Thursday, 18 February 2016

नमस्कार लाईव्ह १८-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- कारगिल आमची चूक, वाजपेयींच्या पाठित खंजीर खुपसला - नवाझ शरीफ 
२- तुर्कस्तानमध्ये स्फोट; 28 ठार, 61 जखमी 
३- ..तर पाकिस्तानला दंड भरावा लागेल- पाकिस्तान क्रिकेट मंडळ 
४- इराकमध्ये किरणोत्सर्गी पदार्थाची चोरी 
५- अमेरिकेच्या हल्ल्यांत 'इसिस'चा निधी नष्ट 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
६- जेएनयू प्रकरण : कन्हैयावरचा देशद्रोहाचा खटला मागे घेण्याची शक्यता  
७- देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर 
८- भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत अवघी रु. 251
९- २५१ रुपयात स्मार्टफोन देणा-या कंपनीची चौकशी ? 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- अतिरेक्यांचं मोठं नेटवर्क नेस्तनाबूत, सिमीचे 3 दहशतवादी अटकेत 
११- नागपूर; मकोका गुन्हेगाराला पोलिसाचा 72 वेळा फोन, फरार होण्यास पोलिसाची मदत 
१२- ज्वलनशील पदार्थ स्टेजखाली ठेवल्याने आग लागली: आशिष शेलार 
१३- मराठवाड्यात अखेर चारा छावण्या सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश 
१४- दिलदार खय्याम, 90व्या वाढदिवसानिमित्त 10 कोटींंचं दान 
१५- नाशिक; नऊ विद्यार्थ्यांना दहा लाखांचे पॅकेज 
१६- आता कोलकत्यामध्येही अफजल गुरुचे समर्थन 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- भिवंडी; आरोपींना नेणाऱ्या पोलीस व्हॅननंच घेतला पेट 
१८- सीतापुर; लग्नाच्या वरातीत गोळीबार, नवरदेवाचा गोळी लागून जागीच मृत्यू 
१९- लखनौ; दहावी परीक्षेत अर्जुन तेंडुलकरच्या बनावट अॅडमिट कार्ड जारी 
२१- लोकलमध्ये प्रवाशांची चोरांना विवस्त्र करुन मारहाण 
२२- बंगळूरू; अपघातात शरीराचे दोन तुकडे, तरीही तरुणाचं अवयवदान 
२३- यवतमाळ; स्कूलबसला अपघात, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू 
२४- पिंपरी; आगकाडीच्या पुनर्वापरातून पर्यावरणाचा समतोल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
निरंजन सांगवे, राजकुमार रघुवंशी, प्रवीण बनसोडे, बालाजी पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,पण....
एखाद्याच्या मनात घर करणे,यापेक्षा सुंदर काहीच नसते...यापेक्षा सुंदर काहीच नसते
(प्राची पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 
http://goo.gl/uS8DX4


========================================

नागपूर; मकोका गुन्हेगाराला पोलिसाचा 72 वेळा फोन, फरार होण्यास पोलिसाची मदत

मकोका गुन्हेगाराला पोलिसाचा 72 वेळा फोन, फरार होण्यास पोलिसाची मदत?
नागपूर: पोलिस आणि गुन्हेगार हे समीकरणच असे आहे की दोघात वैर जरी नसलं तरी मैत्री ही असू नये. मात्र, नागपूर पोलिसातील काही कर्मचारी गुन्हेगारांशी मैत्रीच ठेवत नाही, तर त्यांना पोलिसांची माहिती पुरवून फरार राहण्यास मदतही करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 
नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसात ५ टोळ्यांच्या ३३ गुंडांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करत नागपुरातील गुन्हेगारी मोडून काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. या ५ टोळ्यांमधील काही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले असले तरी संतोष आंबेकर, गौतम भटकर, शक्ती मनपिया, दिवाकर कोत्तुलवार, आशिष कोत्तुलवार असे सराईत गुंड मकोका लागल्यानंतर ही नागपूर पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यामुळे फरार गुंडाना शोधण्यासाठी नागपूर पोलिस जंग जंग पछाडत आहे. फरार गुन्हेगारांना केव्हापर्यंत गजाआड करणार अशी विचारणा केल्यास नागपूरचे वरिष्ठ पोलिस अधिकारी नाराज होतात. ‘तुम्हाला माहिती असल्यास तुम्हीच फरार गुंडांची माहिती द्या.’ असं उत्तर दिलं जातं. 
ही तर झाली नाण्याची एक बाजू. क्रिकेट बुकी अजय राऊत यांच्या अपहरण आणि पावणे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी दिवाकर कोत्तुलवारला नागपूर क्राइम ब्रांचचे काही कर्मचारी आणि अधिकारी फरार राहण्यास मदत करत असल्याचे समोर आले आहे. क्राइम ब्रांचच्या एका कर्मचारयाने अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणात फरार असलेल्या दिवाकर कोत्तुलवारला एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ७२ वेळा फोन केल्याचे आणि त्यापैकी ५३ वेळेला दोघांमध्ये बोलणे झाल्याचे उघड झाले आहे. विशेष बाब म्हणजे दोघांमधले हे संभाषण १५ ते २९ डिसेंबर २०१५ दरम्यानचे म्हणजेच अपहरण आणि खंडणीचे प्रकरण घडल्यानंतरचे आहे.
========================================

देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर 

देशाविरोधी कुणी काही बोलत असेल, तर शिक्षा व्हायलाच हवी : श्री श्री रविशंकर
नवी दिल्ली देशविरोधी कुणी बोलत असेल, मग तो यूनिव्हर्सिटीत बोलत असो, यूनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये बोलत असो, वा बाहेर बोलत असो, त्याला कायद्याने शिक्षा मिळायलाच हवी, असे परखड मत आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केलं आहे. 
“तो विद्यार्थी आहे आणि त्याने देशद्रोही वक्तव्य केलं असेल, म्हणून तू बरोबर कसं असू शकतं?”, असा सवालही श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित केला. 
“देशद्रोहाचं कुणी बोलत असेल, देशविरोधी बोलत असेल, तर त्याला कायद्यान्वये शिक्षा मिळायलाच हवी. नसेल शिक्षा द्यायची तर कायदाच काढून टाका आणि देशभरात सांगून टाका की, देशविरोधी काहीही बोलल्यास काहीही कारवाई होणार नाही. शिवाय, काहीही बोलण्याची सूट असल्याची घोषणाच करुन टाका.” असे श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले. 
कुणीतरी भडकवल्याशिवाय ही मुलं असे काही बोलणार नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 
“जगातील कोणत्याही देशात जा, सर्वत्र देशद्रोहासाठी कायदा आहेच आणि देशद्रोहाचं कुणी उल्लंघन करत असेल, तर त्याला त्यानुसार शिक्षा मिळायलाच हवी.”, असेही ते म्हणाले. 
श्री श्री रविशंकर पुढे म्हणाले, “कायदा ही एक शिस्त आहे, सामाजिक नियम आहे. स्वातंत्र्य ही एक वेगळी गोष्ट आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. मात्र, देशाविरोधी कुणी बोलत असेल, तर कारवाई व्हावीच.”
========================================

ज्वलनशील पदार्थ स्टेजखाली ठेवल्याने आग लागली: आशिष शेलार

ज्वलनशील पदार्थ स्टेजखाली ठेवल्याने आग लागली: आशिष शेलार
मुंबई: मेक इन इंडिया कार्यक्रमात चौपाटीवरील व्यासपीठाच्या खाली व्हिजक्राप्टने ज्वलनशील पदार्थ ठेवले  होते. त्यामुळे ही आग लागली.  असा संशय  आज मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार  आशिष शेलार यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यक्रमात व्यक्त केला. 
मुंबई  अग्निशमन दलात दाखल झालेल्या 16 नव्या अद्यावत गाड्यांचे लोकार्पण समारंभ आज भायखळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी  चौपाटीवरील  आगीच्या वेळी तत्परतेने काम करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांचे त्यांनी अभिनंदन व आभार मानले. 
ही आग आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थिती हाताळली त्याबद्दल त्यांचेही शेलार यांनी  अभिनंदन केले. तर मुंबईत सर्व सोसायटीमध्ये फायर अलार्म बसविण्यात यावे अशी सूचना पालिका  आयुक्तांना केली.
========================================

अतिरेक्यांचं मोठं नेटवर्क नेस्तनाबूत, सिमीचे 3 दहशतवादी अटकेत 

अतिरेक्यांचं मोठं नेटवर्क नेस्तनाबूत, सिमीचे 3 दहशतवादी अटकेत
मुंबई: देशभरात घातपात घडवण्याचे मनसुबे आखणाऱ्या 4 पैकी 3 कुख्यात अतिरेक्यांना बेड्या घालण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. अतिरेक्यांविरोधात उघडलेल्या ऑपरेशनचं हे सर्वात मोठं यश मानण्यात येत आहे. 
ओदिशाचं विशेष तपास पथक, तेलंगाणा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या संयुक्त कारवाईत भुवनेश्वरमधून तिघांना अटक करण्यात आली आहे. 2013 मध्ये मध्यप्रदेशातल्या खंडवा जेलमधून पसार झालेल्या चौघांनीच हल्ल्याचा प्लॅन आखला होता. 
मेहबूब शेख उर्फ गुड्डू, जाकिर हुसैन उर्फ सादिक, अमजद रेहमान आणि मोहम्मद सलाख अशी या चौघांची नावं आहेत. त्यातल्या तिघांना आता बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सिमी या नेस्तनाबूत झालेल्या अतिरेकी संघटनेचे हे सदस्य आहेत. त्यांच्याच शोधासाठी 6 राज्यांच्या तपास यंत्रणांनी आतापर्यंतचं सर्वात मोठं कोम्बिंग ऑपरेशन पार पाडलं. 
धक्कादायक माहिती ही की या चारही जणांनी जळगाव, मुक्ताईनगर, सोलापूर या शहरात आपलं नेटवर्क विस्तारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 
इतकंच नाही, तर मध्यप्रदेशातल्या खंडजवा, रतलाम, कर्नाटकातल्या गुलबर्गा, बिदर आणि बंगलोर, तर राजस्थानच्या जयपूर, उदयपूर, उत्तपद्रदेशातल्या मेरठ, बिजनौर आणि तामिळनाडूच्या चेन्नईत आपले हस्तक पेरल्याचंही समजतं आहे.
========================================

भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत अवघी रु. 251


भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच, किंमत अवघी रु. 251
मुंबई: भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 आज लाँच करण्यात आला आहे. 500 रुपये किंमतीला हा स्मार्टफोन असेल असा अंदाज सुरुवातीला वर्तविण्यात येत होता. मात्र, मोबाइल प्रेमींना आश्चर्याचा धक्का देत कंपनीनं अवघ्या 251 रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला आहे. 
या स्मार्टफोनच्या नावावरुनच समजतं की, हा सर्वात स्वस्त 3जी स्मार्टफोन असून ज्याची किंमत फक्त 251 रु. आहे. नोएडाच्या रिंगिंग बेल कंपनीनं हा स्मार्टफोन तयार केला आहे. ‘मेक इन इंडिया’, डिजिटल इंडिया या कार्यक्रमाच्या अंतर्गत या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन उद्या सकाळी 6 ते 21 फेब्रुवारी रात्री 8 वाजेपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 
अँड्रॉईड 5.1 ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या या स्मार्टफोनचा डिस्प्ले 4 इंच असणार आहे. ३जी कनेक्टिव्हीटी देखील यामध्ये मिळणार आहे. यामध्ये 1.3 गीगाहर्त्झ क्वॉड कोअर प्रोसेसर आहे. तर 1 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल मेमरीही आहे. तसेच 32 जीबी पर्यंत ही मेमरी वाढविताही येऊ शकते. 
तसेच या स्मार्टफोनमध्ये 3.2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तर 0.3 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये स्वच्छ भारत, वुमन सेफ्टी, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर यासारखे अॅप पहिल्यापासूनच इंस्टॉल असतील. 
याची बॅटरी 1,450mAh क्षमता असणार आहे. तसेच फोनच्या सर्विससाठी देशभरात 650 केंद्र असणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर 18 फेब्रुवारीपासून याची प्री-ऑर्डर नोंदणी करता येणार आहे.
========================================

आरोपींना नेणाऱ्या पोलीस व्हॅननंच घेतला पेट 

आरोपींना नेणाऱ्या पोलीस व्हॅननंच घेतला पेट
भिवंडी: कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील आरोपीना भिवंडी न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना भिवंडी कोर्टाच्यासमोर अचानक पोलिस व्हॅनलाच आग लागण्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे . 
कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील आरोपीना भिवंडी कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस व्हॅन क्रमांक एम.एच.०४ ए एन १४८० या गाडीने आणण्यात येत होते. वळण घेत असताना समोरील इंजिनला अचानक आग लागली. भिवंडी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. दरम्यान गाडीतील चालक व आत असलेल्या आरोपींनी भिवंडी कोर्टाच्या आवारात धाव घेत आपला जीव वाचविला. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
दरम्यान, अशाप्रकारे आरोपीना ने-आण करणाऱ्या पोलिस व्हॅनला आग लागल्याने पोलीस प्रशासनातील वाहनांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती होते कि नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
========================================

सीतापुर; लग्नाच्या वरातीत गोळीबार, नवरदेवाचा गोळी लागून जागीच मृत्यू

लग्नाच्या वरातीत गोळीबार, नवरदेवाचा गोळी लागून जागीच मृत्यू
सीतापूर भर मंडपात गोळीबार झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये घडली आहे. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात नवरदेवाचा मृत्यू झाला आहे. सीतापूरच्या प्रेम नगरमधील गेस्ट हाऊसमध्ये लग्नसोहळा सुरु होता. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. 
नवरदेव अमित वाजत-गाजत जात असलेल्या वरताती घोड्यावर स्वार होता. वरात जेव्हा मंडपाच्या जवळ पोहोचली, तेव्हा वरतीमधील काही जणांनी आनंदाच्या भरात गोळीबार सुरु केला. या गोळीबारादरम्यान एक गोळी नवरदेवाच्या डोक्याला लागली आणि तो जागीच मृत्युमुखी पडला. 
गोळी लागल्यावर जागीच पडलेल्या नवरदेवाने तिथेच अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, पोलीस सध्या अमितला चुकून गोळी लागली की, कुणी जाणीवपूर्वक गोळी मारली याचा शोध घेत आहेत.
========================================

जेएनयू प्रकरण : कन्हैयावरचा देशद्रोहाचा खटला मागे घेण्याची शक्यता 

जेएनयू प्रकरण : कन्हैयावरचा देशद्रोहाचा खटला मागे घेण्याची शक्यता
नवी दिल्ली जेएनयू प्रकरणात देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवरील देशद्रोहाचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. गृह मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने इकोनॉमिक टाईम्सने हे वृत्त दिलं आहे. 
कन्हैयाविरोधात कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत, तर त्याच्याविरोधात राजद्रोहाचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार व्हिडीओ टेपमध्ये कन्हैय्या घोषणा देत असलेल्या आवाज स्पष्ट नाही. यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली आहे. 
याचसोबत कन्हैयाने जर जामिनीसाठी अर्ज केला तर आमची त्याला हरकत नसेल असं दिल्ली पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कन्हैयावरचे आरोप मागे घेतला जाऊ शकतात ही शक्यता जोर धरायला लागली आहे.
========================================

दहावी परीक्षेत अर्जुन तेंडुलकरच्या बनावट अॅडमिट कार्ड जारी 

दहावी परीक्षेत अर्जुन तेंडुलकरच्या बनावट अॅडमिट कार्ड जारी
लखनौ : उत्तर प्रदेश माध्यमिक परीक्षा बोर्डात भ्रष्टाचाराचं नवं प्रकरण समोर आलं आहे. आग्र्यातील एका इंटर कॉलेजने दहावी परीक्षेसाठी चक्क क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा फोटो लावून अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. 
आग्र्यात आजपासून दहावी परीक्षेला सुरुवात होत आहे. सुमारे 1.6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्याच्या एक दिवस आधी हा प्रकार समोर आला आहे. हजेरी क्रमांक 0025488 असलेल्या या अॅडमिट कार्डवर अर्जुन तेंडुलकरचा पासपोर्ट साईज फोटो असून त्यावरील नाव अर्जुन सिंह असं नमूद केलं आहे. अॅडमिट कार्टवर लागलेला हा फोटो दुर्गानगरच्या अंकुल इंटर कॉलेज प्रशासनाने जारी केलं आहे. 
यूपी बोर्ड परीक्षेत कॉपी माफियांची किती दहशत किती आहे, याचा अंदाज या घटनेनंतर लावला जाऊ शकतो. अनेक तपासानंतरही शेकडो बनावट विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र जारी केले जातात. 
बोर्ड परीक्षेमध्ये हा प्रकार इतका सर्रास सुरु आहे की, आता सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनलाही बोर्डाने तिथला विद्यार्थी असल्याचं दाखवत अॅडमिट कार्ड जारी केलं आहे
========================================

मराठवाड्यात अखेर चारा छावण्या सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश 

मराठवाड्यात अखेर चारा छावण्या सुरु, शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश
उस्मानाबाद : जिल्हाधीकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर मराठवाड्यात पुन्हा एकचा चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. सकाळपासून मराठवाड्यातील छावण्यांमध्ये जनावरांना चारा द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे.
 ‘जिथं चाऱ्याची गरज आहे तिथं उद्या सकाळपर्यंत चारा छावण्या सुरु करण्यात येतील. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.’ अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसेंनी दिली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा विशेष’ या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली होती. 
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये मुबलक चार उपलब्ध असल्याचा दावा करत सरकारनं चारा छावण्या बंद केल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ खडसेंनी पुन्हा चारा छावण्या सुरु करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता, मात्र, प्रत्यक्षात छावण्या सुरु झाल्या नव्हत्या. आज अखेर छावण्या सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 सोमवारीच लातूर, बीड आणि उस्मानाबादमधील चारा छावण्या बंद करण्याचे आदेश महसूल खात्यानं दिले होते. सध्या पुढचे तीन महिने पुरेल इतका चारा उपलब्ध आहे, त्यामुळं चारा छावण्यांची गरज नसल्याचं खडसेंनी म्हटलं होतं. त्यानंतर काल दिवसभर मराठवाड्यात तीव्र आंदोलनंही झाली.
========================================

दिलदार खय्याम, 90व्या वाढदिवसानिमित्त 10 कोटींंचं दान

दिलदार खय्याम, 90व्या वाढदिवसानिमित्त 10 कोटींंचं दान
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांनी 90 व्या वाढदिवसानिमित्त दहा कोटींची संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. खय्याम यांनी बुधवारी कुटुंबीयांसह केक कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी दहा कोटींची संपत्ती दान करणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी अनेक कलाकार उपस्थित होते.
 खय्याम यांनी जगजीत कौर केपीजी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून चित्रपट क्षेत्रातील गरजू कलाकार आणि तांत्रिक साहाय्य करणाऱ्यांना आर्थिक मदद केली जाणार आहे. खय्याम यांच्या या दानशूरपणाचं चित्रपटसृष्टीत कौतुक होत आहे.
========================================

लोकलमध्ये प्रवाशांची चोरांना विवस्त्र करुन मारहाण 

VIDEO : लोकलमध्ये प्रवाशांची चोरांना विवस्त्र करुन मारहाण
मुंबई : मुंबई लोकलमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना संतप्त प्रवाशांनी विवस्त्र करुन बेदम मारहाण केल्याची घटना काल समोर आली. त्यानंतर रेल्वेने चोरांवर कारवाईचे संकेत दिले आहेत, मात्र कायदा हाती घेणाऱ्या प्रवाशांचं काय, हा प्रश्न कायम आहे.
 चोरी करणाऱ्या दोन चोरांना प्रवाशांनी चालत्या लोकलमध्येच रंगेहाथ पकडलं. त्यानंतर प्रवाशांनी त्यांना रेल्वे पोलिसांच्या हाती सुपूर्द करणं अपेक्षित होतं. मात्र कायदा हातात घेत प्रवाशांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
 इतक्यावरच ते थांबले नाहीत तर प्रवाशांनी त्या चोरांना विवस्त्र करुन मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओही त्यांनी काढला, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 दरम्यान ते चोर असले तरी त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार कायद्याचा आहे, असं सांगत रेल्वेनं या चोरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
========================================

बंगळूरू; अपघातात शरीराचे दोन तुकडे, तरीही तरुणाचं अवयवदान

अपघातात शरीराचे दोन तुकडे, तरीही तरुणाचं अवयवदान
बंगळुरु : बंगळुरुत रस्ते अपघातात शरीराचे अक्षरशः दोन तुकडे झाले असतानाही एका 23 वर्षीय तरुणाने शेवटच्या क्षणी अवयवदानाचा निर्णय घेतला. हरीश निंजप्पा असं या तरुणाचं नाव आहे.
  
बंगळुरुत राहणारा हरीश गावातील पंचायत निवडणुकीसाठी तुमकुरमधल्या गुब्बी या गावी गेला होता. मतदान करुन तो देवदर्शनासाठी निघाला. पण वाटेतच एका भरधाव ट्रकने त्याच्या बाईकला धडक दिली. यामुळे हरीशचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रकच्या खाली आला. या अपघातात हरीशच्या शरीराचे दोन तुकडे झाले.
 पुढची 20 मिनिटे हरीश बंगळुरुतल्या ओसंडून वाहणाऱ्या रस्त्यावर फक्त एक कुतूहल बनून राहिला. अपघातावेळी बाजूने जाणाऱ्या नागरिकांनी हरीशला मदत करण्याऐवजी त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. अपघाताच्या 20 मिनिटांनंतर अॅम्ब्युलन्स आली, तेव्हाही हरीश जिवंत होता. पण त्याआधी अॅब्युलन्समध्ये तो जे बोलला, त्याने हृदय पिळवटून टाकलं, “मी आता जगणार नाही, याची कल्पना आहे मला. पण मी जाण्याआधी माझे अवयवदान करा.” 
“संध्याकाळपर्यंत आम्हाला या अपघाताची कल्पना नव्हती. असा मुलगा पुन्हा जन्माला येणार नाही. मलाही दोन मुलं आहेत. पण हरीशला सुद्धा मी माझा मुलगाच समजत होते. माझ्या मुलाने केलेलं काम सर्वात महान आहे. याचा अभिमान आह, पण त्याला गमावल्याचं दुःख मोठं आहे,” अशी प्रतिक्रिया हरीशची मावशी ललिता यांनी दिली.
========================================

यवतमाळमध्ये स्कूलबसला अपघात, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू 


  • नागपूर, दि. १८ - यवतमाळ जिल्हयामध्ये गुरुवारी सकाळी स्कूलव्हॅनला भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणा-या स्कूलव्हॅनला वडगाव फाटा वणी येथे ट्रकने धडक दिली. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 
    या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला असून, ड्रायव्हरसह सहा जण जखमी झाले आहेत. दोघां मुलांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुलांना रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला.  श्रद्धा हलके, कुमार देवुलकर या मुलांचा जागीच मृत्यू झाला. श्रुतिका ढोके, निशांत देवुलकर, प्रदीप हलके, हर्शल इंगोले या चार विद्यार्थ्यांना लोढा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
========================================

२५१ रुपयात स्मार्टफोन देणा-या कंपनीची चौकशी ?


  • नवी दिल्ली, दि. १८ - रिगिंग बेल या नोएडा स्थित कंपनीने अवघ्या २५१ रुपयात बाजारात आणलेला ‘फ्रीडम २५१’ स्मार्ट फोन वादाच्या भोव-यात सापडला आहे. या फोनच्या किंमतीवर मोबाईल उत्पादक कंपन्यांनी आक्षेप घेतला असून, सरकारकडे चौकशीची मागणी केली आहे. 
    या फोनची किंमत ३५०० च्या खाली असू नये, इतक्या कमी किंमतीत फोनची विक्री कशी शक्य आहे असे प्रश्न मोबाईल उत्पादक कंपन्यांनी उपस्थित केले आहेत. अॅमिटी विद्यापीठाचा पदवीधारक असलेल्या मोहित कुमारने अवघ्या पाच महिन्यांपूर्वी ही कंपनी स्थापन केली आहे. 
    वर्तमानपत्रातून भारतातील हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. मोबाईल कंपन्यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडे मोबाईलच्या किंमतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
    कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फ्रीडम २५१ चा ४ इंचाचा क्यूएचडी डिसप्ले असून ९६० इनटू ५४० एवढे पिक्सल रिजोल्युशन आहे. याशिवाय क्वालकाम १.३ गीगाहर्टज् क्वाड-कोर प्रोसेसर आणि एक जीबीची रॅम असेल. अ‍ॅण्ड्रॉईड ५.१ लॉलीपॉप आॅपरेटिंग सिस्टीमवर आधारित या हॅण्डसेटमध्ये ८ जीबीची इंटरनल स्टोरेज सुविधा असून मायक्रो एसडी कार्ड वापरून ती ३२ जीबीपर्यंत वाढविता येऊ शकेल. 
    यात ३.२ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. त्याचबरोबर १,४५० एमएएचची बॅटरी त्याला इंधन पुरवेल. या फोनमध्ये वूमेन सेफ्टी, स्वच्छ भारत, फिशरमॅन, फार्मर, मेडिकल, व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि यू ट्यूबसह अनेक अ‍ॅप्स इनबिल्ट असतील. 
    भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ विकत घेण्यासाठी नागरीकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. गुरुवारी सकाळी सहावाजल्यापासून कंपनीच्या संकेतस्थळावर बुकिंग सुरु झाले आहे. बुकिंग सुरु होताच कंपनीचे संकेतस्थळ क्रॅश झाले. आता वेबसाईट सुरु असली तरी, पेमेंट करण्यात अडथळे येत आहेत. फक्त २५१ रुपयातील हा ३ जी स्मार्टफोन अनेक आवश्यक फिचर्सनी युक्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 
========================================

कारगिल आमची चूक, वाजपेयींच्या पाठित खंजीर खुपसला - नवाझ शरीफ 

  • नवी दिल्ली, दि.  १८ -  १९९९ साली कारगिलमध्ये केलेली घुसखोरी ही पाकिस्तानची चूक होती. आम्ही असे करुन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठित खंजीर खुपसला होता, पठाणकोट येथील भारतीय वायू दलाच्या तळावर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. व्दिपक्षीय चर्चा सुरु करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होत असताना शरीफ यांनी ही कबुली दिली आहे. 
    कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली तेव्हा नवाझ शरीफच पाकिस्तानचे पंतप्रधान होते. कारगिल युध्दाबद्दल शरीफ यांना अशी अचानक उपरती होण्यामागे राजकारण असल्याचे सूत्रांनी सांगितले. पठाणकोट येथील वायू दलाच्या तळावर हल्ला करणा-या जैशच्या अतिरेक्यांविरोधात पाकिस्तानने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही 
    तसेच डेव्हीड हेडलीच्या कबुलीजबाबाने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडले आहे. अशावेळी भारतासोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी काही पावले मागे येत नमते घेतले असावे असे राजकीय तज्ञांनी सांगितले. 
  •  अशी कबुली खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी दिली. 
========================================
नाशिकच्या नऊ विद्यार्थ्यांना दहा लाखांचे पॅकेज 
नाशिक - पोलंडस्थित सेको (एसईसीओ), डब्ल्यूएआरडब्ल्यूआयसीके कंपनी, तसेच दुबई येथील वर्कस्‌ मीडिया एलएलसी कंपनीने क. का. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमध्ये घेतलेल्या  कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये नऊ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना दहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
दुबई येथील वर्कस्‌ मीडिया एलएलसी कंपनीचे एचआर विभागातील किरण अब्राहिम यांनी कॅम्पस ड्राइव्ह घेतला. किरण अब्राहिम यांनी प्रॉडक्‍शन इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. त्यात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची निवड कंपनीतर्फे केली आहे. हे पाचही विद्यार्थी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर दुबईत राहतील. या विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपये प्रतिवर्ष, तसेच राहण्याची व्यवस्था, वर्षातून ३० दिवसांची सुटी, तर वर्षातून एकदा विमान प्रवासाचा खर्च, अशा सुविधा देण्यात आल्या.

पोलंड येथील कंपनीने मेकॅनिकल शाखेतील चार जणांची, तर इलेक्‍ट्रिकल विभागातून एकाची निवड केली. मेकॅनिकल विभागातून निवडले गेलेले विद्यार्थी पोलंडमध्ये आठ ते नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.
========================================
तुर्कस्तानमध्ये स्फोट; 28 ठार, 61 जखमी
इस्तंबूल : तुर्कस्तानच्या लष्कराला लक्ष्य करून घडवून आणलेल्या स्फोटामध्ये काल (बुधवार) अंकारामध्ये किमान 28 जण ठार झाले. या स्फोटात 61 नागरिक जखमी झाले. हा स्फोट कुणी घडवून आणला, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. 

दहशतवाद्यांनी एका चारचाकी गाडीमध्ये बॉम्ब ठेवला होता. सैनिकांना घेऊन निघालेला लष्कराच्या गाड्यांचा ताफा सिग्नलला थांबलेला असताना हा स्फोट झाला. गेल्या काही महिन्यांपासून तुर्कस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. कालच्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी तुर्कस्तानचे लष्करी मुख्यालय आणि संसदेजवळ स्फोट घडवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. ‘स्वसंरक्षणासाठी कुठेही, कधीही आणि कसाही हल्ला करण्याचा आमचा अधिकार आता वापरला जाईल,‘ असा निर्धार तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन यांनी व्यक्त केला. 
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अंकारामध्ये 103 जण ठार झाले होते. अलीकडच्या काळातील तुर्कस्तानमधील हा सर्वांत भीषण दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर जानेवारीत इस्तंबूलमध्ये झालेल्या स्फोटांत 11 जर्मन पर्यटक ठार झाले होते. याशिवाय इतरही दोन ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात आले होते. या सर्व हल्ल्यांमागे ‘इसिस‘चा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याशिवाय, इस्तंबुलमधील कुर्दीश बंडखोरांच्या संघटनेवरही तुर्कस्तानने लष्करी कारवाई करण्यास सुरवात केली आहे.
========================================
आता कोलकत्यामध्येही अफजल गुरुचे समर्थन 
कोलकता : दहशतवादी अफजल गुरुच्या फाशीच्या विरोधात जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये झालेल्या घोषणाबाजीचा वाद ताजा असतानाच कोलकत्यातील जाधवपूर विद्यापीठामध्येही अफजल गुरुच्या समर्थनाची पोस्टर आढळली. याशिवाय काश्‍मीर, नागालॅंड आणि मणिपूरच्या ‘स्वातंत्र्या‘ची मागणी करणारी पोस्टरही येथे चिकटविण्यात आली होती. विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी मात्र या प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचे नाकारले आहे. विद्यापीठ प्रशासनानेही यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. 

‘हम क्‍या चाहते है - आझादी! काश्‍मीर की आझादी. मणिपूर की आझादी. नागालॅंड की आझादी‘ असे यापैकी एका पोस्टरवर लिहिले होते. या साऱ्या पोस्टरवर ‘रॅडिकल‘ या गटाचा उल्लेख केला आहे. 
‘हे काही कंटकांचे काम आहे. यासंदर्भात मी सकाळीच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. विद्यापीठात झालेली देशविरोधी घोषणाबाजी आणि या वादग्रस्त पोस्टरशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्या विद्यार्थी संघटनांनी स्पष्ट केले,‘ असे जाधवपूर विद्यापीठाचे उपकुलगुरू सुरंजन दास यांनी सांगितले. 
‘जेएनयू‘मध्ये घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकारने कारवाई केली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी जाधवपूर विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली होती. ‘या मोर्चामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांचे काही सदस्यही होते. विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, हे उपकुलगुरु म्हणून माझे कर्तव्य आहे,‘ असे दास यांनी सांगितले. देशविरोधी घोषणाबाजी झाल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली का, या प्रश्‍नावर दास म्हणाले, "विद्यापीठामध्ये पोलिसांचे काहीही काम नाही. मी कधीच पोलिसांना विद्यापीठात बोलाविणार नाही.‘‘
========================================
..तर पाकिस्तानला दंड भरावा लागेल: पीसीबी 
कराची : भारतामध्ये होणाऱ्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेवर बहिष्कार टाकला, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दंड करू शकेल, अशी कबुली पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी काल (बुधवार) दिली. सुरक्षेचे कारण पुढे करत पाकिस्तानने भारतामध्ये क्रिकेट सामने न खेळण्याची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ‘दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी पाकिस्तान त्यांचे खेळाडू भारतामध्ये पाठवू शकतो; मग क्रिकेट खेळण्यात काय समस्या आहे‘ असा खडा सवाल ‘आयसीसी‘ने पाकिस्तानला केला. 
‘ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली, तर ‘आयसीसी‘कडे दंड भरावा लागेल‘ असे वक्तव्य शहरयार खान यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केले. शहरयार खान म्हणाले, "मी पंतप्रधानांच्या कार्यालयात संपर्क साधून यासंदर्भात चर्चा केली. सरकार परवागनी देत नाही, तोपर्यंत पाकिस्तानचा संघ भारतामध्ये जाऊ शकणार नाही. या स्पर्धेतून माघार घेण्याविषयी ‘आयसीसी‘ने कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे किंवा पंतप्रधानांनी पाकिस्तानी संघाला मंजुरी दिली असल्याचे वृत्त निराधार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भारतामध्ये संघ पाठविण्यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून आम्ही सल्ला मागविला आहे. ‘परिस्थितीची पाहणी चालू असून याविषयी लवकरच निर्णय घेतला जाईल‘ असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले. विश्‍वकरंडक स्पर्धेतून माघार घेतली, तर ‘आयसीसी‘कडे दंड भरावा लागेल.‘‘ अर्थात, असे झाल्यास किती दंड भरावा लागेल, हे शहरयार खान यांनी स्पष्ट केले नाही. 
पाकिस्तान सरकार क्रिकेट संघाला परवानगी देण्याची दाट शक्‍यता आहे, असे ‘पीसीबी‘मधील सूत्रांनी ‘पीटीआय‘ला सांगितले.
========================================
इराकमध्ये किरणोत्सर्गी पदार्थाची चोरी 
बगदाद : ‘अत्यंत धोकादायक‘ अशा वर्गवारीतील किरणोत्सर्गी पदार्थ चोरीस गेल्याने इराकचे धाबे दणाणले असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. गेल्या वर्षी ही चोरी झाली होती. हे अस्त्र ‘इसिस‘च्या हाती लागले, तर त्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती इराकी सरकारमधील सूत्रांनी व्यक्त केली. 
यासंदर्भात ‘रॉयटर्स‘ या वृत्तसंस्थेच्या हाती अधिकृत कागदपत्रे आहेत. दक्षिण इराकमधील बसरा या शहरात कडक सुरक्षेमध्ये हा किरणोत्सर्गी पदार्थ ठेवण्यात आला होता. लॅपटॉपच्या आकाराच्या सुरक्षित बॅगमध्ये हा पदार्थ होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही बॅग चोरली गेली. या दाव्यास इराकी अधिकाऱ्यांनीही पुष्टी दिली. मात्र, ‘राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्‍न लक्षात घेता याविषयी अधिक चर्चा करू शकत नाही,‘ असे इराकमधील पर्यावरण मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. 
कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू वहन करणाऱ्या पाईपमधील त्रुटी शोधण्यासाठी या किरणोत्सर्गी पदार्थाचा वापर केला जात असे. हा पदार्थ कितपत जुना आहे आणि त्याची ताकद किती, हे अद्याप समजू शकलेले नाही. या दोन महत्त्वाच्या घटकांवर हा किरणोत्सर्गी पदार्थ कितपत धोकादायक ठरू शकतो, हे अवलंबून आहे. अर्थात, हा किरणोत्सर्गी पदार्थ ‘इसिस‘च्या ताब्यात असल्याचे कुठलेही संकेत अद्याप मिळालेले नाहीत. इराक आणि सीरियामधील काही भागावर ‘इसिस‘ने ताबा मिळविलेला असला, तरीही बसरामध्ये ‘इसिस‘चे फारसे अस्तित्व नाही.
========================================
अमेरिकेच्या हल्ल्यांत 'इसिस'चा निधी नष्ट 
वॉशिंग्टन : सीरिया आणि इराकमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ‘इसिस‘चा 50 कोटी डॉलरचा निधी नष्ट केल्याचा अंदाज अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या निधीचा ‘इसिस‘च्या दहशतवाद्यांचा पगार आणि इतर कारवायांसाठी केला जात होता. ‘हा कमीत कमी अंदाज असून प्रत्यक्षात ही रक्कम शेकडो कोटी डॉलर असू शकते,‘ असे मत अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. 
‘इसिस‘च्या दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेने या संघटनेची आर्थिक रसद तोडण्यावर भर देण्यास सुरवात केली आहे. सीरियामधील तेलसमृद्ध प्रदेशावर मिळविलेला ताबा हा ‘इसिस‘चा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. 
गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेने सीरिया आणि उत्तर इराकमधील दहा मोक्‍याच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केले. ‘इसिस‘ने पैसा गोळा करण्यासाठी स्थापन केलेल्या बॅंका हेच या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य होते. हे हल्ले यशस्वी झाल्याचा एक संकेत म्हणजे हल्ल्यांपूर्वी ‘इसिस‘च्या दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये आता निम्म्याने कपात झाली आहे. रोख रकमेशिवाय जवळपास 20 किलो सोनेही या हल्ल्यांत नष्ट झाल्याचा अमेरिकेचा अंदाज आहे.
========================================
आगकाडीच्या पुनर्वापरातून पर्यावरणाचा समतोल 
पिंपरी - आगपेटीचा (काडीपेटी) काटकसरीने वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यात हातभार लागू शकतो, असे संशोधन ताथवडेतील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले आहे. साधारणत: अर्धी जळालेली काडी आपण टाकून देतो. वाया जाणाऱ्या अर्ध्या काडीला दुसऱ्या बाजूने पुन्हा उपयोगात आणण्याची शक्कल गणेश दुधे, नीलेश चव्हाणके आणि शिवानी शितोळे या विद्यार्थ्यांनी लढविली व अमलातही आणली. या शोधाचे त्यांनी पेटंटही मिळविले. 

आगपेटी निर्मितीसाठी झाडांची कत्तल केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. 1826 मध्ये जॉन वॉकर या रसायन शास्त्रज्ञांनी आगकाडीचा शोध लावला. ती कालांतराने प्रत्येकाच्या स्वयंपाक घरातील अत्यंत छोटी, मात्र अत्यावश्‍यक वस्तू बनली. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात काड्यापेटीचे उत्पादन केले जाते. त्यासाठी वर्षाकाठी 30 ते 40 हजार वृक्षांची कत्तल होत असून, पर्यावरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आता उत्पादक कंपन्यांनाही मऊ लाकडाचा तुटवडा भासत आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने काडीच्या लांबीवर निर्बंध घातल्याने तिची लांबी चार सेंटिमीटर झाली आहे. लाकडाची टंचाई व पर्यावरणाचे वास्तव लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी काडीच्या दोन्ही बाजूने फॉस्फरस (गुल) लावला. हा प्रयोग यशस्वी झाला.
========================================
========================================
========================================

No comments: