[अंतरराष्ट्रीय]
१- बगदाद; रमादी शहरात इराकचे सैन्य घुसले
२- द.चिनी समुद्रात भारत,अमेरिकेची टेहळणी?
३- पाकः शाळेजवळ झालेल्या गोळीबारानंतर गोंधळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- एकाच महिन्यात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा? : हायकोर्ट
५- सियाचीनचं सर्च ऑपरेशन, डॉट आणि मिशा श्वानांची भूमिका
६- मृत्यूला चकवा देणार्या वीरजवानाची अजूनही मृत्यूशी झुंज सुरूच
७- जवान हनुमंतप्पांसाठी महिलेकडून किडनी दान
८- ...म्हणून भारतासाठी सियाचीन प्रचंड महत्त्वाचं
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- कांदा कोसळला, किलोमागे अवघा 4 ते 6 रुपयांचा दर
१०- कोलकाता; रानटी हत्तीचा कहर, शंभरहून अधिक घरं उद्धवस्त
११- वाहन विक्रीदारांनाच द्यावे लागणार ग्राहकांना 2 हेल्मेट
१२- मथुरा; बलात्कारास विरोध केल्याने युवतीस जाळले
१३- पश्चिम बंगाल; बहरामपूरमध्ये अपघातात 7 जणांचा मृत्यू
१४- 'लव्ह जिहाद'चा संदेश गुजरातमध्ये व्हायरल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- औरंगाबाद; काँग्रेसच्या माजी आमदाराचा थाट, मुलाच्या लग्नात वारेमाप खर्च
१६- पंढरपूर; विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुतण्याची पोलिसांना मारहाण
१७- रायपूर; नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थींनीवर बलात्कार
१८- रांची; मुलीवर प्रेम करतो म्हणून शिक्षिकेने केली सातवीतल्या मुलाची हत्या
१९- उदयपुर; 'कलेक्टर, आम्ही तुमचे केस कापणार नाही!'
२०- स्वरातीम प्रकरण; आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्याचा मुखेड मध्ये तीव्र निषेध
२१- महसुल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप भुरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- … आणि रामदास आठवले झाले मुख्यमंत्री!
२३- अभिनेत्री सनी लिऑन विरोधात एफआयआर दाखल
२४- ही इंग्लंडमधील खेळपट्टी होती असं वाटलं: धोनी
२५- सेन्सेक्स २० महिन्यातील नीचांकी पातळीवर
२६- मिनिटांत 82 'पुश अप्स' मारुन जागतिक विक्रम
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
(मीनाक्षी मोरे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट उपलब्ध, अगदी लगेच...
लिप्स चॉकलेट, हार्ट चॉकलेट, गिफ्ट चॉकलेट आणि बरेच प्रकार
अधिक माहितीसाठी कॉल करा.
संपर्क- 9423785456, 7350625656
ढिंच्याक चॉकलेटच्या अधिक माहितीसाठी लिंक- https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/05/blog-post_17.html
व्हिडीओ पहा - https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/dhinchyak-chocklate.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
[अंतरराष्ट्रीय]
१- पाकिस्तानने केला 'कोहिनूर' हि-यावर दावा
२- गूगलची 'ड्रायव्हरलेस कार' म्हणजेच एक ड्रायव्हर... चालकविरहित गाडीला प्रशासकीय मंजुरी
३- लंडन; कुत्र्यामुळे स्वामीनारायण मंदिर प्रशासनाचा माफीनामा
४- चिलीला भूकंपाचा धक्का; जिवीतहानी नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- सियाचीनमध्ये शहीद, साताऱ्याच्या वीराचं पार्थिव आज मूळगावी
६- मृत्युशी झुंज देणाऱ्या हणमंतप्पासाठी सचिनची प्रार्थना
७- डेव्हिड हेडलीच्या साक्षीत तांत्रिक अडचणीचा खोडा
८- बीफ खाल्ल्याशिवाय जगता येत नसेल तर हरियाणात येऊ नका - आरोग्यमंत्री
९- 'वक्तव्यापूर्वी गोमांसाची व्याख्या समजून घ्या' - कॉंग्रेस
१०- 'पाकने 26/11 सूत्रधारांवर तातडीने कारवाई करावी'- कॉंग्रेस
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा: हायकोर्ट
१२- मोबाईलवर तिकीट आणि टॅब्लेटवर चेकिंग, रेल्वे पेपरलेस
१३- कोकण रेल्वेवर दुपदरीकरणासह 11 नवे स्थानकं, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
१४- अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची जागा येरवडा कारागृहात- दिलीप कांबळे
१५- मुंबई- न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल
१६- हनमंतअप्पा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही, अजूनही कोमात, प्रकृती चिंताजनक
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- आसाराम बापू यांच्या याचिकेवर २२ फेब्रुवारी रोजी होणार पुढील सुनावणी
१८- गंगानगर एक्स्प्रेस व सचखंड एक्स्प्रेस फेब्रुवारीमध्ये दर सोमवारी नांदेड येथून नियमित
१९- चंदीगड : पंजाबी हास्यकलाकार गुरप्रीत घुग्गी यांनी आम आदमी पक्षात केला प्रवेश
२०- अकोला; जिल्हा कारागृहाच्या भिंतीवरून उडी टाकून कैदी फरार, कैद्यावर बलात्काराचा होता आरोप
२१- मुंबई: १२,१३,१४ फेब्रुवारी रोजी हार्बर रेल्वे मार्गावर घेण्यात येणार मेगा ब्लॉक रद्द
२२- हरयाणा; करनाल येथे दाट धुक्यामुळे २५ गाड्यांची एकमेकांना धडक; अपघातात ४ जणांचा मृत्यू
२१- औरंगाबाद : भाऊसाहेब चिकटगावकराना ७ लाखांचा दंड, खंडाळा येथील अवैध उत्खननाप्रकरणी कारवाई
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- श्रीलंकेविरुद्ध भारत का हरला? पाच कारणं
२५- HTCचे दोन स्मार्टफोन झाले स्वस्त, किंमतीत घट
२६- तब्बल 21 भाषांसह पॅनासॉनिकचा नवा स्मार्टफोन
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२७- स्वरातीम विद्यापीठातील ग्रंथालयास आंबेडकरांचे नाव देण्यात यावे यामागणीसाठी केलेल्या आंदोलनावर झालेल्या २८- लाठीहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विध्यार्थी संघटनांनी बैठक घेवून
केला निषेध
२९- नायगाव; फोटो नसलेल्या मतदारांची नवे वगळणार
३०- बिलोली; रानडुकराच्या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
शिवकुमार सरकोंडवार, रईस शेख, प्रवीण दमाम, विलास घोरबांड, चैतन्यज्योती पद्मशाली, नारायण कदम, लक्ष्मीकांत मैद, युनुस शेख, रिंकू आरेय, गोविंद बोडके, सुरज चालीन्द्रवार, सुमित येलामे, गणेश नागेव्द, वैशाली शिंदे, रुपेश पाईकराव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
(संदीप साळवे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चॉकलेट-डे साठी खास चॉकलेट
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट उपलब्ध, अगदी लगेच...
लिप्स चॉकलेट, हार्ट चॉकलेट, गिफ्ट चॉकलेट आणि बरेच प्रकार
अधिक माहितीसाठी कॉल करा.
संपर्क- 9423785456, 7350625656
ढिंच्याक चॉकलेटच्या अधिक माहितीसाठी लिंक- https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/05/blog-post_17.html
व्हिडीओ पहा - https://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/dhinchyak-chocklate.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
=====================================================
सियाचीनमध्ये शहीद, साताऱ्याच्या वीराचं पार्थिव आज मूळगावी
सातारा: सियाचीनमधल्या हिमवादळात शहीद झालेल्या साताऱ्याच्या जवानाचं पार्थिव आज त्यांच्या गावी आणलं जाणार आहे. शहीद सुनिल सूर्यवंशी यांच्याबरोबर इतर 8 जवानांचे पार्थिव आधी दिल्लीत आणि त्यानंतर त्यांच्या गावी पाठवले जातील.
तीन फेब्रुवारीला सियाचीन रांगात 19 हजार फूट उंचीवर 10 भारतीय सैनिकांची तुकडी गस्तीवर होती. त्यावेळी अचानक आलेल्या हिमवादळानं चौकीसहीत त्यांना गिळंकृत केलं. त्यात सुनिल सूर्यवंशी यांच्यासह 9 जवान 25 ते 30 फूट खोल बर्फाखाली दाबले गेले. यानंतर भारतीय हवाई दलानं पूर्ण ताकद पणाला लावून या जवानांचा शोध घेतला. आणि तब्बल सहा दिवसानंतर 9 जवानांचे मृतदेह शोधले गेले.
यात आश्चर्यकारकरित्या कर्नाटकचे जवान हणुमंतप्पा जिवंत आढळले.
मूळ माण तालुक्यातल्या मस्करवाडीचे असणारे सुनिल सूर्यवंशी यांना एक वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या गावी नवं घर बांधलं. त्या घराची वास्तूशांती आणि आपल्या चिमुकलीचं बारसं एकत्र व्हावं, असा त्यांचा कुटुबीयांचा बेत होता. मात्र, नियतीनं त्याआधीच सुनिल यांना हिरावून नेलं.
मृत्युशी झुंज देणाऱ्या हणमंतप्पासाठी सचिनची प्रार्थना
मुंबई: सियाचीनमध्ये तब्बल सहा दिवस मृत्युशी झुंज देणारे लढवय्ये हणमंतप्पा कोप्पड यांच्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं प्रार्थना केली आहे.
‘शूर लान्स नायक हणमंतप्पा यांच्यासाठी प्रार्थना करतो, सियाचिन हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांनाही सलाम’ असं ट्विट सचिन तेंडुलकरनं केलं आहे.
श्रीलंकेविरुद्ध भारत का हरला? पाच कारणं
पुणे : ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉशचा दणका देणाऱ्या टीम इंडियाला दिनेश चंडिमलच्या नवख्या श्रीलंकन फौजेनं जमिनीवर आणलं. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवरच्या सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 5 विकेट्स राखून धुव्वा उडवून तीन ट्वेण्टी ट्वेण्टी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यातली भारतीय फलंदाजांची कामगिरी अतिशय लाजिरवाणी ठरली. श्रीलंकेच्या वेगवान आक्रमणासमोर टीम इंडियाची अशी काय दाणादाण उडाली की भारतीयांना 20 षटकंही फलंदाजी करता आली नाही.
========================================
========================================
HTCचे दोन स्मार्टफोन झाले स्वस्त, किंमतीत घट
मुंबई: एचटीसीनं मागच्याच वर्षी लाँच केलेला स्मार्टफोन डिझायर 728 ड्युल सिमच्या किंमतीत कपात केली आहे. आता हा स्मार्टफोन रु. 16,990 किंमतीला उपलब्ध आहे. लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची किंमत रु. 17,990 होती.
डिझायर 728 प्रमाणेच HTC ने डिझायर 626 च्या किंमतीतही घट केली आहे. ज्यांची किंमत 13,990 एवढी आहे. लाँचिंगच्या वेळेस या स्मार्टफोनची किंमत 14,990 होती.
HTC डिझायर 728 ड्युल सिम स्मार्टफोनचे फीचर:
5.5 इंच स्क्रिन आणि 720×1280 रेझ्युलेशन पिक्सल
64 बिट 1.3 GHz मीडियाटेक प्रोसेसर
2 जीबी मेमरी आणि 16 जीबी इंटनरनल मेमरी
बूम साउंड आणि डॉल्बी साउंड फीचरही
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा-
वाय-फाय, रेडिओ, ब्ल्यूटूथ, जीपीआरएस, 3जी, 4जी सपोर्ट
2800mAh बॅटरी क्षमता
गूगलची 'ड्रायव्हरलेस कार' म्हणजेच एक ड्रायव्हर... चालकविरहित गाडीला प्रशासकीय मंजुरी
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या वाहन सुरक्षा नियंत्रकांनी गूगलला मोठा दिलासा दिलाय. गूगलचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार किंवा ड्रायव्हरलेस कार प्रकल्पाला अमेरिकन प्रशासनाने हिरवा कंदिल दाखवलाय. म्हणजेच गूगलच्या कॉम्प्युटर्सनी अमेरिकन आरटीओची ड्रायव्हिंग टेस्ट पास केलीय.
गूगलने विकसित केलेलं आर्टिफिशीयल इंटेलिजन्स सिस्टीम पायलट प्रकल्पातील ड्रायव्हरलेस कारला ड्रायव्हर म्हणून मान्य करण्यासाठी अमेरिकन वाहन सुरक्षा नियंत्रकांनी परवानगी दिलीय. म्हणजे ड्रायव्हरलेस कार ही स्वतःच एक ड्रायव्हर असणार आहे.
ड्रायव्हर लेस कारचं तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल का, यावर असलेल्या प्रश्नचिन्हालाही आता विराम मिळालाय. ड्रायव्हर लेस कार तंत्रज्ञानासाठी हा एक मोठा विजय मानला जातोय.
अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनने गूगलच्या ड्रायव्हर लेस कारबाबतचा प्रस्ताव 4 फेब्रुवारी रोजी मंजूर केला. त्यानंतर आज गूगलच्या वतीने आज ही माहिती सार्वजनिक करण्यात आली.
गूगलने गेल्यावर्षी 12 नोव्हेंबर रोजी ड्रायव्हर लेस कारलाच एक ड्रायव्हर मानावं आणि ही कार चालवण्यासाठी वेगळ्या मानवी चालकाची आवश्यकता नसल्याचा प्रस्ताव नॅशनल हायवे ट्रॅपिक सेफ्टीकडे दाखल केला होता.
डेव्हिड हेडलीच्या साक्षीत तांत्रिक अडचणीचा खोडा
मुंबई: मुंबईवरच्या २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्याप्रकरणी दहशतवादी डेव्हिड हेडलीची नोंदवली जाणारी साक्ष उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवेळी काही तांत्रिक बिघाड आल्यानं हा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी आता उद्या एक ते दीड तास हेडलीची साक्ष अधिक वेळ नोंदवण्यात येईल.
गेल्या दोन दिवसात हेडलीनं आपल्या साक्षीदरम्यान अनेक गौप्यस्फोट केलेत. 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यात आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं लष्कर-ए-तय्यबाला मदत केली. त्यावेळी सिद्धिविनायक मंदिरावरही हल्ल्याचा बेत होता. अशा अनेक गोष्टी हेडलीच्या साक्षीनं पुढे आल्या आहेत.
डेव्हिड हेडली मूळ पाकिस्तानी आहे.26/11 च्या हल्ल्यात त्यानं मुंबईतल्या ठिकाणांची चित्रफित बनवून ती लष्कर ए तय्यबाला दिली होती.सध्या तो डेन्मार्कमधल्या बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेच्या एका तुरुंगात कैदेत आहे.
मोबाईलवर तिकीट आणि टॅब्लेटवर चेकिंग, रेल्वे पेपरलेस
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करत असताना तुमचं तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीटीईकडे टॅब्लेट पाहिल्यावर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण रेल्वेने पेपरलेस काराभाराच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. याच अंतर्गत टीटीईकडे तिकीट तपासणीसाठी टॅब्लेट देण्यात येणार असून पॅसेंजर्सना छापिल तिकीटाऐवजी थेट मोबाईल मेसेज मिळणार आहे.
रिझर्व्हेशन चार्टही लवकरच ऑनलाईन
टीटीईना रेल्वे टॅब्लेट देणार असून प्रवासादरम्यान चालत्या ट्रेनमध्येच पॅसेंजर्सच्या तिकिटांचं स्टेटस टॅब्लेटच्या माध्यमातून तपासलं जाईल आणि त्यानुसर अपडेटही केलं जाईल. विशेष म्हणजे रेल्वेचं रिझर्व्हेशन चार्टही लवकरच ऑनलाईन येणार आहे.
तिकिटाचं स्टेटस थेट टॅब्लेटवर
रेल्वेच्या या पेपरलेस कारभारामुळे पॅसेंजर्सना मोठा फायदा होणार आहे. तिकीट विसरल्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. कारण टीटीई तुमच्या तिकिटाचं स्टेटस थेट टॅब्लेटवर पाहू शकतो.
टॅब्लेटवरुन तिकीट चेकिंग
आतापर्यंत प्रवासादरम्यान पॅसेंजर्स टीटीईकडील चार्टच्या माध्यमातून चेक करत असता. मात्र, लवकरच टीटीई टॅब्लेटच्या माध्यमातून पॅसेंजर्सची तिकीट चेक करु शकणार आहे. टीटीईल त्याच्या विभागाशी ऑनलाईन कनेक्ट राहू शकणार असल्याने रिझर्व्हेशनसह तिकीट कॅन्सलेशनही प्रवासातच शक्य होणार आहे.
छपाईसाठी खर्च होणाऱ्या 8 ते 10 लाख रुपयांची बचत
पेपरलेस कारभारामुळे रेल्वेचा फायदा असा की, कागद आणि छपाईखर्चही वाचेल. याआधी रेल्वेने प्रवाशांना ई-तिकीटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, याद्वारे प्रवाशांना तिकिटाची प्रिंटआऊट काढावी लागते किंवा मोबाईलमध्ये ई-तिकीट सेव्ह करुन ठेवावी लागते. मात्र, आता रेल्वे यापुढे जाऊन आणखी सुधारणा करण्याच्या विचारात आहे.
केवळ NIR किंवा NRमध्ये दर महिन्याला तिकीट रिझर्व्हेशन आणि चार्ट प्रिंटआऊटसाठी रेल्वेचा 8 ते 10 लाखांच्या कागद खर्च होतो. रेल्वेच्या या पेपरलेस कारभारामुळे लाखो रुपयांची बचत होणार आहे. शिवाय, ही सुविधा पूर्ण देशभर लागू झाल्यानंतर कोट्यवधींची बचत होणार आहे.
तब्बल 21 भाषांसह पॅनासॉनिकचा नवा स्मार्टफोन
मुंबई : पॅनासॉनिक कंपनीचा P66 Mega हा नवा कोरा स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7 हजार 990 रुपये आहे. 21 भाषांना हा स्मार्टफोन सपोर्ट करतो.
5 इंचाचा डिस्प्ले
पॅनासॉनिक कंपनीचा हा नवा स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईडची ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईडचं लेटेस्ट 5.1 लॉलिपॉप ओएस मिळणार आहे. 5 इंचाचा डिस्प्ले असून 1.3 GHz क्वाड-कोर 64-बिट प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय, रॅमची क्षमता 2 जीबी रॅम असेल.
16 जीबी इंटरनल मेमरी
इंटरनल स्टोरेज 16 जीबी असून मायक्रोएसडी कार्डच्या सहाय्याने 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची सुविधा आहे.
8 MP रिअर कॅमेरा, तर 5 MP फ्रंट कॅमेरा
P66 Mega या स्मार्टफोनला स्टायलिश बनवण्याचा प्रयत्न पॅनासॉनिकने केला आहे. स्मार्टफोनचा लूक आकर्षक बनवण्याकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. एलईडी फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सेल कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
3200mAH क्षमतेची बॅटरी
कनेक्टिव्हटीमध्ये 3जी, ब्लूटूथ, वाय-फाय आणि जीपीएस इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. 3200mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून इलेक्ट्रिक ब्ल्यू, रोज गोल्ड आणि रसेट ब्राऊन या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा: हायकोर्ट
मुंबई: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेसह भाजप सरकारला अडचणीत आणणाऱ्या चिक्की घोटाळ्याची स्वतंत्र आणि पारदर्शीपणे चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
‘कोट्यवधी रुपयांच्या चिक्की घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, किंवा या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमा.’ अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.
मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी अल्पावधीत कोट्यवधी रुपयांची चिक्की खरेदी केली होती. ती चिक्की विक्री नियमबाह्य असल्याचा आरोप होतो आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, सीबीआयऐवजी चिक्की घोटाळ्याचा तपास निवृत्त न्यायधीश किंवा स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेवर दुपदरीकरणासह 11 नवे स्थानकं, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव
मुंबई : दिवा ते रोहा दुपदरीकरणाचं काम जलद गतीनं सुरु आहे. दिवा ते कासू या मार्गावर दुपदरीकरणाचं काम पूर्णही झालं आहे. मध्य रेल्वेपाठोपाठ कोकण रेल्वेनेही दुपदरणासाठी पावलं उचलली आहेत आणि यासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरीही मिळाली आहे. शिवाय, कोकण रेल्वेवर 11 नवे स्थानकं उभारण्यात येणार आहेत.
कोकण रेल्वेवरील कोलाड ते ठोकूर दरम्यान दुपदरीकरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर या मार्गावर 11 नवे रेल्वेस्थानकं उभारली जाणार आहेत. कोकण रेल्वेकडून याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी देण्यात आला आहे.
11 नव्या रेल्वेस्थानकांचा प्रस्ताव
कोकण रेल्वेवरील कोलाड ते ठोकूर या 741 किलोमीटर रेल्वेमार्गाचं टप्प्या-टप्प्याने दुपदपरीकरण केलं जाणार आहे. प्रवाशांनी या मार्गात नव्या स्थानकांच्या उभारणीचीही मागणी केली होती. त्यासंबंधीचा प्रस्तावही कोकण रेल्वेने रेल्वे बोर्डाकेड मंजुरीसाठी पाठवला आहे. सध्या कोलाड ते ठोकूरपर्यंत 65 रेल्वेस्थानके असून, आता ही संख्या 76 होईल. रेल्वे बोर्डाकडे पाठवलेल्या प्रस्तावावर महिन्याभरात निर्णय होणार आहे.
कुत्र्यामुळे स्वामीनारायण मंदिर प्रशासनाचा माफीनामा
फोटो सौजन्य : बीबीसी
लंडन : एका अंध भक्तासह गाईड म्हणून आलेल्या कुत्र्याला मंदिरात प्रवेश नाकारल्या प्रकरणी लंडनच्या स्वामीनारायण मंदिर प्रशासन दिलगिरी व्यक्त केली आहे. अंध अमित पटेल यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याला गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याने टीका झाली होती.
अंध असलेल्या अमित पटेल यांचा प्रशिक्षित कुत्रा कीका त्यांना बाहेर फिरण्यास मदत करतो. दोन वर्षांपूर्वी मंदिरात जाण्यापूर्वी अमित यांनी फोनवरुन कुत्र्याच्या मंदिर प्रवेशाविषयी बातचित केली. त्यावेळी कुत्र्याच्या प्रवेशाबाबत कुठलीही समस्या नसल्याचं संबंधितांनी पटेल यांना सांगितलं. मात्र ऐनवेळी प्रवेशद्वारावर कीकाला प्रवेश नाकारण्यात आला.
अमित यांनी अखेर कीकाशिवाय प्रवेश केला, मात्र आत वावरताना अनेक अडचणी आल्याचं अमित यांनी मंदिर प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत सांगितलं. त्यामुळे नीस्डेनमधील मंदिरातर्फे या घटनेबाबत माफी मागण्यात आली.
कुत्र्याला प्रवेश दिल्यास खूप जागा व्यापली जाते, असा युक्तिवाद मंदिरातर्फे करण्यात आला, मात्र अमित यांनी हा दावा खोडून काढत आपल्याला फार जागा लागत नाही, शिवाय व्हिलचेअरचा वापर अनेक जण करत असल्यामुळे तेही शक्य नसल्याचं स्पष्ट केलं.
स्वामीनारायण मंदिराने भक्तांच्या गरजांकडे लक्ष पुरवत असल्याचं सांगितलं. कायद्यानुसार गाईड कुत्र्यांना सर्व सार्वजनिक जागांवर नेता येऊ शकतं, मात्र धार्मिक कारणांमुळे मतभेद असल्याचं मंदिराने स्पष्ट केलं.
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांची जागा येरवडा कारागृहात- दिलीप कांबळे
पुणे : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची जागा येरवडा कारागृहात आहे, असं वक्तव्य सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं होतं. याविषयी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिलीप कांबळे यांनी म्हटलं.
याप्रकरणी चौकशी सुरु असून येत्या 8 ते 10 दिवसात सत्य समोर येईल, त्यानंतर कितीही मोठा मासा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच, असं दिलीप कांबळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अण्णाभाऊ साठे महामंडळातून 5 हजार कोटी रुपये अन्यत्र वळवल्याचा तसेच 300 कोटी रुपयांचा हिशेब लागत नसल्याचा आरोप आहे.
बीफ खाल्ल्याशिवाय जगता येत नसेल तर हरियाणात येऊ नका - आरोग्यमंत्री
बीफ खाल्ल्याशिवाय ज्यांना जगता येत नाही, अशा लोकांनी हरियाणात येऊ नये' असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे बीफ बॅनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.
' जगातील अनेक देशांतील खाण्या-पिण्याच्या सवयी आपल्याला रुचत नसल्याने आपण (भारतीय) तेथे जात नाही. तसंच ज्या लोकांना बीफ खाल्ल्याशिवाय रहावतं नाही त्यांनीही हरिणायात येण्याची गरज नाही' असे वीज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हरियाणात येणा-या विदेशी पर्यटकांना सरकारतर्फे बीफ खाण्याचा विशेष परवाना देण्यात येईल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता, त्यावर वीज यांनी हे रोखठोक उत्तर दिले. 'राज्यात गोसंरक्षण कायद्याची कडक अमलबजावणी होते, त्यामुळे इथे बीफ खाण्यास सक्त मनाई आहे' असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी विदेशी पर्यटकांना बीफ खाण्यासाठी कोणताही परवाना वा सूट देण्यास नकार दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
याच अनिल वीज यांनी गाईला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित करण्याची मागणी करत त्यासाठी ऑनलाइन सर्व्हेही केला होता.
=====================================================पाकिस्तानने केला 'कोहिनूर' हि-यावर दावा
- ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मुकुटातील 'कोहिनूर हिरा' पाकिस्तानत परत आणण्यासाठी सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयाने स्वीकारली असून आता पाकिस्ताननेही या 'हि-यावर' दावा केला आहे. याच ' कोहिनीर हिऱ्या'साठी गेल्या कित्येक वर्षांपासून भारत सरकारकडूनदेखील प्रयत्न सुरू आहेत.बॅरिस्टर जावेद इक्बाल जाफरी यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत दस्तुरखुद्द महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासह पाकिस्तानमधील ब्रिटिश उच्चायुक्तालयाला प्रतिवादी केले होते. १०५ कॅरेट्सचा हा हिरा पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या प्रांताचा भाग होता, त्या न्यायाने त्याची मालकी आता पाकिस्तानकडेच असली पाहिजे, असा युक्तिवाद जाफरी यांनी केला होता. मात्र ब्रिटनच्या राणीविरोधातील प्रकरणाची सुनावणी घेणे न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत न्यायालयाच्या निबंधकांनी ही याचिका दाखल करून घेण्यास आक्षेप नोंदवला होता. पण लाहोर उच्चन्यायालयाचे न्या. खालीद महमूद खान ते आक्षेप फेटाळत ती याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले.जर ब्रिटनमध्ये राणीला एखाद्या प्रकरणात प्रतिवादी बनविण्यात अडसर येत नसेल, तर पाकिस्तानातील प्रकरणातही त्यांना प्रतिवादी का बनवता येणार नाही? असा सवाल विचारत आपली याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणी जाफरी यांनी केली होती.ब्रिटीशांनी पंजाबचे महाराजा रणजितसिंह यांचे नातू दलिपसिंह यांच्याकडून जबरदस्तीने हा हिरा बळकावून त्यांच्या देशात नेला. महाराणी एलिझाबेथ यांचा त्या हि-यावर कोणताही अधिकार नसून तो पाकिस्तानला परत मिळावा, असेही जाफरी यांनी याचिकेत म्हटले आहे. १९५३ साली राज्यारोहण समारंभात १०५ कॅरट वजनाचा कोहिनूर हिरा राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात विराजमान झाला होता.
मुंबई- न्यायाधीशांच्या दिशेने फेकली चप्पल
चार वर्षांपासून दरोड्याच्या खटल्यामध्ये केवळ तारखाच पडत राहिल्याने वैतागलेल्या एका आरोपीने सुनावणीच्या वेळी चक्क न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकून शिवीगाळ करण्याची घटना मंगळवारी कुलाबा येथील जिल्हा सत्र न्यायालयात घडली. त्याच्या या आकस्मिक कृतीमुळे कोर्टातील सर्व जण भांबावून गेले. मदन चौहान (वय ३०) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या या कृतीबद्दल कुलाबा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये चेंबूरमधील आरसीएफ पोलिसांनी २०१२ मध्ये चौहानला अटक केली होती. त्याच्या खटल्यासाठी त्याला सुनावणीसाठी पाचारण केले जात होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कुलाबा येथील सत्र न्यायालयाचे न्या. एस.व्ही पाटील यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. कोर्टाकडून पुन्हा पुढची तारीख मिळाल्याने चौहानला संताप आला आणि त्याने आपली चप्पल न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली. चप्पल कोर्टाच्या डायसला लागून खाली पडल्याने न्यायाधीशांना दुखापत झाली नाही. त्यानंतर चौहानने न्यायाधीशांना शिवीगाळ केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चौहानविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
====================================================='पाकने 26/11 सूत्रधारांवर तातडीने कारवाई करावी'- कॉंग्रेस
दहशतवादी डेव्हिड हेडली याने उघड केलेल्या माहितीच्या आधारे पाकिस्तानने मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली झालेल्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांवर पाकिस्तानने तातडीने कारवाई करावी, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
याबाबत बोलताना कॉंग्रेस नेते अभिषेक मनू संघवी म्हणाले, ‘या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट संबंध आहे. दहशतवादी निर्यात करणाऱ्या देशातील (पाक) परिस्थिती अतिशय भयंकर गोष्ट आहे. कमीत कमी आता तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या दुर्दैवी आणि दु:खदायक हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांवर कारवाई करावी.‘ दरम्यान काही तांत्रिक अडचणींमुळे हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज (बुधवार) होणारी साक्ष गुरुवारी घेण्यात येणार आहे. ‘आज हेडली काही पुरावे देणार होता. मात्र अमेरिकेच्या बाजूने काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्याची आजची साक्ष गुरुवारी घेण्यात येणार आहे‘, अशी माहिती विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
=====================================================
'वक्तव्यापूर्वी गोमांसाची व्याख्या समजून घ्या' - कॉंग्रेस
हरियानाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी गोमांसाची (बीफ) व्याख्या समजून घ्यावी, असे म्हणत कॉंग्रेसने वीज यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘जे लोक गोमांसाशिवाय जगू शकत नाहीत त्यांनी हरियानाला भेट देऊ नये‘, असे वक्तव्य वीज यांनी अलिकडेच केले होते. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी बोलत होते. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री सहिष्णु असल्याचे म्हणत आहेत मात्र अशाप्रकारचे वक्तव्य करून अनिल वीज हे सरळ सरळ आरोप करत आहेत. या माध्यमातून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गोमांसाची व्याख्या माहित नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे गायीचे मांस खात नाहीत. पण त्यांना गोमांस म्हणजे काय हे शिकवण्याची गरज आहे‘
दरम्यान ‘गोमांसावर बंदी आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. दुसरीकडे नागरिकांच्या खाण्याच्या सवयी हा एक मुद्दा आहे. मात्र जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत बसूनच करायला हवे‘ असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी दिले आहे.
‘जे लोक गोमांसाशिवाय जगू शकत नाहीत त्यांनी हरियानाला भेट देऊ नये‘, असे वक्तव्य वीज यांनी अलिकडेच केले होते. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी बोलत होते. ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री सहिष्णु असल्याचे म्हणत आहेत मात्र अशाप्रकारचे वक्तव्य करून अनिल वीज हे सरळ सरळ आरोप करत आहेत. या माध्यमातून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना गोमांसाची व्याख्या माहित नाही. आम्ही कोणत्याही प्रकारे गायीचे मांस खात नाहीत. पण त्यांना गोमांस म्हणजे काय हे शिकवण्याची गरज आहे‘
दरम्यान ‘गोमांसावर बंदी आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. दुसरीकडे नागरिकांच्या खाण्याच्या सवयी हा एक मुद्दा आहे. मात्र जे काही करायचे आहे ते कायद्याच्या चौकटीत बसूनच करायला हवे‘ असे स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी दिले आहे.
चिलीला भूकंपाचा धक्का; जिवीतहानी नाही
सँटियागो - मध्य चिलीला मंगळवारी रात्री जोरदार भूकंपाचा धक्का बसला. चिलीची राजधानी सँटियागो शहरातील काही इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बसलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे. ऑव्हेले शहरापासून पश्चिमेकडे 40 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अद्याप कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर आश्रय घेतला.
चिली हा देश भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. सप्टेंबर 2015 मध्ये चिलीला 8.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यापूर्वी 2010 मध्ये 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्क्याने आलेल्या त्सुनामीमुळे 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
==========================================================================================================
श्री गंगानगर एक्स्प्रेस आणि सचखंड एक्स्प्रेस फेब्रुवारी महिन्यात दर सोमवारी नांदेड येथून नियमित (पूर्ववत) धावणार
रेल्वे बोर्डाने पूर्वी कळविल्या नुसार सचखंड एक्स्प्रेस आणि श्री गंगानगर एक्स्प्रेस फेब्रुवारी महिन्यात दर सोमवारी नांदेड येथून रद्द करण्यात आली होती. या निर्णयात आता बदल करण्यात आला आहे. नांदेड –अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड- श्री गंगानगर एक्स्प्रेस नांदेड येथून दर सोमवारी सुटेल. या पूर्ववत धावणाऱ्या गाड्या पुढील प्रमाणे –
संख्या
|
गाडी संख्या
|
कुठुन
|
कुठे
|
पूर्ववत धावणारे दिवस
|
दिनांक
|
1
|
१२७१५
|
नांदेड
|
अमृतसर
|
दर सोमवारी
|
८.२.२०१६
१५.२.२०१६
२२.२.२०१६
|
२
|
१२७१६
|
अमृतसर
|
नांदेड
|
दर बुधवारी
|
१०.२.२०१६
१७.२.२०१६
२४.२.२०१६
|
३
|
१२४८६
|
श्री गंगानगर नांदेड
|
नांदेड
|
दर शनिवारी
|
१३ .२.२०१६
२० .२.२०१६
२७ .२.२०१६
|
4
|
१२४८५
|
नांदेड
|
श्री गंगानगर नांदेड
|
दर सोमवारी
|
१५ .२.२०१६
२२ .२.२०१६
२९ .२.२०१६
|
या गाड्यांचे आरक्षण सुरु झाले आहे. प्रवाशांना विनंती आहे कि याचा लाभ घ्यावा.
जनसंपर्क कार्यालय,
नांदेड विभाग, नांदेड
No comments:
Post a Comment