[अंतरराष्ट्रीय]
१- एफ-१६ विमाने मिळणार म्हणून भारताकडून जी प्रतिक्रिया नोंदवण्यात आली ती निराशाजनक - पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जेएनयूतील देशविरोधी घोषणांना हाफिजचं समर्थन : राजनाथ
३- वेस्ट इंडिजनं अंडर-19 विश्वचषक जिंकला
४- "नेताजी फाईल्स' 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
५- अहमदाबाद; मेक इन इंडिया : सेलिब्रेटींच्या हजेरीत यंत्राची मांदियाळी
६- गुरुत्व तरंग गवसण्याचा क्षण अत्यानंदाचा, आत्यंतिक समाधानाचा - संशोधिका अर्चना पई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत शाहरुखच्या कारवर दगडफेक
८- रेगेंच्या माध्यमातून ठाकरेंना अमेरिकेत बोलावण्याचा कट
९- हरियाणा; प्रसूत झालेल्या महिलेवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती
१०- माझा मुलगा देशद्रोही नाही, हिंदुत्वविरोधी आहे - जयशंकर सिंह
११- दिल्लीकरांची पाणीपट्टी माफ: केजरीवाल
१२- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला राष्ट्रीय जनता दल आमदार राजबल्लभ यादव याला पक्षातून निलंबित
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नाशिक; दोन सेल्फीबळी, विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू
१४- सोलापूर; उपासमार सोसून ज्ञानदान, अंध शिक्षकाची परवड
१५- मुंबई; जबरी बलात्कारानंतर गप्प राहण्यासाठी 30 रुपये
१६- लातूर ; संतप्त महिलांनी स्वतःला पाण्याच्या टाकीवरील कार्यालयात घेतले कोंडवून
१७- मुखेड; जि.प. [मुलींचे] हायस्कूल येथे विज्ञान सोहळा संपन्न
१८- मुखेड; सावरगाव पी.येथे मौलाना युनुस यांच्या हस्ते पाणपोई चे उदघाटन
१९- धामणगाव; जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये स्नेहसंमेलन संपन्न
२०- जळगाव; मेरी गावाजवळ २ दुचाकींच्या अपघातात २ जण ठार, एक गंभीर जखमी
२१- अकोला; जामठी येथे क्रेन विहीरीत कोसळून एका मजूराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विंडीजने जिंकला युवा विश्वकरंडक;भारत पराभूत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कष्टाची किंमत तुम्हाला भविष्यात मिळते, तर आळशीपणाची किंमत तातडीने मिळते
(रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================

=======================================
रेगेंच्या माध्यमातून ठाकरेंना अमेरिकेत बोलावण्याचा कट
गुरुत्व तरंग गवसण्याचा क्षण अत्यानंदाचा, आत्यंतिक समाधानाचा - संशोधिका अर्चना पई
दिल्लीकरांची पाणीपट्टी माफ: केजरीवाल

आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भेट म्हणून दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील नागरिकांची नोंव्हेंबर 2015 पासून थकित असलेली पाणीपट्टी अंशत: वा पूर्णत: माफ करण्याची घोषणा आज (रविवार) केली.
आपच्या सत्तेस एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना केजरीवाल यांनी दिल्लीमधील अनेक कुटूंबांना पाणीपट्टीची अवाजवी बिले आल्याने या नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याचे थांबविले होते, असे सांगितले. केजरीवाल यांनी घोषणा केल्यानुसार, आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबांची 30 नोव्हेंबरपर्यंतची पाणीपट्टी पूर्णत: माफ करण्यात येणार असून इतर कुटूंबांच्या आर्थिक स्थितीनुसार त्यांच्या पाणीपट्टीमध्ये 25 ते 75 टक्क्यांची घट करण्यात येणार आहे.
याचबरोबर, डिसेंबर 2017 पर्यंत शहरातील जवळजवळ प्रत्येक घरास जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
=======================================
विंडीजने जिंकला युवा विश्वकरंडक;भारत पराभूत

मीरपूर - गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करुन निम्मे काम फत्ते केल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांच्या संयमी फलंदाजीच्या सहाय्याने वेस्ट इंडिजने आज (रविवार) युवा विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाच गडी राखून पराभव केला. भारताने ठेवलेले 146 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने अवघे तीन चेंडू बाकी ठेवत पूर्ण करत विश्वकरंडकावर नाव कोरले.
विंडीजच्या विजयात केसी कर्टी (52 धावा - 125 चेंडू) याने नाबाद अर्धशतक झळकावित सिंहाचा वाटा उचलला. कर्टी याला किमो पॉल (40 धावा - 68 चेंडू) याने योग्य साथ देत विंडीजचा विजय अधिक प्रशस्त केला. भारताने ठेवलेल्या तोकड्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची अवस्था एकवेळ 5 बाद 77 धावा अशी झाली होती. मात्र कर्टी व पॉल यांनी संयमाने फलंदाजी करत विजय हातून निसटू न देण्याची खबरदारी घेतली.
=======================================
"नेताजी फाईल्स' 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
थोर देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासंदर्भातील संवेदनशील माहिती असलेल्या आणखी 25 फाईल्स या महिन्यात प्रसिद्ध करण्याचे संकेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिले आहेत.
प्रत्येक महिन्यामध्ये नेताजींशी संबंधित 25 फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार असून या महिन्यात प्रसिद्ध करावयाच्या फाईल्सची यादी तयार झाली आहे, असे शर्मा म्हणाले. गेल्या 23 जानेवारी रोजी नेताजींच्या 119 व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींशी संबंधित 100 फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानुसार, आता येत्या 23 फेब्रुवारीला पुढील फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्यात प्रसिइद्ध करण्यात आलेल्या फाईल्समध्ये सुमारे 16,600 ऐतिहासिक कागदपत्रांचा समावेश होता.
=======================================
मुंबई; जबरी बलात्कारानंतर गप्प राहण्यासाठी 30 रुपये

एका अत्यंत गरीब घरातील 9 वर्षीय मुलीवर बलात्कार केलेल्या 51 वर्षीय आरोपीस वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर वाच्यता न करण्यासाठी तिला 30 रुपये दिले. या मुलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून तिला अन्य पाच भावंडे आहेत. वडिल हे या कुटूंबामधील एकमेव कमावते सदस्य होते.
रंबाली सरोज असे आरोपीचे नाव आहे. सरोज याने या कुटूंबाच्या अडचणीचा फायदा घेत या मुलीवर बलात्कार केला. यानंतर तिने या प्रकाराची माहिती कोणालाही देऊ नये, यासाठी त्याने तिला 30 रुपयेही देऊ केले. पीडित मुलीच्या पोटामध्ये दुसऱ्या दिवशी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिच्या आईने वैद्यकीय तपासणीस नेले. या तपासणीदरम्यान या मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. हा बलात्कार इतका अमानुष होता; की पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी केलेल्या तपासणीमध्ये रक्ताचे मोठे डाग आढळून आले.
यानंतर फरार झालेल्या सरोजला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरोज याने याआधीही अशा स्वरुपाचा कोणता गुन्हा केला आहे काय, याची तपासणी आता पोलिस करत आहेत.
=======================================
लातूर ; संतप्त महिलांनी स्वतःला पाण्याच्या टाकीवरील कार्यालयात घेतले कोंडवून
महाराणाप्रतापनगर हा भाग मनपा हद्दीत येत नाही. या भागासाठी ग्रामपंचायत जबाबदार आहे. असे असतानाही आम्ही त्यांची पाण्याची व्यवस्था करतो. मात्र काही मंडळी राजकारण करीत असे स्टंट करतात असं नगरसेवक रवी सुडे यांनी सांगितलं. एकीकडे महाराणाप्रतापनगरची मंडळी मनपा क्षेत्रात असल्याचा दावा करतात अन दुसरीकडे या भागाशी मनपाचा संबंध नसल्याचा दावा जाणकार करतात यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गहन होत चाललाय. शिवाय या जनतेला पाणी द्यायचं कुणी हाही प्रश्न अधोरेखित होत आहे.
=======================================
मुखेड; जि.प. [मुलींचे] हायस्कूल येथे विज्ञान सोहळा संपन्न
तालुक्यातील सध्या चोहीकडे दुष्काळ परिस्थिती निमार्ण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थिती मध्ये सावरगाव पी. येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच हाजी एजाज मुजावर, तंटामुक्त अध्यक्ष समियोद्दीन मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली नवयुवकांनी जनतेला पाणी पाजविण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध केली आहे.
पाणपोईचे उद्घाटन जामा मस्जीदचे ईमाम मौलाना युनुस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, तहानलेल्यांना पाणी पाजवणे हे पुण्यांचे कार्य आहे. पाणी हे जीवन आहे आज घडीला थेंबथेंब पाण्यासाठी मजल दरमजल भटकावे लागत आहे. पाण्याचीबचत, जलसंवर्धन, तसेच जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहण त्यांनी केले. पाणपोई सुविधेसाठी गावातील नवयुवक जाविद मुजावर, सरफराज मुजावर, हारुण मुजावर, हसण मुजावर, हुसेन मुजावर, खाजा भाई, अहेमद अत्तार, फेरोज मुजावर, इम्रान हाफीज आदींनी परिश्रम घेतले आहे.
=======================================
धामणगाव; जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये स्नेहसंमेलन संपन्न
जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६व्या वर्धापनदिन, समता वर्ष व संविधान दिनाचे औचीत्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
१- एफ-१६ विमाने मिळणार म्हणून भारताकडून जी प्रतिक्रिया नोंदवण्यात आली ती निराशाजनक - पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- जेएनयूतील देशविरोधी घोषणांना हाफिजचं समर्थन : राजनाथ
३- वेस्ट इंडिजनं अंडर-19 विश्वचषक जिंकला
४- "नेताजी फाईल्स' 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
५- अहमदाबाद; मेक इन इंडिया : सेलिब्रेटींच्या हजेरीत यंत्राची मांदियाळी
६- गुरुत्व तरंग गवसण्याचा क्षण अत्यानंदाचा, आत्यंतिक समाधानाचा - संशोधिका अर्चना पई
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत शाहरुखच्या कारवर दगडफेक
८- रेगेंच्या माध्यमातून ठाकरेंना अमेरिकेत बोलावण्याचा कट
९- हरियाणा; प्रसूत झालेल्या महिलेवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती
१०- माझा मुलगा देशद्रोही नाही, हिंदुत्वविरोधी आहे - जयशंकर सिंह
११- दिल्लीकरांची पाणीपट्टी माफ: केजरीवाल
१२- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला राष्ट्रीय जनता दल आमदार राजबल्लभ यादव याला पक्षातून निलंबित
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- नाशिक; दोन सेल्फीबळी, विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू
१४- सोलापूर; उपासमार सोसून ज्ञानदान, अंध शिक्षकाची परवड
१५- मुंबई; जबरी बलात्कारानंतर गप्प राहण्यासाठी 30 रुपये
१६- लातूर ; संतप्त महिलांनी स्वतःला पाण्याच्या टाकीवरील कार्यालयात घेतले कोंडवून
१७- मुखेड; जि.प. [मुलींचे] हायस्कूल येथे विज्ञान सोहळा संपन्न
१८- मुखेड; सावरगाव पी.येथे मौलाना युनुस यांच्या हस्ते पाणपोई चे उदघाटन
१९- धामणगाव; जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये स्नेहसंमेलन संपन्न
२०- जळगाव; मेरी गावाजवळ २ दुचाकींच्या अपघातात २ जण ठार, एक गंभीर जखमी
२१- अकोला; जामठी येथे क्रेन विहीरीत कोसळून एका मजूराचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२२- विंडीजने जिंकला युवा विश्वकरंडक;भारत पराभूत
~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
कष्टाची किंमत तुम्हाला भविष्यात मिळते, तर आळशीपणाची किंमत तातडीने मिळते
(रवी देशमुख, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
http://namaskarlivenanded.blogspot.com/2016/02/blog-post_35.html
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
http://goo.gl/uS8DX4
=======================================
जेएनयूतील देशविरोधी घोषणांना हाफिजचं समर्थन : राजनाथ
अलाहाबाद : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या देशविरोधी घोषणांना लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचं समर्थन होतं, असा दावा गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.
अशा प्रकारच्या देशविरोधी कारवायांना कदापि माफी मिळणार नाही, असा इशारा राजनाथ यांनी दिला. हा देशाच्या एकतेचा प्रश्न असल्यानं विरोधकांनी याचं राजकारण न करता यावर गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
वेस्ट इंडिजनं अंडर-19 विश्वचषक जिंकला
विशाखापट्टणम : ईशान किशनच्या युवा टीम इंडियाला अंडर-19 विश्वचषकात अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. बांगलादेशात मिरपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतावर 5 विकेट्स राखून मात केली.
भारतानं दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याचा विंडीजच्या युवा टीमनं यशस्वी पाठलाग केला. खरं तर आवेश खान, खलिल अहमद आणि मयांक डागरनं वेस्ट इंडीजची 5 बाद 77 अशी अवस्था करून भारताच्या आशा उंचावल्या होत्या. पण पॉल आणि कार्टीनं 69 धावांची भागीदारी करून विंडीजला विजय मिळवून दिला.
त्याआधी, सरफराज खाननं त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करून अर्धशतक झळकावलं. त्यानं 89 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 51 धावांची खेळी उभारली. पण सरफराजला समोरच्या एंडनं चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळं भारताचा अख्खा डाव अवघ्या 145 धावांत आटोपला. विंडीजच्या अलझारी जोसेफ आणि रायन जॉन यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

नाशिक; दोन सेल्फीबळी, विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू
नाशिक : नाशिकमध्ये वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे.
अजिंक्य गायकर आणि सौरभ चुळभरे अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची नावं आहेत. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिडकोतील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्वर्गीय शांतारामबापू वावरे महाविद्यालयात शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता. या कार्यक्रमानंतर अजिंक्य आणि सौरभ हे आपल्या दहा मित्रांसमवेत वालदेवी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
वालदेवी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळच दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सौरभ हा धरणाजवळ एका दगडावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पाण्यात पडला. यावेळी सौरभला वाचवण्यासाठी अजिंक्यने उडी घेतली. मात्र, हे दोघेही पाण्यात बुडाल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मेक इन इंडिया : सेलिब्रेटींच्या हजेरीत यंत्राची मांदियाळी
मुंबई : ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आज बीकेसीत विज्ञानाबरोबरच कला-संस्कृतीचा संगम पाहायला मिळाला. बीकेसीत मांडण्यात आलेली अनेक वैशिष्टयपूर्ण यंत्रं आज सर्वांचं आकर्षण ठरली.
डान्सिंग जेसीबीसह अनेक यंत्र पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्याचसोबत विविध राज्यांच्या कलाकारांनी अनेक कार्यक्रम सादर करत लोकांचं मनोरंजन केलं.
दरम्यान, संध्याकाळी गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीचा कार्यक्रम होणार आहे. विदेशी पाहुण्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारखे अनेक राजकीय नेते या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे अमिताभ बच्चन यांनी महाराष्ट्राबाबत लिहिलेली कविताही ते यावेळी सादर करतील.
आमीर, सलमानसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. शिवाय देशी-विदेशी पाहुण्यांच्या हजेरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक राज्यभिषेक सोहळाही यावेळी होणार आहे.
आमीर, सलमानसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. शिवाय देशी-विदेशी पाहुण्यांच्या हजेरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक राज्यभिषेक सोहळाही यावेळी होणार आहे.
‘जय श्रीराम’च्या घोषणा देत शाहरुखच्या कारवर दगडफेक
अहमदाबाद : अहमदाबदमध्ये ‘रईस’ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली. आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास काही लोक आले आणि शाहरुखच्या गाडीवर दगडफेक सुरु केली. दगडफेक करणारे ‘जय सिया राम’ आणि ‘शाहरुख खान हाय हाय’ अशा घोषणा देत होते. दगडफेक करणाऱ्यांनी चेहऱ्याला रुमाल बांधले होते.
ज्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे, ती गाडी शाहरुखला ‘रईस’ सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सेटवर घेऊन जाणार होती. गाडीच्या मागच्या भागावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केल्याने मोठं नुकसान झालं आहे. परिणात: गाडी बदलावी लागली.
याआधी शाहरुख जेव्हा कच्छमध्ये चित्रिकरण करत होता. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाहरुखविरोधी घोषणा देत निदर्शनं केली होती.
शाहरुखच्या सहिष्णुता-असहिष्णुता यांवरील वक्तव्यामुळे काही लोक नाराज आहेत. याआधी ‘दिलवाले’ हा सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यानही मोठ्या प्रमाणावर आंदोलनं, विरोध, निदर्शनं झाली होती.
सोलापूर; उपासमार सोसून ज्ञानदान, अंध शिक्षकाची परवड
सोलापूर : रोजच्या जेवणाचे वांदे… मुलांच्या शिक्षणाची आबाळ… आणि पर्यायाने जगण्याची भ्रांत, ही व्यथा आहे 50 हजार महीना पगार असलेल्या अंध शिक्षकाची. मात्र, हा 50 हजारांचा आकडा केवळ कागदोपत्रीच. कारण गेल्या 3 वर्षांपासून पगार झाला नसल्याने उपासमार सहन करत हा अंध शिक्षक अध्यापनाच काम नित्य नेमाने करतो आहे. या अवलिया शिक्षकाचं नाव आहे प्रकाश जाधव.
तीन वर्षांपासून पगार नाही, तरीही ज्ञानदानाचं काम प्रकाश जाधव यांनी थांबवलं नाही. एक डोळ्याने अंध असलेली त्यांची पत्नी पापडाचं छोटासा व्यवसाय करुन प्रकाश जाधव यांना थोडा-फार हाताभार लावते.
रेगेंच्या माध्यमातून ठाकरेंना अमेरिकेत बोलावण्याचा कट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव यांना अमेरिकेत येण्यासाठी विनंती करण्याची आणि तेथे त्यांची आमच्याकडून योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी राजाराम रेगे यांना सांगण्यात आल्याचा खुलासा हेडली याने या वेळेस केला. परंतु या ‘दोघांची काय काळजी घेण्यात येईल’ म्हणजे काय करण्यात येणार होते याचा खुलासा मात्र त्याने केला नाही. शिवसेनाभवनाच्या पाहणीच्या वेळेस संपर्कात आलेले रेगे हे नंतरही ‘ई-मेल’च्या माध्यमातून संपर्कात होते. आपल्यासोबत व्यवसाय करायचा होता. मात्र रेगेंचा वापर शिवसेनाप्रमुख यांच्या हत्येच्या कटासाठी होऊ शकतो हे लक्षात घेऊन साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांना त्यांची माहिती दिली होती. तसेच रेगेंचा कसा उपयोग करून घेता येऊ शकतो याबाबत या दोघांसह डॉ. तहव्वूर राणा यांच्याकडेही चर्चा केल्याचे हेडलीने स्पष्ट केले. मात्र या तिघांमध्ये त्यावरून मतभेद होते. रेगेंकडून लष्कराची गोपनीय माहिती इक्बालला हवी होती, साजिद, पाशा आणि मला हल्ल्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचा होता, तर राणाला व्यवसाय करून पैसे मिळवायचे होते.
=======================================गुरुत्व तरंग गवसण्याचा क्षण अत्यानंदाचा, आत्यंतिक समाधानाचा - संशोधिका अर्चना पई
शतकातील सर्वात मोठय़ा संशोधनाच्या मोहिमेतील संशोधिका अर्चना पई यांची भावना ‘गुरुत्व तरंगांचे अस्तित्व सुस्पष्ट करणारा आणि द्वैती कृष्णविवरांचे अस्तित्वही सिद्ध करणारा तो क्षण अत्यानंदाचा आणि आत्यंतिक समाधान देणारा होता’, असे उद्गार डॉ. अर्चना पई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना काढले. शतकातील सर्वात महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय शोधमोहिमेत- ‘लायगो सायंटिफिक प्रोग्राम’मध्ये ज्या भारतीय वैज्ञानिकांनी आपले अमूल्य योगदान दिले, त्यात बिनीचा वाटा मूळच्या मुंबईकर असलेल्या मराठमोठय़ा डॉ. अर्चना पई यांचाही आहे. ज्या ९ भारतीय विज्ञान संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या, त्यांच्या प्रमुख विश्लेषकांमध्ये त्या एकमेव महिला वैज्ञानिक आहेत.
=======================================हरियाणा; प्रसूत झालेल्या महिलेवर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती
हरयाणामधील एका खासगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका २२ वर्षीय महिलेची शुक्रवारी प्रसूती झाली.
शनिवारी सकाळच्यावेळी आरोपी डॉक्टरच्या वेशात महिलेच्या खोलीत आला होता. पीडित महिलेला सुरुवातीला डॉक्टर तपासणी करत आहे असे वाटले. मात्र जेव्हा डॉक्टरचा चुकीचा इरादा लक्षात येताच तिने आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. शुक्रवारीच पिडित महिलेने सिझरींग ऑपरेशनव्दारे अर्भकाला जन्म दिला.
आरोपीची छायाचित्रे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत. फुटेजनुसार तो गाडी घेऊन आला होता. हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांनी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र सुरु आहे.
=======================================माझा मुलगा देशद्रोही नाही, हिंदुत्वविरोधी आहे - जयशंकर सिंह
माझा मुलगा देश विरोधी नाही. फक्त तो हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतो म्हणून त्याला लक्ष्य केले जात आहे. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे ? अशी प्रतिक्रिया जवाहरलाल नेहरु विद्यापाठीतील देश विरोधी घोषणां प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्हया कुमारचे पिता जयशंकर सिंह यांनी दिली.
देशद्रोहाच्या आरोपाखाली कन्हय्या कुमारला शुक्रवारी अटक करण्यात आली. तो जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा नेता आहे. माझ्या मुलाचा लहानपणापासून राजकारणाकडे ओढा आहे पण त्याने कधीही देश विरोधी वक्तव्य केलेले नाही असे कन्हय्याची आई मीणा देवी यांनी सांगितले.
कन्हय्याचे कुटुंब बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यातील मसलनपूर-बिहाट या गावी रहाते. छोटे शेतकरी असलेल्या जयशंकर सिंह यांना दोन वर्षांपूर्वी पक्षघाताचा झटका आला. तेव्हापासून ते बिछान्याला खिळून आहेत. मीणा देवी या अंगणवाडी सेविका असून, महिन्याला त्यांना चार हजार रुपये वेतन मिळते.
सीपीआय नेते डी.राजा यांनी शनिवारी मला फोन करुन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबरोबर झालेल्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीची माहिती दिली असे जयशंकर सिंह यांनी सांगितले.
=======================================दिल्लीकरांची पाणीपट्टी माफ: केजरीवाल
आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भेट म्हणून दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमधील नागरिकांची नोंव्हेंबर 2015 पासून थकित असलेली पाणीपट्टी अंशत: वा पूर्णत: माफ करण्याची घोषणा आज (रविवार) केली.
आपच्या सत्तेस एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना केजरीवाल यांनी दिल्लीमधील अनेक कुटूंबांना पाणीपट्टीची अवाजवी बिले आल्याने या नागरिकांनी पाणीपट्टी भरण्याचे थांबविले होते, असे सांगितले. केजरीवाल यांनी घोषणा केल्यानुसार, आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या कुटूंबांची 30 नोव्हेंबरपर्यंतची पाणीपट्टी पूर्णत: माफ करण्यात येणार असून इतर कुटूंबांच्या आर्थिक स्थितीनुसार त्यांच्या पाणीपट्टीमध्ये 25 ते 75 टक्क्यांची घट करण्यात येणार आहे.
याचबरोबर, डिसेंबर 2017 पर्यंत शहरातील जवळजवळ प्रत्येक घरास जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले.
=======================================
विंडीजने जिंकला युवा विश्वकरंडक;भारत पराभूत
मीरपूर - गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करुन निम्मे काम फत्ते केल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांच्या संयमी फलंदाजीच्या सहाय्याने वेस्ट इंडिजने आज (रविवार) युवा विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पाच गडी राखून पराभव केला. भारताने ठेवलेले 146 धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने अवघे तीन चेंडू बाकी ठेवत पूर्ण करत विश्वकरंडकावर नाव कोरले.
विंडीजच्या विजयात केसी कर्टी (52 धावा - 125 चेंडू) याने नाबाद अर्धशतक झळकावित सिंहाचा वाटा उचलला. कर्टी याला किमो पॉल (40 धावा - 68 चेंडू) याने योग्य साथ देत विंडीजचा विजय अधिक प्रशस्त केला. भारताने ठेवलेल्या तोकड्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची अवस्था एकवेळ 5 बाद 77 धावा अशी झाली होती. मात्र कर्टी व पॉल यांनी संयमाने फलंदाजी करत विजय हातून निसटू न देण्याची खबरदारी घेतली.
=======================================
"नेताजी फाईल्स' 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार
प्रत्येक महिन्यामध्ये नेताजींशी संबंधित 25 फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार असून या महिन्यात प्रसिद्ध करावयाच्या फाईल्सची यादी तयार झाली आहे, असे शर्मा म्हणाले. गेल्या 23 जानेवारी रोजी नेताजींच्या 119 व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींशी संबंधित 100 फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानुसार, आता येत्या 23 फेब्रुवारीला पुढील फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्यात प्रसिइद्ध करण्यात आलेल्या फाईल्समध्ये सुमारे 16,600 ऐतिहासिक कागदपत्रांचा समावेश होता.
=======================================
मुंबई; जबरी बलात्कारानंतर गप्प राहण्यासाठी 30 रुपये
एका अत्यंत गरीब घरातील 9 वर्षीय मुलीवर बलात्कार केलेल्या 51 वर्षीय आरोपीस वरळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर वाच्यता न करण्यासाठी तिला 30 रुपये दिले. या मुलीच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले असून तिला अन्य पाच भावंडे आहेत. वडिल हे या कुटूंबामधील एकमेव कमावते सदस्य होते.
रंबाली सरोज असे आरोपीचे नाव आहे. सरोज याने या कुटूंबाच्या अडचणीचा फायदा घेत या मुलीवर बलात्कार केला. यानंतर तिने या प्रकाराची माहिती कोणालाही देऊ नये, यासाठी त्याने तिला 30 रुपयेही देऊ केले. पीडित मुलीच्या पोटामध्ये दुसऱ्या दिवशी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिच्या आईने वैद्यकीय तपासणीस नेले. या तपासणीदरम्यान या मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. हा बलात्कार इतका अमानुष होता; की पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी केलेल्या तपासणीमध्ये रक्ताचे मोठे डाग आढळून आले.
यानंतर फरार झालेल्या सरोजला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरोज याने याआधीही अशा स्वरुपाचा कोणता गुन्हा केला आहे काय, याची तपासणी आता पोलिस करत आहेत.
=======================================
लातूर ; संतप्त महिलांनी स्वतःला पाण्याच्या टाकीवरील कार्यालयात घेतले कोंडवून
लातूर (आलानेप्र): लातूर शहरात सध्या पाणी टंचाईमुळं नागरिक हैराण आहेत. पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागतेय. अशा परिस्थितीत गेल्या महिनाभरापासून पाणीच मिळत नसल्याने लातूर शहरातल्या महाराणाप्रतापनगर भागातील संतप्त महिलांनी स्वतःला पाण्याच्या टाकीवरील कार्यालयात कोंडवून घेतले. या भागातील नागरिकांनी टॅंकरची मागणी केली पण ती पूर्ण होत नाही. नगरसेवकही हा भाग आमच्याकडे येत नसल्याचे कारण सांगतात. त्यामुळे या भागातल्या नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या महिलांनी आज विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी गाठली. टाकी खाली असलेल्या मनपाच्या कार्यालयात स्वतःला कोंडून घेतले. चार तासांपासून कोंडून घेतलेल्या या महिलांनी जोपर्यंत पाणी देणार नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नसल्याचा पवित्रा घेतला. या महिलांनी रवी सुडे आणि उषा कांबळे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. अखेर मनपा अधिकारी रमाकांत पिडगे यांनी मध्यस्थी केली, दोन टॅंकर पाठवण्याची व्यवस्था केली तेव्हा हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आमचा संबंध नाही.... महाराणाप्रतापनगर हा भाग मनपा हद्दीत येत नाही. या भागासाठी ग्रामपंचायत जबाबदार आहे. असे असतानाही आम्ही त्यांची पाण्याची व्यवस्था करतो. मात्र काही मंडळी राजकारण करीत असे स्टंट करतात असं नगरसेवक रवी सुडे यांनी सांगितलं. एकीकडे महाराणाप्रतापनगरची मंडळी मनपा क्षेत्रात असल्याचा दावा करतात अन दुसरीकडे या भागाशी मनपाचा संबंध नसल्याचा दावा जाणकार करतात यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गहन होत चाललाय. शिवाय या जनतेला पाणी द्यायचं कुणी हाही प्रश्न अधोरेखित होत आहे.
=======================================
मुखेड; जि.प. [मुलींचे] हायस्कूल येथे विज्ञान सोहळा संपन्न
=======================================
मुखेड; सावरगाव पी.येथे मौलाना युनुस यांच्या हस्ते पाणपोई चे उदघाटन
मुखेड :-
तालुक्यातील सावरगाव पी. येथील नवयुवकांच्या वतीने पाणपोईचे उद्घाटन मौलाना युनुस यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यातील सध्या चोहीकडे दुष्काळ परिस्थिती निमार्ण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. अशा परिस्थिती मध्ये सावरगाव पी. येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच हाजी एजाज मुजावर, तंटामुक्त अध्यक्ष समियोद्दीन मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली नवयुवकांनी जनतेला पाणी पाजविण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध केली आहे.
पाणपोईचे उद्घाटन जामा मस्जीदचे ईमाम मौलाना युनुस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की, तहानलेल्यांना पाणी पाजवणे हे पुण्यांचे कार्य आहे. पाणी हे जीवन आहे आज घडीला थेंबथेंब पाण्यासाठी मजल दरमजल भटकावे लागत आहे. पाण्याचीबचत, जलसंवर्धन, तसेच जनावरांना व माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहण त्यांनी केले. पाणपोई सुविधेसाठी गावातील नवयुवक जाविद मुजावर, सरफराज मुजावर, हारुण मुजावर, हसण मुजावर, हुसेन मुजावर, खाजा भाई, अहेमद अत्तार, फेरोज मुजावर, इम्रान हाफीज आदींनी परिश्रम घेतले आहे.
=======================================
धामणगाव; जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये स्नेहसंमेलन संपन्न
जि.प.कें.प्रा. शाळेमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६६व्या वर्धापनदिन, समता वर्ष व संविधान दिनाचे औचीत्य साधून वार्षिक स्नेहसंमेलन अंतर्गत विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

No comments:
Post a Comment