर चढून खिडकीतून कॉपी पुरवल्याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षांत समोर आली होती.
शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वीच तो लोकप्रिय झाला आहे. आर्यन खानचा एक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.
आर्यन खानचा हा व्हिडीओ पाहून तो बॉलिवूड पदार्पणासाठी तर मेहनत घेत नाही ना, असंच वाटत आहे. व्हिडीओमध्ये आर्यन खान स्टंट करताना दिसत आहे. आकर्षक बॉडी असलेला आर्यन उत्कृष्ट जिम्मॅस्टही असल्याचं या व्हिडीओवरुन जाणवतं.
10 वर्षांनी लहान बॉयफ्रेण्डसोबत प्रीती झिंटाचा विवाह
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. प्रीती झिंटा तिचा अमेरिकन मित्र जीन गुडएनफसोबत विवाहबंधनात अडकली आहे. 28 फेब्रुवारी रोजी लॉस अँजेलसमध्ये तिने लगीनगाठ बांधल्याची माहिती आहे.
जीन हा प्रीतीपेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान आहे. मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. एप्रिलमध्ये प्रीती लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र प्रीती हे वृत्त नाकारत होती.
लग्नानंतर प्रीती आपल्या मित्र, परिवाराला मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहे. प्रीती आणि जीन गुडइनफ हे वर्षभरापासून डेटिंग करत आहेत. 31 वर्षीय जीन लॉस एंजिल्समध्ये राहतो. तो फायनान्शिअल अॅनालिस्ट म्हणून काम करतो.
या लग्नातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, प्रीती आपल्या लग्नाच्या फोटोंचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारा पैसा समाजकार्यासाठी दान करण्यात येणार आहे.
संत गजानन महाराजांचा 138 वा प्रगट दिन सोहळा
हा प्रगट दिन गण गण गणात बोतेच्या गजरात शेगावात मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होत आहे.
बुलडाणा : विदर्भाची पंढरी संत नगरी शेगावमध्ये आज संत गजानन महाराज यांचा 138 वा प्रगट दिन संपन्न होत आहे. शेगावमध्ये भल्या पहाटेपासूनच लाखो भाविकांची मांदियाळी जमली आहे.
शेगावात दोन ते तीन लाख भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेगावात दीड ते दोन हजार भजनी, दिंड्या आणि पालख्या दाखल झाल्या आहेत. संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो गजाननभक्त शेगावात दाखल होतात.
138 वर्षांपूर्वी संत गजानन महाराज शेगावच्या बंकत लालाच्या घरी धार्मिक कार्यक्रम असताना उष्ट्या पत्रावळी शोधन करताना प्रगट झाले, अशी आख्यायिका गजानन महाराज विजय ग्रंथात आहे. हा प्रगट दिन गण गण गणात बोतेच्या गजरात शेगावात मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होत आहे.
रिलायन्सचे दोन नवे स्मार्टफोन लाँच, पाहा खास फीचर
मुंबई: रिलायन्स डिजिटलने नुकतंच आपला स्मार्टफोन फ्लेम 1 आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला होता. कंपनीनं रविवारी नवा लाइफ विंड 6 स्मार्टफोनसह लाइफ फ्लेम 1 लाँच केला आहे.
लाइफ फ्लेम 1ची किंमत 6,490 रु. आहे. तर लाइफ विंड 6 रिलायन्स डिजिटल वेबसाइटवर 7,090 रु. उपलब्ध आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4जी सपोर्ट आहे.
– लाइफ फ्लेम 1 स्मार्टफोनचे खास फीचर:
4.5 इंच डिस्प्ले आणि 480×854 पिक्सल रेझ्युलेशन
ड्युल सिम सपोर्ट
1.1 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 210 प्रोसेसर
1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी
5.1 लॉलीपॉप अँड्रॉईड
5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
जीपीएस, ब्ल्यूटूथ आणि वाय-फाय
बॅटरी 2000 mAh क्षमता
– लाइफ विंड 6 स्मार्टफोनचे खास फीचर:
5 इंच डिस्प्ले आणि 480×854 पिक्सल रेझ्युलेशन
ड्युल सिम सपोर्ट
5.1 लॉलीपॉप अँड्रॉईड सपोर्ट
1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरी
5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
जीपीएस, ब्ल्यूटूथ आणि वाय-फाय
बॅटरी 2250 mAh क्षमता
ऑस्कर विजेते अभिनेते जॉर्ज केनेडी यांचे निधन
कूल हँड ल्यूक या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. पॉल न्यूमन यांना मारणाऱ्या एका ताकदवान गँगस्टरची भूमिका केनेडी यांनी साकारली होती.
केनेडी यांच्या नातूने त्यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारावर द हॉलिवूड रिपोर्टर अँड व्हरायटीने हे वृत्त दिल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. केनेडी यांचे अमेरिकेतील इदाहो राज्यातील बॉइझी येथे रविवारी पहाटे निधन झाले.
मनोरंजन व्यवसाय क्षेत्रातील कुटुंबात 1925 मध्ये न्यूयॉर्क येथे केनेडी यांचा जन्म झाला. ते दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन फौजांमध्ये दाखल झाले होते. लष्करात 16 वर्षे सेवा केल्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे अपघाताने ते अभिनय क्षेत्रात आले. अष्टपैलू अभिनेता असणारे 6 फूट 4 इंचाची धिप्पाड देहयष्टी लाभलेले केनेडी यांनी अनेक चित्रपट व टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले.
==============================================
शेती उत्पादन दुप्पट करणे अशक्य-मनमोहनसिंग
नवी दिल्ली- पुढील पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करणे अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान व अर्थशास्त्रज्ञ मनमोहनसिंग यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन 2016-17चा अर्थसंकल्प सोमवारी (ता. 29) सादर केला. यावर बोलताना मनमोहनसिंग म्हणाले, ‘यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. परंतु, हे अशक्य आहे. हे कसे शक्य होईल, हे सरकार सांगू शकत नाही.‘
==============================================
भाजपच्या मते कथेरिया देशभक्त- केजरीवाल
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष कथेरियासारख्या व्यक्तींना देशभक्त मानत असल्याचे वक्तव्य राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
आग्रा येथे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांचा खून झाला होता. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या एका शोकसभेत केंद्रीय राज्यमंत्री राम शंकर कथेरिया यांनी बोलताना प्रक्षोभक शब्दांचा वापर केला होता. "दुसरा अरुण मारला खुन्यांना लटकविले पाहिजे‘, असे विधानही केले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी "कथेरिया हे भाजपच्या मते "देशभक्त‘ आहेत‘ असे म्हणत भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. कथेरिया यांच्या विधानामुळे संसदेत त्यांच्याविरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये यावरून अनेकवेळा कामकाज बंद पडले.
==============================================
कथेरिया यांच्या प्रक्षोभक भाषणावरून गदारोळ
केंद्रीय मंत्री राम शंकर कथेरिया यांनी उत्तर प्रदेशात आग्रा येथे एका जाहीर सभेत बोलताना केलेल्या प्रक्षोभक विधानांमुळे संसदेत त्यांच्याविरोधात जोरदार निषेध नोंदविण्यात आला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये यावरून अनेकवेळा कामकाज बंद पडले.
राम शंकर यांच्या विधानांवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने केली. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांचा खून झाल्याने रविवारी आयोजित शोकसभेत बोलताना कथेरिया म्हणाले, "हे सर्व देशातील तरुणांसोबत घडत आहे. ही हिंदू समुदायाविरोधातील कट कारस्थाने आहेत. आपल्याला सशक्त बनले पाहिजे आणि हा संघर्ष केला पाहिजे. आज अरुण मरण पावले, उद्या दुसरा अरुण मृत्युमुखी पडेल... दुसरा अरुण मारला जाण्याआधी खून्यांना लटकविले पाहिजेत."
केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री असलेल्या कथेरिया यांनी आपण असे विधान केल्याचे आज अमान्य केले.
‘माझे भाषण म्हणून जे वृत्तपत्रांमध्ये जे प्रसिद्ध झाले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी कोणत्याही समाजाचे नाव घेतले नाही. मी फक्त म्हणालो की खून्यांना फाशी दिली पाहिजे.‘
कथेरिया यांच्याशिवाय इतर अनेकांनीही यावेळी प्रक्षोभक भाषणे केली.
‘मुस्लिमांना हिंदूंच्या ताकदीबद्दल इशारा दिला पाहिजे,‘ असे फत्तेपूर सिक्री येथील भाजपचे खासदार चौधरी बाबूलाल त्यावेळी म्हणाले.
==============================================
चिदंबरम यांचे "लष्कर-ए-तैयबा'शी संबंध तपासा
गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं या महिला दहशतवाद्यासंदर्भात केंद्र सरकारने 2009 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातीलवादग्रस्त बदल तत्कालीन चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना स्वामी म्हणाले, ‘गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय काही फाईल्सची सखोल चौकशी करत आहे. भारतीय दंड संहितेनुसार हा गंभीर गुन्हा असून खोटी माहिती दिल्याबद्दल चिदंबरम यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा. तसेच चिदंबरम यांचे ‘लष्कर-ए-तैयबा‘शी काही संबंध आहेत का हे देखील नार्को चाचणी घेऊन तपासणे आवश्यक आहे.‘
पिल्ले यांचा संदर्भ देत स्वामी म्हणाले, "‘करदार वर्ग हा मंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे काम करत असतो. या प्रकरणात त्यांनी शपथपत्रासह फाईल सादर केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वेगळेच शपथपत्र सदर करण्यात आले. चिदंबरम यांनी त्यांच्या हातांनी ते बदलले. पिल्ले यांनी आणखी काय सांगणे अपेक्षित आहे?‘ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशरत जहा प्रकरणी महाधिवक्ता यांना चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सूचना करावी, असे आवाहन स्वामी यांनी अलिकडेच मोदी यांना केले आहे.
==============================================
इस्लाममधील तलाक,बहुपत्नीत्व बेकायदेशीर ठरवा
आपल्या पतीने सातत्याने क्रुरतेची वर्तणुक केल्यानंतर बेकायदेशीररित्या घटस्फोट दिल्याचे शायरा बानु यांनी या याचिकेत म्हटले आहे. हा घटस्फोट तीनवेळा तलाक पद्धतीनुसार दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्राचा अभिप्राय मागविला आहे. या प्रकरणी न्यायाधीश अनिल आर दवे आणि ए के गोएल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
"मुस्लिम महिलांविरोधातील लैंगिक भेदभावाच्या धोरणाचे परीक्षण करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण याआधीच सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. विवाह व वारशासंदर्भातील कायदे हे धर्माचा भाग असू शकत नाहीत; शिवाय बदलत्या काळाबरोबर कायदेही बदलणे आवश्यक असल्याची न्यायालयाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर, तलाकसंदर्भातील तरतुदीची वैधता तपासण्यासाठी आंतरराष्ट्रीय करार व दस्तऐवज संदर्भासाठी अभ्यासले जाऊ शकतात,‘‘ असे सूत्रांनी सांगितले आहे.
==============================================
किर्ती चिदंबरम यांच्यावरून संसदेत गदारोळ
एअरसेल-मॅक्सिस करारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा किर्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अण्णा द्रमुकच्या (एआयएडीएमके) खासदारांनी आज (सोमवार) संसदेत गदारोळ घातला. या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दोनवेळा तहकूब करावे लागले.
या करारात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी किर्ती चिदंबरम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अण्णा द्रमुकच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर वेलमध्ये येत घोषणाबाजी केली. ‘वुई वॉन्ट ऍक्शन‘, ‘एनडीए सरकार टेक ऍक्शन‘ अशा घोषणा देण्यात आल्या. या गदारोळामुळे सुरवातीला कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने कामकाज दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आले.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार किर्ती चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस करारातून आर्थिक फायदा झाला होता. तसेच त्यांची जगभरात बांधकाम व्यावसायात गुंतवणूक आहे. या सर्व प्रकरणाची अंमलबजावणी संचलनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी अण्णा द्रमुकच्या खासदारांनी केली.
==============================================
बलात्काराचा प्रयत्न करणाऱयाचे कापले लिंग
भोपाळ (मध्य प्रदेश)- आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे महिलेने लिंग कापल्याची घटना उमारिया जिल्ह्यात घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (मंगळवार) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवार्दे गावात रविवारी (ता. 28) रात्री ही घटना घडली. रामकरण प्रजापती (वय 29) याने गावातील एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने धारदार चाकूने त्याचे लिंग कापले. यामुळे रामकरण रक्तबंबाळ झाला. उपचारासाठी तो स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला होता. यावेळी डॉक्टरांनी माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, रामकरणवर मनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
==============================================
संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात 10% जादा तरतूद
नवी दिल्ली : ‘समान हुद्दा समान निवृत्तीवेतन‘ (ओआरओपी) योजनेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 9.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. पुढील आर्थिक वर्षात (2016-17) संरक्षण क्षेत्रासाठी 2.58 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये संरक्षण क्षेत्राकरीता 2.33 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणात संरक्षण क्षेत्रातील तरतुदीविषयी कोणताही उल्लेख केलेला नाही. तिन्ही संरक्षण सेवांसाठी एकूण 78,586 कोटी रुपयांचा भांडवली खर्च येणार आहे.
पुढील आर्थिक वर्षासाठी नियोजित असलेल्या 19.78 लाख कोटी रुपयांच्या एकूण सरकारी भांडवली खर्चापैकी 17.2 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रासाठी खर्च केली जाणार आहे. यामध्ये संरक्षण बजेटसोबत पेन्शन बजेटचादेखील समावेश आहे. यंदा सर्वात जास्त वाढ पेन्शन बजेटसाठी आहे. पुढील वर्षात पेन्शनसाठी 82,332 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. मागील वर्षी हा आकडा 60,238 कोटी रुपये होता.
==============================================
महिषासूर चर्चेप्रकरणी टीव्ही निवेदिकेला शिवीगाळ
‘महिषासूराची जयंती साजरी करणे देशद्रोह मानला जाऊ शकतो का‘ या विषयावर टीव्हीवरील एका कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात येत होती. त्यावेळी दुर्गादेवीला ‘वेश्या‘ म्हटल्याबद्दल त्यांना विविध हिंदुत्ववादी गट, संघटनांचे समर्थक व कार्यकर्त्यांकडून एशियानेट न्यूज टीव्हीच्या सिंधू सूर्याकुमार यांच्या मोबाईलवर शिवीगाळ करणारे 2000 कॉल आल्याचे सूर्याकुमार यांनी सांगितले.
सिंधू यांचा मोबाईल क्रमांक काही व्हॉट्सऍप समूहांमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांना मोबाईलवरून शिवीगाळ करण्यास सुरवात झाली.
त्या म्हणाल्या, "मला प्रत्येक मिनिटाला कॉल येत आहेत. मी दुर्गेचा अवमान केल्याचा त्यांचा आरोप आहे. अनेकांनी मला वेश्या म्हटले. त्यातील अनेकजणांना काहीही माहीत नव्हते तरीही ते शिव्या देत होते."
याप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
==============================================
इशरत जहाँ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका
- नवी दिल्ली, दि. १ - इशरत जहाँ चकमक प्रकरणी गुजरात पोलिसांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून त्यावर सुनावणीस न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.वकील एम एल शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुंबई हल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हीड हेडली याने मुंबई न्यायालयात दिलेल्या माहितीच्या आधारे ही मागणी करण्यात आली आहे. इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची प्रशिक्षित हस्तक आणि सुसाईड बॉम्बर होती अशी माहिती डेव्हीड हेडलीने न्यायालयात दिली होती. याचिकेद्वारे पोलिसांना नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
सुरेश प्रभूंच्या तत्वनिष्ठ वागण्याने भारावले अमिताभ बच्चन
- मुंबई, दि. 1 - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची अमिताभ बच्चन यांनी जाहीर स्तुती केली असून इतकी साधनसुचिता आणि तत्व पाळणारी माणसं हल्ली कुठे बघायला मिळतात असं कौतुकही केलं आहे. निमित्त होतं रेल्वेमंत्र्याच्या बजेटसी संबंधित...बजेट सादर करताना सुरेश प्रभूंना हरीवंशराय बच्चन यांच्या कवितेचं वाचन करायचं होतं. प्रभूंनी त्यासाठी आधी अमिताभना फोन केला आणि त्यांची परवानगी घेतली. त्यानंतर त्यांनी त्या कवितेचं सादरीकरण केल्यानंतर पुन्हा बच्चन यांच्याकडे ही कविता मी व्यवस्थित सादर केली ना अशी पृच्छाही केली.प्रभूंनी हरीवंशराय यांची कविता निवडावी याबद्दल आधी मला सन्मान वाटला आणि त्यानंतर प्रभूंनी ज्या विनयाने वर्तणूक केली तिने तर मी खूपच भारावल्याचं अमिताभ यांनी नमूद केलं आहे. अमिताभ म्हणतात, आज के जमानें में कोई नही करता ऐसा..
इरॉम शर्मिला यांचे बेमुदत उपोषण सुरुच
- नवी दिल्ली, दि. १ - मणिपूरमधील मानवाधिकार कार्यकर्त्या इरॉम शर्मिला यांनी न्यायालयाने सुटका केल्यानंतर पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. सोमवारी दंडाधिकारी न्यायालयाने त्यांची न्यायलयीन कोठडीतून सुटका केली होती. शहीद मिनारजवळ इरॉम शर्मिला यांनी 'सेव्ह शर्मिला कमिटी'च्या कार्यकर्त्यांसोबत पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे.सेनादलांना विशेष अधिकार देणारा कायदा(अफ्सपा) रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 15 वर्षांपासून त्या बेमुदत उपोषण करत आहेत.जोपर्यंत माझं ध्येय पुर्ण होत नाही तोपर्यंत शहीद मिनारजवळ मी माझं आंदोलन सुरु ठेवणार आहे. सत्याचा विजय होईल यावर अजून माझा विश्वास आहे अशी प्रतिक्रिया इरॉम शर्मिला यांनी सुटका झाल्यानंतर दिली आहे.इंफाळमध्ये आसाम रायफल्सने 10 लोकांची हत्या केली होती त्यानंतर इरॉम शर्मिला यांनी नोव्हेंबर 2000 साली आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती. इरॉम शर्मिला यांना आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात बंदिस्त ठेवण्यात आलं होतं जिथे त्यांना जबरदस्तीने नाकाद्वारे अन्नपुरवठा केला जायचा . 19 ऑगस्ट 2014 ला सत्र न्यायालयाने इरॉम शर्मिला यांच्या सुटकेचे आदेश दिले होते मात्र काही दिवसांनी पुन्हा त्यांना अटक करण्यात आली होती.
पीएफच्या मुद्दलावर नाही, तर व्याजावर कर; पीपीएफ करमुक्तच
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) कोणताही कर लावण्यात आलेला नसून, केवळ कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) एक एप्रिल २०१६ नंतर जमा होणाऱ्या मुद्दलापैकी ६० टक्के रकमेचे व्याजच करपात्र असेल, असे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. एक एप्रिल २०१६ पूर्वी ईपीएफमध्ये जमा झालेल्या रकमेवर किंवा त्याच्या व्याजावर कोणताही कर लावण्यात येणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला. अर्थसंकल्प मांडतानाच त्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर कर लावण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा कर्मचारी वर्गाने आणि कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला. त्या पार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी अधिक नेमकेपणाने याबाबत माहिती दिली. एक एप्रिल २०१६ पर्यंत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेले मुद्दल आणि त्यावरील व्याज यावर कोणताही कर लावण्यात येणार नाही. मात्र, एक एप्रिलनंतर यामध्ये जो निधी जमा होईल त्याच्या ६० टक्के इतक्या भागावरील व्याजावर कर लावण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी एक एप्रिलनंतर भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढल्यास त्यावर कोणताही कर लावण्यात येणार नाही. फक्त यामध्ये एक एप्रिल २०१६ नंतर जितका निधी जमा झालेला असेल, त्याच्या ६० टक्के इतक्या भागावरील व्याजावर कर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर मात्र कसलाही कर आकारण्यात येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले.
==============================================भारत-पाक सामन्याचे भवितव्य अधांतरी, सुरक्षा पुरविण्यास हिमाचल सरकारची असमर्थता
येत्या १९ मार्चला धर्मशाला येथे होणारा भारत पाकिस्तानमधील ट्वेंटी-२० सामन्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने या सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था देण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे ऐनवेळी हा सामना कुठे घ्यायचा असा पेच बीसीसीआयपुढे उभा राहिला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र पाठवून या सामन्यासाठी सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली. दरम्यान, वीरभद्र सिंह यांनी ऐनवेळी घेतलेल्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. हा सामना धर्मशाला येथे होणार हे खूप दिवसांपूर्वीच निश्चित करण्यात आले होते. त्यावेळीच वीरभद्र सिंह यांनी त्यावर आक्षेप का नाही घेतला, असा प्रश्न अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला. सुमारे वर्षभरापूर्वीच ट्वेंटी-२० विश्वकरंडक सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींनी त्याप्रमाणे आगाऊ तिकीटही निश्चित केले आहे. असे असताना आता ऐनवेळी असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. ‘बीसीसीआय’ने हा सामना रद्द करावा किंवा त्याचे ठिकाण बदलावे, अशी मागणी करणारे पत्र वीरभद्र सिंह यांनी सोमवारीच बीसीसीआयकडे दिले आहे. आता बीसीसीआय काय भूमिका घेते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
==============================================मध्य रेल्वेच्या मायक्रोसाईटचे वेबपेज ‘अल कायदा’कडून हॅक
मध्य रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजासाठी तयार करण्यात आलेल्या मायक्रोसाईटचे एक वेबपेज दहशतवादी संघटना ‘अल कायदा’ने हॅक केल्याचे मंगळवारी दिसून आले. केंद्र सरकारच्या अखत्यारितील (डोमेन) वेबसाईटच हॅक झाल्यामुळे सरकारचे इंटरनेट कवच तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळमधील प्रशासकीय कामासाठी तयार करण्यात आलेले वेबपेज अल कायदाच्या हॅकर्सकडून हॅक करण्यात आले. या पेजवर “Message to Muslim People in India from AQIS (sic).” असा मजकूर एका छायाचित्रासह प्रसिद्ध करण्यात आला आहे. तेथील लिंकवर क्लिक केल्यानंतर दक्षिण आशियातील अल कायदाचा म्होरक्या मौलाना असीम उमर याने दिलेल्या संदेशावर वाचकाला घेऊन जाण्यात येते. भारतातील मुस्लिमांनी जागतिक जिहादामध्ये सक्रिय व्हावे आणि अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांचा बिमोड करावा, असे या संदेशात म्हटले आहे. मौलाना असीम उमर उत्तर प्रदेशमधील संभळचा राहणारा असून, गेल्यावर्षी त्याची दक्षिण आशियातील अल कायदाचा म्होरक्या म्हणून नियुक्ती करण्यात आली.
============================================================================================
No comments:
Post a Comment