[अंतरराष्ट्रीय]
१- नायजेरिया; बोको हरामच्या हल्ल्यात ३० ठार
२- इस्त्रायलमधील तेल अवीवा विद्यापीठात आता मराठीचे वर्ग
३- बाचा खान विद्यापीठः शिक्षक बाळगणार शस्त्रास्त्रे
४- बाशर असद यांना बळाने हटवू: सौदी अरेबिया
५- इसिसकडून अमेरिकेत हल्ल्याची भीती - सीआयए
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी
७- देशद्रोहाला पाठिंबा हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?- अमित शहा
८- कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद नाहीच;
९- कॉंग्रेस नेता म्हणतो "अफजल गुरुजी'
१०- वेतन आयोगामुळे तुटीचे संकट
११- सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका
१२- सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त
१३- दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
१४- भारतीय शिक्षणपद्धतीत परिवर्तनाची गरज- भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- न्यायाधीश वाघेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
१६- पिंपरी-चिंचवड, मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत, तर कल्याण-डोंबिवली अस्वच्छ
१७- शाहरुखचा 'डर' पाहून केलं दिप्ती शर्माचं अपहरण
१८- यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
१९- मराठी साहित्य संमेलन बरखास्त करा: कर्णिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- पुणे; हॉस्टेलच्या रुममध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या
२१- अल्पवयीन मुलीचा वायास्कासोबत विवाह; खाप पंचायतीविरोधात पित्याची न्यायालयात धाव
२२- नांदेड; श्रीरामनगरात अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा
२३- फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
२४- मुखेड: रोजगार, चारा, पाण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने केले धरणे आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- शिवछत्रपतींच्या 'डुडल'साठी ऑनलाइन मोहीम
२६- पाकच्या स्टार खेळाडूंची भर मैदानात धक्काबुक्की
२७- धोनी म्हणतो या 5 कारणांमुळे आम्ही टी 20 वर्ल्डकप जिंकू शकतो
२८- सेन्सेक्स वधारला, दिवसभरात 600 अकांची उसळी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव नि:पक्षपाती न्यायधीश आहे
(विशाल माने, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=============================================

JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी

देशद्रोहाला पाठिंबा हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?- अमित शहा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ‘हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का’, या मथळ्याखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमित शहा यांनी जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या देशविरोधी कारवाया आणि त्याला असणारा काँग्रेसचा पाठिंबा यावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या या कारवायांना पाठिंबा आणि प्रोत्साहन का देत आहे, असा सवालही शहा यांनी विचारला. तसेच ज्या पक्षाच्या नसानसांत हिटलरशाही भिनलेली आहे त्यांच्याकडून भाजपला राष्ट्रवाद शिकण्याची गरज नाही, असेही शहांनी ठणकावून सांगितले. केंद्र सरकार यशस्वी कामगिरी करत असताना काँग्रेसला साधी एका जबाबदार राजकीय पक्षाची भूमिकाही पार पाडत आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात औदासिन्य आलेले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एखादी गोष्टी देशद्रोही आहे किंवा नाही, यातील फरक कळेनासा झाल्याचे टीकास्त्र शहा यांनी सोडले. राहुल गांधी सध्याच्या सरकारची तुलना हिटलरच्या काळातील नाझी राजवटीशी करत आहेत. मात्र, ते एक गोष्ट विसरत आहेत ती म्हणजे, इंदिरा गांधी यांच्या नेत्तृत्वकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे भारत तेव्हाच त्या पातळीपर्यंत पोहोचला होता. राहुल गांधी आता ज्या कम्युनिस्ट आणि डाव्यांचा कैवार घेत आहेत त्यांनाही आणीबाणीच्या काळात सोडण्यात आले नव्हते. सियाचेनमध्ये शहीद झालेल्या नऊ जवानांना राहुल गांधी याच जोमाने श्रद्धांजली वाहतील का?, सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशातील १२५ कोटी जनतेला या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणीही अमित शहा यांनी ब्लॉगद्वारे केली.
=============================================
कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद नाहीच
बाचा खान विद्यापीठः शिक्षक बाळगणार शस्त्रास्त्रे
पेशावर- खैबर पख्तुन्वा भागातील बाचा खान विद्यापीठात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद असलेले विद्यापीठ आजपासून (सोमवार) पुन्हा सुरू झाले आहे. विद्यापीठातील शिक्षकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पेशावर जवळ असलेल्या बाचा खान विद्यापीठावर तालिबानी दहशतवाद्यांनी 20 जानेवारी रोजी हल्ला केला होता. यावेळी झालेल्या हल्ल्यात 21 जण ठार झाले होते. हल्ला झाल्यापासून विद्यापीठ बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आजपासून ते खुले करण्यात आले आहे. विद्यापीठात संरक्षणासाठी केवळ शिक्षकांना शस्त्रास्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती कुलगुरू पझल रहीम मारवत यांनी दिली.
दरम्यान, डिसेंबर 2014 मध्ये पेशावर येथील लष्कराच्या शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 150 जण ठार झाले होते. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा समावेश होता.
=============================================
सिरीयात रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; 10 ठार
बैरूत- उत्तर सिरीयातील एका लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्रद्वारे हल्ला करण्यात आला असून, यामध्ये 10 जण ठार झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्की सीमेवर अझाझ नावाचे गाव आहे. गावातील लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाला. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले व गर्भवती महिलांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रशियाने हे क्षेपणास्त्र डागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
=============================================
राहुल गांधी यांनी माफी मागावी: अमित शहा

नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) प्रकरणास कॉंग्रेस पक्ष निव्वळ नैराश्यापोटी पाठिंबा देत असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात मिळविलेला विजय सहन होत नसल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आता राष्ट्रद्रोही घटकांनाही पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याची टीका शहा यांनी केली. शहा यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही यावेळी लक्ष्य केले. देशातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था फुटीरतावादी आणि राष्ट्रद्रोही कृत्यांचा अड्डा होत असताना केंद्र सरकारने शांत रहावे, अशी राहुल यांची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून केली आहे.
"राहुल यांनी सद्यस्थितीमधील भारताची तुलना हिटलरकालीन जर्मनीशी केली आहे. मात्र भारतामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पुकारण्यात आलेली आणीबाणीकालीन परिस्थिती ही हिटलरकालीन जर्मनीमधील परिस्थितीशी मिळतीजुळती होती. हिटलरसदृश हुकूमशाहीची मानसिकता ही कॉंग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे. अफझल गुरुला सहानुभुती दर्शविणाऱ्यांना पाठिंबा देऊन राहुल कोणत्या स्वरुपाच्या देशभक्तीचे प्रदर्शन करत आहेत? राहुल यांनी देशाची माफी मागावयास हवी,‘‘ असे शहा यांनी म्हटले आहे.
=============================================
बाशर असद यांना बळाने हटवू: सौदी अरेबिया
रियाध - सीरियामधील हिंसाचारासंदर्भातील सध्या सुरु असलेली शांतता चर्चा अयशस्वी झाली; तर सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल असद यांना बळाचा वापर करुन पदावरुन हटविण्यात येईल, असा इशारा सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री अदेल अल-जुबैर यांनी दिला आहे.
"असद यांना जावे लागेल, यात कोणतीही शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. एकतर शांतापूर्ण राजकीय शांतता प्रक्रियेद्वारे ते आपले पद सोदतील; वा त्यांना बळाने पदावरुन हटविले जाईल,‘‘ असे जुबैर म्हणाले. सीरियावर सौदी अरेबिया आक्रमण करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने तुर्कस्तानमधील लष्करी तळावर सैन्य व लढाऊ विमाने पाठविली आहेत.
=============================================
भारतीय शिक्षणपद्धतीत परिवर्तनाची गरज- भागवत
=============================================
यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
मराठी साहित्य संमेलन बरखास्त करा: कर्णिक

जळगाव - मुंबई-पुण्यात भरविण्यात येणारे मराठी साहित्य संमेलनात केवळ पुणे-मुंबईतील साहित्यिकांचे वर्चस्व असते. खऱ्या साहित्याला या संमेलनात व्यासपीठ मिळू शकत नाही. म्हणून उर्वरित महाराष्ट्रातील साहित्याला न्याय देता येत नसेल, असे मराठी साहित्य संमेलन बरखास्त केलेलेच बरे, या शब्दांत आजच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक मधु मंगेश कर्णिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्घाटनपर भाषणात कर्णिक म्हणाले, की खऱ्या साहित्यांची जिथे कदर नाही असे मराठी साहित्य संमेलन मंडळच बरखास्त करावे आणि तेच पैसे साहित्यिकांना अनुदान म्हणून दिले जावे, असे विचार साहित्यिक कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. या साहित्य संमेलनामुळे खानदेशमध्ये नवे वाङ्मय पर्व सुरू होत आहे. खानदेशच्या मातीचे हे ऋण आहेत. साहित्यामुळे सत्त्व, त्यापासून ममत्व आणि ममत्त्वातून माणसे जोडली जाऊन समाजात एकत्व तयार होतं. सहत्व ते एकत्व साधत तेच खरं साहित्य. एकात्म समाजनिर्मिती हेच साहित्याचे ध्येय असते. अशा प्रकारच्या लहान लहान साहित्य संमेलनातून होणारी साहित्य वाढ ही आनंदाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
=============================================
इसिसकडून अमेरिकेत हल्ल्याची भीती - सीआयए
वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट (इसिस) ही जागतिक दहशतवादी संघटना अमेरिकेमध्येही पॅरिसप्रमाणे मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची शक्यता असल्याचा इशारा अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी दिला आहे. फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे इसिसने घडविलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 130 नागरिक मृत्युमुखी पडले होते.
"पॅरिस येथे झालेला हल्ला हे गुप्तचर संस्थेचे अपयश होते. इसिस अशा स्वरुपाचा हल्ला घडविण्याच्या प्रयत्नांत आहे, याची काही दिवसांपूर्वी कल्पना आली होती. मात्र या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशावाद्यांनी तंत्रज्ञानाच्या नव्या साधनांचा फायदा करुन घेतला. अशा स्वरुपाचे हल्ले घडविण्यासाठी चिथावणी देणे, हस्तक पेरणे वा स्फोटके पुरविण्याच्या प्रयत्नांमध्ये इसिस असल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे असे हल्ले घडविण्याचे प्रयत्न सतत होत राहणे अटळ आहे,‘‘ असे ब्रेनन म्हणाले.
पाश्चिमात्य देश व मुस्लिम जगतामध्ये अधिकाधिक संघर्ष निर्माण करुन मुस्लिम तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नांमध्ये इसिस असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले. याचबरोबर, इसिसकडे छोट्या प्रमाणावर रासायानिक शस्त्रास्त्रे तयार करण्याचीही क्षमता असल्याचाही सीआयएचा अंदाज असल्याचे ब्रेनन यांनी सांगितले.
=============================================
खाप पंचायतीविरोधात पित्याची न्यायालयात धाव
बरमेर (राजस्थान)-
एका मध्यमवयीन पुरुषाबरोबर अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याचा आदेश खाप पंचायतीने दिल्यानंतर पित्याने न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंगा गावातील खाप पंचायतीने 12 वर्षीय मुलीचा 35 वर्षीय पुरुषासोबत विवाह लावून देण्याचा आदेश गनाराम प्रजापत यांना दिला होता. आदेश मान्य नसेल तर 25 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खाप पंचायतीमधील 17 सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=============================================
शिवछत्रपतींच्या 'डुडल'साठी ऑनलाइन मोहीम
मुंबई- गुगल या नामांकित सर्च इंजिनच्या होमपेजवर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी शिवरायांचे डुडल प्रदर्शित व्हावे आणि शिवरायांचे जीवन संपूर्ण जगापर्यंत पोचविण्यासाठी आता जगभरातील शिवप्रेमींनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. येत्या 19 फेब्रुवारीला गुगलने डुडलद्वारे महाराजांचे कार्य दाखवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गुगल डुडलच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक लोकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये इतिहास, तत्त्वज्ञ, शिक्षण, सांख्यिकी, विज्ञान, राजकारण, समाजकारण यांसह अनेक क्षेत्रांतील मान्यवरांना स्थान देण्यात आले आहे. शिवजयंतीला आता थोडाच अवधी शिल्लक असल्याने आता या नव्या दमाच्या मावळ्यांनी तंत्रज्ञानाची शिदोरी घेऊन ऑनलाइन मोहीम उघडली आहे. यासाठी इंटरनेट युजर्सना proposals@google.com या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच http://change.org/shivajidoodle या लिंकवर जाऊन यूजर्स या संकेतस्थळाद्वारे डुडलसाठी समर्थन देऊ शकतात. हे संकेतस्थळ जगभरातील फोरम्सवर कार्यरत असून, आज दुपारपर्यंतच सुमारे 14 हजार शिवप्रेमींनी याला पाठिंबा दर्शविला होता. सोशल मीडियावरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे या मागणीचा "ट्रेंड‘ जगभरात पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान हॅशटॅगद्वारे माध्यमे आणि जगभरातील नेटिझन्सपर्यंत शिवरायांचे कार्य पोचवून सर्वांनाच या डुडलच्या मोहिमेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीला गुगलवरून प्रदर्शित होणारे डुडल हा टेक्नोसॅव्हींचा शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल असे मत शिवप्रेमी नेटिझन्सनी व्यक्त करत अधिकाधिक संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
=============================================
फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
नांदेड, 15- फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
=============================================
रोजगार, चारा, पाण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने केले धरणे आंदोलन
तालुक्यात सामान्य नागरिकांना दुष्काळाच्या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रोजगारासाठी अनेक तरुण, बेरोजगार, मजूर, कामगार महानगरात गेले होते मात्र शासनाने पिण्यासाठी पाणी राखुन ठेवण्याचे धोरण राबविल्याने इमारती बांधावयाची कामे बंद केले आहेत. यामुळे महानगरात गेलेला कामगार, बेरोजगारांचा लोंढा गावाकडे परतत आहे. येत्या २ महिण्यात ऊस तोडणीसाठी गेलेले मजदूर मजूर सुध्दा गावाकडे परत येतील तेंव्हा त्यांच्याही हाताला काम द्यावे लागेल. सध्याही अनेक गावात मजुरांना काम नाही, कामाची मागणी करणारा नंबर ४ चा फार्म भरुन दिल्यास संबंधित ग्रामसेवक पोचपावती देत नाही कारण पोचपावती दिली की महाराष्ट्र ग्रामीण रोजगार जमीन योजना मनरेगा मधुन त्यांना काम देने बंधनकारक असल्याने ग्रामसेवक पोचपावती देत नाहीत. शासन निर्णयानुसार गावपातळीवर दुष्काळ निवारण कार्याचा आढावा घेण्यासाठी समित्या स्थापन होणे गरजेचे आहे, म्हणुन गावपातळीवर व तालुका पातळीवर समिती स्थापन करुन त्या समितीवर एनजीओ म्हणुन मराठवाड़ा समन्वय समितीची नियुक्ती करावी. तसेच दुष्काळ मजुरांना रोजगारासाठी मनरेगा योजनेतुन मजुरांना कामे द्यावी, जनावरांना चारा व गावक-यांना पाणी उपलब्ध करुन द्यावे यामागणीसाठी मराठवाड़ा समन्वय समितीच्यावतीने आज १५ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात समन्वयक दत्ता तुमवाड यांच्या नेतृत्वामध्ये शेख जाकिर हुसेन बा-हाळीकर, अँड.मिलिंद कांबळे, आनंदा बनकर, शांताबाई येवतीकर, भिमराव शिंदे, पंचफुला बिराजदार, सायराबी सरवर शेख, आनंदा बोरगावकर, भिमराव मेथीकर, प्रकाश बनसोडे, माधव लव्हटे, संघमित्रा गवळे, कमलाकर घोडके, पुष्पाबाई फिरंगवाड, बाबाजी गवळे, सचिन जोंधळे, सटवाजी वाघमारे, गंगासागर सोनकांबळे, तुकाराम वाघमारे आदी सह अनेक एनजीओ, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
१- नायजेरिया; बोको हरामच्या हल्ल्यात ३० ठार
२- इस्त्रायलमधील तेल अवीवा विद्यापीठात आता मराठीचे वर्ग
३- बाचा खान विद्यापीठः शिक्षक बाळगणार शस्त्रास्त्रे
४- बाशर असद यांना बळाने हटवू: सौदी अरेबिया
५- इसिसकडून अमेरिकेत हल्ल्याची भीती - सीआयए
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
६- JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी
७- देशद्रोहाला पाठिंबा हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?- अमित शहा
८- कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद नाहीच;
९- कॉंग्रेस नेता म्हणतो "अफजल गुरुजी'
१०- वेतन आयोगामुळे तुटीचे संकट
११- सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका
१२- सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त
१३- दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
१४- भारतीय शिक्षणपद्धतीत परिवर्तनाची गरज- भागवत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- न्यायाधीश वाघेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
१६- पिंपरी-चिंचवड, मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत, तर कल्याण-डोंबिवली अस्वच्छ
१७- शाहरुखचा 'डर' पाहून केलं दिप्ती शर्माचं अपहरण
१८- यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
१९- मराठी साहित्य संमेलन बरखास्त करा: कर्णिक
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
२०- पुणे; हॉस्टेलच्या रुममध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या
२१- अल्पवयीन मुलीचा वायास्कासोबत विवाह; खाप पंचायतीविरोधात पित्याची न्यायालयात धाव
२२- नांदेड; श्रीरामनगरात अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा
२३- फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत - जि.प. सदस्या वर्षाताई भोसीकर
२४- मुखेड: रोजगार, चारा, पाण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने केले धरणे आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- शिवछत्रपतींच्या 'डुडल'साठी ऑनलाइन मोहीम
२६- पाकच्या स्टार खेळाडूंची भर मैदानात धक्काबुक्की
२७- धोनी म्हणतो या 5 कारणांमुळे आम्ही टी 20 वर्ल्डकप जिंकू शकतो
२८- सेन्सेक्स वधारला, दिवसभरात 600 अकांची उसळी
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
काळ हा अखंड असून सर्वांचा न्यायनिवाडा करणारा एकमेव नि:पक्षपाती न्यायधीश आहे
(विशाल माने, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=============================================
पिंपरी-चिंचवड, मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत, तर कल्याण-डोंबिवली अस्वच्छ
नवी दिल्ली : देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. 75 शहरांच्या या यादीत महाराष्ट्र खूपच तळाला आहे. पिंपरी-चिंचवड नवव्या, तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. तर या यादीत कल्याण-डोंबिवली शहर 64 व्या स्थानावर आहे.
स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या क्रमाकांचा मान कर्नाटकातील म्हैसूर शहराला मिळाला आहे. या यादीत पंजाब,हरियाणामधील चंदीगड दुसऱ्या तर तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत झारखंड राज्यातील धनबाद हे 75 व्या स्थानी, कल्याण डोंबिवली 64 व्या क्रमांकावर आहे.
केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली.
टॉप 10 स्वच्छ शहरं
1) म्हैसूर – कर्नाटक
2) चंदीगड – पंजाब, हरियाणा
3) तिरुचिरापल्ली – तामिळनाडू
4) नवी दिल्ली
5) विशाखापट्टणम – आंध्रप्रदेश
6) सुरत – गुजरात
7) राजकोट – गुजरात
8) गंगटोक – सिक्कीम
9) पिंपरी चिंचवड – महाराष्ट्र
10) मुंबई – महाराष्ट्र
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही स्वस्त
मुंबई: गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात झालेली वाढ आज मात्र काही प्रमाणात ओसरली आहे. गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले होते. आता मात्र शेअर बाजार स्थिरावला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.
कालपर्यंत 29 हजार 224 रुपयांवर असलेलं सोनं आज मात्र 28 हजार 706 रुपयांवर पोहोचलं आहे. तर चांदीमध्येही 1 हजार 26 रुपयांची घट झाली आहे. सध्या बजारात चांदीचा प्रतिकिलो दर 36 हजार 958 रुपये आहे. येत्या काळात शेअर बाजारात वाढ झाली तर सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विकास दर वृद्धीसाठी चलनाचं अवमूल्यन करण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले. विकास दरासाठी भारत चीन किंवा जपानसारखं चलनाचं अवमूल्यन करणार नसल्याचं स्पष्ट झाल्याचा फायदा सेन्सेक्स वधारण्यात झाला.
पाकच्या स्टार खेळाडूंची भर मैदानात धक्काबुक्की
शारजा: यूएईमधील पीएलएल मॅचच्या दरम्यान, दोन पाकिस्तानी क्रिकेटर्समध्ये झालेल्या धक्काबुक्की सध्या बरीच चर्चेत आहे. ही घटना पाकिस्तान सुपर लीगमधील पेशावर जल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स या संघामध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्यात घडली.
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी खेळणाऱ्या स्टार खेळाडू भर मैदानातच एकमेकांना भिडले.
मॅचमध्ये ५ ओव्हरमध्ये वहाब रिहादच्या पहिल्याच बॉलवर अहमद शहजादनं एक जोरदार षटकार लगावला. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉलवर वहाब भन्नाट चेंडू टाकत अहमद शहजादला ‘क्लीन बोल्ड’ केलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आले. त्यांच्यात झालेलं बोलणं आणि धक्काबु्क्की टीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं आहे. दोघांमध्ये शिवीगाळही झाली.
दोघांमध्ये झालेली शिवागाळ आणि धक्काबुक्कीनंतर टीम मधील खेळाडूंनी तात्काळ मध्यस्ती करीत दोघांना बाजूला केलं. अहमद शहजादनं 17 चेंडूत 21 धावा केल्या. हा सामना रियाज वहाबचा संघ टीम पेशावर जल्मीनं जिंकला.
या प्रकरणानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं दोघांना मोठा दंड सुनावला असू दोघांना चांगलंच सुनावलं आहे. मॅच रेफरी रोशन महानामा यांनी शहजादच्य मॅच फीमधील 30 टक्के रक्कम आणि वहाबच्या मॅच फीमधील 40 टक्के कापली आहे.
धोनी म्हणतो या 5 कारणांमुळे आम्ही टी 20 वर्ल्डकप जिंकू शकतो
विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघ टी 20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
धोनीनेही स्वत: टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकते असा दावा केला आहे. त्यासाठी त्याने आपल्या वरचढ बाबी सांगितल्या आहेत.
फलंदाजांची फळी
श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत फलंदाजांना मोठी संधी मिळाली नाही. धोनी, युवराज सिंह यांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध अधिक फलंदाजी मिळाली नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजीचा अंदाज अद्याप आलेला नाही.
लंकेसोबतच्या तिसऱ्या टी20 सामन्यातील विजयानंतर धोनी म्हणाला, “सर्वांनाच फलंदाजीची संधी मिळाली नाही. फलंदाजी फळी मोठी असल्यामुळे ही समस्या असेलच. जे फलंदाज सहा, सात किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येतात, त्यांना संधी द्यायला हवी. तुम्ही किती धावा केल्या, हे महत्त्वाचं नाही. मात्र तीन-चार चेंडूत 10,15 धावा करणंही खूप उपयोगी ठरतं.
घरच्या मैदानाचा अनुभव
धोनीच्या मते आगामी विश्वचषक स्पर्धेत, भारताला घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा होईल. टी 20 सारख्या क्रिकेटमध्ये आम्ही प्रबळ दावेदारींच्या यादीत असतो. टी20 विश्वचषक भारतात होत आहे, त्यामुळे फिरकीपटूंची भूमिका मोलाची असेल, ज्याचा आम्हाला फायदा होईल, असं धोनी म्हणाला.
हिटर्सना बाद करण्याची क्षमता
धोनीच्या मते, विरोधी संघातील धडाकेबाज फलंदाजांना झटपट बाद करणे आवश्यक आहे. ती क्षमता भारतीय गोलंदाजांमध्ये आहे. घरचं मैदान आणि उत्तम फिरकीपटूंमुळे त्याचा फायदा जरूर होईल, असं धोनी म्हणाला.
विश्वचषकापूर्वी सर्व गोलंदाजांचा सराव
दरम्यान, सर्व गोलंदाजांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका मालिकेदरम्यान सराव मिळाला आहे. जसप्रीत बुमराहसारखे नवखे गोलंदाजही चांगली कामगिरी करत आहेत. बुमराह अंतिम षटकांमध्ये यॉर्कर फेकू शकतो. त्यामुळे अश्विनसारख्या गोलंदाजाकडे लवकर चेंडू सोपवण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
अश्विनस्त्रावर विश्वास
कर्णधार धोनीचा आर अश्विनवर खूप विश्वास आहे. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी 20 सामन्यात अश्विनने चार विकेट घेत, भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे अश्विन हे भारतीय भूमीवरील प्रमुख अस्त्र आहे, असा धोनीचा विश्वास आहे.
“अश्विन नवा चेंडू फ्लाईट करू शकतो. तो फलंदाजांना पुढे येऊन फटके खेळण्यासाठी भाग पाडतो. टी 20 सारख्या प्रकारात हे गरजेचं आहे. अश्विनमुळे मध्यमगती गोलंदाजांचा मधल्या षटकात वापर करता येतो”, असं धोनी म्हणाला.
सेन्सेक्स वधारला, दिवसभरात 600 अकांची उसळी
मुंबई: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने आज मोठी उसळी घेतली. आज दिवसभरात तब्बल 600 पेक्षा जास्त पॉईन्ट्सची उसळी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 568 पाँईन्ट्सची भर पडून 23554 वर स्थिरावला.
निफ्टी या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सर्वसमावेशक समजल्या जाणाऱ्या निर्देशांकातही तब्बल 182 पॉईन्ट्सची भर पडली. चीनच्या युआन या चलनाच्या अवमूल्यनाची शक्यता चीनच्या मध्यवर्ती बँकेने फेटाळून लावल्याचा सकारात्मक प्रभाव भारतीय बाजारांवर पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स-निफ्टीमध्ये सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक बसला.
टक्केवारीच्या हिशेबात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जवळपास अडीच टक्क्यांची भर पडली. आजच्या उसळीमध्ये टाटा स्टील, हिंदाल्को, एल अँड टी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अडानी पोर्ट्स या कंपन्यांच्या शेअर्सचा मोठा सहभाग होता.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आर्थिक विकास दर वृद्धीसाठी चलनाचं अवमूल्यन करण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे बाजाराला सकारात्मक संकेत मिळाले. विकास दरासाठी भारत चीन किंवा जपानसारखं चलनाचं अवमूल्यन करणार नसल्याचं स्पष्ट झाल्याचा फायदा सेन्सेक्स वधारण्यात झाला.
इस्त्रायलमधील तेल अवीवा विद्यापीठात आता मराठीचे वर्ग
मुंबई : भारताबाहेरही मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने इस्त्रायलमधील तेल अवीव विद्यापीठाशी मराठी भाषेच्या प्रसारासाठी करार केला आहे.
राज्य सरकार आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आलं आहे. मुंबई विद्यापीठ आणि राज्य मराठी विकास संस्था येत्या उन्हाळी सुट्टीत तेल अवीव विद्यापीठात मराठी शिकवणार आहेत.
राज्य सरकारच्या पुढाकाराने होत असलेला उपक्रम अशाप्रकारचा पहिलाच प्रयत्न मानला जात आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित तेल अवीव विद्यापीठाच्या सदस्यांशी याबाबतचा करार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख हे यावेळी उपस्थित होते.
पुणे; हॉस्टेलच्या रुममध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची आत्महत्या
पुणे : लोणावळ्याजवळील सिंहगड कॉलेजमध्ये अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने होस्टेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी व्हॅलेंटाईन डेच्या रात्री हा आत्महत्येचा प्रकार घडल्याने त्यामागे काही प्रेम प्रकरण तर नाही ना, याचा तपास पोलिस करत आहेत.
रोहित जाधव असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगावजवळील कौलतेगाव येथील आहे. त्याने कॉलेजमधील सिंधुदुर्ग हॉस्टेलच्या रुम नंबर 3 मध्ये रात्री 10.40 च्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.
आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत. रोहित व्हॅलेंटाईन डेच्या रात्री आत्महत्या केल्याने पोलिस सर्व शक्यता तपासून पाहात आहेत.
JNU प्रकरण - पतियाळा हाऊस कोर्टात भाजपासमर्थक वकिलांची हुल्लडबाजी
- नवी दिल्ली, दि. 15 - सोमवारी दुपारी पतियाळा न्यायालयामध्ये जवळपास 40 वकिलांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विरोधात घोषणा दिल्या असून या परीसरामध्ये वातावरण तंग झालं आहे. देशद्रोही वर्तनाबद्दल अटक केलेल्या कन्हय्या कुमारला कोर्टात हजर करण्यात येत असताना हा प्रकार घडला. काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या वकिलांनी चार ते पाच विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली तसेच विद्यार्थ्यांच्या पाठिराख्यांना कोर्टातून हुसकावण्याचा प्रयत्न केला.भारतमाता की जय आणि वंदे मातरम अशा घोषणा देणा-या वकिलांनी विद्यार्थ्यांवर आणि पत्रकारांवरही हल्ला केल्याचे वृत्त आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अफजल गुरूवरून झालेलं रणकंदन शमण्याची चिन्हे नसून भाजपा विरूद्ध डावे व अन्य असा संघर्ष उफाळलेला दिसत आहे. देशभरातल्या विविध विद्यापीठातल्या अनेक प्राध्यापकांनी कन्हय्या कुमारवर लावलेला देशद्रोहाचा आरोप चुकीचा असल्याचे सांगत त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी दिल्लीतल्या कोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी कन्हय्या कुमारला अटक करण्यात आली होती आणि त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.तर दुसराकीडे भाजप आमदार ओ पी शर्मा आणि त्यांच्या समर्थकांनी पतियाळा न्यायालयाबाहेर अज्ञात व्यक्तीला मारहाण केलीये. ओ पी शर्मा यांच्याकडे याबाबतची विचारणा केली असता पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणा-याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो, मारहाण करत नव्हतो असं स्पष्टीकरण त्यांनी दिल.
शाहरुखचा 'डर' पाहून केलं दिप्ती शर्माचं अपहरण
- गाजियाबाद, दि. 15 - स्नॅपडीलची कर्मचारी दिप्ती शर्मा अपहरण प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे चौकशीत आरोपीने शाहरुख खान - जुही चावलाच्या 1993च्या 'डर' चित्रपटातून प्रेरणा घेतल्याची माहिती दिली आहे.दिप्तीच अपहरण झाल्यानंतर दोनच दिवसांत अपहरणकर्त्यांनी तिला काहीही इजा न करता सोडून दिल्याने तसंचं खंडणीचा कोणताही फोन न आल्याने अपहरणामागचं नेमक कारण काय होतं याचा पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पोलिसांना अगोदरपासून कोणीतरी ओळखीची व्यक्ती या अपहरणात सहभागी असल्याचा संशय होता. दिप्तीच अपहरण करण्यापुर्वी गेली 14 महिने अपहरणकर्ता दिप्तीवर लक्ष ठेवून होता. अपहरणकर्त्यांने दिल्ली मेट्रोमध्ये दिप्तीला पाहिल होतं त्यानंतर सलग तो तिच्यावर लक्ष ठेवून होता.याअगोदरही चित्रपटातून प्रेरणा घेऊन चोरी, फसवणूक, हत्या झाल्याच्या घटना समोर आल्यात ज्यामध्ये धूम, खोसला का घोसला, मुन्नाभाई एमबीबीएस सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
- =============================================
न्यायाधीश वाघेला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
- मुंबई, दि. १५ - न्यायाधीश धीरेंद्र हिरालाल वाघेला यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. दरबार हॉल, राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारोहात राज्यपाल विद्यासागर राव यांनी न्या. वाघेला यांना पदाची शपथ दिली.राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी न्या. वाघेला यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींनी जारी केलेली अधिसूचना वाचून दाखविल्यानंतर राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली.मुंबई येथे बदलीवर येण्यापूर्वी न्या. वाघेला ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर कार्यरत होते. मुंबई उच्च न्यायालचे मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शाह यांचा कार्यकाल ८ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर न्या. विजया कापसे ताहीलरामाणी या मुख्य न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होत्या.शपथविधी समारोहाला राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, महाधिवक्ता श्रीहरी अणे, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. एस आर बन्नूरमठ, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड तसेच शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.न्या. वाघेला यांचा जन्म ११ ऑगस्ट १९५४ रोजी राजकोट येथे झाला. त्यांनी राजकोट येथून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सौराष्ट्र विद्यापीठातून एलएलबी ही पदवी प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. सन १९७६-७७ साली त्यांनी एलएलएम ही पदवी प्राप्त केली. न्या. वाघेला यांनी १९७८ साली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली व श्रम तसेच औद्योगिक न्यायालयात काम केले.सन १९९९ साली त्यांची गुजरात उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती झाली. मार्च २०१३ साली त्यांना बढती देण्यात येऊन कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावर नियुक्त करण्यात आले. दिनांक ४ जून २०१५ रोजी त्यांची ओरिसा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश पदावर बदली करण्यात आली.
दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला
- नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुख्यालयावर दगड फेकले, असा आरोप माकपने केला आहे. तर ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाने आपण आम आदमी सेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राजकारणावरून वातावरण तापले असतानाच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर या कार्यालयाचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नायजेरिया; बोको हरामच्या हल्ल्यात ३० ठार
- कानो (नायजेरिया) : उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली.नायजेरियात बोको हराम ही जिहादी संघटना सक्रिय आहे. या संघटनेला बऱ्याच प्रमाणात नेस्तनाबूत करण्यात आल्याचा दावा अध्यक्ष मुहंमद बुहारी यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा दावा किती पोकळ आहे, हे त्यातून दिसून येते. बोको हराम कट्टरवाद्यांशी लढा देणाऱ्या सरकारी लष्कराला स्थानिक सतर्कता समिती मदत करते. या समितीचे सदस्य मुस्तफा करीम बे यांनी सांगितले की, बंदूकधारी हल्लेखोर दुचाकी आणि अन्य वाहनांतून आले होते.
वेतन आयोगामुळे तुटीचे संकट
- नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी चालली असली, तरी आयोगाच्या शिफारशींमुळे सरकारच्या आर्थिक स्थितीवर मोठा दबाव पडणार आहे. सरकारचे राजकोषीय गणित त्याने बिघडलेच, शिवाय देशातील महागाईही मोठ्या प्रमाणात वाढेल. डॉयचे बँकेने एका अहवालात ही तथ्ये समोर आणली आहेत.जागतिक पातळीवरील वित्तीय सेवा देणारी कंपनी डायचे बँकेने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले आहे की, सरकार महसुली तूट नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य यंदा गाठील. तथापि, सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर पुढील वर्षी म्हणजेच २0१६-१७ या आर्थिक वर्षात हे लक्ष गाठणे सरकारला शक्य होणार नाही. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.८ टक्क्यांपर्यंत महसुली तूट जाऊ शकेल. हे प्रमाण खूपच मोठे आहे.डायचे बँकेने जारी केलेल्या संशोधन टिपणात म्हटले आहे की, सरकारने सुधारित मध्यम अवधीच्या योजनेनुसार महसुली तुटीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार महसुली टप्प्याटप्प्याने घटविण्यात येत आहे. २0१६-१७ मध्ये महसुली तूट जीडीपीच्या ३.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदा ते गाठले जाऊ शकते. तथापि, पुढील वर्षी सातव्या वेतन आयोगामुळे सरकारचे वेतनाचे बिल प्रचंड वाढणार आहे. त्या तुलनेत महसुलाचे प्रमाण वाढणार नाही. त्यामुळे महसुली तूट ३.५ टक्क्यांवर मर्यादित ठेवणे सरकारला शक्य होणार नाही. जागतिक पातळीवर ब्रोकरेज फर्म म्हणूनही काम करणाऱ्या डायचे बँकेने अहवालात म्हटले की, यातून मधला मार्ग म्हणून भारत सरकार महसूल तूट जीडीपीच्या ३.८ टक्के ठेवण्यास प्राधान्य देईल. हे प्रमाण अधिक असेल तरी २0१५-१६ च्या निर्धारित लक्ष्याच्या तुलनेने कमी आहे. २0१५-१६ मध्ये महसुली तुटीचे उद्दिष्ट ३.९ टक्के आहे.डायचे बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाचा काही पातळ्यांवर सकारात्मक परिणामही दिसून येणार आहे. विशेषत: कौटुंबिक पातळीवरील गुंतवणूक त्यामुळे आगामी दोन वर्षांत वाढणार आहे. देशांतर्गत गुंतवणुकीच्या गरजा भागविण्यास त्यातून मदत होईल. विदेशी गुंतवणुकीवरील अवलंबित्व त्यातून काही प्रमाणात तरी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे चालू खात्यातील तूट अप्रत्यक्षरीत्या कमी होईल.
सरकारी बँकांना बसला १२ हजार कोटींचा फटका
- नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या एनपीएमुळे (अनुत्पादित संपत्ती) तोटा वाढत चालला आहे. तिमाही आकडेवारीनुसार या बँकांचा तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला आहे. यात बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया आणि आयडीबीआय यासारख्या बँकांचा समावेश आहे, तर एसबीआय, पीएनबी आणि कॅनरा बँकेच्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.बँक आॅफ बडोदाला ३,३४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एखाद्या बँकेचे हे आतापर्यंतचे सर्वात मोठे तिमाही नुकसान आहे. आयडीबीआय बँकेला २,१८४ कोटी रुपयांचा, तर बँक आॅफ इंडियाला १,५०५ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. याशिवाय युको बँकेला १,४९७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे
देशद्रोहाला पाठिंबा हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का?- अमित शहा
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष्य केले. ‘हीच काँग्रेसच्या राष्ट्रवादाची नवी व्याख्या आहे का’, या मथळ्याखाली लिहिलेल्या ब्लॉगमध्ये अमित शहा यांनी जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या देशविरोधी कारवाया आणि त्याला असणारा काँग्रेसचा पाठिंबा यावर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष जेएनयू विद्यापीठात सुरू असलेल्या या कारवायांना पाठिंबा आणि प्रोत्साहन का देत आहे, असा सवालही शहा यांनी विचारला. तसेच ज्या पक्षाच्या नसानसांत हिटलरशाही भिनलेली आहे त्यांच्याकडून भाजपला राष्ट्रवाद शिकण्याची गरज नाही, असेही शहांनी ठणकावून सांगितले. केंद्र सरकार यशस्वी कामगिरी करत असताना काँग्रेसला साधी एका जबाबदार राजकीय पक्षाची भूमिकाही पार पाडत आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षात औदासिन्य आलेले आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना एखादी गोष्टी देशद्रोही आहे किंवा नाही, यातील फरक कळेनासा झाल्याचे टीकास्त्र शहा यांनी सोडले. राहुल गांधी सध्याच्या सरकारची तुलना हिटलरच्या काळातील नाझी राजवटीशी करत आहेत. मात्र, ते एक गोष्ट विसरत आहेत ती म्हणजे, इंदिरा गांधी यांच्या नेत्तृत्वकाळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमुळे भारत तेव्हाच त्या पातळीपर्यंत पोहोचला होता. राहुल गांधी आता ज्या कम्युनिस्ट आणि डाव्यांचा कैवार घेत आहेत त्यांनाही आणीबाणीच्या काळात सोडण्यात आले नव्हते. सियाचेनमध्ये शहीद झालेल्या नऊ जवानांना राहुल गांधी याच जोमाने श्रद्धांजली वाहतील का?, सोनिया आणि राहुल गांधी यांनी देशातील १२५ कोटी जनतेला या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणीही अमित शहा यांनी ब्लॉगद्वारे केली.
=============================================
कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद नाहीच
नवी दिल्ली : लोकसभेमध्ये कॉंग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज दाखल करून घेण्यास नकार दिला. कॉंग्रेसला हा दर्जा हवा असेल, तर त्यांनी स्वत: न्यायालयात याचिका दाखल करावी, असे न्यायालयाने या वेळी सांगितले.
=============================================
घटनात्मक तरतुदीनुसार, लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपदासाठी संबंधित पक्षाकडे किमान 55 इतके संख्याबळ असणे आवश्यक आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या. भाजपनंतर तोच सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी, विरोधी पक्ष नेत्यासाठी आवश्यक असलेल्या संख्याबळापर्यंत ते पोचू शकले नव्हते. हा दर्जा मिळविण्यासाठी कॉंग्रेसने 2014 मध्येच लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे विचारणा केली होती. ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही कॉंग्रेसची मागणी धुडकावली होती. या वेळी महाजन यांनी 1980 आणि 1984 मध्येही याच कारणामुळे विरोधी पक्ष नेतेपद रिक्त असल्याचे निदर्शनास आणून दिले. कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते पद सध्या ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आहे.
या निर्णयामुळे कॉंग्रेसला धक्का बसल्याचे मानले जाते. सर्वांत मोठा विरोधी पक्ष या नात्याने हा दर्जा मिळावा, यासाठी कॉंग्रेसने अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, केंद्र सरकारने प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवल्याने कॉंग्रेस हतबल झाले आहे. विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट दर्जा मिळण्याबरोबरच विविध संसदीय समित्यांवर त्याची नियुक्ती होत असते. त्यामुळेच कॉंग्रेस या दर्जासाठी प्रयत्नशील आहे.
=============================================
कॉंग्रेस नेता म्हणतो "अफजल गुरुजी'
नवी दिल्ली - भारतीय संसदेवर 2001 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या अफजल गुरु या दहशतवाद्याचा उल्लेख कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी "जी‘ हे आदरार्थी संबोधन वापरुन केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले.
सुरजेवाला जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) सध्या तणावग्रस्त असलेल्या प्रकरणाबद्दल बोलत होते. आपल्या न्यायव्यवस्थेवर जर आपला विश्वास नसता; तर न्यायव्यवस्थेमधील सर्व पर्याय वापरुन झाल्यानंतर अफजल गुरुजी यांना फाशी देण्यात आली नसती, असे विधान सुरजेवाला यांनी केले. यानंतर गुरु याचा उल्लेख आदरार्थी केल्याबद्दल माफी मागत आपल्याकडून चुकून असा उल्लेख झाल्याची सारवासारव सुरजेवाला यांनी केली. सुरजेवाला यांच्या विधानामुळे सध्या सुरु असलेल्या राजकीय वादळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
सुरजेवाला जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) सध्या तणावग्रस्त असलेल्या प्रकरणाबद्दल बोलत होते. आपल्या न्यायव्यवस्थेवर जर आपला विश्वास नसता; तर न्यायव्यवस्थेमधील सर्व पर्याय वापरुन झाल्यानंतर अफजल गुरुजी यांना फाशी देण्यात आली नसती, असे विधान सुरजेवाला यांनी केले. यानंतर गुरु याचा उल्लेख आदरार्थी केल्याबद्दल माफी मागत आपल्याकडून चुकून असा उल्लेख झाल्याची सारवासारव सुरजेवाला यांनी केली. सुरजेवाला यांच्या विधानामुळे सध्या सुरु असलेल्या राजकीय वादळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
बाचा खान विद्यापीठः शिक्षक बाळगणार शस्त्रास्त्रे
पेशावर- खैबर पख्तुन्वा भागातील बाचा खान विद्यापीठात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बंद असलेले विद्यापीठ आजपासून (सोमवार) पुन्हा सुरू झाले आहे. विद्यापीठातील शिक्षकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पेशावर जवळ असलेल्या बाचा खान विद्यापीठावर तालिबानी दहशतवाद्यांनी 20 जानेवारी रोजी हल्ला केला होता. यावेळी झालेल्या हल्ल्यात 21 जण ठार झाले होते. हल्ला झाल्यापासून विद्यापीठ बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आजपासून ते खुले करण्यात आले आहे. विद्यापीठात संरक्षणासाठी केवळ शिक्षकांना शस्त्रास्त्र बाळगण्यास परवानगी देण्यात आलेली आहे, अशी माहिती कुलगुरू पझल रहीम मारवत यांनी दिली.
दरम्यान, डिसेंबर 2014 मध्ये पेशावर येथील लष्कराच्या शाळेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 150 जण ठार झाले होते. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा समावेश होता.
=============================================
सिरीयात रुग्णालयावर क्षेपणास्त्र हल्ला; 10 ठार
बैरूत- उत्तर सिरीयातील एका लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्रद्वारे हल्ला करण्यात आला असून, यामध्ये 10 जण ठार झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुर्की सीमेवर अझाझ नावाचे गाव आहे. गावातील लहान मुलांच्या रुग्णालयावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाला. यामध्ये 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले व गर्भवती महिलांचा समावेश आहे. दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रशियाने हे क्षेपणास्त्र डागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
=============================================
राहुल गांधी यांनी माफी मागावी: अमित शहा
नवी दिल्ली - जवाहरलाल नेहरु विद्यापीठामधील (जेएनयु) प्रकरणास कॉंग्रेस पक्ष निव्वळ नैराश्यापोटी पाठिंबा देत असल्याचे टीकास्त्र भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (सोमवार) सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात मिळविलेला विजय सहन होत नसल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आता राष्ट्रद्रोही घटकांनाही पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याची टीका शहा यांनी केली. शहा यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही यावेळी लक्ष्य केले. देशातील महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था फुटीरतावादी आणि राष्ट्रद्रोही कृत्यांचा अड्डा होत असताना केंद्र सरकारने शांत रहावे, अशी राहुल यांची अपेक्षा आहे काय, अशी विचारणा शहा यांनी आपल्या ब्लॉगमधून केली आहे.
"राहुल यांनी सद्यस्थितीमधील भारताची तुलना हिटलरकालीन जर्मनीशी केली आहे. मात्र भारतामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात पुकारण्यात आलेली आणीबाणीकालीन परिस्थिती ही हिटलरकालीन जर्मनीमधील परिस्थितीशी मिळतीजुळती होती. हिटलरसदृश हुकूमशाहीची मानसिकता ही कॉंग्रेसच्याच डीएनएमध्ये आहे. अफझल गुरुला सहानुभुती दर्शविणाऱ्यांना पाठिंबा देऊन राहुल कोणत्या स्वरुपाच्या देशभक्तीचे प्रदर्शन करत आहेत? राहुल यांनी देशाची माफी मागावयास हवी,‘‘ असे शहा यांनी म्हटले आहे.
=============================================
बाशर असद यांना बळाने हटवू: सौदी अरेबिया
"असद यांना जावे लागेल, यात कोणतीही शंका बाळगण्याची आवश्यकता नाही. एकतर शांतापूर्ण राजकीय शांतता प्रक्रियेद्वारे ते आपले पद सोदतील; वा त्यांना बळाने पदावरुन हटविले जाईल,‘‘ असे जुबैर म्हणाले. सीरियावर सौदी अरेबिया आक्रमण करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने तुर्कस्तानमधील लष्करी तळावर सैन्य व लढाऊ विमाने पाठविली आहेत.
=============================================
भारतीय शिक्षणपद्धतीत परिवर्तनाची गरज- भागवत
पिंपरी- "जीवनाच्या संघर्षात आत्मविश्वासाने पुढे जाणारा माणून घडवायचा असल्यास प्रायोगिक शिक्षण पद्धती विकसित करावी लागेल,‘‘ अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (सोमवार) भारतीय शिक्षणपद्धतीत परिवर्तनाची गरज व्यक्त केली. ""आजच्या तंत्रज्ञान- विज्ञानाच्या बदलत्या युगात कालसुसंगत- मूल्याधारित शिक्षण पद्धती विकसित करण्याची वेळ आली आहे,‘‘ असे विचारही त्यांनी या वेळी मांडले.
"क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती‘ संचलित "पुनरुत्थान समरसता गुरुकुलम‘ आश्रमशाळेच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित "एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सवा‘त ते बोलत होते. या वेळी त्यांनी आश्रमशाळेला भेट देऊन येथील शिक्षण आणि कार्यपद्धतीची जाणून घेतली. "गुरुकुलम‘चे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह ऍड. सतीश गोरडे, अहमदाबादमधील इंदुमती काटदरे, महेश शर्मा (झाबुआ), डॉ. प्रभाकर मांडे (औरंगाबाद) या प्रसंगी उपस्थित होते.
भागवत म्हणाले, "प्रचलित शिक्षण पद्धती आणि प्रायोगिक शिक्षण पद्धती या बाबत अनेक मतप्रवाह आहेत. मात्र, या दोन्हीही शिक्षण पद्धतीपासून समाजातील मोठा वर्ग शिक्षणापासून वंचित आहे. या वंचित घटकांना शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रात फिनलॅंड हा देश जगभरात अग्रभागी आहे. वेगळ्या प्रकारच्या शिक्षण पद्धती कास धरल्याने देशाने शिक्षणात प्रगती साधलीय. अशाच प्रकारे भारतीय शिक्षण प्रणालीतही अमूलाग्र बदलांची आवश्यक आहे. मूल्याधिष्टित शिक्षण निर्माण करणे काळाची गरज आहे. तथापि, ते करत असताना केवळ मूल्यांना चिकटून राहाणेही अयोग्य आहे. तर, शक्य तितके प्रयोग करणे महत्त्वाचे आहे. वेगळ्या प्रयोगांची माहिती घेणे, पाहणी करणे, चर्चा करणे, आदान- प्रदान करणे आणि निरीक्षणातून कालसुसंगत दिशा देणेही गरजेचे आहे.‘‘
|
यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर
नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्ती तसेच संस्थाना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. अशा पद्धतीने दिल्या जाणाऱ्या विद्यापीठाच्या २०१५ च्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सोमवारी नाशिक येथे केली.
“विशाखा काव्य पुरस्कार”
कवी कुसुमाग्रजांच्या “विशाखा” या काव्यसंग्रहाच्या नावाने कुसुमाग्रज प्रतिष्ठान व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे “विशाखा काव्य पुरस्कार” खालील काव्यसंग्रहांना जाहीर झाले आहेत. २१,००० रुपयांचा प्रथम पुरस्कार “अंधारवर्तुळातील वेदनापट” या नेरूर (कुडाळ, जि. रत्नागिरी) येथील कवी अरुण नाईक यांच्या काव्यसंग्रहास १५,००० रुपयेचा द्वितीय पुरस्कार “मॅगेझिनितून सुटतेय गोळी” या लोणंद (माळशिरस, पुणे) येथील कवयित्री बालिका ज्ञानदेव बिटले यांच्या काव्यसंग्रहास तर १०,००० रुपयेचा तृतीय पुरस्कार जळगाव येथील कवी डॉ. अस्मिता गुरव यांच्या “तूर्त इतकंच” या काव्यसंग्रहास दिला जाणार आहे.
‘शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’
पारंपरिक शिक्षणाच्या क्षेत्रात वैचारिक लेखन, संशोधन, प्रकल्प राबविणे, प्रयोग करणे यासाठी ‘शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ संस्थेला आणि व्यक्तीला एक वर्षाआड आलटून पालटून दिला जातो. सन २०१५ च्या या पुरस्कारासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद्तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांची निवड करण्यात आली आहे. २१,००० /- रुपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
“रूक्मिणी पुरस्कार”
कृषी, ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, कला, क्रीडा, पत्रकारिता, प्रशासन आणि आरोग्य, अशा विभिन्न क्षेत्रांत गेल्या दशकात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलेस विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या “रूक्मिणी” पुरस्कारासाठी श्रीमती प्रेरणा केशव सहाणे (सांगवी, पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. रु. २१,००० /- रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘‘बाबुराव बागुल कथालेखक पुरस्कार’’
ज्येष्ठ साहित्यिक, कथालेखक बाबुराव बागुल यांच्या नावाने कथा लेखनासाठी विद्यापीठातर्फे बाबुराव बागुल कथालेखक पुरस्कार दिला जातो. सन २०१५ च्या या पुरस्कारासाठी गोंदी (अंबड, जालना) येथील विजय जाधव यांच्या ‘दाखला’ कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान विद्यापीठातर्फे वरील पुरस्कारांपैकी विशाखा आणि रूक्मिणी पुरस्कारांचे वितरण १२ मार्च रोजी तर डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार आणि बाबुराव बागुल पुरस्कार २१ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयात होणाऱ्या विशेष समारंभात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. त्याबाबतची माहिती पुरस्कारार्थींना स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येईल अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे व विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र प्रमुख प्रा. डॉ. विजया पाटील यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
=============================================मराठी साहित्य संमेलन बरखास्त करा: कर्णिक
जळगाव - मुंबई-पुण्यात भरविण्यात येणारे मराठी साहित्य संमेलनात केवळ पुणे-मुंबईतील साहित्यिकांचे वर्चस्व असते. खऱ्या साहित्याला या संमेलनात व्यासपीठ मिळू शकत नाही. म्हणून उर्वरित महाराष्ट्रातील साहित्याला न्याय देता येत नसेल, असे मराठी साहित्य संमेलन बरखास्त केलेलेच बरे, या शब्दांत आजच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक मधु मंगेश कर्णिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
उद्घाटनपर भाषणात कर्णिक म्हणाले, की खऱ्या साहित्यांची जिथे कदर नाही असे मराठी साहित्य संमेलन मंडळच बरखास्त करावे आणि तेच पैसे साहित्यिकांना अनुदान म्हणून दिले जावे, असे विचार साहित्यिक कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. या साहित्य संमेलनामुळे खानदेशमध्ये नवे वाङ्मय पर्व सुरू होत आहे. खानदेशच्या मातीचे हे ऋण आहेत. साहित्यामुळे सत्त्व, त्यापासून ममत्व आणि ममत्त्वातून माणसे जोडली जाऊन समाजात एकत्व तयार होतं. सहत्व ते एकत्व साधत तेच खरं साहित्य. एकात्म समाजनिर्मिती हेच साहित्याचे ध्येय असते. अशा प्रकारच्या लहान लहान साहित्य संमेलनातून होणारी साहित्य वाढ ही आनंदाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
इसिसकडून अमेरिकेत हल्ल्याची भीती - सीआयए
"पॅरिस येथे झालेला हल्ला हे गुप्तचर संस्थेचे अपयश होते. इसिस अशा स्वरुपाचा हल्ला घडविण्याच्या प्रयत्नांत आहे, याची काही दिवसांपूर्वी कल्पना आली होती. मात्र या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशावाद्यांनी तंत्रज्ञानाच्या नव्या साधनांचा फायदा करुन घेतला. अशा स्वरुपाचे हल्ले घडविण्यासाठी चिथावणी देणे, हस्तक पेरणे वा स्फोटके पुरविण्याच्या प्रयत्नांमध्ये इसिस असल्याचा माझा अंदाज आहे. त्यामुळे असे हल्ले घडविण्याचे प्रयत्न सतत होत राहणे अटळ आहे,‘‘ असे ब्रेनन म्हणाले.
पाश्चिमात्य देश व मुस्लिम जगतामध्ये अधिकाधिक संघर्ष निर्माण करुन मुस्लिम तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नांमध्ये इसिस असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदविले. याचबरोबर, इसिसकडे छोट्या प्रमाणावर रासायानिक शस्त्रास्त्रे तयार करण्याचीही क्षमता असल्याचाही सीआयएचा अंदाज असल्याचे ब्रेनन यांनी सांगितले.
=============================================
खाप पंचायतीविरोधात पित्याची न्यायालयात धाव
बरमेर (राजस्थान)-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंगा गावातील खाप पंचायतीने 12 वर्षीय मुलीचा 35 वर्षीय पुरुषासोबत विवाह लावून देण्याचा आदेश गनाराम प्रजापत यांना दिला होता. आदेश मान्य नसेल तर 25 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर खाप पंचायतीमधील 17 सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.
=============================================
मुंबई- गुगल या नामांकित सर्च इंजिनच्या होमपेजवर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी शिवरायांचे डुडल प्रदर्शित व्हावे आणि शिवरायांचे जीवन संपूर्ण जगापर्यंत पोचविण्यासाठी आता जगभरातील शिवप्रेमींनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. येत्या 19 फेब्रुवारीला गुगलने डुडलद्वारे महाराजांचे कार्य दाखवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
गुगल डुडलच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक लोकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये इतिहास, तत्त्वज्ञ, शिक्षण, सांख्यिकी, विज्ञान, राजकारण, समाजकारण यांसह अनेक क्षेत्रांतील मान्यवरांना स्थान देण्यात आले आहे. शिवजयंतीला आता थोडाच अवधी शिल्लक असल्याने आता या नव्या दमाच्या मावळ्यांनी तंत्रज्ञानाची शिदोरी घेऊन ऑनलाइन मोहीम उघडली आहे. यासाठी इंटरनेट युजर्सना proposals@google.com या गुगलच्या अधिकृत ई-मेलवर शिवाजी महाराजांच्या डुडलची मागणी करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच http://change.org/shivajidoodle या लिंकवर जाऊन यूजर्स या संकेतस्थळाद्वारे डुडलसाठी समर्थन देऊ शकतात. हे संकेतस्थळ जगभरातील फोरम्सवर कार्यरत असून, आज दुपारपर्यंतच सुमारे 14 हजार शिवप्रेमींनी याला पाठिंबा दर्शविला होता. सोशल मीडियावरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे या मागणीचा "ट्रेंड‘ जगभरात पोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज सायंकाळी सहा ते रात्री नऊ दरम्यान हॅशटॅगद्वारे माध्यमे आणि जगभरातील नेटिझन्सपर्यंत शिवरायांचे कार्य पोचवून सर्वांनाच या डुडलच्या मोहिमेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीला गुगलवरून प्रदर्शित होणारे डुडल हा टेक्नोसॅव्हींचा शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल असे मत शिवप्रेमी नेटिझन्सनी व्यक्त करत अधिकाधिक संख्येने या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
=============================================
नांदेड; श्रीरामनगरात अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा
प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षि डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपा आशिर्वादाने श्री रामेश्वर शिव मंदीर, श्रीराम नगर नांदेड येथे मि.वाघ 10, शके 1937 दि.17 फेब्रुवारी 2016 रोज बुधवार पासून ते दि.24 फेब्रुवारी 2016 पर्यंत अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कृतार्थ व्हावे.
अखंड शिवनाम सप्ताहामध्ये श्री ष.ब्र.108 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, श्री ष.ब्र.108 सांबशिवाचार्य महाराज व दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री ष.ब्र.108 करबसव शिवाचार्य महाराज लासिन मठ वसमत, श्री ष.ब्र.108 विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री ष.ब्र.108 शिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री ष.ब्र.108 निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज नागठाणा, श्री ष.ब्र.108 रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड या गुरुवर्यांची उपस्थिती व अमृतउपदेश होणार आहेत.
दैनंदिन कार्यक्रम रोज सकाळी पहाटे 5 ते 6 शिवपाठ, सकाळी 6 ते 8 रुद्राभिषेक, 9 ते 11 परमरहस्य पारायण, 11 ते 12 प्रवचन, दुपारी 12 ते 3 प्रसाद, 3 ते 5 मन्मथ गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 प्रवचन, रात्री 8.30 ते 11 शिवकिर्तन नंतर शिवजागर राहील.
बुधवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.सौ.कमलबाई विश्वनाथ स्वामी शारदानगर, किर्तनकार शि.भ.प.किशन पाटील ताकबिडकर, अन्नदाते श्री माणिकराव विठ्ठलराव नरंगले, गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार श्री ष.ब्र.108 विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, किर्तनकार शि.भ.प.होणराव गुरुजी नागरजांब, अन्नदाते श्री कपिल गोविंदराव हत्ते हनुमानगड, शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.शशिकांत सिद्रामआप्पा पाटील कौठा नांदेड, किर्तनकार शि.भ.प.सौ.कावेरीताई किशनराव मुदखेडे, अन्नदाते श्री विलास मानेजी डिग्रसे, शनिवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.मानेजी सोमाने साहेब मालेगाव, किर्तनकार शि.भ.प.मन्मथ आप्पा डांगे गुरुजी उस्माननगर, अन्नदाते श्री वानखेडे कोचिंग क्लासेस शारदानगर नांदेड, रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.सौ.इंदुमती शांताराम ऐजगे मगनपूरा, किर्तनकार शि.भ.प.काशिनाथ आप्पा सांगवे आ.पा.शिरुर, अन्नदाते श्री गजानन मनोहर सुपारे सगुना उडपी, सोमवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.मारोतराव नळगे आप्पा खेडकरवाडी, किर्तनकार शि.भ.प.बाबुराव पा.सोनटक्के करंजीकर, अन्नदाते श्री रमाकांत बाबुराव थोटे गोविंदनगर, मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रवचनकार शि.भ.प.ईश्वर रामलिंग स्वामी सावरगावमाळ, बालकिर्तनकार शि.भ.प.कु.संगिता गणेश मस्कले रुईकर, अन्नदाते श्री गोविंदराव गंगाराम सोनटक्के व टाळ आरतीवरील किर्तन दुपारी 4 वा, शि.भ.प.परिक्षीत ओमप्रकाश स्वामी माळसावरगाव, बुधवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी प्रसादावरील किर्तन सकाळी 11 ते 1 व किर्तनकार शि.भ.प.किर्तन पंडित, भूषण स्वामी वाखारीकर यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होईल.
श्री ष.ब्र.108 सदगुरु विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांचा शंकरतुला श्री मा.माणिकराव विठ्ठलराव नरंगले यांच्यातर्फे गुरुवार दि.18 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता साजरा होणार आहे.
विणेकरी श्री बाबुराव चाकोते, रितेश घाळे, सुरेश हिंगमीरे, लक्ष्मण सोनवळे, बालाजी तुपलवाड, विठ्ठलराव भुरे, बळीराम खेळगे, संतोष चाकोते, नागोराव धुळशेटे, रामराव सोनटक्के, मुक्तेश्वर खाकरे, रवि घाळे, राजु सोनटक्के, प्रशांत सोनटक्के, अविनाश गोंड, जगदिश सोनटक्के, त्र्यंबक मंगनाळे, माणिकराव नरंगले, हार्मोनिअम वादक श्री नंदुआप्पा देवणे, विश्वांभर सावळे, भुरेआप्पा शिराढोणकर, मनोज पेंटर रुईकर, मृदंगवादक श्री दिगांबर पा.धानोरकर, मारोती स्वामी, उत्तमराव घाडगे, हानमंत देशमुख, गायक श्री अनिल भालेराव, जनार्धन बेंद्रीकर, नंदुआप्पा देवणे, हानमंत पेंटर आंजणीकर, बालाजी भुरे, त्र्यंबक पावडे, लाठकर, भालेराव गुरुजी, प्रल्हाद होळगे, महिला व पुरुष भजनी मंडळ मगनपुरा, पेनूर, अंबेकरनगर, चैतन्यनगर, सिडको, सुगांव बु, लोणी बु,बारसगाव, वाहतुकनगर, जिंदमनगर हडको, पांडुरंगनगर, खुरगाव, नांदुसा, आरळी, गौवळीपुरा व बसवेश्वरनगर नांदेड.
या अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळयाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ व गुरुवर्यांचा अमृत उपदेश घेऊन आपले जिवन कृतार्थ करुन घ्यावे, असे आवाहन श्री रामेश्वर शिवमंदीर नवयुवक सदभक्ती मंडळ व समस्त श्रीरामनगर, हनुमानगड सदभक्ती मंडळी व रामेश्वर शिव महिला व पुरुष भजनी मंडळ, रामेश्वर शिवमंदीर श्रीराम नगर नांदेड यांनी केले आहे.
=============================================फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत - जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर
नांदेड, 15- फुलवळ सर्कल मधील वाडी तांडे विकसित करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी केले.
फुलवळ येथे जिल्हा नियोजन समितीच्या किमान दर्जा कार्यक्रमांतर्गत फुलवळ ते महादेव माळ तांडा रस्त्याचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुख्य रस्त्यावरुन एक किलोमिटर जोड रस्त्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
यावेळी उपसरपंच धोंडीबा मंगनाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संजय भोसीकर, खंडेराव पांडागळे, भिमराव राठोड, सदाशिव पटणे, गंगाधर शेळगावे, हनमंतराव पेटकर, गणेश मंगनाळे, आनंदा पवार, लक्ष्मण राठोड, गोविंद चव्हाण, दिलीप बसवंते, लोभाजी राठोड, संचालक धोंडीबा बोरगावे आदींची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यापासून महादेवमाळ तांडयाला रस्ता नव्हता. जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या कामासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पुढे त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील वाडया, वस्त्या व तांडयांचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असून भौतिक सुविधा पुरविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज फुलवळ ते महादेव माळ तांडा रस्ते विकासाचा मुहूर्तमेढ रोवला आहे. काही महिण्यात हा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.
प्रारंभी ग्राम पंचायतीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आनंदा पवार यांनी मानले.
रोजगार, चारा, पाण्यासाठी मराठवाडा समन्वय समितीने केले धरणे आंदोलन
मुखेड :-
तालुक्यातील सर्व गावात दुष्काळ निवारण कार्यक्रम म्हणुन रोजगारासाठी मनरेगा योजनेतुन मजुरांना कामे द्यावी, जनावरांना चारा व गावक-यांना पाणी उपलब्ध करुन द्यावे यामागणीसाठी मराठवाड़ा समन्वय समितीच्यावतीने आज १५ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याआंदोलनास अनेक एन.जी.ओ.संघटनांनी पाठिंबा देवुन सहभाग घेतला.तालुक्यात सामान्य नागरिकांना दुष्काळाच्या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रोजगारासाठी अनेक तरुण, बेरोजगार, मजूर, कामगार महानगरात गेले होते मात्र शासनाने पिण्यासाठी पाणी राखुन ठेवण्याचे धोरण राबविल्याने इमारती बांधावयाची कामे बंद केले आहेत. यामुळे महानगरात गेलेला कामगार, बेरोजगारांचा लोंढा गावाकडे परतत आहे. येत्या २ महिण्यात ऊस तोडणीसाठी गेलेले मजदूर मजूर सुध्दा गावाकडे परत येतील तेंव्हा त्यांच्याही हाताला काम द्यावे लागेल. सध्याही अनेक गावात मजुरांना काम नाही, कामाची मागणी करणारा नंबर ४ चा फार्म भरुन दिल्यास संबंधित ग्रामसेवक पोचपावती देत नाही कारण पोचपावती दिली की महाराष्ट्र ग्रामीण रोजगार जमीन योजना मनरेगा मधुन त्यांना काम देने बंधनकारक असल्याने ग्रामसेवक पोचपावती देत नाहीत. शासन निर्णयानुसार गावपातळीवर दुष्काळ निवारण कार्याचा आढावा घेण्यासाठी समित्या स्थापन होणे गरजेचे आहे, म्हणुन गावपातळीवर व तालुका पातळीवर समिती स्थापन करुन त्या समितीवर एनजीओ म्हणुन मराठवाड़ा समन्वय समितीची नियुक्ती करावी. तसेच दुष्काळ मजुरांना रोजगारासाठी मनरेगा योजनेतुन मजुरांना कामे द्यावी, जनावरांना चारा व गावक-यांना पाणी उपलब्ध करुन द्यावे यामागणीसाठी मराठवाड़ा समन्वय समितीच्यावतीने आज १५ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याआंदोलनात समन्वयक दत्ता तुमवाड यांच्या नेतृत्वामध्ये शेख जाकिर हुसेन बा-हाळीकर, अँड.मिलिंद कांबळे, आनंदा बनकर, शांताबाई येवतीकर, भिमराव शिंदे, पंचफुला बिराजदार, सायराबी सरवर शेख, आनंदा बोरगावकर, भिमराव मेथीकर, प्रकाश बनसोडे, माधव लव्हटे, संघमित्रा गवळे, कमलाकर घोडके, पुष्पाबाई फिरंगवाड, बाबाजी गवळे, सचिन जोंधळे, सटवाजी वाघमारे, गंगासागर सोनकांबळे, तुकाराम वाघमारे आदी सह अनेक एनजीओ, स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment