Friday, 26 February 2016

नमस्कार लाईव्ह २६-०२-२०१६चे बातमीपत्र

[अंतरराष्ट्रीय] 
१- मार्क झुकरबर्गसह ट्विटरच्या सीईओंना आयसिसकडून जीवे मारण्याची धमकी
२- दिल्ली; मौलाना मसूद अझहरबाबत पाकशी चर्चा करणार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय] 
३- पोलिस कोठडीत उमर, अनिर्बनची बिर्यानी, मोमो खाण्याची इच्छा 
४- संसद हल्ल्यात अफजल गुरुच्या सहभागाबाबत शंका : चिदंबरम 
५- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने कर्जवसुलीचे नियम केले शिथील 
६- प्रभूंच्या 'प्रयत्नांच्या संकल्पा'चे शिवसेनेकडून कौतुक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- ...तर शिवस्मारकाला स्थगिती देऊ, हायकोर्टाने ठणकावलं 
८- कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास एसटी रोखणार -राणे 
९- मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील दिलीप करंबळेकरांच्या नियुक्तीवरुन वादंग 
१०- सिग्नल तोडून लोकल सुसाट, एक्स्प्रेस पाहून करकचून ब्रेक आणि... 
११- शिर्डीच्या साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी दुप्पट शुल्क 
१२- श्रीनगर; अतिरेक्यांचे कौतुक करणा-या सलाउद्दीनच्या मुलाला जवानांनी वाचवले 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- जिया खान खटल्याला दोन आठवड्यांची स्थगिती 
१४- पालघर; जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 गंभीर 
१५- अंधेरी-घाटकोपर रोडवर कारची सख्ख्या भावंडांना धडक, एकाचा मृत्यू 
१६- 'महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम आग प्रकरण: विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा 
१७- बिहार; विद्यार्थिनीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेस अटक 
१८- अजमेर; स्वातंत्र्यानंतर तेथे प्रथमच पोचेल नळाचे पाणी! 
१९- भावना दर्शविण्यासाठी फेसबुकवर आल्या इमोजी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- सुमारे 100 वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये शौचालय सुरु करण्याची आयडिया कोणाची? 
२१- सुटकेनंतर संजयचा पहिला सेल्फी, सोबत वकील हितेश जैन 
२२- 'शेफ'च्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार 
२३- सुंदर असल्याने चित्रपट मिळाला नाही- गौहर खान 
२४- विजय मल्ल्या यांनी सोडले 'युनायटेड स्पिरिट्स' 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
झाकीर आली खान, सुशील कुमार्राय, विष्णू पाटील, निलेश जोंधळे, शिवप्रसाद देशमुख, मोहित केंद्रे, ओमप्रकाश पाटील, अमृता पाटील 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार ]
चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नशिबाचा एक भाग असतो, पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते 
[अरविंद पांचाळ, दाभडकर]
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विकणे आहे 
भगतसिंग रोडवर असलेले गणराज नगर, नांदेड येथील १०x४० चे दुकान योग्य किंमत आल्यास विकणे आहे.
संपर्क- 7350625656
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 



=======================================

सिग्नल तोडून लोकल सुसाट, एक्स्प्रेस पाहून करकचून ब्रेक आणि...

सिग्नल तोडून लोकल सुसाट, एक्स्प्रेस पाहून करकचून ब्रेक आणि...
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना टळली. डहाणू-बोरिवली ही 12 डब्यांची लोकल बुधवारी सकाळी 6.35 मिनिटांनी पालघर स्टेशनवर लाल सिग्नल तोडून पुढे सरकली. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर मोटरमनने करकचून ब्रेक लावला आणि पुढच्या क्षणात वेगाने आलेली गोल्डन टेम्पल मेल अगदी जवळून निघून गेली.
अशी घडली घटना!
ही लोकल पालघर स्टेशनवरील सायडिंगच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असताना लाल सिग्नल असतानाही पुढे सरकली. मात्र गार्डला चूक जाणवल्यानंतर त्याने इमर्जन्सी ब्रेक्स दाबून गाडी मेन लाईनपासून काही मीटर अंतरावर थांबवली. पुढच्याच क्षणाला अमृतसर-मुंबई सेंट्रल सुवर्णमंदिर एक्स्प्रेस अगदी शेजारच्या ट्रॅकवरुन धाड-धाड करत निघून गेली.
पालघरमधे प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील गाडीला पुढे जाण्यासाठी सिग्नलची वाट पाहावी लागते. मेन लाईनवरील वाहतूक मोकळी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.
खरंतर दोन्ही ट्रेन्स प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. त्यातच ट्रेन अचानक प्लॅटफॉर्मवरुन पुढे गेल्याने स्टेशनवरील प्रवाशांमध्येही गोंधळ माजला. ट्रेन आणि स्टेशनवरील प्रवाशांनी आरडाओरडा करताच गार्डला त्याची चूक लक्षात आली. त्याने इमर्जन्सी ब्रेक दाबले आणि गाडी सिग्नलच्या चौदाव्या पोस्टवर थांबली.
एस-14 हा पोस्ट मेन रेल्वे लाईनपासून काही मीटर अंतरावरच आहे. ट्रेन थांबली त्याच्या काही सेकंदांनंतरच त्या मेनलाईनवरुन सुवर्णमंदिर एक्स्प्रेस धाड-धाड करत निघून गेली.
सुवर्णमंदिर एक्स्प्रेस ही बोरीवली पहाटे पाच वाजता पोहोतचे. मात्र जाट आंदोलनामुळे ही ट्रेन सध्या तीन ते चार तास उशिराने धावत होती. त्यानंतर लोकलला मेनलाईनवर जाण्याचा सिग्नल मिळाला.
दरम्यान, घडल्या प्रकाराचा तपास करण्यासाठी पश्चिम रेल्वेने त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे
=======================================

सुमारे 100 वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये शौचालय सुरु करण्याची आयडिया कोणाची?

सुमारे 100 वर्षांपूर्वी रेल्वेमध्ये शौचालय सुरु करण्याची आयडिया कोणाची?
मुंबई: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या बजेटमध्ये ना रेल्वे भाडेवाढ, ना नव्या गाड्यांची घोषणा केली. यावर्षीही त्यांनी पायाभूत सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे आणि स्टेशनच्या स्वच्छतेसाठी नवा विभाग सुरु करण्याची घोषणा केली होती. तर यंदा बायोटॉयलेटवर भर दिला आहे.
मात्र रेल्वेमध्ये टॉयलेट बसवण्याची आयडीया कशी आणि कोणाला आली? 
भारतात रेल्वे डब्ब्यात शौचालय सुरु करण्यामागे मोठी रंजक कहाणी आहे. पश्चिम बंगालचे प्रवासी ओखिल चंद्र सेन यांनी 1909 मध्ये रेल्वेला एक पत्र लिहिल्याचं सांगण्यात येतं. 
यामध्ये त्यांनी तक्रार केली होती. प्रवासादरम्यान ते लघुशंकेसाठी थांबले असता, रेल्वे त्यांना तिथेच सोडून निघून गेली. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार केली. 
या तक्रारीनंतरच रेल्वेने सर्व डब्ब्यांना शौचालयं जोडल्याचं सांगण्यात येतं. भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर अनेक वर्षांनी रेल्वेमध्ये शौचालय बसवण्यात आलं. 
पूर्वी रेल्वेमध्ये शौचालय नव्हती. 1891 मध्ये केवळ फर्स्ट क्लास डब्ब्यांमध्येच ही सुविधा उपलब्ध होती. 
ओखिल चंद्र सेन यांनी लिहिलेल्या पत्रात असं काय होतं, ज्यामुळे रेल्वेत शौचालय बसवण्याचा निर्णय घेण्यात आला?
letter-to-rail-department-by-okhil-ch-sen_021315020040
ओखिल चंद्र सेन यांचं रेल्वेला पत्र 
डियर सर, 
मी पॅसेंजर ट्रेनने अहमदपूर स्टेशनवर पोहोचलो होतो, त्यावेळी मला पोटात कळ आल्याने मी शौचाला गेलो. मात्र काही वेळातच गार्डने शिट्टी वाजवून ट्रेन सुटत असल्याचा सिग्नल दिला. ट्रेन सुटणार, इतक्यातच मी धावत आलो. त्यावेळी माझी अवस्था एका हातात लोटा आणि दुसऱ्या हातात धोतर अशी होती. ट्रेन पकडण्याच्या नादात मी प्लॅटफॉर्मवर पडलो आणि माझं धोतर सुटलं. प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या महिला-पुरुषांसमोर असा प्रकार घडल्याने, ती माझ्यासाठी लाजिरवाणी घटना होती. इतकंच नाही तर माझी ट्रेन पण सुटली आणि मला तिथंच थांबावं लागलं.
 एखादा प्रवासी शौचाला गेला असता, त्याचवेळी गार्डने गाडी सोडणे कितपत योग्य होतं? गार्डने वाट पाहणं आवश्यक होतं. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की जनतेच्या भल्यासाठी त्या गार्डवर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा मी हा प्रकार माध्यमांसमोर मांडेन.
आपला विश्वासू,
                                                                                         ओखिल चंद्र सेन
=======================================

...तर शिवस्मारकाला स्थगिती देऊ, हायकोर्टाने ठणकावलं

...तर शिवस्मारकाला स्थगिती देऊ, हायकोर्टाने ठणकावलं
मुंबई: मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकासाठी तुमच्याकडे 1900 कोटींचा निधी उपलब्ध आहे. पण, माझगाव न्यायालयाच्या इमारतीसाठी मंजूर झालेले 375 कोटी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. असं असेल तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला आम्ही स्थगिती देऊ, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला खडसावलं आहे. 
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. 
माझगाव बार असोसिएशनच्यावतीनं यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात येत्या ४ आठवड्यात राज्य सरकारला उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. 
1997 मध्ये माझगाव कोर्टाची इमारत बांधण्यात आली होती. मात्र 2012 मध्ये कोर्टाचं कामकाज सुरू असताना अचानक या कोर्टाचा स्लॅब कोसळला होता. यानंतर 2014 मध्ये 60 खोल्यांच्या प्रस्तावित पुनर्विकासासाठी 375 कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 10 कोटींचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंजूर झालेली उर्वरित रक्कम तातडीनं देण्यात यावी यासाठी हायकोर्टने राज्य सरकारला सज्जड दम भरला आहे.
=======================================

जिया खान खटल्याला दोन आठवड्यांची स्थगिती

जिया खान खटल्याला दोन आठवड्यांची स्थगिती
मुंबई : अभिनेत्री जिया खान हत्या का आत्महत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यावर उच्च न्यायालायने दोन आठवड्यांची स्थगिती आणली आहे. जिया खानची आई राबिया खान यांनी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रा प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 
जिया खान अमेरिकन नागरिक असल्याने या प्रकरणाची चौकशी आणि तपास हा एसआयटी किंवा एफबीआयमार्फत करावा अशी मागणी राबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. 
3 जून 2013 रोजी जिया खान तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. सुरुवातीला जियाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला होता. पण, जियाची हत्या सूरज पांचोलीने केली असा आरोप करत या प्रकरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत करावा, अशी मागणी राबिया खान यांनी केली होती. त्यानुसार 10 जून रोजी पोलिसांनी सूरज पांचोलीला अटक केली होती. तर, 2 जुलै 2013 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने सूरज पांचोलीला जामीन देत त्याची सुटका केली होती.
=======================================

पालघरमध्ये जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 गंभीर

पालघरमध्ये जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, 17 गंभीर
पालघर : विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुकमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. लागण झालेल्या 17 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कासा बुद्रुकमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील 247 विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. यापैकी 17 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
=======================================

अंधेरी-घाटकोपर रोडवर कारची सख्ख्या भावंडांना धडक, एकाचा मृत्यू

अंधेरी-घाटकोपर रोडवर कारची सख्ख्या भावंडांना धडक, एकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईतल्या अंधेरी-घाटकोपर मार्गावर भरधाव कारने दोन सख्ख्या भावंडांना उडवल्याची घटना घडली आहे. अपघातात एका भावाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. 
अंधेरी-घाटकोपर मार्गावरील लक्ष्मीनगर परिसरात हा अपघात झाला. त्यानंतर स्थानिकांनी याविरोधात रास्तारोको केल्यामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. 
दरम्यान जखमी झालेल्या लहानग्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत
=======================================

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील दिलीप करंबळेकरांच्या नियुक्तीवरुन वादंग!

मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावरील दिलीप करंबळेकरांच्या नियुक्तीवरुन वादंग!
मुंबई शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन दिलीप करंबेळकर यांची महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळावर नेमणूक केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 
दिलीप करंबेळकर आणि विनोद तावडे हे दोघंही श्री मल्टिमीडिया कंपनीत संचालक आहेत. तसंच श्री मल्टिमीडिया संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारतचं प्रकाश करतं. त्यामुळं तावडेंनी पदाचा गैरवापर करुन संघाची लोकं विश्वकोश निर्मिती केंद्रात घुसवण्याचा डाव आखल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. 
तावडेंनी मंत्र्यांच्या कोड ऑफ कंडक्टचा भंग केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली आहे. 
दिलीप करंबेळकरांना तातडीनं पदावरुन बाजूला करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तावडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 
विनोद तावडेंचं स्पष्टीकरण 
दरम्यान, दिलीप करंबळेकरांची नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून पृथ्वीराज चव्हाण यांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे.
=======================================

संसद हल्ल्यात अफजल गुरुच्या सहभागाबाबत शंका : चिदंबरम

संसद हल्ल्यात अफजल गुरुच्या सहभागाबाबत शंका : चिदंबरम
नवी दिल्ली : संसदेवरील हल्ल्याचा दोषी अफझल गुरुबाबत सुरु असलेल्या चर्चांमध्ये यूपीए सरकारमधील ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी उडी घेतली आहे. अफजल गुरुबाबत घेतलेला निर्णय कदाचित योग्य नव्हता. फाशीऐवजी विनापॅरोल जन्मठेपेची शिक्षा अफझलला ठोठावायला हवी होती, असं मत चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे. 
‘अफजल गुरुबाबतचा निर्णय योग्य पद्धतीने घेतला गेला नाही. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात त्याचा कितपत सहभाग होता, याबाबतही शंका आहे’, असं म्हणत अफझल गुरुच्या फाशीच्या तीन वर्षांनंतर चिदंबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मी त्यावेळी गृहमंत्रिपदी असतो, तर काय निर्णय घेतला असता, हे सांगणं कठीण असल्याचंही त्यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 
सरकारमध्ये असताना तुम्ही कोर्टाने चुकीचा निर्णय घेतला आहे, असं मत व्यक्त करु शकत नाही, कारण केस सरकारनेच चालवली होती. मात्र एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचं मत व्यक्त करु शकता. 
13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अफझल गुरुला 2013 मध्ये फाशी झाली होती. यूपीए सरकारमध्ये 2008 ते 2012 या काळात चिदंबरम गृहमंत्रिपदी होते. अफझल गुरुला फाशी दिली, त्यावेळी म्हणजे 2013 मध्ये सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. 
जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर लावलेल्या देशद्रोहाच्या आरोपांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे देशद्रोह नाही. या वयातच विद्यार्थ्यांना चुका करण्याचा अधिकार असतो, असं मत चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे.
=======================================

शिर्डीच्या साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी दुप्पट शुल्क

शिर्डीच्या साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी दुप्पट शुल्क
शिर्डी : शिर्डीतील साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. एक मार्चपासून साईंच्या व्हीआयपी दर्शन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय साई संस्थानाने घेतला आहे. 
संस्थानच्या नव्या निर्णयानुसार साईंच्या व्हीआयपी दर्शनाचं शुल्क दोनशे रुपये केलं जाणार आहे. सध्या साईबाबांच्या व्हीआयपी दर्शनासाठी भक्तांकडून शंभर रुपये आकारले जातात. 
व्हीआयपी दर्शनसोबतच आरतींचेही दर वाढवण्यात आले आहेत. मध्यान्ह, धूप आणि शेज आरतीचे शुल्क 300 ऐवजी 400 रुपये करण्यात आले आहेत. 
साईबाबांच्या चरणी वर्षभरात 500 कोटींचं विक्रमी दान : 
2015 या वर्षात साईबाबांच्या झोळीत भक्तांनी तब्बल 268 कोटी रुपयांचं दान टाकलं आहे. इतकंच नाही तर साई संस्थानचे भक्त निवास, प्रसादालय आणि ठेवींवरील व्याजातून संस्थानाला तब्बल 195 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे.
=======================================

मार्क झुकरबर्गसह ट्विटरच्या सीईओंना आयसिसकडून जीवे मारण्याची धमकी

मार्क झुकरबर्गसह ट्विटरच्या सीईओंना आयसिसकडून जीवे मारण्याची धमकी
न्यूयॉर्क इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसने फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग आणि ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून आयसिसने धमकी दिली आहे. 
‘फ्लेम्स ऑफ द सपोर्टर्स’ असं 25 मिनिटांच्या या व्हिडीओचं नाव आहे. जॅक डोर्सी आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फोटोंवर गोळ्या झाडल्याचं व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे. 
गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक आणि ट्विटरवरील दहशतवादी कारवायांशी संबंधित, संशयास्पद अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आल्याने आयसिस नाराज असल्याचे बोलले जात आहे. फेसबुक, ट्विटरने ब्लॉक केलेल्या अकाऊंट्सवरुन आयसिसचा प्रचार-प्रसार होत होता. 
धमकीच्या व्हिडीओमध्ये आयसिसने म्हटलं आहे की, “जर तुम्ही एक अकाऊंट बंद कराल, तर आम्ही त्याबदल्यात 10 अकाऊंट उघडू. आम्ही लवकरच तुमचा जगातील अस्तित्व संपवू.” 
आयसिसच्या दाव्यानुसार, ते सध्या फेसबुकवर 10 हजार अकाऊंट्स, 150 फेसबुक ग्रुप, तर ट्विटर 5 हजार अकाऊंट्स वापरत आहेत. गेल्यावर्षीही आयसिसने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी धमकी दिली होती.
=======================================

सुटकेनंतर संजयचा पहिला सेल्फी, सोबत कोण?

सुटकेनंतर संजयचा पहिला सेल्फी, सोबत कोण?
मुंबई : अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगून येरवडा तुरुंगातून बाहेर पडला. यावेळी त्याची पत्नी, मुलं, मित्र परिवार आणि चाहत्यांनी जल्लोष केला. सुटकेनंतर काढलेला संजयचा पहिला सेल्फी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
पहिल्या सेल्फीमध्ये पत्नी मान्यता किंवा एखादा अभिनेता-अभिनेत्री असेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र संजयच्या सेल्फीत त्याचे वकील हितेश जैन दिसत आहेत. कपाळावर टिळा लावलेला संजय अत्यंत रिलॅक्स दिसत आहे.
अभिनेता संजय दत्तची अखेर सुटका झाली आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईत दाखल झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजयने पहिल्यांदा येरवडा तुरुंगाला सलाम ठोकला आणि त्यानंतर बॅग उचलून निघाला. यावेळी संजयला घेण्यासाठी दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि त्यांच्या टीममधील काही जण उपस्थित होते.
=======================================

अतिरेक्यांचे कौतुक करणा-या सलाउद्दीनच्या मुलाला जवानांनी वाचवले


  • श्रीनगर, दि. २६ - पाम्पोर चकमकीत भारतीय जवानांना जास्तवेळ झुंज दिल्याबद्दल हिजबुल मुजाहीद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहउद्दीन लष्कर ए तोएबाच्या अतिरेक्यांचे कैतुक करत आहे मात्र त्याच्या स्वत:च्या मुलाला जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी वाचवले. 
    पाम्पोर चकमकीत तीन दहशतवादी ज्या सरकारी इमारतीत घुसले होते तिथे सलाउद्दीनचा मुलगा सय्यद मुईन संगणक विश्लेषक म्हणून नोकरी करतो. तीनही दहशतवादी इमारतीत घुसण्यापूर्वी सुरक्षापथकांनी सलाउद्दीनच्या मुलगा सय्यद मुईनला तिथून सुरक्षितपणे बाहेर काढले होते.  माझी ओळख पटल्यानंतर सुरक्षापथकांनी माझी चौकशी केली नाही किंवा मला कुठलाही त्रास दिला नाही असे ३१ वर्षीय मुईनने सांगितले. आम्ही चकमकीमध्ये फसू नये यासाठी इमारतीत अन्य कर्मचा-यांप्रमाणेच त्यांनी माझीही सुटका केली असे मुईनने सांगितले. तीन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर लष्कराने सोमवारी ही चकमक संपल्याचे जाहीर करताच सल्लाउद्दीनने अतिरेक्यांचे फक्त कौतुकच केले नाही तर, त्यांना हिलाल ई शूजा हा शौर्य पुरस्कार जाहीर केला. सल्लाउद्दीनचे चार मुलगे आणि मुलगी जम्मू-काश्मीरमध्ये शासकीय सेवांमध्ये नोकरीला आहेत. 
=======================================

'महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम आग प्रकरण: विझक्राफ्ट कंपनीविरोधात गुन्हा


  • मुंबई, दि. २६ - गिरगाव चौपाटीवर 'मेक इन इंडिया'सप्ताहाअंर्गत ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी विझक्राफ्ट' कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीच्या सेटवर लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला होता. याप्रकरणी डी बी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप विझक्राफ्टवर ठेवण्यात आला आहे. 
    'मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत ‘महाराष्ट्र रजनी’चा कार्यक्रम १४ फेब्रुवारी रोजी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आला होता़ या सोहळ्यात नृत्याचा कार्यक्रम सुरू असताना, अचानक स्टेजखालून आगीचा भडका उडाला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिससेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यावर उपस्थित होते. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत, ही आग विझविली़ मात्र, यात कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले़. या आगीमागे षड्यंत्र असल्याचे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले़ होते.
    सदोष वायरिंगमुळे लागली आग..
    ही आग सदोष वायरिंगमुळे लागली, तसेच त्यावेळी स्टेजखाली १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन ऑॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले आणि हा अहवाल पालिकेकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे प्राथमिक तपासानंतर नमूद करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा व उपकरणे, तसेच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला़. धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला होता.
=======================================

'शेफ'च्या भूमिकेत झळकणार अक्षय कुमार?


  • मुंबई, दि. २६ - 'एअरलिफ्ट' चित्रपटाला मिळालेले यश आणि या चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी केलेले कौतुक यामुळे 'खिलाडी स्टार'अक्षय कुमारच्या नवीन वर्षाची सुरूवात तर एकदम रॉकिंग झाली आहे. आणि सध्या त्याच्या हातातील प्रोजेक्ट्स पाहता हे संपूर्ण वर्षच त्याच्यासाठी उत्तम जाणार असे दिसते. बँकॉकच्या रेस्टॉरंटमधील शेफ ते बॉलिवूडमधील आघाडीचा नायक हा अक्षयचा प्रवास अतिशय रोमांचक असून येत्या काळात त्याला पुन्हा त्याची शेफची भूमिका जगता येणार आहे. त्यामागचं खरं कारण म्हणजे २०१४ साली हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेफ'चा बॉलिवूडमध्ये रिमेक बनत असून अक्षय त्यात मुख्य (शेफचीच) भूमिका निभावणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी ही भूमिका अभिनेता सैफ अली खान करणार होता, मात्र काही कारणांमुळे आता हा रोल सैफऐवजी अक्षयच्या पारड्यात पडला आहे. 
    २०१४ साली प्रदर्शित झालेल्या 'शेफ' चित्रपटात जॉन फॉव्रेऊ, स्कार्लेट जॉन्सन, सोफिया वर्गेरा आणि रॉबर्ट डॉवनी.ज्युनियर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. लॉस अँजिलिसमधील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये प्रोफेशनल शेफ म्हणून काम करताना कराव्या लागलेल्या तडजोडींना नकार देत शेफ ती नोकरी सोडतो आणि आपला मित्र आणि मुलाच्या मदतीने एक 'फूड ट्रक' उघडतो. हा सर्व प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला असून बॉलिवूडच्या रिमेकमध्ये अक्षय कुमार 'शेफ'चा रोल करेल. स्वत: एक उत्तम कूक असलेल्या अक्षयने सुरूवातीच्या काळात बँकॉकमध्ये शेफ म्हणूनही काम केले होते, त्यामुळे हा अनुभव या चित्रपटासाठी त्याला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि इतर चित्रपटांमप्रमाणे तो याही चित्रपटात उत्तम काम करेल यात शंका नाही
=======================================

विद्यार्थिनीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेस अटक


  • बिहारशरीफ, दि. २६ - एका शाळकरी मुलीला आमदारासोबत सेक्स करण्यास भाग पाडणा-या महिलेला नालंदा पोलिसांनी गुरूवारी अटक केली. ६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या प्रकरणी बिहार पोलिसांनी आरोपी महिला सुलेखा देवी हिच्यासह तिची आई राधादेवी, मुलगी छोटी कुमारी, लहान बहीण तुलसी देवी आणि मोतीराम नामक इसमालाही अटक केली. हिलसा पोलिस स्टेशनअंतर्गत येणा-या खड्डी गावातून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. सेक्स रॅकेट चालवण्यासाठी सुलेखा देवीचे कुटुंब तिला मदत करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
    ६ फेब्रुवारी रोजी सुलेखा देवी तिच्या शेजारी राहणा-या शाळकरी मुलीला वाढदिवसाच्या पार्टीच्या आमिषाने बाहेर घेऊन गेली आणि तिने त्या मुलीला राजद पक्षाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याकडे नेऊन त्यांची शय्यासोबत करण्यास भाग पाडले. मात्र या मुलीने धैर्य दाखवत घडल्या प्रकाराबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सुलेखा देवीसह इतरांना अटक केली. या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणारे राजवल्लभ यादव यांनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान राजद पक्षाने वल्लभ यांची पक्षातन हकालपट्टी केली असून बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनीही आरोपी आमदार पळून पळून किती लांब जातील असा सवाल विचारत लवकरच त्यांच्या मुसक्या बांधण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला.
=======================================

पोलिस कोठडीत उमर, अनिर्बनची बिर्यानी, मोमो खाण्याची इच्छा


  • नवी दिल्ली, दि. २६ - देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले जेएनयूचे विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांनी पोलिसांकडे सिगारेटची पाकिटे, वर्तमानपत्र आणि कन्हैया कुमारसोबत ठेवण्याची मागणी केली आहे. चौकशीत पोलिसांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देण्यापूर्वी त्यांनी या तीन मागण्या केल्या. ९ फेब्रुवारीला देश विरोधी घोषणा दिल्या म्हणून खालिद आणि अनिर्बनवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या ते पोलिस कोठडीत असून, कन्हैया कुमारलाही एकदिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. 
    खालिदला धुम्रपानाची सवय आहे. आत्मसमर्पण करण्यापूर्वी खालिदने शेवटची सिगारेट ओढली होती असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. खालिदची सिगारेटच्या पाकिटाची मागणी फेटाळून लावण्यात आली. गुरुवारी दुपारी दोघांनी जेवणाची विनंती केल्याचे पाहून पोलिसांना आश्चर्य वाटले. जेएनयूमधील ढाब्यावरुन मोमो आणि बिर्यानी आणून देण्याची त्यांनी पोलिसांना विनंती केली. पण पोलिसांनी त्यांची एकही मागणी मान्य केली नाही. त्यांना पोलिस स्थानकाजवळच्या एका भोजनालयातील जेवण देण्यात आले.
=======================================
कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास एसटी रोखणार -राणे 

दोडामार्ग बस स्थानकाचा शुभारंभ करताना पायाभूत सुविधा द्या, अन्यथा उद्घाटन कार्यक्रम रोखण्याचा इशारा देऊन नवीन बस स्थानक आवारात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात पोलीस केस दाखल करण्यात आल्याने काँग्रेस नेते नारायण राणे यांनी या केसीस उद्या शुक्रवारी २६ फेब्रुवारी दुपापर्यंत मागे घ्या, अन्यथा जिल्ह्य़ात एसटी बसेस रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री दिनकर रावते, आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी दर्शन घेऊन सिंधुदुर्गनगरी एस.टी. आगार भूमीपूजन आणि दोडामार्ग एस.टी. आगार उद्घाटन समारंभ करतील असा दौरा आयोजित केला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोडामार्ग आगारात सुविधांची वानवा असल्याने उद्घाटन समारंभ उधळून लावण्याचा इशारा दिला होता. दोडामार्ग आगार उद्घाटन समारंभानिमित्ताने काँग्रेस आणि शिवसेनेने इशारे दिले. काँग्रेसने उद्घाटन समारंभ उधळून लावण्याचा इशारा दिल्यावर शिवसेनेने उधळून दाखवा असे प्रती आवाहन दिले. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्वसंधेला बुधवारी उद्घाटन समारंभाच्या स्टेजवर ठिय्या आंदोलन केले. त्याशिवाय एस.टी. अधिकाऱ्याविरोधात तोंड सुखदेखील घेतले. काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी पंधरा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे संतापले. आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या आगाराचे उद्घाटनदेखील केले. आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतल्यावर नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना एस. टी. विभागाला आणि पोलिसांना इशारा दिला. लोकशाहीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर सत्ताधारी खोटय़ा केसेस दाखल करत असतील तर सोडणार नाही. या केसेस उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पोलिसांनी मागे घ्याव्यात अन्यथा जिल्ह्य़ात एकही एस.टी. फीरणार नाही असा इशारा दिला. 
=======================================
मुंबई - देशभरातील बॅंकांना कर्जवसुली करणे सोपे जावे या उद्देशाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्जवसुलीचे नियम शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. 

आरबीआयने आपल्या कर्ज पुनर्रचनेअंतर्गत (एसडीआर) काही नियम शिथील केले आहेत. कर्जवसुलीसाठी बॅंकांना थकबाकीदार कंपन्या अधिग्रहित कराव्या लागतात. शिथील केलेल्या नव्या नियमानुसार अधिग्रहित केलेल्या कंपनीच्या व्यवस्थापनात बॅंकेला बदल करावे लागणार आहेत. त्याद्वारे एसडीआर अंतर्गत यापूर्वी आवश्‍यक असलेली 51 टक्के हिस्सेदारी विकण्याची अटही शिथील करण्यात आली असून आता केवळ 26 टक्के हिस्सेदारी विकणे पुरेसे ठरणार आहे. 

याशिवाय बॅंकांना सामूहिक कर्ज वसुलीचे नियम देखील शिथील करण्यात आले असून आहे. एकाच कंपनीला अनेक बॅंकांनी कर्ज दिले असल्यास कर्जवसुलीसाठी यापूर्वी सर्व बॅंकांपैकी किमान 75 टक्के बॅंकांची मान्यता घेणे आवश्‍यक होते. ही अट शिथील करून यापुढे केवळ 50 टक्के बॅंकांची सहमती असल्यास कर्जवसुली करता येणे शक्‍य होणार आहे.
=======================================
नवी दिल्ली : युनायटेड स्पिरिट्‌स या कंपनीच्या अध्यक्षपदाचा विजय मल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थापन केलेली आणि विजय मल्ल्या यांनी वाढवलेली ही कंपनी सध्या दियागो या कंपनीकडून नियंत्रित केली जाते. सध्या विविध प्रकारच्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या मल्ल्या यांनी यापुढील जास्त काळ ब्रिटनमध्ये राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

"दियागो आणि युनायटेड स्पिरिट्‌स यांच्याशी माझ्या संबंधांबाबतचे अस्थैर्य आणि माझ्यावरील आरोप या गोष्टी लक्षात घेता मी तत्काळ राजीनामा देत आहे,‘ असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 
"मी नुकताच साठ वर्षांचा झालो असून, यापुढील काळात माझ्या मुलांसमवेत ब्रिटनमध्ये राहण्याचा मी निर्णय घेतला आहे,‘ असेही त्यांनी नमूद केले आहे.
=======================================
प्रभूंच्या 'प्रयत्नांच्या संकल्पा'चे शिवसेनेकडून कौतुक
मुंबई - कोणतीही भाडेवाढ न करता आणि खूप मोठ्या घोषणाही न करता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प म्हणजे "प्रयत्नांचा संकल्प‘ असल्याचे म्हणत सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा लाभ देऊन त्यांनी आश्‍वासनपूर्ती करावी अशी अपेक्षा करत शिवसेनेकडून अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे. 

शिवसेनेने आपल्या "सामना‘ या मुखपत्रातील अग्रलेखाद्वारे रेल्वे अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, "मोठ्या घोषणांऐवजी छोट्या-छोट्या प्रवासी गरजा आणि त्याचवेळी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास याची सांगड घालण्याची कसरत प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे प्रभूंच्या पेटाऱ्यातून भव्यदिव्य काही बाहेर आले नाही हे काही अंशी खरे असले तरी रेल्वे सेवा अधिक सक्षम करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रवाशांना सेवासुविधा देण्याचे सूत्र रेल्वेमंत्र्यांनी पुन्हा मांडले आहे. यासंदर्भात टीकाकार कदाचित "मागील घोषणांचे एक्‍स्टेन्श‘ अशी टीका करू शकतील; पण हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे किती वर्षे धावत राहायचे याचा विचार कधीतरी व्हायलाच हवा होता.‘ असे म्हटले आहे. 

तसेच "रेल्वेमंत्री म्हणाले त्याप्रमाणे रेल्वेपुढे आज मोठी आव्हाने आहेत. मात्र "हम ना रुकेंगे‘ असेही त्यांनी सांगितले आहे. कदाचित त्यामुळेच मोठ्या घोषणांच्या मागे न धावता त्यांनी प्रयत्नांचाच "संकल्प‘ सोडला असावा. हा संकल्प पूर्ण व्हावा आणि त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांनुसार सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा लाभ व्हावा अशीच जनतेची अपेक्षा आहे‘, असेही अग्रलेखात पुढे म्हटले आहे.
=======================================
सुंदर असल्याने चित्रपट मिळाला नाही- गौहर खान

जयपूर - सुंदर दिसत असल्यानेच आपल्या ‘स्लमडॉग मिलेनिअर‘ या चित्रपटात भूमिका करता आली नसल्याची खंत अभिनेत्री गौहर खान हिने व्यक्त केली आहे. 
जयपूरमध्ये एका "फॅशन शो‘साठी उपस्थित गौहर उपस्थित होते. यावेळी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने याबाबत खुलासा केला आहे. तिने सांगितले की, ‘माझी "स्लमडॉग मिलेनिअर‘मधील मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. मात्र चित्रपटाचे दिग्दर्शक डेनी बॉईल म्हणाले की तू खूप सुंदर दिसतेस. तुला ‘स्लम गर्ल‘कसे बनवू? त्यामुळे ज्यावेळी या चित्रपटाच्या यशाबद्दल मी काही ऐकते त्यावेळी तेथे मी नसल्याचे पाहून मला फार दु:ख होते.‘ 
‘स्लमडॉग मिलेनिअर‘ चित्रपटात अनिल कपूर, इरफान खान, महेश मांजरेकर आदी भारतीय कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. 1981 नंतर प्रथमच भारतीय कलाकाराला ऑस्कर मिळण्याचा मान मिळाला.
=======================================
अजमेर; स्वातंत्र्यानंतर तेथे प्रथमच पोचेल नळाचे पाणी!

अजमेर (राजस्थान) - राजस्थानमधील अजमेर शहराजवळील हातीखेडा, अजयसर आणि खरेखडी या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाला पाणी पोचणार असून त्यासाठीच्या पेयजल प्रकल्पाचे नुकताच भूमीपूजन समारंभ झाला आहे. 
राजस्थानमधील मंत्री किरण माहेश्‍वरी आणि शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी गुरुवारी हाथीखेडा येथे पेयजल प्रकल्पाचे योजनेचे भूमीपूजन केले. या प्रकल्पाद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकी उभारून जलवाहिनी सुरू करण्यात येणार आहे. एकूण 8.9 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच या तीनही गावांना नळाद्वारे पाणी उपलब्ध होणार आहे. या परिसरात पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री गांभीर्याने प्रयत्नशील असल्याचे माहेश्वरी यांनी यावेळी सांगितले.
=======================================
भावना दर्शविण्यासाठी फेसबुकवर आल्या इमोजी
मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - लोकप्रिय सोशल मिडिया साईट फेसबुकने एखाद्या पोस्टवरील नेमक्‍या भावना व्यक्त नव्या इमोजी सादर केल्या आहेत. 



फेसबुकवरील एखाद्या पोस्टवर "लाईक‘ आणि "कमेंट‘ करण्यापलिकडे जाऊन विविध भावना व्यक्‍त करण्यासाठी विविध प्रकारच्या इमोजी सादर करण्यात विचार करण्यात येत होता. ऑक्‍टोबरमध्ये फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली होती. त्याचवेळी आयर्लंड आणि स्पेन या दोन देशांमध्ये अशी सुविधा सुरू करण्यात आली होती. आता ही सुविधा भारतामध्येही सुरु झाल्याचे आढळून येत आहे.
फेसबुकवरील प्रत्येक पोस्टच्या खाली लाईक बटनावर माऊस नेल्यानंतर सहा प्रकारच्या इमोजी दिसत आहेत. त्यामध्ये "लाईक‘, "लव्ह‘, "हाहा‘, "वाव‘, "सॅड‘, "अँग्री‘ अशी बटने उपलब्ध आहेत. याद्वारे एखाद्या पोस्टवर राग, प्रेम, आश्‍चर्य, दु:ख आदी नेमक्‍या भावना व्यक्त करणे शक्‍य होणार आहे. यापूर्वी मृत्युबाबतच्या एखाद्या पोस्टवर भावना व्यक्त करताना प्रतिक्रिया लिहिणे आवश्‍यक होते. मात्र यापुढे "सॅड‘ या बटनाचा वापर करून भावना व्यक्त करता येणार आहेत. अशाच प्रकारे इतर सहा प्रकारच्या इमोजीद्वारेही भावना व्यक्त करता येणार आहेत.
=======================================
मौलाना मसूद अझहरबाबत पाकशी चर्चा करणार

नवी दिल्ली - जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझरच्या अटकेसंदर्भात पाकिस्तानसोबत चर्चा करणार असल्याचे भारताने म्हटले आहे. 
पठाणकोट हल्ल्यात सहभागी असणारा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य मौलाना मसूद अझहर हा पाकच्या कैदेत असल्याची माहिती पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. दरम्यान पठाणकोट हल्ल्याबाबत माहिती घेण्यासाठी पाकिस्तानचे विशेष तपास पथक (एसआयटी) भारताला भेट देणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, "मौलाना मसूद अझहर याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. मला असे वाटते पाकचे एसआयटीच्या भारतभेटीवेळी या विषयावर चर्चा करायला हवी.‘ एसआयटीच्या भारतभेटीची कार्यक्रमपत्रिका निश्‍चित होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही स्वरूप पुढे म्हणाले.
=======================================

No comments: