Monday, 29 February 2016

नमस्कार लाईव्ह २९-०२-२०१६ सायंकाळचे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- टॅक्स रेट, काय स्वस्त, काय महाग आणि संपूर्ण अर्थसंकल्प 
२- बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं?
३- बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं?
४- बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला? 
५- १७ वर्षात पहिल्यांदाच बजेटमध्ये डिफेन्सचा अनुल्लेख 
६- या अर्थसंकल्पात नवे काहीही नाही: कॉंग्रेस  
७- गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- नरेंद्र मोदी 
८- हा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला - भाजप
९- महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु 
१०- चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार 
११- राहुल यांच्या विनंतीमुळे ब्रेल पेपर करमुक्त 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१२- विलेपार्ले; फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण 
१३- मालेगाव; कवटी फुटूनही विजयने केला अतिरेक्‍यांचा खात्मा 
१४- मी मोदींपेक्षा अधिक मोठा देशभक्त: केजरीवाल 
१५- डिझेल १ रुपये ४७ पैशांनी महागले, तर पेट्रोल ३ रुपये २ पैशांनी स्वस्त.
१६- उपोषणादरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या समाजसेविका ईरोम शर्मिला यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- नाशिक;  मनसेला भगदाड, माजी महापौर शिवसेनेत दाखल
१८- सोलापूर; भाकर देऊन जपूया माणसाची संवेदनशीलता 
१९- पुण्यात अवकाळी पाऊस  
२०- औरंगाबादच्या गणेश दुसारीयाने पटकाविला मराठवाडा श्री किताब 
२१- नांदेड डासमुक्‍तीचा पॅटर्न कोल्‍हापूर जिल्‍हयात राबविण्‍यात येणार 
२२- भ्रष्टाचार प्रकरणी माजी केंद्रीयमंत्री पी. के. थुंगुन यांना दिल्ली कोर्टाने साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली 
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
माणसाची सर्व कामे या सातपैकी कुठल्याही एका कारणांमुळे होतात, संधी, आरोग्य, नाईलाज, सवय, कारण, वासना, इच्छा
(राज तिडके, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल 
संपर्क- 9423785456, 7350625656 

**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.


====================================

विलेपार्ले; फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण


CCTV : फुकट वडापावसाठी शिवसैनिकाची दुकानदाराला बेदम मारहाण
विलेपार्ले शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाहीत, असे एकीकडे उद्धव ठाकरे म्हणत असतानाच विलेपार्ल्यातील युवासेना पदाधिकाऱ्याने एका दुकानदाराला मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 100 फुकट वडापावांसाठी या पदाधिकाऱ्याने दुकानादाराला बांबूने मारहण केली.
मुंबईच्या विलेपार्ले पश्चिम इथल्या तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर चेतन पटेल यांना युवासेना पदाधिकाऱ्याने मारहाण केली. सुनील महाडीक असे या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. गेल्या शनिवारी 26 फेब्रुवारीला हा प्रकार घडला. 
विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ‘साहेब क्रिकेट चषक’ आयोजित करण्यात आलं होतं. या सामन्यांसाठी तृप्ती फरसाण मार्टच्या मालकानं 100 वडापाव फुकट दिले नाहीत, म्हणून युवासेना पदाधिकाऱ्याने दुकानाच्या मॅनेजरला बेदम मारहाण केली.
 तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजरला कूपर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून सुनील महाडीकवर जुहू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 एकीकडे शिवसैनिकांची चांगली कामं माध्यमांना दिसत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंकडून होत असतांना शिवसैनिकांच्या दादागिरीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
====================================

नाशकात मनसेला भगदाड, माजी महापौर शिवसेनेत दाखल

नाशकात मनसेला भगदाड,  माजी महापौर शिवसेनेत दाखल
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेला बालेकिल्ल्यातच भगदाड पडलं आहे. कारण मनसेचे पहिला महापौर यतिन वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिक महापालिकेत सत्ता आली, त्यावेळी मनसेकडून महापौरपदाची माळ यतिन वाघ यांच्या गळ्यात घालण्यात आली. पण आता त्यांनीच मनसेला राम राम ठोकला आहे. 
यतिन वाघ यांच्यासह माजी स्थायी समिती अध्यक्ष आर.डी. धोंगडे आणि अरविंद शेळके यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. या तिघांनीही मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. 
ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीची नांदी असून आगामी महापालीका निवडणुकीत भाजपा विरुध्द शिवसेना अशीच मुख्य लढत असेल हेही या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया नाशिकमधल्या जेष्ठ पत्रकारांनी दिली आहे.
====================================

टॅक्स रेट, काय स्वस्त, काय महाग आणि संपूर्ण अर्थसंकल्प



काय काय महागणार?

महाग  – कार, सोने, तंबाखू, सिगरेट, गुटखा, हिरे, ब्रँडेड कपडे, विमा पॉलिसी, ब्युटी पार्लर, सिनेमा, केबल, मोबाईल बिल, प्रवास, हॉटेल, कोळसा आणि सर्व करपात्र सेवा

 काय स्वस्त?

कुकींग स्टोव्ह, गोबर गॅस
सॅनिटरी पॅड्स
इंटरनेट मॉडेम्स –
सेट टॉप बॉक्स –
सीसीटीव्ही कॅमेरे
न्यूज प्रिंट – स्वस्त
सोलर दिवे – स्वस्त
बजेटमधून महिलांना काय मिळालं?
देशातील 50 टक्के महिलांनाही आपल्या बजेटमध्ये जेटलींनी महत्वाचं स्थान दिल्याचं दिसतंय.
विशेषत: देशभरात चुलीवर स्वयंपाक केल्यानं धुरात राहून कायम महिलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो, त्यावर उपाय म्हणून देशभरातील घराघरात एलपीजी सिलेंडर पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
त्याशिवाय गोरगरीब कुटुंबासाठी 1 लाखाचा विमा आणि ज्येष्ठांसाठी अधिकच्या 30 हजाराची तरतूद सरकारनं केलीय.
बजेटमधून तरुणांना काय?

  • स्टॅन्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
  • तीन वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
  • नव्या उद्योजकांच्या कर्मचाऱ्यांचा 3 वर्षांचा पीएफ सरकार भरणार
  • 100 मॉडेल करिअर सेंटरद्वारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगार
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास 1500 सेंटरमधून राबवणार
  • कौशल्य विकास योजनेसाठी 1700 कोटी रुपयांची मदत
  • किमान 300 दिवस कामाचा नियम 240 दिवसांवर
  • मागासवर्गीयांना उद्योग स्थापन करण्यासाठी योगदान
  • कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर भर

    यंदाच्या अर्थव्यवस्थेत मोदी सरकारने स्वत:वरील ‘शेतकरीविरोधी सरकार’ हा डाग अटोकाट पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कृषी, सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी यंदा भरघोस तरतूद केल्याचं पाहायलं मिळालं आहे.

    • 5 वर्षांत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न
    • 3 वर्षांत 5 लाख एकर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली
    • नाबार्डकडून सिंचनासाठी 20 हजार कोटी राखीव निधी
    • भूजलपातळी वाढवण्यासाठी 60 हजार कोटी रुपये
    • बी-बियाणे तपासणीसाठी देशभरात 2 हजार प्रयोगशाळा
    • डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 हजार कोटी रुपये
    • हमीभावासाठी ऑनलाईन पद्धतीने मालविक्री
    • पशुधन संजीवन योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 4 योजना
    • 38 हजार 500 कोटी रुपयाचा निधी मनरेगावर खर्च करणार
    • 1 मे 2018 पर्यंत प्रत्येक खेड्यात वीज पुरवठ्याचं उद्दिष्ट
    • खतांची सबसिडी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा विचार
====================================

बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं

बजेटमधून नोकरदारांना काय मिळालं?
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 सालासाठी अर्थसंकल्प मांडला. या बजेटकडे नोकरदार वर्गाचं फार मोठ्या प्रमाणात आशा होत्या. मात्र, अरुण जेटली यांनी नोकरदारांच्या फारशा अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत.
यंदाही टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, छोट्या करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करामध्ये 3 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लहान करदात्यांना खूश करण्याचा मोदी सरकारनं प्रयत्न केला आहे. 
लहान करदात्यांना जरी खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रीमंतांना करकपात अजिबात करण्यात आलेली नाही. 1 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना 12 ते 15 टक्के सरचार्ज आकारण्यात आला आहे. दुसरीकडे घरभाडे कर सवलतीची मर्यादा 24 हजारावरुन 60 हजारावर करण्यात आली आहे. तर घरासाठी कर्ज घेण्याऱ्या कर्जदारांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 50 लाखांपर्यंत घरासाठी 35 लाख कर्ज घेतल्यास त्यामध्ये 50 हजार व्याज वजावट करण्यात येणार आहे.
====================================

महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु

महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरचा पुढाकार, #PositionOfStrength अभियान सुरु
नवी दिल्ली : ऑनलाईन जग असो वा ऑफलाईन… दोन्ही ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती घट्ट रुजली असल्याचं एका अभ्यासावरुन लक्षात आल्यावर ट्विटरने एक अनोखं अभियान सुरु केलं आहे. महिलांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी ट्विटरने #PositionOfStrength अभियान सुरु केलं आहे. 
ऑस्ट्रेलिया आणि आयरलँडमध्ये या अभियानाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे. आता हे अभियान भारतातही दाखल झालं आहे. ऑनलाईन व्यासपीठावरील लैंगिक भेदभाव कमी करण्याचं ध्येय या अभियानाने डोळ्यासमोर ठेवलं आहे. शिवाय, महिला नेत्यांच्या दुसऱ्या पिढीला प्रभावशाली बनवण्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या अभियानासमोर आहे.
====================================

बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं

बजेटमधून शेतकऱ्यांना काय मिळालं?
नवी दिल्ली : यंदा देशाचा अर्थसंकल्प हा शेती आणि ग्रामिण भागासाठी महत्त्वाचा होता…सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला नऊ सुत्री अर्थसंकल्प सादर केला..ज्या शेती आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला…या अर्थसंकल्पात शेतीला काय मिळालं पाहुयात…
देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न येत्या 5 वर्षात दुपटीनं वाढवण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय..सोबत जलसंधारण, मृदसंधारणावर यंदा विशेष भर देण्यात आलाय… 
देशातील जास्तित जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी सध्या सुरु असलेल्या 89 प्रकल्पांपैकी 23 प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार आहेत..सोबत देशात वर्षभरात 5 लाख शेततळे उभे करण्यात येतील..
पंतप्रधान सॉईल हेल्थ कार्ड योजनेंतर्गत देशभरातील 2 हजार खत दुकानात माती परिक्षणाची सोय करण्यात येणार आहे… खत कंपन्यांना शहरातील जैव कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे…
सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना
आणि सेंद्रीय शेतमालाच्या विक्रीसाठी ऑर्गेनिक व्हॅल्यू चैन डेव्हलपमेंट योजना लागू केली जाणार आहे…
या अर्थसंकल्पात कडधान्याचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आलाय…यासाठी देशभरातील 622 जिल्ह्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आलंय..
शेतीतील प्रक्रीया उद्योगाचं महत्त्व ओळखून देशभरात फूड प्रोसेसिंग उद्योगाला प्रोत्साहन दिलं जाणार आहे…या क्षेत्रात 100 टक्के परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्यात आलीय…
====================================

चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार

चिटफंड कंपन्यांना चाप, नवा कायदा आणणार
नवी दिल्ली: देशभरात अनेक कंपन्यांनी सामान्यांना दुप्पट तिप्पट पैसे देण्याच्या नावाखाली कोट्यवधींची वसुली केली. त्यामुळे देशभरात करोडो रुपयांचा चिटफंड घोटाळा झाला आहे. 
अनेक कंपन्यांनी चिटफंडच्या माध्यमातून सामान्यांना गंडा घातला आहे. मात्र यापुढे अशा घोटाळेबाजांवर कडक करावाई करण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. कारण चिटफंड घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी नवा कायदा आणणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. 
त्यामुळे शारदा चिटफंट, पर्ल्स, समृध्द जीवन यासारख्या कंपन्यांवर कारवाई करता येण्याचे संकेत आहेत. छोट्या गुंतवणुकदारांची फसवणूक करणाऱ्यांना यामुळे चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.
====================================

बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला?

बजेटमधून तरुणांना काय फायदा झाला?
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटलींनी केंद्रीय बजेट आज लोकसभेत सादर केलं. देशाच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग मानल्या जाणाऱ्या तरुणांसाठी जेटलींनी काय दिलं, याचा लेखाजोखा

  • स्टॅन्ड अप इंडियासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद
  • तीन वर्षात 1 कोटी तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
  • नव्या उद्योजकांच्या कर्मचाऱ्यांचा 3 वर्षांचा पीएफ सरकार भरणार
  • 100 मॉडेल करिअर सेंटरद्वारे 3.5 कोटी तरुणांसाठी रोजगार
  • प्रधानमंत्री कौशल्य विकास 1500 सेंटरमधून राबवणार
  • कौशल्य विकास योजनेसाठी 1700 कोटी रुपयांची मदत
  • किमान 300 दिवस कामाचा नियम 240 दिवसांवर
  • मागासवर्गीयांना उद्योग स्थापन करण्यासाठी योगदान
 ====================================

१७ वर्षात पहिल्यांदाच बजेटमध्ये डिफेन्सचा अनुल्लेख


  • नवी दिल्ली, दि. २९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर करताना संरक्षण क्षेत्र वगळता सर्व क्षेत्रांच्या तरतुदींची माहिती दिली. अर्थसंकल्पात देशाच्या लष्करी खर्चाची माहिती देणे टाळल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 
    अर्थसंकल्पात देशाच्या संरक्षण खर्चासाठी केल्या जाणा-या तरतुदीची माहिती दिली जाते. १७ वर्षात पहिल्यांदाच अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीची माहिती देण्यात आलेली नाही असे संरक्षण तज्ञ निवृत्त ब्रिगेडीयर गुरमीत कानवाल यांनी सांगितले. 
    मागच्या वर्षीपेक्षा २०१६-१७ मध्ये लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी कमी निधीची तरतुद केल्याची शक्यता आहे कारण संरक्षण क्षेत्रातील निवृत्ती वेतनावर जास्त खर्च होणार आहे. २०१५-१६ मध्ये जेटली यांनी संरक्षण क्षेत्रासाठी २,४६,७२७ कोटींची तरतूद केली होती. २०१४-१५ पेक्षा ७.७ टक्क्यांनी संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आली होती. 
    चीनची वाढती लष्करी ताकत लक्षात घेता भारताने संरक्षणावर जीडीपीच्या तीन टक्के खर्च केला पाहिजे असे तज्ञ सांगतात. २०१५-१६ मध्ये एकूण सरकारी खर्चाच्या १३.८८ टक्के लष्करी खर्चासाठी तरतूद करण्यात आली होती. 
    पायाभूत सुविधांचा फायदा 
    आकडेवारीचा उल्लेख केला नसला, तरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या भरीव तरतुदींचा फायदा संरक्षण क्षेत्राला होईल, असे दिसते. गेल्या दोन वर्षांमध्ये रस्त्यांची बांधणी आणि लोहमार्ग वृद्धी वेगाने होत असल्याचे, अर्थमंत्र्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वहनमंत्री नितीन गडकरी आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे नाव घेऊन सांगितले. सीमावर्ती राज्ये त्याचप्रमाणे, इशान्य भारतामध्ये या वेगाने बांधल्या जाणा-या रस्त्यांचा फायदा भारतीय सैन्याला नक्कीच होणार आहे. विशेषत: चीन रस्त्यांच्या माध्यमांतून त्यांच्या सीमावर्ती भागामध्ये व्यवस्थित पोहोचला असताना, भारताला असे प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच या पायाभूत सुविधा अप्रत्यक्षरीत्या संरक्षण क्षेत्राला फायदेशीर ठरतील.
====================================
 या अर्थसंकल्पात नवे काहीही नाही: कॉंग्रेस 
केंद्र सरकारतर्फे आज (सोमवार) मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून कृषी क्षेत्र व रोजगार निर्मितीच्या आव्हानांसंदर्भात त्वरित उपाय दिसत नसल्याची टीका कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली आहे. 
"हा भविष्याभिमुख अर्थसंकल्प आहे. मात्र दुदैवाने वर्तमानात ज्या उपायांची आवश्‍यकता होती; त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सध्या रोजगार निर्मिती व कृषी क्षेत्रामधील आव्हाने सर्वांत गंभीर आहेत. मात्र याविषयी अर्थसंकल्पात काहीही नाही,‘‘ असे कॉंग्रेस नेते कमल नाथ यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही सरकारतर्फे मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये नवे काहीही नसल्याची टीका केली आहे.
====================================
गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरिबांना दिलासा देणारा आहे. या अर्थसंकल्पात घरांवर भर देण्यात आल्यामुळे प्रत्येकाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. जेटली यांचे अभिनंदन करताना मोदी म्हणाले, ‘अर्थसंकल्पाचा मुख्य ध्येय म्हणजे गाव, गरीब, महिला व युवावर्ग आहे. गरिबांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. देशातील युवकांना रोजगार मिळवूण देण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे. देशातील युवकांची शक्ती चांगल्या दिशेने वळविण्याचा हा एक प्रयत्न आहेत.‘ ‘देशात गरिबीच्या नावावर राजकारण केले जात आहे. एखादी महिला चुलीवर स्वयंपाक करते तेव्हा तिच्या शरिरामध्ये 400 सिगारेट एवढा धूर जात आहे. यामुळे आमचे सरकार दीड कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देणार आहे. शिवाय, अर्थसंकल्पामध्ये आरोग्य सेवेवर जास्त भर देण्यात आला आहे. देशवासीयांचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असून ते नक्कीच होईल, असे मोदी म्हणाले.
====================================
पुण्यात अवकाळी पाऊस 
पुणे : शहराच्या विविध भागांत अवकाळी पावसाने आज (सोमवार) हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांत मराठवाडा, नाशिक, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाबरोबरच गारपीटही झाली आहे. 
पुणे शहराच्या विविध भागांमध्ये आज दुपारी 4.30 च्या सुमारास पाऊस पडला. सिंहगड रस्ता परिसर, बिबवेवाडी भागात पावसाचा जोर जास्त होता. कोथरुडसह मध्यवर्ती पुण्यातही पाऊस पडला. बाजीराव रस्त्यावर अनेक गाड्या घसरल्याचेही चित्र दिसून आले. 
पावसाला पोषक वातावरणामुळे राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यात उद्याही (मंगळवार), तर मध्य महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
====================================
राहुल यांच्या विनंतीमुळे ब्रेल पेपर करमुक्त
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) संसदेमध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या "ब्रेल पेपर‘वरील आयात कर माफ करण्याची घोषणा केली. ब्रेल पेपरवरील कर माफ करण्याची विनंती कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यातर्फे राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला करण्यात आली होती. सरकारने ही विनंती मान्य करत हा कर माफ केला आहे. 
बंगळुरमधील माऊंट कार्मेल महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमात शिकत असलेल्या चंदना चंद्रशेखरने यासंदर्भात गांधी यांना पत्र लिहिले होते. चंदना ही अंध आहे. या पत्रामध्ये ब्रेल पेपरवरील आयात करामुळे अंध विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचे स्पष्ट करत, चंदनाने हा कर रद्द करण्यासंदर्भात प्रयत्न करण्याची विनंती केली होती. या पत्राची योग्य दखल घेत राहुल यांच्याकडून वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर, राहुल यांच्याकडून करण्यात आलेल्या विनंतीचा मान ठेवत सरकारकडूनही ब्रेल पेपरवरील कर रद्द करण्यात आला आहे. 
====================================
सोलापूर; भाकर देऊन जपूया माणसाची संवेदनशीलता


सोलापूर : धकाधकीच्या जीवनात माणसातील संवेदनशीलता हरवून गेली आहे. उपाशी माणसाला एखादी भाकर देऊन आपली संवदेशनशीलता जपता येईल का, याच विचाराने पुण्यातील तरुणांनी एकत्र येऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या "रोटी डे‘ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या 1 मार्च रोजी ‘रोटी डे‘ साजरा होणार असून, हजारो नेटीझन यात सहभागी होणार आहेत. 
फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून ऑनलाइन असणाऱ्या आजच्या तरुणांमध्येही संवेदनशीलता आहे हे ‘रोटी डे‘च्या निमित्ताने दिसून येत आहे. आपल्या सगळ्यांमध्ये असलेल्या संवेदनशील कोपऱ्यात एक खूप चांगला माणूस दडला आहे. आपल्यातल्या चांगल्या माणसाची ओळख जर प्रत्येकाला झाली, तर कोणीच भुकेला राहणार नाही, असे "रोटी डे‘साठी पुढाकार घेतलेल्या अभिनेता अमित कल्याणकर यांचे म्हणणे आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकातील संवेदनशील माणूस जगा होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. 
1 मार्च रोजी ‘रोटी डे‘च्या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या परिसरातील गोरगरिबांना, भटक्‍यांना भाजी-भाकरी व इतर खाद्यपदार्थ द्या. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा. त्यांच्यासोबत सेल्फी काढून आपला अनुभव आणि क्षणचित्रे फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि इतर सोशल मीडियावर #rotiday हा हॅशटॅग वापरून शेअर करा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
====================================
 हा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला - भाजप

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (सोमवार) संसदेमध्ये मांडलेला राष्ट्रीय अर्थसंकल्प हा प्रागतिक व दूरदृष्टी असलेला असल्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने (भाजप) व्यक्त केली. शेतकरी व समाजामधील दुर्बल घटकांना प्राधान्य दिलेल्या या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून तरुणांच्या सक्षमीकरणासही हातभार लागणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. 
"हा अर्थसंकल्प सर्वांकरिता आहे. बंदरे, रेल्वे, विमानतळ यांसारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, आरोग्य क्षेत्रामध्ये गोरगरीबांच्या उपचारार्थ येणाऱ्या खर्चापैकी एक लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. हा एक प्रागतिक व दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प आहे,‘‘ असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले. 
जावडेकर यांच्यासह मुख्तार अब्बास नक्वी, जे पी नड्डा या केंद्रीय मंत्र्यांनीही या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.
====================================
कवटी फुटूनही विजयने केला अतिरेक्‍यांचा खात्मा

द्यानेच्या वीरपुत्राच्या बलिदानातून युवकांना प्रेरणा, मात्र कुटुंबासाठी अनेक स्वप्ने राहिली अधुरी

मालेगाव - बांधकामावरील दगड-विटा डोक्‍यावर घेऊन विजयला वाढविले. प्रतिकूल परिस्थितीत संकटांचा सामना करत जिद्दीने तो सैन्यात भरती झाला. त्याच्या रूपात सुखाचे दिवस दिसू लागले होते, पण नियतीला ते मान्य नव्हते. भारतमातेचे रक्षण करताना तो शहीद झाला. अतिरेक्‍यांशी लढताना त्याने चाळीस जवानांचे प्राण वाचविले. विजय शहीद झाला असला, तरी नावाप्रमाणेच त्याच्या कर्तबगारीने अनेकांच्या मनावर त्याने ‘विजय’ मिळविला. शहीद विजयची आई असल्याचा मला अभिमान आहे, अशा भावना वीरमाता इंदूबाई पवार यांनी व्यक्त केल्या.
मालेगावच्या वेशीवर असलेले द्याने हे छोटंसं गाव. हद्दवाढीनंतर त्याचा शहरात समावेश झाला. येथील गंगाधर पवार पत्नी, मुलगी व तीन मुलांसह राहतात. पती-पत्नीने बांधकामावर मजुरी करून मुलांच्या शिक्षणावर भर दिला. मोठा विजय बी.ए. झाला. मात्र, नोकरी न मिळाल्याने ते सैन्यभरतीला गेले. नागपूर येथे १९९३ ला ‘सीआरपीएफ’मध्ये ते भरती झाले. सुरवातीपासूनच त्यांची सेवा जम्मू-काश्‍मीरमध्ये विविध भागांत होती. डिसेंबर २००० मध्ये त्यांचा ज्योती यांच्याशी विवाह झाला. 
दोडा (जम्मू-काश्‍मीर) कॅम्पमध्ये विजय २००१ मध्ये कार्यरत होते. सहा सप्टेंबर २००१ ला कॅम्पच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते तैनात होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अतिरेक्‍यांचा ट्रक प्रवेशद्वारात घुसला. ट्रकमध्ये स्फोटके लावलेल्या विटा होत्या. ट्रकच्या मागे एका वाहनात सशस्त्र अतिरेकी होते. अतिरेक्‍यांची वाहने प्रवेशद्वारातून घुसताच विजय यांच्यासह सहकाऱ्यांनी रोखले. अतिरेक्‍यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्यास जवानांनी प्रत्युत्तर दिले. अतिरेक्‍यांना कंठस्नान घातल्यानंतर विजय यांच्यासह चौघे जवान शहीद झाले.
====================================
मी मोदींपेक्षा अधिक मोठा देशभक्त: केजरीवाल

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त असल्याचे दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आओप) मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) खऱ्या देशद्रोह्यांना अटक करुन भारतीय जनता पक्षास (भाजप) जम्मु काश्‍मीरमधील मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षास (पीडीपी) दुखवायचे नसल्याची टीका केजरीवाल यांनी यावेळी केली. 
"माझ्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी दलित, गरीब आणि मागासलेल्या वर्गासाठी संघर्ष करत आहे; म्हणूनच मी भाजपसाठी देशद्रोही ठरलो आहे. मात्र माझा आवाज दडपता येणार नाही. मी त्यांच्यासाठी लढतच राहिन. मी मोदीजींपेक्षा मोठा देशभक्त आहे,‘‘ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. 
जेएनयुमध्ये देशहद्रोही घोषणा देणारे हे काश्‍मिरी असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. ""या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यास मुफ्तींना राग येईल या भीतीने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सीमारेषेवर आपले जवान रोज हुतात्मा होत आहेत आणि मोदी काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करावयाचे असल्याचे देशद्रोही घटकांना पाठिंबा देत आहेत,‘‘ असे केजरीवाल म्हणाले.
====================================
औरंगाबादच्या गणेश दुसारीयाने पटकाविला मराठवाडा श्री किताब 


नांदेड,दि.२९- येथील नृसिंह विद्यामंदिराच्या मैदानात काल रविवारी (दि.२८) मराठवाडा श्री ही शरिरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आली. पाच गटातील विजेत्यांशी झालेल्या अटीतटीच्या झुंजीत औरंगाबादच्या गणेश दुसारियाने आपल्या गटाच्या विजेतेपदाबरोबरच अंतिम विजेतेपद पटकावून सलग दुस-यांदा मराठवाडा श्रीचा बहुमान पटकाविला.
कबिर क्रीडा मंडळ व सुरेशदादा गायकवाड मित्रमंडळाच्यावतीने आयोजित 'मराठवाडा श्री' या शरिरसौष्ठव स्पर्धेचे तिसरे वर्ष होते. स्पधेचे उद़घाटक मनपा आयुक्त सुशिल खोडवेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेशदादा गायकवाडमनिष कावळेप्रा. दत्ताहरी धोतरेसामाजिक कार्यकर्ते फारुखभाईआरएमआर कंपनीचे रणदीपविठ्ठल पाटील डकरवि गायकवाडसुरेश मानधने आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा श्री स्पर्धेचे संयोजक साहेबराव सोनकांबळे यांनी केले.
            स्पर्धेचा अंतिम निकाल असा आहे, गट क्र.१ - प्रथम - प्रदीप सरगम (जालना)द्वितीय -कृष्णा पुंड (नांदेड)तृतीय-तुकाराम कल्याणकरचतुर्थ असिफ बेग (औरंगाबाद)गट २ - प्रथम - मो. मुजीब (औरंगाबाद)द्वितीय बुटासिंग (नांदेड)तृतीय सनीपारचा (जालना)गट 3 - प्रथम-शोयेब खान(नांदेड)द्वितीय- मो. जैद (औरंगाबाद)तृतीयःमोईज अहमद (नांदेड)चतुर्थःशुभम गायकवाड (जालना). गट-4 साठी औरंगाबाद येथील चौघेही स्पर्धकांना विजेतेपद मिळाले. यामध्ये गणेश दुसारीया प्रथम आला तर त्याच्यासह द्वितीय-अलताफ खानतृतीय-हसन अब्बासचतुर्थ-शेख जुनेद. गट5- प्रथम- वैभव मंकेवार (जालना)द्वितीय- नंदु रेड्डी (औरंगाबाद)तृतीय राजेश पाटील (जालना)चतुर्थः सिध्दीकी इकबाल (औरंगाबाद).
            या स्पर्धेचे सूत्रसंचालन संदिप धोंडू पाटील यांनी केले तर पंच म्हणून राज परदेसीप्रा. इम्तियाजखान तसेच दीपकसिंह रावतअब्दुल माजीद,महमद अजहर हुसैनरमेश भोसले काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  श्याम सावंतविजय सरपातेराजू जोंधळे, माधव चित्तेभीमराव धम्माकरराहूर वडजकरसिध्दार्थ जावळेअमोल मोरेशेख वसीमशेख बासीनबंटी सूर्यवंशीरामा चितोरेमारोती शिंदेअरुण कांबळे आदिंनी पुढाकार घेतला.
====================================
नांदेड डासमुक्‍तीचा पॅटर्न कोल्‍हापूर जिल्‍हयात राबविण्‍यात येणार 

नांदेड,29- टेंभूर्णी गावाने निर्माण केलेला डासमुक्‍तीचा नांदेड पॅटर्न आता कोल्‍हापूर जिल्‍हयाने राबविण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याची माहिती कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्‍या पाणी व स्‍वच्‍छता विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी दिली आहे.  
      कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेचे अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्‍तार अधिकारी व ग्रामसेवक यानी नांदेड‍ जिल्‍हयामधील डासमुक्‍त अभियानातील गावांची पाहणी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी केली, त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या टिमला संजय भोसीकर व गट विकास अधिकारी किरण सायमोते यांनी माहिती दिली. यावेळी कोल्‍हापूर जिल्‍हा परिषदेच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्‍यासह जिल्‍हा कार्यक्रम व्‍यवस्‍थापक विजय पाटील, गट विकास अधिकारी अप्‍पासाहेब पवार, श्रीमती पवार, डॉ. बाबासाहेब पवार, स्‍वच्‍छता तज्ञ संतोष घाटगे, विस्‍तार अधिकारी कदम, ग्रामसेवक सागर पाटील यांची उ‍पस्थिती होती.
      पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, नांदेड जिल्‍हयाचा डासमुक्‍तीचा उपक्रम स्‍तुत्‍य असून यामुळे गटारावर होणार खर्च तसेच आरोग्‍यावरील होणा-या खर्चामध्‍ये बचत होण्यास मदत होणार आहे. शिवाय ग्रामस्‍थांच्या आरोग्‍यमानातही सुधारणा होणार आहे. आता राजर्षी शाहु महाराजांच्‍या भूमित ही चळवळ ऊभी केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.
विशेषतः चौदाव्‍या वित्‍त आयोगाचा निधी आणि नरेगा मधून कोल्‍हापूर जिल्‍हयात सांडपाण्‍याचं नियोजन नांदेड पॅटर्न प्रमाणे राबविण्‍यात येणार असल्‍याचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी सांगीतले. लोहा तालुक्‍यातील अंबेसांगवी, कंधार तालुक्‍यातील चिखलभोसी व पानभोसी गावातील मॅजिक पिटचा या टिमने अभ्‍यास केला. यावेळी मन्‍मथ नाईकवाडे, शेख बाबू साहेब, डॉ. बालाजी पेनुरकर, गजानन नाईकवाडे, माधवराव कांबळे, विश्‍वांबर डूबूकवाड, प्रल्‍हाद आगबोटे, शिवराज पाटील गौंड, नागोराव नाईकवाडे, गंगाधर जोंधळे, लक्ष्‍मण नाईकवाडे, हरीभाऊ नाईकवाडे, प्रकाश नाईकवाडे आदींची उपस्थिती होती. 
====================================

नमस्कार लाईव्ह २९-०२-२०१६चे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- शेरो शायरीने बजेट सादरीकरण 
२- रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत
३- गतवर्षीच्या बजेटमधील फंड अजूनही वापराविना 
४- राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल 
५- ...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन 
६- बजेटवर मोदींची छाप 
७- अर्थसंकल्पात कर कायदे सुलभ व्हावेत 
८- शेतकरी, गुंतवणूकदारांना खूष करण्याचे आव्हान 
९- गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- राज्याला भरीव तरतुदीची अपेक्षा 
११- भाजपकडून स्मृती इराणींची पाठराखण 
१२- पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर 
१३- विविध मंत्रालयाकडून लागूू करण्यात आलेले 13 कर रद्द करण्याची शिफारस. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपूर; ‘माउंट एलब्रुस’ सर करणारा प्रणय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- अँड दि ऑस्कर गोज टू... 
१६- भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही 
१७- बाजारावर राहिले ‘अस्वला’चेच नियंत्रण .. 
१८- लिओनार्डो सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर लार्सन अभिनेत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- अर्धापूर तालुक्यात दोन अपघातात पाचजण जखमी 
२०- श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयाची जागा महापालिकेस देण्यास शीख समाजाचा विरोध 
२१- महिलांच्या सुरक्षेसाठी आता महिला बीट मार्शल 
२२- भोकर; वादळामुळे उडाले छप्पर; तान्हुल्यासह बाळंतीण उघड्यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जमीर शेख, रामेश्वर भाले, अर्जुन सोनटक्के, शिवाजी देशमुख 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनुष्यात असलेल्या गुणांपैकी त्याच्यातील साहस सर्वात महत्वाचे कारण सर्व गुणांची ते जबाबदारी घेते
(सदाशिव सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


=========================================

रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत

रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत!
नवी दिल्ली: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोनचं बुकींग करणाऱ्या 30 हजार लोकांचे पैसे परत केले आहेत. कंपनीनं आतापर्यंत फक्त 30000 स्मार्टफोन ग्राहकांचे पैसे परत केले असून आतापर्यंत या फोनसाठी 7 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.
एबीपी न्यूजशी बातचीत करताना कंपनीचे संचालकांनी पैसे परत केल्याचे कागदपत्र दाखविले. नोएडात असणाऱ्या रिंगिंग बेल्सची अंमलबजावणी संचनालय (ईडी)नेही चौकशी केली होती. तर हा मोठा घोटाळ असल्याचा आरोपही काही खासदारांनी केला होता. 
19 फेब्रुवारीला कंपनीनं फ्रीडम 251 च्या पहिल्या टप्प्यातील बुकींग बंद केली होती. आतापर्यंत ७ कोटी लोकांनी या फोनसाठी नोंदणी केल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीच्या संचालकांनी असा दावा केला आहे की, आर्थिक बाबींचा विचार करता, एवढ्या कमी किंमतीतही स्मार्टफोन मिळू शकतो आणि भारतात हा फोन तयार करुन याचे आयात मूल्यही कमी करु शकतो. 
आतापर्यंत 30 हजार जणांना पैसे परत करण्यात आले असून याशिवाय इतर लोकांचे पैस घेण्यात आलेले नाही. मात्र, 25 लाख नोंदणी केलेल्या यूजर्सनाही लवकरच पैसे परत करण्यात येणार आहे. असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कारण की, कंपनीनं आता ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ यावर काम सुरु केलं आहे.
 दूरसंचार मंत्रालयानं संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय कमिटी तयार केली असून कंपनी आपलं काम चोख बजावतेय का यावर लक्ष ठेवते आहे. 
दरम्यान, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं की, ‘कोणत्याही परिस्थितीत रिंगिंग बेल्सला पैसे घेऊन पळून जाऊ दिलं जाणार नाही. ग्राहकांची कोणतीही फसवणूक केली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. कंपनीचे पैसे हे एस्क्रो खात्यात ठेवले जातील. जेणेकरुन  जेव्हा कंपनी आपल्या स्मार्टफोनची डिलिव्हरी करेल त्याचवेळी पैसे दिले जातील.’
=========================================

शेरो शायरीने बजेट सादरीकरण

LIVE - शेरो शायरीने बजेट सादरी करणाला सुरुवात
महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश – जेटली
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारताची इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे.
– जीडीपी 7.6 टक्के एवढी वाढला आहे ..
– महागाई – 5.4 टक्के एवढी कमी झाली आहे..
– फॉरेन गंगाजळीत चांगलीच वाढ झाली आहे.
– अस्मानी आणि सुलतानी संकटं असतानाही आमचं सरकार चांगलं काम करतंय.
– विदेशी मार्केटमधे मंदी असल्यानं देशातील मार्केटमधेच वाढ करण्यावर आमचा भर आहे–
कश्ती चलाने वालोंने जब हार के दी पत्वार हमें, लहर तुफान मिले, फिर भी दिखाया है हमने, और फिर ये दिखा देंगे सबको की हालात मै आता है दरिया करना पार हमें – जेटली
=========================================

अँड दि ऑस्कर गोज टू...

अँड दि ऑस्कर गोज टू...
कॅलिफोर्निया : ऑस्करची बाहुली पटकावणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न सत्यात उतरवणं मात्र तितकं सोपं नाही. जगभरातले अनेक दिग्गज त्यांच्या उत्तमोत्तम कलाकृती घेऊन या स्पर्धेत सहभागी होत असतात, त्यामुळे स्पर्धा अर्थातच तगडी असते.
priyanka chopra
यावर्षीही असंच चित्र पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या जॉनरमधले आठ जबरदस्त सिनेमे यावर्षी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. जसं ऑस्कर पुरस्कार मिळण्याचं भाग्य फार कमी कलावंताना लाभतं, त्याचप्रमाणे ऑस्कर प्रदान करण्याची संधी देखील मोजक्याच कलाकारांना मिळते.
Oscar1
यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यासाठी बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियंका चोप्राला आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे ऑस्करच्या स्पर्धेत नसलो तरीही भारतीयांच्या नजरा ऑस्करकडे लागल्या आहेत.
Oscar
सर्वोत्कृष्ट अभिनेता : लिओनार्डो डी कॅप्रियो (द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ब्राय लारसन (रुम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अलेजांद्रो इनार्नितू ( द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत : रायटिंग्ज ऑन द वॉल
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर (मूळ संगीत) : एनीयो मॉरिकोनी (द हेटफुल एट)
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट : हंगेरीचा ‘सन ऑफ सोल’
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : स्टटरर
सर्वोत्कृष्ट फीचर डॉक्युमेंट्री : अॅमी
सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री : गर्ल इन द रिव्हर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पाईज)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : इन्साईड आऊट
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : बिअर स्टोरी
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : अँड्र्यू जॅक्सन, टॉम वूड, डॅन ऑलिव्हर, अँडी विल्यम्स (एक्स मेकिना)
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण : ख्रिस जेन्किन्स (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन : मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट संकलन : मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : एमॅन्युअल ल्युबेझ्की ( द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल : लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम : जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अॅलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
=========================================

भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही

भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही !
ढाका: ट्वेन्टी20 क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांची बरसात, हे गणितच बनलंय. पण शनिवारी आशिया चषकातला भारत-पाकिस्तान सामना त्याला अपवाद ठरला. 
मिरपूरच्या ‘शेर ए बांगला’ स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत एकाही फलंदाजानं षटकार ठोकला नाही. या लो स्कोअरींग गेममध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांनी मिळून आठ तर भारतीय फलंदाजांनी दहा असे एकूण अठराच चौकार लगावले. 
एखाद्या ट्वेन्टी20 सामन्यात एकही षटकार नोंदवला न जाण्याची ही सहावीच वेळ ठरली. तर भारतासाठी हा षटकाराविना पहिलाच सामना ठरला. 
मिरपूरच्या मैदानात उंच फटके खेळणं किती अवघड होतं आणि विराटची 49 धावांची खेळी का महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करायला ही एवढीच आकडेवारी पुरेशी ठरावी. 
शनिवारच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला 83 धावांतच रोखलं होतं आणि मग विराट कोहलीच्या झुंजार फलंदाजीमुळं टीम इंडियानं पाच विकेट्सनी संघर्षमय विजय मिळवला होता.
=========================================

राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नवी दिल्ली: हैदराबादमधील सरुर नगर पोलीस ठाण्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
सीताराम येचुरी, केसी त्यागी, आनंद शर्मा, डी. राजा यांच्यासह उमर खालिद आणि कन्हैया कुमार यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयूमधील घोषणाबाजी यानंतर हे प्रकरण जास्तच चिघळलं. संसदेत याच मुद्द्यांवर जोरदार चर्चाही झाली. सध्या, देशविरोधी घोषणाबाजी देण्याचा आरोप असणारे जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बान आणि कन्हैया कुमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या या तिघांची चौकशी सुरु आहे. 
जनार्दन गौड नामक एका व्यक्तीनं मागील आठवड्यात सरुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. की, यांनी देशद्रोह केला असून यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा. जेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला त्यावेळी जनार्दन गौड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर एल बी नगर कोर्टानं कलम 156 (3) च्या अतंर्गत पोलिसांना गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलमानुसार 124, 124 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
=========================================

...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन

...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना दिवंगत हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळींचा भाषणादरम्यान उल्लेख केला होता. त्यानंतर आज बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुरेश प्रभूंचे आभार मानले आहेत. 
“रेल्वे बजेटमध्ये हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी उद्धृत करण्यापूर्वी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली. रेल्वे बजेट संपल्यावर कवितेच्या ओळी सादर करण्यात काही चूक झाली नाही ना, हे ही विचारलं. आजच्या काळात कुणीच हे करत नाही.” असे फेसबुकवर पोस्ट लिहून अमिताभ बच्चन यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक केलं आहे.
=========================================

बजेटवर मोदींची छाप


  • ‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली गडद छाप असेल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधानांचे राजकीय आणि आर्थिक अग्रक्रम अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होतच असतात व ते रास्तही आहे. पण अर्थसंकल्प ही व्यक्तिश: आपली परीक्षा असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.
    आता माझ्या सरकारला दोन वर्षे झाली आहेत व बराच अनुभव आता माझ्या गाठीशी आला असल्याने या वेळच्या माझ्या अर्थसंकल्पाकडे देशवासीयांनी जरा अधिक गांभीर्याने पाहावे, असेच मोदींनी यातून सूचित केले आहे. देशाच्या वित्तीय स्थितीचे सर्व बारकावे आता मोदींच्या पल्ल्यात आले आहेत व परिस्थितीवर त्यांची घट्ट पकड बसली आहे, हेही त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते.
    कर संकलन वाढविण्यासाठी आणि आगामी काळात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होण्याच्या अनुषंगाने सेवा कराच्या मूल्यात सध्याच्या १४.५ टक्क्यांवरून १६ टक्के अशी वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली करतील, अशी दाट शक्यता आहे. यामुळे स्वाभाविकच भाववाढ होईल अशी अपेक्षा आहे.
    एकीकडे सेवा कराचा दर वाढविण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सध्या सेवा कराची मर्यादा वाढविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकाला सेवा कर माफ आहे. १० लाखांच्या पुढे सेवा कर भरावा लागतो. पण आता ही मर्यादा प्रति वर्ष २५ लाख रुपये होईल असे मानले जात आहे.
=========================================

राज्याला भरीव तरतुदीची अपेक्षा

  • मुंबई : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा असून, मोठे पायाभूत विकासाचे प्र्रकल्प आणि ‘मेक इन महाराष्ट्रा’ला गती देण्यासाठी आवश्यक भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल, अशी अपेक्षा
    राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’सारखे प्रयोग मोठ्या प्रकल्पातील गुंतवणुकीवर अवलंबून आहेत. मुंबई आणि महानगरातील पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळाला, तरच जलदगतीने परकीय गुंतवणूक आकर्षित करणे शक्य होणार आहे. ११ हजार कोटींचा शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर रोड, नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळ, ३३ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड, मोनो आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून विशेष सहाय्यता मिळाल्यास हे प्रकल्प जलदगतीने मार्गी लागणे शक्य आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी तब्बल सव्वा लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, तर महत्त्वाच्या रस्ते व रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, त्यातील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने सुमारे २४ हजार कोटींचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारने अशी तरतूद केल्यामुळे, सदर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्पासाठी जलदगतीने आवश्यक परवानग्या मिंळविणे शक्य झाले. सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. विशेषत: पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या मिळाल्या आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत किमान दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. प्रकल्प न रेंगाळता जलद गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून यंदाही अशाच तरतुदीची अपेक्षा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • =========================================
  • बाजारावर राहिले ‘अस्वला’चेच नियंत्रण ..

    • प्रसाद जोशी - 
      संसदेला सादर झालेला रेल्वेचा अर्थसंकल्प, त्यापाठोपाठ जाहीर झालेले आर्थिक सर्वेक्षण, फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स आणि आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती अशा विविध घटनांमुळे बाजारात चांगलीच हालचाल दिसून आली. रेल्वेच्या अर्थसंकल्पाने बाजारात निराशेचे वातावरण होते.त्यापाठोपाठच्या आर्थिक सर्वेक्षणामुळे बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले. असे असले तरी सोमवारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले असल्याने बाजाराने सावध भूमिका घेतली. असे असले तरी सप्ताहामध्ये बाजारावर अस्वलाचेच नियंत्रण असलेले दिसून आले.गत सप्ताहात मुंबई शेअर बाजारामध्ये मंदीवाल्यांचाच जोर दिसून आला. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५५५ अंशांनी खाली येऊन २३१५४.३० अंशांवर बंद झाला. आर्थिक सर्वेक्षण जाहीर झाल्यावर बाजारामध्ये थोड्या प्रमाणात तेजी आल्यामुळे निर्देशांक २३ हजार अंशांच्या वर बंद झालेला दिसून आला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही १८१ अंशांची घट होऊन तो ७०२९.२५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे अन्य क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले आहेत.गेल्या सप्ताहामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. मात्र, बाजाराचे सगळे लक्ष दि.२९ रोजी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.यामुळे बाजारात काहीसा संथपणा आला आहे. आर्थिक सर्वेक्षणानंतर बाजारामध्ये थोडीफार तेजी दिसून आली असली तरी आधीपासून झालेल्या घसरणीमुळे सप्ताहात अस्वलाचेच साम्राज्य असलेले जाणवले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेला सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे बाजाराची खूपच निराशा झाली. यानंतर बाजारामध्ये विक्रीची लाट दिसून आली. रेल्वेशी संबंधित असलेल्या अनेक आस्थापनांच्या समभागांची किंमत खूपच खाली आली. याच सप्ताहामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स अ‍ॅण्ड आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती झाली.त्यावेळी बाजारावर विक्रीचे दडपण आले. त्यातच रेल्वे अर्थसंकल्पाने केलेली निराशा, परकीय वित्तसंस्थांनी घेतलेले थांबा आणि पहाचे धोरण तसेच काही प्रमाणात केलेली समभागांची विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य अशा विविध बाबींमुळे बाजार खाली आला.संसदेची गेली दोन अधिवेशने विरोधकांच्या गदारोळामध्ये वाहून गेली आहेत. आर्थिक सुधारणांना गती देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे.आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबत काय तरतुदी असतील तसेच अर्थमंत्री चलनवाढ, अर्थव्यवस्थेचा विकासदर, तूट याबाबत काय पावले टाकतात त्यावरच बाजाराची आगामी दिशा ठरणार आहे.
=========================================

अर्थसंकल्पात कर कायदे सुलभ व्हावेत

आर्थिक वर्ष २०१६-२०१७ साठी सोमवारी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योग करणे सुलभ आणि कमी गुंतवणुकीत करता येईल, असे उपाय असतील, अशी आशा उद्योगजगताला आहे. याबरोबर कर कायदे सोपे केले जातील, असेही त्यांना वाटते.इन्टेल दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक देबजनी घोष म्हणाले, ‘सरकारने अर्थसंकल्पात उद्योग करणे सोपे करण्याच्या ज्या घोषणा केल्या होत्या त्यांची अमलबजावणी झाली पाहिजे.’ श्रेई इन्फ्रा फायनान्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हेमंत कनोरिया म्हणाले की, ‘अर्थसंकल्प कराबद्दलच्या अनिश्चितता दूर करून नियमांना काळानुरूप व सुसंगत बनविण्यावर केंद्रित असावा व कामकाजात सुलभता आली पाहिजे.’ मुथूट पप्पाचन ग्रुपचे अध्यक्ष थॉमस जॉन मुथूट यांनी अर्थमंत्र्यांनी कराचा परीघ व्यापक केला पाहिजे व त्यासाठी पॅनची नोंदणी वाढविली पाहिजे. यामुळे काळा पैशांच्या देवाणघेवाणीत उल्लेखनीय घट होईल, असे म्हटले. खेतान अँड कंपनीचे दक्ष बक्षी यांनी म्हटले की, कर कायद्यांना सुलभ करून त्यांच्यात स्पष्टता आणली पाहिजे व त्यामुळे ते कायदे पाळण्याचे प्रमाण वाढेल. किमान पर्याय करात कपात केल्यास करदात्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसा उपलब्ध होईल.
=========================================

गतवर्षीच्या बजेटमधील फंड अजूनही वापराविना

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि.२९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज २०१६-१७ अर्थसंकल्प मांडणार आहेत. अनेक मंत्री आमच्या खात्याला व्यवस्थितररित्या फंडचं वाटप न करण्यात आल्याची तक्रार करतात. मात्र गेल्या २०१५-१६अर्थसंकल्पात देण्यात आलेला फंड अजूनही काही खात्यांनी पुर्णपणे वापरला नसल्याची माहिती समोर आली आहे.  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार १० मंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्यापैकी अर्धा फंडदेखील वापरला नाही आहे. डिसेंबर २०१५ पर्यंत म्हणजे अर्थसंकल्प मांडून झाल्याच्या ९ महिन्यानंतरही हा फंड पुर्ण वापरण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे सात खात्यांनी वेळेच्या आधीच ९० टक्के फंड वापरुन टाकला आहे. महत्वाचं म्हणजे हे आकडे फक्त भांडवली खर्चाच्या आधारावर काढण्यात आले आहेत. कौशल्य विकास मंत्रालयाने फक्त ३३ टक्के फंड वापरला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ महिने बाकी असताना फक्त ३३ टक्के खर्च करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौशल्य भारत अभियानाची जबाबदारी याच मंत्रालयावर आहे. एकीकडे मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत २०२२ पर्यंत देशभरात ४०० दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष ठेवलं असताना कौशल्य विकास मंत्रालय मात्र याबाबत उदासीन दिसत आहे.  
    तसंच सरकारची महत्वाची योजना स्मार्ट सिटीची जबाबदारी असलेल्या शहरी विकास मंत्रालयाकडे आहे मात्र त्यांच्याशी संलग्न असलेल्या गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाने फक्त १८ टक्के फंडचा वापर केला आहे. तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने फक्त ४४ टक्के फंड वापरला आहे. 
=========================================
पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर

पुणे - शहरातील नियोजित मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाच एका स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे तो लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मेट्रोला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरातील मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मार्गांचा सुधारित अहवाल आल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये पाठविण्यात आला असून, जानेवारीत त्याला केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास खात्याच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र, शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाबाबत आक्षेप घेतल्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असलेल्या प्रकल्पासमोर अडचण निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. 

संबंधित संस्थेच्या आक्षेपाबाबत नगरविकास खात्याने महापालिकेकडे विचारणा केली असून, त्याबाबत खुलासा मागविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, संस्थेचा नेमका आक्षेप सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु त्यासंदर्भात केंद्र सरकारला खुलासा केला जाणार असून, त्यानंतर लवकरच प्रकल्पाला मंजुरी मिळेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
=========================================
लिओनार्डो सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर लार्सन अभिनेत्री

लॉस एन्जल्स - हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट, स्पॉटलाईट आणि मॅड मॅक्स फ्युरी रोड या चित्रपटांनी बाजी मारली. स्पॉटलाईट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. तर, लिओनार्डो दी कॅप्रिओ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ब्री लार्सन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने देण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. ख्रिस रॉक हे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
=========================================
‘माउंट एलब्रुस’ सर करणारा प्रणय

नागपूर - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आजी-आजोबांकडे गेल्यावर विटी-दांडू, खुपसणी, सुरकाडी व डाबडुबलीसारख्या अस्सल देशी खेळांत रमणाऱ्या प्रणय बांडेबुचे या साहसी पर्वतारोहीने युरोपातील ‘सेव्हन समिट’पैकी एक मानले जाणारे रशियातील ‘माउंट एलब्रुस’ हे २१ हजार फूट उंचीवरील शिखर सर करून विदर्भाचा झेंडा विदेशी भूमीवर फडकावला. अत्यंत कठीण मानले जाणारे हे शिखर यशस्वीपणे चढणारा प्रणय नागपुरातील एकमेव युवा पर्वतारोही ठरला आहे. अतिशय लाजाळू व सदैव दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारा प्रणय व त्याचे तीन भावंडं सर्वप्रथम २००७ साली सीएसी ऑलराउंडरच्या हिमालयीन पदभ्रमण शिबिरात सहभागी झाले होते. या मोहिमेपूर्वी त्यांनी कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता. शिबिराच्या निमित्ताने प्रणयला मनाली येथील माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटला भेट देण्याची संधी मिळाली. त्यातून प्रणयचा कल साहसी खेळांप्रति वाढत गेला. एक नवी ऊर्जा त्याला मिळाली. त्यानंतर एक वर्ष मैत्रबन येथील साहसी शिबिरात प्रशिक्षक म्हणून काम केले. परंतु, पर्वतरांगांचे आकर्षण कायम साद घालत असल्याने प्रणयने वडिलांकडे बेसिक माउंटनेअरिंग कोर्स करण्याचा आग्रह धरला. वडिलांनीही लगेच होकार दिला आणि २००९ साली अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून बेसिक प्रशिक्षण घेतले.
=========================================
शेतकरी, गुंतवणूकदारांना खूष करण्याचे आव्हान
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली आज (सोमवारी) आपला तिसरा आव्हानात्मक अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कृषी क्षेत्र आणि उद्योग जगतातील गरजांमध्ये समतोल साधण्याचे त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल, असे मानले जात आहे. त्याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागत असताना सार्वजनिक खर्चासाठी पैसा उभा करण्याचेही त्यांच्यासमोर लक्ष्य असेल. 

प्राप्तिकराच्या आघाडीवर अर्थसंकल्पात संभाव्य उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवली जाईल, तर यामध्ये कराच्या सवलतीत बदल होऊ शकतो. सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामीण भागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांवर विकासकामांवर अधिक खर्च करण्याचाही दबाव असेल. त्याचप्रमाणे जलद गतीने सुधारणांची मागणी करत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांचा विश्‍वासही त्यांना जिंकावा लागणार आहे. 
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यामुळे सरकारवर 1.02 लाख कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळेही अर्थमंत्र्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. वित्तीय आघाडीवर विश्वसनीयता आणि सर्वोत्कृष्टतेचा प्रत्यय म्हणून सरकारने आगामी वर्षांत वित्तीय तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 3.5 टक्के या निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त नसेल याची काळजी घेण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्यावर अर्थमंत्री कोणता निर्णय घेतात, याविषयी उत्सुकता आहे. 

कॉर्पोरेट करांचे दर चार वर्षांत 30 ते 25 टक्के करण्याचे आपले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठीही जेटली काहीतरी पावले उचलतील, असे मानले जात आहे. त्याशिवाय ते उद्या अर्थसंकल्पात करसवलत परत घेण्याचा मुद्दा समावेश असलेल्या प्रक्रियेची सुरवात करू शकतात. 
=========================================
भाजपकडून स्मृती इराणींची पाठराखण
रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेची दिशाभूल केल्याच्या विरोधकांच्या आरोपांनंतर भाजपने आता इराणींचा बचाव सुरू केला आहे. "मंत्र्यांचे वक्तव्य हे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच होते‘, असा युक्तिवाद करून भाजपने एकप्रकारे या माहितीला स्मृती इराणी जबाबदार नसल्याचे सूचकपणे सांगणे आरंभले आहे. भाजप प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पाठराखण केली. 

स्मृती इराणी यांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील घटनाक्रमाबद्दल प्रथम लोकसभेत निवेदन केले होते. लोकसभेतील त्यांच्या प्रभावी भाषणानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "ट्‌विट‘द्वारे अभिनंदन केले होते. एवढेच नव्हे, तर या भाषणाला "सत्यमेव जयते‘चे प्रशस्तिपत्रही दिले होते. त्यानंतर, गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही स्मृती इराणी यांनी परिपूर्ण भाषण करून विरोधकांना सविस्तर उत्तर दिल्याचे उद्‌गार काढले होते. मात्र, त्यांच्या निवेदनानंतर रोहित वेमुलाच्या आई व भावाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मंत्र्यांच्या माहितीत आणि वस्तुस्थितीत तफावत असल्याचा आरोप केला होता. पाठोपाठ राज्यसभेतही यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. कॉंग्रेसने तर या विसंगत माहितीमुळे संसदेची दिशाभूल झाल्याचा आरोप करून स्मृती इराणींविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याची घोषणा केली आहे. 
=========================================

गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल

गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल?
नवी दिल्ली : बजेटच्या तोंडावर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही बदल होणार आहे का, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र गेल्या 25 वर्षांत टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल होत गेले, यावर नजर टाकली तर
वर्ष 1992-93
इन्कम स्लॅब (रुपयांत) : टॅक्स रेट
0 – 22,000 : 0%
22,001 – 30,000 : 20%
30,001 – 50,000 : 30%
50,001 – 1,00,000 : 40%
1,00,001 पेक्षा अधिक : 50%
12 % अधिभार 75 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1993-94
0 – 28,000 : 0%
28,001 – 50,000 : 20%
50,001 – 1,00,000 : 30%
1,00,001 पेक्षा अधिक : 40%
12 % अधिभार 1 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1994-95
0 – 30,000 : 0%
30,001 – 50,000 : 20%
50,001 – 1,00,000 : 30%
1,00,001 पेक्षा अधिक : 40%
12 % अधिभार 1 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1995-96
0 – 35,000 : 0%
35,001 – 60,000 : 20%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 40%
वर्ष 1996-97
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 20%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 40%
वर्ष 1997-98
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 15%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 50%
वर्ष 1998-99
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 1999-2000
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2000-01
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
10 % अधिभार 60 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2001-02
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
10 % अधिभार 60 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2002-03
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2003-04
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2004-05
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
एकूण टॅक्सेबल इन्कम 8.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के अधिभार
वर्ष 2005-06
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
एकूण टॅक्सेबल इन्कम 8.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के अधिभार
वर्ष 2006-07
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,85,000 : 0%
1,85,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,35,000 : 0%
1,35,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,00,000 : 0%
1,00,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2007-08
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,85,000 : 0%
1,85,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,35,000 : 0%
1,35,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,00,000 : 0%
1,00,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2008-09
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,95,000 0%
1,95,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,45,000 : 0%
1,45,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,10,000 : 0%
1,10,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2009-10
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,25,000 : 0%
2,25,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,80,000 : 0%
1,80,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,50,000 : 0%
1,50,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2010-11
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,40,000 : 0%
2,40,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक :  30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,60,000 : 0%
1,60,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2011-12
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,40,000 : 0%
2,40,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,60,000 : 0%
1,60,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2012-13
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,80,000 : 0%
1,80,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2013-14
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक: 30%
वर्ष 2014-15
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास