[अंतरराष्ट्रीय]
१- जोहान्सबर्ग: डेल स्टेन अन् प्रचंड विषारी साप... अवघं काही इंचांच अंतर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- होय! मुंबई हल्ल्याचे हाफिज सईदकडूनच आदेश : डेव्हिड हेडली
३- गांधी हत्येसाठी नथुरामला सावरकरांकडून प्रेरणा! - संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप
४- गाडी चालवताना हेल्मेट वापरा, मी कधी हेल्मेट काढून बॅटिंग केली नाही: सचिन
५- वेल्डरच्या मुलाला मायक्रोसॉफ्टचं 1.02 कोटींचं पॅकेज
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
६- टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी यापुढे सरकारी यंत्रणा-मुख्यमंत्री
७- पुणे; प्रियकराच्या साथीने आईकडून पोटच्या मुलाचा खून
८- मुंबई; अखेर चड्डी बनियान गँगच्या मुसक्या आवळल्या
९- मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, अनंत गीतेंचा अजब दावा
१०- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १० लाखांचे अपघाती विमा कवच
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- बंगळुरूच्या शाळेत बिबट्याचा धुमाकूळ, 3 जणांना जखमी करून फरार
१२- उत्तर प्रदेश; निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात सपा कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार,मुलाचा गेला जीव
१३- नाशिक; अपंगत्वावर स्वार झालेला "पाणी'दार श्रीयश
१४- मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोरच पंज्यातून माळ प्रकट
१५- उत्तर प्रदेश; कानपूर येथील रनियामध्ये समाजकंटकांनी केली डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची नासधूस
१६- पुणे; गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत भीषण आग, १५ झोपड्या जळून खाक
१७- तामिळनाडू; विरुधूनगर जिल्ह्यातील फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग, १ कामगार गंभीर जखमी.
१८- पंजाबमधील कपुरतळा रोडवर सोमवारी सकाळी भीषण अपघात होऊन ४ महिलांसाह ५ जण ठार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'क्वाँटिको'च्या नव्या एपिसोडमध्ये प्रियंका चोप्राचा अवतार
२०- 'तो' पराभव धोनीनं फिक्स केला होता?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२१- इतवारा भागात पोलिसांची धडक कारवाई, गौहत्या करणारे पाचजण ताब्यात
२२- मार्चमध्ये गुरुगौरव पुरस्कार वितरण सोहळा - सभापती संजय बेळगे
२३- लोहा; सायाळ येथे २२ वर्षापूर्वी बोगस टीसीवर मिळविलेले अंगणवाडी सेविकापद रद्द
२४- 'एसपी' कार्यालयातील आत्महत्या प्रकरणात महिला पोलीस कर्मचारी निलंबित; एकाची वेतनवाढ रोखली
२५- लहानच्या तपोवन बुद्धभूमीत आज व उद्या धम्म परीषदेचे आयोजन
२६- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णपर्व जयंती वर्षानिमित्त उद्यापासून चित्ररथाचा उपक्रम
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
विलास मोरे, आशु गुप्ता, शैलेश सिंघ, नंदकुमार रेखावार, संतोष पाटील, अंकित तेहरा, महेश धुमाळ, सुमन चौधरी, सतीश बस्वदे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजचा सुविचार
कर्माला दोष देणारे लोक ना-कर्तेच असतात
(श्रद्धा चव्हाण, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
===================================================
बंगळुरूच्या शाळेत बिबट्याचा धुमाकूळ, 3 जणांना जखमी करून फरार
बंगळुरु : बंगळुरूमधील एका शाळेत अचानक बिबट्या शिरल्यामुळं स्थानिकांची चांगलीच पाचावर धारण बसली. कुंडळहाली परिसरातील विगब्योर शाळेत शिरलेल्या बिबट्यानं तीन जणांना जखमी केल्याचं वृत्त आहे.
शाळेत बिबट्या शिरल्याचं समजताच स्थानिकांनी त्याला पकडण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र बिबट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करम्यात आलं आहे. शाळेत बिबट्या फिरतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली.
रविवार असल्यामुळं शाळेत मुलं नव्हती. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. विशेष म्हणजे या परिसरात चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2012मध्ये बिबट्या आढळला होता. त्यानंतर आज बिबट्यानं स्थानिकांना दर्शन दिलं आहे.
===================================================
'क्वाँटिको'च्या नव्या एपिसोडमध्ये प्रियंका चोप्राचा अवतार
मुंबई: अमेरिकी टीव्ही शो ‘क्वाँटिको’ सीजन ब्रेकनंतर पुन्हा सुरु होत आहे. या टीव्ही मालिकेत पहिल्या सीजनमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा भलतीच चर्चेत राहिली होती. नुकताच दुसऱ्या सीजनचा नवा ट्रेलर अपलोड करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्येही प्रियंकाच्या हॉट सीनचा सिलसिला थांबलेला नाही.
शोच्या मिड सीजन हा ब्युरो हेडक्वॉटरमध्ये झालेला स्फोट यावर संपला होता. ज्या प्रकरणात प्रियंका अडकलेली दाखविण्यात आलेली होती. शोच्या या नवीन सीजनमध्ये प्रियंका या स्फोटाच्या खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसून येणार आहे. कारण की, तिला स्वत:ला खरं ठरवायचं असतं. पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही हे या ट्रेलरवरुन दिसून येईलच. ट्रेलरमध्ये प्रियंकाचा हॉट सीन देखील झळकतो आहे. अमेरिकन टीव्ही शोमध्ये प्रियंकानं एलेक्स पेरिश नावाच्या एफबीआयच्या तरुण सदस्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आधीच्या सिजनमध्ये प्रियंकाच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.आपल्या सक्षम अभिनयानं प्रियंकानं ‘पीपुल्स च्वॉईस अवॉर्ड’मध्ये न्यू टीव्ही सीरीजच्या लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावाल आहे.
===================================================
मुंबई: अमेरिकी टीव्ही शो ‘क्वाँटिको’ सीजन ब्रेकनंतर पुन्हा सुरु होत आहे. या टीव्ही मालिकेत पहिल्या सीजनमध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा भलतीच चर्चेत राहिली होती. नुकताच दुसऱ्या सीजनचा नवा ट्रेलर अपलोड करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्येही प्रियंकाच्या हॉट सीनचा सिलसिला थांबलेला नाही.
शोच्या मिड सीजन हा ब्युरो हेडक्वॉटरमध्ये झालेला स्फोट यावर संपला होता. ज्या प्रकरणात प्रियंका अडकलेली दाखविण्यात आलेली होती. शोच्या या नवीन सीजनमध्ये प्रियंका या स्फोटाच्या खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसून येणार आहे. कारण की, तिला स्वत:ला खरं ठरवायचं असतं. पण ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही हे या ट्रेलरवरुन दिसून येईलच. ट्रेलरमध्ये प्रियंकाचा हॉट सीन देखील झळकतो आहे. अमेरिकन टीव्ही शोमध्ये प्रियंकानं एलेक्स पेरिश नावाच्या एफबीआयच्या तरुण सदस्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आधीच्या सिजनमध्ये प्रियंकाच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.आपल्या सक्षम अभिनयानं प्रियंकानं ‘पीपुल्स च्वॉईस अवॉर्ड’मध्ये न्यू टीव्ही सीरीजच्या लोकप्रिय अभिनेत्रीचा पुरस्कारही पटकावाल आहे.
डेल स्टेन अन् प्रचंड विषारी साप... अवघं काही इंचांच अंतर
जोहान्सबर्ग: जगातील सर्वात विषारी साप ब्लॅक मम्बा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या अचानक सामोर आला. अंगाचा थराकाप उडवणारा तो क्षण होता. याचा एक व्हिडिओच स्वत: स्टेनने अपलोड केला आहे.
डेल स्टेनने एक व्हिडिओ त्यानं इस्टाग्रामवर अपलोड केला आहे. स्टेन आणि त्याच्या मित्राला या सापाविषयी अजिबात माहिती नव्हती. सुरुवातीला त्यांना वाटकं की, क्रूगर नॅशनल पार्कातील ब्राऊन हाउस स्नेकला ते मदत करीत आहे. जो आपल्याला काही त्रास देणार नाही.
सापाच्या जवळ जाताच 32 वर्षीय स्टेनला कळून चुकलं होतं की, तो एक अतिशय खतरनाक ब्लॅक मम्बा होता आणि स्टेन त्याच्यापासून काही इंच दूर होता.
सापाच्या जवळ जाताच 32 वर्षीय स्टेनला कळून चुकलं होतं की, तो एक अतिशय खतरनाक ब्लॅक मम्बा होता आणि स्टेन त्याच्यापासून काही इंच दूर होता.
स्टेनने या सगळ्या घटनेचा एक व्हिडिओ अपलोड केला असून त्याबाबत माहितीही दिली आहे. “या बिचाऱ्याला कारखाली चिरडलं, आम्ही त्याला ब्राऊन हाऊस स्नेक समजून त्याला रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी थांबलो.”
“आम्ही जेव्हा फारच जवळ गेलो तेव्हा आम्हाला जाणवलं की, आमच्या समोर विषारी ब्लॅक मम्बा आहे.”
स्टेन पुढे म्हणतो की, “आम्ही किती शूर आहोत. हे दाखविण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. जर तुम्हाला माहित नसेल की, तर तुम्ही त्याला एकटं सोडणंच उचित आहे. यातून धडा शिकलो.”
वेल्डरच्या मुलाला मायक्रोसॉफ्टचं 1.02 कोटींचं पॅकेज
नवी दिल्ली : ‘तो’ एका सामान्य वेल्डरचा मुलगा आहे. सरकारी शाळेत शिक्षण झालं. मूळातच हुशार असलेल्या ‘त्या’ने स्कॉलरशिपच्या मदतीने आयआयटी खडगपूरमधून बीटेक केलं. या कष्टाचं फळ म्हणून मायक्रोसॉफ्टने त्याला वार्षिक 1.02 कोटींच्या नोकरीची ऑफर दिली आहे.
ही कहाणी आहे, राजस्थानमधील 21 वर्षीय वात्सल्य सिंह चौहानच. वात्सल्य मूळचा बिहारचा असून सध्या तो राजस्थानात राहतो. वात्सल्यला अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीने एक कोटी दोन लाखांच्या पगाराची ऑफर दिली आहे. या ऑफरबाबत कळल्यानंतर वात्सल्यसह त्याच्या कुटुंबीयांचाही विश्वास बसेना. वात्सल्यचे वडील राजस्थानच्या कोटामध्ये वेल्डिंगचं काम करतात.
‘आयआयटीमध्ये प्रवेशासाठी वडिलांनी कर्ज घेतलं‘
आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी माझे वडिल चंद्रकांत सिंह यांनी कर्ज घेतलं होतं. नोकरीबाबत कळताच त्यांचा विश्वास बसत नव्हतां, काही वेळ त्यांना बोलताच आलं नाही, असं वात्सल्यने सांगितलं.
होय! मुंबई हल्ल्याचे हाफिज सईदकडूनच आदेश : डेव्हिड हेडली
मुंबई : मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यात शेकडो निरपराधांनी जीव या हल्ल्यात गमावला. या हल्ल्यातील पाकिस्तानचा नापाक चेहरा डेव्हिड हेडलीनं पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे. धक्कादायक म्हणजे हेडलीने थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा उल्लेख केला आहे.
मकोका कोर्टात हेडलीची साक्ष, उज्ज्व निकमही उपस्थित
26/11चा गुन्हेगार आणि या खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेल्या डेव्हिड हेडलीची मुंबईच्या विशेष मकोका कोर्टात साक्ष नोंदवली जाते आहे. अमेरिकेतील एका तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही साक्ष सुरु आहे. यावेळी न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित आहेत.
साजिद मीर आयएसआयचा हँडलर
महत्वाचं म्हणजे लष्कर-ए-तोयबाच्या ज्या साजिद मीरनं त्याला भारतात पाठवलं होतं. तो साजिद मीर आयएसआयचा हँडलर म्हणून काम करत होता, असंही डेव्हिडनं म्हटलं आहे.
हाफिज सईदच मास्टरमाईंड
डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीदरम्यान पाकिस्तानमध्ये मोकाट फिरणारा 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचं नावही घेतलं आहे. हल्ल्यासंदर्भात सर्व आदेश हाफिज साईद देत असे, असे हेडली म्हणाला. शिवाय, हाफिज सईदच्या आदेशावरुन लष्कर-ए-तोयबाची सर्व काम करत होतो, अशी कबुलीही हेडलीने दिली आहे. हेडलीनं कोर्टात साजिद मीरचा फोटो ओळखला. साजिद मीर आणि हेडली वेगवेगळ्या इमेल आयडीच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.
पहिले दोन प्लॅन फेल
‘सप्टेंबर 2008 मध्ये मुंबईवर हल्ला करण्यासाठी 10 दहशतवाद्यांचा एका गट मुंबईकडे रवाना झाला होता. मात्र, समुद्रात जहाजाला ठोकरल लागली आणि प्लॅन फिस्कटला. या अपघातात शस्त्रांचं नुकसान झालं. ऑक्टोबरमध्येही असाच एक प्लॅन झाला. मात्र, तोही अयशस्वी झाला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये मुंबई हल्ल्याचा प्लॅन यशस्वी झाला.”, असे हेडलीन साक्षीत सांगितले.
पहिले दोन प्लॅन असे फसले:
सप्टेंबर 2008मध्ये मुंबईत हल्ल्यासाठी निघालेली एक बोट समुद्रात खडकावर आदळून नष्ट झाली. त्यावरील लोक लाईफजॅकेटच्या मदतीनं पोहत किनाऱ्यावर गेली. त्या बोटीवरील सर्व सामान दारूगोळा, अॅम्युनेशन समुद्रात बुडाला. ही बोट कराचीच्या जवळील समुद्रकिनाऱ्याच्या जवळून निघाली होती आणि बुडाल्यावर सर्व लोक पोहत कराचीत परतले. त्यानंतर महिनाभराने, ऑक्टोबरमधे त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. जोही निष्फळ ठरला. त्यानंतरचा मात्र नोव्हेंबरमध्ये मुंबईवरील हल्ला यशस्वी झाला.
डेव्हिड हेडली कोण?
डेव्हिडचा जन्म अमेरिकेत 23 जून 1960 साली झाला. जन्मानंतर त्याचं संपूर्ण कुटुंब पाकिस्ताना स्थलांतरित झालं. वयाच्या 18 वर्षी तो अमेरिकेत परत गेला. त्याला हिंदी, इंग्रजी, उर्दू या भाषा येतात. हेडलीच्या तीन पत्नी आहेत. पहिली शाझिया गिलानी, दुसरी पोशी पीटर आणि तिसरी फैजा ऑटुला (मोरक्कन) अशा तीन पत्नींची नावं.
मूळ पाकिस्तानी वंशाचा असलेला डेव्हिड हेडली सध्या अमेरिकेतल्या एका तुरुंगात बंद आहे. डेव्हिडनेच 26/11 हल्ल्याआधी मुंबईतल्या विविध ठिकाणांची चित्रफित बनवून ती लष्कर-ए-तोयबाला पाठवली होती. हल्ल्याआधी तो सातवेळा मुंबईत येऊन गेला होता.
2009 मध्ये एफबीआयनं हेडलीला 3 ऑक्टोबर 2009 ला शिकागो एअरपोर्टवर अटक केली. त्यावेळी त्याच्यावर अनेक आरोप होते. ज्यात डेन्मार्कमधील अतिरेकी हल्ल्यातील सहभागाचाही समावेश.
लष्कर-ए-तोयबात हेडलीची भूमिका काय?
2002 मध्ये आझाद काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद हेडलीने 2002ला लष्कर-ए-तोयबामध्ये सहभाग घेतला. सहभगी झाला. लष्करचा प्रमुख हाफिज सईद साहेब याच्या भाषणानं तो प्रभावित झाला. लष्करचं मुख्य काम हे दहशतवादी सेना तयार करणं आणि काश्मिरातील दहशतवादी कारवायांत सहकार्य करणं हे आहे. त्याचप्रमाणे भारतातील वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणं आणि सहभाग घेणं हे आहे.
गाडी चालवताना हेल्मेट वापरा, मी कधी हेल्मेट काढून बॅटिंग केली नाही: सचिन
नवी दिल्ली: एकीकडे हेल्मेट सक्तीविषयी राजकारण सुरु असताना दुसरीकडे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आवश्यक असल्याचा सल्ला नागरिकांना दिला. तो दिल्लीतल्या ऑटो एक्सपोमध्ये बोलत होता.
परदेशात वाहतुकीचे नियम कसोशीने पाळले जातात, मात्र भारतात तसं होताना दिसत नाही. भारतातले अनेक दुचाकीचालक हेल्मेट गाडीला अडकवून गाडी चालवतात, मात्र मी जर हेल्मेट अंपायरकडे देऊन खेळलो तर चालेल का? असा प्रश्न करत सचिनने नागरिकांना हेल्मेट घालण्याचं तसेच वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.
‘मी तसं वागलो असतं तर चाललं असतं का?’
‘मला वाटतं ट्रफिक नियम पाळणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा मी सिग्नलवर थांबलेला असतो पण त्यावेळी आजूबाजूनं वेगानं गाड्या जात असतात. अशावेळी भीती वाटते. जगात असं कुठेही होत नाही. सगळीकडे कसोशीनं नियम पाळले जातात. आपल्याकडे मात्र तसं होत नाही.’ असं म्हणत सचिन तेंडुलकरनं वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन केलं.
===================================================
पुण्यात प्रियकराच्या साथीने आईकडून पोटच्या मुलाचा खून
पुणे : अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यात रविवारी उघड झाली. प्रियकराच्या साथीने तिने हे कृत्य केलं. महत्त्वाचं म्हणजे मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह राहत्या घरीच पुरला. पुण्याच्या फुरसुंगीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस तसंच दिल्ली पोलिसांनी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलाची आई वरिता उर्फ ऋती (वय 40 वर्ष) आणि तिचा प्रियकर युनुस रहमत अली (वय 33 वर्ष) अशी या आरोपींची नावं आहेत. दिल्लीत आजोबांसोबत राहणाऱ्या निकोलसचं (वय 13 वर्ष) या दोघांनी अपहरण केलं होतं. त्यानंतर मुलाचे आजोबा जोसेफ जॉल यांनी 2 सप्टेंबर 2015 रोजी दिल्लीच्या नेबसराई पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र निकोलसला पुण्यात घेऊन आल्याचं मुलगी ऋतीने सांगितलं आणि नातवाचं आजोबांशी बोलणं करुन दिलं. निकोलस सुखरुप असल्याचं कळल्यानंतर आजोबा निश्चिंत होते.
यानंतर निकोलससोबत ख्रिसमसाठी दिल्लीत येत असल्याचं ऋतीने सांगितलं. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबर रोजी युनुस अलीने आजोबांना कॉल करुन, निकूने आत्महत्या केली असून त्याच मृतदेह राहत्या घरीच पुरल्याचं सांगितलं. या कॉलमुळे आजोबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांन दिल्ली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली.
अखेर चड्डी बनियान गँगच्या मुसक्या आवळल्या
मुंबई : मुंबईत अनेक ठिकाणी धुमाकूळ घालणाऱ्या चड्डी बनियान टोळीविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. या टोळीतील चार जणांना मुंबई पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
चड्डी बनियान टोळीने बोरीवली वेस्टच्या साईकृपा सोसायटीमधील एका वृद्ध व्यक्तीच्या घरी काल रात्री दरोड टाकून ऐवज लुटला. त्यानंतर दाम्पत्याला मारहाण केली. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यावेळी एका नागरिकाने चोरी करताना पाहिलं. त्याने व्यक्ती याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून तिघांना अटक केली. तर काही वेळाने चौथ्या चोरट्याला जेरबंद केलं.
'तो' पराभव धोनीनं फिक्स केला होता?
नवी दिल्ली: 2014 साली इंग्लंडविरुद्ध मॅन्चेस्टरमध्ये झालेला मानहानीकारक पराभव हा भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं फिक्स केल्याच्या दाव्यावरून दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवानं घुमजाव केलं आहे.
दिल्लीतल्या सन स्टार या वृत्तपत्रानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुनील देव यांनी ही मॅच धोनीनं फिक्स केल्याचा दावा केला होता. पण वृत्तपत्रानं हे स्टिंग ऑपरेशन जारी करताच सुनील देव यांनी घुमजाव केलं आहे. इतकंच नाही, तर या वृत्तपत्राला कोर्टात खेचणार असल्याचा दावाही केला आहे.
2014 साली झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सुनील देव हे टीम इंडियाचे व्यवस्थापक होते. त्या दिवशी ढगाऴ वातावरण होतं. टॉस जिंकल्यास भारतानं गोलंदाजी करावी असा निर्णय सामन्याआधीच्या बैठकीत घेतला होता. पण धोनीनं मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. असं वक्तव्य देव यांनी स्टिंग दरम्यान केल्याची माहिती सन स्टार या वृत्तपत्रानं दिली… शिवाय हा व्हिडिओही जारी केला. पण असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचा दावा सुनील देव यांनी केला आहे.
काय झालं होतं ‘त्या’ मॅचमध्ये:
भारतानं टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. (मुरली विजय, गंभीर, पुजारा, कोहली) हे चारही बिनीचे फलंदाज अवघ्या 8 धावांवर बाद झाले होते. यातील तिघेही शून्यावर बाद झाले होते. तर मधल्या फळीत आलेल्या धोनीनं 71 धावांची खेळी करुन मानहानिकारक स्थितीतून बाहेर काढलं.
धोनीशिवाय अश्विन 40 आणि रहाणे 24 यांनीच दोन अंकी खेळी केली होती. तब्बल 6 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. भारताचा पहिला डावा 46.4 षटकात 152 धावांवर आटोपला होता.
तर इंग्लडकडून इयान बेल 58 धावा आणि जो रुट 70 धावांची खेळी करुन इंग्लंडला 367 धावांची मजबूत धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ 43 षटकात 161 धावांत पुन्हा एकदा ढेपाळला. त्यामुळे भारतानं हा सामना एक डाव आणि 57 धावांनी गमावला होता. दुसऱ्या डावात अश्विननं 46 धावांची नाबाद खेळी केली होती. तर धोनीनं 22 चेंडूत 27 धावा केल्या होत्या.
मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, अनंत गीतेंचा अजब दावा
मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही असा अजब दावा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केलाय. ते इंदापुरात बोलत होते.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी यंत्रापेक्षा मंत्राचे महत्त्व जास्त आसल्याचे सांगितलंय. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अनंत गीते इंदापूर येथील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या निवेदकानं मंत्राला शरण जाण्यापेक्षा यंत्राला शरण जायाला हवं, असे वक्तव्य केलं.
या नंतर गीते त्यांच्या भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यानी त्या निवेदकाला त्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, असाही दावा अनंत गीतेनी केला. एका अर्थाने यंत्रा पेक्षा मंत्राचे महत्व अधिक आसल्याचं सांगितलं. त्यामुळे अनंत गीते यांचं हे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे का असा ही प्रश्न उपस्थित होतोय.
===================================================टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी यापुढे सरकारी यंत्रणा-मुख्यमंत्री
कोल्हापूरचा टोल जरी रद्द झालेला असला तरी ज्या ठिकाणी 30 वर्षांसाठी टोल सुरू आहे त्या ठिकाणी आता राज्य सरकार स्वताःची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
भाजप सरकारने वचनपूर्ती करत अखेर कोल्हापुरातून टोल हद्दपार करण्यात आला. रविवारी टोलविरोधी कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी टोलनाक्यांवर वाहनांची नोंद ठेवण्यासाठी राज्य सरकार स्वताःची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसंच या यंत्रणेतून टोलनाक्यावरुन ये जा करणार्या वाहनांची नोंद ठेवली जाईल. जर मुदतीपूर्वी टोलचे पैसे कंत्राटदाराला मिळाले तर उर्वरित रक्कमेतली 90 टक्के रक्कम ही राज्य सरकार आपल्याकडं घेणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
===================================================गांधी हत्येसाठी नथुरामला सावरकरांकडून प्रेरणा! - संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप
संघ, हिंदू महासभेकडून पाठबळ; तुषार गांधी यांचा आरोप राष्ट्रपिता म. गांधींवर गोळ्या जरी नथुराम गोडसे याने झाडल्या तरी त्याला याची प्रेरणा सावरकर यांच्याकडून मिळाली व त्याला पाठबळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदू महासभेने दिले होते, असा आरोप गांधीजींचे पणतू ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक तुषार गांधी यांनी केला. त्यांनी यासाठी अनेक दाखलेही दिले. युवा जागर आणि धनवटे नॅशनल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायंकाळी ‘गांधी हत्येमागील षडयंत्राचे सत्य’ या विषयावर महाविद्यालयाच्या प्रांगणात तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गांधीजींच्या हत्येचे समर्थन करताना नथुराम गोडसे समर्थक व हिंदूत्ववादी संघटनांकडून उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्याला स्पर्श करताना ते कसे खोटे आहेत, हे त्यांनी मुद्देसूदपणे सांगितले.
===================================================वीजबिल थकबाकीने महावितरण डळमळीत!
शेतीला जवळपास मोफतच वीजपुरवठा; थकबाकी १३ हजार कोटी रुपयांवर राज्यातील सुमारे ३८ लाख ५९ हजार कृषीपंपधारकांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांनी वीजबिल भरलेले नाही. त्यांच्याकडे असलेली थकबाकी १३ हजार २०० कोटी रुपयांवर गेली आहे. वीजबिलाची थकबाकी असली तरी कृषीपंपांची वीजजोडणी न तोडण्याचे राज्य सरकारचे आदेश असल्याने वसुली १० ते १५ टक्क्यांपर्यंत घसरली असून, शेतीसाठी जवळपास मोफतच वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे महावितरणचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर असून, कृषीपंपांच्या वाढत्या थकबाकीचा भार राज्य सरकारने न पेलल्यास त्याचा भरुदड अन्य ग्राहकांवर पडणार आहे. राज्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या संख्येत दर वर्षी तीन ते चार लाखांची भर पडत असून, बिलाची थकबाकीही किमान दोन हजार कोटी रुपयांनी वाढत आहे. वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडण्याचे आदेश तत्कालीन ऊर्जामंत्री अजित पवार यांनी दिल्याने तीन-चार वर्षांपूर्वी वीजबिल वसुलीचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत पोचले होते. गेली तीन वर्षे पडत असलेला दुष्काळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर बिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई न करण्याच्या सूचना यामुळे कृषीपंपांची थकबाकी वाढतच चालली आहे. एप्रिलपर्यंत ती १४-१५ हजार कोटी रुपयांवर जाण्याची चिन्हे आहेत. विजेच्या पुरवठय़ाचा दर प्रति युनिट सहा रुपयांवर पोचला असताना शेतकऱ्यांना केवळ त्याच्या १० ते १५ टक्के दराने बिल आकारणी होते. दर तिमाहीसाठी साधारणपणे ७०० कोटी रुपयांचे वीजबिल पाठविले जाते, मात्र वसुलीचे प्रमाण केवळ १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास आहे. थकबाकी दर वर्षी वाढतच असल्याने महावितरणची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा परिणाम घरगुती, औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांच्या वीजदरांवर होत असून, त्यांना महागडी वीज खरेदी लागत आहे. व्यावसायिक पद्धतीने महावितरणसह अन्य कंपन्यांचा कारभार चालविण्यासाठी राज्य वीज मंडळाचे कंपनीकरण करण्यात आले, पण सरकारने या उद्दिष्टालाच हरताळ फासला आहे. राज्यातील सुमारे १९ हजार गावांमध्ये दुष्काळ असला तरी थकबाकीचे प्रमाण मोठे असलेल्या प्रत्येक विभागात दुष्काळी परिस्थिती नाही. पण, वसुलीसाठी प्रयत्नच होत नसल्याने थकबाकी वाढत आहे.
===================================================राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १० लाखांचे अपघाती विमा कवच
१ एप्रिलपासून योजना लागू ; वर्षांला फक्त ३४४ रुपये वर्गणी भरावी लागणार राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपघाती मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास, दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्षांला फक्त ३४४ रुपये वर्गणी भरावी लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. वित्त विभागाने ४ फेब्रुवारीला तसा आदेश जारी केला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सध्या १९८२ ची गटविमा योजना लागू आहे. या योजनेनुसार कर्मचाऱ्याचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसाला नुकसानभरपाई म्हणून ठोस रक्कम दिली जाते. आता राज्य सरकारने अपघातामुळे कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास नुकसानभरपाई म्हणून ठरावीक रक्कम देण्याची कर्मचारी सामूहिक अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील वर्ग एक ते वर्ग चारच्या अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना आहे. सेवानिवृत्तीसाठी सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिला असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना ही योजना लागू केली जाणार नाही. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाना विमा योजनेसाठी वर्षांला ३०० रुपये वर्गणी व त्यावर ४४ रुपये सेवा कर म्हणजे फक्त ३४४ रुपये भरावे लागणार आहेत. या प्रकारांना विमा संरक्षण लागू नाही.. * नैसर्गिक मृत्यू. आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न * अमलीपदार्थ्यांच्या सेवनामुळे झालेला मृत्यू. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धामुळे झालेला मृत्यू * बाळंतपणात आलेला मृत्यू किंवा अपंगत्व * किरणोत्सर्ग, अणुभट्टय़ा, युद्ध व बंड आदी कारणांमुळे झालेला मृत्यू
===================================================उत्तर प्रदेश; निवडणूक जिंकल्याच्या उत्साहात सपा कार्यकर्त्यांचा हवेत गोळीबार,मुलाचा गेला जीव
उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीतील विजयानंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात केलेला गोळीबार एका ९ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला. या गोळीबारात त्या मुलाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शामली जिल्ह्यातील नफीसा येथे पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत समाजवादी पक्षाने विजय मिळवला, हे कळताच सपाच्या कार्यकर्त्यांनी हवेत गोळीबार करण्यास सुरवात केली. सुमारे अर्धा तास हा गोळीबार सुरू होता. त्याचवेळी रिक्षातून जाणा-या एका ९ वर्षांच्या मुलाला ही गोळी लागली आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाटी तातीडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत पानीपत-खातीम महामार्ग रोखून धरला. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली आलेली नाही.
===================================================अपंगत्वावर स्वार झालेला "पाणी'दार श्रीयश
श्रीयश द्विवेदी मूळचा उत्तर प्रदेशचा असला, तरी त्याचा जन्म नाशिकमधला. सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात जन्माला आलेला श्रीयश जन्मतः अपंग. त्याच्या दोन्ही हातांची वाढ न झाल्याने ते एक फुटापेक्षाही कमी लांबीचे आहेत. पायांवरही बालपणात अनेक शस्त्रक्रिया केल्याने आज किमान त्याला चालता येते. शालेय शिक्षण घेत असतानाच तो सिडकोच्या जलतरण तलावावर मित्रांसमवेत जायचा. मित्रांना पाण्यात पोहताना पाहून त्यालाही ती मजा लुटावीशी वाटायची, पण त्याला त्याच्या मर्यादा कळत होत्या. मात्र, जलतरण तलावावरील प्रशिक्षक वाळू नवले यांनी त्याच्यातला आत्मविश्वास हेरला आणि त्याला जलतरणपटू बनविण्याचा जणू चंगच बांधला. बघता बघता तो दोन वर्षांत चांगला जलतरणपटू म्हणून उदयास आला. जिल्हास्तरापासून तो राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन पोचला. त्याने आतापर्यंतच्या चार राष्ट्रीय पॅराऑलिंपिक स्पर्धांत सुवर्णपदक पटकावले आहे. बॅकस्ट्रोक, बटरफ्लाय या प्रकारात त्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. लंडन येथे झालेल्या कुमार पॅराऑलिंपिकमध्ये त्याने कांस्यपदक पटकावले होते. आता त्याची नजर येत्या सप्टेंबरमध्ये जर्मनीत होणाऱ्या पॅराऑलिंपिक स्पर्धेवर आहे. त्यासाठी तो आतापासूनच सराव करीत असून, यात त्याला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्याला अनेक स्पर्धांना आर्थिक चणचणीमुळे मुकावे लागते. प्रायोजकाचा शोधही सुरू आहे. पण अद्याप त्याला यश आलेले नाही. त्याची जिद्द आणि मेहनत पाहता तो भविष्यात आंतरराष्ट्रीय पॅराऑलिंपिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक नक्कीच मिळवून देऊ शकेल, असा आत्मविश्वास त्याचे प्रशिक्षक नवले यांनाही आहे.
===================================================मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोरच पंज्यातून माळ प्रकट
पुणे - अमृता फडणवीस यांच्या समोरच ब्रह्माऋषी गुरुवानंद स्वामी हे आपल्या हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट होत असल्याचे उपस्थितांना दाखवीत होते. तसेच, ती माळ आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून देण्यात येत होती. काही पुरस्कार मिळवणाऱ्यांनाही माळ हातातून प्रकट करून दिली गेली. ही माळ अमृता फडणवीस यांनीही आशीर्वाद म्हणून घेतली.
राज्यात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे एका सामूहिक कार्यक्रमात गुरुवानंद स्वामी यांनी हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट करणे आणि ते ही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर हे कितपत योग्य आहे, असे उपस्थितांचे म्हणणे होते.
======================================================================================================
No comments:
Post a Comment