[अंतरराष्ट्रीय]
१- सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद ठरली पाकची
२- पाकिस्तानमध्ये कारवाईत 12 दहशतवादी ठार
३- पाम्पोर- दहशतवाद्यांना मशिदींतून प्रेरणादायी घोषणा
४- ओबामांनी 106 वर्षाच्या आजीसोबत केला डान्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- 17 चा खतरा नको, म्हणून 18 म्हणजेच 1+8 = 9 ला राज्याचा अर्थसंकल्प
६- गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती, शेतकरी विकास, हेच लक्ष्य : राष्ट्रपती
७- संसद चर्चेसाठी आहे; गोंधळासाठी नाही- राष्ट्रपती
८- आदित्य यांच्या 5 ट्विटला आशिष शेलारांचं 21 ट्विट्सनी उत्तर
९- जेएनयूमध्ये विद्यार्थी विवस्त्र नृत्य करतात - ग्यानदेव अहुजा
१०- कन्हैयाची पँट ओली होईपर्यंत आम्ही त्याला मारले; 'त्या' वकिलांची 'स्टिंग'मध्ये कबुली
११- जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात - भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा
१२- विद्यापीठातील भेदभाव संपवण्यासाठी कायदा करा, राहुल गांधींची मागणी
१३- मोदींकडे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही- नायडू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- अकोला; पत्नीच्या तेराव्याऐवजी शाळा 'डिजिटल', अविनाश नाकटांचं आदर्श पाऊल
१५- पुणे; कर्तव्यदक्ष अधिकारी ओमप्रकाश बकोरियांची बदली, 8 वर्षांत सातव्यांदा उचलबांगडी
१६- जाट आरक्षण - आंदोलकांनी राजस्थानमध्ये जाळलं रेल्वेचं इंजिन
१७- भाजप, संघाचे न ऐकल्यास मारले जाल-राहुल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; भाजपचे माजी आमदार पाशा पटेलांचं सामान आमदार निवासातून बाहेर
१९- पिंपरी; भंगाराच्या दुकानांना भीषण आग, लाखोंचं नुकसान, जीवितहानी नाही
२०- कास पठारावर प्रेमी युगुलांची लूट, पाच जणांना बेड्या
२१- पुणे; भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला
२२- हरियाना: रोहतकमध्ये मुख्यमंत्र्यांना रोखले
२३- आग्रा; मोदींचा सूट घेणाऱयाकडून 200 कोटी रुपये दान
२४- नागपूर; हिमालयाची ‘उंची’ गाठणाऱ्या शर्मिला
२५- स्पाइसजेटकडून अवघ्या 599 रुपयांत विमानप्रवास
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- ..आणि 'झिका'चे नाव बदलले; झाले 'टियागो'
२७- 15 वर्षांनी लहान रमणीकसोबत बॉबी डार्लिंग विवाहबंधनात
२८- पँटच्या खिशात मोबाईल ठेवत असाल तर, सावधान
२९- मला षटकार मारता येत नाही - विराट कोहली
३०- दिलीप कुमार यांची 'चेक' प्रकरणातून निर्दोष सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================

=====================================
=====================================
=====================================
=====================================
=====================================
कन्हैयाची पँट ओली होईपर्यंत आम्ही त्याला मारले; 'त्या' वकिलांची 'स्टिंग'मध्ये कबुली
‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलीस कोठडीत असताना आम्ही दोघांनी त्याला सुमारे तीन तास चोपले होते, असा खळबळजनक खुलासा ‘इंडिया टुडे’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशदरम्यान दोन वकिलांनी केला आहे. या मारहाणीमुळे कन्हैयाने स्वत:ची पँट ओली केल्याची कबुलीही विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग यांनी दिली आहे. आम्ही त्याला साधारण तीन तास मारत होतो. यावेळी आम्ही त्याच्या तोंडून ‘भारत माता की जय’ ही घोषणा वदवून घेण्याचाही प्रयत्न करत होतो. अखेर त्याने तसे म्हटल्यानंतर आम्ही त्याला जाऊ दिले, असे चौहान याने सांगितले. कन्हैयाला १५ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पतियाळा न्यायालयात नेले जात असताना विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग या दोन वकिलांनी तेथे जमलेल्या आंदोलक विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण केली होती. स्टिंग ऑपरेशनदरम्यान याबद्दलची कबुलीही देताना त्यावेळी आम्हाला पोलिसांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यशपाल सिंग याने सांगितले. आम्ही गणवेशात नसल्यामुळे कन्हैयाला मारू शकत नसल्याचेही पोलिसांनी आम्हाला सांगितले होते, असेही यशपालने म्हटले आहे. माझ्यावर कोणताही खटला दाखल होवो, मी कुठूनही पेट्रोल बॉम्ब आणेल. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सोडणार नाही. मला कन्हैयाला ठेवलेल्या जेलमध्ये जाऊन तिथे त्याला मारायचे आहे. मी माझ्या जामीनासाठी अर्ज करणार नाही. मी एक किंवा दोन दिवसांसाठी तुरूंगात जाईन, असे यशपाल सिंग याने म्हटले आहे.
=====================================
‘जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात’
विद्यापीठातील भेदभाव संपवण्यासाठी कायदा करा, राहुल गांधींची मागणी
पुण्यात भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला
पूर्ववैमनस्यातून पुण्यातील कोथरूड परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून मंगळवारी सकाळी खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे काहीवेळ घबराटीचे वातावरण पसरले होते. सागर शिंदे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, संजय मोहोळ आणि संभाजी कांबळे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे मंगळवारी सकाळी पौड फाट्याजवळ उभा होता. साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या मोहोळ आणि कांबळे यांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्याच्या डोक्यावरही वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर सागर तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. मोहोळ आणि कांबळे पळून गेल्यावर स्थानिक लोकांनी सागरला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मोहोळ आणि कांबळे हे दोघेही भीमनगर, शीलाविहार कॉलनी येथील राहणार आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करून त्यांना अटक केली. सागर शिंदे हा कोथरूडमधील दहभुजा गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे. त्याच्यात आणि मोहोळ, कांबळे यांच्या आर्थिक व्यवहारासह इतर कारणांवरून वाद होता. त्यातूनच हा हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=====================================
दिलीप कुमार यांची 'चेक' प्रकरणातून निर्दोष सुटका

मुंबई- अभिनेते दिलीप कुमार यांची चेक बाऊंस प्रकरणातून गिरगाव सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) निर्दोष सुटका केली. दिलीप कुमार हे 1998 साली कोलकाता येथील जीके एक्जिम इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक होते. डेक्कन सीमेंटसने या जीके कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दिलीप कुमार यांनी परत फेडीचे दोन चेक दिले होते. परंतु, ते बाऊंस झाले होते. त्यामुळे डेक्कन सीमेंटसने दिलीप कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दिलीप कुमार (वय 94) हे सुनावणीवेळी वयोमानामुळे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
=====================================
हरियाना: रोहतकमध्ये मुख्यमंत्र्यांना रोखले
रोहतक - जाट आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आंदोलनामुळे सर्वांत प्रभावित झालेल्या रोहतक या जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरुद्ध घोषणा देत त्यांचा निषेध करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे खट्टर यांना त्यांचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. जाट समाजाचे आरक्षणाच्या मुद्यावरून हरियानामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांनी रेल्वे, बस रोखून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले. आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री खट्टर आज या आंदोलनातील सर्वात प्रभावित रोहतक जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. वेळी एका जागी भाषण करत असताना आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण मध्येच थांबवावे लागले. ते सध्या कॅनॉल रेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत.
दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागणे ही दु:खद घटना असल्याने खट्टर यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनाच्या मागे असलेला कट लवकरच उघडकीस आणण्यात येणार असल्याचेही खट्टर म्हणाले.
=====================================
संसद चर्चेसाठी आहे; गोंधळासाठी नाही- राष्ट्रपती

नवी दिल्ली- संसद ही चर्चेसाठी असून गोंधळासाठी नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (मंगळवार) संसदेत भाषणादरम्यान सांगितले.
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेच्या परंपरेनुसार राष्ट्रपती बग्गीमधून संसद भवनामध्ये दाखल झाले होते. दोन्ही सभागृहांना उद्देशून बोलताना राष्ट्रपती म्हणाले, ‘हमारी सरकार सबका साथ, सबका विकास‘ या उद्देशाने काम करत आहे. संसद ही काम करण्यासाठी असून गोंधळासाठी नाही.‘
=====================================
..आणि 'झिका'चे नाव बदलले; झाले 'टियागो'
नवी दिल्ली - सामाजिक जबाबदारी तसेच व्यावसायिक विचार करून टाटा मोटर्सने मागील महिन्यात जाहीर केलेल्या आगामी ‘झिका‘ नावाच्या चारचाकी वाहनाचे नाव बदलून ‘टियागो‘ असे केले आहे.
मागील महिन्यात टाटा मोटर्सने लवकरच "झिका‘ नावाची नवी मोटार सादर करणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान जगभरात प्राणघातक आजार पसरविणाऱ्या ‘झिका‘ नावाचा विषाणूही त्याचवेळी चर्चेत आला. त्यामुळे दोन्ही नावात साधर्म्य आढळून येत होते. नामसाधर्म्याचा मोटारीच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर विक्रीवर परिणाम होऊन व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत असल्याचे म्हणत टाटा मोटर्सने ‘झिका‘चे नाव बदलून "टियागो‘ असे केले आहे. साडेतीन ते पाच लाख रुपये किंमतीची ही मोटार ‘टाटा इंडिका‘ची जागा घेण्याची शक्यता आहे. मार्च अखेर ही मोटार बाजारात दाखल होणार आहे.
जगभरात पसरलेल्या ‘झिका‘ विषाणूमुळे नवजात बालकाच्या मेंदूची वाढ खुंटत असून नवजात अर्भकाला मातेच्या गर्भात असतानाच या आजाराची प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले आहे. इतर सर्वसामान्य निरोगी व्यक्तींनाही या आजाराची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जगात अनेक लोक झिका विषाणूच्या प्रसारामुळे मरण पावत आहेत.
=====================================
मोदींचा सूट घेणाऱयाकडून 200 कोटी रुपये दान

आग्रा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील दहा हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱयावर आले त्यावेळी मोदींनी 13 लाख रुपयांचा सूट परिधान केला होता. यासूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे सोनेरी अक्षरांमध्ये नाव लिहिलेले होते. महागड्या सूटमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. पुढे या सूटचा लिलाव करण्यात आला होता.
सूट खरेदी करणारे बादशहा एका कार्यक्रमादरम्यान आज (मंगळवार) येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले. ‘सूरत येथे 13 मार्च रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी देशातून निवडलेल्या 10 हजार मुलींच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. म्हणजेच एका मुलीला दोन लाख रुपये मिळणार आहेत.‘
दरम्यान, बादशहा यांच्याकडून प्रथमच अशा प्रकारचे दान होत नाही. पाटीदार समाजात जन्मलेल्या 5 हजार मुलींच्या नावावर प्रत्येकी दोन लाख रुपये जमा केले आहेत. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ते पैसे मिळू शकणार आहेत.
=====================================
भाजप, संघाचे न ऐकल्यास मारले जाल-राहुल

हिमालयाची ‘उंची’ गाठणाऱ्या शर्मिला
तीस वर्षांपासून सातत्याने करताहेत ट्रेकिंग

=====================================
सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद ठरली पाकची

इस्लमाबाद- जगामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद म्हणून येथील ठरली आहे, असा दावा पाकिस्तानने आज (मंगळवार) केला आहे. पाकिस्तानमधील संसद ही पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. सौरऊर्जेसाठी चीनने साडेपाच कोटी डॉलर एवढा निधी दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हस्ते आज सौरऊर्जेचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले. राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन 2014 मध्ये करण्यात आली होती. यासाठी मित्र देश असलेल्या चीनचे सहकार्य लाभले आहे. यामुळे पाकिस्तान-चीनच्या मैत्रीचा आणखी एक अनुभव पुढे आला आहे. पाकिस्तानची संसद आज पूर्णपणे सौरऊर्जेवर चालू लागली आहे. खासगी संस्थांनीसुद्धा सौरऊर्जेवर भर द्यावा, असे शरीफ म्हणाले.
=====================================
पाकिस्तानमध्ये कारवाईत 12 दहशतवादी ठार
कराची (पाकिस्तान)- पोलिसांनी शहरामध्ये केलेल्या कारवाईत 12 दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 दहशतवादी जागीच ठार झाले आहेत. दोन पोलिस जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर-ए-जांघवी व तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेशी संबंधित हे दहशतवादी असल्याचे समजते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
=====================================
पाम्पोर- दहशतवाद्यांना मशिदींतून प्रेरणादायी घोषणा
पाम्पोर- भारतीय सैन्य आपल्या प्राणांची बाजी लावून घुसखोर दहशतवाद्यांशी लढत असताना पांपोरच्या सभोवतालच्या परिसरातून ध्वनिक्षेपकांवरून दहशतवाद्यांचे स्तुती करीत त्यांना प्रोत्साहन देण्यात येत होते, अशी माहिती समोर आली आहे. पाम्पोर येथील एका सरकारी इमारतीत लपून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने सलग तीन दिवस लढून जेरीस आणले व अखेर यशस्वीपणे त्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, त्याचवेळी त्या परिसरातील मशिंदीमध्ये त्या दहशतवाद्यांना ‘मुजाहिद‘ म्हणजेच पवित्र योद्धे असे संबोधून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती. जागो, जागो सुबह हुई, जिवे जिवे पाकिस्तान, तसेच हम क्या चाहते है- आझादी अशा घोषणा देण्यात येत होत्या.
=====================================
स्पाइसजेटकडून अवघ्या 599 रुपयांत विमानप्रवास
मोदींकडे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही- नायडू
नवी दिल्ली - "पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे "अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा‘ नाही, की ते प्रत्येक शहराला स्वतः स्मार्ट करतील. शहरे स्मार्ट होण्यासाठी लोकसहभाग, स्थानिक नेत्यांचा पुढाकार, त्यांची दूरदृष्टी व काटेकोर अंमलबजावणी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत,‘‘ असे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या "इंडिया स्मार्ट सिटी मिशन : नेक्स्ट स्टेप‘ या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नायडू बोलत होते. स्मार्ट शहरांची निवड करताना कोणत्याही प्रकारचे राजकारण केलेले नाही, असे स्पष्ट करत नायडू म्हणाले, की स्मार्ट सिटीसाठी दिलेल्या निधीचा वापर इतर कारणांसाठी करू नये असे सांगत, निवडक 20 स्मार्ट शहरांनी 25 जूनपासून काम सुरू करावे. जर लोकांनी प्रशासनाला सहकार्यच केले नाही, तर स्मार्ट सिटी शक्य आहे का? असा सवालही त्यांनी केला. "स्मार्ट शहरांची स्पर्धा पूर्णपणे तटस्थतेने राबविण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही सहभागी शहरासंबंधी भेदभावाची भूमिका केंद्र सरकारची नाही; पण राजकीय नेत्यांनी स्मार्ट शहरांसाठी आपली ताकद पणाला लावली तर मात्र ही स्पर्धा अधिक सकस होण्यास मदत होणार आहे,‘‘ असेही त्यांनी नमूद केले. जर राजकीय नेत्यांनी नगरविकास व सुशासनावर भर देत स्मार्ट सिटीचे काम केल्यास त्यातून पायाभूत सुविधांसंदर्भात भरीव कामगिरी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
=====================================
=====================================
१- सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद ठरली पाकची
२- पाकिस्तानमध्ये कारवाईत 12 दहशतवादी ठार
३- पाम्पोर- दहशतवाद्यांना मशिदींतून प्रेरणादायी घोषणा
४- ओबामांनी 106 वर्षाच्या आजीसोबत केला डान्स
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- 17 चा खतरा नको, म्हणून 18 म्हणजेच 1+8 = 9 ला राज्याचा अर्थसंकल्प
६- गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती, शेतकरी विकास, हेच लक्ष्य : राष्ट्रपती
७- संसद चर्चेसाठी आहे; गोंधळासाठी नाही- राष्ट्रपती
८- आदित्य यांच्या 5 ट्विटला आशिष शेलारांचं 21 ट्विट्सनी उत्तर
९- जेएनयूमध्ये विद्यार्थी विवस्त्र नृत्य करतात - ग्यानदेव अहुजा
१०- कन्हैयाची पँट ओली होईपर्यंत आम्ही त्याला मारले; 'त्या' वकिलांची 'स्टिंग'मध्ये कबुली
११- जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात - भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा
१२- विद्यापीठातील भेदभाव संपवण्यासाठी कायदा करा, राहुल गांधींची मागणी
१३- मोदींकडे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही- नायडू
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१४- अकोला; पत्नीच्या तेराव्याऐवजी शाळा 'डिजिटल', अविनाश नाकटांचं आदर्श पाऊल
१५- पुणे; कर्तव्यदक्ष अधिकारी ओमप्रकाश बकोरियांची बदली, 8 वर्षांत सातव्यांदा उचलबांगडी
१६- जाट आरक्षण - आंदोलकांनी राजस्थानमध्ये जाळलं रेल्वेचं इंजिन
१७- भाजप, संघाचे न ऐकल्यास मारले जाल-राहुल
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- मुंबई; भाजपचे माजी आमदार पाशा पटेलांचं सामान आमदार निवासातून बाहेर
१९- पिंपरी; भंगाराच्या दुकानांना भीषण आग, लाखोंचं नुकसान, जीवितहानी नाही
२०- कास पठारावर प्रेमी युगुलांची लूट, पाच जणांना बेड्या
२१- पुणे; भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला
२२- हरियाना: रोहतकमध्ये मुख्यमंत्र्यांना रोखले
२३- आग्रा; मोदींचा सूट घेणाऱयाकडून 200 कोटी रुपये दान
२४- नागपूर; हिमालयाची ‘उंची’ गाठणाऱ्या शर्मिला
२५- स्पाइसजेटकडून अवघ्या 599 रुपयांत विमानप्रवास
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- ..आणि 'झिका'चे नाव बदलले; झाले 'टियागो'
२७- 15 वर्षांनी लहान रमणीकसोबत बॉबी डार्लिंग विवाहबंधनात
२८- पँटच्या खिशात मोबाईल ठेवत असाल तर, सावधान
२९- मला षटकार मारता येत नाही - विराट कोहली
३०- दिलीप कुमार यांची 'चेक' प्रकरणातून निर्दोष सुटका
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
काम करताना चिंता करू नका. जे व्हायचे ते होणारच आहे. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत
[तातेराव इंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
व्हेलेंटाईन निमित्त खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656
**********************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ताज्या बातम्या, क्रिकेट, व्हिडीओ, शॉपिंग, ब्राऊजिंग अॅपमध्ये समाविष्ठ आहे.
=====================================
17 चा खतरा नको, म्हणून 18 म्हणजेच 1+8 = 9 ला राज्याचा अर्थसंकल्प
मुंबई : शुभ आणि अशुभचं गणित राज्य सरकारच्या डोक्यातून जात नाही याचीच प्रचिती आली आहे. कारण राज्याच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली असताना, त्या तारखेची बेरीज अशुभ अंक येत असल्याचं मानत ही तारीख पुढे ढकलण्यात आली. राज्याचा अर्थसंकल्प 17 मार्चला सादर करण्याचं आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र 17 चा खतरा टाळून ही तारीख 18 करण्यात आली. यासाठी वरीष्ठ मंत्र्यांनी अनोखं लॉजिक लावलं. 18 म्हणजे 1+8 = 9 हा शुभ अंक येत असल्याचं मानत, याच तारखेला अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ठरलेली 17 मार्चची तारीख ऐनवेळी बदलून 18 तारीख निश्चित करण्यात आली. दरम्यान, राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्च ते 13 एप्रिल 2016 यादरम्यान असेल. तर 21 मार्चला अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
पत्नीच्या तेराव्याऐवजी शाळा 'डिजिटल', अविनाश नाकटांचं आदर्श पाऊल
अकोला : आपल्या समाजात मृत्यूनंतरच्या कर्मकांडांना मोठं महत्त्व… दशक्रिया, तेरावं, गोडजेवण, पिंडदान, अस्थीविसर्जन अन् परत वर्षभराने येणारं वर्षश्राद्ध. या सर्व गोष्टींवरचा खर्चही कधीकधी अगदी लाखोंच्या घरातला. पण, अकोला जिल्ह्यातील तांदळी बूझरुक गावातील अविनाश नाकट या सामाजिक आणि शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्याने आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे. पत्नीच्या निधनानंतर अविनाश यांनी दशक्रिया अन् तेरवीसह इतर रुढी-परंपरांना संपूर्णपणे फाटा देत यातून वाचलेल्या दीड लाख रुपयांतून गावाची जिल्हा परिषद शाळा ‘डिजिटल’ केली आहे. या शाळेचं लोकार्पण 22 फेब्रुवारीला करण्यात आलं. एका सकारात्मक आणि शाश्वत क्रांतीच्या विचारांची बीजं पेरणारा अविनाश यांचा हा जगावेगळा प्रयत्न आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या तांदळी गावात सोमवारी ‘डिजिटल क्लासरुम’च्या लोकार्पणाचा कार्यक्रम पाड पडला. पण कार्यक्रमातील वातावरण नेहमीच्या कार्यक्रमासारखं उत्साही तर बिलकुलच नव्हतं. पण, याच आनंदाच्या सोहळ्याच्या क्षणा-क्षणाला होती ती कारुण्य, दु:ख, अश्रू अन अनेक अलवार-हळूवार आठवणींची किनार. गावातील अविनाश नाकट यांनी आपली स्वर्गीय पत्नी रुपाली यांच्या स्मृतीत गावातील जिल्हा परिषदेची शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. त्याच ‘डिजिटल शाळे’चा लोकार्पण सोहळा सोमवारी झाला.
कर्तव्यदक्ष अधिकारी ओमप्रकाश बकोरियांची बदली, 8 वर्षांत सातव्यांदा उचलबांगडी
पुणे : पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरियांच्या बदलीविरोधात पुणेकरांनी एल्गार उभारला आहे. केवळ अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती मोडीत काढल्यानं बकोरिया यांची बदली केल्याचा आरोप सजग नागरी मंचनं केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बकोरिया पुण्यात कार्यरत आहेत. नियमानुसार अजून एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्याआधीच त्यांना औरंगाबादचे पालिका आयुक्त म्हणून रवाना करण्यात आलं. ओमप्रकाश बकोरियांची बदली नसून त्यांना पदोन्नती दिल्याची झालर लाऊन भाजपनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, सत्य वेगळंच आहे. गेल्या वर्षीही बकोरियांच्या बदलीसाठी सत्ताधारी आमदारांनी दबाव आणला होता. मात्र पुणेकरांच्या सजगतेमुळं त्याला यश आलं नाही.
भाजपचे माजी आमदार पाशा पटेलांचं सामान आमदार निवासातून बाहेर
मुंबई : भाजपचे माजी आमदार पाशा पटेल यांचं सामान आमदार निवासातून बाहेर काढण्यात आलं आहे. पाशा पटेल रुम सोडत नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
पाशा पटेल कोण आहेत?
पाशा पटेल हे विधान परिषदेवर आमदार होते. मात्र जुलै 2012 सालीच त्यांचा कार्यकाल संपला. त्यानंतर तीन ते साडेतीन वर्षे उलटूनही त्यांनी मनोरा येथील आमदार निवासाचा ताबा सोडला नाही. त्यामुळे अखेर आज त्यांचं सामान बाहेर काढून काऊंटरवर ठेवण्यात आलं आहे.
सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदारावरच कारवाईचा बडगा
पाशा पटेल यांना मनोरा आमदार निवासस्थानातील 92-ब ही खोली दिली होती. खरं तर राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी पक्षाच्या माजी आमदारावर अशा प्रकारे कारवाईचा बडगा उचलल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिंपरीत भंगाराच्या दुकानांना भीषण आग, लाखोंचं नुकसान, जीवितहानी नाही
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये कुदळवाडी इथं दुपारी लागलेल्या भीषण आगीत भंगार मालाची दुकानं आणि लाकडाची वखार जळून भस्मसात झाली. शहरातील महापालिकेचं तसेच खासगी कंपन्यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भंगार मालाची दुकानं आणि लाकडाची वखार शेजारी-शेजारी असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. आगीमुळे धुराचे प्रचंड लोळ उसळल्यानं आकाश झाकोळून गेलंय. घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीमुळे आग विझवण्यात अडचण निर्माण झाल्यानं पोलिसांना गर्दी हटविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. यामुळे बघ्यांमध्ये आणि पोलिसांमध्येही यावेळी बाचाबाची झालीय.
आदित्य यांच्या 5 ट्विटला आशिष शेलारांचं 21 ट्विट्सनी उत्तर
मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात ट्विटरवर पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई रंगली आहे. वांद्रे परिसरात केलेल्या कामावरून हे ट्विटरवॉर सुरु आहे.
वांद्र्यातील कामाचं श्रेय आदित्य ठाकरे शिवसेनेला देत असल्याचा आरोप आशिष शेलारांनी केला आहे. तसंच ज्या कामांबाबत आदित्य ठाकरे बोलत आहेत, ती कामं आपण स्वत: केल्याचा दावा शेलारांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी पुरावेही दिले आहेत. त्यामुळे हे ‘क्रेडिट करप्शन’ अर्थात श्रेय घोटाळा असल्याचा टोमणा शेलारांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
काय आहे प्रकरण?
वांद्रे रेक्लमेशन इथे खुल्या मैदानासाठी 22 एकरचा प्लॉट द्यावा अशी मागणी आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. इथे एमएसआरडीसी खेळासाठी खुलं मैदान विकसित करणार असल्याचं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं.
कास पठारावर प्रेमी युगुलांची लूट, पाच जणांना बेड्या
सातारा : पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कास पठाराच्या परिसरात प्रेमी युगलांना लुटण्याच्या अनेक घटना घडत असल्याचं उघड झालं आहे. अशा प्रेमी युगलांना लुटणाऱ्या पाच जणांना सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. महाविद्यालयीन युवक या परिसरात फिरायला जात असतात. निर्जन स्थळी जाऊन बसणाऱ्या युगुलांना धमकावून त्यांना लुटण्याचे प्रकार अनेक वेळा घडत होते. याबाबत पोलिसांना माहिती होती मात्र कोणीच तक्रार करायला पुढे येत नव्हतं. प्रेमी युगुलांपैकी एका तरुणाने सातारा तालुका पोलिस ठाण्यात जात तक्रार नोंदवण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे या पाच जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. आतापर्यंत ज्या प्रेमी युगलांना या भागात लुटले आहे, त्यांनी पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा, त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही पोलिसांनी केलं आहे.
15 वर्षांनी लहान रमणीकसोबत बॉबी डार्लिंग विवाहबंधनात
नवी दिल्ली : क्या कूल है हम चित्रपट, बिग बॉसचं पहिलं पर्व यात झळकलेला बॉबी डार्लिंग तुम्हाला आठवतोय का? पंकज शर्मा उर्फ बॉबी डार्लिंग त्याचा बॉयफ्रेण्ड रमणीक शर्मासोबत विवाहबंधनात अडकला. भोपाळमधील बिजनेसमन असलेल्या 28 वर्षीय रमणीक शर्मासोबत 43 वर्षीय बॉबी डार्लिंगने लगीनगाठ बांधली. 11 फेब्रुवारी रोजी मित्र आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. बॉबीने 2010 मध्ये ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करुन जेंडर चेंज ऑपरेशनच्या दिशेने पाऊल टाकलं. त्यानंतर बॉबीने पूर्णपणे लिंगबदल शस्त्रक्रिया करुन घेतली. या ऑपरेशननंतर बॉबी उर्फ पंकजची पाखी झाली. दोघांच्याही कुटुंबीयांच्या पसंतीने आणि आशीर्वादाने भोपाळमध्ये त्यांनी संसाराची सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
पँटच्या खिशात मोबाईल ठेवत असाल तर, सावधान
लंडन : मोबाईल.. आजच्या काळातील सर्वांची एक गरज.. पण, जर तुम्ही तुमचा मोबाईल पँटच्या खिशात ठेवत असाल तर सावधान! कारण मोबाईल पँटच्या खिशात घेवून फिरणं तुमच्या पौरुषत्वावर विपरीत परिणाम करू शकतं. एक्स्टर विद्यापीठाच्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.मोबाईल फोन बाळगणं एकेकाळी स्टेटस सिम्बॉल होता, पण आता ती काळानुरुप गरज बनली आहे. पण नवनव्या संशोधनांनुसार मोबाईल फोन वापराचे काही धोकेही पुढे येवू लागले आहेत. असाच एक धोका आता तुम्ही मोबाईल कुठे ठेवता यावरुनही समोर आला आहे. तुम्ही जर पँटच्या खिशात तुमचा मोबाईल ठेवत असाल तर, तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.मोबाईल फोनचा वाढता वापर आणि त्यामुळं होणाऱ्या दुषपरिणामांसंबंधी जगभरात सातत्याने संशोधन सुरु आहे. पँटच्या खिशात मोबाईल फोन ठेवणाऱ्या पुरुषांमधील पौरुषत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे. फोनमधील किरणत्सोर्गामुळं विर्याच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.एक्सटर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका पाहणीत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियशनमुळं विर्याची गती 8 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने 1492 पुरुषांचा सहभाग असलेल्या दहा अभ्यासांच्या पाहणीचे पुर्नपरिक्षण केलं. मात्र फर्टिलिटी क्षेत्रातील तज्ज्ञाने या अभ्यासातील निरिक्षणाशी असहमती दर्शवत आपण आपला आयफोन पँटच्या खिशातच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.पुरुषाच्या पौरुषत्वावर मोबाईल फोनचा लक्षणीय प्रभाव पडतो असं शास्त्रज्ञांचे मत आहे. पँटच्या खिशात मोबाईल फोन बाळगणाऱ्यांना किरणोत्सर्गाचा धोका संभवतो आणि त्यामुळं अशा मोबाईलधारकाची पिता होण्याची शक्यता कमी होते. जगभरातील बहुतांश व्यक्ती मोबाईल फोनचा वापर करतात आणि श्रीमंत देशातील जवळपास 14 टक्के जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो.एक्सटर विद्यापीठातील डॉ. फिओना मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने 1492 पुरुषांचा सहभाग असलेल्या दहा अभ्यासांचे पुर्नावलोकन केलं. तसचं जे पुरुष आपलं पौरुषत्व गमावण्याच्या पातळीला पोहचले आहेत, त्यांना अधिक धोका संभवतो असंही आढळून आलं आहे. अर्थात या निष्कर्षांना पुष्टी देण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकताही डॉ.मॅथ्यूज यांनी बोलावून दाखवली आहे.
गरिबी हटवणे, रोजगार निर्मिती, शेतकरी विकास, हेच लक्ष्य : राष्ट्रपती
नवी दिल्ली: ‘सबका साथ, सबका विकास’ हेच आमच्या सरकारचं ध्येय आहे. तळागाळापर्यंत विकास पोहोचवण्याचं सरकारचं लक्ष आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. जनधन, मेक इन इंडिया अशा योजनांचा उल्लेख करत सरकार विकासाबाबत कटिबद्ध आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. त्यासोबत कृषी, रोजगार, सौर उर्जा अशा क्षेत्रातील अनेक महत्वपूर्ण बदलांचाही मुखर्जी यांनी आर्जून उल्लेख केला.
देशातील गरिबी हटवणे, तरुणांना रोजगार, प्रत्येक कुटुंबाला घर, शेतकऱ्याची प्रगती या मुद्द्यांना सरकारचं प्राधान्य असेल, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
गरिबांपर्यंत विकासगंगा पोहोचवण्याचं लक्ष्य
देशातील गरिबातील गरिबापर्यंत विकासगंगा पोहोचवण्याचं लक्ष्य आमच्या सरकारचं आहे. सबका साथ, सबका विकास हे सरकारचं ध्येय आहे. गेल्यावर्षी सुरु झालेली जनधन योजना उत्तमरित्या सुरु आहे. शेतकऱ्यांना उत्तम सुविधा पोहोचवणं, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यालाही प्राधान्य राहिल, असं राष्ट्रपतींनी नमूद केलं.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पंतप्रधान पीक विमा योजना यासारख्या योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
जाट आरक्षण - आंदोलकांनी राजस्थानमध्ये जाळलं रेल्वेचं इंजिन
- भारतपूर (राजस्थान), दि. 23 - जाट आरक्षणाची मागणी करणा-या हिंसक निदर्शकांनी मंगळवारी रेल्वे स्थानकामध्ये तोडफोड केली तसेच मालगाडीच्या एका इंजिनाला आग लावली. सलग दुस-या दिवशीजाट आंदोलनाने समाज जीवन अस्थिर केले आहे. पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला तसेच अश्रुधुराचा वापर केला. उच्छैन येथे राष्ट्रीय महामार्ग अकरावर निदर्शक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते, तिथेही पोलीसांनी हवेत गोळीबार केला. हेलक स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीच्या इंजिनाला निदर्शकांनी आग लावली तर पारपेरा या स्थानकाची नासधूस केल्याचे भारतपूरचे पोलीस महासंचालक अलोक वशिष्ठ यांनी सांगितले. जिल्ह्यात जिथे जिथे परिस्थिती चिघळली तिथे तिथे पोलीसांची कुमक धाडण्यात आली असून निदर्शकांना पांगवण्याचे काम सुरू असल्याचे वशिष्ठ म्हणाले.आता, भारतपूरमधली स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. निदर्शकांनी केवळ रेल्वे स्थानकांची नासधूस केली नाही तर तिकिट काउंटरवरून पाच हजार रुपयांची रक्कमही लंपास केल्याचे पोलीसांनी सांगितले.हरयाणामधल्या जाटांच्या आंदोलनाला राजस्थानमधल्या जाट समुदायाने पाठिंबा दिल्यामुळे कालपासून राजस्थानमधले काही जिल्हे अशांत झाले आहेत. अशा भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
ओबामांनी 106 वर्षाच्या आजीसोबत केला डान्स
- वॉशिंग्टन, दि. 23- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा थक्क झाले जेव्हा 106 वर्षांच्या आजीने त्यांच्यासमोर डान्स केला. युरोन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 106 वर्षाच्या वर्जिनिया मॅकलॉरिन ओबामांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आल्या होत्या. ओबामांची भेट झाल्याचा त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी डान्स करण्यास सुरुवात केली. यावेळी ओबामांची पत्नी मिशेलदेखील तिथे उपस्थित होत्या. आजींना डान्स करताना पाहून ओबामा आणि मिशेल यांनीदेखील त्यांच्यासोबत डान्स केला. अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला भेटून मला खुप आनंद झाला असल्याची भावनाही त्यांनी ओबामा आणि मिशेल यांना बोलून दाखवली.
मला षटकार मारता येत नाही - विराट कोहली
- ऑनलाइन लोकमतमीरपूर, दि. २३ - मला षटकार मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर खेचत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष दिले. असे बोल भारताचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली ने मांडले. एक प्रकारे विराटने आपल्या खेळातील कुमकुवत बाजूच समोर आणली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय खेळातील प्रत्येक प्रकारात विराटचा दबदबा आहे. भारतीय उपकर्णधार विराट कोहली ने आतापर्यंत २२ टी-२० सामन्यात फक्त २७ षटकार मारले आहेत. तर त्याच सामन्यात १२७ चौकार त्याने लगावले आहेत. उद्यापासून आशिया चषकास सुरवात होत आहे. भारताचा सलामीचा सामना यजमान बांग्लादेश सोबत होणार आहे. आशिया चषकास सुरवात होण्याच्या पुर्वसंध्येला विराट पत्रकांराशी बोलत होता. तो पुढे म्हणाला सुरवातीला मी ज्यावेळी टी २० सामना खेळत होतो त्यावेळी पहिल्या १० चेंडूत फक्त १० धावा करायच्या आणि त्यानंतर जलद धावसंख्या वाढवायची. अशिया चषकापुर्वी भारतीय संघ समतोल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे आत्मविश्वास आहे.
जेएनयूमध्ये विद्यार्थी विवस्त्र नृत्य करतात - ग्यानदेव अहुजा
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २३ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आपली चमक घालवून बसले आहे. हे विद्यापीठ आता देशद्रोह्यांचा अड्डा बनले असून इथे रात्री आठ वाजल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे विवस्त्र नृत्य चालते. राजस्थानचे भाजप आमदार ग्यानदेव अहुजा यांनी ही धक्कादायक विधाने केली आहेत. अहुजा एवढयावरच थांबलेले नाहीत तर, जेएनयूच्या आवारात रोज ३ हजार कंडोम्स आणि गर्भधारण विरोधी इंजेक्शन्स वापरली जातात असे गंभीर आरोप केले आहेत. जेएनयूच्या आवारात तुम्हाला दररोज तीन हजार बिअर कॅन, दहा हजार सिगारेटस, चार हजार बिडीचे तुकडे आणि ५० हजार हाडांचे तुकडे पडलेले असतात असा दावा ग्यानदेव अहुजा यांनी केला.
कन्हैयाची पँट ओली होईपर्यंत आम्ही त्याला मारले; 'त्या' वकिलांची 'स्टिंग'मध्ये कबुली
‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारला पोलीस कोठडीत असताना आम्ही दोघांनी त्याला सुमारे तीन तास चोपले होते, असा खळबळजनक खुलासा ‘इंडिया टुडे’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशदरम्यान दोन वकिलांनी केला आहे. या मारहाणीमुळे कन्हैयाने स्वत:ची पँट ओली केल्याची कबुलीही विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग यांनी दिली आहे. आम्ही त्याला साधारण तीन तास मारत होतो. यावेळी आम्ही त्याच्या तोंडून ‘भारत माता की जय’ ही घोषणा वदवून घेण्याचाही प्रयत्न करत होतो. अखेर त्याने तसे म्हटल्यानंतर आम्ही त्याला जाऊ दिले, असे चौहान याने सांगितले. कन्हैयाला १५ फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात पतियाळा न्यायालयात नेले जात असताना विक्रम सिंग चौहान आणि यशपाल सिंग या दोन वकिलांनी तेथे जमलेल्या आंदोलक विद्यार्थी आणि पत्रकारांना मारहाण केली होती. स्टिंग ऑपरेशनदरम्यान याबद्दलची कबुलीही देताना त्यावेळी आम्हाला पोलिसांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे यशपाल सिंग याने सांगितले. आम्ही गणवेशात नसल्यामुळे कन्हैयाला मारू शकत नसल्याचेही पोलिसांनी आम्हाला सांगितले होते, असेही यशपालने म्हटले आहे. माझ्यावर कोणताही खटला दाखल होवो, मी कुठूनही पेट्रोल बॉम्ब आणेल. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला तरी मी त्याला सोडणार नाही. मला कन्हैयाला ठेवलेल्या जेलमध्ये जाऊन तिथे त्याला मारायचे आहे. मी माझ्या जामीनासाठी अर्ज करणार नाही. मी एक किंवा दोन दिवसांसाठी तुरूंगात जाईन, असे यशपाल सिंग याने म्हटले आहे.
=====================================
‘जेएनयूमध्ये रोज ३ हजार कंडोम आणि २ हजार दारुच्या बाटल्या मिळतात’
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर देशविरोधी घोषणाबाजीवरून सुरू असलेला देशद्रोहाच्या आरोपाचा वाद आता दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. ‘जेएनयू’ हे देशद्रोहाचा अड्डा बनला असल्याची टीका करणाऱया भाजपने पुन्हा एकदा विद्यापीठावर निशाणा साधला. ‘जेएनयू’ हे अय्याशी करण्याचे ठिकाण असून, येथे रोज ३ हजार वापरलेले कंडोम मिळत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या आमदाराने केला. लोकशाही, देशद्रोह अन् सहिष्णुता! राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रामगडचे भाजप आमदार ज्ञानदेव आहूजा यांनी हे वादग्रस्त विधान केले. जेएनयूच्या परिसरात रोज ३ हजार वापरलेले कंडोम, २ हजार दारुच्या रिकाम्या बाटल्या, गर्भपातासाठी वापरण्यात येणारी ५०० इंजेक्शन, ५० हजार हाडांचे तुकडे आणि १० हजार सिगारेटचे तुकडे मिळत असल्याचा आरोप आहूजा यांनी केला आहे. याशिवाय, जेएनयूचे विद्यार्थी हे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नग्न नृत्य’ करीत असतात असाही आरोप त्यांनी केला आहे.
=====================================विद्यापीठातील भेदभाव संपवण्यासाठी कायदा करा, राहुल गांधींची मागणी
विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत केला जाणारा भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी कायदा करण्याची मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये केली. काँग्रेस पक्ष यासाठी विविध संघटनांशी चर्चा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर विविध बहुजन संघटनांकडून दिल्लीमध्ये जंतरमंतरवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर राहुल गांधी यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील विद्यापीठात सध्या घडत असलेल्या घटनांमुळे देशाच्या भविष्याचे नुकसान होते आहे. रोहित आणि त्याच्या सोबतचे सहकारी देशाच्या भविष्याबद्दल बोलत होते. पण भाजप सरकारला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भविष्याबद्दल काहीही ऐकायची इच्छा नाही. ते अजूनही भूतकाळातच रमले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जुन्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. रोहित वेमुला, जेएनयू प्रकरण, हरयाणामध्ये झालेले आंदोलन यावर सरकार काहीच बोलायला तयार नाही. ते फक्त योजनांवर बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली.
=====================================पुण्यात भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर तरुणावर कोयत्याने हल्ला
पूर्ववैमनस्यातून पुण्यातील कोथरूड परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करून मंगळवारी सकाळी खुनाचा प्रयत्न करण्यात आला. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे काहीवेळ घबराटीचे वातावरण पसरले होते. सागर शिंदे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, संजय मोहोळ आणि संभाजी कांबळे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे मंगळवारी सकाळी पौड फाट्याजवळ उभा होता. साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या मोहोळ आणि कांबळे यांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्याच्या डोक्यावरही वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर सागर तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. मोहोळ आणि कांबळे पळून गेल्यावर स्थानिक लोकांनी सागरला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मोहोळ आणि कांबळे हे दोघेही भीमनगर, शीलाविहार कॉलनी येथील राहणार आहेत. पोलिसांनी तातडीने तपास करून त्यांना अटक केली. सागर शिंदे हा कोथरूडमधील दहभुजा गणपती मंडळाचा अध्यक्ष आहे. त्याच्यात आणि मोहोळ, कांबळे यांच्या आर्थिक व्यवहारासह इतर कारणांवरून वाद होता. त्यातूनच हा हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
=====================================
दिलीप कुमार यांची 'चेक' प्रकरणातून निर्दोष सुटका
मुंबई- अभिनेते दिलीप कुमार यांची चेक बाऊंस प्रकरणातून गिरगाव सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) निर्दोष सुटका केली. दिलीप कुमार हे 1998 साली कोलकाता येथील जीके एक्जिम इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक होते. डेक्कन सीमेंटसने या जीके कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. दिलीप कुमार यांनी परत फेडीचे दोन चेक दिले होते. परंतु, ते बाऊंस झाले होते. त्यामुळे डेक्कन सीमेंटसने दिलीप कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दिलीप कुमार (वय 94) हे सुनावणीवेळी वयोमानामुळे न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
=====================================
हरियाना: रोहतकमध्ये मुख्यमंत्र्यांना रोखले
रोहतक - जाट आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी आंदोलनामुळे सर्वांत प्रभावित झालेल्या रोहतक या जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेले मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरुद्ध घोषणा देत त्यांचा निषेध करून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे खट्टर यांना त्यांचा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. जाट समाजाचे आरक्षणाच्या मुद्यावरून हरियानामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांनी रेल्वे, बस रोखून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले. आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री खट्टर आज या आंदोलनातील सर्वात प्रभावित रोहतक जिल्ह्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. वेळी एका जागी भाषण करत असताना आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांविरूद्ध घोषणा देण्यास सुरुवात केली, त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भाषण मध्येच थांबवावे लागले. ते सध्या कॅनॉल रेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत.
दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण लागणे ही दु:खद घटना असल्याने खट्टर यांनी म्हटले आहे. तसेच याप्रकरणी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही म्हटले आहे. या आंदोलनाच्या मागे असलेला कट लवकरच उघडकीस आणण्यात येणार असल्याचेही खट्टर म्हणाले.
=====================================
संसद चर्चेसाठी आहे; गोंधळासाठी नाही- राष्ट्रपती
नवी दिल्ली- संसद ही चर्चेसाठी असून गोंधळासाठी नाही, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (मंगळवार) संसदेत भाषणादरम्यान सांगितले.
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. संसदेच्या परंपरेनुसार राष्ट्रपती बग्गीमधून संसद भवनामध्ये दाखल झाले होते. दोन्ही सभागृहांना उद्देशून बोलताना राष्ट्रपती म्हणाले, ‘हमारी सरकार सबका साथ, सबका विकास‘ या उद्देशाने काम करत आहे. संसद ही काम करण्यासाठी असून गोंधळासाठी नाही.‘
=====================================
..आणि 'झिका'चे नाव बदलले; झाले 'टियागो'
मागील महिन्यात टाटा मोटर्सने लवकरच "झिका‘ नावाची नवी मोटार सादर करणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान जगभरात प्राणघातक आजार पसरविणाऱ्या ‘झिका‘ नावाचा विषाणूही त्याचवेळी चर्चेत आला. त्यामुळे दोन्ही नावात साधर्म्य आढळून येत होते. नामसाधर्म्याचा मोटारीच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर विक्रीवर परिणाम होऊन व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत असल्याचे म्हणत टाटा मोटर्सने ‘झिका‘चे नाव बदलून "टियागो‘ असे केले आहे. साडेतीन ते पाच लाख रुपये किंमतीची ही मोटार ‘टाटा इंडिका‘ची जागा घेण्याची शक्यता आहे. मार्च अखेर ही मोटार बाजारात दाखल होणार आहे.
जगभरात पसरलेल्या ‘झिका‘ विषाणूमुळे नवजात बालकाच्या मेंदूची वाढ खुंटत असून नवजात अर्भकाला मातेच्या गर्भात असतानाच या आजाराची प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले आहे. इतर सर्वसामान्य निरोगी व्यक्तींनाही या आजाराची लागण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या जगात अनेक लोक झिका विषाणूच्या प्रसारामुळे मरण पावत आहेत.
=====================================
मोदींचा सूट घेणाऱयाकडून 200 कोटी रुपये दान
आग्रा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूट खरेदी करणारे लावजीभाई बादशहा हे देशातील दहा हजार मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये दान करणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱयावर आले त्यावेळी मोदींनी 13 लाख रुपयांचा सूट परिधान केला होता. यासूटवर नरेंद्र दामोदरदास मोदी असे सोनेरी अक्षरांमध्ये नाव लिहिलेले होते. महागड्या सूटमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती. पुढे या सूटचा लिलाव करण्यात आला होता.
सूट खरेदी करणारे बादशहा एका कार्यक्रमादरम्यान आज (मंगळवार) येथे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले. ‘सूरत येथे 13 मार्च रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी देशातून निवडलेल्या 10 हजार मुलींच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या मुलींच्या विवाहासाठी 200 कोटी रुपये खर्च करणार आहे. म्हणजेच एका मुलीला दोन लाख रुपये मिळणार आहेत.‘
दरम्यान, बादशहा यांच्याकडून प्रथमच अशा प्रकारचे दान होत नाही. पाटीदार समाजात जन्मलेल्या 5 हजार मुलींच्या नावावर प्रत्येकी दोन लाख रुपये जमा केले आहेत. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना ते पैसे मिळू शकणार आहेत.
=====================================
भाजप, संघाचे न ऐकल्यास मारले जाल-राहुल
नवी दिल्ली - सध्या देशात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) न ऐकल्यास मारले जाल अशी परिस्थिती आहे. रोहित वेमुला भारताच्या भविष्याबद्दल बोलत होता. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते मान्य नव्हते. संघाला आपली विचारसरणी देशात राबवायची असून, विरोधी बोलणाऱ्यास चिरडून टाकण्याचे संघाचे धोरण असल्याची जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी जंतर मंतर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात राहुल गांधी सहभागी झाले होते. देशभरातील विविध विद्यार्थी संघटनांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात एनएसयूआय, डावे पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या आहेत. राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आज झालेल्या भाषणात सरकारच्या भूतकाळातील योजनांबद्दल बोलण्यात आले. पण, आरएसएसच्या विचारसरणीबद्दल कोणीच काही बोलत नाही. सरकारने सुरु केलेल्या योजनांबद्दल बोलण्यात आले, पण रोहित वेमुला व हरियानातील परिस्थितीबद्दल काहीच बोलण्यात येत नाही. विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी कायदा बनविण्यात यावा, अशी मागणी मी यापूर्वीही केली आहे.
=====================================हिमालयाची ‘उंची’ गाठणाऱ्या शर्मिला
तीस वर्षांपासून सातत्याने करताहेत ट्रेकिंग
नागपूर - विशीच्या घरात असलेल्या तरुणीला कुणाची स्वप्ने पडावी आणि तिने कुणाच्या प्रेमात पडावे, हे काही सांगण्याची गरज नाही; मात्र या वयातील एखादी तरुणी निसर्गाच्या किंवा ॲडव्हेंचरच्या प्रेमात पडते तेव्हा ती अपवाद ठरते. तीस वर्षांपूर्वी ट्रेकिंगच्या प्रेमात पडलेल्या शर्मिला चटर्जी आज वयाच्या पन्नाशीतही हिमाचल प्रदेशातील उंच डोंगर सर करण्याची जिद्द बाळगतात, तेव्हा त्यांच्या समर्पणाला हिमालयाची ‘उंची’ही सलाम करते. ‘आपल्या आयुष्याचे पहिले व शेवटचे प्रेम हिमालय आहे’ असे म्हणणाऱ्या शर्मिला चटर्जी या नागपुरातीलच नव्हे, तर देशातील जिंदादिल ट्रेकर म्हणून ओळखल्या जातात. हिमालयाच्या प्रत्येक भागात त्यांनी देश-विदेशातील ट्रेकिंग ग्रूपचे नेतृत्व केले आहे. केवळ डोंगर सर करत नाहीत, तर त्या भागाचा इतिहास, वैशिष्ट्येसुद्धा पर्यटकांना सांगतात. १९८३ ला या क्षेत्रात आल्यापासून त्या देशाच्या विविध भागांमध्ये ट्रेकिंग करीत आहेत. ॲडव्हेंचरच्या क्षेत्रात एवढी वर्षे सातत्याने एखाद्या कामात स्वतःला झोकून देणारी उपराजधानीतील कदाचित ही पहिलीच महिला असावी. हिमाचल प्रदेशात त्या गेल्या दहा वर्षांपासून ट्रेकिंग करीत आहेत. लाहोल स्पिती आणि पांगी भरमोर यांसारख्या अवघड प्रदेशातून ट्रेकिंग करण्यासाठी त्यांची हिमाचल प्रदेशातही आता विशेष ओळख झाली आहे. हिमालयाच्या कुशीत दुर्गम भागातील गावांमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न आजही सुरू आहेत. आतापर्यंत त्यांनी साडेसतरा हजार फुटांपर्यंत हिमालय सर केला आहे. त्याच्याही पुढे जाण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. २५ ते ३० किलो वजन उचलून त्या सहज हिमालयाच्या डोंगरावर स्वार होतात. हिमालयाच्या परिसरातील छोट्या पर्यटन स्थळांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अर्थात, आजही त्यांचे कार्य सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दुर्लक्षित परिसराच्या विकासासाठी उपाययोजना सुचविण्याचे काम शर्मिला चटर्जी करतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या एका महिलेला आपल्या प्रदेशाबद्दल असलेली आस्था स्थानिकांवर विशेष प्रभाव टाकून गेली.
सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद ठरली पाकची
इस्लमाबाद- जगामध्ये सौर ऊर्जेवर चालणारी पहिली संसद म्हणून येथील ठरली आहे, असा दावा पाकिस्तानने आज (मंगळवार) केला आहे. पाकिस्तानमधील संसद ही पूर्णपणे सौरऊर्जेवर चालते. सौरऊर्जेसाठी चीनने साडेपाच कोटी डॉलर एवढा निधी दिला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हस्ते आज सौरऊर्जेचे बटन दाबून उद्घाटन करण्यात आले. राजधानी इस्लामाबादमधील संसद सौरऊर्जेवर चालविणार असल्याची घोषणा सन 2014 मध्ये करण्यात आली होती. यासाठी मित्र देश असलेल्या चीनचे सहकार्य लाभले आहे. यामुळे पाकिस्तान-चीनच्या मैत्रीचा आणखी एक अनुभव पुढे आला आहे. पाकिस्तानची संसद आज पूर्णपणे सौरऊर्जेवर चालू लागली आहे. खासगी संस्थांनीसुद्धा सौरऊर्जेवर भर द्यावा, असे शरीफ म्हणाले.
=====================================
पाकिस्तानमध्ये कारवाईत 12 दहशतवादी ठार
कराची (पाकिस्तान)- पोलिसांनी शहरामध्ये केलेल्या कारवाईत 12 दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आज (मंगळवार) दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 दहशतवादी जागीच ठार झाले आहेत. दोन पोलिस जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कर-ए-जांघवी व तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेशी संबंधित हे दहशतवादी असल्याचे समजते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
=====================================
पाम्पोर- दहशतवाद्यांना मशिदींतून प्रेरणादायी घोषणा
पाम्पोर- भारतीय सैन्य आपल्या प्राणांची बाजी लावून घुसखोर दहशतवाद्यांशी लढत असताना पांपोरच्या सभोवतालच्या परिसरातून ध्वनिक्षेपकांवरून दहशतवाद्यांचे स्तुती करीत त्यांना प्रोत्साहन देण्यात येत होते, अशी माहिती समोर आली आहे. पाम्पोर येथील एका सरकारी इमारतीत लपून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने सलग तीन दिवस लढून जेरीस आणले व अखेर यशस्वीपणे त्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, त्याचवेळी त्या परिसरातील मशिंदीमध्ये त्या दहशतवाद्यांना ‘मुजाहिद‘ म्हणजेच पवित्र योद्धे असे संबोधून त्यांना प्रेरणा देण्यात येत होती. जागो, जागो सुबह हुई, जिवे जिवे पाकिस्तान, तसेच हम क्या चाहते है- आझादी अशा घोषणा देण्यात येत होत्या.
=====================================
स्पाइसजेटकडून अवघ्या 599 रुपयांत विमानप्रवास
नवी दिल्ली - विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने उन्हाळी हंगामापुर्वी ग्राहकांना विशेष सवलत जाहीर करीत 599 रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा केली आहे. ही सवलत नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी लागू होणार आहे. आजपासून(ता.23) सुरु झालेली तीन दिवसांची विशेष सवलत योजना 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. प्रवाशांना 1 मार्च, 2016 ते 13 एप्रिल 2016 दरम्यानच्या प्रवासासाठी तिकीटे आरक्षित करता येणार आहेत. कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करण्याला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी ही सवलत योजना उपयोगी ठरेल. तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीत प्रवास टाळणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील मार्च एप्रिलचा वसंत ऋतू अनुकूल ठरेल, असे स्पाइसजेटच्या व्यावसायिक विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिल्पा भाटिया यांनी सांगितले. या योजनेत तिकीटांचे सामुहिक आरक्षण शक्य नसून कंपनीच्या संकेतस्थळावर, ट्रॅव्हल एजंट्स किंवा ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टल्सद्वारे तिकीटांचे आरक्षण करता येणार आहे.
=====================================मोदींकडे अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा नाही- नायडू
=====================================
=====================================
No comments:
Post a Comment