Monday, 29 February 2016

नमस्कार लाईव्ह २९-०२-२०१६चे बातमीपत्र

[राष्ट्रीय] 
१- शेरो शायरीने बजेट सादरीकरण 
२- रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत
३- गतवर्षीच्या बजेटमधील फंड अजूनही वापराविना 
४- राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल 
५- ...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन 
६- बजेटवर मोदींची छाप 
७- अर्थसंकल्पात कर कायदे सुलभ व्हावेत 
८- शेतकरी, गुंतवणूकदारांना खूष करण्याचे आव्हान 
९- गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
१०- राज्याला भरीव तरतुदीची अपेक्षा 
११- भाजपकडून स्मृती इराणींची पाठराखण 
१२- पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर 
१३- विविध मंत्रालयाकडून लागूू करण्यात आलेले 13 कर रद्द करण्याची शिफारस. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपूर; ‘माउंट एलब्रुस’ सर करणारा प्रणय 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१५- अँड दि ऑस्कर गोज टू... 
१६- भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही 
१७- बाजारावर राहिले ‘अस्वला’चेच नियंत्रण .. 
१८- लिओनार्डो सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर लार्सन अभिनेत्री 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- अर्धापूर तालुक्यात दोन अपघातात पाचजण जखमी 
२०- श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक रुग्णालयाची जागा महापालिकेस देण्यास शीख समाजाचा विरोध 
२१- महिलांच्या सुरक्षेसाठी आता महिला बीट मार्शल 
२२- भोकर; वादळामुळे उडाले छप्पर; तान्हुल्यासह बाळंतीण उघड्यावर 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
जमीर शेख, रामेश्वर भाले, अर्जुन सोनटक्के, शिवाजी देशमुख 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
मनुष्यात असलेल्या गुणांपैकी त्याच्यातील साहस सर्वात महत्वाचे कारण सर्व गुणांची ते जबाबदारी घेते
(सदाशिव सोनवणे, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जगभरात शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन् फ्लॉवर्सच्या माध्यमातून
बुके, चॉकलेट, टेडी आणि बरच काही...
खास एक्सप्रेस डिलिवरीची सोय....
आपल्या प्रियजनांच्या नावाचे चॉकलेट त्वरित बनवून मिळेल.
संपर्क- 9423785456, 7350625656 

*****************
नमस्कार लाईव्हचे अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


=========================================

रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत

रिंगिंग बेल्स फ्रीडम 251ने केले ग्राहकांचे पैसे परत!
नवी दिल्ली: जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम 251 लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोनचं बुकींग करणाऱ्या 30 हजार लोकांचे पैसे परत केले आहेत. कंपनीनं आतापर्यंत फक्त 30000 स्मार्टफोन ग्राहकांचे पैसे परत केले असून आतापर्यंत या फोनसाठी 7 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे.
एबीपी न्यूजशी बातचीत करताना कंपनीचे संचालकांनी पैसे परत केल्याचे कागदपत्र दाखविले. नोएडात असणाऱ्या रिंगिंग बेल्सची अंमलबजावणी संचनालय (ईडी)नेही चौकशी केली होती. तर हा मोठा घोटाळ असल्याचा आरोपही काही खासदारांनी केला होता. 
19 फेब्रुवारीला कंपनीनं फ्रीडम 251 च्या पहिल्या टप्प्यातील बुकींग बंद केली होती. आतापर्यंत ७ कोटी लोकांनी या फोनसाठी नोंदणी केल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीच्या संचालकांनी असा दावा केला आहे की, आर्थिक बाबींचा विचार करता, एवढ्या कमी किंमतीतही स्मार्टफोन मिळू शकतो आणि भारतात हा फोन तयार करुन याचे आयात मूल्यही कमी करु शकतो. 
आतापर्यंत 30 हजार जणांना पैसे परत करण्यात आले असून याशिवाय इतर लोकांचे पैस घेण्यात आलेले नाही. मात्र, 25 लाख नोंदणी केलेल्या यूजर्सनाही लवकरच पैसे परत करण्यात येणार आहे. असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कारण की, कंपनीनं आता ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ यावर काम सुरु केलं आहे.
 दूरसंचार मंत्रालयानं संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय कमिटी तयार केली असून कंपनी आपलं काम चोख बजावतेय का यावर लक्ष ठेवते आहे. 
दरम्यान, दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं की, ‘कोणत्याही परिस्थितीत रिंगिंग बेल्सला पैसे घेऊन पळून जाऊ दिलं जाणार नाही. ग्राहकांची कोणतीही फसवणूक केली जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. कंपनीचे पैसे हे एस्क्रो खात्यात ठेवले जातील. जेणेकरुन  जेव्हा कंपनी आपल्या स्मार्टफोनची डिलिव्हरी करेल त्याचवेळी पैसे दिले जातील.’
=========================================

शेरो शायरीने बजेट सादरीकरण

LIVE - शेरो शायरीने बजेट सादरी करणाला सुरुवात
महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश – जेटली
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार भारताची इकॉनॉमिक ग्रोथ चांगली आहे.
– जीडीपी 7.6 टक्के एवढी वाढला आहे ..
– महागाई – 5.4 टक्के एवढी कमी झाली आहे..
– फॉरेन गंगाजळीत चांगलीच वाढ झाली आहे.
– अस्मानी आणि सुलतानी संकटं असतानाही आमचं सरकार चांगलं काम करतंय.
– विदेशी मार्केटमधे मंदी असल्यानं देशातील मार्केटमधेच वाढ करण्यावर आमचा भर आहे–
कश्ती चलाने वालोंने जब हार के दी पत्वार हमें, लहर तुफान मिले, फिर भी दिखाया है हमने, और फिर ये दिखा देंगे सबको की हालात मै आता है दरिया करना पार हमें – जेटली
=========================================

अँड दि ऑस्कर गोज टू...

अँड दि ऑस्कर गोज टू...
कॅलिफोर्निया : ऑस्करची बाहुली पटकावणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं, पण ते स्वप्न सत्यात उतरवणं मात्र तितकं सोपं नाही. जगभरातले अनेक दिग्गज त्यांच्या उत्तमोत्तम कलाकृती घेऊन या स्पर्धेत सहभागी होत असतात, त्यामुळे स्पर्धा अर्थातच तगडी असते.
priyanka chopra
यावर्षीही असंच चित्र पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या जॉनरमधले आठ जबरदस्त सिनेमे यावर्षी अंतिम फेरीत पोहोचले आहेत. जसं ऑस्कर पुरस्कार मिळण्याचं भाग्य फार कमी कलावंताना लाभतं, त्याचप्रमाणे ऑस्कर प्रदान करण्याची संधी देखील मोजक्याच कलाकारांना मिळते.
Oscar1
यंदाचा ऑस्कर प्रदान करण्यासाठी बॉलिवूडच्या देसी गर्लला म्हणजेच प्रियंका चोप्राला आमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे ऑस्करच्या स्पर्धेत नसलो तरीही भारतीयांच्या नजरा ऑस्करकडे लागल्या आहेत.
Oscar
सर्वोत्कृष्ट अभिनेता : लिओनार्डो डी कॅप्रियो (द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : ब्राय लारसन (रुम)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अलेजांद्रो इनार्नितू ( द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट मूळ गीत : रायटिंग्ज ऑन द वॉल
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर (मूळ संगीत) : एनीयो मॉरिकोनी (द हेटफुल एट)
सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट : हंगेरीचा ‘सन ऑफ सोल’
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : स्टटरर
सर्वोत्कृष्ट फीचर डॉक्युमेंट्री : अॅमी
सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्री : गर्ल इन द रिव्हर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मार्क रायलान्स (ब्रिज ऑफ स्पाईज)
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : इन्साईड आऊट
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : बिअर स्टोरी
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : अँड्र्यू जॅक्सन, टॉम वूड, डॅन ऑलिव्हर, अँडी विल्यम्स (एक्स मेकिना)
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण : ख्रिस जेन्किन्स (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन : मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट संकलन : मार्गारेट सिक्सेल (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : एमॅन्युअल ल्युबेझ्की ( द रेव्हनंट)
सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल : लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम : जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अॅलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल)
सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके)
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
=========================================

भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही

भारत-पाकिस्तान टी 20 सामन्यात एकही षटकार नाही !
ढाका: ट्वेन्टी20 क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांची बरसात, हे गणितच बनलंय. पण शनिवारी आशिया चषकातला भारत-पाकिस्तान सामना त्याला अपवाद ठरला. 
मिरपूरच्या ‘शेर ए बांगला’ स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या लढतीत एकाही फलंदाजानं षटकार ठोकला नाही. या लो स्कोअरींग गेममध्ये पाकिस्तानच्या फलंदाजांनी मिळून आठ तर भारतीय फलंदाजांनी दहा असे एकूण अठराच चौकार लगावले. 
एखाद्या ट्वेन्टी20 सामन्यात एकही षटकार नोंदवला न जाण्याची ही सहावीच वेळ ठरली. तर भारतासाठी हा षटकाराविना पहिलाच सामना ठरला. 
मिरपूरच्या मैदानात उंच फटके खेळणं किती अवघड होतं आणि विराटची 49 धावांची खेळी का महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करायला ही एवढीच आकडेवारी पुरेशी ठरावी. 
शनिवारच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला 83 धावांतच रोखलं होतं आणि मग विराट कोहलीच्या झुंजार फलंदाजीमुळं टीम इंडियानं पाच विकेट्सनी संघर्षमय विजय मिळवला होता.
=========================================

राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

राहुल गांधी, केजरीवाल, येचुरींसह अनेक नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नवी दिल्ली: हैदराबादमधील सरुर नगर पोलीस ठाण्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
सीताराम येचुरी, केसी त्यागी, आनंद शर्मा, डी. राजा यांच्यासह उमर खालिद आणि कन्हैया कुमार यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि जेएनयूमधील घोषणाबाजी यानंतर हे प्रकरण जास्तच चिघळलं. संसदेत याच मुद्द्यांवर जोरदार चर्चाही झाली. सध्या, देशविरोधी घोषणाबाजी देण्याचा आरोप असणारे जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिद, अनिर्बान आणि कन्हैया कुमार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. सध्या या तिघांची चौकशी सुरु आहे. 
जनार्दन गौड नामक एका व्यक्तीनं मागील आठवड्यात सरुर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. की, यांनी देशद्रोह केला असून यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा. जेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास नकार दिला त्यावेळी जनार्दन गौड यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर एल बी नगर कोर्टानं कलम 156 (3) च्या अतंर्गत पोलिसांना गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात भारतीय दंडविधान कलमानुसार 124, 124 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
=========================================

...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन

...म्हणून बजेट मांडण्याआधी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली: अमिताभ बच्चन
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेट सादर करताना दिवंगत हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या ओळींचा भाषणादरम्यान उल्लेख केला होता. त्यानंतर आज बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुरेश प्रभूंचे आभार मानले आहेत. 
“रेल्वे बजेटमध्ये हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी उद्धृत करण्यापूर्वी सुरेश प्रभूंनी माझी परवानगी घेतली. रेल्वे बजेट संपल्यावर कवितेच्या ओळी सादर करण्यात काही चूक झाली नाही ना, हे ही विचारलं. आजच्या काळात कुणीच हे करत नाही.” असे फेसबुकवर पोस्ट लिहून अमिताभ बच्चन यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक केलं आहे.
=========================================

बजेटवर मोदींची छाप


  • ‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली गडद छाप असेल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधानांचे राजकीय आणि आर्थिक अग्रक्रम अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होतच असतात व ते रास्तही आहे. पण अर्थसंकल्प ही व्यक्तिश: आपली परीक्षा असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.
    आता माझ्या सरकारला दोन वर्षे झाली आहेत व बराच अनुभव आता माझ्या गाठीशी आला असल्याने या वेळच्या माझ्या अर्थसंकल्पाकडे देशवासीयांनी जरा अधिक गांभीर्याने पाहावे, असेच मोदींनी यातून सूचित केले आहे. देशाच्या वित्तीय स्थितीचे सर्व बारकावे आता मोदींच्या पल्ल्यात आले आहेत व परिस्थितीवर त्यांची घट्ट पकड बसली आहे, हेही त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते.
    कर संकलन वाढविण्यासाठी आणि आगामी काळात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होण्याच्या अनुषंगाने सेवा कराच्या मूल्यात सध्याच्या १४.५ टक्क्यांवरून १६ टक्के अशी वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली करतील, अशी दाट शक्यता आहे. यामुळे स्वाभाविकच भाववाढ होईल अशी अपेक्षा आहे.
    एकीकडे सेवा कराचा दर वाढविण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सध्या सेवा कराची मर्यादा वाढविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकाला सेवा कर माफ आहे. १० लाखांच्या पुढे सेवा कर भरावा लागतो. पण आता ही मर्यादा प्रति वर्ष २५ लाख रुपये होईल असे मानले जात आहे.
=========================================

राज्याला भरीव तरतुदीची अपेक्षा

  • मुंबई : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा असून, मोठे पायाभूत विकासाचे प्र्रकल्प आणि ‘मेक इन महाराष्ट्रा’ला गती देण्यासाठी आवश्यक भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल, अशी अपेक्षा
    राज्य सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’सारखे प्रयोग मोठ्या प्रकल्पातील गुंतवणुकीवर अवलंबून आहेत. मुंबई आणि महानगरातील पायाभूत विकासाच्या प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मदतीचा हात मिळाला, तरच जलदगतीने परकीय गुंतवणूक आकर्षित करणे शक्य होणार आहे. ११ हजार कोटींचा शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर रोड, नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळ, ३३ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड, मोनो आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून विशेष सहाय्यता मिळाल्यास हे प्रकल्प जलदगतीने मार्गी लागणे शक्य आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी तब्बल सव्वा लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती, तर महत्त्वाच्या रस्ते व रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी, त्यातील गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने सुमारे २४ हजार कोटींचा निधी देण्यात आला. केंद्र सरकारने अशी तरतूद केल्यामुळे, सदर प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत केली. त्यामुळे प्रकल्पासाठी जलदगतीने आवश्यक परवानग्या मिंळविणे शक्य झाले. सध्या मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास सर्वच मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. विशेषत: पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या मिळाल्या आहेत. येत्या मार्च अखेरपर्यंत किमान दोन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. प्रकल्प न रेंगाळता जलद गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारकडून यंदाही अशाच तरतुदीची अपेक्षा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • =========================================
  • बाजारावर राहिले ‘अस्वला’चेच नियंत्रण ..

    • प्रसाद जोशी - 
      संसदेला सादर झालेला रेल्वेचा अर्थसंकल्प, त्यापाठोपाठ जाहीर झालेले आर्थिक सर्वेक्षण, फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स आणि आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती अशा विविध घटनांमुळे बाजारात चांगलीच हालचाल दिसून आली. रेल्वेच्या अर्थसंकल्पाने बाजारात निराशेचे वातावरण होते.त्यापाठोपाठच्या आर्थिक सर्वेक्षणामुळे बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले. असे असले तरी सोमवारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले असल्याने बाजाराने सावध भूमिका घेतली. असे असले तरी सप्ताहामध्ये बाजारावर अस्वलाचेच नियंत्रण असलेले दिसून आले.गत सप्ताहात मुंबई शेअर बाजारामध्ये मंदीवाल्यांचाच जोर दिसून आला. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५५५ अंशांनी खाली येऊन २३१५४.३० अंशांवर बंद झाला. आर्थिक सर्वेक्षण जाहीर झाल्यावर बाजारामध्ये थोड्या प्रमाणात तेजी आल्यामुळे निर्देशांक २३ हजार अंशांच्या वर बंद झालेला दिसून आला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही १८१ अंशांची घट होऊन तो ७०२९.२५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे अन्य क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले आहेत.गेल्या सप्ताहामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. मात्र, बाजाराचे सगळे लक्ष दि.२९ रोजी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे.यामुळे बाजारात काहीसा संथपणा आला आहे. आर्थिक सर्वेक्षणानंतर बाजारामध्ये थोडीफार तेजी दिसून आली असली तरी आधीपासून झालेल्या घसरणीमुळे सप्ताहात अस्वलाचेच साम्राज्य असलेले जाणवले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेला सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे बाजाराची खूपच निराशा झाली. यानंतर बाजारामध्ये विक्रीची लाट दिसून आली. रेल्वेशी संबंधित असलेल्या अनेक आस्थापनांच्या समभागांची किंमत खूपच खाली आली. याच सप्ताहामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स अ‍ॅण्ड आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती झाली.त्यावेळी बाजारावर विक्रीचे दडपण आले. त्यातच रेल्वे अर्थसंकल्पाने केलेली निराशा, परकीय वित्तसंस्थांनी घेतलेले थांबा आणि पहाचे धोरण तसेच काही प्रमाणात केलेली समभागांची विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य अशा विविध बाबींमुळे बाजार खाली आला.संसदेची गेली दोन अधिवेशने विरोधकांच्या गदारोळामध्ये वाहून गेली आहेत. आर्थिक सुधारणांना गती देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे.आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबत काय तरतुदी असतील तसेच अर्थमंत्री चलनवाढ, अर्थव्यवस्थेचा विकासदर, तूट याबाबत काय पावले टाकतात त्यावरच बाजाराची आगामी दिशा ठरणार आहे.
=========================================

अर्थसंकल्पात कर कायदे सुलभ व्हावेत

आर्थिक वर्ष २०१६-२०१७ साठी सोमवारी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात उद्योग करणे सुलभ आणि कमी गुंतवणुकीत करता येईल, असे उपाय असतील, अशी आशा उद्योगजगताला आहे. याबरोबर कर कायदे सोपे केले जातील, असेही त्यांना वाटते.इन्टेल दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक देबजनी घोष म्हणाले, ‘सरकारने अर्थसंकल्पात उद्योग करणे सोपे करण्याच्या ज्या घोषणा केल्या होत्या त्यांची अमलबजावणी झाली पाहिजे.’ श्रेई इन्फ्रा फायनान्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हेमंत कनोरिया म्हणाले की, ‘अर्थसंकल्प कराबद्दलच्या अनिश्चितता दूर करून नियमांना काळानुरूप व सुसंगत बनविण्यावर केंद्रित असावा व कामकाजात सुलभता आली पाहिजे.’ मुथूट पप्पाचन ग्रुपचे अध्यक्ष थॉमस जॉन मुथूट यांनी अर्थमंत्र्यांनी कराचा परीघ व्यापक केला पाहिजे व त्यासाठी पॅनची नोंदणी वाढविली पाहिजे. यामुळे काळा पैशांच्या देवाणघेवाणीत उल्लेखनीय घट होईल, असे म्हटले. खेतान अँड कंपनीचे दक्ष बक्षी यांनी म्हटले की, कर कायद्यांना सुलभ करून त्यांच्यात स्पष्टता आणली पाहिजे व त्यामुळे ते कायदे पाळण्याचे प्रमाण वाढेल. किमान पर्याय करात कपात केल्यास करदात्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसा उपलब्ध होईल.
=========================================

गतवर्षीच्या बजेटमधील फंड अजूनही वापराविना

  • ऑनलाइन लोकमत - 
    नवी दिल्ली, दि.२९ - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज २०१६-१७ अर्थसंकल्प मांडणार आहेत. अनेक मंत्री आमच्या खात्याला व्यवस्थितररित्या फंडचं वाटप न करण्यात आल्याची तक्रार करतात. मात्र गेल्या २०१५-१६अर्थसंकल्पात देण्यात आलेला फंड अजूनही काही खात्यांनी पुर्णपणे वापरला नसल्याची माहिती समोर आली आहे.  टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार १० मंत्र्यांनी गेल्या अर्थसंकल्पात देण्यात आलेल्यापैकी अर्धा फंडदेखील वापरला नाही आहे. डिसेंबर २०१५ पर्यंत म्हणजे अर्थसंकल्प मांडून झाल्याच्या ९ महिन्यानंतरही हा फंड पुर्ण वापरण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे सात खात्यांनी वेळेच्या आधीच ९० टक्के फंड वापरुन टाकला आहे. महत्वाचं म्हणजे हे आकडे फक्त भांडवली खर्चाच्या आधारावर काढण्यात आले आहेत. कौशल्य विकास मंत्रालयाने फक्त ३३ टक्के फंड वापरला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी ३ महिने बाकी असताना फक्त ३३ टक्के खर्च करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कौशल्य भारत अभियानाची जबाबदारी याच मंत्रालयावर आहे. एकीकडे मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत २०२२ पर्यंत देशभरात ४०० दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष ठेवलं असताना कौशल्य विकास मंत्रालय मात्र याबाबत उदासीन दिसत आहे.  
    तसंच सरकारची महत्वाची योजना स्मार्ट सिटीची जबाबदारी असलेल्या शहरी विकास मंत्रालयाकडे आहे मात्र त्यांच्याशी संलग्न असलेल्या गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाने फक्त १८ टक्के फंडचा वापर केला आहे. तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने फक्त ४४ टक्के फंड वापरला आहे. 
=========================================
पुण्यातील मेट्रो प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर

पुणे - शहरातील नियोजित मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याच्या हालचाली सुरू असतानाच एका स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या मंजुरीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असून, त्यामुळे तो लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मेट्रोला लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

शहरातील मेट्रोच्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी या मार्गांचा सुधारित अहवाल आल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये पाठविण्यात आला असून, जानेवारीत त्याला केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळेल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार नगरविकास खात्याच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या. मात्र, शहरातील एका स्वयंसेवी संस्थेने प्रकल्पाबाबत आक्षेप घेतल्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर असलेल्या प्रकल्पासमोर अडचण निर्माण झाल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्याने सांगितले. 

संबंधित संस्थेच्या आक्षेपाबाबत नगरविकास खात्याने महापालिकेकडे विचारणा केली असून, त्याबाबत खुलासा मागविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया रखडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, संस्थेचा नेमका आक्षेप सांगण्यास त्यांनी नकार दिला. परंतु त्यासंदर्भात केंद्र सरकारला खुलासा केला जाणार असून, त्यानंतर लवकरच प्रकल्पाला मंजुरी मिळेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
=========================================
लिओनार्डो सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर लार्सन अभिनेत्री

लॉस एन्जल्स - हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 88 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट, स्पॉटलाईट आणि मॅड मॅक्स फ्युरी रोड या चित्रपटांनी बाजी मारली. स्पॉटलाईट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. तर, लिओनार्डो दी कॅप्रिओ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ब्री लार्सन हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात द रेव्हनंट या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने देण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. ख्रिस रॉक हे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
=========================================
‘माउंट एलब्रुस’ सर करणारा प्रणय

नागपूर - उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आजी-आजोबांकडे गेल्यावर विटी-दांडू, खुपसणी, सुरकाडी व डाबडुबलीसारख्या अस्सल देशी खेळांत रमणाऱ्या प्रणय बांडेबुचे या साहसी पर्वतारोहीने युरोपातील ‘सेव्हन समिट’पैकी एक मानले जाणारे रशियातील ‘माउंट एलब्रुस’ हे २१ हजार फूट उंचीवरील शिखर सर करून विदर्भाचा झेंडा विदेशी भूमीवर फडकावला. अत्यंत कठीण मानले जाणारे हे शिखर यशस्वीपणे चढणारा प्रणय नागपुरातील एकमेव युवा पर्वतारोही ठरला आहे. अतिशय लाजाळू व सदैव दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावणारा प्रणय व त्याचे तीन भावंडं सर्वप्रथम २००७ साली सीएसी ऑलराउंडरच्या हिमालयीन पदभ्रमण शिबिरात सहभागी झाले होते. या मोहिमेपूर्वी त्यांनी कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता. शिबिराच्या निमित्ताने प्रणयला मनाली येथील माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटला भेट देण्याची संधी मिळाली. त्यातून प्रणयचा कल साहसी खेळांप्रति वाढत गेला. एक नवी ऊर्जा त्याला मिळाली. त्यानंतर एक वर्ष मैत्रबन येथील साहसी शिबिरात प्रशिक्षक म्हणून काम केले. परंतु, पर्वतरांगांचे आकर्षण कायम साद घालत असल्याने प्रणयने वडिलांकडे बेसिक माउंटनेअरिंग कोर्स करण्याचा आग्रह धरला. वडिलांनीही लगेच होकार दिला आणि २००९ साली अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून बेसिक प्रशिक्षण घेतले.
=========================================
शेतकरी, गुंतवणूकदारांना खूष करण्याचे आव्हान
नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली आज (सोमवारी) आपला तिसरा आव्हानात्मक अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. कृषी क्षेत्र आणि उद्योग जगतातील गरजांमध्ये समतोल साधण्याचे त्यांच्यासमोर कडवे आव्हान असेल, असे मानले जात आहे. त्याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा सामना करावा लागत असताना सार्वजनिक खर्चासाठी पैसा उभा करण्याचेही त्यांच्यासमोर लक्ष्य असेल. 

प्राप्तिकराच्या आघाडीवर अर्थसंकल्पात संभाव्य उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवली जाईल, तर यामध्ये कराच्या सवलतीत बदल होऊ शकतो. सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने ग्रामीण भागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अर्थमंत्र्यांवर विकासकामांवर अधिक खर्च करण्याचाही दबाव असेल. त्याचप्रमाणे जलद गतीने सुधारणांची मागणी करत असलेल्या परदेशी गुंतवणूकदारांचा विश्‍वासही त्यांना जिंकावा लागणार आहे. 
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यामुळे सरकारवर 1.02 लाख कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळेही अर्थमंत्र्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. वित्तीय आघाडीवर विश्वसनीयता आणि सर्वोत्कृष्टतेचा प्रत्यय म्हणून सरकारने आगामी वर्षांत वित्तीय तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 3.5 टक्के या निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त नसेल याची काळजी घेण्याची शिफारस आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे या मुद्यावर अर्थमंत्री कोणता निर्णय घेतात, याविषयी उत्सुकता आहे. 

कॉर्पोरेट करांचे दर चार वर्षांत 30 ते 25 टक्के करण्याचे आपले आश्‍वासन पूर्ण करण्यासाठीही जेटली काहीतरी पावले उचलतील, असे मानले जात आहे. त्याशिवाय ते उद्या अर्थसंकल्पात करसवलत परत घेण्याचा मुद्दा समावेश असलेल्या प्रक्रियेची सुरवात करू शकतात. 
=========================================
भाजपकडून स्मृती इराणींची पाठराखण
रोहित वेमुला आत्महत्याप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी संसदेची दिशाभूल केल्याच्या विरोधकांच्या आरोपांनंतर भाजपने आता इराणींचा बचाव सुरू केला आहे. "मंत्र्यांचे वक्तव्य हे पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच होते‘, असा युक्तिवाद करून भाजपने एकप्रकारे या माहितीला स्मृती इराणी जबाबदार नसल्याचे सूचकपणे सांगणे आरंभले आहे. भाजप प्रवक्ते एम. जे. अकबर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची पाठराखण केली. 

स्मृती इराणी यांनी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील घटनाक्रमाबद्दल प्रथम लोकसभेत निवेदन केले होते. लोकसभेतील त्यांच्या प्रभावी भाषणानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "ट्‌विट‘द्वारे अभिनंदन केले होते. एवढेच नव्हे, तर या भाषणाला "सत्यमेव जयते‘चे प्रशस्तिपत्रही दिले होते. त्यानंतर, गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही स्मृती इराणी यांनी परिपूर्ण भाषण करून विरोधकांना सविस्तर उत्तर दिल्याचे उद्‌गार काढले होते. मात्र, त्यांच्या निवेदनानंतर रोहित वेमुलाच्या आई व भावाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मंत्र्यांच्या माहितीत आणि वस्तुस्थितीत तफावत असल्याचा आरोप केला होता. पाठोपाठ राज्यसभेतही यावरून प्रचंड गदारोळ झाला होता. कॉंग्रेसने तर या विसंगत माहितीमुळे संसदेची दिशाभूल झाल्याचा आरोप करून स्मृती इराणींविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याची घोषणा केली आहे. 
=========================================

गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल

गेल्या 25 वर्षांत इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल?
नवी दिल्ली : बजेटच्या तोंडावर इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही बदल होणार आहे का, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र गेल्या 25 वर्षांत टॅक्स स्लॅबमध्ये कसे बदल होत गेले, यावर नजर टाकली तर
वर्ष 1992-93
इन्कम स्लॅब (रुपयांत) : टॅक्स रेट
0 – 22,000 : 0%
22,001 – 30,000 : 20%
30,001 – 50,000 : 30%
50,001 – 1,00,000 : 40%
1,00,001 पेक्षा अधिक : 50%
12 % अधिभार 75 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1993-94
0 – 28,000 : 0%
28,001 – 50,000 : 20%
50,001 – 1,00,000 : 30%
1,00,001 पेक्षा अधिक : 40%
12 % अधिभार 1 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1994-95
0 – 30,000 : 0%
30,001 – 50,000 : 20%
50,001 – 1,00,000 : 30%
1,00,001 पेक्षा अधिक : 40%
12 % अधिभार 1 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 1995-96
0 – 35,000 : 0%
35,001 – 60,000 : 20%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 40%
वर्ष 1996-97
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 20%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 40%
वर्ष 1997-98
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 15%
60,001 – 1,20,000 : 30%
1,20,001 पेक्षा अधिक : 50%
वर्ष 1998-99
0 – 40,000 : 0%
40,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 1999-2000
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2000-01
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
10 % अधिभार 60 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2001-02
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
10 % अधिभार 60 हजारांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2002-03
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2003-04
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2004-05
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
एकूण टॅक्सेबल इन्कम 8.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के अधिभार
वर्ष 2005-06
0 – 50,000 : 0%
50,001 – 60,000 : 10%
60,001 – 1,50,000 : 20%
1,50,001 पेक्षा अधिक : 30%
एकूण टॅक्सेबल इन्कम 8.5 लाखांपेक्षा अधिक असल्यास 10 टक्के अधिभार
वर्ष 2006-07
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,85,000 : 0%
1,85,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,35,000 : 0%
1,35,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,00,000 : 0%
1,00,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2007-08
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,85,000 : 0%
1,85,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,35,000 : 0%
1,35,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,00,000 : 0%
1,00,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2008-09
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 1,95,000 0%
1,95,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,45,000 : 0%
1,45,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,10,000 : 0%
1,10,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2009-10
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,25,000 : 0%
2,25,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,80,000 : 0%
1,80,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,50,000 : 0%
1,50,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास
वर्ष 2010-11
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,40,000 : 0%
2,40,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक :  30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,60,000 : 0%
1,60,001 – 3,00,000 : 10%
3,00,001 – 5,00,000 : 20%
5,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2011-12
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,40,000 : 0%
2,40,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,60,000 : 0%
1,60,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2012-13
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 1,90,000 : 0%
1,90,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 1,80,000 : 0%
1,80,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 8,00,000 : 20%
8,00,000 पेक्षा अधिक : 30%
वर्ष 2013-14
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
इतर सर्व पुरुष, अनिवासी भारतीय
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक: 30%
वर्ष 2014-15
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 5,00,000 : 0%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
0 – 2,50,000 : 0%
2,50,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
60 वर्षांखालील महिला
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
0 – 2,00,000 : 0%
2,00,001 – 5,00,000 : 10%
5,00,001 – 10,00,000 : 20%
10,00,000 पेक्षा अधिक : 30%
10% अधिभार 10 लाखांपेक्षा अधिक असल्यास

No comments: