[अंतरराष्ट्रीय]
१- मला पकडले तर, शत्रू आनंदात रहाणार नाही - मसूद अझर
२- अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हुिसा नाकारला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- मुरुड बीचवर बुडालेल्या सर्व 14 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
४- 'मेक इन इंडिया' कार्यक्रमासाठी गिरगाव चौपाटी हवी!, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
५- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 5000 रुपयेही नाहीत!
६- छत्रपती व रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न – नारायण राणे
७- प्रियंका चोप्रा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणार
८- समलैंगिकता (कलम ३७७) प्रकरणी क्युरेटिव्ह याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- समीर भुजबळ यांना अटक, ईडीची कारवाई
१०- 'ईडी सुडबुद्धीने वागतंय', समीरच्या अटकेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
११- “गुजरात भारताचा भाग नाही का?”, सुप्रीम कोर्टाने गुजरातसह अनेक राज्यांना फटकारलं
१२- 20 वर्षांच्या संघर्षानंतर जागा मिळाली : हेमा मालिनी
१३- मुरुडदुर्घटना: मृत विद्यार्थ्यांच्या कुटुबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत - पालकमंत्री प्रकाश मेहता
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नाशिक; 'पतिव्रता सिद्ध करण्यासाठी जात पंचांसमोर नग्नावस्थेत चाल'
१५- मुरुड दुर्घटना : कधी, कुठे आणि काय घडलं?
१६- मुंबईत लोकलच्या महिला डब्यात छेडछाड करणाऱ्याला तुफान मारहाण
१७- मुखेड येथील ग्रामपंचायतींना 'बार्टी'च्यावतीने पुस्तके भेट
१८- तेलंगाना: नालगोंडा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये दोन वर्षाचा मुलगा पडला, बचावकार्य सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- 'नटसम्राट' नानापुढे अनुपम खेर नतमस्तक होतात...
२०- विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं ब्रेकअप?
२१- रविना टंडनच्या मुलीचा गोव्यात लग्नसोहळा! पहा फोटो...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- मुखेड येथील ग्रामपंचायतींना 'बार्टी' च्यावतीने पुस्तके भेट
२३- बिलालनगर; तरुणाच्या खून प्रकरणात चार आरोपींना जन्मठेप
२४- जि.प.च्यावतीने १२८६ गावे, ५५७ वाड्यांसाठी पाणीटंचाई निवारणार्थ ४३ कोटींचा आराखडा
२५- पोलीस जमादार दुरपडे यांची आत्महत्या, कारण अस्पष्ट
२६- नांदेड जिल्हा दारूमुक्तीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा - आ. अमरनाथ राजूरकर
२७- देगलूर; कार झाडाला आदळून तीन जागीच ठार
२८- दि. २१ फेब्रुवारी रोजी दलितमित्र धनाजीराव घोडजकर पुरस्कार वितरण सोहळा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
सुरेश मोरे, अर्जुनसिंग ठाकूर, दीपक गायकवाड, माधव गायकवाड, बाळू दुग्डूमवार, रवींद्र तेलंगे, गजानन वासमवार, अमोल नरवाडे, राम सोळंके, दत्ताहरी साळुंके, शुभम चौरे, प्रभाकर पांडे, अमोल नागमवार, राजेंद्र जाट, वैजनाथ उमरेकर, राहुल जोंधळे, सुनील गरड, दत्ता दळव, संदीप अवनुरे, अमोल इंगोले, जगदीश कदम, लक्ष्मीकांत रहाटकर, व्यंकटेश मुदीराज, शेख हाजी सरकार, वैभव वाघमोडे, वर्ष खंदारे, प्राप्ती डोंगरे, गोविंद राज, संतोष हल्देकर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चुकीचा रस्ता..चुकीची माणसं..वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...
यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे
(डाॅ. राहुल कांबळे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घरांची आर्टिफिशिअल सजावट
फ्लॉवर पॉट, स्टोन, ड्राय स्टिक उपलब्ध
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/lE9S67
*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
http://goo.gl/uS8DX4
===================================================
'नटसम्राट' नानापुढे अनुपम खेर नतमस्तक होतात...
नटसम्राट चित्रपटातून दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी साकारलेली अप्पासाहेब बेलवलकर यांची व्यक्तिरेखा प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहे. मात्र आता प्रख्यात अभिनेते अनुपम खेर थेट रंगमंचावरच नाना पाटेकर यांच्यापुढे नतमस्तक झाले.
‘हा नमस्कार म्हणजे नाटक नसून ‘नटसम्राट’ चित्रपटामधल्या अभिनयाला नमस्कार आहे, अशा शब्दात अनुपम खेर यांनी नानांचं कौतुक केलं. दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या 18 व्या भारत रंग महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेते नाना पाटेकर, अनुपम खेर उपस्थित होते.
भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी खेर नाना पाटेकरांच्या पाया पडले. यावेळी एनएसडीच्या विद्यार्थीदशेतील काही गमतीदार किस्सेही त्यांनी सांगितले. हा नाट्यमहोत्सव 21 तारखेपर्यंत चालणार असून त्यात 15 देशातले 80 नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत.
2018 सालचं थिएटर ऑलिम्पिक भारतात होईल, नाटकांसाठी जागतिक स्तरावरील हा सगळ्यात मोठा महोत्सव असेल अशी घोषणा यावेळी करण्यात आली. त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यापासून एनएसडीमध्ये ईब्राहीम अलकाझी यांच्या नावानं अध्यासन सुरु केलं जाणार आहे.
समीर भुजबळ यांना अटक, ईडीची कारवाई
मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज छगन भुजबळ, पंकज तसंच समीर भुजबळ यांच्या विविध ठिकाणच्या नऊ मालमत्तांवर छापे मारले होते. अखेर आज मुंबईत त्यांना अटक करण्यात आली.
समीर भुजबळ यांना उद्या कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, छगन भुजबळ मुंबईत नसून ते अमेरिकेत गेल्याची माहिती मिळत आहे.
दुसरीकडे, “आम्ही करुन दाखवलं. समीर भुजबळांना ईडीने अटक केली, आता पंकज भुजबळांचा नंबर,” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
'ईडी सुडबुद्धीने वागतंय', समीरच्या अटकेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
मुंबई/वॉशिंग्टन: महाराष्ट्र सदन घोटाळ्यात समीर भुजबळांना झालेली अटक ही सूडबुद्धीनं केली असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. छगन भुजबळ सध्या वॉशिग्टनला आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात काल ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनयानं भुजबळ यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले. त्यानंतर रात्री उशिरा छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक केली गेली. त्यानंतर भुजबळांची ही आलेली पहिली प्रतिक्रिया आहे.
‘चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबाच्या जबरदस्तीने सह्या घेतल्या’
‘मला नोव्हेंबरमध्येच एका कार्यक्रमासाठी अमेरिकेतून निमंत्रण आलं होतं. त्यामुळं मी आजच इथं पोहचलो. दरम्यान, ईडीनं माझ्या घरावर आणि इतर ठिकाणी छापे घातले आणि ते समीरलाही घेऊन गेले. अशा प्रकारच्या बातम्या मला कळाल्या. त्यामुळं हे प्रकरण काही सरळ दिसत नाही. ज्या महाराष्ट्र सदनावरुन हे प्रकरण सुरु आहे त्यामध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. तसेच महाराष्ट्र सदनासाठी आमच्या सरकारने कोणतेही पैसे किंवा जमिन दिली नव्हती. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करुन महाराष्ट्र सदनाचे सुंदर बांधकाम करण्यात आले. मात्र, किरीट सोमय्या यांनी आमच्या विरोधात अनेक खटले दाखल केले.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.
‘या प्रकरणाशी समीर, पंकज किंवा माझा काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही घोटाळा केलेला नाही. मात्र, काहीही करुन कारवाई करायची हा हेतू दिसून येतो आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमच्या काही जवळच्या लोकांचीही जबानी घेतली आहे. त्यात कुणी आमच्या बाजूनं अथवा विरोधात बोललंही असेल पण, अधिकाऱ्यांना स्वत:ला जे हवं तेच लिहून त्यांनी आमच्या जवळील लोकांकडून सह्याही घेतल्या.’ असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
एकूणच समीर भुजबळ यांच्या अटकेमुळे छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांनाही अटक होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
===================================================विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं ब्रेकअप?
मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअप आणि घटस्फोटांचा सीझन सुरु असल्याचं चित्र आहे. बॉलिवूडची अपकमिंग स्टार अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा धुरंधर विराट कोहली यांचं प्रेम प्रकरण संपुष्टात आल्याचे संकेत मिळत आहेत.
इन्स्टाग्राम या फोटो नेटवर्किंग साईटवर विराट आणि अनुष्काने एकमेकांना अनफॉलो केलं आहे. यामुळे दोघांमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या ब्रेकअपचं वृत्त खरं ठरल्यास दोघांच्या चाहत्यांची मोठी निराशा होणार आहे.
मात्र दिलासादायक बाब अशी की विराट ज्या इन्स्टा अकाऊण्ट्सना वारंवार भेट देतो, ती एका तांत्रिक बिघाडामुळे ब्लॉक किंवा अनफॉलो होत असल्याचं एका विराट कोहली फॅन अकाऊण्टने म्हटलं आहे.
हॉलिवूडच्या अँजेलिना-ब्रॅडपासून बॉलिवूडचे रणबीर-कतरिना, फरहान-अधुना, मलायका-अरबाज, सोहेल-सीमा यासारख्या काही जोडप्यांच्या ब्रेकअप्सच्या धक्क्यांनी चाहते सावरलेले नसतानाच हा आणखी एक मोठा धक्का ठरु शकतो.
नाशिक; 'पतिव्रता सिद्ध करण्यासाठी जात पंचांसमोर नग्नावस्थेत चाल'
महाराष्ट्रातल्या जातपंचायतीचं आणखी एक भीषण वास्तव समोर आलं आहे. पतिव्रता असल्याचं सिद्ध करण्यासाठी महिलेनं नग्नावस्थेत जात पंचांसमोर चालायचं, अशी माणुसकीला लाज आणणारी प्रथा नंदुरबारच्या कंजारवाडामध्ये सुरु असल्याचं समजतं.
महिलेनं नग्नावस्थेत जात पंचांसमोर चालून किंवा लहान मुलानं गरम कुऱ्हाड हातावर घेऊन आई पतिव्रता असल्याचं सिद्ध करायचं, अनेक वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या पतीपासून केवळ झाडाची काडी मोडण्याच्या प्रथेनुसार फारकत घ्यायची अशी राक्षसी परंपरा कंजारभाट या भटक्या जातीत पाळली जात असल्याचं समोर आलं आहे.
नंदुरबारच्या कंजारवाडामध्ये हुकुमशाहीला आणि माणुसकीलाही लाजवेल असे अत्याचार आशा (नाव बदलले आहे) या महिलेवर करण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून छायानं जातपंचांचा हा अघोरी नियम पाळावा यासाठी तिच्यावर सातत्यानं दबाव टाकला जात आहे.
तिला दोन लहान मुलांसह जातबहिष्कृतही केलं गेलं आहे. जातपंचांची शिकार होण्याऐवजी आशाने नाशिकजवळच्या ओझरमध्ये असलेल्या आपल्या माहेरी आसरा घेतला, तर तिथेही जातपंच येऊन तिला धमकवत आहेत.
इतकं सारं होऊनही नंदुरबारच्या पोलिस प्रशासनाने जुजबी बाँड लिहून घेत पंचांना अभय दिलं आहे. आपल्यावरचा हा अन्याय घेऊन छायानं अखेर अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे धाव घेतली, तेव्हा हा सारा प्रकार चव्हाट्यावर आला. आशाने आपली अंगावर शहारे आणणारी कैफियत मांडली..आशाला न्याय मिळवून देण्यासाठी अंनिसने पुढाकार घेतला आहे. वारंवार नंदुरबारला पोलीस स्टेशनला जाणं आशाच्या जीवावर बेतू शकतं. मारहाण, विनयभंग होऊनही नंदुरबार पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. तर त्यांच्याकडून इतर अपेक्षा काय करायची असा अंनिसचा सवाल आहे.
ही केस नाशिकमध्ये नोंदवून घ्यावी. जातपंचांवर आणि आशाला क्रूरपणे मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी अंनिसने केली आहे.
===================================================मुरुड बीचवर बुडालेल्या सर्व 14 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले
रायगड: मुरुड बीचवर बुडालेल्या पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजच्या विद्यार्थ्यांपैकी शेवटचा मृतदेह अखेर सापडला आहे. सैफ अहमद या विद्यार्थ्याचा मृतदेह 18 ते 19 तासांच्या शोध मोहीमेनंतर सापडला असून मृतांचा आकडा 14 वर गेला आहे.
रायगडमधील मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून अंत झाला. मृतांमध्ये दहा मुली आणि चार मुलांचा समावेश आहे. तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व विद्यार्थी पुण्याच्या आबेदा इनामदार कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
सोमवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास ही घटना दुर्घटना घडली.
पहाटेच्या वेळी रायगडकडे कूच
पुण्यातून पहाटे सहाच्या सुमारास बीसीएसच्या विद्यार्थ्यांची आनंदाने भरलेल्या बसने रायगडच्या दिशेने कूच केली. दुपारच्या सुमारास रायगडमध्ये दाखल झालेले विद्यार्थी मुरुड किनारी जाण्यासाठी उत्सुक होते. समुद्रकिनारी जाऊन मौजमजा करण्याचा उत्साह ओसांडून वाहात होता.
दुपारी तीनच्या सुमारास मुरुड किनारी दाखल झालेल्या बसमधून विद्यार्थ्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि समुद्राच्या दिशेने एकच धूम ठोकली. पण या पोरांचा अतिउत्साह नडला. त्यांना समुद्राने आपला अंदाज दिला नाही, नव्हे जोशात असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची पुसटशी कल्पना आली नाही.
मुरुड दुर्घटना : कधी, कुठे आणि काय घडलं?
रायगड : रायगडचा मुरुड समुद्र किनारा आज पुण्याच्या आबेदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काळ बनला. पर्यटनासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या विद्यार्थ्यांना समुद्राने अक्षरश: गिळून टाकलं. ओहटी असल्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे एक- दोन नव्हे तर तब्बल 13 विद्यार्थ्यांचा बुडून अंत झाला.
दुपारी तीन ते चार ही वेळ विद्यार्थ्यांसाठी काळ बनून आली. यादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली.
पहाटेच्या वेळी रायगडकडे कूच
पुण्यातून पहाटे सहाच्या सुमारास बीसीएसच्या विद्यार्थ्यांची आनंदाने भरलेल्या बसने रायगडच्या दिशेने कूच केली. दुपारच्या सुमारास रायगडमध्ये दाखल झालेले विद्यार्थी मुरुड किनारी जाण्यासाठी उत्सुक होते. समुद्रकिनारी जाऊन मौजमजा करण्याचा उत्साह ओसांडून वाहात होता.
दुपारी तीनच्या सुमारास मुरुड किनारी दाखल झालेल्या बसमधून विद्यार्थ्यांनी पटापट उड्या घेतल्या आणि समुद्राच्या दिशेने एकच धूम ठोकली. पण या पोरांचा अतिउत्साह नडला. त्यांना समुद्राने आपला अंदाज दिला नाही, नव्हे जोशात असलेल्या विद्यार्थ्यांना त्याची पुसटशी कल्पना आली नाही.
आनंदाच्या भरात समुद्रात उतरलेले विद्यार्थ्यी आत..आत …निघाले..हे विद्यार्थी परततील अशी आशा काठावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना होती. मात्र आत गेलेल विद्यार्थी परतलेच नाहीत. जे विद्यार्थी आत समुद्रात गेले होते, त्यामध्ये जास्तीत जास्त मुलींचाच समावेश होता. एक- दोन नव्हे तर 18 विद्यार्थी बुडत होते. मुरुड किनारी एकच हल्लकल्लोळ झाला. मौजमजेची जागा आकंडतांडवाने घेतली. बुडणाऱ्यांना वाचवण्याची धडपड आणि गोंगाट एकाचवेळी सुरु होता.
18 पैकी 4 मुलींना वाचवण्यात यश आलं, पण 14 जणांचा बुडून अंत झाला. यामध्ये 10 मुली आणि 4 मुलांचा समावेश आहे.
मुरुड दुर्घटना – कधी काय झालं?
– पुण्याच्या आबेदा कॉलेजचे 116 विद्यार्थी आणि 11 शिक्षक सहलीसाठी मुरुड समुद्र किनारी सोमवारी पोहोचले. पुण्यातून सकाळी सहाच्या सुमारास 50 मुली, 66 मुले आणि शिक्षक रायगडकडे रवाना झाले होते.
– दुपारी तीन ते चार या दरम्यान विद्यार्थी धमाल-मस्तीसाठी समुद्राच्या पाण्यात उतरले
– समुद्रात ओहटी असल्याने अनेकांना पाण्याचा अंदाज आला नाही.
– साडेतीनच्या सुमारास 5 विद्यार्थी बुडाले
– मिनिटागणिक बुडालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली
– पावणेचारच्या सुमारास बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 9 वर पोहोचला
– संध्याकाळी पाचच्या मृतांचा आकडा 13 पर्यंत पोहोचला
– साडेपाचच्या सुमारास मृतांमध्ये 10 मुली आणि 3 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर. तर पाच जणांना वाचवण्यात यश
– एकूण 18 विद्यार्थी पाण्यात उतरल्याची माहिती रायगड नायब तहसिलदारांनी दिली
– संध्याकाळी सातपर्यंत शोध आणि बचावकार्य सुरूच.
– बचावकार्यात तटरक्षक दल, नौदल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा सहभाग
– नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर, आणि तटरक्षक दलाची सीजी 117 ही बोट व चेतक हेलिकॉप्टर बचावकार्यात
– संध्याकाळी सातच्या सुमारास आबिदा इनामदार कॉलेजचे संस्थापक पी ए इनामदार यांचा माध्यमांशी संवाद.
– मंगळवारी सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरु
– 18 ते 19 तासांच्या शोध मोहिमेनंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास 14 वा मृतदेह सापडला.
===================================================
'मेक इन इंडिया' कार्यक्रमासाठी गिरगाव चौपाटी हवी!, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
मुंबई: गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’चा कार्यक्रम घेण्यासाठी राज्य सरकार आता सुप्रीम कोर्टात गेलं आहे. 13 तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे.
गिरगाव चौपाटीवर विसर्जन वगळता इतर कोणतेही कार्यक्रम घेतले जात नसल्यानं कोर्टानं या कार्यक्रमावर आक्षेप घेत त्यासाठी मनाई केली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
13 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘मेक इन इंडिया’च्या या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींसह विविध देशांचे प्रतिनिधी हजर राहणार आहेत. ज्यासाठी राज्य सरकारनं मोठी तयारीही केली आहे. राज्य सरकारला या भव्य कार्यक्रमासाठी 2 लाख स्केअर फुटांची जागा 15 दिवसांच्या वापराकरता हवी आहे.
या कार्यक्रमासाठी क्वीन्स नेकलेसच्या बॅकड्रॉपवर राज्य सरकारने गिरगाव चौपाटीची निवड केली होती. मात्र, यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना हायकोर्टने स्पष्ट केलं की, याप्रकरणात 2005 साली हायकोर्टाने नेमून दिलेल्या समितीनं गिरगाव चौपाटीवर कोणते कार्यक्रम घ्यावेत याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
===================================================पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 5000 रुपयेही नाहीत!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाच हजार रुपयेही नाहीत. वाचून आश्चर्य वाटेल की, देशाचा पंतप्रधान मात्र त्याच्याकडे पाच हजार रुपये नाहीत? पण हे खरं आहे. पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, “मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 31 मार्च 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्याकडे केवळ 4700 रुपये एवढीच रोख रक्कम होती.”
“मोदींची एकूण संपत्ती 1.40 कोटी रुपये आहे. तर 18 ऑगस्ट 2014 रोजी त्यांनी जाहीर 1.26 कोटी रुपये होती,” असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं
26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदींकडे स्वत:चं असं खासगी वाहन नाही. गुजरातमध्ये त्यांचं बँक अकाऊंट आहे. पण दिल्लीत त्याचं कोणतंही खातं नाही.
नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. दागिन्यांचं म्हटलं तर त्यांच्याकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्याचं वजन 45 ग्राम आहे.
गांधीनगरमध्ये 169.81 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेत असलेल्या घराचा एक चतुर्थांश भाग नरेंद्र मोदींच्या नावावर आहे. त्यांनी हे घर 25 ऑक्टोबर 2002 रोजी खरेदी केलं होतं.
सेव्हिंगच्या नावावर त्यांच्याकडे 20 हजार रुपयांचे एल अॅण्ड टी इन्फ्राचे बॉण्ड्स आहेत. तर 5.45 लाख रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र आहे. याशिवाय जीवन विमा पॉलिसीची रक्कम 1.99 लाख रुपये आहे.
मोदींची एकूण जंगम संपत्ती 41.15 लाख रुपये आहे.
===================================================मुंबईत लोकलच्या महिला डब्यात छेडछाड करणाऱ्याला तुफान मारहाण
मुंबई : लोकलमध्ये शिरुन महिलांची छेडछाड काढणाऱ्या एका तरुणाला महिलांनी चांगलाच चोप दिला आहे. बोरिवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडला.
बोरिवलीहून चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरलेल्या एका तरुणाला महिलांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्या तरुणाला अंधेरीत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
महिलांच्या डब्यात शिरलेल्या या तरुणाने सुरुवातीला काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. मात्र, त्यानंतर महिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. तर एका मुलीचे कपडेही खेचू लागला. त्यानंतर संतप्त महिलांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि अंधेरी स्टेशनवर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
===================================================20 वर्षांच्या संघर्षानंतर जागा मिळाली : हेमा मालिनी
मुंबई : भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी जमीन वादावर मौन सोडलं आहे. “या जागेसाठी मी मागील 20 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. डान्स स्कूल सुरु करण्यासाठी मला जागा मिळावी आणि तो माझा अधिकार आहे,” असं हेमामालिनी यांनी म्हटलं आहे.
“मला नाट्य विहार केंद्रासाठी जमीन देण्यात आली आहे. यामध्ये कोणतंही राजकारण नाही. मी एक कलाकार आहे. नियमांतर्गतच मला मुंबईत जमीन मिळाली आहे. या नृत्य अकादमीमध्ये सर्वांना मोफत प्रवेश देणार,” असंही हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
अंधेरीतील ओशिवरा परिसरातील 2 हजार स्क्वेअर मीटर जागा राज्य सरकार हेमा मालिनींच्या नाट्य विहार केंद्राला फक्त 70 हजारात देणार आहेआहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यासंदर्भातली माहिती मागितली होती. त्यानंतर त्यांना ही माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे ही जागा बागेसाठी आरक्षित आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे या जमिनीसाठी 1976च्या दर लावण्यात आला आहे. 35 रुपये प्रती चौरस मीटर एवढा आकारण्यात आला आहे.
खरंतर भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करत मुंबईतील रिकाम्या जागा पुन्हा महापालिकेच्या ताब्यात घेतल्या. दुसऱ्या बाजूला मात्र फडणवीस सरकारने हेमा मालिनीवर मेहरबानी दाखवली आहे. त्यामुळे भाजपचा दुटप्पीपणा समोर आला आहे.
‘जमीन हातात आल्यावर पैसे देणार’
मथुराच्या खासदार असलेल्या हेमा मालिनी म्हणाल्या की, किती पैसे द्यायचे आहेत हे मला अद्याप माहित नाही. जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर सरकारच्या नियमांनुसार जेवढे पैसे होतील, तेवढे देणार.
===================================================“गुजरात भारताचा भाग नाही का?”, सुप्रीम कोर्टाने गुजरातसह अनेक राज्यांना फटकारलं
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यावरुन सुप्रीम कोर्टाने गुजरातसह अनेक राज्यांना चांगलंच फटकारलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सवाल केला आहे की, “देशाच्या संसदेनं जो कायदा तयार केला आहे, तो लागू का केला जात नाही?”
“गुजरात भारताचा भाग नाही का? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संपूर्ण देशभर लागू करणं बंधनकारक असतानाही गुजरात कायदा लागू करत नाही. उद्या कुणी म्हणेल की, सीआरपीसी, आयपीसीसारखे कायदेही लागू करणार नाही.”, असं म्हणत न्यायाधीश मदान बी लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना फटकारलं आहे.
दुष्काळग्रस्त राज्यातील मनरेगा आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यासारख्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची माहिती आणि आकडेवारी गोळा करण्याचे आदेशही खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहेत.
सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी 10 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले असून याबबात पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला होणार आहे.
दुष्काळग्रस्त भागात रोजगार आणि अन्न पुरवठा योग्य प्रमाणात होतो आहे की नाही, याबाबत माहिती घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 18 जानेवारीला कल्याणकारी योजनांबाबत माहिती देण्यास सांगितले होते.
उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमधील दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रशासन योग्य मदत पुरवत नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने गुजरातसह अन्य राज्यांना फटकारलं आहे.
===================================================छत्रपती व रामाच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न – नारायण राणे
छत्रपती शिवाजी महाराज आणि रामाच्या नावाने राजकारण करणारी मंडळी स्वत:चाच विकास करत आहेत. या दैवतांच्या नावावर पैसा गोळा करत असल्याची रोखठोक टीका माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपचे नाव टाळत केली. सर्वागीण विकास करून देशाची कर्तृत्ववान पिढी निर्माण करण्याची धमक फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे राणे म्हणाले. आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी नारायण राणे यांनी मंदिर, देवतांचे पावित्र्य राखताना संगणक युगाचे भान ठेवून तरुणांना शिक्षण द्यावे, असे आवाहनदेखील केले. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, देवस्थानचे वासुदेव परब, काँग्रेस तालुका अध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, प्रेमानंद देसाई, अॅड. दिलीप नार्वेकर आदी उपस्थित होते. आंबेगाव परिसर निसर्गरम्य अतिसुंदर आहे. या आनंदी कार्यक्रमात लोकांचे चेहरे आनंदी आहेत. पालकमंत्र्यासारखे नाही, त्यांचा चेहरा कायमच रडका असतो असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव टाळत लगावला. सत्ता कोणतीही असो विकास थांबणार नाही. आपला विकास करण्यास समर्थ आहोत असेही राणे म्हणाले. हिंदू माणूसाची मंदिर, दैवतावर श्रद्धा आहे. तुम्ही देव, मंदिराला जेवढे महत्त्व देता तेवढेच महत्त्व शिक्षणाला द्या. संगणकाचे धडे येथे विद्यार्थ्यांना द्या. संगणकीय तंत्रज्ञानाचे शिक्षण ही काळाची गरज असून उद्याची युद्धेदेखील संगणकीय तंत्रज्ञानाची क्रांती ठरेल. आता या कॉम्प्युटरमुळे सर्व सहज शक्य आहे. विद्यार्थ्यांना या शिक्षणाची ओळख करून द्या. आजची मुले शार्प आहेत, त्यांना कर्तृत्ववान घडविण्यासाठी प्रयत्न करू या, असे नारायण राणे म्हणाले. राजकारणासाठी काही लोक दैवतांचा दुरुपयोग करताहेत, गंगेचे पाणी भारतभर फिरवून पैसे गोळा करणारी माणसे रामाच्या नावाचाही राजकारणासाठी दुरुपयोग करताहेत, असा भाजपला टोला हाणत, महागाई कमी करून अच्छे दिन आणणार होते त्याचे काय झाले, असा प्रश्नदेखील राणे यांनी विचारला. आमदार, पालकमंत्र्यांनी जिल्ह्य़ाचा विकास काय केला? आज शिक्षक, डॉक्टर जिल्ह्य़ात नाहीत. केरगावात माकडताप आला, त्यांच्या सेवेसाठी आम्ही धावलो. हे कुठे आहेत असा अप्रत्यक्ष पालकमंत्री दीपक केसरकरवर राणे यांनी प्रहार केला. पर्यटन, प्रक्रिया उद्योग, सी-वर्ल्ड, विमानतळ आणण्याच्या आमच्या संकल्पाला त्यांनी हरताळ फासला असल्याची टीका करत मुंबई-गोवा हायवे माझ्या व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने होत आहे. भाजप फक्त ठेकेदार नेमून पैसे कमविण्याचे काम करील, असे राणे म्हणाले. देवगडला एक लाख नोकऱ्या देणारा रिफायनरी उद्योग आणला जाणार असल्याचे सांगणाऱ्यांनी अद्यापि जमीनही घेतली नाही. कोकणात अणू ऊर्जा, पेट्रोलियम प्रकल्प कशासाठी आणताहेत, असा प्रश्न करत राणे यांनी इंजिनीअिरग, टेक्साटाइल, अॅटोमोबॉइलसारखे प्रकल्प आणा. सुरेश प्रभूंनी रेल्वेचा वर्कशॉप आणावा, असे आवाहन नारायण राणे यांनी केले. रत्नागिरीत मुख्यमंत्री आले आणि गेले. त्यांना कोकणच्या शाश्वत विकासाशी देणे घेणे नाही, असे राणे म्हणाले. जिल्हा नियोजन मंडळ बैठकीच्या आराखडय़ावर पाच महिने सही करण्यास पालकमंत्र्याला वेळ नाही. हा पालकमंत्री नियोजनच्या बैठकीतून उठून जातो. रस्ते व नळपाणी योजना दुरुस्त होत नाहीत अशी टीका पालकमंत्री केसरकर यांच्यावर करत, मी उद्योगमंत्री असताना राज्यातील चार हजार तरुणांना उद्योगासाठी भूखंड दिले. हे साधे उभेही राहू शकत नाहीत, असा टोला राणे यांनी हाणला. महिलांनी उद्योग करावेत म्हणून ओसरगाव येथे उपक्रम हाती घेतला, असे राणे म्हणाले. जिल्ह्य़ात रेशनिंगवर धान्य नाही, डॉक्टर नाहीत, शिक्षक नाहीत. जनता संतापाने उठून अन्याय करणाऱ्यांच्या गालावर आवाज काढत नाही तोवर परिवर्तन होणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगून, मी इंजिनीअिरग कॉलेज, मेडिकल कॉलेज, कृषी कॉलेजसारखे अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. काँग्रेस सोडून अन्य सर्व पक्षांनी एकत्रित येऊन एक कॉलेज काढून चालवून दाखवावे, असे आवाहन नारायण राणे यांनी विरोधकांना दिले. कोकणात दुसरा नारायण राणे शोधा, असा नारायण राणे कोकणाला शोधूनही सापडणार नाही, असे राणे यांनी सांगून छत्रपती शिवाजी महाराज व रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी विकास, सेवा, शिक्षण, आरोग्य व जनतेचा विकास करून कर्तृत्ववान माणसे घडवावीत, असे आवाहन शिवसेना-भाजपचे नाव टाळत केले. या वेळी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी पालकमंत्री म्हणजे बालकमंत्री असल्याची टीका करत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री असताना केलेल्या कामांची जंत्रीच वाचली. या वेळी वासुदेव परब व ग्रामस्थांनी उपस्थितांचे स्वागत केले. सभापती प्रमोद सावंत, राजन भगत यांनीदेखील राणे यांचे स्वागत केले. आंबेगाव शाळा क्र.१च्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे राणेंनी स्वागत करून बक्षीस दिले.
=================================================
प्रियंका चोप्रा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणार
यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठी खास असणार आहे. कारण बॉलिवू़डची देसी गर्ल प्रियंका चोप्रा यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळयात पुरस्कार प्रदान करताना दिसणार आहे. अॅकडमीने यंदाच्या ऑस्कर सोहळयात पुरस्कार प्रदान करणा-यांची नावे टि्वटरवरुन जाहीर केली असून त्यात प्रियंका चोप्राचेही नाव आहे.
ऑस्कर हा हॉलिवूडमधील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा आहे. जगभरातील चित्रपट रसिक, समीक्षकांचे ऑस्कर पुरस्कार सोहळयाकडे लक्ष असते अमेरिकन टी.व्ही. मालिका ‘क्वान्टिको’तील भूमिकेमधून प्रियंकाने आधीच आपली छाप उमटवली आहे. या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राला २०१६ चा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ मिळाला आहे. सध्या ती क्वान्टिकोच्या दुस-या सीझनसाठी शूट करत आहे.
मागच्या आठवडयात तीने एसएजीए पुरस्कार सोहळयात पुरस्कार प्रदान केले होते. मागच्यावर्षी बाजीराव-मस्तानी हा तिचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटातील काशीच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
यावर्षी प्रकाश झा यांच्या आगामी गंगाजलमधून ती पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. २९ फेब्रुवारीला सोमवारी सकाळी डॉल्बी थिएटरमध्ये ८८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगणार आहे.
=====================================================
मला पकडले तर, शत्रू आनंदात रहाणार नाही - मसूद अझर
पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली आहे.
भारता विरुध्द दहशतवादी कारवाया करणा-या अतिरेकी संघटनांवर बंदी आणली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्याने पाकिस्तानी नेतृत्वाला दिला आहे.
मी जे लष्कर तयार केले आहे ते आनंदाने मृत्यूला सामोरे जायला तयार आहे. माझ्या लष्कराला मूळापासून उखडून फेकणे आमच्या शत्रूला शक्य होणार नाही. देवाच्या इच्छेने माझे लष्कर शत्रूंना आनंदी राहू देणार नाही तसेच त्यांना माझी कमतरताही जाणवणार नाही असे अझरने पेशावरमधील अल कलाम या जिहादी नियतकालिकात लिहीलेल्या लेखात म्हटले आहे.
पाकिस्तान नेतृत्वाकडून मशिद, मदरसे आणि जिहाद विरुध्द सुरु असलेली कारवाई देशाच्या अखंडतेसाठी धोका असल्याचेही त्याने म्हटले आहे.
अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हुिसा नाकारला
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांना पाकिस्तानने व्हिसा नाकारला आहे. येत्या पाच फेब्रुवारीला होणा-या कराची लिटरेचर फेस्टिव्हलला ते उपस्थित रहाणार होते. पाकिस्तानकडून व्हिसा न मिळणे दु:खद आणि निराशाजनक असल्याचे अनुपम यांनी म्हटले आहे.
कराची लिटरेचर फेस्टिव्हलसाठी पाकिस्तानने १८ पैकी १७ जणांना व्हिसा मंजूर केला मात्र मला एकटयाला व्हिसा नाकारला असे खेर यांनी म्हटले आहे. ६० वर्षीय अनुपम खेर यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
मी हिंदू आहे हे जाहीरपणे सांगायला मला भिती वाटते या अनुपम खेर यांच्या विधानावरुन मागच्या आठवडयात टि्वटरवरुन त्यांच्यात आणि काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यामध्ये शाब्दीक लढाई रंगली होती. त्याआधी असहिष्णूतेच्या मुद्यावरुन सुरु झालेल्या वादात त्यांनी जाहीरपणे नरेंद्र मोदी सरकारचे समर्थन केले होते.
मुखेड येथील ग्रामपंचायतींना 'बार्टी' च्यावतीने पुस्तके भेट
मुखेड :- रियाज शेख
डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रक्षिक्षण संस्था (बार्टी), पुणे सामाजिक न्याय विभाग समतादुत पथदर्शी प्रकल्प अंतर्गत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्य तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींना महापुरुषांच्या जिवनावरिल वैचारिक पुस्तके वाटप करण्यात आले. अशी माहीती समतादुत कु. दहिकांबळे अनीता विठ्ठल यांनी दिली.
समाजात वैचारिक पातळी वाढवुन समाजात स्वातंत्र्य, समता, न्याय ही मुल्ये रुजवुन समाजाची उन्नती घडवुन आणण्यासाठी डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रक्षिक्षण संस्था बार्टी च्यावतीने तालुक्यातील बेरळी खु., दापका गुंडोपंत, बा-हाळी, वडगाव, निवळी, डोरनाळी या ग्रामपंचायतींना डाँ. बाबासाहेब आंबेडकर जिवनचरित्र, सावित्रीबाई फुले जिवनचरित्र, सर्वोत्तम भुमिपुत्र गौतम बुद्ध, सयाजीराव गायकवाड़, राजर्षी शाहु महाराज, मलाला युसुफझई, फकिरा, बसवप्रज्ञा, जादुटोना विरोधी कायदा 2013, संविधान, भारतीय राज्यघटना, श्री.विठ्ठल एक महासमन्वय असे वैचारिक पुस्तके ग्रामपंचायतींना भेट देण्यात आली. यावेळी ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
धन्यवाद ............
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये 8975495656 हा नंबर अड्ड करा========================================










No comments:
Post a Comment